Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एसपीव्ही’ला मंजुरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे



केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या बहुचर्चित 'स्पेशल पर्पज व्हेइकल' (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी मान्यता देण्यात आली. पुणेकरांवर वाढीव पाणीपट्टी बोजा लादल्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा पालिकेत मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचा विरोध डावलून सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीने भाजप, सेनेच्या मदतीने मतदानाच्या जोरावर हा प्रस्ताव मान्य करून घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासदांनी याला कडाडून विरोध केला.



या कंपनीमुळे महापालिकेच्या अधिकारांवर कोणतीही गदा येऊ नये, अशी मागणी करून भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी एसपीव्हीला विरोध केला होता. हा विरोध लक्षात घेऊन माजी केंद्रीय कृषिमंत्र्यांत्री शरद पवार यांनी महापालिकेच्या अधिकारांवर कोणतीही गदा येणार नाही, असे स्पष्ट करून सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन 'एसपीव्ही'चा मसुदा करण्याची सूचना केली होती. मात्र, त्यापूर्वीच हा मसुदा मंजुरीसाठी ठेवल्याने काँग्रेससह, मनसेच्या सभासदांनी त्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली.



नवनिर्वाचित महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात होताच, कंपनीचे स्वरूप, अधिकार आणि प्रत्यक्ष होणारी कामे यांची माहिती मराठीत देण्याची मागणी करीत मनसेच्या सभासदांनी आंदोलन केले. 'एसपीव्ही'ला देण्यात येणाऱ्या अधिकारांमुळे पालिकेच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली होणार असल्याची टीका करत काँग्रेसचे अभय छाजेड यांनी विरोध केला. 'एसपीव्ही'च्या नावाखाली छोटी पालिका तयार करणार का, पुणेकरांना सेवांसाठी वाढीव पैसे मोजावे लागणार आहे, शहरात असमतोल विकास होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. बांधकाम परवानगीचे अधिकार कंपनील का देण्यात येणार आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.



खासगी सहभागातून (पीपीपी) प्रकल्प, कंत्राटे, करार-भागीदारीचे अधिकार या कंपनीकडे येणार असल्याचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी नक्की कोणाच्या हितासाठी हा प्रस्ताव मान्य करत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. या मसुद्यात कंपनीच्या संचालकांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविण्याचा घाट घातल्याचा आरोप संजय बालगुडे यांनी केला. कंपनीराज आणण्याचा घाट राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने घातल्याचा आरोप मनसेच्या वनिता वागस्कर यांनी केला. पालिकेच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या तरतुदी रद्द करण्याची काँग्रेसची उपसूचना नामंजूर करण्यात आली. मतदान घेऊन राष्ट्रवादीने भाजप, सेनेच्या मदतीने ८५ विरुद्ध ४८ मतांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.




उपसूचना



- 'एसपीव्ही'च्या कामात पारदर्शकतेसाठी एमआयएसचा वापर करावा



राज्य, केंद्र सरकारने कंपनीला परस्पर आदेश न देता पालिकेशी चर्चा करावी.



- एसपीव्हीचे काम दोन वर्षात बंद करण्याचा निर्णय झाल्यास राज्य सरकारने तीन महिन्यांत अंमलबजावणी करावी.



- कंपनीला नाव देण्याचा अधिकार महापौरांना द्यावा


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशांत जगताप नवे महापौर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची, तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या मुकारी अलगुडे यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. जगताप आणि अलगुडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनुक्रमे अशोक येनपुरे आणि वर्षा तापकीर यांचा पराभव केला.

दत्तात्रय धनकवडे आणि आबा बागूल यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे, महापौर-उपमहापौरपदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत तीन उमेदवार असले, तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे असलेल्या बहुमतामुळे दोन्ही उमेदवार सहज विजयी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन्ही पदांसाठी उमेदवार दिले असले, तरी त्यांनी माघार घेतली. तसेच, त्यानंतर सभागृहात उपस्थित असूनही त्यांनी निवडणूक प्रकियेत भाग घेतला नाही. महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये अनुक्रमे जगताप आणि अलगुडे यांना ८४ मते पडली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार येनपुरे आणि तापकीर यांना अवघी २५ मते पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-नाशिक अखेर ‘मार्गा’वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये पुण्यासाठी 'थोडी खुशी...थोडा गम' अशी परिस्थिती आहे. बहुप्रतिक्षीत पुणे-नाशिक रेल्वे, पुणे-लोणावळादरम्यान तिसरी लाइन टाकणे, हडपसर येथे टर्मिनल उभारणे, पुणे रेल्वे स्टेशनची पुनर्रचना करणे आदींना बजेटमध्ये मान्यता दिली असून, यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पुणे-लोणावळा लोकलची संख्या वाढविणे, पुणे-दौंड मार्गावर लोकल सुरू करणे या पुणेकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयांकडे डोळेझाक करण्यात आली आहे.

पुणे-नाशिक या बहुचर्चित प्रकल्पाला केंद्र सरकारने दिलेली मान्यता ही, यंदाच्या रेल्वे बजेटमधील मोठा निर्णय आहे. पुणे-लोणावळा तिसरी लाइन, हडपसर टर्मिनल याबरोबरच पुणे विभागात पुणे-मिरज-लोंढा या मार्गाच्या दुपदीकरणासाठी निधीची तरतूद केली आहे. पुणे विभागात नऊ ठिकाणी रेल्वे मार्गावर ओव्हरब्रिज बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. वैभववाडी-कोल्हापूर, कराड-चिपळूण या मार्गांसाठीही निधी देण्यात आला आहे.

