Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विनापरवाना पार्टीवर गुन्हेदाखलचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

​नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला विनापरवाना पार्टी करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात परिमंडळनिहाय पथके तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ​भरमसाठ शुल्क आकारून विनापरवाना पार्ट्यांचे आयोजन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात विविध हॉटेल्स, लॉन्सवर पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. या पार्ट्यांमध्ये विनापरवाना मद्यविक्री होणार नाही. अंमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस मुख्यालयाचे उपायुक्त मकरंद रानडे यांनी दिली. हॉटेल व्यवस्थापनांनी १८ वर्षांखालील मुलांना मद्यविक्री होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी मुलांची ओळखपत्रे तपासण्यात यावीत, असे सांगण्यात आले आहे. ध्वनी प्रदूषणाची पातळी ओंलाडली जाणार नाही, याकडे लक्ष देऊन नियमभंग झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वृद्ध, महिला, मुली, लहान मुले यांना पार्ट्यांमध्ये त्रास होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी हॉटेल चालक, मालक यांनी लक्ष द्यावे, तपासणी पथकांच्या नजरेत काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांनी तत्काळ त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावे. या नियमांबाबत पोलिस ठाण्याच्या स्तरावर हॉटेल चालक, मालकांच्या बैठका घेऊन त्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, असे सर्व पोलिस ठाण्यांना आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुटीच्या काळातही वीजबिल केंद्रे सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वीजग्राहकांना वीजबील आणि थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, या साठी २४ ते २७ डिसेंबर या कालावधीत सार्वजनिक सुट्या असल्या, तरीही महावितरणचे आणि इतर अधिकृत वीजबील भरणा केंद्रे सुरूच राहणार आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राजगुरूनगर, मुळशी आणि मंचर विभागातील वीजग्राहकांना वीजबिलाचा आणि थकबाकीचा भरणा सार्वजनिक सुटीच्या दिवशीही केंद्रांमध्ये कार्यालयीन वेळेत करता येणार आहे. वीजबील भरण्याची मुदत संपल्यानंतर दंडाच्या रकमेसह वीजबील ऑनलाइन भरणाची सोय महावितरणने www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुदतीनंतर ऑनलाइन वीजबिलांचा भरणा करणाऱ्या ग्राहकांनी देयकाची पावती महावितरणच्या संबंधित कार्यालयात दाखवावी आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनामदार कृतज्ञता पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी' व 'प्रबोधन माध्यम'तर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींना पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांचे यंदाचे सातवे वर्ष आहे.

यंदा 'मिशन फॉर ट्रास्फॉर्मेशन ऑफ रुरल एरिया' ('मित्र') संस्थेचे प्रमुख अनंत अभंग, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, जलबिरादरीचे संघटक सुनील जोशी, आयुर्वेदतज्ज्ञ व वृक्षप्रेमी डॉ. मंदार अक्कलकोटकर यांना 'पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येईल, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष दीपक बिडकर यांनी दिली. अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य. डॉ. किरण भिसे आणि हाजी गुलाम महमंद आझम एज्युकेशन ट्रस्टच्या कर्मचारी जयश्री पवार यांना 'पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

येत्या सोमवारी (२८ डिसेंबर) सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. आझम कॅम्पसच्या असेंब्ली हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सल्या चेप्याचा ससूनमध्ये मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कराड येथे संजय पाटील यांच्या खुनातील मुख्य सुत्रधार कुख्यात गुंड सल्या चेप्या ऊर्फ सलीम महंमद शेख (वय ४२, रा. शिंदे गल्ली, कराड) याचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. ऑगस्ट २०१३मध्ये सल्याच्या पाठीच्या मणक्यात गोळी लागली होती. तेव्हापासून त्याला अर्धांगवायू झाला होता.

सल्या चेप्याने वैमनस्यातून महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील याचा खून केला होता. या प्रकरणी सल्या चेप्याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करत असताना त्याच्यावर आणि साथीदारावर ३० ऑगस्ट २०१३ रोजी कोर्टाच्या आवारातच गोळीबार झाला होता. त्यामध्ये एक गोळी सल्याच्या मनक्यात घुसली होती. तेव्हापासून तो जायबंदी झाला होता. २० जुलै २०१५ रोजी कराडमधील गुरुवार पेठेत बबलू उर्फ उमेश भीमराव माने याचा सल्या आणि साथीदारांनी खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. सल्यासह त्याच्या टोळीवर सातारा पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. नोव्हेंबर २०१५पासून तो येरवडा जेलमध्ये होता.

