Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

झांबियाच्या निवडणुकांवर पिंपरीच्या युवकाची ‘नजर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी अफ्रिकेतील झांबिया या देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या 'निवडणूक निरीक्षक'पदी आशियाचा प्रादेशिक प्रतिनिधी म्हणून पिंपरीमधील प्रवीण निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झांबियामध्ये ११ ऑगस्ट रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यावेळी येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि निष्पक्षपाती निवडणूक पार पडावी, यासाठी आफ्रिकेतील प्रशासनातर्फे १३ जणांचा 'आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक गट' तयार करण्यात आला आहे. यामध्ये आशियामधून प्रवीण निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या गटामध्ये निकम यांच्याबरोबरच टांझानिया, कॅनडा, युगांडा, नायजेरिया, यूके, केनिया, घाना, श्रीलंका, बार्बाडोस, लेसोथो, न्यूझीलंड आणि फिजी यांमधील प्रतिनिधींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संपूर्ण जगाची या निवडणुकांवर नजर असणार आहे. त्यामुळे ती योग्य प्रकारे कशी होईल, याकडे लक्ष देण्याचे काम या गटावर सोपवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ई-मेल हॅक करून १३ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातील एका कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून १३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत नरेंद्र मेहता (वय ४७, रा. नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता गेल्या चार वर्षांपासून चाकण एमआयडीसी येथून चीनच्या कंपनीला अॅल्यूमिनियमचे रॉड पाठवितात. ३१ जानेवारी ते चार एप्रिल या कालावधीत त्यांनी चीन येथील झिंग जियांग या कंपनीला कच्चा माल पाठविला होता. त्यानंतर ई मेलद्वारे कागदपत्रांची देवाण घेवाण करत होते. त्या वेळी कोणी तरी त्यांचा ई मेल आयडी हॅक करून बँकेची माहिती चोरली. पुणे विद्यापीठ परिसरातील अॅक्सीस बँकेच्या फॉरेन एक्स्चेंज विभागातून मेहता यांच्या नावाने व्यवहार करून १३ लाख २५ हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यावर हस्तांतर केले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) उदयसिंग शिंगाडे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत फेरीवाल्यांना दहापट दंडाची शिक्षा

$
0
0

पाचशे रुपयांऐवजी पाच हजारांचा प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात यापुढे अनधिकृत स्टॉल, हातगाडीस पथारी लावल्यास अशा विक्रेत्यांना महापालिकेकडून जबर दंड करण्यात येणार आहे. वारंवार कारवाई करूनही तुटपुंजी दंडाची रक्कम भरून पुन्हा अतिक्रमण होत असल्याने आता दंडाच्या रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय शहर फेरीवाला समितीने घेतला आहे. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतरच या प्रस्तावाची अंमलबजावणी होऊ शकणार आहे.
शहरातील अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी पालिकेतर्फे प्रमुख ४५ रस्ते आणि १५३ चौकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत पथारी व्यावसायिक/फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाईचा बडगा उचलला जातो. अशा व्यावसायिकांकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जातो. पालिकेचे पथक कारवाईला आल्यास अनेक व्यावसायिकांची हा दंड भरण्याची तयारी असते. पालिकेने माल जप्त केल्यानंतरही तो ठरावीक दिवसांनी सोडावाच लागतो. त्यामुळे, पाचशे रुपये दंडामध्ये कारवाईपासून बचाव करता येत असल्याने संबंधित रस्त्यांवर पुन्हा अनधिकृत अतिक्रमणे होतात, असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर जरब बसविण्यासाठी दंडाची रक्कम दहापटीने वाढवून तो पाच हजार रुपये करण्याचा प्रस्ताव शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. फेरीवाला समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, अशी माहिती अतिक्रमण विभागप्रमुख विलास कानडे यांनी दिली.
फेरीवाला समितीने मान्यता दिलेला हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. स्थायी समिती आणि त्यापाठोपाठ सर्वसाधारण सभेने त्याला मान्यता दिल्यास, पालिकेला अनधिकृत फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करता येणार आहे. त्यामुळे, रस्त्यावरील अतिक्रमणे काही प्रमाणात दूर होतील, अशी शक्यता आहे.
...............
'स्थायी'परवानगी देणार का?
शहर फेरीवाला समितीने यापूर्वी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण, नोंदणी आणि पुनर्वसन अशा विविध प्रश्नांबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. दुर्दैवाने, पालिकेत सर्वोच्च असलेल्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी हे प्रस्ताव दाखल झाले, की त्यात राजकीय हितसंबंधांमुळे बदल केले जातात. त्यामुळे, शहरातील अधिकृत फेरीवाले/पथारी व्यावसायिकांकडून शहराच्या विभागानुसार शुल्क आकारणी करण्याचा प्रस्तावही अजून कागदोपत्रीच आहे. येत्या सहा महिन्यांत महापालिका निवडणुका होणार असल्याने अनधिकृत फेरीवाल्यांकडूनही दहापट दंड आकारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा मान्यता देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील पाऊस वाढण्याची शक्यता

$
0
0

पुणे : अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील पावसाचे प्रमाण वाढले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात पावसाचे प्रमाण काहीसे वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी शहरात पावसाच्या काही सरींची शक्यता आहे.
पावसाळ्यादरम्यान सक्रिय असणारा पश्चिम पूर्व मान्सूनचा पट्टा (मान्सून ट्रफ) हिमालयाच्या पायथ्याकडून काहीसा खाली मध्य भारताकडे सरकला आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागराच्या ईशान्येकडील भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच, महाराष्ट्र ते कर्नाटकच्या किनारपट्टीदरम्यान किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे 'आयएमडी'तर्फे सांगण्यात आले. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात रेणापूर येथे १८० मिमी तर, लातूर येथे १०० मिमी, चंद्रपूर येथे १२० मिमी, कोयना येथे १०० मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या २४ तासात सांताक्रूझ येथे ५७, महाबळेश्वर येथे ४९, रत्नागिरी येथे ३४, नाशिक येथे २३, औरंगाबाद येथे ७, परभणी येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली.
पुढील दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात पावसाच्या काही सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा, विदर्भात जुलैत अतिरिक्त पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गतवर्षी भीषण दुष्काळ अनुभवलेल्या मराठवाड्यासह विदर्भात यंदाच्या जुलैअखेर सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवा या विभागातही सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात सरासरीपेक्षा ३६ तर, मराठवाड्यात ३१ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे. देशभरातही सरासरीइतक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) देण्यात आली.

भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे महाराष्ट्राचे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे चार उपविभाग करण्यात आले आहेत. यंदा जुलैअखेर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक, कोकण-गोव्यात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक, मराठवाड्यात ३१ टक्के अधिक तर विदर्भात सर्वाधिक म्हणजेच सरासरीपेक्षा ३६ टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याचे आयएमडीतर्फे सांगण्यात आले.

भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे देशाचे एकूण ३६ उपविभाग करण्यात आले आहेत. या सर्व उपविभागांमध्ये मिळून देशात ३१ जुलैअखेर सरासरी ४५२.८ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा सरासरीपेक्षा किंचित अधिक म्हणजेच ४५४.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. देशभरात यंदा संपूर्ण हंगामात सरासरीपेक्षा अधिक (सरासरीच्या १०६ टक्के) पाऊस होईल, असा सुधारित अंदाज आयएमडीतर्फे वर्तविण्यात आला होता. एक जून ते ३० सप्टेंबर या पावसाच्या हंगामापैकी अजून ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन पावसाचे महिने शिल्लक असले, तरी खऱ्या अर्थाने ऑगस्ट हा एकच पावसाचा महिना शिल्लक आहे. त्यामुळे या महिन्यात पाऊस कसा पाऊस होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

उपविभाग कोकण-गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ

सरासरी पाऊस (मिलिमीटर) १८१० ३८७.८ ३३०.५ ४७९.९ प्रत्यक्ष पाऊस (मिलिमीटर) २११८.७ ४१९.१ ४३३.१ ६५३.३ फरक (टक्केवारी) १७ ८ ३१ ३६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे थोडं चुकलंच, नाही का?

$
0
0

बदलांची पूर्वचाचणी नसल्याने थेट प्रक्रियेमध्येच दिसले दुष्परिणाम

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये बेटरमेंटची एकच संधी देणे आणि कॉलेजांकडे रिक्त राहणारे कोट्याचे प्रवेश प्रत्येक फेरीपूर्वी टप्प्याटप्प्याने समर्पित करण्याची संधी कॉलेजांना देण्याचा सरकारचा निर्णय चुकल्याचे यंदा अनुभवायला मिळाले.
ऑफलाइन प्रवेशांवर नियंत्रण ठेवण्यात अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती अपयशी ठरल्याचेही यंदाच्या प्रक्रियेने दाखवून दिले. प्रक्रियेतील या त्रुटी विद्यार्थी-पालकांच्या अडचणीतच नव्हे, तर अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या डोकेदुखीमध्येही वाढ करण्यास कारणीभूत ठरल्याचे प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यापासून अनुभवायला मिळाले.
अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी यंदा सरकारने सुधारित सरकारी निर्णय काढला होता. यापूर्वी राबविण्यात आलेल्या प्रक्रियांचा विचार करून त्यामध्ये काही बदल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या बदलांचा विचार करता, बेटरमेंटची एकच संधी देण्याचा महत्त्वाचा बदल या निर्णयात आहे. बेटरमेंटच्या संधी वाढल्यास प्रक्रियेबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते, हे महत्त्वाचे निरीक्षण हा बदल करण्यामागे असल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात येत होती. त्यामुळे कोणतीही पूर्वचाचणी न घेता, बेटरमेंटची एकच संधी देण्याचा निर्णय सरकारने थेट अमलात आणला. निर्णयाची पूर्वचाचणी घेतली नसल्याने या निर्णयाचे उलटे परिणाम निर्णय ठरविणाऱ्या तज्ज्ञांनी विचारातच घेतले नसल्याचे यंदाच्या प्रक्रियेने दाखवून दिले.
केवळ या एका चुकीच्या निर्णयामुळे तिसऱ्या फेरीपासून पुढच्या टप्प्यांमध्ये चांगली टक्केवारी असूनही, अपेक्षित चांगल्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. या बदलाच्या आधारे प्रक्रियेबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादीत ठेवण्याचे सरकारचे मनसुबे धुळीस मिळाले आणि अखेरीस विद्यार्थ्यांसह पालकही रस्त्यावर उतरले. चांगली टक्केवारी असूनही दुय्यम कॉलेजांमध्ये प्रवेश मिळालेल्यांची संख्या या बदलामुळे वाढली. अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणून समितीला अखेरच्या टप्प्यासाठी आपल्या धोरणांमध्येही बदल करावे लागले. त्यातूनच बेटरमेंटची एकच संधी देण्याचा निर्णय समितीला चांगलाच महागात गेल्याचे दिसले.
प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने यंदा कॉलेजांकडे रिक्त राहणारे कोट्याचे प्रवेश ऑनलाइन प्रवेशांसाठी समर्पित करण्याची संधी समितीने कॉलेजांना दिली होती. ऑनलाइन प्रक्रियेसाठी उपलब्ध जागा वाढाव्यात आणि त्यातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना एकाच वेळी कॉलेज निश्चिती देता यावी, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र तसे करताना समितीने अशा जागा एकाच वेळी समर्पित करण्याचे धोरण ठरविण्याऐवजी, प्रक्रियेच्या तिन्ही टप्प्यांपूर्वी जागा समर्पित करण्याची संधी कॉलेजांना दिली. त्यामुळे एकाच वेळी अशा सर्व जागा उपलब्ध होण्याऐवजी तिन्ही फेऱ्यांमध्ये थोड्या प्रमाणात या जागा ऑनलाइन प्रक्रियेसाठी मिळाल्या.
..
गुणवंत राहिले न्यायापासून वंचित
प्रक्रियेच्या एकूण रचनेनुसार समिती पहिल्या फेरीमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांना कॉलेज निश्चिती देते, तिसऱ्या फेरीपर्यंत ही संख्या सर्वात कमी होते. या उलट समर्पित जागांची परिस्थिती अनुभवायला मिळाली. पहिल्या फेरीत कमी, तर तिसऱ्या फेरीपर्यंत सर्वाधिक जागा समर्पित झाल्याचे दिसले. त्यामुळे जागा भरल्याच गेल्या नाहीत आणि गुणवंत विद्यार्थ्यांना न्यायही मिळाला नाही. प्रक्रिया संपता संपता, समितीने एक महत्त्वाचा बदल जाहीर केला. अकरावीचे प्रवेश बारावीच्या परीक्षा अर्जांशी जोडण्याची प्रक्रिया होणार असल्याचे समितीने जाहीर केले. हा बदल स्वागतार्ह ठरत असला, तरी तो सुरुवातीच्या टप्प्यातच जाहीर झाला असता, तर प्रक्रियेबाहेर राहून ऑफलाइन प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या शून्यावर आणण्यात समिती यशस्वी झाली असती. मात्र सकारात्मक बदलांचा तितक्याच सकारात्मकपणे पाठपुरावा करण्यात सरकार आणि समितीही अपयशी ठरल्याने, अखेर पहिल्या दोन टप्प्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेली यंदाची अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा टीकेचाच विषय ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेश; घरातले मोठे ‘कार्य’

