Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांवर बाधा

$
0
0

महापालिकेच्या अहवालात शिक्कामोर्तब; त्रिसदस्यीय समितीच्या ४२ शिफारसी म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नसून, त्यांच्या वेतनातून कापण्यात येणाऱ्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कामगार विमा (ईएसआय) या लाभांपासूनही त्यांना वंचित ठेवण्यात येत असल्यावर गुरुवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांकडून याबाबत तक्रारी केल्या जात होत्या; पण त्याकडे कानाडोळा केला जात होता. मात्र, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालातच ठेकेदारांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवश्यक लाभ दिले जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुमारे पाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांकडील माहिती संकलित करून जगताप समितीने तब्बल ४२ शिफारसींचा विस्तृत अहवाल सादर केला आहे. यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा प्राधान्याने विचार करण्यात आला असून, त्यांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांवरना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली आहे; तसेच विविध विभागांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती विभागप्रमुखांनी करून घेणेही बंधनकारक करण्यात आले असून, सर्वांनी त्याचा सविस्तर अहवाल दरवर्षी १५ सप्टेंबरपर्यंत महापालिका आयुक्तांना सादर करावा, असे बंधन घालण्यात आले आहे. जगताप यांच्यासह दक्षता विभागाचे उपायुक्त डॉ. उदय टेकाळे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मंगेश जोशी यांचा या समितीमध्ये समावेश होता. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करताना राबविण्यात येणारी निविदा प्रक्रियाही सदोष असल्याने त्याचे वेळापत्रक कसे असावे, याचाही उल्लेख या अहवालामध्ये करण्यात आला आहे; तसेच निविदेचा कालावधी संपण्यापूर्वी तीन महिने आधीच पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी पुरविणाऱ्या ठेकेदारांची नोंदणी करण्यात येते, त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जावी. तसेच, त्यांना देण्यात येणारे सर्व लाभ दर महिन्याला जमा होतात ना, यावर विभागप्रमुखांनी देखरेख करावी, अशी शिफासही या अहवालात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या शिफारसी किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नसेल, तर कंत्राट रद्द करावे किमान वेतन न देणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात यावी दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे दर आठवड्याला एक भरपगारी सुट्टी दिली जावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय कामगार अधिकारी नियुक्त केला जावा

विविध कायद्यांनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा दिल्या जातात का, याची तपासणी करण्यात आली. त्यावर आधारित वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.' राजेंद्र जगताप, अतिरिक्त महापालिका आयुक्त

