Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

री-रबरायझेशनची प्रक्रिया झाली विकसित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी
भारतीय सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आयडिया अँड इनोव्हेशन स्पर्धेमध्ये खडकीतील ५१२ आर्मी बेस वर्कशॉपला प्राइमिनिस्टर सर्टिफिकेट ऑफ एक्स्लन्स हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. रणगाड्यासाठी आवश्यक असलेल्या बोगी व्हिल्सची री-रबरायझेशन प्रक्रिया ५१२ने यशस्वी रीतीने विकसित केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. ही प्रक्रिया विकसित केल्याने झीज झालेल्या बोगी व्हिल्सचा पुनर्वापर होणार आहे.
भारताने रशिया आणि अमेरिकेकडून टी-२०, तंगुसका, शिल्का हे रणगाडे खरेदी केले आहेत. पाच हजार किलोमीटरच्या प्रवासानंतर रणगाड्यांची चाके झिजत होती. ही चाके बदलण्यासाठी रशिया, अमेरिकेवर अवलंबून राहावे लागत होते. पर्यायाने चाके येईपर्यंत रणगाडा गॅरेजमध्ये पडून राहत. चाकांची गरज लक्षात घेऊन खडकी ५१२ आर्मी बेसने प्रयोगाला सुरुवात केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साखर उद्योगावरदुष्काळामुळे परिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यात गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम ऊस उत्पादन आणि साखर उद्योगावर झाला आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात त्याचे दुष्परिणाम दिसू लागले असून, यंदा मराठवाड्यातील साखर कारखान्यांमध्ये उसाचे अवघे ७५ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत ४१४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यातील सर्वाधिक गाळप हे पुणे विभागात झाले असून, ते १७० मेट्रिक टन आहे. त्यानंतर कोल्हापूर विभागात ११० मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांनी ३३ लाख मेट्रिक टन, नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी ४२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत राज्यात १५ साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले असल्याचे साखर आयुक्त विपिन​ शर्मा यांनी सांगितले. दुष्काळामुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे साखर कारखान्यांमध्ये ऊस येण्याचे प्रमाण कमी आहे. मराठवाड्यात उसाचे उत्पादन खूप कमी असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जात असल्याने या भागात साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे. दरवर्षी गाळपाचा उच्चांक गाठला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले असल्याने त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेडमालक ओझा यांना जामीन

$
0
0

शेडमालक ओझा यांना जामीन
कोथरूड येथे गादी कारखान्याला आग लागून चार जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील जागा आणि शेडमालक मोतीराम ओझा यांची कोर्टाने २० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
ओझा यांनी कोर्टात जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांच्यातर्फे अॅड. एस. के. जैन आणि अॅड. अमोल डांगे यांनी काम पाहिले. त्यांना १७ डिसेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जामीन मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता.
ओझा यांनी संबंधित जमीन भाड्याने वापरण्यासाठी दिली होती. घडलेल्या घटनेत त्यांचा कोणताही सहभाग नाही; तसेच त्यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे दरम्यानच्या काळात कोणतीही चौकशी केली नाही. ओझा यांची जामिनावर सुटका करण्यात येत असल्याचे कोर्टाने आदेशात नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे अपघात रोखणार ‘वॉर्निंग अलार्म’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना येणाऱ्या रेल्वेची चाहूल न लागल्याने होणारे अपघात टाळणे आता शक्य होणार आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) रेल्वेसाठी सॅटेलाइटवर आधारित 'वॉर्निंग आलार्म' प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे रेल्वेच्या मार्गात ५०० मीटर अंतरावर येणाऱ्या अडथळ्यांची माहिती रेल्वे चालकाला अलार्मद्वारे दिली जाणार आहे. नुकतीच या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. देशातील ५० रेल्वेला ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे क्रॉसिंग पॉइंटच्या ५०० मीटर पूर्वीच रेल्वेचा हा अलार्म वाजणार आहे. त्यामुळे गाडी चालकाला ट्रॅकवर अडथळा असल्याची किंवा ट्रॅक ओलांडला जात असल्याची कल्पना मिळेल. तसेच, अलार्म क्रॉसिंग पॉइंटच्या येथेही अलार्म बसविण्यात येणार असून, त्यामुळे ट्रॅक ओलांडणाऱ्यांनाही रेल्वेची येत असल्याची माहिती मिळून ते सावध होतील. गुजरातमधील अहमदाबादजवळील पूर-सरखेज येथे गेल्या आठवड्यात या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली. वऱ्हाडाची गाडी, ट्रॅक्टर, बैलगाड्या आदी वाहने ट्रॅकवर अडकून किंवा वाहने बंद पडल्याने मोठी जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी रेल्वे क्राॅसिंग पॉइंटवर घडल्या आहेत. तसेच, गाडी प्लॅटफॉर्मवर किती वेळात येईल, याचा अचूक अंदाज न आल्यानेही अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या यंत्रणेमुळे क्राॅसिंगच्या समस्या काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. रेल्वेत बसविण्यात येत असलेली ही यंत्रणा अपघात कमी करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. महाराष्ट्रातही अनेक रेल्वे क्राॅसिंग पॉइंटवर नेहमी अपघात होतात. त्यामुळे पुणे-सोलापूर, पुणे-मनमाड या मार्गावरील गाड्यांनाही ही यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार देशभरात ३० हजार रेल्वे क्रॉसिंग पॉइंट आहेत. त्यापैकी सुमारे ११ हजार पॉइंटवर कर्मचारी नेमण्यात आलेले नाहीत. तसेच, एका वर्षात सरासरी सात हजार व्यक्तींचा या ११ हजार क्रॉसिंगवर रेल्वे खाली येऊन मृत्यू होतो. त्यामुळे कर्मचारी नसलेल्या ठिकाणी या प्रणालीचा निश्चितच उपयोग होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्क्या लायसन्ससाठी कसरत

