Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिस सुस्त.. सोनसाखळीचोर मस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोनसाखळी चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले असून रविवारी शहरात दिवसभरात विविध ठिकाणी चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दत्तवाडी, भारती विद्यापीठ, सांगवी आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनांमध्ये साधारण दहा तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या घटनांमुळे पोलिस सुस्त तर सोनसाखळी चोरांचे 'मस्त' झाल्याचे चित्र दिसत आहे.

शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आहे. शहरात दररोज किमान एक ते दोन घटना घडत आहेत. शहरात रविवारी पहिली सोनसाखळी चोरीची घटना दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारी बाराच्या सुमारास घडली. याबाबत शोभा बाळकृष्ण अनगळ (वय ७०, रा. लक्षलेखा सोसायटी, सहकारनगर) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अनगळ या त्यांच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी सरकारनगर येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्या दोघी मैत्रिणी भाजी आणण्यासाठी म्हणून घराबाहरे पडल्या. बाराच्या सुमारा अॅक्सीस सुझुकी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अनगळ यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चिंतामणी सोसायटीच्या दिशने पळून गेले. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी सोनसाखळी चोरीची घटना रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास कात्रज दत्तनगर रोडवर घडली. मीरा गणपत माने (वय ५०, रा. समृद्धी हाइट्स, दत्तनगर, कात्रज) या पायी जात असताना चंद्रभागा परमिट रूमसमोर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र व गंठण हिसका मारून तोडून नेले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना सोनसाखळी चोरीची घटना ही विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या घटनेत एक तोळे वजनाचे दागिने चोरीला गेले आहेत. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेतही एका ज्येष्ठ महिलेचे एक तोळ्याचे दागिने हिसकावून नेले आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असली, तरी देखील सोनसाखळी चोरीच्या घटना थांबण्यात तयार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हडपसर येथील घरातून चोरी केल्याप्रकरणी तिघांना अटक

$
0
0

पुणेः काळेपडळ येथील एका घरातून सोन्याची अंगठी, रोकड असा ५५ हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणी तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. नरेश पदम शाही (वय ३६), जगत करीराज जोशी (वय २२) आणि सागर विजय शर्मा (वय १९, सर्व मूळ रा. नोपाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अतुल पांडुरंग जोशी (वय २७, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. २८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली. अतूल जोशी यांचे घराचे कुलूप तोडून घरातील दागिने आणि रोकड चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

आरोपीला कोठडी

पिस्तूलधाऱ्यास व्यक्तीचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या एकाला तरुणाला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. गोळीबार करणारा आरोपी अद्यापही फरार आहे. अक्षय अनिल सोनी (१९, रा. परभणी) असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला आहे. २२ डिसेंबर रोजी दुपारी सावरकर भवन ते आपटे रोड परिसरात ही घटना घडली. पोलिस कर्मचारी मयूर भोकरे (२६, रा. कसबा पेठ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मयूर त्यांच्या भावासह निघाले होते. त्या वेळी सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीस्वारामागे बसलेल्या एकाकडे पिस्तूल असल्यचे त्यांना दिसले. त्यांनी त्याच्याकडे पिस्तुलाच्या परवाण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर तो त्यांच्याशी हुज्जत घालून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून पिस्तूल ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना त्याने भोकरे यांच्या दिशेने गोळी झाडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंगीचे औषध देऊन लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वारगेट ते नवी मुंबई प्रवासात एका जेष्ठ नागरिकाला गुंगीचे औषध असलेले बिस्किट खायला देऊन त्यांच्याकडील तब्बल ८७ हजार रूपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. लोणावळ्याच्या पुढे गेल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत बसच्या सीटवर ज्येष्ठ नागरिक आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुंडलिक हराळे (६४, रा. नवी मुंबई) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हराळे कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील जत येथे गेले होते. १५ डिसेंबर रोजी काम संपवून ते पुण्यात आले. त्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावरून ते नवी मुंबईला जाण्यासाठी बसमध्ये बसले. ही बस शहराच्या बाहेर जात असताना, एकजण त्यांच्या शेजारी बसला. तुम्ही कुठले, काय करता, पुण्यात कशासाठी आले होते असे प्रश्न विचारून गप्पा मारण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्या व्यक्तीने त्याच्या जवळ असलेले बिस्टिक हराळे यांना खायला दिले. बिस्किट खाल्ल्यानंतर हराळे यांना काही वेळातच चक्कर आली. ते बेशुद्ध अवस्थेत गेले. हराळे यांना काहीच कळत नसल्याची संधी साधत चोरट्याने त्यांच्या गळ्यातली सोन्याची साखळी, दोन अंगठ्या असा एकूण ८७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले, हराळे यांना लुटल्यानंतर त्यांच्या शेजारी बसलेला व्यक्ती लोणावळ्याच्या आधी बसमधून खाली उतरला. लोणावळ्याच्या पुढे गेल्यानंतर हराळे सीटवर पडले होते. बसमधील इतर प्रवाशांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. बसच्या चालक व वाहकाने त्यांना बेलापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांनी प्रकृती व्यवस्थित झाली. त्यांनतर हराळे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे. मात्र, त्यांना बिस्कीट कधी खायला दिले, कोणी दिले हे त्यांना अद्याप आठवत नाही. गुंगीचे औषध देऊन प्रवाशाला लुटल्याची गेल्या वर्षभरातील ही पहिलीच तक्रार स्वारगेट पोलिसांकडे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाजीराव-मस्तानी’मुळं शनिवारवाडा गजबजला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पेशव्यांचा पराक्रमी इतिहास सांगणारा शनिवारवाडा पर्यटकांचे आकर्षण असला, तरी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमानंतर हा ऐतिहासिक वारसा पाहण्याच्या 'ट्रेंड'ला नवा उजाळा मिळाला आहे. सिनेमाचा प्रभाव आणि नाताळ सुट्ट्यांमुळे शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. परंतु, येथे येणाऱ्या पर्यटकांना पेशवे आणि शनिवारवाड्याविषयी माहिती देणारी यंत्रणा नसल्याने अनेकांना माहितीअभावी परत जावे लागत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून शनिवारवाडा पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दर रविवारी सरासरी पाच ते साडेपाच हजार पर्यटक शनिवारवाड्यास भेट देतात. मात्र, गेल्या दोन रविवारी ही संख्या नऊ हजारांवर पोहोचली आहे.

