Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गांजा विक्री करणारा सराईत गुन्हेगार अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हैदराबाद येथून आणलेल्या गांजाची शहर आणि ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून सात लाख २१ हजारांचा ३३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
महेश गोरख साळुंखे (वय २९, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, पोलिस हवालदार संतोष सावंत, प्रशांत काकडे यांना पेट्रोलिंग करताना वडगाव पुलाखाली काळ्या रंगाची कार संशयास्पद अवस्थेत आढळून आली. त्यावेळी कारमधील व्यक्तीला थांबण्याचा इशारा केल्यानंतर ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्या कारचा पाठलाग सुरू करून प्रयेजा सिटीजवळ ओव्हरटेक करून त्यांना थांबवले. कारची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गांजा सापडला. साळुंखेची झडती घेतली असता कंबरेला लावलेले गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आढळली.
साळुंखे पुण्यातील गांजाचा वितरक असून, हैदराबाद येथून गांजा आणतो. या गांजाची पुणे शहर आणि ग्रामीण भागात विक्री करतो. पोलिसांनी त्याच्याकडून सात लाख २१ हजार ५०० रुपयांचा गांजा, पिस्तूल, दोन काडतुसे, कार असा ऐवज जप्त केला. साळुंखेविरुद्ध स्वारगेट, दत्तवाडी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु जगताप, उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, यशवंत आंबासे, हवालदार पांडुरंग वांजळे, चंद्रकांत मोरे, संतोष सावंत, प्रशांत काकडे यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनाहेल्मेट दंडास पात्र

$
0
0

नव्या नियमांची रविवारपासून अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली. दंडाच्या नव्या नियमानुसार गाडी चालविणारा चालक आणि मागे बसलेला सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे.

मोटार वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याच्या नवीन नियमानुसार दंड आकारणीची अंमलबजावणी रविवारपासून (७ ऑगस्ट) सुरू करण्यात आली. शहरात वेग मर्यादा ओलांडून वेगाने वाहन चालविल्यास आता एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. निष्काळजीपणे आणि आरटीओ कार्यालयात नोंदणी नसताना वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

शहर वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनीही सर्व वाहतूक विभागांना याबाबतचे आदेश दिले आहेत. इन्शुरन्स नसताना वाहन चालविल्यास चालक आणि मालक या दोघांनाही यापुढे दंड भरावा लागणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट किंवा दादा, मामा, काका अशा स्वरुपात नंबर प्लेट असलेल्या वाहन चालकांकडून एक हजार रुपये वसूल केले जातील.
-----
मद्यपींसाठी ५०० रुपये दंड
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना पूर्वी १०० रुपये दंड भरावा लागत होता. आता दंडाची रक्कम ५०० रुपये केली आहे. तसेच, तीन वेळा मद्यपान करून गाडी चालविताना आढळल्यास वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे.
----
दंडात दुप्पट वाढ
बहुप्रतीक्षित मोटर व्हेइकल सुधारणा विधेयकाला (२०१६) केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या विधेयकामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास किमान दंड शंभर रुपयांवरून पाचशे रुपये करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार किमान दंड शंभर रुपयांवरून दोनशे रुपये करण्यात आला आहे.
------
१७५० वाहनांवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी रविवारपासून नवीन शुल्कप्रमाणे दंड आकारणी केली असली तरीही, प्रादेशिक परिवहन विभागाने मात्र पाच ऑगस्टपासूनच कारवाईला सुरुवात केली आहे. आरटीओच्या निरीक्षकांनी शहरात दुचाकींची तपासणी केली. त्यामध्ये हेल्मेट न घालणे, वाहनाची कागदपत्रे नसणे, लायसन्स नसणे, पीयूसी नाही अशा एकूण १७५० वाहनांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.
..
वाहतूक नियम दंड (पूर्वी) दंड (आता)
फॅन्सी नंबरप्लेट १०० १०००
रिफ्लेक्टर्स न लावणे १०० १०००
विनाहेल्मेट (दोन्ही प्रवासी) १०० ५०० (प्रत्येकी)
विनातिकीट प्रवास २०० २००
विना परवाना ३०० ५००
विना पात्रता वाहन चालवणे २०० ५००
अतिवेग २०० १०००
धोकादायकपणे वाहन चालविणे ३०० २०००
फिट नसताना वाहन चालवणे १०० ५००
पीयूसी नसणे ५०० ५००
वाहनात बेकायदा बदल ३०० १०००
विनानोंदणी वाहन (दुचाकी) ३०० १०००
विनानोंदणी वाहन (चारचाकी) १००० २०००
विना विमा (चालक व मालक) ३००-३०० ३००-२०००
दुसऱ्याच्या वाहनात बेकायदेशीर बदल१०० १०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेच्या वरिष्ठांकडून तरुणीचा विनयभंग

$
0
0

महिला अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एका नामांकित खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणीचा वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात बँकेतील महिला अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत २४ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून शंतनु कुलकर्णी आणि दिव्या तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता एका नामांकित खासगी बँकेत क्रेडिट कार्ड विभागात नोकरीला आहे. या बँकेकडून जे कर्मचारी क्रेडिट कार्ड क्षेत्रामध्ये चांगले काम करतात. त्यांना बक्षीस म्हणून दुबई सहलीला पाठविले जाते. एप्रिलमध्ये तक्रारदार तरुणी आणि तिच्या तीन मैत्रिणींनी चांगले काम केल्यामुळे त्यांची २०१६मध्ये दुबईसाठी निवड झाली. पीडितेकडून एका ग्राहकाच्या अर्जावर तिसऱ्याच व्यक्तीचा फोटो चुकून लागला होता. या बाबत मुख्य शाखेतून आरोपी शंतनु कुलकर्णी आणि दिव्या तिवारी यांना पीडीत तरुणीच्या चुकीबाबत कळवण्यात आले होते. मे महिन्यात तरुणीला तिवारीने सांगितले की, 'दुबई ट्रिपला निवड होऊन उपयोग नाही. त्यासाठी तुला कुलकर्णी यांना खूश करावे लागेल. तसेच, त्यांच्याबरोबर एक रात्र काढावी लागेल.' त्याला पीडित तरुणीने स्पष्ट नकार दिला.
त्यानंतर तिवारीने सातत्याने तरुणीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. सहल जवळ आली असून, तू ऐकले नाहीस तर, आयुष्य बरबाद करण्याची धमकीही ​दिली. तरीही तरुणीने तिवारीला नकार दिला. एक ऑगस्टला कुलकर्णी बँकेत आला. पीडितेला कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावून घेतले. रात्री सोबत नाही आलीस तर दुबई सहल विसरून जा, असे सांगितले. तसेच, तुला बँकेतून काढून टाकतो. तुझे फ्रॉड प्रोफाइल तयार करतो, अशीही धमकी दिली. तरुणीचा मोबाइल घेऊन अश्लील शेरेबाजी केली. तरुणी निघाली असता लिफ्टमध्ये तिचा हात धरला. तरुणी कामावर न गेल्यामुळे कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक जानकर तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅप मेसेजवर विश्वास ठेवू नका