$
0
0

विद्यार्थ्यांबरोबर कुटुंबीयही हवालदिल

Chintamani.Patki@timesgroup.com
पुणे : पाल्याची अकरावी प्रवेश प्रक्रिया ही पालकांसाठी दहावीच्या परीक्षांपेक्षाही मोठी समस्या बनली आहे. पूर्वी पाल्याची दहावी म्हटली की घरातील सर्वांच्या पोटात गोळा यायचा. अख्खे कुटुंब अभ्यासाला लागत असल्याने कुटुंबच परीक्षा देणार आहे की काय, असे चित्र निर्माण होत असे. 'कुटुंब रंगलयं अभ्यासात', अशी परिस्थिती घरांघरांत अनुभवायला मिळत असे.
आता अशीच काहीशी अवस्था अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत होऊन बसली आहे. या प्रक्रियेतील समस्या, अडचणींमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया घरातील मोठे 'कार्य' होऊन बसले आहे. या परिस्थितीत कोणीच वाली नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत. पुण्यात अनेक वर्षांपासून केंद्रीय पद्धतीने अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. कॉलेजमध्ये ऑफलाइन प्रवेशातून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया आदर्श मानली जाते. पुण्यात या प्रक्रियेची आवश्यकता आहेच, पण नियोजन योग्य नसल्याने तसेच बहिस्थ शक्तींचा हस्तक्षेप होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसून येते. यातूनच पालकांच्या तक्रारीचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले आहे.
लांबचे कॉलेज मिळणे, पसंतीचे कॉलेज न मिळणे, या तक्रारी पसंतीक्रम योग्य न भरल्याने होत असल्या तरी तेवढेच एकमेव कारण नाही. दहावीचा निकाल दरवर्षी वाढत आहे. ९० वा त्यापेक्षा अधिक टक्के मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ९० ते ९५ टक्के या दरम्यान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एक लाटच आली आहे. भरघोस गुण मिळाले तरी, विद्यार्थ्यांना चांगले कॉलेज मिळताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमके किती गुण मिळवले म्हणजे त्यांना चांगले कॉलेज मिळू शकेल, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आता केवळ १०० टक्केच गुण मिळायचे बाकी आहे. आगामी काळात असे गुण मिळाले तरी प्रवेशाचे काय, हा प्रश्न अनुत्तरीत असल्याने दहावीच्या परीक्षेपेक्षा अकरावीची प्रवेश प्रक्रियाच अधिक स्पर्धात्मक होताना दिसत आहे.
ऑनलाइन प्रक्रिया पालकांना हवीच आहे. वाढत्या पुण्यात प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन अर्ज भरणे पालकांना शक्य नाही. त्यापेक्षा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कधीही चांगलीच. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केल्यानंतर अडचणी संपतील, असा अंदाज होता, पण पालकांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणारा पालक नवीन असल्याने गोंधळ उडतोच. यासाठी समुपदेशन अधिक खोलवर होणे गरजेचे आहे. टुकार कॉलेजला मान्यता देणे, अशा कॉलेजमधील तुकडी वाढवणे तसेच प्रत्येक पालक व विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन प्रक्रिया राबवली, बहिस्थ शक्तींचा हस्तक्षेप थांबवला व गुणवत्ता हाच एकमेव निकष डोळ्यासमोर ठेऊन प्रक्रियेतील त्रुटी दूर केल्यास ही प्रवेश परीक्षा दिव्य न ठरता ती अधिक पारदर्शी व जलद होऊ शकेल. अन्यथा सहभागी होणारा नवीन पालक विरूद्ध प्रशासन, प्रवेश प्रक्रिया गोंधळात हे चित्र आहे तसेच राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कटऑफ तपासूनच अर्ज भरा’

$
0
0

अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीद्वारे पुणे-पिंपरी चिंचवडच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आखली आहे. या प्रवेश प्रक्रियबाबत आणि प्रवेशाच्या विविध फेऱ्यांबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अद्याप काही शंका आहेत. त्याबाबत समितीच्या सचिव तथा सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांच्याशी हर्ष दुधे यांनी केलेली बातचीत...
...................
प्रश्न : अकरावीची प्रवेश प्रक्रियेत कोणता महत्वाचा बदल झाला?
उत्तर : गेल्या वर्षीच्या अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एकापेक्षा अधिक बेटरमेंटची संधी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज मिळायला कमी त्रास झाला. मात्र, यंदा मुंबई आणि पुण्यात एकच बेटरमेंटची संधी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पसंतीची कॉलेजे मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईमध्ये अकरावीसाठी प्रवेशक्षमता भरपूर असल्याने तेथे याबाबत विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या तक्रारी कमी आहेत. मात्र, तुलनेने पुण्यात कमी जागा असल्याने विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या तक्रारी अधिक आहेत. याबाबत आणि तक्रारींची माहिती शिक्षण खात्याला दिली आहे.
..............
प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज का मिळत नाही?
प्रवेश प्रक्रियेत कॉलेज मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजचे कट-ऑफ गुण आधी तपासून घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी कट-ऑफ गुण तपासून त्यानुसार पसंतीक्रमाचा अर्ज भरण्याची आ‍वश्यकता आहे. मात्र, विद्यार्थी अर्ज भरताना कट-ऑफ गुण तपासतच नाही. त्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रियेतून पसंतीचे कॉलेज मिळत नाही. काहींना कॉलेजच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगामी फेऱ्यांमध्ये कॉलेजच्या रिक्त जागा आणि कट-ऑफ गुण तपासून पसंतीक्रमाचा अर्ज भरण्याची गरज आहे.
..........
पाचव्या आणि विशेष फेरीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सूचना द्याल?
विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर कॉलेजचा कोड टाकून संबंधित कॉलेजच्या रिक्त जागा आणि कट-ऑफ गुण तपासून पसंतीक्रमाचा अर्ज भरण्याची आ‍वश्यकता आहे. किमान पाच तर कमाल पंधरा पसंतीक्रम भरायचे आहे. या शिवाय संबंधित कॉलेजचे घरापासून अंतर तपासण्याची गरज आहे. पालकांनी देखील त्यांच्या पाल्यांना पसंतीक्रमाचा अर्ज भरायला मदत केल्यास पसंतीचे कॉलेज मिळेल.
..........
इंजिनीअरिंग, एमबीए या अ‍भ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होते. मात्र, तेथे अकरावीसारखा गोंधळ होत नाही, असे का?
इंजिनीअरिंग, एमबीए या अ‍भ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही खूप वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे आता ती प्रवेश प्रक्रिया स्थिरावली आहे. त्यामुळे तेथे गोंधळ निर्माण होत नाही. तुलनेने अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नवीन आहे. त्यामध्ये या वर्षी देखील बदल झाले आहेत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया स्थिरावली की गोंधळ कमी होईल.
.................
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेष फेरी एक, दोन आणि तीन घेण्याचे प्रयोजन काय?
विद्यार्थ्यांना आणि पालकांना अकरावीच्या प्रवेशाबाबत काही अडचण असल्यास ते या फेरीचा लाभ घेऊ शकतील. दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल ऑगस्टमध्ये लागण्याची शक्यता आहे.हा निकाल या विशेष फेरींच्या कालावधीमध्ये लागल्यास उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल.
................
पाचव्या आणि विशेष फेरीबाबत काय सांगाल ?
अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत ज्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या तक्रारी आहेत, अशा सर्वांना या फेरीद्वारे प्रवेश मिळणार आहेत. या फेरींसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध केल्या आहेत. या फेरीचे वेळापत्रक अतिशय सूक्ष्म निरीक्षण करुन तयार केले असून पूर्वीच्या फेऱ्यांमध्ये आलेल्या त्रृटी या फेरीत दूर केल्या आहेत.या प्रकारचे वेळापत्रक यापूर्वीच तयार झाले असते तर प्रवेश प्रक्रिया लांबली नसती. त्यामुळे पाचव्या फेरीद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्याच्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न होणार आहे.येत्या १५ ऑगस्टपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. त्यामुळे विशेष फेरीची आवश्यकता भासणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवेशप्रक्रियांची कॉपी नको