$
0
0

पक्क्या लायसन्ससाठी कसरत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चारचाकी वाहनांच्या पक्क्या लायसन्ससाठी अपॉइंटमेंट घेण्याची वेबसाइट रात्री १२ वाजेपासून एक दिवसाचा कोटा संपेपर्यंतच कार्यान्वित राहत आहे. बहुतांश नागरिकांना याची माहिती नसल्याने त्यांची गैरसोय होत असून, अपॉइंटमेंटसाठी कसरत करावी लागत आहे.
शिकाऊ व पक्के लायसन्स काढण्यासाठी sarathi.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे; तसेच एका दिवसात लायसन्स वितरणासाठीचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे लायसन्ससाठी वेटिंग करावे लागत आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंटची पद्धत सुरू झाली, तेव्हा सुरुवातीच्या काळात वेबसाइट मध्यरात्री १२ वाजल्यानंतर कार्यान्वित होत होती. नागरिकांच्या मागणीनंतर आरटीओने कार्यालयीन वेळेत वेबसाइट कार्यान्वित ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पुन्हा मध्यरात्री १२ नंतर वेबसाइट कार्यान्वित होत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा अपॉइंटमेंटच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
आरटीओमार्फत भोसरी येथील इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग अँड ट्रेनिंग रिसर्च (आयडीटीआर) येथे चारचाकी वाहनांच्या पक्क्या लायसन्ससाठी टेस्ट घेतली जाते. एका दिवसात येथे पुण्यासाठी १३५ व पिंपरी चिंचवडसाठी ७० लायसन्सचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे एका दिवसात केवळ २३५ अपॉइंटमेंट दिल्या जात आहेत; तसेच नागरिकांना सिस्टिमद्वारे मिळणारी अपॉइंटमेट स्वीकारावी लागत आहे. यापूर्वी त्यांना त्यांच्या पसंतीच्या दिवशी अपॉइंटमेंट घेणे शक्य होते.
..................
कार्यालयीन वेळेत कार्यान्वित ठेवा
सध्याच्या वेळापत्रकानुसार, आरटीओतील एजंट आणि अधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मध्यरात्रीनंतर अपॉइंटमेंट घेतल्या जातात. मात्र, अपॉइंटमेंट घेताना अर्जदाराच्या मोबाइलवर एक कोड नंबर पाठविला जातो. तो ऑनलाइन अर्जात नमूद केल्याशिवाय अर्ज पूर्ण होत नाही. त्यामुळे मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांना मध्यरात्री संबंधितांशी संपर्क साधून कोड नंबर घ्यावा लागतो. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच कार्यालयीन वेळेत वेबसाइट कार्यान्वित ठेवावी, अशी मागणी ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलटेकडी परिसरात सात झोपड्या खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये विजेच्या खांबावर शॉटसर्किट झाल्याने आग लागून सात झोपड्या खाक झाल्या. मदतकार्यादरम्यान, नागरिकांनी पत्रे तोडण्यासाठी दगडांचा वापर सुरू केल्याने काहीवे‍ळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी सव्वादहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर येत होता. त्यामुळे आग मोठी असल्याची शक्यता वर्तवून, फायरब्रिगेडने पाच गाड्या घटनास्थळी पाठविल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात घटनास्थळी आगीची तीव्रता कमी होती. अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, आग पसरू नये यासाठी जवानांनी झोपड्यांवर चढून पत्रे कापण्यास सुरुवात केली. त्या वेळी काही रहिवाशांनी मोठे दगड टाकून पत्रे तोडण्यास सुरुवात केली. परिणामी, जवानांना धोका निर्माण झाला होता. अखेरीस पोलिसांना पाचारण करून मदतकार्य सुरू करण्यात आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती फायरब्रिगेडचे अधिकारी प्रकाश गोरे यांनी दिली. गेल्यावर्षी याच वसाहतीमध्ये आग लागून तब्बल ६० कुटुंबांचा संसार उद‍्ध्वस्त झाला होता. त्यानंतर आजतागायत नागरिक पुन्हा त्यांचा संसार उभा करण्यासाठी झटत आहेत. आजच्या आगीमुळे त्या घटेनेची रहिवाशांना पुन्हा आठवण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमपीएससी’ पेपरला चार पर्याय