$
0
0

अकरावी केंद्रीय प्रवेश समितीचे पालकांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'अकरावीच्या प्रवेशासाठी आम्ही मदत करू,' असे सांगणाऱ्या कोणत्याही व्हॉट्सअॅप मेसेजवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पुण्यातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने रविवारी केले. सध्या पुण्यात पालक आणि विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात फिरणाऱ्या मेसेजविषयी काळजी घेण्याचे आवाहन समितीने केले आहे.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधील पाचव्या ऑनलाइन फेरीमधील ब गटातील विद्यार्थ्यांसाठी आज, सोमवारी (८ ऑगस्ट) सकाळी ११ ते ५ आणि मंगळवारी (९ ऑगस्ट) सकाळी १० ते ३ या वेळेत प्रवेश घ्यायचा आहे. तसेच, या फेरीनंतर कॉलेज पातळीवर शिल्लक असलेल्या रिक्त जागांचा तपशील १० ऑगस्टला सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. त्या आधारे विशेष फेरीतील विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदविण्याची संधी समितीने दिली आहे. विशेष फेरीतील विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टला कॉलेज निश्चिती मिळणार आहे. त्यानुसार त्यांना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी प्रवेश घेणे गरजेचे ठरणार आहे. दरम्यान, सध्या या फेरीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसोबतच, या पूर्वीच कॉलेजांमध्ये प्रवेश निश्चिती केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवरून सध्या अकरावीच्या प्रवेशाविषयीचे मेसेज केले जात आहेत. त्या संदर्भाने समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी 'मटा'शी अशा मेसेजविषयीची स्पष्टता केली.

टेमकर म्हणाले, 'संबंधित मेसेजमध्ये नोंदविलेल्या क्रमांकावर फोन करून पाहिला असता, तो मुंबईतील व्यक्तीकडे असल्याचे समोर आले. एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देणार का, असे विचारल्यावरही त्या व्यक्तीने नकारात्मक प्रतिसाद दिला. या व्यक्तीच्या मदतीने प्रवेश घेतल्यानंतर, ऑनलाइन प्रक्रियेतून प्रवेश नियमित करून देण्याविषयीही त्या व्यक्तीने असमर्थता दर्शविली.' विद्यार्थ्यांनी अशा मेसेजवर विश्वास न ठेवता ऑनलाइन प्रक्रियेच्याच आधारे प्रवेश घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून रोज पाणी; पण दोन वेळा कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तब्बल ११ महिन्यानंतर पुणेकरांना आज, सोमवारपासून पुन्हा दैनंदिन पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरत आल्याने पूर्वीप्रमाणेच दिवसातून दोनदा पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी केली जात आहे.

राजकीय पक्षांचा दबाव आणि पुणेकरांचा आग्रह यामुळे अखेर पालकमंत्र्यांनी शनिवारी घेतलेल्या कालवा समितीच्या बैठकीत दररोज पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्या वेळीही हातचे राखून देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने त्याविरोधात आवाज उठवावा लागला. राजकीय श्रेयवादाच्या लढाई संपल्यानंतर दुष्काळात पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या पुणेकरांना सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराच्या प्रत्येक भागासाठी स्वतंत्र वेळा निश्चित करण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सुरू असून, ते एक-दोन दिवसांत जाहीर केले जाईल. शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी पूर्वीप्रमाणेच दोनदा पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात येत आहे. धरणातून नदीत पाणी सोडले जाणार असेल, तर पुणेकरांनाही त्यांच्या हक्काचे पाणी वाढवून मिळाले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे सर्व धरणांत जेमतेम १५ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे, गेल्या सप्टेंबरपासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजसदरेचा थ्री-डी आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी मनाचा अभिमानबिंदू असणाऱ्या रायगडावरील वास्तूअवशेष जपण्यासाठी तन, मन आणि धन अर्पून जवळपास वीस इतिहासप्रेमी युवकांच्या गेले वर्षभर चालणाऱ्या 'रायगड संवर्धन मोहिमे'ला विधायक वळण मिळाले आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने रायगडावरील राजसदरेचा थ्रीडी आराखडा तयार

केला आहे.

गडसंवर्धन हे प्लास्टिक गोळा करणे, वृक्षारोपण, टाक्यांची सफाई एवढ्यापुरते मर्यादित राहू नये, हा विचार ठेऊन त्यांनी या कामाला सुरुवात केली. प्रत्येक महिन्यातील तीन दिवस आणि वर्षभरातील पगाराचा काही भाग गडसंवर्धनासाठी राखीव ठेऊन त्यांनी या कामाला सुरुवात केली. पहिल्या मोहिमेत राजसदरेवरील भिंतीवर वर्षानुवर्षे चढलेले शैवाल आणि उपद्रवी पर्यटकांनी लिहिलेली त्यांची नावे काढण्यात आली. मोहिमेने सहा महिन्यांत महिन्यातून तीन दिवस गडावर जाऊन सदरेवरचे तीस पोती शेवाळ काढले. त्यानंतर या टीमने गडावरील वास्तूंची मोजमापे घ्यायला सुरुवात केली. आत्तापर्यंत गडाचे ५५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून त्यात प्रामुख्याने बालेकिल्ला, मनोरे यांचा समावेश आहे. पुढील टप्प्यातील काम सध्या सुरू आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या परवानगीने गडावर आधुनिक प्रकारचे दिशादर्शक फलक, माहिती फलक; तसेच नकाशा फलक बसविण्याचे कामही टीमने केल्याचे दुर्गअभ्यासक प्रसाद दांगट यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

