Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आग प्रतिबंधक यंत्रणेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे रेल्वे गाड्यांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा ठपका 'कॅग'च्या अहवालात ठेवण्यात आला आहे. ज्वलनशील वस्तू्ंचा रेल्वेच्या कोचमध्ये वापर न करण्याची सूचना केल्यानंतरही अनेक कोचमध्ये त्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, आगप्रतिबंधक यंत्रणेचा अभावही काही ठिकाणी दिसून आला. कॅगच्या समितीने २०११ ते २०१४ या कालावधीत रेल्वेच्या सर्व विभागांतील १४ वर्कशॉप, ३८ डेपो, १३८ गाड्या, १०८९ कोच आणि ५१ पँट्री आदी ठिकाणी पाहणी केली. या पाहणीत आग प्रतिबंधक व रोधक यंत्रणेची पाहणी करण्यात आली. कॉर्पोरेट सेफ्टी प्लॅन्स २००३ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही पाहणी करण्यात आली. त्यानुसार त्यांनी अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. रेल्वेतील आगीच्या अपघाताची संख्या २००१-०२ साली संख्या पाच होती. त्या तुलनेत २०११-१२ मध्ये चार घटना आणि २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षात प्रत्येकी आठ घटना घडल्या. त्यानुसार रेल्वेतील आगीच्या घटनांचे प्रमाणे दुपटीने वाढल्याचे निदर्शनास येते. रेल्वेमध्ये आग झपाट्याने पसरते, त्यामुळे अधिक धोका संभवतो. त्यामुळे पीव्हीसी पाइप, प्लायवूड, पेंट आदी ज्वलनशील पदार्थ कोचच्या बांधणीत वापरू नये, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, कॅगच्या पाहणीत अद्यापही ज्वलनशील पदार्थ वापरले जात असल्याचे दिसून आले. आपत्कालीन परिस्थिती खिडकी, एसी कोचेसमध्ये काच फोडण्यासाठीचे साधन, एका एक्स्प्रेस गाडीत सिगरेट विक्री करताना आढळले.

१०१ स्टेशनवर अनधिकृत प्रवेशद्वार,

१७ स्टेशनवर एक किंवा दोन बॅग स्कॅनर उपलब्ध

१०५ स्टेशनवर बॅग स्कॅनर नाही



रेल्वेमध्ये आगीच्या घडलेल्या घटना वर्ष घटना २०११-१२ ४ २०१२-१३ ८ २०१३-१४ ८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्राहकांच्या मोबाइलवर‘महावितरण’च्या सेवा

$
0
0

पुणे परिमंडळातील साडेसहा लाख ग्राहकांची नोंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह 'महावितरण'च्या पुणे परिमंडलातील सहा लाख ५९ हजार १३३ वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाइल क्रमांकाची मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रामध्ये (सेंट्रलाइज्ड कस्टमर केअर सेंटर) नोंदणी केली आहे. त्यामुळे या ग्राहकांना 'महावितरण'कडून देण्यात येत असलेल्या ग्राहक सुविधांचा लाभ मिळू शकणार आहे. 'महावितरण'कडून विविध ग्राहकसेवांसह वीजग्राहकांच्या मोबाइलवर महिन्याच्या वीजबिलाची माहिती प्रायोगिक तत्त्वावर एसएमएसद्वारे पाठवण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना वीजबिलाचा एसएमएस पाठवला जातो. याशिवाय ई-मेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना ईमेलद्वारे वीजबिल देण्याची सुविधा आहे. आतापर्यंत सहा लाख ५९ हजार १३३ वीजग्राहकांनी नोंदणी केली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ६० हजार ९०५ वीजग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली असल्याचे 'महावितरण'कडून सांगण्यात आले. 'महावितरण'ने वीजग्राहकांना मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये 'महावितरण'च्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएसद्वारे वीजग्राहकांना स्वतःचा ई-मेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी बारा अंकी ग्राहक क्रमांक आणि वीजग्राहकाचा ई-मेल टाइप करून एसएमएस केल्यास ई-मेल आयडीची नोंदणी होऊ शकणार आहे. 'महावितरण'च्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून कोणत्याही कंपनीच्या मोबाइल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकांवर संपर्क साधता येतो. वीजग्राहकांना वीजग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे मोबाइल किंवा दूरध्वनी क्रमांक ग्राहक प्रतिनिधींना सांगून ते रजिस्टर करण्याची सोय आहे. कॉल सेंटर व्यतिरिक्त महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल अ‍ॅपवर ऑनलाइन बिल भरणा करणाऱ्या वीजग्राहकांनाही संपर्क क्रमांकाची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

विभागवार नोंदणी पिंपरी- ९९०८९ कोथरूड- ७९५८८ भोसरी- ५१८४९ बंडगार्डन - ८५३०५ शिवाजीनगर - ५३८५७ नगररोड - ५६९२३ पद्मावती- ६०४५९ पर्वती - ७३९९३ रास्ता पेठ - ५१८२२ मंचर, मुळशी आणि राजगुरुनगर ४६२४८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरणासाठी आरोग्य शिक्षण दिले पाहिजे

