Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डास मारायला आले ‘महामशिन’...

$
0
0
फवारणी केल्यानंतरही डास मरत नसल्याने महापालिकेने डास मारण्यासाठी ‘मस्किटो किलिंग सिस्टीम’ घेण्याचे ठरवले आहे. या यंत्रणेला नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (नासा) मान्यता दिली असून, एक एकर अंतरावरील डास खेचून घेण्याची क्षमता या यंत्रणेच्या मशिनमध्ये आहे. मात्र, पुण्यात ही यंत्रणा यशस्वी ठरणार का, हे तपासण्यासाठी सध्या चित्तरंजन वाटिकेमध्ये याची चाचणी घेतली जात आहे.

पवारांच्या भूमिकेमुळे ‘राष्ट्रवादी’ची गोची

$
0
0
‘आधी सुविधांचे नियोजन करा आणि नंतरच गावे घ्या,’ अशी भूमिका खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्याने गेले वर्षभर गावांच्या समावेशासाठी आग्रही भूमिका घेणा-या राष्ट्रवादीची गोची झाली आहे. पवार यांच्या या भूमिकेच्या मूळाशी काय असावे, याबाबत आता वेगवेगळे तर्क लढविण्यात येऊ लागले आहेत.

तरूणाचे अपहरण करून मुंबईत लुटले

$
0
0
पैशाच्या उसनवारी व्यवहारातून भोर तालुक्यातील टिटेघर येथून एका तरूणाचे त्याच्याच परिचयातील तिघांनी अपहरण केले. त्याला मुंबईत लॉजवर डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणाकडून रोख रक्कम घेऊन नंतर त्याला बसस्थानकावर नेऊन आरोपींनी पलायन केले.

७ म‌हिन्यांत ७ लाखांचा दंड वसूल

$
0
0
लक्ष्मी रोडवर वॉकिंगमध्यच्या बाहेर चारचाकी गाड्या उभ्या करणा-या सात हजार वाहनचालकांकडून सात महिन्यात सात लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना देहूरोड बायपासवर लुटले

$
0
0
मुंबई-बंगळुरू हायवेवर दुचाकीवर चाललेल्या दोघा सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना लुटल्याचा शनिवारी मध्यरात्री प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी याच पसिरात मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना लुटणारे आरोपी हे एकच असावेत, अशा संशय वारजे पोलिसांनी असून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

हायवेवर ट्रक चालकांना लुटणारी टोळी गजाआड

$
0
0
पुणे-मुंबई हायवेवर गेल्या वर्षभरात दहा दरोडे टाकणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट तीनने अटक केली. हायवेवरील ट्रक चालक आणि क्लिनरला लुटून ही टोळी पसार होत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नियोजनाबाबत पवारांचे विचार योग्यच

$
0
0
गावांचा समावेश करण्यापूर्वी पाणी, कचरा अशा मुलभूत सुविधांचे नियोजन करण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे विचार योग्यच आहेत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर गावांच्या समावेशाबाबत राष्ट्रवादी आग्रही असली, तरी हे नियोजन आवश्यकच असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. हद्दीलगतच्या २८ गावांचा महापालिकेत समावेश करण्यासंदर्भात राज्य सरकारने हरकती-सूचना मागविल्या आहेत.

नवीन कनेक्शनसाठी विनाअनुदानित सिलिंडरचेच पैसे घ्या

$
0
0
नवीन गॅस कनेक्शनसोबत दिल्या जाणा-या सिलिंडरसाठी विनाअनुदानित सिलिंडरचा दर आकारावा, असा फतवा ऑइल कंपन्यांनी काढला असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व गॅस एजन्सीला देण्यात आल्या आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवीन गॅस कनेक्शन मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.

पूर्वपरीक्षा...शॉपिंगपर्वाची

$
0
0
दस-यानंतर आता बाजारपेठेला दिवाळीचे वेध लागले आहेत. येत्या गुरुवारी एक तारखेनंतर खिसा गरम झाल्यावर उत्साही पुणेकरांची खरेदीसाठी झुंबड उडेल. येणा-या वीकेंडला लक्ष्मी रस्ता शॉपिंगपर्वाने उजळून जाईल.

