Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साडेतीन लाखांची रोकड लांबवली

$
0
0

पुणे : कोथरूडच्या मयूर कॉलनीतील प्रभा अपार्टमेंन्टमध्ये घरफोडी करून साडेतीन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वसंत महादेव ठकार (वय ७८, मयूर कॉलनी, प्रभा अपार्टमेंट, अलंकार बंगला) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर कॉलनी येथील प्रभा अपार्टमेंट येथे ठकार यांचा अलंकार नावाचा बंगला आहे. त्यांचे भूगाव येथे फार्महाऊस आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता ते कुटुंबीयासोबत फार्महाऊसवर गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ठकार यांची सामाजिक संस्था आहे. या संस्थेत सोमवारी कार्यक्रम आहे. त्यासाठी बँकेतून साडेतीन लाख रुपये ठकार यांनी काढले होते. ते एका बॅगेत ठेवून ती बॅग घरात ठेवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डॉक्टरांनो, ‘कट प्रॅक्टिस’ थांबवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'वैद्यकीय सेवा ही ईश्वरी सेवा मानली जाते. पेशंटच्या दृष्टीने डॉक्टर देव असतो. वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकता आणि 'कट प्रॅक्टिस'चा शिरकाव झाल्याने वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे. पेशंटकडे संवेदनशील वृत्तीने पाहून डॉक्टरांनी 'कट प्रॅक्टिस' थांबविली पाहिजे. डॉक्टर-पेशंटमधील सलोखा वाढला पाहिजे,' असे मत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश एम. बी. शहा यांनी केले.

कोअर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लीगल मेडिसीन (सीआयआयएलएम) आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने (आयएमए) 'डॉक्टर-पेशंट सिनर्जी' यावरील न्यायवैद्यक परिषदेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या माजी सदस्या राजलक्ष्मी राव, राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भंगाळे, चंडीगड येथील मेडिको लीगल अॅक्शन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. नीरज नागपाल, सीआयआयएलएमचे संस्थापक डॉ. संतोष काकडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भूतकर, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. संजय गुप्ते आदी उपस्थित होते.

'दैनंदिन जीवनात आपण सर्व ग्राहक आहोत. डॉक्टरांनी पेशंटवर उपचार करताना त्याचे भान ठेवले पाहिजे. अनेकदा मोठ्या दवाखान्यात पैशांची अडवणूक करीत पेशंटकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी पेशंटचा जीव जातो. अपघातग्रस्तांना उपचार देण्याचे टाळून त्याकडे डॉक्टर दुर्लक्ष करतात. अशा अनेक तक्रारी आयोगाकडे येतात. वैद्यकीय सेवा घेणाऱ्यांच्या तुलनेत हलगर्जीपणाच्या तक्रारींची संख्या कमी आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी आयएमए, एमसीआय या संस्थांनी पुढाकार घ्यावा,' असे आवाहन माजी न्यायाधीश एम. बी. शहा यांनी केले.

'डॉक्टरांच्या विरोधात आयोगाकडे येणारे पैशासाठी येत नाहीत. न्याय मिळण्याची अपेक्षा असते. पेशंटशी कसे बोलावे, तसेच प्रिस्क्रिप्शन स्पष्ट लिहिण्याबाबत डॉक्टरांनी कौशल्य अवगत करायला हवे,' असे राजलक्ष्मी राव म्हणाल्या. 'वैद्यकीय क्षेत्र पैसा कमविण्याचे माध्यम बनल्याने पेशंटची लूट होते. त्यातून संताप निर्माण होऊन हिंसाचाराच्या घटना घडतात,' असे अशोक भंगाळे यांनी सांगितले. डॉ. संतोष काकडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतिभा काने यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनपीएस’ योजनेला चांगला प्रतिसाद

$
0
0

पुणे : राष्ट्रीयकृत बँका 'नॅशनल पेन्शन स्कीम' बंद झाल्याचा दावा करत असल्या तरी प्रत्यक्षात ही योजना व्यवस्थित सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीने, तसेच काही गुंतवणूक सल्लागार किंवा कंपन्यांमार्फत हे खाते उघडता येत आहे. ग्राहकांचाही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीज लिमिटेडच्या (एनएसडीएल) वेबसाइटवरून सहजसोप्या प्रकियेद्वारे हे खाते उघडता येते. तर स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनसारख्या सरकारी, तसेच अन्य काही गुंतवणूक सेवा-सल्लागारांमार्फतही हे खाते उघडता येते. 'नॅशनल पेन्शन स्कीम'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एनएसडीएल व १७ बँकांमध्ये करार झाला आहे. जर तुमचे खाते या १७ पैकी कोणत्याही बँकेत असेल, तसेच त्याला पॅनकार्ड जोडण्यात आले असेल, तर तुम्ही 'एनपीएस खाते' उघडण्यासाठी enps.nsdl.com या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अॅप्लिकेशन केल्यानंतर संबंधित बँक तुमच्या कागदपत्रांची पाहणी करते. जर, त्यातील माहिती समाधानकारक असेल, तर तुमचा अर्ज पुढे पाठवला जातो.

