Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रेडिओलॉजिस्टचा संप संस्थगित

$
0
0

पुणे : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तीन महिन्यांत प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे रेडिओलॉजिस्टनी पुकारलेले बेमुदत आंदोलन संस्थगित करण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री घेण्यात आला. 'इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशन'च्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. याबाबतचा पाठपुरावा चालूच ठेवण्यात येईल, असेही सांगण्यात आले. तोडगा निघेपर्यंत डॉक्टरांचा कागदोपत्री चुकांसाठी छळ करण्यात येऊ नये, यासाठीच्या सूचना संबंधितांना देण्यात येतील, असे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. 'पीसीपीएनडीटी' या कायद्यात दुरुस्ती करून रेडिओलॉजिस्टची होणारी पिळवणूक थांबण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीरपत्नी स्वाती महाडिक यांची प्रशिक्षणासाठी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले साताऱ्याचे कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांची सैन्यात अधिकारी होण्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. 'शॉर्ट सर्व्हिस कमिशन वुमन' (नॉन टेक्निकल)-१८ कोर्ससाठी नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम गुणवत्ता यादीत श्रीमती महाडिक यांचे नाव समाविष्ट आहे. या प्रशिक्षणानंतर त्या सेनादलात लेफ्टनंट म्हणून रुजू होतील.

स्वाती महाडिक यांनी पुण्यातील 'अपेक्स करिअर्स''मध्ये एसएसबी मुलाखतीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेंगळुरू येथे मुलाखत दिली होती. 'मुलाखतीच्या निकालामुळे आता महाडिक यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमीमध्ये सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी रुजू होता येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सेनादलामध्ये रुजू होतील,' अशी माहिती संस्थेच्या लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) यांनी दिली. या निवडीनंतर महाडिक यांनी ब्राह्मणकर यांच्याशी संवाद साधला. 'या संवादादरम्यान महाडिक यांनी स्वतःच्या निवडीपेक्षाही निधी मिश्रा या महिलेच्या निवडीविषयी आनंद व्यक्त केला. मुलाखतीदरम्यान इतर तरुणींकडूनही खूप काही शिकायला मिळाले. संस्थेमध्ये मुलाखतीसाठी मिळालेल्या मार्गदर्शनाचाही महाडिक यांनी उल्लेख केला,'' अशी माहिती ब्राह्मणकर यांनी दिली.

संस्थेच्या ब्रिगेडिअर विदूर नेवरेकर, कर्नल विनोद सैनानी, ग्रुप कॅप्टन देवधर, कॅप्टन आशा अलगप्पा, हृषीकेश आपटे, देबस्मिता सिन्हा यांनीही श्रीमती महाडिक यांना मार्गदर्शन केल्याची माहिती संस्थेतर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळासाठी पुरंदरला पसंती

$
0
0

प्राधिकरण दहा दिवसांत अहवाल देणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणारी किमान अठराशे हेक्टर जागा आणि खेडमधील शेतकऱ्यांकडून होणारा विरोध यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) पथकाने अखेर पुरंदर तालुक्यातील राजेवाडी व वाघापूर येथील जागेला विमानतळासाठी पसंती दर्शवली आहे. या प्रस्तावित जागेचा तांत्रिक तपासणी अहवाल येत्या दहा दिवसांत करण्याची तयारीही या पथकाने दाखवली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी आवश्यक जागेची उपलब्धता, विमानोड्डाणासाठी डोंगर-दऱ्यांचा अडथळा नसलेली सपाट जागा आणि संपूर्ण पड जमीन यामुळे पुरंदरच्या जागेला पथकाने पसंती दिली आहे. पुण्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची पाहणी करण्यासाठी प्राधिकरणाच्या सात तज्ज्ञ सदस्यांचे पथक शुक्रवारी सकाळी पुण्यात आले. राज्याचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी सौरव राव या वेळी उपस्थित होते. सकाळी या पथकाने विमानतळासाठी प्रस्तावित असलेल्या राजगुरूनगर येथील दोन जागांची पाहणी केली. या जागांची पाहणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ही जागा अपुरी असल्याचे मत पथकाने मांडले. 'आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी किमान अठराशे हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. एवढी जमीन असेल तरच विमानतळासमवेत कार्गो हब, पंचतारांकित हॉटेल अशा सुविधा देता येऊ शकतात. राजगुरूनगरमधील दोन्ही जागा बाराशे हेक्टरच्या आहेत. त्या किमान अठराशे हेक्टर कराव्या लागतील. या सुविधांशिवाय नुसता विमानतळ होऊ शकत नाही,' असे पथकाने स्पष्ट केले.

'राजगुरूनगर येथील दोन्ही ठिकाणी बाराशे हेक्टरपर्यंत जागा मिळवता आली आहे. त्यापेक्षा अधिक जागा मिळणे अशक्य आहे,' असे जिल्हा प्रशासनाकडून पथकाला सांगण्यात आले. या जागांच्या पाहणीनंतर पथकाला पुरंदर तालुक्यातील जागेची पाहणी करण्यासाठी नेण्यात आले. पुरंदरमधील राजेवाडी व वाघापूर येथील जागा पाहिल्यानंतर या पथकाने पसंती दर्शवली. राजेवाडी-वाघापूरची जागा पडीक आहे. याशिवाय जागेजवळ डोंगर-दऱ्यांचा अडथळा नाही आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणारी दोन हजार हेक्टर जमीन एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या जागेला हिरवा कंदील दाखवताना पथकाने दहा दिवसांत तांत्रिक अहवाल सादर करण्याची तयारी दर्शवली.

पुरंदरची जागा कशासाठी?

'पुण्यातील विमानतळाच्या जागेच्या पाहणीसाठी २००४पासून खेड तालुक्यात पथक येत आहे. जागेच्या पाहणीसाठी येण्याची ही चौथी-पाचवी वेळ आहे. जागेची पाहणी केल्यावर स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोध होतो आणि प्रस्ताव मागे पडतो. त्यामुळे विमानतळासाठी दुसरी जागा का पाहत नाही,' असे विमानतळ प्राधिकरणाच्या पथकातील सुजॉय डे यांनी सुचवले. त्यानंतर डे यांना पुरंदरची जागा दाखवल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वप्रथम कामावर लक्ष द्या!

$
0
0

देशप्रेमाविषयी गळे काढणाऱ्यांना नारायण मूर्तींच्या कानपिचक्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ मेरा भारत महानच्या घोषणा देण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या कामावर अधिक लक्ष द्यावे,' असे खडे बोल इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी शुक्रवारी सुनावले. 'धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद, सहिष्णुता ही उदात्त मूल्ये लहान मुलांच्या मनावर वेळीच कोरायला हवीत'' या शब्दांत मूर्ती यांनी देशातील सद्यस्थितीवर नेमकेपणाने भाष्य केले.

