Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालिकेची विश्रांतवाडीत अतिक्रमण कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,येरवडा

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण आणि बांधकाम विभागाकडून मंगळवारी विश्रांतवाडी भागात जोरदार अतिक्रमण कारवाई करण्यात आली. आळंदी रस्ता आणि विश्रांतवाडी ते विमानतळ रस्त्यावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदार, पथारीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

विश्रांतवाडी ते विमानतळ रस्त्याच्या कडेला बसलेले पथारी व्यावसायिक, रस्त्यावर वाढीव बांधकाम केलेले वाढीव दुकानदार आणि पदपथावर फर्निचर ठेवणाऱ्या व्यावसायिक यांच्यावर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या मार्गावरील अनेक दुकानदारांनी अनधिकृत सिमेंटचे वाढीव बांधकाम, पत्रे आणि शेड टाकून अतिक्रमण केले होते. फर्निचर व्यावसायिकांनी पदपथावर खुर्च्या, टेबल शोकेस ठेवून रस्ता बंद केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच, विद्यानगर भागात दुचाकींची विक्री करणाऱ्या शांती होंडा शोरूमने पदपथावर दुचाकी उभ्या केल्याने त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

सहायक आयुक्त संध्या गागरे यांच्या नेतृत्त्वाखाली उपभियंता नाथा चव्हाण, बांधकाम निरीक्षक प्रवीण भावसार, अतिक्रमण निरीक्षक राजेंद्र लोंढे, अधिकारी आणि कर्मचारी यांनी कारवाई केली. या वेळी महापालिका आणि पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कारवाईत एक जेसीबी आणि बिगारी यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फूल बाजाराला अखेर मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित अत्याधुनिक फूल बाजाराच्या भूमिपूजनाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. राज्याचे पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि. १२) इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपमुख्य प्रशासक भूषण तुपे, संचालक प्रताप चव्हाण, राजेंद्र कोरपे, मंग़ेश मोडक आणि संतोष खांदवे उपस्थित होते.

'हॉलंडच्या धर्तीवर अत्याधुनिक फूल बाजार मॅफकोच्या ८१ हजार चौरस फूट जागेत उभारण्यात येणार आहे. बाजार संपूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. फुलांसाठी लोडिंग, अनलोडिंगची व्यवस्था, कट फ्लॉवर्सच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा, आवक विभाग, पॅकिंग सुविधा, वितरणासाठी जागा, फुलांच्या साठवणुकीसाठी शीतगृह तसेच ३५ हजार चौरस फुटाचे पार्किंग, व्यापारी संकुल, बँकेसाठी जागा, निर्यात सुविधा केंद्र आदी सुविधा फूल बाजारात असणार आहेत,' अशी माहिती खैरे यांनी दिली.

या शिवाय पूरक व्यवसायाची दुकाने, निरीक्षण कक्ष, प्रदर्शन हॉल, पुष्परचनेसाठी विशेष विभाग, प्रशासकीय कक्ष, कचेरी, सभागृह, प्रशिक्षण केंद्राचा समावेश असणार आहे. बाजाराची इमारत ग्रीन बिल्डिंगच्या आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार गोल्ड रेटिंगसाठी पात्र आहे. सध्या फूल बाजारातील १०० कोटी उलाढालीपैकी एक ते सव्वाकोटी रुपयांचा सेस समितीला मिळतो. या बाजारासाठी १००कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत. दीड वर्षात उभारल्या जाणाऱ्या या बाजारात १० हजार कोटींची उलाढाल होणे अपेक्षित असल्याचेही खैरे यांनी स्पष्ट केले.

..

१३२ जणांनाच गाळे?

हॉलंडच्या धर्तीवर उभारल्या अत्याधुनिक फूल बाजारात १२० चौरस फूटाच्या आकाराचे २७२ गाळे तयार उभारले जाणार आहेत. मात्र सध्या बाजारातील १३२ जणांनाच विक्रीसाठी जागा देण्यात येणार आहे. उर्वरित गाळे १९९० पासून नावनोंदणी करून प्रतीक्षायादीवर असलेल्या २४९ पैकी काही जणांना देण्यात येणार आहेत. फूलबाजारात किरकोळ तसेच कट फ्लॉवर्सच्या लिलावासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कराड यांचा उत्साह तरुणांना लाजविणारा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'डॉ. विश्वनाथ कराड शास्त्र आणि कलेचा संगम आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, प्रसन्नता आपल्यातील प्रत्येकाला प्रेरणा देऊन जाते. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे,' असे गौरवोद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.

एमआयटीचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, छत्रपती शाहू महाराज, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार, एमआयटीचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुनील कराड, डॉ. सुचित्रा नागरे, प्रा. स्वाती कराड-चाटे आदी उपस्थित होते. 'अमृतमेघ' या गौरवग्रंथाचे प्रकाशनही या वेळी झाले.

'समता, मानवता प्रस्थापित होईल, अशा प्रकारचे शिक्षण देण्यावर डॉ. कराड यांनी भर दिला आहे,' या शब्दांत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचा गौरव केला. डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, की 'ज्ञान, कर्म आणि भक्तीचा संगम साधून डॉ. कराड यांनी संस्थेला पुढे नेले आहे. केवळ पदवीधारक निर्माण करण्यावर नाही तर देशाच्या भविष्यातील युवक निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.' डॉ. मुजूमदार म्हणाले, की 'शिक्षणसंस्थांनी केवळ शिक्षण नाही, तर संस्कारही दिले पाहिजेत. हे ओळखून त्यांनी काम केले आहे. खासगी शिक्षणसंस्थांकडे शासन साशंकतेने पाहत असून, शासनाने ही भावना बदलली पाहिजे.'

