Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ने मिटणार पाण्याची चिंता

$
0
0

'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ने मिटणार पाण्याची चिंता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सध्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांपासून ते शहरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळेच पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आता 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. पुण्यातील ग्रीन एनर्जी फाउंडेशनचा मॉडेल रथ केंद्रीय पेयजल मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर फिरत असून, पुण्यानंतर तो लातूरला जाणार आहे.
ग्रीन एनर्जी फाउंडेशनने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे हे मॉडेल शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले आहे. पुण्यात सरासरी ७२२ मिलीमीटर इतका पाऊस पडतो. एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा विचार करता ६० हजार लिटर पावसाचे पाणी या 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'च्या माध्यमातून वाचविणे शक्य आहे. अशा या मॉडेलमध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे एकत्र आणून त्याचे शुद्धीकरण केले जाऊ शकते. नंतर ते टाकीत जमा होते. त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य होते. पावसाळ्याचे साठवलेले पाणी पुढील तीन ते चार महिन्यापर्यंत पुरेल इतके असते. त्यातून सोसायटी अथवा घराच्या पाणी व वीजपट्टीत मोठी बचत होणे शक्य आहे,' अशी माहिती ग्रीन एनर्जी फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला ओसवाल यांनी दिली.
शास्त्रोक्त पद्धतीच्या 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'द्वारे पुण्यातील सर्व भागातील सर्वांचाच पाण्याचा प्रश्न सुटण्यात मदत होईल. इन्फोसिस व सिंध हाऊसिंग सोसायटीत या पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. हे सोशल इनोव्हेशनचे मॉडेल आहे. महापालिका, सरकार अथवा सोसायट्या अशा कोणीही पुढाकार घेतल्यास आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे हे मॉडेल तयार झाल्यानंतर त्याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण करण्यात आले. त्यास वर्ल्ड वॉटर लीडरशीप काँग्रेससह अन्य विविध संस्थांनी गौरविले आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोकणचा आंबा अमेरिकेच्या वाटेवर

$
0
0

कोकणचा आंबा अमेरिकेच्या वाटेवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रामुळे निर्यातयोग्य आंब्यासाठी 'यूएसडीए एफिस' हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोकणचा राजा असलेला हापूस आता अमेरिकेच्या वाटेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आयोजित 'आंबा महोत्सव २०१६'चे उद्घाटन पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, सहायक सरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते.

'यूएसडीए एफिस' या प्रमाणपत्रामुळे अमेरिकेची मोठी बाजारपेठ कोकणच्या हापूस; तसेच केशर आंब्याच्या निर्यातीसाठी खुली झाली आहे. हापूस व केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालावर विकिरण प्रक्रिया करून निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी निर्यातीच्या आंब्यांना चांगले दर मिळतील. कृषी पणन मंडळाने मँगोनेटअंतर्गत नोंदणीकृत १२०० शेतकऱ्यांचे 'कॅम्पेन फॉर मँगो' या योजनेंतर्गत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांचा आंबा निर्यातदारांना उपलब्ध करून दिला आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट ग्राहकांना आंब्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकविलेले व रास्त दरातील आंबे थेट शेतकऱ्यांकडून मिळावेत, या उद्देशाने पणन मंडळाने हा आंबा महोत्सव भरवला आहे. महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागातील ३६ शेतकरी गट व आंबा उत्पादक शेतकरी संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांच्याकडील नैसर्गिकरित्या पिकवलेले देवगड हापूस, रत्नागिरी हापूस आंबे उपलब्ध आहेत. सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत कृषी पणन मंडळाच्या कार्यालयाजवळ हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे, अशी माहिती आकरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या प्रतिबंधासाठी ‘लाइफ इन कॉन्सर्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आत्महत्या प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या कनेक्टिंग या सेवाभावी संस्थेच्या मदतीसाठी पुण्यातील डॉक्टरांच्या डॉक्स या बँडच्या विशेष लाइफ इन कॉन्सर्ट या कार्यक्रमाचे येत्या २३ एप्रिलला आयोजन करण्यात आले आहे. विमाननगरमधील सिम्बायोसिस संस्थेच्या प्रेक्षागृहात आयोजित या कार्यक्रमातून गोळा होणारा निधी आत्महत्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणार आहे.

संस्थेतर्फे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. संस्थेतर्फे २००८ पासून समाजातील गरजू व्यक्तींसाठी मोफत हेल्पलाइनची सुविधा पुरविली जाते. ताण-तणावाच्या वातावरणामध्ये वावरणाऱ्या व्यक्तींसाठी या हेल्पलाइनच्या माध्यमातून समुपदेशनाची सुविधा पुरविली जाते. गेल्या काही काळात महिलांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्या करण्याचे किंवा त्या विषयीचा विचार करण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण या निमित्ताने समोर येत असल्याची माहिती या वेळी संस्थेतर्फे देण्यात आली. या विषयीची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी गेल्या काही काळात पुरुषांचे वाढते प्रमाण जाणविणारे असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. हेल्पलाइनसोबतच विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी लागणारी मदत या लाइफ इन कॉन्सर्टद्वारे गोळा होण्याचा विश्वास संस्थेच्या पूजा कांबळे यांनी व्यक्त केला. या विषयी अधिक माहितीसाठी ९६८९००३०४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडीतून काही काळ सुटका