१८ डिसेंबर रोजी बाजीराव मस्तानी हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर ३९ हजार ५२९ पर्यटकांनी शनिवारवाड्यास भेट दिली. त्यामध्ये २५२ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाताळच्या सुट्ट्यांमुळे गर्दीत भर पडत आहे.

शनिवारवाड्यातील आरसे महाल, गणेश महाल, हजारी कारंजे, कात्रजच्या तलावातून आणलेल्या पाण्याचा हौद, शनिवारवाड्याची मूळ वास्तू आणि पेशव्यांचा इतिहास याबाबतची माहिती सांगण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. आतमध्ये ठिकठिकाणी लावलेल्या माहिती फलकांपैकी अनेक फलक गायब झालेले आहेत. सायंकाळी होणाऱ्या 'लाइट अँड साउंड शो'द्वारे पेशव्यांच्या इतिहासाची माहिती दिली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून नूतनीकरणाच्या कामामुळे तोही बंद आहे.

''वाड्याच्या प्रांगणात गेल्या आठवड्यात शनिवारवाडा कला महोत्सव सुरू होता. अनेक पर्यटक शनिवारवाड्यातील 'लाइट अँड साउंड शो' आहे, असे समजून महोत्सवाच्या कार्यक्रमांना येऊन बसत होते. तसेच, आयोजकांकडे त्याबाबत विचारणाही करीत होते. संबंधित शो बंद असल्याची माहिती स्पष्टपणे पर्यटकांना दिली पाहिजे.''

- विजय काळे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशन होणार चकाचक

$
0
0

'आयआरसीटीसी' उभारणार प्रवाशांसाठी एक्झिक्युटिव्ह लाउंज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एअरपोर्टवर दाखल झाल्यापासून फ्लाइट उड्डाण घेईपर्यंत प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधा, त्यांच्या दिमतीसाठी नेमलेले विशेष कर्मचारी, वाय-फाय इंटरनेटची सुविधा, त्यांना फ्रेश होण्यासाठी व कपडे बदलण्यासाठी रूम, बफेट सर्व्हिसेस आदी एअरपोर्टवर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, आता रेल्वे प्रवाशांनाही दिल्या जाणार आहेत. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे ठराविक ४९ रेल्वे स्टेशनवर एक्झिक्युटिव्ह लाउंज उभारले जाणार असून तेथे या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे.

राज्यात पुण्याव्यतिरिक्त मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, बांद्रा टर्मिनस व नागपूर या स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी एका व्यक्तीला दर दोन तासासाठी १५० रुपये व त्यापुढील प्रत्येक तासासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. एक्झिक्युटिव्ह लाउंज हे संपूर्ण एसी असेल. येथे प्रवाशांना त्यांची रेल्वे स्टेशनवर येईपर्यंत थांबता येणार आहे. यामध्ये प्रवाशांना वाय-फाय इंटरनेटसह चहा, कॉफी, सरबत दिला जाईल. तसेच, वाचनासाठी वर्तमानपत्र, मासिके आणि करमणुकीसाठी टीव्ही असणार आहे. या सुविधा प्रवाशांना प्रवेश शुल्कात दिल्या जाणार आहेत.