याचा विचारही नाही

पुणे-लोणावळा मार्गावर लोकलची संख्या वाढविण्याची मागणी केली जात होती. तसेच, दौंड, पाटस, केडगाव, यवत या सारख्या गावांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुणे ते दौंड लोकल सेवा सुरू करण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या दोन्हीकडे बजेटमध्ये काणाडोळा करण्यात आला आहे. तसेच, पुणे-सातारा, पुणे-वाल्हे या मार्गांवर लोकल सुरू करणे व बारामती-लोणंद-फटलण या दरम्यानचा मार्ग करणे हे प्रस्ताव अद्याप प्रलंबित ठेवले गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसर टर्मिनल मार्गी

$
0
0

हडपसर टर्मिनल मार्गी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला रेल्वेच्या हडपसर येथील टर्मिनलचा प्रश्न या बजेटमध्ये मार्गी लागला आहे. टर्मिनससाठी बजेमध्ये २३ कोटी ९४ लाख रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. येत्या पाच वर्षात हडपसर येथे टर्मिनल उभे राहील, अशी शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या दररोज १५० प्रवासी गाड्या व २५ मालगाड्यांची वाहतूक चालते. मात्र, पुणे स्टेशनच्या सध्याच्या यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जवळपासच्या स्टेशनचा विस्तार करण्याची संकल्पना काही वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. तेव्हा सर्वप्रथम खडकी स्थानकाच्या विस्ताराचा विचार झाला. मात्र, तेथे पुरेशी जागा नसल्याने हडपसरमध्ये पर्यायी टर्मिनल उभारण्याचे नियोजन करण्यात आले. अखेरीस रेल्वे बजेटमध्ये टर्मिनलच्या पुढच्या कामासाठी २३.९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुरुवातीला टर्मिनलसाठी सर्व्हे केला जाणार आहे, अशी माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या हडपसर येथे दोन प्लॅटफॉर्म आहेत. टर्मिनल उभारतेवेळी तेथे आणखी दोन प्लॅटफॉर्म नव्याने उभारले जाणार आहेत. तसेच, दोन 'लुप लाइन' टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सहा लाइनवरून वाहतूक नियंत्रित करणे शक्य होणार आहे. हे टर्मिनल कार्यान्वित झाल्यास, अनेक गाड्या पुणे स्टेशनऐवजी येथून सोडता येतील, असे माहिती दादाभॉय यांनी सांगितले.

पुणे स्टेशनची पुनर्रचना

पुणे स्टेशन यार्डच्या पुनर्रचनेसाठी बजेटमध्ये ३८ कोटी सात लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पुनर्रचनेमध्ये प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार आहे. सध्या पुणे स्टेशनवरील सहा प्लॅटफॉर्मपैकी केवळ एकाच प्लॅटफॉर्मवर २६ डब्यांची गाडी थांबू शकते. त्यामुळे २६ डब्यांची गाडी स्टेशनवर दाखल झाल्यानंतर संबंधित प्लॅटफॉर्म उपलब्ध नसेल, तर बाकीच्या २६ डब्यांच्या गाड्यांना प्रतीक्षा करावी लागते.

लोणावळा तिसरी लाइन

पुणे-लोणावळ्यादरम्यान तिसरी लाइन टाकण्यासाठी ७९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. त्यापैकी ७५ कोटी या बजेटमध्ये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाइनचे कामही सुरू होईल. सुरुवातीला या मार्गासाठी सर्व्हे होईल.

'ब्लॉक हट' योजना

पुणे ते दौंड या मार्गावर हडपसर ते लोणी, लोणी ते उरळी, उरळी ते यवत, यवत ते केडगाव, केडगाव ते पाटस, पाटस ते दौंड या दरम्यान सहा ठिकाणी 'इंटरमीजिएट ब्लॉक हट' योजना राबविली जाणार आहे. 'ब्लॉक हट' म्हणजे रेल्वेच्या सध्याच्या सिग्नल यंत्रणेच्या दरम्यान आणखी वाढीव सिग्नल देऊन, गाड्यांचे नियोजन करणे. सध्या हडपसरवरून निघालेल्या गाडीला पुढील सिग्नल मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. मात्र, 'ब्लॉक हट'मुळे एका वेळेस दोन गाड्या धावू शकतील.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शौर्य महोत्सवा’तून टोपेंना मानवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय व राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील सूत्रधार स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या जन्मद्विशताब्दीनिमित्त शनिवारवाड्यावर 'शौर्य महोत्सवा'तून त्यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारच्या वतीने तात्या टोपे जन्मद्विशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत शौर्य महोत्सव रंगणार आहे. यामध्ये आज (शुक्रवार) शाहीर विजय तनपुरे व शाहीर संगीता मावळे पोवाडा सादर करणार आहेत. सातारा येथील उदय यादव यांचा छावा ग्रुप व मुंबई येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समाज प्रबोधिनी युद्धकलेची प्रात्यक्षिके दाखविणार आहेत. २७ तारखेला शाहीर राजू राऊत व शाहीर अनिता खरात पोवाडा सादर करणार आहेत. गोपाळ सूर्यवंशी व कोल्हापूर येथील संदीप जाधव यांचा रामकृष्ण मर्दानी खेळ विकास मंच युद्धकलेची प्रात्यक्षिके दाखविणार आहेत.
मुख्य कार्यक्रम २८ तारखेला होणार असून, 'पहिला एल्गार' या कार्यक्रमात प्रवीण तरडे, निरंजन भाकरे, राहुल सोलापूरकर आदींचा सहभाग असेल. या वेळी तात्या टोपे यांना मानवंदना देण्यात येणार असून, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारवाडा पटांगणावर हा कार्यक्रम होणार आहे. तीन दिवसांतील सर्व कार्यक्रम याच ठिकाणी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-नाशिक रेल्वे ‘रुळावर’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या ११ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेला केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. केंद्र सरकारने पुणे-नाशिकच्या २६५ किलोमीटर मार्गासाठी एक हजार २१२ कोटी पाच लाख रुपये निधीची तरतूद केली आहे.

पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी दोन हजार ४५० कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून खर्चाचा अर्धा-अर्धा भार उचलला जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारने त्यांच्या हिश्श्याचे एक हजार २१२ कोटी पाच लाख मंजूर केले. पुणे व नाशिक या शहरांना जोडणारा हा रेल्वेमार्ग नागरी व औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त आहे.
पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचा विकास होणार आहे. चाकण, रांजणगाव एमआयडीसीतील उद्योगांनाही त्याचा फायदा होणार आहे. या भागातील शेतमालाची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. यापूर्वी या मार्गास पुरवणी मागण्यांद्वारे तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. मात्र, केंद्रीय नियोजन मंडळाकडे प्रस्ताव रखडल्याने प्रत्यक्ष काम झाले नाही. आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बजेटमध्येच या मार्गासाठी निधीची तरतूद केल्याने पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वप्रथम २००५ मध्ये पुणे-नाशिक रेल्वेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. तेव्हा या मार्गासाठी अपेक्षित खर्च ७५० कोटी रुपये होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजयने केली कैद्याला मदत

$
0
0

वंदना घोडेकर

फर्लोच्या रजेवर असताना काही महिन्यांपूर्वी त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात मुंबईहून पुण्यातील एका वकिलाला पत्र पाठविले. जेलमध्ये भेटलेल्या एका कैद्याची केस चालवावी म्हणून विनंती केली. खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या त्या कैद्याला केसची फी देणेही शक्य नव्हते. त्याच्या केसचा सर्व खर्च उचलण्याची तयारी संजयने दर्शविली होती. त्यासाठी लागणारी पहिल्या टप्प्यातील फी अदा करण्यात आली. संजय दत्तने केलेल्या मदतीमुळे त्या कैद्याच्या केसची सुनावणी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात सुरू झाली आहे.


या केसमधील वकील संतोष भागवत यांनी 'मटा'ला ही माहिती सांगितली. संजय जेलमध्ये असताना तेथील अनेक कैद्यांबरोबर त्याची ओळख झाली होती. वानवडी पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या सागर गायकवाड याच्याबरोबर त्याची ओळख झाली होती. गायकवाडतर्फे त्याची केस पाहण्यासाठी वकील नेमण्यात आलेला नव्हता. तसेच त्याला आपल्या केससाठी लागणारी फी देणेही शक्य नव्हते. संजय दत्तबरोबर ओळख झाल्यानंतर त्याने ही बाब त्याला सांगितली होती. काही महिन्यांपूर्वी फर्लोच्या रजेवर बाहेर असताना मुंबईहून संजय दत्तने पुण्यातील अॅड. भागवत यांना स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्ये लिहिलेले पत्र पाठविले होते.


सागर गायकवाड कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने आपली आई, पत्नी आणि मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. गायकवाडची ऐपत नसल्याने केसची फी आपण देऊ असे आश्वासन संजय दत्तने दिले.


प्रारंभी ही केस घेण्यास आपण तयार नव्हतो. मात्र, ही विनंती विचारात घेऊन आपण ही केस स्वीकारली. संजय दत्तने केवळ माणुसकीच्या नात्याने पाठपुरावा केला आहे. संबंधित पक्षकाराच्या केसची सुनावणी शिवाजीनगर कोर्टात विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टात सुरू झाली आहे, अशी माहिती भागवत यांनी दिली. जेलमध्ये शिक्षा भोगत असल्यामुळे संजय दत्तने या केससाठी केलेल्या मदतीची यापूर्वी कोणाला माहिती देण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानवृक्षाखाली खुलणार शब्दफुलांचे चांदणे...

$
0
0

निवडक कवींना दोन दिवस काव्यवाचनाची संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बालकवितांपासून प्रेमकवितांपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून विश्वाला साद घालणाऱ्या वैश्विक विषयांपर्यंतच्या कवितांचा मोठा पट 'मटा'कडे आलेल्या कवितांमधून उलगडला आहे. २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये रंगणाऱ्या 'मटा मैफल'मध्ये दोन दिवस काव्यकट्टा खुलणार असून, त्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून कवींनी आपल्या कविता 'मटा'कडे पाठविल्या आहेत. त्यातील निवडक कवींना आपल्या कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. गोखले संस्थेच्या आवारातील 'ज्ञानवृक्षा'खाली कवितावाचन होणार आहे.

साहित्यरसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी असलेल्या 'मटा मैफली'त शनिवारी (२७ फेब्रुवारी) दुपारी तीन ते सायंकाळी ६.३० या वेळेत 'मटा'च्या वाचकांना काव्यवाचनाची संधी दिली जाणार आहे. त्याशिवाय रविवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी दोन ते चार या वेळेत काव्यमैफलीचा प्रवास सुरूच राहील. काव्यकट्ट्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन 'मटा'ने केले होते, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्यांच्या कविता काव्यवाचन सादर करण्यासाठी निवडल्या गेल्या आहेत, त्यांना तसे स्वतंत्रपणे कळविण्यात आले आहे. कळविलेल्या दिवशी कविता वाचनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपली कविता सादर करावयाची आहे. या मैफलींचा श्रवणानंद घेण्यासाठी आवर्जून या मैफलीत सहभागी व्हावे. कार्यक्रम सर्व साहित्यरसिकांसाठी खुला आहे.

मराठी भाषा, साहित्य, कविता, गीते यांबाबत परिसंवाद, मुलाखत, सादरीकरण, कार्यशाळा आदींद्वारे चर्चा करणाऱ्या या मैफलीच्या निमित्ताने लघुत्तम कथा आणि लघुकथा स्पर्धा आयोजिण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धांना वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीचे जगताप पुण्याचे नवे महापौर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि उपमहापौरपदी काँग्रेसच्या मुकारी अलगुडे यांच्या निवडीवर गुरुवारी औपचारिक शिक्कामोर्तब झाले. दोन्ही उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा ५९ मतांनी पराभव केला. भाजप-शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केले होते, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदानात भागच घेतला नाही.

राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे आणि काँग्रेसचे आबा बागूल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. राष्ट्रवादी-काँग्रेसकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने जगताप आणि अलगुडे यांची निवड अर्ज भरण्याच्या दिवशीच नक्की झाली होती. त्यावर गुरुवारी सभागृहाच्या मान्यतेची मोहोर उमटली. महापौर-उपमहापौर निवडणुकीत जगताप आणि अलगुडे यांची निवड झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत जल्लोष केला.
महापौर-उपमहापौर पदासाठी चौरंगी लढत अपेक्षित होती; पण मनसेने दोन्ही निवडणुकीतून माघार घेतली. भाजप-सेनेचे उमेदवार रिंगणात कायम राहिल्याने निवडणूक अटळ होती. त्यानुसार सुरुवातीला महापौरांची निवडणूक झाली. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीमुळे प्रशांत जगताप यांना ८४ मते मिळाली. भाजपच्या अशोक येनपुरे यांना २५, तर शिवसेनेच्या सचिन भगत यांना १२ मते मिळाली. जगताप यांची निवड जाहीर होताच, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांना खांद्यावर उचलूनच महापौरांच्या आसनापर्यंत नेले. पीठासीन अधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या. जगताप यांचे कुटुंबीयही या वेळी आवर्जून उपस्थित होते.

महापौरांच्या निवडणुकीनंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीतही पक्षीय बलाबल कायम राहिल्याने काँग्रेसचे मुकारी अलगुडे यांनी भाजपच्या वर्षा तापकीर यांचा पराभव केला. शिवसेनेच्या योगेश मोकाटे यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महापौर-उपमहापौरांच्या निवडीनंतर सर्वपक्षीय सदस्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
...............
शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवून पुण्याला पुढे नेण्यासाठी कायम प्रयत्नशील राहीन. सर्वसामान्य जनतेसाठी पदाचा वापर करण्याला प्राधान्य देत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर असेल.
प्रशांत जगताप, महापौर, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: हनुमान टेकडी परिसरात विद्यार्थिनीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हनुमान टेकडीवर अभ्यासासाठी गेलेल्या एका नामांकित कॉलेजमधील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरटयाने विद्यार्थिनीची पर्स, आणि इतर मौल्यवान वस्तु चोरून नेल्या आहेत. घाबरलेली असलेल्यामुळे विद्यार्थिनीने गुरुवारी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून विजय विकास कांबळे (वय २१, रा. चतुःश्रृंगी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थिनी ही एका नामांकित कॉलेजमध्ये बीएससी इकॉनॉमिक्सच्या प्रथम वर्षाला शिकते. ती मूळची पश्चिम बंगाल येथील असून पुण्यात ती सेनापती बापट रोड परिसरात मैत्रिणीसोबत भाड्याने राहते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो पुस्तकांचा खजिना खुला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एका बाजूला पोटासाठी कष्ट करत असताना दुसरीकडे साहित्याच्या प्रेमापोटी अण्णांनी पुस्तकांचा संग्रह केला. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे याला अधिकृत स्वरूप देऊन पुस्तकांचा संग्रह संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला करण्यात येणार आहे,' असे ज्येष्ठ कवी डॉ. अरुणा ढेरे यांनी शुक्रवारी सांगितले.

चिमण्या गणपती मंडळातर्फे 'मराठी भाषा दिना'निमित्त ३० हजारांपेक्षा अधिक पुस्तकांची ग्रंथसंपदा संग्रहित करणाऱ्या लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक व संशोधक रा. चिं. ढेरे यांना 'साहित्य सेवा सन्मान' त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. डॉ. अरुणा ढेरे यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी त्या बोलत होत्या. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे विभागीय सरव्यवस्थापक सुशील जाधव, जनता बँक सहकारनगर शाखेचे सहशाखाव्यवस्थापक अभय पाठक, पराग ठाकूर, संदीप गायकवाड, सुरेश पवार, मंडळाचे अध्यक्ष सुनील रसाळ, बंडोपंत गोडबोले, भगवान बलकवडे, कुमार रेणुसे, नीलेश दुधाणे आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. ढेरे म्हणाल्या, 'आजच्या संशोधकांना संशोधन करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, यापूर्वी कष्ट करून पुढे आलेल्या संशोधकांचा सन्मान गणपती मंडळ करत आहेत, याचे कौतुक वाटते.' या कार्यक्रमात निंबाळकर तालीम मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, जयजवान मित्र मंडळ, नवा विष्णू नवरात्रोत्सव मंडळ, त्वष्टा कासार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन आनंद सराफ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरोदिया करंडकावर ‘सीओईपी’चे नाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तरुणाईचे भावविश्व जाणून त्याचे प्रतिबिंब उमटवणारी स्पर्धा, अशी ओळख असलेल्या फिरोदिया स्पर्धेच्या करंडकावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी)ने नाव कोरले. सीओईपीचे नाव पुकारताच 'आवाज कुणाचा सीओईपीचा',अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. दुसरा क्रमांक व्हीआयआयटीने, तर तिसरा क्रमांक स. प. महाविद्यालयाने पटकावला.

सामाजिक आर्थिक विकास संस्था,'स्वप्नभूमी'निर्मित फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे यंदा ४२वे वर्ष आहे. ही स्पर्धा अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पार पडली. गुरुवारी मध्यरात्री या स्पर्धेचा निकाल जाहीर होताच सीओईपीच्या घोषणेने नाट्यगृह दुमदुमून गेले. प्राथमिक फेरीतील २८ संघामधून नऊ संघांनी अंतिम फेरीत बाजी मारली होती. त्यामध्ये विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय (आगाध), एमआयटी (असा मी), मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय (जातकवेणा), सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (आठ), अभियांत्रिकी महाविद्यालय(सीओईपी-गुलिस्ता), ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालय (डब्बा गुल), स. प. महाविद्यालय (नेव्हर एंडिंग रेस), पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्पुटर टेक्नॉलॉजी (अव्यक्त) व विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी-जयप्रभा) या महाविद्यालयांचा समावेश होता. आठ संघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे होते, तर स. प. महाविद्यालय हे एकमेव पारंपरिक महाविद्यालय या स्पर्धेत होते. अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या गर्दीतून स.प. महाविद्यालयाने तिसरा क्रमांक पटकावला. उमेश कुलकर्णी, संदीप खरे, महेश काळे, अमित फाळके, प्रसाद वनारसे, हृषीकेश देशपांडे, क्षितीज पटवर्धन, केदार पंडित, श्रुती मराठे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते २ मार्च रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होईल. विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चरित्र, अनुवादितसाहित्यामध्ये रुची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'चरित्र, अनुवाद, शास्त्रीय अशा साहित्याची वाचकांमध्ये अभिरूची वाढली आहे. साहित्य फक्त कथा, कादंबरया इतपत मर्यादित राहिलेले नाही. प्रकाशन व्यवसायावर गेल्या वर्षापर्यंत मंदीचे सावट होते, पण ते आता दूर होत आहे,' असे निरीक्षण कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या संचालिका देवयानी अभ्यंकर यांनी 'मटा'शी बोलताना नोंदविले. 'लेखक हा प्रकाशन संस्थांचा आत्मा असतो. त्यामुळे प्रकाशन संस्थांच्या दृष्टीने लेखकाचे महत्त्व मोठे आहे. कॉन्टिनेन्टल संस्थेला मोठे लेखक मिळाले, याचे समाधान आहे,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेला राज्य शासनाचा 'श्री. पु. भागवत पुरस्कार' जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आज (शनिवार) मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई येथे होणारया सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्त अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला असता, 'आमची तिसरी पिढी प्रकाशन व्यवसायात असून आजोबा अनंतराव कुलकर्णी यांनी कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेची १९३८ मध्ये स्थापना केली. वडील अनिरूद्ध व काका रत्नाकर कुलकर्णी यांनी संस्था नावारूपास आणली. सध्या भाऊ ऋतुपर्ण व मी संस्थेची धुरा सांभाळत आहोत,' असे त्यांनी सांगितले.

