Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राहो चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव

$
0
0

जन्माने पुणेकर असलेला स्वीडिश श्रीकांत गणेशोत्सवासाठी पुण्यात

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
Tweet : @chaitralicMT

पुणे : जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी प्रत्येकाच्या मनात आपल्या जन्मगावाविषयी ओढ असते. तेथील संस्कृती, समाजजीवनाशी आपल्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. काही कारणाने जन्मगावाशी दुरावा निर्माण झाला, तरी तिथे जाण्याची मनातील इच्छा मात्र कमी होत नाही. जन्माने पुणेकर, मात्र सध्या स्वीडनचा नागरिक असलेला श्रीकांत वॉर्ड हा तरुण यंदा अशाच ओढीने गणेशोत्सवासाठी थेट स्टॉकहोमहून पुण्यात दाखल झाला आणि त्याने उत्सवाचा मनसोक्त आनंदही लुटला.

श्रीकांतचा जन्म पुण्यातच झाला; मात्र स्वीडनमधील एका कुटुंबाने त्याला लहानपणीच दत्तक घेतले. त्यामुळे तो त्या देशाचा रहिवासी झाला; पण आपल्या जन्मगावाबद्दलची ओढ काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. शिवाय गणपती हा त्याचा आवडता देव. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सव पाहायला यायचे स्वप्नच त्याने बाळगले होते. यंदा त्याने ते पूर्ण केले. सध्या श्रीकांत तिकडे राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहे.

'कळत नसलेल्या वयात मी तिकडे गेलो; पण समजायला लागल्यापासून मला भारताबद्दल आणि जन्मगाव असलेल्या पुण्याबद्दल कुतूहल होते. पुण्यात असतो तर कसा वाढला असतो, असा विचार मी नेहमी करायचो. येथील परंपरा, जीवनपद्धतीबद्दल अनेक प्रश्न पडत होते. शिक्षण आणि करिअर मार्गी लागल्यावर एकदा पुण्यात जायचे असे ध्येय मी ठेवले होते,' असे सांगताना श्रीकांत भावनिक झाला होता.

'गणपती हा माझा लाडका देव. पुण्यातील गणेशोत्सवाबद्दल खूप वाचले होते. त्यामुळे उत्सवात पुण्यात निवांतपणे मुक्काम ठोकण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे मी गणेशोत्सव अनुभवला असून, तो अविस्मरणीय ठरला आहे. त्याबद्दल मी पुस्तकही लिहायचे ठरवले आहे. स्वीडनबद्दल मला अभिमान नक्कीच आहे; पण भारताबद्दलही मला तेवढाच आदर आहे. मी रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, हिंदू परंपरा आदींबद्दलची पुस्तके सतत वाचतो. स्टॉकहोममध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांच्याही मी संपर्कात आहे. त्यांच्याकडून मला नवनवीन माहिती मिळत असते,' असेही श्रीकांतने आवर्जून सांगितले.

गेल्या दहा दिवसांत श्रीकांतने मानाच्या गणपतींसहते शहरातील सर्व प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेतले. एवढेच नव्हे, तर दोन दिवस विसर्जन मिरवणुकीतही तो उत्साहाने सहभागी झाला. गणेश मंडळांनी साकारलेले भव्य देखावे, देहभान विसरून पारंपरिक वाद्ये वाजवणारी पथके, आकाशाला गवसणी घालू पाहणारे ध्वज आणि लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्साह पाहून तो भारावला. आपण याच संस्कृतीत जन्माला आलो, या अभिमानाने त्याची छाती फुलून आली. गणेशोत्सवाच्या आनंदयात्रेविषयीचे भरभरून वर्णनही त्याने सोशल नेटवर्किंग साइटवरून केले आहे. एवढेच नव्हे, तर पुढच्या वर्षी पत्नी आणि मुलीलाही हा उत्सव दाखवण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन,

मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन,

नेवो, नेते जड तनूस या दूर देशास दैव

राहो चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव...

या जुन्या कवितेच्या ओळी आपल्याला ज्ञात आहेत. श्रीकांत यांची गोष्ट वाचल्यानंतर या ओळी मनाला आणखीच भिडतात.

..........

'लवकरच मराठीत लेखन'

श्रीकांतच्या पत्नीलाही भारताबद्दल आकर्षण आहे. 'आम्ही आमच्या मुलीला बियांका आणि इंदिरा अशी दोन नावे ठेवली आहेत. मराठी माणसांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सध्या मी मराठी भाषाही शिकतो आहे. तिकडे एक मराठी शिक्षिका सध्या मला बोलायला शिकवत आहेत. लवकरच मी मराठीत लेखनही करीन,' असे श्रीकांतने अभिमानाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एफटीआयआय गजबजली

$
0
0

एफटीआयआय गजबजली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुसळधार पावसात एफटीआयआय ही संस्था शनिवारी गजबजून गेली होती. ना विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते, ना माध्यमांचा, पोलिसांचा फौजफाटा... ना चित्रीकरण सुरू होते. ही गर्दी होती अस्सल चित्रपटप्रेमी रसिकांची. चित्रपट आपण आनंदाने पाहतो. त्याचे रसग्रहण करतो, पण त्यासाठीचे शिक्षण कसे असते, कॅमेरा वगैरे तंत्रज्ञान कसे वापरले जाते, थोडक्यात चित्रपटाचे अद्भुत जग असते तरी काय, याचा प्रत्यक्ष अनुभव रसिकांनी घेतला; तर संस्था जिवंत झाल्याचा अनुभव अधिकारी, कर्मचाऱ्यांना आला.
राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आली होती. संस्थेला वैभवशाली इतिहास असताना, त्यापेक्षा गैरप्रकारांनी संस्था ओळखली जाऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर संस्थेचा वारसा, इतिहास व चित्रपट क्षेत्राच्या माहितीसह संस्थेची विधायक बाजू नागरिकांसमोर यावी, यासाठी आमदार विजय काळे व संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांच्या पुढाकारातून 'ओपन डे' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात सुमारे दोन हजार नागरिकांनी भेट देऊन या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
सकाळी दहा वाजता गुलाबपुष्प देऊन नागरिकांचे स्वागत करण्यात आले. दिवसभर पाऊस असतानाही नागरिकांचा उत्साह टिकून होता. एफटीआयआय अनुभवण्यासाठी भर पावसातही सायंकाळपर्यंत गर्दी कायम होती. विविध शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. संस्थेतील कर्मचारी एका-एका गटाला संस्था फिरवत होते व प्रत्येक विभागाची माहिती देत होते. चित्रपटनिर्मिती आणि दूरचित्रवाणी या विषयी रसिकांमध्ये असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यात आले.
'मनोरंजनासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, हे संस्था पाहिल्याने समजू शकले,' अशी बोलकी प्रतिक्रिया एका रसिकाने अभिप्राय वहीमध्ये आवर्जून लिहिली होती. आज, रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत
एफटीआयआय सर्वांसाठी खुली राहणार असल्याची माहिती संचालक भूपेंद्र कँथोला यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला अखेर जाग

$
0
0

राखीव खाटा ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक ९२ टक्के पेशंट पुण्यात असल्याचे उघड झाल्यानंतर, इतके दिवस उदासीनता बाळगणाऱ्या राज्य सरकारला अखेर जाग आली असून, उपाययोजनांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उपाययोजनांबाबत मुंबईत बैठकही घेतली आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलना भेटी देऊन पेशंटची चौकशी केली. तसेच चिकुनगुनियाच्या पेशंटसाठी खाटा राखीव ठेवण्याचा आदेशही दिला.