गेल्या काही दिवसांत या योजनेसाठीची मागणी वाढली आहे. डिसेंबर ते मार्च या काळात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट खाती उघडली गेली आहेत,' असे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनच्या पुणे शाखेतील वरिष्ठ अधिकारी मनोज कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्तीमुळे कोंडीत भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठी कोंडी होत आहे. अवजड वाहने आणि लेन कटिंगमुळे या कोंडीत भर पडत आहे. दरड कोसळणे अथवा अपघातानंतर कोंडी होताना नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांमुळे अन्य वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. द्रुतगती मार्गावरील तीन लेनपैकी तिसऱ्या लेनमधून अवजड वाहनांनी जाणे अपेक्षित आहे. परंतु, एकूण द्रुतगती मार्गावर सर्रास तिन्ही लेनमधून अवजड वाहने नेली जातात. अनेकदा घाटात अवजड वाहने नादुरुस्त झाल्याने अथवा एखादे वाहन उलटल्याने पूर्ण मार्गच ठप्प होतो. मुंबई व पुणे या प्रमुख शहरांना यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाने जोडले आहे. परंतु, महामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. प्रामुख्याने लोणावळा घाट परिसरात ही वाहने चुकीच्या पद्धतीने तिन्ही लेनवरून जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणारी अवजड वाहने बऱ्याचदा नादुरुस्त होतात. ही वाहने बंद पडलेल्या अवस्थेत लेन क्रमांक १ व २ वर उभी असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली कोंडी फोडण्यासाठी विरूद्ध दिशेने वाहने सोडावी लागली होती, तर दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने बऱ्याच ठिकाणी लोखंडी पिंप व बॅरिकेटिंग करून रस्ता अडविलेला आहे. पावसाळ्यात वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार तसेच वाहतूक मंदावली जाते. त्यामुळे येत्या काही दिवसातच येथील पेंडिंग कामे आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे आवश्यक आहे. ओव्हर लोडमुळे या वाहनांचा वेग कमी असतो. त्यामुळे त्यांच्या मागे असलेल्या इतर वाहनांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या अवजड वाहनांमुळे द्रुतगती मार्गाचे रूपांतर सामान्य रस्त्यात झाले आहे. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी याबाबत पुणे आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनादेखील याबाबत निवेदन दिले आहे. इतर वाहनचालकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी यापूर्वी ठरवून दिल्याप्रमाणे द्रुतगती मार्गावरील ३ क्रमांकाच्या लेनवरूनच अवजड वाहनांना वाहतुकीस परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामंडळाच्या लाभार्थ्यांना धनादेश

$
0
0

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम यांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे रखडलेल्या कर्ज प्रकरणातील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यास अखेर मुहूर्त लागला आहे. रविवारी, जिल्ह्यातील ७६ लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. तर, प्रादेशिक कार्यालयामार्फतही ३१ मार्च पूर्वी धनादेश देण्याची कार्यवाही केली जात आहे.

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना हे धनादेश देण्यात आले. ७६ लाभार्थ्यांना एकूण ७० लाख रुपयाचे धनादेश दिले. त्यामध्ये अनुदान योजनेतील ४९ लाभार्थ्यांना चार लाख ९० हजार रुपये आणि बीज भांडवल योजनेतील २७ लाभार्थ्यांना ६५ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. या वेळी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक ह. वी. दळवी, जिल्हा व्यवस्थापक पांडुरंग गिऱ्हे, राहुल डंबाळे आदी उपस्थित होते.

बीज भांडवल योजनेमध्ये ४५ टक्के रक्कम महामंडळाकडून पाच टक्के रक्कम लाभार्थी आणि ५० टक्के रक्कम बँक देते. यामध्ये १० हजार रुपये सबसिडी दिली जाते. तर, महामंडळाच्या उर्वरीत रकमेवर चार टक्के दराने व्याज आकारले जाते. तर, अनुदान योजनेमध्ये महामंडळाकडून १० हजार रुपये सबसिडी दिली जाते. उर्वरित कर्ज बँकेकडून दिले जाते.

महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे महामंडळाचे कामकाज बंद पडण्याची वेळ आली होती. पण, सरकारने हे महामंडळ बंद पडू नये यासाठी काळजी घेतली. आता महामंडळाचे कामकाज सुरू झाले असून, भ्रष्टाचाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असे मत कांबळे यांनी या वेळी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईस्टर संडे’ सर्वत्र उत्साहात साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी प्रभू येशूने मरणावर विजय मिळविलेला दिवस म्हणजेच ईस्टर संडे. पिंपरी-चिंचवडमधील चर्चमध्ये भाविकांनी प्रार्थना करून रॅली काढून ईस्टर उत्साहात साजरा केला. कामगारनगर येथील दि युनायडेट चर्च ऑफ ख्राइस्टमध्ये पास्टर सुधीर पारकर यांनी 'येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान' विषयावर संदेश दिला. चर्च युथ ग्रुपने 'मरण जिंकिले येशू राजाने...', 'अद्‌भुत लाहो, प्रभू उठला, मज दिसला हो...', 'जा सांगा मम बंधूजना...', 'आलो जिंकुनी या मरणा...' अशी भक्तिगीते सादर केली. चर्चच्या महिला मंडळाने 'सर्व्हिस' केली. यात सुहासिनी चोपडे यांनी संदेश दिला. डॉ. सुहास जाधव, दीपक शिंदे, प्रतिभा साबळे, स्मिता शिंदे, सत्यप्रकाश तेलधुणे, विश्वास सायबण्णा, हेमंत ढिलपे उपस्थित होते.पिंपरीतील अवरलेडी कन्सोलर अप्लिकेटेड चर्चमध्ये फादर जोसेफ डिसोझा यांनी संदेश देऊन प्रार्थना केली. फादर रोलन, आयझॅक, नॉव्हेल उपस्थित होते. चिंचवडमधील सेंट झेवियर चर्चमध्ये फादर एस. लुइस, काळेवाडीतील सेंट अल्फान्सो चर्चमध्ये फादर फ्रान्सिस, निगडीतील इन्फंट जीझस चर्चमध्ये फादर नेल्सन मचाडो, निगडीतील सेंट अन्थोनी चर्च, काळेवाडीतील केडीसी चर्च ऑफ ख्राइस्टमध्ये पास्टर सुनील चोपडे, पिंपरी गावातील हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्चमध्ये रेव्हरंड येशूदास कालेकर आदींनी 'पुनरुत्थान'चे महत्त्व सांगणारा संदेश दिला. दापोडीतील विनियार्ड चर्चमध्ये फादर सिल्वे यांनी प्रार्थना केली. शहरातील विविध चर्चमधून ईस्टरच्या पूर्वसंध्येनिमित्त शनिवारी रात्री, तसेच रविवारी विशेष उपासनाविधीचे आयोजन केले होते. ईस्टर हा प्रभू येशूप्रती आपले प्रेम प्रकट करण्याचा खास दिवस असतो. गुडफ्रायडेच्या आधी चाळीस दिवस उपवास प्रार्थनेत घालवायचे असतात. प्रभू येशूने आपल्यासाठी दिलेली प्राणांची आहुती, आणि त्याला झालेला छळ हे आठवून या दिवसामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला होता. गुडफ्रायडेला हे उपवास संपतात. या ईस्टर संडेला ख्रिस्ती बांधवांनी अंड्यापासून पदार्थ बनवून आपल्या नातेवाईक मंडळींना भेट म्हणून दिली. चाळीस दिवसांच्या कठीण उपवासानंतर ईस्टर या दिवशी खाण्यापिण्याची मेजवानी ख्रिस्ती बांधवांच्या घरी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टी-२० वर्ल्ड कपमुळे सट्टेबाजार तेजीत