कर्मचाऱ्यांऐवजी वर्गीकरण महत्त्वाचे महापालिकेच्या विविध अहवालांवर गुरुवारी खास सभा घेण्यात आली होती. या सभेमध्ये हा अहवाल मांडण्यात आला होता. परंतु, गणसंख्येअभावी ही सभाच तहकूब केली गेली. त्यानंतर, जूनची मासिक सभा सुमारे तासाभराहून अधिक काळ चालली. या सभेमध्ये वर्गीकरणाचे विषय असल्याने त्याला आवश्यक संख्याबळ सभागृहात उपस्थित होते. त्यामुळेच, कर्मचाऱ्यांच्या हितापेक्षा वॉर्डातील वर्गीकरणे अधिक महत्त्वाची असल्याची चर्चा पालिकेत रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अश्विनी कदम यांना आवश्यक तो निधी देणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांना आवश्यक असलेला वॉर्डस्तरीय निधी दिला जाईल, असे महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यांनी मागणी केल्यानंतर महापौरांच्या अधिकारात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जगताप यांनी सांगितले. महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी स्थायी समिती अध्यक्षा कदम यांना अंधारात ठेवून त्यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून ६४ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले होते. यावर वाद होऊ नये, यासाठी तातडीने हा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयत्यावेळेस आणून हे प्रस्ताव दाखल मान्यही करण्यात आले. कदम यांना अंधारात ठेवून करण्यात आलेल्या वर्गीकरणाचे जोरदार पडसाद गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेविकांनी एकत्र येऊन सभागृह नेते, महापौर यांच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देत सभागृहात आंदोलन केले होते. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या या वर्गीकरणाबद्दल राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त करत झालेल्या प्रकाराचा निषेध केला होता. राष्ट्रवादीच्या महिला सभासदांनी सभागृह नेत्यांसह सर्वच पक्षांचे गटनेते या फसवणुकीला जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावरही याचे खापर फोडले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर यांनी सभागृह नेत्यांना दोष देत त्यांचा निषेध केला होता. याबाबत महापौर जगताप यांना विचारले असता, ते म्हणाले, 'झालेल्या प्रकारामध्ये कोण जबाबदार आहे, याच्या खोलात जाण्याची मला इच्छा नाही. कदम यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांना विकास कामांसाठी आवश्यक असलेला निधीची मागणी करावी, महापौरांच्या अधिकारात त्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. सभागृह नेते, सर्वपक्षीय गटनेते यांच्याशी चर्चा करून कदम यांना निधी दिला जाईल,' असेही महापौर जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसएनडीटी प्राचार्यांच्या नियुक्तीचा वाद कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातील एसएनडीटी आर्टस, कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्य नियुक्तीच्या वादामध्ये थेट राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याची ओरड सध्याच्या प्राचार्यांनी केली आहे. सध्याच्या प्राचार्यांनी या विषयी हाय कोर्टात याचिका दाखल करून प्राचार्यपदाला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे सध्याचे प्राचार्य वैयक्तिक स्वार्थासाठी हा प्रकार करत असल्याने त्यांना पदावरून हटविण्याची मागणी भारतीय शिक्षक महासंघाने केली आहे. याविषयी महासंघाचे प्रतिनिधी धनंजय कुलकर्णी यांनी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराबाबत माहिती देताना कुलकर्णी म्हणाले, 'कॉलेजचे सध्याचे प्राचार्य डॉ. जी. वाय. शितोळे यांची प्राचार्यपदाची मुदत ३१ मे रोजी संपल्याने ते निवृत्त होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना प्राचार्य म्हणून काम करण्याची इच्छा असल्याने, त्यांनी हे पद अद्याप सोडलेले नाही. गेल्या काही काळामध्ये प्राचार्य पदावर नव्याने नियुक्ती करण्यासाठी विद्यापीठाने दोन वेळा मुलाखती घेतल्या. पहिल्या मुलाखतीत पात्र ठरलेल्या काही उमेदवारांना दुसऱ्या मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्याचा प्रकार या दरम्यान घडला. त्यामुळे दुसऱ्या मुलाखतीसाठी अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी त्याविरोधात थेट विद्यापीठ आणि कुलपती या नात्याने राज्यपाल कार्यालयाकडेही तक्रार केली. त्यानंतर या विषयीची सूत्रे हलल्याने दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती तातडीने झाल्या.' दरम्यानच्या काळात डॉ. शितोळे यांनी त्याविरोधात थेट हाय कोर्टात याचिका दाखल करत या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. कोर्टाने विद्यापीठाला प्राचार्य नियुक्तीची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, नव्याने प्राचार्यांची नियुक्ती होईपर्यंत डॉ. शितोळे यांनाच प्राचार्य राहण्याची मुभा दिली आहे. मात्र, आता नव्याने प्राचार्य रुजू होण्यासाठी इच्छुक असतानाही प्राचार्य शितोळे आपले पद सोडण्यास तयार नाहीत. म्हणून या प्रकाराविरोधात कुलगुरूंकडे तक्रार केल्याचेही कुलकर्णी यांनी नमूद केले. या विषयी डॉ. शितोळे यांना विचारले असता ते म्हणाले, 'या बाबतीत माझ्यावर अन्याय होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तत्कालीन विद्यापीठ प्रशासनाला विश्वासात घेतले होते. शिक्षणमंत्री किंवा प्राचार्य होण्यासाठीचे इच्छुक उमेदवार यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक आकस वा वाद नाही. यापूर्वीच्या विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्यपदासाठी मुदतवाढ दिल्याविषयी अनुकूलता दर्शविली होती. त्यानुसार मुलाखतींची प्रक्रियाही सुरू केली होती. मात्र प्रशासनामध्ये बदल झाल्यानंतर त्या विषयीच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे मग नाईलाजाने मे महिन्यात आवाज उठवला.' या दरम्यानच्या काळात कोर्टाने पुढील आदेश मिळेपर्यंत प्राचार्य पदावर कार्यरत राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील तारखेपर्यंत पदावर कार्यरत राहणार असल्याचेही डॉ. शितोळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका-कॅन्टोन्मेंट वादामुळे पाइपलाइन योजनेत विघ्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे कॅनॉलमधून घेतल्या जाणाऱ्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी पर्वती ते कॅन्टोन्मेंट पाण्याच्या टाकीपर्यंत बंद पाइपलाइन टाकण्याच्या योजनेमध्ये विघ्न निर्माण झाले आहे. बंद पाइपलाइन टाकण्यासाठी आवश्यक असलेली रस्ते खोदाई करण्यासाठी महापालिकेने कॅन्टोन्मेंट बोर्डाला खोदाई शुल्कापोटी ९२ लाख ४० हजार रुपये द्यावेत, त्यानंतरच कामाला मान्यता दिली जाईल, असे पत्र बोर्डाच्या प्रशासनाने पालिकेला पाठविले आहे. महापालिकेची कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे पाणीपट्टीपोटी तब्बल ११ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी असल्याने यामधून ९२ लाख रुपयांचे खोदाई शुल्क वळते करून घ्यावे, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्रासाठी कॅनॉलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कॅनॉलने पाणी घेताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. यावर उपाय म्हणून पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते कॅन्टोन्मेंट केंद्र या दरम्यान बंद पाइपलाइन टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्च येणार आहे. अनेक महिने हा प्रस्ताव जलसंपदा खात्याकडे प्रलंबित राहिल्याने रखडला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी जलसंपदा विभागाने याला हिरवा कंदिल दाखविल्याने या कामाला काही प्रमाणात वेग आला होता. गेल्या महिन्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्वती ते कॅन्टोन्मेंट केंद्रापर्यंत पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. या प्रकल्पामुळे अर्धा टीएमसी पाण्याची बचत होणार असल्याचे हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पर्वती ते कॅन्टोन्मेंट केंद्र अशी साडेसहा किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकली जाणार आहे. सुमारे २२०० मिलीमीटर व्यासाची ही पाइपलाइन असणार आहे. सोलापूर रोडवरील धोबी घाट ते कॅन्टोन्मेंट पाणीपुरवठा केंद्र हा भाग कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत आहे. त्यामुळे येथे रस्ते खोदाई करून पाइपलाइन टाकली जाणार आहे. रस्ते खोदाई करून त्यानंतर त्याची संपूर्ण डागडुजी करण्याची भूमिका पालिकेने घेतली आहे. मात्र असे असतानाही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत पालिका रस्ते खोदाई करणार असल्याने त्यांच्याकडून बोर्डाने खोदाई शुल्क घ्यावे, त्यानंतरच त्यांना काम करण्यास मंजुरी द्यावी, अशी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे रस्ते खोदाईपोटी पालिकेने बोर्डाकडे ९२ कोटी ९४ लाख रुपये शुल्क भरावे, असे पत्र पालिकेला पाठविले आहे. बोर्डाकडे पालिकेची तब्बल ११ कोटी ९६ लाख रुपयांची थकीत पाणीपट्टी आहे. या थकबाकीमधून रस्ते खोदाईचे शुल्क वळते करून घ्यावे, असे पत्र महापालिकेने तयार केले आहे. महापालिका प्रशासनाने अशी भूमिका घेतली असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका विरुद्ध कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यामध्ये निर्माण झालेल्या वादावर तोडगा निघणार नाही, तोपर्यंत हा प्रकल्प रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे असलेली पालिकेची थकीत पाणीपट्टी

