Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दाऊद इब्राहिम हे बर्थडे गिफ्ट मागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला आपल्या पंतप्रधानांनी अचानक हजेरी लावली. वाढदिवसाला गेल्यानंतर 'रिटर्न बर्थडे गिफ्ट' मिळत असते. शरीफ यांच्याकडे दाऊद इब्राहिम हा रिटर्न बर्थडे गिफ्ट मिळावा म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरावा. त्याला आमचा पाठिंबा राहील,' अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली. तसेच, पाकिस्तानला जाण्याचे मोदींचे 'टाईमींग' चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला अचानक भेट दिल्यासंदर्भात अॅड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी त्यांनी ही मागणी केली. अॅड. आंबेडकर म्हणाले, की पाकिस्तानने दहशतवादाच्या संदर्भात अनेक आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे अमेरिका व युरोपीयन देशांनी पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत बंद केली आहे. त्यामुळे पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांचे येणारे आर्थिक बजेट तुटीचे असणार आहे. आग्रा भेटीच्या वेळी देखील अशीच परिस्थिती होती. त्याभेटीनंतर भारताला काहीही साध्य झाले नाही. उटल पाकिस्तानचे कर्ज व्यवस्थित मिळाले. पाकिस्तान अडचण आल्यास नेहमी बोलणीचा वापर करते. अडचण दूर झाली पुन्हा त्यांच्या कारवाया सुरू होतात. त्यामुळे पाकिस्तानला आणखी आर्थिक अडचणीमध्ये येऊ द्यावे. त्यानंतरच त्यांच्याशी बोलणी सुरू करावीत. म्हणजे आपल्याला हव्या तशा पद्धतीने शांततेसाठी बोलणी सफल करता येतील. पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिलेली भेट ही चुकीच्या वेळी दिली असून त्यामागे युरोपीयन व अमेरिकन देशांचा दबाव असल्याचा आरोप ही त्यांनी या वेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी जमिनींवर हजारो अतिक्रमणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील ८५७ एकर सरकारी जमीन अतिक्रमणांनी व्यापली आहे. खासगी जमिनींवरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकणारे प्रशासन सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यात मात्र अपयशी ठरले आहे.

सरकारीपड आणि गायरान जमिनींवर अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. सरकारी जमिनींवर झालेल्या अतिक्रमणांची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्यासंबंधीही आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, ही अतिक्रमणे काढण्यासाठी गेल्या वर्षभरात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

शहरी व ग्रामीण भागातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील सरकारी जमिनींवर ७ हजार ९०३ अतिक्रमणे झाल्याचे आढळले आहेत. या अतिक्रमणांनी ८५७ एकर जमीन व्यापली आहे. अतिक्रमणे काढण्याच्या राज्य सरकारच्या सूचना असताना केवळ पुरंदर तालुक्यातील दोन गुंठे सरकारी जमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. पुणे शहरात १४२ एकर सरकारी जमिनीवर ३८ अतिक्रमणे झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ४८५ अतिक्रमणांनी सरकारी जमीन व्यापली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीलगतच्या हवेली तालुक्यात ३,३७९ अतिक्रमणे झाली असून ४२ एकर जमीन अतिक्रमणांखाली आहे. मावळ तालुक्यात अठरा एकर सरकारी जमिनीवर ६३४ अतिक्रमणे झाली आहेत. औद्योगिकपट्टा म्हणून विकसित होत असलेल्या खेड तालुक्यात सरकारी जमिनीवर १०८७ अतिक्रमणे असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अतिक्रमणे ५८ एकर सरकारी जागेवर आहेत.

..

तालुका अतिक्रमणे अतिक्रमित जागा

शिरूर ११६ २०६ एकर

मुळशी २९ ११० एकर

भोर ३८ ०.३८ गुंठे

दौंड ४०१ ३ एकर २७ आर

पुरंदर ७१० ७२ एकर

जुन्नर ३१३ ५८ एकर

आंबेगाव ४२० २७ एकर

बारामती १२५ ९२ एकर

इंदापूर १३७ ३३ एकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरांच्या मुलांसह चौघांविरुद्ध गुन्हा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
उपमहापौर आबा बागुल यांच्या दोन मुलांसह चौघांविरुध्द दत्तवाडी पोलिस ठाण्यात बलात्कार, विनयभंग, चोरी आणि शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ३८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अमित बागुल, कपील बागुल, तनुजा भागवत-रावळ आणि महादू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बागुल यांनी डिसेंबर २०११ मध्ये आयोजित केलेल्या काशी यात्रेला ही गेली होती. या यात्रेच्या काळात आणि परतल्यानंतर आरोपी अमितने पीडित महिलेला वेळावेळी खडकवासला येथे घेऊन जात लज्जास्पद वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी महिला सहायक निरीक्षक जे. सी. गडकरी तपास करत आहेत. दरम्यान, पीडित महिलेविरुद्ध काही अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे, असे पोलिसांनी सांगितले.
'बदनामीचे राजकीय षड्यंत्र'
या तक्रारीमागे बदनामीचे राजकीय षडयंत्र आहे. यापूर्वीच संबंधित महिलेविरुद्ध सात तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये मानसिक त्रास देणे, एकतर्फी प्रेमाची पत्रे पाठविणे, ब्लॅकमेलिंग यांचा समावेश आहे. त्या महिलेने पंधरा दिवसांपूर्वी तक्रार देऊन मागे घेतली. आता पुन्हा तक्रार करण्यामागे राजकीय बदनामीचा हेतू आहे, असे उपमहापौर आबा बागुल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिक्रेट सांता’मुळे खुलले निरागस हास्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ख्रिसमच्या पूर्वसंध्येला रात्री आपल्या उशाशी कोणीतरी भेटवस्तू ठेवून जाईल, असे प्रत्येक लहान मुलाला वाटत असते. त्यामुळे ते सांताक्लॉजची आवर्जून वाट पाहतात आणि गिफ्टची मजाही अनुभवतात. पण अनेक मुले या आनंदापासून वंचित राहतात. ख्रिसमसच्या आनंदाला मुकलेल्या मुलांना भरपूर 'मटा'च्या 'सिक्रेट सांता'ने भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