$
0
0

पुणे : भारतात सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये चुरशीचे सामने होऊ लागल्यानंतर पुण्यातील सट्टा बाजार तेजीत आला आहे. मंगळवार पेठ, येरवडा, पिंपरी-चिंचवड आणि मंडई परिसरातील सटोडियांकडे दररोज करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.

राज्यात मुंबई पाठोपाठ क्रिकेटवर सट्टा घेण्याचे सर्वाधिक प्रमाण हे पुण्यात आहे. 'आयपीएल' सुरू झाल्यापासून सटोडियांकडून मोठ्या प्रमाणात पुण्यात सट्टा घेण्यात येतो. पोलिसांकडून कारवाईचा फार्स जरी पूर्ण करण्यात येत असला तरी सटोडियांचा धंदा मात्र तेजीतच आहे. पिंपरी-चिंचवड आणि ढोले-पाटील रोडवरील सटोडियांकडून मोठ्या प्रमाणात सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती एका सटोडियाने 'मटा'ला नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

भारतीय टीमने आशिया कपमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ केला होता. वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी सट्टा बाजारात वर्ल्डकप जिंकण्याच्या टीममध्ये सर्वाधिक फेव्हरेट टीम ही भारताची होती. भारतीय टीमचा भाव दोन रुपये दहा पैसे होता. त्याचवेळेच पाकिस्तानवर २१ रुपयांचा भाव लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बटाटा, मिरची महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे आवक घटत चालल्याने फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याच्या दरात थोडीशी वाढ झाली असली, तरी बटाटा महागला आहे. त्याशिवाय फ्लॉवर, सिमला मिरची, हिरवी मिरची, मटार, पावटा, चिंचेच्या दरात वाढ झाली आहे. आवक वाढल्याने काकडी, वांगी, तोतापुरी कैरीच्या दरात घसरण झाली आहे. मार्केटयार्डात गेल्या आठवड्याप्रमाणेच आवक झाली आहे. उन्हाळ्यामुळे फळभाज्यांच्या आवकवर परिणाम होत आहे. त्यामुळे दर वाढत आहेत. मागणी आणि पुरवठा यांचे गणित जुळले, तर दरावर परिणाम होत नाही. राज्यासह परराज्यातून १६० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मध्य प्रदेशातून मटारची दोन ते तीन ट्रक, कर्नाटकातून तीन ट्रक कोबीची आवक झाली. कर्नाटक, मध्य प्रदेशातून हिरवी मिरचीची ७ ते ८ टेम्पोची आवक झाली. शेवग्याची आंध्रप्रदेश, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पोची आवक झाली. राजस्थानातून गाजरची ८ ते १० ट्रकची आवक झाली आहे. पुणे विभागाच्या स्थानिक भागातून सातारी आल्याची ५५० ते ६०० पोत्यांची आवक झाली. टोमॅटोची साडेसहा हजार पेटीची आवक झाली. फ्लॉवर, कोबीची अनुक्रमे १५ टेम्पो आणि १८ ते २० टेम्पो बाजारात आले. सिमला मिरचीची ८ टेम्पो, शेवग्याची ६ टेम्पो, स्थानिक मटारची दोन टेम्पोची आवक झाली. स्थानिक; तसेच परराज्यातूनही मटारची आवक कमी झाली आहे. तांबड्या भोपळ्याची ७ ते ८ टेम्पो, चिंचेची २०० पोतींची आवक झाली आहे. कांद्याची दोनशे ट्रक आवक झाली. बटाट्याची स्थानिक भागासह इंदूरहून ३० ट्रकची आवक झाली. बटाट्याची आवक कमी झाली आहे. मध्य प्रदेशाची लसणाची साडेतीन हजार गोणींची आवक झाली आहे. पालेभाज्यांना उन्हाचा फटका बसत असून त्यामुळे मेथी, कोथिंबिरीच्या दरात चांगली वाढ झाली आहे. कोथिंबीरची दीड लाख जुडीची आवक झाली आहे. शेपू, चाकवक, कांदापात, अंबाडी, मुळे राजगिरासारख्या भाज्यांचे दर शेकड्यामागे ४०० ते ५०० रुपयांपर्यंत झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्लीतील तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फेसबूकवर ओळख झालेल्या दिल्लीस्थित मॉडेल तरुणीस बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तिच्यावर पुण्यात बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शरिरसंबंधाला नकार दिल्याने तिला सिगारेटचे चटके देण्यात आले. दरम्यान, आपला जीव वाचवत दिल्लीत पोहोचलेल्या या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुणे पोलिसांकडे पाठवला आहे.

