Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

देशात अशांततेची परिसिथिती : चव्हाण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे 'काँग्रेस सरकारच्या काळात देशात शांततेचे वातावरण होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्माच्या नावावर लोकांमध्ये भांडणे लावून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न काही पक्षांकडून केला जात आहे,' अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ईद मिलनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर प्रशांत जगताप, काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व अन्य पदाधिकारी आदी या वेळी उपस्थित होते. 'काश्मीरसह जगभरात दहशतवादी कारवायांमुळे सर्वत्र रक्तपाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाही कोलमडू लागल्या आहेत. भारतात गेल्या दोन वर्षांपासून शांतता बिघडविण्याचे काम सुरू आहे. मात्र, आपण त्याविरोधात उभे राहून शांतता बिघडू नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 'ईद मिलन'च्या कार्यक्रमाचे आयोजन करून डॉ. कदम यांनी राज्यभरात सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे,' असे चव्हाण म्हणाले.

आधी 'लिव्ह इन इंडिया' मग, 'मेक इन इंडिया' करा देशाक 'मेक इन इंडिया'चा नारा दिला जात आहे. पण, स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आधी 'लव्ह इंडिया', आणि 'लिव्ह इन इंडिया' म्हणजेच, देशावर प्रेम करणे व देशात राहणे देखील गरजेचे आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या वेळी मोदी सरकारला लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफाई कर्मचाऱ्यांचा भाजपतर्फे सत्कार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे स्वच्छतेमध्ये ईश्वराचे प्रतीक असून, आपला परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे ईश्वराची सेवा केल्याप्रमाणेच आहे. महानगर पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कायमच खूप जिव्हाळ्याने आपले काम करीत असल्याचे मत शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार विजय काळे यांनी व्यक्त केले. भाजप प्रभाग क्र. ३६ तर्फे आयोजित महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, शिवाजीनगर भाजप अध्यक्ष सतीश बहिरट, ओक अॅकॅडमीचे दिलीप ओक यांच्यासह सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील एकूण ७६ प्रभागांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून देण्यात सफाई कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे मत व्यक्त करून बीएमसीसीमागील टेकडीवर वन विभागाच्या सहकार्याने शहाळ्यातून खत निर्मिती प्रकल्प सुरू केला असल्याची माहिती नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे ह्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षलागवड झाले; संगोपन विसरले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, येरवडा राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या 'वृक्ष लागवडीच्या'कार्यक्रमानंतर महापालिका, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वृक्ष मरणासन्न अवस्थेत झाली आहेत. प्रसिद्धी मिळविण्यासाठी केवळ कार्यक्रमापुरते वृक्षांची देखभाल करणाऱ्यांनी आता सोयीस्करपणे पाठ फिरविली आहे. परिणामी, वृक्षांना पाणी मिळाले नसल्याने जळून गेली आहेत. मोठ्या गाजावाजा करीत उत्साहात आणि दिमाखदारपणे वृक्षरोपण करून अनेकांनी सेल्फीही काढले आणि ते फोटो सोशल मीडियावर टाकले. प्रसिद्धी मिळविणाऱ्या पालिका, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून झाडांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही झाडे जळून गेली आहेत. येरवडा विमानतळ रस्त्यावर वृक्षांच्या आधारासाठी लावलेली लाकडे तुटल्याने अनेक वृक्ष कोलमडून पडली आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा केवळ दिखावाच ठरला आहे. महाराष्ट्र कृषिदिन आणि वन महोत्सवानिमित्त १ जुलै रोजी राज्यात कोट्यवधी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. पुणे शहर आणि येरवडा, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड, वडगाव शेरी भागातील नगरसेवक, राजकीय नेते, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांनी उत्साहात वृक्षारोपण केले. त्यानंतर आपण निसर्गाचे वाली असून, वृक्ष वाढविण्याची जबाबदारी घेत कार्यक्रमाचे फोटो, सेल्फी सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धी मिळविण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र, काही दिवसानंतर पालिकेसह सर्वांनीच वृक्षाच्या संगोपनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वृक्ष कोलमडून पडले असून, काही ठिकाणी वृक्ष जळून गेल्याचे दिसून आले आहे.



कोट

वनमहोत्सव दिनानिमित्त नव्याने वृक्षारोपण केलेल्या झाडांची संगोपनाची जबाबदारी पालिकेची आहे. सध्या पावसाचा हंगाम चालू असल्याने पाणी टाकले जात नाही. पाण्याआभावी जळलेल्या वृक्षांच्या जागी नवे वृक्ष लावले जातील. - ज्ञानेश्वर बालवडकर, उद्यान निरीक्षक, पुणे महानगर पालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा जीवघेणा अपघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुलाच्या संरक्षक कठड्याला कार जोरात आदळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात कामशेत बोगद्याजवळ राऊतवाडीच्या हद्दीत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला. अमित श्रीकांत सोलेभावीकर (वय ३२, रा. यमुनानगर, निगडी, पुणे), संतोष सुरेश उदावंत (वय ३२, रा. कर्वेनगर, पुणे), शरद कृष्णा पवार (वय ३५, रा. वारजे माळवाडी, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलेभावीकर, उदावंत आणि पवार हे तिघे शनिवारी काही कामानिमित्त मुंबईला एका मीटींगला गेले होते. कामानंतर ते त्यांच्या आय-२० कारने (एमएच- १४/ डीएफ ५९९४) मध्यरात्री घरी परतत होते. गाडी भरधाव वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. दोन्ही मार्गामधील असलेले गटर ओलांडत सुमारे दीडशे ते दोनशे मीटर अंतर कापत ही गाडी दोन्ही मार्गाच्या मध्यभागी असलेल्या पुलाच्या सिमेंटच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळली. घटनेची माहिती कळताच आयआरबी कर्मचारी आणि देवदूत या आपत्कालीन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. आयआरबीने या संदर्भात कामशेत पोलिसांना माहिती कळविली. कामशेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. अमित सोलेभावीकर हे 'नाद पान स्टॉल'चे मालक होते. त्यांचे निगडी परिसरात दुकान आहे, तर संतोष उदावंत यांचे पुण्यात 'नाद पान स्टॉल' आहे. शरद याची पुण्यात सुरक्षा एजन्सी आहे. घटनेचा पुढील तपास कामशेत पोलिस करीत आहेत.

