Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

समृद्ध ग्राम योजनेसाठी ३०० कोटींचा निधी

$
0
0
राज्यात सुरू करण्यात आलेल्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे निकष पूर्ण करणा-या राज्यातील १२ हजार १९३ ग्रामपंचायतींना विकासासाठी ३८९ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या आणि दुस-या वर्षाचे निकष पूर्ण करणा-या दोन हजार ३७८ ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार ३०० कोटीचा निधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

र‌ईसही ताब्यात

$
0
0
फसिह महंमदसह सौदी अरेबियाने ए. र‌ईस या दहशतवाद्यालाही भारतीय पोलिसांच्या ताब्यात दिले. हा दहशतवादी ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेचा असून २००९ मध्ये केरळमध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी तो केरळ पोलिसांना हवा होता.

शिक्षणाचा पाया भक्कम हवा

$
0
0
शैक्षणिक कायद्यांच्या माध्यमातून शाळेतील सुविधा सुधारण्यापेक्षा शिक्षणातील गु‍णवत्ता सुधारण्याचे आव्हान सध्या भारतासमोर आहे. जोपर्यंत प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम होत नाही, तोपर्यंत ‘सुपर इंडिया’चे स्वप्न साकारणार नाही, असे मत थर्मेक्स कार्पोरेटच्या माजी अध्यक्ष अनू आगा यांनी व्यक्त केले.

पत्नीची आत्महत्या पतीला सक्तमजुरी

$
0
0
घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला पाच वर्षे सक्तमजुरी आणि साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश साधना शिंदे यांनी हा निकाल दिला.

‘आय सरिता’च्या कोर्टात वकिलांमध्ये ‘वादी-प्रतिवादी’

$
0
0
नोंदणी व मुद्रांक विभागात सुरू करण्यात आलेल्या आय सरिता या कम्प्युटर सॉफ्टवेअरमधील त्रुटीच्या निमित्ताने पुणे बार असोसिएशनच्या कामकाजातील मतभेद उघड झाले आहेत.

क्रीडा धोरणाचा पालिकेकडून ‘खेळ’

$
0
0
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकीकडे पुणे महापालिकेने क्रीडा धोरण तयार केले असतानाच, शहरातील मैदानांची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत सादर केला आहे. या प्रस्तावानुसार नेहरू स्टेडिअमवर व्यावसायिक क्रिकेटच्या एका सामन्यासाठी एक हजार रुपयांऐवजी दहा हजार रुपये भाडे प्रस्तावित केले आहे.

‘रिलायन्स’चा न्याय पुतण्यांना नाही

$
0
0
रिलायन्स कंपनीमार्फत दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे खासगी साखर कारखाना उभारण्यात येणार होता. इथेनॉलपासून अनेक उपपदार्थांची निर्मिती त्यात होणार होती.

‘तीन सिलिंडर’चा निर्णय अधांतरीच

$
0
0
‘राज्यातील घरगुती ग्राहकांना तीन सिलिंडर सवलतीच्या दरात मिळावेत, यासाठीचा कोणताही प्रस्ताव अद्याप अर्थखात्याकडे आलेला नाही,’ असे राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. यामुळे महागाईने हैराण झालेल्या अनेक नागरिकांना तोंडावर आलेला दसरा-दिवाळीचा सण ‘कडू’च ठरणार आहे.

राज्यात २४ टक्के दुधात पाणी

$
0
0
महाराष्ट्रात २३.९४ टक्के दुधात चक्क ‘पाणी’ आढळल्याची माहिती पुढे आली आहे आणि एक टक्का दूध भेसळयुक्त आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारत पाच लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. देशातील ६८ टक्के दूध अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या निकषांची पूर्तता करत नसल्याची माहिती अलीकडेच केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली होती.

पूर्व वैमनस्यातून दोघांवर वार

$
0
0
मोटारीतून आलेल्या चौघांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. निगडीच्या ओटास्किम येथे रविवारी रात्री ही घटना घडली. सागर शहाजी सावंत (वय २२ रा. श्रीदत्त हौसिंग सोसायटी, ओटास्किम निगडी), सुधीर रमेश भोसले (ओटास्किम निगडी) असे जखमींची नावे आहेत. याप्रकरणी विजय चौधरी, संजय चौधरी (दोघे रा. ओटास्किम निगडी) आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘डीपी’साठी राष्ट्रवादीची घाई का?

