Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जिल्ह्यातील धरणसाठा ७३ टक्क्यांवर

$
0
0
गेल्या काही दिवसात जिल्ह्यासह पुणे विभागातील अनेक भागात जोरदार पाऊस पडल्याने धरणातील पाणीसाठा ७३ टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र असे असले तरी आजही विभागातील ११ लाख १८ हजार लोकसंख्येला ५९१ द्वारे पाणीपुरवठा केला जा‌त आहे. सर्वाधिक २२३ टँकर सोलापूर जिल्ह्यात सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यात एकही टँकर नाही.

पहिली सहामाही कठीणच

$
0
0
महापालिकेचे नाव बदलले तरी समस्या वर्षानुवर्षे त्याच असल्याची अनुभूती दापोडीकर घेत आहेत. तर, बोपखेल, फुगेवाडी आणि कासारवाडी भागातील लष्कराच्या बंधनामुळे विकासाला फारसा नाही. त्यामुळे या भागातील नगरसेवकांच्या दृष्टीने पहिली सहामाही कठीणच गेल्याचे दिसून येत आहे.

ओपन हार्ट ऐवजी बरगड्यातून सर्जरी

$
0
0
अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेले लग्न... अचानक छातीचे दुखणे सुरू होते आणि तपासणीदरम्यान हृदयातील पडद्याला छिद्र असल्याचे निदान... त्यासाठी छाती फाडून ‘ओपन हार्ट सर्जरी’चा एका डॉक्टरांचा सल्ला पण... लग्न समोर असताना आलेला हा नाजूक क्षण... तरीही छातीऐवजी बरगड्यांच्या भागांमधून छोटेसे ऑपरेशनद्वारे हृदयाच्या पडद्याचे छिद्र बंद करण्यास यश आले

जवानांना हव्यात तुमच्या शुभेच्छा

$
0
0
देशाच्या सरहद्दीवर लढणाऱ्या जवानांचा एकटेपणा दूर व्हावा आणि देशातील नागरिक आपल्याशी संवाद साधून आपल्याला प्रेरणा देत आहेत, अशी भावना त्यांच्या मनात दृढ व्हावी यासाठी जवानांना शालेय विद्यार्थ्यांनी ग्रिटींग कार्ड पाठविण्याचा उपक्रम बी. एन. श्रीवास्तव फाऊंडेशनतर्फे राबवित आहे. यंदा एक लाख जवानांना ग्रिटींगकार्डद्वारे शुभेच्छा देण्याचा संकल्प असून, पुण्यातील सुमारे सत्तर शाळांनी त्यात सहभाग नोंदविला आहे.

लेण्याद्रीवर सीसीटीव्हीचा वॉच

$
0
0
अष्टविनायक तिर्थक्षेत्र असलेल्या लेण्याद्री येथे गिरीजात्मजाच्या दर्शनमार्गावर आता सीसीटीव्ही वॉच ठेवणार आहे. जुन्नर पोलिस ठाण्याच्या सूचनेनुसार लेण्याद्रीच्या दर्शन मार्गावर १६ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, अशी माहिती लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत डोके तसेच सचिव जितेंद्र बिडवई यांनी दिली.

सफाई कर्मचा-यांचा विकासातला वाटा मोलाचा

$
0
0
शहराच्या विकासासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन प्रयत्न करीत असते. मात्र, त्यात सफाई कर्मचा-यांचा वाटा मोलाचा असतो. त्यामुळ त्यांच्या कामाचे कौतुक झालेच पाहिजे असे मत महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केले.

पुनर्मूल्यांकनांच्या निकालांना अखेर मुहूर्त!

$
0
0
इंजिनीअरिंग पुनर्मूल्यांकनाच्या निकालावरून पुणे विद्यापीठाची ‘परीक्षा’ पाहिली जात असून, पहिल्या व चौथ्या वर्षाचे निकाल जाहीर करण्यात अखेर विद्यापीठाला शक्य झाले आहे. परीक्षा विभागावर चहूबाजूंनी टीकास्त्र सोडले जात असताना आता दुस-या व तिस-या वर्षाचे निकाल किमान सत्र परीक्षेपूर्वी लावून लज्जारक्षण करणे विद्यापीठाला शक्य होणार की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

बारामती पॅसेंजर, निझामाबाद एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

$
0
0
लोणी आणि उरळीदरम्यान असणा-या रेल्वेमार्गावर दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे ३० ऑक्टोबर रोजी पुण्याहून सुटणारी बारामती पॅसेंजर आणि निझामाबाद एक्स्प्रेस या दोन गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

सासवड विकास आराखडा ठरला वादग्रस्त

$
0
0
सासवड शहर विकास आराखड्याच्या प्रारूपावरील वादग्रस्त आरक्षणे, अल्प भूधारक जमीन मालकांवर त्यामुळे भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. यामुळे ६ महिने उशिराने प्रसिद्ध केलेला हा शहर विकास आराखडा वादग्रस्त ठरला असून त्यावर १८०० मिळकतदरांनी आक्षेप व हरकती नोंदविल्याची माहिती प्रशासनाने दिली. पहिल्या दिवशी ११२ जणांना उपस्थित राहून आपले म्हणणे लेखी देण्याचे पत्र देण्यात आले आहे.