खचलेली लेन कारणीभूत? मुंबईहून पुण्याकडे येताना पहिला कामशेत बोगदा सोडल्यावर अपघात स्थळापासून दीडशे मीटर अंतरावर मधली लेन मोठ्या प्रमाणात खचलेली आहे. या ठिकाणी चढ उतार झाल्यामुळे पुढचा खड्डा पाहून तो चुकविण्याच्या नादात वाहनांना अचानक लेन बदलावी लागते. यामुळे अनेकदा गाडीवरील नियंत्रण सुटते. त्याचप्रमाणे या खड्ड्यावरून वाहन गेल्यास ते जोरात आदळून वरती उचलले जाऊन अपघात होण्याचीही शक्यता आहे. रविवारी झालेल्या या अपघातास गाडीच्या वेगासह हा खड्डाही कारणीभूत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या खड्ड्यापासूनच कार नियंत्रण सुटून दोन्ही मार्गाच्या मधील गार्डन व गटारामधून गेल्याच्या खुणा आहेत. यामुळे या अपघातास वेगासह खड्डाही कारणीभूत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय प्रवेशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी (कॅप -१) अॅलॉटमेंट नुकतीच जाहीर करण्यात आली. या फेरीच्या अॅलॉटमेंटमध्ये ९१ हजार ८५७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थ्यांनी पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र, ज्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही, त्यांना प्रवेश घेण्यासाठी आज, सोमवार १८ जुलै हा शेवटचा दिवस आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या (डिव्हीईटी) वतीने राज्यातील ४१७ शासकीय आणि ४५४ खासगी 'आयटीआय'मधील ७७ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याकरीता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेद्वारे राज्यातील एकूण १ लाख ३३ हजार जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी तब्बल ३ लाख ६४७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या प्रक्रियेमध्ये एकूण पाच फेऱ्या होणार असून सहावी फेरी ही शासकीय आयटीआयमध्ये समुपदेशन फेरी राहणार आहे. या कॅपमध्ये ९१ हजार ८५७ विद्यार्थ्यांना राज्यातील विविध आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे घेऊन आणि शुल्काची रक्कम घेऊन कॉलेजमध्ये कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी उपस्थित राहून प्रत्यक्ष कार्यवाही करायची आहे. त्यामुळे उर्वरित २ लाख ८ हजार ७९० विद्यार्थांना पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी पुढील फेऱ्यांची वाट पाहावी लागणार आहे.

नव्याने पसंतीक्रम भरणे शक्य आयटीआयच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यासाठी कॅप-१ मध्ये प्रवेशासाठी अॅलॉटमेंट न मिळालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने आटीआय कॉलेजचे पसंतीक्रम भरता येणार आहे. जे विद्यार्थी हा पसंतीक्रम भरणार नाहीत, त्यांचा पहिल्या फेरीचा पसंतीक्रम गृहीत धरला जाणार आहे. हे पसंतीक्रम विद्यार्थ्यांना येत्या बुधवारी २० जुलै ते शुक्रवार २२ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यत ऑनलाइन पद्धतीने www.dvet.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून भरू शकतात. कॅप-२ अॅलॉटमेंट सोमवारी २४ जुलैला जाहीर करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरासरीपेक्षा अधिक पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात गेल्या चार-पाच दिवसांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी कोकण, गोवा वगळता राज्यातील चारही उपविभागांमध्ये हंगामी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण राज्यात (गोव्यासह) २८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वांत जास्त पाऊस विदर्भ उपविभागात आणि सर्वांत कमी पाऊस कोकण गोवा उपविभागात झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे राज्याचे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे चार उपविभाग करण्यात आले आहेत. या चारही उपविभागांत मिळून १७ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचपर्यंत सरासरी ३८७.२ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा या सरासरीपेक्षा २८ टक्के अधिक ४९५.२ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशावर कमी दाबाचे क्षेत्र होते. त्यामुळे राज्यात विदर्भ, दक्षिण -उत्तर महाराष्ट्रात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात संततधार पाऊस झाला. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. नाशिक व दक्षिण उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिमुसळधार पावसाने सरासरीला मागे टाकले. त्याच वेळी अरबी समुद्राकडील बाजूवर अनुकूल परिस्थिती नसल्याने कोकण गोव्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. पुढील दोन दिवसांत राज्यात कोकणच्या काही भागांत जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात पावसाच्या एक दोन सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे रेल्वे प्रशासन ‘स्मार्ट’पणात मागे?

$
0
0

अवैध प्रकारांकडे उशिरा लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वेच्या स्वयंचलित तिकीट मशिनमधून एका व्यक्तीने एका दिवसात एक लाख ६३ हजार रुपयांच्या तिकिटांची केलेली विक्री आणि मिरज स्टेशनवर प्रवाशांकडून पैसे वसूल करताना सापडेला बोगस 'टीसी'...गेल्या दोन दिवसांत रेल्वेच्या पुणे विभागात या दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या. देशात सगळीकडे 'स्मार्ट' पणाचे वारे वाहत आहेत. अगदी रेल्वेमंत्रीदेखील या 'स्मार्ट'पणाचा प्रचार करतात. मात्र, रेल्वेच्या पुणे विभागाचा 'स्मार्टनेस' काहीसा कमी पडत आहे का, असा प्रश्न या दोन्ही घटनांमुळे उपस्थित होतो.

