Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लोकबिरादरी’साठी‘व्हायोलिन गाते तेव्हा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी सांस्कृतिक पुणे डॉट कॉम व लोकबिरादरी मित्रमंडळ यांच्यातर्फे व्हायोलिन गाते तेव्हा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (२६ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते ज्येष्ठ समीक्षक डॉ. मा. कृ. पारधी यांचा ९६व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आहे.

आयोजक सुभाष इनामदार यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाला ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. वीणा देव, अनिकेत आमटे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. 'व्हायोलिन गाते तेव्हा' या या कार्यक्रमात चारुशीला गोसावी व्हायोलिनवर लोकप्रिय हिंदी-मराठी गाणी सादर करणार आहेत. गो. नी. दांडेकर यांनी लिहिलेल्या 'आनंदवनभुवनी' या कादंबरीचे पुनर्प्रकाशन मृण्मयी प्रकाशनतर्फे केले जाणार आहे. तसेच, कविता कशी जन्म घेते याविषयी कवयित्री शांता शेळके यांच्याशी सुभाष इनामदार यांनी साधलेल्या संवादाची 'असेन मी नसेन मी' ही सीडी ज्येष्ठ लेखिका डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशित केली जाणार आहे.

पारधी यांनी दीर्घकाळ साहित्य समीक्षा केली. अनेक वृत्तपत्रांतून लेखन केले. त्यांचे 'मी परत येईन' हा कथासंग्रह, 'मारवा' हा कवितासंग्रह प्रकाशित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रॉपर्टी टॅक्सची मुदत तीन महिने?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील अधिकाधिक नागरिकांना पालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स सवलतीच्या दरात भरता येण्यासाठी सवलतीची मुदत एका महिन्याने वाढविण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सवलतीच्या दरात टॅक्स भरण्याची मुदत दोन महिन्यांऐवजी तीन महिने करावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. समितीने मान्यता दिल्यास पुणेकरांना जून अखेरपर्यंत पाच ते दहा टक्के सवलतीच्या दरात टॅक्स भरता येणार आहे.

पालिका प्रशासनाला मिळकतकरातून मोठे उत्पन्न मिळते. पालिकेच्या मिळकतकर विभागाकडून एक एप्रिलपासून नागरिकांना बिलांचे वाटप केले जाते. त्यानंतर दोन महिन्यांची मुदत देऊन मे महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत नागरिकांना पाच ते दहा टक्के सवलतीच्या दरात प्रॉपर्टी टॅक्स भरता येतो. पंचवीस हजारापर्यंत टॅक्सची रक्कम असलेल्या नागरिकांना १० टक्के, तर पंचवीस हजारांपेक्षा अधिक टॅक्स असलेल्या ग्राहकांना पाच टक्के याप्रमाणे ही सवलत दिली जाते. या सवलतीच्या योजनेमुळे पहिल्या दोन महिन्यांतच पालिकेच्या मिळकतकराचे ५० ते ६० टक्के उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण होते.

नागरिकांना बिलांचे वाटप करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतचा कालावधी जातो. पालिकेने एक महिन्याने सवलतीच्या दरात बिल स्वीकारण्याची मुदत वाढवून दिल्यास अनेक नागरिक याचा फायदा घेत दिलेल्या मुदतीत बिल भरतील. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. यामुळेच प्रशासनाने एक महिना मुदतीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या समितीच्या बैठकीत याला मंजुरी दिल्यास पुणेकरांना एक एप्रिल ते ३० जून अशा तीन महिन्याच्या कालावधीत सवलतीच्या दरात प्रॉपर्टी टॅक्स भरता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारमुळेच डाळ महागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने डाळींचा किती प्रमाणात साठा ठेवायचा याचा वेळीच निर्णय घ्यायला हवा होता. सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे बाजारात तूरडाळ महागली, अशी टीका करतानाच सरकारकडून धोरणात्मक चुका टाळाव्यात अशी टिपण्णी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.
द पूना मर्चंट्स चेंबरच्यावतीने शरद पवार यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी फॅमचे मोहन गुरनानी, डॉ. बाबा आढाव, चेंबरचे माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, वालचंद संचेती, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, अशोक लोढा, जवाहरलाल बोथरा, राजेंद्र बांठिया, प्रकाश म्हस्के उपस्थित होते.
'महाराष्ट्रात तसेच देशात डाळींचे उत्पादन कमी आहे. कापूस, साखर, गहू, तांदूळाचे उत्पादन वाढले आहे. पण डाळी आणि खाद्यतेले यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन वाढले नाही. अद्याप मागणी आणि पुरवठा यामध्ये अंतर आहे. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी आयातीचा निर्णय घ्यावा लागतो. मुंबईच्या बंदराच्या बाहेर परदेशातून डाळींची जहाजे उभी होती. राज्य सरकारने डाळींचा साठा किती करायचा याचा निर्णय घेतला. पण कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी जहाजातील माल उचलला नाही. अशा प्रकारच्या सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे डाळ महागली,' या शब्दांत डाळीच्या महागाईवर शरद पवार यांनी भाष्य करीत अप्रत्यक्षरित्या सरकारवर टीका केला.
सर्वसामान्यांना परवडेल त्या दरात वस्तू पुरवणे गरजेचे असून सरकार, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची जबाबदारी आहे. देशाच्या विकासासाठी गुंतवणूक वाढविणे चांगले आहे. पण, किरकोळ क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढविणे कितपत चांगली आहे याचा विचार होणे गरजे आहे. याचा विचार झाला नाही तर आपले व्यापारी संपतील, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली. या वेळी असुरक्षित असंघटित कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी विनंती डॉ. आढाव यांनी पवार यांना केली. ओस्तवाल, संचेती, गुरनानी यांनी मनोगते व्यक्त केली. चोरबेले यांनी प्रास्तविक केले. लोढा यांनी स्वागत केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
'ऑनलाइन तंत्रज्ञानाचा विचार करा'
सध्या व्यापारात ऑनलाइन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या तंत्रज्ञानाचा व्यापाऱ्यांवर काय परिणाम होईल, हे देखील पाहिले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाने वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून देताना माणसे उद्‍ध्वस्त होणार नाहीत, याचीही काळजी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करताना घेतली पाहिजे , अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीपूर्वीच वादांची नांदी