इसवी सन १८१८मध्ये इंग्रजांनी रायगड घेतला, तेव्हा गडाचे खूप नुकसान केले. त्यात लाकूडकाम जळाले, तर दगड आणि विटा असणाऱ्या वास्तूही भग्न झाल्या. असे असले, तरी त्याच्या खाणाखुणा शिल्लक आहेत. त्या बांधकामाचे स्वरूप स्पष्ट करतात. राजसदरेच्या बाजूला असणाऱ्या पडवीचे अवशेष, नगारखान्यावरील छताच्या खांबांचे अवशेष, राजसदरेत असलेले तळखड्याचे अवशेष यावरून तिथल्या वास्तू कशा होत्या याचा उलगडा होतो. सदरेच्या बाजूला असणाऱ्या दरवाजांची मोजमापे घेण्यात आली. राजसदरेचा अभ्यास आणि मोजमाप पूर्ण झाल्यावर सदरेचे भव्य स्वरूप डोळ्यांसमोर उभे राहिले. त्यामुळे मोहिमेने पूर्ण राजसदरेचा थ्री-डी आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. गडावरील शिल्लक वास्तूंचा अभ्यास, त्या भागात पडणारा पाऊस, रायगडाच्या घेऱ्यातील जुन्या घरांचे आणि मंदिरांचे बांधकाम हे परस्परांशी ८० टक्के जुळत होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि तज्ज्ञ संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली राजसदरेचा थ्रीडी आराखडा तयार केल्याचेही दांगट म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकेतरांचा महामोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाने सोमवारी पुण्यात महामोर्चा काढला. मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो कर्मचाऱ्यांनी या पुढील काळात आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार झाला नाही, तर गरज पडल्यास शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक प्रतिनिधींनीही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. महामंडळाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली नवी पेठेतील माध्यमिक शिक्षण संचालनालयापासून हा मोर्चा काढण्यात आला होता. राज्यभरातून आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याने, एकाच वेळी हजारो कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर चालून 'बालभारती'मधील शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे निघाल्याचे चित्र या मोर्चानिमित्त पाहायला मिळाले. या मोर्चामुळे दुपारच्या टप्प्यात डेक्कन परिसरातील वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. 'बालभारती'समोर आल्यानंतर या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले. उपस्थित सर्व आमदारांनी कर्मचाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडली.

आमदार काळे म्हणाले, 'शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल कित्येक महिन्यांपासून सरकारकडे विचाराधीन आहे. या अहवालावर निर्णय घेण्यात सरकार मुद्दाम चालढकल करीत आहे. राज्याला शाळाबंद आंदोलनाचा इतिहास जुना नाही. शिक्षकेतरांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर असेच राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन करून, सरकारला जागेवर आणू.' सरकारच्या धोरणांवर टीका करताना आमदार तांबे यांनी सर्वांत निष्क्रिय सरकार म्हणून राज्य सरकारची गणना केली. शिक्षण क्षेत्रामध्ये अप्रत्यक्षरीत्या दबंगगिरी करणाऱ्या सरकारविरोधात संघर्ष हा एकमेव पर्याय असल्याने, समाजाला सोबत घेऊन शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा या वेळी दिला.

माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग यांनी या आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनासाठी चार आमदार आलेले असतानाही, शिक्षण आयुक्त धीरज कुमार आपल्या कार्यालयात न थांबल्याबाबत चारही आमदारांनी या वेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही एका आंदोलनावेळी शिक्षण आयुक्त कार्यालयातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याची बाब काळे यांनी या वेळी नमूद केले. या पुढील काळात पुन्हा असा अनुभव आल्यास, आयुक्तांविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही दिला.

चार शिक्षक आमदारांनी पगार नाकारला

'शिक्षक- शिक्षकेतरांनी आपल्या मागण्या मांडल्या, की हे सरकार पैसे नाही म्हणून रडते. मात्र, आमदारांसाठी पगारवाढ करण्याचा निर्णय अगदी तातडीने घेते. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो,' असे म्हणून राज्यातील चार शिक्षक आमदारांनी पगारवाढच नव्हे, तर आपले पगारही नाकारण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचेही या आमदारांनी पुण्यात सांगितले.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एका आंदोलनानिमित्त शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार दत्तात्रय सावंत आणि आमदार श्रीकांत देशपांडे पुण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान उपस्थितांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. एकीकडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक यांच्या नानाविध समस्यांबाबत सरकारी पातळीवरून पैसे नसल्याची ओरड केली जात असताना, दुसरीकडे आमदारांची पगारवाढ मात्र अवघ्या काही मिनिटांमध्ये मंजूर होतीच कशी, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. याच मुद्द्याचा आधार घेऊन शिक्षक आमदारांनी आपली भूमिका उपस्थितांसमोर मांडली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत, तोपर्यंत पगारवाढच काय, पण पगारही नाकारणार असल्याचे उपस्थितांसमोर जाहीर केले.

आमदार काळे म्हणाले, 'या विषयी आम्ही शिक्षक आमदारच नव्हे, तर इतर आमदारांनाही आवाहन करणार आहोत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करत असताना, अशी पगारवाढ घेणे आम्हाला मान्य नाही. शिक्षकेतरांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही ही पगारवाढ आणि पगार नाकारत असल्याचे पत्र मंगळवारी सभापती आणि मंत्रालय सचिवांना देत आहोत.' शिक्षण क्षेत्रातील समस्या कायम असताना अशी पगारवाढ घेणे ही बाब व्यक्तिगत पातळीवरही न पटणारी असल्याचे मत डॉ. तांबे यांनी मांडले. सध्याचे भाजप सरकार हे रडके सरकार असल्याची टीका देशपांडे यांनी केली. 'शिक्षक- शिक्षकेतरांनी आपल्या मागण्या मांडल्या, की हे सरकार पैसे नाही म्हणून रडते. मात्र, आमदारांसाठी पगारवाढ करण्याचा निर्णय अगदी तातडीने घेते. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानांना पाठविल्या सव्वा लाख राख्या

$
0
0

पुणेकर बहिणींचा 'सैनिक मित्र'च्या उपक्रमाला प्रतिसाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिक मात्र प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात. सीमेवरील या हजारो सैनिकांना भाऊ मानणाऱ्या पुण्यातील बहिणींनी सव्वा लाखाहून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राखी पौर्णिमेनिमित्त सैनिक मित्र परिवारातर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन सारसबाग गणपती मंदिरात नुकतचे झाले. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या हस्ते या राख्यांचे पूजन करण्यात आले. संपदा सहकारी बँकेच्या संचालिका संगीता मावळे, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी मंडई शाखेच्या अधिकारी शुभांगी गरूड, रूपाली शास्त्री, सारसबाग आरती मंडळाच्या राणी गावडे, सैनिक मित्र परिवाराच्या कल्याणी सराफ, स्वाती ओतारी, अभिनव प्रशालेच्या वंदना आणेकर, आनंद सराफ आदी उपस्थित होते. सैनिकांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र, पत्र आणि राख्या पाठविण्यात आल्या.
'देशाच्या सीमेवरील सैनिकांसाठी राखी पाठविण्याचा हा उपक्रम विविध ठिकाणी मोठया प्रमाणात राबविण्यात यायला हवा. या उपक्रमांमुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढते,' असे ज्योती चांदेकर यांनी सांगितले.
'भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे. समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, यासाठी १९९८ पासून हा सातत्याने राबविण्यात येत आहे. देशाच्या दीडशे सीमाभागात प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविण्यात येतात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूदेखील पुणेकरांना पाठविल्या जातात,' असे सराफ यांनी सांगितले. ग्राहक पेठेने राखी पाठविण्याचा टपाल खर्च केला असून ज्यांना या उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी ग्राहक पेठ टिळक रोड येथे १२ ऑगस्टपर्यंत राख्या आणून द्याव्यात. माहितीसाठी ९८२२८६१३०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चांगला संमेलनाध्यक्ष मिळेल?

