Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रसिद्धीसाठीचे आरोप थांबवा

$
0
0
‘काही जणांना हल्ली चार वाजले की पत्रकार परिषद घेतल्याशिवाय चैन पडत नाही. कॅमेरासमोर चार कागद दाखवून कुणावर तरी आरोप करायचे, ते सिद्ध करण्याची गरज नसल्याने त्यांचे काही जात नाही. पण ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांना आयुष्य संशयित गुन्हेगारासारखे जाते.

१० वा पुलोत्सव ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान

$
0
0
चित्रपट, नाटक, संगीत आणि साहित्य यांचा मिलाफ असलेला यंदाचा दहावा ‘पुलोत्सव’ ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. संगीतमार्तंड पं. जसराज यांना ‘पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कारा’ने, तर प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांना ‘पु. ल. स्मृती सन्मान पुरस्कारा’ने गौरविले जाणार आहे.

गॅसची टंचाई आहे? ‘सिलिंडर’ची शेती करा!

$
0
0
अनुदानित सिलिंडर सहा मिळणार की नऊ, विनाअनुदानित सिलिंडरची किंमत नऊशे रुपये असणार की त्याहूनही जास्त, सिलिंडरच्या किमती पेट्रोलसारख्या सतत वाढणार का, या अवघड बनत चाललेल्या प्रश्नांवर विजय मिळवण्याच्या दिशेने यंदाची विजयादशमी सीमोल्लंघन करणारी ठरणार आहे.

खासगी कारखान्यासाठी विकासाचा ‘फास्ट-ट्रॅक’

$
0
0
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरदहस्त असलेल्या ‘दौंड शुगर लिमिटेड’ या खासगी साखर कारखान्याला नगर जिल्ह्यातील ऊस मिळावा, यासाठी भीमा नदीवर पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे गावक-यांनी मागणी केली नसतानाही सुमारे पावणेबारा कोटी रुपये खर्ची पाडून या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

डी. टी. एड.च्या सीइटीला मुहूर्त नाहीच!

$
0
0
डी.टी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा होण्याची सध्या कोणतीही शक्यता नसल्याची स्पष्टोक्ती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी पुण्यात केली. पात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून रुजू करून घेण्यासाठी शासनाकडे जागाच नसल्याने नव्या उमेदवारांना संधी द्यायची तरी कशी, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

आणखी २ दिवस ढगाळ हवा राहणार

$
0
0
शहरात थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत असतानाच, ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारी दिवसभर शहरात हवामान ढगाळ होते. रात्री उशिरा काही भागांत हलका पाऊसही झाला. पुढच्या दोन-तीन दिवसांत ढगाळ हवा कायम राहण्याची शक्यता असून, हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अंदाजही पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

देवीच्या दर्शनाला चाललेली महिला अपघातात ठार

$
0
0
चतुश्रृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी पायी चाललेल्या महिलेला सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास एका रिक्षा चालकाने उडवले. या अपघातात महिला ठार झाली तर रिक्षा चालक हा घटनास्थळावरून पळून गेला.

‘मेकॅनिक’ असल्याच्या बहाण्याने २ दुचाकी चोरल्या

$
0
0
‘तुमच्या स्कूटरच्या मागील चाकाचा नटबोल्ट सैल झाला आहे. मी मेकॅनिक आहे. नट चांगला बसवून देतो,’ असे सांगून एका भामट्याने दोन अॅक्टिव्हा दुचाकी पळवल्या. गुलटेकडी आणि केळकर रोडवर या घटना घडल्या असून, स्वारगेट आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आठवीपर्यंत नापास नाही, परीक्षा मात्र घ्यायचीच!

$
0
0
शिक्षणहक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत नापासच न करण्याच्या भूमिकेवर केंद्र सरकार ठाम आहे. त्याचप्रमाणे, नापास करायचे नसेल, तर परीक्षा कशासाठी घ्यायच्या, या भूमिकेचाही केंद्राकडून समाचार घेण्यात आला असून, कोणत्याही परिस्थितीत परीक्षा होणारच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘प्रवाशांच्या सुरक्षेसाठी PMP ने उपाययोजना कराव्यात’

$
0
0
पीएमपीच्या अपघातामध्ये दोन महिन्यांत पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी पीएमपी प्रवासी मंचातर्फे करण्यात आली आहे.

