Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गदिमांच्या स्मारकाच्या कामवेगाने करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आपल्या गीतांमधून संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविणारे गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या कामाला गती मिळावी, यासाठी आवश्यक तो पुढाकार घ्यावा, अशी मागणी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी केली आहे. अलगुडे यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांची भेट घेऊन ही मागणी केली.
माडगूळकर यांच्या नावाने वाकडेवाडी भागात स्मारक उभारण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. या स्मारकासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने गेली अनेक वर्षापासून हे काम रखडले आहे. जिल्हाधिकारी यांनी यामध्ये पुढाकार घेऊन गदिमांच्या स्कारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, त्याचप्रमाणे महापालिकेने स्मारक उभारण्यासाठी पुरेशी तरतूद करून स्मारकाचे काम लवकरात लवकर करावे, असे उपमहापौर अलगुडे यांनी सांगितले. वाकडेवाडी भागातील मुठा नदीच्या काठी स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. त्या वेळी राष्ट्रीय हरित लवादाने नदीच्या कडेला कोणतेही बांधकाम करण्यास मज्जाव केल्याने अडचणी निर्माण झाली होती.
या भागात बांधकाम करण्यास 'एनजीटी'ची काही हरकत आहे का? हरकत असल्यास याच भागात उपलब्ध असलेल्या सरकारी जमिनींमधील काही जमीन जिल्हाप्रशासनाने पालिकेला स्मारक आणि बागेसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अलगुडे यांनी जिल्हाधिकारी राव यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. या वेळी गदिमांचे नातू सौमित्र माडगूळकर, भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे प्रवीण वाळिंबे, संवाद पुणेचे सुनील महाजन, पालिकेचे उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासकामांचे होणार ऑडिट

$
0
0

महापालिकेचा निर्णय; कामाची माहिती नागरिकांसाठी खुली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेने गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांचे सोशल ऑडिट करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिकेने केलेल्या विकास कामांची संपूर्ण माहिती नागरिकांसाठी खुली केली जाणार असून त्यावर पुढील काही महिन्यात कामाच्या दर्जाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली.
शहराच्या विविध भागात महापालिकेच्या वतीने अनेक विकास कामे केली जातात. यामध्ये मुख्य भवन, क्षेत्रीय कार्यालये, आयोग्य विभाग, घनकचरा, बांधकाम, यासह नगरसेवकांच्या सह यादीमधील कामांचा समावेश असतो. गेल्या पाच वर्षात पालिकेने जी विकास कामे केली आहेत. ती नक्की कोणत्या भागात करण्यात आली. त्यांचे स्वरुप काय आहे, त्यासाठी किती खर्च करण्यात आला. त्यासाठी कोणत्या विभागाकडून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. कोणत्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणासाठी हे काम झाले. ते काम कधी सुरू झाले, कधी पूर्ण झाले ही संपूर्ण माहिती यामध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना कोणते काम कधी करण्यात आले होते. त्याची किंमत किती आहे. यामध्ये कोणत्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. याची माहिती मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त देशभ्रतार म्हणाल्या, 'प्रशासनाने राबविलेल्या टेंडरची माहिती नागरिकांना आता पालिकेच्या वेबसाइटवर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या पुढील पाऊल म्हणजे ज्या ठिकाणी काम करण्यात आले आहे, त्याच्या दर्जाविषयी नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवून घेण्यात येणार आहेत. यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.'
०००००००००००००
टेंडरची माहिती महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. ज्या ठिकाणी कामे करण्यात आली आहेत, त्या कामांच्या दर्जाबाबत नागरिकांची मतेही जाणून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांना त्यांच्या सूचना आणि हरकती नोंदवता येतील. ही प्रक्रिया येत्या सहा महिन्यांमध्ये सुरू होईल.
प्रेरण देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न सोडवण्यासाठीइतिहासप्रेमींचा पुढाकार

$
0
0

सोनोरी, दिवे, काळेवाडी गावांना फायदा होणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाणी प्रश्नाने राज्यभरात अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले असले; तरी जलसंवर्धनाचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. जलसंवर्धनाचे महत्व लक्षात घेत पुण्यात इतिहास कट्टा उपक्रमातून इतिहासप्रेमींनी सासवड जवळच्या सोनोरी गावातील त‍ळ्यातला गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने या तळ्यात पाणी साठल्यास ऐतिहासिक सोनोरीसह दिवे आणि काळेवाडी अशा तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
पुणे-सासवड मार्गावर दिवे घाट चढून गेल्यावर मल्हारगड उर्फ सोनोरी हा गड आहे. या गडाच्या परिसरातच सोनोरी, दिवे, काळेवाडी, झेंडेवाडी अशी गावे आहेत. पावसाळा आणि त्यानंतरचे काही महिने सोडल्यास या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. इथल्या रानात हरणे, तरस, कोल्हे, मोर, ससे असे प्राणी आहेत. माणसांनाच प्यायला पुरेसे पाणी नसल्याने वन्यजीवांचा विचार कोणी करण्याचा प्रश्न नाही.
या पार्श्वभूमीवर इतिहास कट्टा या उपक्रमात राजेंद्र ढुमे आणि मंदार लवाटे, इतिहासाचा अभ्यास करणारी मंडळी तसेच सदाचार साधना संस्थेचे सदस्य यांनी एकत्र येत सोनोरी गावाजवळच्या तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सोनोरी गडाजवळील डोंगरातून एक ओढा वाहत येतो आणि या मोठया तलावाला मिळतो. या तलावाची एक बाजू फुटल्याने तिथे पावसाचे पाणी साठत नव्हते. सरकारने या वर्षी या तलावाला बांध घालून दिला आहे. त्यामुळे त्यात पाणी साठू शकणार आहे.
त्याबाबत बोलताना ढुमे म्हणाले, 'या तलावात पाणी साठण्यासाठी त्यातील माती काढून त्याची खोली वाढवणे आवश्यक आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने थोडा गाळ काढला आहे; पण त्यासाठी पैशाचे बळ कमी पडते आहे. तलाव खोल करण्यासाठी पोकलेन किंवा जेसीबीच्या साह्याने गाळ काढणे आणि ही माती डंपरच्या मदतीने दूर नेऊन टाकणे अशी दोन प्रकारची कामे करावी लागणार आहेत.
या तलावातील माती काढण्यासाठी लागणाऱ्या पोकलेन किंवा जेसीबीच्या भाडयाच्या खर्चाचा भार उचलला तर स्थानिक शेतकरी ती गाळाची माती डंपर्सने आपल्या शेतात टाकण्यासाठी स्वखर्चाने घेऊन जायला तयार आहेत. हे काम पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण केले, तर या वर्षी दिवे, सोनोरी आणि काळेवाडी या तीन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. गावकरी या कामासाठी मदतीची अपेक्षा करत आहेत. आम्ही काही मित्र, इतिहास कट्टाच्या माध्यमातून एकत्र आलेले इतिहास प्रेमी, सदाचार साधना या संस्थेचे सदस्य मिळुन या गावकऱ्यांना मदत करत आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा दुजाभाव का?