$
0
0

पोलिसांची अभिनव योजना शनिवारी यशस्वी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिग्नल लागल्यानंतर वाहनांच्या लागणाऱ्या रांगा... वाहनचालकांना एका सिग्नलवर दोन वेळा थांबण्याची येणारी वेळ... रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणारा अडथळा.. आणि त्यामुळे गर्दीच्या वेळेस कायमच कोंडीयुक्त राहणारा विद्यापीठ रस्ता शनिवारी दिवसभर कोंडीविरहित होता; मात्र सायंकाळी गर्दीच्या वेळेला या मार्गावर तीन पीएमपी बस बंद पडल्याने पुन्हा मोठ्या प्रमा‍णावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

नवनियुक्त पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शहरातील वाहतूक कोंडीची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घेऊन शहराच्या महत्त्वाच्या रस्त्यावर अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाहतूक पोलिस शाखेने शनिवारपासून या योजनेचा प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक, रेंजहिल्स चौक, सूर्यमुखी दत्तमंदिर चौक, सिमला ऑफिस चौक (भाऊसाहेब खुडे चौक), संचेती हॉस्पिटलजवळील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक (जुना बाजार), प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाजवळील (आरटीओ) चौक, सीओईपी कॉलेज येथील चौक, पाटील इस्टेट चौक या प्रत्येक चौकांत सुमारे १५ वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी व्यवस्थित निभावली.

रेंजहिल्स चौक आणि कला निकेतनजवळील थांब्यावर बसगाड्या थांबवण्यात आल्या नाहीत. 'ई-स्क्वेअर'समोर, तसेच वेधशाळा ते वीर चाफेकर चौकापर्यंत पार्किंगला बंदी करण्यात आली होती. तसेच संचेती हॉस्पिटलसमोरील चौक ते स. गो. बर्वे चौकापर्यंतही पार्किंगला बंदी होती.
..................
बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

सायंकाळी सहानंतर इंजिनीअरिंग कॉलेज चौकात दोन आणि कृषी महाविद्यालय चौकात एक बस बंद पडल्याने आसपासच्या काही परिसरात वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. संचेती हॉस्पिटलपासून रेंजहिल्सपर्यंत, तसेच विरुद्ध दिशेला 'आरटीओ'पर्यंत कोंडीची परिस्थिती होती.
..........................

दररोजच्या तुलनेत शनिवारी विद्यापीठ रस्त्यावर वाहनांची संख्या कमी असते. शनिवारी सायंकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होती. सोमवारी खासगी व सरकारी कार्यालये सुरू असतील. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या नेहमीप्रमाणेच असेल. त्या दिवशी या योजनेचे निष्कर्ष समजू शकतील.

- राजकुमार शेरे, पोलिस निरीक्षक, नियोजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचए’च्या पुनर्वसनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष

$
0
0

श्रीरंग बारणेंचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार करून अर्थ मंत्रालयाकडे पाठवला आहे. परंतु याबाबत विचार होत नाही. कंपनीच्या प्रस्तावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे,' असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

एचए कामगार संघटनेच्या कॉलनीच्या सभागृहात शुक्रवारी बैठक घेण्यात आली. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून बारणे बोलत होते. संघटनेचे महासचिव सुनील पाटसकर, कृती समितीचे पदाधिकारी अरुण बोऱ्हाडे, कामगार संघटनेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

बारणे म्हणाले, 'कंपनीच्या कामगारांच्या प्रश्नांबाबत कामगार प्रतिनिधी आणि सर्व कामगारांनी मिळून काय भूमिका घ्यायची याबाबत आपण सर्वानुमते निर्णय घ्यावा. आपण बरोबर लढा देऊ.' बोऱ्हाडे म्हणाले, 'पुनर्वसन प्रस्ताव लवकर मंजूर होण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवत तीव्र आंदोलन करावे. प्रश्नाचे गांभीर्य केंद्र सरकारला दाखवून द्यावे.' 'केंद्र सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी दोन दिवसांत पुढील आंदोलनाची दिशा ठरवून जाहीर करण्यात येईल,' असा इशारा पाटसकर यांनी दिला.

कंपनीच्या कामगारांना गेल्या १७ महिन्यांपासून पगार नाही. नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीचे कामकाज ठप्प झाले आहे; मात्र तरीही सरकार भूमिका स्पष्ट करत नसल्यामुळे कामगार हवालदिल आहेत, याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अणेंच्या विरोधात मनसेचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्राचे विभाजन करून चार वेगळी राज्ये निर्माण करण्याबरोबरच वेगळ्या विदर्भाची ‌मागणी करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा निषेध करून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वत‌ीने डेक्कन जिमखाना चौकात शनिवारी आंदोलन करण्यात आले. अणे यांच्या धिक्काराच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. अणे यांनी अखंड महाराष्ट्राच्या जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना यापुढील काळात पुण्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही मनसेने दिला.

'महाराष्ट्राची चार राज्ये निर्माण करण्याची भाषा करून, अणे यांनी गेल्या आठवड्यात‌ महाराष्ट्राचा नकाशा असलेला केक कापून त्यामधून विदर्भाचा भाग वेगळा केला होता. सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या नासक्या विचारांना खतपाणी घालून स्वतंत्र विदर्भाबाबत अणे यांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्रातील जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे आहे. अणे यांनी आपली भाषा न सुधारल्यास मनसेचे कार्यकर्ते त्यांना आपल्या पद्धतीने उत्तर देतील,' असा इशारा या वेळी देण्यात आला.