निमित्त होते महाराष्ट्र टाइम्सच्या 'सिक्रेट सांता' या उपक्रमाचे. गरजू आणि निराधार मुलांसाठी सांताक्लॉजची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी 'मटा'च्या माध्यमातून वाचकांना देण्यात आली होती. वाचकांनी मुलांसाठी नवीन वस्तू, खेळणी, शालोपयोगी वस्तू, उपयुक्त अशी अवांतर वाचनाची पुस्तके आदी विविध भेटी 'मटा'च्या कार्यालयात जमा केल्या.

ख्रिसमसच्या दिवशी विजय आणि साधना फळणीकर यांच्या 'आपलं घर' या संस्थेला 'मटा'च्या वाचकांनी प्रेमाने दिलेल्या भेटवस्तू देण्यात आल्या. 'आपलं घर'मध्ये समाजातील वंचितांबरोबरच, निराधार मुले वास्तव्यास आहेत. संस्थेतर्फे त्यांची निवास, भोजन, कपडे, शिक्षण आणि औषधोपचाराची निःशुल्क व्यवस्था कऱण्यात आली आहे. या सर्व मुलांना शैक्षणिक धडे देण्याबरोबरच शिवणकाम, हस्तकला, सुतारकाम, वायरमन अशा विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. सामाजिक उपक्रमातून त्यांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी तसेच जबाबदार नागरिक बनविण्यावर विशेष भर दिला जातो.

संस्थेतील या मुलांना आत्तापर्यंत पुस्तकातील कथांमध्ये 'सांता' बद्दल वाचले होते. सांता भेटवस्तू घेऊन येतो, ही कल्पना त्यांनाही अनुभविण्याची संधी 'मटा' ने उपलब्ध करून दिली. ख्रिसमसच्या संध्याकाळी मिळालेल्या या भेटवस्तूंमुळे मुले खूष झाली. काहींनी बॅट बॉल, पझल आणि विविध गेम्सची मजा अनुभवली. अनेक मुलांना पुस्तके, तर काही मुलांना चित्रकलेच्या वह्या आणि साहित्य मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहिरातींवर केंद्राचे आठशे कोटी खर्च

$
0
0

prasad.panse@timesgroup.com

पुणे : केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या सरकारने आपल्या केवळ वर्षभराच्या काळात फक्त मुद्रित माध्यमांतील जाहिरातींवर चारशे पाच कोटी रुपये; तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींवर तब्बल चारशे सहासष्ट कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे.

पुण्यातील युवा वकील प्रणय अजमेरा यांनी केंद्र सरकारच्या जाहिरात व दृक्‌श्राव्य प्रसिद्धी महासंचालनालयाकडून (डीएव्हीपी ) माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविलेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. अॅड. अजमेरा यांनी २६ मे २०१४ ते २६ मे २०१५ या काळात केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांनी सर्व प्रकारच्या जाहिरातींवर केलेल्या खर्चाची माहिती मागवली होती.

पहिल्यांदा त्यांना उशिरा व अत्यंत त्रोटक स्वरूपाची माहिती देण्यात आली. त्याबाबत अपील केल्यानंतर मात्र, त्यांना याबाबतची तपशीलवार माहिती पाठविण्यात आली. कामाचा प्रचंड व्याप सांभाळताना मनुष्यबळावर येणाऱ्या ताणामुळे माहिती पाठविण्यास उशीर झाल्याचेही डीएव्हीपीने आपल्या उत्तरात म्हटले आहे. खासगी रेडिओ चॅनेल्सवरील जाहिरातींसाठी ६७ कोटी ४५ लाख ६३ हजार ६४५ रुपये खर्ची पडले आहेत. सर्वाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या आकाशवाणी व दूरदर्शनवरून करण्यात आलेल्या जाहिरातींचा खर्च ४३ कोटी ३५ लाख १५ हजार १२५ रुपये इतका आहे. कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सवरील जाहिरातींसाठी ८९ लाख ८५ हजार २२६ रुपये खर्चण्यात आले आहेत.