$
0
0

काँग्रेस आघाडी सरकारची शिवसेनेकडून भलामण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी न देण्याच्या निर्णयावर शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून घरचा आहेर दिला आहे. मुंबईमध्ये वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक प्रस्तावित करताना पुण्याबद्दलच दुजाभाव का? असा सवाल करून यापूर्वीचे सरकार पुणेकरांशी सापत्नभावाने वागत होते, पण काही तरी देत होते अशा शब्दांत काँग्रेस आघाडी सरकारची भलामणही शिवसेनेने केली आहे.
विकास आराखड्यातील आरक्षित जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्याचे धोरण राज्य सरकारने निश्चित केले होते. परंतु, या धोरणातील काही तरतुदींमुळे पुनर्विकासाला खीळ बसणार असल्याने शिवसेनेसह बांधकाम व्यावसायिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे हे धोरण बदलून राज्य सरकारने सुधारित धोरण निश्चित केले आहे. या सुधारित धोरणामध्ये नऊ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावरच टीडीआर वापरास मुभा देण्यात आली आहे. या धोरणावरून शिवसेनेने थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे.
'नागरिकरणाचा वेग लक्षात घेऊन सरकारने पुण्यात ३३ टक्क्यांहून एक एफएसआय केला. १९९७ मध्ये टीडीआर धोरण आल्यावर सरकारने ४० टक्के टीडीआर वापरण्यास परवानगी दिली. २००४ नंतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यासाठी २० टक्के टीडीआर वापरण्यास मान्यता दिली. आतापर्यंत ६० टक्के टीडीआर वापरून बांधकामे होत होती. मग अचानक काय घडले आणि शहरामध्ये टीडीआर वापराची नियमावली बदलली,' असा सवाल शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण, शहरप्रमुख शाम देशपांडे व अजय भोसले यांनी केला आहे.
पुण्यातील टीपीएस स्कीम व जुन्या इमारती सहा मीटर रस्त्यावर आहेत. त्यांच्या पुनर्विकासासाठी पुणेकर प्रयत्नशील आहे. नागरिकरणाचा वेग वाढल्यावर एफएसआय वाढविला जातो. मुंबईतही एफएसआय वाढीचा प्रस्ताव आहे. मग पुण्यातच दुजाभाव का असा प्रश्न सेनेच्या या त्रयींनी उपस्थित केला आहे. १९९७ च्या नियमावलीप्रमाणे सहा मीटरवर टीडीआर वापराची परवानगी देण्यात यावी. त्यासाठी पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारे वजा सल्लाही शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
..
खाते कोण चालवते मुख्यमंत्री की सचिव?
नगर विकास विभागाचा कारभार या खात्याचे मंत्री म्हणून आपण पाहता की नगरविकास खात्याचे सचिव पाहतात, असा खोचक प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेनेने आहे. पुणेकर तुमचे नाहीत, तर दुसऱ्याचे पोर आहे असेच गेली दीड वर्षे आपल्या वागण्यातून जाणवत आहे. मेट्रो असो की आयआयएम वा हायकोर्टाचे खंडपीठ, अशा अनेक विषयांमध्ये पुणेकरांना जा‍णवण्याइतपत दुर्लक्ष आपल्याकडून होत आहे, असा थेट हल्लाही शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिकांना मीटरने पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून येत्या महिनाभरात शहरातील व्यावसायिकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना राबविली जाणार आहे. तसेच स्मार्ट मोबिलिटी कार्ड, बसला जीपीएस यंत्रणा, शहरातील सिग्नलसाठी अत्याधुनिक यंत्रणा याबरोबरच बाणेर, बालेवाडी भागात इलेक्ट्रीक बसची सुविधा अशा सुमारे पंधरा प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,' अशी माहिती स्मार्ट सिटीच्या अंमबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) चे अध्यक्ष कुणाल कुमार यांनी‌ दिली.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची दुसरी बैठक शनिवारी पालिकेत झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रकल्पांची अंमलबजावणी, कंपनीवर होणारा खर्च अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संचालक मंडळाच्या गेल्या बैठकीमध्ये ज्या पंधरा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ती कामे पुढील काही काळात मार्गी लावण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले. शहरातील सर्व व्यावसायिकांना पहिल्या टप्प्यात मीटरने पाणीपुरवठा करण्यासाठी स्मार्ट मीटरिंग योजना सुरू केली जाणार आहे. पालिकेला पाणीपट्टीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न हे व्यावसायिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक नागरिकांनी वापर करावा, यासाठी पहिल्या टप्प्यात 'पीएमपी'च्या बसला जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन तयार करून कोणती बस किती वाजता कुठल्या स्टॉपवर येणार याची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळण्यास मदत होणार आहे. याबरोबरच स्मार्ट मोबिलीटी कार्ड, बाणेर,औंध, भागासाठी इलेक्ट्रीक बस, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील सुमारे ३३६ सिग्नलला आधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
...
कंपनीचा लोगो तयार
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा लोगो कसा असावा, यासाठी महापालिकेने स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत एका आठवड्यामध्ये पालिकेकडे २८२ लोगो स्पर्धकांनी पाठविले. त्यातील एका लोगोवर शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अभिनव कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या रमेश पवार यांनी हा लोगो तयार केला असून त्याला २५ हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. या लोगोवर थोडे काम शिल्लक असून पुढील आठवड्यात हा लोगो अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यास सुरुवात होईल, असे कंपनीचे अध्यक्ष कुणाल कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूर : बोअरमध्ये पडून मुलगा जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा येथे खेळताना सहा वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या मुलाला वाचवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ), अग्निशमन दलासह सर्व यंत्रणा त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रात्री सात वाजेपर्यंत या मुलाला बाहेर काढण्यात यश आले नसल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली आहे. २२ फूट आतमध्ये पडलेला मुलगा फक्त जिवाच्या आकांताने आजीचा नाव घेत असून 'मला मला बाहेर काढा' असे म्हणत आहे.