तीन फुटांपर्यंत उंची असलेल्या लहान मुलांना शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती 'आयआरसीटीसी'च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लाउंजमध्ये स्वच्छतागृह देखील असणार आहे. स्वच्छतागृहात टॉवेल, साबण, शाम्पू, बॉडीलोशन, शॉवर कॅप इत्यादी वस्तू पुरविल्या जाणार आहेत. व्यावसायिकांसाठी कम्प्युटर व इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. तसेच, प्रिंट, फोटोकॉपी व कागदपत्रांचे स्कॅनिंग करणे येथे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७० हजार संस्था कागदावरच

$
0
0

सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सुमारे ७० हजार सहकारी संस्था या फक्त कागदोपत्री नोंदविण्यात आल्याचे सर्वेक्षणात आढळले असल्याने ३१ मार्चपर्यंत त्या संस्था बंद करण्यात येणार असल्याचे राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. सहकारी बँका टिकविण्यासाठी गुजरात सरकारच्या धर्तीवर 'बँक डेव्हलममेंट फंड' सुरू करण्याची आवश्यकता असून, सहकारी बँकांनीही शेतीवर आधारित उद्योग निर्माण होण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून उद्योगांना अर्थसाह्य करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्या सहकारी बँकेच्या बँकिंग ​दिनदर्शिकेचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, विद्या सहकारी बँकेचे प्रमुख विद्याधर अनास्कर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन किवळकर आदी उपस्थित होते.

राज्यातील दोन लाख ३० हजार सहकारी संस्था या नोंदणीकृत आहेत. त्यापैकी सुमारे ७० हजार संस्था या कागदोपत्री नोंदविण्यात आल्या आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी या संस्था असून ३१ मार्चपर्यंत या संस्था बंद करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

गुजरात राज्याने 'बँक डेव्हपलमेंट फंड' सुरू केला आहे. त्या धर्तीवर राज्यात बँका टिकविण्यासाठी अशा फंडची आवश्यकता आहे. साखर कारखान्यांसाठी 'शुगर डेव्हलपमेंट फंड' आहे. यावर्षी राज्य सरकारने पतसंस्थांसाठी २०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यामुळे पतसंस्थांमधील खातेदारांना दहा हजार रुपये मिळू शकले. नागपूर, वर्धा आणि बुलढाणा मध्यवर्ती सहकारी बँकांना ४०० कोटी रुपयांची मदत करण्यात आली. मात्र, नागरी सहकारी बँकांसाठी अद्याप मदत देता आलेली नाही. 'बँक डेव्हपलमेंट फंड' सुरू केल्यास त्यांनाही मदत देता येईल, असे पाटील यांनी सांगितले. राज्यातील साखर कारखान्यांनी 'एफआरपी' न दिल्यास त्यांचे गाळप परवाने रद्द करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. २० हजार कोटी रुपयांपैकी १९ हजार ७०० कोटी मिळाले आहेत.

४६ कारखान्यांनी 'एफआरपी' नाही

राज्यातील साखर कारखान्यांनी 'एफआरपी' न दिल्यास त्यांचे गाळप परवाने रद्द करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. २० हजार कोटी रुपयांपैकी १९ हजार ७०० कोटी शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अद्याप ४६ कारखान्यांनी सुमारे ३०० कोटी रुपये दिलेले नाहीत. त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत ही रक्कम न दिल्यास कारवाई केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या आठवड्यात महापौर बदलणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्मार्ट सिटी'च्या गोंधळाचा अध्याय, शरद पवार यांचा वाढदिवस आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये गुंतलेल्या नेत्यांना वेळ मिळाल्यानंतर आता महापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या आठवड्याभरात महापौर दत्तात्रय धनकवडे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्याला नवे महापौर मिळण्याचा अंदाज आहे.

धनकवडे यांना महापौरपदी विराजमान होतानाच सव्वा वर्षाचा कालावधी असल्याचे संकेत वरिष्ठांनी दिले होते. १० डिसेंबर रोजी ही मुदत पूर्ण झाली. त्या काळात महापौर बदलाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, या काळात पुण्यात स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावरून राजकीय वादळ निर्माण झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनात नेते गुंतले होते. हे पार पडल्यानंतर राज्यात विधान परिषदेच्या काही जागांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला होता. पुण्यातील कारभारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकांची समीकरणे जुळविण्यात गुंतले होते. त्यामुळे महापौर बदलाच्या हालचाली लांबणीवर पडल्या होत्या. रविवारी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. त्यामुळे आता इच्छुकांनी पुन्हा नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येत्या आठवड्याभरात विद्यमान महापौरांना राजीनामा देण्यास सांगण्यात येईल आणि नव्या वर्षात नव्या महापौरांची निवड होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

त्या पार्श्वभूमीवर पुन्हा राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये बाळासाहेब बोडके, विकास दांगट, दिपक मानकर, बाबुराव चांदेरे, प्रशांत जगताप, दिलीप बराटे यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना बदलण्यात येईल, असेही संकेत नेत्यांनी दिले असून दोन्ही शहरांना नवे महापौर एकाच वेळी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उपमहापौरही बदलणार ?

