Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रेडी रेकनरच्या दरात वाढ?

$
0
0

मराठवाडा, विदर्भात वाढ न करण्याचा प्रस्ताव
म. टा. प्रतिनिधी, पुणे
रियल इस्टेटमध्ये मंदीची परिस्थिती असल्याने राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी सात ते आठ टक्के वाढ सुचविण्यात आली असल्याचे समजते. गेल्या वर्षी १४ टक्के वाढ करण्यात आली होती. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात रेडी रेकनरच्या दरात वाढ सुचविण्यात आलेली नाही.
पुण्यासह, ठाणे, मुंबई आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये दरवाढ दहा टक्क्यांच्या आसपास ठेण्यात आली असल्याचे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून सांण्यात आले.
एक ​एप्रिल रोजी ही दरवाढ जाहीर करण्यात येणार येणार आहे. यापूर्वी दरवर्षी डिसेंबर महिन्यात रेडी रेकनरचे दर जाहीर करण्यात येत होते. रेडीरेकनरच्या दरात २००८ पासून आतापर्यंत दहा ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुद्राक शुल्कांचे उत्पन्न आठ हजार ३८५ कोटी रुपयांवरून सुमारे २० हजार कोटी रुपये झाले आहे. यावर्षी मंदीची परिस्थिती असल्यामुळे सरासरी सात ते आठ टक्केच दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. ही दरवाढ करताना गेल्या वर्षभरात झालेले खरेदी-विक्रीचे व्यावहार विचारात घेण्यात आले आहेत. पुणे, मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार अधिक झाले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील वाढ दहा टक्क्यांपर्यंत सुचविण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळग्रस्त स्थिती असल्याने रेडी रेकनरच्या दरात वाढ न करण्याचे ठरविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
..............
मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाला या वर्षासाठी २१ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत २० हजार ३७६ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. हे प्रमाण सुमारे ९७ टक्के आहे. रेडी रेकनरच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या दरवाढीला स्थगिती देण्यात आल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांचा महसूल कमी झाला आहे.
- डॉ. एन.रामास्वामी, नोंदणी महानिरीक्षक
..................................
दरवाढ न करण्याची मागणी
रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याची मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटस या संघटनेने केली आहे. संघटनेने याबाबतचे निवेदन राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे दिले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी, उपाध्यक्ष रवींद्र चौकसे, राजेंद्र दोशी, सचिन कात्रे, संजय ढोकळे आदी उपस्थित होते. रेडीरेकनरचे दर ठरविताना मागील वर्षात झालेल्या व्यवहारांची सत्यता पडताळून निर्णय घ्यावा; तसेच या क्षेत्रात काम करणारे वकील आणि रियल इस्टेट ब्रोकर यांच्याशी सल्लामसलत करण्याची मागणी असल्याचे शिंगवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशोधने हवीत समाजोपयोगी

$
0
0

अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
संशोधकांनी जमेल त्या किंवा फॅशनेबल विषयांवर संशोधन करण्यापेक्षा, आंतरविद्याशाखीय आणि समाजातील समस्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गरजांवर प्रभावी उपाय शोधून काढणारी संशोधने पुढे आणणे गरजेचे असल्याचे मत अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी पुण्यात व्यक्त केले. तंत्रज्ञानाचा वाढता विस्तार पाहता, तंत्रज्ञानाचे तोटे दूर सारून त्याचा प्रभावी वापर करणारी नवी पिढी निर्माण करू शकेल अशी शिक्षणपद्धती विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठाच्या आवारामध्ये १०९ व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर यांनी शिक्षणपद्धती आणि नव्या पिढीकडून असणाऱ्या अपेक्षांविषयी बोलताना हे मत मांडले. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांच्यासह विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे इतर सदस्य या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी डॉ. काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ३२४ उमेदवारांना पीएचडी पदवी देण्यात आली. ७६ हजार ७५३ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदव्या देण्यात आल्या. तसेच या वेळी विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाने यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना कॉलेज पातळीवरूनही पदव्या घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत यंदा या कार्यक्रमाची गर्दी घटल्याचेही दिसून आले.
डॉ. काकोडकर म्हणाले, 'संशोधन आणि विकास क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक असूनही, तंत्रज्ञानासाठी अद्यापही आपण इतर देशांवरच अवलंबून आहोत. ही परिस्थिती बदलण्यासाठी संशोधनावरील गुंतवणूक वाढविण्यासोबतच त्या आधारे समोर येणाऱ्या उत्पादनांबाबत, त्यांच्या गुणवत्तेबाबत अधिक पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये मोठे बदल होण्याची गरज आहे. उच्चशिक्षित मनुष्यबळ हे देशावरील ओझे न बनता, देशाच्या प्रगतीचे वाहन म्हणून समोर यावे अशा पद्धतीच्या शिक्षणव्यवस्थेची देशाचा गरज आहे. शिक्षणव्यवस्थेने भविष्यातील आव्हाने पेलू शकेल अशी पिढी तयार करायला हवी.' शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी करण्यासोबतच मोठ्या संख्येने असणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना त्यांना उपलब्ध संधींची जाणीवही करून द्यायला हवी. त्यामुळे देशाच्या विकासाला त्यामुळे निश्चितच गती मिळेल. त्यासाठी खेड्यांना शहरांसारखे अस्तित्व देणारी 'सिलेज' विकसित करणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा प्रचार, प्रसार आणि पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुधारणा शक्य असल्याचा विश्वासही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. गाडे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेताना गेल्या काही काळातील महत्त्वाच्या घटना आणि विद्यापीठाच्या प्रगतीचा चढता आलेख उपस्थितांसमोर मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्विमिंग पूल सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा महापालिकेचे आणि खासगी संस्थांचे स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिलेले असूनही येरवड्यातील विभागीय क्रीडा संकुल आणि विश्रांतवाडी येथील सदाशिव देवकर स्विमिंग पूल खुलेआम सुरू असल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. तलाव सुरू ठेवल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे बजाविण्यात आले असूनही आयुक्तांचा आदेश पायदळी तुडवला जात आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील घटता पाणीसाठा लक्षात घेऊन शहरातील महापालिकेच्या मालकीचे आणि खासगी सर्व स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने सोमवारी दिले आहेत. पुढील दोन महिन्यांत पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने ही पावले उचलली आहेत. तसे आदेशही सर्व स्विमिंग पूल चालकांना धाडण्यात आलेले आहेत. आदेश धुडकावून कोणी स्विमिंग पूल सुरू ठेवल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर येरवड्यातील विभागीय क्रीडा संकुलाच्या आवारातील आणि विश्रांतवाडीमधील सदाशिव गोविंद देवकर स्विमिंग पुलाची मंगळवारी 'मटा' प्रतिनिधीने पाहणी केली असता दैनंदिन वेळेप्रमाणे दोन्ही स्विमिंग पूल सुरू असल्याचे दिसून आले. उन्हाच्या झळा वाढल्याने स्विमिंग पूलमध्ये गर्दीही होती. अनेक जण दुपारी तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहून खिडकी उघडण्याची वाट पाहत बसले होते. विभागीय क्रीडा संकुलाच्या आवारातील स्विमिंग पूलमध्ये बोअर वेलच्या पाण्यासोबत पालिकेच्या पाण्याचादेखील वापर केला जातो. तसेच स्विमिंग पूलमध्ये उतरण्याआधी आणि बाहेर आल्यानंतर अंघोळीसाठी पिण्याचा पाण्याचा सर्रास वापर केला जात आहे. त्यासाठी इमारतीवर टाक्या उभारल्या आहेत, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. विश्रांतवाडी भागातील सदाशिव गोविंद देवकर स्विमिंग पूलदेखील नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले. या ठिकाणी स्विमिंग पूल खुले आहे का, अशी विचारणा केली असता उत्तरे देण्यास टाळाटाळ केली गेली. विभागीय आयुक्तांचे आदेश हवेत