सुनील हरीभाऊ मोरे (वय सहा वर्षे) असे बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचे नाव आहे. सुनीलचे आई-वडील शेतात मोल मजूरी करतात. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावातील जुना मळा परिसरात शनिवारी त्याची आई एका कांद्याच्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. आई सोबत सुनिल त्या शेतात गेला होता. दुपारी बाराच्या सुमारास सुनिल शेतात मित्रासोबत खेळत होता. खेळता खेळता तो बोअरवेलकडे गेला. बोअरवेल बंद असल्याने त्यावर फक्त एक पोते टाकले होते. त्यामुळे सुनिलला अंदाज न आल्यामुळे तो बोअरवेलमध्ये पडला. खाली सरकत-सरकत तो तब्ब्ल २२ फुटावर जाऊन अडकला. त्याच्या सोबतच्या मित्रांनी घटनेची माहिती त्याच्या आजीला दिली. आजीने शेताचे मालकांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ शंभर क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. नागरिकांनी त्याला प्रथम दोरीच्या मदतीने वर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. आतमध्ये टाकलेली दोरी त्याच्या हाताला अडकवली. मात्र, हे करत असताना बोअरवेल मधील एक दगड पडला आणि अडचणीत आणखीनच भर पडली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाची रेस्क्यू व्हॅन दुपारी साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली. 'एनडीआरएफ'लाही घटनेची माहिती देण्यात आली, त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. सुनीलला वाचवण्यासाठी पोलिस, डॉक्टरांसह सर्व यंत्रणा दुपारपासून अथक प्रयत्न करत आहेत. मात्र, पडलेल्या दगडाने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. बोअरवेलच्या शेजारी जेसीबीच्या सहाय्याने समांतर खड्डा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टराची एक टीम, अॅम्ब्युलन्स तसेच इतर यंत्रणा ठाण मांडून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारपासून पिंपरीत दिवसाआड पाणीपुरवठा

$
0
0

मंगळवारपासून अंमलबजावणी होणार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये येत्या मंगळवारपासून (तीन मे) दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शहरात एकूण पाणीकपात २५ टक्के झाली आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी शनिवारी (३० एप्रिल) पत्रकार परिषदेत दिली.

शहर पातळीवर पाणी कपातीचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत गेल्याच महिन्यात मिळाले होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर सर्वपक्षीय बैठक आणि पाटबंधारे विभागाशी चर्चा केल्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबाजवणी मंगळवारपासून (तीन मे) होणार आहे. जुलै महिन्यामध्ये आढावा घेऊन पाणीकपातीबाबतचे पुढील धोरण ठरविण्यात येईल, असे आयुक्त जाधव यांनी स्पष्ट केले. शहर अभियंता एम. टी. कांबळे, कार्यकारी अभियंता जयंत बरशेट्टी, प्रवीण लडकत, रामदास तांबे या वेळी उपस्थित होते.

राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्याचा फटका ग्रामीण भागाबरोबर शहरवासियांनाही बसला आहे. पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे नऊ डिसेंबर २०१५ पासून शहरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली. त्यानंतर ११ मार्च २०१६ पासून पाच टक्के पाणीकपात वाढून १५ टक्के पाणीकपात झाली. आता पुन्हा दहा टक्के पाणीकपात लागू करून शहरातील एकूण पाणीकपात २५ टक्क्यांवर पोचली आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेणे भाग पडले.

पवना धरणात सद्यःस्थितीत २.१९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तो जुलै २०१६ पर्यंत पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, दिवसाआड ठरवून दिलेल्या वेळेमध्ये पाणीपुरवठा होईल. 'अ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व भागाला सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा होईल. 'ब' आणि 'ड' प्रभागात सध्या सुरु असलेल्या नेहमीच्याच वेळेनुसार परंतु, दिवसाआड पाणी मिळेल. 'क', 'इ' आणि 'फ' क्षेत्रीय कार्यालय परिसरात सकाळी आणि सायंकाळी या टप्प्यात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

असे आहे नियोजन

क्षेत्रीय कार्यालयनिहाय ज्या भागात ज्या वेळेत पाणीपुरवठा असेल, तो त्याच वेळी दिवसाआड होईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. समजा, तीन तारखेला ज्या भागात पाणीपुरवठा असेल. तेथे चार तारखेला पाणी मिळणार नाही. पाच तारखेला पाणी मिळेल. चार तारखेला ज्या भागात पाणी पाणीपुरवठा असेल. तेथे पाच तारखेला पाणी मिळणार नाही. सहा तारखेला मिळेल. याच क्रमाने पाणीपुरवठ्याचे नियोजन असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसशिवाय पंतप्रधान अशक्य, पवारांना टोला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात कॉँग्रेस आणि भाजप हे दोनच प्रमुख पक्ष आहेत. काँग्रेसचे मत विचारात घेतल्याशिवाय देशात पंतप्रधान ठरविता येणार नाही. कॉँग्रेसशिवाय नव्या पर्यायाचा विचारही करता येणार नाही,' अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

'देशात पुढील पंतप्रधान होण्यास नीतीशकुमार योग्य उमेदवार आहेत. सोनिया गांधी नेतृत्व करीत असलेल्या काँग्रेसचा आणि राहुल गांधी नेतृत्व करीत असलेल्या काँग्रेसचा चेहरा वेगळा आहे,' असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच म्हटले होते. त्या संदर्भात पुण्यात एका कार्यक्रमासाठी चव्हाण आले असता पवार यांचे न घेता त्यांनी टोला लगावला.

'देशात नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत केवळ घोषणा केल्या आहेत. कामे न केल्याने नागरिक त्रस्त आहेत. सरकारबाबत नागरिकांची विरोधी मते झाली आहेत. राज्यासह देशात केवळ घोषणाच भरपूर झाल्या आहेत. त्यामुळे देशात नवा पर्याय स्वीकारण्यापूर्वी काँग्रेसला विचारात घ्यावे लागेल. भाजप आणि काँग्रेस हे दोनच देशात प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे काँग्रेसची भूमिका विचारात घेतली पाहिजे,' असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

'राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर सरकारचे धोरण योग्य नाही. चुकीचे धोरण सरकार राबवित आहे. बाहेरील राज्यातून येणाऱ्या उद्योगांना जमीन, पाणी देण्याची भाषा सरकार करते आहे; परंतु दुसरीकडे पाणी नसल्याने आयपीलएलचा खेळ असो की उद्योग बंद करते. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या सरकार बाहेरील उद्योगांना येऊ नका असाच संदेश देत आहे. सरकारची ही भूमिका चुकीची आहे. एका वर्षात दुष्काळ हटविण्याचे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांच्याकडे 'जादूची कांडी' आहे का, असा खोचक सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.

उद्योगांचे पाणी बंद करण्यासंदर्भात ते म्हणाले, 'शीतपेय, बिअर यांच्यासंदर्भात उद्योगांना पाणी बंद करण्याचे एकच धोरण ठेवले पाहिजे. औद्योगिकीकरणाचे धोरण स्वीकारताना पाणी आणि जमीन हे दोन विषय गांभीर्याने हाताळले पाहिजेत. वेगळा विदर्भ करण्यासंदर्भात कोणी मागणी करीत असेल, आणि आर्थिकदृष्ट्या ते व्यवहार्य असेल, तर त्या मागणीचे निश्चित स्वागत केले जाईल. पण तसे संबंधितांनी दाखवून दिले पाहिजे.'

'राज्यातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात मिळायला हव्यात. पण त्या संदर्भात सरकारकडून कोणतीही उपाययोजना वेळीच करण्यात आली नाही. त्यावेळी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला. त्यामुळेच आता डाळींची दरवाढ झाली आहे. दरवाढीत शेतकऱ्यांचा की व्यापाऱ्यांचा फायदा याचा जाब आम्ही विचारत आहोत,' असेही ते म्हणाले.

