Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

समर्पण वृत्तीच्या शिक्षकांची गरज

$
0
0

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. काकोडकर यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पारंपरिक शिक्षणात मोठी ताकद असली, तरी शिक्षकांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. आपल्याकडे असलेली युवाशक्ती आणि झपाट्याने विकसित होणारे तंत्रज्ञान यामुळे पुढील दहा-पंधरा वर्षांत भारतीयांना मोठ्या संधी आहेत. त्याचा योग्य लाभ घ्यायचा असल्यास समर्पण आणि संशोधक वृत्तीच्या शिक्षकांची फळी तयार होणे आवश्यक आहे,' असे प्रतिपादन पहिल्या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे (मिटसॉग) आयोजित पहिल्या नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या समारोपात डॉ. काकोडकर बोलत होते. या वेळी दिग्दर्शक सिद्धार्थ बसू, ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुहास सुखात्मे, आयआयटी मद्रासचे माजी संचालक डॉ. आर. नटराजन, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्रा. राहुल कराड, प्रा. प्रकाश जोशी आदी उपस्थित होते. डॉ. काकोडकर यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल डॉ. आर. नटराजन आणि डॉ. सुहास सुखात्मे यांना 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. काकोडकर म्हणाले, 'गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक कॉलेजांना स्वायत्तता दिली जात आहे. त्याच्या चाचणीसाठी प्रमाणपद्धती अंमलात आणली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी शिक्षणसंस्थांनी ज्ञान देण्यासह आर्थिक स्रोत उभारण्याला प्राधान्य द्यावे. सरकार किंवा उद्योग क्षेत्राकडून हे स्रोत उपलब्ध होऊ शकतील. शिक्षकांनी आपल्यामध्ये समर्पण आणि संशोधक वृत्ती जोपासायला हवी. त्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे शिक्षकांना मिळणारे वेतन, संशोधन व विकास यावर होणारा खर्च अधिक आहे. त्यामुळे याचा फायदा शिक्षकांनी उठवायला हवा. आपण जे वेतन घेतो, त्याच्या बदल्यात काय देतो, याचाही विचार व्हावा.'
डॉ. नटराजन, डॉ. सुखात्मे यांनीही सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले. नीलम शर्मा, गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भ्रष्टाचाराचे आरोप खोटे?

$
0
0

'अॅँटी करप्शन'कडे तक्रार नाही; पिंपरीत सत्ताधारी आणि विरोधकांत केवळ आरोप-प्रत्यारोप
Rohit.Athavale@timesgroup.com
..
Tweet - @AthavaleRohitMT
पिंपरी : भ्रष्टाचार झाल्याचे सांगून गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा आमने-समाने आले आहेत. परंतु यातील एकाही प्रकरणाची तक्रार अँन्टी करप्शन विभागाकडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा केवळ पब्लिसिटी स्टंट तर नाही ना अशी शंका आता सामान्य नागरिकांना वाटू लागली आहे.
आरोग्य वैद्यकीय विभाग, शिलाई मशिन, सायकल, शालेय साहित्य, प्राणीसंग्रहालय नूतनीकरण, सोनोग्राफी मशिन, पोषण आहार या सारख्या अनेक बाबींमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनेही सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु याबाबत आरोप करणाऱ्यांनी शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली नाही. यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने महापालिकेची सर्वसाधरण सभा देखील तहकूब करण्यात आलेली आहे.
सध्या भाजपाकडून भ्रष्टाचाराबाबत होणाऱ्या टीकेवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी भाष्य केले. 'भाजप सूडाचे राजकारण करीत आहे. केंद्र आणि राज्यात त्यांचीच सत्ता असल्याने महापालिकेत भ्रष्टाचार झाला असेल, तर चौकशी करू शकतात.' त्यांच्यावर पलटवार म्हणून भाजपाचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये 'पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने देवालाही न सोडल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केली आहे,' असे जाहीर केले आहे. हा केवळ नागरिकांना अनेक मूळ मुद्यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे.
विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सांगताना काम लाख रुपयांचे आणि भ्रष्टाचार करोडो रुपयांचा असे आरोप देखील सध्या सुरू आहेत. तर यांचे आरोप कसे चुकीचे हे सांगत महापालिकेतील सत्ताधारी वेळ मारून नेत आहेत. विशेष म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यावर 'चौकशीचा फेरा' सुरू झाल्याचे सांगून काही जणांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. तर दुसरीकडे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तसा आदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगत आंदोलन आणि आंदोलकांची हवा काढून घेतली.
वास्तविक जर महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करायचा असेल तर एकही तक्रार का दाखल झाली नाही हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. काही व्यक्तींनी माहिती अधिकारात माहिती मिळविल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु त्याचे पुढे काय झाले हा मोठा सवाल आहे. चार वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या काही प्रकरणांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. पण त्यानंतर घोंगावणाऱ्या
आंदोलनातून अद्यापपर्यंत तरी काहीच साध्य झालेले नाही.
,.....
सत्ताधारी-विरोधक-प्रशासनाचे साटेलोटे
शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षापासून सत्ता आहे. तर भाजप-शिवसेना व काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहेत. सत्ताधारी-विरोधी आणि प्रशासन यांच्यात उघड-उघड साटेलोट आहे. त्यामुळे केवळ तू मारल्या सारखे कर, मी रडल्यासारखे करतो असे चित्र आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ स्टंटबाजी केली जात आहे. अनेक प्रकरणात भ्रष्टाचार झाला हे देखील खरे आहे. पण यात विरोधी पक्ष आणि प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या साक्षी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्यांचा नवीन गणवेश तयार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्थापनेपासून, म्हणजेच गेल्या ६८ वर्षांपासून प्रचलित असलेला सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा खाकी रंगाचा गणवेश अखेर बदलणार आहे. यापुढे पुरुष चालक, वाहकांसाठी गडद खाकी रंगाचा रिफ्लेक्टर असलेला आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी सलवार-कुर्ता, काठपदराची साडी आणि जॅकेट असा गणवेश असणार आहे.
महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काही महिन्यांपूर्वी गणवेश बदलण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या 'राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट' या संस्थेला नवीन गणवेश तयार करण्याचे काम दिले आहे. संस्थेने नवीन गणवेशाच्या डिझाइनचे नुकतेच सादरीकरण केले.
'राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट'च्या प्रतिनिधींनी राज्यातील आगारांमध्ये जावून एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच, सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील संवाद साधला. त्यातून कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र गणवेशाचे डिझाइन केले. संस्थेचे नुकतेच खारघर येथील संस्थेच्या आवारात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांच्यासमोर गणवेशाच्या निवडक डिझाइनचे सादरीकरणही केले.
चालक-वाहकांबरोबर वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक नियंत्रक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक या संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाचा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. संवर्गानुसार गणवेशाचा खाकी रंग फिकट होत जाणार आहे. त्याचप्रमाणे यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा गणवेश तयार करण्यात आला आहे. संवर्गानुसार हा गणवेश राखाडी रंगाचा होत जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्शांचा दावा नको