$
0
0
जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने पुढील वर्षी एप्रिलपर्यंतची मुदत दिली असूनही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यासाठी घाई-गडबड सुरू असल्याची टीका सत्तेत भागीदार असलेल्या काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी सोमवारी केला. डीपी मांडण्यासाठी घाई करण्यामागे कोणते गौडबंगाल आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘सोने’ लुटल्यास यंदा दंड

$
0
0
दस-याच्या निमित्ताने होणारी आपटा आणि कांचनची वृक्षतोड थांबविण्यासाठी उद्यान विभागातर्फे धडक मोहिम हाती घेण्यात आली असून कांचन किंवा आपट्याच्या फांद्या तोडताना आढळल्यास संबंधित व्यक्ती विरोधात महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.

‘स्केटिंगवरील गरबा’ खेचतोय गर्दी

$
0
0
स्केटिंग पाहताना आपल्या अंगावर काटा आला नाही तर आश्चर्यच ! आपल्या शरीराचा तोल ढळू न देता पायाला बांधलेल्या चाकांव्दारे (स्केटस) सादर केल्या जाणा-या या मनोहरी खेळाला दांडियाची साथ मिळाली तर ? हो हे खरे आहे. चिंचवड येथील सिद्धी प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवामध्ये ‘स्केटिंग दांडिया’ हा नवीन प्रकार पहायला मिळत आहे. स्केटिंग आणि दांडिया यांची सांगड घालून धरला जाणारा फेर पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

राज्यातील पाणीसाठे तपासा

$
0
0
पुण्या-मुंबईसारख्या शहरांसह राज्यात डेंगीचे पेशंट आढळत असल्याने सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिका-यांनी आपल्या भागातील पाणीसाठा तपासावा, असे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात येणार आहेत.

लोणावळा लोकल दस-याला सुरू राहणार

$
0
0
पुणे-लोणावळ्यादरम्यान धावणा-या दोन लोकल दस-यानिमित्त सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे. पिंपरी ते दापोडी स्टेशनदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे दुपारी तीन वाजता पुण्याहून लोणावळ्याला जाणारी लोकल आणि दुपारी दोन वाजता लोणावळ्याहून पुण्याला येणारी लोकल चिंचवड स्थानकापर्यंतच धावणार होती.

पालिका उत्पन्नाच्या ‘दहना’वर शिक्कामोर्तब

$
0
0
होर्डिंग व्यावसायिकांच्या हितासाठी शहराचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडविणाऱ्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी मंगळवारी फेटाळून लावली आणि त्याचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला. जाहिरात धोरण राज्य सरकारकडून मंजूर होईपर्यंत आता स्थायीने मान्यता दिलेल्या दरांनीच आकारणी केली जाणार हे स्पष्ट झाले.

माजी राज्यमंत्री मदनराव पिसाळ यांचे निधन

$
0
0
वाई तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री मदनराव गणपतराव पिसाळ यांचे उपचारादरम्यान पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी सात वाजता निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते ते आप्पा या नावाने सर्वत्र प्रसिद्ध होते. मदनराव गेले अनेक महिने मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते.

डीपीतील बदलाबाबत शिवसेनेतर्फे पत्र

$
0
0
शहराच्या भवितव्याचा विचार करून विकास आराखड्यातील (डीपी) शाळा, बागा, क्रीडांगणे, पार्किंग अशा महत्त्वाच्या ठिकाणची आरक्षणे बदलण्याचा घाट घालणा-या सत्ताधा-यांना रोखण्यासाठी शिवसेनेतर्फे खासदार आणि आमदारांना साकडे घालण्यात आले आहे.

मिर्चीची पूड टाकून सोनसाखळी हिसकावली

$
0
0
मेंढी फार्मजवळील वनविहार गेटसमोरून सोमवारी इव्हिनिंग वॉक घेत असलेल्या महिलेच्या डोळ्यात मिर्चीची पूड टाकून २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार घडला.

ऊसाला नव्हे; पाणी पिण्यासाठी देणार

$
0
0
‘दारात आलेल्या माणसाला पाणी देण्याची महाराष्ट्राची रीत आहे. त्यामुळे ऊसाला बाजूला सारून पिण्यासाठी पाणी देणार आहे,’ असे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘ऊसासाठी भूगर्भातील पाण्याचा उपसा केल्यास सरकार कडक पावले उचलेल,’ असा इशाराही त्यांनी दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images