आश्रमशाळेतील शिक्षणाचे वाजले की बारा

$
0
0
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पुणे, सोलापूर, सातारा तसेच कोल्हापूर या चार जिल्ह्यांच्या आदिवासी क्षेत्रात, घोडेगाव प्रकल्प कार्यालयांतर्गत चालविल्या जाणा-या २५ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांपासून तर अधिका-यांपर्यंत तसेच शिपायांपासून स्वयंपाक्यापर्यंत अनेक पदे रिक्त असल्याने येथील शिक्षणाचे बारा वाजले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आंतरराज्य बससेवेबाबत आज बैठक

$
0
0
एसटीतर्फे चालवण्यात येणा-या आंतरराज्य बससेवेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी ( ३० ऑक्टोबर) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एसटीतर्फे चालवण्यात येणा-या आंतरराज्य बससेवेचा आढावा घेणार असून कोणत्या बससेवा बंद आहेत, कोणत्या ठिकाणी नवीन सेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे, याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले.

दुचाकीस्वार ठार

$
0
0
पुणे-नगर रोडवर शनिवारी रात्री खांदवेनगर येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला असून, विमाननगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

शॉर्टफिल्मच्या अडचणीसाठी संघटीत होण्याची गरज

$
0
0
‘चित्रपट आणि नाटक करताना येणा-या समस्या सोडवण्यासाठी या माध्यमातील निर्माते एकत्र येऊन त्यांची संघटना निर्माण झाली आहे. आपल्याकडे शॉर्टफिल्म निर्मितीची संख्या वाढत असून, हे प्रभावी माध्यम आहे. याच्या निर्मितीमध्ये येणा-या अडचणी सोडवण्यासाठी शॉर्टफिल्मच्या निर्मात्यांनी एकत्र येऊन संघटना उभारून दबावगट तयार करण्याची आवश्यकता आहे’, असे मत इम्पाचे संचालक विकास पाटील यांनी व्यक्त केले.

डेंगीच्या साथीला जागृतीची हाक

$
0
0
शहरात डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दिरंगाईमुळे वाहन परवाना मिळेना

$
0
0
नागरिकांना घरबसल्या वाहन परवाना मिळण्यासाठी प्रादेशिक परिवाहन कार्यालयाने घेतलेली टपाल खात्याची मदत वाहनचालकांना मनस्ताप देणारी ठरत आहे. टपाल खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या दहा महिन्यांपासून सहा हजार २५५ परवाने नागरिकांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत. त्यामुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयाप्रमाणे टपाल खात्यातही चकरा माराव्या लागत आहेत.

आधारने जोडले ‘रक्ताचे नाते’

$
0
0
रुग्ण आणि रक्तदाते यांच्यात ''रक्ताचे नाते'' जोडण्यासाठी आधार सोशल फाउंडेशनने स्वतंत्र वेबसाइट विकसित केली आहे. गरजेच्यावेळी रक्ताची शोधाशोध करण्यात वेळ जाऊ नये, रक्तदात्यांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध व्हावी, तसेच रक्तदात्यांना रक्तपेढीची माहिती मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली वेबसाइट असल्याचा दावा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे यांनी केला आहे.

खुर्शिद यांना पुणेकरांचे ‘रक्तरंजित’ उत्तर...

$
0
0
मला लेखणीने काम करायला सांगितले आहे, पण मी रक्ताचाही वापर करू शकतो, अशी धमकी देणारे केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांना ९०० पुणेकरांनी स्वतःचे रक्त असलेले पत्र पाठवून उत्तर दिले आहे. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (आयएसी) संघटनेने ९०० पुणेकरांच्या रक्ताचा ठसा असलेली पत्रे गोळा केली असून ही पत्रे खुर्शिद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पाठविण्यात आली आहेत.

बुरशीच्या माहितीसाठी आता खास वेबसाइट

$
0
0
बॉटनीच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाच्या ठरणा-या बुरशीच्या नानाविध प्रकारांची माहिती त्यांना एका क्लिकवर मिळाली तर किती मस्त ना! अशाच एका क्लिकने त्याविषयीचे संदर्भ गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांचा खर्ची होणारा वेळ आणि संशोधकांना करावी लागणारी मेहनत आता कमी होणार आहे.

ढगाळ वातावरणामुळे भातपिक धोक्यात

$
0
0
मावळात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सावटामुळे भात कापणी खोळंबली आहे. हातातोंडाशी आलेले भाताचे पीक धोक्यात आल्याने, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले. पीक वाया जाऊ नये, यासाठी ते शेतातच झोडण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरू आहे.

दुष्काळ अभ्यासासाठी समिती नोव्हेंबरमध्ये

$
0
0
दुष्काळ कायमस्वरूपी दूर व्हावा याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेली समिती पुढील महिन्यात पुणे दौ-यावर येणार आहे. अभ्यास दौरा आणि स्थानिक लोक प्रतिनिधींशी चर्चा करण्याबरोबरच दुष्काळ दूर करण्याबाबत शिफारसही सांगणार आहे, अशी माहिती रोजगार आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images