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी मूर्ती बोलत होते. फेस्टिव्हलच्या संयोजन समितीचे सदस्य डॉ. रघुनाथ माशेलकर, संयोजिका डॉ. मंजिरी प्रभू, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संचालक भारत अग्रवाल, हॉटस्टारचे सिद्धार्थ जैन, सबिना संघवी, बिपीनचंद्र चौगुले या वेळी उपस्थित होते. यशदा येथे आयोजित हा महोत्सव ४ सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मूर्ती यांची मुलाखत रंगली. या वेळी बोलताना मूर्ती यांनी देशातील सद्यस्थितीवरून कानपिचक्या दिल्या. 'आपल्या देशाने भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. १९९१नंतर झालेल्या आर्थिक बदलामुळे आपण जगातील शक्ती होऊ शकतो, याची जाणीव भारतीयांना झाली. उदारीकरणाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. अशा काळात केवळ मेरा भारत महानच्या घोषणा देण्यापेक्षा प्रत्येकाने आपले काम जबाबदारीपूर्वक आणि लक्ष देऊन करावे,' असे खडे बोल मूर्ती यांनी सुनावले. 'युरोपियन महासंघाप्रमाणे दक्षिण आशियातील देशांची संघटना स्थापन झाली तर, भारतासह अन्य गरीब देशांचा विकास होईल. दक्षिण आशियातील गरीब देशांना एका व्यासपीठाची गरज असून ते राजकीयच असावे असे नाही,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.

चांगल्या समाजासाठी आणि आदर्श नागरिक घडवण्यासाठी साहित्य महत्त्वाचे असते. आयुष्यात चुका कशा टाळाव्यात, हे सर्व धर्मग्रंथ सांगतात. साहित्यामुळे विविध विचार समजतात तसेच, सभ्यता आणि संस्कृती अंगी बाणावते. लेखक परिस्थितीशी झगडत असतो. प्रश्न कसे सोडवायचे याचे मार्गदर्शन साहित्यातून मिळते. विनोदाशिवाय माणसाचे आयुष्य निरस आहे, अशा शब्दांत मूर्ती यांनी साहित्याचे महत्त्व विषद केले. डॉ. माशेलकर म्हणाले, की 'अधिकार आले की जबाबदारी येते. राइट टू एज्युकेशनपासून आपण आता राइट एज्युकेशनकडे जायला हवे.'

एअरलिफ्ट आणि मोबाइलची रिंगटोन

'जवळपास २१ वर्षांनंतर मी पुण्यात रिक्षातून प्रवास केला. हा प्रवास खूप आनंददायी होता,' या मूर्तींच्या वाक्याला टाळ्यांचा कडकडाट झाला. 'मला चित्रपट हे चित्रपटगृहातच जाऊन पाहायला आवडतात. दूरचित्रवाणीवर मी ते पाहू शकत नाही,' या त्यांच्या विधानावर 'तुम्ही अलिकडे पाहिलेला चित्रपट कोणता,'असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'मी एअरलिफ्ट पाहिला आणि माझ्या मोबाइलची रिंगटोनदेखील तीच आहे,' या उत्तराने काळाप्रमाणे प्रवाही असलेल्या व्यक्तिमत्वाच्या 'मूर्ती'मंत रुपाचे रसिकांना दर्शन घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलच्या नादाने पोलिस झाले ‘वेडे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बंदोबस्तासाठी नेमलेला पोलिस हा अलर्ट असतो, अशी सर्वसाधारण भावना आहे. याला अपवाद आहेत ते शिवाजीनगर कोर्टात बंदोबस्तासाठी असलेले पोलिस. कोणी निवांत गप्पा मारतायेत तर कोणी वृत्तपत्र वाचण्यात दंग आहे. मोबाइलवर गेम खेळण्याच्या नादात आपल्या शेजारी 'एसएलआर रायफल' असल्याचे भानही त्यांना राहिलेले नाही.

... हे निरीक्षण दुसरे तिसरे कोणी नोंदवलेले नाही. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी अचानक दिलेल्या भेटीत पोलिस बंदोबस्ताची झलक त्यांना पाहायला मिळाली. या अलर्ट पोलिस कर्मचाऱ्यांची त्यांनीही 'चांगली' दखल घेत त्यांचा चौकशी अहवाल मागविला. या अहवालानुसार त्यांना सक्त ताकीद देण्याची शिक्षा देऊन संबंधितांना योग्य ती समज देण्यात आली आहे. या अलर्ट पोलिसांमध्ये पाच महिला तर तीन पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मोबाइलने पोलिसांना चांगलेच वेड लावल्याची उदाहरणे दररोज दिसत असतानाच पोलिस उपायुक्तांना आलेला अनुभव यावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. शिवाजीनगर कोर्टात दररोज पक्षकार, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस यांच्यामुळे गजबजलेले असते. कोर्टाच्या आवारात खटल्यांच्या निमित्ताने येणाऱ्या पक्षकारांची संख्या हजारोंवर आहे. कोर्टात दररोज पाच ते सहा हजार लोकांची ये-जा असते. कोर्ट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे अलर्ट आल्यानंतर कोर्टातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोर्टाच्या सुरक्षेचाही आढावा

सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या कोर्टाच्या सुरक्षेचा आढावा हिरेमठ यांनी गेल्या महिन्यात अचानक घेतला. त्यांच्या या पाहणीत एक महिला कर्मचारी गेटवर गप्पा मारत होती. दुसरी मोबाइलमध्ये दंग होती तर एसएलआर रायफल बाजूला ठेवण्यात आली होती. वृत्तपत्रात डोके खुपसून तिसरी कर्मचारी ते वाचण्यात दंग होती. कोर्टात बंदोबस्तासाठी असलेली पोलिस व्यवस्था ढिसाळ असल्याचे चित्र या वेळी दिसले. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष केले जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझी लेखणी लोकांचीच भावना बोलते!- शोभा डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मी 'ताली-गाली'साठी बोलत नाही किंवा सनसनाटी निर्माण करत नाही, पण प्रसिद्धी मिळावी असेच माझे व्यक्तिमत्व आहे. मी आणि माझी लेखणी थेट बोलते, आणि ती लोकांचीच भावना बोलते...' अशा शब्दांत प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी शनिवारी आपले वादग्रस्त ट्विट व ट्विस्ट ही लोकांचीच भावना असते, अशी जोरकस मांडणी करून वादाचा चेंडू लोकांच्याच कोर्टात टोलावला.

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये 'युवर्स ट्रुली शोभा डे' या सत्रात डे यांची मुलाखत रंगली. विक्रम संपथ यांनी डे यांच्याशी संवाद साधला. विविध वक्तव्यांवरून होणाऱ्या वादांविषयी 'थेट बोलले की हे होणारच, मी माझे काम करते' अशी भूमिका त्यांनी मांडली.