डीएव्हीपीने अॅड. अजमेरा यांना दिलेल्या माहितीनुसार या एक वर्षाच्या काळात जाहिरातींसाठी संरक्षण मंत्रालयाने सर्वाधिक म्हणजे ७६ कोटी २३ लाख सात हजार ८३९ रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. तसेच, स्टील मंत्रालयाने सर्वात कमी म्हणजे केवळ ८८ हजार ४४६ रुपये खर्च केले आहेत. या कालावधीत विभागानुसार जाहिरातींसाठीचा सर्वाधिक खर्च प्राप्तीकर विभागाने केला आहे. या विभागाने ४० कोटी ५२ लाख सहा हजार ५३४ रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत. याच एकाच वर्षाच्या कालावधीत मुंबईतील चिल्ड्रन फिल्म सोसायटी विभागाने फक्त ७७३ रुपये खर्च केले आहेत.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केल्या गेलेल्या जाहिरातींमध्ये आरोग्य मंत्रालय आघाडीवर आहे. या मंत्रालयाने वर्षभरात ९७ कोटी १२ लाख ६६ हजार ४७७ रुपये खर्च केले आहेत; तर व्यापार व उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी सर्वात कमी म्हणजेच केवळ दोन लाख ५५ हजार १९२ रूपये खर्चले आहेत.

डिजिटल सिनेमाच्या माध्यमातून होणाऱ्या जाहिरातींसाठी ८६ कोटी १४ लाख ७० हजार २५३ रुपये खर्च केले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या अशा इंटरनेट-सोशल मीडिया या माध्यमासाठी सहा कोटी ६१ लाख आठ हजार ९६ रुपयांचा खर्च केला गेला आहे.

मोदी सरकार खर्चिक आहे. या सरकारकडून जाहिरातींसाठी भरमसाठ खर्च केला जातो; कामे मात्र होत नाहीत, असा आरोप केला जातो. मात्र, असा आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी ही माहिती मागवली. सरकारने जाहिरातींसाठी केलेल्या खर्चाचा आकडा खरोखरच खूप मोठा आहे, असे अॅड. प्रणय अजमेरा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यासह राज्यात कडाका कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कडाक्याच्या थंडीने पुण्याला आणि राज्याला भरलेली हुहहुडी सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट आहे. पुण्यात शनिवारी ६.६ अंश सेल्सिअस या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद झाली.

राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान नांदेडमध्ये नोंदले गेले. शनिवारी पारा साडेचार अंशांपर्यंत खाली उतरला. दरम्यान, पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असला, तरी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तरेकडून राज्याकडे वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढत आहे. किमान तापमानात सरासरीपेक्षा पाच अंशांनी घट झाल्यास त्या भागात थंडीची लाट आहे, असे मानण्यात येते. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, मध्य प्रदेशाचा पूर्व भाग, छत्तीसगड आदी भागातही थंडीची लाट आहे. याचबरोबर राज्यातही हवामान कोरडे असल्याने राज्यातील थंडीचा कडाका वाढला आहे. परभणी येथे ६.६, उस्मानाबाद येथे ८.५, नाशिक येथे ७.४, जळगाव येथे आठ, महाबळेश्वर येथे ९.६, नागपूर येथे ७.७ तर अकोला येथे ७.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परंतु, त्याचबरोबर तापमानातही किंचित वाढ होण्याचीही शक्यता आहे.

.............

पुण्यात चार वर्षातील नीचांक

पुण्यात शनिवारी ६.६ अंश सेल्सिअस (सरासरीपेक्षा ४.२ अंशांनी कमी) किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान यंदाच्या हंगामातील नीचांकाबरोबरच गेल्या चार वर्षातील डिसेंबर महिन्यातील नीचांकी तापमान आहे. पुण्यात ४ डिसेंबर २०१३ मध्ये ६.८ तर २० डिसेंबर २०१० रोजी ६.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले होते. तर डिसेंबरमधील सर्वात नीचांकी तापमान २७ डिसेंबर १९६८ रोजी (३.३ अंश सेल्सिअस) नोंदले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेटलींविरोधात आपची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'दिल्ली क्रिकेट संघटनेतील घोटाळाप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा,' या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या जोगेश्वरी येथील मुख्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. पुण्याबरोबरच सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली येथेही ही निदर्शने करण्यात आली.

पक्षातर्फे डॉ. अभिजित मोरे, राजेश चौधरी, श्रीकांत आचार्य, चंद्रशेखर पानसे, पद्मा गादिया, मुकुंद कीर्दत आदींसह कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते. हा घोटाळा गंभीर असून जेटली संघटनेचे अध्यक्ष असताना खर्चाची मान्यता २४ कोटी असताना ११४ कोटी खर्च केले गेले. भाजपमधील कलमाडी असलेल्या याच जेटलींकडे आता अर्थमंत्रिपद आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. लोकेश शर्मा यांच्याशी असलेले संबंध, मालमत्तेत झालेली भरमसाठ वाढ आदीबाबत आपने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही अरुण जेटली यांनी द्यावीत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो जमिनींवर अतिक्रमणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील ८५७ एकर सरकारी जमीन अतिक्रमणांनी व्यापली आहे. खासगी जमिनींवरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकणारे प्रशासन सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यात मात्र अपयशी ठरले आहे.

सरकारीपड आणि गायरान जमिनींवर अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. सरकारी जमिनींवर झालेल्या अतिक्रमणांची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्यासंबंधीही आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, ही अतिक्रमणे काढण्यासाठी गेल्या वर्षभरात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

शहरी व ग्रामीण भागातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील सरकारी जमिनींवर ७ हजार ९०३ अतिक्रमणे झाल्याचे आढळले आहेत. या अतिक्रमणांनी ८५७ एकर जमीन व्यापली आहे.