उद्याच्या भारताचे भवितव्य असलेल्या युवकांमध्ये भारतीय अस्मिता जागविण्याचा प्रयत्न अखेरच्या श्वासापर्यंत करत राहणार आहे, अशी भावना डॉ. कराड यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाप्रकारांतून प्रकटली तरुणाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फोटोग्राफी, टायपोग्राफी, कॅलिग्राफी, थ्रीडी डिस्प्ले, हेल्मेटवर मोडीतील संदेश अशा विविध कलांतून तरुणाईचे भावविश्व मंगळवारी उलगडले. निमित्त होते आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टच्या वतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या शैक्षणिक डिझाइन आर्ट वर्क प्रदर्शनाचे.

बालगंधर्व कलादालनामध्ये आयोजित या प्रदर्शनाचे उद् घाटन प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर सुदर्शन धीर आणि व्यंगचित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते झाले. कॅम्पस संचालक एस. के. जोशी, प्राचार्य डॉ. मिलिंद ढोबळे या वेळी उपस्थित होते. प्रदर्शनात १३० विद्यार्थी सहभागी झाले असून, व्हिज्युअलायजेशन, इलेस्ट्रेशन, फोटोग्राफी, टायपोग्राफी, कॅलिग्राफी, थ्रीडी डिस्प्ले, पब्लिकेशन डिझाइन, युझर इंटरफेस अशा विविध विषयांचा समावेश असलेले प्रकल्प, पेंटिंग व विविध शैक्षणिक कलाकृती या प्रदर्शनात पाहता येतील. ऋषीकेश सोनवणे, दीपेश राठी, सुझन रंजी, मानसी ननावरे, अश्विनीकुमार गुप्ता, इश इजमुलवार, अपूर्व पोरंदवार, मानसी सोनवणे, संकेत भालारे, कुणाल साळवीस, उत्तम जानवडे, तॄप्ती कानगडे या विद्यार्थ्यांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.

'विचार करण्याची कुठलीही कला नसते, कल्पक विचार करणे हीच मोठी कला आहे,'असे धीर यांनी सांगितले. पंडित म्हणाले, की 'नियमित सराव आणि त्यातील सातत्य कलेसाठी आवश्यक आहे.' सूत्रसंचालन शमरीन कादर हिने केले. मोनिश तेजानी याने आभार मानले. प्रा. प्रकाश कलवले आणि प्रा. श्रद्धा काजे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. हे प्रदर्शन आज, बुधवारी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुपरहिट गाण्यांची माती करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या 'डॉन' सिनेमातील 'खय के पान बनारस वाला' हे गाणे सुपरहिट होते. मात्र, रिमेक करताना त्याची अक्षरशः माती करण्यात आली. त्यामुळे ज्या गाण्यांना सुपरहिट म्हटले जाते, अशा कुठल्याच गाण्याला तरुण संगीत दिग्दर्शकांनी हात लावू नये, असे परखड मत नुकतेच प्रसिद्ध गीतकार समीर यांनी व्यक्त केले.

नव्वदच्या दशकात 'आशिकी', 'राजा हिंदुस्तानी', 'दिवाना', 'साजन' यांसारख्या सिनेमांची सुपरहिट गाणी समीर अंजान पांडेय यांनी लिहिली. सर्वाधिक हिंदी गाणी लिहिल्याबद्दल त्यांची 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यात आली आहे. याच विश्वविक्रमाविषयी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी हे मत खास 'महाराष्ट्र टाइम्स'च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले.

'हिंदुस्थानी प्रेक्षक आणि कानसेनांना ओरिजनल ऐकण्याची उत्तम सवय आहे. त्यात कुणी बदल केला, की त्यांच्या भावना दुखावल्या जातात आणि एकप्रकारे ते योग्यही आहे; कारण जुनी, लोकप्रिय आणि सुपरहिट गाण्यांशी प्रेक्षक फक्त त्याचे शब्द, संगीत किंवा आवाजासाठी नाही, तर त्याच्याशी संबंधित गीतकार, संगीतकार आणि गायकाशीही जोडला गेलेला असतो. सुंदर आणि आवडती गाणी ही ऐकणाऱ्याच्या मनात गाण्याशी संबंधित व्यक्तींविषयीचा जिव्हाळाही निर्माण करतात. त्याचमुळे जुन्या गाण्यांना हात लावायला नव्या संगीतकारांनी धजावू नये,' असे मत समीर यांनी व्यक्त केले.

..