मेडिकलचे पालक करणार आमरण उपोषण

$
0
0
मेडिकल प्रवेशांदरम्यान कॉलेजांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी प्रवेश नियंत्रण समिती नेमून पारदर्शकता आणल्याचा सरकारचा दावा फोल ठरला आहे. यंदाच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेवरील तक्रारींवर मार्ग काढण्यातही शासनाची समितीने अपयशी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर ही समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी पालक संघटनांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

विद्यापीठांना बदलांनुसार अनुदान आणि मूल्यांकन

$
0
0
विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या अनुदान आणि अधिस्वीकृतीचे निकष आता आ‍णखी कडक होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) यापुढे हे अनुदान आणि मूल्यांकन हे संबंधित विद्यापीठांना शैक्षणिक आणि प्रशासन व्यवस्थेत केलेल्या सुधारणांनुसारच देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मुंबई एअरपोर्ट’चा घोटाळा सोमय्यांच्या ‘रडार’वर

$
0
0
मुंबई एअरपोर्टचा घोटाळा पुढल्या आठवड्यात बाहेर काढणार असून त्यामध्ये सहभागी असणाऱ्या कोणकोणत्या मंत्र्यांचा समावेश आहे, हे जाहीर करणार असल्याचे सूतोवाच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी केले.

संमेलनाध्यक्ष निवडणुकीतही मतदार निरुत्साही

$
0
0
सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच मतदानातील निरुत्साह साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी मतदारांची संख्या वाढूनही पन्नास टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नसल्याची माहिती समोर येत आहे. मतदारांपर्यंत मतपत्रिका पोहोचण्यात निर्माण झालेल्या समस्या आणि अध्यक्ष निवडणुकीत रंगलेले जातीय राजकारण, यामुळे मतदारांचा निवडणुकीतील उत्साह कमी झाल्याची चर्चा होत आहे.

‘जेईई-मेन’चे प्रवेश अर्ज गुरुवारपासून ऑनलाइन

$
0
0
आयआयटी प्रवेशासाठी पुढील वर्षी प्रथमच होणा-या ‘जेईई-मेन’ या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज येत्या गुरुवारपासून (१ नोव्हेंबर) ‘ऑनलाइन’ उपलब्ध होत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात काही शंका असतील, तर थेट औरंगाबाद किंवा नागपूरमधील केंद्राशी संपर्क करावा लागणार आहे. कारण, राज्यात इतरत्र कोठेही मदत केंद्र ठेवण्यात आलेले नाही.

पालिकेची डेंगी-मलेरिया निर्मूलन मोहीम

$
0
0
गेल्या काही दिवसांत शहरात फैलावणाऱ्या डेंगी आणि मलेरिया अशा रोगांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत डेंगी-मलेरिया निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये विविध उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. दरम्यान, शहरात ४०८ जणांना रोगांचा प्रादुर्भाव झाला असून सात पेशंट पॉझिटिव्ह आढळले आहेत.

अभ्यासक्रम ठरविण्याची हुशार विद्यार्थ्यांनाही संधी

$
0
0
शालेय शिक्षणाची प्रक्रिया विद्यार्थीकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ज्यांच्यासाठी अभ्यासक्रम तयार करायचा, त्या विद्यार्थ्यांनाच अभ्यासक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा निर्णय ‘सीबीएसई’ने घेतला आहे.

‘अल्बुमिन’ नियंत्रणाने डायबेटिसच्या त्रासातून सुटका

$
0
0
रक्तातील ‘अल्बुमिन’ प्रकारातील प्रथिनाची पातळी सर्वसामान्य व्यक्तींच्या शरीराएवढी राखल्यास डायबेटिसच्या घातक परिणामांपासून बचाव करून घेत त्याच्या त्रासातून सुटका शक्य आहे, असा निष्कर्ष पुण्यातील शास्त्रज्ञांच्या गटाने काढले आहेत.

कांदा, बटाटा महाग

$
0
0
दिवाळी तोंडावर आली असतानाच कांदा, बटाटा आणि आले महाग होऊ लागले असून, घेवडा आणि मटारच्या भावात वाढ झाली आहे. आवक वाढल्याने टोमॅटो, कोबी, वांगी, काकडी स्वस्त झाली आहे. तर, कोथिंबिरीच्या जुडीचा भाव अजूनही १० ते १५ रुपये आहे. मेथी आणि पालकचे भाव टिकून आहेत. कांदापातीचे भाव उतरले आहेत.

‘इंन्फ्रंट्री डे’ साजरा

$
0
0
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे शनिवारी ‘इंन्फ्रंट्री डे’ साजरा करण्यात आला. कँटोन्मेंटमधील नॅशनल वॉर मेमोरिअल येथे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए के सिंग यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवांनाना आदरांजली वाहिली.

कुटुंब हेच खरे संस्कार केंद्र

$
0
0
मुलांना संस्कार केंद्रांमध्ये घालून संस्कार होत नसतात. त्यासाठी घरातूनच संस्कार करावे लागतात. त्यामुळेच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रत्येक कुटुंबच संस्कार केंद्र होण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images