$
0
0

नेमकी गरज समजून घेऊन बदल आवश्यक

पुणे : अकरावी प्रवेश ऑनलाइन होण्याचे हे चौथे वर्ष असले, तरी ती अजून रुळलेली नाही. हे अपयश नक्की कोणाचे, या प्रश्नाचे खरे तर गांभीर्याने उत्तर देण्याची वेळ आली आहे. पुण्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया इतर प्रवेश प्रक्रियेचे मॉडेल जसेच्या तसे कॉपी करून सुरळीत होणार नाही, तर नेमकी गरज समजून त्याचा फेरआढावा घ्यायला हवा.
पुण्यामध्ये सुमारे १५ वर्षे अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने होत होते. या प्रवेश प्रक्रियेत कॉलेजबाह्य घटकांची सुरू झालेली 'दुकानदारी' बंद करण्यासाठी आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी ऑनलाइन पद्धत आणली गेली. ऑनलाइन पद्धतीचा हेतू अतिशय चांगला आहे. मुळात त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत होणारे बरेचसे गैरप्रकार बंद होण्यास मदत झाली, हेही मान्य करावे लागेल. आता प्रश्न आहे, ही प्रक्रिया स्थिरस्थावर होण्याचा...
राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया गेली काही वर्षे ऑनलाइन होत आहेत. त्या आता कुठे स्थिरावल्या आहेत; पण म्हणून त्यांची सरसकट कॉपी करून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत होऊ शकेल का, हा प्रश्न आहेच. मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे वर उल्लेखलेल्या सर्व प्रक्रिया या राज्यस्तरावरील होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया आहेत. अकरावीची प्रक्रिया ही एका शहरापुरती मर्यादित आहे.
दुसरी गोष्ट अशी, की या प्रक्रियांमध्ये भाग घेणारे विद्यार्थी एकाच वेळी अनेक प्रक्रियांत भाग घेणारे असतात. नुसते इंजिनीअरिंगचे उदाहरण घेतले, तरी त्यामध्ये राज्यातील कॉलेजेस, आयआयटी, एनआयटी, बिट्स-पिलानी असे अनेक पर्याय विद्यार्थी चाचपडून पाहत असतो. जोडीने फार्मसी वा आर्किटेक्चरलाही प्रयत्न करीत असतो. बेटरमेंटच्या संधीमध्ये मनासारखे कॉलेज मिळाले नाही, तर शाखाच बदलण्याची संधी त्याच्याकडे असते. अकरावी प्रवेशाचे तसे नाही. सायन्सला प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी पुढे इंजिनीअरिंग किंवा मेडिकलला जाण्यासाठी सायन्सला प्रवेश घेत असतो. त्यामुळे शाखा बदलण्याचा पर्याय त्याच्याकडे नसतो.
..
प्रक्रियेची फेररचना आवश्यक
अकरावीची प्रक्रिया एका शहरापुरती असल्याने त्यातील सर्वोत्तम कॉलेजसाठीची स्पर्धाही तीव्र असते, हेही लक्षात घ्यायला हवे. अशा वेळी एखाद्याला मार्क चांगले आहेत; पण बेटरमेंटच्या एकाच संधीमुळे हवे ते कॉलेज मिळाले नाही आणि दुसऱ्याला मार्क कमी असूनही ते मिळाले, तर असंतोष होणार, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रक्रियेतील हा दोष काढायलाच हवा आणि तो केवळ एखाद्या प्रवेश प्रक्रियेची कॉपी करून साध्य होणार नाही. त्यासाठी आताच्या रचनेची अनुरूप फेररचनाच गरजेची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशंटच्या नातेवाइकांची डॉक्टरांना बेदम मारहाण

$
0
0

ससून हॉस्पिटलमधील प्रकार; परस्परविरोधी गुन्हे दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उपचारासमयी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून पेशंटच्या नातेवाइकांनी ससून हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना मारहाण केली. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड आणि डॉक्टरांनीही पेशंटच्या नातेवाइकांना मारहाण केली. शनिवारी रात्री मारामारीचा प्रकार घडल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

या प्रकरणी डॉ. अभिजित बाळाभाऊ जवंजाळ (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रमेश प्रभाकर भिसे (वय ३४), अविनाश सुधाम जाधव (वय २३), रोहन भीमराव साळवे (वय १८), विकी प्रमोद गायकवाड (वय २६) आणि राहुल राजू परदेशी (वय ३०, सर्व राहणार येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. रमेश भिसे यांने दिलेल्या तक्रारीवरून डॉ. अभिजित जवंजाळ, सिक्युरिटी गार्ड देवेंद्र मोंगडे, पांडुरंग मडके आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश भिसे याचे भावजी तानाजी कोंडिबा सकट (वय ४२) यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना शुक्रवारी ससूनमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक १४मध्ये उपचार सुरू होते. सकट यांच्या पोटात जास्त दुखू लागल्याने भिसे यांनी डॉ. जवंजाळ यांना लक्ष देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यातच सकट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी चिडलेल्या भिसे यांनी जवंजाळ यांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करून त्यांना मारहाण केली. त्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

