Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हॉटेलमधील भांडणात परस्परविरोधी गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी भक्तीशक्ती चौक, निगडी येथील हॉटेल तिरुमध्ये खोली दिली नाही म्हणून टोळक्याने सुरक्षारक्षकास मारहाण करून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. मारहाण करणाऱ्या टोळक्यातील एकाला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही मारहाण केली आहे. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात हॉटेल व्यवस्थापक मनोज हेगडे आणि प्रदीप पांडे यांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. हेगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रदीप पांडे व त्याच्या इतर आठ ते दहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकारात सुरक्षारक्षक टेक बहादूर (३०) हा जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी भक्ती-शक्ती येथे हॉटेल तिरु असून तेथे राहण्याची सोय आहे. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रदीप तेथे खोली भाड्याने घेण्यासाठी आला. मात्र, लॉजमधील एकही खोली रिकामी नसल्याचे त्याला सांगण्यात आले. आपणाला खोली मुद्दाम दिली जात नाही, असा समज करून प्रदीप याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वादावादी केली व तो निघून गेला. पहाटे दीडच्या सुमारास प्रदीप त्याच्या आठ ते दहा साथीदारांना घेऊन आला. हॉटेलच्या दरवाजावर असलेल्या टेक बहादूर याला मारहाण करून त्याच्याकडील चावी घेतली. दरवाजा उघडून ते जबरदस्तीने हॉटेलमध्ये घुसले. त्यानंतर हॉटेलच्या खुर्चा, टेबल व काचा फोडून टाकल्या. या वेळी हॉटेल कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. पांडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मनोज हेगडे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल आहे. चिडलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी प्रदीप पांडे याला मारहाण केली, तसेच त्याच्या आकुर्डी येथील दूध डेअरीसमोर जाऊन तेथील दोन दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी दोघांनीही निगडी पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यानगर पोटनिवडणुकीसाठी ५१.०३ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'राष्ट्रवादी काँग्रेस'चे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने विद्यानगर (प्रभाग क्रमांक ८-अ) मध्ये रविवारी पोटनिवडणूक झाली. यासाठी ५१.०३ टक्के मतदान झाले. मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले मत दिले आहे, हे सोमवारी (१८ एप्रिल) सकाळी स्पष्ट होणार आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दत्तू मोरे, भाजपकडून माजी नगरसेवक भीमा बोबडे, काँग्रेसकडून सतीश भोसले, शिवसेनेचे राम पात्रे तर, भारिप बहुजन महासंघाच्या शारदा बनसोडे निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवड स्टेशन येथील संघवी केशरी कॉलेज आणि श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील १३ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान करण्याकडे मतदारांचा कल दिसून आला. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी मतदान धीम्यागतीने सुरू होते. शेवटच्या दोन तासांत मतदार राजाला घराबाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर रांग लागल्याचे चित्र होते. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व काँग्रसच्या शहराध्यक्षांसह प्रमुख नेते सकाळपासून या ठिकाणी तळ ठोकून होते. अंगावर धाऊन जाणे, शिवीगाळ करणे असले प्रकार दुपारी घडले; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवले. स्थानिक कार्याकर्त्यांसह बाहेरील कार्यकर्त्यांची गर्दीही लक्षणीय होती. अवघ्या सहा महिन्यांसाठी असलेले हे नगरसेवकपद स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठेचे केले होते. त्यामुळे या निवडणुकीत वादावादी व बाचाबाचीचे किरकोळ प्रसंग घडले. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून खबरदारी घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळच्या टप्प्यात अगदी पाच टक्के मतदान झाले होते. तोच अकडा तिसऱ्या टप्प्यात ३१ टक्यांवर गेला व शेवटच्या टप्प्यात एकदम २० टक्क्यांनी मतदान वाढले होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनही या पोटनिवडणुकीकडे पाहिले जात होते. मागील पंचवार्षिकला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे 'राष्ट्रवादी' आपली जागा कायम ठेवण्यासाठी, तर शिवसेना प्रथम क्रमांकावर येण्यासाठी धडपडत होती. भाजपने आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नेत्यांची मोठी फौज येथे तैनात केली होती. तर काँग्रेसने अनेक माजी मंत्र्यांना येथे प्रचारसभेला आणून निवडणुकीत रंगत आणली.

विद्यानगर प्रभागात एकूण दहा हजार २०८ मतदार आहेत. त्यामध्ये पाच हजार ७१४ पुरुष व चार हजार ४९४ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी प्रत्यक्षात ५२०९ म्हणजेच ५१.०३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यात २७८८ पुरुष तर २४२१ महिलांचा समावेश होता. विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर आणि रामनगर अशा चार झोपडपट्ट्यांमध्ये हा वॉर्ड विभागलेला आहे. निगडी-प्राधिकरणातील हेडगेवार भवनामध्ये सोमवारी (१८ एप्रिल) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या अवघ्या काही तासातच निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माल वाहतूकदारांचा बेमुदत संपाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाढवलेले परवाना नूतनीकरण शुल्क कमी करण्याचा अध्यादेश राज्य सरकारच्या परिवहन विभागाने पंधरा दिवसांत काढावा,' अशी मागणी राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने केली आहे. अन्यथा संघटनेतर्फे राज्यात बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे. राज्यातील सुमारे १३ लाख माल व प्रवासी वाहतूकदार या संपात सहभागी झाल्यास प्रवासी व माल वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाने माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परवाना नूतनीकरण शुल्कात मार्च महिन्यात भरमसाठ वाढ केली. त्याला विरोध म्हणून राज्यातील रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो व बसच्या विविध व्यावसायिक संघटनांनी गेल्या आठ मार्चला बेमुदत संपाची हाक दिली होती; मात्र हा संप होऊ नये म्हणून संघटनांच्या प्रतिनिधींची परिवहनमंत्री दिवाकर रावते व परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांच्यासोबत बैठक झाली. त्यात परवाना शुल्क कमी करण्याचा निर्णय झाला; मात्र महिना उलटून गेल्यानंतरही त्या निर्णयाचा अध्यादेश अद्याप विभागाने काढलेला नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात माल व प्रवासी वाहतूकदारांकडून वाढीव शुल्काद्वारे वाहनांचे परवाना नूतनीकरण केले जात आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड सुमारे १३ लाख माल व प्रवासी वाहतूकदारांना पडत आहे. यात सुमारे एक लाख ३२ हजार वाहतूकदार पुणे जिल्ह्यातील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दगडखाणींना बंदीच्या नोटिसा