$
0
0

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'लोकप्रिय चित्रपट वाईट असतो. ज्यांना असे चित्रपट करायचे आहेत त्यांनी ते जरूर करावेत व पैसे कमवावेत. पण आदर्श चित्रपटाचा दावा करू नये,' अशी टिप्पणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केली. 'लोकप्रिय चित्रपट करताना मला त्रास होत नाही, कारण मी सगळे विसरून व घरी ठेवून असा चित्रपट करतो,' असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचा महाराष्ट्र विभाग यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या 'रसास्वाद सिनेमाचा' या चित्रपट रसास्वाद शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, फेडरेशनचे सचिव सतीश जकातदार, चित्रपट अभ्यासिका डॉ. श्यामला वनारसे या वेळी उपस्थित होते.
या वेळी विक्रम गोखले म्हणाले, 'लोकप्रिय चित्रपटातून पैसे कमवावेत पण तो चित्रपट आदर्श चित्रपट आहे, असा दावा करू नये. त्याबाबतचा स्पष्ट व स्वच्छ दृष्टिकोन कलाकारांकडे असणे आवश्यक आहे. लोकप्रिय आणि वैचारिक चित्रपट यात फरक आहे तो कळायला हवा. चांगला चित्रपट पाहून ते कळू शकेल. त्याला समांतर, कलात्मक असे काही नाव देता येईल.'
'वास्तववादी चित्रपट पाहताना त्रास होतो का? चांगला चित्रपट पाहून आपण अस्वस्थ झालेच पाहिजे. कारण याम माध्यमात अस्वस्थ करण्याची ताकद आहे. सिनेमा माणसाला भिडणारा हवा, त्याची भाषा परीपूर्ण आणि सर्वस्पर्शी हवी. माणसासाठी चित्रपट तयार व्हायला हवा,' असेही त्यांनी या वेळी सांगितले. 'माझे अभिनयाचे ६३ वे वर्ष आहे. या काळात मी शेकडो लोकांबरोबर काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून पहिल्या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर आता लवकरच मराठी, हिंदी व इंग्रजी चित्रपट काढणार आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ चाकणलाच व्हायला हवा होता

$
0
0

पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेचे मत

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

विमानतळ पुरंदर ऐवजी चाकणला झाले असते, तर पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील उद्योगांना चालना मिळाली असती व या परिसराचा विकास झाला असता. परंतु, राज्य सरकारने विमानतळ पुरंरदला हलविण्याच्या निर्णयाबाबत पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी-चिंचवड लघुद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व सचिव जयंत कड यांनी लेखी निवेदन दिले आहे.

बेलसरे यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, 'तळेगाव, रांजणगाव, चाकण, पिंपरी, चिंचवड व औद्योगिक परिसरामध्ये एकूण बारा ते पंधरा हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. कित्येक नवीन कंपन्या येत आहेत. यामध्ये अनेक नामंकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ औद्योगिक वसाहतीजवळ होणे आवश्यक होते. पण पुरंदरला होणाऱ्या विमानतळाचा या औद्योगिक वसाहतींना काही फायदा होणार नसल्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे.'
चाकणमध्ये विमानतळ होणार अशी चर्चा गेल्या १५ वर्षांपासून सुरू होती. निमगाव, कनेरसर परिसरात खेड सेझच्या जागेत विमानतळ होणार असे जाहीर झाले. पण शेतकऱ्यांनी या सर्वच जागांना विरोध केल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी पुरंदर तालुक्यातील जागेची पाहणी केली. या ठिकाणी तळेगाव, रांजणगाव, चाकण, पिंपरी, चिंचवड या औद्योगिक परिसरामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय वाहन निर्मिती कंपन्या कार्यरत आहेत. यासाठी उद्योजक व परदेशी तंत्रज्ञ यांच्यासाठी चाकणला विमानतळ होणे गरजेचे होते, असेही संघटनेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनांचा प्रवाहो चालला...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एक दिवस समाजासाठी' म्हणत रविवारी पहाटेपासूनच जिल्ह्यातील मराठा आबालवृद्धांसह महिलांनी डेक्कनची वाट धरली. संपूर्ण डेक्कन परिसर जणू भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. संयोजकांच्या सूचनांनुसार स्वयंसेवक मोर्चाची शिस्त अबाधित राहील, याची दक्षता घेत होते. दहा वाजून २८ मिनिटांनी उरीमधील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंची गर्दी जागीच स्तब्ध झाली. लगेचच युवतींनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि क्षणार्धात हा जनांचा प्रवाह शिस्तीत मार्गक्रमण करू लागला.

नेटके पूर्वनियोजन आणि त्या नियोजनाची चपखल अंमलबजावणी यामुळे कोणत्याही गडबड गोंधळाशिवाय, अतिशय शिस्तीत हा मोर्चा संभाजी महाराज पुतळा, खंडुजीबाबा चौक, लकडी पूलमार्गे लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ झाला.

पहाटे पाच साडेपाचपासूनच शहराच्या नव्हे तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील आबालवृद्ध महिलांनी डेक्कनची वाट धरली होती. आठच्या सुमारास या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्यास सुरुवात झाली. उंचच उंच भगवे ध्वज, भगव्या टोप्यांमुळे अवघा परिसर भगवामय झाला होता. पारंपरिक वेशात आलेल्या महिला, लहान मुले आणि नागरिकांमुळे वातावरणाला ऐतिहासिक झालरही लाभत होती.

मोर्चाच्या नियोजनाविषयी ध्वनिवर्धकावरून सातत्याने सूचना दिल्या जात होत्या. मोर्चाचे नेतृत्व महिला करतील, महिला व युवतींच्या मागे वकिल वर्ग त्यांच्या मागे डॉक्टर आणि मग सर्व इतर समाजबांधव अशी ही रचना होती. सुरुवातीलाच त्याप्रमाणे महिलांना सर्वात पुढे उभे करण्यात आले होते.

हा मोर्चा मूक मोर्चा आहे. कोणीही कोणत्याही प्रकारच्या घोषणा देऊ नयेत, अशा सूचना सातत्याने दिल्या जात होत्या. मात्र, भारावलेल्या वातावरणात एखाद्याकडून घोषणा दिली गेलीच, तर त्याला समजावण्यासाठी अनेक ज्येष्ठ धाव घेत होते. मोर्चासाठी नेमण्यात आलेले स्वयंसेवक आणि सुरक्षा अधिकारी जातीने सर्वत्र लक्ष देत होते. मोर्चा सुरू होण्यापूर्वीच सर्वांना पाण्याची बाटली, चॉकलेट आणि टोपी मिळेल, याची व्यवस्था केली गेली होती.

मूक मोर्चा असल्याने अनेकांनी आपल्या मागण्यांचे फलक आणले होते. मोर्चा सुरू व्हायला वेळ असल्याने अनेकांनी सेल्फी, ग्रुफ्फीसोबतच फोटोही काढण्याला पसंती दिली. बालशिवाजीच्या वेशात आलेली मुले आणि पारंपरिक वेषात आलेल्या नागरिकांसोबतही आवर्जून सेल्फी किंवा फोटो घेतला जात होता.