'द. र. कवठेकर यांचे नादनिनाद हे पहिले पुस्तक निघाले, त्यानंतर आजतागायत १ हजार ७०० पुस्तके कॉन्टिनेन्टलतर्फे प्रकाशित करण्यात आली आहेत. कुसुमाग्रज, शिवाजी सावंत, चि. वि. जोशी, ना. सं. इमानदार असे मोठे लेखक संस्थेला मिळाले. त्यामुळेच प्रगती होऊ शकली. मृत्युंजय, छावा, युगंधर, विशाखा, राऊ, मंत्रावेगळा, शहनशहा अशी मोठी ग्रंथसंपदा निर्माण करता आली,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 'शेती, निसर्ग, पर्यावरण या विषयाची साहित्यसंपदा निर्माण करण्याकडे आमचा कटाक्ष राहिला आहे,' याकडे अभ्यंकर यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर डाळीच्या दरात घसरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील विविध भागांमधून पुण्याच्या भुसार विभागात तूर डाळीची आवक झाली. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांची घट झाली आहे. लाखोली डाळीची चोरी छुपे विक्री होत असली, तरी त्याचा बाजारपेठेवर परिणाम होत नसल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे.

मध्यंतरी तूर डाळीचे दर गगनाला भिडले होते. त्यावेळी चोरी छुपे तूर डाळ म्हणून लाखोली डाळ विकली जात होती. ग्राहकांना स्वस्तात डाळ मिळत असल्याने त्याची खरेदी केली जात होती. परंतु, ग्राहकांची फसवणूक होत होती. लाखोळीची लागवड, साठा आणि विक्रीवरील बंदी केंद्र सरकारने हटविल्यामुळे इतर बाजारपेठांमध्ये त्याचा परिणाम दिसू लागला होता. मार्केट यार्डातील भुसार विभागात सध्या लातूर, अकोला भागातून तूर डाळीची आवक होत आहे. देशात १७० लाख टनापर्यंत उत्पादन होणार असून सध्या बाजारात नवीन तूर डीळीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागणी कमी असल्याने तूर डाळीचे दर घसरले आहेत, असे नितीन नहार यांनी सांगितले.

सध्या तूरडाळीला क्विंटलला १० हजार ८०० ते १२ हजार रुपये भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात एका किलोसाठी ११० ते १२२ रुपयांपर्यंत दर खाली उतरला आहे. दर वर्षी मूग डाळीचे भाव तुरीपेक्षा अधिक असतात. परंतु, मूग डाळीचे उत्पादन वाढल्याने किलोसाठी ९० रुपये मोजावे लागणार आहेत. मसूर डाळीला ५५ ते ५८ रुपये किलो, तर चणा डाळीला ५४ ते ५६ रुपये दर मिळाला आहे. नजीकच्या काळात तूर डाळीचे दर आणखी खाली उतरण्याची शक्यता असल्याचे नहार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची भूमिका दुटप्पी

$
0
0

हवेली तालुका कृती समितीचा आरोप; ३४ गावांच्या समावेशासाठी मोर्चा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या हद्दीशेजारील ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. त्यानतंर जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला हवेली तालुका नागरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, जालिंदर कामठे, बाळासाहेब हगवणे, रूपाली चाकणकर, संदीप घुले, सुनिल चांदेरे, दीपक बेलदरे, मालन भाडळे, नामदेव गोलांडे, राजभाऊ रायकर, प्रदीप दांगट, काका चव्हाण, पांडुरंग खेसे, शक्ती प्रधान, रमेश राऊत, डॉ. दादा कोद्रे आदी सहभागी झाले होते.
या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याबाबत राज्य सरकार हे दुटप्पी भूमिका घेत आहे. पालकमंत्री गिरीश बापट हे गावांच्या समावेशाबाबत दिशाभूल करीत आहेत, असे आरोप या वेळी करण्यात आले.
या ३४ गावांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनियंत्रित बांधकामे, पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय, ड्रेनेज आणि रस्त्यांची सुविधा नाही, नागरिकांसाठी उद्याने, क्रीडांगणे, शाळा आणि महाविद्यालये नसल्यामुळे या गावांची अवस्था दयनीय झाली आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन करण्यात आल्यानंतर केवळ बांधकामांना परवाने देण्याव्यतिरिक्त या गावांसाठी नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे या गावांचा महापालिकेत समावेश करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेकड्यांची सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हनुमान टेकडीवर घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे शहरातील सर्वच टेकड्यांवरील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाकडे गस्त घालण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने टेकड्यांवर सध्या भुरटे चोर आणि तळीरामांचा सुळसुळाट झाला आहे. टेकडीवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांना लुटणे आणि रात्री दारूपार्ट्या करणाऱ्यांवर आता तरी कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, पाचगाव पर्वती, वारजे यांसह सर्वच टेकट्या चहू बाजूंनी मानवी वस्तीने घेरलेल्या आहेत. या टेकड्यांवर सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, हे वनक्षेत्र अनेक गैरकृत्यांचा अड्डा बनले आहे. विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या या परिसरामध्ये गुंडांकडून धमकावणे, मारहाण होणे, लुटणे असे अनेक प्रकार यापूर्वी आणि नियमित घडत असतात, काही वेळा तक्रार केली जाते काही वेळा नाही. हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, चतुःशृंगी टेकडी येथे अशा अनेक घटना घडल्या आहेत.