$
0
0

धुळीला वैतागलेल्या नागरिकांच्या बाजूने न्यायाधिकरणाची कारवाई म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे शहर परिसरातील १०६ दगडखाणींना टाळे ठोकण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. या खाणींच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी धुळीला वैतागून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने खाणींवर तातडीने कारवाई केली. नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खाणीतून उडणाऱ्या धुळीचा त्रास होतो आहे. श्वसनाच्या आजारांबरोबच तेथील पिकांचेही नुकसान झाले होते. भूजलाची गुणवत्ता ढासळली होती. वैतागलेल्या नागरिकांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे तक्रार दाखल केली. 'मी गेल्या आठ वर्षांपासून ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होतो. शहरातील आणि राज्यस्तरीय विविध अधिकाऱ्यांची मी भेट घेतली; पण माझ्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. यामध्ये या अधिकाऱ्यांनाही प्रतिवादी केले आहे. आमची केस अजून चालू असून न्यायाधिकरणाने अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही', असे याचिकाकर्ते उत्तम भोंडवे यांनी सांगितले. न्यायाधिकरणामध्ये दगडखाणींच्या विरोधात सुरू असलेल्या केसची दखल घेऊनच प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाघोली, लोणीकंद, बावडी या परिसरातील १०६ खाणींना विविध नियमांचे उल्लंघन केल्याच्या निकषांवर टाळे ठोकण्याची नोटीस दिली आहे. आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत, असे मंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून खाणींनी प्रदूषण नियंत्रणसंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही, म्हणून संबंधित दगडखाण चालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. पण आम्ही काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे प्रमाणपत्रासाठी मुदत मागितली होती. दरम्यान कोर्टाने आदेश दिल्यामुळे खाणींना बंदीची नोटीस आली आहे. सध्या ९० टक्के खाणी या परवान्याशिवाय काम करीत आहेत. या खाणीतून होणाऱ्या हवेच्या प्रदूषणापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या कच्चा रस्त्यातील धुळीमुळेच जास्त प्रदूषण होते. कच्चा रस्त्याचा प्रश्न सुटला तर प्रदूषण नक्कीच कमी होईल', असे पुणे जिल्हा दगडखाण असोसिशएशनचे खजिनदार बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. मंडळाने दिलेली नोटीस हे एक छोटेसे काम आहे. राज्यातील बहुतांश खाणींमध्ये हीच परिस्थिती असून पर्यावरण आणि कामगार कायदे धाब्यावर बसवून खाणींमधील काम सुरू आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तेथे काळजी घेतली जात नाही. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी वृक्षारोपणही केले जात नाही. या खाणींमधील परिसंस्था सुधारण्याऐवजी तिथे कचरा कसा साठवता येईल, याच दृष्टीने प्रशासनाचा विचार सुरू आहे. पुण्यातील चाळीस टक्के खाणी अनधिकृत आहेत. महसूल विभागालाही पर्यावरणाविषयी आस्था नसल्याने ते केवळ निधी गोळा करण्यात व्यग्र आहेत, असे खाणकामगारांसाठी काम करणाऱ्या संतुलन संस्थेचे बस्तू रेगे यांनी सांगितले.



खाणीतून होणाऱ्या हवेच्या प्रदूषणापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या कच्चा रस्त्यातील धुळीमुळेच जास्त प्रदूषण होते. कच्चा रस्त्याचा प्रश्न सुटला तर प्रदूषण नक्कीच कमी होईल. - बाळासाहेब चव्हाण, खजिनदार, पुणे जिल्हा दगडखाण असोसिशएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुण्यात मोहल्ला क्लिनिक सुरू करावेत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे सर्वसामान्यांसाठी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजना महापालिकेतही राबविण्याचा प्रस्ताव पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मुख्य सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात औषधोपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी दिल्लीमध्ये एक हजार मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात‌ आले आहेत. याच पद्धतीने पुणे शहरात मोहल्ला क्लिनिक सुरू करावेत. तसेच सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व औषधे आणि आरोग्य तपासणी मोफत उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव 'राष्ट्रवादी'चे रवींद्र माळवदकर आणि काँग्रेसचे सुधीर जानजोत यांनी दिला आहे. फूटपाथवर स्टीलचे खांब उभारणे, चांगल्या स्थितीतील रस्ते खोदून नव्याने तयार करण्यावर पालिकेचा अनाठायी खर्च होत आहे. हा खर्च कमी करून नागरिकांच्या आरोग्यावर व शिक्षणावर खर्च करण्याची मागणी प्रस्तावात आहे. दिल्लीतील जे ग्राहक दरमहा चारशे युनिट वीज वापरतात, त्यांना बिलात पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. याच पद्धतीने पुणे शहरात किमान पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना पाणीपट्टीत सूट द्यावी, असे म्हटले आहे. राज्यात या पूर्वी कल्याणकारी योजना राबविल्या जात होत्या. या कल्याणकारी योजनेची पाहणी करण्यासाठी देशभरातून लोकप्रतिनिधी येत होते. केजरीवाल सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. तशाच योजना पुण्यातही राबविण्याची गरज असल्याचे माळवदकर यांनी सांगितले.

