Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू

$
0
0

हडपसर : ब्रेक फेल झालेल्या बसची धडक बसल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वार स्वाती मोहिते यांचा शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. मोहिते या गुरुवारी आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात होत्या.

स्वाती उदय मोहिते (वय ३५, रा. अमर बाग सोसायटी, हडपसर) या मांजरी येथील एंजल स्कूलमध्ये शिकत असलेल्या मुलाला आणण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या. त्या वेळी हडपसर-उरळी कांचन बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने एका लोखंडी खांबाला बस धडकवली. त्या वेळी मोहिते यांच्या दुचाकीला धडक लागली. नागरिकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पथनाट्य चळवळ अखेरच्या मार्गावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे सामाजिक विषयांवर परखडपणे भाष्य करणाऱ्या आणि समाजामध्ये जनजागृती करणारी पथनाट्ये आता जवळ जवळ नाहीशी झाली आहेत. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि निवडणुकांमध्ये उमेदवाराचा गाजावाजा करण्यापुरती पथनाट्ये मर्यादीत राहिली आहेत. पूर्वी अनेक चळवळींच्या माध्यमातून नागरिकांचे मन परिवर्तन करण्यात महात्त्वाची भूमिका बजावणारी पथनाट्य चळवळ शहरातून नामशेष झाली आहे.

गेल्या दोन तीन वर्षांमध्ये माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले. सोशल मीडियाने या सगळ्यामध्ये भर घातली. त्यामुळे आधी एखादा सामाजिक विषय लोकांपर्यंत प्रभावापणे पोहोचवण्यासाठी पांढरा कुर्ता, पायजमा असा पेहराव करून चौकाचौकांमध्ये खणखणीत आवाजात पथनाट्य सादर करणारी तरुण मंडळी आता दिसत नाहीत. निवडणुकीच्या वेळी मात्र ही मंडळी पुन्हा एकदा शहरातील चौक गाजवताना दिसतात. पण बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही.

केरळमध्ये जन्मलेला हा नाट्यप्रकार पुढे भारतभर रुजला. सुरुवातीला बंगालमध्ये झालेल्या चळवळी, तसेच महाराष्ट्रातही त्याचा प्रसार झाला. महाराष्ट्रात अनेक चळवळींमध्ये पथनाट्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शहरात आणि ग्रामीण भागात हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, सावकारी, स्त्रीयांवरील अत्याचार अशा अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडण्यासाठी पथनाट्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु, कालांतराने ही चळवळ मागे पडली.

व्यावसायिक नाटक, चित्रपट यामध्ये कलाकारांना संधी मिळाल्याने त्यांची पावले त्या क्षेत्राकडे वळली आणि पथनाट्यांसाठी कलाकार मिळेनासे झाले. त्यामुळे आता पथनाट्यांचे देखील व्यावसायिकरण झाले आहे. अखेरच्या घटका मोजत असलेला हा नाट्यप्रकार पुन्हा नव्याने सुरू व्हावा, असे अनेक नाट्य संस्थांना वाटते. मात्र त्यासाठी प्रयत्न करताना कुणी दिसत नाही. नव्या पद्धतींचा वापर करून तरुणाईला आवडतील अशी पथनाट्ये सादर झाली, तरच या चळवळीला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.

कलाकारांना इतर माध्यमांमधून पैसे मिळत असतील, तर साहजिक ते त्या क्षेत्राकडे वळतील. मात्र, नाट्य संस्थांनी पथनाट्य चळवळ सुरू ठेवणे गरजेचे आहे. लवकरच पथनाट्य या विषयावर नाट्यपरिषदेतर्फे कार्यशाळा, संमेलने घेतली जातील. - सुरेश देशमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, पुणे शाखा

पथनाट्य संपूर्ण नामशेष झाले असे म्हणता येत नाही. कलाकारांना पथनाट्यासाठी वेळ अधिक द्यावा लागतो. शिवाय त्यांना पैसेदेखील कमी मिळतात. निवडणुकांच्या पलिकडे जाऊन पथनाट्यांचा विचार होण्याची गरज आहे. - आरती पाठक, पथनाट्य दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारने मोटरसायकललाफरपटत नेले; दाम्पत्य जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कारचालकाने एका मोटारसायकलला धडक दिल्यानंतर ही मोटारसायकल कारसोबत फरपटत गेल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाले. कर्वे रस्त्यावर शनिवारी रात्री हा अपघात घडला. जखमींवर उपचार सुरू असून, कारचालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले आहे.

अनिकेत अशोक वाकोडे (३२, रा. एरंडवणे) आणि त्यांची पत्नी अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एमएच ०४ बीएस ३६०९ असा क्रमांक असलेल्या कारच्या चालकाला डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचे नाव समजू शकले नाही.

या कारचालकाने स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे एका मोटारसायकलला धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील दाम्पत्य खाली पडून जखमी झाले. अपघातामुळे मोटारसायकल कारच्या खालच्या बाजूस अडकली. परंतु घाबरलेल्या कारचालकाने कार न थांबवता तशीच पुढे दामटली. गरवारे कॉलेजकडून डावीकडे वळून सेंट्रल मॉलकडे जाताना ही कार एका ओम्नी व्हॅनला धडकली आणि आणखी एका कारला धडकून थांबली. त्यानंतर नागरिकांनी या कारचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

हा कारचालक व त्याचा लहान मुलगा जंगली महाराज रस्त्यावरून डेक्कन कॉर्नरच्या सिग्नलपाशी आला. त्याची कार भरधाव वेगात होती. सिग्नल सुटताच कर्वे रस्त्यावरून भरधाव जाताना त्याने मोटारसायकलवरून जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली. हे दाम्पत्य रस्त्यावर पडले व मोटारसायकल कारच्या पुढील चाकात अडकली. त्यानंतरही न थांबता या कारचालकाने कार तशीच पुढे नेली. मोटरसायकल कारच्या पुढच्या चाकात अडकल्याने ती रस्त्यावर घासून त्यातून ठिणग्या उडत होत्या. गरवारे कॉलेजजवळून सेंट्रल मॉलजवळ जाताना ही कार आणखी दोन कारना धडकल्याने थांबली. त्यानंतर नागरिकांनी या कारचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच मोटारसायकलवरील दाम्पत्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शहेनशहा’ आता इंग्रजीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुघल साम्राज्यातील सर्वांत क्रूर बादशहा म्हणून ओळख असणाऱ्या औरंगजेबाचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक ना. सं. इनामदार यांच्या 'शहेनशहा' कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद करण्यात आला असून त्या निमित्ताने इंग्रजी वाचकांसमोर औरंगजेबाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणार आहेत.