$
0
0

Chinmay.Patankar@timesgroup.com

पुणे : मराठी सारस्वताची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर वादांची नांदी झाली आहे. त्यामुळे राजकारणाचे विविध पैलू साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न साहित्यिक करत असतानाच साहित्याच्या क्षेत्रातील राजकारणही आता चव्हाट्यावर येऊ लागले आहे. निवडणुकीला अद्याप साडेतीन महिने बाकी असून, आताच सुरू झालेल्या या वादांमुळे निवडणुकीचे रंग किती खुलणार याचा अंदाज येऊ लागला आहे.

गेल्या पाच वर्षांत मसाप विविध कारणांनी चर्चेत राहिली. गेल्या निवडणुकीनंतर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत डॉ. वि. भा. देशपांडे यांनी डॉ. माधवी वैद्य यांच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करून फेरनिवडणुकीची मागणी केली होती. या प्रकाराची कोर्टकचेरीही सुरू आहे. त्यानंतर कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर 'सही' प्रकरण गाजले. तरुणांसह पुणेकरांना मसापशी जोडून घेण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा करण्यात आली. त्यात पदाधिकाऱ्यांना सातत्य टिकवता न आल्याने त्यातील काही उपक्रम बंद पडले. डॉ. वैद्य यांच्या पॅनेलच्या जाहीरनाम्यातील अनेक वचनांची पूर्तताही अद्याप झालेली नाही. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात येत्या निवडणुकीत तीव्र प्रतिक्रिया उमटणार असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात आहे. आगामी निवडणूक चुरशीची होण्याची कल्पना असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

मसापची नवीन कार्यकारिणी १५ मार्च २०१६पर्यंत अस्तित्वात येणे घटनात्मकदृष्ट्या आवश्यक आहे. या तारखेच्या तीन महिने आधी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतदारांची यादी सुपूर्द करणे गरजेचे होते. मात्र, विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मुदतीनंतर यादी सुपूर्द केल्याने घटनेचा भंग झाला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियाच घटनाबाह्य ठरणार आहे, असा आरोप साहित्य परिषदेचे कायदेशीर सल्लागार अॅड. प्रमोद आडकर यांनी नुकताच केला.

आडकर यांनी मसापच्या कार्यकारिणीतील पदाचा राजीनामा देऊन साहित्य महामंडळाचे निवडणूक अधिकारी म्हणून तीन वर्षे काम केले. आता त्यांच्यावरील जबाबदारी संपल्याने साहित्य महामंडळ आणि मसाप या दोन्ही संस्थांमध्ये त्यांच्यासाठी काहीच उरलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीतील उमेदवाराच्याच भावनेतून आडकर यांनी हा आरोप केला असण्याची शक्यता आहे. प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी साहित्य महामंडळाच्या निवडणूक प्रक्रियेवरही आक्षेप घेतला होता. निवडणूक जाहीर झाल्यावर लगेचच आक्षेप, आरोप केले जाऊ लागणे ही आगामी काळातील वादांची आणि अंतर्गत वाद समोर येण्याची नांदी ठरणार आहे.

