Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'तरच 'मेरा भारत महान' च्या घोषणेला अर्थ'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ 'मेरा भारत महान'च्या घोषणा देण्यापेक्षा प्रत्येक भारतीयाने आपल्या कामावर अधिक लक्ष द्यावे,' तरच त्या घोषणेला खरा अर्थ प्राप्त होईल, असे खडेबोल इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आज सुनावले. 'धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद, सहिष्णुता ही उदात्त मुल्ये लहान मुलांच्या मनावर वेळीच कोरायला हवीत,' अशा शब्दांत मूर्ती यांनी देशातील सद्यस्थितीवर नेमकेपणाने भाष्य केले.

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. फेस्टिव्हलच्या संयोजन समितीचे सदस्य डॉ. रघुनाथ माशेलकर, संयोजिका डॉ. मंजिरी प्रभू, यावेळी उपस्थित होते. यशदा येथे आयोजित हा महोत्सव ४ सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मूर्ती यांची मुलाखत रंगली. याप्रसंगी बोलताना मूर्ती यांनी देशातील सद्यस्थितीवरून कानपिचक्या दिल्या. 'आपल्या देशाने भांडवलशाही अर्थव्यवस्था आता स्वीकारली आहे. १९९१ नंतर झालेल्या या आर्थिक बदलामुळे जगातील आपण एक शक्ती होऊ शकतो, याची जाणीव भारतीयांना झाली आहे. उदारीकरणाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. अशा काळात केवळ 'मेरा भारत महान'च्या घोषणा देण्यापेक्षा प्रत्येक भारतीयाने आपले काम लक्षपूर्वक करावे,' असे खडे बोल मूर्ती यांनी सुनावले.

'युरोपियन महासंघाप्रमाणे दक्षिण आशियेतील देशांची संघटना स्थापन झाली तर भारतासह गरीब देशांचा विकास होईल. दक्षिण आशियातील गरीब देशांना एका व्यासपीठाची गरज असून ते राजकीय असावेच असे नाही,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उद्घाटनसत्रात मूर्ती यांनी 'साहित्य आणि समाज' यांचा परस्परसंबंध उलगडून दाखवला. 'चांगल्या समाजासाठी व आदर्श नागरिक घडवण्यासाठी साहित्य महत्त्वाचे असते. आयुष्यात चुका कशा टाळाव्यात, हे सर्व धर्मग्रंथ सांगतात. साहित्यामुळे विविध विचार समजतात तसेच सभ्यता व संस्कृती अंगी येते, असेही मूर्ती यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अलंकारांनी सजली सराफ पेठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाजूक दुर्वा, मिनावर्क केलेली जास्वंदाची फुले, रेखीव मोदक, रत्नजडित मुकुट, कोरीव काम केलेले हार, छोटासा उंदीर... यासंह असंख्य प्रकारचे चांदी आणि सोन्याचे दागिने लाडक्या गणरायासाठी सराफी पेठेत दाखल झाले आहेत. घरी येणाऱ्या गणरायाला विविध प्रकाराच्या अलंकारांनी सजविण्याची भक्तांची इच्छा ओळखून सराफी कारागिरांनी सुंदर दागिने तयार केले आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेल्या या दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळाली आहे.

गणपतीच्या सजावटीतील लहान वस्तूपासून ते त्याच्या आभूषणांपर्यंत प्रत्येक निर्णयाबद्दल नागरिक खूप चिकित्सक आहेत. दर वर्षी गणपतीसाठी नावीण्यपूर्ण सजावट करण्याबद्दल ते आग्रही असतात. यातूनच गणपतीसाठी दागिने करण्याची लाट गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आली आहे. गणपतीचे बहुतांश चांदीचे दागिन्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असल्याने दरवर्षी या दागिन्यांची मागणी वाढते आहे. चोखंदळ ग्राहकांसाठी कारागीरांनीही असंख्य प्रकारचे दागिने तयार केले आहेत. अवघ्या पाच ग्रॅमपासून किलोपर्यंत विविध प्रकारात चांदीचे दागिने उपलब्ध आहेत.

गणपतीच्या आभूषणांमध्ये रत्नजडित मुकुट, परशू, अंकुश, जानवे, हार, जास्वदांचे फूल, हातातले कडे उपलब्ध आहे. पूजा साहित्यामध्ये दुर्वा, जास्वंदाच्या फुलांचे हार, कमळ, नारळ, शमीची पाने, तोरण, पाच फळाचे सेट, तबकडी, पंचपाळे, समई, दिवे, ताम्हण, पळी पंचपात्रे अशा वस्तूंचा समावेश आहे. चांदीबरोबरच या सर्व वस्तू सोन्यामध्ये तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे सोन्याच्या वस्तूंनाही मागणी वाढली आहे. काही सराफांनी गणेश अलंकार, पूजा साहित्य असे सेट तयार केले आहेत. भेट देण्यासाठी देखील या सेटची खरेदी होते आहेत. अवघ्या शंभर रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंत या वस्तूंच्या किमती आहेत. गेल्या काही वर्षात गणपतीच्या चांदी आणि सोन्यांच्या अलंकारांमध्ये भरपूर प्रकार उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा दर वर्षी प्रतिसाद वाढतो आहे. गणपतीचे अलंकार, पूजा साहित्य, फळे आणि फुलांमध्येही अनेक प्रकार आहेत. या वर्षी चांदीच्या अलंकारांबरोबर सोन्याचे दागिने घेण्याचा कल वाढलेला दिसतो आहे, अशी माहिती पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे भागीदार अजित गाडगीळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशवाई, जय मल्हार पगड्यांना मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणरायाच्या स्वागतासाठी आराशीसह जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणरायांना वस्त्रालंकारांनी सजवतानाच त्यांच्यासाठी खास पगड्याही बनवून घेतल्या जात आहेत. तीन इंच आकारापासून ५६ इंच आकारापर्यंत या पगड्या उपलब्ध असून यंदा 'पेशवाई' आणि 'जय मल्हार' पगड्यांना जोरदार मागणी आहे. खास गणरायांसाठी पुण्यातून २५ हजारहून अधिक खास गणरायांसाठी बनवून घेतलेल्या पगड्या निर्यात होत असल्याची माहिती फेटेवाल्यांनी दिली.