$
0
0

- जागतिक लसीकरणाच्या सप्ताहाचे नेमके महत्त्व काय? जगात विविध आजारांपासून बालकांना वाचविण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. परंतु, अपेक्षेएवढे लसीकरण होत नाही. लसीकरणामध्ये मोठा गॅप आहे. त्यात अनेक त्रुटी असल्याचे आढळते. सर्व बालकांचे लसीकरण करायचे असेल, तर त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी जागतिक लसीकरण सप्ताह पाळण्यात येतो. सध्या जगात पोलिओ, ट्रिपल, गोवरच्या लसी पहिल्या वर्षी दिल्या जातात. भारतात क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी बीसीजी ही लस दिली जाते. त्याशिवाय घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला अशी त्रिगुणी (ट्रीपल) तसेच गोवर प्रतिबंधक लसीचा समावेश आहे. न्यूमोनिया आणि रोटाव्हायरसमुळे होणारे जुलाब या लसींचा राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत समावेश होऊ लागला आहे. -लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामध्ये नेमका कोणता अडथळा येतो? हो. लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. कोणत्या दिवशी अथवा महिन्यात कोणत्या आजाराची लस द्यावी या वेळापत्रकाची अनेकदा पालकांना माहिती नसते. तसेच पालक लसीकरण करायचे विसरून जातात. पालकांना लसीकरण फारसे आवडत नाही. लसींच्या किमती अधिक असल्यानेही त्या देण्यास टाळाटाळ केली जाते. त्याशिवाय लसीकरणाबाबत काही समाजात अंधश्रद्धा आहे. त्यामुळे लसीकरण होण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. आता सरकारने सर्व लसी मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. - लसीकरणाच्या धोरणाबाबत काय सांगाल? जुलाब होणाऱ्या जंतूविरोधात रोटाव्हायरस तसेच न्यूमोनियावरील लसी देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या लसी सुरू करण्यासाठी अखिल भारतीय बालरोग संघटनेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्या लसी सुरू झाल्या आहेत. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वातासारखे आजार घातक आहेत. पोलिओचा त्यात समावेश होता. पोलिओ आटोक्यात आल्याने गोवर, रोटाव्हायरस, न्यूमोनिया या आजारांवर लसीकरणासाठी लक्ष केंद्रित केले आहे. - लसीकरणापुढील आव्हाने कोणती ? देशात लसीकरण १०० टक्के पूर्ण होत नाही. वेळापत्रकानुसार आठवण करणारा मेसेज देण्याचा प्रकल्प अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेने राबविण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण केल्याने कोणताही धोका नाही. तसेच दुर्बल, भटक्या विमुक्त जाती जमाती वर्गात लसीकरण करण्याचे राहून जाते. त्या वर्गामध्ये याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. शहरासह ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. लसीकरण किंवा मुलांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात नाही. त्या करिता 'इम्युनाइज इंडिया' प्रकल्पाद्वारे पालकांना मेसेज पाठवून लसीकरणाचा 'रिमाइंडर' देतो. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशात लसीकरणाची भयावह स्थिती आहे. त्या ठिकाणी लसीकरणाबाबत अज्ञान आहे. एकूणच लसीकरणाबाबत पालकांसह समाजातही आरोग्य शिक्षण दिले पाहिजे. हेच लसीकरणापुढील मोठे आव्हान आहे. - लहान मुलांच्या आरोग्याबाबत अखिल भारतीय बालरोग संघटना कोणते प्रयत्न करीत आहे? लहान मुलांच्या आरोग्याबाबत बालरोग तज्ज्ञ संघटनेने विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. बाळाच्या जन्माच्यावेळी आईला स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयुष्याची 'आदर्श सुरुवात' असा दहा सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. बाळाच्या जन्मानंतर अर्धा तासात स्तनपान करणे, जंतूसंसर्गापासून दूर राहण्यासाठी हात स्वच्छ धुणे याबाबत प्रबोधन सुरू आहे. पाळण्यापासून ते हातात खडू धरेपर्यंत मुलांचा विकास कसा होतो, लसीकरण आणि संसर्गजन्य आजार प्रशिक्षण परिवर्तन अशा विविध मुद्यांवर संघटना आता वर्षभर काम करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पात्रता परिक्षेत ९५ टक्के अनुत्तीर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) दुसऱ्या पेपरचा निकाल यंदाही १० टक्क्यांच्या आतच लागला आहे. राज्यात सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी केवळ ५.६९ टक्केच उमेदवार पात्र ठरल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. राज्यातील सुमारे सव्वा लाख उमेदवारांमधून केवळ ७०७८ उमेदवार टीईटी उत्तीर्ण झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने १६ जानेवारी रोजी घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील दुसऱ्या पेपरचा निकाल गुरुवारी जाहीर केला. www.mahatet.in या वेबसाइटवरून हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निकालातील आकडेवारीनुसार राज्यभरातून १,२४,४३४ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ ७,० ७८ उमेदवारांना उत्तीर्ण होण्यात यश मिळाले आहे. राज्याचा एकूण निकाल ५.६९ टक्के इतका लागला आहे. मराठी माध्यमातून परीक्षा दिलेल्या १,१५,०२७ उमेदवारांपैकी ६८२२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. मराठी माध्यमासाठी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची टक्केवारी ५.९३ टक्के आहे. इंग्रजी माध्यमातील उत्तीर्णांची टक्केवारी २.२३, तर उर्दू माध्यमातील टक्केवारी ३.२३ टक्के असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
या निकालाविषयी काही आक्षेप असल्यास संबंधितांनी योग्य त्या अर्जासह ७ मे पूर्वी परिषदेकडे तक्रार करावी, असे आवाहनही केले आहे.
000
शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपर क्रमांक उत्तीर्णांची आकडेवारी
माध्यम परीक्षार्थी हजर उमेदवार पात्र उमेदवार टक्केवारी
मराठी १,२५,२०९ १,१५,०२७ ६८२२ ५.९३
इंग्रजी ५३५२ ४७६२ १०६ २.२३
उर्दू ४८९९ ४६४५ १५० ३.२३
एकूण १,३५, ४६० १,२४, ४३४ ७०७८ ५.६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण प्रकरणी परस्पर​विरोधी गुन्हे

