Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आला थंडीचा महिना...

$
0
0
गेल्या आठवड्यात अवेळी पावसाचा फटका सहन केल्यानंतर रविवारी शहरातील किमान तापमानात किंचित घट झाली. पुढील दोन दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असली, तरी किमान तापमानातही घट होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

दक्षता समिती सदस्याची दुकानदाराशी बाचाबाची

$
0
0
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या दक्षता समितीचे सदस्य आणि स्वस्तधान्य दुकानदार यांच्यात बाचाबाची झाल्याची घटना बिबवेवाडीतील पार्श्वनगर सोसायटीत शनिवारी घडली. या प्रकरणी दोघांनी बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रार दिली आहे.

फराळाची ‘डाळ शिजता शिजेना...’

$
0
0
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीला तोंड देत असलेल्या सामान्यांना आता हरभरा डाळ, तूरडाळ आणि उडीदडाळसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. यंदा बाजारात पुरेशा डाळी उपलब्ध असूनही या डाळींच्या भावात किलोमागे ८ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, किरकोळ बाजारात शेंगदाण्याचा भाव ‘शंभरी’च्या घरात आहे.

सफाई कामगारांमध्ये एकता आवश्यक

$
0
0
‘सफाई कामगारांमध्ये एकता नाही ही मोठी खेदाची बाब आहे. हा समाज गट तट विसरून एकत्र आले तरच शासन त्यांची दखल घेईल,’ असे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी सांगितले.

सरकारी हॉस्पिटलमधील डिलिव्हरीचे प्रमाण वाढले

$
0
0
शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ‘सुरक्षित’ डिलिव्हरीविषयी जनजागृती होत असल्याने राज्यातील सरकारी हॉस्पिटलमधील डिलिव्हरीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळेच राज्यात गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. माता आणि कुटुंबीयांच्या या जागरूकतेमुळे मातामृत्युसह बालमृत्युवर नियंत्रण मिळविण्यातही यश येत आहे.

मतदार नोंदणीसाठी युवक सरसावले

$
0
0
कॉलेज युवकांची मतदार म्हणून नावनोंदणी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्गदर्शन मेळाव्याला रविवारी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रात काम करणा-या स्वंयसेवी संस्थांबरोबरच गणेश मंडळांचे पदाधिकारी, ढोल ताशा पथकांच्या दीडशेहून अधिक प्रतिनिधींनी या मेळाव्यात सहभाग घेतला.

बोंगाली मिठ्ठास...!

$
0
0
नवरात्रीचा सण पश्चिमेकडील गुजरात आणि पूर्वेकडील पश्चिम बंगाल या दोन राज्यांत सर्वांत मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. तरीही आजकाल त्याचे प्रतिबिंब महाराष्ट्रातही उमटतेच.त्यामुळेच, गुजरातचा दांडिया असो वा, बंगालची मिठाई त्याची क्रेझ येथील नागरिकांमध्येही निर्माण झाली आहे.

खेडच्या आश्रमशाळेत असुविधांची रेलचेल

$
0
0
खेड तालुक्यात कलमोडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या चिखलगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी मुलामुलींना मोठ्या असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. पिण्याचे व वापरासाठीचे पाणी, स्वच्छतागृहासारख्या साध्या प्राथमिक गरजाही पुरविण्यात आलेल्या नाहीत. कागदोपत्री या आदिवासी मुलांना सर्व काही दिले जाते, असे भासवण्यात येते.

विद्यार्थ्यांना बनविणार रोजगारक्षम

$
0
0
कुशल मनुष्यबळाची कमतरता आणि इंजिनीअरिंग, एमबीएसारख्या अभ्यासक्रमाचे बहुतांश विद्यार्थी रोजगारक्षम नसल्याची टीका उद्योगजगताकडून होत असतानाच आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनिवण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील आयटीआयच्या सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यंदापासून ‘एम्प्लॉयब्लिटी स्किल्स’ हा विषय बंधनकारक करण्यात आला आहे.

अवयवदानामध्ये भारत पिछाडीवरच

$
0
0
‘भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार लिव्हर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र, सध्या विविध २१ हॉस्पिटल्समध्ये वर्षभरात एक हजाराहून कमी शस्रक्रिया होत आहेत. भारतात अपघाती मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक असले तरीही अवयवदानामध्ये भारत पिछाडीवर आहे,’ असे मत कर्नल डॉ. अवनीश सेठ यांनी सोमवारी व्यक्त केले.