अतिक्रमणे काढण्याच्या राज्य सरकारच्या सूचना असताना केवळ पुरंदर तालुक्यातील दोन गुंठे सरकारी जमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. पुणे शहरात १४२ एकर सरकारी जमिनीवर ३८ अतिक्रमणे झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ४८५ अतिक्रमणांनी सरकारी जमीन व्यापली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीलगतच्या हवेली तालुक्यात ३,३७९ अतिक्रमणे झाली असून ४२ एकर जमीन अतिक्रमणांखाली आहे. मावळ तालुक्यात अठरा एकर सरकारी जमिनीवर ६३४ अतिक्रमणे झाली आहेत. औद्योगिकपट्टा म्हणून विकसित होत असलेल्या खेड तालुक्यात सरकारी जमिनीवर १०८७ अतिक्रमणे असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अतिक्रमणे ५८ एकर सरकारी जागेवर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उजाळा बाबा आमटेंच्या आठवणींचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कवयित्री शांता शेळके यांच्या कवितांवर मनापासून प्रेम करणाऱ्या श्रोत्यांना कवितेच्या जन्माचा उलगडलेला प्रवास खुद्द शांता शेळकेंच्याच आवाजात ऐकण्याची मिळालेली संधी... व्हायोलीनच्या सुरांमधून प्रगटलेली त्यांची भावगीते... आणि बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन गो. नी. दांडेकरांनी लिहिलेल्या आनंदवनभुवनी या कांदबरीच्या कथेचा त्यांची कन्या डॉ. वीणा देव यांनी सांगितलेला सारांश..., असा एक मन भारावून टाकणारा अनुभव रसिकांना शनिवारी एस. एम. जोशी सभागृहात आला.
निमित्त होते, सांस्कृतिक पुणे संस्थेतर्फे बाबा आमटे यांच्या १०१ व्या जयंती आयोजिण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमाचे. त्यामध्ये संस्थेचे प्रमुख सुभाष इनामदार यांनी शांता शेळके यांच्याशी मारलेल्या गप्पांच्या 'असेन मी... नसेन मी' या सीडीचे अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले; तर. गो. नी. दांडेकर यांच्या 'आनंदवनभुवनी' या कांदबरीचे अनिकेत आमटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर, ज्येष्ठ समीक्षक मा. कृ. पारधी यांचा ९६ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर व डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी चारुशीला गोसावी यांनी व्हायोलीनवर मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण केले. तसेच, इनामदार यांनी शांता शेळके यांची घेतलेली मुलाखत कार्यक्रमादरम्यान ऐकविण्यात येत होती. शांता शेळके या भावगीतांच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या साहित्यिका होत्या. 'कवयित्री म्हणून त्या मोठ्या आहेतच, पण भावगीतांच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे,' असे ढेरे म्हणाल्या. बाबा आमटे यांच्या सान्निध्यात वाढल्याचे भाग्य मला मिळाले. त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलेसे केले. आज दुर्गम भागात विविध क्षेत्रातील तरुण काम करत आहेत. त्यांच्या कामाला दाद दिली पाहिजे, असे अनिकेत आमटे यांनी सांगितले.
दरम्यान, सांस्कृतिक पुणे संस्थेचे सुभाष इनामदार यांच्या एकसष्ठीच्या निमित्ताने त्यांनी ६१ हजार १११ रुपयांचा निधी लोकबिरादरी प्रकल्पासाठी दिला. तसेच, शांता शेळके यांची मुलाखतीच्या सीडीचे सर्व श्रोत्यांना मोफत वाटप करण्यात आले.
हेमलकसा येथे १९७६ साली सर्व प्रथम शाळा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता २०१५ मध्ये हेमलकसा येथून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलगुंडा या ठिकाणी दुसरी शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेसाठी नुकतेच इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले तरुण काम करत आहेत, अशी माहिती अनिकेत आमटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाजांना अखेर दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
लोणावळ्याजवळील पर्यटकांचे आकर्षण असलेले, तसेच नाइट लाइफचे ठिकाण बनलेले टायगर व लायन्स पॉइंट हे थर्टी फर्स्टपर्यंत सुरक्षेसह विविध कारणास्तव सायंकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय लोणावळा पोलिसांनी घेतला आहे. सातनंतर याठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांसह येथील व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोणावळा-खंडाळ्यातील अनेक स्थळांचे पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. यामध्ये सर्वाधिक आकर्षण असलेले भुशी डॅम, टायगर व लायन्स पॉइंट येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. लाखो पर्यटक येथील डोंगर दऱ्यातील मनोहारी निर्सगरम्य ठिकाणी येऊन आनंद लुटतात. मागील पाच सहा वर्षांपासून ही ठिकाणे पर्यटकांची नाइट लाइफची केंद्रे बनली आहेत. टायगर व लायन्स पॉइंट ही ठिकाणे लोणावळा शहरापासून १३ किलोमीटर लांब असून येथे डोंगर वनराईने व्यापलेले आहेत. यामुळे अशा ठिकाणी रात्री अपरात्री मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्य, तसेच परराज्यातील महाविद्यालयीन आणि इतर तरुण तरुणींचे लोंढे रात्र जागविण्यासाठी येऊ लागले आहेत. या ठिकाणी पर्यटनाच्या गोंडस नावाखाली नाइट लाइफची संस्कृती सुरू झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात दारू व अमली पदार्थांचा वापर वाढल्याने सातत्याने वाद झाले आहे. अनेकवेळा वादाचे रूपांतर हाणामारी, तसेच खुनात झाले आहे. येथील अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अनेकवेळा पर्यटकांसह व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. विशेषतः विकेंडला शेकडो तरुण-तरुणी या भागात रात्र जागवताना आढळतात. डीजे, म्युझिकच्या तालावर मद्याचे पेग रिचवत, अश्लील नृत्याचे प्रकारही घडले आहेत.