'मी जे बोलते ते कोणाच्या विरोधात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी नसते. देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण दुर्दैव हे की ते लोकांना माहीत नाही. नागरिकांनी आपले अधिकार आत्मविश्वासाने वापरले पाहिजेत, आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींवर प्रतिक्रिया न देणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. मी कोणाचीही प्रवक्ता नाही. गोड-गोड मला आवडत नाही. मी स्वातंत्र्याच्या बाजूची आहे. स्वयपाकघरात एखादा पदार्थ तयार करावा, तसा हा घ्या नवीन वादाचा पदार्थ, असे मी करत नाही,' अशा शब्दांत डे यांनी टीकाकारांवर निशाणा साधला.

'महिला कार्ड वापरण्याची मला कधी गरज भासली नाही. स्त्रीवाद हा राजकीय शब्द असून त्यावर माझा विश्वास नाही. यापेक्षा संपूर्ण स्त्री-पुरुष समानतेवर माझा विश्वास आहे. स्त्रीवाद या शब्दाकडे हस्तीदंती मनोऱ्यातून पाहता येणार नाही. स्त्री लेखक, पुरुष लेखक असा भेद करत राहिलो तर लेखक म्हणून असलेली उत्स्फूर्तता गमावून बसू,' याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'पुरस्कार वापसी हे ठरावीक सरकारविरोधी नव्हते, तर ती लेखकांची भावना होती. राष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी ते अभियान नव्हते,' असे सांगून डे यांनी पुरस्कार वापसीचे जोरदार समर्थन केले.

स्कर्टवरून तुलना कसली करताय ?

'महिलांच्या पेहरावावरून त्यांची बुद्धिमत्ता व गुणवत्ता जोखली जाऊ नये. देशात लोकशाही आहे. स्कर्ट घालण्यावरून त्यांची तुलना व परीक्षण कसे होऊ शकते,' असा संतापजनक सवाल करत केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या स्कर्टवरील वक्तव्यावर शोभा डे यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळी चोराला अटक

$
0
0

८६ गुन्ह्यांमध्ये सहभाग; आणखी १२ गुन्हे उघड
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे व इतर शहरातील ८६ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या सराईत सोनसाखळी चोराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पकडताना दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या सोनसाखळी चोराकडून शहरातील नवीन बारा सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणला आहे. त्याच्याकडून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अली मंझुर जाफरी उर्फ इराणी उर्फ अली अक्रम जाफरी उर्फ इराणी (३०, सध्या रा. दहावा मैल, वडकीनाला) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार युसुफ समीर इराणी याला देखील अटक करण्यात आली आहे. अली इराणी हा पुणे शहरातील ५६ आणि ठाणे व कर्नाटकातील २८ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात फरारी होता. कर्नाटकातील संजयनगर पोलिसांनी त्याला अटक केली असता पोलिसांना धक्काबुक्की करून पळून गेला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील व सुरेश भोसले यांनी पत्रकार परिषेदत दिली.
अली हा साथीदार युसुफ इराणी याच्यासह दहावा मैल वडकीनाला येथील एका चाळीत वेशांतर करून राहात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक दिवाकर पेडगावकर, नायकवाडी यांनी माहितीची खात्री केली. अली सराईत गुन्हेगाक असून, तो पळून जाण्यात तरबेज होता. पोलिसांनी तो राहत असलेल्या चाळीला वेढा दिला. त्यानंतर अलीने खोलीतील लाइट बंद करून सिमेंटचा पत्रा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पकडण्यात आले. त्या वेळी त्याच्याशी झालेल्या झटापटीत देशमुख आणि साळुंके हे कर्मचारी जखमी झाले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून नवीन दहा गुन्हे उघडकीस आले. पोलिस कर्मचारी राजनारायण देशमुख, संजय बरकडे, विवेक जाधव, भालचंद्र बोरकर, सुनील चिखले, इकबाल शेख, रमेश चौधर, प्रवीण तापकीर, गणेश साळुंके या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल क्रांतीची संधी गमवू नका

$
0
0

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'देशाने औद्यागिक क्रांतीची आणि उद्योजक घडविण्याची संधी गमावली आहे. आता 'डिजिटल क्रांती'ची संधी गमवायची नाही. या क्रांतीच्या आधारेच देशाला जागतिक पातळीवर 'डिजिटल क्रांती'मध्ये सर्वोच्च स्थान मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी नावीन्यपूर्ण संशोधनासाठी 'आउट ऑफ बॉक्स थिकिंग' करावे,' असे आवाहन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी शनिवारी केले. या वेळी २०१० पासून प्रलंबित असणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पदोन्नतींना मंजूरी देण्याची घोषणा प्रसाद यांनी केली.
प्रसाद यांच्या हस्ते प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) इनोव्हेशन पार्क आणि 'ई-हस्ताक्षर' सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले. माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सचिव अरुणा सुंदराराजन, खासदार अनिल शिरोळे, महापालिकेचे आयुक्त आयुक्त कुणाल कुमार, कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी उपस्थित होते.
प्रसाद म्हणाले, 'डिजिटल इंडिया अंतर्गत देशात अडीच लाख ग्रामपंचायती जोडल्या आहेत. देशात गेल्या दोन वर्षात एक लाख ३९ हजार किलोमीटरची फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यात येईल. देशातील सुमारे दोन लाख ३० हजार ग्रामपंचायतींमध्ये नागरी सुविधा केंद्र उभारण्याचा मानस असून त्याद्वारे लोकांना आधार, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे काढता येतील.देशातील ६३० बॅँकचे 'लिंक अप' ग्रामीण भागातील सुमारे एक लाख ३० हजार ग्रामपंचायतींसोबत केले आहे. तसेच ग्रामीण भागात नागरिकांच्या सोयीसाठी येत्या काळात 'रूरल पीपीओ' आणि 'व्हर्च्युअल मोबाईल नेटवर्क' उभारण्यात येतील.'
प्रा. मूना म्हणाले,'वापरकर्त्याला ई-हस्ताक्षर प्रणालीद्वारे आधार कार्डाचा क्रमांक वापरून आवश्यक त्या ठिकाणी किंवा कागदपत्रावर डिजिटल स्वाक्षरी करता येईल. प्रणाली वापरात येण्यासाठी पुणे महापालिकेशी करार करण्यात आला आहे.'
.........
शास्त्रज्ञांना पदोन्नती
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञानाच्या खात्यांतर्गत येणाऱ्या सी-डॅक, सी-मेट यांसारख्या संशोधन आणि विकास (आर अॅन्ड डी) संस्थांमध्ये २०१० सालापासून शास्त्रज्ञांच्या पदोन्नतींचा प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे या शास्त्रज्ञांच्या पदोन्नती देण्यात येत आहेत, अशी घोषणा प्रसाद यांनी केली. यामुळे देशातील शास्त्रज्ञांना मोठा लाभ मिळणार आहे. तसेच अधिक चांगले काम करता येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोपखेल रस्त्याबाबत अहवालाची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'बोपखेल ग्रामस्थांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध होईपर्यंत 'सीएमई'च्या हद्दीतून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्या अनुषंगाने लष्कराच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे,' अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी दिली.
जगताप म्हणाले, 'पुणे-मुंबई महामार्गालगत दापोडी येथून बोपखेलकडे जाणारा रस्ता नागरिकांसाठी बंद आहे. त्यामुळे बोपखेल ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून संरक्षणमंत्र्यापर्यंत पाठपुरावा चालू आहे. अनेक बैठका झाल्या. परंतु, ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे दिल्ली येथे पर्रीकर यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.'
बोपखेल ग्रामस्थांसाठी मुळा नदीवर उभारलेला पूल पावसाळ्यामुळे काढण्यात आला. परंतु, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे शक्य नाही. या कारणास्तव ग्रामस्थांना मनस्ताप होतो, याकडे संरक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले. पर्यायी रस्ता उपलब्ध होईपर्यंत 'सीएमई'च्या हद्दीतील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. नदीवर कायमस्वरुपी पूल बांधण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. त्याचे काम झाल्यानंतर अडचण दूह होईल. तोपर्यंत सदरचा रस्ता वापरू द्यावा, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जल्लोष ‘उत्सवमूर्ती सन्मान’चा