शिक्षणाधिकारी पदाच्या निकालासाठी प्रतिक्षाच

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जुलै २०११ मध्ये घेतलेल्या शिक्षणाधिकारी पदासाठीच्या मुलाखतीसाठी अपात्र ठरलेल्या ३० उमेदवारांनी न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्यामुळे पात्र ठरलेले २५१ उमेदवार गेल्या वर्षभरापासून निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

‘कम्प्युटर प्रशिक्षण काळाची गरज’

$
0
0
सध्याच्या काळात नोकरी मिळविण्यासाठी कम्प्युटर प्रशिक्षण त्याच बरोबर इंग्रजी भाषा शिकणे ही काळाचा गरज झाली आहे. त्याकरता गोरगरीबांपर्यंत कम्प्युटर पोचावेत यासाठी जास्तीजास्त शाळांमध्ये कम्प्युटर देण्यात येत आहेत, असे खासदार सुरेश कलमाडी यांनी सांगितले.

स्टार बॅटल्सची चाचणी येत्या १६ नोव्हेंबरपासून

$
0
0
मास्टर इव्हेंट व पब्लिसिटी आणि कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशनतर्फे आयोजित स्टार बॅटल्स या राज्यस्तरीय गायन, वादन आणि नृत्य विषयक स्पर्धेची प्राथमिक चाचणी येत्या १६ ते १८ नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या संचालिका प्रिया बेर्डे आणि संदीप पारखे यांनी दिली.

भ्रष्टाचारविरोधासाठी जनजागृतीची गरज

$
0
0
‘भ्रष्टाचाराविरोधातील लढाई प्रत्येक घरापासून सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी रविवारी व्यक्त केले. तसेच, ‘टीम अण्णांच्या आंदोलनाची मोठी लाट आता ओसरली आहे. परंतु, हे आंदोलन संपले नसून स्थिर झाले आहे, लवकरच अधिक सशक्त आंदोलन उभे राहील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

सभा तहकुबीचा सपाटा

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभा वारंवार तहकूब करण्याचा सपाटा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे, अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

लाभार्थींनी मिळालेल्या घरांमध्ये राहणे गरजेचे

$
0
0
झोपडपट्टी वाढ रोखण्यासाठी लाभार्थींना मिळालेल्या घरांमध्ये त्यांनी स्वतः राहणे आवश्यक असल्याचे आग्रही मत महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी शनिवारी व्यक्त केले. या घरांचा ताबा दुसऱ्या कोणाला देऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सिंहगड रस्ता परिसरात स्वतंत्र पोलिस ठाणे हवे

$
0
0
सिंहगड रस्ता परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज आहे. त्यासाठी आयुक्तांनी त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने गृह मंत्रालयाकडे पाठवावा, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.

जुन्या मिळकतींच्या दुरुस्तीचा प्रश्न मिटणार

$
0
0
पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीतील मोडकळीस आलेल्या जुन्या निवासी ‌मिळकतींच्या दुरुस्तीची नियमावली तयार करण्याच्या सूचना लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांनी केली. त्यामुळे या भागातील जुन्या मिळकतीच्या दुरुस्तीचा प्रश्न आता मिटण्याची शक्यता आहेत. घोरपडी येथील प्रस्तावित उड्डाणपुलाबाबत महिनाभरात अहवाल देण्याचा आदेश त्यांनी दिला.

रक्तगटाच्या अवघ्या तासात १२० चाचण्या... !

$
0
0
अवघ्या एका तासात रक्ताचे गट ओळखण्याच्या १२० चाचण्या एका तासात करणे शक्य होणार आहे. स्वयंचलित तंत्राद्वारे रक्ताचे गट, रक्त जुळणी, प्लेटलेट क्रॉस मॅचिंगसारख्या विविध चाचण्या एकाचवेळी मनुष्यबळाविना करणे शक्य होणार आहे.

नगरसेवकाचे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा प्रयत्न

$
0
0
नगरसेवकपदाचा गैरवापर करुन अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा प्रयत्न खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेवकाने केला आहे. बोर्डाच्या सिव्हील एरीया कमिटीच्या बैठकीमध्ये सोमवारी (ता.२२) हा विषय आयत्यावेळी मांडण्यात आला. मात्र, यावर बोर्डाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्याचा प्रस्ताव मंजूर करून कमिटीने हा विषय पुढे रेटला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images