$
0
0

'एमपीएससी' पेपरला चार पर्याय

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील मराठी व इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपातील बदलासंदर्भाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) चार वेगवेगळे पर्याय विचाराधीन आहेत. या चारही पर्यायांबाबत आयोगाने मत-मतांतरे मागविली असून, त्यानंतर या दोन्ही प्रश्नपत्रिकांचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे.
राज्यसेवा परीक्षेतील मराठी आणि इंग्रजीच्या परीक्षेतील मूल्यांकनात अधिक पारदर्शकता व अचूकता आणण्यासाठी दोन्ही प्रश्नपत्रिकांचे स्वरूप सध्या अस्तित्वात असलेल्या वर्णनात्मक प्रश्नांकडून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांकडे नेण्याचा प्रस्ताव आयोगाच्या विचाराधीन होता. त्यानुसार आयोगाने २० जून २०१५ ला उमेदवार आणि अभ्यासकांकडून त्या विषयीची मत-मतांतरेही मागविली होती. या मत-मतांतरामधून पुढे आलेल्या सूचनांमधून आणखी तीन पर्याय समोर आल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. या नव्या पर्यायांविषयीही आयोगाने सूचना मागविल्या आहेत.
या विषयी आयोगाने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे करून ते क्वालिफायिंग स्वरुपाचे ठेवणे, पारंपरिक वर्णनात्मक स्वरुपात परीक्षा घेत दोन्ही पेपरचे गुण अंतिम गुणवत्तायादीसाठी विचारात न घेणे, अर्धे प्रश्न वर्णनात्मक आणि अर्धे वस्तुनिष्ठ अशा स्वरुपात या दोन्ही पेपरची परीक्षा घेणे आणि सध्याच्या वर्णनात्मक स्वरुपातच वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रमाण वाढविणे हे ते चार पर्याय आहेत. या चारही पर्यायांविषयी आयोगाने येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सूचना मागविल्या असून, त्यासाठी mpscreview@gmail.com या ई-मेलवर योग्य त्या संदर्भांसह संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.
.................
चार पर्यायांची ही माहिती...
अ - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप. दोन्ही पेपरला प्रत्येकी ५० प्रश्न आणि १०० गुण. दोन्ही पेपर आवश्यक किमान अर्हता स्वरुपाचे (क्वालिफायिंग स्वरूप), किमान ४० टक्के गुणांना पासिंग. दोन्ही पेपरमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे गरजेचे.
ब - पारंपरिक, पण केवळ अर्हताकारी स्वरूप - सध्याचेच स्वरूप, मात्र अंतिम गुणवत्तायादी तयार करताना या दोन्ही पेपरचे गुण ग्राह्य न धरणे. दोन्ही पेपरमध्ये स्वतंत्रपणे ३५ किंवा ४० टक्के गुण मिळविणे गरजेचे.
क - मिश्र स्वरूप - अर्धा भाग परंपरागत वर्णनात्मक प्रकारचा. त्यातील गुण केवळ क्वालिफायिंगसाठी. अंतिम गुणवत्तायादीसाठी वर्णनात्मक पेपरचे गुण विचारात न घेणे. पासिंगसाठी किमान ४० टक्के गुण अनिवार्य. उर्वरीत अर्धा भाग वस्तुनिष्ठ बहुपर्यायी करणे. त्यातील गुण गुणवत्तायादीसाठी ग्राह्य धरणे. स्वरूप - भाषा पेपर १ हा पूर्णपणे वर्णनात्मक प्रकारचा १०० गुणांचा. पैकी ५० गुण मराठी, ५० गुण इंग्रजी. भाषा पेपर २ हा पूर्णपणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचा. १०० गुण. मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी प्रत्येकी ५०. दुसऱ्या पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंगचाही विचार.
ड - सध्याचे वर्णनात्मक स्वरूप कायम ठेवून त्यातील वस्तुनिष्ठ प्रश्नांचे गुण वाढविणे - सध्या मराठी व इंग्रजी या दोन्ही पेपरसाठी पहिले तीन प्रश्न हे वर्णनात्मक पद्धतीचे, त्यासाठी ९० गुण आहेत. चौथा प्रश्न १० गुणांचा व वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. त्यात वस्तुनिष्ठ प्रश्नाला १० ऐवजी २० ते ३० गुण करून वर्णनात्मक प्रश्नांचे गुण त्या प्रमाणात कमी करणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंबाटकी घाटातून प्रवास करा; पण जपून...

$
0
0

Swapnil.Shinde@timesgroup.com पुणे : नियमांचे उल्लघन करणारे वाहनचालक अन् अचानक घाटात समोर येणारी मोठ मोठी दगडे, माती... एखाद्या गावातील रस्त्यावरचे वाटणारे हे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्ग चारवरील खंबाटकी घाटाचे. पुण्यावरून सातारा, कोल्हापूर, बेंगळुरूकडे जाताना खंबाटकी घाटातून प्रवास करावा लागतो. परंतु, सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे येथून प्रवास जिकीरीचा बनला आहे. घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, बऱ्याच दिवसांपासून हे काम रेंगाळले आहे. पुण्याला कोल्हापूर, बेंगळुरू सारख्या महत्त्वाच्या शहरांकडे प्रवास करताना या घाटातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते. खेड शिवापूर ते सातारा दरम्यान चौपदरीकरण केल्यानंतर खंबाटकी घाटातून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक करण्यात आली होती. मात्र, घाटात रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात आले नव्हते. त्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणावर होणारी वाहनांची कोंडी नित्याची झाली होती. सध्या महामार्गाचे सहापदरीकणाचे काम हाती घेण्यात आले असून, खंबाटकी घाटातही रस्ता रुंदीकरण सुरू करण्यात आले आहे. रुंदीकरण करताना वाहतुकीचे कसलेही नियोजन नसल्यामुळे घाटात तासन‍्तास वाहतूक कोंडी होत आहे. घाटातील अवघड वळणावर फोडण्यात आलेल्या डोंगराचा सर्व भराव रस्त्यावर आल्यामुळे अगोदरच अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद झाला आहे. परिणामी दुचाकीचालकांनाही मार्ग काढणे अवघड होत आहे. काम सुरू असलेल्या एकाही ठिकाणी सुचना फलक ठेवण्याची तसदीही ठेकेदाराने न घेतल्यामुळे दुहेरी रांग लागून ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्याठिकाणी वाहने अडकून पडत आहेत. गाड्या घसरून अनेक अपघातही या ठिकाणी झाले आहेत. अवजड सामान घेऊन जाणारे कंटेनर, २८ ते ३० चाकी ट्रक याच घाटातून जात असल्याने त्यांना घाटाच्या सुरुवातीला घाटात काम सुरू असल्याची कसलीही सूचना मिळत नसल्याने त्यांना अनेकवेळा दिवसभर घाटातच अडकून पडावे लागते. शनिवारी व रविवारी लोक मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर येत असल्याने येथील वाहतूक कोंडी अधिकच भीषण होते. रस्तारुंदीकरणांच्या घाटात रस्त्याचीही पूर्ण वाट लागली असून, या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस नसल्याने अडचणीत अधिकच भर पडत आहे. घाटात अनेक ठिकाणी कठडे तुटल्यानेही धोका वाढला आहे. प्रशासनाने घाटातील सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेक बाउन्स झाल्यास वीजजोड खंडित