रेल्वे स्टेशनवर काही महिन्यांपूर्वी स्वयंचलित तिकीट मशिन (ऑटोमॅटिक व्हेंडिंग तिकीट मशिन) बसविण्यात आले आहे. एका दिवसात या मशीनमधून २० ते २२ हजार रुपयांची तिकिटे काढण्याची क्षमता आहे. असे असताना एका व्यक्तीने एका दिवसात स्मार्ट कार्डमध्ये फेरफार करून तब्बल एक लाख ६३ हजार रुपयांच्या तिकिटे काढून त्याची प्रवाशांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, दुसऱ्या घटनेत मिरज रेल्वे स्टेशनवर बनावट तिकीट तपासनीसाला पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. तो बोगस 'टीसी' गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून पैसे वसूल करीत होता. या दोन्ही घटना उघडकीस आल्यानंतर काही प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे रेल्वेच्या तांत्रिक विभागाला व्हेंडिग मशीन व स्मार्ट कार्डमधील फेरफार तातडीने का समजू शकला नाही? ती घटना घडल्यानंतर संबंधिताला ताब्यात घेण्यासाठी १० ते ११ दिवसांचा कालावधी का लागला? रेल्वेच्या आवारात अवैधरीत्या तिकीट विक्री करीत असताना, त्याकडे कोणाचे लक्ष कसे गेले नाही? तसेच, दुसऱ्या घटनेत मिरज मार्गावर एक व्यक्ती काही महिन्यांपासून 'टीसी' असल्याचे भासवून प्रवाशांकडून पैसे उकळते. ही गोष्ट रेल्वे प्रशासनापैकी कोणाच्या लक्षात येत नाही. यावरून रेल्वे प्रशासनाकडे 'स्मार्ट'पणाचा अभाव असल्याचे दिसून येते.

'टीसी'चे ओळखपत्र मागावे काय?

दौंड-पुणे पॅसेंजरमध्ये गेल्या आठवड्यात एका पासधारक प्रवाशाने 'टीसी'कडे त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. यामध्ये संबंधित प्रवाशाला अटकही झाली. मात्र, 'टीसी'ला ओळखपत्र विचारल्याचा राग आल्याने त्यांनी भांडणास सुरुवात केल्याचा रेल्वे प्रवासी संघटनांचा दावा आहे. तो प्रवासी किंवा 'टीसी' यांच्यापैकी कोणाची बाजू खरी हा प्रश्न बाजूला ठेवून, प्रवाशांना 'टीसी'चे ओळखपत्र विचारण्याचा अधिकार आहे किंवा नाही, याचे उत्तर रेल्वे प्रशासनाने दिले पाहिजे.

चालू तिकीटावर 'आरक्षित' प्रवास

चालू तिकीट घेऊन आरक्षित डब्यात प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासापूर्वीच दंडाची रक्कम व चालू तिकीट आणि आरक्षित तिकिटातील फरकाची रक्कम स्वीकारली जाते. त्यानंतर संबंधितांना आरक्षित डब्यातून प्रवास करू दिला जातो. हा प्रकार पुणे स्टेशनवर सर्रास पाहायला मिळतो. याबाबतचे वृत्त माध्यमांनी अनेकदा प्रसिद्ध केले आहे. या प्रकाराची दखल रेल्वे प्रशासन कधी घेणार, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’वर तेलगळती; वाहतूक विस्कळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळ ऑइलची वाहतूक करणाऱ्या टँकरला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे टँकरला छिद्र पडून मार्गावर तेलगळती झाल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दहा तास विस्कळीत झाली होती. हा अपघात रविवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास घडला.

वाहतूक कोंडीमुळे रविवारी वीकेंडला लोणावळा व खंडाळ्यात पर्यटन आणि वर्षाविहाराला येणाऱ्या पर्यटकांसह कामगार आणि प्रवाशांना फटका बसला. बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे ऑइलची वाहतूक करणाऱ्या टँकरला एका अज्ञात वाहनाने मागून जोरात धडक दिली. धडकेनंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह पळून गेला. या धडकेमुळे ऑइलच्या टाकीला मोठे छिद्र पडल्याने टाकीतून गळती होऊन ऑइल मार्गावर पसरले. उतारामुळे आणि पावसामुळे ऑइल मार्गावरून वाहू लागल्याने संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबविली. या संदर्भात पोलिसांनी 'आयआरबी'ला कल्पना देऊन अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने पाण्याच्या सहाय्याने व आयआरबी आणि देवदूत आपत्कालीन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मार्गावर सांडलेले ऑइल धुवून काढून मार्ग स्वच्छ केला. त्यानंतर पहाटे साडेचार वाजता पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

वीकेंडला लोणावळा व खंडाळ्यात पर्यटन आणि वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत पहाटे आणखी भर पडली. रविवारी दुपारी साडेबारानंतर वाहतूक सुरळीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारच्या धडकेत विवाहिता ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भांडारकर रोडवरील साने डेअरीजवळ रविवारी दुपारी कारच्या धडकेत अरुंधती गिरीश हसबनीस (वय २९, रा. नऱ्हेगाव) या दुचाकीस्वार विवाहितेचा मृत्यू झाला. अरुंधती एका सार्वजनिक बँकेत नोकरीस होत्या. त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याच्या संशयावरून कॉसमॉस बँकेचे मानद अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, धडक दिली नसल्याचा दावा अभ्यंकर यांच्याकडून करण्यात येत असल्याने डेक्कन पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील 'सीसीटीव्ही' फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. अपघातानंतर भांडारकर रोडवरील स्थानिकांनी अभ्यंकर यांनी अपघात केल्याचा दावा करून त्यांना पोलिसांच्या हवाली केले होते.

या प्रकरणी विक्रम सुशील धूत (वय ३५, रा. शिवाजीनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अरुंधती या पंजाब नॅशनल बँकेत नोकरीस होत्या. त्या नऱ्हे येथे राहत होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्या भांडारकर रोडवर आल्या होत्या. भांडारकर रोडने गुडलक चौकाच्या दिशेने येत असताना साने डेअरीजवळ त्यांच्या दुचाकीला कारची धडक बसली, त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. डोक्यावर हेल्मेट असतानाही त्यांच्या डोक्याला जखम झाली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. स्थानिकांनी लगेचच त्यांना नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ विक्रेत्यांचा बंद सुरूच