सहा महिन्यांपूर्वी याच ठिकाणावरील व्यावसायिक वादातून एकाचा खून झाला होता. तर दारूच्या नशेत येथे दरीत पडून अनेकांनी प्राण गमवले आहेत. काही तरुण देखील येथील दरीच्या तोंडावर जाण्याच्या प्रयत्नात दरीत पडले आहेत. वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या ठिकाणावर वन विभाग व पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन या कोणाचाही अंकुश नसल्याने ही ठिकाणे अवैध धंद्यांचा अड्डा बनली आहेत. त्यामुळेच वाढत्या गर्दीवर नियंत्रण, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील असलेली ही ठिकाणे थर्टी फस्टपर्यंत पर्यटकांसाठी रात्री सातनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नववर्षासाठी लोणावळा सज्ज
गेल्या आठवड्यापासून लोणावळा-खंडाळा हे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. येथील हॉटेल, रिसॉर्ट, खासगी बंगले हे पर्यटकांनी गजबजू लागले आहेत. अनेक हॉटेलांत मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर सवलतींच्या दरात खास मेजवानी आयोजित केल्या गेल्या आहेत. या काळात शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच वाहतूक सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी संस्कृती जिवंत : सबनीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'मराठी संस्कृती अजूनही पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये जिवंत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. आपल्या संस्कृतीचे आणि आपल्या मातीचे वैभव पाहून समाधान वाटते,' असे प्रतिपादन ८९व्या अखिल भरतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. पिंपरीतील एक दिवसीय साहित्य संमेलनात ते बोलत होते. दरम्यान, उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये दरवर्षी साहित्य संमेलन भरवणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी या वेळी केली.

८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एक दिवसीय संमेलनपूर्व संमेलनामध्ये सबनीस बोलत होते. या संमेलनाचे उद्‌घाटन ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य आणि २४व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. प्रसिद्ध कथक नर्तक डॉ. पंडित नंदकिशोर कपोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेश वंदना सादर केली. या वेळी रंगलेल्या तबला आणि घुंघरू यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या काळभोरनगर, प्रभाग क्रमांक २६ मधील 'अ' जागेसाठी सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ रविवारी फुटला. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुजाता अविनाश टेकवडे आणि शिवसेनेचे उमेदवार विजय गुप्ता या दोघांनीही रविवारी प्रचाराला सुरुवात केली. या प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी १० जानेवारीला मतदान होणार आहे.

टेकवडे यांच्या हत्येनंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, भाजप व शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. भाजप व शिवसेनेने निवडणुकीसाठी आपापला उमेदवार उभा केला असून, काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत अंतर्गत हातमिळवणी केली आहे. भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले गणेश लंगोटे यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेने विजय गुप्ता यांना रिंगणात उतरविले आहे.

राष्ट्रवादीकडून अविनाश टेकवडे यांच्या पत्नी सुजाता टेकवडे, शिवसेनेचे विजय गुप्ता, भाजपकडून गणेश लंगोटे अशी तिरंगी लढत होत आहे. या व्यतिरिक्त दोन उपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. रविवारचा सुटीचा मुहूर्त साधून राष्ट्रवादी आणि शिवेसेनेच्या उमेदवारांनी नारळ फोडून प्रचाराला प्रारंभ केला. टेकवडे आणि गुप्ता यांनी पदयात्रेद्वारे मतदारांशी संपर्क साधला.

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुजाता टेकवडे यांच्या प्रचाराचा नारळ महापौर शकुंतला धराडे व आझम पानसरे यांच्या हस्ते फोडण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभागर वाघेरे यांच्यासह मनसे नगरसेवक अनंत कोऱ्हाळे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे उमेदवार विजय गुप्ता यांच्या प्रचाराचा नारळ खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते फोडण्यात आला. या वेळी शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी विद्यार्थ्यांचा अनुभव उपयोगी

$
0
0

खडकी : 'माजी विद्यार्थी हे शिक्षण संस्थेची खूप मोठी ताकद आहेत. शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावर पोचलेले असतात. त्यांना मिळालेल्या अनुभवाचा उपयोग सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो,' असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी मांडले.