$
0
0

ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा सवाल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सध्याचे संमेलनाध्यक्ष साहित्य हा विषय सोडून एखाद्या संघटनेचे कार्यकर्ते किंवा नेते असल्यासारखेच सगळीकडे बोलत आहेत. संमेलनाला यापुढे पुढे चांगला अध्यक्ष मिळेल की नाही,' अशी शंका उपस्थित करत 'सरस्वतीच्या मंदिरात मोरांनी रात्र रात्र जागवली, तरीसुद्धा पिंपरी, चिंच आणि वडाखाली येडी बाभळ उगवली,' अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. 'माणूस जोडणारा संमेलनाध्यक्ष व्हायला हवा,' असा टोला त्यांनी लगावला.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे विजय कोलते यांच्या 'साहित्य संमेलन २०१४ सासवड' या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते झाले. माजी महापौर अंकुश काकडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, प्रकाशक सु. वा. जोशी या वेळी उपस्थित होते. 'आजवरील पूर्वाध्यक्षांची भाषणे सर्वसमावेशक नव्हती,' अशी टीका सबनीस यांनी नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर फुटाणे यांनी त्यांचा समाचार घेतला.
'संमेलनाध्यक्षाचे भाषण हा समाजाचा आरसा असतो. समाज मोठ्या आशेने या भाषणाकडे पाहत असतो; पण यंदाच्याच नव्हे, तर गेल्या दहा वर्षांतील कुठल्या संमेलनाध्यक्षाचे भाषण आपल्याला आठवते,' असा सवाल करून 'या सर्व प्रकाराकडे साहित्यविश्वाने गांभीर्याने पाहायला हवे,' अशी अपेक्षा फुटाणे यांनी व्यक्त केली.
मिरासदार म्हणाले, 'संमेलनाचे स्थळ ठरले, की तिथल्या लोकांचा स्वाभिमान लगेच जागृत होतो आणि संमेलनस्थळाला यांचे नाव द्या, अशा असंख्य मागण्या होतात. अशा सर्व प्रकारांना शांत डोक्याने सामोरे गेलात, तरच संमेलन यशस्वी होते. सासवडचे संमेलनही त्यातलेच एक होते.' 'सासवडचे संमेलन लोकवर्गणीतून, समाजाच्या सहकार्याने भरवलेले होते. असे संमेलन शेवटचे ठरते की काय, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे,' अशी भीती कोलते यांनी व्यक्त केली. 'स्वागत समिती ठरवते तोच संमेलनाध्यक्ष होतो, हे चित्र आता बदलायला हवे, त्यासाठी साहित्य महामंडळाच्या घटनेत बदल होणे गरजेचे आहे,' असे प्रा. जोशी म्हणाले. श्रीकांत कोलते यांनी सूत्रसंचालन केले. गौरव कोलते यांनी आभार मानले.
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिकारकांचा ठेवा संग्रहालयरूपात

$
0
0



chaitrali.chandorkar
@timesgroup.com
पुणे : पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया घालणाऱ्या भाऊ रंगारी गणपती मंडळाच्या १२५ व्या वर्षपूर्तीनिमित्त, भाऊसाहेबांच्या तळघरामध्ये संग्रहालयाच्या रूपाने असलेल्या दस्ताऐवजांवरून क्रांतिकारकांचा इतिहास उलगडणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांसाठीची हक्काची जागा असलेले ठिकाण म्हणजे भाऊसाहेब रंगारी यांचे दवाखान्याचे तळघर. या घरात सापडलेली हत्यारे, दारूगोळा आणि महत्त्वाच्या दस्तऐवजांचा ठेवा या वर्षी पुणेकरांना बघायला मिळणार आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेमध्ये भाऊसाहेब लक्ष्मण जवळे अर्थात भाऊसाहेब रंगारी यांचा उल्लेखनीय वाटा आहे. त्यांनी १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. जवळे हे आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांनी कधीच रुग्णांकडून तपासणी शुल्क घेतले नाही. शालू या साडी प्रकाराचे रंगकाम हा त्यांचा व्यवसाय होता, त्यामुळे लोक त्यांना रंगारी या नावाने ओळखायला लागले. त्या काळात भाऊ रंगारी भवनमध्ये नेहमी क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका होत असत. भाऊसाहेबांनी पहिल्यांदा सार्वजनिक स्तरावर गणेश मंडळ ट्रस्टची स्थापना केली होती, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त दिलीप आडकर यांनी दिली.
भाऊसाहेबांच्या या उपक्रमाची दखल घेऊन लोकमान्य टिळकांनी १८८३ मध्ये केसरी वृत्तपत्रामध्ये अग्रलेख लिहिला होता. त्यांनी विंचुरकर वाड्यामध्ये सार्वजनिक स्तरावर गणेश महोत्सवाला सुरुवात केली. त्याकाळी बनवलेली गणेशमूर्ती ही पर्यावरण पूरक आहे. लाकूड आणि भुशाच्या वापरातून ती बनविली. रंगारी यांनी १९०५मध्ये लोकमान्य टिळक आणि न. चिं. केळकर यांना ट्रस्टवर विश्वस्त केले होते. भाऊसाहेबांच्या निधनानंतर या भवनची देखरेख मंडळातर्फे करण्यात येते आहे, असे आडकर यांनी सांगितले.
रंगारी भवनमध्ये गेल्या काही वर्षांपासून एक अडगळीची खोली बंद होती. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या खोलीची स्वच्छता केली तेव्हा तिथे अनेक ऐतिहासिक कागदपत्रे सापडली. यातूनच संग्रहालयाची संकल्पना पुढे आली. गेल्या वर्षीच संग्रहालयाचे काम सुरू झाले असून, या गणेशोत्सवामध्ये गणेशभक्तांना पर्वणी मिळणार आहे.
जनवाणीतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'हेरिटेज वॉक' या उपक्रमांतर्गत आम्ही पर्यटकांना वॉक दरम्यान प्रत्येक वेळी भाऊ रंगारी गणेश मंडळामध्ये घेऊन जातो. भाऊसाहेबांनी क्रांतिकारकांना केलेले सहकार्य, त्यांच्या बैठकांबद्दल माहिती सांगितल्यावर पर्यटकांना कुतूहल वाटते. भाऊसाहेबांचा पूर्वीचा दवाखाना, तेथील छुप्या खोल्या, लपण जागा पाहिल्यावर ते आश्यर्य व्यक्त करतात. आता संग्रहालयाच्या निमित्ताने मंडळाची एक नवी ओळख पुणेकर आणि पर्यटकांना मिळणार आहे, असे जनवाणीच्या प्राजक्ता पणशीकर यांनी सांगितले.
संग्रहालयामध्ये एका विभागात सार्वजनिक गणेशोत्सवाचा १२५ वर्षांचा इतिहास छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. यामध्ये भाऊसाहेबांच्या गणपतीबरोबरच पुण्यातील इतर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गणेश मंडळांचाही समावेश असेल. दुसऱ्या विभागात स्वातंत्र्याच्या चळवळीदरम्यान क्रांतिकारकांच्या झालेल्या बैठकांची कागदपत्रे, हत्यारे आणि वस्तू मांडण्यात येणार आहेत, असे दिलीप आडकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर पीएमपीला अध्यक्ष मिळाले

