Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चांदणी चौकात दोघांना लुटले

$
0
0
चांदणी चौकातून वेद विहारकडे दुचाकीवर चाललेल्या दोघा तरुणांना थांबवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील एक लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. या प्रकरणी दुचाकीवर आलेल्या दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकटीला सोबत ‘एकी’ची

$
0
0
ऐन तारुण्यात अपघाताने एकटे राहण्याची वेळ आली असली, किंवा ठरवून एकटे राहण्याचा निर्णय घेतला असला, तरी काही वेळेस एकट्या महिलांना देखील त्यांना समजून घेणाऱ्या एखाद्या हक्काच्या व्यक्तीची गरज भासते. अशाच एकट्या महिलांना समविचारी हक्काच्या मैत्रिणी मिळवून देणारा ‘एकी सपोर्ट ग्रुप’ नुकताच पुण्यात स्थापन झाला.

मकबूलवर नऊ गुन्हे

$
0
0
नांदेड येथील धर्माबादचा रहिवासी असलेला सईद मकबूल उर्फ जुबेर याच्यावर खुनाचे तीन गुन्हे, बॉम्ब स्फोटाचे चार गुन्हे, कट रचणे आणि शस्त्रात्रे बाळगणे असे नऊ गुन्हे दाखल आहेत.

विकास आराखड्यातील बदल बिल्डरांच्या हितासाठी

$
0
0
‘जुन्या पुण्याच्या विकास आराखड्याला ६० उपसूचना आणि विकास नियंत्रण नियमावलीतील ६० बदल हे बिल्डरांच्या हितासाठी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे बदल रद्द करून याबाबत सीआयडीमार्फत चौकशी करावी,’ अशी मागणी भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी केली आहे.

प्राध्यापकांसाठी पात्रता निकष कायम

$
0
0
राज्यातील विद्यापीठांमधील कुलगुरू निवडीचे निकष विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शिथिल केले असले, तरी लेक्चरर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी नेट/सेट पात्रतेचा निकष कायम असल्याचे स्मरण ‘यूजीसी’ने कॉलेज आणि विद्यापीठांना करून दिले आहे.

‘धर्म ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब’

$
0
0
धर्म ही आपल्या मनातली गोष्ट असून, ती सिद्ध करणे कठिण असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पुणे मराठी ग्रंथालयाच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्त साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार कवयित्री आसावरी काकडे, लेखिका डॉ. मीना प्रभू, श्रीनिवास भणगे, अजय शहा यांना मोरे यांच्या हस्ते देण्यात आला.

पैशाची उधळण थांबणार

$
0
0
शहरात वेगवेगळ्या सांस्कृतिक महोत्सवांच्या नावाखाली पुणेकरांच्या पैशांची होणारी मुक्त उधळण आणि राजकीय नेत्यांचा मोफत प्रचार कायमचा थांबणार आहे. कारण यापुढे कोणताही सांस्कृतिक महोत्सव महापालिकेकडूनच आयोजित केला जाणार असून, सहप्रायोजकत्व न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे स्फोटातील पाचवा आरोपी गजाआड

$
0
0
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी नांदेड येथील ‘बॉम्बमेकर’ सईद मकबूल उर्फ जुबेर याला मंगळवारी हैदराबाद येथून अटक केली. पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कटात यापूर्वी अटक केलेल्या चौघा आरोपींबरोबरच याचाही हात असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

मान्यतेची अट वगळल्याची नगरसेवकांची तक्रार

$
0
0
विमानतळ आणि संरक्षण खात्याच्या परिसरात उंच इमारतींना परवानगी देण्यासाठी संरक्षण खात्याची मान्यता घेण्याची अट विकास आराखड्यातून वगळल्याचा आरोप काँग्रेसच्या दोघा नगरसेवकांनी शनिवारी केला. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मामीला जिवे मारण्याचा भाच्याचा प्रयत्न

$
0
0
किरकोळ कारणावरून भाच्याने मामीला जबरदस्तीने किटकनाशकाचे औषध पाजून त्यांना जिवे प्रयत्न केल्याची घटना हडपसरमधील शिंदे वस्तीत शुक्रवारी ( २६ ऑक्टोबर ) दुपारी तीन वाजता घडली.