'नव्याची निर्मिती आवश्यकच'

जुनीच गाणी नव्या पिढीने नव्या सिनेमांतून पुन्हा वापरण्याचा एक दुसरा अर्थ असाही होतो, की तरुणांना नवे काही सुचत नाही. जुन्याइतके कसदार आणि उत्तम त्यांना लिहिता किंवा संगीत देता येत नाही किंवा मग आजही जुनी गाणीच लोकांना आवडतात; म्हणून तीच पुन्हा फक्त नव्या पद्धतीने नव्या सिनेमांतून वापरली जातात. मात्र, हे योग्य नाही. किती दिवस आपण नॉस्टॅल्जिक होणार? नव्याची निर्मिती व्हायलाच हवी, असेही समीर यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाषेच्या चर्चेपेक्षा वापरावर भर हवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मराठी भाषा कशी जगवायची याच्या कोरड्या चर्चा करीत बसण्यापेक्षा व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. लिहिणे ही गोष्ट छंद किंवा निव्वळ आवड न राहता जेव्हा जगणे बनते, त्याच वेळी सकस साहित्यनिर्मिती होऊन भाषा वाढीस लागते,' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी केले.

साहित्य संस्कृती मंच या संस्थेचा वर्धापनदिन नुकताच पार पडला. त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खान यांनी भूषवले. 'आकाशवाणी'चे सहायक वृत्तसंचालक नितीन केळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 'अलीकडील काळात प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यातील भेद पुसट व्हायला लागले आहेत. प्रसारमाध्यमांकडूनही बोलीभाषेच्या वापरात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे माध्यम साक्षरता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,' असे मत केळकर यांनी व्यक्त केले.

या वेळी रत्नमाला खिंवसरा यांना कै. राजा परदेशी स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. कथालेखन, कवितालेखन, उखाणे, कथावाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्यापूर्वी सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच संस्थेच्या 'बहार' या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. संस्थेच्या कार्यवाह स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्षा अरुणा महाळंक यांनी प्रास्ताविक केले. अनिल स्वकुळ यांनी आभारप्रदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांनी अनुभवली ‘निरंकुशाशी थेट भेट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हे नायका जगईश्वरा, सखी मंद झाल्या तारका, दिस जातील दिस येतील अशा गीतांतून मैफल सजली आणि शब्दांचे माणिकमोती घडवणाऱ्या एका 'निरंकुशाशी' रसिकांची सहदय भेट घडली. निमित्त होते, ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 'थेट भेट निरंकुशाशी : अर्थात पोएट सुधीर मोघे' या विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमातून मोघे यांना सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली.

अरुण काकतकर यांची निर्मिती असलेल्या या दृकश्राव्य कार्यक्रमात दृश्यफितींद्वारे मोघे यांचा जीवनपट उलगडण्यात आला. शब्दांच्या सुरेल प्रवासाचे रेशमी बंध या निमित्ताने उलगडत गेले. विशिष्ट कविता, त्याचे अर्थ, सुचलेली चाल अशा संवादातून ही 'काव्यमैफल' रंगली. पं. उपेंद्र भट यांनी हे नायका जगईश्वरा, सखी मंद झाल्या तारका ही गीते सादर करून रसिकांची दाद मिळविली. प्रमोद रानडे यांनी गुरू एक जंगी कांतासी हे गुरूची महती सांगणारे गीत सादर केले.

'सखी मंद झाल्या तारका' या गाण्याची आठवण पं. उपेंद्र भट यांनी यावेळी सांगितली. सुधीर मोघे यांनी पं. रामभाऊ फाटक यांना हे गाणे अर्पण केल्याचे सांगितले. त्यावर फाटक यांनी हे गाणे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेऊ असे म्हटले. पण हे भावगीत असून, त्यात ताना आणि आलापी नाहीत, असे मोघे यांचे म्हणणे होते. पंडितजींनी या गाण्यासाठी महिनाभर रियाज केला. आकाशवाणीच्या सूरचित्रासाठी हे गाणे तयार झाले. अंतिम होण्यापूर्वी आपण गमतीत पंडितजींना हे भावगीत तुम्ही गायलय अशी शेवटी छाप काहीतरी सोडा, असे मिश्किलपणे म्हटले. पण नंतर बाबूजींना हे गीत गाण्यास सांगितले. त्यावर त्यांचे गाणे तसेच ठेवा असे म्हणून बाबूजींनी शुद्ध धैवता'ऐवजी कोमल निषाद' चा वापर गाण्यात केला, अशा आठवणींना या वेळी उजाळा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांमध्ये शिगेला ‘फिरोदिया’चा ज्वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तरुणाईचे भावविश्व जाणून त्याचे प्रतिबिंब उमटवणारी स्पर्धा म्हणजे फिरोदिया करंडक... तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणाऱ्या फिरोदिया करंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीला सुरुवात व्हायला आठ दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये कमालीचे उत्साही वातावरण अनुभवयास मिळणार असून नाटक, संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला अशा अनेक विविध प्रकारच्या कलांची अनुभूती एकाच रंगमंचावर मिळणार आहे.

सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे यंदा ४२ वे वर्ष आहे. पुण्याच्या महाविद्यालयीन विश्वात अत्यंत मानाचे स्थान असलेली ही स्पर्धा दरवर्षी अत्यंत शिस्तीत आणि मोठ्या उत्साहाने पार पडते. एकाच रंगमंचावर विविध कलाविष्कार घडवणारी भारतातील ही एकमेव व नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे. येत्या सोमवारी (१५ फेब्रुवारी) मुख्य फेरीला सुरुवात होत आहे.

