Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

यूजीसीचे ‘अकॅडेमिक जॉब पोर्टल’

$
0
0
देशभरातील नेट-सेट पात्रताधारक उमेदवार आणि पीएचडी प्राप्त संशोधकांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) ‘अॅकेडेमिक जॉब पोर्टल’ची निर्मिती करण्यात येत आहे. अशा उमेदवारांना उपलब्ध नोक-यांची माहिती मिळावी आणि नोकरी देऊ इच्छिणा-यांनाही पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती मिळावी, म्हणून यूजीसीने हे पाऊल उचलले आहे.

प्रोफेसर भरतीसाठी नेट/सेट पात्रता निकष कायम

$
0
0
राज्य विद्यापीठांतील कुलगुरू निवडीचे निकष विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शिथिल केले असले, तरी लेक्चरर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी नेट/सेट पात्रतेचा निकष कायम असल्याचे स्मरण ‘यूजीसी’ने कॉलेज आणि विद्यापीठांना करून दिले आहे.

चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी ‘सीए डॅशबोर्ड’

$
0
0
चार्टर्ड अकाउंटंट्सना त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधता यावा, तसेच लॅपटॉपवरून कोठेही त्यांचा व्यवसाय सांभाळता यावा, यासाठी पुण्यातील माईंडचिप्स कन्सल्टिंग्ज या कंपनीतर्फे ‘सीए डॅशबोर्ड’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूची लागण झाल्याने दोघांचा विविध हॉस्पिटलमध्ये दिवसभरात मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २५ झाली आहे. शहरात अठरा जणांना लागण झाली असून त्यातील दोघे व्हेंटीलेटरवर आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या खात्यात ट्रान्स्परन्सी ‘ऑफलाइन’

$
0
0
टेकसॅव्ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्यात ई-गव्हर्नन्स आणि ट्रान्स्परन्सी ऑफलाइन झाली आहे. सरकारने घेतलेले निर्णय, आदेश, परिपत्रके वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याकडे बहुतेक विभाग काणाडोळा करीत असल्याचे स्पष्ट झाले असून हे माहिती अधिकाराच्या कायद्याचेही उल्लंघन असल्याची टीका करण्यात येत आहे.

९४ टक्के डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटलमध्ये

$
0
0
मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण एकीकडे कमी होत असताना राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील गर्भवतींच्या डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटलमध्येच करण्याचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत चांगलेच वाढले आहे. सद्यस्थितीत राज्यात ९४ टक्के बाळंतपणे ही सरकारी हॉस्पिटलमध्येच होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

बोटांच्या शस्त्रक्रियेसाठी सिरॅमिक सांध्यांचा वापर

$
0
0
हाता-पायांच्या बोटांच्या छोट्या सांध्यांच्या ऑपरेशनसाठी सिरॅमिकच्या सांध्यांचा वापर करण्याचा प्रयोग वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून सध्या त्यासाठी सिलिकॉनचा वापर केला जातो.

भाषावाढीच्या क्षुधाछंदी विक्रमी झुंज

$
0
0
सर्वांत मोठे शब्दकोडे आणि अनुप्रास अलंकारातील सर्वांत मोठी कथा लिहून विश्वविक्रम नोंदवल्यानंतर मिलिंद शिंत्रे यांनी आणखी एक विश्वविक्रम केला आहे. मराठी भाषेतील ‘क ते ज्ञ’ या सर्व चौतीस व्यंजनांचा समावेश असलेले मराठीतील सर्वांत छोटे वाक्य त्यांनी तयार केले आहे. ‘रेकॉर्ड होल्डर रिपब्लिक लंडन’ या संस्थेने या विश्वविक्रमाची नोंद घेतली आहे.

अल्बुमिन वाढवा, डायबेटीस घटवा

$
0
0
रक्तामध्ये सापडणा-या ‘अल्बुमिन’ प्रकारातील प्रथिनांचा डायबेटीसवर होणारा परिणाम अभ्यासण्यामध्ये पुण्यातील शास्त्रज्ञांच्या गटाला नुकतेच यश मिळाले आहे. डायबेटीसचे घातक परिणाम टाळण्यासाठी पेशंटच्या रक्तातील अल्बुमिनची पातळी सर्वसामान्य व्यक्तींएवढीच ठेवणा-या औषधांचा वापर केल्यास त्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो, अशा निष्कर्षापर्यंत हे शास्त्रज्ञ पोहोचले आहेत.