सकट यांच्या नातेवाइकांनी गोंधळ घालून जवंजाळ यांच्या डोक्यात लाकडी खुर्ची डोक्यात घातली. जवंजाळ यांचे सहकारी डॉक्टर भांडण सोडवण्यास आले असता, त्यांनाही आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत डॉ. जवंजाळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ससूनचे सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी आले. त्यांनी हातातील लाकडाने भिसे आणि इतरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार अर्धा ते पाऊण तास सुरू होता. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बंडगार्डन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचे भवितव्य आज ठरणार

$
0
0

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या बहुप्रतीक्षित फैसल्याकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील बहुप्रतीक्षित मेट्रोला गती मिळण्याची शक्यता असतानाच, त्याला पुन्हा अडथळा निर्माण होणार का, हे आज सोमवारी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) निर्णयावर ठरणार आहे. 'एनजीटी'ने सुधारित मार्गाला आक्षेप घेतल्यास शहराचा मेट्रो प्रकल्प धोक्यात येण्याची शक्यता आहे. शहराच्या मेट्रो प्रकल्पातील वनाज ते रामवाडी मार्गिकेला अनेक स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे, या मार्गाच्या आराखड्यात बदल करून तो जंगली महाराज रोडऐवजी नदीपात्राच्या बाजूने दर्शविण्यात आला. या सुधारित मेट्रो मार्गालाही आक्षेप घेत पर्यावरणवाद्यांनी 'एनजीटी'कडे दाद मागितली आहे. नदीपात्रातून जाणाऱ्या मेट्रोमुळे नदीची वहनक्षमता कमी होण्याचा दावा केला जात आहे.

गेल्या महिन्यात सात जुलै रोजी 'एनजीटी'समोर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी, पालिकेसह दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे, आज, सोमवारी होणाऱ्या सुनावणीत एनजीटी काही निर्णय देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेट्रो मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असल्याने 'एनजीटी'ने मेट्रो प्रकल्पाच्या विरोधात निर्णय दिला, तर संपूर्ण प्रक्रियेला पुन्हा खीळ बसण्याची भीती आहे. त्यामुळे, मेट्रो प्रकल्पाची बाजू 'एनजीटी'समोर ठामपणे मांडता यावी, यासाठी पालिकेने वरिष्ठ वकिलांची नियुक्ती केली आहे.

राज्यसभेच्या खासदार अनु आगा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्यासह पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर यांनी मेट्रोच्या सुधारित मार्गाविरोधात दंड थोपटले आहेत. प्रकल्पाला अद्याप मंजुरी नसून, हा केवळ प्रस्ताव असल्याचा दावा पालिकेने गेल्या सुनावणीवेळी केला होता. त्यामुळे, आजच्या सुनावणीत नक्की काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

'एनजीटी'घेणार पूर्वीच्या निकालाचा आधार?

'एनजीटी'ने यापूर्वी विठ्ठलवाडी ते वारजे दरम्यानचा नदीपात्रातील रस्ता उखडून टाकण्याचे आदेश देतानाच, हा रस्ता 'पिलर'वर बांधण्यास हरकत नाही, असे निरीक्षण नोंदविले होते. हाच आधार धरल्यास खंडुजीबाबा चौकापासून ते महापालिकेपर्यंत आखण्यात आलेला मेट्रोचा मार्ग हा पूर्णतः एलिव्हेटेड (पिलरवर) आहे. त्यामुळे, त्यातून नदीच्या प्रवाहाला कोणताही अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाही. 'एनजीटी'ने यापूर्वी दिलेल्या निकालाचा संदर्भ घेऊनच पालिकेतर्फे बाजू मांडली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळाची परंपरा कायम

$
0
0

पाच फेऱ्यांपर्यंत पोहोचूनही परिस्थिती 'जैसे थे'

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : पुण्यात गेल्या चार वर्षांपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अनुभवणाऱ्या प्रत्येकालाच 'नेमेचि​ येतो मग पावसाळा' या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण याच पावसाळ्यादरम्यान शहरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ पुणेकर पालक दरवर्षी अनुभवतात. यंदा, तीन फेऱ्यांवरून आता पाच फेऱ्यांपर्यंत पोहोचलेली अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया या परंपरेलाही अपवाद नाही, हे प्रक्रियेच्या सद्यस्थितीवरून स्पष्ट झाले आहे.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीने वेळोवेळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा ऑनलाइन प्रक्रियेची सुरुवात होण्यापूर्वी शहरातील ५३१ कॉलेजांमधून एकूण ७३ हजार ३८५ प्रवेश उपलब्ध होते. त्यासाठी यंदा समितीकडे एकूण ८२ हजार १०६ अर्ज आले होते. एकूण ७३ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी हे अर्ज भरले. या सर्व विद्यार्थ्यांना तीनच ऑनलाइन फेऱ्यांमधून प्रवेश देण्याचा निर्णय समितीने घेतला होता. मात्र, या तीनही फेऱ्यांमध्ये प्रवेश निश्चिती मिळालेल्या प्रत्येकच विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये प्रवेश अंतिम केला असे झाले नाही. तसेच, अनेकांनी ऑफलाइन प्रवेशही घेतले. अखेर सरकारने अकरावीचे प्रवेश बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याशी जोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अशा प्रत्येकाचीच पावले कॉलेजकडे वळाली किंवा आपल्या तक्रारींना न्याय मागण्यासाठी थेट उपसंचालक कार्यालयात तरी पोहोचली.