इंग्रजी भाषेचे अभ्यासक आणि लेखक विक्रांत पांडे यांनी या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. हार्पर-कॉलिन्स या प्रकाशन संस्थेने या कादंबरीचे प्रकाशन केले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कादंबरी वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.

औरंगजेब हा एक क्रूरकर्मा बादशहा होता एवढीच त्याची ओळख बहुतांश लोकांना माहिती आहे. मात्र तो बादशहा कसा झाला. त्यानंतर त्याने अनेक वर्ष मुघल साम्राज्य कशाप्रकारे सांभाळले , त्याचे व्यक्तिमत्व कसे होते याचा संपूर्ण आढावा संशोधन करून ना. स. इनामदार यांनी वाचकांसमोर मांडला आहे. त्यासाठी इनामदार यांनी औरंगजेबाचे वास्तव्य असणाऱ्या सर्व ठिकाणांची भटकंती केली आहे. त्या ठिकाणी संशोधन करून त्यांनी औरंगजेबाचे व्यक्तिमत्व रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

यासंदर्भात बोलताना ना. स. इनामदार यांचे जावई सुभाष आरोळे म्हणाले, 'मराठी वाचकांनी ही कादंबरी अगदी डोक्यावर उचलून धरली. पण मराठीच्या पलिकडे जाऊन इतर वाचकांना औरंगजेबाची आणि मुघल साम्राज्याची माहिती व्हावी या उद्देशाने कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद करण्यात येत आहे. कादंबरीत इनामदार यांनी केवळ इतिहास विषद केलेला नाही, तर प्रत्यक्ष प्रवास करून तेथील संस्कृतीचा वेध घेतला आहे.'

औरंगजेब चांगला होता का वाईट याचा कसलाही निष्कर्ष न काढता ना. स. इनामदार यांनी त्याचे व्यक्तिमत्व कांदबरीमार्फत वाचकांसमोर उभे केले आहे. ते लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या निमित्ताने मुघल साम्राज्याचा इतिहास जागतिक स्तरावर जाणार आहे. मूळ कादंबरीला कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही, तर केवळ इंग्रजीला साजेसा असा बदल भाषा पद्धतीत केला आहे. - विक्रांत पांडे, अनुवादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळंतिणीचा खून; बाळाचे अपहरण

$
0
0

पुणे : बाळंत होऊन अवघे वीस दिवस झालेल्या एका महिलेचे बाळासह अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना वानवडीत घडल्याचे शनिवारी उघडकीस आले. तिच्या बाळाचे अपहरण करण्यात आले असून, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी एका पुरुषासह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हडपसर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेला २० दिवसांपूर्वी मुलगा झाला. ही महिला शुक्रवारी अचानक गायब झाल्याची तक्रार तिच्या पतीने हडपसर पोलिसांकडे दिली. गेले काही दिवस दोन महिला या महिलेशी सलगी वाढवण्याच्या प्रयत्नात होत्या. दरम्यान, रामटेकडी परिसरात काही गोंधळ सुरू असल्याची माहिती वानवडी पोलिसांना शुक्रवारी रात्री मिळाली होती. पोलिसांनी तिथे गोंधळ घालणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतले. दिवसभराच्या चौकशीअंती ताब्यात घेतलेल्या महिलांनी खुनाची माहिती दिल्याने खळबळ उडाली. वानवडी व हडपसर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी बंद घरात कॉटखाली बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. दरम्यान, बाळ घेऊन आरोपी महिला पसार झाली आहे. तिचा कसून शोध घेण्यात येत आहे. एका डॉक्टरला स्त्री-बीज विकण्यातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मंत्र्यांच्या बदनामीचे षड‍्यंत्र’

$
0
0

आरोप होत असलेल्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एकही घोटाळा न होता वेगवान विकास सुरू झाल्याने विरोधकांनी आमच्या मंत्र्यांच्या विरोधात गोबेल्स पद्धतीने प्रचार सुरू केला आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आरोप होत असलेल्या मंत्र्यांची पाठराखण केली. इतकेच नव्हे, तर राजीनामा दिलेले एकनाथ खडसे अग्निपरीक्षेतून बाहेर येतील, अशीही टिपण्णी त्यांनी केली.

गेल्या काही काळात भाजपचे मंत्री आणि नेत्यांवर घोटाळ्यांच्या आरोपांची मालिका सुरू झाली आहे. त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद़्घाटनप्रसंगी फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आपल्या मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांचा जोरदार प्रतिवाद त्यांनी केला. या मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षड‍्यंत्र असल्याची टीका त्यांनी केली.

'विरोधकांनी प्रथम विनोद तावडे यांच्यावर न झालेल्या खरेदीप्रकरणी आरोप केले; पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले; पण चिक्कीच्या खरेदीचे संबंधित जीआर पूर्वीच्याच सरकारच्या काळातील निघाले. देशभरात डाळीचे भाव वाढलेले असताना विरोधकांनी फक्त गिरीश बापट यांच्यावर टीका केली; पण मी विधिमंडळात वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर गजानन पाटील प्रकरण, दाऊदशी कथित संभाषण आणि एमआयडीसी जमीनखरेदी अशा प्रकरणांवरून खडसे यांच्यावर आरोप सुरू झाले. गजानन पाटीलप्रकरणी खडसे यांचा संबंध नाही, तसेच दाऊदशी संभाषणाच्या आरोपातही तथ्य नसल्याचे समोर आले. 'एमआयडीसी'प्रकरणी स्वतः खडसे यांनीच न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे आणि या अग्निपरीक्षेतून ते नक्की बाहेर येतील,' असे फडणवीस म्हणाले.

विरोधकांचा बुरखा फाडा

गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरील आरोपही बिनबुडाचे असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. 'गेली अनेक वर्षे सत्तेत राहून भूखंड लाटणाऱ्यांकडून आमच्यावर बिनबुडाचे आरोप होत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळून न जाता उलट आक्रमक व्हावे आणि आमच्या नेत्यांवरील आरोप खपवून घेणार नाही, आणि तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, हे दाखवून द्यावे,' असे आवाहन फडणवीस यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. आरोप करणाऱ्यांच्या विरोधात गावोगावी निदर्शने करण्याचा आणि त्यांचा भ्रष्टाचार खणून काढण्याचा संदेशही त्यांनी दिला.