बेड्या ठोका, तुरुंगात टाका

'घर ही प्रत्येकाची गरज आहे. ती पुरविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मेपल या ग्रुपकडून ग्राहकांची फसवणूक झाली असून, मेपलमध्ये राज्य सरकारमधील उच्चपदस्थ व्यक्तींचा समावेश आहे. मेपलचा संबंधित व्यक्ती पकडला जात नाही ही गंभीर बाब आहे. अशा व्यक्तीला बेड्या ठोका. तुरुगांत टाका,' अशीही प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्यात यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षीय सुनील हरीभाऊ मोरे या मुलास ३१ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. एनडीआरएफ आणि पुणे अग्निशमन दलाच्या जवानांमुळे सुनीलचे प्राण वाचू शकले. दरम्यान, सुनीलला उपचारांसाठी तातडीने वरद विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सुनीलचे आई-वडील मोलमजुरी करतात. शनिवारी आई सोबत सुनील शेतात गेला होता. दुपारी बाराच्या सुमारास सुनील शेतात मित्रासोबत खेळत होता. खेळता खेळता तो बोअरवेलकडे गेला. बोअरवेल बंद असल्याने त्यावर फक्त एक पोते टाकले होते. त्यामुळे सुनीलला अंदाज आला नाही आणि तो बोअरवेलमध्ये पडला. खाली सरकत-सरकत तो तब्ब्ल २२ फुटांवर जाऊन अडकला. त्याच्या सोबतच्या मुलांनी घटनेची माहिती त्याच्या आजीला दिली. आजीने शेताच्या मालकांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ शंभर क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. नागरिकांनी प्रथम दोरीच्या मदतीने सुनीलला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. आतमध्ये टाकलेली दोरी त्याच्या हाताला अडकवली. मात्र, हे करत असताना बोअरवेलमध्ये एक दगड पडला आणि अडचणीत आणखीनच भर पडली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाची रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. 'एनडीआरएफ'लाही घटनेची माहिती देण्यात आली, त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. सुनीलला वाचवण्यासाठी पोलीस, डॉक्टरांसह सर्व यंत्रणा काल दुपारपासून अथक प्रयत्न करत होते.

सुनीलला वाचवण्यासाठी चाललेल्या या प्रयत्नांना आज ३१ तासांनंतर यश आलं. सुनीलला वाचवताना त्याला कोणतीही मोठी इजा होणार नाही, याचीही दक्षता घेण्याचे आव्हान होते. त्यामुळे ब्रेकरच्या साह्याने आतील खडकाचा काही भाग मोकळा करत मदत पथक सुनीलपर्यंत पोहोचलं. सुनीलला सलाईन लावणे कठीण जात असल्याने दुपारी काही वेळ रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी इंजेक्शनचा पर्याय निवडला. इंजेक्शन दिल्यानंतर पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं.

दरम्यान, सुनीलला आता वरद विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोअरवेलमधून वाचलेल्या सुनीलचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षीय सुनील हरीभाऊ मोरे या मुलास ३१ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं खरं पण नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याला मृत्यून गाठले. सुनीलच्या मृत्यूने सगळेच हळहळले आहेत.

शनिवारी आई सोबत शेतात गेलेला सुनील मित्रांसोबत खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला होता. एनडीआरएफची टीम, पुणे अग्निशमन दलाचं पथक, पोलीस व डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करून आज सायंकाळी तब्बल ३१ तासांनंतर सुनीलला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं होतं. त्यानंतर सुनीलला तातडीने वरद विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुनीलवर डॉक्टरांनी लगेचच उपचारही सुरू केले. पण, सुनील वाचू शकला नाही.

बोअवेलमध्ये ३१ तास मृत्यूशी यशस्वी झुंज देणाऱ्या चिमुकल्या सुनीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनीलचा मृत्यू त्याला वाचवण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून अविश्रांत प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठीच मोठा धक्का देणारा ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैंथोला यांनी स्वीकारली FTII संचालकपदाची सूत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) संचालकपदाची सूत्रे भूपेंद्र कैंथोला यांनी मंगळवारी स्वीकारली. संस्थेला आठ-नऊ महिन्यानंतर पूर्णवेळ संचालक मिळाला आहे.

गेल्या वर्षी एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्ती विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. आंदोलना दरम्यान तत्कालीन संचालक डी.जे नारायण पदमुक्त झाल्याने वातावरण अधिक चिघळू नये यासाठी माहिती पत्र कार्यालयाचे (पीआयबी) संचालक प्रशांत पाठराबे यांच्याकडे प्रभारी संचालकपद सोपविण्यात आले होते. आठ-नऊ महिने प्रभारी संचालकांनी काम केल्यानंतर कोणताही गाजावाजा न करता डायरेक्टोरेट ऑफ पर्सोनेल ट्रेनिंग (डीओपीटी) कडून कैंथोला यांची संचालकपदी नियुक्ती झाल्याचा आदेश गेल्या महिन्याच्या अखेरीस जारी करण्यात आला. त्यानुसार कैंथोला यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.

कैंथोला हे १९८९ बँचचे आयएसएस (भारतीय माहिती सेवा) अधिकारी आहेत. मुंबई विद्यापीठातून 'पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनँशनल रिलेशन्स' याविष़यात त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केली असून, ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. दूरदर्शनच्या दिल्ली येथील मुख्यालयात ते १९९० ते २००४ पर्यंत कार्यरत होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही ते पाहत होते. 'डिरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्स' च्या माध्यमातून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चित्रपटांच्या संदभार्तील 'इंडियन पॅनारोमा' विभागाचे काम आणि लोकसभा टीव्हीचे कामही त्यांनी पाहिले आहे.

'चित्रपट निर्मिती आणि दूरदर्शनच्या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला आकार देण्याचे भरीव कार्य एफटीआयआय ही संस्था करीत आहे. संस्थेचे हे वैभव अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. कोणत्याही पूर्वग्रहदूषित विचाराने संस्थेमध्ये पाऊल न ठेवता खुल्या मनाने इथे प्रवेश केला आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे मला सर्वोतोपरी सहकार्य मिळेल याची मला खात्री आहे,' अशी भावना कैंथोला यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोलर अंगावरून गेल्याने दोघींचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

तळेगाव नवलाखउंब्रे औद्योगिक वसाहत रस्त्यालगत सावलीत बसलेल्या दोन मजूर महिलांचा रोडरोलरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. अपघातानंतर चालक पसार झाला आहे. या दोघी चुलत सासू-सुना होत्या.