बरेच घटक रिंगणात

गेले तीन वर्षे साहित्य महामंडळाचे कार्यालय मसापकडे होते. मात्र, मसाप आणि साहित्य महामंडळातील विद्यमान पदाधिकाऱ्यांबाबत साहित्य विश्वात नाराजीचे वातावरण असल्यानेच आगामी निवडणुकीत साहित्यातील बरेच घटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. साहित्यातून राजकारण मांडल्यानंतर आता साहित्यातील राजकारण, गटतट, संस्थांतर्गत संघर्ष, नाराजीनामे असे सगळे होणार आहे. त्यामुळेच ही निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राऊ’ची किंमत वाढली ‘राव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वाट लावली' आणि 'पिंगा' या गाण्यांमुळे वादात सापडलेल्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटामुळे एक सकारात्मक घटना घडली आहे. ना. सं. इनामदार यांच्या 'राऊ' कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून कादंबरीला मोठी मागणी आली असून, कादंबरीची किंमत पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

साहित्य आणि चित्रपट यांच्यातील नाते जुने आहे. यापूर्वी कादंबरीवर आधारित अनेक चित्रपट झाले आहेत. बालगंधर्व, दुनियादारी, श्री पार्टनर अशा अनेक चित्रपटांमुळे त्यांच्या मूळ कादंबऱ्यांना मागणी आली होती. त्याचीच पुनरावृत्ती 'बाजीराव मस्तानी'मुळे होत असल्याचे दिसून येत आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ना. सं. इनामदार यांनी लिहिलेली 'राऊ' ही कादंबरी १९७२ मध्ये प्रकाशित झाली होती. बाजीराव काशीबाई यांचा विवाह, मस्तानीशी असलेले नातेसंबंध, नात्यातील गुंतागुंत अशा पद्धतीने यातील कथानक रंगवण्यात आले आहे. प्रकाशित झाल्यानंतर या कादंबरीच्या ११ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या कादंबरीबाबत वाचकांची उत्सुकता वाढली आहे. सध्या या कादंबरीची तेरावी आवृत्तीही संपली असून, नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे.

'बाजीराव मस्तानी चित्रपटाबाबत वाद सुरू झाल्यापासून राऊचे नाव चर्चेत आले. तेव्हापासूनच वाचक कादंबरीची मागणी करू लागले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात आणखीन वाढ झाली आहे,' असे साहित्य दरबारच्या विनायक धारणे यांनी सांगितले.

'पेशवाई'वरील पुस्तकांनाही मागणी

राऊ या कादंबरीसह पेशवाईवर आधारलेल्या इतर काही पुस्तकांनाही वाचकांकडून मागणी आहे. त्याशिवाय श्रीराम साठेलिखित पेशवे, प्रमोद ओकलिखित पेशवे घराण्याचा इतिहास, नीळकंठ खाडिलकर लिखित बाजीराव मस्तानी, जयराज साळगावकर लिखित अजिंक्य योद्धा बाजीराव आदींचा त्यात समावेश आहे, अशी माहिती अक्षरधारा बुक गॅलरीच्या रमेश राठिवडेकर यांनी दिली.

ना. सं. इनामदार यांच्या 'राऊ' कादंबरीला वाचकांकडून आधीपासूनच चांगला प्रतिसाद होता. ती वाचकांच्या पसंतीला उतरलेली कादंबरी आहे. इनामदारांच्या साहित्यातही या कादंबरीचा क्रमांक वरचा आहे. नव्या आवृत्तीमध्ये किंमत पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

- देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरी करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक

$
0
0

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याकडून फसवणुकीचा प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बालेवाडी येथील एका महिलेच्या घरातून वीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांला चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

नागेश पांडुरंग शिंदे उर्फ अनिकेत जाधव (वय १९, रा. बालेवाडी गावठाण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिंदे हा मूळचा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील राहणारा असून तो बालेवाडी येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. बालेवाडी येथे तो मित्रांसोबत राहतो. सोशल नेटवर्किंग साइटवर वेगवेगळ्या नावाने त्याने अकाउंट तयार केली आहेत. या माध्यमातून तो अनेकांशी संपर्क साधत होता. तसेच, तो मोबाइलवर कोणताही नंबर लावून बोलत असे. अनोळखी व्यक्तीला फोन लावल्यास त्या व्यक्तींशी गोड बोलून ओळख वाढवीत असे. अशाच पद्धतीने त्याने बालेवाडी येथील एका महिलेशी ओळख वाढविली. त्यानंतर तो त्या महिलेच्या घरी जाऊ लागला. त्या ठिकाणी गेल्यानंतर महिलेच्या घरातील इतर व्यक्तींसोबतही त्याने चांगले संबंध निर्माण केले. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी त्याने गुपचूप लॉकरची चावी चोरून कपाटातील वीस तोळ्याचे दागिने त्याने चोरून नेले व तो पळून गेला.

चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याचे कर्मचारी संजय वाघ यांना शिंदे हा पुण्यात मित्रांकडे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार फौजदार राजेंद्र चव्हाण, पाचपुते, पोलिस कर्मचारी प्रवीण पाटील, गिरी यांच्या पथकाने त्याला सापळा रपचून पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने बालेवाडी येथे त्याच्या खोलीतून चौदा तोळे सोने जप्त केले; तर सहा तोळे सोने त्याने उदगीर येथील मंगल ज्वेलर्स यांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार सराफ व्यवसायिक राजेश चिल्लगे याला पकडण्यासाठी गेल्यानंतर तो पळून गेला. त्याबरोबर शिवाजीनगरच्या शाहूनगर पर्वती बंगला परिसरात घरफोडी करणाऱ्या इरफान उर्फ इप्पू अश्रफ खान (वय ३२, रा. घोरपडी गाव) याला अटक केली असून त्याच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिघीतील ‘दीपमाया’ची वीजचोरी उघड

$
0
0

पुणे : दिघी येथील दीपमाया इंडस्ट्रीज आणि त्यावरील रहिवासी इमारतीमधील ४० खोल्यांमध्ये करण्यात असलेली सुमारे १४ लाख ६८ हजार रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. 'महावितरण'च्या मिनी फिडर पिलरमधून अनधिकृत केबल जोडून ही वीजचोरी करण्यात आली असून, या प्रकरणी दीपमाया इंडस्ट्रीजविरुद्ध महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी येथील गायकवाडनगरमध्ये माया प्रदीप दिघे यांच्या मालकीच्या दीपमाया इंडस्ट्रीजला औद्योगिक वीजजोडणी देण्यात आली आहे. या इंडस्ट्रीजच्या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर ४० खोल्या आहेत. वीजवापराच्या विश्लेषणातून संशय निर्माण झाल्याने या इंडस्ट्रीजमधील वीजयंत्रणेची 'महावितरण'कडून पाहणी करण्यात आली. त्यामध्ये छुप्या पद्धतीने वीजचोरी केल्याचे दिसून आले.

दीपमाया इंडस्ट्रीजसमोर असलेल्या महावितरणच्या मिनी फिडर पिलरमधून वेगळी अनधिकृत केबल इमारतीमधील घरगुती वापरासाठी असलेल्या खोल्यांमध्ये आणि तेथून इंडस्ट्रीजच्या वीजयंत्रणेला जोडण्यात आल्याचे दिसून आले. याद्वारे इंडस्ट्रीजमध्ये वीजवापर करून सुमारे आठ लाख ५३ हजार रुपयांची, तर या इमारतीमधील ४० खोल्यांसाठी वीजवापर करून सहा लाख १५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले आहे.

मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, कार्यकारी अभियंता धर्मराज पेठकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप गिरी, सहायक अभियंता रमेश सुळ, शितल बोथे, अंजली हिरे, चंद्रकांत मोहरे, तुळशीराम गवळी, कृष्णा गायकवाड, चंद्रकांत वाडेकर, नामदेव आढे, संजय नायकवडी, महेश वाघमारे, अतुल वाळुंज, शुभांगी मुचुंडे आदींनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेट सदस्यसंख्येस कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नव्या विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीनंतरच्या टप्प्यामध्ये राज्यभरातील विद्यापीठांमध्ये एकूण २२ सदस्यांचा समावेश असलेल्या व्यवस्थापन परिषदा अस्तित्वात येणार आहेत. विद्यार्थी प्रतिनिधीसह इतर दोन निमंत्रित सदस्यांचा समावेश आणि एकाच संस्थेच्या व्यवस्थापन प्रतिनिधीला लागोपाठच्या वर्षी संधी न देण्याची तरतूद या कायद्याच्या मसुद्याचे वैशिष्ट्य म्हणूनच विचारात घेतली जात आहे.

नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सिनेटमधील सदस्यांच्या संख्येला कात्री लावणाऱ्या तरतुदी सुचविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापाठोपाठ व्यवस्थापन परिषदांच्या रचनेमध्येही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या प्रचलित विद्यापीठ कायद्याप्रमाणेच नव्या कायद्यामध्येही व्यवस्थापन परिषदेच्या एका वर्षात किमान चार बैठका होणे अपेक्षित आहे. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या व्यवस्थापन परिषदांसाठी विद्यापीठाचे कुलसचिव हे सदस्य सचिव राहतील, अशी तरतूद नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यामध्ये करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेपत्ता विवाहितेच्या अपहरणाची शक्यता

$
0
0

येरवडा : महिन्याभरापूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे अपहरण झाल्याची शक्यता निर्माण झाल्याने विश्रांतवाडी पोलिसांनी हरविल्याच्या तक्रारीचे गुरुवारी अपहरणाच्या गुन्ह्यात रूपांतर केले. बीड जिल्ह्यातील एका तरुणाने महिलेचे अपहरण केल्याचा संशय आहे.

प्रियांका आसाराम तुपे (वय २२, रा. न्यू नर्सेस क्वार्टर, आरोग्य भवनशेजारी, विश्रांतवाडी) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे पती आसाराम परमेश्वर तुपे यांनी मागील महिन्यात पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली होती. महेश खरसाडे (रा. गेवराई, जिल्हा बीड) या तरुणाने प्रियांकाचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. एन. सुपेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी बीडला जाणार असल्याचे प्रियांकाने फोनवर पतीला सांगितले. आसाराम संध्याकाळी

कामावरून घरी आल्यानंतर प्रियांका गावी पोहोचली का, हे विचारण्यासाठी त्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिचा मोबाइल बंद होता. म्हणून त्याने सासऱ्यांशी संपर्क साधला. त्या वेळी प्रियांका गावी पोहोचली नसल्याचे लक्षात आल्यावर रात्री उशिरा विश्रांतवाडी पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. आसाराम येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनला मिळेना ‘आधार’