यापूरवी अनेकदा महापौरांबरोबरच उपमहापौरही बदलण्याचे निर्णय राजकीय पक्षांनी घेतले आहेत. आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे अधिकाधिक नगरसेवकांना पदांवर संधी देण्याचे दोन्ही पक्षांचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने महापौर बदलण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसकडूनही उपमहापौर आबा बागूल यांच्याजागी नव्या व्यक्तीस संधी देण्याची शक्यता आहे. त्याबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पूर्वीच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा मुक्काम दिल्लीपासून गल्लीपर्यंत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/वृत्तसंस्था

गेले तीन-चार दिवस राज्याला हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा मुक्काम कायम असला, तरी थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. प्रत्यक्ष तापमानात किंचित वाढ झाली असली तरीही हुडहुडी आहे. सूर्यदर्शन झाल्याने रविवारी उत्तर भारतातील अनेक भागांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. बहुतांश भागात थंडीची लाट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी उणे ०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, दिल्लीतही ७.६ अंश तापमान नोंदविले गेले. एकंदरित दिल्लीपासून ते थेट गल्लीपर्यंत थंडीचा कडाका कायम आहे.

राज्यात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तरेकडून राज्याकडे वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी वाढत आहे. रविवारी पाकिस्तानचा उत्तर भाग ते जम्मू काश्मीरदरम्यान वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील तापमानात काहीशी वाढ झाली आहे. परिणामी तेथून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रातही तापमानात काहीशी (एक ते दोन अंश सेल्सिअस) वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, रविवारी सलग चौथ्या दिवशी पुण्यासह राज्यातही थंडीचा कडाका कायम होता. रविवारी पुण्यात किमान तापमानात शनिवारच्या तुलनेत केवळ ०.२ अंशांची वाढ होऊन ६.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. दिवसा पडणाऱ्या उन्हामुळे काहीसा दिलासा मिळत असला, तरी पुणेकरांना सायंकाळी आणि रात्री कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

नांदेड महाबळेश्वरपेक्षा थंड

रविवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान नांदेडमध्ये (४.५ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. जळगाव येथे ७.८ अंश सेल्सिअस, नाशिक येथे ८.२, औरंगाबाद येथे ८.४, नागपूर येथे १०.१, वर्धा येथे ९.४, महाबळेश्वर येथे १२.१ तर सांताक्रूझ येथे १४.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस राज्यात हवामान कोरडे राहून किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोतेवारांविरोधात अन्य राज्यांतही गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी उस्मानाबाद पोलिसांनी अटक केलेले 'समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार यांच्यावर पुण्यासह अन्य राज्यांमध्येही विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डेअरी प्रकरणात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्यात मोतेवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी तेथील पोलिसांनी मोतेवार यांना पुण्यातून ताब्यात घेतले. दरम्यान, 'सेबी'ने निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी मोतेवार यांच्यासह इतरांवर डेक्कन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तसेच, इतर राज्यातही मोतेवार यांच्याविरुद्ध सेबीच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल आहेत.

'कोणतीही फसवणूक नाही'

'महेश मोतेवार यांनी हा प्रकल्प विकत घेतला असून यामध्ये त्यांचीच फसवणूक झालेली आहे. रेवते यांनी तात्यासाहेब पाटील यांची फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये महेश मोतेवार यांचा काहीही संबंध नाही. मुरूम पोलिसांनी आम्हाला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सांगितले असते, तर आम्ही स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झालो असतो. रेवते यांनी आमचा करार पूर्ण करून द्यावा म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध दिवाणी दावा केला आहे. आम्ही कशी काय फसवणूक करू शकतो? केवळ महेश मोतेवार यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जण आमची बदनामी करीत आहेत,' असे मोतेवार यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचेचाळीस जणांनीच घेतले पार्टी परवाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी 'थर्टी फस्ट' पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत असले, तरी यंदा परवानगीसाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडील रांगा कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत अवघ्या ४५ जणांनीच पार्टी परवाना घेतला आहे.

दरवर्षी ३१ डिसेंबरला पार्टी आयोजित करण्यासाठी विविध हॉटेल, रिसॉर्ट, कल्ब आणि काही संस्थांकडून विभागाकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात येतात. एका दिवसासाठी हा परवाना देण्यात येतो. आतापर्यंत ४५ जणांना परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी १६५ परवाने देण्यात आले होते, असे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.

पार्टीला परवाना देण्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध बाबी तपासल्या जातात. पोलिसांकडून पार्टीला परवानगी देण्यात आली आहे का, याची तपासणी करण्यात येते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, हा त्यामागील हेतू असतो. पार्टीमध्ये मद्यपान होणार असल्यास त्यासाठी पार्टी आयोजकांना स्वतंत्र शुल्क भरावे लागते. 'थर्टी फस्ट' पार्ट्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होण्यामागे लोकांचा बदलता कल, हे कारण असण्याची शक्यता आहे. मात्र, शेवटच्या दोन दिवसांत परवाना घेणाऱ्यांची संख्या जास्त असते, असे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे उपअधीक्षक सुनील फुलपगार यांनी सांगितले.

............

एक दिवसाच्या पार्टी परवानासाठी आतापर्यंत कमी अर्ज आले असले, तरी येत्या दोन दिवसांत हा आकडा शंभरापर्यंत पोहोचेल. पार्टीचे ठिकाण आणि आयोजकांबाबतची सर्व माहिती तपासल्यानंतरच परवाना देण्यात येत आहे.