$
0
0

sujit.tambade@timesgroup.com पुणे : विजचे बील भरण्यासाठी चेक देताना आता नागरिकांना खबरदारी घ्यावी​ लागणार आहे. कारण चुकीच्या माहितीमुळे चेक बाउन्स झाल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. एवढेच नव्हे; तर वीजबील थकित असल्यामुळे जाणीवपूर्वक चेकमध्ये चूक करणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार आहे. महावितरणच्या बिलाचा भरणा करताना अनेकजण चेकचा अवलंब करतात. दर महिन्याला सरासरी ८०० चेक चुकीच्या माहितीमुळे बाउन्स होत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. चेक बाउन्स झाल्यानंतर नवीन चेक देण्यासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्याचे सोपस्कार करावे लागतात. त्यामुळे लागणाऱ्या विलंबामुळे थकबाकीची रक्कमही वाढत जाते. मात्र, काहीजण थकित बील देणे टाळण्यासाठी जाणीवपूर्वक चेकमध्ये चूक करून महातिरणकडे जमा करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता चेक बाउन्स झाल्यास संबंधित वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. बाउन्स होणाऱ्या चेकबाबत महावितरणकडून माहिती घेण्यात आल्यानंतर त्यापैकी बहुतांश ग्राहकांची बिलाची रक्कम थकित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तारीख चुकीची टाकणे, खाडाखोड करणे, चुकीची सही करणे यासारखे प्रकार करण्यात येत आहेत. ते चेक बाउन्स होत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी यापुढे कोणत्याही​ नागरिकाचा चेक बाउन्स झाल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण ठरविण्यात आले असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. चेक बाउन्स झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता येते. एखाद्या ग्राहकाने थकित बील देण्यासाठी आणखी कालावधी मिळावा म्हणून जाणुनबुजून चुकीचा चेक दिल्यास त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मुंडे म्हणाले. विजेचे बील भरण्यासाठी कोणत्याही बील भरणा केंद्रात गेल्यानंतर नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन मुख्य अभियंता मुंडे यांनी केले आहे. कारण रोकड घेऊन चेक स्वीकारल्याची पावती देणारी टोळी शहरात कार्यरत झाली आहे. रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाची लवकर बील भरण्यासाठी घाई सुरू असल्यास अशा नागरिकाला या टोळीकडून हेरले जाते. त्या नागरिकाजवळ टोळीतील एकजण जातो. आतमध्ये जाऊन बील भरून देतो, असे सांगून त्या नागरिकाकडून रोकड घेतली जाते. त्यानंतर फसवणूक करणारी व्यक्ती बील भरणा केंद्रामध्ये जाते आणि थोड्यावेळाने पैसे भरल्याची पावती आणून देते. बील भरले असे समजून नागरिक निघून जातो; पण ती पावती बिलापोटी चेक स्वीकारल्याची असते. प्रत्यक्षात नागरिकाने रोख रक्कम दिलेली असते. फसवणूक करणाऱ्याने दिलेला चेक बाउन्स झाल्यानंतर हा प्रकार लक्षात येतो...'असे अनेक प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडे बील भरण्यासाठी पैसे देऊ नयेत.' असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनाही बसला हेल्मेटसक्तीचा दंडुका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहतूक पोलिसांकडून गेल्या पाच दिवसांपासून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर करण्यात येत असलेली कारवाई सोमवारीही सुरूच होती. शहरात सोमवारी ८८५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. ४५ पोलिस कर्मचाऱ्यांनाही या कारवाईचा दट्ट्या सहन करावा लागला.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुण्यात हेल्मेट सक्ती लागू करण्याची घोषणा औरंगाबादला केली. त्यानंतर चार फेब्रुवारीपासून शहरात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी ४,०१७ आणि दुसऱ्या दिवशी ५,०११ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर पुणेकरांकडून हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध केला. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. हेल्मेटसक्तीच्या विषयावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत राजकीय कलगीतुराही रंगला. त्यानंतर रावते यांनी रविवारी (ता. ७) पुण्यात कौन्सिल हॉलला पुणेकरांशी हेल्मेटप्रश्नी चर्चा केली. राज्य सरकारला हेल्मेटसक्ती रद्द करण्याबाबत निर्णय घेणे शक्य नसल्याने या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

दरम्यान, सामान्य नागरिकांवरच हेल्मेटची कारवाई केली जाते. पोलिस कर्मचारी हेल्मेट वापरत नाहीत. त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न रावतेंच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाईस सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोडीच्या प्रसारासाठी डोक्यावर हेल्मेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हेल्मेटसक्तीवरून नागरिक आणि प्रशासन यांच्यात खडाजंगी सुरू असतानाच, एका युवतीने मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हेल्मेटचा अभिनव पद्धतीने वापर केला आहे. हेल्मेटवर मोडीतील संदेश लिहून वाहन चालविणाऱ्या युवतीची ही कृती नागरिकांचे लक्ष वेधत आहे.