या दरम्यान ऑनलाइन प्रक्रियेसाठी कॉलेजांकडून प्रत्यर्पित होत असलेल्या जागांचा आकडा वाढत होता. त्यामुळेच की काय, यंदा पहिल्यांदाच अधिकृतपणे चौथ्थ्या फेरीनंतरही अकरावी प्रवेशाच्या एकूण दहा हजार ५९४ जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले होते. या सबंध प्रक्रियेदरम्यान अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीवर जागा दडविल्याचा आरोपही झाला. ज्युनिअर कॉलेज आणि खासगी क्लासचालकांचे लागेबांधेही स्पष्टपणे अधोरेखित करणारी उदाहरणेही समाजासमोर आली. बेटरमेंटची एकच संधी देण्याच्या चुकलेल्या निर्णयामुळे समितीला चौथ्थ्या फेरीनंतर आता पाचव्या फेरीकडेही वळावे लागले आहे. या फेरीदरम्यान आता एक नवा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन, तो अंतिम केलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत, पाचव्या फेरीमध्ये रिक्त जागांचा अंदाज घेऊन पुन्हा नव्याने अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली कॉलेजे मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी चांगली टक्केवारी असूनही तुलनेने बऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश अंतिम करणाऱ्यांपेक्षा या फेरीतून तुलनेत कमी टक्केवारी असूनही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही मोठा असू शकतो. प्रवेश समितीमधील अनुभवी तज्ज्ञही सध्या या शक्यता नाकारू शकत नाहीत. ही परिस्थिती एक वस्तुस्थिती म्हणूनच समोर आल्यास, सरतेशेवटी या प्रक्रियेने गोंधळाची परंपरा जपली असेच म्हणावे लागेल.

ऑनलाइन प्रयोग तसे कच्चेच...

वेगवेगळ्या शैक्षणिक प्रक्रियांसाठी ऑनलाइन यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, असा वापर होण्यापूर्वी शिक्षण खात्यामध्ये या यंत्रणांची पूर्वचाचणी होत नसल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. मुंबईतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे यश लक्षात घेत, ही प्रक्रिया जशीच्या तशी पुण्यात वापरली जात आहे. पुण्या- मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये असणारी तफावत आणि त्या अनुषंगाने पुण्यात कॉलेजांचे बदलणारे प्राधान्यक्रम हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. त्याचप्रमाणे यंदा बेटरमेंटची एकच संधी देण्यामागे सरकारचा चांगला हेतू असल्याचे बोलले जात असले, तरी त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चांगलीच धावपळ झाली. बेटरमेंटच्या संधी कमी केल्यानंतर नेमके काय परिणाम होतील, याचा कोणताही अंदाज शिक्षण खात्यातील तज्ज्ञांना लागला नाही. त्यामुळेच शिक्षण खात्याचे ऑनलाइन प्रयोग तसे अजून कच्चेच राहिल्याचे ही प्रक्रिया सांगत आहे. या पुढील काळात हे प्रयोग अधिक प्रगल्भ आणि पुरेशा पूर्वतयारीनिशी होणे विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचेही यंदाची प्रक्रिया अधोरेखित करत आहे.

एकूण कॉलेजे ५३१

उपलब्ध प्रवेश ७३ हजार ३८५

एकूण अर्ज ८२ हजार १०६

एकूण सहभागी विद्यार्थी ७३ हजार ९६१

५२ हजार ६१६

पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चिती

३६ हजार ७५२

दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा

१५ हजार ५६३

दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चिती

१० हजार ५२३

दुसऱ्या फेरीत बेटरमेंट मिळालेले विद्यार्थी

५ हजार ४०

दुसऱ्या फेरीत नव्याने प्रवेशित विद्यार्थी

१३ हजार ७२३

कॉलेज निश्चिती न मिळालेले विद्यार्थी

१८ हजार ७६

तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चिती

४ हजार ८४४

कॉलेज निश्चिती न मिळालेले विद्यार्थी

११ हजार ४३२

चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चिती

५ हजार ६७८

चौथ्या फेरीत पहिल्यांदाच प्रवेशित विद्यार्थी

५ हजार ७५४

चौथ्या फेरीत बेटरमेंट मिळालेले विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुलैअखेरीस पाऊस सरासरीपेक्षा कमीच

$
0
0

पुणेकरांची पाणीकपात 'जैसे थे' राहण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जून महिन्यात सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्यानंतर जुलैअखेरही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहिले आहे. त्यामुळे पाणीकपातीचा सामना करत असलेल्या पुणेकरांवरील चिंतेचे सावट आणखी गहिरे झाले आहे. यंदा जुलै महिन्याच्या अखेरीस पुण्यात २८२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, हा पाऊस हंगामी सरासरीपेक्षा ३९.४ मिलिमीटरने कमी आहे.

पुण्यात जून महिन्यात सरासरी १३७.७ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा जूनमध्ये पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४९ टक्के कमी पावसाची नोंद झाली होती. यंदा जूनमध्ये सरासरीच्या निम्म्या म्हणजेच केवळ ५९ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली होती. त्यामुळे सर्वांनाच जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा होती.

जुलै महिन्यात सरासरी १८४ मिलिमीटर पाऊस होऊन जुलैअखेरपर्यंत सर्वसाधारणपणे एकत्रित ३२१.७ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मात्र, प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण हंगामी सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. यंदा ३१ जुलै रोजी पुण्यात २८२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण हंमागी सरासरीपेक्षा ३९.४ मिलिमीटरने कमी असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सांगण्यात आले. २०१५ मध्ये जुलैअखेरीस २७३.२ मिमी तर २०१४च्या जुलैअखेरीस २९६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

जुलैच्या पहिल्या तीन दिवसात पुण्यात दमदार पाऊस झाला. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याजोडीला कच्छ व लगतच्या भागावर वातावरणाच्या वरच्या थरात असलेली हवेची चक्राकार स्थिती यामुळे या कालावधीत राज्याभरातील पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. या कालावधीत पुण्यात सुमारे १२५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला. परिणामी तोपर्यंत हंगामी सरासरीपेक्षा मागे पडलेला पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला.

त्यानंतर मात्र, पश्चिम पूर्वेकडे असणारा मान्सून ट्रफ हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने दक्षिण भारतातील पावसाचे प्रमाण कमी होऊन उत्तर भारतातील पावसाचे प्रमाण वाढले होते. परिणामी, अनुकूल परिस्थिती नसल्याने गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे. क्वचित पावसाच्या सरी हजेरी लावत असूनऽ काही वेळा शहरात लख्ख ऊनही पडले होते. पावसाने घेतलेली ही विश्रांती शेतीच्या कामासाठी उपयुक्त ठरत असली, तरी धरणसाठ्यात पुरेशी वाढ न झाल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सरासरीच्या १०४ टक्के पाऊस

दरम्यान, हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या १०४ टक्के पावसाची शक्यता वर्तविली असून, किमान ऑगस्टमध्ये तरी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, आणि धरणे भरतील, अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार बोकड अन् ३२ टन मासळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांनी आखाडात मांसाहारावर चांगलाच ताव मारला. शेवटच्या रविवारी शहरात ३२ टन मासळी, ८०० टन चिकन आणि दोन हजार बोकडांची विक्री झाली. त्यासाठी पुणे विभागासह राज्याच्या विविध भागातून मालाची आवक झाली.