डेक्कन जिमखाना येथील खंडूजीबाबा चौकात हे आंदोलन करण्यात आले. शहराचे अध्यक्ष हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात अजय शिंदे, उपशहराध्यक्ष जयराज लांडगे, राम बोरकर, मोहनराव शिंदे सरकार, विभाग अध्यक्ष राहुल गवळी, आशिष देवधर, चंद्रकांत गोगावले, साईनाथ बाबर, सुधीर धावडे, ज्योती कोंडे, जयश्री मोरे, विशाखा गायकवाड, आरती गायकवाड यांच्यासह दीडशे ते दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहारदार संगीताने रसिक मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राग पूरिया धनाश्री अन् मारूबिहागने रंगलेले वातावरण, भावपूर्ण गायकी आणि व्हायोलिनवादनाच्या मेजवानीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अमेरिकास्थित गायक मनू श्रीवास्तव आणि व्हायोलिनवादक रतीश तागडे यांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

निमित्त होते 'व्हायोलिन अॅकॅडमी'तर्फे शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे आयोजित कार्यक्रमाचे. गुरुवर्य बा. शं. उपाध्ये यांच्या स्मृतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारातील कामगिरीसाठी श्रीवास्तव आणि तागडे यांना ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. प्रभाकर जोग यांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आले. संस्थेचे पं. अतुलकुमार उपाध्ये, शिरीषकुमार उपाध्ये या वेळी उपस्थित होते.

संस्थेतर्फे दिला जाणारा 'विनोद देऊळकर पुरस्कार' समीर सूर्यवंशी यांना, तर 'श्रीमती हेमलता जोशी पुरस्कार' अनिल दामले यांना प्रदान करण्यात आला. अमेरिकेत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना गायनाचे धडे देणारे श्रीवास्तव यांचे बहारदार गायन पहिल्या सत्रात रंगले. त्यांनी राग पूरिया धनाश्री आणि राग मारूबिहाग सादर केले. 'देखी तोरी आनबान' या रचनेला उपस्थितांची दाद मिळाली. मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम), रोहित मुजुमदार (तबला) यांनी त्यांना समर्पक साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात 'इनसिंक' या दूरदर्शनवर चोवीस तास सुरू असणाऱ्या वाहिनीचे प्रवर्तक रतीश तागडे यांनी व्हायोलिनच्या सुरावटींनी उपस्थितांना मुग्ध केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानाची चाळिशी कायम

$
0
0

आणखी दोन दिवस तीव्र उकाड्याचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तापमानात किंचित घट झाली असली, तरी तीव्र उकाड्यातून शनिवारीही पुणेकरांची सुटका होऊ शकली नाही. पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने आणखी काही दिवस पुणेकरांना हा उकाडा सहन करावा लागणार आहे. राज्यातही अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली आहे.

शनिवारी पुण्यात ४०.२ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १८.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. लोहगाव येथे ४१.२ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर २२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. गुरुवारच्या तुलनेत तापमानात काहीशी घट होती. तापमानात घट झाली असली, तरी प्रत्यक्षात कडक उन्हाचा चटका पुणेकरांनी अनुभवला. त्यामुळे गरज असेल तरच घर अथवा ऑफिसच्या बाहेर पडणे अनेकांनी पसंत केले. परिणामी भर दुपारी रस्त्यावरील रहदारी कमी असल्याचे चित्र होते. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने पुणेकरांना आणखी उकाड्याचा सामना करावा लागणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान मालेगाव व चंद्रपूर येथे (४४.८ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. विदर्भात सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली होती. नागपूर येथे ४४.६, अकोला येथे ४४.४, वर्धा येथे ४४.२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद येथे ४१.४, तर परभणी येथे ४४.१ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस राज्यात अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

................

शनिवारचे कमाल तापमान

मालेगाव ४४.८

चंद्रपूर ४४.८

नागपूर ४४.६

परभणी ४४.१

सोलापूर ४३

जळगाव ४२.५

औरंगाबाद ४१.४

सांगली ४१

नाशिक ३८.६

महाबळेश्वर ३४.१

रत्नागिरी ३२.७

सांताक्रूझ ३२.६

(अंश सेल्सिअसमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

$
0
0

बेल्ह्याजवळच्या खराडे मळ्यातील दुर्घटना

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

जुन्नर तालुक्यातील बेल्ह्याजवळील खराडे मळ्यात गवत कापण्यास गेलेल्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सगुणा दादाभाऊ खराडे (वय ५५, रा. खराडेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर घटनास्थळी गेलेले उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे, सहायक वनसंरक्षक वाय. पी. मोहिते या दोन अधिकाऱ्यांसह माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख या तिघांना जमावाने मारहाण केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंना उसाची शेती आणि मध्यभागी चारापीक लावलेल्या शेतात सगुणा खराडे गवत कापायला गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्या परत आल्या नाहीत, हे लक्षात आल्यावर शोध घेतला असता, शेतात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्यामुळे त्या मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले. सगुणा या माजी सरपंच दादाभाऊ खराडे यांच्या पत्नी आहेत. बिबट्याने त्यांच्या शरीराचा काही भाग खाल्लाही होता. त्यामुळे संबंधित बिबट्या नरभक्षक झाल्याचा निष्कर्ष काढून संतप्त नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामध्ये धोकटे यांचा चष्मा हरवला, तर डॉ. देशमुख यांचा शर्टही फाटला.