मोहल्ला क्लिनिकसाठी मोठ्या निधीची गरज दिल्लीप्रमाणे शहरात मोहल्ला क्लिनिक सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी सांगितले. आरोग्य विभागाला सध्या केवळ पन्नास कोटी रुपयांचा निधी मिळतो. मोहल्ला क्लिनिक सुरू करायचे झाल्यास एकूण अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी आरोग्य विभागाला देण्याची गरज आहे. सध्या महापालिका शहरात पाच जेनरिक मेडिकल सुरू करणार आहे. लवकरच त्याचीही टेंडर प्रक्रिया सुरू होईल, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इमारतींच्या उंचीवर बंधने नकोत’

$
0
0

हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांचे मत म. टा. प्रतिनिधी, पुणे 'देशाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता भासणार आहे. त्यातच जमिनीची कमी प्रमाणात उपल्बता आणि घरांच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांना पाच लाख रुपयांत घर देणे अशक्य आहे. ही खूप चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारने एफएसआय वाढवावा आणि उंच इमारती बांधण्यासाठी परवानगी देण्याची आवश्यकता आहे', असे मत प्रख्यात आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी शनिवारी व्यक्त केले. 'वाईड अँगल फोरम' व 'रवी परांजपे स्टुडीओ' यांच्या वतीने कॉन्ट्रॅक्टर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. फोरमच्या प्रिया गोखले व सलील सावरकर यांनी मुलाखत घेतली. या वेळी कॉन्ट्रॅक्टर बोलत होते. त्यांच्या पत्नी पर्ल कॉन्ट्रॅक्टर, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, स्मिता परांजपे आदी उपस्थित होते. या वेळी परांजपे यांच्या हस्ते कॉन्ट्रॅक्टर यांचा वास्तुरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. 'आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कॉन्ट्रॅक्टर म्हणाले, 'सरकारने नागरिकांना कमी किंमतीत आणि मुबलक प्रमाणात घरे उपलब्ध करून दिल्यास झोपडपडपट्ट्यांची संख्या वाढणार नाही. दिल्लीसारख्या शहरात बांधकामासाठी ४ एफएसआयला परवानगी मिळाली आहे. त्याप्रमाणेच इतर शहरांत अधिक एफएसआयला आणि उंच इमारती बांधण्यासाठी परवानगी असली पाहिजे. केंद्र सरकार वाढणाऱ्या शहरांवर स्मार्ट सिटीसारख्या योजनांद्वारे लक्ष केंद्रित करीत आहे, ही चांगली गोष्ट आहे'. 'आर्किटेक्चर' ही कॉलेजमध्ये शिकता येणारी कला नाही. ती शिकण्यासाठी डोळे उघडे ठेवून आजूबाजूला घडणाऱ्या घटना लक्षात ठेवून त्याचे बिनचूक चित्र काढता आले पाहिजे. त्यामुळे घडणाऱ्या गोष्टींचे चित्र काढायला शिका. कामामध्ये रोज काहीतरी नाविन्यपूर्ण करा. आधुनिक जागाशी जुळवून कामाला कधीच नाही म्हणू नका', असा सल्ला कॉन्ट्रॅक्टर यांनी युवा वर्गाला दिला. कॉन्ट्रॅक्टर यांनी शाळा आणि कॉलेजमधील विविध आठवणी सांगून आपल्या जडणघडणीत आईवडील यांच्याबरोबरच पत्नी व शिक्षकांचा सहभाग असल्याची माहिती दिली. रवी परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले.

'परवानगीची प्रक्रिया क्लिष्ट' प्रशासकीय यंत्रणांकडून बांधकामाच्या आराखड्याला विविध विभागांची परवानगी मिळत नाही. त्यावर तोडगा म्हणून सरकारकडून परवानग्या मिळण्यासाठी विविध कायदे आणले जातात; तसेच परवानग्या मिळवण्यासाठी विविध प्रकारचे कर आकारले जातात. त्यामुळे बांधकामाच्या आराखड्याला परवानगी मिळवण्याची एकंदरीत प्रक्रीया अतिशय क्लिष्ट असून परवानग्या मिळवण्यासाठी 'अंडर द टेबल' यंत्रणेमधून जावे लागते, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांना पाणीटंचाईच्या झळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती
बारामती तालुक्यात पॉवरफुल राजकारणी असूनही बारामतीपासून हाकेच्या अंतरावर असलेली २१ गावे गेल्या ४७ वर्षांपासून पाण्यासाठी झगडत असल्याचे चित्र आहे. बारामती तालुक्यातील २१ गावे, २२७ वाड्यावस्त्यांना ३१ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असून संघर्ष करूनही पाणी प्रश्न कायम आहे.