जुलै, ऑगस्ट महिन्यात डेंगी, चिकुनगुनियाच्या पेशंटची संख्या वाढली आहे. शहरातील दवाखाने, तसेच खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची गर्दी झाली आहे. उपचारासाठी दाखल करून घ्यायला हॉस्पिटलमध्ये बेड्स रिकामे नाहीत. अशा परिस्थितीत सरकारकडून तातडीने उपाययोजना करण्याबाबत उदासीनता दिसून आली; मात्र दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढतच गेली आणि चिकुनगुनियाच्या पेशंटपैकी ९२ टक्के जण फक्त पुण्यातील असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आणि सरकारला जाग आली.

शनिवारी बापट यांनी पालिकेच्या नायडू हॉस्पिटलसह रुबी, पूना हॉस्पिटलमध्ये जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली आणि पेशंटची विचारपूस केली. प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी त्या वेळी उपस्थित होते.

'नायडू हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांत अकराशे पेशंटवर उपचार करण्यात आले. पालिकेच्या हॉस्पिटलमधून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक जणांना डेंगी, चिकुनगुनियाचे उपचार देण्यात आले आहेत. रुबी, पूना हॉस्पिटल, तसेच नायडू आणि कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये अशा पेशंटची संख्या अधिक आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलनी अशा तापाच्या पेशंटसाठी खाटा राखीव ठेवण्याला प्राधान्य द्यावे. त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत,' असा आदेश बापट यांनी दिला.

'डेंगी, चिकुनगुनियाचे पेशंट शहरात वाढत असल्याने त्याबाबत आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे सध्या पुरेसा औषधसाठा आहे. तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू,' असेही आश्वासन त्यांनी या वेळी दिले.


न घाबरण्याचे आवाहन

'शहरात डेंगी, चिकुनगुनियाची साथ आली आहे. नागरिकांना ताप, अशक्तपणा येणे, तसेच सांधेदुखी अशी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता स्वच्छता राखावी. पाणी साठवून ठेवू नये. डासांची निर्मिती होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी,' असे आवाहन गिरीश बापट यांनी केले. 'पालिकेच्या वतीने आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. हा आजार बरा होणारा आहे. त्यामुळे आजाराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये,' असेही आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववी, दहावीसाठीही पायाभूत चाचण्या

$
0
0

पुणे : राज्य सरकारने माध्यमिक शाळांसाठीही 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' योजना लागू केली आहे. यंदापासूनच या योजनेची अंमलबजावणी सुरू होत असून, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी आणि गणित या दोन विषयांच्या पायाभूत चाचण्या घेतल्या जाणार आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळांशी संलग्न माध्यमिक शाळांसाठी ही योजना लागू असेल. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. प्राथमिक शाळांसाठी ही योजना यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. माध्यमिक शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करणे, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणणे, गरजेनुसार विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम आखणे, प्रथम भाषा व गणित या विषयांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी सुधाण्यासाठी लक्ष देणे, माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवरील राज्याची कामगिरी सुधारणे यासाठी ही योजना माध्यमिक स्तरावरही राबविली जाणार आहे. २०१६-१७पासूनच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजीची पायाभूत चाचणी घेतली जाईल.

शाळांमधून प्रतिष्ठेच्या कारणावरून नववी अनुत्तीर्णांची होणारी हेळसांड रोखण्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नववी नापासांसाठीही फेरपरीक्षेचे आयोजन केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात ४०२ मंडळांवर ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग केल्याचे आढळून आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ४०२ मंडळांवर ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्यापही नियमभंग करणाऱ्या मंडळ व पथकांची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याबाबतची सूचना बैठका घेऊन गणेश मंडळांना देण्यात आली होती. मात्र, विसर्जन मिरवणुकीमध्ये 'डीजे'च्या भिंतींचा सर्रास वापर करण्यात आल्याचे आढळून आले. काही ठिकाणी रात्री बाराच्या नंतरही 'डीजे'चा वापर करण्यात आला. तसेच, ढोल-ताशा पथकांनी त्यांना सांगितलेल्या ढोल व ताशांपेक्षा जास्त ढोल विसर्जन मिरवणुकीत वाजवले. पोलिसांनी विविध ठिकाणी ३४ डेसिबल मीटरच्या साह्याने आवाज मोजला आहे. त्यानंतर ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. शहरात सर्वाधिक गुन्हे मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या झोन एकच्या हद्दीत ९२ ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर झोन टूमध्ये ११४ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये स्वारगेट विभागात ९४ तर लष्कर विभागात २० मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर झोन तीनचा भाग असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात ७१ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. झोन चारमध्ये सर्वाधिक ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल झाले असून, या ठिकाणी १२५ मंडळांवर गुन्हे दाखल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शनिपार मित्र मंडळाने गेल्या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये नोटिशीची उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली होती. या वर्षी त्यांना परवानगी नसतानाही विसर्जन मिरवणुकीमध्ये घुसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केलेल्या मंडळ व ढोलताशा पथकांची माहिती घेण्यात येत आहे. नियमांचा भंग केल्याचे आढळून आल्यास त्या मंडळांवरही गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवेली प्रांत अधिकारी बारा तासांत बदलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे विभागातील प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या चार बदल्या राज्य सरकारने अवघ्या बारा तासांत रद्द करून नव्याने बदली आदेश काढले आहेत. त्यामध्ये हवेली प्रांत अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या संजीव देशमुख यांच्या जागी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांची व शहर पुरवठा अधिकारी या पदावर शहाजी पवार यांचा समावेश आहे.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूरमधील ४२ उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने १४ सप्टेंबर रोजी काढले.

हवेली प्रांत अधिकारीपदी नियुक्ती झालेल्या संजीव देशमुख यांनीही नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांना थांबण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. याचदरम्यान कोल्हापूर येथे बदली झालेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी कदम यांची हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सुधारित आदेश राज्य सरकारने काढले. या आदेशामुळे नियुक्तीचा पेच निर्माण झाला असून, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम या संदर्भात काय निर्णय घेतात, यावर हवेलीचा कारभार कोणाकडे जाणार हे अवलंबून राहणार आहे.