$
0
0

महात्मा फुले मंडई, कोथरूड, हडपसरमध्ये शुकशुकाट

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आडत देण्याला विरोध दर्शविण्यासाठी पुण्यासह पिंपरी-चिंचवड, कोथरुड, हडपसर येथील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे ग्राहकांची गैरसोय झाली. मंडई बंद असल्याने तेथे शुकशुकाट पसरला होता. दरम्यान, बेमुदत बंद सुरूच ठेवण्याचा निर्धार किरकोळ विक्रेत्यांनी रविवारी सायंकाळी केला.
आडत देण्याच्या मुद्यांवरून किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी रविवारी अचानक संप पुकारला. त्या संपाची शेतकऱ्यांसह ग्राहकांना माहिती नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शहरातील शुक्रवार पेठेतील भाजीपाला विक्रीचे ठिकाण असलेल्या महात्मा फुले मंडईत सकाळपासून शुकशुकाट होता. बाजार बंद असल्याने खरेदीच्या मूडमध्ये आलेल्या ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले. तीच परिस्थिती कोथरूड सुतार मार्केट तसेच हडपसरच्या जवाहरलाल नेहरू मार्केटमध्ये दिसून आली. सर्वत्र शुकशुकाट होता. बंदमध्ये महात्मा फुले मंडई, कोथरूड, हडपसर, खडकी, दापोडी, आकुर्डी, पिंपरी-चिंचवडमधील सुमारे पाच हजार भाजीपाला विक्रेते सहभागी झाले होते. विविध ठिकाणच्या बहुतांश व्यापाऱ्यांनी बंदचा फायदा घेऊन मार्केट यार्डात दर रविवारी मोठ्या प्रमाणात होणारी खरेदीच थांबविली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
आडत देण्याच्या मुद्यांवरून बंद पुकारलेल्या किरकोळ विक्रेत्यांशी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाने संवाद साधला. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. अखेर किरकोळ विक्रेत्यांनी बंद कायमच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, व्यापाऱ्यांना आडत देण्यास आमचा विरोध कायम राहील. यापुढे आडत देणार नाही. यापुढे शेतकऱ्यांकडून थेट शेतीमालाची खरेदी करण्यास आम्ही तयार आहोत. आम्हाला आडत परवडत नाही. ती रद्द केल्याशिवाय खरेदी करणार नाही. खरेदीदारांकडून आडत घेणार नाही असे बाजार समितीने लेखी द्यावे,' अशी भूमिका खरेदीरांनी घेतली. त्यामुळे ही बैठक निर्णयाविनाच संपली.
..
खरेदीदारांकडून आडत वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे खरेदीदारांकडून ती वसूल करणार नाही, असे लेखी देण्याचा अधिकार बाजार समिती प्रशासनाला नाही. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. शेतकऱ्यांनी सोमवारी बाजारात माल विक्रीसाठी आणावा. बाजार समिती पणन मंडळाच्या मदतीने शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्था करण्यात येईल.
-दिलीप खैरे, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड वर्षातील दुसरा अपघात

$
0
0

पहिल्या अपघातानंतर कामावर परतल्या होत्या श्रीमती हसबनीस

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भांडारकर रोडवर रविवारी दुपारी अपघातात जीव गमवावा लागलेल्या अरुंधती गिरीश हसबनीस (वय २९, रा. नऱ्हेगाव) यांना दीड वर्षांपूर्वी नऱ्हे परिसरात अशाच अपघाताला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना अनेक दिवस घरीच राहावे लागले होते. काही महिन्यांपूर्वीच पूर्णपणे बऱ्या होऊन त्यांनी दैनंदिन काम सुरू केले होते.
हसबनीस या नऱ्हे येथे राहात होत्या. त्या ​रविवारी दुपारी भांडारकर रोडवर मैत्रिणीला भेटण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या गुडलक चौकाच्या दिशेने जात असताना त्यांना कारची धडक बसली आणि रस्त्यावर पडून जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हसबनीस यांना दीड वर्षांपूर्वी अपघाताला सामोरे जावा लागले होते. यावेळी त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्यामुळे त्यांना घरीच राहावे लागले होते. त्या नुकत्याच पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या आणि त्यांनी आपले दैंनदिन कामकाज सुरू केले होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
हा अपघात झाला त्यावेळी त्याठिकाणी कौस्तुभ तांबळे मोबाइलवर काम करत होते. अचानक मोठा आवाज झाल्याने त्यांनी पाहिले असता एका महिलेला दुचाकीवरून पडल्याचे पाहिले. 'त्याचवेळी तेथून लाल रंगाची कार जाताना मी पाहिली. या घटनेची माहिती मी पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच तेथे अॅम्बुलन्सही दाखल झाली. या महिलेला घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. तेथेच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले,'असे तांबळे यांनी सांगितले. दरम्यान, पोलिस कर्मचारी मोहन मालगुंडे हे घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांनी कार चालकाला थांबवले होते. या कार चालकाला ताब्यात घेऊन त्यांना प्रभात रोड पोलिस चौकीत आणले.
..
'माझ्याकडून अपघात झाला नाही'
अभ्यंकर यांनी त्यांच्याकडून अपघात झाला नसल्याचा दावा केला. 'मी माझे काम संपवून कारमधून २० किमी प्रतितास वेगाने पत्नीसह पीवायसीकडून सिम्बायोसिसच्या दिशेने जात होतो. माझ्या गाडीचा कोणालाही धक्का लागला नाही. मी पुढे गेल्यानंतर एका व्यक्तीने मला अपघात झाला आहे, तुम्ही का जाता, असे सांगितले. त्यामुळे मी गाडी वळवून उलट दिशेने आलो. संबंधित महिला विरुद्ध दिशेने सिम्बायोसिसकडून पीवायसीकडे जात होती. तिचा अपघात आधीच झालेला होता. माझी कोणतीही चूक नसताना काहींनी मला पोलिस चौकीत आणले. मी अपघात केलेला नाही, हे सीसीटीव्ही फूटेजमधूनही सिद्ध होईल, अशी माहिती अभ्यंकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व राजकीय पक्षांची पालकमंत्र्यांवर टीका