चिंचवड गावात राहणाऱ्या श्रृती गावडे या विद्यार्थिनीने हा उपक्रम राबवला आहे. श्रृती आकुर्डीतील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अप्लाइड आर्ट्स अँड क्लाफ्ट्स कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत आहे. शहरात हेल्मेटसक्ती सुरू झाल्यानंतर, हेल्मेटद्वारे मोडी लिपीचा प्रसार करण्याची कल्पना तिला सुचली. तिने हेल्मेटवर मोडी लिपीतील १० व्यंजने आणि बाराखडी पेंट करून घेतली. 'रस्त्यावरून येता-जाता, सिग्नलला थांबल्यावर अनेक जण माझ्या हेल्मेटकडे कौतुकाने पाहतात. काही जण कुतूहलाने काय लिहिले आहे, याची विचारपूस करतात. जुन्या पिढीतील आणि मोडीची माहिती असणारी मंडळी माझ्या उपक्रमाचे कौतुकही करतात,'असे श्रृतीने 'मटा'ला सांगितले.

पदवी अभ्याक्रमामध्ये 'टायपोग्राफी' हा तिचा विशेष विषय आहे. तसेच, तिला मोडी शिकण्याची आवड होती. त्यामुळे तिने मोडी लिपीचा पर्याय निवडला. 'डिसेंबर २०१५पासून आपण मोडी लिपी शिकण्यास सुरुवात केली आहे. हेल्मेटबरोबरच मोडी भाषेतील कॅलेंडर आणि बॅचेसही तयार केले आहे,' असेही श्रृती म्हणाली. बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन आज, मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस भरविण्यात आले आहे. तेथे या गोष्टी पाहायला मिळतील, असेही श्रृती म्हणाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएमई गार्डच्या मृत्यूचे गूढ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे माळवाडीतील डुक्करखिंडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या 'सीएमई'तील गार्डच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा वारजे माळवाडी पोलिसांकडून शोध सुरू आहे.

बाजीराव बाळू पवार (वय २५, रा. कस्पटेवस्ती, मूळ रा. बीड) असे या गार्डचे नाव आहे. रविवारी सकाळी डुक्करखिंड परिसरात जळालेल्या अवस्थेत पवारचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वारजे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पवार यांच्या मृत्यूबद्दल कुटुंबीयांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांनी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले. सीएमईमध्येही चौकशी केली असता अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. पवारच्या पत्नीकडे अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही. चौकशी झाल्यानंतरच पवारचा खून झाला की त्याने आत्महत्या केली, त्याचा मृतदेह डुक्करखिंडीत कोणी टाकला याचा तपास करण्यात येत आहे, असे वारजे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडथळे आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप भरले गेले नाहीत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही,' असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर बडोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'सामाजिक न्याय विभागाकडे राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जांची नोंद झाली आहे. सर्व्हरच्या अडचणींमुळे शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी कॉलेजला पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेले नाहीत. ऑनलाइनचे काम दिलेल्या मास्टेक कंपनीचा करार या वर्षी संपणार आहे. तो संपल्यानंतर जास्त क्षमतेचे सर्व्हर किंवा सॉफ्टवेअर घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. सर्व्हरसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. मात्र, मास्टेक कंपनीकडे आम्ही सत्तेवर येण्याच्या पूर्वीपासून काम दिलेले आहे. करार संपेपर्यंत त्यांच्यावरच विसंबून राहावे लागेल,' असे बडोले यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतील (बार्टी) कामकाजात लवकरच बदल होतील, असे सांगून बडोले म्हणाले, की 'बार्टीचे महासंचालक डी. आर. परिहार ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे डी. आर. डिंगळे यांच्याकडे महासंचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या घटनेला चार-पाच दिवस झाले आहेत. बार्टी ही मोठी संस्था आहे, या संस्थेचे कामकाज समजण्यास त्यांना काही कालावधी लागेल. त्यामुळे काही कामे थांबली आहेत, याचा अर्थ आधी घेतलेले निर्णय स्थगित केले असा होत नाही. वर्षभरात संस्थेची भरभराट झालेली आहे. कोणतीही योजना बंद करण्याचा किंवा कोणाचे धनादेश अडवण्याचा आमचा उद्देश नाही,' असेही बडोले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलचाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खात्याने यंदा प्रथमच आयोजित केलेल्या कल चाचणीला सोमवारी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून एकूण १८ हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी कलचाचणी दिली. तसेच, ऑनलाइन कलचाचणीच्या प्रयोगालाही राज्यात कोणत्याही अडथळ्याविना सुरुवात झाल्याचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

दहावीच्या टप्प्यावरच विद्यार्थ्यांना त्यांचा नेमका कल समजावा, त्यानुसार पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांची निवड करणे सोयीचे जावे आणि अंतिमतः करिअर निवडीची प्रक्रियाही सुलभ व्हावी, या हेतूने शिक्षण खात्याने यंदा राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात सोमवारपासून कल चाचण्यांचे आयोजन करण्यात आले. दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने ही चाचणी घेतली जाणार आहे. शहर आणि परिसरातही चाचण्यांचा पहिला दिवस सुरळीत पार पडल्याचे अनुभवायला मिळाले.