गणरायांना वस्त्रालंकारांनी सजवून वाजत-गाजत घरी आणले जाते. सार्वजनिक मंडळांनी गणरायांसाठी खास फेटे आणि पगड्या बनवण्याचा पायंडा पाडला. आता घरोघरी प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या गणरायांसाठीही वैविध्यपूर्ण फेटे आणि पगड्या ऑर्डर देऊन बनवून घेतल्या जात असल्याचे चित्र आहे. यंदा 'बाजीराव-मस्तानी' हा सिनेमा गाजला. त्यानुसार श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या वेशभूषेतली आवेशपूर्ण गणेशमूर्ती बाजारात दाखल झाली आहे. त्यासह गणरायांसाठी खास पेशवाई पगडीही विविध आकारांमध्ये आली आहे. त्याचप्रमाणे 'जय मल्हार' मालिकेसारखी श्रीखंडेरायांची पगडीही बाजारात आली असून या दोन्ही पगड्यांनी विशेष मागणी असल्याचे रविवार पेठेतील 'साई फेटा'चे एजाज रंगरेज यांनी सांगितले.

कमीत कमी तीन इंच आकारापासून ते ५६ इंच आकारापर्यंतच्या पगड्या आणि फेटे गणरायांसाठी खास बनवून घेतल्या जातात. त्यासह जर्दोसी वर्क आणि वीणकाम केलेले शेले यांनाही मागणी आहे. पिवळा, लाल, सोनेरी, गुलाबी अशा ठसठशीत रंगात आणि त्यावर मोत्यांच्या माळा आणि घोस, आकर्षक लेस लाऊन फेट्यांची सजावट होते. पेशवाई पगडीसाठी खास कुंदनचा शिरपेचही वापरला जातो. पेशवाई आणि जय मल्हार पगडीसह जिरेटोप, शिंदेशाही, पुणेरी पगड्या आणि महाराजा फेटा यांना सर्वाधिक मागणी आहे. सार्वजनिक मंडळांसह घरच्या गणपतीहीसाठीही या पगड्या मागितल्या जात असल्याचेही रंगरेज म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींचे बुकिंगही करा ‘ऑनलाइन’

$
0
0

पुणे ः सणावाराच्या काळात पूजेसाठी अनुभवी आणि विद्वान गुरुजी उपलब्ध नसणे, गुरुजींच्या तारखा न मिळणे अशा अडचणी आता दूर होणार आहेत. गुरुजींना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुण्यात आता 'गुरुजी फॉर ऑल' ही सेवा सुरू झाली आहे. त्यासाठी पुण्यात तयार झालेल्या वेबपोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना गुरुजींचेही ऑनलाइन बुकिंग करणे शक्य होणार आहे.

'गुरुजी फॉर ऑल'तर्फे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संस्थेचे संस्थापक निकेत पुराणिक यांनी या उपक्रमाची माहिती दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या वेबपोर्टलला गेल्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पुराणिक यांनी केला.

या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना अनेकानेक अनुभवी गुरुजींचे प्रोफाइल जाणून घेता येईल. गुरुजींचा फोटो, त्यांच्या आजवरच्या कार्याची माहिती, त्यांचा अनुभव, ते पुरवत असलेल्या सेवांची यादी आदी बाबींचा त्यामध्ये समावेश असेल. ग्राहकांच्या नेमक्या अपेक्षा जाणून हे पोर्टल विकसित केल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालचित्रवाणी’ बंद करण्यावरून कर्मचारी संतप्त

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
'बालचित्रवाणी' बंद करण्यामागे असलेले झारीतील शुक्राचार्य नेमके कोण, असा खडा सवाल संस्थेमधील कर्मचारी आता उपस्थित करीत आहेत. संस्थेला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याविषयी अनास्था असणाऱ्या, अगदी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनासाठीही संस्थेकडे न फिरकणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना संस्था बंद करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांना बदनाम करून, अधिकारी स्वतःची पोळी भाजून घेत असल्याची भूमिकाही आता कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.
शिक्षण खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पुण्यातील राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात 'बालचित्रवाणी' बंद करण्याचा निर्णय घेतल्याची बाब 'मटा'ने शुक्रवारी उघड केली. संस्थेचा इतिहास लक्षात घेता, ही संस्था सुरू राहणे आणि त्यातून चांगले शैक्षणिक कार्यक्रम विकसित होणे गरजेचे असल्याचे मत मांडले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे संस्था बंद करण्याचा निर्णय घेणे म्हणजे 'आजारापेक्षा उपाय भयंकर' अशीच परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रियाही याच निमित्ताने नोंदविण्यात आल्या.
'बालचित्रवाणी'विषयी खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे नकारात्मक मत या निमित्ताने समोर येत आहे. संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी खात्याने पुढाकार घेऊन काही उपक्रम केले. मात्र, या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारून, त्या आधारे काम करण्याकडेही दुर्लक्ष केले. शिक्षण खात्याच्या विविध विभागांमधील प्रशिक्षण कार्यक्रम, सीडी तयार करणे, खात्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे चित्रीकरण करून, ते जतन करून ठेवणे आदी प्रकारांनी संस्था टिकविण्यासाठी गेल्या काही काळामध्ये प्रयत्न झाले. 'बालभारती'सारख्या संस्थेच्या जोडीने काम करण्याचे प्रयत्नही झाले. संस्थेसाठी आवश्यक ई-लर्निंग अभ्याससाहित्य विकसित करण्यासाठी 'बालचित्रवाणी'ची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या प्रयत्नांनाही 'बालचित्रवाणी'कडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे खात्यातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर, काम करण्यास कर्मचाऱ्यांचा नकार नसून, संस्थेसाठी अपेक्षित पुरेसे अधिकारी-कर्मचारी भरण्याविषयी आणि एकूणच संस्थेविषयी शिक्षण खाते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच अनास्था असल्याने संस्था बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी केला.