कॉलेज विश्वातील मानबिंदू समजल्या जाणाऱ्या फिरोदिया करंडक स्पर्धेत यंदा ५० महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्याप्रमाणे पूर्वप्राथमिक फेरी ( पात्रता फेरी ) जानेवारी महिन्यात पार पडली. एकूण २८ संघाना मुख्य फेरीसाठी निवडण्यात आले आहे. मुख्य फेरी दि. १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान व अंतिम फेरी दि. २५ फेब्रुवारी रोजी अण्णा भाऊ साठे स्मारक येथे रंगणार आहे, अशी माहिती संयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी दिली. एखाद्या संघाची स्पर्धेच्या दृष्टीने किती तयारी आहे, याचा विचार करून तो संघ पुढे प्राथमिक फेरीला पात्र ठरेल, की नाही, याचा निर्णय पूर्वप्राथमिक फेरीत केला जातो. या फेरीसाठी प्रेक्षक नसतात. केवळ संयोजक आणि परीक्षक असतात. महाविद्यालयांचे सादरीकरण पाहून प्राथमिक फेरीसाठी ( मुख्य फेरीसाठी ) पात्र संघांची निवड केली जाते, असेही ते म्हणाले.

..

गेल्या वर्षीपासून थेट प्राथमिक फेरीसाठी १५ संघांना प्रवेश दिला जातो. हे १५ संघ आणि पूर्वप्राथमिक फेरीतून प्राथमिक फेरीत आलेले १० ते १५ संघ अशा साधारण २५ ते ३० संघांची या फेरीत स्पर्धा होते. प्राथमिक फेरीतील स्पर्धेतून कमीत कमी ७ आणि जास्तीत जास्त ९ सर्वोत्तम संघांना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मार्च महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे.

अजिंक्य कुलकर्णी, संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावी अधिकाऱ्यांचे पुण्यात होणार मंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टिळक स्मारक मंदिर येथे १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी सातव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय संमेलनात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील चर्चासत्र आणि परिसंवादांची मेजवानी मिळणार आहे.

ग्लोबल एज्युकेशन, रिसर्च ट्रस्ट आणि स्टडी सर्कल यांच्या वतीने हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यपदी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती स्टडी सर्कलचे संस्थापक डॉ. आनंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनाची सुरुवात १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथ दिंडीचे उद्घघाटन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनात यूपीएससीचे माजी अध्यक्ष डी. पी. अग्रवाल, पुणे विद्यापीठाचे कुलकुरू डॉ. वासुदेव गाडे, परिवहन आयुक्त श्याम वर्धने, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, पोपटराव पवार, शेखर गायकवाड आदी नामवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद, सनदी अधिकाऱ्यांचे अनुभवकथन, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कथाकथन, कवी संमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच, पाच ई-बुकचेही प्रकाशन केले जाणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा परिक्षा साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात येणार आहे. राज्यभरातून विद्यार्थी उपस्थित राहणार असून, पाचशे विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजगुरुनगरमध्ये १८ लाखांची वीजचोरी उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महावितरणच्या वीजमीटर तपासणी मोहिमेत राजगुरुनगर विभागात १८ लाख ३० हजार रुपयांची वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापर उघडकीस आला आहे.तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, वडगाव मावळ या उपविभागात वीजमीटर तपासणीची विशेष मोहीम घेण्यात आली. त्यामध्ये १५ ठिकाणी दोन लाख ६५ हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली; तर १३ ठिकाणी १५ लाख ६५ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आले.पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सुनील पावडे, कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता बी. व्ही. साबदे, संजय पोळ, आर. जे. चव्हाण, मुकुंद तेलके आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यसंमेलनाचे बोधचिन्ह जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला अवघे दहा दिवस राहिले असताना संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. नाट्य संमेलन आहे की नाही असे वातावरण नाट्यवर्तुळात असताना किमान संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध करण्याचे सौजन्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व आयोजकांनी दाखवले आहे. त्यामुळे नाट्यरसिक व कलावंतांच्या जिवात जीव आला आहे. 'हुश्श...किमान बोधचिन्ह तरी आले,'अशा प्रतिक्रिया नाट्यपरिषदेच्या अजब कारभारामुळे नाट्यवर्तुळातून ऐकायला मिळत आहेत.

संमेलन अवघ्या दहा दिवसांवर आलेले असताना संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर झालेली नाही. तसेच, नाट्य परिषद शाखा व नाट्य कलावंतांना निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे नाट्यवर्तुळातून या बाबतीत नाराजी व्यक्त होत आहे. कार्यक्रम पत्रिका मंगळवारी अंतिम होईल, असे परिषदेच्या गोटातून बोलले जात आहे. यंदाचे नाट्य संमेलन १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत ठाण्यात रंगणार आहे. साहित्य संमेलनानंतर रसिकांना वेध लागतात ते नाट्य संमेलनाचे.. मात्र अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडून नाट्य संमेलनाच्या तारखा घोषित करण्यापलीकडे अद्याप कोणतीच हालचाल झालेली नाही. संमेलनासाठी पदाधिकाऱ्यांना अद्याप राज्य सरकारकडून २५ लाखांचा निधी मिळालेला नाही. या प्रकारामुळे आयोजनावर परिणाम जाणवू लागला आहे.