चाचण्यांचे नियोजन करतानाच विद्यार्थ्यांवर कोणताही ताण येऊ नये, या हिशेबाने शाळांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. राज्य बोर्डाने विभागीय बोर्डांच्या माध्यमातून त्या विषयी शाळांपर्यंत नियोजन या पूर्वीच पोहोचविलेले आहे. 'ऑनलाइन चाचणीमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास ऑफलाइन माध्यमातून चाचणी घेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांमध्ये कोणतीही अडचण आली नाही,' असे बोर्डाचे सचिव के. बी. पाटील यांनी सांगितले.


..
शाळांनी आपल्याकडील कम्प्युटरची उपलब्धता, विद्यार्थ्यांची संख्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक या बाबींचा मेळ घालून विद्यार्थ्यांना चाचणी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत.

के. बी. पाटील, सचिव, राज्य बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धांची तिपिटके मराठी भाषेत येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचे सखोल संशोधन होण्यासाठी आणि त्यांचा साहित्यिक, सांस्कृतिक वारसा पुन्हा देशता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, बुद्धांच्या पाली भाषेतील ग्रंथांचे मराठीत भाषांतर करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षानिमित्त राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. इगतपुरी येथील विपश्यना संशोधन विन्यासाने प्रकाशित केलेल्या तिपिटकातील सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांचे भाषांतर केले जाणार आहे. या उपक्रमाबाबत राज्य सरकारने समितीची स्थापना केली असून, समितीच्या अहवालानंतर प्रत्यक्ष भाषांतराचे काम सुरू होणार आहे. सामाजिक न्यायमंत्री समितीचे अध्यक्ष आहेत. तिपिटकातील कोणत्या ग्रंथांचे भाषांतर करायचे आणि त्याचा प्राधान्यक्रम समिती ठरविणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली भाषा विभाग, पाली बुद्धिस्ट विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आदी संस्थांतील तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

पाली देशातील प्राचीन भाषा आहे. गौतम बुद्धांची शास्त्रीय, तर्कसंगत आणि मानवी मूल्यांवर आधारित शिकवण पाली भाषेत जतन करून ठेवण्यात आली आहे. तसेच, त्यांनी दिलेला वैज्ञानिक आणि मानवी उपदेश पाली तिपिटकामध्ये उपलब्ध आहे. या साहित्याच्या अभ्यासातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणा घेतली. त्यांना बुद्धांच्या उपदेशात स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय ही मूल्ये आढळून आली. बुद्धांच्या उपदेशातून प्रतिबिंबीत झालेले तत्त्वज्ञान डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेच्या तत्त्वांमध्ये स्पष्ट केले. बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक साहित्यावरही या तत्त्वांचा प्रभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त हा राज्य सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असहिष्णूता नाहीच; चांगलेच वातावरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील वातावरण 'अच्छे' आहे. सर्व लोक चांगले आहेत. आपणच वातावरण घाण करतो, अशा शब्दांत प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी केंद्रातील भाजप सरकारची पाठराखण केली. देशात असहिष्णुता नसून, वातावरण चांगलेच आहे असे स्पष्ट करून त्यांनी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर फुंकर मारली.

एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या चौरसिया यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. असहिष्णुता ते संगीतातील शिव-हरी जोडी या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला.

असहिष्णू वातावरण आणि पुरस्कारवापसी याविषयी आपले मत काय, असे पत्रकारांनी विचारले असता, 'कुठे आहे असहिष्णुता,' असा उलट सवाल त्यांनी केला. 'देशात असहिष्णुता नाही तर वातावरण अच्छे आहे. देशात संगीताचे वातावरण चांगले होऊ पाहात आहे. अनेक महोत्सव होतात आणि त्यातून शास्त्रीय संगीत पुढे येत आहे, या वातावरणात मी आनंदी आहे,' असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवण सांगताना ते म्हणाले, पंतप्रधान चांगले आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझ्या कार्यक्रमात दोन तास बसले होते. सगळीच मंडळी चांगली आहेत. आपणच वातावरण खराब करतो, असेही चौरसिया म्हणाले.

..

'चित्रपट संगीताची प्रतीक्षा'

शिव-हरी ही प्रसिद्ध जोडी हिंदी चित्रपटात पुन्हा अनुभवायला मिळेल का, असे पत्रकारांनी विचारले असता, आम्हाला काम करायला आवडेल असे उत्तर पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी दिले. चित्रपट संगीताचे वेगळे जग असून, त्यातही आनंद आहे. शास्त्रीय संगीत दहा लाख लोक ऐकतात , तर चित्रपट संगीत दहा कोटी लोक ऐकतात. चित्रपट संगीतप्रेमींच्या हृदयात बसायला आम्हाला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रकाश व काळोख यांच्या लपंडावात गंमत आहे. काळोख पडल्याशिवाय प्रकाशाचे महत्व कळत नाही. त्यानुसार आजच्या संगीतावरून चांगल्या संगीताचे महत्त्व रसिकांना कळेल. ही एक अवस्था असते. ही परिस्थिती बदलेल, असा आशावाद त्यांनी प्रकट केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारी भूखंडावर गुरुकुलच चालवतो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सरकारने दिलेल्या जागेत गुरूकुलच चालवले जाते. या जागेचा गैरवापर होत नाही, त्यासाठी मान द्यायला हवा. टीका सहन करून इतकी वर्षे संगीताची सेवा केली; त्याचे हेच फळ का, असा सवाल करून हेमामालिनी ते हरिप्रसाद अशी बदनामी या वयात नको,' अशी भावना प्रख्यात बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी 'महाराष्ट्र टाइस्म'शी बोलताना व्यक्त केली.

