Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आर्थिक कारणावरूनच दत्तात्रय फुगे यांचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'गोल्डन मॅन' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेले दत्तात्रय फुगे (वय ४७) यांचा खून आर्थिक कारणावरून घडल्याचे समोर आले आहे. फुगे यांचा खासगी सावकारीचा व्यवसाय होता. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या होत्या. मात्र, अनेकांना पैसे दिले नव्हते. या प्रकरणी त्यांच्यावर खडकी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी या चिटफंडाशी संबंधित आहेत. ते पैसे गोळा करण्यास फुगेंना मदत करत होते.

आरोपी विशाल पारखेकडून फुगेंना दीड लाख रुपये येणे होते. त्यावरून एक महिन्यांपूर्वी त्यांच्यात वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी आर्थिक कारणावरून फुगेंचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या प्रकरणी दिघी पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच जणांस अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू आहे, अशी माहिती बारवकर यांनी दिली.

अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे दत्तात्रय फुगे पिंपरीचे 'गोल्डन मॅन' म्हणून ओळखले जात. त्यांनी सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवल्याने एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले होते. सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वादग्रस्त ठरलेल्या फुगे यांना काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी तडीपारीची नोटीसही बजावली होती. मात्र, नंतर तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुगेंच्या हत्येसाठी रचला वाढदिवसाचा बनाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/पिंपरी

सोन्याच्या शर्ट घातल्याने 'गोल्डन मॅन' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेले दत्तात्रय फुगे (वय ४७) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना दिघी परिसरात गुरुवारी रात्री घडली. त्यांच्या २१ वर्षांच्या मुलासमोरच हा निर्घृण खून करण्यात आला. आपल्या पित्यावर झालेला प्राणघातक हल्ला पाहून मुलाने मदतीसाठी आरडाओरडा केला; परंतु अवघ्या काही मिनिटांतच हल्लेखोरांनी त्यांचे शीर दगडाने ठेचले आणि तेथून पळ काढला. चिटफंडमधील पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. फुगेंच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी वाढदिवसाचा बनाव रचला होता.

अमोल ऊर्फ बल्ली कैलास पठारे (वय २४, रा. म्हस्के वस्ती, आळंदी रोड), शैलेश सूर्यकांत वाळके (वय २६, रा. यमाई नगर, दिघी), विशाल दत्ता पारखे (वय ३२, रा. विश्रांतवाडी), निवृत्ती ऊर्फ बाळू किसन वाळके (वय ४५, रा. विठ्ठल मंदिराजवळ दिघी), प्रेम ऊर्फ कक्का ऊर्फ प्रमोद संताराम ढोलपुरीया (वय २३ रा. रामनगर, बोपखेल) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बाबू वाळके व त्याचे इतर साथीदार फरार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त कल्पना बारावकर यांनी दिली. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि फुगे यांचा मुलगा शुभम (वय २१) याने दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी वक्रतुंड चिटफंडशी संबंधित आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल याने शुभमला गुरुवारी रात्री फोन केला आणि वाढदिवस असल्याचा बनाव केला. या वाढदिवसाला दत्ता फुगे यांना आणण्याची गळ घातली. दुसरीकडे फुगे यांना आणण्यासाठी अतुल मोहिते हा त्यांच्या घरी गेला. मोहितेने त्यांना दुचाकीवर बरोबर घेतले आणि भारतमाता नगर येथे नेले. दरम्यानच्या काळात शुभमने वडील फुगे यांना फोनवरून वाढदिवसाबाबतची माहिती दिली होती. भारतमाता नगर येथे आल्यानंतर आरोपींनी फुगे यांच्यावर कोयत्यांनी वार करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना दगडांनीही मारहाण केली. वडिलांच्या शोधात शुभम भारतमाता नगर परिसरात आला. त्याने पानटपरी चालकाकडे चौकशी केली. तेव्हा येथे कोणाचा वाढदिवस नसल्याचे उत्तर मिळाले. त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर शुभमला वडिलांवर हल्ला होत असल्याचे दिसले. शुभमने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागवली. मात्र, तोपर्यंत फुगे यांचा मृत्यू झाला होता. हल्ला करणारे बारा जण असल्याचे शुभमने सांगितले आहे. खुनातील मुख्य सूत्रधार मोहिते पसार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

IS कनेक्शन; पुण्यात पाच विद्यार्थी ताब्यात

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तरुणाला परभणीतून अटक केल्यानंतर आज दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील कोंढवा परिसरात धरपकड केली आहे. आयएसशी संबंध असल्याच्या संशयावरून त्यांनी पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