बारामती तालुक्यातील तहानलेल्या गावांमध्ये प्रामुख्याने तरडोली, मोरगाव, जोगवडी, आंबी बुद्रुक, मुर्टी, मुडवे, मोराळवाडी, जळगाव, लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, वढाणे, भोडवेवाडी, अंजनगाव, पानसरेवाडी, बाबुर्डी, कऱ्हाटी, काळखैरेवाडी, खराडेवाडी, गोजुबावी, दंडवाडी, साबळेवाडी यासह अनेक गावांतील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या सरकारी टँकरच्या खेपा आणि स्थानिक लोकसंख्या याचा ताळमेळ बसत नसल्याने गावातील पुढारी, तसेच राजकीय पदाधिकारी पदाचा वापर करून आलेला टँकर प्राधान्याने घेऊन आपली तहान भागवून घेत आहे. मात्र वाड्यावस्त्यांवरील नागरिक याच टँकरची दिवसभर बसून वाट पाहत असल्याचे चित्र आहे. सरकारी टँकर पोहचत नसल्याने २० रुपयांना हंडाभर पिण्याचे पाणी खासगी टँकरकडून घेण्याची वेळ आली आहे, असे अंजनगावमधील नागरिकांनी सांगितले. दुष्काळी भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जलयुक्त शिवाराची कामे झाली. मात्र दुष्काळामुळे पाणी नाही.

सरकारी टँकर वाड्यावस्त्यांवर पाच-पाच दिवस येत नाही. त्यामुळे आम्हाला पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. प्रशासनाने टँकरची रोज किमान एक खेप द्यावी ही विनंती आहे, ग्रामस्थ संपत वायसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूतोंडे, हिर्डोशी भागात भीषण पाणीटंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर
भोर तालुक्याच्या भाटघर परिसरातील भूतोंडे व निरा देवघर धरणाच्या हिर्डोशी खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. महिला पाण्यासाठी दोन-तीन मैलांची पायपीट करून हैराण झाल्या आहेत. या भागात दोन धरणे असूनही पाण्याची तीव्र टंचाई गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे.

'धरण उशाला अन कोरड घशाला' अशी अवस्था या भागातील जनतेची झाली आहे. परिसरातील १५ गावे आणि ३० वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिला आहे. मात्र, आतापर्यंत एकही टँकर सुरू झालेला नाही. त्यामुळे महिला आणि ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. पंचायत समितीच्या मासिक सभेतही पाणी टंचाई आणि टँकरच्या प्रश्नाचे पडसाद उमटले.

भाटघर व नीरा देवघर ही दोन्ही धरणे या वर्षी पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. सध्या भाटघर धरणात जेमतेम १०, तर नीरा देवघरमध्ये २४ टक्के पाणीसाठा आहे. भूतोंडे, डेरे येथील टँकर मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, आतापर्यंत टँकर पोहोचलेले नाहीत. प्रत्यक्षात प्रस्ताव मंजूरीला पाठवण्यात आल्याचे समजते. भूतोंडे खोऱ्यातील डेरे, भूतोंडे, पसुरे, तळजाईनगर, कुरण गावठाण, जळकेवाडी, सोनारवाडी, हुंबेवस्ती येथे पाणी टंचाई जाणवत आहे. वीसगांव खोऱ्यातील बालवडी, नेरे, वरोडी, डायमुख, वरोडी खुर्द ,धनावडे वस्ती, महुडे खुर्द, ससेवाडी येथेही टँकरची मागणी करण्यात आली आहे. हिर्डोशी खोऱ्यातील जयतपाडच्या हुंबेवस्ती, गोरेवस्ती, हिर्डोशीचा सोमजाई माळ, हरणीचा माळ, रायरीची धारांबे वस्ती, गुढे, निवंगण, कळंबाचा माळ, दुर्गाडी, वारंवड, कुडली खुर्द, कुडली बुद्रुक येथेही पाणी टंचाई आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोळा जोडपी विवाहबंधनात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती
महादेवराव जानकर शिक्षण प्रबोधिनीच्या वतीने बारामती येथे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाहबद्ध झाली. पाच हजार रुपये खर्चात हे विवाह झाले.

प्रबोधिनीचे अध्यक्ष संदीप चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्याचे शारदानगर येथील अनुज मंगल कार्यालयात आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर, रामहरी रूपनवर, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल, दशरथ राऊत आदी उपस्थित होते. बारामती, इंदापूर तालुक्यातील एक बौद्ध, तर १५ हिंदू धर्मीय जोडप्यांचे विवाह या वेळी झाले.

'बारामती, इंदापूर भागातील ​पालकांनी दुष्काळामुळे मुला-मुलींचे विवाह लांबणीवर टाकायचे ठरविले. बऱ्याच कुटुंबांमध्ये कर्ज काढून थाटात विवाह केले जातात. मात्र, नंतर कुटुंब कर्जबाजारी होते. त्याचा परिणाम त्या घरातील अन्य मुला-मुलींच्या शिक्षणावर होतो. खर्चाअभावी शिक्षण थांबविण्याची वेळ येते. शिक्षण थांबले, की त्या कुटुंबाची

प्रगती थांबते. शिक्षणाचा अभाव हे गरिबीचे मुख्य कारण आहे. ग्रामीण भागात विवाह समारंभावरील वाढता खर्च एक समस्या बनली आहे. त्यामुळे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला,' असे संदीप चोपडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅनॉलमध्ये बुडून दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
उन्हाचा कडका असल्याने कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास गोपाळपट्टी मांजरी रोड येथे ही घटना घडली. प्रेम प्रवीण कुवर (वय १३, रा. घुलेवस्ती, गणपती मंदिराशेजारी, मांजरी बुद्रुक) आणि गणेश विजय राखपसरे (वय १२, सिद्धिविनायक कॉलनी, नवरत्न मंगल कार्यालयाजवळ, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हडपसर येथील साने गुरुजी आदर्श विद्यालयात प्रेम हा सातवीत, तर गणेश चौथीत शिकत होता.