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अखेर एका महिन्यानंतर पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले असून, धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमपी सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांना पूर्ण कार्यकाल दिला जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
राज्य सरकारने पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची गेल्या महिन्यात नाशिकच्या आयुक्तपदी बदली केली. प्रवाशांसाठी अनेक सुविधा आणि नवीन बसखरेदीची प्रक्रिया सुरू असतानाच, कृष्णा यांची बदली करण्यात आली. त्यामुळे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडेच पीएमपीचा अतिरिक्त कार्यभार होता. अखेर, महिन्याभरानंतर पीएमपीला पुन्हा पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार आहे.
मिसाळ हे २००४ च्या बॅचमधील प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. मिसाळ यांनी एमएस्सी (अॅग्रीकल्चर) आणि एमए (डेव्हलपमेंट स्टडीज) अशा पदव्या प्राप्त केल्या आहेत.
पीएमपीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केवळ एकच पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला आहे. तीन ते चार महिन्यांपासून ते वर्षभरात येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली केली जात असल्याने त्याविरोधात प्रवासी संघटनांनी वारंवार आवाज उठवला आहे. त्यामुळे, मिसाळ यांना कार्यकाल पूर्ण करण्याची संधी दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकसहभागाचे आवाहन
'सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीतर्फे सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. पीएमपीने प्रवास करणारे लाखो प्रवासी आणि पुणेकरांचे हित लक्षात घेऊन सुधारणांसाठी आणखी कोणते उपक्रम घेता येऊ शकतात, याबद्दल नागरिकांनी त्यांची मते आणि सूचना लेखी स्वरूपात कळवाव्यात,' असे आवाहन महापालिका आयुक्त आणि पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष कुणाल कुमार यांनी सोमवारी केले आहे. sanjay.more@punecorporation.org या ई-मेलवर नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मर्सिडीज चोरट्याकडून अनेक वाहनांची चोरी

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
हॉटेल जे डब्ल्यू मेरियटमधून मर्सिडीज चोरणाऱ्या हायप्रोफाइल वाहनचोराने पुण्यातील इतरही काही नामांकित हॉटेलमधून महागडी वाहने चोरल्याचे समोर आले आहे. तसेच, त्याने मुंबईमध्येही अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून पोलिसांना समजले आहे. मात्र, या हायप्रोफाइल वाहनचोराला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही.
सेनापती बापट रोडवरील जे डब्लू मेरियट हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याची वॉलेट पार्किंगमधून मर्सिडीज चोरून नेल्याची घटना एक ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह हॉटेलच्या वॉलेट पार्किंगमधील चाव्यांवर नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्काळ हॉटेलचे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये मर्सिजीड चोर हा बालेवाडीपर्यंत कार घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी यापूर्वी शहरातील अनेक हॉटेलमधून अशा प्रकारे वाहन चोरी झालेल्या घटनांची माहिती घेतली. त्यावेळी शिवाजीनगर, कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन नामांकित हॉटेलच्या पार्किंगमधून अशा प्रकारे महागड्या कार चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी मर्सिडीज चोरी करणाऱ्या चोरट्यानेच यापूर्वीच्या गाड्या चोरल्याचे आढळून आले आहे. तसेच, त्याने मुंबईतही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली आहे. पण, या आरोपीचे रेकॉर्ड पोलिसांकडे नसल्यामुळे त्याचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. मात्र, सीसीटीव्हीमध्ये आढळून आलेल्या फोटोवरून त्याचा शोध सुरू आहे.

चोरट्याचा व्हिडिओ पोलिसांच्या साइटवर
गुन्हेगाराची माहिती मिळावी म्हणून गुन्हा करतानाचे मिळालेल्या व्हिडिओसाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने एक वेबसाइट सुरू केली आहे. या ठिकाणी राज्यातील विविध गुन्ह्यांचे व्हिडिओ टाकण्यात आले असून, त्यावरून गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळावी हा हेतू आहे. या वेबसाइटवर मर्सिडीज चोरणाऱ्या चोरट्यांचा व्हिडिओ चतुःश्रृंगी पोलिसांनी टाकला आहे. त्यामुळे या चोरट्याची माहिती मिळते का, याच्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया डॉक्टर गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नदीचे पाणी वाढले असून हा पूल बंद करा. या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी पाठवा,' असे खोटे सांगून पोलिस व अग्निशामक दलास त्रास देणाऱ्या एका तोतया डॉक्टरला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.

अमित जगन्नाथ कांबळे (वय ३०, रा. नवी पेठ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर खोटे बोलून पोलिस व इतरांना त्रास दिल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षातील जवान सुनील नामे यांनी तक्रार दिली आहे. पुण्यामध्ये सध्या नदीमध्ये धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्या वेळी आरोपी कांबळे याने अग्निशामक दलास फोन करून गाडी पाठवण्यास आणि एसएमजोशी पूल बंद करण्यास सांगितले. एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी बोलत असल्याची थाप त्याने मारली. अग्निशामक दलाकडून गाडी पाठवण्यात आल्यावर संबंधित ठिकाणी पाणी वाढले नव्हते. तसेच, पूल बंद करण्यासारखी स्थिती नव्हती. कांबळेला परत फोन केला असता, त्याने जवानांशी अरेरावीशी भाषा वापरली. त्यानंतर त्याने पोलिसांनाही फोन केला. याबाबत अग्निशामक नियंत्रण कक्षातील जवान नीलेश महाजन यांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो पत्रकार नसल्याचे लक्षात आले. हा प्रकार डेक्कन पोलिस ठाण्याला कळविण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुषमा चव्हाण, उपनिरीक्षक राहुल कोळंबीकर, चंद्रकांत लोहकरे, संजय जगताप, संजय पायगुडे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. दोन दिवसांच्या शोधानंतर सोमवारी त्याला अटक करण्यात आली.