$
0
0

आधारकार्ड लिंक करण्याची ३१ डिसेंबरची मुदत टळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशनकार्ड हे आधार कार्डशी लिंक करण्याच्या कामाला अद्याप गती मिळू शकली नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील सुमारे सात कोटी १६ लाख रेशनकार्डधारकांपैकी अवघे तीन कोटी ५८ लाख रेशनकार्ड हे आधारशी लिंक झाले आहेत. या कामासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असली, तरी नागरिकांकडून मिळणारा थंड प्रतिसाद पाहून मुदतवाढ करण्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय राहिलेला नाही.

पुणे विभागात सुमारे २० लाख ६० हजार २९४ रेशनकार्ड हे आधारशी लिंक झाले आहेत. सांगलीमध्ये १२ लाख ८७७, कोल्हापूरमध्ये १८ लाख ७६ हजार ४६६, साताऱ्यात १३ लाख ३० हजार ३०५, सोलापूर परिसरातील १७ लाख नऊ हजार ८४३ आणि नगरमध्ये १३ लाख ७८ हजार ६३१ रेशनकार्ड आधारशी लिंक करण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम कायद्यान्वये राज्यामध्ये कुटुंबातील वरिष्ठ महिलेच्या नावाने बारकोड आणि छायाचित्र असलेले रेशनकार्ड दिले जाणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मतदान कार्ड क्रमांक लिंक करण्याची मोहीम सुरू आहे. या कामासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यात सुमारे सात कोटी १६ लाख ६८४ रेशनकार्डधारक आहेत. त्यापैकी तीन कोटी ५८ लाख २७ हजार ४०८ रेशनकार्ड हे आधारशी लिंक करण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने आणखी मुदतवाढ द्यावी लागणार असल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करण्यासाठी रेशनकार्डधारकांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. याबाबतचे अर्ज रेशन दुकानदारांमार्फत पुरवठा विभाग गोळा करत आहे. रेशनकार्ड हे आधार कार्डशी लिंक करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने स्वस्त धान्य दुकानांतून धान्याचे वाटप होणार आहे. या योजनेसाठी सुमारे १०३ कोटी ९९ लाख रुपये खर्च येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात टेकडीफोडीला ‘ब्रेक’

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका हद्दीलगतच्या गावांसह ग्रामीण भागांमध्ये गौण खनिज उत्खननासाठी टेकडीफोड होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. गौण खनिजाचे अनधिकृतणे उत्खनन करून टेकड्या खिळखिळ्या करण्याच्या कामाला यामुळे 'ब्रेक' लागणार आहे.

महापालिका हद्दीलगतच्या गावांमध्ये बेसुमार टेकडीफोड झाली आहे. मुरूम व मातीसाठी या टेकड्या फोडण्याचे प्रकार होत आहेत; तसेच या टेकड्या फोडून त्यावर बेकायदा घरेही बांधली जात आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये यासबंधी तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने टेकडीफोड होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश हरित न्यायाधिकरणाने नुकतेच दिले आहेत.

कात्रजमधील शिंदेवाडी येथे मोठ्या प्रमाणावर टेकडीफोड करण्यात आली. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक नाले व ओहोळ बंद झाले. त्याचा परिणाम पावसाचे पाणी महामार्गावर आले. या पावसाच्या पाण्यात एक मोटार अडकून त्यात मायलेकींचा गुदमरून मृत्यू होण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि टेकडीफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शिंदेवाडीत टेकडीफोड करणाऱ्या किसन राठोड याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला; तसेच बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी त्याला दंडात्मक नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीन्वये दंडाची रक्कम न भरल्याने राठोडच्या जमिनीचा लिलाव करून ती सरकारजमा करण्यात आली.

ही कारवाई करताना महसूल प्रशासनाने लगतच्या टेकड्यांवरील बेकायदा बांधकामे थांबविली. अनधिकृतपणे सुरू असलेल्या टेकडीफोडीच्या प्रकारांना अटकाव घातला. त्यानंतर मात्र ही कारवाई थंडावली. महापालिकेच्या हद्दीलगतचा; तसेच ग्रामीण भागातील बहुतांश भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) समाविष्ट झाला आहे. त्यामुळे टेकडीफोड रोखण्याची जबाबदारी पीएमआरडीएवर आली आहे. तथापि गौण खनिजाच्या उत्खननासाठी टेकडीफोड होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकारी राव यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखळीचोराकडून वृद्ध महिला पुन्हा टार्गेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात मोपेडवरून फिरणाऱ्या एका सोनसाखळी चोराने जाणीवपूर्वक वृद्ध महिलांना टार्गेट केल्याचा प्रत्यय शुक्रवारी दुपारी पुन्हा आला. एरंडवणा येथील गंगा निवास बंगल्यासमोरून पायी चाललेल्या ७७ वर्षांच्या आजींच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली. या घटनेतील चोरटा पूर्वीच्याच 'सीसीटीव्ही' फुटेजमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या शोधासाठी आणखी काही फुटेज तपासण्यात येत आहे.