- मोहन वर्दे

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात थंडीनंतर पुन्हा तापमानवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चार दिवस कडाक्याची थंडी पडल्यानंतर सोमवारपासून राज्यात तापमानात काहीशी वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. राज्यातही अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील राज्यातून राज्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढतो. गेल्या आठवडाभर उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी होती. त्यामुळे तेथून राज्याकडे वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे तसेच राज्यातील कोरड्या हवामानामुळे राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. रविवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तेथील तसेच उत्तरेकडील राज्यात तापमानात वाढ झाली आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंडिगड, दिल्ली आणि मध्यप्रदेशमध्ये कमाल तापमानात तीन ते सहा अंशांची वाढ झाली आहे. परिणामी, तेथून तुलनेने उष्ण व कोरडे वारे वाहत असल्यामुळे राज्यातही तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसात राज्यात किमान तापमानात आणखी एक दोन अंशांची वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुण्यातही किमान तापमानात वाढ होऊन ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. परंतु, दिवसा आणि रात्रीही बोचरे वारे वाहत असल्यामुळे थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातही अनेक ठिकाणी किमान तापमानात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी राज्यातील सर्वांत नीचांकी किमान तापमानाची नोंद नांदेड येथे (७ अंश सेल्सिअस) झाली. जळगाव येथे ९.६, महाबळेश्वर येथे १३.७, नाशिक येथे १०.४, सांताक्रूझ येथे १३.३, औरंगाबाद येथे ११.४, नागपूर येथे १०.४ तर अकोला येथे १०.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसात राज्यात हवामान कोरडे राहील. तसेच किमान तापमानातही एक ते दोन अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिकाला लुटणाऱ्यांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवणे येथील व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये घुसून जिवे मारण्याची धमकी देऊन ६० हजार रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी सात जणांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. धानेश्वर बसवराज हिरेमठ (वय १९, रा. वारजे), शुभम कृष्णा मानकर (वय १९, रा. शिवणे), रोहित वसंत पासलकर (वय २३), मनोज उर्फ ऋषीकेश सदाशिव आदमाने (वय २०), आकाश उर्फ सोन्या विष्णू आखाडे (वय २१), सुरज उर्फ केळ्या राजेंद्र केळगंद्रे (वय १९, रा. वारजे माळवाडी), शंकर प्रल्हाद हरणे (वय १९, रा. शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अश्विन ओसवाल (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

चोवीस डिसेंबर रोजी व्यावसायिक ओसवाल यांच्या कार्यालयात सायंकाळी चार जण शिरले. त्यांनी कोयता, चाकू, दगड आणि फरशीचा धाक त्यांना दाखविला. त्यातील एकाने त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यांना जीवे ठार करण्याची धमकी देऊन पैसे मागितले. ओसवाल यांच्याकडील ६० हजारांची रोकड हिसकावली आणि त्यांचा मोबाइल फोडला. या प्रकरणी हिरेमठसह सात जणांना अटक करण्यात आली. त्यातील एकाकडून २२ हजारांची रोकड, दोन दुचाकी, कोयता असा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यातील चार जणांची ओळख पटवून एकत्रित तपास करायचा आहे, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली. ती कोर्टाने मंजूर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खारफुटीच्या जंगलांना आठशे वर्षांचा इतिहास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मानवी हस्तक्षेपामुळे मुंबई आणि रायगड परिसरातील खाड्या आणि खारफुटी जंगलांची बेसुमार हानी होत आहे. मात्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारफुटीची परिपक्वता अजूनही अबाधित आहे. ही खारफुटीची जंगळे आठशे ते नऊशे वर्षे जुनी असून आता ती परिपक्व झाली असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरील खाड्या आणि त्यातील खारफुटी जंगलांबद्दल प्रसिद्ध भूगर्भतज्ज्ञ डॉ. श्रीकांत कार्लेकर आणि त्यांची टीम गेल्या काही वर्षांपासून संशोधन करीत आहे. या खाडीत आढळणारे चिखल मातीचे, सूक्ष्म अवसादांचे प्रमाण, त्यात वाढणाऱ्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजातीचे प्रकार, त्यांची विविधता, घनता आणि खाडीत गाळ साठण्याचा अशा विविध पैलूंचा अभ्यास त्यांनी केला आहे.

'महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर डहाणू, वैतरणा, ठाणे ,धरमतर, जैतापूर अशा अनेक खाड्या होलोसीन कालखंडाच्या शेवटच्या काळात म्हणजे गेल्या ३००० वर्षांत आणि खाड्यातील खारफुटीची जंगले ८०० ते ९०० वर्षांत परिपक्व झाली असावीत असे संकेत आम्हाला मिळाले आहेत,' असे कार्लेकर यांनी सांगितले.