मोर्चा सुरू होण्याची वेळ जवळ येऊ लागली तशा सूचनाही वाढल्या. सव्वादहाच्या सुमारास मोर्चाची रचना पूर्ण झाली होती. आपापसात सुरू असलेल्या गप्पाही थांबल्या. साडेदहापूर्वी दोन मिनिटे उरी येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या वेळी ही लाखोंची गर्दी एकदम स्तब्ध झाली होती. त्यानंतर लगेचच युवतींनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि पुढच्याच क्षणी महिलांच्या नेतृत्वात हा मोर्चा विधान भवनाच्या दिशेने मार्गस्थही झाला.

मोर्चासाठी चारही दिशांनी सातत्याने नागरिकांचे लोंढे येत होते. त्यामुळे संयोजकांनी जंगली महाराज रस्त्याकडून महिलांना पुढे जाऊ दिले. त्यानंतर डेक्कनकडे येणाऱ्या प्रत्येक मोठ्या रस्त्यावरून पाच-पाच मिनिटे नागरिकांना मोर्चात सहभागी करून घेतले जात होते. मात्र, या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने मोर्चा सुरू होऊन तास-दीड तास लोटला, तरी जंगली महाराज रस्ता संभाजी बागेपुढेही गर्दीने खचाखच भरलेला होता. परंतु, कोणतीही तक्रार न करता प्रत्येक जण आपल्याला नेमून दिलेल्या मार्गानेच मार्गक्रमण करत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात लाखो मराठ्यांची मूक गर्जना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोणतीही घोषणा नाही, भाषण नाही आणि गडबड-गोंधळही नाही...! शांतता आणि संयमातही किती प्रचंड शक्ती असते, याची प्रचिती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जमलेल्या विराट जनसमुदायाने रविवारी पुणेकरांना दिली; मात्र हा मूक मोर्चा असला, तरी या शांततेतूनच समाजाने केलेल्या गर्जनेने पुण्याचा आसमंत दुमदुमला. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ निघालेला हा मोर्चा पुण्याच्या इतिहासातील अभूतपूर्व ठरला.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती (मूक) मोर्चाने रविवारी पुण्यात धडक दिली. शहरातील सर्व रस्त्यांवर सकाळपासूनच 'एक मराठा, लाख मराठा'चा हुंकार पसरला अन् जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांनी विक्रमी गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयात सांगता झाली. सर्वच राजकीय नेत्यांना या वेळी मागे ठेवण्यात आले आणि समाजातील रणरागिणींनी मोर्चाचे नेतृत्व केले. शहराकडे येणारे सर्वच रस्ते दिवसभर भगव्या झेंड्यांनी आणि नागरिकांनी फुलून गेले होते. या अलोट मोर्चाचे नियोजन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यापुढील काळातही आठवणीत राहील, असाच ठरला.

दरम्यान, मोर्चासाठी केवळ मराठा समाजामधूनच नव्हे, तर इतर समाजबांधव आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोलाचे सहकार्य केल्याचे अनुभवायला मिळाले. मोर्चात सहभागी नागरिकांना पिण्याचे पाणी, अल्पोपाहार वाटप करून इतर समाजबांधवांनीही या मोर्चाच्या यशस्वीतेमध्ये खारीचा वाटा उचलला.

वाहतूक कोंडी नाही

मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरूनही नागरिक लाखोंच्या संख्येने पुण्यात आले. त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांसह १८ रस्ते बंद करण्यात आले होते. यानंतरही शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र, मोर्चा संपल्यानंतर परतीच्या मार्गावर वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक काही प्रमाणात धीम्या गतीने सुरू होती.

मोर्चासाठी पुण्याबाहेरील बहुतांश नागरिक हे खासगी वाहनांनी शहरात दाखल झाले होते. सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग या रस्त्याने नागरिक आले. या सर्व रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला नाही. तसेच, सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत आवश्यकतेशिवाय बाहेर पडू नये, या वाहतूक पोलिसांच्या आवाहनालाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरही गर्दी कमी होती. वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे कोंडीची परिस्थिती निर्माण झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाज बोलत नाही; सरकारनेच समजून घ्यावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मराठा समाज बोलत नाही तोपर्यंत सरकारने आता समजून घ्यायला हवे. मराठा बांधवानो आता एक व्हा, जागे व्हा आणि जागृत व्हा,' अशा शब्दांत मोर्चातील उपस्थित लाखोंच्या समुदायाला रणरागिणींनी आवाहन केले. आता मुंबईतच नव्हे तर दिल्लीतही मराठ्यांचा आक्रोश पोहोचविला जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायापासून प्रवेशापासून नोकरीत नाकारली जाणारी संधी अशा मुद्द्यांवर समाजाच्या भावनांना या मुलींनी वाट करून दिली.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोर्चा विधानभवन चौकात पोहोचला. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रतीक्षा गव्हाणेने पुष्पहार अर्पण केला. शुभदा येवलेने निवेदनाचे वाचन केले. या वेळी मोहिनी पलांडे, अर्चना भोर, सुचित्रा भालेराव या तरुणींनी परखड शब्दांत आपले मनोगत व्यक्त केली.

'मराठ्यांना प्रत्येक क्षेत्रात मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजव्यवस्था बदलत नाही, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही. शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. सरकार स्मारक बांधणार नसेल, तर राज्यातील मराठा एकत्र येऊन ९०० कोटी रुपयांचा निधी गोळा करून स्मारक तयार करू. दुसऱ्यांच्या ताटातील आम्हाला भाकरी नको. तर आमच्या हक्काची, वाट्याची भाकरी हवी आहे,' अशी भावना मोहिनीने व्यक्त केली, तेव्हा लाखोंच्या जनसमुदायात गंभीर शांतता निर्माण झाली.

मनोगतात मोहिनीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणाऱ्या दरापासून ते त्यांच्या आत्महत्येपर्यंत आणि मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजात मिळणाऱ्या प्रवेशापासून ते नोकरीपासून वंचित या मुद्द्यांवरून उपस्थितांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांसाठी सरकार काय योजना करीत आहे असा सवाल करीत ती म्हणाली, 'सरकार एक रुपया देते आणि शेतकऱ्यांपर्यंत १४ पैसेदेखील पोहोचत नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे मुलामुलींचे शिक्षण, मुलींची लग्ने कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असल्याने त्यांना आत्महत्या करावी लागत आहे. राज्यात ९० टक्के शेतकरी हा मराठी बांधव आत्महत्या करणारा आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय केले?'