जुन्नर तालुक्यातील बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात धोरणात्मक उपाययोजना राबवण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून दिसून आले. जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर, नारायणगावचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

'बिबट्यांना पकडण्यासाठी या ठिकाणी सहा पिंजरे पाठवण्यात आले आहेत. तीन पिंजरे यापूर्वीच रानमळा येथे देखील लावलेले आहेत, तर २० ते २५ कर्मचारीदेखील वनविभागाने घटनास्थळाच्या परिघात नेमले आहेत,' अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाळीव जनावरांची संख्या यंदा ६००च्या वर गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियकराच्या मदतीने घरफोड्या; तिघांना अटक

$
0
0

घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुन्हेगार असलेल्या व्यक्तीशी ओळख झाल्यानंतर त्याच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून त्याच्या मदतीने शहरातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणून, पोलिसांनी आठ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

उषा कांबळे (२७), भाऊदास कचरू शिरसाट (३२, दोघे रा. पिंगळे चाळ, विकासनगर झोपडपट्टी, देहूरोड) आणि रामा पापा जाधव (२०, रा. शिवाजीनगर झोपडपट्टी, शेलकर वस्ती, देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी उषा हिच्याविरुद्ध बंडगार्डन, येरवडा, निगडी, विश्रांतवाडी, चतुःश्रृंगी, विमानतळ, कोरेगाव पार्क, मुंढवा आणि दिघी पोलिस ठाण्यात आतापर्यंत एकूण १८ गुन्हे दाखल असून, आरोपी शिरसाट याच्याविरुद्ध १४ गुन्हे दाखल आहेत. उषाला गेल्या वर्षी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलनेच अटक केली होती. त्या वेळी तिच्याबरोबर अन्य एकाला अटक करण्यात आली होती. उषाने आतापर्यंत तीन ते चार जणांसोबत घरफोड्या केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महिला आरोपी साथीदारांसोबत घरफोड्या करत असल्याची माहिती प्रॉपर्टी सेलचे कर्मचारी यशवंत खंदारे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुषमा चव्हाण यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हे गुन्हे उघडकीस आले. उच्चभ्रू परिसरातील फ्लॅटची टेहळणी केल्यानंतर बंद फ्लॅट शोधून त्या ठिकाणी प्रियकराच्या मदतीने घरफोडी करत होती. त्यासाठी तिच्याकडून सायकलच्या तुटलेल्या स्टँडचा कटावणी म्हणून वापर केला जात होता. नेमका किती ऐवज चोरला हे साथीदाराला न कळण्यासाठी ती फ्लॅटमध्ये गेल्यानंतर साथीदाराला बाहेर उभे करत असे. गेल्या वर्षी आरोपी उषा हिने तिचा प्रियकर आणि साथीदार आकाश परदेशी याच्या मदतीने पाच घरफोड्या केल्या होत्या. त्या वेळी दोघांना अटक करण्यात आली. त्या गुन्ह्यात कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर तिने परत साथीदार आणि प्रियकर बदलून शिरसाट याच्या मदतीने चार घरफोड्या आणि वाहनचोरीचा एक गुन्हा केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र आयुक्तालयाच्या आराखड्याला गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी चिंचवडसाठी प्रस्तावित स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी चिंचवड महापालिकेसह, चाकण, तळेगाव दाभाडे या औद्योगिक पट्ट्याचाही समावेश असण्याची दाट शक्यता आहे. या नव्या आयुक्तालयाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यासंदर्भात शनिवारी पोलिस आयुक्तालयात अनौपचारिक बैठक झाली. यात नव्या आयुक्तालयाची हद्द निश्चित करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

'महाराष्ट्र टाइम्स'ने गेल्या वर्षीच 'पुणे सुपरफास्ट' या कार्यक्रमात पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असावे, अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच, यासाठी निकष तपासण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पाच एप्रिल रोजी विधान परिषदेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मिळालेल्या निर्देशांनुसार शहर पोलिसांनी याबाबत कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

पोलिस आयुक्तालयात झालेल्या या बैठकीत नव्या आयुक्तालयाच्या हद्दीबाबत सविस्तर चर्चा झाली. या हद्दीत चाकण, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, देहू रोड, हिंजवडी, म्हाळुंगे, वाकड, सांगवी, भोसरी, पिंपरी चिंचवड, निगडी, चिखली तळवडे आदी गावांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्द व चाकण, तळेगाव या भागाची लोकसंख्या २० लाखांच्या आसपास आहे. सध्या पिंपरी चिंचवडमध्ये एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी असून वाहतूक व विशेष शाखेसह अन्य वरिष्ठ अधिकारी पुण्यातील आयुक्तालयातूनच काम पाहतात. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे जमिनीचे वाद व अन्य कारणांमुळे पिंपरी चिंचवड परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाणही वेगाने वाढले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र आयुक्तालयाची मागणी जोर धरत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्णाचा हॉस्पिटलप्रवेश सुकर

$
0
0

किचकट प्रक्रियेवर धर्मादाय उपायुक्तांचा तोडगा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस किंवा एखाद्या सामान्य व्यक्तीला मनोरुग्ण आढळल्यास त्याला थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या सूचना धर्मादाय उपायुक्त नितीन जाधव यांनी पोलिसांना केल्या आहेत. प्रवेश घेतल्यानंतर तीन दिवसांत मानसोपचार तज्ज्ञांच्या प्रमाणपत्रासह कोर्टातून आदेश मिळवावेत, अशीही सूचना त्यांनी केली.

