Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भेसळयुक्त खव्यावर स्क्वाडमार्फत नजर

$
0
0
सणासुदीच्या काळात केल्या जाणा-या मिठाईत भेसळयुक्त खव्याचा वापर होऊ नये, याची दक्षता घेण्यात येणार आहे. विशेष स्क्वाडमार्फत भेसळीच्या खव्यावर कारवाई केली जाणार असून आरोग्याला घातक पदार्थ वापरून खवा करणा-यांना कडक शिक्षा केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी सांगितले.

शेट्टी खूनप्रकरणी वकिलावर छापे

$
0
0
माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खुनाच्या चौकशीबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गरवारे कॉलेज परिसरात असलेल्या एका वकिलाच्या कार्यालयात मंगळवारी छापा घातला.

दूध दरवाढीची टांगती तलवार

$
0
0
खासगी व्यावसायिकांचे दूध खरेदी बंदचे सावट, डिझेल दरवाढीचा फटका, पशुखाद्याच्या भावातील वाढ आणि अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतक-यांच्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीने राज्य सरकारला दिला आहे.

रिलायन्सचे नेटवर्क डाऊन

$
0
0
सर्व्हर डाउन झाल्याने पुण्यात रिलायन्स कम्युनिकेशन्सचे पूर्ण नेटवर्क मंगळवारी डाउन होते. त्यामुळे सकाळपासूनच ‘आरकॉम’चे काही लाख ग्राहक कम्युनिकेशनच्या जगातून ऑउट ऑफ नेटवर्क राहिले. रस्त्याचे खोदकाम करताना ऑप्टिक फायबर केबल तुटल्याने नेटवर्कवर परिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

५८ हजार रुपये लंपास

$
0
0
गणेश पेठेतील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या महिलेला एका वेगळ्या फसवणुकीला सामोरे जावे लागले. तेथे असलेल्या एका भामट्याने त्यांचे ‘एटीएम’ बदलून त्याद्वारे ५८ हजार रुपये लंपास केले.

नायजेरियन व्यापारी गजाआड

$
0
0
नायजेरियातील एका कापड व्यापा-याने आपल्या पासपोर्टवर ‘इमिग्रेशन’ विभागाचे बनावट शिक्के मारून पुण्यातील ‘स्टे’ वाढवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्कमधील हॉटेल सूर्यव्हिला येथील कर्मचा-यांच्या लक्षात आल्याने या भामट्याला जेरबंद करण्यात आले आहे.

गॅस एजन्सींवर आणला चाप

$
0
0
नवीन गॅस कनेक्शन देताना अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करणा-या गॅस एजन्सी चालकांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊले उचलली आहेत. नवीन गॅस कनेक्शनसाठी आकारली जाणारी रक्कम; तसेच दुस-या जादा सिलिंडरसाठी घेतले जाणारे शुल्क याबाबतच्या संपूर्ण माहितीचा फलक एजन्सीच्या बाहेर लावणे बंधनकारक असेल.

दुबार मतदार होणार 'डिबार'

$
0
0
मतदारयादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या अनेक मतदारांचे राहण्याचे पत्ते बदलल्याने त्यांची नावे रद्द करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. मतदारयादीत दोन ठिकाणी नाव असणे हा कायद्याने गुन्हा असून, याबाबतची माहिती नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाकडे देणे गरजेचे आहे.

महावितरणला लाखोंचा ‘झटका’

$
0
0
तब्बल ९९ दिवस शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित राहिल्याबद्दल नागपुरातील शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख १६ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश महावितरणला देण्यात आला आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार केली नसेल तरीही बाधित ग्राहक भरपाईस पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण मुद्दा या निकालातून समोर आला आहे.

महिलेने रॉकेल ओतून पेटवून घेतले

$
0
0
कर्वे रोडवर एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका महिलेने बुधवारी दुपारी रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा प्रकार घडला. रॉकेल आणि पेट्रोलमुळे पेटलेली महिला कर्वेरोडरोडवर आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. नागरिकांनी या महिलेला विझवून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.

छळाप्रकरणी नणंदेसह ६ जणांना अटक

$
0
0
विवाहितेवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेच्या पतीच्या नावावर असलेला फ्लॅट नणंदेने दिशाभूल करून स्वतःच्या नावावर केल्याचा आरोपही या महिलेने तक्रारीत केला आहे.