'ज्यांना जमीन नाही त्यांना अनुदान दिले जाते आणि जमीन असलेल्यांना अनुदान अद्याप मिळत नाही. प्रवेशापासून आरक्षण सुरुवात होते. सरकार स्मार्ट सिटी करायला निघाले आहे आणि ग्रामीण भागाचा निधी शहराकडे वळविला जात आहे,' असा आरोपही तिने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलयुक्त शिवार पाणीदार

$
0
0

बारामतीच्या पश्चिम भागात अखेर वरुणराजाची कृपा

म. टा. वृत्तसेवा, बारामती
बारामतीच्या कायम दुष्काळी असलेल्या पश्चिम भागात अखेर वरुणराजाने कृपा केल्याने शिवारातून वाहून जाणारे लाखो लिटर पावसाचे पाणी गावच्या बांधाभोवती साठविण्याची किमया जलयुक्त शिवारने साधली आहे़. गेल्या चार वर्षांत निर्माण झालेली पाण्याची टंचाई त्यामुळे काही प्रमाणात भरून निघण्यास मदत झाली असून, गावोगावच्या शिवारात पाणी पाहायला मिळाले आहे.

बारामतीच्या जिरायत भागात प्रशासन, लोकसहभाग आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या जलयुक्त शिवारातील कामे पूर्ण झाल्यामुळे या गावांत पाणी उपलब्ध झाले आहे. यात एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेचा सिहांचा वाटा असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. जलयुक्त शिवार ही लोकचळवळ राहिली तर जिरायत भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही येथील नागरिकांनी व्यक्त केला. विविध कामांमध्ये अंदाजे ८३०.२४ टीसीएम पाणीसाठा होणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिरायत भागात झालेल्या कामांमुळे या भागाचे चित्र बदलण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, बाराही महिने आम्ही हे काम सुरूच ठेवणार असून या कामांचा अधिकाधिक फायदा टंचाईमुक्तीसाठी व्हावा असे प्रयत्न आहेत, असे एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढीव खर्चाला मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने गेल्या सात महिन्यांत ऐनवेळच्या प्रस्तावांच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असून, त्यामध्ये १३५ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाचा समावेश आहे. या वाढीव खर्चाच्या प्रस्तावांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरसेविका सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, गेल्या सात महिन्यांत स्थायी समितीच्या ३१ बैठका झाल्या. त्यामध्ये ऐनवेळच्या प्रस्तावांच्या माध्यमातून २०४ कोटी रुपये २६ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये १३५ कोटी ८३ लाख रुपयांच्या वाढीव खर्चाचा समावेश आहे. प्रस्ताव रितसर विषयपत्रिकेवर आणणे आवश्यक असताना घाईने मोठ्या प्रमाणावर ऐनवेळी प्रस्ताव आणण्याचे प्रयोजनच काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. नागरिकांनी कररुपाने भरलेल्या पैशांची उधळपट्टी आणि लूट असल्याचा तसेच वाढीव खर्चाच्या नावाखाली निवडणूक फंड गोळा करीत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

महापालिकेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या अनेक वस्तू आणि विविध विकासकामांच्या खर्चांना स्थायी समितीची मंजुरी घेतली जाते. या बैठकीत शहरातील जनतेच्या कल्याणासाठी निर्णय घेण्याऐवजी स्वहित आणि टक्केवारी मिळाली तरच विकासकामांना मंजुरी देणारी समिती म्हणून गवगवा होतो आहे. आता तर स्थायी समितीने ठेकेदार, आर्किटेक्ट आणि पुरवठादारांना वाढीव खर्चाच्या नावाखाली सुमारे शंभर कोटी रुपये खर्च केल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय विविध कामांना सल्लागार नेमण्यासाठीही ४० ते ४५ कोटी रुपये उधळण्यात आले आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.

वाढीव खर्च मंजूर करण्यासाठी मिळालेल्या टक्केवारीचे पैसे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत खर्च करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा हेतू आहे. वाढीव खर्च म्हणजे करदात्या नागरिकांनी घाम गाळून कररुपाने भरलेल्या पैशांवर एकप्रकारे दरोडाच आहे. त्यामुळे ठेकेदारांना वाढीव खर्च देण्यासाठी मंजूर केलेले प्रस्ताव रद्द करण्यात यावेत. तसेच या सर्व खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी सावळे आणि शेंडगे यांनी केली आहे.


'नियमानुसारच कामकाज'

महापालिकेत सातत्याने विकासकामे होत आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या पायाभूत सुविधांच्या बाबतीत पिंपरी-चिंचवड अग्रेसर आहे. ऐनवेळचे प्रस्ताव, वाढीव खर्च या प्रशासकीय बाबी आहेत. नियमानुसारच कामकाज होते. त्यामुळे एखाद्याला एकदम साक्षात्कार होऊन सगळीकडे भ्रष्टाचार कसा दिसू लागतो? हेच समजत नाही. बिनबुडाचे आरोप करण्यात अर्थ नाही. शहराचा विकास जनतेसमोर आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे विरोधकांच्या हाती काही नाही. निवडणूक फंड गोळा करीत असल्याचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावेत.

- संजोग वाघेरे-पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पिंपरी-चिंचवड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाइन शॉपला लोणावळ्यात आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळ्यातील कुमार रिसॉर्ट समोरील गणेश कॉर्नर इमारतीतील वाइन शॉपला रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लागलेल्या आगीत वाइन शॉप पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत वाइन शॉपचे सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले असून, वाइन शॉपजवळील काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. पहाटे साडेचारला पुन्हा याच वाइन शॉपला पुन्हा आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टसमोर असलेल्या वीके वाइन शॉप रात्री दहा वाजता बंद करण्यात आल होते. दुकान बंद केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत अचानक आग लागली. आगीची माहिती कळताच दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दुकान उघडून जवळ असलेल्या पेट्रोल पंपावरून अग्निशामक पंप घेऊन आग आटोक्यात आणून, पुन्हा दुकान बंद केले होते. पुन्हा काही मिनिटांत दुकानाला आग लागली. या आगीत दुकानातील एका फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. काही मिनिटात संपूर्ण दुकान जळून खाक झाले. दुकानातील मद्याच्या बाटल्यामुळे आग आणखी भडकत होती. लोणावळा नगरपालिकेच्या अग्निशामक बंबानंतर आयएनएस शिवाजी, आयआरबी व तळेगाव नगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सहा बंबांच्या साह्याने अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाला डोसा, वॉटर पार्कसाठी घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मसाला डोसा खाण्यासाठी, तर कधी वॉटर पार्कमध्ये खेळायला जाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून घरफोडी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना भोसरी पोलिसांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेतले. या तिघांकडून तीन लाख २९ हजारांचे सोने-चांदीचे दागिने, नऊ मोबाइल, काही घड्याळे जप्त करण्यात आले आहेत.

सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक दिलीप कुलकर्णी, अजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांमध्ये घरफोडीच्या काही घटना घडल्या होत्या. त्याच्या तपासादरम्यान, १३ ते १५ वर्षांची मुले चोरी झाली त्या ठिकाणी घुटमळताना काही लोकांनी पाहिले होते. त्यामुळे खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांवर काही दिवस 'वॉच' ठेवण्यात आला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि त्यांचे राहणीमान यावरून संशय आल्यावर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यावर या मुलांनी भोसरी, मोशी आणि परिसरात अनेक ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. हातात एक लोखंडी सळई घेऊन ही मुले घरांचे कुलूप, कडी-कोयंडा उचकटत होते. जर कोणी पाहिलेच तर यांचाच एक साथीदार 'अरे आई तुला बोलावत आहे, किती वेळ खेळतो' असे म्हणून इमारतींमधून घेऊन जात असे. त्यामुळे लोकांना कधी संशय येत नव्हता. या मुलांची घरची परिस्थिती बिकट आहे. तिघांपैकी कोणाला आई, तर कोणाला वडील नाहीत. एकाचे वडील अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यातून केवळ हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर जाऊन मसाला डोसा खाण्यासाठी चोऱ्या करण्यास सुरुवात केली. सलग घरफोडीचे गुन्हे होण्यास सुरुवात झाल्यावर आणि अनेक सराईतांकडे सहायक निरीक्षक योगेश आव्हाड, फौजदार प्रमोद कठोरे, सहाय्यक फौजदार तात्या तापकीर, सचिन चव्हाण, कर्मचारी पाटील, लांडगे, श्रीसुंदर, धनगर, म्हसकर, महा‌डिक, खाडे, विधाते, रासकर, तेलेवार आदींच्या पथकाने चौकशी केली. त्यानंतर वरील तीन अल्पवयीन मुलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

वॉटर पार्क, सिनेमाही!

सुरुवातीला काही घरांमधून एखादा मोबाइल, शे-पाचशे रुपयांची चोरी करून या मुलांनी ७-८ तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने, इम्पोर्डेट मनगटी घड्याळे चोरली आहेत. जास्त पैसे मिळाल्यावर ही मुले कधी वॉटर पार्कमध्ये जाऊन खेळत; तर कधी एखादा सिनेमा बघत होते. शे-पाचशे रुपये चोरीला गेल्यावर अनेकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारच दाखल केली नाही. त्यामुळे या मुलांचेही फावल्याचे सहायक आयुक्त राम मांडुरके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणारे पालघरमध्ये अटकेत

$
0
0

पिंपरी : बंद घरांचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने पिंपरी खराळवाडी आणि परिसर चोरी करणाऱ्यांना पिंपरी पोलिसांनी पालघर येथून अटक केली आहे. त्याच्याजवळून १४ तोळे सोन्यासह, एक लॅपटॉप, एक दुचाकी व एक कार असा ९ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राहुल ऊर्फ शेंड्या सीताराम थोरात, (२४, रा. वाकीपाटा नायगाव पूर्व, ता. वसई जि. पालघर) याच्यासह रणवीर सिंह बलबीरसिंग सहोता, (२५, रा. एमआयडीसी, भोसरी) अक्षय सोनवणे (२०, रा. रत्नदीप हाउसिंग सोसायटी, निगडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलिस आयुक्त राम मांडुरके व वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, मसाजी काळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, खराळवाडी आणि परिसरात घरफोडीचे गुन्हे घडले होते. त्याबाबत आरोपींनी गुन्हे केल्याची माहिती पोलिस शिपाई उमेश वानखेडे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यावरून मंगळवारी (२० सप्टेंबर) पालघर येथे फौजदार श्रीनिवास कामुनी, हरीश माने, बाळासाहेब आंतरकर यांच्यासह सहायक फौजदार अरुण बुधकर, हवालदार राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, शाकीर जिनेडी, विवेकानंद सपकाळे, प्रभाकर खणसे, महादेव जावळे, शैलेश मगर, दादा धस, अमोल जगताप, सुहास डंगारे, उमेश वानखेडे, संतोष भालेराव आदींची तीन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी पालघर येथे आरोपी राहत असलेल्या घराला वेढा घातला होता. आरोपी सराईत असल्याने ते पळून जाण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी घेतली होती. परंतु आरोपींनी आपल्याला घेरले गेल्याचे समजल्याने डोक्याने सिमेंटचा पत्रा फोडून छतावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात आरोपींच्या डोक्याला दुखापतही झाली. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना अटक केली. या तिघांकडून चोरीचे अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. फौजदार हरीश माने तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-लोणावळा मार्गास महापालिकेचा ‘रेड सिग्नल’

$
0
0

आर्थिक सहभाग न देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरालगतच्या उपनगरीय रेल्वे सेवेला चालना देण्याकरिता 'पुणे-लोणावळा' दरम्यान नवीन रेल्वे मार्ग (तिसरी लाइन) टाकण्यासाठी पुणे महापालिकेच्या हिश्श्याचा आर्थिक सहभाग न देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने एकमताने मान्य केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेने काही दिवसांपूर्वी या मार्गासाठी आर्थिक भार उचलण्यास नकार दिला होता. त्यामुळे, पुणे-लोणावळा दरम्यान नव्या रेल्वेमार्गाचा विस्तार कागदावरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने काही महिन्यांपूर्वीच निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर महापालिकेची हद्द अतिशय मर्यादित असून, नव्या रेल्वेमार्गाचा फायदा शहरातील नागरिकांना होणार नाही, असा दावा केला गेला. सोमवारी हाच प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आला. त्यावेळी, पुणे-लोणावळा लोहमार्गासाठी आर्थिक सहभाग न देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही काही महिन्यांपूर्वीच अशाच तऱ्हेने नव्या रेल्वेमार्गासाठी आपला हिस्सा उचलण्यास नकार दिला होता. आत्तापर्यंत केवळ 'पीएमआरडीए'ने ३८० कोटी रुपयांचा खर्च उचलण्यास मान्यता दिली आहे. परंतु, उर्वरित खर्च उभारण्यास पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी नकार दिल्याने हा प्रकल्प बारगळण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्प गतीने मार्गी लावण्यासाठी केंद्र-राज्य सरकारच्या भागीदारीतून 'स्वतंत्र कंपनी' (एसपीव्ही) स्थापन करण्यात आली आहे. पुणे-लोणावळा दरम्यान सध्या दोन रेल्वेमार्ग आहेत. परंतु, या मार्गावर असणारा लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा ताण लक्षात घेता, उपनगरीय सेवेसाठी स्वतंत्र मार्गाची गरज व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने, या प्रकल्पाला चालना देण्यासाठी दोन हजार ३०६ कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी, निम्मा म्हणजेच एक हजार १५३ कोटी रुपये पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी उपलब्ध करून द्यावे, असा प्रस्ताव राज्य सरकारने सादर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय श्रेयवादावरून नुरा कुस्ती