'....न खाने देंगे'

'केंद्रात नरेंद्र (मोदी) आणि राज्यात देवेंद्र (फडणवीस) हे दोघेही 'ना खुद खाएंगे, और ना किसीको खाने देंगे,' अशा पठडीतील आहेत,' असे 'प्रमाणपत्र' केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिले. 'आम्ही मोदी यांच्या मार्गाने चालणारे आहोत. ज्या क्षणी आम्ही भ्रष्टाचाराचा अंगीकार करू, त्या दिवसापासून आम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आणि तसे घडल्यास आम्हीही अधिकारपदे सोडून देऊ,' अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

'शिवसेना सर्वांत जुना मित्रपक्ष'

'एखाद्या कुटुंबात वाद-भांडणे होतात, तसेच शिवसेनेसोबत एकत्र काम करताना काही अडचणी असल्या, तरी त्या एकत्र मिळून, आपापसात सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील वाद चव्हाट्यावर आणू नका,' असा सल्ला केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. तसेच, 'शिवसेना हा भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष असून, त्यांच्यासह यापुढेही काम करायचे आहे, हे लक्षात ठेवा,' असा संदेशही त्यांनी दिला.

युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर?

'महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेशी युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात येतील,' असे संकेत या बैठकीत मिळाले. 'हे अधिकार स्थानिक पातळीवर द्या,' असे सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी राजकीय ठरावावरील भाषणात सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचवीपर्यंत मातृभाषेतूनच शिकवा

$
0
0

बोर्ड परीक्षेत ग्रेस गुण बंद करण्याची सुब्रह्मण्यन समितीची शिफारस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून देण्याबरोबरच शिक्षणात त्रिभाषा सूत्र कायम ठेवण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्यासाठीच्या समितीने केली आहे. पाठांतरावर भर देणारी परीक्षा पद्धत बदलून नवी पद्धत विकसित करतानाच बोर्ड परीक्षांमध्ये सध्या प्रचलित असलेली 'ग्रेस' गुण देण्याची पद्धत बंद करण्याची शिफारसही या समितीने केली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांत गुण वा श्रेणी देण्याऐवजी पर्सेंटाइल देण्याची पद्धत तपासून पाहण्याची सूचना या समितीने केली आहे.

समितीचे अध्यक्ष टी. एस. आर. सुब्रह्मण्यन यांनी आपला अहवाल काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना सादर केला होता; मात्र त्याचा तपशील सरकारने जाहीर केला नव्हता. हा अहवाल राज्यांना दिल्यानंतरच तपशील सर्वांसाठी खुला करणार असल्याचे इराणी यांनी सांगितले होते; मात्र २३० पानांचा हा अहवाल खासगीरीत्या जाहीर करण्यात आला असून, त्याबाबत चर्चा सुरू आहे. अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, भाषाशिक्षण, खासगी क्लास, शिक्षक भरती आदी विषयांबाबतची निरीक्षणे नोंदवतानाच या समितीने शिफारशी केल्या आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटलेले असतानाच्या सध्याच्या काळात मातृभाषेतून वा प्रादेशिक भाषेतून शिक्षण देण्याची सूचना सुब्रह्मण्यन समितीने केली आहे. पाचवीपर्यंत माध्यमाची भाषा मातृभाषा किंवा त्या प्रांताची भाषा असायला हवी, असे नमूद करण्यात आले आहे; मात्र याची अंमलबजावणी कशी करावी, त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. संस्कृतला 'अभिजात भाषा' असे न मानता स्वतंत्र विषय म्हणून ती शिकवायला हवी, अशी शिफारस करण्यात आली आहे.



सुब्रह्मण्यन समितीच्या शिफारशी

परीक्षा

दहावीची बोर्ड परीक्षा दोन स्तरांवर हवी.

गणित आणि विज्ञानात गती नसणाऱ्यांसाठी कनिष्ठ स्तरावरील परीक्षा.

बोर्ड परीक्षांतील ग्रेस गुणांची पद्धत बंद करायला हवी.

गुणांऐवजी पर्सेंटाइल पद्धत स्वीकारली जावी.

विद्यार्थ्यांनी मागणी केली, की बोर्ड परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन सुविधा हवी.

बारावीनंतर पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर पात्रता परीक्षा हवी.

आठवीपर्यंत नव्हे, तर पाचवीपर्यंतच नापास न करण्याची पद्धत हवी.



शाळा आणि शिक्षक

गरजेनुसार छोट्या शाळांचे मोठ्या शाळांत विलीनीकरण व्हायला हवे.

शिक्षक भरतीसाठी राष्ट्रीय स्तरावर सेवा सुरू केली जावी.

सरकारी आणि खासगी शाळांतील शिक्षकांना दर दहा वर्षांनंतर प्रमाणपत्र घेणे बंधनकारक.

शहरी भागांतील शाळांत क्रीडांगण नसल्याने योगविद्येचे शिक्षण उपयुक्त



विद्यापीठ

संलग्न कॉलेजांची संख्या शंभरपेक्षा जास्त नको.

कॉलेज शिक्षकांसाठी पीएचडीचे बंधन नको.

यूजीसी कायद्याऐवजी उच्च शिक्षण कायदा हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंगीचे औषध देऊन बलात्कार

$
0
0

आरोपीसह साथीदार महिलेवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

थंड पेयातून गुंगीचे औषध देऊन एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीच्या महिला साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी प्रसूत झाल्यावर दोन्ही आरोपी नवजात अर्भकाला घेऊन पसार झाले होते. पिंपरी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून अर्भकाला ताब्यात घेतले आहे.

सचिन नारायण शेडगे (३८, रा. अजमेरा, पिंपरी), तसेच दत्तनगर येथे राहणारी २५ वर्षीय महिला साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर २३ वर्षीय पीडित तरुणीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या महिलेला आणि अर्भकाला पिंपरी पोलिसांनी धानोरी येथून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तनगर येथे राहणाऱ्या महिलेने पीडित तरुणीची ओळख सचिन याच्याबरोबर करून दिली. आरोपींनी या तरुणीला चिंचवड आणि पाषाण येथे बोलावून तिला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले. पीडित महिला बेशुद्ध झाल्यानंतर सचिनने तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार मागील एक वर्षापासून सुरू होता. पीडित तरुणीची प्रसुती दोघा आरोपींनी सूस येथील हॉस्पिटलमध्ये करून घेतली. त्यानंतर अर्भकाला घेऊन पसार झाले होते.