अनैसर्गिक गाळामुळे नुकसान

मुंबई जवळच्या परिपक्वता निर्देशांकावर मानवी हस्तक्षेपाचा खूप मोठा परिणाम झाला आहे. त्या परिसरामध्ये अपेक्षेपेक्षा कमी असलेला परिपक्वता निर्देशांक हा तेथील खारफुटीच्या बेसुमार हानीचा परिणाम आहे. इतर भौगोलिक रचना खाड्यांच्या परिपक्वतेस अनुकूल असतानाही कमी होत असलेली झाडांची घनता आणि अनैसर्गिक गाळ संचयनामुळे नुकसान झाले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारफुटी परिपक्वता अबाधित असल्याचे दिसून आले. रायगडच्या उत्तरेकडील भागात खाड्यांचा व खारफुटीचा झपाट्याने होणारा ऱ्हास, तेथील परिपक्वता निर्देशांकात घट दाखवतो आहे.

मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट

'खारफुटीची जंगले परिपक्व होण्यासाठी मोठ्या काळासाठी किनारी परिसंस्था स्थिर असणे आवश्यक असते. होलोसीन कालखंडाच्या शेवटच्या काळात महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर समुद्र पातळी आजच्यापेक्षा उंच असल्याचे भूशास्त्रीय पुरावे मोठ्या प्रमाणावर सापडतात. त्यानंतर कमी होत जाणाऱ्या समुद्र पातळीमुळे वाढलेला गाळ संचयनाचा वेग, संचयनाचे प्रमाण यांचा विचार करता खारफुटीच्या वाढीला अनुकूल पर्यावरण होत गेल्यामुळे त्यांची घनदाट वने तयार झाली. आज मात्र नैसर्गिकपणे परिपक्व झालेली ही खारफुटीची वने मानवाच्या अनिर्बंध हस्तक्षेपामुळे झपाट्याने नष्ट होत आहेत,' असे कार्लेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीबाबत प्रशासनाचा ‘यू टर्न’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिळकतकरात १० टक्के वाढीसह पाणीपट्टीत दुप्पट वाढ सुचविण्यात आलेल्या करवाढीच्या प्रस्तावावर पालिका प्रशासनाने अचानक 'यू टर्न' घेतला आहे. आज, मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर निर्णय अपेक्षित असतानाच, दुरुस्तीसाठी हा प्रस्ताव मागे घेण्यात येत असल्याचे पत्र समितीला देण्यात आले आहे. त्यामुळे, दुरुस्त प्रस्तावात करवाढ मागे घेतली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

आगामी आर्थिक वर्षात (२०१६-१७) पालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. यामध्ये, मिळकतकरात १० टक्के, तर पाणीपट्टीत दुप्पट वाढ सुचविण्यात आली होती. त्यातून, पालिकेला सुमारे दोनशे कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आयुक्तांच्या करवाढीच्या प्रस्तावास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह स्वयंसेवी संस्थांनी कडाडून विरोध केला होता. मार्च २०१७मध्ये महापालिकेची निवडणूक होणार असल्याने पुणेकरांवर करांचा बोजा वाढविणाऱ्या या प्रस्तावाला मंगळवारच्या (२९ डिसेंबर) स्थायी समितीत विरोध होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे, संभाव्य परिस्थिती लक्षात घेत, हा प्रस्तावच दुरुस्तीसाठी मागे घेत असल्याचे पत्र आयुक्तांनी सोमवारी स्थायी समितीला दिले.

आयुक्तांनी पुढील आर्थिक वर्षाचे बजेट स्थायी समितीला सादर करण्यापूर्वी कर प्रस्तावांना मान्यता घेण्याचे कायदेशीर बंधन आहे. त्यामुळे, सरत्या वर्षात करवाढीच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही, तरी त्या संदर्भातील फेरप्रस्ताव पुन्हा स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे. हा दुरुस्त प्रस्ताव पुन्हा करवाढ सुचविणारा असेल, की राजकीय पक्षांची संभाव्य भूमिका लक्षात घेऊन कोणत्याही करवाढीशिवाय मांडण्यात येईल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

.................

प्रथमच करवाढीचा प्रस्ताव मागे

स्मार्ट सिटीमुळे पुणेकरांना छुप्या करवाढीला सामोरे जावे लागणार असल्याची टीका सर्व स्तरांतून केली जात होती. त्यातच, आयुक्तांनी नव्या आर्थिक वर्षात पुणेकरांवर करांचा बोजा वाढविणारा प्रस्ताव सादर केला. पालिका निवडणुकांपूर्वीच्या वर्षात नागरिकांवर करवाढ लादण्यास राजकीय पक्षांकडून समर्थन मिळणे शक्यच नव्हते. त्यामुळेच, दुरुस्तीसाठी करवाढीचा प्रस्ताव मागे घेण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांत प्रथमच घडला आहे.

....................

करवाढीचा प्रस्ताव काही दुरुस्त्यांसाठी मागे घेण्यात येणार आहे. त्यात काही सुधारणा करून स्थायी समितीच्या पुढील बैठकीत तो पुन्हा सादर केला जाईल.