$
0
0

सर्वसाधारण सभेत निधीच्या वर्गीकरणावरून जुंपली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी चार महिनेच राहिले असल्याने प्रभागातील विकासकामांच्या निधीपासून ते शहरातील विविध प्रकल्पांच्या श्रेयवादावरून सोमवारी सर्वसाधारण सभेत राजकीय वातावरण गरम झाले. पुढील महिन्यात प्रभागांच्या हद्दी निश्चित झाल्यानंतर महापालिकेत येणाऱ्या सदस्यांची संख्या रोडवण्याची शक्यता असल्याने सोमवारच्या सभेत प्रभागातील विकासकामांना वर्गीकरणाद्वारे जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा जोरदार प्रयत्न सर्वपक्षीय सदस्यांनी केला.
महापालिकेच्या सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर वर्गीकरणाचे अनेक विषय होते. निवडणुकीपूर्वी बहुतेक सदस्यांना प्रभागात विविध विकासकामांचा शुभारंभ करायचा आहे, तर अनेकांना अपूर्ण कामे पूर्णत्त्वास न्यायची आहेत. त्यामुळे, वर्गीकरणाचे विषय प्राधान्याने घेतले जात होते. त्यात, शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद होती. ही तरतूद १४ प्रभागांमध्ये वळवून विविध विकासकामे करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, हे सर्व प्रभाग केवळ स्थायी समितीमधील सदस्यांचे असल्याने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी त्याला तीव्र विरोध केला. इतर सदस्यांनीही त्याला आक्षेप घेत, आम्हांलाही वर्गीकरण मिळायला हवे, असा आग्रह धरला. अखेर, हा प्रस्तावच दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेच्या मुख्य खात्यांमार्फत शहराच्या विविध भागांत करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या सुविधांसाठी ठेवलेल्या तरतुदीची याच पद्धतीने मोडतोड करण्यात आली. उद्यानांच्या विकासापासून ते रस्त्यांच्या पुर्नडांबरीकरणापर्यंतचा निधी अनेक सदस्यांनी आपापल्या प्रभागासाठी वळवून घेतला. काही ज्येष्ठ सदस्यांनी विरोध केल्यानंतर त्यांचा मान राखण्यासाठी असे प्रस्ताव मान्य करण्याऐवजी 'वगळण्याचे' सौजन्य दाखवले गेले.
महापालिकेतील प्रत्येक सदस्यालाचा उर्वरित चार महिन्यांसाठी अतिरिक्त निधी हवा असल्याने वर्गीकरण मान्य करण्यासाठी त्यांच्याकडून आग्रह धरला जात होता. सर्व पक्षांचे गटनेते परस्परांशी चर्चा करून, कधी सदस्याचे मत विचारात घेत, तर कधी त्याच्या मताविरोधात प्रस्ताव मान्य/अमान्य करण्याचा निर्णय घेत होते. काही प्रस्तावांना सत्तेतील भागीदार असलेल्या काँग्रेसने विरोध केला, तर इतर पक्षांचे सहकार्य घेत आणि काही प्रस्तावांना भाजप-सेनेने विरोध केल्यास काँग्रेस-मनसेला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसने बहुसंख्य प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मान्य केले.
.................
'मेट्रो'वरून खडाजंगी
शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पावरूनही सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार शा‍ब्दिक युद्ध रंगले. सुरुवातीला, शिवसृष्टीसाठीच्या पाच कोटी रुपयांच्या वर्गीकरणाला काँग्रेस-मनसेने विरोध केला. राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनीही शिवसृष्टीबद्दल महापौरांनी चार महिन्यांपूर्वी घेतलेल्या बैठकीनंतर पुढे काय झाले, अशी विचारणा केली. त्यानंतर, मेट्रो प्रकल्पाच्या तरतुदीपैकी सात कोटी रुपये 'पीएमपीएमएल'च्या डेपोंच्या दुरुस्तीसाठी वर्गीकरण करण्यावरून सभागृह नेते बंडू केमसे आणि भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्यात खडाजंगी झाली. दोन वर्षांत भाजप सरकारला मेट्रो मान्य करता आली नसल्याचा आरोप केमसे यांनी केला. तर, १५ वर्षांत तुम्ही काय केले? अशी विचारणा करून मेट्रोचे भूमिपूजन आम्हीच करणार, असे प्रत्युत्तर बिडकर यांनी दिले.
०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलेच्या आस्वादाची प्रक्रिया ढोबळ

$
0
0

कवी संदीप खरे यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कवितेवर दुर्बोध असा शिक्का मारून कवितेच्या आस्वादाची प्रक्रिया आपण ढोबळ केली आहे. चांगला कलाकार असण्यापेक्षा चांगला रसिक असणे गरजेचे आहे. त्यासाठी सीमेच्या पलीकडील काही तरी शोधण्याची गरज आहे. कलाकृतींकडे एकांगी नजरेने पाहू नये. कविता हा न संपणारा शोध आहे,' अशा शब्दांमध्ये प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनी आपला कवितालेखनाचा प्रवास उलगडला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'एक कवयित्री, एक कवी' या कार्यक्रमात डॉ. संगीता बर्वे व संदीप खरे यांच्या कवितांचा प्रवास रसिकांना अनुभवता आला. अॅड. प्रमोद आडकर व उद्धव कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी परिषदेचे विश्वस्त उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. हळुवार पण मनाला भिडणाऱ्या कवितांच्या माध्यमातून खरे व बर्वे यांनी कवितानिर्मितीचा प्रवास उलगडला. रसिकांनी तुडुंब भरलेल्या माधवराव पटवर्धन सभागृहात कवितेतील शब्दांगणिक हशा-टाळ्यांची बरसात झाली.
या वेळी बोलताना खरे म्हणाले, 'कविता हे वेलीवर येणारे फूल आहे. त्यातील आनंद व बीज महत्त्वाचे असून कवितेचे फूल उमलण्याची काळजी करण्याची गरज नसते. कोणी तरी चार पायऱ्या खाली येऊन रसिकांना साहित्याची प्रक्रिया सोप्या शब्दांत सांगायला हवी. पण रसिकांचीही तितकीच जबाबदारी असून त्यांनीही साहित्यापर्यंत पोहोचायला हवं.' बर्वे म्हणाल्या, 'माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला शांता शेळके यांनी स्वत:हून प्रस्तावना लिहून दिली. तेव्हा डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. बालवाङ्मय मला सुचत गेले. बालसाहित्यामुळे बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशील मुनहोत यांची हकालपट्टी

$
0
0

'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या अध्यक्षांवर निवृत्तीआधी चार दिवस कारवाई

Prasad.Panse@timesgroup.com

Tweet : PrasadPanseMT


'बँक ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनहोत यांची अखेर केंद्र सरकारने सोमवारी हकालपट्टी केली. मुनहोत यांच्या निवृत्तीला केवळ चार दिवस राहिले असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पदाचा गैरवापर करून मुनहोत यांनी एकाच वेळेस दोन सरकारी घरे बाळगण्यासह, या घरांच्या नूतनीकरणावर कोट्यवधींची उधळण केल्याची बाब 'महाराष्ट्र टाइम्स'ने सर्वप्रथम उघड केली होती.

'नॅशनलाइज्ड बँक्स मॅनेजमेंट अँड मिस्लेनियस प्रोव्हिजन स्कीम'नुसार केंद्र सरकारला असलेल्या अधिकारांनुसार सुशील मुनहोत यांची 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या वेबसाइटवरील गॅझेटमध्ये म्हटले आहे.