खेड प्रांत अधिकारीपदी नंदूरबारचे प्रांत सुनील गाढे यांची, तर अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून शहाजी पवार यांचा आदेश नव्याने काढण्यात आला आहे. सूचिता भिकाणे यांच्याकडे पाटणच्या प्रांत म्हणून कार्यभार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी कर्मचारी आणि पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून त्यासंदर्भातील परिणामकारक कायदा लवकरच केला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाला दिले.

शासकीय कर्मचारी तसेच पोलिसांना होणारी मारहाण आणि दमबाजीविरोधात महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष मनोहर पोकळे, कोषाध्यक्ष नितीन काळे, मुंबईचे अध्यक्ष संजय इंगळे, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष विनायक लहाडे आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान महासंघाने २२ सप्टेंबर रोजी पुकारलेले लेखणी बंद आंदोलन मागे घेतले आहे. परंतु २० व २१ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन कायम ठेवले आहे. शासकीय कर्मचारी व पोलिसांना कर्तव्यावर असताना मारहाण व दमबाजी होते हे गंभीर आहे. त्याविषयी लवकरच परिणामकारक कायदा करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या कायद्यासंदर्भात महासंघाशी २९ व ३० सप्टेंबरला बैठक घेण्याचेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रातराणी’ची कमाई ८२ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) १६ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपये उत्पन्न ‌मिळाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न ४४ लाख रुपयांनी अधिक आहे. यंदा पीएमपीच्या रातराणी बस सेवेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, त्याद्वारे शेवटच्या सात दिवसांत ८२ लाखांचे उत्पन्न मिळाले.

गणेशोत्सव काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने पाच ते १५ सप्टेंबर दरम्यान नेहमीपेक्षा ६२२ जादा गाड्या मार्गावर सोडल्या होत्या. त्यामुळे गणेशोत्सवाच्या १० दिवसांत सोळा कोटी ६४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या दहा दिवसांत गेल्या रविवारी (ता. ११) सर्वाधिक म्हणजे एक कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर सर्वांत कमी उत्पन्न गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी एक कोटी पाच लाख रुपये मिळाले. गेल्या वर्षी गणेशोत्सवात पीएमपीला १६ कोटी २० लाख ५९ हजार रुपये ‌मिळाले होते.

गेल्या वर्षी सप्टेंबर २०१५ मध्ये रातराणी बससेवेच्या माध्यमातून प्रतिबस प्रतिफेरी पाच हजार २५४ रुपयांचे उत्पन्न पीएमपीला मिळाले होते. यंदा हे उत्पन्न प्रतिबस प्रतिफेरी पाच हजार ५६३ रुपयांवर पोहाेचले; तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोठेही फिरण्यासाठी अवघ्या ५० रुपये दरात पास उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांकडून पीएमपीला मिळणारा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्य संमेलन डोंबिवलीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे होणार आहे. आगरी यूथ फोरम, या संस्थेला संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत झालेला निर्णय दोन दिवसांनी जाहीर करू, अशी आधुनिक काळाशी विसंगत भूमिका साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी घेतल्याने त्यांच्या 'एकला चलो रे' कार्यपद्धतीविषयी साहित्य महामंडळ, घटक संस्था व साहित्य वर्तुळात प्रचंड खदखद निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेतून नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाकडे गेले तरी साहित्य संमेलनाच्या महत्त्वाच्या विषयावरील बैठक रविवारी साहित्य परिषदेमध्ये पार पडली. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विलास देशपांडे, इंद्रजित ओरके, सुधाकर भाले, प्रकाश पायगुडे, दादा गोरे, उज्ज्वला मेहेंदळे यांच्या समितीने स्थळ निवड अहवाल या बैठकीत मांडला. संमेलनासाठी डोंबिवली किंवा बेळगाव यापैकी एका ठिकाणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे आगामी संमेलनासाठी डोंबिवलीची निवड करण्यात आली.

कर्नाटकमधील वातावरण ढवळून निघत असल्याने बेळगावमध्ये संमेलन घेणे शक्य नाही तसेच डोंबिवलीमध्ये सांस्कृतिक वातावरण असूनही त्याठिकाणी साहित्य संमेलन झालेले नाही, यानिकषांच्या आधारे डोंबिवलीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनासाठी डोंबिवलीतील आगरी यूथ फोरमसह बेळगावमधील सार्वजनिक वाचनालय, कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय तसेच सातारा, इंदापूर, चंद्रपूर, रिद्धपूर येथील निमंत्रणे महामंडळाकडे आली होती. संमेलन स्थळानंतर आता संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

तंत्रस्नेही काळात महामंडळाचा कारभार 'जुनाट'

'साहित्य महामंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती मी २० सप्टेंबर रोजी नागपूर येथे जाहीर करणार आहे. आत्ता माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही,' अशी भूमिका महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घेतली. व्हॉट्सअॅप, फेसबुक, टि्वटर यासारख्या जलद माध्यमांच्या काळात कोणतीही माहिती काही क्षणांसाठीही लपून राहत नसताना, तंत्रस्नेही नसलेल्या महामंडळाच्या या 'जुनाट' कारभाराविषयी खुद्द महामंडळाच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये तसेच घटक संस्था व साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी नाही

साहित्य महामंडळाच्या माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, ही मागणी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत लावून धरली. महामंडळाच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, अध्यक्षांचा हेतू काय आहे, या मुद्द्यांवरून सभा सव्वा तास लांबली. अखेर मी योग्य ती कृती करेन, असे आश्वासन देत अध्यक्षांनी वेळ मारून नेली. गेल्या बैठकीत हा विषय पत्रिकेत नसल्याचे सांगून टोलाविण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कास’वर पर्यटकांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निळ्या, पिवळ्या, तांबड्या चिमुकल्या फुलांनी बहरलेले साताऱ्याजवळील कास पठार पर्यटकांच्या सोशल अकाउंटवर टॅगिंगमध्ये आले आहे. जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांत दहा हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आहे. मर्यादित कालावधीत वन विभागाने नेमलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे दहा लाख रुपयांचे शुल्क जमा झाले आहे.

महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ फ्लॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठाराला 'युनेस्को'ने जागतिक पातळीवर नेल्यापासून पठाराबद्दल कुतूहल वाढले असून, पर्यटकांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे पठारावरील जैवविविधता धोक्यात आली असून, प्लास्टिक कचरा आणि प्रदूषणही वाढत होते. पर्यटकांच्या या अनियंत्रित संख्येला लगाम घालण्यासाठी वन विभागाने यंदा कंबर कसली आहे. पठारावर सुट्टीच्या दिवशी पन्नास ते साठ हजार पर्यटक गर्दी करीत होते. मात्र, यंदा दररोज केवळ तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देणार असल्याचे बंधन घालण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून प्रत्येक पर्यटकाकडून सुट्टीच्या दिवशी शंभर रुपये पर्यावरण शुल्क आणि कॅमेरा असल्यास शंभर रुपये उपद्रव शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. पठाराच्या या शाश्वत संवर्धन आराखड्याला वनस्पती अभ्यासक, स्वयंसेवी संस्था आणि गावकऱ्यांचाही प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षी पहिल्यांदा पठारावर नियोजनबद्ध पर्यटन दिसत आहे.

'ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा फुलांचा हंगाम उशिरा सुरू झाला. आम्ही २६ ऑगस्टपासून नवीन नियमांची अंमबलजावणी सुरू केली आहे. पठारावर येण्यासाठी पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग बंधनकारक केले आहे. सुट्टीच्या दिवशी मर्यादित लोकांनाच प्रवेश देत आहोत. याशिवाय स्थानिक लोकांच्या सहभागातून ४० सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त वाढवला आहे. परिणामी पर्यटकांचा उपद्रव यंदा कमी जाणवतो आहे,' अशी माहिती सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी दिली.

'पठारावर सुट्टीच्या दिवशीच पर्यटकांची संख्या प्रचंड असते, ही संख्या कमी होऊन इतर दिवशी पर्यटकांनी पठारावर यावे असा आमचा उद्देश आहे. सध्या पठार इतर फुलांनी बहरले आहे. हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक पर्यटकांनी पठाराला भेट दिली आहे. यातून दहा लाख रुपयांहून अधिक शुल्क जमा झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर ओसरल्यास १५ ऑक्टोबरपर्यंत पठार फुललेले बघायला मिळेल,' असे अंजनकर यांनी सांगितले.

अशी आहे नवीन नियमावली

- सुट्टीच्या दिवशी प्रतिपर्यटक १०० रुपये पर्यावरण शुल्क
- सोमवार ते शुक्रवार प्रतिपर्यटक ५० रुपये पर्यावरण शुल्क
- फोटोग्राफीसाठी १०० रुपये उपद्रव शुल्क
- दहा पर्यटकांसाठी एका तासासाठी १०० रुपयांत प्रशिक्षित गाइड
- वाहनाच्या प्रकारानुसार १० रुपये ते १०० रुपयांपर्यंत वाहनतळ शुल्क
- १२ वर्षे वयापर्यंतचे विद्यार्थी आणि ६५ वर्षांपुढील ज्येष्ठांना शुल्क माफ
- http://www.kas.ind.in/ या वेबसाइटवर प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरची, फ्लॉवर, कोबी स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनंत चतुर्दशी तसेच शनिवारी मार्केट यार्डाला सुट्टी असल्याने शेतकऱ्यांनी रविवारी मोठ्या प्रमाणात फळभाज्यासह पालेभाज्या बाजारात आणल्या. त्यामुळे २५० ट्रक आवक झाल्याने कोबी, फ्लॉवर, हिरवी मिरची, सिमला मिरची, काकडी, पावट्याचे दर उतरले आहेत. त,र पितृपंधरवडा सुरू झाल्याने भेंडी, गवारसारख्या भाज्यांना मागणी वाढली आहे.

मार्केट यार्डात राज्याच्या विविध भागासह परराज्यातून फळभाज्यांची आवक झाली. परराज्यातून या आठवड्यात कमी प्रमाणात भाज्यांची आवक झाली. अनंत चतुर्दशी आणि शनिवारी मार्केट यार्डाला सुट्टी असते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी थांबविलेला माल रविवारी बाजारात आणला. मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून ३० ते ३५ टेम्पो हिरवी मिरची तसेच कर्नाटकासह गुजरातमधून १० ते १२ ट्रक कोबीची आवक झाली आहे. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून सात ते आठ ट्रक शेवग्याची आवक झाली.

सातारी आल्याची १७०० ते १८०० पोतींची आवक झाली. कोबी, फ्लॉवरची प्रत्येकी २० ते २२ टेम्पो, टोमॅटोची साडेसहा हजार पेटी, मटारची सहा ते सात टेम्पोची आवक झाली. पावट्याची सात ते आठ, सिमला मिरचीची १८ ते २० टेम्पो, गाजरची आठ ते दहा टेम्पोची आवक झाली. भुईमुग शेंगाची १०० पोती, बटाट्याची आग्रा, इंदौर, गुजरातमधून ६० ते ६५ ट्रकची आवक झाली. कांद्याची १०० ट्रक पुणे विभागातून आवक झाली. लसणाची मध्य प्रदेशातून चार हजार गोणींची आवक झाली. पालेभाज्यांचीही मोठी आवक झाली आहे. कोथिंबिरची अडीच लाख तर मेथीची दोन लाख गड्डीची आवक झाली आहे. अन्य पालेभाज्यांची देखील समाधानकारक आवक झाली आहे. पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मोठी मागणी आहे. पितृपधंरवड्यामुळे गवार, भेंडी, कार्ली, चवळी, मेथी, कोथिंबिर या भाज्यांना मागणी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

मासळीची दरवाढ

गणेशोत्सव संपल्याने सर्वच ठिकाणाहून मासळीला आवक वाढली आहे. मागणीही जास्त असल्याने सर्वच मासळीच्या दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. गणेश पेठेत खोल समुदातील मासळीची आठ ते दहा टन, खाडीच्या मासळीची दोनशे ते अडीचशे किलो, नदीची मासळीची चारशे ते पाचशे किलो, आंध्रचा रहू, कतला आणि सिलनची चौदा टन आवक झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत मासळी बाजारामध्ये रत्नागिरी आणि मुंबई येथून तब्बल पन्नास टक्के मालाची आवक होत आहे. गुजरात येथून ३० टक्के तर आंध्र, हावडा आणि ओडिशा येथून २० टक्के आवक होत आहे. सर्वच ठिकाणाहून मासेमारीला सुरुवात झाली असल्याने आवक वाढली असून, मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

फुलांचे दर उतरले

पावसाळ्याने पुन्हा आगमन केल्याने फुलांची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक झाली. फुलांची आवक वाढल्याने त्यांच्या दरावर परिणाम झाला. दर उतरले असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मत आहे. झेंडूला किलोसाठी १० रुपयांपर्यंत तर गुलछडीला ३० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. जुईला २०० ते २५० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. अबोली लडच्या ३०० ग्रॅम वजनाच्या फुलांसाठी १४० रुपये मोजावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साथ निवारणासाठी ‘मायक्रो प्लॅनिंग’ करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात साथीचा उद्रेक झाल्यानंतर उशिरा जागे झालेल्या राज्य सरकारने सर्वाधिक चिकुनगुनियाचे पेशंट असलेल्या पुणे महापालिकेला डेंगी, चिकुनगुनिया नियंत्रणांसंदर्भात 'मायक्रो प्लॅनिंग' करण्याचे आदेश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.