कौसरबाग परिसरातील अमन व्हिल इमारतीत आखाती देशांमधील काही तरुण राहत होते. एक महिन्यापासून त्यांच्या हालचालींवर स्थानिक पोलीस आणि एटीएस अधिकारी नजर ठेवून होते. बीड परिसरात छापे टाकल्यानंतर, तिथे मिळालेल्या माहितीतून या विद्यार्थ्यांवरील एटीएसचा संशय बळावला. ते आयएसच्या संपर्कात असू शकतात, अशी कुणकुण लागताच अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. आता त्यांच्या चौकशीतून काय समोर येतं, काही धागेदोरे सापडतात का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, आयएसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने परभणी येथे एका २१ वर्षीय तरुणाला परवाच अटक केली आहे. नासेरबिन अबुबकर याफई (चाऊस) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश स्थानिक कोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडांचे नकाशे बनवणार

0
0

करण्याचा राज्य सरकारचा आदेश





म. टा. प्रतिनिधी, पुणे असंरक्षित गडकोट ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून, राज्यभरातील ३९१ गडांचे सातबारे आणि नकाशे करण्याचा आदेश महसूल खात्याला देण्यात आला आहे. दुर्गसंवर्धन समितीनेही राज्यातील पंधरा गड संवर्धनासाठी घेण्याचा निर्णय घेतला असून, गडांवरील तोफांचे जतन करण्यासाठी सुरक्षा योजना बनविण्यात येणार आहेत. गडांचे सातबारे आणि नकाशांचे काम तातडीने व्हावे, यासाठीचा पाठपुरावाही समितीतर्फे केला जाणार आहे. राज्यातील पंधरा किल्ले संवर्धनासाठी प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात येणार आहेत. समितीचे सदस्य या गडांची पाहणी करून त्याचा आराखडा तयार करणार आहेत. या पंधरा गडांमध्ये कोराईगड, पूर्णगड, बाणकोट, उंदेरी, यशवंतगड, रांगणा, विशालगड, अंकाई, टंकाई, साल्हेर, मुल्हेर, बैतुलवाडी, लळींग, भरतगड, पाथरी आदी गडांचा समावेश आहे. गडांवरील तोफा चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील गडकोटांवरील तोफांसाठी सुरक्षायोजना बनविण्यात येत आहेत. गडांवरील तोफांची सुयोग्य मांडणी केली जाणार आहे. छायाचित्रांचा संग्रह करून त्यांची नोंदणी व पाठपुरावा घेतला जाणार आहे. समितीचे सदस्य डॉ. सचिन जोशी यांनी गडांवरील तोफांच्या छायाचित्रांचे संकलन केले आहे. ही छायाचित्रे आणि रेखांकने पुरातत्त्व खात्याकडे देण्यात येणार आहेत. पुण्यातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या सिंहगड आणि राजगड या गडांवरील स्वच्छतागृहांची डागडुजी तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत त्यांची नियमित स्वच्छता ठेवली जाणार असल्याचा निर्णय समितीच्या नुकत्याच पुण्यात झालेल्या बैठकीत झाल्याचे समितीचे सदस्य चंद्रशेखर शेळके यांनी सांगितले. सांस्कृतिक खात्याच्या पुणे विभागाच्या सदस्य सचिव अमिता तळेकर, पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक विलास वाहणे, समितीचे मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे, समन्वयक मिलिंद लेले, सदस्य प्र. के. घाणेकर, डॉ. सचिन जोशी, हृषीकेश यादव, राजेंद्र टिपरे, भगवान चिले, प्रमोद पाटील, डॉ. अमर आडके, चंद्रकांत अभंग, मृदुला माने, अवधूत पै आणि सांस्कृतिक खात्याच्या अधिक्षक संयोगिता पाटील आदींच्या उपस्थितीत हे निर्णय घेण्यात आले. महसूल खात्याकडून गडांचे नकाशे आणि सातबारे बनविण्याबाबत यापूर्वी दिरंगाई झाली, यापुढे ती होऊ नये याचा पाठपुरावा समिती करणार आहे. गडकोटांवरील पाण्याचे ठाव स्वच्छ करण्याचे काम जलयुक्त शिवार योजनेतून करणार असल्याचेही ते म्हणाले.

गडांच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यापूर्वी रेखांकनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तज्ज्ञ सल्लागार समिती नेमण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती वाहणे यांनी दिली.