ज्येष्ठ अभिनेत्री आ​णि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांना नाममात्र दराने दिलेल्या भूखंडावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. या पूर्वी सरकारने कलाकारांना दिलेल्या भूखंडांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ख्यातनाम गायक सुरेश वाडकर आणि चौरसिया यांना सांस्कृतिक उपक्रमांसाठी दिलेले भूखंड चर्चेत आले असल्याचे वृत्त 'टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले होते.

चौरसिया यांच्या 'वृंदावन गुरुकुल'साठी २०००मध्ये जुहू-वर्सोवा लिंक रोड येथे भूखंड देण्यात आला आहे. या वास्तूचा वापर ते कुटुंबासाठी 'हॉलिडे होम' म्हणून करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता, चौरसिया म्हणाले, की 'हेमा मालिनी चांगले काम करत आहेत. मीही गेली अनेक वर्षे संगीताची सेवा करीत आहे. पुरेशा माहितीअभावी बदनामी करण्यात येत आहे. सरकारने दिलेल्या जागेत गुरुकुल चालवले जाते; त्यासाठी मला मानच द्यायला हवा. या प्रकाराने खूप दु:ख झाले. वृंदावन हे गुरुचे घर आहे. त्यासाठी मी मेहनत घेतली आहे. या ठिकाणी शिष्यांकडून पैसेही घेतले जात नाहीत. जे चुकीचे असेल ते चुकीचेच आम्ही मानतो. अशा चर्चेने वाईट वाटते. लोकांचा दृष्टिकोन तसा असेलही, पण वरचा आपल्याकडे पाहात असतो. त्याच्याकडे सर्व हिशेब नोंद असतो,' अशा शब्दांत चौरसिया यांनी आपली बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराण्यांमुळे झाली नृत्य, संगीताची हानी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पुणे


घराण्यांमुळे नृत्य, संगीताची हानी झाली आहे. घराण्यांमधील वाद अद्याप सुरू असून युवा कलाकारांना या वादाशी काहीही देणेघेणे नाही. सर्व घराण्यांतील चांगली कला आत्मसात करून कलेचा संगम घडवणे आणि ती जोपासणे हाच नव्या पिढीचा उद्देश आहे,' असे रोखठोक मत युवा कथक नर्तक विशाल कृष्ण याने व्यक्त केले.



बनारस घराण्याचे संस्थापक पं. सुखदेव महाराज यांच्या कुटुंबातील कथक नृत्याचे प्रतिनिधित्व करणारी विशाल कृष्णची अकरावी पिढी आहे. ज्येष्ठ नृत्यगुरू सितारादेवी यांचा नातू आणि पं. गोपीकृष्ण यांचे धाकटे बंधू असलेल्या विशालने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सितारादेवी यांच्याकडे नृत्याचे धडे गिरविले. थाळी नृत्याबरोबरच एका पायावर नृत्य करण्याचे कौशल्य विकसित करून जगभर अनेक महोत्सव आणि कार्यक्रमांमध्ये त्याने हजेरी लावली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बहारदार सादरीकरणानंतर विशालने पत्रकारांशी संवाद साधत कथक नृत्यामध्ये झालेले बदल, संगीतामधील घराणी, कथकचे सौंदर्य या विषयांवर प्रकाश टाकला.



'एक काळ असा होता की कथक नृत्याला खालच्या स्तरावरचे मानले जात होते; ते केवळ मनोरंजनाचे साधन होते. कोठ्यांवरचे नृत्य अशीच त्याची प्रतिमा होती. त्याकाळी महिलांनी नृत्य करणे देखील निषिद्ध मानले जात होते. मात्र, आपले पणजोबा पं. सुखदेव महाराज यांनी लोकांचा विरोध पत्करून आपल्या मुलींना या क्षेत्रात आणले. आमच्या कुटुंबाला समाजाने बहिष्कृत केले. तरीही पणजोबा डगमगले नाहीत. त्यांच्यामुळेच तारादेवी, सितारादेवी या क्षेत्रात येऊ शकल्या,' असे विशालने स्पष्ट केले.



नृत्य शिकता येते; भाव नाहीत



आज गल्लीबोळांमध्ये नृत्याचे क्लासेस घेतले जात आहेत, मात्र त्यात गुणवत्ता नाही. आपण काय शिकत आहोत, हे स्वत: तपासायला हवे. शिक्षकही विद्यार्थ्यांना क्लासव्यतिरिक्त अन्य व्यक्तीकडून शिक्षण घेण्यास मज्जाव करतात. त्यामुळे नृत्य शिकता येते पण, भाव शिकता येत नाहीत अशी मार्मिक टिप्पणी विशाल कृष्ण याने केली.


कथकमध्ये बनारस, लखनौ आणि जयपूर या तिन्ही घराण्यांचे योगदान आहे. लखनौ भक्तीरसासाठी तर, जयपूर हे वीररसासाठी ओळ्खले जाते. या दोन्ही घराण्यांचे मिश्रण बनारस घराण्यामध्ये सापडते. ही तिन्ही घराणी माझ्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांसारखी आहेत.