‘पीएमपी’ कर्मचा-यांच्या दिवाळी बोनसवर पाणी?

$
0
0
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ‘बोनस’च्या माध्यमातून दिवाळी उत्साहात साजरी करण्याची स्वप्ने पाहणा-या ‘पीएमपीएमएल’ कर्मचा-यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस देण्यास पालिका प्रशासनातर्फे असमर्थतता व्यक्त करण्यात आली.

तोरणाची मिरवणूक रोखली

$
0
0
तोरण काढण्याचा ‘कॉलेजिअन्स’मधील उत्साह पाहता पोलिसांनी शहराच्या मध्यवस्तीतील कॉलेजच्या प्राचार्यांना नोटीसा बजावल्या आहेत. आपले विद्यार्थी तोरण मिरवणूक काढणार नाही, याबाबत खबरदारी घ्या, अशा आशयाच्या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

पहिला मराठी-जर्मन शब्दकोश प्रकाशित

$
0
0
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ प्रा. अविनाश बिनीवाले यांनी संपादित केलेल्या पहिल्या मराठी-जर्मन शब्दकोशाचे प्रकाशन नुकतेच झाले. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हा कोश प्रकाशित करण्यात आला आहे.

‘बीआयएन’साठी कर्मचारी त्रस्त

$
0
0
कोषागार कार्यालयाकडून ‘बीआयएन’ (बूक आयडेंटिफीकेशन नंबर) मिळण्यास दिरंगाई होत असल्याने राज्य शासकीय कर्मचा-यांवर नाहक आयकराचा बोजा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली दहा महिने प्रतीक्षा करूनही ‘बीआयएन’ मिळत नसल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

समाजकल्याण आयुक्तांच्या चौकशीची मागणी

$
0
0
‘शासकीय संस्थेमध्ये सुरक्षा रक्षक नेमताना जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडील कर्मचारी घेणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत बेकायदा पद्धतीने टेंडर काढणा-या समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांची खातेअंतर्गत चौकशी करावी,’ अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे करणार असल्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

दिवाळीत प्रवास ‘दिवाळे’ काढणार

$
0
0
नागपूर दोन हजार ते अडीच हजार रुपये...अमरावती सुमारे दोन हजार रुपये...यवतमाळ दीड हजार ...जबलपूर पावणेतीन हजार...बेंगळुरू दोन हजार रुपये ! हे प्रवास दर, कुठल्या विमान प्रवासाचे नव्हेत; तर खासगी ट्रॅव्हल्सचे आहेत. दिवाळीत पुण्याहून घरी जाण्यासाठी आता एवढे पैसे मोजावेच लागतील. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सामान्यांचे ऐन दिवाळीत ‘दिवाळे’ निघण्याची शक्यता आहे.

पालिकेतर्फे लोहगावमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई

$
0
0
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून बोपोडी आणि लोहगाव येथे अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. बोपोडीत सर्व्हे क्रमांक ६२ येथे परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले होते.

कोणत्याही मजल्यावर काढा हॉटेल

$
0
0
निवासी किंवा व्यावसायिक इमारतीमधील कोणत्याही मजल्यावर मोकळी जागा असेल, तर पालिकेच्या नव्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डीसी रूल) तुम्ही हॉटेल व्यवसाय करण्यासाठी पात्र ठरू शकाल. विकास आराखड्याअंतर्गत (डीपी) हा महत्त्वपूर्ण बदल इमारतीतील रहिवासी आणि व्यावसायिकांनाही धोक्याचा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

फसिह महमंदचे मुंबईतील स्फोटांशी संबध

$
0
0
इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख असलेल्या भटकळ बंधूबरोबर दक्षिण कर्नाटकातील भटकळ येथे इंडियन मुजाहिदीनची स्थापनेतील महत्वाचा सूत्रधार असलेल्या फसिह महमंद याचे मुंबईतील १३/७ स्फोटांशी संबध असल्याचे पुरावे यंत्रणांना मिळाले आहेत. फसिहला पुण्यातील स्फोटांसबंधीही माहिती असल्याचा यत्रंणाचा कयास आहे.

‘शूटआऊट’ रोखणा-या पोलिस-नागरिकांचा सत्कार

$
0
0
एस. पी. कॉलेजच्या मैदानाजवळ एकाचा खून करण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावलेल्या तिघांना पकडण्यात मोलाची कामगिरी करणारे पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ आणि सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी रोख पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images