काम करण्यास तयार पण...
संस्थेमध्ये एकूण १२० पदे आहेत. त्यापैकी केवळ ३४ पदांवर सध्या कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेकडे निर्मात्यांची १२ पदे आहेत; मात्र सध्या एकही निर्माता नाही. तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून प्रथम आणि द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांची कामे करण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नाही. वरिष्ठ अधिकारी संस्थेकडे फिरकण्यासही तयार नाहीत. संस्थेमध्ये सन २००० पासून कर्मचारी निवृत्ती प्रक्रिया सुरू झाली. या पदांवर सरकारने, वा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवे कर्मचारी भरलेच नाहीत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून काम करण्यासही कर्मचाऱ्यांची हरकत नाही; मात्र संस्थेकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीच निधी नाही, तर अशा सुविधा विकसित होणार तरी कशा, असा सवाल कर्मचारी उपस्थित करत आहेत. याही परिस्थितीत कर्मचारी काम करण्यास तयार आहेत. मात्र, ही परिस्थिती समजून घेण्यासाठी संस्था बंद करण्यासाठी प्रयत्नशील उच्चपदस्थ अधिकारी एकदाही संस्थेकडे फिरकले नसल्याची नोंदही कर्मचाऱ्यांनी 'मटा'कडे शुक्रवारी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅट्रॉसिटी’मुळे देशाचे तुकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात सध्या अॅट्रासिटी कायदा पुन्हा आणला जात आहे. या कायद्यामुळे देशाच्या चिंध्या होतील,' अशी टिपण्णी किशोर व्यास यांनी केली. देशाचे राजकीय, आर्थिक, नैतिक किंवा कोणतेही पतन झाले असेल तर त्याला नेहरू परिवार जबाबदार आहे, असा आरोपही व्यास यांनी या वेळी केला.

स्नेहल प्रकाशन आणि पुणे मराठी ग्रंथालयातर्फे अरुण करमरकर लिखित 'पोलादी राष्ट्रपुरुष' या पुस्तकाचे किशोर व्यास (गोविंददेव गिरी महाराज) यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी व्यासपीठावर सरदार वल्लभभाई पटेल यांचे नातू डॉ. मधू पटेल, पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष मुकुंद अनगळ, कार्याध्यक्ष धनंजय बर्वे, प्रकाशक रवींद्र घाटपांडे, लेखक करमरकर आदी उपस्थित होते.

'देशात सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही वर्ष राहिले असते तर आयोध्याच्या राम मंदिराचा प्रश्न पुन्हा उकरून काढावा लागला नसता. त्यांच्या कौशल्याने तो सोडविला गेला असता. स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेता आले याचे खरे श्रेय हे सरदार पटेल यांना जाते. या देशाला जो माता मानत नाही त्यांना ही गोष्ट कळणार नाही. आपण भारत मातेचे पुत्र असल्याची भावना पटेलांनी देशवासीयांच्या मनात जागविली. काश्मीर प्रश्न हा देशाला जडलेला दुर्धर रोग आहे. हा प्रश्न चिघळल्यानंतर उशिरा सरदारांचा त्यात प्रवेश झाला. या प्रश्नात जाणीवपूर्वक त्यांना दूर ठेवण्यात आले,' असे किशोर व्यास यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियाचा वापर पक्षासाठी करण्याचे राष्ट्रवादीचे आवाहन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शहराच्या हितासाठी केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी फेसबुक आणि ट्विटरचा उपयोग पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करावा,' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे, पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्ग मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यशाळेसाठी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया तज्ज्ञ सिद्धेश भोबे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
नागरिकांपर्यंत पक्षाचे काम पोहचविण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. 'सोशल मीडिया'मध्ये वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप असे अनेक पर्याय असले तरी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवर अधिक भर द्यावा, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या. नगरसेवकांना त्यांनी केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया अधिक उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे 'आगामी निवडणुकीसाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहा' असे शहराध्यक्ष खासदार चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार संघटनांचा पिंपरीमध्ये मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

देशातील प्रमुख कामगार संघटनांनी विविध मागण्यासाठी शुक्रवारी देशव्यापी संप पुकारला होता. त्या निमित्त शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमधील विविध कामगार संघटनांनी पुण्यातील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये मोठ्या संख्येने कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे संत तुकारामनगर पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले.

पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. यामध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडी, इंटक, आयटक, हिंदू मजदूर सभा, राष्ट्रवादी कामगार संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे संत तुकारामनगर पिंपरी येथे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. कामगार नेते आणि राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनाला दिलीप गावडे, दीपक पाटील, धनाजी जाधव, रुबिना शेख, रेबिका अमोलिक, संतोष पवार, अरुण चासकर उपस्थित होते.

चिंचवड येथील इंटक प्रणित नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एमप्लॉइज या संघटनेच्या कामगारांनीही संपामध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे आज पिंपरी-चिंचवड परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये वर्दळ कमी होती. हा संप यशस्वी झाला आहे, असेही मत इंटक प्रणित नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एमप्लॉइजचे सचिव देवदास

देवकर यांनी व्यक्त केले. या वेळी के. एस पारखी, प्रमोद आवतारे, डी. के. गोडसे, प्रकाश सोंडकर, आर. पी. कर्पे, अक्षय मिंडे, रामदास वाकडकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दरोडेखोरांची टोळी गजांआड

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) नगर-पुण्यातील टोळीला गजांआड केले. या टोळीने आळेफाटा (साकोरी) आणि कल्याण येथे दरोडा घालून दोन कुटुंबांतील पाच जणांचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. साकोरी येथील घटनेत ४० वर्षांच्या महिलेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेवर नराधमांनी बलात्कार करून अमानुषतेचा कळस गाठला होता.
दरम्यान, कल्याण येथील घटनेतही नराधमांनी बलात्कार केल्याची शक्यता असून, त्यांच्याकडे तपास करण्यात येत आहे. पुणे आणि नगर परिसरातून अटक केलेले सहाही नराधम १९ ते ३२ या वयोगटातील आहेत. ऋषी अशोक काळे (वय १९, रा. कासारवाडी), अनिल उर्फ तिऱ्या ढोम्या काळे (वय ३०, रा. तळेगाव), मथ्या उर्फ नामदेव यमराज भोसले (वय १९,रा. चिखली), नागेश उर्फ सचिन अशोक काळे (वय ३२, रा. पारनेर), आकाश उर्फ डोळा कळसिंग भोसले (वय २०, रा, आकुर्डी), गोविंद उर्फ नीलेश सुरेश भोसले (वय २०, रा. तळेगाव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिली.
आळेफाट्याजवळील साकोरीत गेल्या महिन्यात दरोडा पडला होता. या वेळी दरोडेखोरांनी दाम्पत्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेचा तपास 'एलसीबी'चे प्रमुख राम जाधव यांच्या पथकाने सुरू केला. तपासादरम्यान, जूनमध्ये ठाणे जिल्ह्यातील करवलेत अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले. तेथे तिघांचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही घटनास्थळांच्या अनुषंगाने मोबाइल टॉवरची मदत घेतली आणि एका संशयितावर लक्ष केंद्रित केले. हा संशयित पिंपरी रेल्वे स्टेशनवर फिरत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
संशयिताला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांची माहिती देऊन पाच खून आणि बलात्कार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी उर्वरित पाचही आरोपींना गजाआड केले. या आरोपींनी कल्याण येथे शंकर भंडारी (वय ६०), त्यांची पत्नी, मुलगी शनी (वय २०) यांचा खून केला होता.