श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे आषाढ महिन्यात चिकन, मटण व मासळीच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. आता श्रावण महिना सुरू होण्यास अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे आखाडातील शेवटच्या रविववारची संधी सांधून खवय्यांनी मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला. मटणाला अधिक मागणी असल्याने किरकोळ बाजारात किलोच्या दरात २० ते ४० रुपयांनी वाढ झाली. तर, मासळी, चिकन आणि अंड्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याची माहिती मटन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

बोकडाच्या बाजारात शिरूर, खेड, लोणंदसह पुणे विभागातून बोकडाची आवक झाली. तर, राज्यातील विविध भागातून बॉयलर कोंबड्यांची आवक झाली. बोकडाच्या मटनाला एक किलोला ४८० रुपयापर्यंत दर मिळाला. आणि चिकनला १८० रुपये दर मिळाला. विविध प्रकारच्या मासळीच्या दरातही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आखाडात मागणी चांगली होती. तसेच, मागणीमुळे दरही वाढले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेः गर्भलिंग चाचणी करणाऱ्या दोन पतींना अटक

$
0
0

माजिया सैय्यद, पुणे

गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी आतापर्यंत डॉक्टारांना अटक केल्याची बातमी ऐकायला मिळत होती परंतु पत्नीची सोनोग्राफी करणाऱ्या दोन पतींना अटक करण्यात आलीय. गर्भलिंग चाचणी केल्याच्या आरोपाखाली पतीला अटक करण्यात आल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

पुणे-सोलापूर रोडवर गुरुवारी पोलिसांची गस्त सुरु असताना रस्त्याच्या कडेला एक पार्किंग केलेली संशयास्पद गाडी पोलिसांना दिसली. गाडीत दोन महिला व दोन डॉक्टर असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांच्याकडे अधिक चौकशी करताच ते गर्भलिंग चाचणी करीत असल्याचे त्यांनी कबूल केले. सुनीता विलास डांगे आणि बालिका पोपट चव्हाण अशी या दोन महिलांची नावे असून त्या दोघेही सोलापूरच्या रहिवाशी आहेत. मला ३ मुली असल्याने पतीच्या सांगण्यावरुन मी गर्भलिंग चाचणी करत होते, असे सुनीता डांगे या महिलेने सांगितले तर मलाही ५ मुली असल्याने पतीने दबावा टाकल्यानंतर मी ही चाचणी करण्यासाठी या ठिकाणी आल्याचे बालिका चव्हाण या महिलेने सांगितले.

दोन महिलांची गर्भलिंग चाचणी करीत असताना रंगेहात पकडलेले डॉ. हनुमतं मोरे आणि डॉ. तुषार गडे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून या दोघांकडेही एमबीबीएसची डीग्री नसून ते हॉमिओपॅथी व आयुर्वेदची प्रॅक्टीस करतात, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दिल्लीत लागलेल्या एका प्रदर्शनात गर्भलिंग चाचणीची मशीन दीड लाखाला खरेदी केली होती व वर्षभरापासून गर्भलिंग चाचणी करत होतो, अशी कबुली आरोपी डॉक्टरने दिली. गर्भलिंग चाचणी करण्यासाठी अटक करण्यात आलेले डॉक्टर महिलेकडून ८ ते १० हजार रुपये उकळत होते अशी, माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारतीय संस्कृतीचा आदर करा : रश्मी शुक्ला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे 'विद्यार्थ्यांनो भारतात अथवा परदेशात राहत असताना शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी विसरू नका. त्यांचा आदर करा. भारतात राहणार असाल तर भारतीय संस्कृती शिकून तिचा आदर करायला शिका,' असे आवाहन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी परदेशी विद्यार्थ्यांना रविवारी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवसाच्या समारंभात शुक्ला बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रश्मी गुप्ते, सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कौन्सिलच्या अध्यक्षा हाबा बालदेह, डॉ. ए. व्ही. संगमनेरकर, उद्योगपती बाहरी मल्होत्रा, दादा जोशी आदी उपस्थित होते. शुक्ला यांच्या हस्ते 'प्रो. डॉ. एस. बी. मुजुमदार आउटस्टँडिंग फॉरेन स्टुडन्ट ऑफ द इयर' या पुरस्काराच्या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. शुक्ला म्हणाल्या, 'शेकडो वर्षांपूर्वी परदेशी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी नालंदा विद्यापीठात येत होते. मात्र, काळ बदलला आणि देशात मोठ्या संख्येने शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी पुण्यात येऊ लागले. पुण्यात देखील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सर्वाधिक येत आहेत. मुजुमदार यांनी हे विद्यापीठ उभारून परदेशी विद्यार्थ्यांसाठी मोलाचे काम केले आहे. या विद्यापीठाच्या शिक्षकांनी तुम्हाला घडवले आहे. त्यामुळे त्यांचा आदर करा.' शुक्ला यांच्या हस्ते प्रत्येक देशातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. मुजुमदार यांनी प्रो. डॉ. एस. बी. मुजुमदार आउटस्टँडिंग फॉरेन स्टुडन्ट ऑफ द इयर' या पुरस्काराची त्यांच्या वाढदिवसानिमित्त घोषणा केली. डॉ. मुजुमदार दरवर्षी एका परदेशी विद्यार्थ्याला हा पुरस्कार आणि १ लाख रुपये रोख देणार आहेत. डॉ. येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.



'... तेव्हा खात्रा पटली' 'राज्य गुप्तवार्ता विभागाची प्रमुख असताना पुणे शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यार्थी का येतात, हा प्रश्न सतत पडायचा. त्यामुळे या विद्यार्थ्यांची माहिती मी सातत्याने घेत असे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र, पुण्यात पोलिस आयुक्त म्हणून आल्यावर माहिती झाली की, हे विद्यार्थी शिकायलाच येतात याची खात्री पटली,' असे शुक्ला यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पोटच्या अडीच वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करून आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना चिखली येथे मंगळवारी (२ ऑगस्ट) घडली. या महिलेची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. निशिगंध विक्रम माळवदकर (अडीच वर्षे, रा. कोयनानगर, चिखली) असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे; तर स्वाती विक्रम माळवदकर (३२, रा. चिखली) या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आईचे नाव आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी विक्रम हे कामाला गेले होते; तर छोटा भाऊही जीममध्ये गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास विक्रम हे स्वाती यांच्या मोबाइलवर संपर्क करत होते. बराच वेळ होऊनही स्वाती या फोनला प्रतिसाद देत नव्हत्या. रात्री भांडण झाल्याने, संशय आल्याने विक्रम यांनी छोट्या भावास घरी पाठवले. विक्रम यांचा भाऊ घरात गेला त्यांना घराचा दरवाजा पुढे केलेला दिसला. दरवाजा ढकलून आत गेल्यावर त्यांना फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत स्वाती आढळून आल्या. तसेच, पुतण्या निशिगंध हा खाली बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले. याबाबत विक्रम यांना ही माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तत्काळ स्वाती आणि निशिगंध यांना उपचारासाठी जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच निशिगंधचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्वाती यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चिंचवड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलिसांनी चौकशी केली असता निशिगंध याचा गळा आवळून आणि विषारी औषध पाजल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. स्वाती यांनी घरगुती किरकोळ कारणावरून पोटच्या मुलाचा गळा आवळून, विषारी औषध प्राशन करून खून केला; तर स्वतः विषारी औषध पिऊन, गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर असून, पुढील तपास सहायक निरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते ठेकेदारांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शहरातील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांना तडे आणि अन्य रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करणारे ठेकेदार, महापालिकेचे अधिकारी आणि कामाचा दर्जा तपासणीसाठी नेमलेल्या कंपन्यांवर कारवाई करा,' अशी मागणी भाजपचे आमदार विजय काळे यांनी केली.

विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार काळे यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, 'शहरात सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करताना सदोष रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ठेकेदारांबरोबर झालेल्या करारात तीन वर्षांत रस्ता खराब झाल्यास दुरुस्ती करून देण्याची तरतूद आहे. मात्र ठेकेदारांनी खराब झालेले रस्ते दुरुस्त केलेले नाहीत. त्यामुळे अशा रस्त्यांची तपासणी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी.'

सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करताना पुरेशा प्रमाणात पाण्याचा वापर करण्यात आलेला नाही. याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याचे सांगून ते म्हणाले, 'पाण्याचा वापर कमी करण्यात आल्याने रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. ठेकेदारांबरोबर महापालिकेचे अधिकारी आणि कामाचा दर्जा तपासणी नेमलेल्या कंपन्यांवर कारवाई करावी.'

कारवाईचे आश्वासन

बालेवाडी येथे इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ मजूर मृत्युमुखी पडल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन गृह आणि नगररचना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्यावेळी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी आश्वासन दिले. कुलकर्णी म्हणाल्या, 'बालेवाडी येथे बांधकाम मजूरांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने तरुणाला एका लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. याबाबत आसिफ अब्दूल रहेमान शेख (वय २४, रा. कासेवाडी, सिंहगड रोड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, २४ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. तिचा पती फरार आहे. शेख हा मुळचा पुण्यातला असून, सध्या तो दुबई येथे कारचालक म्हणून नोकरीस आहेत. नातेवाइकांच्या लग्नासाठी दहा दिवसांपूर्वी तो पुण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी आरोपी महिलेची आणि त्याची कोंढवा परिसरात ओळख झाली. त्यावेळी महिलेने त्याला ' मी एका ठिकाणी मी कामाला होते. तेथे मला अमेरिकन डॉलर सापडले असून त्याची बाजारात मोठी किंमत आहे,' असे महिलेने शेखला सांगितले. ही बाब शेखने त्याच्या ओळखीच्या एका रिक्षावाल्याला सांगितली. दरम्यान, आरोपी महिला व तिच्या पतीने संगनमत करून शेखला विश्वास संपादन केला. त्याच्याकडून एक लाख रुपये घेऊन त्याला डॉलर न देता त्याची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेखने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी संबंधित महिलेला पोलिसांनी तत्काळ अटक केली. महिलेचा पती अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक एम. पी. जाधव हे अधिक तपास करत आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रद्द प्रवेशाची रक्कम परत द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोंढवा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घेतलेला प्रवेश रद्द करूनही फी ची रक्कम परत न केल्याप्रकरणी ग्राहक मंचाने फटकारले आहे. तसेच तक्रारदाराला ८५,९५० रुपये परत देण्यात यावेत, असा आदेश दिला आहे. पुणे जिल्हा ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य ओेंकार पाटील यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. या प्रकरणात डॉ. इम्रान रमझान शेख (रा. प्रोफेसर कॉलनी, ​हिमायत बाग, औरंगाबाद) यांनी मंचाकडे कोठारी नॅशनल स्कूल (कोंढवा) यांच्याविरुद्ध मंचाकडे दावा दाखल केला होता. तक्रारदार शेख यांच्यातर्फे अॅड. प्रीतेश देशपांडे यांनी काम पाहिले.

तक्रारदार डॉक्टर आहेत. त्यांना महंमद आदिल आणि महंमद डानिश ही दोन मुले आहेत. ते औरंगाबाद येथील स्टेपिंग स्टोन्स हायस्कूलमध्ये शिकत होते. महंमद आदिल हा सहावीमध्ये, तर महंमद डानिश आठवीमध्ये शिकत होता. डॉ. शेख यांना पुण्यात शिफ्ट व्हायचे होते. दोन्ही मुलांच्या अॅडमिशनसाठी ते शाळा शोधत होते. त्यांना कोठारी नॅशनल स्कूलची माहिती मिळाली. संबंधित शाळेकडे जावून त्यांनी चौकशी केली. मोजक्याच जागा उपलब्ध असल्यामुळे माहितीपत्रक घ्यावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी दोन हजार रुपयांचे माहितीपत्रक विकत घेतले. शाळेकडून त्यांना डिपॉझिट फी भरण्यास सांगण्यात आले. महंमद आदिलसाठी ४४ हजार रुपये आणि महंमद डानिश ५१,५०० रुपये फी त्यांनी भरली. फी ची रक्कम भरण्या व्यतिरिक्त अॅडमिशनसाठी दुसरी कोणतीही प्रॅक्रिया तिथे नव्हती. तक्रारदार यांचा पुण्याला शिफ्ट होण्याचा प्लॅन नंतर रद्द झाला. कोठारी नॅशनल स्कूलला यासंदर्भात त्यांनी माहिती देऊन फी ची रक्कम परत देण्याची मागणी केली.

फी भरल्यानंतर ४० दिवसांच्या आत त्यांनी फी ची रक्कम परत देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, रक्कम परत देण्यात आली नाही. तक्रारदार यांनी वारंवार मागणी करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याप्रकरणी त्यांनी मंचाकडे दावा दाखल केला. विरुद्ध पक्षातर्फे आपली बाजू मंचापुढे मांडण्यात आली. मंचाने तक्रारदार यांच्या बाजूने निकाल दिला. तक्रारदार यांना फी ची ८५,९५० रुपये रक्कम परत देण्यात यावी. तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी दहा हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, असा आदेश मंचाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images