येरवड्यातील विभागीय क्रीडा संकुलामधील स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दोन दिवसांपूर्वीच सबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तरीही बिनधास्तपणे स्विमिंग पूल चालविले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



'पालिका आयुक्तांचे आदेश मोडून जर कोणी स्विमिंग पूल सुरू ठेवले असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तत्पूर्वी येरवडा आणि विश्रांतवाडीतील स्विमिंग पूल कोणाच्या अखत्यारीत आहेत, हे तपासून कारवाई करू. या विषयी येरवडा आणि नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाईल. - ज्ञानेश्वर मोळक, सहआयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लक्ष हटविण्यासाठीचस्वतंत्र मराठवाड्याचा मुद्दा’

$
0
0

'लक्ष हटविण्यासाठीच स्वतंत्र मराठवाड्याचा मुद्दा' म. टा. प्रतिनिधी, पुणे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र आज दुष्काळात होरपळत असताना शेतकरी आणि दुष्काळाच्या या संवेदनशील विषयांवरून इतरत्र लक्ष वळविण्यासाठीच स्वतंत्र विदर्भ-मराठवाड्यासारखे मुद्दे उकरून काढण्यात येत आहेत काय, अशी शंका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी व्यक्त केली आहे. 'विदर्भासह मराठवाडाही वेगळा केला पाहिजे,' असे मत राज्याचे महाधिवक्ता (अॅडव्होकेट जनरल) श्रीहरी अणे व्यक्त केल्यानंतर विधिमंडळात गदारोळ सुरू झाला आणि विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेही प्रचंड दबाव आणल्यानंतर अणे यांनी पदाचा राजीनामा दिला. गेले दोन दिवस राज्यात हाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला होता. त्यापूर्वीही गेल्या आठवड्यात 'भारत माता की जय,' म्हणण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत आहे. पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत. अशा काळात कोणत्या विषयांना किती प्राधान्य द्यायचे, यालाही काही मर्यादा आहेत. किंबहुना अशा संवेदनशील विषयांवरून इतरत्र लक्ष वळविण्यासाठीच असे भावनात्मक मुद्दे उकरून काढण्यात येत आहेत का, अशी शंका येते, असे शेट्टी म्हणाले. विधिमंडळाच्या सभागृहात आपणही काम केले आहे. जनतेचे प्रश्न मांडणे आणि आपला अनुभव-लोकसंपर्क या बळावर प्रशासनाकडून कामे करून घेणे, ही लोकप्रतिनिधी या नात्याने आपली जबाबदारी आहे. सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खासगी सावकारांचा उच्छाद, कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, पाणीटंचाई आणि बेकारी अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवर प्राधान्याने चर्चा अपेक्षित आहे, पण तसे घडत नाही, ही खेदाची बाब आहे, असे शेट्टी म्हणाले. ..........