या तरुणीची चंदननगर-खराडी परिसरातील एका तरुणाशी फेसबुकवरून ओळख झाली होती. त्या तरुणाने तिला 'लो बजेट' सिनेमात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. चित्रपटाच्या ऑ​डिशनसाठी तिला १० मार्च रोजी पुण्यात बोलावण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या तरुणीला ​त्याने एका व्यक्तीला भेटवले. ती व्यक्ती या तरुणाचा बॉस असल्याचे सांगण्यात आले. चित्रपटात काम हवे असल्यास शरीरसंबंधाची तिच्याकडे मागणी करण्यात आली. या प्रकाराला विरोध केल्यानंतर त्या तरुणीला आरोपींनी सिगारेटचे चटके दिल्याचे तिने दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकारानंतर तरुणीने तेथून पळ काढत दिल्ली गाठली. दिल्लीत तिला उपचार घेण्यासाठी दक्षिण दिल्लीमधील बत्रा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटल प्रशासनाने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्यानंतर तिचा जबाब नोंदवून कोटला मुबारकपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांचे एक पथक पुण्यात येण्यासाठी निघाले असून ते सोमवारी पुणे पोलिसांची भेट घेणार आहे.

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती आम्हालाही माध्यमातून समजली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून या घटनेचा तपास सुरू केला आहे, असे गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दडपशाहीविरोधात विद्यार्थ्यांचा मंच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फर्ग्युसन कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात विद्यार्थ्यांचा संयुक्त मंच स्थापन करण्यात आला आहे. फर्ग्युसन कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग (रानडे इन्स्टिट्यूट) आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत सुरू केलेल्या या मंचाच्या माध्यमातून शहरात कन्हैया कुमारचा कार्यक्रम घेण्याचा निर्धार रविवारी व्यक्त करण्यात आला.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये आलोक सिंह याच्या कार्यक्रमाच्या आयोजनावरून झालेल्या गोंधळानंतर कॉलेजसोबतच, रानडे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना धमक्या दिल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. कन्हैया कुमारला पुण्यात बोलविण्याविषयी झालेल्या वादातून रानडे इन्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना धमक्या दिल्याप्रकरणी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिस तक्रारही दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा मंच स्थापन केल्याची घोषणा रविवारी केली. तसेच, या पुढील काळात विद्यार्थ्यांच्या पातळीवरील राजकीय दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकशाही मार्गाने आणि राज्यघटनेचा मान ठेवत व्यापक प्रयत्न करणार असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. हर्षल लोहकरे, भूषण राऊत, कल्याणी माणगावे आदी विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

कन्हैयाला पुण्यात कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याविषयी सध्या प्राथमिक पातळीवरील बोलणी पूर्ण झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी विचारात घेता, शक्यतो २५ एप्रिलनंतर कन्हैयाला पुण्यात बोलविण्यात येईल. मंचाने कन्हैयाला निमंत्रण देण्यापूर्वीपासूनच जेएनयूमधील ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ) या संघटनेच्या पातळीवरून त्याला चर्चेसाठी महाराष्ट्रात पाठविण्याविषयी प्रयत्न सुरू झाले होते. त्यामुळे फेडरेशनने २५ एप्रिलपूर्वी त्याला राज्यात पाठविल्यास, फेडरेशनच्या नियोजनाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

...म्हणून मंचाची स्थापना

राज्यघटनेचा आदर राखून विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली आहे. मंचाच्या माध्यमातून बहुसांस्कृतिकतेला पाठिंबा दिला जाणार असून, विद्यार्थ्यांच्या पातळीवर भेडसावणारे विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठीही मंच काम करणार आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये आयोजित निदर्शनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांवर झालेल्या दडपशाहीचाही मंचाने निषेध केला.

परवानगी मिळाल्यास कन्हैया विद्यापीठात

युक्रांदचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी कन्हैयाला पुण्यात बोलविण्याविषयी जाहीर केलेल्या भूमिकाचे मंचाने स्वागत केले. तसेच, मंचाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांची भेट घेऊन, त्यांना मंचाची भूमिका सांगणार आहे. विद्यापीठामध्ये कन्हैयाच्या कार्यक्रमासाठी परवानगी मिळाल्यास मंचाचा कार्यक्रम विद्यापीठामध्ये घेण्यासाठीही मंच प्रयत्नशील असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. अन्यथा विद्यापीठाबाहेर हा कार्यक्रम होईल. त्याचा तपशील लवकरच जाहीर करू, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

‍व्यवस्थापनाचाही दोष

फर्ग्युसनमध्ये झालेल्या प्रकाराबाबत केवळ प्राचार्यांना दोष देणे चुकीचे असल्याचे मतही या वेळी विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आले. कॉलेजच्या कँपसमध्ये कोणत्याही विशिष्ट विचारांना प्रोत्साहन देण्यापेक्षा सर्व प्रकारच्या विचारांसाठी खुले वातावरण ठेवायला हवे. फर्ग्युसनमध्ये केवळ एकाच विचाराला प्रोत्साहन दिले जाते. ही चुकीची बाब असून, त्याला प्राचार्यांइतकेच संस्थेचे व्यवस्थापनही जबाबदार असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरचे पाणीही आता महागले

$
0
0

Chaitanya.Machale @timesgroup.com

पुणे : धरणातील पाणीसाठी घटल्याने दिवसाआड पाणी मिळणाऱ्या पुणेकरांना यापुढील काळात टँकरच्या पाण्यासाठीही जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नागरिकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याने पुढील तीन दिवसानंतर नागरिकांना पालिकेकडून पाण्याचा टँकर घेताना २५० रुपये जादा मोजावे लागणार आहे.