रविवारी शाळेला सुट्टी असल्याने प्रेम आणि गणेश कॅनालमध्ये पोहायला गेले होते. मुंढवा येथून जॅकवेलचे पाणी जुन्या कॅनॉलमध्ये सोडले होते. त्यामुळे जुना कॅनॉलमध्ये गढूळ पाणी होते. दोघांनाही पोहता येत नव्हते. प्रेम आणि गणेश पाण्यात बुडताना जवळच बकरी चारणाऱ्या धनगराने हे दृष्य पाहिले. त्यांना वाचण्याचा प्रयत्नही त्याने केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. शेजारी गणेशचा भाऊ तुषार हा क्रिकेट खेळत होता. तो देखील दोघांना वाचवण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरला होता. मात्र, पाण्याची खोली पाहून तो बाहेर आला. एक तास ही मुले गढूळ पाण्यात बुडालेली होती. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार पी. एस. कामठे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनरक्षक, वनपालांचा आंदोलनाचा पवित्रा

$
0
0

जुन्नर : मंगरुळ येथे बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर जुन्नर वनविभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून झालेल्या मारहाणीमुळे वनविभागाचे कर्मचारी धास्तावले आहेत.

अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होईपर्यंत आळेफाटा येथे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा वनरक्षक आणि वनपाल संघटनेचे अध्यक्ष सी. एन. नलावडे यांनी दिला आहे. या संघटनेत जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यातील वन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या संघटनेच्या या आंदोलनाला राज्य वनक्षेत्रपाल संघटनेने पाठिंबा दिला आहे. आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी या संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय कडू जुन्नरला येणार आहेत.

मंगरुळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात सगुणा खराडे या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी घटनास्थळी गेलेल्या उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे, सहाय्यक वनसंरक्षक वाय. पी. मोहीते यांच्यासह बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांना जमावाने मारहाण केली होती.

जुन्नर तालुक्यात बिबट्या-मानव संघर्षाचे प्रकार अनेक वर्षांपासून घडत आहेत. वनविभागाचा सध्याचा कर्मचारीवर्ग आणि अपुऱ्या सुविधा यामुळे हा प्रश्न सुटलेला नाही.

नर बिबट्या जेरबंद

मंगरुळ भागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सहा वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद झाला आहे. सकाळी सात वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला माणिकडोहच्या बिबट्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे, अशी माहीती उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांवर काळाचा घाला

$
0
0

जीप-टँकरच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू
म. टा. वृत्तसेवा, बारामती
तुळजापूरहून देवदर्शन करून माघारी परतत असताना बारामती-इंदापूर रस्त्यावरील पिंपळी-लिमटेकच्या हद्दीत महिंद्र जीप आणि टँकरच्या भीषण अपघातात हिवरे (ता. पुरंदर) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. अपघातातील मृतांपैकी चार जण पुरंदर तालुक्यातील हिवरे गावचे, तर एक जण दौंड तालुक्यातील बोरीएढ येथील आहे.
चालक किरण बाळासाहेब कुदळे, रखमाबाई एकनाथ बोरावके, स्वाती अशोक बोरावके, सुरेखा नामदेव कुदळे (सर्व रा. हिवरे, ता. पुरंदर) आणि लक्ष्मीबाई शंकर गायकवाड (रा. बोरीएढ ता. दौंड) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात चैतन्य किरण कुदळे, तेजश्री संतोष गायकवाड, मंजुषा पांडुरंग कुदळे, मोनिका किरण कुदळे, पूजा परशुराम कुदळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बारामती तालुक्यातील पिंपळी-लिमटेकच्या हद्दीत महिंद्र जीप (एमएच १२ जीझेड ६५६४) या गाडीला समोरून आलेल्या रॉकेलच्या टँकरने (एमएच ०४ डीएस २६२५) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. गावकऱ्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा रक्षकानेच चोरले सत्तर लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नारायण पेठेतील 'रायटर कॉर्पोरेशन' या कंपनीच्या कार्यालयातील सत्तर लाख रुपयांची रोकड सुरक्षा रक्षकानेच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अभिजित मगर (वय ३९, रा. गोकुळनगर, धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अवैद्यनाथ ठाकूरप्रसाद पांडे (रा. मौर्या, वडगाव मावळ, मूळ रा. उत्तर प्रदेश) आणि सुशीलकुमार जंत्री (रा. कसबा पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायटर कॉर्पोरेशन ही मुंबई येथील कंपनी आहे. या कंपनीकडून वेगवेगळ्या कंपन्या, सराफी पेढ्या, मॉल आदींमध्ये दररोज जमा होणारी रोकड जमा करून दुसऱ्या दिवशी ती संबंधितांच्या बँक खात्यात भरण्याची सेवा दिली जाते. मगर कंपनीत नोकरी करतात. कंपनीचे नारायण पेठेत रामकुंज अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. या कार्यालयात एक कोटी ३२ लाख रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. या कंपनीत आरोपी पांडे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. रोकड ठेवलेल्या खोलीची चावी एका टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्याची त्याला माहिती होती. बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्याने खोली उघडून सत्तर लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाला. कंपनीत 'वॉल्ट ऑफिसर' म्हणून कार्यरत जंत्री याने पांडेला अप्रत्यक्षरित्या मदत केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
कंपनीकडे जमा होणाऱ्या रकमेच्या हाताळणीची आणि सुरक्षेची जबाबदारी परराज्यातील सुरक्षा रक्षकावर सोपविण्यात आले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजन तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा चाळिशीच्या खाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आठवडाभर चाळिशीच्या घरात मुक्काम केल्यानंतर शहरातील कमाल तापमानात रविवारी काहीशी घसरण झाली. आठवडाभर तीव्र उकाड्याची काहिली सहन केल्यानंतर रविवारी सुटीच्या दिवशी तापमानात घट झाल्याने पुणेकरांना सुखद दिलासा मिळाला. पुढील दोन दिवसही तापमान ३८ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
शहरात रविवारी ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तर, १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. शनिवारी पुण्यात ४०.२ अंश सेल्सिअस कमाल, तर १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले होते. त्या तुलनेत रविवारी तापमानात घट झाल्याने उकाड्याची तीव्रताही कमी झाल्याचे जाणवत होते. तसेच, वातावरणही अंशतः ढगाळ राहिल्याने भरदुपारीही उन्हाचा फारसा तडाखा जाणवत नव्हता. सायंकाळनंतरही हवेत सुखद गारवा होता. त्यामुळे पुणेकरांसाठी रविवारची सुटी काहीशी सुखावह ठरली.
पुण्यात तापमानात घट झाली असली, तरी विदर्भ मराठवाड्यातील उष्णतेची लाट कायम होती. रविवारी राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे (४५ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या वरच नोंदले गेले. या भागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
............
तापमानात घट होण्याची शक्यता
उत्तरेकडील राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तेथून राज्याकडे उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातही तापमानात मोठी वाढ झाली आहे. परंतु, पुढील दोन दिवसात उत्तरेकडील राज्यात दिवसाच्या तापमानात दोन ते चार अंशांची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही पारा ४० अंशांखाली येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळआयातीचे धोरण हवे