मनोरुग्णांना येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेण्यासाठी राबवण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया खूप किचकट आहे. सामाजिक संस्थेच्या तक्रारीची दखल घेऊन विधानभवनात धर्मादाय उपायुक्त नितीन जाधव यांनी या सुचना केल्या आहेत. सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जाधव, निवासी जिल्हाधिकारी सुरेश जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख, तसेच पोलिस व समाजकल्याण खात्याचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

मनोरुग्णाला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते. त्या प्रमाणपत्रासोबत मनोरुग्णाला कोर्टापुढे हजर केले जाते; मात्र कोर्टाचे आदेश मिळेपर्यंत सुमारे १० ते १२ तास लागतात. तसेच मनोरुग्णाला अॅम्ब्युलन्समधून आणण्यात येते. अॅम्ब्युलन्सचालकांचा दिवस कोर्टात जात असल्याने ते मनोरुग्णाला कोर्टात आणण्यास तयार होत नाहीत. तसेच सामाजिक कार्यकर्तेदेखील दिवसभर कोर्टात बसून कंटाळतात. त्यामुळे मनोरुग्णांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची किचकट प्रक्रिया सोपी व्हावी, अशी मागणीही स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आली होती. त्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली.सामान्य व्यक्ती अथवा पोलिसांना मनोरुग्ण आढळल्यास त्याला थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करता येईल; मात्र संबंधित मनोरुग्णासाठी मानसिक आरोग्य कायद्याच्या कलम ३५ (३) नुसार तीन दिवसांत कोर्टाचे आदेश मिळवावेत. तसेच त्याकरिता मानसोपचारतज्ज्ञांचे प्रमाणपत्र असावे. त्यामुळे पोलिसांकडे कोणी मनोरुग्ण असल्याची तक्रार घेऊन गेला, तर पोलिसांनी ती तक्रार नाकारता कामा नये,' अशी सूचना धर्मादाय उपायुक्त नितीन जाधव यांनी केली.करण्याचा अभिनव उपक्रम धर्मादाय आयुक्तालयाने राबवला. त्यानंतर आता 'मनोरुग्णांचा शोध' अशी मोहीम राबवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या संदर्भात शहरातील मनोरुग्णांचा शोध घेऊन त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासंदर्भात रूपरेषा निश्चित करणे आवश्यक आहे. त्याकरिता येत्या काही दिवसांत धर्मादाय आयुक्तालयात बैठक घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल टॉवरसाठी परस्पर जागा दिल्याची तक्रार राज्यपालांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला अंधारात ठेवून पालिकेच्या मालकीच्या तब्बल ३९४ जागा मोबाइल कंपनीला टॉवर उभारण्यासाठी देण्यात आल्याची तक्रार राज्यपालांकडे करण्यात आली आहे. पालिकेतील सभासदांना कोणतीही माहिती न देता प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची भीती काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी व्यक्त केली. यामध्ये विशेष लक्ष घालून याची चौकशी करावी, अशी मागणी बालगुडे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

'शहरातील ३९४ जागा मोबाइल टॉवर उभारण्यासाठी कंपनीला देताना या जागा नक्की कोणत्या आहेत, याची कोणतीही माहिती प्रशासनाने सर्वसाधारण सभेला दिली नाही. स्थायी समितीलाही अंधारात ठेवले गेले. प्रत्येक जागेचा दर वेगळा असताना सरसकट प्रत्येकी १४ हजार १५४ रुपये दराने ३९४ जागा देण्यात आल्या. ज्या खात्यांच्या या जागा आहेत त्यांचे अभिप्राय घेण्यात आले नाहीत. अशी परवानगी द्यायची असेल तर त्यासाठी राज्य सरकारचे काही नियम आहेत, ते डावलण्यात आले,' असे आक्षेप बालगुडे यांनी घेतले आहेत. जागांची निवड पालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रशासनाने टॉवर उभारण्याची मान्यता दिलेल्या कंपनीच्या विरोधात पालिकेच्याच बांधकाम, मिळकतकर आकारणी, विधी सल्लागार, तसेच पथ या विभागांनी हरकत नोंदवली होती. प्रशासनाने या सर्व विभागांनी घेतलेली हरकत डावलून त्याच कंपनीला पालिकेच्या मालकीच्या तब्बल ३९४ जागा दिल्या. यामध्ये मोठा आर्थिक फायदा झाल्याने हा निर्णय प्रशासनाने घेतल्याचा आरोप बालगुडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमावलीचे पालन करा

$
0
0

कंत्राटी कामगार नेमणुकीसंदर्भात आयुक्तांची ताकीद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महापालिकेतील विविध विभागांची कामे करण्यासाठी कंत्राटी कामगारांची नेमणूक करताना कंत्राटी कामगार कायद्यातील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. कंत्राटी कामगार कायद्यातील सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विभागप्रमुखांवर कडक कारवाई करा,' असे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाला दिले आहेत. कंत्राटी कामगारांची नियुक्ती करताना देण्यात आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत अनेक विभागप्रमुख चुकीच्या पद्धतीने कंत्राटी कामगारांची निवड करत असल्याने आयुक्त कुमार यांनी कार्यालयीन आदेश काढून सर्व विभागप्रमुखांना याबाबत सूचना केल्या आहेत.

विभागप्रमुखांनी ठेकेदारांमार्फत कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्याचे टेंडर काढताना या कामगारांना दिल्या जाणाऱ्या वेतनाबाबत पालिकेच्या कामगार कल्याण विभागाचा अभिप्राय घ्यावा. केवळ मनुष्यबळ पुरवण्यासाठी जे ठेकेदार महापा‌लिकेकडे नोंदणी करतात, त्यांनी कामगार कल्याण, तसेच दक्षता विभागामार्फत पहिले बिल मिळण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक अरहे. दर तीन वर्षांनी या दाखल्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. कंत्राटी कामगार नेमण्याची टेंडर प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करून एक एप्रिलपासून कामाचे आदेश द्यावेत. ठेकेदाराकडील कामगार कंत्राटी पद्धतीने घेताना या ठेकेदाराकडून दररोज किती कामगार नियुक्त केले जाणार आहेत, याची आकडेवारी द्यावी. ज्या ठेकेदाराने टेंडर भरताना कामगारांना दिले जाणारे वेतन कंत्राटी कामगारांना देय असलेले किमान वेतन, विशेष भत्ता, बोनस, रजा वेतन, तसेच पीएफ आणि राज्य कामगार विमा योजनेत भरावयाची रक्कम यामध्ये फरक असल्यास असे टेंडर स्विकारू नये. पालिकेकडे टेंडर भरताना संस्थेने त्यांची नोंदणी, सेवाकर, गेल्या तीन वर्षांचे रेकॉर्ड, पॅनकार्ड, ईएसआय, पीएफ, व्यवसायकर यांची तपासणी करून त्याची फोटोकॉपी टेंडरबरोबर जोडावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