वर्षे थकीत रक्कम २०१२ १३ ४ कोटी १८ लाख ८७ हजार १०१३ १४ ३ कोटी १४ लाख ८५ हजार २०१४ १५ ३ कोटी ५८ लाख ५५ हजार २०१५ १६ ५ कोटी ०४ लाख २२ हजार एकूण १५ कोटी ९६ लाख ४२ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अश्विनी कदम यांना आवश्यक तो निधी देणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांना आवश्यक असलेला वॉर्डस्तरीय निधी दिला जाईल, असे महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यांनी मागणी केल्यानंतर महापौरांच्या अधिकारात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जगताप यांनी सांगितले. महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी स्थायी समिती अध्यक्षा कदम यांना अंधारात ठेवून त्यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून ६४ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले होते. यावर वाद होऊ नये, यासाठी तातडीने हा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयत्यावेळेस आणून हे प्रस्ताव दाखल मान्यही करण्यात आले. कदम यांना अंधारात ठेवून करण्यात आलेल्या वर्गीकरणाचे जोरदार पडसाद गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेविकांनी एकत्र येऊन सभागृह नेते, महापौर यांच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देत सभागृहात आंदोलन केले होते. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या या वर्गीकरणाबद्दल राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त करत झालेल्या प्रकाराचा निषेध केला होता. राष्ट्रवादीच्या महिला सभासदांनी सभागृह नेत्यांसह सर्वच पक्षांचे गटनेते या फसवणुकीला जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावरही याचे खापर फोडले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर यांनी सभागृह नेत्यांना दोष देत त्यांचा निषेध केला होता. याबाबत महापौर जगताप यांना विचारले असता, ते म्हणाले, 'झालेल्या प्रकारामध्ये कोण जबाबदार आहे, याच्या खोलात जाण्याची मला इच्छा नाही. कदम यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांना विकास कामांसाठी आवश्यक असलेला निधीची मागणी करावी, महापौरांच्या अधिकारात त्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. सभागृह नेते, सर्वपक्षीय गटनेते यांच्याशी चर्चा करून कदम यांना निधी दिला जाईल,' असेही महापौर जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेन्सॉरशिपच्या मुजोरीबद्दल मोठी चळवळ उभी राहावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सेन्सॉरशिपमुळे जे चित्रपट प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकतात, त्या विरोधात केवळ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक लढा देतात आणि आपण त्यांना पाठिंबा म्हणून केवळ टाळ्या वाजवतो. सेन्सॉरशिपच्या मुजोरीबद्दल एक मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केले.

'उडता पंजाब' या चित्रपटाच्या सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावरून सध्या देशभर गदारोळ सुरू आहे. त्या संदर्भात बोलताना पालेकर यांनी सेन्सॉर बोर्डावर टीका केली.

ते म्हणाले, 'सेन्सॉरशिपची मुजोरी काही आजची गोष्ट नाही. वर्षानुवर्षांपासून हे चालत आले आहे. ज्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून विरोध केला जातो, त्याचे लेखक आणि दिग्दर्शक लढा देतात आणि आपण फक्त पाहात राहतो. सेन्सॉरशिपच्या विरोधात आपण लढा का देत नाही, सेन्सॉरशिप हवी की नको यावर चर्चा का होत नाही? गेल्या तीस वर्षांपासून माझा या विरोधात लढा सुरू आहे. लोकचळवळीच्या माध्यमातूनच सेन्सॉरशिपचा मुद्दा खोडून काढला जाऊ शकतो,' असे पालेकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे म्हणाले, 'सेन्सॉरशिप हा केवळ राजकिय मुद्दा झाला आहे. प्रत्येक जण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. अशा गोष्टींवर कधी चर्चा घडत नाही. हे खुळ आजचे नसून घाशीराम कोतवाल या नाटकापासून हे चालत आले आहे. संसदेत जर का शांततेने चर्चा घडू शकत नसेल तर बाहेर का घडेल?, सोशल नेटवर्किंगचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले असताना सेन्सॉरचे किती ठिकाणी लक्ष राहणार याबाबत साशंकता आहे. त्या जोवर चर्चा घडत नाही आणि राजकिय वापर थांबत नाही तोवर हे चालूच राहणार.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुभाष जगताप यांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्राची नासधूस होत असल्याच्या संशयावरून तेथे पाहणी करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. जगताप यांनी भांडणे उकरून काढत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. रेकॉर्डवरील गुंड बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महापालिकेने सहकारनगर येथे सांस्कृतिक केंद्र बांधले आहे. या केंद्राची दोन महिन्यांपूर्वी नासधूस करण्यात आली; तसेच दारे, खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. जगताप महापालिकेचे अधिकाऱ्यांसह या सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाहणीसाठी गेले होते. या वेळी तेथे काही तरुण क्रिकेट खेळत होते. जगताप यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले असता वाद होऊन तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून एक्स्प्रेस सुस्साट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केरळसह कर्नाटकाच्या काही भागात दाखल झालेली मान्सून एक्स्प्रेस सुसाट वेगाने पुढील प्रवास करत आहे. बुधवारी केरळ मुक्कामी असलेला मान्सून गुरुवारी आणखी काही भागात डेरेदाखल झाला आहे. तर पुढील दोन दिवसात मान्सून गोव्यासह कोकणच्या दक्षिण भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे.