गंगूबाई भगवान अंभोरे (वय ३५), मीराबाई बाबूराव अंभोरे (वय ३०, दोघीही मूळ रा. अंबरवाडी, जिंतूर, परभणी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. चालक सुरेश गायकवाड पसार झाला आहे. वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी रोडच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यासाठी मजूर आले होते. गंगूबाई, मीराबाई यांच्यासह इतर काही मजूर नाश्ता करून काही वेळ विश्रांतीसाठी मिळेल त्या ठिकाणी सावलीत बसले होते. गंगूबाई व मीराबाई या दोघी बंद असलेल्या रोडरोलरच्या सावलीत बसल्या होत्या. परंतु, चालकाला या दोघी रोलरखाली बसल्याची माहिती नसल्याने त्याने रोलर सुरू केला. तो दोघींच्या अंगावरून गेल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर इतर मजुरांनी गोधळ करून काम बंद करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मध्यस्तीनंतर मृतदेह ताब्यात देण्यात आल्याने प्रकरण शांत झाले. अपघातानंतर पसार झालेल्या चालकाचा पोलिस शोध घेत असून, या घटनेचा पुढील तपास वडगावच्या सहायक पोलिस निरीक्षक पी. जी. तोडकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शीतपेयाच्या बाटलीत डास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

'ओरो' कंपनीच्या शीतपेय बंद बाटलीमध्ये ग्राहकाला दोन डास आढळून आले आहेत. त्यामुळे शुद्ध शीतपेयाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. येरवड्यातील एका किराणा दुकानात हा प्रकार घडला.

येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ते संतोष राजगुरू आणि अमित गायकवाड हे दुपारी जय प्रकाशनगरमध्ये थांबले होते. उन्हाचा तडाखा वाढल्याने राजगुरू यांनी जवळील एका किराणा दुकानातून दहा रुपये किमतीचे 'ओरो ओरेंज' हे शीतपेय विकत घेतले. बंद बाटलीचे झाकण उघडण्यापूर्वीच बाटलीत दोन डास तरंगताना दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ शीतपेय बाटली घेऊन अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालय गाठले. विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला केवळ अर्ज लिहून देण्यास सांगितले व पथकाकडून संबंधित किराणा दुकानातील मालाची पाहणी केली जाईल, असे उत्तर दिले.

राजगुरू म्हणाले, 'अनेक चाचण्या पूर्ण केल्यानंतरही नामवंत कंपनीच्या शीतपेयांच्या बाटलीत डास आढळून आले आहेत. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने कंपनीवर कडक कारवाई करावी. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…अन् शूटिंग बंद झाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

आरोग्य विभागाची कुठलीही परवानगी न घेता अधीक्षकांनी आपल्या अधिकारात येरवडा मनोरुग्णालयामध्ये हिंदी चित्रपटाचे शूटिंग करण्याचे आदेश दिल्याचे समोर आले आहे. संबंधित निर्मात्याने हॉस्पिटलला शंभर पंखे (सीलिंग फॅन) भेट देण्याचे आमिष दाखवल्याची चर्चा आहे.

कुठल्याही सरकारी जागेत अथवा आवारात चित्रपट, मालिका अथवा जाहिरातीचे शूटिंग करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाला सरकारकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. येरवडा मनोरुग्णालयामध्ये मात्र कुठल्याही परवानगीविना चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याचे दिसले. हॉस्पिटल प्रशासनाकडूनच शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. मनोरुग्णालयाच्या आवारात शूटिंगला परवानगी मिळविण्यासाठी चित्रपट निर्मात्याकडून हॉस्पिटलला शंभर पंखे भेट देऊ, असे सांगितल्याची चर्चा आहे. त्यानंतर आरोग्य विभागाची कुठलीही परवानगी न घेता अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर यांनी आपल्या अधिकारात निर्मात्याला परवानगी दिली. 'ओमारटा' नावाच्या हिंदी चित्रपटाचे सोमवारपासून शूटिंग सुरू होते. हॉस्पिटलचे स्वयंपाकगृह, पुरुषांच्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये सोमवारी दिवसभर शूटिंग केले.

राज्याच्या अतिरिक्त संचालिक डॉ. साधना तायडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, 'येरवडा मनोरुग्णालयमध्ये शूटिंग करण्याबाबत कुठलीही परवानगी दिलेली नाही. विनापरवानगी शूटिंग केल्याप्रकरणी हॉस्पिटलकडून अहवाल मागविला जाणार असून उपसंचालकांना तातडीने माहिती देण्यास सांगितले आहे.

प्रभारी अधीक्षक डॉ. मधुमिता बहाले म्हणाल्या, 'अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर यांनी १८ एप्रिल रोजी संबंधित चित्रपट निर्मात्यांना हॉस्पिटलमध्ये शूटिंग करण्यास परवानगीचे आदेश काढले होते. त्यानंतर ते वैद्यकीय रजेवर गेले. अधीक्षकांच्या आदेशानुसारच सोमवारपासून चित्रपटाचे शूटिंग करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शूटिंगला सरकारची परवानगी घेतली, की नाही, हे तपासले नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार मंगळवारी दुपारपासून शूटिंग बंद करण्यात आले आहे.



येरवडा मनोरुग्णालयाच्या आवारात चित्रपटाचे शूटिंग करण्यापूर्वी प्रशासनाने आरोग्य विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमभंग केल्याप्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

हनुमंत चव्हाण, उपसंचालक, आरोग्य विभाग, पुणे





शूटिंगला परवानगी नव्हतीच

येरवडा मनोरुग्णालयामध्ये सोमवारपासून (२ मे) हिंदी चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याची माहिती 'मटा' प्रतिनिधीला मिळाली. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालिका डॉ. साधना तायडे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे शूटिंगबाबत परवानगी घेतल्याची विचारणा केली. त्यांनी कुठलीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोग्य विभागातून तातडीने हालचाली सुरू झाल्या. पुण्याचे उपसंचालक हनुमंत चव्हाण यांनी तातडीने हॉस्पिटलच्या आवारातील शूटिंग बंद करण्याचे आदेश दिले.



मनोरुग्णालयाचे विशेष

आशिया खंडातील सर्वांत मोठ्या येरवडा मनोरुग्णालयाने गेल्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण केली. सुमारे ८५ एकर परिसरात मनोरुग्णालय विस्तारले असून यामध्ये पुरुषांसाठी १० आणि महिलांकरिता सात वॉर्ड स्थापन केले आहेत. मनोरुग्णालयाची रुग्ण क्षमता २४०० इतकी असून सध्या सोळाशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. हॉस्पिटलच्या आवारात शेकडो घनदाट झाडे असून अनेक वॉर्ड आणि खोल्यांचे दगडी बांधकाम, नयनरम्य सजावट पाहण्यास मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रजच्या फुलराणीचा वाढदिवस उत्साहात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कात्रज

बालचमूंसोबत पालकांनाही सामावून घेणारी आणि वर्षभरात दीड लाखांहून अधिक जणांना सफरीचा आनंद देणाऱ्या फुलराणीचा पहिला वाढदिवस व कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात साजरा झाला.