खडकी शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाचा तिसरा मेळावा शुक्रवारी शाळेच्या प्रांगणामध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे अॅड. चंद्रकांत छाजेड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष राजेश माने, सचिव विजय मानकर, सहसचिव राजेंद्र भुतडा, मदन गाडे, खजिनदार सागर शिंदे, सदस्य अनिरुद्ध शिर्के, दत्ता सूर्यवंशी, महिपाल पारेख, अॅड. सुनील जपे, अॅड. सीमा भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सुमारे एक हजार माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. बी. टी. पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय मानकर यांनी संघाच्या कार्याचा आढावा मांडला. मदन गाडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण करणार दोषींवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महावितरणच्या चुकीमुळे काळेवाडी येथील पांडुरंग गाडे कुटुंबीयांना १४ लाख ४२ हजारांचे वीज बिल देण्यात आले होते. त्यानंतर पूर्व सूचना न देता कारवाई करीत थेट वीज तोडल्याने गाडे कुटुंबीय सध्या अंधारात आहेत. मात्र, गाडे कुटुंबीयांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या; तसेच हे गेल्या ७१ महिन्यांचे बिल आहे. मीटर रिडिंग घेणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे गेल्या ७१ महिन्यांत रिडिंग न घेतले गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे महावितरणच्या काही अधिकाऱ्यांनी ही चूक दुरुस्त करण्याऐवजी त्याच पत्त्यावर दुसरे मीटर देत घोळ वाढविल्याचे आता चौकशीत पुढे येत आहे.

काळेवाडी येथे राहणाऱ्या गाडे कुटुंबीयांकडे काही भाडेकरू देखील राहतात. गेल्या ७१ महिन्यांत म्हणजे सहा वर्षांत त्यांना चुकीच्या पद्धतीने बिल देण्यात येत होते, असे आता महावितरणचे म्हणणे आहे. ही चूक दुरुस्त करणे गरजेचे होते. पण काही महाभागांनी चुकीच्या पद्धतीने दुसरे मीटर दिल्याचे चौकशीत पुढे आल्याचे महावितरणच्या लक्षात आले आहे. या प्रकारामुळे आता मीटर रिडिंग घेणाऱ्या ठेकेदारासह चुकीच्या पद्धतीने काळे यांना दुसरे मीटर देणाऱ्या महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

गाडे कुटुंबीयांना बिलाबाबत पूर्व कल्पना देण्यात आली होती. पण चूक महावितरणची आहे. त्यांना मासिक हप्ते करून देण्यास महावितरण तयार असून त्यांना हे बिल भरावेच लागणार आहे. नवीन मीटर घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही. त्यामुळे यात गैरप्रकार झाल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे सर्वच दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यापासून जरा सांभाळूनच...

$
0
0

Mustafa.Attar@timesgroup.com

पुणे : 'थर्टी फर्स्ट'ला मद्याला आपलेसे केलेल्यांबरोबरच, प्रथमच मद्य चाखणाऱ्यांचीही चांगलीच चंगळ असते. त्यामुळे प्रथमच मद्याच्या आहारी जाणाऱ्यांना 'जरा सांभाळूनच' असा सल्ला देण्यास यंदाही डॉक्टरमंडळी विसरलेली नाहीत.

'नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सध्या पार्टी मूडमध्ये आहे. कोणी हॉटेल, पब तर कोणी घरात मित्र मैत्रिणींसोबत पार्टी एन्जॉय करीत सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र, या पूर्वी दारूच्या थेंबाला कधीही न शिवलेल्यांनी हा पराक्रम करताना मनावर ताबा ठेवणे गरजेचे असून, मर्यादेतच मद्यपान करण्यास हरकत नाही,' असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

'मद्यपानाची सवय असलेल्यांना दारू किती प्रमाणात घ्यायची याचा एक अंदाज आलेला असतो. मात्र, प्रथमच मद्यपान करणाऱ्याला तो अंदाज नसल्याने त्यांनी अतिरेक टाळावा. मद्याचे सेवन केल्यानंतर वाहन चालविणे, बाहेर फिरणे अथवा वेगवान ड्रायव्हिंग करण्याच्या भानगडीत पडू नये,' नये, असा सल्ला डॉ. शिशिर जोशी यांनी दिला. दर वर्षी नवर्षाच्या स्वागताला अनेकजण दारू पिण्याचला सुरुवात करतात, याकडे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांनी लक्ष वेधले. या दिवशी दारू पिण्याची सुरुवात करणारे वर्षभर या ना त्या कारणाने दारूला स्पर्श करीतच असतात. काही जण तर पुढे जाऊन सोशल ड्रिंकर या गोंडस नावाखाली मद्याचे पेले रिचवतात. खरे तर ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करणे, ही पाश्चात्यांची संस्कृती आहे. पण या दिवशी दारू घेण्याच्या सवयी वाढल्यानेच आहारी गेलेल्या महिलांसह मुलींसाठी मुक्तांगणमध्ये स्वतंत्र वॉर्ड उघडला आहे, असेही डॉ. अवचट म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाह्यवळण रस्ता हवाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर सातत्याने प्रचंड प्रमाणात होणारी वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी प्रस्तावित बाह्यवळण रस्त्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे अशी मागणी प्रवासी संघटना आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

वाहतूककोंडीमुळे या रस्त्याने जाणारे स्थानिक पादचारी व हुतात्मा राजगुरू कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनींना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. राजगुरुनगर शहराच्या पूर्व भागातून जाणारा हा बाह्यवळण रस्ता राक्षेवाडी, होलेवाडी, भांबुरवाडी, राजगुरुनगर व चांडोली गावांच्या हद्दीतून जाणार आहे. सुरुवातीला या बाह्यवळण रस्त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होता. बाह्यवळण रस्त्याऐवजी पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर शहरात उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी संबंधित गावातील शेतकऱ्यांनी केली होती. परंतु सध्या बाह्यवळण रस्त्याचा विरोध पूर्णपणे मावळला असून दिवाळीच्या दरम्यान या रस्त्याची मोजणी देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.