राज्यातील डेंगी, चिकुनगुनियाबरोबर मलेरिया आजाराच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी साथरोग नियंत्रण समितीची बैठक झाली. त्या बैठकीत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांना आरोग्यमंत्र्यांनी आदेश दिले. त्या बैठकीत राज्यातील सर्व ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

'राज्यात पुणे शहर जिल्ह्यात चिकुनगुनियासह डेंगीचे पेशंट मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. शहरात संगमवाडी, नगर रोड, सहकारनगर, वानवडी कोंढवा, ढोले पाटील रस्ता या भागात डेंगी, चिकुनगुनियाची लागण झालेले पॉझिटिव्ह पेशंट आढळत आहेत. पेशंटच्या घरांसह आजूबाजूच्या शंभर ते दोनशे घरांमध्ये जाऊन औषध तसेच धूर फवारणी करावी. त्या ठिकाणी सर्वेक्षण करावे. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ते ठिकाण नष्ट करण्यावर भर दिला पाहिजे. संसर्ग झालेला डास आठ ते दहा दिवस जिवंत राहतो. त्यामुळे तो अन्य ठिकाणी फिरत असल्याने त्याचा संसर्ग होतो. त्यामुळे अळ्या, डासांची अंडी नष्ट करण्यावर भर देण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करा, असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला आदेश दिले आहेत,' अशी माहिती आरोग्य खात्याच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी 'मटा'ला दिली.

राज्यात ऑगस्ट अखेर डेंगीचे २५८२ पेशंट आहेत. त्यापैकी सर्वाधिक ९०० पेशंट अर्थात ३५ टक्के पेशंट ग्रामीण भागात आहेत. तर उर्वरीत १६८२ पेशंट हे राज्याच्या शहरी भागात आढळले आहेत. म्हणजेच डेंगीचे ६५ टक्के पेशंट शहरांमध्ये आहेत. राज्यात डेंगीचे सर्वाधिक ४२५ पेशंट नाशिकला तर त्या पाठोपाठ मुंबईत ३१० पेशंट आहेत. पुण्यात २२५ पेशंट आहेत. डेंगीमध्ये पुणे चौथ्यावर तर चिकुनगुनियात पुणे शहर जिल्हा सर्वोच्च स्थानावर आहे. राज्यात आजमितीला चिकुनगुनियाचे ४३९ पेशंट पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी पुण्यात ३९३ अर्थात ९२ टक्के पेशंट आहेत. त्यापाठोपाठ नगर, औरंगाबाद, सातारा, नाशिक, सोलापूर या ठिकाणी पेशंट आहेत, असे डॉ. जगताप यांनी सांगितले.

डेंगीची पाच हजार उत्पत्तीस्थाने नष्ट

पुणे शहरात डेंगीचा उद्रेक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पाच हजार ठिकाणी डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली. 'शहरात डेंगीचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्या सर्वेक्षणातून संगमवाडी, नगर रस्ता, ढोले पाटील रस्ता, कोंढवा वानवडी, हडपसर, सहकारनगर भागात सर्वाधिधक डेंगीचे पेशंट आढळले आहेत. त्या भागात जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. या भागात आढळलेली सुमारे पाच हजार डेंगीची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत,' अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरांची ‘इंडस्ट्री’ २५० कोटींची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात दर वर्षी सरासरी अडीच लाख मोबाइल हरवतात किंवा चोरी होतात. पोलिसांकडून मोबाइल शोधण्यासाठी प्रयत्न झाले तरी ते सापडण्याचे प्रमाण केवळ पाच ते सात टक्के असल्याने मोबाइल चोरीची 'इंडस्ट्री' तेजीत सुरू आहे. चोरीच्या बहुतांश मोबाइलची तस्कारी परराज्यात अथवा देशाच्या सीमेवर होत आहे. मोबाइल चोरीची ही 'इंडस्ट्री' अडीचशे कोटी रुपयांच्या घरात आहे.

पुणे शहरात दर महिन्याला सरासरी ३०० मोबाइल गहाळ किंवा चोरी होतात. अशा प्रकारे दर महिन्याला पुणे शहरातून सरासरी ९ हजार मोबाइल गहाळ होत आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात सरासरी अडीच लाख मोबाइल दर वर्षी गहाळ अथवा चोरीस जातात. यातील ९५ टक्क्यांहून अधिक मोबाइल पोलिस दप्तरी गहाळ म्हणून नोंदवण्यात येत असल्याने त्यांच्या तपासाबाबत गांभीर्याने घेण्याची पोलिसांना आवश्यकता भासत नाही. तसेच, पोलिस दप्तरी गहाळ अथवा चोरी झालेल्या मोबाइलची नोंद नसेल तर असे मोबाइल शोधण्यात येत नाही.

'आयएमईआय' बदलण्यासाठी सॉफ्टवेअर

राज्यात विशेषकरून मुंबईमध्ये हँडसेटचा 'आयएमईआय' नंबर बदलण्याचे सॉफ्टवेअर बेकायदा वापरले जाते. चोरीच्या, गहाळ झालेल्या हँडसेटचे 'आयएमईआय' नंबर बदलून त्यांची पुनर्विक्री करण्यात येते. पोलिसांना असे मोबाइल शोधण्यात अडचणी येतात. सायबर सेलने पुणे शहरात अशा प्रकारचे सॉफ्टवेअर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आलेले नाही. त्यामुळे पुण्यात 'आयएमईआय' बदलला जातो की नाही, याबाबत ठोस माहिती नसल्याची प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

मोबाइलची नोंद गहाळच का?

पोलिसांकडून मोबाइल चोरीस गेला तरी तो गहाळ असल्याची नोंद घेण्यात येते. मोबाइलधारकांकडून चोरीचा गुन्हा दाखल करण्याबाबत विनंती केली तरीही बुहतांशवेळा पोलिस मोबाइल गहाळ असल्याचीच नोंद घेतात. मोबाइल चोरीस गेल्याची नोंद घेतली, तर त्या गुन्ह्याचा तपास करून मोबाइल शोधण्याचे बंधन पोलिसांवर येते. ते टाळण्यासाठी आणि दखलपात्र गुन्ह्यांची नोंद कमी दिसावी, यासाठी गुन्हे दाखल न करण्याचे सत्र पोलिसांकडून अवलंबवले जाते.