$
0
0

बाबा मिसाळ यांना जामीन; राजकीय वळण लागण्याची चिन्हे
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महंमदवाडी येथील ३७०६ चौरस मीटर (साधारणतः एक एकर) जमिनीवर अतिक्रमण केलेल्या घटनेला राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकाच प्लॉटवर अतिक्रमण केल्याप्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, अतिक्रमणप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यांत भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस बाबा मिसाळ यांना कोर्टाने जामीन दिला आहे. कोंढवा पोलिसांनी अमजद बडगुजर (वय ४६, रा. कौसरबाग हौसिंग सोसायटी, कोंढवा खुर्द) यांनी​ दिलेल्या तक्रारीनुसार बाबा मिसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. त्यानंतर मिसाळ यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार बडगुजर आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बडगुजर आणि त्यांच्या भावांनी मिळून लँड डेव्हलपर कंपनीची स्थापन केली होती. या कंपनीने डिसेंबर २०१४मध्ये यशवंत नाना चव्हाण आणि आणखी नऊ जणांकडून महंमदवाडी येथील ही जागा खरेदी केली होती. या जागेशेजारी मिसाळ यांचा प्लॉट आहे. या प्लॉटवर मिसाळ यांनी अतिक्रमण केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिसाळ यांनी बडगुजर यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिसांत धाव घेतली होती. मिसाळ यांच्या ७० गुंठे जमिनीवरील काही हिस्सा बळकावण्याचा उद्देशाने यशवंत चव्हाण आणि बडगुजर यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. बडगुजर बंधूंनी मिसाळ यांच्या जमिनीवर अतिक्रमण केले, तसेच चव्हाण यांना जमीन खरेदी करताना दिलेले ३५ लाख रुपये त्यांनी जमिनीचे मूळ मालक काटकर यांना न देता त्यांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
..
आ. मिसाळ-पोलिस आयुक्त भेट
मिसाळ यांच्याविरुद्ध राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिसाळ अनेक वर्ष पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, आमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप आमदार माधुरी मिसाळ यांनी केला आहे. दरम्यान, श्रीमती माधुरी मिसाळ यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा स्थिरावला ३९ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील उन्हाची तीव्रता गुरुवारी थोडी कमी झाली असून, पारा ३९.८ अंशांवर स्थिरावला आहे. तरीदेखील उकाडा मात्र कायमच आहे.
लोहगावमध्ये ४०.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत उन्हाच्या तप्त झळांपासून दिलासा मिळणार नसल्याची चिन्हे आहेत. तापमान ४१ अंशांच्या दरम्यान जाण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. ३५ अंशांपर्यंत कमी झालेल्या कमाल तापमानाने पुन्हा चाळिशी ओलांडली आहे. त्यामुळे, सकाळी नऊपासूनच पुणेकरांना झळांचा सामना करावा लागत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने घामाच्या धारांनी पुणेकर हैराण झाले आहेत.
पुढील दोन दिवसांत उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. तसेच, कमाल तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक असेल, असे संकेत दिले आहेत. उन्हाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता असल्याने सायंकाळी शहराच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, शहरासह राज्याच्या सर्व भागांतही पुन्हा उकाडा तीव्र झाला आहे. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद नांदेड येथे झाली. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्येही पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रागाच्या भरात तरुणाचा खून

$
0
0

घरफोडी करूनही ऐवज न मिळाल्याने कृत्य; सराईत गुन्हेगार अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज येथे गेल्या महिन्यात झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन ठिकाणी घरफोडी करूनही काहीच हाती न लागल्याने चोरट्यांनी रागाच्या भरात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीचा खून केल्याचे उघड झाले आहे.

तानाजी नाना टकले (वय २७, रा. दुर्गा हिल्स, अंजलीनगर, कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संदीप उर्फ संदीपा उर्फ जयकूल नमाशा भोसले (वय २८, सध्या रा. वडकीनाला, ता. हवेली, मूळ रा. गुनावरे, ता. फलटण, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा दुसरा साथीदार फरारी आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली.

भोसले आणि त्याचा साथीदार ३ एप्रिलला रात्री घरफोडी करण्यासाठी दुचाकीवरून कात्रज परिसरात पोहोचले. तेथून ते अंजलीनगरमध्ये पोहोचले. अंजलीनगर येथे दोन ठिकाणी चोरी केली. या चोरीतून त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यानंतर हे दोघे टकले यांच्या घराजवळ पोहोचले. टकले घराबाहेर मच्छरदाणी लावून झोपले होते. दोघा आरोपींनी मिळून टकले यांचे घर फोडले. घरातून त्यांना दोन मोबाइल आणि किरकोळ रक्कम असा ऐवज मिळाला. तीन ठिकाणी घरफोडी करूनही काहीच हाती न लागलेल्या चोरट्यांनी चिडून टकले यांच्या डोक्यात कटावणीने हल्ला केला. त्यातच टकले यांचा मृत्यू झाला.

भारती विद्यापीठ पोलिसांना तपासादरम्यान घरफोडी करणाऱ्या संशयितांचे फुटेज मिळाले होते. त्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात झाली. फुटेजशी मिळत्याजुळत्या ७० संशयितांकडे चौकशी करण्यात आली. या दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब सुर्वे यांच्या पथकाला भोसलेबद्दल माहिती मिळाली. भोसलेला तपासासाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.
..
भोसले निघाला सराईत गुन्हेगार

भोसले आणि त्याच्या साथीदारांनी साताऱ्यातील दहीवडी परिसरात राहणाऱ्या आमदाराच्या घरी दरोडा घातला होता. ठाण्यातील नालासोपारा येथे त्याने फौजदारावहीर हल्ला केला. विरार पोलिस ठाण्यात भोसले आणि त्याच्या साथीदारांविरुध्द २००८ मध्ये 'मोक्कां'तर्गत गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो नालासोपारा पोलिसांना हुलकावणी देत आहे. त्याने गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे
...............
पोलिस मित्रांची झाली मदत

पोलिस मित्र चंद्रकांत मोरे आणि सचिन लिम्हण यांनी गेल्या तीन आठवड्यात कात्रज परिसरातील 'सीसीटीव्ही' फुटेज तसेच गुन्हेगारांची माहिती मिळवून देण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत केली. सुर्वे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक शेखर शिंदे, फौजदार उत्तम बुदगुडे, कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, प्रवीण काळभोर, समीर बागसीराज, बाबा नरळे, संदीप पवार आदींचा तपास पथकात सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सा’ व ‘नी’ तर्फे आज संगीत मैफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सा' व 'नी' सूरसंगीत संस्थेतर्फे प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांच्या जयंती निमित्त शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित करण्यात आली आहे. आज, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कर्नाटक हायस्कूल येथील शकुंतला शेट्टी सभागृहात ही मैफल रंगणार आहे. मैफलीमध्ये पं. शुभांकर बॅनर्जी यांचे तबलावादन होणार आहे. ज्येष्ठ गायक डॉ. पं. अजय पोहनकर यांचे गायनही रसिकांना अनुभवता येणार आहे. कीबोर्डवर अभिजित पोहनकर, तबल्यावर ओजस अधिया आणि हार्मोनियमवर अजय जोगळेकर साथसंगत करणार आहेत, अशी माहिती सुरेंद्र मोहिते, सावनी मोहिते यांनी दिली. ही मैफल सर्वांसाठी खुली असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रुपी’ तोडग्याबाबत दिल्ली दरबारी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रुपी सहकारी बँकेबाबत तोडगा काढण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या उपस्थितीत पुढील महिन्यात बैठक होणार आहे. बैठकीत प्रामुख्याने बँकेला अडचणीतून बाहेर काढण्याबाबत चर्चा होणार आहे.