'आधी राजीनामा द्या, मग मते मांडा' 'मुळात महाधिवक्तासारख्या पदांवरील नियुक्ती या राजकीय हेतूने प्रेरित असतात, त्यामुळेच श्रीहरी अणे यांच्यासारख्यांची अशी मते मांडण्याची हिंमत होते, अशी टीका शेट्टी यांनी केली. त्यांची मते ही सरकारची मते, असा समज होत असल्याने त्यांनी आधी राजीनामा देऊन मग वैयक्तिक मते मांडण्याची गरज होती, हे विरोधकांचेही मत चुकीचे नाही. आम्ही स्वतः छोट्या राज्यांच्या बाजूने असलो, तरीही ज्या पद्धतीने सध्याचा प्रकार सुरू आहे, तो चुकीचा आहे.' - खासदार राजू शेट्टी (संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख गॅसधारकांकडून ‘गिव्ह इट अप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनी घरगुती वापराच्या गॅसचे अनुदान स्वच्छेने परत करण्याच्या आवाहनाला पुणे शहर व जिल्ह्यातील दोन लाख गॅसधारकांनी प्रतिसाद दिला आहे. 'गिव्ह इट अप'मध्ये सहभाग घेतलेल्या या गॅसधारकांचे अनुदान आता गरिबांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दहा लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या गॅसधारकांचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, त्यासंबंधीच्या ठोस सूचना अद्याप न आल्याने त्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले नसल्याची माहिती पुरवठा खात्यातील सूत्रांकडून देण्यात आली. उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनी घरगुत गॅस सिलिंडरचे अनुदान परत करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले होते. या आवाहनाला पुणे शहर व जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरात सुमारे सोळा लाख तर ग्रामीण भागात आठ लाख गॅसधारक आहेत. या गॅसधारकांपैकी दोन लाख नागरिकांनी स्वच्छेने गॅसचे अनुदान नाकारले आहे. गॅसचे अनुदान नाकारलेल्यांची माहिती सरकारला कळविण्यात आली आहे. या गॅसधारकांनी नाकारलेले अनुदान देशातील अन्य गरीब कुटुंबाला देण्यात येत आहे. हे अनुदान कोणाला देण्यात आले याची माहिती एसएमएसद्वारे संबंधित गॅसधारकांना कळविण्यात येत आहे. देशातील दहा लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न गटातील गॅसधारकांना यापुढे अनुदान दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासंबंधीचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. प्राप्तीकर विभागाकडून अशा गॅसधारकांची माहिती घेऊन त्यात पुढे कार्यवाही करावी लागणार आहे. मात्र, त्यासंबंधीच्या सूचना आल्या नसल्याने त्यात कोणतीही पावले उचलली गेली नसल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजगुरूंच्या वाड्यातील देवघर पूर्ण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरू वाड्यातील देवघराच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून ही दुमजली इमारत संपूर्ण सागवानी लाकडामध्ये बांधण्यात आलेली आहे. सागवानी लाकडांमध्ये ही इमारत अधिकच आकर्षक दिसत आहे. या वाड्यात हुतात्मा राजगुरूंचे भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार असून त्यासाठी राज्य शासनाने सुमारे ४८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. येत्या दोन वर्षांत या स्मारकाचे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील एक महत्वाचे प्रेरणास्थळ व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाईल, अशा पद्धतीने या स्मारकाची उभारणी केली जाणार आहे. पुरातत्त्व विभागाकडून यापूर्वीच राजगुरूंचे जन्मस्थळ असलेल्या खोलीचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच या वर्षी देवघराच्या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले. राजगुरूंच्या कर्तृत्वाला साजेशा अशा राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती केली जावी, अशी येथील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्याची दखल घेऊन २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाने राजगुरू वाडा हा 'राज्य संरक्षित स्मारक' म्हणून घोषित केला. या राज्य स्मारकाच्या बांधकामास पुरातत्त्व विभागाकडून २००७ मध्ये सुरवात करण्यात आली. दरम्यान जन्मखोलीचे काम झाल्यानंतर मधल्या काळात अन्य कामांची गती काहीशी मंदावली होती. देवघरासहित थोरल्या वाड्याचे काम बंदच होते. परंतु गेल्या वर्षी देवघराच्या कामाला गती प्राप्त झाली व खंड न पडता देवघराचे कामही झटपट पूर्ण झाले. राजगुरूंचा इतिहास शालेय मुलांसाठी व तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावा, यासाठी येथे प्रशस्त वाचनालय बनविले जाणार आहे. स्मारकाच्या कडेने ऐतिहासिक पद्धतीची दगडी भिंत बांधली जाणार आहे. स्मारकाच्या मध्यभागी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी स्मारकाच्या आवारात दोन उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे. अंतर्गत रस्ते, चारचाकी व दुचाकी गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था, सुरक्षा चौकी, स्वच्छतागृह देखील बांधले जाणार आहे. स्मारकाच्या कामाबद्दल खेडचे प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे यांना विचारले असता ते म्हणाले, 'राज्य शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू आहे. या राष्ट्रीय स्मारकाचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही'.