संमेलनाची कार्यक्रमपत्रिका किमान महिनाभर आधी जाहीर करणे अपेक्षित असताना पत्रिकेची 'एंट्री' झालेली नाही. कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यास विलंब होत असल्याने त्याचा फटका दरवर्षीच्या नाट्यसंमेलनाला बसतो. कार्यक्रम पत्रिका वेळेत हाती न पडल्याने अनेक रसिक व कलावंत नाट्यसंमेलनाचा बेत रद्द करतात. त्यात किमान संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्याचे सौजन्य नाट्यपरिषदेने दाखवल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.

..

बोधचिन्हावर आदिवासी परंपरेची छाप

बोधचिन्हात भगव्या रंगात तुतारी दर्शवली असून, आयोजकांची खूण त्यातून स्पष्ट होत आहे. आदिवासी परंपरेतील ठाण्याची ओळख असलेली वारली चित्रकला, नाटकाच्या घंटेतून मुखवटे अशा कल्पनेतून सतीश खोत यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे. राम गणेश गडकरी, अण्णासाहेब किर्लोस्कर व बालगंधर्व यांच्या चित्राचे गडकरी रंगायतन येथील शिल्प या बोधचिन्हाच्या अग्रभागी आहे. हे बोधचिन्ह कलात्मकतेने सजलेले आहे, असे संमेलनाचे निमंत्रक नरेंद्र बेडेकर यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोलर सिस्टीम’चा प्रस्ताव फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे महानगरपालिकेच्या इमारतींवर भारतीय सौर ऊर्जा निगम यांनी निवड केलेल्या दोन कंपन्यांकडून सोलर सिस्टीम बसवून घेण्याबाबत आयुक्त कुणाल कुमार यांनी ठेवलेला प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीने फेटाळला. दुसऱ्या कंपन्यांकडून सोलर ‌सिस्टीम बसवून घेण्याऐवजी पालिका प्रशासनाने त्याचे टेंडर काढून स्वत:च ही यंत्रणा पालिकेच्या इमारतींवर उभारावी, अशी उपसूचना देऊन याचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविलेल्या पुणे महापालिकेने सोलर सिस्टीमच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका आयुक्त कुमार यांनी यामध्ये पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या 'सोलर इंडिया कार्पो‍रेशन लिमिटेड' या कंपनीच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा विचार सुरू केला होता. पालिकेच्या मुख्य इमारतींवर सोलर सिस्टीम लावून ही वीजनिर्मिती केली जाणार आहे. यासाठी पालिकेच्या १९ इमारतींवर सोलर पॅनल लावून एक मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार होती. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कंपनीकडून ही यंत्रणा लावून घ्यावी, असा प्रस्ताव कुमार यांनी गेल्या महिन्यात स्थायी समितीसमोर ठेवला होता. महापालिकेचा कारभार चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या वीजेसाठी पालिकेला महावितरण कंपनीला प्रती युनिट १० रुपये ३० पैसे हा दर द्यावा लागतो. मात्र, या ठेकेदारांकडून सोलर सिस्टीमच्या माध्यमातून वीज घेतल्यास पालिकेला ५ रुपये ६० पैसे प्रती युनटि दराने वीज उपलब्ध होणार आहे. परिणामी, पालिकेची वर्षाला तब्बल ६० लाख रुपयांची बचत होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पालिकेला कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात संबंधीत ठेकेदाराला ३० वर्षे कराराने जागा द्यायची होती. आयुक्तांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडल्यानंतर यावर प्रत्येकवेळी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. महापालिका प्रशासनाने स्वत:च अशा पद्धतीची यंत्रणा उभारल्यास सोलर सिस्टीमसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळेल तसेच पालिकेला मोफत वीज उपलब्ध होईल, अशी चर्चा स्थायी समितीच्या बैठकीत झाली. त्यानंतर या ठरावाला उपसूचना देत पालिकेने याचे टेंडर काढून ही यंत्रणा बसवावी, असा ठराव मांडण्यात आला. याला भाजपच्या सभासदांनी विरोध केल्याने मतदान घेऊन ११ विरुद्ध ३ मतांनी हा विषय मान्य करण्यात आल्याचे समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात पिस्तूल; १३ काडतुसे जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सात ​पिस्तूल आणि १३ काडतुसे जप्त केली आहेत. त्यामध्ये गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत पाच; तर लष्कर पोलिसांनी दोन पिस्तूल जप्त केले आहेत. पिस्तुलांचा पुरवठा हा मध्य प्रदेश येथून झाला असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम मोरे यांच्या पथकाने अंबादास तायप्पा पवार (वय २५, चिखली, ता. इंदापूर), नीलेश दत्तात्रय म्हस्के (२५, रा. राहुरी, नगर), राहुल भारत जगधने (३०, रा. राहुरी, नगर) यांना अटक केली. तर, लष्कर पोलिसांनी सोनू रामतेज कुसवाह (२६, रा. रा. इटवा, उत्तर प्रदेश) आणि आशिष दशरथसिंग राजावत (वय १९, रा. भिंड, देहाती, मध्यप्रदेश) या दोघांना अटक केली. पोलिस कर्मचारी अतुल साठे यांना आरोपी पवार आणि म्हस्के हे दोघे स्वारगेट एस. टी. स्टॅँडजवळ येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, फौजदार सुधीर साकोरे, प्रकाश अवघडे, सहायक फौजदार सिकंदर जमादार, अशोक भोसले, शरद वाकसे, गुणशिलन रंगम, शिवानंद स्वामी, जावेद पठाण, संदीप राठोड, प्रतिक लाहिगुडे आणि सुजित पवार यांच्या पथकाने सापळा रचत दोघांना अटक केली. त्यांच्या अंगझडतीमध्ये तीन पिस्तूल आणि चार काडतुसे मिळाली होती. तपासादरम्यान त्यांनी जगधने याला आणखी दोन पिस्तूल विकल्याचे विकल्याचे सांगितले होते. त्यानुसार जगधनेला अटक करत दोन पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आले. पवार हा रेकार्डवरचा गुन्हेगारा असून त्याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, अपहरण, गर्दी, मारामारी असे ११ गुन्हे दाखल आहेत, असे वाकडे यांनी सांगितले. जप्त करण्यात आलेली पिस्तुले आणि काडतुसे मध्य प्रदेशातील बलवाडी येथून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. लष्कर पोलिसांनी कुसवाह आणि राजावत या दोघांना अटक करत त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त केली आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त वसंत तांबे यांनी दिली. या आरोपींविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फौजदार विलास गुजर तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवे वाहन घेताय? आधी हेल्मेट घ्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवीन वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना, संबंधित वाहनधारकाकडे हेल्मेट असेल, तरच त्या वाहनाची नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे संबंधिताला हेल्मेट दिले असल्याचे घोषणापत्र (डिक्लरेशन) वितरकांना आरटीओला द्यावे लागणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय चार महिन्यांपूर्वी घेतला असून, त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट सक्तीची घोषणा केल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईला पुणेकरांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर आता सरकारच्या या दुसऱ्या आदेशामुळे पुन्हा दुसऱ्या मार्गाने प्रशासनाकडून हेल्मेटचा आग्रह धरला जात आहे. या निर्णयानुसार दुचाकीची विक्री करतानाच त्यासोबत हेल्मेट देण्याचे बंधन विक्रेत्यांवर घातलेले आहे. एक हेल्मेट मोफत आणि एक हेल्मेट सवलतीच्या दरात द्यावे, असे आदेशात म्हटले आहे.