पाठवा वास्तू, तोफांची छायाचित्रे गडकोटांच्या संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहे. काही गडांवरील वास्तू नामशेष झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. गडकोटांवरील अशा वास्तू, तोफा व इतर अवशेषांची छायाचित्रे दुर्गसंवर्धन समितीकडे gadkillesamiti@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावीत, असे आवाहन समितीने केले आहे. या छायाचित्रांचा संदर्भ संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीला अध्यक्ष मिळाल्यावरच बस खरेदी

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्षपद रिक्त असल्याने प्रस्तावित असलेल्या नवीन बस खरेदीच्या प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, पीएमपीच्या गेल्या काही बस खरेदीत झालेला गोंधळ पाहता नवीन अध्यक्ष नेमल्याशिवाय खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येऊ नये, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली. शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पीएमपीने १५५० बसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पाचशे बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमधून, पाचशे बस विविध संस्थांकडून कर्ज घेऊन, तर उर्वरित साडेपाचशे बस राज्य सरकारच्या 'असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग' (एएसआरटीयू) या संस्थेकडून भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय झाल्यानंतर काहीच दिवसांत पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची बदली झाली. त्यामुळे आता नवीन अध्यक्ष मिळेपर्यंत बस खरेदीची प्रक्रिया थांबणार का, किंवा अध्यक्षाविनाच खरेदीची प्रक्रिया सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणेशोत्सवापर्यंत ताफ्यात त्या बस दाखल करण्याचे ध्येय पीएमपी प्रशासनाने ठेवले आहे. त्यामुळे पीएमपीकडे आता केवळ ५० दिवस राहिले आहेत. त्यामुळे बस खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी लागणार आहे. बस खरेदी करताना राज्यातील किंवा बेंगळुरू सारख्या शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी कोणत्या बस वापरल्या जातात, त्या बस कोठून, किती रुपयांना खरेदी केल्यात, याचा सर्व्हे करूनच मग पीएमपीने बस खरेदी करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे. आणि बस खरेदी करताना मार्केट सर्व्हे करणे अपेक्षितही आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनापुढे ५० दिवसांत ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान राहणार आहे. त्यातच निर्णय घेणारी व्यक्ती उपलब्ध नाही, हे आणखी एक आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोतेवारांच्या पत्नीच्या दागिन्यांची चोरी उघड

0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी उद्योगपती महेश मोतेवार यांची पत्नी लिना यांनी त्यांच्या वाहनचालकाकडे ठेवलेल्या चार किलो सोन्याची चोरी झाल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी वाकड येथे चोरी करणाऱ्या टोळीला अटक केले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये या चोरीची माहिती मिळाली. मोतेवार यांनी या चोरीची तक्रार पोलिसांमध्ये केली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगपती महेश मोतेवार यांनी गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. मोतेवार यांना अटक होताच त्यांच्या पत्नीने तिच्याकडे असलेले आठ किलो सोने त्यांचा समृद्धी जीवन को-आॅप सोसायटी या कंपनीमध्ये आॅफिस स्टाफला ने-आण करणारा वाहनचालक नरहरी घरत (रा. वाल्हेकरवाडी) याच्याकडे लपवून ठेवण्यासाठी दिले होते. घरत याने हे सोने दोन डब्यांमध्ये चार-चार किलो असे विभागून ठेवले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी चालक घरत याने चोरट्यांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी मारून घरातील चार किलो सोने चोरून नेल्याचे मोतेवार यांच्या पत्नी लिना यांना सांगितले होते. मात्र, 'ही चोरी तूच केली आहे,' असा आरोप करून, मोतेवार यांच्या पत्नीने वाहनचालक घरत याला मारहाण केली होती. परंतु, या घटनेची माहिती कोणाला होऊ नये, यासाठी घरत याला गावाला पाठविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी युनिट चारच्या पोलिस पथकाने वाकड येथून चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे तपास केला असताना आरोपींनी मोतेवार यांच्या चालकाच्या घरातून चार किलो सोने चोरल्याची कबुली दिली. त्यातील एक किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचा निर्णय इथेच

0
0

आघाडीचा निर्णय इथेच

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यात येईल,' अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडीबाबत कार्यकर्त्यांच्या संमिश्र भावना असून, अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित पक्षाच्या बैठकीस माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, विश्वजित कदम आदी उपस्थित होते. काँग्रेस भवनातील सोशल मीडिया सेलचे उद‍्घाटन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आघाडीबाबतचा निर्णय प्रदेश पातळीवर होणार नसल्याचे स्पष्ट केले.
'आगामी निवडणुकांच्या प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेपाच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या. त्याचा फायदा सत्ताधारी सेना-भाजपला होण्यासाठी काम सुरू आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर गरज पडल्यास या विरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल,' असेही चव्हाण यांनी सांगितले.