$
0
0

पाणीकपातीतून दिलासा देण्याची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अवघ्या १५ दिवसांत धरणे ५० टक्के भरल्याने गेल्या ११ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सहन करणाऱ्या पुणेकरांना दिलासा मिळालाच पाहिजे, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्थांनीही पाण्याबाबत सहकार्य करणाऱ्या पुणेकरांचे 'पालक व्हा; मालक होऊ नका,' अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी पाणीकपात रद्द करण्याची भूमिका घेतली. तत्पूर्वी, धरणांतून पाणी सोडण्यात आल्यावर लगेच काँग्रेसनेही पुणेकरांवरील पाणीकपात रद्द करून पूर्वीप्रमाणे सुरळीत पाणीपुरवठा सुरू करा, अशी मागणी केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांनीही पुणेकरांची बाजू उचलून धरली असून, धरणांत पाणी असेल तर पुणेकरांना रोज पाणी मिळायलाच हवे, असा आग्रह धरला आहे.
पाण्याबाबत पुणेकरांसाठी सकारात्मक निर्णय झाला नाही, तर त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. तर, मनसेनेही पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल, असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या श्रेयवादाच्या लढाईत पुणेकरांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी केला. धरणांत अत्यल्प साठा असताना दीड टीएमसी ग्रामीण भागांसाठी सोडणारे पालकमंत्री बापट १५ टीएमसीहून अधिक साठा असतानाही पुणेकरांची पाणीकपात मागे का घेत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पाणीटंचाईच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा सहन करणाऱ्या पुणेकरांना आता दिलासा देण्याची गरज असून, त्यांना दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जावा, असे पत्र काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांच्यासह माजी नगरसेवक शिवा मंत्री, श्याम मानकर यांनी दिले आहे.
................
स्वयंसेवी संस्थांनीही थोपटले दंड
धरणातून, कालव्यातून पाणी वाहत चालले असूनही नागरिकांवरील कपात कायम ठेवून पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा प्रकार सुरू आहे, अशा शब्दांत शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर टीका केली आहे. धरणातील अत्यल्प साठा असतानाही ग्रामीण भागासाठी पाणी सोडणाऱ्या पालकमंत्र्यांनी पाणीकपात रद्दचा निर्णय घेता येणार नाही असे सांगताना, पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा आरोप सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी केला. तर, महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येनुसार राजकीय पक्षांनी पाण्याचे श्रेय जरूर घ्यावे, अशा उपरोधिक शब्दांत सुराज्य संघर्ष समितीच्या विजय कुंभार यांनी श्रेयवादावर टोला लगावला आहे; पण पुणेकरांना वेठीस धरले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता पाण्यावरून राजकारण

$
0
0

पुणेकरांचा कैवार घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांचा सर्वाधिक 'कळवळा' आम्हांलाच आहे, हे दाखवण्याची जोरदार स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे. त्यातूनच पुणेकरांच्या हक्काच्या पाण्याचेही राजकारण सुरू झाले आहे. पाणीकपात, एकवेळ पाणीपुरवठा, दिवसातून दोनदा पाणी, यावरून राजकीय वातावरण गरम होण्याची ही पहिलीच वेळ नसली, तरी आता त्यातील 'मोहरे' बदलले आहेत. पुणेकरांवरील पाणीसंकट मात्र नजीकच्या काळात दूर होईल का, याबद्दल सर्वचजण साशंक आहेत.
जुलैच्या सुरुवातीला धरणांमध्ये पाणी नाही म्हणून पुणेकरांवरील पाणीकपात वाढवण्याचा विचारात असणाऱ्या शहराच्या कारभाऱ्यांना अवघ्या १५ दिवसांत पुणेकरांना एकवेळ पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आंदोलन करण्याची भाषा करावी लागत आहे. तर, पावसाचा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे असताना, तात्पुरता दिलासा देऊन आगामी निवडणुकीसाठी 'बोनस पॉइंट' मिळविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहे. गेल्या आठवड्यातच धरणे पूर्ण भरल्याशिवाय पाणीकपात रद्द केली जाणार नाही, असा पवित्रा महापौरांनी घेतला होता. परंतु, आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुणेकरांना पाण्यापासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही, हे कारभाऱ्यांनी जाणल्याने कपात रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. दोन वर्षांपूर्वी याच कारभाऱ्यांनी धरणे पूर्ण भरलेली असूनही पुणेकरांची कपात सुरूच ठेवली होती.
धरणातील पाणी ग्रामीण भागातही पुरवले जाते. पाण्याचे योग्य नियोजन केले नाही, तर जूनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होते, हे माहीत असूनही पाणीकपात रद्द करण्याची घाई केली जात असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. सर्व संबंधित घटकांशी चर्चा केल्याशिवाय ही कपात रद्द करणे शक्य होणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी भांडणारेच आत्ता राज्यात सत्तेत आहेत. तरीही, पुण्याच्या पाण्यापेक्षा ग्रामीण भागासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जात असल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे, राजकीय लाभासाठी पाण्याशी खेळ सुरू असल्याची भावना पुणेकरांमध्ये पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीअभावी शेतीमाल पडून