सरकारने चार महिन्यांपूर्वीच हेल्मेटशिवाय वाहनांची नोंदणी न करण्याचा आदेश काढला आहे. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नव्हती. हेल्मेटसक्तीच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आरटीओ कार्यालयाला देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच ही घोषणा करण्यात आली आहे. पुणे आरटीओ कार्यालयास हा आदेश अजून पोहोचलेला नाही. मात्र, आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे आरटीओ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

-----------



वाहनधारक किंवा वाहन विक्रेता वाहनाची नोंदणी करण्यासाठी आरटीओ कार्यालयात येतील, त्या वेळी त्यांच्याकडून हेल्मेट घेतले असल्याचे घोषणापत्र घेतल्याशिवाय त्यांच्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. याबाबत सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५४० विनाहेल्मेट चालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे हेल्मेट न वापरणाऱ्या ५४० वाहनचालकांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५४ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला; तसेच १४ पोलिस कर्मचाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४०० रुपये वसूल करण्यात आले, अशी माहिती वाहतूक पोलिस विभागाने दिली. गेल्या दोन दिवसांपासून हेल्मेटबाबत केलेली कारवाई पाहता, मोठ्या रस्त्यांवरच कारवाई करण्याची पालकमंत्र्यांची सूचना वाहतूक विभागाने गांभीर्याने घेऊन, त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचे निदर्शनास येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे पोलिसांकडून ‘मायक्रोसॉफ्ट’ला समन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'मायक्रोसॉफ्ट'च्या नावाने अमेरिकी नागरिकांना गंडा घालणाऱ्या 'बीपीओ'वरील कारवाईनंतर पुणे पोलिसांनी 'मायक्रोसॉफ्ट'ला समन्स पाठवला आहे. 'मायक्रोसॉफ्ट'कडून तपासाबाबत अधिक माहितीची आवश्यकता असल्याने त्यांना समन्स पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 'मायक्रोसॉफ्ट टेक्निकल सपोर्ट'मधून बोलत असल्याचे सांगून अमेरिकी नागरिकांना गंडा घालणाऱ्या बावधन येथील एका 'बीपीओ' सेंटरवर, पुणे पोलिसांच्या सायबर सेलने छापा घालून तिघांना अटक केली आहे. या 'बीपीओ'मधून अमेरिकी नागरिकांच्या 'कम्प्युटर'मधील 'व्हायरस' 'क्लिन' करण्यासाठी पैसे घेण्यात येत होते. आरोपींनी 'मायक्रोसॉफ्ट'च्या नावाने अमेरिकी नागरिकांना गंडा घातला असल्याने सायबर सेलने 'मायक्रोसॉफ्ट'ला 'समन्स' बजावले आहे. या प्रकरणी आदित्य रवींद्र राठी (वय २५, रा. बावधन, चांदणी चौक), हरीष नारायणदास खुशलानी (वय २६, रा. पिंपरी) आणि रितेश खुशाल नवानी (वय २९, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे ​आहेत. आरोपींकडे तीन लाख अमेरिकी नागरिकांचा 'डेटा' होता. हा 'डेटा' त्यांना कोणी दिला, याचीही चौकशी करण्यात येत आहे. 'आरोपींनी 'मायक्रोसॉफ्ट'च्या नावाचा वापर फसवणुकीसाठी केला आहे. त्यामुळे कंपनीला तपासाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी 'सीआरपीसी' कलम १६० अन्वये समन्स पाठवण्यात आले आहे,' अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. पोलिसांनी आरोपी वापरत असलेले लॅपटॉप, कम्प्युटर जप्त केले आहेत. त्यांची तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर नेमकी किती अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली, याचा अंदाज येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे. 'पेमेंट गेट वे' बंद अमेरिकेतील ग्राहकांकडून 'पेमेंट' मिळवण्यासाठी आरोपींनी 'पेमेंट गेट वे' ओपन केला होता. हा 'गेट वे' नोव्हेंबरमध्ये बंद पडला होता. त्यामुळे त्यांना एक महिना पैसे मिळू शकले नव्हते. त्यानंतर आरोपींनी पुन्हा दुसरा 'पेमेंट गेट वे' सुरू केला आणि आपला 'व्यवसाय' तेजीत आणला. हा गेट वे सुरू करण्यासाठी आरोपींना काही व्यक्तींनी मदत केली आहे. त्यांच्याकडेही चौकशी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळ्यात बड्या नेत्यांच्या सहभागाचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'मी या घोटाळ्यातील छोटा मासा असून, माझा बळी दिला गेला आहे. मोठे मासे दुसरे आहेत,' असे विधान लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रमेश कदम यांनी केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तपासामध्ये हाती लागलेले पुरावे व कदम यांचे वक्तव्य यावरून या घोटाळ्यात आणखी बड्या नेत्यांचा हात असण्याची शक्यता आहे. पुराव्यांची जुळवाजुळव केली जात असून, लवकरच बाकीची नावेही समोर येतील, असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक विमल शहा यांना अटक करण्यात