ही बैठक होईपर्यंत 'पुणेकर नागरिक कृती समिती'चे अध्यक्ष मिहिर थत्ते यांनी आमरण उपोषण स्थगित केल्याचे कळवले आहे. 'पालकमंत्री गिरीश बापट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीला जाणार असून, गडकरी, सिन्हा आणि अन्य व्यक्तींशी चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर बापट यांच्या उपस्थितीत सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रशासकीय मंडळ आणि पुणेकर नागरी कृती समिती यांची संयुक्त बैठक होणार आहे. ही बैठक होईपर्यंत आमरण उपोषण स्थगित केले आहे,' असे थत्ते म्हणाले.
'रुपी'तील ठेवीदारांना प्रत्येकी २० हजार रुपये मिळवेत, अशी थत्ते यांची मागणी आहे. ही मागणी मान्य होण्यासाठी एक मेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, नवीन प्रशासकीय मंडळाने पदभार स्वीकारला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) खातेदारांना २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रशासकीय मंडळ ही रक्कम देण्यास तयार नाही. त्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण रखडले

$
0
0

लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण रखडले

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोहगाव विमानतळाच्या प्रस्तावित विस्तारीकरणासाठी घरांच्या संपादनासह अन्य अडथळे दूर होत नसल्याने हे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. लोहगावचे रखडलेले विस्तारीकरण आणि नव्या विमानतळाच्या जागेचा शोध थांबत नसल्याने पुणेकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानसेवेपासून दूर राहावे लागत आहे.
लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी गेल्या काही महिन्यांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. हे विमानतळ संरक्षण खात्याच्या अखत्यारित असल्याने विमान उड्डाणांवर निर्बंध येत आहेत. या विमानतळाचे विस्तारीकरण करून विमानोड्डाणांची संख्या वाढविणे आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा देण्याचा प्रस्ताव आहे.
या विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी बैठक घेतली. विस्तारीकरणासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच या विस्तारीकरणासाठी संरक्षण खात्याने त्यांच्याकडील पंधरा एकर जमीन एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडियाला तीस वर्षांच्या कराने देण्यासही संमती दिली.
केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचा पाहणी केली. विस्तारीकरणासाठी दिलेल्या जमिनीतून सध्याचा विमानतळाकडे जाणारा रस्ता जातो. विस्तारीकरणाच्या कामात हा रस्ता बंद होणार आहे. त्यासाठी नवा पर्यायी रस्ता करावा लागणार आहे. हा पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी चारशेहून अधिक घरांचे संपादन करावे लागणार आहे. हे संपादन करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे मत आहे. या घरांऐवजी विमानतळाच्या दुसऱ्या बाजूकडील जमीन संपादित करून विस्तारीकरण करणे शक्य असल्याचा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला होता. मात्र, संरक्षण खात्याने त्याला संमती दर्शविली नाही.
या अडथळ्यांतून मार्ग काढण्यासाठी विमानतळापर्यंत भुयारी मार्ग तयार करण्याचा विचार करण्यात आला होता. भुयारी मार्गातून थेट विमानतळापर्यंत वाहने नेण्याची सोय, बहुमजली पार्किंग तसेच शॉपिंग मॉल करण्याच्या पर्यायाचा सुद्धा विचार करण्यात आला होता. त्यासाठी विमानतळालगतची खासगी जागा ताब्यात घेण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासंबंधी जागा मालकांशी बैठकही घेण्यात आली. परंतु त्यातून अद्याप मार्ग निघालेला नाही. केवळ बैठका आणि चर्चा यापुढे विमानतळाचे विस्तारीकरण गेलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी

$
0
0

साहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सर्वाधिक श्रीमंत संमेलन अशी चर्चा असलेल्या पिंपरी येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी रुपये इतका झाला आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी साहित्य महामंडळाला खर्चाचा अहवाल सादर केला असून, त्यामध्ये संमेलनाच्या खर्चाची नोंद सव्वा कोटी अशी करण्यात आली आहे.
पिंपरी येथे झालेल्या संमेलनाच्या आयोजनाचा मान डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडे होता. सरकारचा संमेलनासाठी मिळालेला २५ लाखांचा निधी डॉ. पाटील यांनी महामंडळाला सुपूर्द केला होता. डॉ. पाटील यांनी सरकारचा निधी स्वीकारून तो परत केल्याने निधी सरकारचा की स्वागताध्यक्षांचा, असा पेच निर्माण झाला होता. खर्चाचा अहवाल द्यावा, असे पत्र महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी स्वागताध्यक्षांना पाठवले होते. त्यावर 'कोणाकडूनही एका रुपयाचे अनुदान घेतलेले नाही. सरकारचे २५ लाख रुपये संमेलनाच्या समारोपावेळी महामंडळास परत दिले आहेत. त्यामुळे साहित्य महामंडळाला हिशेब देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे पैसे वापरलेच नाहीत, तर हिशेब कशाचा देणार,' अशी भूमिका डॉ. पाटील यांनी घेतली, तर 'संमेलनाच्या खर्चाचा अहवाल आयोजक संस्थेने देणे बंधनकारक असून, अहवाल महामंडळाला द्यावाच लागेल,' अशी ठाम भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतली. संमेलनाच्या खर्चाचा वाद विकोपाला गेला असतानाच डॉ. पाटील यांनी महामंडळाला खर्चाचा अहवाल दिला आहे.
'संमेलनाच्या खर्चाचा अहवाल साहित्य महामंडळाकडे सुपूर्द केला आहे. संमेलनात एक कोटी २६ लाख इतका खर्च झाला आहे, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे,' अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. पाटील यांनी 'मटा'ला दिली.
'स्वागताध्यक्षांचा खर्चाचा अहवाल मिळाला आहे. महामंडळाच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात येईल,' असे पायगुडे यांनी सांगितले.
.................
२५ लाखांचा निधी वापरला
सर्वांत श्रीमंत ठरलेले साहित्य संमेलन अशी चर्चा झालेल्या साहित्य संमेलनाला सर्वात कमी खर्च आला आहे. पुण्यात महामंडळ असताना झालेल्या सासवड व घुमानच्या संमेलनाचा खर्च दोन कोटी दाखविण्यात आला होता. पिंपरी येथील संमेलनात स्टॉलचे भाडे २३ लाख, डॉ. पाटील यांनी नाम फाउंडेशनला दिलेले ७८ लाख व सरकारचे २५ लाख असे मिळून सव्वा कोटी खर्च दाखविण्यात आला आहे. खर्चात सरकारच्या २५ लाख निधीचा उल्लेख केल्याने या निधीचा विनियोग झाल्याचे स्पष्ट झाले असून हा प्रश्न मिटविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद यादव, मेहता यांची शिक्षा कायम