$
0
0

'मटा'तर्फे आयोजन; आजपासून नाव नोंदणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
विघ्नांचे सावट दूर करून मांगल्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागताला अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. गणेशाच्या या उत्सवाचा जल्लोष आणखी रंगतदार करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स घेऊन आला आहे, 'उत्सवमूर्ती सन्मान' हा अनोखा उपक्रम.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया पुण्याने महाराष्ट्रात घालून दिला. सर्वांगसुंदर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून मांगल्यापूर्ण वातावरणात बाप्पाची पूजा, रंजक आणि प्रबोधन करणारे देखावे करून सार्वजनिक मंडळे या उत्सवाची शान वाढवित आहेत. आपले वैशिष्ट्य जपण्यासाठी प्रत्येक मंडळ प्रयत्नशील असते. या मंडळांना व्यापक व्यासपीठ देण्यासह त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने खास मंडळांसाठी उत्सवमूर्ती सन्मान आयोजित केला आहे. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेलाही मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
उत्सवमूर्ती सन्मानमध्ये सर्वोत्तम गणेशमूर्ती, इकोफ्रेंडली गणेशमूर्ती, सर्वोत्तम मंडळ आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे मंडळ अशा गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित या उपक्रमासाठी आजपासून नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मटा'च्या कार्यालयात येऊन, प्रवेश अर्ज भरून आपल्या मंडळाची नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी
संपर्क - ९७६२११५८१४.
वेबसाइट - www.mtganeshutsav.com
इन्स्टाग्राम - #mtganeshutsav
व्हॉट्सॅप क्रमांक - ९२७७०००७११ ( या क्रमांकावर आपल्या नावासह फोटो पाठवावेत.)
ट्विटर - #mtganeshutsav