सहकारी कारखानदारीवरचे ‘खासगी’चे अतिक्रमण रोखा

$
0
0
बक्कळ पैसा असलेल्या उद्योजकांकडून खासगी साखर कारखाने काढले जात असून सहकारी साखर कारखाने मात्र बंद पडत आहेत. सहकारी साखर कारखान्यांवर होणारे ‘खासगी’चे हे अतिक्रमण थोपविले पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खासगी कारखानदारीत शिरलेल्या राजकारण्यांवर शरसंधान केले.

‘ओपन स्पेस’मध्ये बांधकामांना सोसायट्यांना परवानगी

$
0
0
सोसायट्यांमधील मोकळ्या जागांवर (ओपन स्पेस) खेळांच्या मैदानाचे आरक्षण टाकले गेल्यास संबंधित जागांवर सोसायट्यांकडून उद्यान किंवा मैदान विकसित करता येणार आहे. मात्र, नागरिकांसाठी ते खुले ठेवण्याची अट घालण्यात आली आहे.

‘सेव्हन वंडर्स’चे दर कमी होणार ?

$
0
0
पुणे महापालिकेच्या सहकारनगर येथील चव्हाण उद्यानासाठी स्थायी समितीने ठरविलेले दर अखेर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची चिन्हे आहेत. पक्षनेत्यांच्या बैठकीत हे दर कमी करण्याविषयी एकमत झाल्याने स्थायी समितीमध्ये आलेला फेरविचाराचा प्रस्ताव मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

बिल्डरांच्या हितासाठीच आरक्षण बदलांचा घाट

$
0
0
शहरातील केवळ काही बड्या बिल्डरांच्या हितासाठीच महत्त्वाची आरक्षणे उठविण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतला असल्याची टीका विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांनी मंगळवारी केली. शहराच्या विकास आराखड्यातील कोणतेही आरक्षण हलवू देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

‘वाङ्मय संस्कृती हा अनमोल ठेवा’

$
0
0
‘माणसाला वाङ्मय निर्मितीचा शोध लागला आणि तो वाचन करू लागला. वाचनामुळे माणूस समृद्ध होत गेला. हाच त्याचा आयुष्यतला सर्वोच्च बिंदू मानला पाहिजे. वाङ्मय संस्कृती हा माणसाला लाभलेला अनमोल ठेवा आहे’, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांनी बुधवारी व्यक्त केले.

RSS चे विजयादशमीनिमित्त संचलन

$
0
0
विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहराच्या सहा भागांतून संचलने काढण्यात आली. या संचलनात सुमारे साडेतीन हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.

समस्यारुपी रावणाचे पुणेकरांच्या साक्षीने दहन

$
0
0
भ्रष्टाचार, प्रदूषण, महागाई, रोगराई, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी अशा विविध समस्यांच्या रावणाचे दहन बुधवारी पुणेकरांच्या साक्षीने झाले. नदीपात्रामध्ये तब्बल तीस फूटी रावणाची प्रतिकृती उभी करण्यात आली होती. रावणदहन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

निधी पळविल्याचा मनसेचा आरोप

$
0
0
मंगळवार पेठेतील शिवाजी स्टेडियमच्या विकासासाठी बजेटमध्ये राखून ठेवलेला निधी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियमसाठी पळविल्याचा आरोप मनसेच्या सदस्यांनी बुधवारी केला. महापालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष अविनाश बागवे यांनी फक्त आपल्या प्रभागापुरता विचार न करता संपूर्ण शहराचा विचार करावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे आणि नगरसेवक अजय तायडे यांनी केली.

वाहननोंदणीचा पिंपरीत विक्रम

$
0
0
इंधनाच्या दरातील वाढ आणि कर्जावरील व्याजदर चढे असूनही साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहनप्रेमी वाहन खरेदीचा ट्रेंड कायम राखला. यंदा कारला पसंती मिळाली आहे.

चतुःशृंगीवर जल्लोषात पुष्पवृष्टी

$
0
0
वेळ सायंकाळी साडेपाचची. चतुःशृंगी मंदिराच्या परिसरात आबालवृद्धांची गर्दी. देवीच्या पालखीमार्गावरील साऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खिळलेल्या. घरघरत आलेले हेलिकॉप्टर पाहून झालेला जल्लोष नि त्यामधून होणारी पुष्पवृष्टी अंगावर झेलत देवीपुढे नतमस्तक झालेले भाविक...

अंधश्रद्धेमुळे फसवणूक झाल्यास तक्रार द्या

$
0
0
अंधश्रद्धेमुळे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images