आपल्या टेकड्यांचा अतिक्रमण, वृक्षतोड, पक्षांच्या-प्राण्यांच्या शिकारी, दारू आणि ड्रग्स चे अड्डे अशा अनेक गोष्टींसाठी वापर केला जातो; पण त्याकडे वन खात्याचे आणि पोलिसांचे दोघांचेही लक्ष नाही. टेकडीवर गस्त वाढली, तर गैरप्रकारांना आळा बसेल, असे टेकडीवर नियमित फिरायला जाणारे अमेय जगताप यांनी सांगितले. टेकडीवरील अवैध शिकारी, दारू पार्ट्यांसारखे गैरप्रकार थांबविण्यासाठी वन विभागाने सुरक्षारक्षक नेमावेत अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. वनाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काही वर्षांपूर्वी महापालिकेने सुरक्षारक्षक नेमले होते. पण, महापालिकेने आम्ही विकासकामांसाठीच पैसे देणार असे सांगून या रक्षकांचे पगार थांबवून कामावरून काढून टाकले, असे सुषमा दाते यांनी सांगितले.

............

सुरक्षारक्षकांसाठी महापालिका तयार नाही

टेकडीच्या चहू बाजूंनी होणारी अतिक्रमणे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी वन विभागाकडे मनुष्यबळ अपुरे असल्याने महापालिकेने खासगी सुरक्षारक्षक नेमण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव आम्ही आयुक्तांना दिला होता. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनीही त्यास स्पष्ट नकार दिला. टेकडीच्या सुशोभिकरणासाठी जाहीर केलेली रक्कमदेखील वर्षभरात दिलेली नाही, अशी माहिती उपवनसंरक्षक सत्यजीत गुजर यांनी दिली.

'नागरिकांनीच सुरक्षेचे शुल्क भरावे'

संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या लोकांशीही आम्ही सुरक्षारक्षांबद्दल चर्चा केली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ऐच्छिक प्रवेश शुल्क आकारायचे आणि त्या रकमेतून सुरक्षा रक्षकांच्या पगाराचे नियोजन करण्याचा आमचा उद्देश होता. पण, नागरिकांनीही या प्रस्तावास विरोध करून योजना बंद पाडली आहे. दरम्यान, वन विभागाने टेकडीच्याच्या सभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे इतर मार्गाने येणारे भुरट्या चोरांच्या वाटाच बंद होणार आहेत. या कामास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. नागरिकांनी तयारी दर्शविल्यास प्रवेश शुल्कातून सुरक्षारक्षक नेमण्यास आम्ही तयार आहोत, असे गुजर यांनी सांगितले.


टेकडीवर सतत लुटमारीच्या घटना

शहरात टेकड्यांवर फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अनेक तरुण-तरुणी देखील खास करून टेकड्यांवर फिरण्यासाठी येतात. या टेकड्यांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्था नसल्याचे या ठिकाणी येणाऱ्या एकट्या किंवा जोडप्यांना लुटण्याचे प्रकार नेहमी सुरू असतात. बुधवारच्या घटनेनंतर हनुमान टेकडी परिसरात पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे.

हनुमान टेकडीवर पुस्तक वाचत बसलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. पुणे शहरातील एक महत्त्वाचे ठिकाण असलेल्या हनुमान टेकडी येथे सकाळ-संध्याकाळ अनेक पुणेकर फिरण्यासाठी जातात. मात्र, त्याच टेकडीवर हा भीषण प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, तळजाई टेकडी, पर्वती टेकडीवर एकट्या व्यक्तीला किंवा जोडप्यांना हेरून लुटमार केल्याच्या घटना या ठिकाणी घडतात. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात हनुमान टेकडीवर लुटमारीचे दोन गुन्हे डेक्कन पोलिस दाखल आहेत. तसेच, पूर्वीदेखील या ठिकाणी लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी पर्वती टेकडीवर तरुण-तरुणींना लुटमार केल्याच्या अनेक घटना घडत होत्या. मात्र, त्या ठिकाणी गस्त वाढविण्यात आल्यानंतर त्या कमी झाल्या होत्या.

प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही बसविणार

हनुमान टेकडी ही डेक्कन व चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येते. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. सायंकाळी पाच ते रात्री नऊदरम्यान अधिक गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, टेकड्यांकडे जाणाऱ्या मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विचार सुरू आहे.

विद्यार्थ्यांची जनजागृती

हनुमान टेकडी परिसरात कॉलेज असल्यामुळे अनेक विद्यार्थी टेकड्यावर जातात. त्यामुळे या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या जनजागृतीसाठी कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्यांना सुरक्षिततेबाबत काय काळजी घ्यावी याची माहिती दिली जाणार आहे. कॉलजने त्यांच्या परिसरात येणाऱ्या टेकडीवर सुरक्षारक्षक ठेवण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. टेकड्यांवर फिरायला जाऊ नये असे आम्ही म्हणणार नाही. पण, अंधार असेल आणि मदत मिळू शकणार नाही, अशा ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली.

हद्दीचा वाद नाही.