$
0
0

वाढत्या किमतीवरून सर्वपक्षीयांची सरकारवर टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
डाळींच्या दरात पुन्हा वाढ होण्यास भाजप सरकारच जबाबदार असून,डाळींच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने आयातीचे धोरण स्वीकारावे, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांनी केली आहे. आयातीचे धोरण स्वीकारण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला आहे.
डाळीचे उत्पादन घटल्याने तूर डाळीचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसात तूरडाळ किलोमागे दीडशे रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. पाच महिन्यांपूर्वी राज्यात डाळसंकट उभे राहिले होते. त्यावेळी डाळीचे भाव दोनशे रुपये किलोवर गेल्याने सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यावेळी पुण्यात खासगी कंपनीकडून खरेदी केलेली तूरडाळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी शंभर रुपये किलो दराने विकली होती. त्यानंतर म्यानमारसह अन्य देशांतून तूरडाळ आयात करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते.
डिसेंबर महिन्यात राज्यातील विविध भागातून तूरडाळ बाजारात आल्याने दर उतरले होते. मात्र, आता पुन्हा डाळीचे भाव वाढत असल्याने या सर्व प्रकाराला राज्य सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असल्याची टीका राजकीय पक्षांकडून होऊ लागली आहे. डाळीच्या दरात पुन्हा होत असलेली वाढ भाजप सरकारचे अपयश असल्याची टीका शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी केली. सत्तेत येताना भाजपने 'अच्छे दिन'चे स्वप्न सर्वसामान्यांना दाखविले होते. हेच का राज्य सरकारचे अच्छे दिन असा प्रश्न निम्हण यांनी उपस्थित केला. डाळीची राज्यातील परिस्थिती माहित असतानाही राज्य सरकार ठोस निर्णय घेणार नसेल तर, अवघड आहे. सरकारी निर्णयात काळेबेरे असल्याचीही शंका निम्हण यांनी व्यक्त केली. डाळीच्या किमती आवाक्यात येण्यासाठी राज्य सरकारने डाळ आयात करण्याची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी आयात धोरण स्वीकारणार असल्याचे राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले होते. मग, त्यास विलंब का होत आहे, असा सवाल मनसेचे अध्यक्ष हेमंत संभूस यांनी उपस्थित केला. सर्वसामान्यांसाठी शंभर रुपये किलो दराने भाजपच्या कार्यकर्त्यांनी डाळ विकली होती. भाजपचे हे कार्यकर्ते आता कुठे गेले? असा सवालही संभूस यांनी विचारला आहे. डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, चौकशीची मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोथरूड कचरा डेपोला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोथरूड येथील कचरा डेपोला रविवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी फेऱ्या मारून दुपारपर्यंत आग विझवली. आग विझविण्यासाठी जेसीबीची मागणी करण्यात आली. पण, तो उपलब्ध न झाल्याने तशीच आग विझवण्यात आली. मात्र, दुपारी पुन्हा आग भडकली. त्यामुळे सायंकाळी सातपर्यंत आग विझवण्यासाठी साठ ते सत्तर हजार लिटर पाण्याचा वापर करावा लागला.
कोथरूड कचरा डेपोला तीन ठिकाणी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला रविवारी सकाळी अकराच्या सुमारास मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग चांगलीच पसरली होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. कोथरूड अग्निशमन केंद्राच्या गाडीने फेऱ्या मारून आग दुपारपर्यंत आग विझवली. कचरा खोदून आग विझवण्याची आवश्यकता होती. त्यासाठी जवानांकडून जेसीबीची मागणी केली. पण, सुट्टीचा दिवस असल्यामुळे संबंधित विभागाला जेसीबी पाठविण्यात अपयश आले. त्यामुळे जवानांनी पाणी मारून आग विझवली. आग विझवल्यानंतर काही वेळाने पुन्हा आग भडकल्याची माहिती मिळाली. त्यानतंर कोथरूड, एरंवडणे केंद्राच्या गाड्यांनी सात वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. त्याचा नागरिकांना ही त्रास झाला.
सायंकाळी सातपर्यंत दहा ते बारा जवानांनी आग विझवली. ही आग विझवण्यासाठी साठ ते सत्तर हजार लिटर पाणी वापरावे लागले. कोथरूड कचरा डेपाजवळ कोणीही सुरक्षारक्षक नसल्यामुळे आग लागल्यानंतर बऱ्याच वेळाने अग्निशमन दलास माहिती मिळाली. तसेच, आग वेगवेगळ्या तीन ठिकाणी लागल्यामुळे ती लावली असण्याची शक्यता आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
..
कापड दुकान भक्ष्यस्थानी
मार्केट यार्ड येथील कपड्याच्या दुकानाला आग लागून कपडे, पंखा आणि इतर साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा मिनिटात ही आग विझविली. मार्केट यार्ड येथे सिरवी बंधू मिठाईवाले या दुकानाशेजारी यश कलेक्‍शन दुकान बंद असताना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोटमाळ्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकान उघडून आग आटोक्‍यात आणली.
..
मंडप साहित्याला आग
गंगाधाम चौकातील आईमाता मंदिराजवळील साठे मंडपाच्या साहित्याला आग लागल्याची घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. या आगीत कामगार जखमी झाला आहे. आगीमध्ये फळ्या, लाकूड आणि मांडवाच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. मध्यवर्ती केंद्राचा पाणीटँकर आणि दोन अग्निशमन गाड्यांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅपी स्ट्रीट’रंगी रंगले पुणेकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाहनांविना मोकळा रस्ता...त्यामुळे बिनधास्त वावरणारे पुणेकर...कुणी सायकलिंग तर, कुणी स्केटिंगचा आनंद लुटण्यात दंग...मुलांच्या उत्साहात सामील होतानाच स्वतःही ड्रम वाजविण्यात हरपून गेलेले पालक...अशा उत्साही वातावरणामुळे औंधमधील 'हॅपी स्ट्रीट'चा उपक्रम रंगला.
औंध येथील आयटीआय रोडवर हॅपी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले होते. पुणे पोलिस, वाहतूक पोलिस, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने 'टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काही ​दिवसांच्या विश्रांतीनंतर हा उपक्रम पुन्हा पुणेकरांच्या भेटीसाठी आला आहे. हॅपी स्ट्रीटवर धम्माल करण्यासाठी औंध, बाणेर, पाषाण, कोथरूडसह मध्यवर्ती पेठांमधूनही नागरिकांनी उत्साहाने गर्दी केली होती. शहरात वाहनमुक्त परिसर असावा, तिथे नागरिकांना मनसोक्त आनंद लुटता यावा आणि सायकल चालविण्यालाही प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील हेतू आहे.
हॅपी स्ट्रीटवर लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळांसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचा या मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कल्चर क्लबतर्फे ड्रम सर्कलअंतर्गत सर्वांना ड्रमवादनाची संधी देण्यात आली. त्यालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायकलिंग, स्केटिंगला उत्तम प्रतिसाद लाभला. अनेकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह हॅपी स्ट्रीटवर हजेरी लावली होती. पाणी वाचवा, प्राणी वाचवा, नद्या वाचवा, प्रदूषण टाळा असे पर्यावरणपूरक संदेशही या वेळी देण्यात आले. हॅपी स्ट्रीटवर मनसोक्त धमाल केल्यानंतर पुढील रविवारी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन नागरिकांनी एकमेकांचा निरोप घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रगत’च्या घाईत अभ्यासाचा विसर