अर्भक धानोरे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने शुक्रवारी महिला व अर्भकाला ताब्यात घेतले. फौजदार रत्ना सावंत तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नायडूंना शिवसेनेसोबत हवेत गोड संबंध; नेत्यांचा मात्र विरोध

$
0
0

राधेश्याम जाधव। पुणे

गेले अनेक दिवस शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस तीव्र होत असताना 'शिवसेनेसोबत असलेले आपले मतभेद ताबडतोब संपवून टाका' असा वडिलकीचा सल्ला केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पक्ष कार्यकर्त्यांना काल राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत दिला. परंतु, राज्यातील भाजप नेत्यांनी नायडू यांचे हे आवाहन परतवून लावले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका आणि अन्य निवडणुका भाजपने स्वतंत्रपणे लढल्या पाहिजेत असे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

या बैठकीत व्यंकय्या नायडू यांच्यसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कॅबिनेट मंत्र्यांव्यतिरिक्त पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 'एखाद्या कुटुंबात वाद-भांडणे होतात, तसेच शिवसेनेसोबत एकत्र काम करताना काही अडचणी असल्या, तरी त्या एकत्र मिळून, आपापसांत सोडविण्याचा प्रयत्न करा. घरातील वाद चव्हाट्यावर आणू नका,' अशा स्पष्ट शब्दात नायडू यांनी शिवसेनेला विरोध करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले.

परंतु नायडू यांचे हे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गांभिर्याने घेतले नसल्याचेच जाणवले. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळला. 'पंचायत निवडणुकीपासून ते संसदेच्या निवडणुकीपर्यंत पक्षाने आपल्या बळावरच सत्तेत येण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासाठीची हीच वेळ आहे', असे वक्तव्य दानवे यांनी केले.

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर सदस्यांना हे सांगितलं पाहिजे, की शिवसेनेला लक्ष्य करणं आता बंद करा', अशी भूमिका यावेळी पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. पटोले पुढे म्हणाले, ' शिवसेना, भाजप सरकारचा सहकारी पक्ष आहे हे आपल्या मंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी समजवावं असं ठाकरे यांना सांगण्याची गरज आहे.' पटोले यांच्या या वक्तव्याचं उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.

शिवसेना आणि भाजपचे भविष्यकाळात नेमके संबंध कसे असतील याबाबत आजच्या बैठकीत ठराव होण्याची शक्यता आहे. या ठरावावर मतदान घेतल्यानंतरच शिवसेना-भाजप संबंधांबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक योगदिनी पोलिसांचे ‘आदेशा’सन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर पोलिस दलातील सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, फौजदारांसह चार हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय योगासन दिनी (२१ जून) 'सक्ती'चे योग प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. उद्या, मंगळवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सर्व अधिकारी-कर्मचारी श्वसनावर लक्ष केंद्रित करून योगाभ्यास करणार आहेत. पोलिस मुख्यालयाच्या उपायुक्तांनी योग प्रशिक्षणाबाबत आदेश काढून सर्व घटकांच्या प्रमुखांनी आज, सोमवारपर्यंत पोलिस कर्मचाऱ्यांची नावे मुख्यालयात पाठवण्यास सांगितले आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्या प्रकारचा पोशाख परिधान करायचा, याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी सफेद रंगाची पँट आणि टी-शर्ट, पांढऱ्या रंगाचे शूज घालण्यास सांगण्यात आले आहे. तर कर्मचाऱ्यांनी खाकी रंगाची पँट, सफेद गोल गळ्याचा टी-शर्ट, फूल बनियन, ब्राउन पी. टी. शूज घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी येताना सोबत सतरंजी आणण्यास सांगण्यात आले आहे.
'जागतिक योग दिनी पोलिस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणात योग प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयात तयारी सुरू असून आयुक्तालयातील जास्तीत जास्त मनुष्यबळाने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, अशी भावना यामागील आहे,' असे आदेशात या म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगदिनाच्या आवाहनाला गेल्या वर्षी जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या वर्षी दुसरा जागतिक योगदिन साजरा करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चार हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना योग प्रशिक्षणासाठी सकाळी साडेसहा वाजता पोलिस आयुक्तालयावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

उपस्थिती आवश्यक

शहर पोलिस दलातील सर्व पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, फौजदार, विशेष शाखा, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, अतिक्रमण विभाग, बॉम्बशोधक पथक, जलद प्रतिसाद दलाचे कर्मचारी, मोटार ट्रान्स्पोर्ट, वायरलेस शाखेतील सर्व कर्मचारी, प्रत्येक पोलिस ठाण्यातील ४० कर्मचारी, वाहतुक शाखेकडील ६०० कर्मचारी, पोलिस मुख्यालयातील एक हजार कर्मचाऱ्यांना योगदिनी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूसाठी पैसे नाकारल्याने खून

$
0
0


पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्यामुळे पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकावर वार झालेल्या व्यक्तीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात बंडगार्डन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भजनसिंग मदनसिंग राणा (वय ४०, रा. उत्तराखंड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन नम यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून प्रदीप पुरोहित ऊर्फ सरदार नावाच्या व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा हा फिरस्ता असून तो पुणे स्टेशन येथील स्थानकावर राहत होता. शुक्रवारी सकाळी त्याला आरोपीने पुरोहित याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याला राणा याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले होते. त्यानंतर तो पळून गेला होता. एस. एम. पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजकीय खटले मागे घ्या’