गंगा सोसायटीसमोरील सार्वजनिक रस्त्यांवरून आजी पायी जात होत्या. त्या वेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि तेथून पळ काढला. यापूर्वीही अशाच प्रकारच्या पंधरा ते सोळा घटना घडल्या असून, यातील काही घटनांमध्ये आरोपीचे 'सीसीटीव्ही' फुटेज मिळाले आहे. हे फुटेज तक्रारदार आजींना दाखवले असता, त्यातील आरोपीला त्यांनी ओळखले आहे. पोलिसांनी त्यांना वेगवेगळे 'सीटीटीव्ही' फुटेज दाखवले असता त्यांनी त्यातील आरोपीला ओळखले. पोलिसांकडून आरोपीचा माग काढण्यासाठी 'सीसीटीव्ही' फुटेजमधील गाडीची ओळख पटवण्यात येत आहे. गाडीचा 'मेक' कळल्यानंतर आरोपीचा शोध घेणे सोपे होणार आहे. फुटेजमधील दुचाकीची नंबरप्लेट 'ब्लर' असून फुटेज क्लिअर करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे.

शहरातील विविध भागांत सोनसाखळी चोराने तब्बल १५हून अधिक गुन्हे केले आहेत. ज्येष्ठ महिलांना धक्का मारून गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले आहेत. शहरात सीसीटीव्ही बसवल्यामुळे या सोनसाखळी चोराचे फुटेज मिळाले आहे. रंगाने सावळा असलेला हा चोरटा जीन्स पँट आणि टी-शर्ट परिधान करतो. अशा वर्णनाचा चोरटा आढळल्यास १०० नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले.

चोरटा स्थानिक असण्याची शक्यता

सोनसाखळी चोराकडून वयस्कर महिलांना लक्ष्य करण्याच्या घटना गेल्या पाच महिन्यांत वाढल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या वर्णनानुसार या घटनांमध्ये एकच सोनसाखळी चोरटा असून, तो स्थानिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपलब्ध 'सीसीटीव्ही' फुटेजनुसार सोनसाखळी चोराची ओळख पटवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मद्यपींकडून चालकास मारहाण

$
0
0

पुणेः पाच मद्यपी तरुणांनी दोन लहान मुले व दोन महिलांना घरी घेऊन निघालेल्या मोटारीच्या चालकास अडवून जबर मारहाण केल्याची घटना सिंहगड रोडवर घडली. आरोपींनी फरशीचा तुकडा मोटारीच्या काचेवर मारला. मात्र, लहान मुलांना कोणतीही जखम झालेली नाही. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुजाता पांडे (वय ३२, रा. वानवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडे या २० डिसेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास सिंहगड रोडवरून दोन लहान मुलांसह घरी येत होत्या. त्या वेळी भंडारी हॉटेलजवळ त्यांच्या मोटारीला मद्यपान केलेल्या तरुणांनी पाठीमागून धक्का दिला. त्यामुळे चालकाने त्यांना दुचाकी नीट चालविण्यास सांगितले. मोटार घेऊन पुढे निघाले असता काही अंतरावर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी मोटार अडविली व चालकास बेदम मारहाण केली; तसेच फरशीचा तुकडा उचलून मोटारीच्या पाठीमागील बाजूस मारला. त्या वेळी मोटारीमध्ये दोन लहान मुले व दोन महिला होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्टी फर्स्टला जोरदार नाकाबंदी

$
0
0

उत्पादन शुल्क, पोलिस, करमणूक कर विभागाकडून संयुक्त कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यावर्षी राज्य उत्पादन शुल्क, पोलिस आणि करमणूक कर विभाग या तीन विभागांकडून संयुक्तपणे कारवाई होणार आहे. त्यामुळे विनापरवाना पार्टी करणारे आणि रस्त्यावर बेभानपणे वागणाऱ्यांना जागीच कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला रात्री उशीरापर्यंत पार्ट्यांचे आयोजन केले जाते. विनापरवाना पार्टी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क, पोलिस आणि करमणूक कर विभाग स्वतंत्रपणे कारवाई करते. यावर्षी तिन्ही विभागांनी एकत्रपणे मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.

तिन्ही विभागांनी एकत्र येऊन मोहीम राबविल्यामुळे कारवाई करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. गैरप्रकार करणाऱ्यांवर जागीच कारवाई होऊ शकणार असल्याचे वर्दे यांनी स्पष्ट केले.

शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसासाठी परवाना देण्यात येतो. मात्र, काही ​ठिकाणी परवाना न घेता पार्टीचे आयोजन केले जाते. त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे कारवाई करत होते. यावर्षी पोलिसांचेही सहकार्य लाभणार आहे; तसेच करमणूक कर बुडविला गेला असल्यास संबंधितांकडून कर वसूल होणार असल्याचे वर्दे म्हणाले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २० नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये १९५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर रोजी कारवाईसाठी १२ पथके बनविण्यात आली असल्याचे वर्दे यांनी नमूद केले.