फर्मला दोन कोटी रुपयांना गंडवले

$
0
0
‘बॅँक ऑफ महाराष्ट्र’ने पिंपरी ‘एमआयडीसी’मधील एक प्लॉट जप्त केल्याचे खोटेच सांगून तो स्वस्तात सोडवून देण्याच्या आमिषाने पाच ठगांनी एका फर्मला दोन कोटी रुपयांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे.

‘एम्स’मध्ये १० टक्के खाटा गरिबांसाठी राखीव

$
0
0
औंध येथील एम्स हॉस्पिटलमध्ये गरिबांना मोफत उपचारासाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. औंध येथे पालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांवर मोफत उपचार करण्यात येत नसल्याची तक्रार जनआरोग्य मंचाने केली होती.

माननीयांचे ‘रुसू बाई रुसू’

$
0
0
टेंडर भरणा-या संस्थेने योग्य पाहुणचार केला नाही, म्हणून महापालिकेतील काही सदस्यांचा ‘रुसू बाई रुसू’चा प्रयोग रंगला. मात्र, त्याचा फटका त्या संस्थेला बसून संबंधित योजनेचे टेंडर पुन्हा काढण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आता महापालिकेत रंगली आहे.

‘कॉमन मॅन’च्या वाढदिवशी चिमुकल्यांची माहितीपूर्ण भेट

$
0
0
सर्वसामान्यांच्या भावना आपल्या कुंचल्यातून व्यक्त करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना ९१ व्या वाढदिवशी दोन चिमुकल्यांनी ‘माहितीपूर्ण’ भेट दिली. आरकेंना प्रिय असलेल्या कावळ्यावर आधारित ‘दी ब्रेनी क्रो’ या माहितीपटाचे अनावरण त्यांनी केलेच, शिवाय कावळ्याचे चित्र रेखाटून नव्वदीतही आपल्या कुंचल्याची किमया दाखवली.

‘युक्रांद’ घेणार आयुक्तांची भेट

$
0
0
इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना पूर्णत्वाचा दाखला, तसेच भोगवटापत्र न देता सदनिकाधारकांना जागेचा ताबा घेण्याची सक्ती शहरातील बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. यामुळे घराचा ताबा घेतलेल्या फ्लॅटधारकांना मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक दंड सहन करावा लागतो.

बिल्डरांच्या धमक्यांना फ्लॅटधारकांनी बळी पडू नये

$
0
0
बांधकाम व्यावसायिकांनी मनमानी पद्धतीने फ्लॅटवर व्हॅट आकारण्याच्या निर्णयाला फ्लॅटधारकांनी एकत्र येऊन विरोध केल्याने बिल्डरने ग्राहकांना त्रास देण्याचे धोरण स्वीकारले आहे. काही बिल्डरने व्हॅट भरल्याशिवाय फ्लॅटचा ताबा देण्यास नकार दिला असून काही बांधकाम व्यावसायिकांनी पाणीपुरवठा तोडण्याची धमकी देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे.

पुढच्यास ठेच, तरी मागच्यांचा ‘वेडेपणा’

$
0
0
पुण्यातील बीआरटी सेवा अयशस्वी ठरल्याचे उदाहरण डोळ्यासमोर असताना पिंपरी चिंचवड महापालिकेने याच बीआरटीच्या रस्तारुंदीकरणासाठी तब्बल १९९१ झाडांवर पाणी सोडले आहे. रुंदीकरणासाठी ‘डिफेन्स इस्टेट डिपार्टमेंट’ची जागा विकत घेताना वृक्षसंवर्धनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या मार्गावरील दोन हजार झाडे तोडण्यास महापालिकेने लष्कराला परवानगी दिली आहे.

वनखात्याच्या टेकड्यांवर कुत्र्यांना नो एन्ट्री?

$
0
0
पाळीव प्राण्यांमुळे टेकड्यांवर फिरायला येणा-या नागरिकांना होणारा त्रास आणि त्यांच्या नैसर्गिक विधीमुळे होणारी घाण कमी करण्यासाठी वनविभागाच्या शहरातील सर्वच टेकड्यांवर पाळीव प्राण्यांना बंदी आणण्याचा प्रस्ताव वनविभागाच्या विचाराधीन आहे.

अवकाळी पावसाचे ‘सीमोल्लंघन’

$
0
0
सणासुदीच्या दिवशी आप्तेष्ट-नातेवाईकांची गाठ-भेट घेण्यासाठी तसेच नव्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या उत्साहावर ‘पाणी’ बरसवत दस-याचा ‘मुहूर्ता’वर अवकाळी पावसाने बुधवारी सायंकाळी पुणेकरांना भिजविले. रात्री साडेआठपर्यंत ... मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images