$
0
0

किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी खरेदी थांबविल्याचा फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून आडत घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला किरकोळ खरेदीदारांनी विरोध दर्शविण्यासाठी रविवारी मार्केट यार्डातील फळभाज्यांच्या खरेदीवर बहिष्कार टाकला. अचानक खरेदी थांबविल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. कोथिंबिरीसह मेथीच्या गड्ड्या रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. बहुतांश फळभाज्या विक्रीअभावी पडून होत्या.
फळभाज्या नियमन मुक्तीचा तोडगा सोडविताना सरकारने शेतकऱ्यांकडून आडत वसूल करायची नाही असा निर्णय घेतला होता. त्या ऐवजी खरेदीदारांकडून आडत वसूल करण्यात यावी, असा आदेश काढण्यात आला. त्या आदेशाची अंमलबजावणी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सुरू केली. सहा टक्के आडत घेण्याचे स्पष्ट आदेश यापूर्वीच दिले असतानाही व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने आडत वसूल केली. त्यामुळे खरेदीदारांनी आडत देण्यास विरोध दर्शविला. परिणामी, पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी अचानक बंद पुकारला.
मार्केट यार्डात रविवार बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल आणला होता. कोथिंबिरीच्या दोन लाख तर मेथीच्या दीड लाख गड्ड्यांची आवक झाली. परंतु, शहराच्या विविध भागातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी मार्केट यार्डात येऊन खरेदीच केली नाही. त्याशिवाय भाज्या खरेदी करणाऱ्या इतरांना दमदाटी तसेच रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून रविवारी सकाळीच बाजारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी किरकोळ व्यापारी, शेतकऱ्यांमध्ये घोषणाबाजीसुद्धा झाली. अनेक किरकोळ विक्रेते इतर खरेदीदारांना खरेदी करू देत नव्हते. त्यावेळी बाजार समिती प्रशासकीय मंडळ सकाळपासून बाजार आवारात हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांना पाचारण करून अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांच्या विविध गटांना देखील किरकोळ व्यापाऱ्यांकडून धमकविण्याचा प्रकारही घडला. शेतीमालाची खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
'किरकोळ विक्रेत्यांनी बंद पुकारणार असल्याचे शनिवारी सायंकाळी पत्र दिले होते. त्यासंदर्भात त्यांना चर्चेसाठी बोलविले होते. परंतु, त्यांनी संपर्क केला नाही. शहरासह बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना खरेदी करण्यास मज्जाव केला. त्यासंदर्भात किरकोळ विक्रेत्यांना समजविण्याचा वेळप्रसंगी हटकण्याचा प्रयत्न केला. काही व्यापारी इतरांना खरेदी करण्यात अडवणूक करीत होते. त्यावेळी काहींना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर किरकोळ व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. अखेर काही तासानंतर पुन्हा बाजार सुरू करण्यात यश आले,' अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी दिली.
..
किरकोळ विक्रेत्यांचा बंद मागे
मार्केट यार्डातील किरकोळ विक्रेत्यांनी देखील बंद पुकारला होता. त्यांचे गाळे पुन्हा ताब्यात घेण्याचा सज्जड दम दिल्यानंतर त्यांनी खरेदी-विक्री सुरू केली. उर्वरित माल विक्रीसाठी पणन मंडळाशी संपर्क साधून व्यवस्था करण्यात आल्याचे खैरे यांनी सांगितले. या वेळी उपसभापती भूषण तुपे, एकनाथ टिळे तसेच अन्य संचालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सर्पदर्शनात झाली वाढ

$
0
0

पंधरा दिवसांमध्ये अडीचशेहून अधिक साप मानवी वस्तीत दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसामुळे अडगळीच्या जागांमध्ये लपलेले साप बाहेर पडत असल्याने मानवी वस्तीत सर्पदर्शनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहराच्या विविध भागातून सर्पमित्रांनी अडीचशेहून अधिक सापांना निसर्गात सोडले आहेत.
'वस्तीत साप दिल्यावर मारून टाकण्याऐवजी सर्पमित्रांना संपर्क साधणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोक साप दिसल्यावर लगेच आम्हाला फोन करतात. पावसाळ्यात वस्त्यांमधून जास्त फोन येतात. गेल्या वर्षी पाऊसच कमी झाला; त्यामुळे आम्हाला फोन कमी आले. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून रोज सतरा ते अठरा फोन येत आहेत,' अशी माहिती 'वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन'चे रवी लोहिरे यांनी दिली. आतापर्यंत पकडलेल्या सापांमध्ये नागाची पिल्ले, घोणस, मण्यारचे प्रमाण जास्त आहे. तीन दिवसांपूर्वीच भोसरी येथील सदगुरू नगरमधून आमच्या स्वयंसेवकांनी घोणस या विषारी सापाची ३७ पिल्ले ताब्यात घेतली. याशिवाय वाकड, औंध, भोसरी, रावेत, विश्रांतवाडी, शिवाजीनगर या भागातूनही आम्हाला जास्त फोन येत आहेत. दररोज पंधरा-सोळा साप घरात ठेवणे शक्य नसल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना निसर्गात सोडत आहोत, असेही लोहिरे म्हणाले.
'मध्यवर्ती पुणे आणि उपनगरांतून गेल्या महिनाभरापासून नागरिकांचे सातत्याने फोन येत आहेत. यात दिवसाला किमान पाच फोन हे साप घरात अथवा वस्तीत आल्याचे असतात. तर, काही फोन जखमी अवस्थेत असलेल्या पक्ष्याला वाचविण्यासाठी येतात. पावसाने वेग घेतल्यास पुढील दोन महिन्यात भरवस्तीत साप दिसण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे,' अशी माहिती सर्पमित्र अनिल अवचिते यांनी सांगितले. राम भूतकर म्हणाले, 'एप्रिल, मे हा काळ सापांच्या मिलनाचा असतो. साधारणतः जुलैमध्ये पिल्लांचा जन्म होतो. घोणससह इतर काही सापांना एकावेळी नव्वद ते शंभर पिल्ले होतात. अडगळीच्या ठिकाणी एकावेळी सगळी पिल्ले ओलसर जागेत राहू शकत नाहीत. त्यांना कोरडी जागा आवश्यक असल्याने ते बाहेर पडतात, तर काही अन्नाच्या शोधात फिरतात. सर्पमित्रांनी पकडलेल्या सापांना शहरापासून दूर सोडणे टाळले पाहिजे. साप हा हद्द ठरवून राहणारा प्राणी आहे. वेगळ्या अधिवासाशी जुळवून घेताला त्याला झगडावे लागते. मुख्यतः बिनविषारी सापांच्या बाबतीत निर्जन ठिकाणी सोडणे शक्य आहे. प्रत्येक वेळी जंगलात सोडून त्यांना मूळ अधिवासापासून दूर नेणे अयोग्य आहे,' असेही भूतकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंचावरील ‘शांतते’ला मिळाली दाद

