Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सुरक्षारक्षकांचा हलगर्जीपणा भोवला

$
0
0
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलमधील (वायसीएम) अपुरी सुरक्षाव्यवस्था आणि सुरक्षा रक्षकांचा हलगर्जीपणामुळेच मूल चोरीला गेल्याची घटना घडल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (६ नोव्हेंबर) करण्यात आला. घटनेदरम्यान ड्यूटीवरील महिला सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

आगीची झळ पोहचलेल्यांना मदत

$
0
0
तळवडे-गणेशनगरमधील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीची झळ पोहचलेल्या प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपये मदत देण्याची शिफारस पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने प्रशासनाकडे मंगळवारी (सहा नोव्हेंबर) केली. अध्यक्षस्थानी जगदीश शेट्टी होते.

बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक

$
0
0
लोणावळ्यात बनावट कागदपत्रे आणि मालक तयार करून ती जमीन बळकावून फसवणूक केल्याप्रकरणी तीन जमीन दलालांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, यापैकी तिसरा आरोपी अनिल पंचमुख याचा यापूर्वीच हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

पुणे-पाटणा रेल्वेचे रिझर्व्हेशन सुरू

$
0
0
दिवाळीच्या सुटीनिमित्त पुणे-पाटणा दरम्यान धावणा-या विशेष रेल्वेगाडीचे रिझर्वेशन सात नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

काँग्रेस भवनात इच्छुकांचा मेळा

$
0
0
शहरात विविध भागांमध्ये काम करणारे अनेक नेते आता दिल्लीला जाण्यासाठी इच्छुक झाले आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) पाठविलेले निरीक्षक केवलसिंग धिल्लन यांच्यापुढे शक्तिप्रदर्शन केले.

धुमाकूळ घालणारा वळू जेरबंद

$
0
0
उरळीकांचनमधील शेतक-यांची आणि ग्रामस्थांची झोप उडवणारा वळू अखेर पुणे महापालिकेच्या प्राणी संग्रहालयातील पथकाच्या सहकार्याने जेरबंद करण्यात आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नाट्यसंमेलनात परेश रावल 'लाइव्ह'?

$
0
0
मराठी रंगभूमी आणि प्रेक्षकांना सलाम ठोकणा-या परेश रावल यांना आपल्या अदाकारीने मराठी रसिकांकडून सलाम घेण्याची संधी पुढील महिन्यात मिळू शकणार आहे. परेश रावल यांच्या गुजराती किंवा हिंदी नाटकाचा प्रयोग बारामतीत होणा-या नाट्यसंमेलनात झाला, तर ‘बॉलीवूड स्टार’ची ‘लाइव्ह’ झलक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

पुण्यात डेंगीचे ३७ नवे पेशंट

$
0
0
डेंगीच्या पेशंटची संख्या एका दिवसात झपाट्याने वाढली असून मंगळवारी दिवसभरात ३७ जणांना लागण झाली आहे. डेंगीसह मलेरिया आणि कांजिण्यांचेही प्रत्येकी दोन पेशंट शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची नोंद पालिकेने केली आहे.

बलात्कार, खून करणा-यास फाशी

$
0
0
तिसरीतील मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी एका बिहारी तरुणाला सांगलीच्या सेशन कोर्टाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली. राजू जगदीश पासवान (वय २२, रा. मूळ बिहार) असे गुन्हेगाराचे नाव आहे. गेल्या १५ वर्षांत फाशीची शिक्षा होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

सशस्त्र जमावाचा सख्ख्या भावांवर हल्ला

$
0
0
नात्यातल्या मुलीला पळवून नेणाऱ्याला मदत केल्याच्या संशयावरून आठ ते दहा जणांच्या सशस्त्र जमावाने मंगळवारी (७ नोव्हेंबर) रात्री दोन सख्ख्यां भावांवर हल्ला केला. यामध्ये मोठ्या भावाचा मृत्यू झाला असून, लहान भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फ्लॅटमधून मंगळसूत्र चोरणाऱ्यांना अटक

$
0
0
बंद असलेल्या फ्लॅटचा दरवाजा तोडून २४ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर केल्यावर एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बोस यांनी हा आदेश दिला.