येत्या शुक्रवारपासून (१ एप्रिल) या नवीन दराची अंमलबजावणी केली जाणार आहे. शहराच्या ज्या भागात कमी दाबाने आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात नाही, अशा भागात महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. अशा भागासाठी पालिका कोणतेही शुल्क न घेता पाणीपुरवठा करते. मात्र ज्या भागात पुरेसा पाणीपुरवठा होतो, अशा भागातून टँकरची मागणी झाल्यास पालिकेच्या वतीने प्रती टँकर ५५० रुपये दर आकारला जातो. महापालिकेच्या मालकीच्या टँकरबरोबरच शहरात अनेक खासगी टँकरचालक आणि व्यावसायिक नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करतात. हे टँकर भरण्यासाठी महापालिकेने दर निश्चित केलेले आहेत. दहा हजार लिटरपर्यंतचा टँकर भरण्यासाठी ४०० रुपये, दहा ते पंधरा हजार लिटरच्या टँकरसाठी ५५०, तर पंधरा हजार लिटरच्या पुढील टँकर भरण्यासाठी पालिका ७५० रुपये हा दर टँकरचालकांकडून घेते. पालिकेकडून या दराने टँकर भरून घेऊन त्यामध्ये काही प्रमाणात वाढ करून ठेकेदार नागरिकांच्या मागणीनुसार या टँकरद्वारे शहरातील वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा करतात. यासाठी सर्वसाधारण ८०० ते १२०० रुपये प्रति टँकर असा दर घेतला जातो. पाण्याचे टँकर भरण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्कात गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कोणतीही वाढ केलेली नाही.

तत्कालीन महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्या काळात टँकरच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झालेला नव्हता. टँकरच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर आला असता, त्याला मंजुरी देण्यात आल्याचे समजते. आयुक्तांच्या अधिकारात अशा पद्धतीने दरवाढ करण्याची तरतूद असल्याने पालिका प्रशासनाने ही दरवाढ करण्यास मान्यता दिल्याने खात्रीलायक सूत्रांनी 'मटा' शी बोलताना स्पष्ट केले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा ‌दिला. येत्या एक एप्रिलपासून या नवीन दरांची अंमलबजावणी केली जाणार असून, पुढील दोन दिवसांत शहरातील सर्व टँकरचालकांची बैठक घेऊन याबाबत अंतीम शिक्कामोर्तब होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेमार्गावर सशस्त्र पोलिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वेमार्गावर जबरी चोरी, दरोडा, लुटमार होत असलेली ७० ठिकाणे लोहमार्ग पोलिसांनी शोधली आहेत. त्यापैकी ४८ ठिकाणी बंदूकधारी पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यामुळे रेल्वे मार्गावरील गुन्हे रोखण्यास मदत झाली आहे, अशी माहिती पुणे लोहमार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली.

रेल्वेत जबरी चोरी, दरोडा, लुटमारीच्या घटना घडत असल्यामुळे रेल्वेमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू करण्यात आले होते. पेट्रोलिंग सुरू असताना रेल्वे पोलिस नसतील ते डबे चोरट्यांकडून लक्ष केले जात होते. रेल्वेतील पेट्रोलिंग परिणामकारण होत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पेट्रोलिंग बंद करून चोरीच्या ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी रेल्वे मार्गावर चोरीच्या दृष्टीने संवेदनशील अशी ७० ठिकाणे पोलिसांना आढळून आली. पहिल्या टप्प्यात त्यापैकी २७ ठिकाणी बंदुकधारी पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू वाढ करत आता ४८ ठिकाणी रेल्वे पोलिस तैनात असतात. रेल्वेला बाहेरून दिली जाणारी सुरक्षा अधिक परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जून २०१४पासून दरोड्याचा प्रकार घडलेला नाही. छोट्या-मोठ्या लुटमारीच्या घटना घडतात. या प्रकरणी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. लोहमार्ग पोलिसांकडून खिडक्या बंद करण्याबाबतच्या सूचनांचे प्रवाशांनी पालन करावे, असे आवाहन पानसरे यांनी केले. तसेच, आउटरला रेल्वे थांबवू नये, याबाबतचे पत्र रेल्वे प्रशासनाला दिले आहे. मात्र, त्यांच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्यात ४२ ठिकाणे

सोलापूर जिल्ह्यात रेल्वेतील प्रवाशांना लुटमार केल्याच्या घटना घडू लागल्यामुळे त्या ठिकाणचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार या जिल्ह्यात चोरीच्या दृष्टीने संवेदनशील अशी ४२ ठिकाणे शोधण्यात आली आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत, असे पानसरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाच्या जागेत तांत्रिक अडचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या प्रस्तावित जागेतील काही अडचणींमुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने त्यासंबंधीचा अहवाल अद्याप राज्य सरकारला पाठविला नाही. या तांत्रिकबाबींची पूर्तता करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पुन्हा एकदा जागेची पाहणी केली. हा विमानतळ प्रस्तावित जागेतून पश्चिमेच्या दिशेने हलविता येईल का, यादृष्टीने ही पाहणी झाल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले.

पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी आतापर्यंत चार ते पाच जागांचे पर्याय निवडण्यात आले. त्यातील चाकणसह खेडच्या 'सेझ'च्या जमिनीचीही पाहणी झाली. परंतु चाकणसह सेझच्या जागेवर विमानतळ करण्यास स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी मोठा विरोध केला. या विरोधामुळे विमानतळाची जागाच बदलण्याच्या विचाराप्रत प्रशासन आले होते. त्यादृष्टीने जेजुरी, तसेच चौफुला व शिक्रापूर येथील जागांची पाहणी करण्यात आली.