चोरी, हॉटेलमध्ये ऐषाराम

कांबळे याचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले असताना डॉक्टर असल्याचे बनावट ओळखपत्र काढले होते. त्यावरून एका कॅबचालकास बोलावून तो गोव्याला घेऊन गेला. त्या ठिकाणी एका नामांकित हॉटेलमध्ये पैसे न देता तीन दिवस राहिला. त्याने एका रिक्षा चालकाला डॉक्टर असल्याचे सांगून मोबाइल बोलण्यासाठी घेऊन चोरल्याचे समोर आले आहे.

नेत्यांचे फोन नंबर तोंडपाठ

मोठमोठ्या राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे दाखवून पुण्यातील बहुतांश नामांकित हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर बनून रुग्णांच्या नातेवाइकांना लाखोंचा गंडा घातल्याचे गुन्हे कांबळेवर दाखल आहेत. या प्रकरणी २०१३मध्ये हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली होती. पाचवी पास असूनही वैद्यकीय क्षेत्रातील अफाट माहिती, वर्तमानपत्रे, जस्ट डायलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वापरलेल्या युक्त्या, व्हीआयपींचे तोंडपाठ फोन नंबर असे 'उद्योग' व त्याची सफाईदार कार्यपद्धती पाहून पोलिसही चक्रावून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नगरसेवकांचे मानधन ५० हजार करा’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
नगरसेवकांचे मासिक मानधन साडेसात हजार रुपयांहून ५० हजार रुपये करावे, अशी शिफारस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीने सोमवारी (आठ ऑगस्ट) केली. सातपट वाढीच्या या प्रस्तावावर स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे.
राज्याचे मंत्री आणि आमदारांच्या वेतन भत्त्यात भरीव वाढ करणारे विधेयक विधानसभेत नुकतेच मंजूर करण्यात आले. त्यामुळे मंत्री आणि आमदारांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे. मंत्र्यांना मुख्य सचिवांप्रमाणे आणि राज्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळणार आहे. तर, आमदारांना प्रधान सचिवांप्रमाणे वेतन-भत्ते मिळणार आहेत. निवृत्त आमदारांना टर्मनुसार निवृत्ती वेतन आणि माजी आमदारांना किमान ५० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. हे विधेयक सभागृहात मांडल्यानंतर ते काही मिनिटांतच एकमुखाने मंजूर करण्यात आले.
याच धर्तीवर महापालिकेच्या नगरसेवकांना दरमहा ५० हजार रुपये मानधन मिळावे, असा ठराव विधी समितीच्या सभापती नंदा ताकवणे यांनी मांडला. तो तातडीने मंजूरही करण्यात आला. माजी नगरसेवकांना नियमाप्रमाणे निवृत्ती वेतन द्यावे, असेही प्रस्तावात नमूद केले आहे. या प्रस्तावाला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविला जाईल. त्यानंतर अंमलबजावणी होऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, सद्यःस्थितीत नगरसेवकांना दरमहा साडेसात हजार रुपये मानधन मिळते. मानधनाची रक्कम २५ हजार रुपायंपर्यंत वाढवावी, असा प्रस्ताव या महापालिकेने तीन वर्षांपूर्वीच मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नवा प्रस्ताव पाठवून अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सध्या मिळत असलेले मानधन तुटपुंजे पडते. ही रक्कम नक्कीच अपुरी आहे. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आपलेही मानधन वाढले तर गैर नाही, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) माजी नगरसेवकांवरील वैद्यकीय उपचार सवलतीच्या दरात करावेत, या प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी सूचना पक्षनेत्या मंगला कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

कोट
आमदारांच्या वेतनवाढीत नुकतीच घसघशीत वाढ करण्यात आली. त्यानुसार आमदारांना दरमहा दीड लाख रुपये मिळणार आहेत. मग, नगरसेवकांच्या मानधनातही वाढ व्हावी, असा प्रस्ताव आम्ही मंजूर केला. त्याची कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा आहे.
- नंदा ताकवणे, सभापती,
पिंपरी-चिंचवड महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचालकांविरोधात छुपी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांविरुद्ध छुपी मोहीम हाती घेतली असून प्रत्येक वाहतूक विभागाला किमान २५ केसेस करण्याची सक्ती करण्यात आली आहे. वाहतूक शाखेत २८ विभाग आहेत. या सर्व शाखांनी दर दिवसाला ​प्रत्येकी २५ केसेस केल्या, तरी किमान साडेतीन लाख रुपये दंड गोळा होणार आहे.

राज्य सरकारने हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीचालक आणि पाठीमागे बसणाऱ्या​ 'पिलियन रायडर'ला प्रत्येकी ५०० रुपये दंडाचे दिलेले आदेश दिले आहेत. पुणे पोलिसांनी या आदेशाचे तात्काळ पालन करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक विभागाला २५ केसेस करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

हेल्मेटची सक्ती न करण्याची भूमिका घेणाऱ्या पुणेकरांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी छुपी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे दुचाकीस्वारांमध्ये नाराजी पसरली आहे. चौकाचौकांमध्ये आडोसा पकडून उभे राहिलेले वाहतूक पोलिस हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांची कोंडी करू लागले आहेत. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांच्या हातात ५०० रुपये दंडाची पावती थोपवण्यात येत आहे.

१३ कोटी रुपये दंड गोळा होईल?

वाहतूक पोलिसांच्या एका वाहतूक विभागाने दरदिवशी किमान २५ केसेस केल्या आणि प्रत्येकाकडून ५०० रुपये दंड घेतला, तरी दिवसाला साडेतीन लाख रुपये दंड गोळा होईल. महिन्याभरात तब्बल एक कोटीहून अधिक आणि वर्षअखेरीस १२ कोटी रुपयांहून अधिक दंड गोळा होईल. केवळ हेल्मेट वापरले नाही, म्हणून १२ कोटी रुपये दंड गोळा होण्याची ही ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली जाईल.