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवासाठी पोलिस सज्ज

$
0
0

- नऊ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात
- नियमांचे पालन करण्याच्या मंडळांना सूचना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पुणे व पिंपरी चिंचवड शहरात गणेश उत्सवर शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिस सज्ज झाले आहेत. साडेचार हजार सार्वजनिक मंडळे गणेशाची स्थापना करणार आहेत. गणेशोत्सव काळात नऊ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून, आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या गणेश व ढोल ताशा मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील. गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी पहिल्यांदाच प्रमुख गणेशमंडळाच्या मिरवणुकीसाठी 'जीपीएस सिस्टम'चा वापर केला जाणार आहे,' अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गणेश उत्सवातील नियोजन व बंदोबस्त याची माहिती शुक्ला यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. या वेळी सहआयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शुक्ला यांनी सांगितले, 'पुण्यात होणारा गणेशोत्सव हा राज्यात मानाचा समजला जातो. ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या गणेश उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गणेश मंडळ, ढोल-ताशा पथक मंडळे यांच्याशी बैठका घेण्यात आल्या आहेत. चार हजार ४१९ मंडळ गणेश मंडळे गणेशाची प्राणप्रतिष्ठा करणार असून, त्यामध्ये वाढ होऊ शकते. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला असून, त्यावरून त्यांच्याशी संपर्क ठेवला जात आहे.' '५ सप्टेंबर रोजी गणेशाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन परिसरातील वाहतूक बंद केली जाणार आहे. पोलिसांकडून विर्सजन घाटांची पाहणी करण्यात आली आहे. गणेश उत्सवासाठी ११३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर विसर्जन मार्गावर २६ कॅमेरे बसविले आहेत. शांत व सुरक्षितपणे गणेश उत्सवर पार पाडण्यासाठी पोलिसांकडून चोख तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे,' असे आवाहन शुक्ला यांनी केले.
...
नऊ हजार पोलिस तैनात
गणेशोत्सव सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी नऊ हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. यामध्ये दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, १६ पोलिस उपायुक्त, ४० सहायक पोलिस आयुक्त, १७० पोलिस निरीक्षक, ६०० सहायक व उपनिरीक्षक, आठ हजार कर्मचारी, पाचशे होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन कंपन्यांचा बंदोबस्तामध्ये सहभाग राहणार आहे.
....
पहिल्यांदाच 'जीपीएस' सिस्टीम
'गणेश मंडळाच्या प्राणप्रतिष्ठा मिरवणुकीत पोलिसांकडून पहिल्यांदाच 'जीपीएस' सिस्टीम राबविली जाणार आहे. महत्त्वाच्या गणपतींच्या मिरवणुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, पुढची आणि मागची वाहतूक सुरळीत चालावी म्हणून 'जीपीएस' सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. गणेशाच्या रथाला जीपीएस डिव्हाइस जोडले जाणार आहे. त्याचे मॉनिटरिंग पोलिसांमार्फत केले जाणार आहे. त्यामुळे मिरवणुकीचे नेमके 'लोकेशन' पोलिसांना समजणार आहे. दोन मिरवणुका एकमेकांना आडव्या येणार नाहीत, तसेच गर्दीमुळे अडथळा होणार नाही याचीही दक्षता या 'जीपीएस'मुळे घेणे सोपे जाणार आहे. पुण्यामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात येत असूनस मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आलेला आहे,' अशी माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
..
गिव्ह वे टू अॅम्ब्युलन्स योजना सुरू
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अॅम्ब्युलन्सला जाण्यासाठी मार्ग करून देणारी 'गिव्ह वे टू अॅम्ब्युलन्स' ही योजना वाहतूक शाखेने सुरू केली आहे. वाहतूक नियंत्रण कक्षात ८४९१८००१०० क्रमांक ठेवण्यात आला आहे. हा क्रमांक सर्व हॉस्पिटलमध्ये देण्यात आला आहे. या क्रमांकावर फोन केल्यास वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचारी अम्ब्युलन्स जाणाऱ्या मार्गावर पुढील वाहतूक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मार्ग मोकळा करून देतील. या योजनेसाठी फलक तयार केले असून उत्सवामध्ये त्याचे फलक लावण्यात येणार आहेत. 'अॅम्ब्युलन्सचा सायरन म्हणजे रुग्णाची हाक असे समजून वाहनाची गती कमी करा. रोडच्या डाव्या बाजून वाहने सावकाश चालवा. रस्त्याच्या उजव्या बाजूने अब्म्युलन्ससाठी रोड मोकळा करून द्यावा,' असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले.
...
मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना
गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी, हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाचे पालन करावे. प्रत्येक मंडळाने चोवीस तास कमीत कमी दहा स्वयंसेवक नेमावेत. मंडळाच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. गर्दी नियंत्रण करण्यासाठी स्वयंसेवकांनी पोलिसांना मदत करावी. तर, नागरिकांनी देखील काही स्वतःची काळजी घ्यावी. गर्दीमध्ये येताना मौल्यवान वस्तू घालून येणे टाळावे. लहान मुलांची काळजी घ्यावी. बेवारस वस्तू आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.
...
आवाजाची चाचणी होणार
गणेश उत्सवामध्ये १०, ११, १२, १३ आणि १५ तारखेला रात्री बारापर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी आहे. मात्र, बारापर्यंत परवानगी असली तरी कोर्टाने आवाजाची मर्यादा आखून दिलेली आहे. त्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज आढळून आल्यास त्या मंडळावर ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. नागरिकांनी जास्त आवाज असल्याची तक्रार केल्यास पोलिस अधिकारी त्या ठिकाणी जाऊन आवाजाची चाचणी घेतील. त्यात तथ्य आढळून आले, तर संबंधित मंडळावर कारवाई केली जाईल.
...
नियमभंग केल्यास ढोल-ताशा पथकांवर गुन्हे
गणेश मंडळासमोर वाजविण्यासाठी संबंधीत ढोल-ताशा पथकाला परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी शिवाय त्यांना मंडळासमोर वाजविता येणार नाही. ढोल व ताशांची नेमून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त आढळून आले व आवाजाची मर्यादा पाळली नाही तर ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
...
स्वागत कक्षांना बंदी
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानींना बंदी घालण्यात आली आहे. विघ्नहार्ता न्यास व महापालिकेच्या स्वागत कक्षांना परवानगी आहे.
...
- दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त
- साडेचार हजार सावर्जनिक मंडळे गणेशाची स्थापना करणार
- १३ ठिकाणी अॅम्ब्युलन्सची सोय
- सात चौकात अनाउन्सिंगची सोय
- संभाजी चौकी, पुरम चौक, फरासखाना पोलिस ठाणे येथे क्लिनिक
- साडेपाचशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
- १७ जणांवर 'एमपीडीए'ची कारवाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूजेचा मुहूर्त दुपारी दीडपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
श्रावण संपल्यावर नागरिकांची गणरायाच्या स्वागतासाठी लगबग सुरू झाली आणि बघताबघता उद्यापासून (सोमवार) या बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांचे लाडके दैवत असलेल्या या गणरायाच्या स्वातगासाठी घराघरात सध्या लगबग सुरू आहे. या वर्षी गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटे साडेचार पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त आहे.
'यंदाच्या गणेश चतुर्थीची श्रीगणेशपूजा प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी सोमवारी (४ सप्टेंबर) सकाळी सूर्योदयापासून (६.३०) ते मध्यान्ह १.३० हा काळ मुहूर्त म्हणून चांगला आहे. मध्यान्हपिनी, चित्रा नक्षत्रयुक्त चतुर्थी उत्तम मुहूर्त असल्यामुळे सकाळी ९.३० ते १ हा प्राणप्रतिष्ठा पूजनासाठी सर्वोत्तम काळ आहे,' असे शारदाज्ञान पीठम् चे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.
'दिवाळीप्रमाणेच ब्राम्ह मुहूर्तावर चार ते साडेचार या वेळात स्नान, संध्यावंदन, घरच्या देवतांचे पूजन, सूर्यनमस्कार, गायत्री जपानुष्ठान, मातापितासद्गुरू पूजन झाल्याशिवाय गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा विद्या कलांचे अधिदैवत असणाऱ्या विद्येश्वर महागणपतीची प्रतिष्ठा - पावित्र्य - मांगल्य वाढविणारी नाही. दुपारनंतर दिवसभर केव्हाही सवडीने गणपती बसविणे हे धर्मशास्त्र नसून, 'सवडशास्त्र' आहे. गायन, वाद्य वादन, नृत्यकला या सेवा श्रीगणरायाला राजोपचार म्हणून सर्वाधिक प्रिय आहेत,' असे गाडगीळ यांनी सांगितले.
.................
भद्रा वर्ज्य नाही
'श्री गणेश चतुर्थीला सकाळी ८ वाजेपर्यंत भद्रा असली, तरी श्री गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठा आणि पूजन करण्यास भद्रा वर्ज्य नाही, म्हणून सोमवारी ब्राह्ममुहूर्तापासून सुमारे पहाटे साडेचार वाजल्यापासून मध्यान्हकाळी दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोईने कोणत्याही वेळी श्री गणेश पूजन करता येईल,' अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. 'आपल्या घरी जितके दिवस उत्सव असेल तितके दिवस सकाळी पूजा आणि रात्री आरती मंत्रपुष्प केल्याने घरामध्ये प्रसन्नता येते, घरातील मूर्ती सुमारे एक वीत म्हणजे ७/८ इंच उंचीची असावी, ही मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी तसेच मातीची अथवा शाडूची असावी,' असे दाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवस खरेदीचा