नगरसेवक वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला नानासाहेब पेशवे जलाशय शहरवासीयांचे आकर्षण ठरला आहे. तलावात कृत्रिम बेटे, बेटावर अश्वारूढ शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, बालोद्यान, आजा-आजी उद्यान, म्युझिकल फाउंटन, भव्य विठ्ठलमूर्तीच्या उभारणीने पर्यटकांची गर्दी या ठिकाणी खेचण्यात यश आले होते. त्यापाठोपाठ फुलराणीनेही गेले वर्षभर धावून दीड लाख आबालवृद्धांना आनंदीत केले आहे. 'फुलराणी'ने महापालिकेला सोळा लाख तेरा हजार सहाशे वीस रुपयांचे उत्पन्न दिले. वर्षभर 'फुलराणी'ला कार्यरत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा व फुलराणीचा वाढदिवस वसंत मोरे मित्र परिवाराने साजरा केला. यानिमित्त फुलराणी प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या 'मदन इंजिनीअरिंग'चे ज्ञानेश माहुले आणि चालक, देखभाल-दुरुस्ती कारागीर, सुरक्षा रक्षक, स्टेशन व्यवस्थापक यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या उद्यान विभागाचे उप अधीक्षक रत्नाकर करडे, विद्युत विभागाचे उपअभियंता प्रकाश कोल्हापूरकर, बाळासाहेब डोळस आदी उपस्थित होते. जेष्ठ नागरिक संघाचे शंकरअण्णा शेलार, राजाभाऊ कदम, बाळकृष्ण फाटे, मंगेश रासकर, योगेश खैरे यांनी 'फुलराणी'च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला मंगळवारपासून (तीन मे) प्रारंभ झाला. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यापुढील काळात १५ जूनपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार ४, ६, ८, .....या तारखांनुसार होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा भाग पुढीलप्रमाणे (कंसात वेळ) :

'अ' क्षेत्रीय कार्यालय : मामुर्डी प्रभाग क्र. १८, प्रभाग क्र. १९, रावेत गावठाण, पोलिस पाटील बंगला, म्हस्केवस्ती, लक्ष्मीनगर, भोंडवेवस्ती, सेक्टर २३, २६, साईनाथ नगर, निगडी गावठाण, सिध्दीविनायक नगरी, श्रीनगरी, आशिर्वाद सोसायटी, दत्तनगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन पूर्ण, ऑटो क्लस्टर, इंदिरानगर झोपडपट्टी काळभोरनगर, दवाबाजार, विद्यानगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, ऑटो क्लस्टर, फुलेनगर झोपडपट्टी, मोरवाडी, श्रद्धा रिजन्सी सोसायटी परिसर, म्हाडा परिसर (सकाळी).

'ब' आणि 'ड' क्षेत्रीय कार्यालय : चिंचवडगाव, मोरया गोसावी आणि धनेश्वर मंदिर परिसर, भाजी मंडई परिसर, गणेश मंदिर परिसर, केशवनगर, मोरया गोसावी राजपार्क परिसर, दर्शननगरी, भीमनगर, तानाजीनगर, शिवाजी उदय मंडळ परिसर, श्रीधरनगर, सुदर्शननगर, गावडे पेट्रोलपंप परिसर, जीवननगर, भोईर कॉलनी, लिंकरोड परिसर, लक्ष्मीनगर, दर्शन हॉल परिसर, भाटनगर, अशोकनगर, बौद्धनगर, रमाबाईनगर, निराधारनगर, बी ब्लॉक, पिंपरीनगर, शगून चौक, सी ब्लॉक, पिंपरी गावठाण, मिलींदनगर, बलदेवनगर, शास्त्रीनगर, कैलासनगर, वैष्णोदेवी मंदिर परिसर, वैभवनगर रोड, सुभाषनगर, जिजामाता हॉस्पिटल परिसर, हेमू कलानी गार्डन परिसर, तपोवन रोड, वाघेरे पार्क, सुखवानी एम्पायर, वाघेरे कॉलनी क्रमांक १ ते ४, माळी आळी, गव्हाणे आळी, संजय गांधीनगर झोपडपट्टी, शनीमंदिर रोड, नवमहाराष्ट्र विद्यालयासमोरील भाग, अशोक थिएटर रोड परिसर, डेअरी फार्मरोड, पी. डब्ल्यू. डी. ब्लॉक, एच. बी. ब्लॉक, गणेशनगर झोपडपट्टी, बालामळ चाळ, पिंपरी गाव, पिंपळे सौदागर रोड, यशश्री सोसायटी, जुना काटे पिंपळे रोड परिसर, मासुळकर पार्क, ज्ञानेश्वरनगरी, लडकत रोड परिसर, न्हावी आळी रस्ता, वाघेरे कॉलनी समोरील भाग, कापसे आळी, वाघेरे आळी, शिंदे आळी, पवना मित्र मंडळ परिसर, शिवाजी चौक परिसर दापोडी गावठाण, सिध्दार्थनगर, पवारवस्ती, गुलाबनगर, गणेशनगर, फुलेनगर, एसएमएस कॉलनी, लिंबोरेवस्ती, आनंदवन, यांत्रिकी भवन, एस. टी. वर्कशॉप, पिंपळे गुरव गावठाण, कवडेनगर, विनायकनगर, काटेपुरम, नेताजीनगर, गजानननगर, गांगर्डेनगर, काशिदनगर, ज्ञानेशपार्क, विद्यानगर, सहकरानगर, अमृता कॉलनी ते विजयनगर, लक्ष्मीनगर, एम. के. हॉटेल चौक ते एस.एम. काटे चौक, मयूरनगरी, श्रीकृष्णनगर, सुदर्शननगर, वैदुवस्ती, सुदर्शनगर, सुवर्णयुग कॉलनी, मधुबन ते ममतानगर, रिव्हर साईडरोड ते सांगवी गावठाण, कृष्णा चौक ते पी. डब्ल्यू. डी. चौक, एम. के. हॉटेल ते गंगानगर चौक, पिंपळे सौदागर गावठाण, काटेवस्ती, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर सोसायटी परिसर (नेहमीच्या वेळेनुसार).

'क' क्षेत्रीय कार्यालय : नेहरूनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, खराळवाडी, गांधीनगर, नाणेकर चाळ, गुरुदत्तनगर, गोकुळ हॉटेल, फुगेवाडी परिसर, मटण मार्केट, साहिल सोसायटी (सकाळी), कोहिनुर वायोना (दुपारी), नेहरुनगर, मनपा गोडाऊन, नेहरुनगर शाळा परिसर, विठ्ठलनगर (सायंकाळी).

'इ' क्षेत्रीय कार्यालय : गुळवे वस्ती, भगतवस्ती, शांतीनगर काही भाग, इंद्रायणीनगर, महाराष्ट्र कॉलनी, सेक्टर क्रमांक १ आणि २, बालाजीनगर, सेक्टर क्रमांक ३ आणि ७, दत्तनगर, गजानन महाराज नगर, श्रीराम कॉलनी १ आणि २, गणेशनगर, खंडोबामाळ आपटे कॉलनी, नवग्रह मंदिर परिसर, दिघी रोड, गवळीनगर, राधानगरी, श्रीराम कॉलनी, बोपखेल संपूर्ण भाग (सकाळी), पांजरपोळ, पांडवनगर १ ते ४, सहकार कॉलनी, शिवशंकर १ ते ४, देवकरवस्ती, महादेवनगर, गुरूविहार सोसायटी, लांडगेवस्ती, लांडगेनगर, धावडे वस्ती, सेक्टर क्रमांक १, सदगुरूनगर, अक्षयनगर, आनंदनगर (सकाळी), सँडविक कॉलनी, गुरूकृपा कॉलनी, सत्यनारायण सोसायटी, नूरमोहल्ला (दुपारी), गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, रामनगर, जे. पी. नगर, रामनगरी, विठ्ठलपार्क, संभाजीनगर, श्रीकृष्ण कॉलनी, फुलेनगर, रामनगर, राधाकृष्णनगर, हुतात्मा चौक, शास्त्रीचौक, महादेवनगर (सायंकाळी).