अधीक्षकांतर्फे रोख पारितोषिक
दरोडा, खून आणि बलात्कार करून निर्दयतेचा कळस गाठणारा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल अधीक्षक डॉ. जाधव यांनी तपास पथकाला रोख बक्षीस देऊन अभिनंदन केले. सहायक निरीक्षक राजेश वाघमारे, फौजदार अंकुश माने, दत्तात्रय गिरमकर, सुनील बांदल, शरद बांबळे, किरण आरुटे, मुन्ना मुत्तनवार, सचिन गायकवाड, महेश गायकवाड, विशाल साळुंखे, शफी शिलेदार, सतीश कुदळे, अतुल डेरे, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, सचिन मोरे, विघ्नहर गाडे, चंद्रकांत वाघ यांचा पथकात सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यान विभागाची अवस्था दयनीय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाची अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे वाट लागली आहे,' असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. वृक्षारोपणाचा आकडा फुगवत त्यातील किती झाडे जगतात, याविषयी खरे तर संशोधन करण्याची गरज आहे, अशी खोचक टिप्पणीही करण्यात आली.

उद्यान विभागाच्यातर्फे शहरात ठिकठिकाणी केवळ वृक्षारोपण केले जाते. मात्र, त्यातील किती झाडे जगतात, याचे संशोधन व्हावे. बहुतांशी झाडे जगतच नाहीत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. उद्यान अधीक्षकांकडे तक्रार केल्यास ते वेळेवर दखल घेत नाहीत, असेही निदर्शनास आणून दिले. महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणासाठी चांगल्या प्रजातींच्या रोपांची गरज आणि आवश्यकता पाहून वृक्षारोपणाची रोपे, फळांची पाहणी करावी. सामाजिक वनीकरण विभागाच्या पुणे, शिरूर, इंदापूर आदी भागांतील नर्सरींची पाहणी करावी. तसेच रोपे आणि फळरोपे थेट पद्धतीने खरेदी करण्याच्या सुमारे चार लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने सदस्यांनी उद्यान विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

नारायण बहिरवाडे म्हणाले, 'स्थायी समितीच्या बैठकीत विषयपत्रिकेवर दरवर्षी रोपे खरेदीचा विषय असतो. पूर्वी गुलाबपुष्प उद्यान आणि संत तुकारामनगर येथील नर्सरीत रोपे तयार करण्यात येत होती. मात्र, तेथील रोपांची निर्मिती बंद झाली आहे. त्यामुळे खरेदीचे विषय आणले जातात. शहरात ठिकठिकाणी केवळ वृक्षारोपण करण्यात येते. त्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होते. रस्त्याच्या कडेला अगदी फूटपाथवरही वृक्षांचे रोपण केले जाते. तेथे झाडे मोठी झाल्यावर पादचाऱ्यांना चालणे मुश्किल होते. किती आणि कोठे वृक्षारोपण करावे, यावर नियंत्रण राहिलेले नाही. शहराच्या विविध भागांतील झाडे तोडण्याविषयीची सक्षम यंत्रणा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे छोटी-मोठी झाडे काढण्यासाठी नागरिकांची गैरसोय होते. याबाबत पर्यावरण आणि उद्यान विभागाने उपाययोजना करायला हवी. झाडे तोडून देण्यासाठी प्रशिक्षकांची माहिती संकेतस्थळावर टाकावी. याबाबतची सूचना उद्यान विभागाने मान्य केली.'

कैलास थोपटे म्हणाले, 'अनेकदा लहानमोठ्या सोसायट्यांच्या परिसरात छोट्या वृक्षांची छाटणी करण्याची मागणी होते. त्यासाठी पाठपुरावा केला जातो. परंतु, यंत्रणाच सक्षम नसल्यामुळे गैरसोय होते. तसेच काही वेळा धोकादायक झाडांमुळे अपघातांची शक्यता असते. त्यामुळे वृक्षतोडणे, छाटणी करणे याबाबत यंत्रणा उपलब्ध करून द्यायला हवी. याबाबतची कामे ठेकेदारांमार्फेत केली जातात. ते लोक व्यवस्थितपणे काम करीत नाहीत. त्यामुळे गैरसोय होते. आता पावसाळा संपत आला तरी वृक्षारोपणाची मोहीम कागदावर आहे. हा संथ गतीचा कारभार सुधारणार तरी कधी?'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या विरोधातील फौजदारी खटला रद्द