$
0
0

आनंद यादव, मेहता यांची शिक्षा कायम

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुस्तकांमध्ये संतांविषयी बदनामीकारक मजकूर लिहिल्याबद्दल ज्येष्ठ लेखक आनंद यादव व प्रकाशक सुनील मेहता यांना प्रथमवर्ग न्यादंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांनी कायम ठेवली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोघांना दहा हजार रुपये दंड किंवा एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा मे २०१४ मध्ये सुनावली होती.
आनंद यादव लिखित 'संतसूर्य तुकाराम' आणि 'लोकसखा ज्ञानेश्वर' या पुस्तकांमध्ये संतांविषयी बदनामीकारक मजकूर लिहिल्याचा दावा करण्यात आला होता. संत तुकाराम महाराजांचे नववे वंशज जयसिंग विश्वनाथ मोरे यांनी एप्रिल २००९ मध्ये डॉ. यादव, स्वाती यादव, तसेच प्रकाशक सुनील मेहता यांच्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला होता. हे लेखन आक्षेपार्ह असल्याचा आरोप कोर्टाने मान्य करत दोन्ही पुस्तकांचे लेखक डॉ. आनंद यादव; तसेच प्रकाशक सुनील मेहता यांना दोषी ठरवले. २७ मे २०१४ रोजी दोघांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड व तो न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याची साधी शिक्षा न्यायदंडाधिकारी के. पी. जैन-देसर्डा यांनी सुनावली. स्वाती यादव यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. या निर्णयावर सत्र न्यायालयात अपील करण्यात आले होते. सत्र न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला आहे. मोरे यांच्या वतीने एम. एम. केळकर यांनी काम पाहिले.
याबाबत मोरे म्हणाले, 'लेखकाने संतांचा केलेला अपमान हा समस्त वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचे कोर्टाने निकालात म्हटले आहे. दहा हजार रुपये खिशात असतील, तर कोणीही उठावे आणि संताची बदनामी करावी, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुपी’च्या खातेदारांना मिळणार पाच हजार

$
0
0

'रुपी'च्या खातेदारांना मिळणार पाच हजार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रुपी को ऑप. बँकेचे विलिनीकरण करण्यात अडथळा येऊ नये, यासाठी खात्यात पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असणाऱ्या खातेदारांना सर्व रक्कम देण्याचा निर्णय नवनियुक्त प्रशासकीय मंडळाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) पाठवण्यात येणार असून, या निर्णयाचा लाभ सुमारे चार लाख खातेदारांना मिळू शकणार आहे.
प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी सदस्य विजय भावे, सदानंद जोशी, 'आरबीआय'चे माजी अधिकारी अच्युत हिरवे उपस्थित होते. या निर्णयाबाबत पंडित म्हणाले, 'मागील प्रशासकीय मंडळाने खातेदारांना २० हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सुमारे ३८८ कोटी रुपये वाटावे लागणार होते. त्यामुळे विलिनीकरणात अडथळे आले असते. त्यामुळे २० हजार रुपये न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी पाच हजार रूपये देण्यात येणार आहेत. या संदर्भात 'आरबीआय'च्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्या बैठकीत २० हजार रूपये देणे शक्य नसून, पाच हजार रुपये देण्याची तयारी दर्शवण्यात आली. त्यास 'आरबीआय'कडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. त्यानुसार नवीन प्रस्ताव पाठवला जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर रक्कम दिली जाईल.'
'सध्या पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम खात्यात असलेल्या खातेदारांची माहिती घेण्यात येत आहे. अशाप्रकारचे सुमारे चार लाख खातेदार आहेत. तीन ते चार आठवड्यांनी प्रत्यक्ष रक्कम वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर खातेदारांचा विचार करण्यात येणार आहे,' असेही पंडित म्हणाले.
'गेल्यावर्षी बँकेने ७१ कोटी रूपयांची कर्जवसुली केली. बँकेचे सहा लाख ३१ हजार खातेदार आहेत. बँकेवर प्रशासक मंडळ नेमल्यापासून आतापर्यंत ४३ हजार खातेदारांना सुमारे १७९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. बँकेचे राष्ट्रीयीकृत बँकेत विलिनीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,' असे त्यांनी सांगितले.
................
कर्जबुडव्यांना काळ्या यादीत टाका
'बँकेचे कर्ज बुडवणाऱ्यांची यादी बनवण्यात येणार आहे. ती यादी 'आरबीआय'कडे पाठवली जाणार आहे. संबंधित कर्जदारांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करणार आहे. त्यामुळे त्यांना इतर बँकांमध्ये कर्ज मिळू शकणार नाही. त्या कर्जदारांविरुद्ध सहकार खात्याच्या मदतीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही केली जाणार आहे,' असे पंडित यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री सूत्र स्वीकारत नाहीत का?