$
0
0

ऐन वेळी निकष बदलल्याने खात्याच्या कारभारावर ​प्रश्नचिन्ह
Yogesh.Borate@timesgroup.com
पुणे : राज्यातील शाळा 'प्रगत' करण्याच्या घाईगडबडीमध्ये शिक्षण खात्याचे अधिकारी शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि त्याची काठिण्यपातळी विसरले की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. प्रगत शाळांच्या निकषांमधील गणिती संख्या अचूक लिहिण्याविषयीचा निकष ऐनवेळी बदलण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) नुकताच घेतला. या बदलामागे अभ्यासक्रमांचा विचार करण्यात आल्याने या पूर्वी असा विचार झालाच नसल्याचेही स्पष्ट होत आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी २३ मार्च २०१६ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षणप्रमुखांना प्रगत शाळा निश्चित करण्यासाठीचे निकष कळविले होते. राज्यात नेमक्या किती शाळा प्रगत झाल्या आहेत, या विषयी एकवाक्यता निर्माण व्हावी, या साठी प्रगत शाळांचे निकष ठरविण्याचा विचार पत्रात मांडण्यात आला होता. त्यासाठी शाळांची वस्तुस्थिती विचारात घेऊन निकष अंतिम करण्यात आले होते. शाळांनी या २५ निकषांच्या आधारावर ८० गुण आणि 'प्रगत'च्या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या संकलित चाचणी क्रमांक दोनमध्ये प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला किमान ४० टक्के गुण मिळाल्यास, अशा शाळा २०१५-१६ साठी 'प्रगत' म्हणून घोषित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला किमान पाच गणिती संख्या अचूक लिहिता आणि वाचता येणे, या निकषासाठी पाच गुण विचारात घेतले जाणार आहेत. त्यासाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी व पुढील इयत्तेसाठी प्रत्येकी एक अंक वाढवत जाण्याचा निकष पाळला जाणे अपेक्षित होते. मात्र, 'एससीईआरटी'चे संचालक गोविंद नांदेडे यांनी नुकत्याच काढलेल्या पत्रामध्ये हा निकष बदलल्याचे सांगितले.
'एससीईआरटी'ने काढलेल्या या पत्रानुसार, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी एक व दोन अंकी संख्या अंकात लिहिणे, वाचणे, तिसरीच्या विद्यार्थ्यांनी तीन अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन, लेखन करणे 'प्रगत'च्या निकषांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, इयत्ता चौथीसाठी पाच अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन, लेखन, इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सात अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन 'प्रगत'साठी अपेक्षित आहे. सर्व अधिकारी, शाळा व शिक्षकांनी या बाबी लक्षात घेण्याचे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे. तसेच, हे बदल अभ्यासक्रमानुसार करण्यात आल्याचेही हे पत्र सांगत आहे.
..
शिक्षकांसाठी अनपेक्षित बदल
शाळांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा ठरलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेमधील शाळा मूल्यांकनाच्या टप्प्यावर अचानक करण्यात आलेला हा बदल शिक्षकांसाठी अनपेक्षित ठरला आहे. नवे बदल अभ्यासक्रमाचा विचार करून करण्यात आल्याने, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही त्रास कमी होणार आहे. मात्र, हीच बाब सुरुवातीच्या टप्प्यात विचारात घेतली असती, तर पुन्हा नव्याने पत्र काढून ते कळविण्याची वेळ शिक्षण खात्यावर आली नसती, अशा प्रतिक्रिया या निमित्ताने नोंदविल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटीच्या वाटेत जाचक अटींचे काटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगर रोडवरील बीआरटी मार्ग कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली टर्मिनलची जागा महापालिकेने रविवारी पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेतली. केसनंद भागातील ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा टर्मिनलसाठी घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, ग्रामस्थांनी विरोध करून जागा ताब्यात देण्यासाठी जाचक अटी घातल्या होत्या. त्यामुळे या जागेऐवजी जिल्हा प्रशासनाच्या मालकीची दुसरी जागा विकत घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.