अॅम्फी थिएटर बांधणार प्रस्तावित नव्या राष्ट्रीय स्मारकामध्ये पन्नास आणि अडीचशे आसनी प्रेक्षक क्षमतेची दोन अॅम्फी थिएटर निर्माण केली जाणार असून तिथे हुतात्मा राजगुरूंच्या जीवनपटावर आधारित विविध घटना व प्रसंग दाखविले जाणार आहेत. या ठिकाणी म्युझियमदेखील निर्माण केले जाणार आहे. यामध्ये राजगुरूंच्या विविध उपलब्ध ऐतिहासिक वस्तू मांडण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीएसके विश्व’येथे चार दुचाकी जळाल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे डीएसके विश्व येथील भास्करा इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली चार दुचाकी वाहने जळाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाचे जवान आणि इमारतीतील रहिवाशांनी तातडीने इतर दुचाकी व वाहने बाजूला काढल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमागचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डीएसके विश्वमध्ये असलेल्या भास्करा सोसासटीतील एफ इमारतीच्या पार्किंगमध्ये रात्री वीस ते बावीस दुचाकी व वाहने रहिवाशांनी लावलेली होती. मंगळवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास पार्किंगमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीत झोपलेल्या एका रहिवाशाला आगीचा प्रकार निदर्शनास आला. त्याने सोसायटीतील इतर नागरिकांना आणि अग्निशमन दलास आगीची माहिती तत्काळ दिली. अग्निशमन दलाच्या सिंहगड केंद्राचे अधिकारी प्रभाकर उमराटकर, जवान रोहिदास दुधाणे, संतोष भिलारे, भारत पवार, भरत गोगावले, राजेश बरे, मनोज ओव्हाळ यांनी तेथे धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सोसायटीतील रहिवाशांच्या मदतीने पार्किंगमधील वाहने बाजूला नेली. आगीची झळ सहा दुचाकी आणि एका सायकलीला पोहोचली. आगीत विनायक दामोदर जोशी, प्रीती किरण रत्नाकर यांच्या तीन दुचाकी जळाल्या. या आगीत जळालेल्या आणखी एका दुचाकीच्या मालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती उमराटकर यांनी दिली. पार्किंगमध्ये दिवे लावण्याचा होल्डर आहे. तेथे लावण्यात आलेल्या दुचाकीला सुरुवातीला आग लागली. शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता सोसायटीतील रहिवाशांनी व्यक्त केली. पार्किंगच्या जागेत 'महावितरण'चा डीपी आहे. मात्र, सुदैवाने डीपीला आगीची झळ पोहोचली नाही. डीएसके विश्व गृहप्रकल्पातील भास्करा इमारतीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

पोलिस लाइनमध्ये वाहने जळाली स्वारगेट पोलिस लाइनमध्ये कचरा पेटवून दिल्यामुळे एक जुनी कार आणि एक स्कूटर जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. भवानी पेठ अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. स्वारगेट पोलिस लाइनच्या बिल्डिंग क्रमांक पाच मागे वापरात नसलेली कार आणि स्कूटर उभ्या केलेल्या होत्या. या ठिकाणी कचरा जमलेला होता. सकाळी अकराच्या सुमारास अचानक कारला आग लागली, शेजारी उभ्या केलेल्या स्कूटरनेही पेट घेतला. भवानी पेठ अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच ही आग विझवली. मात्र, कार आणि स्कूटर पूर्ण जळून खाक झाल्या. कचऱ्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तुम्ही अत्यंत गर्विष्ठ राजकारणी आहात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्यामधील वाद पराकोटीला पोहोचले आहेत. 'शहराच्या हितासाठी काम करण्यात तुम्हाला रस नसून, तुम्ही अत्यंत उद्धट आणि गर्विष्ठ राजकारणी आहात,' अशा भाषेत आयुक्तांनी वैयक्तिक स्तरावर टीका केल्याने त्यांच्याविरोधात राजशिष्टाचार समितीमार्फत केंद्र-राज्याकडे दाद मागण्याचा पवित्रा चव्हाण यांनी घेतला आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावरून गेले काही दिवस आयुक्त आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी आणि कमतरतांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बोट ठेवले होते; तसेच स्मार्ट सिटीचे सर्व प्रस्ताव आयत्यावेळी दाखल करत, लोकप्रतिनिधींना विचार करण्याची संधीच देत नसल्याची टीका केली जात होती. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा चव्हाण यांनी वेळोवेळी त्याबद्दल आक्षेप नोंदविले होते; तसेच आयुक्तांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

स्मार्ट सिटीमुळे आयुक्तांना शहराच्या कोणत्याच प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याबाबत नापसंती व्यक्त केली जात होती. याच अनुषंगाने शहरातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांची डेडलाइन चुकल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र चव्हाण यांनी ई-मेलद्वारे आयुक्त आणि तत्कालीन महापौरांना पाठविले. त्याला उत्तर देताना महापालिका आयुक्तांनी चव्हाण यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून, शहराच्या हितासाठी काम करण्यात तुम्हाला रसच नाही, अशा खरमरीत शब्दांत टीका केली आहे. एकत्र चांगले काम करून दाखविण्याची तयारी दाखवली, तरी तुमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत आयुक्तांनी चव्हाण यांनाच लक्ष्य केले आहे. आयुक्त म्हणून नागरिकांच्या प्रश्नांशी माझी बांधिलकी असून, वैयक्तिक स्वरुपात एखाद्या व्यक्तीचा किंवा पक्षाचा अजेंडा राबविण्यासाठी माझी नेमणूक झाली नसल्याचा दावा आयुक्तांनी पत्रात केला आहे. दरम्यान, आयुक्तांच्या पत्रामुळे व्यथित झालेल्या खासदार चव्हाण यांनी ही बाब पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या सुचनांनुसार खासदारांना चुकीच्या भाषेत पत्र पाठविल्याबद्दल त्या विरोधात दाद मागण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्तांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या राजशिष्टाचार समितीकडे ही तक्रार येत्या काही दिवसांत दाखल केली जाणार असल्याचे समजते.

आयुक्तांनी पाठविलेल्या पत्राचा सारांश

तुमचा माझ्या कार्यक्षमेतवर विश्वासच नाही. शहराच्या हितासाठी ठोस काम करण्याबाबत माझा नेहमी आग्रह राहिला आहे; पण त्याबाबत तुमचा प्रतिसाद कधीही सकारात्मक नव्हता. माझ्या आजवरच्या कारकि‍र्दीत अत्यंत उद्धट आणि सहकार्यास टाळाटाळ करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये तुम्ही एकमेव आहात. महापालिका आयुक्त म्हणून शहराच्या नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे आणि त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, ही माझी अंतिम जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्तीचा किंवा पक्षाचा अजेंडा राबविण्यासाठी माझी नेमणूक झालेली नाही, ही गोष्ट तुमच्या लक्षात आणू देऊ इच्छितो.