दरवर्षी सर्वसाधारणपणे मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पाच जूनला गोवा व कोकणच्या काही भागात दाखल होतो. त्यानंतर दहा जूनपर्यंत मान्सून राज्यभरात दाखल होतो. यंदा मान्सूनचे केरळमधील आगमन आठ जूनपर्यंत लांबले असले, तरी त्याचा पुढील प्रवास मात्र, वेगाने होत आहे. त्यामुळे लवकरच मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मान्सून बुधवारी (आठ जून) केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर हवामान अनुकूल असल्याने गुरुवारीही मान्सूनची आगेकूच सुरूच राहिली. गुरुवारी मान्सून केरळ व तामिळनाडूच्या उर्वरित भागात, कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांश भागात, कर्नाटकचा दक्षिण भाग, बंगालच्या उपसागराच्या मध्याकडील आणखी काही भाग, रायलसीमा व आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीकडील काही भागात दाखल झाला, असे 'आयएमडी'तर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले.

सध्याची परिस्थिती मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे मान्सूनची आगेकूच वेगाने होईल. येत्या ४८ तासात मान्सून कोकण व गोव्याचा दक्षिणेकडील भाग, कर्नाटकचा उत्तरेकडील अंतर्गत भाग, कर्नाटकचा किनारपट्टी व दक्षिणेकडील उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, आंध्रप्रदेश किनारपट्टीचा काही भाग व बंगालच्या उपसागराच्या मध्याकडील आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे, असे 'आयएमडी'तर्फे स्पष्ट करण्यात आले.

आज पावसाची शक्यता

पुण्यात शुक्रवारी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर त्यानंतर पुढील दोन दिवस अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहरातील कमाल तापमान ३३ तक किमान तापमान २४ अंशांच्या आसपासच राहण्याची शक्यता आहे. राज्यात दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी पावसाची तर विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटी वावटळीसह पावसाची शक्यता आहे.

गोव्यात आदर्श परिस्थिती

गेल्या दोन तीन दिवसांपासून कोकणच्या दक्षिण किनारपट्टीसह गोव्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही नोंद झाली आहे. ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल मानली जात आहे. पुढील दोन दिवसात दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण हक्काचेही ऑडिट

$
0
0

Yogesh.Borate @timesgroup.com

पुणे : राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या ऑडिटमुळे उडालेला धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता याच विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) अंमलबजावणीचे ऑडिट करण्यात येणार आहे. महालेखापाल (ऑडिटर जनरल) कार्यालयाने या विषयातील गेल्या सहा वर्षांची माहिती शिक्षण खात्याकडे मागवल्यामुळे संचालनालयातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

'आरटीई'अंतर्गत देण्यात येणारे प्रवेश, तसेच इतर अनेक बाबी गेल्या काही वर्षांत सातत्याने वादग्रस्त ठरल्या आहेत. अनेक शिक्षणसंस्थांनीही या बाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे; मात्र त्याची दखल प्राथमिक शिक्षण विभागाकडून घेतली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर, सहा वर्षांतील 'आरटीई'च्या कार्यवाहीची माहिती ऑडिटर जनरल कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे. अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा नसल्याने 'आरटीई'तील कोणत्याही बाबीचे ऑडिट झालेले नाही. त्यामुळे त्याच्यातील त्रुटींबाबतही फारशी चर्चा झालेली नाही. आता या सहा वर्षांमधील सगळे गोंधळ या निमित्ताने पुढे येण्याची शक्यता असल्याने या योजनेचे विद्यार्थ्यांखेरीजचे 'लाभार्थी' अस्वस्थ झाल्याची चर्चा सुरू आहे.

राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागावर सध्या महालेखापाल कार्यालयाची नजर आहे. या कार्यालयाने यापूर्वीच शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. त्यातच प्राथमिक शिक्षण विभागाकडे अंतर्गत लेखापरीक्षणाची यंत्रणाच नसल्यामुळे महालेखापाल संतप्त झाले होते. त्यांनी आपले आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवले होते. या सर्व प्रकाराला 'महाराष्ट्र टाइम्स'ने वाचा फोडली होती.

प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी येऊनही त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नसल्याची ओरड होत होती. या विभागातील अनेक अधिकारी मनमानी पद्धतीने काम करत असल्याच्या तक्रारी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे या योजनेचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले.

...यांची माहिती मागवली

महालेखापालांनी मागवलेल्या माहितीमध्ये विनाअनुदानित शाळांना दिलेल्या फी परताव्याविषयीचा लेखाजोख्याचा समावेश आहे. तसेच, कायद्याच्या अंमलबजावणीदरम्यान राज्यात शिक्षण घेणाऱ्या बालकांचे हक्क विचारात घेण्यात आले का, त्यासाठी खात्याने काही पावले उचलली का, कायद्याच्या अंमलबजावणीचे सरकारी यंत्रणांमार्फत राज्य पातळीवर मूल्यमापन झाले का, जिल्हा पातळीवर कायद्याच्या अंमलबजावणीविषयी किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचे निराकरण झाले, इतर तक्रारींचे निराकरण न होण्यामागची नेमकी कारणे काय, आदी प्रश्न महालेखापालांनी विचारले आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये बालकामगारांचा काही विचार झाला का, विशेष विद्यार्थ्यांसाठी नेमकी काय पावले उचलली गेली, खात्याने अशा सर्व बाबींसाठी विश्वासार्ह पद्धतीने अधिकृत आकडेवारी गोळा केली आहे का, आदी माहिती विचारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉफ्टवेअर इंजिनीअरचे ‘याड’कॉप्टर