मुनहोत यांनी पदाचा दुरुपयोग करून एकाच वेळेस बँकेच्या मालकीच्या दोन घरांचा वापर केला. याबाबत ओरड झाल्यानंतर त्यांनी बँकेच्या अध्यक्षांच्या पारंपरिक बंगल्याचे कागदोपत्री रूपांतर 'गेस्ट हाउस'मध्ये केले. मुंबईतील गडकरी चौकातील 'गेस्ट हाउस'चे रूपांतर त्यांनी अध्यक्षांच्या क्वार्टरमध्ये केले आणि या दोन्ही घरांचा स्वतःच्या कुटुंबासाठी वापर केला. त्याचबरोबर या घरांच्या नूतनीकरणासाठी तब्बल सव्वा कोटी रुपयांहून अधिक रक्कम बँकेच्या तिजोरीतून खर्च केली होती.

भारतीय मजदूर संघाच्या माहिती अधिकार विभागाचे सुहास वैद्य व सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारातून ही बाब उघड केली व त्याबाबत तक्रारही केली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या कृषी कृती दलाचे विशेष निमंत्रित मदन दिवाण यांनी मुनहोत यांच्यावर कारवाई होण्यासाठी अर्थ मंत्रालयासह पंतप्रधान कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला होता.

'महाराष्ट्र टाइम्स'ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे अर्थ मंत्रालयाने याबाबत मुनहोत यांना 'तुम्हाला बडतर्फ का करू नये,' अशा आशयाची नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागवला होता. त्याचप्रमाणे बँकेच्या संचालक मंडळाकडूनही याबाबतचे मत मागवण्यात आले होते.

संचालक मंडळाच्या या बैठकीसही मुनहोत यांनी उपस्थित राहू नये, असे आदेश देण्यात आले होते. अध्यक्षांनाच संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित न राहण्याचे आदेश देण्याची ही ऐतिहासिक कृती होती. या संदर्भात केंद्र सरकारनेच योग्य ती कार्यवाही करावी, असे संचालक मंडळाने बहुमताने कळवले होते. त्यानंतर मुनहोत यांची गच्छंती अटळ मानली जात होती. या बैठकीनंतर मुनहोत प्रत्यक्ष कामकाजामध्येही सहभागी होत नव्हते; पण आपली हकालपट्टी टाळण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. निवृत्तीसाठी चारच दिवस राहिल्याने 'मुनहोत सन्मानाने निवृत्त होणार,' असेच त्यांचे समर्थक सांगत होते; मात्र अखेर मुनहोत यांचा कार्यकाल संपण्याआधी चार दिवस त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.


सूत्रे रवींद्र मराठेंकडे

सुशील मुनहोत यांच्यानंतर बॅँकेची सूत्रे रवींद्र मराठे यांच्याकडे जाणार हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनी सोमवारी मुंबईत कार्यभार स्वीकारला.

............

६५८ कोटींचा गैरव्यवहार

सुशील मुनहोत यांच्याच काळामध्ये बँकेमध्ये 'चालक से मालक' या योजनेमध्ये ६५८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचेही 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघडकीस आणले होते. त्यांच्यावर कारवाई होण्यामध्ये या प्रकरणाची प्रत्यक्ष दखल घेतली गेल्याचे दाखविले जात नसले, तरीही या प्रकरणाची 'सीबीआय'च्या माध्यमातून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुनहोत यांच्या गच्छंतीमध्ये या प्रकरणाचाही अप्रत्यक्षपणे मोठा भाग असल्याचे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साथ नियंत्रणासाठी एक हजार कर्मचारी रस्त्यावर

$
0
0

शहरात विविध भागात औषध व धूर फवारणी सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील डेंगी, चिकुनगुनियाच्या वाढत्या साथीचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाच्या मदतीला घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांची फौज देण्यात आली आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागासह अन्य असे एक हजार कर्मचारी रस्त्यावर उतरणार असून, विविध भागात जाऊन औषध तसेच धूर फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे. याच दरम्यान शहरातील तीन नगरसेवकांच्या घरात डासांची अंडी सापडल्याचे सांगण्यात आले.
'गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने औषध व धूर फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. सुशिक्षित व्यक्तींच्या घरात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले आहे. नागरिकांनी घरापासून काळजी घेणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. महापौरांच्या आदेशानंतर आता घनकचरा विभागाचे चारशे कर्मचारी प्राप्त होणार आहेत. त्यापैकी दोनशे कर्मचारी मदतीला मिळाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासह घनकचरा विभागाचे असे एक हजार कर्मचारी डेंगी, चिकुनगुनियाच्या साथ नियंत्रणाचे काम करणार आहेत,' अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली.
सध्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने विश्रांती दिली आहे. कडक उन पडत असल्याने डेंगीच्या डासांच्या उत्पत्ती होण्यास वातावरण पोषक आहे. त्यामुळे डास वाढण्याची शक्यता डॉ. परदेशी यांनी व्यक्त केली. शहरात तीन नगरसेवकांच्या घरी डासांची अंडी सापडली असून त्यांच्यावर कारवाई केली का, असे विचारता त्याबाबत उत्तर देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.
'डेंगी तसेच चिकुनगुनियाचे पेशंट आढळलेल्या ठिकाणी डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेण्यात येत आहे. त्याशिवाय त्याच घरांमध्ये अथवा जागेवर औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच परिसरात धूर फवारणी देखील केली जात आहे. पाऊस नसल्याने आता दोन दिवसांपासून ही विविध भागात औषध व धूर फवारणी सुरू केली आहे. पावसात औषध व धूर फवारणी करणे शक्य नाही. कचरा असलेल्या ठिकाणी देखील औषध फवारणीवर भर देण्यात येत आहे,' असे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी सांगितले.
....
आठ हजार जणांना नोटिसा
शहरात आतापर्यंत १८५२ जणांना डेंगीची लागण झाली असून, त्यापैकी ३७५ जण पॉझिटिव्ह आहेत. तर चिकुनगुनियाची ४७७ जणांना लागण झाली आहे. मलेरियाचे बारा पेशंट शहरात आहेत. डेंगी, चिकुनगुनियाची साथ शहरात वाढत असल्याने डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेण्यात येत आहे. त्याबाबत सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे डासांची अंडी आढळलेल्या सोसायट्यासंह दुकानांना नोटिसा देऊन कारवाई करण्यात आली. आतापर्यंत शहरात आठ हजार २९१ जणांना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांच्याकडून दोन लाख ८९ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातही ‘रॅनसमवेअर’चा धोका