$
0
0

मुख्यमंत्री सूत्र स्वीकारत नाहीत का?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'प्रक्रिया अर्धवट राहिली म्हणून संस्थेचे काम थांबवून चालत नाही. माणसं बदलली तरी संस्था कायम असते. ती टिकवायची असते व पुढे न्यायची असते,' अशा शब्दांत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या भावी पदाधिकाऱ्यांनी महामंडळाचा कारभार स्वीकारणार असल्याचे स्पष्ट करत वादावर पडदा टाकला. 'मुख्यमंत्री बदलल्यावर अर्धवट कामामुळे पुढील मुख्यमंत्री सूत्र स्वीकारत नाहीत का,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
साहित्य महामंडळाचे कार्यालय एक एप्रिलपासून विदर्भ साहित्य संघाकडे जाणे अपेक्षित असताना पदाधिकाऱ्यांची निवड व अर्धवट कामे यामुळे महामंडळाचा कारभार एक महिना साहित्य परिषदेतून चालवला जात होता. परिषदेचे प्रमुख कार्यवाह यापुढेही महामंडळाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत राहणार असल्याने हंगामी कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
मंहामंडळाचे कार्यालय तीन वर्षासाठी परिषदेकडे होते, आता ते विदर्भ साहित्य संघाकडे जाणार असून आज (शनिवार) नागपूर येथे होणाऱ्या बैठकीत महामंडळाचे नवीन पदाधिकारी निवडले जाणार आहेत. महामंडळाच्या आर्थिक ताळेबंदाचे काम अर्धवट स्वरूपात असून संमेलनाच्या खर्चाच्या वादावरून निर्माण झालेला वाद ताजा आहे. मात्र, याही परिस्थितीत विदर्भ साहित्य संघ महामंडळाचा ताबा घेणार आहे.
'महामंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. श्रीपाद जोशी यांचे नाव चर्चेत आहे. माणसे गेली तरी पद व संस्था कायम असते. संस्थेची कामे करावीच लागतात, ती थांबवून चालत नाहीत. मुख्यमंत्री बदलल्यावर अर्धवट कामामुळे पुढील मुख्यमंत्री सूत्र स्वीकारत नाहीत का,' असा सवाल करीत ज्यांना असे काम स्वीकारायचे नसेल, त्यांनी काम करू नये,' अशी स्पष्ट भूमिका डॉ. जोशी यांनी 'मटा'शी बोलताना मांडली.
'साहित्य महामंडळावरील पद लाभाचे नसून ते सेवेचे पद आहे. ही सामाजिक जबाबदारी आहे. ती स्वीकारायलाच हवी. साहित्य परिषदेकडे महामंडळ असताना त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षितच आहे, पण काही कामे अर्धवट राहिली असतील तरी आम्ही महामंडळाचा कारभार स्वीकारणार आहोत,' असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
..................
जबाबदारीने काम केले तर बोजा वाढत नाही
'एखादी प्रक्रिया अर्धवट असेल तर ती पूर्ण करावी लागेल. जबाबदारीने काम केले नाही, तर पुढच्या व्यक्तींवर बोजा वाढतो. तीन वर्षे योग्य पद्धतीने काम केले नसेल, तर पुढील वर्ष आम्हाला तेच काम करावे लागेल. विशेष असे आम्ही काय करणार,' असा टोला डॉ. श्रीपाद जोशी यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुध ग्रहाचे अधिक्रमण दिसणार नऊ मे रोजी

$
0
0

बुध ग्रहाचे अधिक्रमण दिसणार नऊ मे रोजी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खगोलशास्त्रातील दुर्मिळ आणि नयनरम्य घटना असणारे बुध ग्रहाचे अधिक्रमण (ट्रांझिट) येत्या नऊ मे रोजी संपूर्ण भारतातून दिसणार आहे. सूर्य बुध आणि पृथ्वी एका रेषेत आल्यामुळे बुध ग्रहाचा सूर्यबिंबावरून होणारा प्रवास या वेळी पाहता येणार आहे. भारतातून दुपारी साडेचार ते सूर्यास्तापर्यंत ही घटना दिसू शकणार आहे. भारतातून बुधाचे अधिक्रमण यानंतर २०३२ मध्ये दिसणार असल्यामुळे ही दुर्मिळ घटना पाहण्याची संधी सोडू नये, असे आवाहन खगोलतज्ज्ञांनी केले आहे.

बुध आणि शुक्र या पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहांच्या कला संध्याकाळच्या किंवा पहाटेच्या आकाशात दुर्बिणीद्वारे पाहता येतात. या ग्रहांच्या सूर्याच्या दिशेला असणाऱ्या भागावर प्रकाश, तर विरुद्ध बाजूला सावली असल्यामुळे पूर्ण गोलाकार बुध किंवा शुक्राचे दर्शन घडू शकत नाही. मात्र, अधिक्रमणादरम्यान जेव्हा या ग्रहांचा सूर्यबिंबावरून प्रवास होतो, तेव्हा मात्र, पूर्ण गोलाकार बुध आणि शुक्र पाहण्याची दुर्मिळ संधी आकाशप्रेमींना मिळत असते.
पुण्यातून पाहताना नऊ मे रोजी दुपारी चार वाजून ४२ मिनिटांनी बुधाने सूर्याला पूर्वेकडून स्पर्श केल्याचे दिसून येईल. मात्र, बुधाचा आकार लहान असल्यामुळे काही मिनिटांनी बुधाचा छोटा काळा ठिपका सूर्यावर आल्याचे दिसून येईल. त्यानंतर पुढील दोन तास बुधाचा सूर्यावरून पश्चिमेकडे होणारा प्रवास पाहता येईल. नऊ मे रोजी पुण्यातून सूर्यास्त सहा वाजून ५९ मिनिटांनी होणार असल्यामुळे दोन तासांहून जास्त वेळ ही घटना पाहता येऊ शकेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार अधिक्रमणाचा मध्य साडेआठ वाजता, तर शेवट साडेबारा वाजता होणार आहे.