अडीचशे कोटींची 'उलाढाल'

चोरांकडून जादा किंमत असलेलेच मोबाइल चोरण्यात येतात. ज्या मोबाइलला बाजारात विक्री करताना चांगला परतावा मिळेल, असेच हँडसेट चोरले जातात. सायबर सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार किमान १० हजार रुपयांहून अधिक किमतीचे हँडसेट चोरण्याकडे चोरट्यांचा कल असतो. अडीच लाख हँडसेट आणि प्रत्येकाची किंमत १० हजार रुपये असल्यास ही मोबाइल चोरीची इंडस्ट्री अडीचशे कोटी रुपयांच्या घरात आहे.

'सापडण्याचे प्रमाण कमी'

मोबाइल गहाळ अथवा चोरीस गेल्याची तक्रार आल्यानंतर मोबाइलच्या 'आयएमईआय' नंबरच्या आधारे तो 'हँडसेट' ट्रेसिंगला लावण्याचा आमचा प्रयत्न असतो. नेटवर्क ऑपरेटर कंपनीकडून हँडसेट ट्रेसिंगला टाकला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांत मोबाइल सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यासाठी आम्ही नेटवर्क ऑपरेटर कंपन्यांशी चर्चा करीत ​आहोत.

- सी. एच. वाकडे, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​रसिकतेच्या संयमाचा आपल्याकडे अभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कोणताही चित्रपट वाईट नसतो, कोणाला तो आवडेल, तर कोणाला आवडणार नाही, इतकाच काय तो फरक असतो. आपण मात्र चित्रपट संपताचक्षणी 'बंडल' व 'चांगला' अशी विभागणी करून टाकतो. रसिक म्हणून आपल्याकडे संयम नसल्यानेच हे होते', अशा शब्दांत प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी रविवारी समाजातील चित्रपट निरक्षरतेवर नेमकेपणाने बोट ठेवले.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन ऑफ फिल्म सोयायटीज ऑफ इंडियाचा महाराष्ट्र विभाग यांच्यातर्फे आयोजित 'रसास्वाद सिनेमाचा' या शिबिराचे उद्घाटन गोवारीकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ समीक्षक समर नखाते यांनी गोवारीकर यांच्याशी संवाद साधला. या वेळी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, सोसायटीचे सुधीर नांदगावकर व सतीश जकातदार उपस्थित होते.
'एक प्रेक्षक म्हणून मला चित्रपटांची चांगली समज आहे, असे मला वाटत होते; पण बंडल व चांगला चित्रपट यापुरतीच ती समज होती. चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाच्या शिक्षणामुळे माझ्या समजुतीला तडा गेला. १९९० मध्ये हे शिक्षण घेतल्यानंतर माझे आयुष्य बदलून गेले', अशी कबुली गोवारीकर यांनी दिली. 'चित्रपट माध्यमाची ताकद काय आहे, दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे, तसेच चित्रपट कसा पाहावा, हे या अभ्यासक्रमातून शिकायला मिळते. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर तो आवडत नाही म्हणून बंडल म्हटले जाते; पण दोन दिवसांनंतर तोच चित्रपट आवडू लागतो. रसिक म्हणून आपल्याकडे संयम नसल्याने असे होते', याकडे त्यांनी लक्ष वेधले. उत्तरार्धात गोवारीकर यांचा 'मोहेंजोदारो' हा चित्रपट दाखविण्यात आला. वीणा क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.
--------------
राष्ट्रवाद दिसून येत नाही
राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेम या दोन वेगळ्या व्याख्या आहेत. राष्ट्रप्रेमातून आयुष्य समर्पित केले जाते; तर राष्ट्रवादातून देशाचा विकास साधता येतो. पण हल्ली असा राष्ट्रवाद दिसून येत नाही, अशी मार्मिक टिप्पणी आशुतोष गोवारीकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप वाढला : सुनील तटकरे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप सातत्याने वाढत आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी प्रभाग रचना बदलली. परंतु, प्रत्येकवेळी त्यांना सपाटून मार खावा लागला आहे. कशीही प्रभाग रचना केली तरी राष्ट्रवदी काँग्रेस पक्षाचीच सत्ता येणार आहे. ज्यावेळी राजकारणातील सर्व डावपेच संपतात त्या वेळी अफवा पसरवण्याचे काम केले जाते. त्यांनी कितीही अफवा पसवल्या तरी त्याकडे लक्ष देऊ नका पिंपरी-चिंचवडला राष्ट्रवादी पक्ष १०० जागा जिंकणार असून, त्यासाठी कामाला लागा,' असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी (१८ सप्टेंबर) दिले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चिंचवड येथील दर्शन हॉलमध्ये आढावा बैठक झाली. त्या वेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगल कदम, स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे आदींसह नगरसेवक-पदाधिकारी उपस्थित होते.
येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्यासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच, आघाडीचा निर्णय हा स्थानिक पाळीवरच घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वेळी सांगितले. 'सध्या राज्य सरकाराने पिंपरी-चिंचवडची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनवली आहे. 'अच्छे दिन' म्हणून त्यांनी सत्ता मिळवली; परंतु निवडणुकीनंतर अच्छे दिन निघून गेले. हे आता मतदारांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदारांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने देतील,' असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
'विरोधक आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या निवडणुकीत तुम्हाला अनेक आमिषे दाखवली जातील. त्यांना कार्यकर्ते तयार करता आले नाहीत. म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता पालिकेत एक हाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्यांनी पक्षात राहून अनेक पदे उपभोगली, आमदार झाले ते पक्षातून इतर पक्षात गेले. जे आहेत त्यांचा विचार करा, जे गेले त्यांचा विचार करू नका,' असा टोला आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव न घेता तटकरे यांनी लगावला.
'मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक घोटाळे झाले आहेत; परंतु त्याची चौकशी करण्याचे आदेश मात्र भाजप सरकार देत नाही. कारण शिवसेनेला डिवचण्याचे धाडस त्यांच्यामध्ये नाही. सभागृहात शिवसेना नेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे बघितल्यावर शिवसेनेचे नेते गप्प बसतात. बाहेर मात्र हीच शिवसेना वेगळ्या गृहमंत्र्यांची मागणी करते.'
राष्ट्रवादीच्या या मेळाव्याला काही नगरसेवकांनी मात्र पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. 'मेळाव्याला गैरहजर नगरसेवकांना खरेच काम होते, का हे विचारले पाहिजे,' असे तटकरे म्हणाले. 'पक्ष संघटनेपेक्षा दुसरे कुठलेच काम महत्त्वाचे नसले पाहिजे. पक्षामुळे पदे मिळतात हे लक्षात ठेवावे,' असाही टोला त्यांनी गैरहजर नगरसेवकांना उद्देशून लगावला. पिंपरी-चिंचवडमधील जनता सुज्ञ असून राष्ट्रवादीशी बांधील असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. चार सदस्यीय प्रभाग रचनेबाबत सरकारने दोन वर्षांत पाच वेळा निर्णय बदलला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आवश्यक ठिकाणी हरकती नोंदवा असेही तटकरे म्हणाले.