'फ' क्षेत्रीय कार्यालय : त्रिवेणी नगर, ज्योतीबानगर रोड, त्रिवेणी नगर, तळवडे रोड, गणेशनगर, तळवडे गावठाण, देहू-आळंदी रोड, देवी इंद्रायणी सोसायटी, बाठेवस्ती, यमुनानगर, सेक्टर क्रमांक २२, संजयनगर, राजनगर, शरदनगर, गल्ली क्रमांक १ ते ९, कुदळवाडी हारगुडेवस्ती, गणेश मंदिर परिसरातील भाग, बालघरेवस्ती, भैरवनाथ मंदिर, जाधववाडी रस्ता, देहू-आळंदी रोड, रिव्हर रेसिडेन्सी, सेक्टर २२ (सकाळी), कृष्णानगर सेक्टर १९, सेक्टर २०, महात्मा फुलेनगर (सायंकाळी), संभाजीनगर - जी-ब्लॉक, शाहूनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर (रात्री), जाधववाडी, बोल्हाईचा मळा गल्ली क्रमांक १ ते ९, वडाचा मळा, आहेर कॉलनी, सावतामाळी मंदिर परिसर (तीन तास प्रत्येकी क्षेत्रीय टप्प्याने).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवतेच्या एकतेतून शांतता प्रस्थापित होईल

$
0
0

डॉ. रामविलास वेदांती यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आतंकवाद व जातीधर्माच्या नावाखाली होणारा हिंसाचार यामुळे जगभरात अशांततेचे वातावरण आहे. त्यामुळे सर्व धर्मगुरू, इमाम, राष्ट्रांचे पंतप्रधान व प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेऊन मानवतेच्या रक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत. मानवतेच्या एकतेतून मंदिर-मशिदींची सुरक्षितता कायम राहणार असून, समाजात शांती प्रस्थापित होऊ शकेल,' असे प्रतिपादन अयोध्या येथील रामजन्मभूमी शिलान्यासाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी खासदार डॉ. रामविलास वेदांती यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी) व एमआयटीच्या वतीने दिला जाणारा 'तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर जागतिक शांतता पुरस्कार' मानव एकता मिशनचे अध्यक्ष एम (मुमताज अली खान) यांना डॉ. वेदांती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्ञानेश्वर महाराजांची सुवर्णजडित मूर्ती, प्रतीमा असलेले सुवर्णपदक, सन्मानपत्र, शाल व सव्वापाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 'एमआयटी'चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. राहुल कराड, प्रा. प्रकाश जोशी, डॉ. मंगेश कराड, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. सुचित्रा कराड-नागरे या वेळी उपस्थित होते. कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. वेदांती म्हणाले, 'मानवता, भारतीय अस्मिता आदीचा संचय करणारे एम यांनी मानव एकता मिशनच्या माध्यमातून मानवतेच्या रक्षणेचे काम केले आहे. त्यांच्यासारखा मार्ग इतरांनीही अवलंबला तर रामजन्मभूमी-बाबरी मशीद असा वाद निर्माण होणार नाही. 'श्रीराम मानवता भवन' उभारण्याचा प्रस्ताव मंदिर-मशिदीच्या वादावर उत्तम तोडगा आहे. हा प्रस्ताव मी स्वीकारला असून, सर्व शंकराचार्य आणि सर्व इमामांनीही यावर चर्चाविनिमय करुन यासाठी पुढाकार घ्यावा.'
एम म्हणाले, 'वॉक ऑफ होप यात्रेदरम्यान आळंदी येथे वृक्षाखाली भारावलो होतो. तीच भावना आता आहे. मानव एकतेची ही यात्रा येथे संपली असली तरी आता मनुष्यत्वाची खरी यात्रा सुरू झाली आहे. मनाची शांती होणार नाही, तोवर बाहेर शांतता निर्माण होणार नाही.'
डॉ. भटकर म्हणाले, 'सत्यम शिवम सुंदरम' यानुसार सत्य हेच ईश्वर आणि सुंदर आहे. त्याचा स्वीकार करुन सर्वांनी एकत्रितपणे नांदायला हवे. तरच समाज व्यवस्था अधिक बळकट होईल आणि एकोपा निर्माण होईल.' प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. राहुल कराड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळी सुट्टी पुण्यातच

$
0
0

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची करिअरसाठी लढाई पुणे : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या आणि परीक्षा संपल्यानंतर गावी धाव घेणाऱ्या मूळच्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना दुष्काळामुळे यंदाची सुट्टी पुण्यातच घालवावी लागणार आहे. गावाकडे काहीच कामधंदा व पाणी नसल्यामुळे पुण्यातच थांबून पुढील वर्षीची फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्यास सुरूवात केली आहे. मराठवाड्यातील आठ ते दहा हजार विद्यार्थी पुणे शहरात शिक्षणासाठी आहेत. अकरावीपासून ते पदवीधर आणि इतर परीक्षांचा अभ्यास हे विद्यार्थी पुण्यात करतात. वर्षभर अभ्यास करून परीक्षा झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना गावी जायची ओढ असते. शेवटचा पेपर दिल्यानंतर हे विद्यार्थी गावाकडे धाव घेतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यानंतर हे विद्यार्थी कुटुंबीयांना शेतात व इतर कामात मदतदेखील करतात. या वर्षी मराठवाड्यात दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी अनेक मैल अंतरावर जावे लागते. पाऊस नसल्यामुळे शेतात व इतरही काहीच कामे नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांचा पालकांनी पुण्यातच थांबाण्याचे सुचवले आहे. काही विद्यार्थी दोन-चार दिवस कुटुंबीयांची भेट घेऊन पुण्यात परतले आहेत. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत पुण्यातच छोटे-मोठे काम करून स्वतःबरोबरच कुटुंबीयांना मदत करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी सुरू केला आहे. नोकरीतून मिळालेले पैसे पुढील वर्षीच्या प्रवेश फीसाठी राखून ठेवण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. त्यासाठी छोटी-मोठी ऑफीस, कॉलसेंटर, त्याबरोबच दुकानांमध्ये विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी शोधाशोध सुरू केली आहे. काही विद्यार्थ्यांना कामदेखील मिळाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबचा विद्यार्थी ज्ञानेश्वार कुरूंद याने सांगितले, 'मी बी-कॉमच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा नुकतीच दिली आहे. प्रत्येक वर्षी परीक्षा झाल्यानंतर गावी जात होतो. शेतात वडीलांना छोटी-मोठी मदत करत होतो. पण, या वर्षी गावाकडे दुष्काळ असल्यामुळे शेतातही काहीच कामे नाहीत. त्यामुळे सुट्टीत पुण्यातच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नोकरीची शोधाशोध सुरू आहे. एम कॉम करणारा कळंब येथील दुसरा विद्यार्थी बालाजी फाटे हादेखील उन्हाळी सुट्टीत गावाकडे जाणार नसून या ठिकाणी नोकरी शोधत असल्याचे त्याने सांगितले. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी शंकर डमरे पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या वर्षाला आहे. तो म्हणतो, 'दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा गावाकडे जाणार नाही. प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जात होतो. पण, या वर्षी पुण्यातच नोकरी शोधणार आहे.'