साध्या डोळ्यांनी ही घटना दिसणार नसून, पिनहोल कॅमेरा, किंवा छोट्या दुर्बिणीद्वारे सूर्याची प्रतिमा कागदावर किंवा भिंतीवर घेऊन सूर्यावरुन प्रवास करणारा बुधाचा छोटा ठिपका पाहता येऊ शकेल.
-----------------
बुध अधिक्रमणावर रविवारी कार्यशाळा

बुधाचे अधिक्रमण सुरक्षितपणे कसे पाहावे आणि दाखवावे यासाठी खगोल विश्व, विज्ञान भारती आणि केंद्र सरकारच्या विज्ञान प्रसार या संस्थेच्या वतीने येत्या रविवारी (एक मे) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे दुपारी तीन ते सहा या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. शाळा, महाविद्यालय आणि सोसायटीमध्ये बुध अधिक्रमण दाखवण्याची इच्छा असणाऱ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांना अधिक्रमण आणि सूर्याच्या निरीक्षणाची डीव्हीडी देण्यात येणार असून, ही कार्यशाळा विनामूल्य आहे. नावनोंदणीसाठी ९९२२९२९१६५ किंवा ९७६६२९१६३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवरायांची मूळ चित्रे स्वराज्यात परतली

$
0
0

Prasad.Pawar@timesgroup.com

पुणे : महाराष्ट्राचा अभिमानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र महाराष्ट्रात आणण्याची मोहीम पुण्याचे मालोजीराव जगदाळे या इंजिनीअर तरुणाने फत्ते केली आहे. महाराजांचे मूळ चित्र म्हणून राज्य शासनाने यापूर्वी याच चित्राला मान्यता दिलेली आहे. मात्र, त्याची मूळ प्रत आपल्याकडे उपलब्ध नव्हती. हे चित्र आणि महाराजांचे यापूर्वी कधीही न पाहिलेले रंगीत चित्र नेदरलँड आणि क्रोएशिया येथील संग्रहकांकडून मालोजी यांनी आणले आहे.

पहिले चित्र (कृष्णधवल) 'मार्गो एन फ्रँक वॅन लॅटम - वॅन डंगन' या डच संग्रहकाकडून, तर रंगीत चित्र क्रोएशियातील लादिमीर मेडमोर या संग्रहकाकडून मालोजी यांनी विकत घेतली आहेत. यापैकी पहिले चित्र डच संग्रहकांच्या ऑक्शन हाऊसकडून आणि दुसरे चित्र खासगी संग्रहकाकडून उपलब्ध झाले आहे.

कृष्णधवल चित्र

हे चित्र फ्रान्स्वा वॅलेंटाइन या डच अधिकाऱ्याच्या 'ओल्ड अॅण्ड न्यू ईस्ट इंडिया' या चौथ्या खंडाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित करण्यात आले आहे. त्याने या पुस्तकात पूर्वेकडील देश, जसे की भारत आणि तेथील मुघल सत्ता याचे अभ्यासात्मक वर्णन केले आहे. त्यात शिवछत्रपतींच्या आयुष्यातील इ. स. १६६२ ते १६८० या कालखंडातील पराक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे. त्याचा उल्लेख असणारी खंडातली चार मूळ पानेही या चित्रासोबत मिळाली आहेत.

रंगीत चित्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे घोड्यावर विराजमान असलेले हे रंगीत चित्र यापूर्वी कुणीही पाहिलेले नाही, प्रथमच हे चित्र लोकांसमोर येत आहे हे याचे वैशिष्ट्य.

''शिवरायांचे किमान एकतरी अस्सल चित्र भारतात यावे म्हणून मी प्रयत्नशील होतो, त्यासाठी खर्च आला तरी पर्वा नव्हती. युरोपातील शक्य तितक्या खाजगी संग्राहकांशी, संस्थांशी यासंदर्भात संपर्क साधला असता क्रोएशियामधील लादिमीर मेडमोर या संग्राहकाशी मेल द्वारे बोलणे झाले आणि त्याने मला शिवरायांच्या या चित्राची माहिती दिली.'' - मालोजीराव जगदाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमविवाहाला नकार; युगुलाची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्यानं नैराश्य आलेल्या प्रेमी युगुलानं रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पुण्यातील हडपसर येथे ही घटना घडली आहे.

शुभम चव्हाण (२१) व अश्विनी गावडे (१८) अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही पुण्यातील शिंदे वस्तीत राहत होते. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. पण घरातल्यांचा त्यांच्या प्रेमाला व विवाहालाही तीव्र विरोध होता. शुभमच्या घरातल्यांनी त्याच्या इच्छेचा विचार न करता त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्नही ठरवले होते. त्यामुळं शुभम निराश झाला होता. अश्विनीचीही तीच अवस्था होती.

शुभम आणि अश्विनीनं शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले. रात्री दोन वाजून गेल्यानंतरही ते परत न आल्यानं त्यांच्या कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ शोध सुरू केला. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास रेल्वे स्थानकावर पोलिसांना दोघांचे मृतदेह सापडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वागस्करांचे नाव अधिकृत नाही