गावांचा समावेश : शरद पवारांचा ‘गुगली’

$
0
0
‘पुणे महापालिकेमध्ये आणखी काही गावे समाविष्ट करण्याचा विषय मला वर्तमानपत्रातूनच कळला,’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची संपूर्ण योजना मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितल्याशिवाय या निर्णयाचे समर्थन करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

घरफोडी करणा-यांचा पोलिसांवरच हल्ला

$
0
0
घरफोडी करून पळून निघालेल्या चोरट्यांना रोखणा-या पोलिसांवरच वार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना न-हे रोडवर घडली. या हल्ल्यात हवेली पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जखमी झाले. ऋतुगंध सोसायटीत शुक्रवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास हा थरार घडला. पोलिसांनी पाठलाग करून गोळीबार केला. मात्र, चोरट्यांनी पळ काढला.

पायावर ग्राहकाने ओतले गरम तेल

$
0
0
हॉटेलमध्ये खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांचे पैसे मागितल्याचा राग येऊन एका ग्राहकाने हॉटेल मालकाच्या पायावर उकळते तेल ओतल्याची घटना शनिवारी भोसरीत घडली. या प्रकरणी तेल ओतणा-या दोघांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पुणे’ आणि ‘पुणं’मधला फरक जाणतो, तोच खरा पुणेरी...

$
0
0
‘पुण्याचे शास्त्रशुद्ध नाव ‘पुणे’ असे आहे. तरीही ‘पुणं’ म्हटल्यावर जो अर्थ ध्यानात येतो, तो फक्त अस्सल पुणेकरालाच पुणेकराला कळू शकतो. हा सूक्ष्म फरक केवळ पुणेरीच जाणू शकतो,’ असे सांगत, केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुण्याचा गेल्या साडेतीनशे वर्षांचा इतिहास उलगडला. पुण्यातील मिसळ, पाट्या, दुकानदार, रिक्षावाला आणि वाहतूक व्यवस्थेबरोबरच पुणेकरांच्या विक्षिप्तपणावरही पवारांनी चिमटे काढले.

क्रीडा संघटनांमधून पवार निवृत्ती घेणार

$
0
0
गेली चाळीस वर्षे महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षपद भूषविणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यानी या पदावरून निवृत्ती घेण्याचे स्पष्ट संकेत शनिवारी दिले. संघटनेच्या पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी पदाधिका-यांना याबाबत कल्पना दिल्याचे समजते.

ST कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

$
0
0
राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगारांच्या रखडलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिवाळीच्या तोंडावरच आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, येत्या आठ नोव्हेंबरला मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष हनुमंत ताटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

गॅससाठी शेगडीची सक्ती नाही

$
0
0
गॅस एजन्सीकडून नवीन कनेक्शन घेणा-या ग्राहकांवर गॅस शेगडी घेण्याची सक्ती केल्यास संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत.

बिस्किटांच्या डायची चोरी

$
0
0
बिस्किट बनविण्याच्या कारखान्यातील डाय आणि अन्य सामुग्रीच्या चोरी प्रकरणी दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. धर्मराज ऊर्फ गुल्ली कनप्पा शेटटी (वय २८, रा. मिलिंदनगर, पिंपरी), संतोष ऊर्फ फकिरा महादू क्षीरसागर (वय २४, रा. मिलिंदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत.

डिसेंबरमध्ये ‘MOA’चा निर्णय

$
0
0
‘महाराष्ट्रातील विविध क्रीडा संघटनांच्या प्र‍श्नांसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन, ते सोडवले जातील’, असे प्रतिपादन महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. दरम्यान, ‘एमओए’च्या बैठकीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ ते २० डिसेंबर या कालावधीत राज्य ऑलिंपिक स्पर्धा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.

दिघीतील वीज ग्राहक भोसरीत

$
0
0
महावितरणाच्या विश्रांतवाडी उपविभागाअंतर्गत दिघी आणि परिसरातील सुमारे ८५५१ वीज ग्राहकांचा समावेश भोसरी उपविभागामध्ये नुकताच करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>