राज्यात 'ट्विटर वॉर'
'राज्य सरकारवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजिबात अंकुश नाही. खातेवाटपानंतर पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट आणि त्याला फडणवीस यांनी दिलेले उत्तर पाहता राज्यात ट्विटर वॉर सुरू असल्याचे चित्र आहे. त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून 'इफेक्टिव्ह' काम सुरू आहे,' अशी टीका चव्हाण यांनी केली; तसेच मंत्रिमंडळ विस्तारातही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना स्थान मिळाले असल्याचेही ते म्हणाले.

दुष्काळ ते तूर डाळ... अपयशच
मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही निर्णयाला केंद्र सरकार प्रतिसाद देत नाही, तर रिझर्व्ह बँक ऐकत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही. तूर डाळीचा भाव २०० रुपयांवर पोहोचला होता. काँग्रेसने मागणी केल्यानंतरच आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेनुसार तूर डाळीचा विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याचे पालकत्व आता ‘बाबां’कडे

0
0

पुण्याचे पालकत्व आता 'बाबां'कडे

पुणे : गेला काही काळ प्रदेश नेत्यांकडून काहीशा दुर्लक्षित असलेल्या शहर व जिल्हा काँग्रेसचे पालकत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी ही माहिती दिली. मतभेद मिटवून महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकदिलाने कामाला लागा, अशी सूचना चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर शहर काँग्रेसची फेररचना झाली असली, तरी प्रदेशाकडून शहराची जबाबदारी कोणावर, याबाबत संभ्रम होता. त्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्याकडे शहर व जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले.
दरम्यान, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबतही कार्यकर्त्यांनी बैठकीत भावना व्यक्त केल्या. काही जणांनी स्वबळावर लढण्याचे आवाहन केले, तर चार सदस्यांचा प्रभाग असल्याने आघाडी करावी, असाही सूर काही जणांनी लावला. आघाडी झाल्यास ज्या पक्षाचे प्राबल्य असेल, त्या पक्षाचे चारपैकी तीन उमेदवार असावेत, अशीही सूचना काही जणांनी केली. ब्लॉक अध्यक्षांनी या वेळी पक्षाचे नगरसेवक विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी चव्हाण यांच्याकडे केल्या. या बैठकीतही गटबाजी उफाळून येऊ लागल्याने अखेर अन्य विषय काढू नका, निवडणुकीबाबत बोला, अशी सूचना वरिष्ठांनी केली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पिंपरीला खंबीर नेतृत्वाची गरज’

0
0

'पिंपरीला खंबीर नेतृत्वाची गरज'

पिंपरी ः पिंपरी-चिंचवडसाठी प्रदेश पातळीवरून खंबीर नेतृत्व मिळण्यास आतापर्यंत दुर्लक्षच झाले. आता तरी श्रेष्ठींनी लक्ष द्यावे, असा सूर काँग्रेसच्या बैठकीत शनिवारी उमटला.
महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षनिरीक्षक चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार अशोक मोहोळ, नाना नवले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत छाजेड, प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन, शहराध्यक्ष सचिन साठे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, पालिकेतील विरोधी पक्षनेते राहुल भोसले, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, सचिव अलका राठोड, महिला शहराध्यक्षा ज्योती भारती या वेळी उपस्थित होत्या.
प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर शहर काँग्रेसला खंबीर वाली मिळालेला नाही, याचा शहरातील कार्यकर्त्यांनी पुनरूच्चार केला. पक्षश्रेष्ठी त्यांच्या जिल्ह्यांपुरताच विचार करतात. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पक्षाला गळती लागली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणातरी एका श्रेष्ठींकडे शहराची जबाबदारी सोपवावी. कार्यकर्त्यांना पाठबळ मिळणे गरजेचे आहे, अशा व्यथा मांडण्यात आल्या.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित, तुझी सात्विक मूर्ती उजळत राहो...

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अजित, तुझे विद्वत्ताप्रचुर भाषण ऐकून मला गहिवरून आले. आजकाल तू इतरांनाही शब्द जपून वापरण्याचा सल्ला देतोय, आजकाल तुझा अध्यात्माकडील कल वाढलेला दिसतोय. तुझी ही सात्विक मूर्ती अशीच दिवसेंदिवस उजळत राहो,' अशा मार्मिक शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिप्पणी केली आणि एकच हशा पिकला.

निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित गुरुजन सत्कार समारंभाचे. या समारंभात गुरुजन नानांचा अजितदादांनी सत्कार केला. पवारांनी आपल्या खास शैलीत नानांचा गुणगौरव केला. त्यानंतर आपल्या खुमासदार भाषणात नानांनी चौफेर टोलेबाजी करीत अजित पवारांना चिमटे काढले. आमदार दिलीप सोपल यांच्या भाषणाच्या संदर्भाने पवार यांना नाना म्हणाले, 'आजच्या तुझ्या भाषणाने मी गहिवरून गेलो. भाषण काही वेगळेच होते. अलीकडे तू अध्यात्माकडे वळतो आहेस की काय असे वाटले. त्यामुळे आज तुझे गुरू असलेल्या शरद पवारांची गैरहजेरी जाणवली नाही.' 'अजित माझा चांगला मित्र आहे, पण मी त्याला काही मागणार नाही; अर्थात मी काही मागितल्यावर तो नाही म्हणणारही नाही,' असे सांगतानाच मला जमिनींची गरज नाही, माझा सातबारा माणसांचा आहे, असा टोलाही नाना पाटेकर यांनी हाणला. भाषणादरम्यान एका वेळी अजित पवारांचे लक्ष नाही, असे जाणवताच नानांनी त्यांचे लक्ष वेधले. तेव्हा पवारांनी केलेल्या स्मितहास्यामुळे 'आज पहिल्यांदाच तुझ्या चेहऱ्यावर लाली पाहिली. तुझी ही सात्विक मूर्ती दिवसेंदिवस अधिक उजळत राहो,' असा आशीर्वाद देत नानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

'धरणांत खूप पाणी'

पुणेकरांना आता दररोज पाणी द्या, अशी सूचना अजित पवार यांनी महापौरांना केली होती. त्याचा संदर्भ घेत, 'आपल्या धरणांत खूप पाणी आहे, शहराला दोन वेळ पाणी मिळावे, ही तुझी मागणी पूर्ण झालीच पाहिजे,' असा बाऊन्सर नाना पाटेकर यांनी टाकल्यावर अवघे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

सरकारपेक्षा 'नाम'वर विश्वास

मी आज विरोधी पक्षात आहे म्हणून बोलत नाही. पण कोणाचेही सरकार आले, तरी लोकांचा सरकारवर विश्वास नाही, नाम फाउंडेशनवर मात्र लोकांचा विश्वास आहे, हे राज्याने पाहिले आहे. नानांवर असलेल्या विश्वासाचीच ही पावती आहे, असेही अजित पवार म्हणाले. नाना पाटेकर यांचा स्पष्टवक्तेपणा, खंबीरपणा, सामाजिक कार्याची आवड अशा विविध पैलूंचाही पवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चोवीस बाय सात’ला मंजुरी

0
0

'चोवीस बाय सात'ला मंजुरी

पुणे ः शहरात चोवीस बाय सात या पद्धतीने समान पाणीवाटप करता यावे, यासाठी महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, केंद्राने मंजुरी दिल्यानंतर शहरात ही योजना राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकांबरोबर कर्जाबाबत बोलणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी सांगितले.
शहराचा आकार हा बशीप्रमाणे असल्याने प्रत्येक भागाला समान पाणीपुरवठा होत नाही. काही भागांना चोवीस तास, तर काही भागात अवघे दोन ते तीन तास पाणी येत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे शहरात‌ पाणीपुरवठा करण्यासाठी चोवीस बाय सात ही योजना महापालिका प्रशासनाने तयार केली आहे. यासाठी तब्बल दोन हजार ८०० कोटींचा खर्च येणार आहे. निधीअभावी ही योजना रखडली होती. योजना राबविण्यासाठी आवश्यक तो निधी उभा करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षासाठी बारा टक्के, तर त्यापुढील पाच वर्षांसाठी पंधरा टक्के पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवून तो मान्य करण्यात आला होता. या पाणीपट्टी वाढीतून पाच वर्षांत पालिकेला ३०० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे; तर उर्वरीत निधी कर्ज रूपाने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.
गेले अनेक महिने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असल्याने काम रखडल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध करून यासाठी पाठपुरावा केला होता.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्ता फुगे खूनप्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

0
0

दत्ता फुगे खूनप्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, खडकी
भोसरीतील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या दत्ता फुगे यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या नऊ आरोपींपैकी सात जणांना २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर दोघांवरील निर्णय राखून ठेवत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. फुगेंचा मुलगा शुभम याने तक्रार दिली होती.
फुगे यांची गुरुवारी रात्री दिघी येथे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री मुख्य सूत्रधारांसह चौघांना, तर खून झाल्यानंतर लगेचच पाच जणांना अटक केली होती. या सर्वांना शनिवारी खडकी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यापैकी शौकत मुनीर आत्तार (वय २४), तुषार कान्हु जाधव (वय २०, दोघे रा. भारतमाता नगर, दिघी) या दोन आरोपींची ओळख परेड होणे अद्याप बाकी असल्यामुळे त्या दोघांबाबतचा निर्णय राखून ठेवत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खड्डेमुक्ती’साठी भाजपचे आंदोलन