कुणाल कुमार

आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष मुलांबाबत न्यूनगंड नको : बापट

$
0
0

पुणे : 'विशेष मुलांना न लाजता समाजापुढे आणले पाहिजे. या मुलांना समाज समजून घेतो. विशेष मुलांबाबत पालकांनी न्यूनगंड बाळगता कामा नये,' असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
जलतरणपटू आणि यलो चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गौरी गाडगीळ हिच्यावर स्नेहा गाडगीळ यांनी लिहिलेल्या 'राजहंस' या पुस्तकाचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे झाले. त्या वेळी बापट बोलत होते. अभिनेता उपेंद्र लिमये, दिग्दर्शक महेश लिमये, शिरीष फडतरे, स्नेहा व शेखर गाडगीळ आदी उपस्थित होते.
'दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर गौरीने मारलेली मजल सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,' असेही बापट यांनी सांगितले. 'यलो चित्रपटादरम्यान गौरीच आम्हाला खूप काही शिकवत होती. ती खऱ्या अर्थाने स्पेशल आहे,' अशी भावना महेश लिमये यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन दरोडेखोरांना नागरिकांनी पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे येथे दरोडा टाकणाऱ्या तीन दरोडेखोरांना नागरिकांनी शनिवारी पहाटे पकडले. दरोडेखोरांचे चार साथीदार मात्र, पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांना पकडण्यामध्ये काही नागरिकही जखमी झाले आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साजन फेकू सहानी-केवट (वय २३), कन्हैय्या छबीलाल सहानी (वय ४०) आणि रामनयन छबीलाल सहानी (वय ६०, रा. वाघोली, मूळ- उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी युवराज इरभान वानखेडे (वय ४६, रा. करंजेनगर, शुक्रापूर) यांनी तक्रार दिली आहे. वडगाव शिंदे गावातील इंडस कंपनीच्या टॉवरजवळ काही दरोडेखोर आल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. हे दरोडेखोर बॅटऱ्या चोरी करण्यासाठी आले आहेत. त्यानुसार गावकऱ्यांनी या दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमोल जाधव (वय २४) या तरुणावर त्यांनी हल्ला केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम खात्यात बदल्यांचागोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक बांधकाम खात्यात सध्या बदल्यांचा सावळागोंधळ सुरू असून, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता दर्जाच्या बारा अधिकाऱ्यांची दोन ते सहा महिन्यांत तीन ते पाच ठिकाणी बदली करण्याचा 'प्रताप' या खात्याने केला आहे. एकीकडे या बदल्या करताना कार्यकारी अभियंत्यांना उपलब्ध पदांपेक्षा अधिक जागांवर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे अनेक अधिकाऱ्यांना पदस्थापनेअभावी फुकट पोसावे लागत आहे.

बदल्यांसाठी तीन वर्षांचा नियम आहे. मात्र, हा नियम सर्रास धुडकावून दर तीन महिन्याला अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात येत असल्याची सारवासारव त्यासाठी केली जात असली, तरी बदल्यांच्या खर्चाचा बोजा सरकारवर पडत आहे. विशेष म्हणजे बदल्यांच्या प्रस्तावाची फाइल मुख्यमंत्री कार्यालयातून मंजूर होऊन आल्यावर टिप्पणीमध्ये काही बदल्या घुसविण्याचा प्रकार होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उ. प्र. देबडवार यांची एप्रिल ते जून या काळात तीन वेळा बदली करण्यात आली. अधीक्षक अभियंचा पी. बी. भोसले यांची जून ते नोव्हेंबर या कालावधीत पाच वेळा बदली करण्याचे आदेश निघाले. त्यांना राहुरी, मुंबई ते धुळे असे भाग दाखविण्यात आले. अधीक्षक अभियंता सी. डी. वाघ आणि आर. टी. पाटील यांची जून ते ऑगस्टदरम्यान तीन वेळा बदली झाली. खात्याचे सचिव ममदापुरे यांना दोनदा बदलीचे ठिकाण दाखविण्यात आले. मुख्य अभियंता सी. व्ही. तुंगे, अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, अ. पा. नागरगोजे, रा. पा. निघोटे यांची अल्प कालावधीत दोन वेळा बदली करण्यात आली. कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांची एप्रिल ते नोव्हेंबर या काळात तीनवेळा बदली झाली. अधीक्षक अभियंता अ. शं. खैरे, प्रदीप खवले, विवेक साळवे यांना अनुक्रमे औरंगाबाद, गडचिरोली आणि नागपूर जिल्हा बदलीसाठी दाखविण्यात आला. या बदल्या नेमक्या कोणत्या कारणासाठी व कोणाच्या आग्रहास्तव केल्या गेल्या आहेत, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

..