ठेकेदारामार्फत कंत्राटी कामगारांची सेवा घेताना संबंधित विभागाने कंत्राटी कामगारांना ईएसआय, ईपीएफ, तसेच कामगार कल्याण निधी हे सर्व फायदे दिले पाहिजेत. याबरोबरच प्रत्येक कामगाराला संबधित ठेकेदाराने यूएएन क्रमांक देणे आवश्यक आहे. विभागप्रमुखाने कंत्राटी कामगारांना कार्यालयात हजर करून घेताना आणि कार्यालय सोडताना बायोमेट्रिक पद्धतीने त्यांनी उपस्थिती नोंदवणे बंधनकारक असून, याचा संपूर्ण खर्च ठेकेदाराने करावयाचा आहे. कंत्राटी कामगारांची हजेरी योग्य पद्धतीने होते की नाही, हे पाहण्याची संपूर्ण जबाबदारी विभागाप्रमुखांच‌ी असल्याचे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त कुमार यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी संस्थेकडून कामगारांवर अन्याय

$
0
0

सभागृह नेत्यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी‌, पुणे

'महापालिकेच्या विविध विभागांसाठी कामगार पुरवणाऱ्या स्मार्ट सेवा सहकारी संस्थेकडून कामगारांवर अन्याय होत असून, कमी पगारात या कामगारांना वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते,' असा आरोप सभागृह नेते शंकर केमसे यांनी केला. या कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या वेतनापेक्षा अत्यंत अल्प वेतन दिले जात असल्याचे स्पष्ट करून, या सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी केमसे यांनी केली.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कामांसाठी कर्मचाऱ्यांची गरज असते. हे कर्मचारी पुरवण्यासाठी काही वर्षांपूर्वी सहकारी तत्त्वावर स्मार्ट सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. कारकुनी कामासाठी संस्थेकडून २५० कर्मचारी घेतले गेले. याबरोबरच प्लंबिंगच्या कामासाठी ३०० स्वतंत्र कर्मचारी घेण्यात आले आहेत. तीस रुपये तास याप्रमाणे हे २५० कर्मचारी तासिका तत्त्वावर काम करतात. संस्थेचे १२ संचालकदेखील पालिकेत कामाला आहेत; मात्र त्यांना एकवट वेतन तत्त्वावर दरमहा ११ हजार ५०० रुपये मिळतात. दर सहा महिन्यांनी त्यांना एक दिवसाचा ब्रेक देऊन पुन्हा सलग सहा महिने त्यांची नियुक्ती केली जाते, असे केमसे यांनी सांगितले.

वर्षानुवर्षे कारकुनी काम करणाऱ्या २५० कर्मचाऱ्यांनी एकवट वेतनाची मागणी केली होती. महापालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही दिले होते; मात्र आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केमसे यांनी केला. या कर्मचाऱ्यांकडून संस्थेच्या नावाखाली ठराविक रक्कम वेतनातून कापून घेत जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

.....................

संचालक आणि पालिकेतील अधिकारी यांच्यात निर्माण झालेल्या हितसंबंधातून हा प्रकार होत आहे. या सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी करून तातडीने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करणार आहे.

- शंकर केमसे, सभागृह नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्लीतील टोळी गजाआड

$
0
0

आकर्षक भेटवस्तूंचे आमिष दाखवून फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'तुमच्या मोबाइल नंबरची लकी कस्टमर म्हणून निवड केली आहे,' असे सांगून ग्राहकांना आकर्षक भेटवस्तूंचे आमिष दाखवून फसवणाऱ्या दिल्ली येथील टोळीचा पर्दाफाश करण्यात सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दिल्ली येथील एका बीपीओ सेंटरमधून हे आरोपी वेबसाइटवरून बनावट ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसाय चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.

अनुजकुमार दिनेशकुमार तिवारी (३५, रा. मंडावली, शकारपूर, पूर्व दिल्ली), विकास रविंदरसिंग रावत (२४, रा. आनंदनगर, फायर स्टेशनजवळ, दिल्ली), देवसिंग चंद्रपाल गौतम (२३, वेस्ट विनोदनगर, दिल्ली), पवन नारायण मिश्रा (१८, रा. अमर मार्केट, जैतपूर, नवी दिल्ली) आणि सनीकुमार महेशकुमार चंद (२४, रा. गणेशनगर कॉम्प्लेक्स, पांडवनगर, दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सीए पंकज मोदाणी (३८) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पंकज यांना वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तुमचा मोबाइल नंबर लकी कस्टमर म्हणून निवडल्याचे सांगितले. 'शॉप इट टुडे इंडिया प्रा. लि.' या आमच्या कंपनीकडून कोणतीही वस्तू मिळवण्यासाठी फक्त व्हॅट भरावा लागेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. त्यानुसार पंकज यांनी कॅनन कंपनीचा 'डी ७०' हा कॅमेरा निवडला. त्यासाठी त्यांना आरोपींनी विविध कारणे सांगून चार लाख ६८ हजार रुपये भरायला लावले. कोणत्याही प्रकारचा कॅमेरा त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. गुन्हे शाखेच्या सायबर गुन्हे शाखेने या कंपनीची माहिती काढली असता पंकज यांची फसवणूक केलेली कंपनी दिल्ली येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने दिल्ली येथील बीपीओ सेंटरवर छापा टाकला. या ठिकाणाहून आरोपींना अटक करण्यात आली.