$
0
0

पूजा साहित्य, फुलांची मागणी वाढली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सर्वांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शनिवारच्या सुटीचा योग साधून पुणेकरांनी पूजा साहित्याची खरेदी केली. अष्टगंध, उदबत्ती, शेंदूर, आसन, केवडा, कमळाचे फूल यासह विविध प्रकारच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती.
येत्या सोमवारपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार हे दोनच दिवस आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी उरले आहेत. बहुतांश नागरिकांनी सजावटीच्या साहित्याची खरेदी यापूर्वीच केली आहे. तरीही, काही जणांनी शनिवारी देखील मखरापासून सजावटीच्या विविध साहित्याची खरेदी केली. मात्र, शनिवार हा प्रामुख्याने पूजेच्या साहित्य खरेदीचा दिवस ठरला. पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारापेठेत व दुकानांमध्ये गर्दी झाली होती. नोकरदार गृहिणींकडून पूजेच्या तयार ताटांना पसंती मिळाली. पूजेच्या तयार ताटामध्ये फुलवाती, हळद-कुंकू, अक्षता, अत्तर, वस्त्र, उदबत्ती, धूप, अष्टगंध, बदाम, खारका यांचा समावेश आहे. महात्मा फुले मंडई परिसरात या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती.
छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या दोन दिवसांपासून फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गणेशोत्सवानिमित्त झेंडू, गुलछडी, बिजली, जर्बेरा, गुलाब गड्डी, डच गुलाब, पिवळी शेवंती, अस्टर या फुलांना अधिक मागणी आहे. त्यामुळे आवक वाढूनही या फुलांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. साधारणपणे, फुलांच्या किमतीत ३० ते ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती फुलांचे व्यापारी युवराज पाटील यांनी दिली.
-------
नारळाचे दर उतरले
'गणेशोत्सवानिमित्त आंध्रप्रदेश, तामिळनाडू व कर्नाटकातून सुमारे दीड ते दोन लाख नारळांची आवक झाली आहे. मागणी जास्त असूनही नारळाच्या दरामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्क्यांनी घट झाली आहे,' अशी माहिती नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी दिली. गेल्या वर्षी गोटा खोबऱ्याला जागेवर ९० रुपये किलो भाव मिळाला होता. यंदा तो ६० रुपयांवर आला आहे. त्यामुळे गोटा खोबरे न करता थेट कच्च्या नारळाची विक्री करण्यावर उत्पादकांचा भर आहे. त्यामुळे नारळाची आवक अपेक्षेपेक्षा अधिक असून, त्यामुळेच नारळाचे दर उतरले असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना साडेबारापर्यंत

$
0
0

गणरायाच्या स्वागताची तयारी पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चैतन्यदायी गणेशोत्सवाला आता केवळ २४ तास उरल्याने लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सारे सज्ज झाले आहेत. घरोघरी कामांना वेग आला असून, सार्वजनिक मंडळेदेखील नियोजनाच्या कामांमध्ये व्यग्र आहेत. त्यातच मानाच्या पाच, तसेच दगडूशेठ, मंडई व भाऊसाहेब रंगारी गणपती यांसह सर्व मंडळांच्या श्रींच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली असून, आता सर्वांना वेध लागले आहेत ते प्रत्यक्ष उत्सवाचे. दुपारी साडेबारापर्यंत सर्व मंडळांमध्ये श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

गणेशोत्सवाला सोमवारपासून दिमाखदार सुरुवात होत आहे. उत्सवामुळे वातावरणात उत्साह संचारला आहे. मांडव उभारणीच्या कामाला वेग आला असून, काही मंडळांनी देखाव्यांची तयारी सुरू करत आघाडी घेतली आहे. पुढील दहा दिवस उत्सवाचे असल्याने वातावरणाचा नूर पालटायला आता सुरुवात झाली आहे.

मानाचे पाच गणपती म्हणजे पुण्याचे वैभव. दगडूशेठ गणपती म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान. मंडईची शारदा गजाननाची विलोभनीय मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू, तर भाऊ रंगारीची मूर्ती गणरायाच्या शक्तीस्थानाचे प्रतीक. अशा या मंडळांबरोबर शहरातील उत्सवाची परंपरा सांगणारी सर्व मंडळे गणरायाच्या स्वागतासाठी आतुर झाली आहेत.

अशी होईल प्रतिष्ठापना

श्री कसबा गणपती
पुण्याचे ग्रामदैवत व मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक सकाळी ८.३० वाजता निघणार आहे. मिरवणुकीत देवळाणकर बंधू यांचे नगारा वादन तर श्रीराम व शिवतेज ढोलताशा पथकाचे वादन रंगणार आहे. तसेच मिरवणुकीत प्रभात बँड असेल. दुपारी ११ वाजून ३६ मिनिटांनी प्रकाश प्रभुणे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल.

तांबडी जोगेश्वरी
मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता मंदार लॉजजवळून निघणार असून, सतीश आढाव यांचे नगारा वादन, तर न्यू गंधर्व बँड व शिवमुद्रा ढोलताशा पथक यांचे वादन होणार आहे. मिलिंद व अपर्णा केळकर यांच्या हस्ते साडेबारा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल.

गुरुजी तालीम
मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीच्या मिरवणुकीला गणपती चौकातून सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. जयंत नगरकर यांचे नगारावादन मिरवणुकीची शोभा वाढवणार आहे. मनीलाल गड्डा यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होईल.

तुळशीबाग
मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी ९ वाजता सुरुवात होईल. दुपारी साडेबारा वाजता पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल. मिरवणुकीमध्ये गजलक्ष्मी, रणमर्द व आदिमाया ही ढोलताशा पथके असतील. उत्सव मंडपाच्या मागे असणाऱ्या पेशवेकालीन मूर्तीला यंदा चांदीची प्रभावळ करण्यात आली आहे.

केसरीवाडा
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सकाळी ९ वाजता निघणार असून बिडवे बंधू यांचे सनईवादन व श्रीराम पथकाचे ढोलताशा वादन आकर्षण असेल. डॉ. रोहित व प्रणति टिळक यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीस सकाळी ८ वाजता प्रारंभ होईल. मिरवणुकीत ताल, वाद्यवृंद, शंभूगर्जना या पथकांचे वादन रंगणार आहे. महापौर प्रशांत जगताप रथाचे सारथ्य करतील. सकाळी ११ वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल.

मंडई गणपती
मंडईच्या शारदा-गजाननाच्या मिरवणुकीस सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार आहे. फुलांचा रथ हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण आहे. दुपारी बारा वाजता प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रींच्या मिरवणुकीस सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. मिरवणुकीत देवळाणकर बंधूंचे नगारावादन असेल. सकाळी सकाळी ११ वाजून १ मिनिटांनी बाबामहाराज तराणेकर यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल, तर सायंकाळी सात वाजता राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते देखाव्याच्या विद्युत रोषणाईचे उद्‍घाटन होणार आहे. चेन्नई येथील महाबलीपुरमच्या शिवमंदिराची प्रतिकृती मंडळाने साकारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सी-डॅक़’ला निधी लवकरच

$
0
0

मंजूर निधी लवकरच; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सचिव सुंदरराजन यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'केंद्र सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खाते सी-डॅकला 'फंडिंग' देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे सी-डॅकला खात्याकडून जो काही मंजूर निधी मिळण्याचे शिल्लक आहे, तो येत्या काही दिवसात देण्यात येईल,' अशी ग्वाही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सचिव अरुणा सुंदराराजन यांनी शनिवारी कार्यक्रमात दिली.

सी-डॅकच्या इनोव्हेशन पार्क या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सुंदराराजन बोलत होत्या. 'मटा'ने सी-डॅकला संशोधन आणि विकासासाठी (आर अँड डी) सुसज्ज इमारत म्हणजेच 'इनोव्हेशन पार्क बांधण्यासाठी खात्याकडून मंजूर झालेला निधी मिळत नसल्याचे काही दिवसांपूर्वी वृत्तमालिकेतून प्रकाशित केले. यावर शनिवारी सुंदराराजन यांनी माहिती दिली. इमारतीचे पाच पैकी केवळ तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अशा अपूर्णावस्थेत असलेल्या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केले. उर्वरित तीन मजल्यांच्या तसेच सुसज्ज इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ३७ कोटी रुपये खात्याकडून येणे बाकी आहे.