दरम्यान, विनापरवाना पार्टीचे आयोजन करणे, बनावट मद्यविक्री, हातभट्टी विक्री करणाऱ्यांविरूद्ध या वर्षभरात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सुमारे तीन हजार गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये सुमारे एक हजार ५०० लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे आठ कोटी ९० लाख रुपयांचा माल जप्त झाला आहे. त्यामध्ये २४६ वाहने असल्याचे उपअधीक्षक सुनील फुलफगर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहरूख खान’ अखेर स्थानबद्ध!

$
0
0

पिंपरी : हाणामारी, दमदाटी, लोकांना त्रास, खंडणी, गोंधळ या सारख्या अनेक गुन्हेगारी कारवायांद्वारे जनतेला वेठीस धरणाऱ्या शाहरूख खान नामक स्थानिक गुंडाला वाकड पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.

सराईत गुन्हेगार शाहरुख युनुस खानची रवानगी कोल्हापूर कारागृहात करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (२३ डिसेंबर) करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने नव्याने अंमलात आणलेल्या एमपीडीए म्हणजेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत पुणे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाहरुखच्याविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

शाहरुखच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये जीवघेणी हत्यारे बाळगणे, दुखापत करणे, दंगा करणे, लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. त्याच्या दहशतीमुळे कोणीही त्याच्याविरोधात तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले.

त्यांच्या आदेशानुसार वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नूरमहंमद शेख, फौजदार व्ही. व्ही. पाटील आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे @ ७.६

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरातील थंडीचा मुक्काम वाढतच चालला असून, शुक्रवारी यंदाच्या हंगामातील नीचांकी ७.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या अनेक भागांतही थंडीचा कडाका वाढला असून, राज्यातील नीचांकी ५.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. पुढील दोन दिवसांत गारठा कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महावितरण’चा शॉक १४ लाख रुपयांचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

घरातील इलेक्ट्रिक उपकरणांची संख्या वाढली की लाइट बील जास्त येते अशी चर्चा नेहमीच होत असते. पण, छोट्याश्याच घरात नेहमीच्याच उपकरणांचे आणि दैनंदिन वापराचे पाच महिन्यांचे एकत्रित १४ लाखांचे बिल काळेवाडी येथील एका कुटुंबाला 'महावितरण'ने पाठविले आहे. तसेच हे बिल न भरल्याने 'महावितरण'कडून वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

काळेवाडीमध्ये राहणारे पांडुरंग गाडे यांना हा शॉक बसला आहे. महावितरणाच्या चुकीमुळे गेल्या महिनाभरापासून हे कुटुंब अंधारात जीवन जगत आहे. त्यांना १४ लाख ४२ हजार रुपये बिल आले आहे. हे बिल ते भरू न शकल्यामुळे महावितरणाने कोणतीही नोटीस न देता वीजही कापली आहे.

जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांचे हे बिल असून न भरल्याने महावितरणने नोटीस न देता गाडे यांच्या घरातील वीज कापली. मीटर पांडुरंग गाडे यांच्या नावावर आहे. त्यांचा मुलगा अमोल गाडे म्हणाले, की 'आमचे बिल नेहमी ९०० रुपयांपर्यंत येत होते. जुलै महिन्यापासून अचानक लाखांपर्यंत बिल यायला लागले. याबद्दल आम्ही वारंवार तक्रार देखील केली. वाढीव मोठ्या रक्कमेच्या बिलाबाबत चौकशी पण केली. मात्र, कोणतीही नोटीस न देता आमच्या घरातली वीज कापण्यात आली. त्यामुळे आमचे जीवन विस्कळीत झाले आहे. वीज नसल्यामुळे पाणी येत नाही. मुलांचा अभ्यास पण थांबला आहे.'या विषयी 'महावितरण'चे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत म्हणाले की, 'आम्ही वरिष्ठांशी बोलून तोडगा लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहिते दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षकास जीवे मारण्याची धमकी देऊन २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दाम्पत्याची शुक्रवारी कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या आरोपींनी इतरही तपास अधिकाऱ्यांना मेसेज पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.