या जागांचा पर्याय विमानतळासाठी असताना भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोय-पाईट-केंदूर-पाबळ येथील जमिनीलाच विमानतळासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी सलग किमान तीन हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे. तसेच धावपट्टीसाठी सहा किलोमीटर लांब व दोन किमी रुंद सलग जमीन असणे गरजेचे आहे. लोहगाव विमानतळाचा रन-वे हा पूर्व-पश्चिम असल्याने नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रन-वेही त्याच दिशेने करावा लागणार आहे. विमानतळाची प्रस्तावित जागा त्यासाठी सुयोग्य असल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे मत झाले आहे. त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यासंबंधीचा तांत्रिक अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले.

मात्र, विमानतळाच्या या जमिनीमध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रस्तावित जागेतून हा विमानतळ पश्चिमेच्या दिशेस हलवावा लागणार असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या तांत्रिक पथकाचे मत आहे. त्यादृष्टीने मागील आठवड्यात या पथकाने पुन्हा एकदा जागेची पाहणी केली. तसेच विमानतळासाठी यापूर्वी निवडलेल्या जागांचीही पाहणी पथकाने केली. हे लोकेशन स्पष्ट झाल्यानंतर विमानतळाचा तांत्रिक अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल राज्य सरकारला पाठविला जाणार असून सरकारने हिरवा कंदील दाखविल्यावरच विमानतळाच्या कामाचे टेकऑफ होऊ शकणार आहे, असेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदोबस्ताचे ठिकाण सोडणारे तिघे निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रेल्वे सुरक्षितेसाठी नेमूण दिलेले ठिकाण वेळेआधीच सोडणाऱ्या तीन लोहमार्ग पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती लोहमार्ग अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, याठिकाणी गैरहजर असलेले रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) तीन कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. या ठिकाणीच हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या माय-लेकींना चोरट्यांनी लुटले होते.

व्ही. बी. लंकेश, एस. आर. पाटोळे, ए. जी. काळे अशी निलंबित केलेल्या लोहमार्ग पोलिसांची नावे आहेत. तर, आरपीएफचे रामवीर रावत, राम अवतार, मोहित सिंग यांनाही या प्रकरणी निलंबित केले आहे. दौंडजवळील आउट येथे एक मार्च रोजी सायंकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान या या पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. पण, त्यांनी वेळेच्या आगोदरच ठिकाण सोडले. त्यानंतर काही वेळातच या ठिकाणी चोरट्यांनी माय-लेकीच्या हातावर वार करीत पर्स हिसकावून नेली होती. पोलिस कर्मचारी या ठिकाणी असते तर ही घटना टळली असली. त्यामुळे पानसरे यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपअधीक्षक खैरे यांच्यामार्फत घटनेची चौकशी करण्यात आली. त्यावेळी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ वेळेच्या आगोदरच सोडल्याचे चौकशीत आढळून आले. त्यांनी चौकशीचा अहवाल अधीक्षकांना सादर केला. या प्रकरणी त्यांनी तिघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांची खात्याअंर्तगत चौकशी सुरू आहे, असे पानसरे यांनी सांगितले.

दुसऱ्या आरोपीला अटक

हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या माय-लेकींवर दौंडजवळ वार करून लुटणाऱ्या दुसऱ्या आरोपीला दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात अद्याप दोन आरोपी फरार आहेत, अशी माहिती लोहमार्ग पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली.

मंज्या उर्फ मजुम उर्फ मनश्या राजू काळे (वय २३, रा. भगतवाडी, ता. करमाळा, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यापूर्वी त्याचा साथीदार योगेश शप्या भोसले (वय २२, रा. वेताळनगर, लिंबाळी ता. दौंड) याला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. नगरहून दौंडकडे येत असलेली हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस मालू स्लीपर कंपनीजवळ सिग्नल नसल्याने एक मार्च रोजी पहाटे सव्वापाचच्या सुमारास आउटरला थांबली होती. या वेळी चोरट्यांनी संपा तापस सिन्हा (वय ५४, रा. मालवीयनगर, छत्तीसगढ) यांच्या उशाशी ठेवलेली पर्स चोरली. मात्र, संपा व त्यांची मुलगी समीक्षा तापस सिन्हा (वय २५) यांना चोरट्यांना प्रतिकार केला. त्यामुळे चोरट्यांनी दोघींच्या हातावर धारदार शस्त्रांनी वार केले होते. यामध्ये दोघी माय-लेकी जखमी झाल्या होत्या. गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीची माहिती पोलिस कर्मचारी धनंजय वीर यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अरुण मोरे व दौंडचे सहायक पोलिस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकाने भिगवण येथून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मोबाइल जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यासह राज्यभरात तापमानात किंचित घट

$
0
0

पुण्यासह राज्यभरात तापमानात किंचित घट

म. टा. प्रतिनिधी, पुणे
असह्य उकाड्यानंतर शहराबरोबरच राज्यातही अनेक ठिकाणी सोमवारी तापमानात किंचित घट झाली. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवत नसल्या, तरी हवेतील उकाडा कायम होता. पुढील दोन दिवसांत राज्यात असेच हवामान राहून त्यानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे (४१.६ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. पुण्यात ३७.६ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. चंद्रपूर येथे ४१.३, सोलापूर येथे ३९.७, जळगाव येथे ३९ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान औरंगाबाद येथे (१५.४ अंश सेल्सिअस) नोंदले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सुरेश जैन यांना कोर्टात हजर करा’

$
0
0

'सुरेश जैन यांना कोर्टात हजर करा'