$
0
0

एसव्हीपीव्ही संचालकपदाबाबत मनसेचा खुलासा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटीच्या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही‌) कंपनीच्या संचालकपदासाठी आयुक्तांकडे आलेले नाव पक्षाचे अधिकृत नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच नेत्यांना विश्वासात न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) गटनेते बाबू वागस्कर यांनी संचालक म्हणून स्वत:चे नाव दिले होते. हे नाव अधिकृत नसल्याचे नगरसेवक किशोर शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनंतरच ही माहिती देत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
'एसपीव्ही'च्या संचालकपदी कोणला संधी द्यायची याची नावे भारतीय जनता पक्ष आणि मनसेने द्यावी, असे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले होते. संचालक म्हणून कोणाच्या नावाची शिफारस करायची या निर्णय दोन्ही पक्षांचे नेते, शहरातील पदाधिकारी तसेच पालिकेतील नगरसेवक यांच्याशी चर्चा करून निश्चित केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून 'मनसे'चे गटनेते वागस्कर यांचे नाव परस्पर संचालकपदासाठी आयुक्तांकडे गेल्याने 'मनसे'मध्ये एकच खळबळ उडाली होती. वागस्कर यांनी कोणालाही विश्वासात न घेता, कोणतीही चर्चा न करता स्वत:चेच नाव दिल्याने पक्षामध्ये चांगली नाराजी निर्माण झाली होती. वागस्कर यांनी परस्पर नाव दिल्याची तक्रार शहरातील काही नगरसेवकांनी थेट राज ठाकरे यांच्याकडे केल्याने त्यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना फोन करून हे नाव अधिकृत नसल्याचे सांगितले. संचालकपदासाठी 'मनसे'चे गटनेते वागस्कर यांच्या नावाची‌शिफारस प्रशासनाकडे आल्याच्या माहितीला आयुक्त कुमार यांनी दुजोरा दिला.
'एसपीव्ही'च्या संचालक मंडळाची बैठक झाल्यानंतर मनसेचे नगरसेवक किशोर शिंदे यांन‌ी पत्रकार परिषद घेऊन संचालकपदासाठी वागस्कर यांनी दिलेले नाव पक्षाचे अधिकृत नसल्याचा गौप्यस्फोट केला. संचालकपदासाठी पक्षाने अजून कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब केले नाही. वागस्कर यांनी आयुक्तांना परस्पर पत्र देऊन त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. हे पक्षाचे अधिकृत पत्र नाही, असे आयुक्तांची भेट घेऊन स्पष्ट केल्याचे शिंदे यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या नावाबद्दल खुलासा करण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा खुलासा करत असल्याचे त्यांनी सांगितले. वागस्कर यांनी परस्पर केलेल्या उद्योगामुळे लवकरच त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
...
बीडकर यांचा पत्ता कट
'एसपीव्ही'च्या संचालकमंडळामध्ये महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेने यांचा समावेश आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपच्या गटनेत्यांनी संचालक म्हणून संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र सदस्यांनाही संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे भाजपने पक्षाचे गटनेते गणेश बीडकर यांना संधी न देता, पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक येनपुरे यांना संधी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेणार

$
0
0

पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाची प्रस्तावाला मान्यता
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यासह राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती ओढावल्याने अनेक स्वयंसेवी संस्थांकडून गावे दत्तक घेऊन तेथील नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाने पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात कँन्टोन्मेंट बोर्डाच्या विशेष बैठकीत नगरसेवक अतुल गायकवाड यांनी दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय संरक्षण खात्याकडे पाठविला जाणार आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळग्रस्त स्थिती आहे. पाणीटंचाई आहे. जनावारांना चारा मिळत नाही. शेतीचे उत्पादन घटले आहे. पाण्याअभावी अनेक गावे, गावातील कुटुंबीयच शहराकडे स्थलांतरीत होऊ लागले आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती ओढावली आहे. त्याचेच काही प्रमाणात पुणे जिल्ह्यातील गावांवर पडसाद उमटले आहेत. अशा पार्श्वभूमीवर कँन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक गायकवाड यांनी बोर्डाने गाव दत्तक घेण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला.
'कँन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बोर्डाचे अन्य नगरसेवक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांनी हा प्रस्ताव मान्य केला. त्यानुसार आता बोर्डाच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त गाव हे पुणे जिल्ह्यातील तालुक्यापैकी एक असणार आहे. शिवाय पुण्यापासून नजिकचे असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. या गावात पाण्यापासून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर्वार्थाने गावाचा विकास करण्यावर आमचा भर असेल,' असे अतुल गायकवाड यांनी सांगितले.
दत्तक गावाच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिल्यास देशातील ६२ कँन्टोन्मेंटला अशा प्रकारचे गाव दत्तक घेण्याचे अधिकार मिळू शकतात. त्यामुळे अनेक गावांचा कायापालट होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
...
पुण्यापासून नजिकचे असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. या गावात पाण्यापासून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर्वार्थाने गावाचा विकास करण्यावर आमचा भर असेल.
- अतुल गायकवाड, नगरसेवक, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायन्स शाखा सुरू होणार?

$
0
0

गोहे बुद्रुकमधील आश्रमशाळेतील अकरावीसाठी अपर आदिवासी विकास आयुक्तांकडे प्रस्ताव
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक येथील आश्रमशाळेत अकरावीकरीता सायन्स शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांनी अपर आदिवासी विकास आयुक्तांना पाठविला आहे. त्यामुळे आदिवासी विकास आयुक्तालयाने तातडीने पावले उचलल्यास यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना सायन्सच्या शिक्षणासाठी घर सोडावे लागणार नाही.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील १३ आदिवासी आश्रमशाळांपैकी केवळ दोन आश्रमशाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज असून, तेथे केवळ आर्ट‍्स शाखेचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील १२० गावातील विद्यार्थ्यांना सायन्स व कॉमर्स शाखांचे शिक्षण घेता येत नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या कुटुंबातील विद्यार्थीच तालुक्याच्या ठिकाणी किंवा पुण्यात शिक्षणासाठी येतात. हा प्रकार 'मटा'ने प्रकाशझोतात आणला होता. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने आदिवासी विकास आयुक्तालयाकडे सायन्स शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत (घोडेगाव) पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत एकूण २३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. त्यापैकी १३ आश्रमशाळा या पुणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक व जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील आश्रमशाळेत ज्युनिअर कॉलेज कार्यान्वित आहे. आंबेगाव तालुक्याच्या गोहे बुद्रुक येथील शाळेतील विज्ञान शाखा शिक्षकांची बदली झाल्याने दोन वर्षांपूर्वी बंद झाली. गेल्या वर्षी पुन्हा तेथे विज्ञान शाखा सुरू करण्याची जाहिरात करून, प्रवेश प्रक्रिया देखील राबविण्यात आली होती. तेव्हा १८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र, कॉलेज सुरू होण्याच्या वेळेला विज्ञान शाखेला मान्यता न मिळाल्याने अभ्यासक्रम सुरू करता येणार नसल्याचे प्रशासनाने कळविले होते. त्यामु‍ळे गेल्या वर्षी येथील विद्यार्थी सायन्स शाखेला मुकले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images