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून एका महिलेने दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि इतर पाच पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात कोर्टात दाखल केलेला फेरविचार याचिकेत कोर्टाने रद्द केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या खटल्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. तो फेरयाचिकेत रद्द करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी. डी. देशमुख यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
फिर्यादी किरण रशिद शेख (वय ४०, दत्तवाडी) यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी दावा दाखल केला होता. कोर्टाने या प्रकरणात भारतीय दंड संहिता कायदा कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला होता.
फिर्यादी किरण शेख यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांचा दत्तवाडी येथील मिळकतीचा वाद होता. दत्तवाडी पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. उलट मलाच त्रास दिला, असा आरोप करून शेख यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये फौजदारी खटला दाखल केला होता. या आदेशाविरुद्ध दत्तवाडी पोलिसांनी अॅड. मिलिंद पवार, अॅड योगेश पवार, अॅड गणेश सोनवणे यांच्यामार्फत कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती.
प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल हा चुकीचा असून, तो रद्द झाला पाहिजे. अन्यथा पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश यांनी आदेश पारित करताना तांत्रिक व चुकीच्या आरोपांवर व मुद्दयांवर निकाल दिला. निकाल देताना नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार झाला नाही, असा युक्तिवाद वकिलांनी कोर्टात केला.
शेख यांच्यावर दत्तवाडी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. त्याचा राग धरून खोटे आरोप करून फौजदारी खटला दाखल करण्यात आला. ही फिर्याद कपोलकल्पित असून त्यामध्ये नेमकी घटना कधी घडली हाच मुद्दा नाही. आरोप केलेले पोलिस अधिकारी यांचे संपूर्ण नावे देखील फिर्यादीमध्ये नमूद नाहीत.
फिर्यादी यांच्या फिर्यादीची खातरजमा न करता गुन्हा दाखल करण्याचे आदेश दत्तवाडी पोलिसांनाच देण्यात आले होते. हे पुर्णपणे चुकीचे असून, पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे. अशा चुकीच्या निकालामुळे समाजात पोलिसांच्या विरोधात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायालयाचा निकाल रद्द होणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद अॅड. पवार यांनी केला. कोर्टाने अॅड. पवार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडा​धिकाऱ्यांचा आदेश रद्द केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याच्या भरधाव डंपरने सात वाहनांना उडविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकाच्या उतारावरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या महापालिकेच्या कचऱ्याच्या डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपरने सात वाहनांना धडक दिली. त्यानंतर डंपर भिंतीवर जाऊन आदळल्याने थांबला. या अपघातामध्ये दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या असून, एकावर उपचार सुरू आहेत. या अपघातमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी डंपर चालकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. ब्रेक निकामी झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे.
रामेश्वर संभाजी सोनार (वय ३१, रा. रायकर मळा, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या अपघातामध्ये संतोष कोंडे (वय ३१) व सचिन पवळे (वय ३२, रा. पिरंगुट) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचा कचरा वाहणारा डंपर शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास चांदणी चौकाकडून कोथरूड डेपोकडे येत होता. उतारावर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले. त्याने पवळे यांच्या दुचाकीला गुप्ता टॉय शॉपसमोर पाठीमागून धडक दिली. धडकेत कोंडे गंभीर जखमी झाले, तर पवळे यांना किरकोळ मार लागला. त्यानंतर डंपरने काही अंतरावर जाऊन जैन- लोहिया आयटी पार्कसमोर उभ्या असलेल्या चार चारचाकी मोटारी आणि दोन रिक्षांना धडक दिली. त्यानंतर तो आयटी पार्कच्या भिंतीवर जाऊन धडकल्याने थांबला.
दुचाकीला धडक दिल्यामुळे जखमी झालेल्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एका व्यक्तीवर किरकोळ उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर, दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. कोथरूड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे थोडीशी वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिस अधिक तपास करत आहेत.
-------------
डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू
महर्षीनगर येथे महापालिकेचा कचरा वाहणाऱ्या डंपरच्या धडकेत संजय राम नगुळे (वय ४५, रा. थेरगाव फाटा, डांगे चौक) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी डंपर महर्षीनगरकडून विघ्नहर चौकाकडे जात होता. त्यावेळी नगुळे खन्ना दवाखान्यासमोर सिलिंडरच्या गाडीजवळ थांबले होते. डंपरचा नगुळे यांना जोराचा धक्का लागला. त्यामुळे ते खाली पडून डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात डंपरचालक प्रदीप आव्हाडे (वय ३१, रा. पुनावळे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशी सुपरकम्प्युटरची पुण्यात होणार निर्मिती

$
0
0

सहा महिन्यांत 'सी-डॅक' लहान सुपरकम्प्युटरही विकसित करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'केंद्र सरकारच्या नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनला (एनएसएम) पाठबळ देण्यासाठी सी-डॅक येत्या वर्षभरात पहिल्या देशी बनावटीच्या सुपरकम्प्युटरची निर्मिती करणार आहे. त्याची जोडणी पुण्यातील इनोव्हेशन पार्कमध्ये होईल. या सुपरकम्प्युटरच्या जोडीलाच दोन लहान सुपरकम्प्युटरही येत्या सहा महिन्यात विकसित करण्यात येतील,' अशी माहिती सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

'प्रगत संगणन विकास केंद्राच्या'वतीने (सी-डॅक) पाषाण येथील पंचवटीमध्ये उभारण्यात आलेल्या सी-डॅकच्या इनोव्हेशन पार्कची (आर अॅन्ड डी) माहिती प्रा. मूना यांनी दिली. या वेळी कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी उपस्थित होते. प्रा. मूना म्हणाले, 'सी-डॅकची नवी इमारत म्हणजेच इनोव्हेशन पार्क ही पाच मजली इमारत आहे. त्यातील तीन मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या तीन मजली इमारतीतून सी-डॅकचा कारभार चालेल. यामध्ये नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनला उपयोगी पडणाऱ्या सुपरकम्प्युटरची निर्मिती करण्यात येणार आहे. हा पहिला देशी बनावटीचा कम्प्युटर असेल. सुपरकम्प्युटरचा आराखडा, त्याला लागणाऱ्या विविध भागांची निर्मिती आणि जु‍ळणी या तिन्ही गोष्टी सी-डॅक करणार आहे. या सुपरकम्प्युटरचा काम करण्याचा वेग जबरदस्त आणि सध्या उपलब्ध असणाऱ्या परम सुपरकम्प्युटरपेक्षा अधिक असेल. अशाप्रकारचे जगात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सुपरकम्प्युटर आहेत. या प्रयोगामुळे जागतिक सुपरकम्प्युटिंगमध्ये भारताची नवी ओळख निर्माण होईल.'

'सी-डॅककडून निर्मिती होणारा डेटा मोठ्या प्रमाणात आहे. आता इनोव्हेशन पार्कमुळे डेटा निर्मितीमध्ये अधिकच वाढ होणार आहे. त्यामुळे डेटाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन सी-डॅकने सायबर सिक्युरिटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. सायबर सिक्युरिटी वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून सायबर सिक्युरिटी सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे,' असेही प्रा. मूना म्हणाले. सी-डॅकने निवडणुकीसाठी 'नॅशनल इलेक्ट्रल रोल प्युरिफिकेशन अँड ऑथेंटिकेशन' या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या शिवाय 'सी-डॅक'द्वारे केंद्राच्या सर्व वेबसाइट्स प्रादेशिक भाषांमध्ये पाहण्याची सुविधा निर्माण कण्यात येणार आहे, असेही मूना म्हणाले.
..........