$
0
0

Shrikrishna.Kolhe @timesgroup.com

पुणे : पुण्यात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांवर दाखल असलेले १५७ खटले मागे घेण्याची शिफारस पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत कोर्टाने ६५ राजकीय खटले मागे घेतले आहेत. राज्यात सर्वाधिक राजकीय खटले पुण्यात मागे घेण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक हिताच्या वेगवेगळ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून बंद पुकारणे, घेराव घालणे, मोर्चा काढणे, निदर्शने करणे इत्यादी मार्गाने आंदोलन केले जाते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल केले जातात. त्यांच्या विरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले जाते. हे खटले अनेक वर्षे कोर्टात सुरू असतात. हे खटले मागे घेण्यासाठी सरकारकडे अर्ज करण्यात येतात. राज्य सरकारने २०१० मध्ये २००५ पर्यंतचे राजकीय स्वरूपाचे खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही खटले मागे घेतले होते. त्यानंतर सरकारने २०१५ मध्ये निर्णय घेऊन नोव्हेंबर २०१४ पर्यंतचे खटले मागे घेण्याचे आदेश दिले होते. तसेच, खटले मागे घेताना कोणती काळजी घ्यावी याबाबत नुकत्याच काही सूचना केल्या होत्या.
'ज्या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही व खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाखांपेक्षा जास्त हानी झालेली नाही, असे खटले मागे घ्यावेत. हे खटले काढून घेण्याची कार्यवाही करण्यासाठी पोलिस आयुक्त, अभियोग संचालनालयाचे सहायक संचालक आणि गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त यांची समिती नेमली होती. या समितीने त्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल असलेले राजकीय खटल्यांची छाननी करून कोर्टाकडे मागे घेण्यास शिफारास करावी. ज्या गुन्ह्यात नुकसान भरपाई भरण्यास तयार होतील, त्यांचे खटले मागे घ्यावेत,' असे सरकारने सूचनांमध्ये म्हटले होते.
या आदेशानंतर पुणे पोलिस आयुक्तालयातील राजकीय खटले मागे घेण्यासाठी नेमलेल्या समितीसमोर २२० राजकीय खटले ठेवण्यात आले. या समितीने या खटल्यांची छाननी करून १५७ खटले मागे घेण्याची शिफारस कोर्टाकडे केली आहे. तर २९ खटल्यात त नुकसान भरपाई भरण्यास सांगण्यात आले आहे. तर, ३४ खटल्यांची शिफारस करण्यात आलेली नाही. या शिफारशीनंतर कोर्टाने आतापर्यंत ६५ राजकीय खटले मागे घेतले आहेत. तर, बाकीचे खटले प्रलंबित आहेत. राज्यात सर्वाधिक राजकीय खटले पुणे पोलिस आयुक्तालयाने मागे घेण्याची शिफारस केली आहे. मागे घेण्याची शिफारस करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये १९९२ पासूनच्या काही खटल्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नियमानुसारच शिफारस

'सरकारने दिलेल्या नियमांमध्ये बसलतील, असेच राजकीय खटले मागे घेण्याची समितीने कार्टाकडे शिफारस केली आहे. सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांवर किरकोळ स्वरूपांच्या खटल्यांचा यामध्ये समावेश आहे,' अशी माहिती समितीचे सचिव व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाचा अखेर उलगडा

$
0
0

आरोपींकडून बाळाचा चार लाखांना सौदा, सरोगेट मदरच्या नावाखाली धंदा म. टा. प्रतिनिधी, हडपसर बाळंतिणीचा खून करून तिच्या २५ दिवसांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या चौघांना शनिवारी रात्री गजाआड करत पोलिसांनी बाळाची सुटका केली. आरोपींकडून बाळाची लाखो रुपयांना विक्री करण्यात येणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या बाळाची खरेदी करणारे संशयित तसेच 'सरोगेट मदर'च्या नावाखाली धंदा करणारे डॉक्टर आणि हॉस्पिटल पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मधुमती रघुनंदन ठाकूर (वय २२, रा. बिराजदारवस्ती, वैदुवाडी, हडपसर) असे खून झालेल्या बाळंतिणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती रघुनंदन ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. निकीता संजय कांगने (वय ३०), लक्ष्मी उर्फ पिंकी बालाजी जाधव (वय १९), चंद्रभागा कृष्णा उडानशू (वय ४२), आकाश कृष्णा उडानशू (वय २०, सर्व रा. आनंदनगर, रामटेकडी) यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. तर, माया मोरे ही महिला नगर जिल्ह्यात पसार झाली असून तिचा शोध सुरू आहे, अशी माहिती सहायक आयुक्त रवींद्र रसाळ यांनी दिली. असा शिजला अपहरणाचा कट मधुमती या २५ दिवसांपूर्वी बाळंत होऊन त्यांना मुलगा झाला होता. त्या बिराजदार वस्ती येथे राहतात, तर आरोपी निकिता ही रामटेकडी येथे राहत होती. मधुमती या गरोदर असल्याचे निकिताला समजले होते. निकिता आणि इतर महिला आरोपींनी अंगणवाडी सेविका असल्याचा बहाणा करत त्या मधुमती यांच्या घरी गेल्या होत्या. पोलिओ डोस देणे, सरकारी मदत मिळवून देणे अशी माहिती देत त्यांनी मधुमती यांचा विश्वास संपादन केला. बाळाच्या जन्मानंतर पंधरा दिवसांनी त्यांनी मधुमती यांची भेट घेतली होती. निकिताने मधुमती, त्यांचे बाळ आणि बाळाच्या आजीला घेऊन रामटेकडी येथे बहाण्याने नेले होते. त्यानंतर ते घरी परतले. निकिता शनिवारी सकाळी मधुमती यांच्या घरी पुन्हा आली होती. ती मधुमती आणि बाळाला घेऊन गेली. मधुमती बाळाला घेऊन न परतल्याने तिचे पती आणि सासू रामटेकडी येथे निकिताच्या घरी गेले होते. मात्र, तेथील घराला कुलूप होते. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. आरोपी महिलांनी मधुमती यांच्या गळा दाबून खून केला आणि मृतदेह कॉटखाली लपवून बाळाला घेऊन पळ काढला होता.