$
0
0

'मौनांतर'चा पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सध्याच्या गजबजाटाच्या आणि कोलाहलाच्या जगात मंचावरील शांतता ऐकून मला फार छान वाटले. त्यातूनही माझ्यापर्यंत फार सुंदर नाट्य पोहोचत होते. साचेबद्ध एकांकिका स्पर्धांमध्ये मूकनाट्य सादरीकरणातून आपल्या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या या स्पर्धेचे आणि सादरकर्त्यांचे मनापासून कौतुक!' असे गौरवोद्‍‍गार पटकथालेखक आणि गीतकार क्षितिज पटवर्धन याने काढले आणि विजेत्यांना प्रोत्साहन दिले.
'मौनांतर' या मूकनाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी भरत नाट्य मंदिर येथे पार पडला. ड्रीम्स टू रिअॅलिटी, वाइड विंग्ज मीडिया आणि रंगीत तालीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणादरम्यान क्षितिजबरोबरच आगामी 'वाय झेड' या सिनेमाचा दिग्दर्शक समीर विद्वांस आणि निर्माता अनीष जोगही उपस्थित होते.
पुण्यातील पहिली मूकनाट्य स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या तिसऱ्या वर्षीचे विजेते ठरले 'व्यक्ती', पुणेचे 'घनदाट'! त्यांनी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्राव्होचे 'चॅम्पियन' हे गाणे गातच करंडक उंचावला. पीव्हीजी सीओईटीच्या 'खिचीक्'ला द्वितीय, तर 'संवर्धन, पुणे'च्या 'संगत'ला तृतीय पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट नेपथ्याचे पारितोषिक अमेय महाजनला, प्रकाश योजनेचे ओंकार हजारेला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे अपूर्वा भिलारेला आणि सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक प्रत्यक्षातही मूकबधीर असलेल्या शिवशंकर गवळी यांना मिळाले. प्रतीक कार्यकर्ते आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनाही उत्तेजनार्थ अभिनयासाठी विभागून पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण अभिनेते गिरीश परदेशी आणि अभिनेत्री देविका दफ्तरदार यांनी केले. या वेळी प्रकाशयोजनाकार प्रदीप वैद्य, 'वाइड विंग्ज मीडिया'चे राजेंद्र मनोहर, 'एलान एंटरटेन्मेंट'चे प्रथमेश इनामदार, 'माय थिएटर कॅफे'चे सुनील चांदोरकर आणि 'कैलासजीवन'चे परेश कोल्हटकरही उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन भैरवी देशमुखने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन फसवणुकीत वाढ

$
0
0

दोन दिवसांमध्ये तीन गुन्हे दाखल; पाऊण लाखांना गंडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या नावाखाली बँकेतून बोलत असल्याच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे पोलिसांनी दोन दिवसांत असे तीन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी संबंधितांना पाऊण लाख रुपयांना टोपी घातल्याचे उघडकीस आले आहे. एकीकडे ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी वाढत असून, त्यांच्या तपासासाठी वेळ लागत असल्याने चोरट्यांचे फावत आहे.
कोथरूड पोलिस ठाण्यात सुमेधा नाईक (वय ५०, रा. कोथरूड) यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अजित कुमार या मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने नाईक यांचा ई-मेल हॅक केला आणि त्यावरून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना मेल पाठवला. नाईक या परदेशात असून, त्यांना पैशांची अडचण असल्याचे मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. नाईक यांच्या ई-मेलवरून आलेला मेल पाहून त्यांच्या ओळखीचे नितीन शहा यांनी मेलमध्ये दिलेल्या बँक खात्यात ३३ हजार ७१२ रुपये भरले. शहा यांनी घडलेला प्रकार नाईक यांना कथन केल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार एप्रिल महिन्यात घडला.
अन्य एका घटनेत सरकारी बँकेतून बोलत असल्याच्या बहाण्याने रोहितराजे पवार (वय ३९, रा. जगताप चौक, वानवडी) यांची १५ हजार ५९४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. पवार यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक करण्यात आली. तिसऱ्या घटनेत, ज्योती पांगारे यांना फसवण्यात आले आहे. पांगारे यांना आरोपींनी फोन करून तुम्ही एटीएम कार्ड वापरत नसल्याने तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर हस्तांतर होत असल्याचे सांगितले. या बहाण्याने आरोपींनी पांगारे यांच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवली आणि २६ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरात ऑनलाइन व्यवहारांमधून फसवण्याचे प्रकार वाढत आहेत. या पूर्वी घडलेल्या अनेक गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिसांनी दिल्लीतील ठकसेनांच्या सहा टोळ्या गजाआड केल्या असल्या तरी, अद्याप हे गुन्हे रोखता आलेले नाहीत.
..
नागरिकांनी कोणालाही बँक खात्यांची माहिती, डेबिट अथवा क्रेडिट कार्डविषयी सांगू नये. आरोपींकडून ओटीपी क्रमांकाची विचारणा केल्यास तो देऊ नये. कोणत्याही बँकेतून खातेधारकांना गोपनीय माहिती विचारली जात नाही. नागरिकांनी सावधानता बाळगली तर फसवणुकीचे गुन्हे टाळता येऊ शकतील.
दीपक साकोरे, उपायुक्त, सायबर शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या अध्यायाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्याराज्यांमध्ये निर्माण होत असलेली धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. संत नामदेव यांच्या नावाने पंजाबमध्ये कॉलेज सुरू करून पंजाब आणि महाराष्ट्रातील लोकांना जोडणारा एक नवा अध्याय पंजाब सरकारने सुरू केला आहे,' असे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी रविवारी केले.