0
0

'खड्डेमुक्ती'साठी भाजपचे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात एकही खड्डा नाही, असा दावा करणारे महापालिका प्रशासन; तसेच महापौर प्रशांत जगताप यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शहर भाजपच्या वतीने पर्वती आणि कसबा विधानसभा मतदारसंघात आंदोलन करण्यात आले. शहर तातडीने 'खड्डेमुक्त' करा, अशी मागणी करत महापालिका भवनासमोरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. शहरात खड्डा नसल्याचा दावा करणाऱ्या महापौर जगताप यांच्या प्रभागातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना भेट देण्यात आले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना महापौर जगताप मात्र शहरात खड्डे नसल्याचे वक्तव्य करत आहेत, त्यामुळे भाजपच्या वतीने हे आंदोलन करून पालिका प्रशासनाला शहरातील खड्ड्यांचे फोटो भेट देण्यात आल्याचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे यांनी सांगितले. नगरसेवक अशोक येनपुरे व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
पर्वती मतदारसंघाच्या वतीने लक्ष्मीनारायण चौकात निदर्शने करण्यात आली. शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, नगरसेविका स्मिता वस्ते, मानसी देशपांडे, मनीषा चोरबेले, कविता वैरागे, रघु गौडा, गणेश घोष, हरिष परदेशी, दीपक नागपुरे उपस्थित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॅकेन्झी’ला देणार ३९ कोटी रुपये

0
0

'मॅकेन्झी'ला देणार ३९ कोटी रुपये

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून अपेक्षेप्रमाणे शनिवारी मॅकेन्झी कंपनीची नियुक्ती करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सल्लागार म्हणून काम करणाऱ्या या कंपनीला शुल्क म्हणून ३९ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिकेने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडची (पीएससीडीसीएल) स्थापना केली आहे. शहरातील विविध भागांत या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात चौदापेक्षा अधिक प्रकल्प राबविले जाणार आहेत. या प्रकल्पाचे काम करण्यासाठी सल्लागार म्हणून कंपनीने टेंडर प्रक्रिया राबविली होती. यामध्ये सात कंपन्यांनी टेंडर भरले होते. त्यापैकी सर्व प्रक्रिया पूर्ण करून तीन कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली होती. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी मॅकेन्झी कंपनीला सर्वात अधिक गुण मिळाल्याने त्यांना हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही मान्यता देताना मॅकेन्झी कंपनीने प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार नाही, तसेच उपसल्लागार नेमण्याची अट ठेवली होती.

या अटींना विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी विरोध केला. त्यानंतर यावर सविस्तर चर्चा करून सर्व अटी रद्द करण्यात आल्या. सल्लागार म्हणून मॅकेन्झीला काम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात शहरात झालेल्या कार्यक्रमाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारच करणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमाचा कोणताही भुर्दंड पालिकेला भसणार नाही, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी विक्रेत्यांचा आजपासून बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना अडत देण्यास किरकोळ ग्राहक खरेदीदारांनी विरोध दर्शविला असून, पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील सुमारे पाच हजार किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी आजपासून (रविवारी) बेमुदत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे अडतीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांऐवजी खरेदीदार व्यापाऱ्यांकडून अडत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाची मार्केट यार्डातील आडत्यांकडून अंमलबजावणी होऊ लागली आहे. मार्केट यार्डातही त्याला विरोध झाला. मात्र, बाजार समितीच्या दबावामुळे अखेर किरकोळ व्यापाऱ्यांनी तात्पुरती खरेदी केली. याबाबत पिंपरी-चिंचवड येथे किरकोळ विक्रेत्यांची शनिवारी दुपारी बैठक झाली. तीत बंदचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडई, कॅम्पातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट आणि हॉकर्स संघटना; तसेच कोथरूडमधील सुतार मार्केट, हडपसरचे पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट आणि पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, दापोडी, खडकी येथील किरकोळ विक्रेते उपस्थित होते.

'मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून अडत घेण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकला पावणेतीन टक्के अडत आहे. तेथील व्यापारी मनाप्रमाणे दहा टक्क्यांप्रमाणे अडत घेत आहेत. त्याचा फटका आम्हाला बसत आहे. त्याशिवाय सेस, लेव्हीदेखील आम्हालाच द्यावी लागत आहे. अडत किती घ्यावी हे सरकारने अद्याप ठरविलेले नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. अन्यायाला वाचा फोडावी यासाठी शहरातील विविध भागाच्या भाजीपाला किरकोळ विक्रेता संघटनेने आजपासून (रविवारी) बेमुदत बंद पुकारला आहे,' अशी माहिती महात्मा फुले मंडईतील किरकोळ विक्रेत्यांचे प्रतिनिधी शशी पटवर्धन यांनी 'मटा'ला दिली. संपात शहरातील पाच हजार किरकोळ भाजीपाला विक्रेते सहभागी होणार असून, मार्ग निघत नाही तोपर्यंत संप कायम राहणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

'किरकोळ विक्रेत्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या अडतमुळे आमच्यावर आर्थिक बोजा पडत आहे. एक हजार रुपयांच्या खरेदीवर १०० रुपये अडत द्यावी लागत आहे. त्यामुळे महात्मा फुले मंडईने पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी कॅम्पातील शिवाजी मार्केट बंद राहणार आहे,' असे शिवाजी मार्केट आणि हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष शरद बोराटे, तसेच युसूफ बागवान, शंकर सुर्वे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेक्कन पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

0
0

पुणेः घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. सापळ्यामध्ये एकच आरोपी पकडला गेला, तर त्याचा साथीदार फरारी होण्यात यशस्वी झाला. त्यामुळे टेन्शन आलेल्या आरोपीने पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांची नजर चुकवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्फराज उर्फ शेरू बाबुमियाँ शेख (वय २८, रा. कागदीपुरा, कसबा पेठ) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी संजय शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून पाणीकपात रद्द?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्याने उद्यापासून (सोमवार) पुणेकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला दिले आहेत. सर्व गटनेत्यांबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. मात्र, आयुक्त कुणाल कुमार यांनी जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी यांच्यासह पालिकेतील पाणीपुरवठा करणारे तांत्रिक अधिकारी या सर्वांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द होणार का, याबाबत संभ्रमच तयार झाला आहे.

खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या धरणांच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. या चारही धरणांमध्ये सध्या १५ अब्ज घनफूटहून (टीएमसी) अधिक साठा झाला आहे. त्यामुळे पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या सप्टेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता स्थिती बदलल्याने पाणीकपात रद्द करावी, अशी मागणी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली होती. त्यातच शनिवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी गेली वर्षभर काटकसरीने पाणी वापरले. यंदा पुरेसा पाऊस पडला नसला, तरी धरणांत समाधानकारक साठा आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा देण्यासाठी रोज पाणीपुरवठा करावा, अशा सूचना महापौरांना दिल्या होत्या. त्यानंतर जगताप यांनी सर्व गटनेते, आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी पाणीकपात रद्द करण्याबाबत चर्चा केली आणि रोज पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी झाल्यास अकरा महिन्यांपासून पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना ‌दिलासा मिळणार आहे.

तूर्त तरी शक्य नाही : आयुक्त

धरणात पुरेसा पाणीसाठा असला, तरी जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी यांच्यासह पालिकेतील पाणीपुरवठा करणारे तांत्रिक अधिकारी या सर्वांशी चर्चा केल्यानंतरच सध्या सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. धरणातील उपलब्ध पाणी, शहराची मागणी या सर्वांचा विचार करून शहरातील सर्व लोकप्रतिनिधींशी बोलून हा निर्णय होईल. सर्व गोष्टींचा विचार करता सोमवारपासून लगेच पाणीकपात रद्द करून दरररोज पाणी पुणेकरांना देणे शक्य नसल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.



पुन्हा पाण्याचे राजकारण

अजित पवार यांच्या सूचनेवरून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी घोषित केल्याने पालकमंत्री आणि कालवा समितीचे प्रमुख गिरीश बापट यांच्यापुढे तिढा उभा राहिला आहे. पूर्वी दुष्काळी स्थितीत धरणांत पाणी कमी असताना दौंड आणि इंदापूरला दीड टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आताह पाणीसाठा वाढलेला असताना पालकमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे पाण्यावरून पुन्हा राजकारण रंगणार, हे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणेकरांना आता दररोज पाणी द्या’

0
0

पुणे : 'पुण्यात आता बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. मात्र, तरीही पुणेकरांना आता दिवसाआड पाणी देण्याऐवजी दररोज पाणीपुरवठा करावा,' अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौर प्रशांत जगताप यांना केली.

राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ उद्योजक रसिकलाल धारिवाल, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शरद हर्डीकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड या गुरुजनांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, आमदार जयदेव गायकवाड व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक दीपक मानकर, अप्पा रेणुसे, विशाल तांबे आणि अभय मांढरे यांनी संयोजन केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

'नैसर्गिक संकटे येतात आणि जातात. त्यावर मात करण्यासाठी खबरदारी घ्यायला हवी,' असे पवार यांनी स्पष्ट केले. 'आजच्या चारही सत्कारमूर्तींनी आपापल्या क्षेत्राबरोबरच समाजासाठीही भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे भावी पिढ्यांनाही प्रेरणा मिळेल,' असे पवार यांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑइल गळतीमुळे एक्स्प्रेस वे-वर कोंडी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर कंटेनरने धडक दिल्यानंतर ऑइल टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झाल्याने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे. पहाटे २.३० च्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला मात्र अजूनही या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटू शकलेली नाही. रविवार असल्याने वाहनांची संख्या मोठी असून कासवगतीने गाड्या पुढे सरकत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कंटेनरने ऑइल टँकरला धडक दिली तो अपघातानंतर पसार झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर ऑइल गळती झाल्याने काही वेळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर रस्त्यावरील तेलाचा तंवग काढण्यात आला असला तरी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

अपघातात तीन तरुण ठार

आधीच ऑइल टँकरच्या गळतीमुळे एक्स्प्रेस वे-वरील वाहतूक मंदावलेली असताना कामशेत बोगद्याजवळ पहाटे ५ च्या सुमारास दुसरा अपघात झाला. आय-२० कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात अमित सोलेभाविकर (२९), संतोष उडवंत (३२) आणि शरद कृष्णराव पवार (३५) हे पुण्याचे तीन तरुण ठार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीचे चार हजार विद्यार्थी प्रवेशाविना

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या झाल्यानंतरही आतापर्यंत एकूण ४ हजार ८४४ विद्यार्थी कोणत्याही प्रवेशाविना राहिले आहेत. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना आज, सोमवारी १८ जुलैला जाहीर होणाऱ्या चौथ्या फेरीत पसंतीच्या कॉलेजात प्रवेश मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही फेरी जाहीर होण्याकडे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे. तसेच, या फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडून पाचवी फेरी घेण्याबाबत निर्णय होण्याकडे लक्ष असणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये नोंदविलेले पसंतीक्रम आणि त्यांच्या दहावीच्या गुणवत्तेची टक्केवारी अजिबात न जुळल्याने तीन फेऱ्या झाल्यानंतरही एकूण ५ हजार ८१५ विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश निश्चिती मिळालेली नाही. या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९७१ विद्यार्थ्यांनी विविध कोट्यांमधून कॉलेजांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे उर्वरित ४ हजार ८४४ विद्यार्थ्यांना १८ जुलैला सकाळी अकरा वाजता जाहीर होणाऱ्या चौथ्या फेरीतून कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार का, याकडे लक्ष लागलेले आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी बुधवारी जाहीर झाली. या यादीतून एकूण १८ हजार ७६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यामध्ये १० हजार ७०३ विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश मिळाला आहे; तर ७ हजार ३७३ विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी मिळाली आहे. त्यामध्ये सायन्सला ९ हजार १३९, कॉमर्स (इंग्रजी) ५ हजार ६१६, कॉमर्स (मराठी) ३ हजार ५२, तर आर्ट‍‍्स (इंग्रजी) १५३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड येथील कॉलेजमधील अकरावीच्या ७३ हजार ३८५ जागांच्या प्रवेशासाठी अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता फेरीतून ५२ हजार ६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यापैकी ३६ हजार ६३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते. दुसऱ्या फेरीतून एकूण १५ हजार ५६३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. यामध्ये ५ हजार ४० विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश निश्चिती देण्यात आली. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या १० हजार ५२३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीतून 'बेटरमेंट'ची संधी मिळाली होती. दरम्यान, चौथ्या फेरीत काही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडून पाचवी फेरी घेण्याबाबत निर्णय होणार का, याकडे लक्ष असणार आहे.

तिसऱ्या फेरीत १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत १० हजार ७०३ विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यायचा होता. मात्र, त्यापैकी ४ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवेश दिलेल्या मुदतीत निश्चित केला आहे. तसेच, बेटरमेंटची संधी मिळालेल्या ७ हजार ३७३ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी पूर्वी मिळालेल्या किंवा या फेरीत मिळालेल्यापैकी एका कॉलेजात प्रवेश निश्चित केला आहे. अशाप्रकारे या फेरीतून सुमारे ९ हजार ५६४ विद्यार्थी बाहेर पडल्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images