असा लागला शोध मधुमती यांची आई, मावशी आणि भाऊ हे शनिवारी पहाटेच्या सुमारास निकीताच्या रामटेकडी येथील घरी गेले होते. यावेळी त्यांना निकिता आणि इतर संशयित तेथे आढळले. त्यांच्यात वाद झाल्याने आजूबाजूची मंडळी गोळा झाली. ही माहिती वानवडी पोलिसांना समजल्यावर त्यांनी सगळ्यांना ताब्यात घेतले आणि हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. हडपसर पोलिसांनी दिवसभर केलेल्या तपासात मधुमतीचा खून झाला असल्याचे तर बाळाचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले. ताबडतोब तपासाची चक्रे फिरली आणि बाळाला घेऊन पळालेल्या ​महिलेला ताब्यात घेत बाळाची सुटका करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना सुरूच आहेत. बिबवेवाडीतील व्हीआयटी कॉलेज ते पद्मावती मंदिर परिसरातील घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांची एका मद्यधुंद टोळक्याने रविवारी पहाटे तोडफोड केली. यामध्ये स्कूल बस, रिक्षा, कार, दुचाकी अशा वीस वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी तीन जण अल्पवयीन आहेत. दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे.
याबाबत जगदीश ठाकूर (वय ४२, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. व्हीआयटी कॉलेजजवळ शनिवारी रात्री दोन गटात भांडणे झाली होती. यातील चार अल्पवयीन मुलांच्या टोळीने रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास व्हीआयटी कॉलेज परिसरातील वाहनांची तोडफोड केली. कोयते आणि दगड घालून ही तोडफोड करण्यात आली आहे. टोळक्याने व्हीआयटी कॉलेजपासून पद्मावती मंदिरापर्यंत नागरिकांनी घरासमोर पार्क केलेल्या स्कूल बस, चारचाकी, रिक्षा, दुचाकी वाहनांवर दगड घालून तोडफोड केली. यामध्ये वीस वाहनांचे नुकसान झाले. तसेच, हातामध्ये कोयता फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. पहाटेच्या सुमारास अचानक गोंधळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दहशत निर्माण करणारे पळून गेले होते. घटनास्थळी मिळालेल्या दुचाकीवरून माग काढून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. संबंधित मुले परिसरात कॉलेजमध्ये अकरावी व बारावीमध्ये शिकतात. दारूच्या नशेत दहशत निर्माण करण्यासाठीच त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक बालाजी मगर अधिक तपास करीत आहेत.

'पोलिसांनी प्रयत्न करावेत'

शहरात दहशत निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी वारजे परिसरात दोन टोळक्याच्या वादातून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेमध्ये पंधरापेक्षा जास्त वाहनांचे नुकसान झाले होते. या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्कूल बसची दुरुस्ती

तक्रारदार जगदीश ठाकूर यांच्या व इतर दोन अशा एकूण तीन स्कूल बसची टोळक्याने तोडफोड केली. शाळा सुरू झाल्यामुळे अशाच अवस्थेत स्कूल बस घेऊन जाणे शक्य नाही. रविवारी सुट्टी असल्यामुळे तातडीने स्कूल बस दुरुस्तीसाठी टाकण्यात असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन गैरव्यवहार रोखणार ‘ई-सर्च’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जमीन, फ्लॅट आणि दुकानांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाने 'ई-सर्च' हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या प्रणालीद्वारे मागील तीस वर्षांतील दस्त पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
'ई-सर्च' सुविधेसाठी मुंबईतील सुमारे अडीच कोटी दस्तांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. मुंबईव्यतिरिक्त पुणे आणि अन्य जिल्ह्यांतील दस्तांच्या स्कॅनिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्य सरकारने उद्योगांना पायघड्या घालण्यासाठी सुधारित धोरण आणले आहे. या दस्तांचे स्कॅनिंग हे नव्या उद्योग धोरणालाही पोषक राहणार असून ते 'इज ऑफ डुइंग बिझनेस'साठीही फायदेशीर ठरणार आहे. जमीन, फ्लॅट व दुकानांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार होतात. एकच जमीन वा फ्लॅट अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा व्यवहारांमध्ये खरेदीदारांची आर्थिक फसवणूक होते. हे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नोंदणी विभागाने 'ई-सर्च' प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. 'ई-सर्च'वर फेब्रुवारी २००२पासून नोंदणी झालेल्या दस्तांची माहिती उपलब्ध होती. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. 'ई-सर्च'वर मागील तीस वर्षांचे दस्त उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दररोज साधारणतः पाच हजार दस्तांची नोंदणी होते. ही दस्त नोंदणी करताना एकच फ्लॅट व जमिनीची फेरविक्री होत असल्याची माहिती उपलब्ध होत नाही. 'ई-सर्च'मुळे यापूर्वी संबंधित जमीन वा फ्लॅटची खरेदी-विक्री झाली किंवा कसे याची माहिती मिळू शकणार आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयांत नोंद झालेल्या सुमारे पाच कोटी दस्तांच्या स्कॅनिंगचे काम सुरू आहे. 'इज ऑफ डुइंग बिझनेस'साठी या प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी मुंबईमधील दस्तांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. मुंबईशिवाय अन्य जिल्ह्यातही दस्तांच्या स्कॅनिंगचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना जुने दस्त पाहता येणार आहेत. यासंदर्भात पुढील आठवड्यात एक बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरिक्षक डॉ. एन. रामास्वामी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विविध देशांच्या प्रतिनिधींनी अनुभवला वारसा