................

आरोपींच्या खात्यात नऊ कोटी

दिल्ली येथील बीपीओ सेंटरवर सायबर शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी आरोपी एका वेबसाइटवरून ऑनलाइन शॉपिंगचा बनावट व्यवसाय चालवत असल्याचे उघडकीस आले. त्यापैकी मिश्रा ग्राहकांना फोन करून आमिष दाखवत होता. देविसिंग डायरेक्‍टर होता, रावत अकाउंटंट होता, तर चंद वेबसाइट अपडेट करत होता. या सर्व आरोपींनी मिळून ग्राहकांची माहिती मिळवून त्यांना आकर्षक भेटवस्तूंचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. पोलिसांनी सेंटरवरील वॉकी, लॅपटॉप, कंपनीची कागदपत्रे यांसह विविध बँकांची एकूण पंधरा चेकबुक जप्त केली आहेत. या आरोपींच्या बँक खात्यांची पाहणी केली असता, फसवणूक झालेल्या अनेक ग्राहकांनी मिळून तब्बल नऊ कोटी रुपये त्यांच्या खात्यात भरल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकीत बस नेऊनही मोबाइल मिळाला नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका भवन ते हिंजवडी दरम्यान पीएमपी बसमध्ये एका तरुणीचा मोबाइल चोरीला गेल्याची घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. त्यासाठी या तरुणीने शिवाजीनगर पोलिस चौकीत बस नेण्याचा आग्रह धरला. तिथे पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली; मात्र तरुणीचा मोबाइल सापडला नाही.

मोबाइल चोरीला गेल्यानंतर तरुणीने दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवरून फोन लावला. त्या वेळी फोन लागला. पण पोलिसांनी प्रवाशांची तपासणी सुरू केल्यानंतर मोबाइल बंद झाला. दोन महिला पोलिस व दोन पुरुष कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतरही मोबाइल सापडला नाही. अर्धा ते पाऊणतास तपासणी सुरू होती. अखेर निधी चव्हाण (वय २३, रा. वाकड) या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून प्रॉपर्टी मिसिंगची नोंद करण्यात आली. चोरट्यांनी मोबाइल फेकून दिला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंधळकर, कवठाळेंना न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक नामदेव कवठाळे या दोघांना शनिवारी कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

दरम्यान, कोर्टाने भाऊसाहेब आंधळकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, 'त्यांना येरवडा जेलमध्ये पाठवण्यात येऊ नये. त्याऐवजी इतर जेलमध्ये पाठवण्यात यावे,' असा अर्ज त्यांच्या वकिलांनी कोर्टापुढे केला होता. कोर्टाने त्यांचा हा अर्ज फेटाळला. तसेच आंधळकर यांना जेलमध्ये स्पेशल रूममध्ये ठेवण्यात यावे, असा आदेश दिला.

सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयच्या दिल्ली स्पेशल सेलने तपास केला आहे. तपासादरम्यान या प्रकरणात आंधळकर यांच्याविरुद्ध काही पुरावे हाती लागल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली होती. त्यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आंधळकर यांच्यानंतर नामदेव कवठाळेंना अटक करण्यात आली होती. या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले.

या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयतर्फे कोर्टात करण्यात आली. या दोघांतर्फे अॅड. सुधीर शहा, अॅड. सुहास कोल्हे, अॅड. अतुल पाटील यांनी काम पाहिले. कोर्टाने आंधळकर आणि कवठाळे यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

आंधळकर यांनी पोलिस सेवेत असताना अनेक आरोपींना अटक केली असून, ते सध्या येरवडा जेलमध्ये आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध कोर्टात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी पर्यटनाला पोलिस महासंचालकांची हरकत

$
0
0

परदेसी..., परदेसी जाना नहीं...!

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत सहकुटुंब परदेशी जाण्याचे नियोजन करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. पोलिस महासंचालकांनी परवानगी नाकारल्याने राज्यातील चाळीसहून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांना परदेशातील सहलींना मुकावे लागणार आहे. यापैकी अनेकांनी तर तिकीटेही काढली असून आता परवानगी न मिळाल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

पोलिस उपायुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी वर्षभर कामात व्यग्र असतात. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे काही अधिकारी उन्हाळ्यात मुलांच्या शाळेला सुटी लागल्यानंतर काही दिवस इतर देशात फिरायला जाण्याचे नियोजन करतात. त्यासाठी आगोदरच विमानाचे तिकीट, इतर बुकिंग करून ठेवतात. पोलिस अधिकाऱ्यांना संबंधित विभाग प्रमुख सुट्टी मंजूर करून परदेशी जाण्यासाठी परवानगी देतात. परदेशवारीचा खर्च कसा करणार आहे, याचा तपशीलही त्यांना द्यावा लागतो. परदेशवारीसाठी रक्कम कोठून आणली, याची सर्व माहिती अर्जात द्यावी लागते. ही माहिती तपासून त्यांना परवानगी मिळते.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या वर्षी मात्र कुटुंबासोबत परदेशी जाता येणार नाही. राज्यातील चाळीसपेक्षा जास्त पोलिस अधिकाऱ्यांनी परदेशी जाण्यासाठी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे परवानगी मागितली होती. दीक्षित यांनी ती अमान्य केली आहे. त्यासाठी कोणतेही कारण दिलेले नाही. परवानगी मागितलेल्यांमध्ये मुंबई पोलिस दलातील सर्वाधिक अधिकारी आहेत. यातील बऱ्याचशा अधिकाऱ्यांना सुटीदेखील मंजूर झाली होती. त्यांनी विमानाचे तिकीट, परदेशातील हॉटेलच्या बुकिंगची तयारी केली होती. पण, पोलिस महासंचालकांनी परवागनी नाकारल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.