पीडित विद्यार्थिनीवर नेमक्या कोणत्या ठिकाणी (कोणत्या पेालिस ठाण्याच्या हद्दीत ) ही घटना घडली, हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र, पीडीत युवती सर्वप्रथम डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. डेक्कन पोलिसांनी तिला घटनास्थळ हे डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत नसल्याचे सांगून चतुःश्रृंगी पोलिसांकडे पाठविल्याची चर्चा आहे. याबद्दल पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांना विचारले असता, डेक्कन व चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीवर ही घटना घडली. त्यामुळे कोणाची हद्द हे समजत नव्हते. मात्र, हद्दीच्या वादाचा असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.

------

टेकड्यावर जाताना काय काळजी घ्यावी?

एकटे फिरण्यासाठी जाऊ नये.

नेहमी ग्रुपमध्ये फिरावे.

अंधार असलेले आणि मदत मिळणार नाही, अशा ठिकाणी जाणे टाळावे.

सोबत मौल्यवान वस्तू ठेवू नये

शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या चोरट्यांना विरोध करू नये

मदतीसाठी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावे.

-----------------

मदतीसाठीचे क्रमांक

पोलिस नियंत्रण कक्ष- ०२०-२६१२२८८०, २६२०८२५० आणि १००

डेक्कन पोलिस ठाणे- ०२०-२५६७५००५

चतुःश्रुंगी पोलिस ठाणे- ०२०-२५६५५३३५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्या सोडविण्यावर भर

$
0
0

झिरो गार्बेज, पाणी टंचाईवर उपाययोजना आदी गोष्टींना महापौर देणार प्राधान्य
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून काम करताना पुढील वर्षभरात पुणेकरांच्या अधिकाधिक समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. शहरात शून्य कचरा प्रकल्प (झिरो गार्बेज), पाणीटंचाईवर उपाययोजना, मेट्रोसाठी पाठपुरावा, जायका प्रकल्पाची अंमलबजावणी यासह 'पीएमपीएमएल'चे सक्षमीकरण या पाच गोष्टींना प्राधान्य दिले जाणार असल्याने नवनियुक्त महापौर प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
'शहराचा चारही दिशेला विस्तार होत असून, अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना गेल्या चार वर्षा‌त राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकांच्या हितासाठी केलेल्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविली जाणार आहे. यापूर्वीच्या महापौरांच्या काळात सुरू झालेल्या योजनांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 'पीएमपी'चे संचालक म्हणून अडीच वर्षे काम केल्याने महापौर म्हणून काम करताना 'पीएमपी'च्या बळकटीकरणासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्रात 'यूपीए'चे सरकार असताना पुणे शहरासाठी ५०० बस खरेदी करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, अद्यापही हा निधी मिळालेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी तातडीने मिळावा, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. वाहतुकीची समस्या सोडण्यासाठी बसची उपलब्धता अत्यंत गरजेची असल्याने खासगी आयटी कंपनीच्या मदतीमधून बस उपलब्ध करून घेण्याचा विचार आहे,' असे महापौर जगताप यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षापासून शहरात कचऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट होत चालला आहे. कचरा टाकण्यासाठी जागा मिळावी, यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु असून पुढील काही महिन्यात हा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील अनेक भागात पाणी पोहचण्यास अडचण येते. धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन पावसाळा सुरू होइपर्यंत उपलब्ध पाणी कशा पद्धतीने पुरविता येईल, यासाठी नियोजन केले जाणार आहे. याबरोबरच मेट्रो, जायका, नदी सुधारणा तसेच भामा आसखेड प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याचे महापौर जगताप यांनी स्पष्ट केले. प्रशासनाबरोबर मैत्रीपूर्वक संबध असले तरी पुणेकरांच्या हितासाठी प्रसंगी कडक भूमिका घेण्यासही मागे पुढे पाहणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.
..
लंडन दौऱ्याला जाणार नाही
'स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लंडन दौऱ्याला जाणार नसल्याचे महापौर जगताप यांनी स्पष्ट केले. महापौर म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक प्रश्न समोर असताना दौरा करणे योग्य नाही. पालिकेचे बजेट या काळात सादर होणार असल्याने या दौऱ्याला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या दौऱ्याला जावे, त्याचा अभ्यास करावा. दौऱ्यानंतर तेथे राबविलेल्या संकल्पना आपल्या येथे राबविण्याचा प्रयत्न करावा,' असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावरकरांच्या कार्याचा विचार व्हावा’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटनेसारख्या घटना घडल्यानंतरही, कारभारी पाकिस्तानी कारभाऱ्यांसारखा नसल्याने कोणाची मुस्कटदाबी केली जात नाही. ही सहिष्णुता नाही का,' असा सवाल ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले यांनी शुक्रवारी पुण्यात उपस्थित केला. देशाच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक आणि नागरिकांचे रक्षण करणारे पोलिस यांच्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद केली, तर भाजपला सत्ता गमावण्याची भीती नाही, असे मतही त्यांनी मांडले.

राज्याचे पोलिस महासंचालक डॉ. प्रवीण दीक्षित आणि दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना 'मुक्तछंद'तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी गोखले बोलत होते. पुण्याचे पोलिस आयुक्त के. के. पाठक, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आदी या वेळी उपस्थित होते.

गोखले म्हणाले, 'भाजप सरकारला नागरिकांनी पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. सरकारने अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार वापरण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहून मी देशाच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या किमान गरजा पूर्ण करण्याची विनंती करणार आहे. त्याद्वारे त्यांच्या किमान गरजा पूर्ण होतील.' दीक्षित म्हणाले, 'सावरकरांनी त्यांच्या काळाच्या फार पुढे जाऊ प्रत्येक गोष्ट केली होती. त्यांचे केवळ स्मरण करणे पुरेसे नाही. त्यांच्या कार्याचाही विचार व्हायला हवा.' डॉ. मोरे यांनी टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि सावरकर या तिघांच्या कार्याचा उल्लेख करत, महाराष्ट्राचे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे योगदान अधोरेखित केले. राष्ट्र सर्वोच्च मूल्य मानून राजकारण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहित्यिक आणि नाट्यकार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

000

रंगमंचाला अलविदा...