$
0
0

ऑनलाइन गॅजेटखरेदीच्या बहाण्याने १० लाख रुपयांना गंडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पैशांच्या मोहापोटी लोकांना कसे फसवले जाते आणि आपण दक्ष नसल्यास वारंवार फसवणूक कशी होऊ शकते,' याचा अनुभव बालेवाडी येथील सॉफ्टवेअर इंजिनीअरला आला आहे. या इंजिनीअरला क्वाडकॉप्टर हे गॅजेट खरेदी करण्याच्या बहाण्याने दहा लाख रुपयांना फसवण्यात आले आहे. 'नायजेरियन फ्रॉड'मध्ये उच्चशिक्षितही अडकले जात असून, नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बालेवाडी येथे राहणारे अनिल डोके (नाव बदलेले आहे) यांच्याबाबत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अनिल हिंजवडी येथील 'आयटी' कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांना त्यांच्या नोकरीनिमित्त क्वाडकॉप्टर या गॅझेटची आवश्यकता होती. त्यांनी ते 'आरसी इंडिया' या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून समीर लिओनोर्ड (यूएसए) याच्याकडून ४० हजार रुपयांना खरेदी केले होते. त्यापैकी दहा हजार रुपये अनिल यांनी समीरच्या अकाउंटवर भरले.

अनिल यांना काही दिवसांनी फोन आला आणि तुमचे गॅझेट बेंगळुरू येथे कस्टम विभागात अडकले असून, ते सोडवण्यासाठी ९० हजार रुपयांची आवश्यकता आहे, असे त्यांना सांगण्यात आले. अनिल यांनी ते पैसे भरले आणि त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी हा प्रकार त्यांच्या कंपनीतील सहकाऱ्यांना सांगितला. त्यातील एका सहकाऱ्याने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका कथित वकिलाचा ई-मेल आयडी दिला आणि हा वकील तुम्हाला नुकसानभरपाई मिळवून देईल, असे सांगितले.

अनिल यांनी त्या वकिलाशी संपर्क साधला असता, त्याने दोन लाख डॉलर नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याने काही दिवसांनी अनिल यांना फोन केला आणि कोर्टाने एक लाख ७५ हजार डॉलरची भरपाई मंजूर केल्याचे सांगितले. कोर्टाच्या आदेशाचा ई-मेल त्याने अनिल यांना पाठवला. अनिल यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि ही रक्कम मिळवण्यासाठी त्याने सांगितल्यानुसार सहा हजार सहाशे डॉलर त्यांच्या अकाउंटवर भरले. अनिल यांनी त्याच्या अकाऊंटवर पैसे भरले आणि त्यांना डॉलर असलेला बॉक्स पाठवत असल्याचा मेसेज मिळाला.

डॉलर असलेला बॉक्स एक व्यक्ती घरी घेऊन येईल, असे आरोपींनी अनिल यांना सांगितले. त्यांना सहा जून रोजी पहाटे साडेतीन वाजता फोन आला आणि घराचा दरवाजा उघडण्यास सांगण्यात आले. या व्यक्तीने डॉलर असलेला बॉक्स घेऊन आल्याचे सांगितले. लोखंडी लॉक असलेला तो बॉक्स त्याने अनिल यांच्या घरात ठेवला आणि तेथून लगेचच गायब झाला. अनिल यांनी लॉक उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये बनावट डॉलर आणि कागद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सावधानता हवी

'नायजेरियन फ्रॉड'मध्ये उच्चशिक्षितही अडकले जात असून, नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ऑनलाइन माध्यमातून कोणतेही व्यवहार करताना प्रचंड सावधानता बाळगणे जरूरीचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डंपरच्या धडकेने एकाचा मृत्यू

$
0
0

पुणे : भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने माजी पोलिस पाटलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धायरी येथील अभिरूची मॉलसमोर सकाळी दहाच्या सुमारास घडली. गर्दीच्यावेळी हा अपघात झाल्याने रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकरणी डंपर चालकास सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.

मधुकर रामभाऊ तोडकर (वय ४५, रा. यशगंगा, सोसायटी, धायरी फाटा) असे मृत्यू झालेल्या पोलिस पाटलाचे आहे. याप्रकरणी डंपरचालक नौशाद खान महंमद खान याला अटक केली आहे. तोडकर यांचा पुतण्या युवराज दिनकर तोडकर (वय १९) याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर तोडकर हे पानशेत जवळील खामगावचे पोलिस पाटील होते. त्यांचा धायरीमध्ये हनुमान दुग्धालय नावाने दूध विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना गुरुवारीच हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ते पावणेदहाच्या सुमारास वडगावच्या दिशेने उड्डाणपुलाच्या खालून दुचाकीवरून जात होते. अभिरूची मॉलसमोर उड्डाणपुलावरून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये तोडकर हे डंपरच्या चाकाखाली आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फौजदार धुळाजी कोळपे हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एस. पी. कॉलेजचे व्हीजन डॉक्युमेंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पेपरलेस व्यवहार... अॅपद्वारे सर्वांसाठी माहिती... नेतृत्वगुण विकास उपक्रम... सिक्स सिग्मा सर्टिफिकेशन... अॅकेडेमिक ऑडिट... एखाद्या कॉर्पोरेट कंपनीची वैशिष्ट्ये ठरू पाहणाऱ्या या बाबी लवकरच पुण्यातील एस. पी. कॉलेजमध्ये अनुभवता येणार आहेत. त्यासाठी कॉलेजने येत्या दहा वर्षांसाठीचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले असून, येत्या मंगळवारी (१४ जून) त्याचे प्रकाशन होणार आहे.