वाहनकोंडीमुळे थेट चांडोली टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या जातात. एक ते दीड किमीचे अंतर कापण्यासाठी वाहनांना दोन ते तीन तास लागतात. चाकण औद्योगिक वसाहतीमुळे या रस्त्यावरील रहदारीचा ताण वाढलेला आहे. या महामार्गावर राजगुरुनगर एसटी बसस्थानकासमोरच्या ओढ्यावरील व भीमा नदीवरील पूल अरुंद आहेत. हे दोन्ही पूल वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. बसस्थानकात जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी गाड्यांमुळे देखील वाहतूक कोंडीत भर पडते. पाबळ चौक व वाडा रस्ताही वर्दळीचे मार्ग आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने या ठिकाणी वाहतुकीला अडथळा येईल, अशा पद्धतीने उभी असतात. त्याचाही वाहतुकीवर परिणाम होतो. दोन वर्षापूर्वी महामार्गावरील हुतात्मा राजगुरू कॉलेज ते थिगळ स्थळ यादरम्यान असलेली अतिक्रमणे हटवून रस्ता प्रशस्त करण्यात आला. परंतु कालांतराने पुन्हा या रस्त्यावर अतिक्रमणे वाढत गेली.

प्रगतीसाठी हवा रस्ता

बाह्यवळण रस्त्यामुळे राजगुरुनगर शहराच्या विकासाला मोठी गती प्राप्त होऊन एक नवीन राजगुरुनगर शहर उदयास येईल, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. या बाह्यवळण रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेझ (खेड सिटी) अंतर्गत काही कंपन्या सुरू झाल्या असून, काहींचे कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे या भागात बांधकाम क्षेत्रासाठी निश्चितच 'अच्छे दिन' येतील आणि या भागाचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघोलीतील दुय्यम निबंधक कार्यालयाची चौकशी करा

$
0
0

वाघोलीतील कार्यालयाबाबत मनविसेची मागणी

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

गेल्या काही दिवसांपसून वाघोली येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी साठी येणाऱ्या नागरिकांकडून अवाच्या सव्वा रक्कम घेऊन प्रचंड लूट चालू आहे. दुय्यम निबंधक कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी मनविसेचे जिल्हाउपप्रमुख गणेश म्हस्के व माहिती सेवा समितीचे प्रल्हाद वारघडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह महसूलमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे वाघोतीलील उद्योग मोठ्या प्रमाणवर वाढले आहेत. जागेची मुबलक उपलब्धता, मोठमोठ्या इमारती आणि परिसरातील आयटी कंपन्यांमुळे लोकांचा ओढा वाघोलीकडे वळू लागला आहे. जमिनीचे आवाक्यात असणाऱ्या भावामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. क्षमतेपेक्षा अधिक दस्त नोंदणी होत असल्याने असंख्य नागरिकांची कामे प्रलंबित राहत असल्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. दुय्यम निबंधकाकडून दस्तेवज नोंदणी फी जास्त आकारून मनमानी करत असल्याचा आरोप गणेश म्हस्के यांनी केला.

आर्थिक कारभार पारदर्शी होण्यासाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, नागरिकांच्या दस्तेवजाच्या सुरक्षेबाबत उपाय योजना नसल्यामुळे भविष्यात अचानक आग लागल्याचा प्रकार घडल्यास महत्त्वाच्या कागदपत्रांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आवारात अग्निशमन यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा आंदोलन

वाघोली कार्यालयाच्या कारभाराची सखोल चौकशी करून संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी. संबधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती मनविसेचे उपजिल्हाप्रमुख गणेश म्हस्के व माहिती सेवा समितीचे महराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद वारघडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व महसूलमंत्री यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवस्थापनाविना पाणीबाणी

$
0
0

ग्रामस्थांचा आरोप; पारवडीत ठेकेदारांना पोसण्यासाठी पाणी योजना

म. टा. वृत्तसेवा, बारामती

पारवडी गावठाणासह आसपासच्या वाड्यावस्त्यांवर बारा पाणी योजना सरकारकडून राबवण्यात आल्या. मात्र या योजना व्यवस्थापनाच्या टंचाईमुळे बंद पडल्या असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

पारवडी गावात १९८६ मध्ये माळखोपवस्ती, व अन्य दोन वस्त्यासाठी पहिली पाणी पुरवठा योजना करण्यात आली. मात्र, तत्कालीन व्यवस्थापन समिती व स्थानिक राजकीय नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे ही योजना फक्त कागदावर पूर्ण झाली. गार्डीवस्ती - होलेवस्ती योजना सुरू आहे. मात्र, गावकऱ्यांना हे पाणी मिळत नाही. या योजनेचे पाणी नेमके कोठे जाते, असा प्रश्न आजही नागरिकांना पडला आहे. या योजनेचे वीज बिल ग्रामपंचायत भरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पारवडी गावातील ग्रामस्थाना दिवसाआड येणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागते आहे. सात हजाराच्या आसपास लोकसंस्था असलेल्या पारवडी गावात ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, व अन्य योजनाच्या व्यवस्थापनातील टंचाईमुळे पाणीबाणी सुरू आहे. गावठाणासाठी दोन स्वतंत्र्य योजना राबवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक योजना रडतखडत सुरू आहे, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची दुसरी योजना पूर्ण होण्याआधीच बंद पडली असल्याचे गावडे यांनी सांगितले.