आली; तसेच या घोटाळ्याशी संबंधित आणखी काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्या आधारावर तपास सुरू आहे. महामंडळात एक हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यातील ३८५ कोटी रुपयांचे पुरावे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सादर केले आहेत, तर शहा यांच्या खात्यावर १०६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. उर्वरित रकमेच्या पुराव्यांची जुळवाजुळव केली जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महामंडळातून तीनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. या खर्चाचा तपशील मिळत नाही. हा पैसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खर्च करण्यात आल्याची शंका कांबळे यांनी व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांत सामाजिक न्याय विभागाचा साडेपाच हजार कोटींचा निधी अन्य विभागांकडे वळविण्यात आला आहे. त्याचीही चौकशी केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. लोणावळ्यातील एका कार्यक्रमात दिलीप कांबळे यांनी 'अजित पवार यांची जागा येरवडा कारागृहातच' असे वक्तव्य केले होते. याबाबत त्यांना विचारले असता, 'मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही,' असे कांबळे म्हणाले. 'पुढच्या आठवड्यातच भाजपच्या कार्यक्रमासाठी लोणावळ्यात येणार आहे. कोणाची हिंमत असेल, तर अडवून दाखवा,' असे आव्हान कांबळे यांनी दिले. .....

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पाच दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकासाची योजना राज्य सरकारने आखली आहे. या योजनेअंतर्गत त्या वस्त्यांमध्ये पथदिवे, पाणी, ड्रेनेजची सुविधा पुरविली जाणार आहे; तसेच ग्रंथालय, बहुउद्देशीय समाजभवन आणि घरोघरी सोलर वीज दिली जाणार आहे. मुलींसाठी १५० व मुलांसाठी १०० नवीन वसतिगृहे उभारली जाणार आहेत.

- दिलीप कांबळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्गाच्या फोटोंसाठी हवी नियमावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे छायाचित्रांमुळे निसर्गसंवर्धनाला मोलाची मदत होते, हे सत्य असले तरी या छंदामुळे वाढत असलेल्या स्पर्धेतून वन्यजीवांच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे. त्यामुळे निसर्गाच्या फोटोग्राफीसाठी 'कोड ऑफ कंडक्ट' करण्याची वेळ आली आहे, असे मत वनखात्याच्या शिक्षण आणि संशोधन विभागाचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. बायोस्फिअर्स, पुणे महापालिकेचे पर्यावरण केंद्र आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जिविधता महोत्सवा'चे उद् घाटन राज्याच्या जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांच्या हस्ते झाले. महोत्सवांतर्गत घोले रोड येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आलेल्या फोटोग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले. काकोडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निसर्गातील विविध पैलू समाजासमोर पोहोचविण्यासाठी छायाचित्रे प्रभावी माध्यम ठरली आहेत. गेल्या काही वर्षांत निसर्गप्रेमींमध्ये फोटोग्राफीची लाट आली असून, कॅमेऱ्यांची उपलब्धताही वाढली आहे; पण ही आवड काही दिवसांत स्पर्धेत रूपांतरित होत आहे. सर्वांत उत्तम फोटो टिपण्याच्या नादात आपण निसर्गाचे नुकसान तर करीत नाही ना, याचे भान फोटोग्राफरला राहिलेले नाही. जंगलामध्ये कॅमेऱ्यांनाच बंदी आणणे हा यावर पर्याय नसून त्यांच्या वापराबद्दल 'कोड ऑफ कन्डक्ट' तयार करण्याची गरज आहे. याच वेळी फोटोग्राफरनेदेखील जबाबदारीचे भान राखून वन्यजीवांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, असे वागावे, असा सल्ला काकोडकर यांनी दिला. बर्डेकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ लक्ष्मी नरसिंह, महोत्सवाचे संयोजक डॉ. सचिन पुणेकर आणि महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. .... दुर्मिळ वृक्षांना मिळणार ओळख पुण्यामधील दुर्मिळ आणि अपवादाने आढळणाऱ्या १२६ वृक्षांची यादी बायोस्फिअर्सने केली आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील २५ दुर्मिळ वृक्षांशेजारी त्यांची सविस्तर ओळख सांगणारे हरित फलक लावण्यात येणार आहेत. आज, बुधवारी सकाळी १० वाजता प्रातिनिधिक तीन वृक्षांच्या फलकांचे उद्घाटन होईल. 'पुढील काही दिवसांत इतर झाडांना आम्ही फलक लावणार आहोत. या शिवाय महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समिती शहरातील १२६ वृक्षांना हरित पाट्या लावल्या जातील. संबंधित वृक्षाचे मराठीतील, इंग्रजीतील आणि शास्त्रीय नावांचा समावेश असेल,' अशी माहिती डॉ. सचिन पुणेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरांचाही राजीनामा