विशाल कृष्ण, युवा कथक नर्तक


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकी नागर‌िकांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मायक्रोसॉफ्ट टेक्निकल सपोर्ट'मधून बोलत असल्याचे सांगत अमेरिकी नागरिकांना गंडा घालणाऱ्या बावधन येथील एका 'बीपीओ' सेंटरवर, पुणे पोलिसांच्या सायबर सेलने छापा घालून तिघांना अटक केली आहे. या 'बीपीओ'मधून अमेरिकी नागरिकांच्या कम्प्युटरमधील व्हायरस काढून देण्याचा पराक्रम करण्यात येत होता. अशा प्रकारचे फसवणूक करणारे अनेक 'बीपीओ' पुण्यात कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या 'बीपीओ'मध्ये तीन लाखांहून अधिक अमेरिकी नागरिकांचा 'डेटा' मिळाला असून तो त्यांना कसा मिळाला, याचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी आदित्य रवींद्र राठी (वय २५, रा. बावधन, चांदणी चौक), हरीष नारायणदास खुशलानी (वय २६, रा. पिंपरी) आणि रितेश खुशाल नवानी (वय २९, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे ​आहेत.

'बीसीए'च्या द्वितीय वर्षात शिक्षण सोडलेला आदित्य हे 'बीपीओ' चालवत होता. मध्येच शिक्षण सोडलेल्या आदित्यने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली आहे. एका 'बीपीओ'मधील नोकरी सोडल्यानंतर त्याने स्वतःचे 'बीपीओ' सुरू करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान अमेरिकी नागरिकांचा 'डेटा' मिळाला. या अमे​रिकी नागरिकांना 'व्हीओआयपी'वरून कॉल करण्यात येत होता. 'मायक्रोसॉफ्ट टेक्निकल सपोर्ट'मधून बोलत असल्याचा बहाणा करत या नागरिकांच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस असल्याचा बहाणा करत येत होता. कम्प्युटर 'क्लिन करण्यासाठी त्यांच्याकडे ३०० डॉलरपर्यंतची मागणी करण्यात येत होती, अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

'बीपीओ'मधील कर्मचाऱ्यांकडून 'टीम व्हीवर' हे सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून अमेरिकी नागरिकांच्या कम्प्युटरमधील 'डेटा' मिळवून त्याचा गैरवापर केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने आरोपींना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटसाठी पुणेकरांकडून सूचनांचा पाऊस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रभागातील छोटा रस्ता-फूटपाथपासून ते सार्वजनिक वाहतुकीसाठी बससंख्येत वाढ करण्यापर्यंतच्या अनेक सूचनांचा पाऊस पुणेकरांनी 'आपलं बजेट, आपलं पुणे' या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मोहिमेत पाडला. नागरिकांनी केलेल्या सर्व सूचना सोमवारी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या असून, त्यातील काही प्रकल्पांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद होण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला अर्थसंकल्प आराखडा सादर केला असून, स्थायी समितीमार्फत २०१६-१७चा अर्थसंकल्प लवकरच अंतिम केला जाईल. तत्पूर्वी, नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात व्हावा, या दृष्टीने 'मटा'ने राबवविलेल्या 'आपलं बजेट, आपलं पुणे' या मोहिमेला मोठा प्रतिसाद देत हजारोंहून अधिकांनी सूचना केल्या. 'मटा'कडे प्राप्त झालेल्या सर्व सूचना महापालिकेत विविध कामांसाठी आलेल्या सामान्य नागरिकांच्या हस्तेच स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्याकडे सुपूर्त केल्या गेल्या. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या या उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांच्या सहभागाबद्दल कदम यांनी सर्व पुणेकरांचेही विशेष आभार मानले.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या विविध योजनांमध्ये नागरी सहभागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या पाच हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या थेट सहभागाचे प्रतिबिंब उमटावे, या उद्देशाने 'मटा'ने 'आपलं बजेट, आपलं पुणे' ही मोहीम राबविली. शहराच्या विविध भागांतून हजारो पुणेकरांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 'मटा'च्या कार्यालयामध्ये; तसेच ई-मेलवरही बजेटमध्ये कामे सुचविणाऱ्या सूचनांचा ढीग साठला. आपल्या परिसरातील रस्त्यावर एलईडी दिवे बसविणे, परिसरातील रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यांचे डांबरीकरण, पादचाऱ्यांसाठी फूटपाथ निर्मिती, घनकचरा संकलनासाठी व्यवस्था, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे, लहान मुलांसाठी उद्याने-बागा यासारख्या अनेक सूचना नागरिकांनी केल्या. बऱ्याच नागरिकांनी त्याविषयीच्या अपेक्षित खर्चाचा अंदाजाचा आवर्जून उल्लेख केला आहे.

अर्थसंकल्पामध्ये नागरिकांचा थेट सहभाग घेण्याचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे. शहराच्या विकासामध्ये यापुढील काळातही नागरिकांचा सक्रिय सहभाग, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरेल. नागरिकांनी सुचविलेल्या जास्तीत जास्त कामांना अर्थसंकल्पात स्थान देण्याचा प्रयत्न केला जाईल.

- अश्विनी कदम, अध्यक्षा,स्थायी समिती, पुणे महापालिका


नागरिकांच्या गरजांतून तयार झालेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणेही अधिक सोपे जाईल. नागरिकांच्या सूचनांची दखल घेणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा हा उपक्रम भविष्यातही असाच सुरू राहो.
- कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images