'स्मार्ट पुण्यासाठी मदतीचा हात'

सी-डॅक, पुणेतर्फे 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी पुणे महापालिकेसोबत करार करण्यात आला आहे. या करारानुसार स्मार्ट सिटीत 'वाहतूक' आणि 'पाणी' या दोन गोष्टींचे व्यवस्थापन कसे असावे, या विषयी सी-डॅक मार्गदर्शन करणार आहे. त्यानुसार प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्रणालीनुसार येत्या काही दिवसांत या दोन्ही बाबींचे काम सुरू होईल. त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू असल्याचे डॉ. दरबारी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकाशे मंजुरीपूर्वीच क्षेत्र ताब्यात मिळणार

$
0
0

सुधारित बदलासाठीचे हेलपाटे टाळण्यास मदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बांधकाम परवानगीमध्ये सुलभता येण्याच्या दृष्टीने इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वीच सुविधा क्षेत्र आणि रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र ताब्यात देण्याची सुविधा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) उपलब्ध केली आहे. त्यामुळे एकदा बांधकाम नकाशा मंजूर झाल्यावर त्यातील सुधारित बदलांसाठी वारंवार घालावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत आणि प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विकास गतीने होण्यास मदत होणार आहे.
'पीएमआरडीए'चे आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. प्रचलित पद्धतीने बांधकाम नकाशा मंजूर झाल्यानंतर सुविधा क्षेत्र तसेच रस्ता रूंदीकरणाचे क्षेत्र हस्तांतरीत करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांमार्फत सुधारित नकाशे सादर केले जातात. हे नकाशे सादर केल्यावर चालू बांधकाम थांबविले जाते. या सुधारित नकाशांच्या मान्यतेसाठी विलंब लागतो आणि त्यामध्ये फ्लॅट बुकिंग केलेले नागरिक भरडले जातात. हा विलंब टाळण्यासाठी तसेच प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विकास गतीने होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वी रस्ता रुंदीकरणात येणारे क्षेत्र तसेच सुविधा क्षेत्राची जागा प्रथम ताब्यात घेण्यात येते आणि त्याचे मान्य चटईक्षेत्र (एफएसआय) ग्राह्य धरूनच बांधकाम नकाशे मंजूर करण्यात येतात. त्यामुळे सुधारित नकाशे तयार करून त्यास पुन्हा मान्यता घेण्याची गरज राहणार नाही. मात्र, हा निर्णय पीएमआरडीच्या कार्यक्षेत्रातील दहा किलोमीटरच्या परिसरापुरताच लागू होणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्याचे बंधन बांधकाम व्यावसायिकांवर राहणार नाही तर ते ऐच्छिक ठेवण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिकाला सुरुवातीला अंशतः चटईक्षेत्र वापरायचे असेल तर त्यासाठी तेवढाच विकास निधी, अधिमूल्य आणि उपकर आकारण्यात येत आहे. भविष्यात पुढील चटईक्षेत्र वापरायचे असल्यास तसा इरादा केवळ आवश्यक नकाशांसह प्राधिकरणात एक खिडकी योजनेत सादर करणे अभिप्रेत आहे. त्याची छाननी न करता नकाशा मंजूर करण्याची ही सुलभ पद्धत कार्यरत करण्यात आली आहे, असेही झगडे यांनी स्पष्ट केले.
..
स्थळपाहणी दाखला जागेवरच
इमारतीचा बांधकाम नकाशा सादर करताना जागेचा स्थळपाहणी दाखला आवश्यक असतो. हा दाखला देण्यासाठी मोबाइल ऑफिस तयार करण्यात आले आहे. स्थळ पाहणीसाठी आवश्यक शुल्क भरल्यानंतर बांधकाम निरीक्षक प्रत्यक्ष जागेवर पाहणी करतात. त्यानंतर हा दाखला टॅबद्वारे लगेचच उपलब्ध करून दिला जात आहे. स्थळ पाहणी दाखला देण्यासाठी सात दिवसांपेक्षा अधिक पेन्डसी नसल्याचे 'पीएमआरडीए'चे आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले.
..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’मध्येही ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’

$
0
0

बांधकाम परवानग्यांमध्ये आणली सुलभता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उद्योगांना पायघड्या घालण्याच्या धोरणाला अनुसरून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्येही (पीएमआरडीए) 'इज ऑफ डुइंग बिझनेस'चे धोरण अवलंबिण्यात येत आहे. 'पीएमआरडीए'चे आयुक्त महेश झगडे यांनी इमारतींच्या बांधकाम परवानगीमध्ये सुलभता आणली असून, डिजिटल ऑफीस हे त्याचे पुढचे पाऊल असणार आहे.
'इज ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत राज्य सरकारने उद्योगांना पायघड्या घातल्या आहेत. उद्योगांना विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. या परवानग्यांची संख्या निम्म्याहून कमी करण्यात आली असून, त्यात सुलभताही आणण्यात आली आहे. त्याच धर्तीवर 'पीएमआरडीए'मध्ये बांधकाम नकाशांना मान्यता देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यात आली आहे. 'पीएमआरडीए'ची स्थापना होऊन वर्षभराचा कालावधी लोटला आहे. स्थापनेनंतर जवळपास साडेतीन हजार फाइल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच नवीन मंजुरीची प्रकरणेही दाखल होत होती.
तुटपुंज्या मनुष्यबळावर हे काम मार्गी लावण्याचे आव्हान होते. त्यामुळे त्यात सुलभता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यात प्राधिकरणाला यश आले. या कामाचे प्रमाणिकरण करण्यात आले. बांधकाम नकाशे मंजुरीसाठी दाखल करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याची कल्पना वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येते. या कागदपत्रांसह नकाशे दाखल झाल्यावर 'पीएमआरडीए'कडून केल्या जाणाऱ्या छाननीची माहितीही संबंधितांना कळविली जाते. छाननीमधील माहिती खुली झाल्यामुळे बांधकाम नकाशांचे प्रस्ताव करून त्याच्या मान्यतेची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
बांधकाम नकाशांची छाननी झाल्यावर विकास शुल्क, उपकरांचे चलन केले जाते जाते. हे चलन भरण्याचा एसएमएस आणि ई-मेल संबंधितांना पाठविला जातो. बँकेच चलन भरल्यानंतर त्याची पावतीही बँकेमार्फतच 'पीएमआरडीए'कडे येते. त्यामुळे मध्यस्थ हा प्रकार बंद झाला आहे. बांधकाम नकाशे मंजुरीची संपूर्ण प्रक्रियाच साठ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
..
पुढचा टप्पा डिजिटल ऑफिसचा
पुढील टप्प्यात डिजिटल ऑफिस ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू असून, सध्या प्राधिकरणात येणारे टपाल डिजिटल पद्धतीने निकाली काढले जाते. तशाच पद्धतीने फाइल्सचेही काम केले जाणार आहे.
..
पीएमआरडीएचा विकास आराखड्याचा इरादा जाहीर करण्यासाठी एमीपीसी कमिटीने मान्यता दिली आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील जमीन वापराचा सर्व्हे (इएलयू) सुरू करण्याता आला असून, तो तयार झाल्यानंतर सहा महिन्यांत पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्यात येईल. तसेच पीएमआरडीएसाठी फायनान्शियक मॉडेल तयार करण्याचे काम सुरू आहे.
महेश झगडे, आयुक्त, पीएमआरडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संपाला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या विविध धोरणांना विरोध म्हणून देशातील विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला शहरात शुक्रवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. टपाल कार्यालये आणि काही सरकारी कार्यालये वगळता अन्य सेवा नियमितपणे सुरू होत्या. पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा सुरळीत राहिल्याने पुणेकरांना अडचणी आल्या नाहीत.
बँका, सरकारी कार्यालये, विमा, आरोग्य, टपाल, औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटनांनी संपाची हाक दिली होती. मात्र, काही संघटनांनी संपात सहभागी न होता केवळ काळ्या फिती लावून काम करण्याचे या पूर्वीच जाहीर केले होते. महसूल खात्यातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. तलाठी कार्यालय, सर्कल ऑफिस, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखा, रेशनिंग कार्यालये, नागरी सुविधा केंद्रामध्ये शुकशुकाट होता.
विविध कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देऊन निदर्शने केली. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे, अनिल वाघमारे, सदानंद काळे, दत्तात्रय धुमाळ, अनुराधा आठवले, सुमन टिळेकर, जब्बार शेख, विनायक राऊत, नितीन घोडके, सचिन तांबोळी, शरद हेंद्रे, सविता मोहरे, प्रकाश धानेपकर, सचिन तारू, प्रवीण इगवे, बबलू शेख, शुभांगी परदेशी, माधुरी वाघ आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या औषधांमुळे पेशंटचा मृत्यू; गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