'मराठा समाजाला आरक्षण मिळावे'
'मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची मागणी होती. ओबीसीला ज्याप्रमाणे आरक्षण देण्यात आले तसेच मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु हे आरक्षण देत असताना इतर जातींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाज मोर्चे काढत असून, याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असेही बोलले जाते ते चुकीचे आहे,' असेही तटकरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बालेवाडी येथील स्लॅब दुर्घटनेस जबाबदार असलेल्या सहा बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात कोर्टाने बजावलेलेल अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी चार जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्या कोर्टात हा अर्ज करण्यात आला आहे. त्यावरील सुनावणी आज, सोमवारी होणार आहे.

बांधकाम व्यावसायिक अरविंद प्रेमचंद जैन (वय ४४, रा. प्राइड पॅराडाइज, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), श्रवण देवकीनंदन अगरवाल (वय ४५, रा. पाषाण), शामकांत जगन्नाथ वाणी शेंडे (वय ५२, रा. सणस मेमरीज, शिवाजीनगर) आणि कैलास बाबूलाल वाणी (वय ४८, रा. गोपाळ पार्क, एरंडवणे) या चौघांनी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांच्यासह प्रदीप जनार्धन कोसुंबकर (वय ४१, रा. गणेशनगर, कोथरूड), हंसल सुधीर पारेख (वय ४७, रा. हर्ष विहार सोसायटी, नवीन डीपी रस्ता, औंध) यांच्याविरुद्ध कोर्टाने अजामीनपत्र वॉरंट बजावले आहे. बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस जॉइंट व्हेंचर या बांधकाम प्रकल्पातील इमारतीचा चौदावा मजला २९ जुलै रोजी सकाळी कोसळला होता. यामध्ये नऊ कामगारांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले होते. या प्रकरणात म्रिगांक कंस्ट्रक्शनचा महेंद्र कामत याला अटक केले होते. या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

अरविंद जैन, श्रवण अगरवाल, शामकांत वाणी शेंडे, प्रदीप कोसुंबकर आणि कैलास वाणी यांचाही अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी यापूर्वीच फेटाळून लावला होता. आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आलेले नाहीत. त्याचे मोबाइल रेकॉर्डही तपासण्यात आले तरीही ते मिळून आले नाही. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यासाठी अजामीनपत्र वॉरंट बजावणे गरजेचे असल्याने, पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सहाही जणांविरुध्द सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांच्यामार्फत अर्ज केला. कोर्टाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून त्यांच्याविरूध्द अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. दरम्यान, आम्ही फरार नसून आम्ही हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावरील निर्णय प्रलंबित असल्याने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात यावे, अशी मागणी चारही बांधकाम व्यावसायिकांतर्फे करण्यात आली.