एस. पी. कॉलेजच्या स्थापनेला येत्या मंगळवारी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या निमित्ताने कॉलेजतर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी कॉलेजने शुक्रवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी शतकोत्तर काळात कॉलेजच्या वाटचालीचा आलेख कायम चढता राहावा, यासाठी कॉलेजने योजलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यातून कॉलेजच्या 'व्हिजन डॉक्युमेंट'चा मुद्दा समोर आला. शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सदस्य केशव वझे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी या उपक्रमांची माहिती दिली.

कॉलेजच्या शतकपूर्तीनिमित्त मंगळवारी सकाळी कॉलेजमध्ये 'शतजन्म शोधताना' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कॉलेजची इमारत उभी राहण्यामागे लोकमान्य टिळक, जगन्नाथ महाराज पंडित आणि सर परशुरामभाऊ पटवर्धन यांनी त्या काळी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले. याची जाणीव ठेवत या तिन्ही कुटुंबीयांमधील वारसांचा प्रातिनिधिक सत्कारही या वेळी करण्यात येईल. तसेच, कॉलेजच्या कलामंडळाच्या विद्यार्थ्यांचा 'कलाविष्कार' हा विशेष कार्यक्रमही मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. शेठ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय पोलिस बँड स्पर्धेचे उद्घाटन

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे वाद्ये वाजवण्याची शैली...वाद्य वाजवत चालतानाची लकब...वाद्ये वाजवताना एखादी जागा घेण्याची अचूक वेळ...आणि वेशभूषा...अशा विविध निकषांवर ताल धरू लागलेली अखिल भारतीय पोलिस बॅँड स्पर्धेचे मोठ्या धामधुमीत उद्घाटन झाले. रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर अखिल भारतीय पोलिस बॅँड स्पर्धा सुरू झाली आहे. १७ राज्यातील विविध पोलिस दलातील २६ संघ या स्पर्धेसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. सिक्कीम येथील महिला पोलिसांच्या बॅँड पथकाने उपस्थितीतांची मने जिंकली. राज्याराज्यातील बॅँड संघानी उद्घाटनच्या दिवशीच केलेले प्रदर्शन पुणेकरांसाठी पुढील चार दिवस मेजवानी ठरणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, ​पिंपरी-चिंचवडच्या महौपार शकुंतला धराडे, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, लेफ्टनंट जनरल बिपीन रावत, पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासमवेत पोलिस दलातील विविध अधिकारी या वेळी उपस्थित होते. पाइप बँड, ब्रास बॅँड आणि बिगुल अशी तीन स्तरांवर ही स्पर्धा होणार आहे. पाइप बॅँडमधील स्पर्धा हे या वेळी मुख्य आकर्षण ठरणार आहे. दिल्लीस्थित असलेल्या अखिल भारतीय पोलिस स्पोर्ट‍्स बोर्डाकडून दोन महिने आधी स्पर्धेसाठी मार्चिंग ट्यून 'म्युझिक कोड'मध्ये पाठवण्यात येतात. या टोन सर्व संघांनाही पाठवल्या जातात. या टोनचा सराव करून सर्व संघ प्रदर्शनासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. पाइप बॅँड वाजतविताना त्यावर करण्यात येणारे फॉर्मेशन बघण्यासारखे असतात. संगीताच्या तालावर डोलत वाजवत चालणारा पोलिस कर्मचारी या फॉर्मेशनचा केंद्रबिंदू असतो. अचूक ताल, लय आणि वेशभूषा या निकषांवर पात्र होण्यासाठी सर्व २६ संघ तयार झाले आहेत. ब्रास बॅँडसाठी तीन ट्यून देण्यात आल्या असून, त्यामध्ये खुर्चीवर बसून साजरा करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी ओव्हरट्यूर (विल्यम टेल) ही ट्यून देण्यात आली आहे. त्याबरोबर क्विक मार्चसाठी गोल्डन ज्युबली अॅँड ऑन द क्वॉर्टर डेक, स्लो मार्चसाठी ट्रूप पेगेंट्री ही ट्यून देण्यात आली आहे. पाइप आणि ड्रम बॅँडसाठी सहा ट्यून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पोट्री बे, द, कॅप्टन नार्मन, द स्काय गॅदरिंग, कटी वेडिंग, द बॉल दॅट वॉज इन ओबॅन या ट्यून देण्यात आल्या आहेत. बिगूल स्पर्धेसाठी जनरल सॅल्यूट, रिट्रिट, टॅटू फस्ट पोस्ट असे विविध दहा ट्यून देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रायोगिक रंगभूमीला हक्का जागा हवी’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे 'बालनाट्य आणि प्रायोगिक रंगभूमीला हक्काची जागा मिळावी ही प्रायोगिक नाटकांसाठी आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल,' अशा अपेक्षा चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील दिग्गजांनी व्यक्त केल्या. अखिल भारतीय नाट्य परिषद, पुणे शाखेच्या वतीने सुलभा देशपांडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनेक दिग्गजांनी सुलभाताईंच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे, अमोल पालेकर, अनंत कान्हो, ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग, सुषमा देशपांडे, ज्येष्ठ दिग्दर्शक श्रीनिवास भणगे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. सुलभा देशपांडे यांनी कायम प्रायोगिक नाटकांची चळवळ मोठी व्हावी यासाठी प्रयत्न केले. छबिलदास चळवळ त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. केवळ अभिनयाच्या ताकदीवर नाटक कसे उभे राहू शकते याचा त्या एक वस्तूपाठ होत्या, अशा भावना या वेळी सर्वांनी व्यक्त केल्या. त्यांच्या 'शांतता कोर्ट चालू आहे' या चित्रपटाने तर त्यांच्या अभिनयाला एक वेगळीच कलाटणी दिली. सुलभाताईंचा हसरा स्वभाव, प्रसंगी मिश्किल विनोद करण्याची त्यांची लकब अशा अनेक आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृतीयपंथीयांचे प्रश्न कायम : डॉ. श्रीपाल सबनीस यांची टीका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे 'देशात स्वातंत्र्य आहे, पण शारीरिक संबंधांवर बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. याबाबतीत मोकळेपणा नसल्यामुळे राम अवतारापासून मोदी अवतारापर्यंत तृतीयपंथीयांचे प्रश्न कायम आहेत,' अशा शब्दांत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी हल्ला चढवला. 'तृतीयपंथीयांना माणूस म्हणून जगता येत नसेल तर कायदा, व्यवस्था व सरकार यांच्या सेन्सॉरशीपचा उपयोग नाही,' अशी टीका त्यांनी केली. आडकर फाउंडेशनतर्फे सूर्यकांत तिवडे यांच्या 'तृतीयपुरुषी शून्य वचनी' या पुस्तकाचे प्रकाशन सदानंद शेट्टी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रा. डॉ. मनोहर जाधव, सलमा खान, फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, लेखक तिवडे उपस्थित होते. 'आज सगळीकडे विकास होत असला तरी तृतीयपंथीयांचे प्रश्न मात्र कायम आहेत. ते आजही रामराज्याची वाट पाहात आहेत. कॅन्सरवर औषध निघाले, एका शहरातून दुसऱ्या शहरात अवयव नेले जातात, अशा काळात तृतीयपंथीयांच्या बाबतीत विज्ञानाने उत्तर दिलेले नाही. देव, संस्कृती, समाज, माणूस, विज्ञान हे सर्व तृतीयपंथीयांच्या बाबतीत करंटे आहेत,' अशी टीका डॉ. सबनीस यांनी केली. 'तृतीयपथीयांमध्ये त्यांची स्वत:ची अस्मिता आहे, ती आपण आपल्या माणूसपणाच्या जाणिवेत जोडणार का,' असा सवाल उपस्थित करत सबनीस म्हणाले, 'तृतीयपंथीयांना स्वातंत्र्य आहे; पण त्यांच्या जगण्याचा प्रश्न कायम आहे. त्यांना जगण्यासाठी सरकारने जमीन व रोजगार द्यायला हवा. समाज त्यांचा उपभोग घेत असल्याने जगाच्या संस्कृतीपुढे तृतीयपथीयांचा प्रश्न कायम आहे,' याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'जन्म हा व्यक्तीचा दोष कसा असा, सवाल उपस्थित करून मानवी मूल्यांमध्ये बसणार नाहीत, अशी पद्धत भारतीय समाजात असून ती भयंकर आहे,' अशी टीका प्रा. जाधव यांनी केली. सूत्रसंचालन रूपाली अवचरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीवनदायी योजनेच्या नावाला विरोध