ST च्या जादा बससेवेला चांगला प्रतिसाद

$
0
0
दिवाळीच्या सुटीनिमित्त एसटीकडून सुरू करण्यात आलेल्या जादा बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत सुमारे ५०० गाड्यांचे बुकिंग फुल झाले असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बनावट व्हिसा बनविण्यातही चोरटे माहीर

$
0
0
कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा व्हिसा मिळवून द्यायचा धंदा या आरोपींनी उघडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अहमदाबाद येथील ३० जणांकडून लाखो रुपये उकळत त्यांना गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींकडून विविध देशांचे स्टॅम्प, स्कॅनर मशिन असा विविध प्रकारचा ऐवज जप्त केला आहे.

डासांना दिली ओसरी, डेंगी हातपाय पसरी

$
0
0
कोथरूड ते हडपसर, औंध ते पिंपळे गुरव आणि येरवडा, विश्रांतवाडीपासून अगदी वानवडीपर्यंत डेंगीच्या विषाणूने आपले पाय पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या विविध भागांत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात डेंगीच्या पेशंटची संख्या ५६ झाली आहे.

रक्तपुरवठ्यासाठी आता जिल्हा स्वेच्छिक समिती

$
0
0
डेंगीच्या पेशंटमध्ये ‘प्लेटलेट’ कमी होत असल्याची गंभीर दखल राज्याच्या आरोग्य खात्याने घेतली असून त्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर ‘स्वेच्छिक रक्तसंकलन समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. उन्हाळ्यासह दिवाळीच्या दरम्यान रक्ताचा होणारा तुटवडा दूर करण्यासाठी ही समिती प्रयत्नशील राहणार आहे.

‘PMP’ खासगी ठेकेदाराकडे देण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा

$
0
0
‘पीएमपी’च्या मालकीच्या बस ‘इंधन, चालक आणि देखभाल’ या तत्त्वावर खासगी ठेकेदारास चालविण्यास देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी विविध संस्था-संघटनांनी केली आहे.

‘पीएमपी’ खासगीकरणाच्या प्रस्तावाची फेरनिविदा काढा

$
0
0
‘पीएमपी’च्या दोनशे बसच्या मेन्टेनन्सचे काम खासगी कंपनीकडे सोपविण्याच्या प्रस्तावाची फेरनिविदा काढण्यात यावी, अशी मागणी ‘पीएमपी’च्या संचालकांनी केली आहे. तसेच डेपोसाठी स्वतःची जागा उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीकडेच हे काम सोपवावे, असे पत्र ‘पीएमपी’चे संचालक प्रशांत जगताप यांनी पाठविले आहे.

कम्प्युटरमध्ये फेरफार : गुन्हा दाखल करण्याचा आदेश

$
0
0
महापालिकेच्या मिळकतकर विभागातील कम्प्युटरमध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत घडलेल्या याप्रकरणी मनसेच्या उमेदवाराने कोर्टात धाव घेतली होती.

मंत्रिमंड‍ळ विस्ताराला दिवाळीनंतरचा मुहूर्त?

$
0
0
केंद्रापाठोपाठ राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त साधला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या विस्तारात ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांचा पुनर्प्रवेश होणार का, याचीही उत्सुकता राजकीय क्षेत्रात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला.

‘रक्तपिपासू’ पेढ्यांविरोधात ग्राहक पंचायतीचा लढा

$
0
0
‘शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा दर आकारून रक्ताची विक्री करणाऱ्या शहरातील रक्तपेढ्यांच्या विरोधात ग्राहक पंचायत लढा उभारणार आहे,’ अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे शहराध्यक्ष रमेश टाकळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images