उपराष्ट्रपतींकडून दखल

वंदना चव्हाण या राज्यसभेच्या सदस्या असल्याने त्यांनी एखादा आयएएस अधिकारी अशा शब्दांत कसे उत्तर देऊ शकतो, अशी विचारणा राज्यसभेच्या सचिवांकडे केली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्यसभेचे अध्यक्ष व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे गेले. त्यांनीही हे पत्र वाचून अतिशय तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, याबाबत हक्कभंग दाखल करता येईल का, याची तपासणी करण्यास सचिवालयाला सांगितल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अभाविपकडून राजकीय स्टंटबाजी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून केला जात असलेला 'जेएनयूतील नऊ फेब्रुवारीचे सत्य' हा चर्चेचा कार्यक्रम पॉलिटिकल स्टंट आहे, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांनी केला. तर, कन्हैय्याला पाठिंबा देणाऱ्या वृत्तीने आम्हाला चर्चेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी केला.

'अभाविप'तर्फे फर्ग्युसन कॉलेजात 'किमया'मध्ये चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कॉलेजातील आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास विरोध दर्शवित कार्यक्रम थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही बाजुने झालेल्या घोषणाबाजीने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केल्यानंतर, आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला.

आम्ही केवळ चर्चा करण्यासाठी येथे आलो होते. तसेच, 'जेएनयू'मध्ये घडलेली सत्य परिस्थिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, आमची चर्चा थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सत्य परिस्थिती विद्यार्थ्यांपर्यंत, जनतेपर्यंत पोहचू द्यायची नाही, असा आरोप आलोक सिंह याने केला. आम्हाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेकजण फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी नव्हते, असेही त्याने सांगितले.

'अभाविप'ला विरोध करण्यासाठी बाहेरचे विद्यार्थी मागविले नव्हते. आमच्या विरोधात हा खोटा प्रचार केला जात असल्याचे फर्ग्युसन कॉलेजातील सिद्धार्थ कांबळे, भूषण राऊत, सुजात आंबेडकर, कल्याणा माणगावे या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. आम्ही स्वतः त्या चर्चेत सहभागी होण्यासाठी गेलो होतो. मात्र, 'अभावपि'च्या कार्यकर्त्यांनी आमच्याशी बाचाबाची सुरू केली. आम्ही डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आहोत, असा खोटा प्रचार 'अभाविप'ने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभाविपला कार्यक्रमाची परवानगी नव्हती’

$
0
0

पुणे : फर्ग्युसनमधील कार्यक्रमासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला कॉलेज प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी यांनी मंगळवारी सांगितले. अभाविपकडे परवानगी नसल्याने आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता.

'अभाविप'ने मंगळवारी सकाळी दहा वाजता कार्यक्रमासाठी परवानगीसाठीचे पत्र सादर केले. त्यांना परवानगी नाकारण्यात आली. तसेच, आता परीक्षेचा काळ असून, असे कार्यक्रम घेऊ नका, असेही बजावण्यात आले होते, अशी माहिती परदेशी यांनी दिली. जेएनयूतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आलोक सिंह सध्या पुण्यात असून, 'जेएनयू'मध्ये नऊ फेब्रुवारी रोजी काय घडले हे सांगण्यासाठी फर्ग्युसनमध्ये कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.

'जेएनयू'मध्ये नऊ फेब्रुवारीला घडलेल्या सत्य घटनेबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये आलो होतो. अशा प्रकारच्या चर्चेला परवानगी आवश्यकता नसावी. 'जेएनयू'च्या घटनेचे सत्य विद्यार्थ्यांना कळू नये, ते बाहेर येऊ नये यासाठीचा प्रयत्न कन्हैय्या कुमारच्या काही समर्थकांनी केला,' असे आलोक सिंह याने सांगितले.

'चार महिन्यांपूर्वी एफटीआयआयचे आंदोलन झाले. त्यावेळी त्या आंदोलनाशी संबंधित कार्यक्रम फर्ग्युसन कॉलेजमध्ये घेण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, कॉलेज प्रशासनाने परवानगी नाकारली होती. 'अभाविप'कडे परवानगीबाबत विचारणा केली. त्यांना परवानगी दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला विरोध केला,' असे सुजात आंबेडकर या विद्यार्थ्याने सांगितले.

कॉलेजबाहेरील विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये येऊन प्राचार्यांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केल्याने गडबड झाल्याचे सकाळी समजले. कॉलेजबाहेरील विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये असे करणे योग्य नाही. त्यामुळेच प्राचार्यांनी या प्रकाराविरोधात पोलिसांकडे पत्र दिले आहे, असे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रानडे इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात गोंधळ

$
0
0

पुणे : 'अभाविप' तर्फे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये सायंकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांशी चर्चेचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. मात्र, सकाळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालेल्या राड्यामुळे पोलिसांनी त्यापूर्वी तेथे दाखल होऊन 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांना संस्थेच्या आवारात प्रवेश नाकारला. मात्र, रानडे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी 'अभाविप'शी चर्चेस तयारी दर्शविली. संस्थेच्या गेटच्या एका बाहेरील बाजूस 'अभाविप'चे कार्यकर्ते व आतील बाजूस विद्यार्थी बसून त्यांनी चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्यांना संस्थेच्या आवारात प्रवेश दिला. काही वेळ चर्चा झाल्यानंतर 'अभाविप'च्या कार्यकर्ते व आलोक सिंह यांच्याकडून अपेक्षित पद्धतीने उत्तरे न मिळाल्याने रानडेतील विद्यार्थ्यांनी 'उत्तरे नीट द्या, नाहीतर चर्चा नको,' असे म्हणून चर्चा थांबविण्याची घोषणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसपीव्ही’ नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' (पीएससीडीसीएल) या नावाने स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आज, बुधवारी (२३ मार्च) कंपनीची नोंदणी पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर, अनुदान प्राप्त करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारमार्फत केंद्राला सादर केला जाणार आहे.