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, हडपसर राज्य सरकारने गेले अनेक वर्षे सुरू असलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून त्याला महात्मा फुले यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला असून याला माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी विरोध केला आहे. 'सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून, राजीव गांधी यांच्यासारख्या आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा अवमानच करण्याचा हा निंदनीय प्रकार आहे. मुळात काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे नाव बदलण्यास या सरकारला अधिकार नाही. सरकारने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने दुसरी एखादी मोठी स्वतंत्र योजना सुरू करून त्यांना अभिवादन करावे. राजीव गांधी जीवनदायी योजना ही गरीब व शहरी मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत उपयुक्त योजना ठरली आहे. त्याचा लाभ असंख्य रुग्णांना झाला आहे. हजारो शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून पार पडल्या आहेत. त्या योजनेच्या नावातून राजीव गांधीचे नाव बदलणे पूर्णतः अनाठायी आणि अन्यायकारक आहे. युती सरकारने इतिहासातून गांधी, नेहरूंचे नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न केंद्रीय पातळीवरून हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील जीवनदायी योजनेला देण्यात आलेले राजीव गांधीचे नाव बदलणे हा याचाच एक भाग आहे,' असा आरोपही शिवरकरांनी निवेदनात त्यांनी केला आहे. 'सरकारला आम्ही असे करू देणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला आहे. 'युती सरकारने महात्मा फुले यांच्या नावाने गरीब लोकउपयोगी स्वतंत्र योजना सुरू करावी,' अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल सौंदर्य टिपतो तेव्हा...

$
0
0

पुणे टाइम्स टीम

प्रवासात सहज म्हणून काढलेले फोटो, तेही मोबाइलवर... सर्वसामान्यपणे हे फोटो भटकंतीवरून परतून घरी आल्यानंतर कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना दाखवले जातात. मात्र, मोबाइलवर काढूनही पिक्सेल न फाटणाऱ्या अप्रतिम फोटोंचं मोठ्या प्रमाणावर चक्क एक प्रदर्शनच एका व्यक्तीनं भरवलं आहे.

समर्थ पुणे परिवाराच्या वतीने जगन्नाथ लडकत यांच्या छायाचित्रांच्या प्रमोदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज (दि. ११) सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात विशेष पोलिस महानिरीक्षक (सीआयडी) विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्‍‍घाटन होणार आहे. या वेळी मदन भोसले, डॉ. वि. वि. उर्फ उदयसिंह पेशवा, डॉ. शहाजी देशमुख आणि प्रख्यात निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ उपस्थित राहाणार आहेत. नयनरम्य निसर्ग छायाचित्रांचं हे प्रदर्शन १२ जूनपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी सात या वेळेत सर्वांसाठी खुलं राहाणार आहे.