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी केल्याच्या खटल्यात माजी मंत्री सुरेश जैन यांच्यावर आरोप निश्चिती करण्यासाठी त्यांना कोर्टात हजर करण्यात यावे, असा अर्ज हजारे यांच्या वकिलांनी कोर्टात दाखल केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांच्या कोर्टात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर चार एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
अण्णा हजारे यांची बदनामी केल्याचा पुरेसा पुरावा उपलब्ध असल्यामुळे जैन यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात यावेत, असा आदेश नुकताच कोर्टाने दिला. जैन यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यासाठी त्यांना कोर्टात हजर करणे आवश्यक आहे. सुरेश जैन यांना कोर्टात हजर करण्यात यावे, त्यासाठी प्रॉडक्शन वॉरंट बजावण्यात यावे, असा अर्ज हजारे यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी कोर्टात दाखल केला आहे. आरोपीच्या उपस्थितीत कोर्टात त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र ठेवण्यात येते. त्यामुळे जैन यांना कोर्टात हजर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असल्याचे अॅड. पवार यांनी सांगितले.
सुरेश जैन यांनी नऊ मे २००३ रोजी पत्रकार परिषद घेऊन हजारे यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणी हजारे यांनी कोर्टात बदनामीचा फौजदारी दावा दाखल केला होता. हजारे यांच्यातर्फे अॅड. हर्षद निंबाळकर आणि अॅड. पवार कामकाज पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुपी’च्या अध्यक्षपदी आता अरविंद खळदकर

$
0
0

'रुपी'च्या अध्यक्षपदी आता अरविंद खळदकर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अरविंद खळदकर यांची सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी नेमणूक केली आहे. मात्र, खळदकर यांच्यासह प्रशासकीय मंडळातील चार सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही बँक आणखी अडचणीत सापडली आहे.
बँकेच्या सभासदांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आदेशानुसार प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचा निर्णय हा कळीचा मुद्दा ठरला आहे. सभासदांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्यासाठी अभ्यंकर आग्रही होते. मात्र, हा निर्णय प्रशासकीय मंडळातील अन्य सदस्यांना मान्य नव्हता. त्यावरून विसंवाद निर्माण झाला. त्यानंतर अभ्यंकर यांनी प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सहकार आयुक्त दळवी यांनी खळदकर यांची या पदावर नेमणूक केली आहे. मात्र, खळदकर यांच्यासह सुधीर पंडित, विजय भावे, एस. एन. जोशी यांनीही सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
'अभ्यंकर यांनी राजीनामा दिल्यामुळे खळदकर यांची या पदावर नेमणुकीचे आदेश दिले आहेत,' असे सहकार आयुक्त दळवी म्हणाले. 'दळवी यांनी नेमणूक केली असली, तरी त्यापूर्वीच प्रशासकीय मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. सभासदांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्यासाठी अभ्यंकर यांनी 'आरबीआय'कडून मान्यता मिळवून आणली. हा निर्णय अन्य सदस्यांना मान्य नव्हता. या निर्णयामुळे बँकेचे अन्य बँकेत विलिनीकरण होणार नाही. त्यामुळे सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे,' असे खळदकर यांनी स्पष्ट केले.
'मी १८ मार्च रोजी बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ठेवीदारांबाबत राज्य शासन काय भूमिका घेते, हे एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. त्यानंतरच मी माझी भूमिका मांडणार आहे,' असे अभ्यंकर म्हणाले.
................
दोन एप्रिलला आंदोलन
पुणेकर नागरिक कृती समितीचे अध्यक्ष मिहिर थत्ते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भवानी पेठेतील लक्ष्मी सभागृहात सभासदांचा मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये सभासदांना २० हजार रुपये मिळण्यासाठी दोन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता बाजीराव रस्त्यावरील जनता सहकारी बँकेसमोर आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. या आंदोलनात खळदकर यांच्याकडे विचारणा केली जाणार असल्याचे थत्ते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैयाकुमारची पुण्यात सभा होणारच

$
0
0

कन्हैयाकुमारची पुण्यात सभा होणारच

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजप युवा मोर्चा यांनी विरोध केला असला, तरी कन्हैयाकुमारची पुण्यात सभा होणारच, असे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (एआयएसएफ) सोमवारी जाहीर केले. पुण्याबरोबरच मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नागपूर आणि अमरावती या भागातही पुरोगामी शक्तींना बरोबर घेऊन सभा घेतल्या जाणार असल्याचे सांगून त्यांनी भाजपप्रणित संघटनांना आव्हान दिले. कन्हैयाकुमार यांनीही सभेसाठी येण्यास होकार दिला आहे.
'एआयएसएफ' आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या वेळी 'एआयवायएफ'चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे, प्रसाद घागरे, 'एआयएसएफ'चे राज्याध्यक्ष पंकज चव्हाण, माजी राष्ट्रीय महासचिव अभय टाकसाळ, माजी राज्य सरचिटणीस सुशील लाड, राकेश शुक्ला आदी उपस्थित होते.
'कन्हैयाकुमारवर खोटा आरोप करण्यात आला. मात्र, दिल्ली पोलिसांनी कन्हैयाकुमारविरूद्ध काहीही पुरावा नसल्याचे सांगितले. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज आणि रानडे इ​न्स्टिट्यूटमधील प्रकारांनंतर आता विचाराचा लढा द्यावा लागणार आहे. त्यासाठी पुण्यात एप्रिल महिन्यात कन्हैयाकुमार यांची सभा घेतली जाणार आहे. सभेचे ठिकाण लवकरच निश्चित करण्यात येणार आहे,' असे फोंडे यांनी सांगितले.
'पुण्यानंतर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नागपूर आणि अमरावती या ठिकाणीही​ सभा होणार आहेत. रोहित येमुलाच्या आईदेखील या सभांना उपस्थित राहणार आहेत,' असेही फोंडे म्हणाले.
पत्रकार परिषदेत कन्हैयाकुमार यांच्याशी फोंडे यांनी मोबाइलवरून संवाद साधला. तो संवाद उपस्थितांना ऐकविण्यात आला. कन्हैयाकुमार म्हणाले, 'न्यायासाठी, संघर्ष करण्यासाठी मी पुण्यात येणारच. धमक्या देण्याची भाजप युवा मोर्चा आणि अभाविपची जुनी सवय आहे. भाजप आणि हे सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. हे अन्याय करणारे लोक आहेत. त्यामुळे मी देशभर फिरून सत्य बाजू मांडणार.'
'प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र आहे. मात्र, या सरकारकडून दबाब आणण्यात येत आहे. अभाविप आणि भारतीय युवा मोर्चाकडून धमक्या येत आहेत. तरीही लोकशाही मार्गाने या सभा घेण्यात येतील,' असे चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटनांनी वातावरण तापवले