कार्यक्रमामध्ये बोलताना गोखले यांना घशाचा त्रास होत होता. त्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले, 'घशाच्या विकाराने आजारी असल्याने या पुढे मी रंगमंचावर दिसणार नाही, हे यापूर्वीच जाहीर केले आहे. सुदैवाने कॅन्सर नाही, हे आज सकाळीच समजले. माझ्या आवाजाने आनंदून जाणाऱ्या रसिक प्रेक्षकांना या पुढे मी सेवा देऊ शकणार नाही, म्हणून मी रंगमंचापासून दूर झालो आहे.'

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांच्या स्मृतींना शहरात उजाळा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरातील विविध संस्था- संघटनांनी सावरकर यांच्या पुतळ्यास आदरांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांना आदरांजली वाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती. या निमित्त १९०२ ते १९०५ या कालावधीत सावरकरांचे वास्तव्य असलेली महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली सर्वांच्या दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन यांच्या हस्ते सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी कविता वाचन केले. विनता जोशी यांनी पोवाडा सादर केला. सोसायटी आणि कॉलेजचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ आणि पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेंद्र भन्साळी यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. विठ्ठल मोरे यांनी सावरकरांच्या जीवन कार्याची माहिती मुलांना सांगितली. सावरकरांनी १९०५मध्ये विदेशी कपड्यांची होळी केलेले स्मारक या वेळी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. सुषमा घडशी, प्रिया मंडलिक, वंदना कदम यांनी नियोजन केले.

कथाभारती संस्थेतर्फे कर्वे रस्त्यावरील स्मारकातील सावरकर यांच्या पुतळ्यास आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी महापालिकेतर्फे बांधणाऱ्यात येत असलेल्या या स्मारकातील विकास कामांची माहिती दिली. शाम भुर्के यांनी सावरकर यांचा जीवनप्रवास, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान आणि विदेशी वस्तूंविरोधातील लढा या विषयी माहिती दिली. या वेळी श्याम ढवळे, व्यंकटेश जोगळेकर, गीता भुर्के उपस्थित होत्या.

विविध संघटनातर्फे या स्मारकमध्ये दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रदीप रावत यांनी सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. या वेळी नाना गोडसे, डॉ. शं. ना. नवलगुंदकर, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव सोनवणे, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. रावत यांनी स्मारकातील वाचनालयासाठी स्वतःच्या संग्रहातील सावकरांवर आधारित १५०० पुस्तके देणार असल्याचे जाहीर केले.

.....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोटी डे’ला वाढता पाठिंबा

$
0
0

पुण्यासह पाच शहरांमध्ये येत्या १ मार्चला गरजूंना देणार पोळ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'व्हॅलेंटाइन डे'ला अभिनेता अमित कल्याणकर आणि त्याचा एक मित्र फर्ग्युसन रोडवर भटकत असताना त्यांना विशीतला एक गरीब मुलगा मोठ्या कष्टाने स्वयंपाक करताना दिसला. एकीकडे सेलिब्रेशन आणि दुसरीकडे खाण्याविषयी उदासिनता असे विरुद्ध चित्र पाहून अमित सुन्न झाला. त्याच रात्री त्याला 'काश कोई 'रोटी डे' भी होता,' अशा आशयाच्या व्हॉट्स-अॅप मेसेज आला आणि त्याने ही कल्पना उचलून धरली. आपल्या कलाकार मित्रांच्या सोबतीने १ मार्च हा 'रोटी डे' म्हणून ठरवला. त्याला आता केवळ पुण्यातूनच नाही, तर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या शहरांतूनही सहभागाचा पाठिंबा मिळाला आहे.
येत्या १ मार्चला कलाकारांसहित अनेक सामान्य नागरिक आपापल्या परीने घरी पोळ्या/रोटी/ चपाती बनवून गरजूंना देणार आहेत. इतरांनी तयार केलेल्या चपात्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अमितने उचललेली नाही, तर जे त्या तयार करतील, तेच
प्रत्यक्ष पोहोचवण्याची भूमिका बजावतील, अशी या 'रोटी डे' मागची कल्पना आहे. अमितच्या 'रोटी डे'च्या कल्पनेला डिझायनर सुरेश बोर्डेने अंतर्मुख करणाऱ्या अशा पोश्टरचे रूप देऊन व्हायरल केले आहे.
अमितसोबत नेहा गद्रे, मैथिली पानसे-जोशी, विनोद खेडेकर, प्राजक्ता, जगन्नाथ नवंगुणे, अमित शेरखाणे, आस्ताद काळे, अमित फाटक, चेतन चावडा आदी कलाकार जोडले गेले आहेत. त्यांनी 'रोटी डे'मध्ये सहभाग नोंदवला आहेच; त्याशिवाय ही कल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंतही पोहोचवली आहे. 'समर्थ अॅकॅडमी' नाट्यसंस्थेतील कलाकारांचाही त्याला पाठिंबा आहे.
'व्हॅलेंटाइन डे'च्या दुसऱ्या दिवशी पुन्हा फर्ग्युसन रोडवर गेलो असता, तिथे मला तो मुलगा दिसला नाही. त्याने काही खाल्ले असेल का या प्रश्नांने मला अस्वस्थ केले. तो जिथे कुठे असेल तिथे त्याचे पोट भरता येईल याचा एक मार्ग 'रोटी डे'मुळे मला सापडलाय. यामुळे कुठलाच गरजू उपाशी राहणार नाही,' असे अमितने नमूद केले.
'शक्य होईल तितक्या पोळ्या बनवून तुम्ही राहत असलेल्या भागातील गरजूंना द्या. सोसायटीचा वॉचमन, हॉस्टेलवर राहणारी मुले, दवाखान्यात बाहेरून आलेले पेशंट, अनाथाश्रम, वृद्धाश्रम इत्यादी ठिकाणी एक-दोन दिवस आधी संपर्क साधूनही तुम्ही पोळ्या द्या,' असे आवाहन अमितने केले आहे.
...
सध्या रोटी डे पाच शहरांमध्ये होतो आहे. मात्र, जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला, तर १ मार्च हा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा 'रोटी डे' नक्कीच होऊ शकतो.
- अमित कल्याणकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images