दोघांना कोठडी

गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर घरी निघालेल्या एका व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी वार जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कोर्टाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. महेश ऊर्फ बबलू चंद्रकांत चलगेरी (वय २७) आणि रोहीत बाबू पुटगे (वय १९, दोघेही रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) अशी कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. या घटनेत अज्जू अहमद शेख (वय ४०, रा. आश्रफनगर, कोंढवा) जखमी झाले होते. या प्रकरणात सद्दाम शाफिक तिलगर (वय २५, रा. आश्रफनगर, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणात नंदू आणि त्याच्या आणखी एका साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी तिलगर आणि त्यांचा मित्र अज्जू शेख दुपारी गणपती विसर्जन मिरवणूक संपवून पार्क केलेली गाडी काढत होते. अज्जू शेख थांबवून तेथील गर्दी कमी करीत असताना उलट्या बाजूने आलेल्या एकासोबत त्यांची बाचाबाची झाली. याच वादातून अटक आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी डायसप्लॉट येथे त्यांना मारहाण करत कोयत्याने डोक्यावर, बरगडीवर व हातावर वार करून खुनाचा प्रयत्न केला. दोघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियकराच्या मदतीने पतीला संपविले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
डोक्यात हातोडा घालून खून करण्यात आलेल्या लघुउद्योजकाच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. घरगुती वादातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने लघुउद्योजक पतीचा खून केल्याची घटना दोन दिवसांनी उघड झाली आहे. गुरुवारी (१५ सप्टेंबर) मध्यरात्री एमआयडीसीमध्ये ही घटना घडली होती.
विजय सुभेदार पवार (४५, रा. आंळदी रोड, भोसरी) असे खून झालेल्या लघुउद्योजकाचे नाव आहे. या प्रकरणी पवार यांची पत्नी कांचन विजय पवार (३७) आणि तिचा प्रियकर सत्यवान सखाराम जाधव (४५, रा. भोर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पवार हे पोपट तुकाराम रासकर यांच्यासोबत भागीदारीमध्ये भोसरी येथील सेक्टर क्रमांक चारमध्ये शिवम एंटरप्रायजेस ही फॅब्रिकेशनची कंपनी चालवित होते. विजय पवार हा घरखर्चासाठी पैसे देत नव्हता. तसेच, त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे पत्नी कांचनसोबत भांडण होत होते. त्यामुळे कांचन ही तिच्या भावाकडून घरखर्चासाठी पैसे घेत होती. यावरूही त्यांच्यात नेहमी वाद होत होते. किरकोळ कारणावरूनही विजय घरामध्ये भांडण करत होता. त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून कांचने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने भावाच्या गाडीवर चालक असलेल्या सत्यवान जाधव याची मदत घेतली. भावाच्या गाडीवर तो चालक असल्याने कांचनची आणि त्याची चांगली ओळख होती.
घटनेदिवशी विजय पवार आणि रासकर यांनी दिवसभर काम केले. सायंकाळी रासकर हा घरी निघून गेला. त्या दिवशी सुरक्षा रक्षक नसल्याने पवार हा कंपनीत झोपण्यास आले होते. कंपनीमध्ये पवार आणि आरोपी जाधव यांनी बराचवेळ गप्पा मारल्या. काही वेळाने जाधव हा परत येतो, असे सांगून निघून गेला. तो परत झोपण्यास येणार असल्याने पावर यांनी कंपनीचे दार उघडे ठेवले होते.
मद्यप्राशन केल्यामुळे पवार लगेच झोपी गेले. त्यानंतर रात्री आकराच्या सुमारास जाधव पुन्हा त्या ठिकाणी आला. त्याने कंपनीत असलेल्या मोठ्या हातोड्याने पवारच्या डोक्यात तीन घाव घातले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कांचन आणि जाधव यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठीत ताकदीचे लिखाण व्हावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शब्द हे शस्त्र आणि रत्न आहेत. त्यांचा वापर करून ताकदीचे लिखाण करता येईल आणि त्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी होऊ शकतो. मात्र, असे असताना मराठीची वाटचाल गरीबीकडे होत आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि प्रतिभा असणाऱ्यांनी मराठीत ताकदीचे लिखाण करून मराठीला गरीब होण्यापासून वाचवण्याची गरज आहे', असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी व्यक्त केले.
मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा 'मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कार' बाबासाहेबांच्या यांच्या हस्ते डॉ. रवींद्र शोभणे यांना तर 'मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती समाजकार्य पुरस्कार' सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना देण्यात आला. त्या वेळी पुरंदरे बोलत होते. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा मृणालिनी शिवाजीराव सावंत, कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे उपस्थित होते.
बाबासाहेब म्हणाले, 'ग. दि. माडगूळकर, शिवाजीराव सावंत, मंगेश पाडगावकर आदींच्या जाण्याने मराठीचे फार मोठे नुकसान झाले. त्यांनी त्यांच्या साहित्याने मराठीला समृद्ध केले आहे. या व्यक्तींच्या जाण्यानंतर मराठीत उत्कृष्ट दर्जाचे लिखाण फार कमी होत आहे. सध्या तर सर्वत्र इंग्रजीचा भडीमारच होत आहे. ज्ञानार्जनासाठी इंग्रजी लिहता आणि बोलता अालेच पाहिजे. मात्र, त्याचा अतिरेक होऊन चालणार नाही. बुद्धिमत्ता आणि प्रतिभा असणाऱ्यांनी मराठी साहित्यात ताकदीचे लिखाण करून मराठीला गरीब होण्यापासून वाचवण्याची गरज आहे. त्याची सुरुवात शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनापासून करण्याची गरज आहे.'
प्रभुणे म्हणाले, 'हा पुरस्कार मिळाल्याने साक्षात शिवाजीरावांनीच पाठीवर कौतुकाची थाप दिल्याचे वाटत आहे. मी प्रचंड भारावून गेलो आहे'.
डॉ. शोभणे म्हणाले, 'दर्यापूरला १९९६ सालामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवाजीरावांना समजले की मी महाभारतावर पुस्तक लिहीत आहे, तेव्हा त्यांनी बोलावून माझी विचारपूस केली. त्यावेळी ते म्हणाले, माझ्या पिढीचे पुढील काम हा करणार आहे. त्यामुळे हा फोटो पाहिजे. शिवाजीरावांच्या नावाने हा पुरस्कार मला मिळाल्याने मी कृतकृत्य झालो'. डॉ. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला उपनिरीक्षकाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एका प्रकरणात चौकशी करण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस उपनिरीक्ष, महिला शिपायासह तिघांना मारहाण केल्याचा प्रकार हडपसर परिसरात शनिवारी रात्री घडला. या प्रकरणात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार महिलांसह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस शिपाई नवनाथ शंकर खताळ यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून रविकांत किसन चव्हाण (वय ४६), महेश रविकांत चव्हाण (वय १९), अमित काळुराम गोयरे (वय ३७), हर्षल गणेश खळदकर (वय १९), अमित काळुराम गोयर याची आई यांच्यासह तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्यात युवराज गायकवाड या व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी महिला उपनिरीक्षक घाटे, शिपाई खताळ व खांडवे यांना सोबत घेऊन हडपसर येथील शंकरमठ मोकाशी गॅरेज येथे गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी रविकांत चव्हाण याच्याकडे चौकशी सुरू केली. त्यानंतर आरडाओरडा करून इतरांना बोलावनू घेत उपनिरीक्षक घाटे यांच्यासह खताळ, खांडवे यांना धक्काबुक्की करून मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरड्यातील भाजी मार्केटमध्ये मद्यपींचा धिंगाणा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, येरवडा
येरवड्यातील शीला साळवे भाजी मार्केटमध्ये काही अज्ञात मद्यपींनी धिंगाणा घालून गाळेधारकांच्या शेतमालाचे नासधूस केल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. दगड टाकून त्यांच्या हातगाड्यांची मोडतोड केली असून, या प्रकारामुळे भाजी विक्रेत्यांनी पोलिसांनी संबंधितांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर गुरुवारी येरवडा परिसरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. डीजेच्या तालावर बेभानपणे थिरकण्यासाठी अनेक स्थानिकांनी मद्यप्राशन करण्यासाठी भाजी मार्केटचा असरा घेतला होता. विसर्जन मिरवणूक असल्यामुळे भाजी मार्केटमधील सर्वच विक्रेत्यांनी दुकाने लवकर बंद केली होती. शुक्रवारी सकाळी मार्केटमध्ये आल्यानंतर सखुबाई भातकर यांच्या शेतमालाची आणि दोन हातगाड्यांची मोडतोड केल्याचे दिसून आले. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष संतोष हावडे आणि काही विक्रेत्यांनी तातडीने येरवडा पोलिस आणि पालिकेच्या मंडई अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी मंडई निरीक्षक मारुती हनमघर यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे.
याबाबत हनमघर म्हणाले, 'वर्षाभरापुर्वीच आपण मंडई निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. भाजी मार्केटला सुरक्षारक्षक पुरविण्याआधी सीमा भिंत उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वप्रथम सीमा भिंत उभारणीसाठी भवन विभागाकडे प्रस्ताव देण्यात येईल. त्यानंतर भाजी विक्रेत्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. तूर्तास काहीही उपयायोजना पूर्ण करणे शक्य नाही.'

सुरक्षेची मागणी
शीला साळवे भाजी मार्केटमध्ये सुमारे १७२ अधिकृत गाळेधारक असून, पालिकेच्या मंडई विभागाकडून दरमहा मासिक शंभर रुपयेप्रमाणे भाडे वसूल केले जाते. गेल्या वीस वर्षांत पालिकेला लाखो रुपयांचा महसूल भाड्याचा रूपाने मिळत असूनही भाजी विक्रेत्यांसाठी प्राथमिक सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. मागील अनेक वर्षांपासून भाजी मार्केटमधील दिवे चोरीला गेले आहेत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना भाड्याने दुकानातून अथवा बॅटरीद्वारे लाइट घ्यावी लागते. भाजी मार्केटच्या सुरक्षेसाठी पालिकेने कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली.

पोलिसांचे दुर्लक्ष
शीला साळवे भाजी मार्केटमध्ये दररोज रात्री या परिसरातील अनेक मद्यपी दारू पिण्यास बसतात. यापूर्वीही दारू पिताना अनेक वेळा गंभीर हाणामारीचे प्रकार घडले आहेत. काही वर्षांपूर्वी एका मद्यपीने शेजारील घरातील एका चिमुरडीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तरीही मार्केटमध्ये भरदिवसा आणि रात्री खुलेआम दारू आणि जुगार खेळला जातो. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती असूनही कारवाई केली जात नसल्याचा आरोप भाजीविक्रेते करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images