$
0
0

कम्प्युटरचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचा पोलिसांच्या सायबर सेलचा सल्ला
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऑनलाइन खंडणीखोरांकडून जगभरात ऑनलाइन खंडणी मागण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'रॅनसमवेअर' या मालवेअरचा धोका पुण्यातही जाणवू लागला आहे. शहरातील एक डॉक्टर आणि जाहिरात एजन्सीला 'डाटा करप्ट' करण्याची भीती दाखवून धमकावण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने कम्प्युटरचा वापर करताना पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
'रॅनसमवेअर मालवेअर'चा वापर करत ऑनलाइन खंडणीखोरांनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. या मालवेअरला बळी पडलेल्या देशांच्या यादीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. ऑनलाइन खंडणीखोरांकडून कम्प्युटरमधील 'डाटा करप्ट' केला जात असून, तो रिकव्हर करण्यासाठी खंडणी मागण्यात येत आहे. कम्प्युटरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेत आपला 'डाटा' सुरक्षित ठेवावा, असे आवाहन सायबर सेलचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी केले आहे.
पुण्यातील एका नामांकित डॉक्टरांकडे नऊ सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे खंडणी मागण्यात आली होती. या डॉक्टरांनी नऊ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे आपला कम्प्युटर सुरू करून अपॉइंटमेंटस् तसेच इतर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी कम्प्युटर सुरू केला तेव्हा वेगळीच 'विंडो' उघडली गेली. या विंडोमध्ये त्यांना पासवर्ड आणि की विचारण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे ती नव्हती. त्यांच्या कम्प्युटरमधील सर्व फाईल्स या 'इन्क्रिप्ट' करण्यात आल्या. या फाइल्स उघडण्यासाठी 'डिस्क्रिप्शन की' हवी असेल तर मेलवर संपर्क साधण्यास सांगितले होते. या 'की' देण्यासाठी डॉक्टरांकडे 'अनट्रेसेबल करन्सी'च्या रूपात खंडणी मागण्यात आल्याची माहिती साकोरे यांनी दिली.
भारतात ६० हजार हल्ले
'रॅनसमवेअर मालवेअर'चा धोका भारतात वाढला आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारे ६० हजार हल्ले झाल्याची नोंद आहे. एका नामांकित 'अॅँटी व्हायरस' कंपनीने केलेल्या दाव्यानुसार 'रॅनसमवेअर मालवेअर'ला बळी पडलेल्या देशांच्या यादीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेतल्यास हे हल्ले टाळता येऊ शकतात, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी केले आहे.
...
खंडणीसाठी 'बिटकॉन करन्सी'
सायबर हल्लेखोरांकडून सायबर जगतात 'बिटकॉन करन्सी' वापरली जाते. ही 'करन्सी अनट्रेसेबल' असल्याचा दावा केला जातो. एका बिटकॉनची किंमत ही ४० हजार ४१० रुपयांच्या घरात आहे. 'रॅनसमवेअर मालवेअर'चा धोका इंटरनेट कनेक्शन असलेल्या सर्वच कम्प्युटर्सना असला तरी डॉक्टर, शैक्षणिक संस्था यांनाही मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले आहे.
...
काय काळजी घ्यावी
- चांगल्या दर्जाचे अँटी व्हॉयरस वापरण्यात यावेत.
- कम्प्युटरची 'फायरवॉल', इंटरनेट सिक्युरिटी अॅन्टी व्हॉयरस एकाच वेळी अपडेट करण्यात यावेत.
- पायरेटेड सॉफ्टवेअर, गाणी, चित्रपट, व्हिडिओ डाउनलोड करू नयेत.
- ई-मेलद्वारे आलेल्या फाइल्स स्कॅनकरूनच ओपन कराव्यात.
- विश्वासार्ह साइटवरूनच डाटा डाउनलोड करावा.
- ज्यांचे 'सोर्स' माहिती नाहीत, अशी 'अॅप्लिकेशन' डाउनलोड, इन्स्टॉल करू नयेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑरकस हॉस्पिटलला फुकट जागा

$
0
0

शाहू महाराज दवाखाना चालविण्याच्या प्रस्तावाला पुणे महापालिकेची मंजुरी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
वानवडी येथील महापालिकेचा छत्रपती शाहू महाराज दवाखाना ऑरकस हॉस्पिटलला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानाच्या जोरावर मान्य केला. विशेष म्हणजे सात हजार चौरस फुटांची ही जागा एक रुपयाही भाडे न घेता फुकट या हॉस्पिटलला दिली जाणार आहे. पालिकेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अशा प्रकारे खासगीकरणाच्या माध्यमातून दिली जाऊ नये, यासाठी मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने केलेला विरोध डावलून हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी हा विषय मान्यतेसाठी आलेला असताना काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी यावर आक्षेप घेतला. 'कोट्यवधी रुपयांची पालिकेची प्रॉपर्टी खासगीकरणाद्वारे हॉस्पिटलला देण्याचे कारण काय आहे? यासाठी केवळ एकच टेंडर आलेले असल्याने यामध्ये पुरेशी स्पर्धा झालेली नाही. मग कोणाच्या हितासाठी हा प्रस्ताव आणला आहे?' असा प्रश्न उपस्थित करून शिंदे यांनी पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांच्यावर टीकेची झोड उठविली. हा विषय महापौर प्रशांत जगताप यांच्या प्रभागातील असल्याने काँग्रेसचा विरोध असतानाही मतदान घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना, भाजप, मनसेच्या मदतीने हा प्रस्ताव मान्य केला.
वानवडी येथील छत्रपती शाहू महाराज दवाखान्याची साडेसात हजार चौरस फूट जागेत तीन मजली इमारत आहे. यातील पहिल्या मजल्यावर पालिकेला बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू असून, उर्वरित दोन मजले पडून आहेत. 'आर ७' अंतर्गत ही जागा पालिकेच्या ताब्यात आलेली आहे. ही इमारत पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशीप (पीपीपी) तत्त्वावर ऑरकस हॉस्पिटलला चालविण्यास देण्यात आली आहे. येथे अस्थिरोग चिकित्सा आणि आधुनिक पद्धतीने उपचार केले जाणार आहे. तीस वर्षाच्या कराराने ही इमारत 'ऑरकस'ला देण्यात आली असून, यासाठी एक रुपया देखील भाडे आकारले जाणार नाही. महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड बसणाऱ्या या प्रस्तावाला मान्यता देऊ नये, अशी मागणी करून अरविंद शिंदे, 'आरपीआय'चे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी विरोध केला. अखेर मतदान घेऊन हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि हॉस्पिटलचे खासगीकरण करण्यास मान्यता देण्यात आली.
...
पालिका कर्मचाऱ्यांसाठी राखीव बेड
ऑरकस हॉस्पिटलला ही जागा दिल्याने पालिकेतील कर्मचारी, माजी सभासद, सभासद यांच्यासाठी राखीव बेड्स येथे ठेवले जाणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये ३० बेड्स असणार आहेत. यातील ६० टक्के म्हणजे १८ बेड्स केंद्र सरकारच्या स्वास्थ्य योजनेचे लाभार्थी, तसेच पालिकेतील सभासद, कर्मचारी यांना राखीव आहेत. केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांकडून एक टक्का कमी दराने रक्कम घेऊन त्यांना उपचार दिले जाणार आहेत. तर हॉस्पिटलमधील बारा बेड्ससाठी हॉस्पिटल प्रशासन त्यांच्या नियमाप्रमाणे शुल्क आकारणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images