हेल्मेट कारवाईसाठी आरटीओ रस्त्यावर

राज्य सरकारने मोटार वाहन कायद्यातील दंडात वाढ केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच दिवसांत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १७०६ वाहन चालकांवर कारवाई करून चार लाख दोन हजार रुपये दंड केला. त्यामध्ये ११० वाहनचालक विनाहेल्मेट दुचाकीवरून प्रवास करणारे आहेत. आरटीओने या कारवाईदरम्यान अनेक वाहन चालकांकडील लायसन्स किंवा वाहन परवाना जप्त करून 'मेमो' दिल्याने, सोमवारी सकाळपासून दंड भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

पुणे आरटीओची आठ आणि पिंपरी-चिंचवड आरटीओची तीन अशी एकूण ११ पथके या कारवाईसाठी नेमण्यात आली आहे. प्रत्येक पथकात दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने गेल्या आठवड्यात बेशिस्त वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली. त्यानुसार वाहतूक पोलिसांबरोबर आरटीओने देखील कारवाईची मोहीम हाती घेतली. यामध्ये १७०६ वाहनांवर कारवाई केली. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वारांचा समावेश असून, विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या ११० आहे. त्यांच्याकडून एक लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात आला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

वाहनांना विमा, कागदपत्रे, पीयूसी आदी गोष्टी नसणे यासाठी कारवाई करताना हेल्मट नसल्यास त्याचाही दंड घेतला जात आहे. दरम्यान, शहरात वाहतूक पोलिस शाखेतर्फेही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आरटीओमध्ये हेल्मेटचा दंड भरण्यासाठी आलेल्या ११० वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात आले. हेल्मेटचे फायदे त्यांना पटवून देण्यात आले, असे पाटील यांनी सांगितले.

केवळ हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम नाही. वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडे हेल्मेट नसल्यास, त्यांच्याकडून त्याचा दंड देखील घेतला जात आहे. यापुढे ही अशाप्रकारे कारवाई सुरू राहणार आहे.

- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील विविध भागांत असलेल्या १८ महत्त्वाच्या पुलांपैकी ६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले असून उर्वरित बारा पुलांचे ऑडिट करण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे पत्र प्रशासनाने स्थायी समितीला पाठविले आहे.

गेल्या आठवड्यात महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकाची दुर्घटना घडू नये, यासाठी महापा‌लिका प्रशासनाने शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल द्यावा, अशा सूचना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. शहरात महत्त्वा १८ पूल असून यामध्ये राजाराम पूल, म्हात्रे पूल, डेंगळे पूल, बालगंधर्व पूल, जुना हॅरिस पूल, जुना बंडगार्डन पूल, मुंढवा पूल, बोपोडी पूल, वेलस्ली पूल, जुना संगम पूल, गाडगीळ पूल, यशवंतराव चव्हाण पूल यांचा समावेश आहे. यापैकी बालगंधर्व, राजाराम, संभाजी, ‌शिवाजी, म्हात्रे तसेच वेलस्ली पूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले असून उर्वरित पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या कामासाठी पालिकेच्या स्थायी स‌मितीने निधी उपलब्ध करून दिल्यास हे काम तातडीने पूर्ण होईल, असे प्रशासनाने समितीचे अध्यक्ष बोडके यांना पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे.

'जुन्या पुलांची दुरुस्ती करा'

शहरातील ज्या पुलांचे आयुष्य संपले आहे, तसेच जे पूल अत्यंत जुने आहेत, अशा पुलांची माहिती गोळा करून त्याच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक धनंजय जाधव यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. शहरातील जुन्या पुलांची पाहणी करुन प्रशासनाने त्यावर ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉर्न साइटवर फोटो टाकणारा पती अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पत्नीशी वाद झाल्यानंतर तिला मानसिक त्रास देण्यासाठी अभियंता पतीने तिचे छायाचित्र आणि मोबाइल क्रमांक अश्लील सोशल मीडियावर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विवाहितेला सतत अश्लील फोन येऊ लागल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच तपासादरम्यान ही सर्व बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अभियंता पतीला अटक केली असून, कोर्टाने त्याची जामिनावर मुक्तता केली.

पीडित विवाहितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिच्या पतीला मध्य प्रदेशमधून हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य मूळचे मध्य प्रदेशातील बिजापूर जिल्ह्यातील आहे. सध्या हे दाम्पत्य सूसगाव येथे वास्तव्यास आहेत. तिचा पती हिंजवडी येथील आयटी कंपनीत अभियंता म्हणून नोकरीला आहे. दोघांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून भांडणे होतात. दोन महिन्यांपूर्वी पतीचा अपघात झाल्याने तो बिजापूरला निघून गेला होता.

काही दिवसांपासून तो पत्नीला सतत फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, पत्नी फोन घेत नव्हती. तसेच, त्याला कसलीच प्रतिक्रिया देत नव्हती. यावरून पुन्हा दोघांमध्ये वादावादी झाली. यातून अभियंता पतीने वडिलांच्या नावावर असलेल्या वायफायचा वापर करून पत्नीचे काही छायाचित्रे आणि मोबाइल क्रमांक अश्लील सोशल मीडिया साइटवर अपलोड केले. तसेच त्याखाली अश्लील मजकूर टाकून लोकांना संपर्काचे आवाहन केले. त्यानंतर पत्नीला अनोळखी व्यक्तींकडून फोन येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे संबंधित पत्नीने ६ जूनला हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी आयटी अॅक्टनुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान ज्या आयपी अॅड्रेसवरून विवाहितेचे फोटो अपलोड झाले तो आयपी अॅड्रेस तिच्या सासऱ्याच्या नावावर असलेल्या वायफायचा असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी चौकशीनंतर तिच्या पतीला २३ जुलैला अटक केली होती. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली. कोर्टाने नुकतीच त्या पतीची जामिनावर मुक्तता केली आहे. पोलिस निरीक्षक रघुनाथ उंडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंडावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