पोलिस खात्यात चर्चा

'वर्षभर काम केल्यानंतर सात-आठ दिवस परदेशी जाण्यास काहीच हरकत नाही. कुटुंबीयांसोबत सुट्टीवरून परतल्यानंतर काम करण्यास आणखी उत्साह येतो. मात्र, या निर्णयामुळे केलेले नियोजन बिघडले असून कुटुंबीयही नाराज आहेत,' अशी भावना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सरसकट सर्व अधिकाऱ्यांना ही परवानगी नाकारण्यामागे काय कारण असावे, याबाबत पोलिस खात्यात चर्चा सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

$
0
0

एटीएम कार्डची माहिती घेऊन फसवणूक; महिला-वृद्ध लक्ष्य म. टा. प्रतिनिधी, पिंपरी तुमचा नंबर अमुक योजनेत 'सिलेक्ट' झाला आहे..., तुम्हाला बक्षीस लागले आहे..., अशा प्रकारचे कॉल करून एटीएम कार्डची माहिती घेऊन फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. या फसवणुकीसाठी प्रामुख्याने महिला आणि वृद्धांना लक्ष्य केले जात आहे. महिन्याकाठी किमान दोन तीन व्यक्ती तरी अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे सांगून पोलिस ठाणे गाठत आहेत. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात एटीएमची माहिती घेऊन अथवा बक्षिस लागल्याचे सांगून बँकेत पैसे भरायला लावून फसवणूक होत आहे. चिंचवड, बावधन, हिंजवडी, वाकड तसेच सांगवी पट्ट्यात अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिल्लीच्या एसटीडी कोडने सुरूवात होणाऱ्या क्रमांकावरून असे 'फ्रॉड कॉल' येत आहेत. लॉटरी लागली आहे किंवा गिफ्ट कुरिअरने येणार आहे, असे परदेशातून सांगून खात्यात पैसे भरण्यास सांगितले जात आहे. विशेष म्हणजे नामांकित बँका, कंपन्यांचे नाव वापरून फोन केले जातात. त्यामुळे लोकदेखील अशा कॉलवर थेट विश्वास ठेवत आहेत. परंतु अशानेच फसवणूक होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चांदणी चौक येथे राहणाऱ्या अच्युत गोखले (६९) यांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. त्यांच्या एटीएमचा तपशील घेऊन साडेआठ हजारांना गंडा घातला आहे. गोखले यांच्या एटीएमची माहिती वापरून परस्पर खरेदी करण्यात आली आहे. तुम्हाला नवीन एटीएम कार्ड देण्यात येणार असून, त्यासाठी जुन्या कार्डचे तपशील द्या, असे फसवणूक करणाऱ्यांनी गोखले यांना सांगितले होते. सांगवी येथील प्रतिभा गावडे (२४) यांना साठ हजार रुपयांना गंडा घातला आहे. आम्ही सरकारी बँकेतून बोलत आहोत. तुमचे कार्ड ब्लॉक झाले असून, नवीन कार्ड देण्यासाठी जुन्या कार्डचे डिटेल्स द्या, असे सांगून गावडे यांची फसवणूक करण्यात आली होती. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे असून, अशा प्रकारे अनेक घटना घडत आहेत. कोणतीच बँक ग्राहकाला एटीएम कार्डचे तपशील मागत नाही, तसेच अकाउंट सुरू करताना बँकेत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर 'व्हेरिफिकेशन कॉल' तसेच एसएमएस येत असतो. त्यामुळे शक्यतो खात्री करूनच आपली माहिती देणे उचित होईल. एटीएमचा पासवर्ड बदलण्यासाठी योग्य ती प्रक्रिया प्रत्येक बँकेने निश्चित केलेली आहे. एटीएम कार्ड मिळाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या माहितीपुस्तकात याबाबत सविस्तर माहिती दिलेली असते. ती वाचल्यास फसवणूक टळू शकते. एखाद्या स्कीमबाबत खात्री करून घ्यायची झाल्यास बँकांच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क करून फसवणूक टाळता येऊ शकते.

सायबर क्राइमची टीम दिल्लीत दिल्लीस्थित कॉलसेंटरमधून या प्रकारचे फोन येऊ लागल्याने सायबर क्राइमची एक तुकडी महिन्यातून किमान दोन-तीन वेळा अशा कॉलसेंटरवर छापे टाकत आहे. काही वेळेस कॉल सेंटर बोगस असल्याचेही समजत असून, सायबर क्राइमचे प्रमुख वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार, सहाय्यक निरीक्षक संजय ठेंगे व फौजदार प्रवीण स्वामी यांनी अनेक मोठे गुन्हे उघड केले आहेत. सायबर क्राइम शाखेकडून अशा प्रकारे फसवणूक न होण्यासाठी नागरिकांमध्ये जागृतीही करत आहे. मात्र, नागरिक आमिषाला बळी पडत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images