अडीच एकराच्या या जागेसाठी साडेतीन ते चार कोटी रुपये पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले होते. या जागेची मोजणी करण्यासाठी गेलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विरोध करून ग्रामस्थांनी हाकलून लावले. ग्रामस्थांचा विरोध असल्याने जागा ताब्यात देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी महापौर जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यांनीही पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक जय जाधव यांच्याशी चर्चा करून पोलिस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश दिले होते. रविवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दुपारी ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा ‘कॉलगर्ल’ म्हणून वापर

$
0
0

११३ जणांवर बलात्काराचा गुन्हा; पोलिसांनीही अत्याचार केल्याची तक्रार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अल्पवयीन मुलीला पश्चिम बंगालहून 'ब्युटीपार्लर'मध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच, तिचा 'कॉलगर्ल' म्हणून वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने सुटका करून घेऊन दिल्ली येथे गेल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनीही अत्याचार केल्याचे अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी ११३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी १६ वर्षीय पीडितेने तक्रार दिली आहे. त्यावरून स्वीकृती किरण खरेल (रा. विमाननगर, मूळ- नेपाळ) या महिलेस अटक केली आहे. तर, रोहित भंडारी (वय ३५, कल्याणीनगर), तपेन्द्र साई, हरेन्द्र साई, रमेश ठाकुला, भारत, अण्णा, रामू यांच्यासह १०५ जणांवर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात दिल्लीतील एका मॉडेलला चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात बोलवण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून रोहित भंडारी आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली. याच मॉडेलने अल्पवयीन मुलीची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. मॉडेलने २२ मार्च रोजी पीडितेने मुलीला ब्युटीपार्लरमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने रोहितकडून चार हजार रुपये घेतले. त्यानंतर ती या मुलीला दिल्ली येथे घेऊन गेली. त्यानंतर दिल्ली पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री गुन्हा विमानतळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

अल्पवयीन मुलगी पश्चिम बंगाल येथील सिलिगुडीची आहे. दीड ते दोन वर्षांपूर्वी आरोपी रोहितने तिला 'ब्युटीपार्लर'मध्ये काम देतो, या बहाण्याने पुण्यात आणले. पुण्यात तिचा सहा ते सात दिवस व्यवस्थित सांभाळ केला. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने व इतरांच्या मदतीने मुलीला कॉलगर्लचे काम स्वीकारण्यास भाग पाडले. चंदन नगर, विमान नगर, संजय पार्क, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईतही तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या ११३ पैकी आठ जणांची नावे पीडितेने पोलिसांना सांगितली आहेत. अल्पवयीन मुलीला आरोपींनी सिगारेटचे चटके दिले असून, काही पोलिसांनी देखील अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्याते सहायक निरीक्षक पी. बी. कोलते अधिक तपास करत आहेत.

आईच्या उपचारासाठी मुलगी पडली बळी

अल्पवयीन मुलीचे वडील घरातून निघून गेले आहेत. या धक्यामुळे तिच्या आईचे मानसिक संतूलन बिघडले. त्यामुळे पीडित मुलगी आजीसोबत राहात होती. तिच्या आजीची पान टपरी होती. येथे आरोपी रोहित सिगरेट पिण्यासाठी येत होता. भंडारी याने तिला माझ्यासोबत चल, पुण्यात तुला ब्युटीपार्लरमध्ये काम देतो, असे सांगितले. त्या ठिकाणी चांगले पैसे मिळतील त्यातून तुला आईवर उपचार करता येतील, असेही सांगितले. या अमिषाला मुलगी बळी पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>