स्मार्ट सिटीत निवड झालेल्या सर्व शहरांनी मार्चअखेरपर्यंत एसपीव्हीची स्थापना करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. एसपीव्हीच्या स्थापनेनंतरच यंदाचा दोनशे कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले गेले होते. राज्य सरकारने एसपीव्हीची रचना मंजूर केल्यानंतर पालिकेने तातडीने कंपनीच्या नोंदणीसाठीचा प्रस्ताव दाखल केला होता. त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि इतर माहिती सादर करण्यात आली असून, बुधवारी दुपारपर्यंत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा उपायुक्त अनिल पवार यांनी व्यक्त केली. 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' असे एसपीव्हीचे नाव निश्चित करून त्याची नोंदणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेल्या शहरांना पहिल्या वर्षी केंद्र सरकारकडून १९४ कोटी, तर राज्य सरकारकडून ९८ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. हा निधी ३१ मार्चपूर्वी प्राप्त होण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारला पाठविण्यात येणारा प्रस्ताव तयार ठेवण्यात आला असून, नोंदणी पूर्ण होताच तो पाठविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठीच्या कंपनीचे कार्यालय तूर्तास तरी महापालिकेमध्येच सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र कार्यालय असावे, या दृष्टीने जागेचा शोध सुरू असला, तरी सुरुवातीच्या टप्प्यात महापालिकेमध्येच स्मार्ट सिटी कार्यालय निर्माण केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनापती बापट रोडवर महिलेचा अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील 'ज‌िम इन्स्ट्रक्टर' महिलेचा मृत्यू झाला. सेनापती बापट रोडवर एनसीसी कँटीनसमोर मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सकाळी गर्दीच्या वेळी अपघात झाल्याने सेनापती बापट रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. रेश्मा दावलसाहेब गोळसंगी (वय ३०, रा. जनता वसाहत, जनवाडी गोखलेनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी तिचे मेव्हणे विजय जयकुमार खिलारे (वय २६, रा. जनवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून ट्रक चालक मद्दप्पा काळाप्पा पुजारी (वय ३६, रा. विशालनगर, पिंपळे निलख, मूळ - अक्कलकोट) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा या सेनापती बापट रोडवरील 'अॅब्स ज‌िम'मध्ये 'जीम इन्स्ट्रक्टर' म्हणून काम करत होत्या. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास काम संपवून त्यांच्या अॅक्टीव्हावरून घरी येत होत्या. सिम्बॉयोसिसकडून लॉ कॉलेज रोडकडे येत असताना वळणावर एनसीसी कँटीनसमोर त्यांच्या दुचाकीला पाठिमागून भरधाव ट्रकने जोरात धडक दिली. त्यामुळे रेश्मा या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्या. यामध्ये डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच डेक्कन

पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. रेश्मा या मूळच्या कर्नाटकातील राहणाऱ्या असून काही वर्षांपासून त्या पतीसोबत पुण्यात राहत होत्या. त्यांचे पती हे एका खासगी मोटारीवर चालक म्हणून नोकरी करतात. त्यांना दोन मुले आहेत. या प्रकरणी पोलिस हवालदार दिलीप निढाळकर हे करत आहेत.

सेनापती बापट रोडवर सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाल्यामुळे सेनापती बापट रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर अर्धा ते पाऊस तास वाहतूक सुरळीत होण्यास लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबलसाठी खोदाई सुरूच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील सर्व रस्त्यांवर सुरू असलेली केबल कंपन्यांची खोदाई थांबविण्याचे आदेश महापौरांनी दिले असले, तरी त्याची अंमलबजावणी कशी करायची, असा यक्षप्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. कंपन्यांची यापूर्वीच परवानगी देण्यात आली असून, ती अचानक बंद केली तर कायदेशीर प्रश्न निर्माण होण्याचा भीती असल्याने तूर्तास खोदाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केलेल्या तक्रारींमुळे केबल खोदाई तातडीने थांबविण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी दिले होते. महापालिकेतर्फे विविध कंपन्यांना १५ एप्रिलपर्यंतच खोदाईसाठी परवानगी दिली जाते. त्यानंतर, पावसाळ्यापूर्वीच्या दीड महिन्यांच्या कालावधीत रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण केले जाते. त्यामुळे, कंपन्यांना विविध रस्त्यांवर खोदाईसाठी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे. कंपन्यांतर्फे काम सुरू असतानाच, मध्येच त्यांचे काम थांबविणे योग्य ठरणार नसल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यातून, कायदेशीर प्रश्न निर्माण होण्याची भीती असून, त्यामुळे अधिक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतील, याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे, महापौरांनी काम थांबविण्याचे आदेश दिले असले, तरी त्यावर अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.

दरम्यान, रस्ते खोदाई करताना पालिकेने ठरविलेल्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्यांवर; तसेच परवानगीपेक्षा अधिक खोदाई करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जात आहे. नियमानुसार काम न करणाऱ्या कंपन्यांना दंड ठोठावला जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांचा पुन्हा बेमुदत बंद

$
0
0

पुणे : सोन्यावर लादण्यात आलेल्या उत्पादन शुल्काला सराफ व्यावसायिकांचा विरोध अजून कायम आहे. हे शुल्क पूर्णतः रद्द होईपर्यंत राज्यभरातील सराफ व्यावसायिकांनी पुन्हा बेमुदत बंद पुकारला आहे. यापुढे बंदबरोबरच अन्य मार्गांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राज्यभरातील सराफ व्यावसायिकांनी मंगळवारी पुण्यात झालेल्या बैठकीत दिला.

महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनतर्फे पुण्यात सराफ व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सचिव प्रेम झांबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यभरातील हजारो सराफ उपस्थित होते. या बैठकीत अर्थतज्ज्ञ सागर शहा यांनी उत्पादन शुल्क कायद्याबाबत मार्गदर्शनही केले.

'सोन्यावर लादण्यात आलेले उत्पादन शुल्क मान्य करणे शक्य नाही. याबाबत नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत फेडरेशनच्या प्रतिनिधींनी या शुल्काला कडाडून विरोध केला. त्यातच सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दिल्लीत झालेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी पुण्यात मंगळवारी बैठक घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेट्रोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) राबविण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे दिल्ली मेट्रोला दिलेले सर्वेक्षणाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी पीएमआरडीएने पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन केले आहे.

पुणे महापालिकेमार्फत शहरातील दोन मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा निर्णय होऊन पाच वर्षे उलटले तरी मेट्रो प्रकल्प कागदावरच अडकला आहे. या मेट्रोचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पडून आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असताना पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्याच्या सर्वेक्षणाचे काम दिल्ली मेट्रो या संस्थेला देण्यात आले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या या मेट्रो मार्गाचे गेल्या तीन महिन्यांपासून दिल्ली मेट्रोमार्फत सर्वक्षण करण्यात येत आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात पीएमआरडीएमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पीएमआरडीएचा मेट्रो मार्ग १७ किमी लांबीचा असणार आहे. हा मार्ग पुणे महापालिकेच्या वनाज ते रामवाडी दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पास जोडण्याचा निर्णयही पीएमआरडीएने घेतला आहे.

पीएमआरडीएच्या मेट्रोच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बांधणीसाठी निधी कसा उभारता येईल, याचे नियोजन केले जाणार आहे. हा प्रकल्प राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला सादर करून त्यांची मान्यता घेतली जाणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता, अन्य पर्यायी मार्गाने निधी कसा उपलब्ध करून घेता येईल यासाठी पीएमआरडीए प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम दिल्ली मेट्रो कंपनीला देण्यात आले आहे. हे काम पूर्ण होत आले असून त्याचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक बोलविली असल्याचे पीएमआरडीचे आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या ‘फर्ग्युसन’मध्ये देशविरोधी घोषणा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) देशद्रोही घोषणांच्या आरोपावरून डाव्या आणि उजव्या विद्यार्थी संघटनांमधील संघर्षाचे लोण मंगळवारी पुण्यात पोहोचले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि दोघांनी घोषणा देण्यास सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचे पत्र 'फर्ग्युसन कॉलेज'ने पोलिसांना दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

'जेएनयू'तील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आलोक सिंह सध्या पुण्यात आहे. नऊ फेब्रुवारी रोजी जेएनयूमध्ये काय घडले हे सांगण्यासाठी फर्ग्युसनमध्ये कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. तो सुरू असताना आंबेडकरी चळवळीतील काही विद्यार्थी तिथे आले आणि या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी घेतली का, असा प्रश्न त्यांनी संयोजकांना केला. परवानगी नसल्यास कार्यक्रम थांबविण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि लगेचच घोषणायुद्ध सुरू झाले. 'फॅसिझम से आझादी', 'भाजपसे आझादी', 'मनुवादसे आझादी', 'अभाविप चलेजाव', 'कितने रोहित मारोगे, घर घरसे रोहित निकलेगा' आदी घोषणा आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांनी दिल्या. 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी 'भारत माता की जय' व 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या.

परिस्थिती तणावाची झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी 'अभाविप'चा कार्यक्रम बंद केला. आणि आंदोलक विद्यार्थ्यांना तेथून दुसरीकडे नेले. त्यानंतरही काही वेळ कॉलेजच्या आवारात तणावाचे वातावरण होते. 'कॉलेज प्रशासन नेहमीच उजव्या संघटनांच्या कार्यक्रमांना परवानगी देते आणि अन्य संघटनांच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारते,' असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

पत्रात स्पष्टता नाही

या कार्यक्रमादरम्यान कॉलेजात देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचे पत्र फर्ग्युसन कॉलेजतर्फे पोलिसांना देण्यात आले आहे. मात्र, या घोषणा कोणी दिल्या याबाबतची संदिग्धता असून, कॉलेजच्या पत्रातही याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे पोलिसही गोंधळात पडले आहेत. या कार्यक्रमाचे वेगवेगळे फूटेज पाहून आणि उपस्थितांपैकी सर्वांची चौकशी करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जेएनयूमध्येही देशविरोधी घोषणाबाजीचा मुद्दा संपूर्ण देशात चर्चेच्या केंद्रस्थानी होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशविरोधी घोषणा: फर्ग्युसन कॉलेजचे घुमजाव

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याची तक्रार पोलिसांकडे करणाऱ्या कॉलेजच्या प्राचार्यांनी अवघ्या काही तासांतच घुमजाव केले आहे. पोलिसांना दिलेल्या पत्रात 'टायपिंग मिस्टेक' झाली. त्यात 'घोषणा दिल्या असल्यास' असा उल्लेख असणं अपेक्षित होतं, असं स्पष्टीकरण आज प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी 'मटा'शी बोलताना दिलं आहे.

'जेएनयू'तील देशविरोधी घोषणांचं प्रकरण ताजं असताना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातही त्याची पुनरावृत्ती झाल्याच्या वृत्ताने मंगळवारी खळबळ उडाली होती. 'जेएनयू'तील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आलोक सिंह सध्या पुण्यात आहे आणि ९ फेब्रुवारी रोजी 'जेएनयू'मध्ये काय घडलं हे सांगण्यासाठी त्याने फर्ग्युसनमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी आंबेडकरी चळवळीतील काही विद्यार्थी तिथे आले आणि त्यांनी परवानगीशिवाय होत असलेल्य कार्यक्रमाला आक्षेप घेतला. त्यानंतर हे विद्यार्थी आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या वादाबाबत कॉलेजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीने गंभीर वळण लागलं.