अतिरिक्त कार्यभार असणाऱ्यांवर अन्याय

बांधकाम विभागात उपलब्ध असलेल्या पदांपेक्षा अधिक जागांवर कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली. अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती झालेले पाच अधिकारी गेल्या काही महिन्यांसाठी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. गेली काही महिने त्यांना फक्त पगार देऊन पोसले जात आहे. मुख्यालयाबाहेरील अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा प्रघात या खात्यात पडला आहे. परिणामी, अतिरिक्त कार्यभार असलेल्या पदांना न्याय मिळत नसल्याचेही सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक मदतीचा लेखाजोखा मांडा’

$
0
0

पुणे ः 'पालिकेकडून दर वर्षी आर्थिक मदत घेणाऱ्या सर्व संस्थांचा वार्षिक ताळेबंद वेबसाइटवर जाहीर केला जावा,' अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनेच तसे स्पष्ट निर्देश दिले असून, हा लेखाजोखा सादर करण्यात टाळाटाळ करणाऱ्या संस्थांना केलेली मदत पालिकेने काढून घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांना ३० लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते. पालिकेकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग संबंधित संस्थेतर्फे नक्की कशा स्वरूपात केला जातो, याची माहिती करदात्यांना मिळणे आवश्यक आहे. राज्य सरकारनेही आर्थिक मदत दिलेल्या सर्व संस्थांची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली जावी, असे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार ५-१० हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची देणगी घेणाऱ्या संस्थांचा वार्षिक ताळेबंद पालिकेच्या वेबसाइटवर जाहीर केला जावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे आणि जुगल राठी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्नाच्या मुळावर आर्थिक मंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आर्थिक क्षेत्रातील मंदीसदृश्य स्थिती आणि त्याचा नव्या बांधकामांवर झालेला परिणाम पालिकेच्या तिजोरीवर जाणवू लागला आहे. पालिकेला बांधकाम परवानगी आणि विकसन शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नात यंदा घट झाल्याचे चित्र दिसून येत असून, चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट गाठतानाही दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे उभी राहिली. बांधकाम परवानगी आणि विकसन शुल्कातून पालिकेला गेल्या तीन वर्षांत सरासरी सहाशे कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. गेल्या वर्षीही डिसेंबरअखेरपर्यंत पालिकेने पाचशे कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. परंतु, यंदा बांधकाम शुल्कातून पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत पालिकेला अंदाजे ४५० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि मिळकत कर यांच्यासह बांधकाम शुल्काचे उत्पन्न पालिकेच्या प्रमुख आर्थिक स्रोतांपैकी आहे. या सर्व प्रमुख उत्पन्न स्रोतांमध्ये दरवर्षी किमान १० टक्क्यांची वाढ अपेक्षित धरली जाते. त्यानुसार, २०१५-१६ चे बजेट मान्य करताना स्थायी समितीने बांधकाम शुल्कातून साडेसातशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहित धरले होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत पालिकेला प्रत्यक्ष मिळालेले उत्पन्न पाहता, यंदा हे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. परिणामी, गेल्या काही वर्षांप्रमाणेच बांधकाम शुल्कातून पालिकेला सहाशे-साडेसहाशे कोटींच्या उत्पन्नावरच समाधान मानावे लागणार आहे.

...................

'स्थायी'चा कृत्रिम फुगवटा

महापालिकेचे आर्थिक स्रोतांद्वारे नेमके किती उत्पन्न मिळू शकते, याचा विचार करूनच आयुक्तांतर्फे बजेट सादर केले जाते. मात्र, विविध योजनांसाठी बजेटमधील आकडे स्थायी समितीतर्फे मोठ्या प्रमाणावर फुगविले जातात. त्यामुळेच, बजेटमधील उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष उत्पन्न यातील तफावत वाढत जात असल्याचे दिसून येते. २०१५-१६ साठी आयुक्तांनी बांधकाम शुल्कातून सहाशे कोटी मिळतील, असाच अंदाज मांडला होता. स्थायी समितीने हे आकडे फुगवून साडेसातशे कोटी रुपयांपर्यंत नेले. परिणामी, बांधकाम शुल्काची उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल देण्यावरून मित्रांमध्येच हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हॉटेलचे बिल देण्याच्या कारणावरून आकुर्डी येथील किंग्ज कोर्ट हॉटेलमध्ये मित्रांमध्येच हाणामारीची घटना घडली. या वेळी तोडफोडीचा प्रकार झाला. या वेळी घटनास्थळी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (२७ डिसेंबर) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.

सोमनाथ अंकुश शेलार (वय २७), नीलेश लहु शेलार (वय २३, दोघे रा. कोंडेवस्ती, वाल्हेकरवाडी) आणि महेश प्रताप लोमटे (वय २७, रा. निगडी) यांना अटक करण्यात आली आहे, तर अमितकुमार भुपाल नाईक (वय २८, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींना ३० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश पिंपरी कोर्टाने दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किंग्ज कोर्ट हॉटेलमध्ये तिन्ही आरोपी रविवारी रात्री दारू पिण्यासाठी बार सेक्शनमध्ये बसले होते. एक बिल दिल्यानंतर पुन्हा दारू पिऊन बिल देण्याच्या कारणावरून एकमेकांमध्ये शिवीगाळ व हाणामारी झाली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी हॉटेलमधील कामगार गेले असता वेटर शुभम चव्हाण, बारमॅन भीमा विठोबा देवणे, मॅनेजर रॉबिन पॉल यांना मारहाण करून शिवीगाळ केली. अमितकुमार नाईक याच्या दुचाकीचे वीट मारून आरोपींनी नुकसान केले. हा प्रकार घडल्याने नाईक याने पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनाही आरोपींनी धक्काबुक्की केली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images