चंद्रकांत दिनकर मोहिते आणि पत्नी संगीता चंद्रकांत मोहिते (दोघेही रा. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर खडकी पोलिस ठाण्यात खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांनी तक्रार दिली आहे. घोडके हे केंद्रीय अन्वेषण विभागाशी (सीबीआय) संलग्न आहेत. ते आणि त्यांचे सहकारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपासात सीबीआयला मदत करत आहेत. २ डिसेंबर रोजी घोडके यांच्या मोबाइलवर मेसेज आला होता. त्यामध्ये डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास थांबवावा असे सांगण्यात आले होते. तपास न थांबवल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. पाठविलेल्या मेसेजमध्ये आत्तापर्यंत १५ खून केल्याचे सांगून धमकी देण्यात आली होती. घोडके यांच्या दोन सहकारी अधिकाऱ्यांनाही अशाचा स्वरूपाचा मेसेज पाठविल्याचे समोर आले आहे. या दोघांना कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांची कोठडी संपल्यानंतर कोर्टाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘अॅप’चे लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहवोत्सवानिमित्त सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पक्षाचा दबदबा वाढावा, या साठी पक्षातर्फे तयार करण्यात आलेल्या मोबाइल अॅपचे लोकार्पण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

या अॅप्लिकेशनच्या निर्मितीची जबाबदारी पिंपरी चिंचवडला देण्यात आली होती. अॅपनिर्मितीत पिंपरी-चिंचवडचे ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते आझम पानसरे यांनी पुढाकार घेतला. पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या सहकार्याने झीशान सय्यद, संजीवनी पांडे आणि असिफ शेख यांनी या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे.

हे अ‍ॅप्लीकेशन खान्देश, मराठवाडा, विदर्भ, कोकण, देशनिहाय तसेच, मुंबई आणि पुणे अशा विभागातून कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम करणार आहे. तेथील लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी केलेली विकास कामे एका क्लिकवर सर्वांपर्यंत पोहचवण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या कित्येक वर्षात केलेली विकासकामे, विविध क्षेत्रात राबविलेल्या योजनांचा तपशीलही नव्या पिढीपर्यंत या अ‍ॅप्लिकेशनद्वारे पोहचवण्यात येणार आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनधारकांनी हे अॅप्लिकेशन प्ले स्टोअरमध्ये जाऊन mi rashtrwadi असे टाइप करावे आणि पुढील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी अनुदानात पुणे अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) उलाढालीच्या मर्यादेत राज्य सरकारने बदल केल्यानंतर त्यापोटी मिळणाऱ्या अनुदानापोटी पाच महिन्यांत पुणे महापालिकेला सर्वाधिक ४०६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही ३३२ कोटी रुपयांची आर्थिक रसद मिळाली आहे. तर, जेमतेम पाच कोटी रुपयांचे नीचांकी अनुदान परभणी आणि लातूर महापालिकांना प्राप्त झाले आहे.

एलबीटी बंद झाल्याने पालिकेची आर्थिक स्थिती ढासळेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे, गेल्या दोन वर्षांत महापालिकांना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाच्या सरासरीवर उर्वरित कालावधीसाठी अनुदान देण्याचे सरकारने निश्चित केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या दोन आर्थिक वर्षांत एलबीटीतून एक हजार कोटींपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त केले. सरकारच्या अनुदान वाटपात दोन्ही महापालिकांना त्याचा फायदा झाल्याचे दिसून येत असून, ३५ टक्के अनुदान पुणे-पिंपरीच्या वाट्याला आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर नाशिक, ठाणे आणि नागपूर या महापालिकांना शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान मिळाले आहे. या पाच महापालिका वगळता उर्वरित सर्व महापालिकांचे अनुदान शंभर कोटींपेक्षा कमीच आहे.

सरकारच्या अनुदानाप्रमाणेच एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत एलबीटीतून मिळालेले सुमारे चारशे कोटी रुपयांचे उत्पन्न, ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दर महिन्याला मिळणारे सरासरी ३५ ते ४० कोटी रुपये, मुद्रांक शुल्क अधिभार आणि अभय योजनेतून प्राप्त झालेले सरासरी १५ ते २० कोटींचे उत्पन्न, यामुळे पुणे महापालिकेचे एलबीटीचे उत्पन्न हजार कोटींच्या जवळपास पोहोचले आहे. आर्थिक वर्षातील आणखी तीन महिने बाकी असल्याने गेल्यावर्षीचा बाराशे कोटी रुपयांचा टप्पाही महापालिकेतर्फे ओलांडला जाईल, अशी चिन्हे दिसून येत आहेत.

...................

अनुदानासाठी ४ हजार कोटींची तरतूद

आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च या अखेरच्या तीन महिन्यांसाठी एलबीटी अनुदानापोटी सरकारने नागपूर अधिवेशनात साडेबाराशे कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या आहेत. त्यातून, सर्व महापालिकांना उर्वरित अनुदान दिले जाईल. केंद्र सरकारचे वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ शकले नसल्याने पुढील आर्थिक वर्षामध्येही सरकारला पालिकांच्या अनुदानासाठी सुमारे साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

......................

राज्यातील प्रमुख महापालिकांना प्राप्त अनुदान

(कोटी रुपयांत ऑगस्ट ते डिसेंबर २०१५ पर्यंत)

पुणे ४०६.९५

पिंपरी-चिंचवड ३३२.४५

नाशिक २२९.२

ठाणे १७८.६०

नागपूर १५४.९५

भिवंडी-निजामपूर ७३.३०

औरंगाबाद ५७.८०

कल्याण-डोंबिवली ५३.६०

नवी मुंबई ३८.७५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images