एका सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर लडकत यांनी दक्षिण भारताचा दौरा नुकताच केला. या त्यांच्या प्रवासात त्यांनी मोबाइलमध्ये दक्षिण भारतातील विशेषतः केरळमधील निसर्गदृष्यं टिपली असून, तीही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तन कक्षाचा पुन्हा प्रस्ताव

$
0
0

हजारो कोटींच्या प्रकल्पांसाठी काम; संस्थेच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरात ३० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यासाठी 'शहर परिवर्तन कक्ष' (सिटी ट्रान्स्फॉर्मेशन युनिट) स्थापन करण्याचा मागे घेतलेला वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीपुढे आला आहे. या कक्षातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च संबधित संस्था करणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, हा लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करून ही संस्था पालिकेला मदत का करत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. परिवर्तन कक्षाद्वारे शहरात पुणे मेट्रो, बीआरटी, एचसीएमटीआर (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट), एनएमटी (पादचारी वा सायकल मार्ग), झोपडपट्टी पुनर्विकास, २४ तास पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट सिटी, असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी पुढील तीन ते पाच वर्षांत सुमारे ३० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निधी मिळवून हे प्रकल्प राबविण्यासाठी तज्ज्ञांचे सहकार्य आवश्यक असून, प्रकल्पांची गुणवत्ता, देखभाल दुरुस्ती, त्यावर नियंत्रण ठेवणे यासाठी नॉलेज पार्टनर म्हणून हा कक्ष काम करणार आहे, असे आयुक्तांनी पूर्वीच्या प्रस्तावात म्हटले होते. मात्र, या रचनेमुळे प्रकल्पांची संपूर्ण सूत्रे खासगी संस्थेच्या ताब्यात जातील, अशी शंका व्यक्त झाल्याने आयुक्तांनी तो मागे घेतला. मात्र तीन महिन्यानंतर आता पुन्हा हा प्रस्ताव दाखल होत आहे. या कक्षात आयआयटी तसेच आयआयएम या संस्थामधून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची नियुक्ती केली जाणार असून त्यांचे संपूर्ण वेतन हे पुणे सिटी कनेक्टच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेला कोणतेही आर्थिक दायित्व राहणार नाही, असे आयुक्त कुमार यांनी नव्या प्रस्तावात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांचा ‍भुर्दंड सहन करून संबधित संस्था महापालिकेला मदत का करत आहे? अशी शंका पालिकेतील अधिकाऱ्यांकडून विचारली जात आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून हे प्रकल्प राबविणे म्हणजे पालिकेतील अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असल्याची खंत अधिकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. सुरुवातीला पालिकेला मोफत मदत करून त्या माध्यमातून इतर फायदे घेण्यासाठीच हा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी चर्चाही पालिकेत रंगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांमी बुडवला ‘पीएफ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिकेत ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) सुमारे ६४ लाख रुपये ठेकेदारांनी जमा केले नसल्याचे समोर आले आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतनासह अन्य सुविधा मिळत नसताना त्यांच्या पीएफची रक्कमही भरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पालिकेला सविस्तर माहिती देऊनही त्याची कोणतीही दखल प्रशासनाने घेतलेली नाही. महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये ठेकेदारांमार्फत नेमलेल्या सुमारे पाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जात नाही. तसेच, त्यांचा पीएफ भरला जात नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पालिकेकडून कर्मचाऱ्यांना संपूर्ण सुविधा देण्याची व्यवस्था असतानाही ठेकेदार मात्र या सुविधा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवित नसल्याचे समोर आले आहे. पालिकेकडून पीएफची रक्कम घेऊन ती पीएफ कार्यालयाकडे न भरणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे. महापालिकेला कर्मचारी पुरविणाऱ्या १३ ठेकेदारांनी सुमारे ६४ लाख रुपयांचा पीएफ भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो भरला जात नसल्याचे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने महापालिकेला कळविले आहे. त्याबाबत सहा मे रोजी पत्रही पाठविले आहे. परंतु, त्याची साधी चौकशीही महापालिका प्रशासनाने केलेली नसल्याचा आरोप बालगुडे यांनी केला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा सुधारगृहातून पाच मुलांचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा येरवडा येथील जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून (बाल सुधारगृह) पाच विधी संघर्षग्रस्त मुले (बाल गुन्हेगार) पळून गेल्याची घटना बुधवारी ८ जून रोजी रात्री घडली. पळून गेलेली सर्व मुले पुणे शहर व जिल्ह्यातील असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. बाल सुधारगृहातून वारंवार मुले पळून जाण्याच्या गंभीर घटना घडूनही शासनाकडून सुरक्षेबाबत कुठलीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. बाल सुधारगृहात वास्तव्य करणाऱ्या मुलांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा फायदा उचलून गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार पळून जाण्याचा घटना घडताना दिसतात. बुधवारी रात्री पाच मुले पाठीमागील सीमा भिंतीवरून उड्या मारून पळून गेले. बाल सुधारगृहातून पळून गेलेल्या एका मुलावर खून; तर काहींवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, घरफोड्या, मारामाऱ्या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुले अल्पवयीन असल्याने त्यांना तुरुंगात न पाठवता बाल सुधारगृहात पाठविले जाते. मागील काही महिन्यांपासून ही मुले नाशिकमधील किशोर सुधारगृहात शिक्षा भोगत होती; पण बाल न्यायालय मंडळ, पुणे यांच्या आदेशाने त्यांची येरवड्यातील सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. नाशिकहून एकूण ११ मुलांना येरवडा सुधारगृहात आणण्यात आले होते. त्यापैकी पाच मुले बुधवारी रात्री पळून गेली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images