$
0
0

Prasad.Pawar @timesgroup.com

पुणे : 'ज्याचे आरमार त्याचा समुद्र' ही उक्ती प्रमाण मानून परकीयांना धाक बसविणारे मराठी आरमार आणि गडकोटांचा वारसा जगातल्या ३९ देशांच्या प्रतिनिधींनी नुकताच अनुभवला. महाराष्ट्रातील गडकोट जागतिक वारसा स्थळ व्हावेत, यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांतले हे पहिले पाऊल केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सदस्या डॉ. शीखा जैन यांच्या प्रयत्नांनी उचलले गेले आहे.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे 'मौसम' या विशेष परिषदेसाठी विविध देशांचे प्रतिनिधी नुकतेच दिल्लीत आले होते. डॉ. शीखा जैन यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सागरी दुर्ग, इतिहासातील त्यांचे स्थान, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी, परकीय सत्ताधीशांचा या गडकोटांशी आलेला संबंध आणि जगाच्या इतिहासावर झालेले त्याचे परिणाम अशा विविध पैलूंच्या माध्यमातून या गडकोटांची माहिती या प्रतिनिधींना दिली. जागतिक वारसा म्हणून हे गडकोट जगभरात पोहोचावेत, आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी त्यांची दखल घ्यावी, या स्पर्धेत आपल्या वारशाला पाठिंबा मिळावा या हेतूने हा संवाद झाला. कोणत्याही ठिकाणाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याची स्पर्धा आणि तिचे निकष अतिशय काटेकोर आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील गडांचा संबंध व्यापार आणि राजकारणाच्या निमित्ताने शिवकालातच थेट इंग्लंड, पोर्तुगाल, फ्रान्स या देशांशी आला आहे.
जगभरातील प्रतिनिधींना या गडांची माहिती मिळाल्यास त्यांचा आणखी प्रचार आणि प्रसार होणार आहे. जागतिक वारसा म्हणून इतर देशांशी इतिहासापासून आलेला या गडांचा संबंध अधिक ठळकपणे अधोरेखित होणार आहे. जागतिक वारसा म्हणून गडकोटांबाबत काम करण्याची ही अतिशय प्राथमिक पायरी आहे. मात्र, गडांच्या नामांकनाबाबतही इतरांना आत्तापासून माहिती व्हावी, यासाठी विविध देशांचे विशेष प्रतिनिधी तसेच राजदूत यांच्याशी याबाबत संवाद साधून त्यांना गडकोटांची माहिती दिल्याचे डॉ. शीखा जैन यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. युनेस्कोने 'ट्रान्स नॅशनल हेरिटेज' ही नामांकनाच्या विभागात नवी कॅटेगरी आणली आहे. त्यामुळे यापूर्वी जागतिक वारसास्थळांच्या नामांकनासाठी तयार केलेल्या यादीत भरपूर ठिकाणे असली; तरी या नव्या कॅटेगरीत गडकोटांना नामांकन देणे शक्य होणार आहे. वारशाचा परिणाम एखाद्या ठिकाणापुरता मर्यादित न राहता त्याचे धागेदोरे इतर देशांशीही जोडलेले असतात, त्यामुळे अशा स्थळांसाठी 'ट्रान्स नॅशनल हेरिटेज' ही नवा विभाग युनेस्कोने तयार केला आहे.

'मौसम' परिषदेचे महत्त्व

जागतिक व्यापारातल्या महत्त्वपूर्ण सागरीमार्ग आणि त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने २०१४ मध्ये दोहा, कतार इथे 'प्रोजेक्ट मौसम' ही परिषद घेतली. भारताचा सागरी किनारा ते इजिप्तचा किनारा, या परिसरातली वारसास्थळे, व्यापार, त्याचा जगाच्या इतिहासावर झालेला परिणाम आदी विविध गोष्टींचा ऊहापोह या परिषदेत झाला. भारतीय उपखंड आणि त्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचा सहभाग जगासमोर या निमित्ताने आला. दिल्लीत झालेल्या या परिषदेच्या पुढच्या सत्रात महाराष्ट्राचे गडकोट जगभरात पोहोचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट’ नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राज्य सरकारच्या 'स्मार्ट सिटी' मोहिमेतूनही पिंपरी-चिंचवड शहराला डावलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश न झालेल्या उर्वरित आठ महापालिकांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र योजना जाहीर केली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश नसल्याने पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या योजनेनंतर ही मोहीम जाहीर केली होती.
केंद्राकडे स्मार्ट सिटी योजनेसाठी प्रस्ताव पाठविताना पुणे-पिंपरी-चिंचवड असा उल्लेख असल्याने पिंपरी-चिंचवड शहर या योजनेतून प्रथम बाहेर फेकले गेले. त्या वेळी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नवी मुंबई, सोलापूर या महापालिकांची शिफारस केली होती. परंतु, केंद्र सरकारने सोलापूर आणि पुणे महापालिकेचा प्रस्तावच मंजूर केला होता. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र सरकार महापालिकांना शंभर कोटी रुपयांचा निधी देणार आहे. त्यामुळे अन्य फेरनिवड न झालेल्या शहरांसाठी राज्य शासनाच्या महामंडळांकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार होता. त्याकरिता योजना जाहीर झाली. त्यानंतर या मोहिमेसाठी महापालिकांमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार होते. राज्य सरकारच्या स्तरावर त्याबाबत विविध बैठका झाल्यावर अखेर दहापैकी आठ शहरांची यादी जाहीर करण्यात आली.
त्यापैकी मुंबई व नवी मुंबई आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे निरीक्षण नोंदवून सरकारने या शहरांमध्ये स्वतःच्या निधीतून ही मोहीम राबवावी, असे आदेशात नमूद केले आहे. तर, अन्य सहा शहरांसाठीचा आर्थिक भार एमएमआरडीए आणि सिडकोवर टाकण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेला एमएमआरडीए शंभर कोटी रुपयांचा निधी देणार आहे, तर नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावतीला सिडकोच्या माध्यमातून निधी दिला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेसाठी शहरांची शिफारस करताना पिंपरी-चिंचवडचा स्वतंत्र उल्लेख करणे नितांत गरेजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. आता राज्य शासनाने 'अभियान' राबविण्याबाबत निर्णय जाहीर करताना पुणे आणि सोलापूरचा समावेश केंद्र सरकारच्या योजनत झाल्याचे सांगून पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून, त्यामुळेच हा निर्णय झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. तसेच, शहराचा विकास करण्यासाठी तरी राजकारण बाजूला ठेवावे अशी माफक इच्छा नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

स्मार्ट सिटी योजनेत सहभागी न झालेल्या शहरांसाठी राज्य सरकारने ही योजना लागू केली. त्याचा पहिला टप्पा आत्ता जाहीर झाला आहे. शहराचा त्यात समावेश नसला, तरी तो पुढील टप्प्यात होऊ शकतो. त्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत.
- दिनेश वाघमारे, महापालिका आयुक्त पिंपरी-चिंचवड
भाजप केवळ दिशाभूल करीत आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहेत. त्यामुळे जाणूनबुजून शहराला प्रत्येक विकासात्मक गोष्टींमधून डावलले जात आहे. पक्षीय वादातून सामान्यांचे नुकसान होत असून, भाजप विकासालाच खीळ घालत आहे. दिखाव्यापलीकडे सरकार काहीच करीत नाही.
- राहुल भोसले, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड
शहराला योजनेत सामावून घेणे आवश्यक होते. तो हक्क होता. परंतु, केवळ राजकीय आकसापोटी पिंपरी-चिंचवड शहराला डावलले जात आहे. मात्र, आम्ही शहराचा विकास करण्यास सक्षम आहोत. - संजोग वाघेरे-पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्ग अपघातांचा अहवाल मागविला