किडनीचा त्रास होत असल्यामुळे इनलॅक्स आणि बुधराणी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या पेशंटला दुसऱ्याच पेशंटची डायबेटिसची औषधे दिल्याने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात डॉक्टर, हॉस्पिटलचे व्यवस्थापक आणि नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ज्योती चंद्रकांत वाळके (वय २३, रा. फ्लेमिंगा अपार्टमेंट, बावधन) यांनी तक्रार दिली आहे. चंद्रकांत दिनकर वाळके (वय ५४, रा. बावधन) असे दगावलेल्या पेशंटचे नाव आहे. तक्रारीवरून बुधराणी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकासह डॉक्टर सचिन आणि दोन नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत वाळके रेल्वेमध्ये अधिकारी होते. किडनीचा त्रास होत असल्याने ते पूर्वीपासूनच बुधराणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. २७ जुलै रोजी त्रास वाढल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवस उपचार केल्यानंतर घरीही सोडण्यात आले.

घरी आल्यानंतर काही औषधे विकत घेण्याविषयी सांगण्यात आले. वाळके यांच्या कुटुंबियांनी औषधे आणल्यानंतर डॉ. सचिन यांना दाखविली. त्यावेळी त्यांनी ती योग्य असल्याचे सांगितले. ही औषधे घेतल्यानंतर वाळके बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान २७ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी चौकशी केली असता, चंद्रप्रकाश लोखंडे या पेशंटची डायबेटिसची औषधे चंद्रकांत वाळके यांना देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. चुकीची औषधे घेतल्यामुळे पेशंटचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाळके कुटुंबीयांनी तशी तक्रार पोलिसांकडे केली. तपासात तथ्य आढळल्याने हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासह डॉक्टर व नर्सेसवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक जे. ए. मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरकडून न्यायाधीशांवर दबाव

$
0
0

बाणेर दुर्घटनेचा खटला चालवण्यास हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा नकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बाणेर येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी संबंधित बिल्डरने थेट न्यायाधीशांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या न्यायाधीशांनी हा खटला आपल्यापुढे चालवण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश कोर्टाच्या रजिस्ट्रारना देण्यात आले आहेत.

न्या. साधना जाधव यांनी शुक्रवारी हे आदेश दिले. त्यांच्या खंडपीठापुढे संबंधितांच्या अटकपूर्व जामिनाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आतापर्यंत अनेकदा सुनावणी झाली होती. या अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस निकाल लागेल या अपेक्षेने कोर्टात मोठी गर्दी झाली होती. त्याच वेळी न्या. जाधव यांनी 'या प्रकरणी कोर्टावर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न संबंधितांकडून होत असून, ते कदापिही मान्य करण्यासारखे नाही,' असे सांगितल्यामुळे कोर्टात खळबळ उडाली.

न्यायमूर्तींनी ही बाब आपल्या निकालपत्रामध्ये नमूद करून ही केस आपल्या कोर्टापुढे चालवण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले. हा दबाव आणणाऱ्यांमध्ये या प्रकरणात बाजू मांडणाऱ्या वकिलांना जबाबदार धरता येणार नसल्याचेही त्यांनी त्यांच्या निकालपत्रामध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील बिल्डर मंडळींचे काय होणार, अशी चर्चा पुण्यातील बांधकाम वर्तुळात सुरू झाली आहे.

बालेवाडी येथील हाय स्ट्रीटवरील 'पार्क एक्स्प्रेस' सोसायटीच्या विनापरवाना मजल्याचा स्लॅब २९ जुलै २०१६ रोजी कोसळून नऊ कामगार मृत्युमुखी पडले होते, तर तिघे जण जखमी झाले होते. या प्रकरणी बिल्डर, आर्किटेक्ट पसार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी श्रीनिवास डेव्हलपर्स आणि 'प्राइड पर्पल प्रॉपर्टीज'चे अरविंद जैन, श्रवण अगरवाल, 'समर्थ ग्रुप'चे कैलास वाणी, 'मृगांक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड'चे श्याम शेंडे (वाणी), महेंद्र कामत, 'पार्क एक्स्चेंज जॉइंट व्हेंचर'चे भाविन हर्षद शहा, आर्किटेक्ट प्रदीप कौसुंबकर, स्ट्रक्चरल डिझायनर हंसल पारीख अँड असोसिएट्स, बांधकाम साइट प्रोजेक्टची जबाबदारी असलेले ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष सोपान चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चतुःश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी श्रीकांत पवार, भावेन शहा, महेंद्र कामत, ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष चव्हाण यांना अटक केली आहे. या गुन्ह्यांतील ‍आरोपी अरविंद जैन, श्रवण अगरवाल, कैलास वाणी, श्याम शेंडे (वाणी), प्रदीप कौसुंबकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शिवाजीनगर कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर सुनावणी सुरू असतानाही न्यायाधीशांवर दबाब आणण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय मंत्र्यांना जग फिरवण्याची गरज