पुढील वर्षीच्या फीसाठी... परभणी जिल्ह्यातील चोरवड गावचा आनंद कदम हा विद्यार्थी पुण्यात एलएलबीच्या पहिल्या वर्षाला आहे. त्याने पुण्याच बीएचे शिक्षण घेतले आहे. कदम म्हणाला, 'परीक्षा संपून एक महिना झाला आहे. गावाकडे पाण्याची परिस्थिती खूपच बिकट आहे. त्यामुळे घरच्यांकडून पुण्यात थांबण्यास सांगण्यात आले. पुण्यात सध्या नोकरी सुरू केली आहे. त्याचा फायदा पुढील वर्षीची फी भरण्यास होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध विद्यार्थी झाले ‘ऑफिसर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे अंध असलो तरी, अधिकारी होण्याचे स्वप्न पाहण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. विद्यापीठातील अंध विद्यार्थ्यांसाठीच्या प्रगत तंत्रज्ञान अध्ययन केंद्राच्या मदतीने या विद्यार्थ्यांनी बँकिंगच्या परीक्षेत यशस्वी होऊन प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पोस्टिंगही मिळविली आहे. विश्वनाथ कंधारे, गौरव घायाळ, कल्याणी चित्ता, तेजश्री चिकने आणि सविता साळवे ही या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यात सविता वगळता इतर सर्वांनी नुकत्याच झालेल्या आयबीपीएसच्या परीक्षेतून प्रोबेशनरी ऑफिसर होण्यात यश मिळविले आहे. याच परीक्षेतून सविताला असिस्टंट होण्याची संधी मिळाली आहे. या निमित्ताने 'मटा'ने या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. विश्वनाथ मूळचा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये असलेल्या सावरगाव नसरत या गावचा. त्याने विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातून २०१४ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो बँकिंगच्या परीक्षांची तयारी करत होता. या काळातील आपल्या प्रयत्नांविषयी तो म्हणाला, 'एमए झाल्यानंतर ही तयारी सुरू केली होती. त्यासाठी काही खासगी क्लास आणि बार्टीसारख्या संस्थांमध्ये चालणाऱ्या वर्गांची निश्चितच मदत झाली. अंध विद्यार्थ्यांसाठी म्हणून विकसित झालेल्या केंद्राचा या तयारीसाठी खूप उपयोग झाला. माझ्या मित्र- मैत्रिणींनीसुद्धा त्यासाठी मला खूप मदत केली.' केंद्रामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी म्हणून उपलब्ध असलेली सॉफ्टवेअर्स, ऑडिओ बुक्स, इंटरनेट वापरण्यासाठीची सुविधा यांचा आधार घेऊन बँकिंगच्या परीक्षेची तयारी करणे शक्य झाल्याचे त्याने नमूद केले. अर्थशास्त्रामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या कल्याणी चित्ता यांनी नुकताच आपला पीएचडीचा प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला आहे. त्यांचे दहा शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत. मुळात शिक्षण क्षेत्रामध्ये रस असलेल्या चित्ता यांनी काही काळ प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली आहे. मात्र, शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्थिर होण्यास पोषक वातावरण न मिळाल्याने, त्यांनी अखेर बँकिंगची परीक्षा दिल्याची बाब चित्ता यांनी या निमित्ताने 'मटा'ला सांगितली. चित्ता म्हणाल्या, 'पहिल्यांदाच ही परीक्षा दिली होती. परीक्षा देताना केवळ सरावाची परीक्षा म्हणून विचार केला होता. मात्र, याच परीक्षेतून ऑफिसर होण्याची संधी मिळाल्याने निश्चितच आनंद झाला आहे.'

'केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अंध विद्यार्थ्यांना पूरक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांच्यासाठी समुपदेशन, नोकर भरतीसाठीचे मेळावे आणि प्लेसमेंट सेलची सुविधाही पुरविली जात आहे. केंद्राच्या उपक्रमांना औद्योगिक क्षेत्राकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.' - धनंजय भोळे, समन्वयक, अंध विद्यार्थ्यांसाठीचे प्रगत तंत्रज्ञान अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे ते बेंगळुरू वातानुकुलित एसटी सेवेचा प्रस्ताव

$
0
0

एसटीचे उपाध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक देओल यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील वातानुकूलित बसच्या संख्येत वाढ केल्यानंतर, पुणे-बेंगळुरू मार्गावर बस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी मंगळवारी दिली.
स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या डिझेल पंपाचे अद्ययावतीकरण करण्यात आले. त्याचे औपचारीक उद्घाटन देओल यांच्या हस्ते झाले. एसटीचे स्टोअर विभागाचे सरव्यवस्थापक आर. आर. पाटील, यंत्र अभियांत्रिकी विभागाचे सरव्यवस्थापक वसंत गायधनी, प्रादेशिक अधिकारी प्रताप सावंत, विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण, स्वारगेट आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक रवींद्र मोरे व एम. एम. शेख आणि इंडियन ऑइलचे उप सरव्यवस्थापक दीपक बसू, वरिष्ठ व्यवस्थापक सी. एम. घोरपडे, रवींद्रन, झुबीन गर्ग आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी देओल यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
स्वारगेटहून भोर, वेल्हे मार्गावर बसच्या अनुपलब्धतेमुळे गर्दीच्या वेळेला बस सोडल्या जात नाहीत. परिणामी, या भोर, वेल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खासगी अवैध वाहतूक चालते. हे फायद्याचे मार्ग असून, या मार्गावर जादा बस सोडाव्यात. एसटी वर्कशॉपमध्ये अद्ययावत यंत्रसामग्रीचा समावेश करावा, आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी देओल यांच्याकडे केल्या. कर्नाटक राज्यातून पुण्यासाठी ऐरावत व सामान्य बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविली जाते. त्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, असे असतानाही एसटीकडून या मार्गावर एकही बस धावत नाही. काही वर्षांपूर्वी पुणे-बेंगळुरू मार्गावर बस सुरू करण्यात आली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, ती बंद करण्यात आली. आता या मार्गावर बस सुरू करावी, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली. त्यावर, देओल यांनी याबाबतच लेखी प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली.
-------
सध्या मुंबई-हैदराबाद व मुंबई-गोवा या मार्गांवर आंतरराज्यीय बस सेवा सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात पुणे-बेंगळुरू मार्गाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर त्या मार्गावरही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.
- रणजितसिंह देओल (उपाध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक, एसटी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images