$
0
0

उपमहापौरांचाही राजीनामा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या महापौरांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अखेर काँग्रेसचे उपमहापौर आबा बागूल यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसमध्येही इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसने दर सव्वा वर्षानंतर महापौर बदलण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसनेही अधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी उपमहापौरपद देखील सव्वा वर्षाने बदलण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार दीपक मानकर आणि बंडू गायकवाड आणि आबा बागूल यांना संधी देण्यात आली. मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासोबत उपमहापौर बागूल यांनीही राजीनामा द्यावा, असे निर्देश काँग्रेसतर्फे देण्यात आले होते. मात्र, राजीनामा देण्याबाबत बागूल यांच्याकडून चालढकल सुरू होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्याशिवाय राजीनामा देणार नाही, असा पवित्रा बागूल यांनी घेतला होता.
गेल्या काही दिवसांपासून चव्हाण यांची भेट घेण्याचे प्रयत्न बागूल यांच्याकडून सुरू होते. अखेर मंगळवारी बागूल यांनी चव्हाण यांची भेट घेतली. या वेळी शहराध्यक्ष अभय छाजेडही उपस्थित होते. या भेटीमध्ये बागूल यांनी त्यांचे सविस्तर म्हणणे चव्हाण यांच्यासमोर मांडले; तसेच चव्हाण यांच्या आदेशानुसार राजीनामाही सादर केला. महापौरांचा राजीनामा सोमवारीच मंजूर झाला असल्याने महापौर-उपमहापौरपदासाठी एकत्रच निवडणूक घेण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून सुधीर जानजोत, मुकारी अलगुडे, दत्ता बहिरट, मिलिंद काची, सुनीता गलांडे आणि सुनंदा गडाळे यांच्या नावाची चर्चा असून, त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, हे येत्या आठवड्याभरात स्पष्ट होईल, असे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या

$
0
0

शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कुपोषण आणि रक्तक्षयावर (अॅनेमिया) मात करण्यासाठी ६ ते १९ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य खात्याच्या वतीने चारशे ग्रॅमच्या जंतनाशक गोळ्या उद्या (बुधवारी) देण्यात येणार आहेत. राज्यातील दीड कोटी मुलांना या गोळ्या वाटण्यात येणार असून, त्यासाठीचा औषधसाठा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
'देशात एक ते १४ वयातील ६८ टक्के बालके आतड्यांमधील जंत विकारासाठी हायरिस्कचा गट आहे. राज्यात आरोग्य खात्याच्या वतीने यापूर्वी एक ते सहा वयोगटातील मुलांना जंताच्या गोळ्या दिल्या जात होत्या. मात्र, केंद्र सरकारने सहा ते १९ वयातील मुलांनाही त्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे १० फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन पाळण्यात येत आहे. त्या निमित्ताने राज्यातील दीड कोटी शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य खात्याच्या वतीने जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी अंगणवाडी कर्मचारी, शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे,' अशी माहिती आरोग्य खात्याच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात १० फेब्रुवारीला ज्या मुलामुलींना जंतनाशक गोळ्या मिळाल्या नाहीत. त्यांच्यासाठी १५ फेब्रुवारीला गोळ्या देण्यात येणार आहेत. जंतामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि रक्तक्षयाचे आजार बळावत आहेत. आजारामुळे मुले शिक्षणापासून वंचित होऊ लागली होती. मुलामुलींमधील आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यात कुपोषण आणि रक्तक्षयाच्या मुलामुलींचे सर्वेक्षण कऱण्यात आले. त्यावेळी राज्यात सहा महिन्यापासून ते ५९ महिने वयोगटातील १० पैकी ७ मुलांना रक्तक्षय असल्याचे आढळले. त्याचे प्रमाण हे ग्रामीण भागात अधिक आहे. राज्यात १० ते १९ वयातील ६७ टक्के मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. त्याच वयातील मुलांमध्ये हे प्रमाण ५७ टक्के आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images