$
0
0

संघटनांनी वातावरण तापवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कन्हैय्या कुमारच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्यार्थी संघटनांसह शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत इतर संघटनांनीही वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात कन्हैय्याच्या पाठीशी उभी राहण्याची तयारी 'एनएसयूआय'ने सोमवारी दर्शविली. कन्हैय्याला पुण्यात येण्यास बंदी घालण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) केली.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्थापन झालेल्या विद्यार्थ्यांच्या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून कन्हैय्या कुमारला पुणे भेटीचे निमंत्रण देण्यात आले; तसेच कोणत्याही परिस्थितीत पुण्यात कन्हैय्याचा कार्यक्रम घेण्याचा निर्धारही मंचाने व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवर भाजयुमोने सोमवारी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका जाहीर केली. मंचाने या विषयी पुणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र देत, कन्हैय्या कुमारला पुण्यात येण्यास बंदी घालण्याची मागणी केली. संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, कन्हैय्यावर देशद्रोहाचा खटला सुरू आहे. तो जामिनावर बाहेर असताना, त्याला पुण्यात कार्यक्रमाला बोलावणे रास्त नाही. त्यामुळे शहरातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण दूषित होण्याची शक्यता असल्याने कन्हैय्याला पुण्यात येण्यास बंदी घालावी. तसे न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला. संघटनेने या विषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना पत्र देत, शहर तसेच जिल्ह्यातील कॉलेजांमधून कन्हैय्या कुमारच्या कार्यक्रमाला बंदी घालण्याची मागणीही केली.
कन्हैय्या कुमारवर असलेला देशद्रोहाचा आरोप अद्याप सिद्ध झाला नसल्याने, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) ही संघटना राज्यभरातील त्याच्या कार्यक्रमांसाठी कन्हैय्याच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश समितीच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले. कन्हैय्याकुमार लोकशाहीच्या हक्कांसाठी लढत असल्याने, संघटना त्याच्या दौऱ्यात अथवा कार्यक्रमात त्याला संरक्षण देऊन सहकार्य करेल.
................
प्रतिज्ञा वाचन आणि राष्ट्रगीत गायन
पुणे विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून विविध संघटनांनी एकत्र येत सोमवारी शनिवारवाड्याच्या परिसरात प्रतिज्ञा वाचन आणि सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. फर्ग्युसनमध्ये घडलेल्या प्रकरणाचा फायदा घेत उजव्या व डाव्या विचारसरणीचे पक्ष शैक्षणिक संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे शहरातील शैक्षणिक वातावरण बिघडत असल्याने, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने शहरातील कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊ नये, अशी मागणी चळवळीने केली आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा शैक्षणिक संस्थेला पाठीशी न घालता वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

फर्ग्युसनच्या प्राचार्यांवर कारवाईची मागणी
फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलिसांकडे चुकीची तक्रार दिल्याने शहरात कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने सोमवारी केला. या प्रकरणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे आणि जिल्हा प्रमुख विशाल म्हस्के यांनी डॉ. परदेशी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी शहर पोलिस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक बंदी उरली कागदावरच

$
0
0

सदस्यांच्या निर्णयाला प्रशासकीय आदेशाची प्रतीक्षा म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर शंभर टक्के बंदी आणण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला असला, तरी त्याची कार्यवाही मात्र अद्यापही झालेली नाही. त्यामुळे शहरात सगळीकडे अजूनही प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून येते. स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवडचा देशात नववा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेच्याबाबतीत नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्याच अनुषंगाने शहरात सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालावी, असा प्रस्ताव जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्याची कार्यवाही तातडीने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, दोन महिने उलटल्यानंतरही शहरातील परिस्थिती 'जैसे-थे' आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना बंदी केल्याचा नियमही तयार आहे. मात्र, ही बाबदेखील कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन किती दुकानदारांना नोटीसा दिल्या, किती जणांना दंड केला याबाबत प्रशासन गप्प आहे. तत्कालीन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांच्या काळात प्लास्टिक पिशव्यांवरील वापराबाबत कठोर कारवाई करण्यात येत होती. ती परिस्थिती कायम राहिलेली नाही, याकडे नगरसेविका सीमा सावळे यांनी सर्वसाधारण सभेचे लक्ष वेधले होते. त्याची दखल प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली दिसून येत नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी दीर्घ कालखंड लागतो. त्यामुळे अशा प्लास्टिकवर खऱ्या अर्थाने बंदी घालण्यासाठी पालिकेने कितीतरी ठराव केले आहेत. परंतु, अजूनही मार्केटमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर आढळतो. काही दुकानात किंवा मॉलमध्ये पिशवीचे स्वतंत्र पैसे घेतले जातात. त्याने नागरिकांना झळ पोहोचणार असेल, तर प्लास्टिकवर शंभर टक्के बंदी संयुक्तिक ठरणार आहे, अशी उपसूचना सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती. या सूचनेलाही केराची टोपली दाखविण्यात आली. पावसाळ्यामध्ये तर पिशव्या पाण्यावर तरंगताना दिसतात. त्या वेळी भयावह परिस्थितीची जाणीव होते. इंद्रायणी नदीचे पाणी अनेक भाविक श्रद्धेने तीर्थ म्हणून प्राशन करीत असतात. त्यामुळे किमान नदीचे पावित्र्य जतन करण्यासाठी तरी पालिकेने पावले उचलायला हवीत, असे मत पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images