घुमान येथे सुरू करण्यात आलेल्या बाबा नामदेवजी कॉलेजचे व भक्तनिवासाचे उद्‍‍घाटन प्रकाशसिंग बादल, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सरहदचे संजय नहार, सुनील महाजन; तसेच पंजाब राज्यातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

बादल म्हणाले, 'सध्याच्या वातावरणात देशभरात जातीय ऐक्य आणि बंधुभाव प्रस्थापित करणे गरजेचे आहे. पवित्र गुरू ग्रंथ साहिब मध्ये हीच शिकवण देण्यात आली आहे. जी देशासाठी प्रेरणादायक आहे. संत नामदेव यांच्या नावाने पंजाबमध्ये कॉलेज सुरू करून पंजाब आणि महाराष्ट्रातील लोकांना जोडणारा एक नवा अध्याय पंजाब सरकारने सुरू केला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत शहीद भगतसिंग आणि त्यांचे साथीदार सुखदेव आणि राजगुरू यांनी बलिदान दिले होते. भगतसिंग आणि राजगुरू यांच्या मैत्रीमुळे पंजाब आणि महाराष्ट्रात तेव्हापासून एक नाते तयार झाले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांनी पंजाब सरकार ते नाते दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. संत नामदेव यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील १९ वर्षे घुमानमध्ये वास्तव्य केले. त्यांनी मानवतेचा संदेश येथील नागरिकांना दिला. सर्वांना समान वागणूक मिळावी, अशी शिकवण त्यांच्याकडून पंजाबी नागरिकांनी घेतली. गुरू गोविंदसिंगांनी त्यांच्या आयुष्याची काही वर्षे महाराष्ट्रात नांदेड येथे वास्तव्य केले असल्यामुळे पंजाब आणि महाराष्ट्राचे संबंध अनेक शतकांपासून दृढ होत गेले आहेत. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पर्यटकांनी संत नामदेव विद्यापीठाला भेट द्यावी. पंजाब सरकार त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करील.'

सुरेश प्रभू म्हणाले, 'संत नामदेव यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या विद्यापीठामुळे पंजाब आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक वारशाची देवाणघेवाण होण्यास मदत होणार आहे. एकात्मता आणि बंधुता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम पंजाब सरकारने पूर्णत्वास नेला आहे.'



शरद पवार म्हणाले, 'प्रकाशसिंग बादल यांची 'मॅन ऑफ अॅक्शन' ही ओळख त्यांनी खरी करून दाखवली. घुमान संमेलनात त्यांनी विद्यापीठाची घोषणा केली होती. त्यानंतर केवळ एका वर्षात त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.'

घुमान येथील संत नामदेव विद्यापीठामध्ये आर्ट, कॉमर्स आणि सायन्सचे शिक्षण दिले जाणार असून, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. शासनातर्फे विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना अल्प दरात शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाने घेतला शतकापुढचा वेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भविष्याची भुरळ सगळ्यांनाच पडते. मात्र, औरंगाबादमधील प्रणव जोशी या तरुण लेखकाने अचाट कल्पनाशक्तीच्या जोरावर शंभर वर्षांनंतर पृथ्वीवर काय घडेल, याचा वेध घेणारी एक चित्तथरारक 'साय-फाय' कादंबरी लिहिली आहे. 'बुक हंगामा डॉट कॉम'ने ही कादंबरी ई-बुक स्वरूपात प्रकाशित केली आहे. बाणेर येथील 'पगदंडी बुक चाय कॅफे' येथे हा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या वेळी लेखक प्रणव जोशी, 'बुक हंगामा'चे सह-संस्थापक विक्रम भागवत, अक्षय वाटवे, सोहम सबनीस, केतकी करंदीकर, संगीता कुलकर्णी, पद्मश्री अमिताभ उपस्थित होते.

'मराठीमध्ये तुलनेने साय-फायचे प्रमाण कमी आहे. मात्र, प्रणवने हे आव्हान पेलले आणि समर्थपणे पार पाडले आहे. कादंबरी वाचताना अगदी पहिल्या प्रकरणापासून कादंबरीचा प्रभाव वाचकांवर पडत जातो. तो प्रभाव शेवटपर्यंत कायम राहतो,' असे मत भागवत यांनी व्यक्त केले. 'विज्ञानाची कास धरून माणूस झपाट्याने प्रगती करत आहे. सर्व बाजूंनी विकास करण्याच्या नादात पुढे काय होईल आणि आपल्या महत्त्वाकांक्षेचे परिणाम काय भोगावे लागतील, याची त्याला तिळमात्र कल्पना नाही. अशा वेळी शंभर वर्षानंतर २१२१ साली हे जग काय समस्येला सामोरे जात असेल. जगाचा अंत जवळ आलेला असताना एक शास्त्रज्ञ पृथ्वीवरचा मानवी वंश टिकवण्यासाठी काय प्रयत्न करतो. याचे रोमांचक वर्णन करणारी ही कादंबरी वाचकांना नक्कीच खिळवून ठेवेल,' अशी अपेक्षा प्रणवने व्यक्त केली. ई-बुक स्वरूपात प्रकाशित झालेल्या या कादंबरीतील काही भागाचे अभिवाचन या वेळी करण्यात आले. अक्षय वाटवे, केतकी करंदीकर आणि प्रणव जोशी यांनी केलेल्या अभिवाचनाला उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. प्रणव जोशी हा 'मटा मैफल'च्या कथा स्पर्धेतील विजेता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महापौरांनी मागावी पुणेकरांची माफी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाणी प्रश्‍नावरून पुणेकरांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करणाऱ्या महापौरांनी पुणेकरांची माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी रविवारी केली.

दुष्काळग्रस्त दौंड-इंदापूरमधील नागरिकांना पिण्याचे पाणी सोडण्यासही महापौरांनी विरोध केला होता. त्याचबरोबर पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणातील पाणीपातळी खालावली आणि त्यात नारूचे जंतू आढळल्याचा कांगावा सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महापालिकेच्या मुख्यसभेत केला. त्यामुळे, पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, अशी टीका गोगावले यांनी केली.

गेल्या महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर नागरिकांना दिलासा देण्याचे काम शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांनी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात महापौरांनी खडकवासला प्रकल्पातील पानशेत आणि वरसगाव धरणांची पाहणी करून पाणीसाठा खाली गेला असून, काही दिवसच पुरेल अशी हाकाटी पिटल्याचा आरोप गोगावले यांनी महापौर प्रशांत जगताप यांच्यावर केला.

धरणांत आजमितीस ५० टक्के पाणीसाठा झाला असून, तातडीने पाणीकपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी परस्पर केली. हा निर्णय घेताना पालकमंत्री, जलसंपदा विभाग यांची मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पाणीप्रश्‍नाचे राजकारण करीत असून, याला सर्वस्वी महापौरच जबाबदार असल्याचा आक्षेप गोगावले यांनी नोंदविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images