$
0
0

पिंपरीत स्थायी समितीचा प्रशासनावर आरोप, सर्वेक्षणाची सूचना
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यातील भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (नऊ ऑगस्ट) करण्यात आला. यावर संबंधित ठिकाणांचे सर्वेक्षण करून योग्य कारवाईच्या सूचना महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग केलेल्या सुविधा क्षेत्रांवरील जागांवर अतिक्रमणे झाल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित झाला. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत पालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांवरील अतिक्रमणांबाबत सदस्यांनी आक्रमक भूमिका मांडली. पालिकेच्याच जागेवर अतिक्रमणे होणार असतील आणि ती रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल तर अन्य अनधिकृत बांधकामांबाबत कारवाई करताना विचार करायला हवा. प्रशासनाने त्यांचे अपयश झाकून ठेवू नये, असे धनंजय आल्हाट यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक विभागाचे निवासी आणि वाणिज्य वापरासाठी (इंडस्ट्रीअल टू रेसिडेन्सिअल) रुंपातर करताना महापालिकेकडे दहा टक्के भूखंड सुविधांसाठी वर्ग करण्यात येतो. यासंदर्भातील कार्यवाही २००७ पासून चालू आहे. आजतागायत पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, दापोडी, वडमुखवाडी, रावेत, दिघी, डुडुळगाव, बोऱ्हाडेवाडी, पुनावळे, मोरवाडी या भागातील ५१ भूखंडांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यानुसार औद्योगिक वापराचे सुमारे नऊ लाख ७२ हजार चौरस मीटरचे क्षेत्र निवासी आणि व्यापारी कारणासाठी वापरात येत आहे. त्या मोबदल्यात पालिकेकडे ९० हजार ५५२ चौरस मीटर क्षेत्र सुविधांसाठी उपलब्ध आहे. तसेच ताब्यातदेखील आहे. परंतु, ताब्यात असलेल्या भूखंडांवर अतिक्रमणे झाली असून, त्यातील काही अतिक्रमणे संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच केल्याचा आरोप आल्हाट यांनी केला.
नवनगर विकास प्राधिकरणाकडून वाहतूकनगरीतील १८० भूखंड पालिकेकडे वर्ग केले आहेत. परंतु, त्यावरील भाडेकरू आणि पोटभाडेकरू यासंदर्भात माहिती प्रशासनाकडे नाही. महसूलाकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच समाविष्ट गावांतील गायरानांच्या जमिनींवरील अतिक्रमणांबाबतही दुर्लक्ष होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर आयुक्त वाघमारे यांनी पालिकेच्या ताब्यातील अतिक्रमणांबाबत सर्वेक्षण करून योग्य कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
...
ग्रीन बेल्ट तयार करणार
मोशी कचरा डेपोसाठी नागपूर येथील नेरी संस्थेने उपाययोजनांचा अहवाल दिला आहे. त्यानुसार डेपोभोवती ग्रीन बेल्ट तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या एक कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याबाबतची कार्यवाही करताना महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना या वेळी सदस्यांनी केली.
...
मुलींना योग प्रशिक्षण
शहरातील इच्छुक महिला आणि मुलींना योग आणि कुंगफू कराटे प्रशिक्षण देण्याच्या येणाऱ्या खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही योजना वस्ती पातळीवर राबविण्यात येणार आहे. क्रीडा धोरणानुसार खेळाडू दत्तक योजनेचा लाभ १६ खेळाडूंना मिळावा आणि त्यासाठीच्या २६ लाख रुपयांच्या खर्चासही या वेळी मंजुरी देण्यात आली.
.....
'आय टू आर' प्रकरणांचा तपशील
एकूण प्रस्ताव / भूखंड क्षेत्र / पालिकेच्या ताब्यातील क्षेत्र
५१ / ९ लाख ७२ हजार चौ.मी. / ९० हजार ५५२ चौ. मी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस शवदाहिनीविरोधातभाजपचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शहरातील पाच स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या नावाखाली करदात्यांची लूट होत असल्याचा आरोप करून याबाबतचा प्रस्ताव मंजूर करू नये, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत मंगळवारी (नऊ ऑगस्ट) तिरडी आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
महापालिकेमार्फत वाकड, दापोडी, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर आणि पिंपरी वाघेरे या ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या ठेकेदारांनी अव्वाच्या सव्वा दर सादर केल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे यांनी केला. त्यानंतर प्रशासनाने संबंधित ठेकेदारांसोबत दर कमी करण्यासाठी चर्चा केली. आधी जादा दराने निविदा भरलेल्या ठेकेदारांनी नंतर दर कमी करण्याची तयारी दर्शविल्यामुळे निविदेत संगनमत झाल्याचे कारण पुढे करून निविदा रद्द केली आणि पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविली. त्यामुळे याबाबतच्या प्रस्तावाला विरोध दर्शविण्यासाठी आणि संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नगरसेविका सावळे यांच्यासह आशा शेंडगे, एकनाथ पवार, सारंग कामतेकर, अनुप मोरे, राजू दुर्गे, कुमार जाधव, शरद बोऱ्हाडे, प्रकाश ढवळे, अजीज शेख, गणेश लंगोटे, अपर्णा मणेरीकर, सारिका पवार, आशा काळे, गीता महेंद्रू, शेखर चिंचवडे यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदिस्त जलवाहिनीबाबत योग्य निर्णय घेऊ

$
0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांचे मावळातील शेतकऱ्यांना आश्वासन
म. टा. प्रतिनिधी लोणावळा
बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे मावळातील शेतकऱ्यांना विचारात घेऊन बंदिस्त जलवाहिनी संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल. मावळ गोळीबार प्रकरणी मावळातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे. बंदिस्त पवना जलवाहिनी विरोधात ९ ऑगस्ट २०११ला झालेल्या आंदोलनात गोळीबार झाला होता. त्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी येळसे (पवनानगर) शिवप्रसाद मंगल कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पालकमंत्री बापट बोलत होते.
या श्रद्धांजली सभेला मावळचे आमदार बाळा भेगडे, दिगंबर भेगडे, शंकरराव शेलार, केशराव वाडेकर, शिवसेनेचे मच्छिंद्र खराडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, एकनाथराव टिळे, भाजाप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी अध्यक्ष रामनाथ वारिंगे, भाजपचे प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना बापट म्हणाले, 'बंदिस्त पवना जलवाहिनीच्या विरोधासाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आलेल्या मावळ गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला. या तीनही शेतकऱ्यांच्या स्मारकासाठी सरकारकडून निधी देण्यात येईल. आंदोलनाप्रकरणी ज्या शेतकऱ्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या शेतकऱ्यांवरील गुन्हे एका महिन्यात मागे घेण्यात येतील. याबाबत लवकरच संबधित अधिकारी, पिंपरीं चिंचवड महानगर पालिका व मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ.'
या वेळी मावळचे आमदार बाळा भेगडे म्हणाले, 'युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर वारसांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाची सीबीआय चौकशी करून सत्य जनतेसमोर आले पाहिजे. पवना धरणग्रस्तांचा रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.' माजी आमदार दिगंबर भेगडे म्हणाले, 'हक्काच्या पाण्यासाठी करण्यात आलेले आंदोलन पोलिसांना योग्य पद्धतीने हाताळता आले नाही. त्यामुळे तीन जणांचा हकनाक बळी गेला. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images