$
0
0

पर्यटकांच्या ड्रेस कोडसंदर्भात डॉ. कसबे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात आलेल्या परदेशी पर्यटकांनी कोणते कपडे घालावेत, कोणते कपडे घालू नयेत, याची चर्चा केंद्रातील मंत्री करीत आहेत. या मंत्र्यांना जगभर फिरवून अन्य देशांची संस्कृती किती विकसित झाली आहे, हे दाखविण्याची गरज आहे,' अशी टीका ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी केली. परदेशी महिलेला नऊवारी साडी नेसणे काही अशक्य नाही; मात्र त्यांनी कोणते कपडे परिधान करावेत, याचा निर्णय आपण घेणे चुकीचे आहे, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार डॉ. कसबे, पं. विजय सरदेशमुख आणि रक्तदान चळवळीतील कार्यकर्ते राम बांगड यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर मुकारी अलगुडे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, माजी आमदार आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, आमदार अनंत गाडगीळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिरीश बोधणी आदी या वेळी उपस्थित होते.

'देशापुढे आज विविध प्रकारचे प्रश्न आहेत. महिला व दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. मात्र, देशात कोणी काय खावे, याचीच चर्चा होते. देशातील अराजकतेची परिस्थिती उद्याच्या फॅसिझमची नांदी आहे. ते आपल्यासाठी घातक ठरेल. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे,' असा इशाराही डॉ. कसबे यांनी दिला. गांधी-नेहरूंचा राष्ट्रवाद हा प्रेमावर आधारित होता. आज राष्ट्रवादाच्या नावावर धिंगाणा सुरू आहे. आजच्या राष्ट्रवादात द्वेषाची मुळे आहेत. त्यातून जातव्यवस्था बळकट होत आहे. असे झाल्यास पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.

'राजकीय नेत्यांवर वृत्तपत्रांतून अनेकदा अग्रलेख प्रसिद्ध होतात. मात्र, एका कार्यकर्त्याच्या निधनानंतर बहुतांश वर्तमानपत्रांनी त्याच्यावर अग्रलेख प्रसिद्ध करावा, अशी घटना धनंजय थोरात यांच्याबाबत घडली होती. थोरात हे धडपडणारे कार्यकर्ते होते,' असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले.
--
'आरक्षणात गैर ते काय'

महाराष्ट्रात जात चिकटली की ती जात नाही. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाला, तरीही दलितच राहणार, या जातीच्या उतरंडी फोडल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वंकष दलित चळवळी उभ्या राहिल्या पाहिजेत, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच, सध्या संक्रमणाचा काळ सुरू आहे. 'स्वातंत्र्यानंतर आता काही समाजांना आरक्षणाची गरज वाटू लागली आहे. ते आमच्या बरोबरीला येऊन बसू इच्छितात; त्यात काय हरकत आहे,' असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राच्या निधीअभावी इनोव्हेशन पार्क रखडले

$
0
0

'सी-डॅक'चे महासंचालक प्रा. रजत मूना यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'केंद्र सरकारने सी-डॅकच्या इनोव्हेशन पार्कच्या इमारतीसाठी (आर अँड डी) वेळेत निधी न दिल्याने इमारतीचे बांधकाम गेली काही वर्षे रखडले. त्यामुळे सी-डॅकला इमारतीच्या बांधकामासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागले. याचा विपरित परिणाम हा आमच्या संशोधनावर होऊन काही प्रकल्प सुसज्ज इमारतीअभावी गमवावे लागले,' अशी खंत 'सी-डॅक'चे महासंचालक प्रा. रजत मूना यांनी शुक्रवारी दिली.
'सी-डॅक'च्या पत्रकार परिषदेत प्रा. मूना बोलत होते. प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) पाषाणजवळ पंचवटीत उभारण्यात आलेल्या इनोव्हेशन पार्क इमारतीचे उद्घाटन आज, शनिवारी बारा वाजता केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते होणार आहे. प्रा. मूना म्हणाले,' केंद्र सरकारने इनोव्हेशन पार्कसाठी २००६मध्ये मंजुरी दिली. त्यानुसार २०१०मध्ये बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारकडून निधी वेळेत न मिळाल्याने काम रखडले. २०११मध्ये नव्या आराखड्यानुसार पुन्हा इमारतीचे बांधकाम करण्याची संमती मिळाली. तेव्हा इमारतीच्या बांधकामाचा खर्च १२० कोटींवर पोहोचला. त्यानुसार सी-डॅकने स्वतःचे ३५ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे सी-डॅकला कारभार भाड्याच्या इमारतीतून चालविण्याची वेळ आली. सरकारचे आर्थिक पाठबळ कमी असल्याने सुपरकम्प्युटिंगमध्ये संशोधन आणि विकास प्रकल्प राबविण्यावर सी-डॅकला मर्यादा आल्या. तसेच, बाहेरचे प्रकल्पही सुसज्ज इमारतीविना निसटले.'
प्रा. मूना म्हणाले,'केंद्र सरकारकडून इमारतीच्या बांधकामासाठी मंजूर झालेला सुमारे ३७ कोटी रुपयांचा निधी लवकर मिळण्याची आशा आहे. हा निधी त्वरित मिळाल्यास इमारतीचे उर्वरित बांधकाम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल. मात्र, निधी न मिळाल्यास बांधकाम पुन्हा रखडेल.' दरम्यान, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी 'ई-हस्ताक्षर' या सॉफ्टवेअरच्या उद् घाटनाचा कार्यक्रम अपरिहार्य कारणाने रद्द करण्यात आला.
........
अपारंपरिक ऊर्जेच्या वापरावर भर
इनोव्हेशन पार्कमध्ये सोलर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेवर इमारतीतील एलईडी दिवे, पंखे, सॉफ्टवेअर, कम्प्युटर, प्रिंटर चालविण्यात येतील. विजेचा वापर केवळ सुपरकम्प्युटिंग आणि अवजड उपकरणांसाठी करण्यात येईल. इमारतीतील संगणकीय उपकरणे एकमेकांशी 'वायरलेस' पद्धतीने जोडली आहेत. त्यामुळे इमारत वायरलेस असेल, असेही प्रा. मूना यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images