$
0
0

रस्ते वाहतूक मंत्रालय करणार उपाययोजना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय महामार्गांवर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणांचा अभ्यास करून, आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने महामार्ग प्राधिकरणाच्या देशभरातील विभागीय कार्यालयांकडून अहवाल मागविला आहे.
देशभरातील रस्ते अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातांची व अपघाताली मृतांची संख्या कमी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गांचे अहवाल मागविले आहेत. यामध्ये महामार्गांवरील सातत्याने अपघात होणारी ठिकाणी, अपघातांची कारणे याचा अभ्यास करून अहवाल देणे अपेक्षित आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. मंत्रालयाकडून रस्ता सुरक्षा व अंमलबजावणी, वाहनातून होणारे उत्सर्जन, जड वाहने व हलकी वाहने यासाठी प्रत्येकी एक तज्ज्ञ सल्लागारही नेमण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे-बेंगळुरू महामार्गावर पुणे ते साताऱ्या दरम्यान प्रारूप आराखड्यात नमूद असलेली सर्व कामे झाली आहेत. मात्र, त्यानंतर लोकहितासाठी किंवा स्थानिक आवश्यकतेनुसार मंजूर करण्यात आलेली काही कामे अपूर्ण आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. त्यास एक महिना झाला आहे. उरलेल्या पाच महिन्यात ती कामे पूर्ण झाली नाहीत, तर संबंधित कंत्राटदाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
--------
पुलाचा प्रश्न सुटणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या आराखड्याला प्राधिकरणाने मान्यता दिली होती. आता त्या पुलासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. लवकरच पुलाचा विषय मार्गी लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
--------
'रिंग रोडचे काम प्राधिकरणाकडे द्यावे'
पुणे-पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या रिंगरोडचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपवावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्य रस्ते विकास महामंडळाला करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, पालखी मार्ग, सांगली-कोल्हापूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. येत्या काळातही महाराष्ट्रातील अधिकाधिक महत्त्वाचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथिंबीर, मेथी @ ३० रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाअभावी पाणीटंचाईचे असणारे सावट, पालेभाज्यांची घटलेली आवक, या पार्श्वभूमीवर पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. पालेभाज्यांसोबत फ्लॉवर, कोबी, शेवगा, घेवडा टोमॅटो महागल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.
मार्केट यार्डात फळभाज्यांसह पालेभाज्यांची कमी प्रमाणात आवक झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने पालेभाज्यांचे उत्पादन घटले आहे. मे महिन्यापासून पालेभाज्या तेजीत आहेत. मे महिन्याच्या तुलनेत रविवारी पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले. रविवारी मार्केट यार्डात एक लाख कोथिंबिरीच्या, तर ३५ हजार मेथींच्या जुडींची आवक झाली.
'पाऊस नसल्याने तसेच आवक घटल्यामुळे पालेभाज्यांचे दर तेजीत राहिले आहेत. त्यामुळे सामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कोथिंबीर, मेथीच्या एका गड्डीला ३० ते ३२ रुपये मोजावे लागत आहेत. तर, कांदापात ४५ ते ५० रुपयांवर पोहोचली आहे. मुळा तसेच पालकच्या गड्डीला २० ते २५ रुपये दर मिळत आहे,' अशी माहिती भाज्यांचे किरकोळ व्यापारी सचिन काळे यांनी दिली. घाऊक बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. दहा किलो कांद्याला ८० ते १२० रुपये दर मिळाला आहे. शेवग्याला ८०० ते १००० रुपये तसेच, ढोबळी मिरचीला दहा किलोसाठी ६०० ते ७०० रुपये दर मिळाला आहे.
सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. एकीकडे शाळेचा खर्च पेलताना त्यात वाढत्या महागाईचा भार पडल्याने सामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
..
भाज्यांचे भाव
भाजी किलोचे, गड्डीचे दर (रुपये)
कोथिंबीर ३० ते ३२
मेथी ३० ते ३२
कांदापात ४५ ते ५०
चाकवत १८ ते २०
करडई १८ ते २०
पुदिना ८ ते १२
अंबाडी ८ ते १२
पालक २० ते २५
मुळा २० ते २५
कांदा १८ ते २०
टोमॅटो ७० ते ७५
शेवगा १०० ते १०५
घेवडा १०० ते १०५
फ्लॉवर ६५ ते ७०
कोबी ५० ते ५५
ढोबळी मिरची ८५ ते ९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस-वे’वर तीस मिनिटांचे ब्लॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वरील खंडाळा (बोरघाट) घाटातील आडोशी बोगद्यावरील व परिसरातील धोकादायक दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम २२ व २३ जूनला हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी एक्स्प्रेस वेवर पहिले दोन तास प्रत्येकी १५ मिनिटांचे व नंतरचे दोन तास प्रत्येकी ३० मिनिटांचे चार ब्लॉक घेतले जाणार आहे. त्या दरम्यान, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या तिन्ही लेन बंद ठेवल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर १९ व २२ जुलैला एक्सप्रेस वेवरील खंडाळा व आडोशी बोगद्याजवळ मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. या दोन्ही दुर्घटनांत तीन प्रवांशाचा मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले होते. या दोन्ही परिसरांत एका महिन्यात पाच ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणे असुरक्षित बनले होते. या पार्श्वभूमीवर रस्ते विकास महामंडळाने खबरदारी घेऊन खंडाळा ते आडोशी बोगदा परिसरातील सुमारे आठ किलोमीटर परिसरातील धोकादायक ठिकाणे निश्चित करून त्या धोकादायक ठिकाणांच्या सैल झालेल्या दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला गेल्या वर्षी २७ जुलैला सुरुवात करण्यात आली होती.
एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्यावरील परिसरातील सैल झालेल्या धोकादायक दरडी हटविणे आणि संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाचा दुसरा टप्पा २२ व २३ जून रोजी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही दिवशी १५ व ३० मिनिटांचे चार ब्लॉक घेण्यात येणार असून दुपारी १२ ते १२.१५ पहिला, एक ते सव्वा दुसरा ब्लॉक आणि दोन ते अडीच व तीन ते साडेचार या दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. दरडी हटविण्याच्या कालावधीत वाहतूक थांबविण्यात येणार असून, कामानंतर मार्गावरील दरडीचा राडारोडा साफ केल्यानंतर थांबविण्यात आलेली वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याचे माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. प्रवाशांनी दोन्ही दिवस सहकार्य करावे, असे आवाहन महामार्गाचे वाहतूक पोलिस निरीक्षक अजय बारटक्के यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images