सुंदराराजन म्हणाल्या, 'देशात 'डिजिटल' ही संकल्पना सर्वप्रथम सी-डॅकने मांडली. सी-डॅक देशांतील विविध क्षेत्रांतील समस्या सोडविण्यासाठी 'आर अँड डी'चे मोठे काम करत आहे. त्यामुळे भारत हा येत्या काही जागतिक स्तरावर 'डिजिटल' क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवेल.' 'देशात डिजिटल क्रांतीमुळे खूप मोठा सकारात्मक बदल होणार असून देश माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक बळकट होत आहे. या क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सी-डॅकच्या पाठीशी खाते असून, त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे सी-डॅकला खात्याकडून जे काही इमारतीसाठी, संशोधनासाठी आदींसाठी 'फंडिंग' व मंजूर निधी मिळण्याचे शिल्लक आहे, ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल. या पुढेही सी-डॅकला मदत करण्यात येईल,' असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सी-डॅकला मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सी-डॅकला खात्याकडून जे काही इमारतीसाठी, संशोधनासाठी आदींसाठी 'फंडिंग' व मंजूर निधी मिळण्याचे शिल्लक आहे, ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल.

- अरुणा सुंदराराजन, सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खाते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मी लोकांची भावना बोलते : शोभा डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मी 'ताली-गाली'साठी बोलत नाही किंवा सनसनाटी निर्माण करत नाही, पण प्रसिद्धी मिळावी असेच माझे व्यक्तिमत्व आहे. मी आणि माझी लेखणी थेट बोलते आणि ती लोकांचीच भावना बोलते...' अशा शब्दांत प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी शनिवारी आपले वादग्रस्त ट्विट व ट्विस्ट ही लोकांचीच भावना असते, अशी जोरकस मांडणी करून वादाचा चेंडू लोकांच्याच कोर्टात टोलावला.

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये 'युवर्स ट्रुली शोभा डे' या सत्रात डे यांची मुलाखत रंगली. विक्रम संपथ यांनी डे यांच्याशी संवाद साधला. विविध वक्तव्यांवरून होणाऱ्या वादांविषयी 'थेट बोलले की हे होणारच, मी माझे काम करते' अशी भूमिका त्यांनी मांडली.

'मी जे बोलते ते कोणाच्या विरोधात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी नसते. देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण दुर्दैव हे की ते लोकांना माहीत नाही. नागरिकांनी आपले अधिकार आत्मविश्वासाने वापरले पाहिजेत, आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींवर प्रतिक्रिया न देणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. मी कोणाचीही प्रवक्ता नाही. गोड-गोड मला आवडत नाही. मी स्वातंत्र्याच्या बाजूची आहे. स्वयंपाकघरात एखादा पदार्थ तयार करावा, तसा हा घ्या नवीन वादाचा पदार्थ, असे मी करत नाही,' अशा शब्दांत डे यांनी टीकाकारांवर निशाणा साधला.

'महिला कार्ड वापरण्याची मला कधी गरज भासली नाही. स्त्रीवाद हा राजकीय शब्द असून, त्यावर माझा विश्वास नाही. यापेक्षा संपूर्ण स्त्री-पुरुष समानतेवर माझा विश्वास आहे. स्त्रीवाद या शब्दाकडे हस्तीदंती मनोऱ्यातून पाहता येणार नाही. स्त्री लेखक, पुरुष लेखक असा भेद करत राहिलो, तर लेखक म्हणून असलेली उत्स्फूर्तता गमावून बसू,' याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'पुरस्कार वापसी हे ठरावीक सरकारविरोधी नव्हते, तर ती लेखकांची भावना होती. राष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी ते अभियान नव्हते,' असे सांगून डे यांनी पुरस्कार वापसीचे जोरदार समर्थन केले.

स्कर्टवरून तुलना कसली करताय?

'महिलांच्या पेहरावावरून त्यांची बुद्धिमत्ता व गुणवत्ता जोखली जाऊ नये. देशात लोकशाही आहे. स्कर्ट घालण्यावरून त्यांची तुलना व परीक्षण कसे होऊ शकते,' असा संतापजनक सवाल करत केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या स्कर्टवरील वक्तव्यावर शोभा डे यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘२४ बाय ७’ योजनेचा भुर्दंड; 'मनसे'ची टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील नागरिकांना समान पाणीवाटपाच्या नावाखाली महापालिका राबवित असलेल्या '२४ बाय ७' योजनेची वाटचाल 'रोगापेक्षा उपाय भयंकर' दिशेने सुरू आहे. या योजनेच्या खर्चाचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी पडणार आहे. ही योजना संपूर्ण शहरात राबविण्याऐवजी स्मार्ट प्रकल्पासाठी निवडलेल्या बाणेर, बालेवाडी भागात राबवावी; महापा‌लिकेच्या 'स्मार्ट' आयुक्तांनी याची चाचणी घेऊन ही योजना पुढे न्यावी, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.

पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या आणि त्यानंतर मीटर बसविण्याची प्रक्रिया होणार असतानाही महापालिका मीटर बसविण्याची इतकी घाई का करत आहे, मीटरची घाईगडबड करण्यामागे नक्की कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी उपस्थित केला. शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी आवश्यक मीटर बसविण्यासाठी पुणेकरांच्या करातून पालिकेच्या तिजोरीत जमा झालेल्या पाचशे कोटी रुपयांचा चुराडा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जे नागरिक पाण्याचे मीटर बसवून घेतील, त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्समधील पाणीपट्टीचे नक्की काय होणार? याचा स्पष्ट खुलासा का केला जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

'पालिका प्रॉपर्टी टॅक्सची वसूली योग्य पद्धतीने करू शकत नाही. यापूर्वी पालिकेने मीटरने पाणी देण्यास सुरुवात केली होती. त्याची कोट्यवधी रुपयांची असलेली थकबाकी वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरले असताना पुन्हा मीटरचा घाट का घातला जात आहे,' असा सवाल संभूस यांनी उपस्थित केला. जीएसटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याने मीटर योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड पालिका करणार तरी कशी, या योजनेमुळे पालिका कर्जबाजारी होण्याची भीती आहे. केवळ खासगी कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी महपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही योजना आणल्याची शंका यातून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, NCP, MNS चा पुरंदर विमानतळाला पा‌ठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदर तालुक्यातील राजेवाडी व वाघापूर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पा‌ठिंबा दिला आहे. या विमानतळाची उभारणी करताना स्थानिक शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा आणि त्यात भागीदार करावे, असा प्रस्ताव दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिला आहे.

पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ झाल्यास या भागाचा मोठा विकास होणार आहे. त्यामुळे विमानतळाच्या उभारणीला आमचा पूर्ण पा‌ठिंबा राहणार आहे. विमानतळाचे काम 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप' (पीपीपी) तत्त्वावर केले जाते. त्याऐवजी शेतकऱ्यांची जमीन घेऊन त्यांना यामध्ये भागीदार केल्यास त्यांचा मोठा फायदा होईल, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी मांडले.

पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास तालुक्याचा कायापालट होऊ शकतो. विमानतळासाठी जागा घेताना शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा ही अपेक्षा आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतल्यास आणि सर्वांचे एकमत झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विमानतळाला पा‌ठिंबा राहणार आहे. पुरंदरमधील जनतेच्या हितासाठी हा चांगला निर्णय असणार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी घेतली आहे.

विमानतळाचे मनसेनेही स्वागत केले आहे. या विमानतळासाठी बागायती जमीन घेऊ नये; तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा. जमिनीच्या मोबदल्याबरोबरच त्यांना विमानतळाच्या उभारणीत भागीदार केल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे मनसेच्या शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) पथकाने शुक्रवारी प्रस्तावित विमानतळासाठी राजगुरूनगरमधील दोन जागा आणि पुरंदर तालुक्यातील राजेवाडी व वाघापूर येथील जागांची पाहणी केली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी किमान अठराशे हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. राजगुरूनगरमधील दोन्ही ठिकाणांचे क्षेत्र बाराशे हेक्टरपर्यंत आहे. या क्षेत्रामध्ये आणखी वाढ करणे अवघड आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाला राजेवाडी व वाघापूर येथील जागा दाखविली. पुरंदर तालुक्यातील या दोन्ही गावांमध्ये दोन हजार हेक्टर जमिनीची उपलब्धता आहे; तसेच विमानोड्डाणासाठी डोंगरांचा अडसर नाही. सपाट आणि पडीक जमीन याचा फायदा विमानतळासाटी होऊ शकतो. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने या जागांसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

खेड तालुक्यात विमानतळासाठी चार पर्याय निवडण्यात आले आहेत; परंतु स्थानिक शेतकरी व पुढाऱ्यांकडून विमानतळाच्या जागांना वारंवार विरोध होत असल्याने पुरंदरचा नवा पर्याय पुढे आला आहे. पुरंदरमधील विमानतळाला स्थानिक शेतकरी व पुढाऱ्यांकडून पा‌ठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कामठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगताप व मनसेचे जाधवराव यांनी पुरंदरच्या विकासासाठी विमानतळ आवश्यक असल्याची भूमिका घेतली असून त्यासाठी सहकार्याचे पाऊल उचलले आहे.

रेल्वेची सोय पथ्यावर

विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या राजेवाडी गावातून रेल्वे जाते. राजेवाडी ते पुणे स्टेशनपर्यंत रेल्वेने येण्यास सध्या पस्तीस ते चाळीस मिनिटांचा अवधी लागतो. रेल्वेचा हा अवधी पंधरा मिनिटांपर्यंत कमी करणे शक्य आहे. सिंगापूरसारख्या देशात विमानतळावर जाण्यासाठी रेल्वेची स्वतंत्र सोय आहे. तशी स्वतंत्र सोयही या ठिकाणी करता येणे शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेमघर धरण गळतीप्रकरणी १० अभियंते निलंबित

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

टेमघर धरण गळतीप्रकरणी जलसंपदा विभागानं दोषी अभियंत्यांवर तात्काळ कारवाई केली आहे. प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केल्यानंतर दोषी आढळलेल्या २५ पैकी १० अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर उर्वरित १५ अभियंते सेवानिवृत्त झाले आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या अभियंत्यांमध्ये आर. बी. गलियान, मोरे यांच्यासह टी. एस. देशपांडे, एस. डी. कोकाटे, आर. डी. पाटील, जे. वाय. सूर्यवंशी, व्ही. के. लोमटे, एस. ए. टिळेकर, ब. भि. ढेरे, एच. के. धामणकर यांचा समावेश आहे.

टेमघर धरणातून गळती होत असल्याचे समोर आल्यानंतर जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली. त्यात कंत्राटदारासह २५ अभियंते दोषी आढळून आले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरणाची पाहणी केली. त्यानंतर या प्रकरणी ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक बांधिलकीचा गणेशोत्सव

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला दीर्घ परंपरेबरोबरच सामाजिक बांधिलकीचीही मोठी परंपरा लाभली आहे. शहरापासून देशपातळीवर कोठेही आपत्तीजनक परिस्थिती उदभवल्यास, मग तो एखादा भूकंप असो की कारगिलचे युद्ध असो, अशा कोणत्याही प्रसंगात शहरातील गणेश मंडळांकडून मदतीचा हात नेहमीच दिला जातो.
शहरात सुमारे चार हजार नोंदणीकृत मंडळे आहेत. यापैकी बहुतांश मंडळे दरवर्षी गणेशोत्सवात देखावे साकारतात. बहुतांश देखाव्यांचे विषय सामाजिकच असतात. या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्यात येते. यामध्ये स्त्री-पुरुष समानता, मुलगी वाचवापासून नव्याने दाखल झालेल्या आजारात काळजी कशी घ्यावी आदींबाबत प्रबोधन केले जाते. या माध्यमातूनही गणेश मंडळे सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. त्याबरोबरच आर्थिक मदत देण्यात गणेश मंडळे अजिबात मागे नाहीत.
कारगिल युद्धाच्या वेळी पुण्यातील अनेक मंडळांनी देखाव्यांवर खर्च न करता किंवा विसर्जन मिरवणूक साधेपणाने काढून खर्चात बचत केली. वाचलेला सर्व पैसा सैन्याच्या मदतीसाठी पाठविला होता. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणूनही अनेकदा मदत केली जाते. राज्यात विदर्भ, मराठवाड्यात दरवर्षी काही भागात दुष्काळी परिस्थिती असते. यंदाचे वर्ष वगळता गेल्या चार वर्षांत राज्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी सर्वाधिक भरडले जातात. या परिस्थितीचा सामना करताना त्यांना बळ मिळावे यासाठी मंडळांकडून विविध उपक्रम राबविले जातात. दिवाळीच्या सणासाठी शिधा पाठविणे, उन्हाळ्यात जनावरांसाठी चारा पाठविणे, आर्थिक मदत करणे आदी गोष्टी केल्या जातात.
------
वंचितांसाठीही कार्यरत
शहरातील देवदासी व त्यांच्या मुलांसाठी व अनाथ मुलांसाठी गणेश मंडळे काम करतात. त्यांच्या शिक्षणापासून विविध सणांचा आनंद त्यांना लुटता यावा यासाठी मंडळे प्रयत्नशील असतात. दिवाळीच्या काळात 'रेड लाइट' भागात जाऊन दीपोत्सव करणे, फराळ वाटप करणे, अशा उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images