'कोणतीही परवानगी न घेता कॉलेजच्या आवारात एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या एका समूहाने देशविरोधी घोषणा दिल्या. या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी', अशी तक्रार प्राचार्यांच्या स्वाक्षरीने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच त्याचा तपासही सुरू केला. मात्र, आज कॉलेजने 'टायपिंग मिस्टेक' म्हणत या तक्रारीवर सपशेल घुमजाव केले आहे. देशविरोधी घोषणा दिल्याची शंका आल्याने ही तक्रार करण्यात आली आहे. मला देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास कारवाई करा, असं म्हणायचं होतं. मात्र पत्रात 'असल्यास' हा शब्द राहून गेला, असे परदेशी यांनी स्पष्ट केले.

प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करा: आव्हाड

फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थांनी उचललेला आवाज हा पुरोगामीत्वाचा आवाज आहे. त्याला तुम्ही दाबू शकत नाही. आम्ही सर्व 'त्या' विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. मी या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे. 'त्या' प्राचार्यांनी राजीनामा द्यायला हवा. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. पोलिसांना पत्र लिहून आपल्याच विद्यार्थींच्या विरोधात कारवाई करण्यास सांगणं हे काय आहे? या प्राचार्यांची हक्कालपट्टी करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जितेंद्र आव्हाडांना फर्ग्युसन कॉलेजात धक्काबुक्की

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील आंबेडकरवादी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. याबरोबर आव्हाड यांच्या गाडीवरही आंदोलक विद्यार्थ्यांनी तुफान दगडफेक केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनीच आव्हाडांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचं सांगितलं जातय. या प्रकारानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजयुमोचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

आमदार जितेंद्र आव्हाड फर्ग्युसन कॉलेजात दाखल होताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी 'आव्हाड गो बॅक' च्या घोषणा देणं सूरू केलं. आमदार आव्हाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शिवाय त्यांच्या गाडीवर लाथाही मारण्यात आल्या. पोलिसांनी लाथा मारणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला.

दोन्ही बाजूची स्थिती जाणून न घेता फर्ग्युसन कॉलेजात घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करा अशी मागणी करणारे आणि पोलिसांना चुकीची माहिती देणारे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी यांची हकालपट्टी करा अशी मागणी आव्हाड यांनी यावेळी केली. लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कॉलेजाच घडलेल्या कालच्या प्रकारानंतर कन्हैया कुमारला फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणावेच लागेल. कन्हैयाच खऱ्या अर्थानं आजच्या तरूणाईचा आवाज आहे असेही ते पुढे म्हणाले.

जितेंद्र आव्हाड हे या विषयाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप अभाविपनं केला आहे.

दरम्यान, फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांना निलंबित करावे अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( एस.एफ.आय) च्या पुणे जिल्हा समितीनं सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून केली आहे. डाव्या आणि आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नसतानाही कॉलेजचे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी यांनी तशी माहिती पोलिसांनी देऊन शैक्षणिक क्षेत्रातले वातावरण दुषित होईल असा संभ्रम निर्माण केला अशी तक्रार एस.एफ. आयनं आपल्या पत्राद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्ग्युसन बनले राजकीय आखाडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फर्ग्युसन कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मंगळवारी झालेल्या कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या वादाच्या परिस्थितीनंतर बुधवारी कॉलेज कॅम्पसचा राजकीय आखाडा बनला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अभाविप, भारतीय जनता पक्ष व भाजयुवामोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. आव्हाड यांच्या अंगरक्षकाने रिव्हॉल्वर बाहेर काढल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

फर्ग्युसनमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्या असून संबंधितांवर कारवाई करण्याचे पत्र कॉलेज प्रशासनाने पोलिसांना दिल्याची माहिती मिळाल्यानंतर, आव्हाड यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ते मुंबईहून पुण्यात फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांना भेटायला आले. त्यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांना घेराव घालून, 'अभाविप'वर कारवाई करण्याची मागणी केली. त्याची माहिती मिळाल्याने 'अभाविप'चे कार्यकर्तेही फर्ग्युसनमध्ये जमले होते.

त्यानंतर भाजप व भाजयुमोचे कार्यकर्ते व आव्हाड एकाचवेळी कॉलेजच्या आवारात दाखल झाले. कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आव्हाड प्राचार्यांच्या भेटीसाठी निघाले. तेव्हा दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यांनी परस्परविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यामध्ये आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. पोलिस आव्हाड यांना बाजूला घेऊन पुढे जात असताना त्यांच्या दिशेने काहींनी दगडही फेकले. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी आव्हाड यांना सुरक्षेच्या कारणास्तव प्राचार्यांची भेट न घेता खासगी गाडीतून बाहेर जाण्यास सांगितले.




रंगला शिमगा

शिवसेना वगळता पुण्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये हजेरी लावली. काहींनी घोषणाबाजीचा स्टंटही केला. त्यामुळे कॉलेजच्या आवारात बुधवारी 'राजकीय शिमगा' रंगल्याचे पाहायला मिळाले.

विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे दुदैवी गोष्ट आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला हे अशोभनीय आहे. देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजाला देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे प्रकार येथे घडणार असतील, तर जेएनयूतील कन्हैय्या कुमारला फर्ग्युसनमध्ये आणले पाहिजे.
- जितेंद्र आव्हाड आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images