गावातील दोन दलित वस्तीसाठी प्रत्येकी दोन योजना अशा एकून चार योजना ३५ लाख रुपये खर्च करण्यात आला. चर्मकार वस्तीसाठी पाच लाख रुपये खर्च करून योजना पूर्ण करण्यात आली. तिन्ही योजना व्यवस्थापनाच्या नियोजनाअभावी बंद आहेत. त्यामुळे दलित महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्यात पारवडी ग्रामपंचायतीला अद्याप पूर्ण यश आलेले नाही. त्यामुळे दलित महिला रोजंदारीच्या कामांच्या वेळ व पाण्याच्या वेळेची सांगड घालताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून आले.

गावालगत असलेल्या कोकणे वस्ती व अन्य तीन वस्त्यासाठी ४९ लाख रुपये देण्यात आले आहे. २०१०मध्ये नागरेवस्ती-बेगारेवस्ती ४५ लाखांची योजना करण्यात आली आहे. गवंडवस्तीसाठी स्वतंत्र दोन योजना, गावडेवस्ती, पवारवस्ती अशा लाखो खर्च करून योजना पूर्ण केल्या. पाणी मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी 'मटा'ला सांगितले. गावात पारवडी-जैंनकवाडी रोडच्या बाजूला जुना आड असून, याच आडावरून परिसरातील ग्रामपंचायती २००५पर्यत पिण्यासाठी पाणी घेऊन जात असल्याचे गावातील जेष्ठ नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहितीचे ‘अधिकारी’ कोण?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी सारस्वताची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या संस्थेत माहितीचा 'अधिकारी' कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत साहित्य महामंडळाकडे काही माहिती मागवण्यात आली असून, त्याला उत्तर कोणी द्यायचे हेच कळत नसल्याने या पत्रांना अद्याप उत्तर देण्याबाबत चालढकल करण्यात येत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८९वे साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीत वादविवाद झाले होते. साहित्य क्षेत्रातील काहींनी या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी माहिती मागवणारी पत्रे साहित्य महामंडळाला पाठवली आहेत. महामंडळाच्या घटनेनुसार संस्थात्मक अधिकार अध्यक्षांकडे, कागदपत्रांच्या देखभालीचे काम प्रमुख कार्यवाह आणि निवडणुकीचे कामकाज निर्वाचन अधिकाऱ्यांकडे आहेत. मात्र, मागवलेल्या माहितीला उत्तर कोणी द्यायचे, हेच स्पष्ट झालेले नाही.

माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आल्यापासून त्या आधारे माहिती मागवणारी पत्रे प्रथमच साहित्य महामंडळाला आल्याची माहिती सूत्रांनी दिली. साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील माहिती मागणारी काही पत्रे साहित्य महामंडळाकडे आली आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी दुबार मतपत्रिका किती पाठवल्या, एकूण किती मतपत्रिका आल्या आदी विषय आहेत.

'महामंडळाच्या अध्यक्षांनी निर्वाचन अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यावर निवडणुकीचे कामकाज त्यांनी पूर्ण करायचे असते. निवडणूक झाल्यावर ती कागदपत्रे मंहामडळाला सुपूर्त केली पाहिजेत. माहिती अधिकारांतर्गत मागवलेली माहिती निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आहे. निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी गेल्या तीन साहित्य संमेलन निवडणूक प्रक्रियेची कागदपत्रे साहित्य महामंडळाला दिलेली नाहीत. त्याबाबत त्यांना पत्रही पाठवले आहे,' असे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी सांगितले.

'महामंडळाला आलेली पत्रे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह यांच्या नावे आलेली आहेत. त्यामुळे पत्रांना उत्तरे त्यांच्याकडून दिली गेली पाहिजेत. त्या आधी माहिती अधिकाराची पूर्तता महामंडळाला पूर्ण करावी लागेल. या पत्रांना उत्तर देण्यासाठीची माहिती मागितल्यास दिली जाईल,' असे अॅड. आडकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गंगाधाम परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवूण अंगावरील सोन्याची साखळी व अंगठी काढून घेऊन सव्वा दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत श्रीकृष्ण दामोदर फाकटकर (६३, रा. बिबवेवाडी-कोंढवा रोड) यांनी तक्रार दिली आहे. गंगाधाम परिसरातून फाकटकर रविवारी दुपारी जात होते. त्या वेळी शंभो मित्र मंडळाजवळ त्यांना एका व्यक्तीने आवाज दिल्यामुळे ते थांबले. त्या व्यक्तीने त्यांना लग्नात ओळख झाल्याचे सांगून त्यांच्या मोटारीत बसली. त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्या गळ्यातील ५२ तोळ्याची सोन्याची माळ व १२ ग्रॅमची सोन्याची अंगठी पाहण्यास म्हणून घेतली. बोलण्यात गुंतवून ठेवत मोटारीतून उतरून दुचाकीवरून पळून गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images