मणक्याच्या आजारपणामुळे त्याची मान आणि पाठ अवघडली होती. येरवडा जेलमध्ये जमिनीवर झोपून राहिल्याने त्याला मणक्याचा त्रास सुरू झाला. हा त्रास वाढल्यामुळे त्याला कोर्टाच्या परवानगीने २४ नोव्हेंबरला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्याची प्रकृती जास्तच खालवली आणि सकाळी सव्वाअकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. सल्यावर सातारा, सांगली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये ३०पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये अपहरण, खुनाचा प्रयत्न, खून, दरोडा, मारामारी, खंडणी आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक कर्मचारी अद्यापही मानधनाविना

$
0
0

पुणेः विधानसभेच्या निवडणुका होऊन सुमारे दीड वर्षे होत आले, तरी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज करण्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र अद्याप मानधन मिळू शकलेले नाही. संबंधित कर्मचाऱ्यांचे मानधन मार्च २०१६ पर्यंत मिळणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघामध्ये सात हजार मतदान केंद्रांवर विविध कामांसाठी सुमारे ४० हजार कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामध्ये वर्ग एक ते वर्ग चारपर्यंतच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सुमारे दीड वर्षे होत आली, तरी या कर्मचाऱ्यांना मानधन मिळू शकलेले नाही. या कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे बेसिक वेतन आणि ग्रेड पे एवढी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणे अत्यावश्यक असताना, या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यामधील ४० हजार कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काम केले. या कर्मचाऱ्यांना रात्री उश‌िरापर्यंत काम करावे लागते होते. संबंधित कर्मचाऱ्यांकडून मानधन देण्याची मागणी करण्यात येत आहे.

'लोकसभा निवडणुकीचे मानधन मिळण्याही विलंब लागला होता. निवडणुकीच्या कामकाजासाठी लागणारी स्टेशनरी आणि अन्य बाबींचा खर्च सुरुवातीला देण्यात येतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाते. विधानसभा निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ससूनला सोफोशची १५ लाखांची देणगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पेशंटचे हृदय अनियमितपणे कार्यरत राहत असल्याने ठोकेदेखील अनियंत्रित होतात. त्या वेळी पेशंटचा जीव वाचविण्यासाठी डिफ्रिबीलेटरच्या यंत्राचा वापर करून पेशंटला जीवदान दिले जाते. या प्रकारच्या पंधरा लाखांच्या नऊ डिफ्रिबीलेटर मशीन सोफोश संस्थेने ससून हॉस्पिटलला दिल्या आहेत.

तातडीचा विभाग, तसेच अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटरमध्ये या यंत्रांचा प्रामुख्याने वापर केला जातो. या विभागात हे मशीन असणे आवश्यक असते. त्यामुळे सोफोश संस्थेने १५ लाख रुपये किमतीच्या नऊ डिफ्रिबीलेटर मशीन ससून हॉस्पिटलला देणगी म्हणून दिल्या आहेत. सोफोशच्या उपाध्यक्षा डॉ. कविता करीर, निर्मला लाहोटी, अमला फाटक, रतन भागवत, ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. हरीष टाटिया, डॉ. सोनाली साळवी आदी उपस्थित होते.

'ससूनच्या आधुनिकीकरणाचे काम सध्या सुरू आहे. अकरा मजली इमारतीचे कामदेखील प्रगतीपथावर सुरू आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांची सध्या ससून हॉस्पिटलला गरज आहे. त्याचा गरीब पेशंटनाच फायदा होईल. त्यामुळे विविध कॉर्पोरेट कंपन्यांसह दानशूर व्यक्तींना ससूनला मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा,' असे आवाहन अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक विभागाच्या ६५० जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने दोन्ही शहरांना स्वतंत्र वाहतूक उपायुक्त देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, सद्य परिस्थितीत वाहतूक विभागासाठी मंजूर असलेल्या १६५० कर्मचाऱ्यांपैकी केवळ एक हजार कर्मचारी उपलब्ध आहेत. शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र उपायुक्त नेमण्याबरोबरच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी दोन स्वतंत्र वाहतूक उपायुक्तांची पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते. या घोषणेनुसार भविष्यात दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र उपायुक्त नेमण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांची विभागणी केली जाईल. सध्या वाहतूक विभागासाठी १६५० कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात एक हजार कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची विभागणी झाल्यास, ती या एक हजार कर्मचाऱ्यातूनच केली जाईल. त्यामुळे वाहतूक यंत्रणेवर आतापेक्षाही जास्त भार वाढेल. त्यामुळे सक्षम वाहतूक विभागासाठी रिक्त ६५० पदे प्राधान्याने भरण्याची गरज असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

पुणे शहरातील वाहनांची संख्या ऑक्टोबर अखेरपर्यंत २९ लाख ८३ हजार ७४९, तर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची संख्या १३ लाख ६१ हजार १७४ होती. एकूण वाहन संख्या आणि उपलब्ध वाहतूक कर्मचारी यांचे गुणोत्तर पाहिल्यास, ४,३०० वाहनांमागे एक कर्मचारी कार्यरत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सिग्नलची संख्या ३२५ आहे. तर, वाहनांची कायम वर्दळ असलेल्या किंवा ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यक आहे, असे दीड हजार चौक आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्तांनी शंभर कर्मचारी वाहतूक विभागासाठी नेमले आहेत. येत्या काळातही कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी 'मटा'ला सांगितले.

दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र वाहतूक उपायुक्त नेमण्यात येणार, म्हणजे नक्कीच कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविली जाईल. त्याचा वाहतूक नियंत्रणासाठी फायदा होईल.

- सारंग आवाड, उपायुक्त, वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सल्या चेप्याचा ससूनमध्ये मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कराड येथे संजय पाटील यांच्या खुनातील मुख्य सुत्रधार कुख्यात गुंड सल्या चेप्या ऊर्फ सलीम महंमद शेख (वय ४२, रा. शिंदे गल्ली, कराड) याचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. ऑगस्ट २०१३मध्ये सल्याच्या पाठीच्या मणक्यात गोळी लागली होती. तेव्हापासून त्याला अर्धांगवायू झाला होता.

सल्या चेप्याने वैमनस्यातून महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील याचा खून केला होता. या प्रकरणी सल्या चेप्याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करत असताना त्याच्यावर आणि साथीदारावर ३० ऑगस्ट २०१३ रोजी कोर्टाच्या आवारातच गोळीबार झाला होता. त्यामध्ये एक गोळी सल्याच्या मनक्यात घुसली होती. तेव्हापासून तो जायबंदी झाला होता.

२० जुलै २०१५ रोजी कराडमधील गुरुवार पेठेत बबलू उर्फ उमेश भीमराव माने याचा सल्या आणि साथीदारांनी खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. सल्यासह त्याच्या टोळीवर सातारा पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. नोव्हेंबर २०१५पासून तो येरवडा जेलमध्ये होता.

मणक्याच्या आजारपणामुळे त्याची मान आणि पाठ अवघडली होती. येरवडा जेलमध्ये जमिनीवर झोपून राहिल्याने त्याला मणक्याचा त्रास सुरू झाला. त्रास वाढल्यामुळे त्याला कोर्टाच्या परवानगीने २४ नोव्हेंबरला ससूनमध्ये दाखल केले होते. बुधवारी पहाटे त्याची प्रकृती जास्तच खालवली आणि सकाळी सव्वाअकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. सल्यावर सातारा, सांगली जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांमध्ये ३०पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये अपहरण, खुनाचा प्रयत्न, खून, दरोडा, मारामारी, खंडणी आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसावर गोळी झाडणारा तरुण अखेर आला शरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपटे रोडवर भरदिवसा पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार झालेल्या घटनेतील १९ वर्षांचा महाविद्यालयीन तरुण डेक्कन पोलिसांसमोर शरण आला. पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार विदर्भात पळाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

परभणी येथील देशमुख आणि मेहमूद टोळीतील वादाचे पडसाद पुण्यात उमटले. काँग्रेस भवनासमोरील कबुतर बाजाराजवळ दुचाकीवरून चाललेल्या तरुणाच्या कमरेला पिस्तूल पाहून त्याला पकडण्यासाठी धावलेले पोलिस कर्मचारी मयूर भोकरे यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेने पोलिस दलही हादरले होते. भोकरे यांनी मुख्य आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपण परभणी येथील असून लाचलुचपत प्रतिबंधक समितीचे सदस्य असल्याचे त्याने सांगितले होते. त्या आधारे पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांनी परभणी पोलिसांशी संपर्क साधला होता. आरोपींचे 'सीसीटीव्ही' फुटेज परभणी पोलिसांना दाखवण्यात आले. फुटेजमधील व्यक्ती ही त्यांच्याकडील रेकॉर्डवरचा गुन्हेगार देवेंद्र देशमुख असल्याची माहिती देण्यात आली होती.

भोकरे यांनी आरोपींच्या दुचाकीचा नंबर पाहिला होता. ती दुचाकी कर्वेनगर येथील व्यक्तीच्या पत्त्यावर नोंदवलेली होती. या व्यक्तीकडे चौकशी केल्यानंतर ती दुचाकी त्यांचा भाचा अक्षय अनिल सोनी (वय १९, रा. आनंद कॉलनी, मूळ-रा. परभणी) याच्याकडे असल्याचे समजले होते. दरम्यान, सोनीच्या वडिलांचा परभणीत व्यवसाय आहे. पूर्वी परभणी येथे आणि सध्या खडक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांचा अक्षयच्या वडिलांशी परिचय होता. या घटनेची माहिती अक्षयच्या वडिलांना समजल्यावर त्यांनी मुगळीकर यांच्याशी संपर्क साधला.

भोकरे यांचे आयुक्तांकडून कौतुक

जिवाची पर्वा न करता कमरेला पिस्तूल असलेल्या संशयिताचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोकरे यांचा सत्कार पोलिस आयुक्त के. के. पाठक आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांनी केला. या वेळी पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील उपस्थित होते. भोकरे यांनी दाखवलेले धाडस गौरवास्पद असून पुणे पोलिसांना त्याचा अभिमान आहे, अशा शब्दांत पाठक यांनी भोकरे आणि त्यांचा मित्र संदेश खडके यांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी निवडणुकांचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात नवा विद्यापीठ कायदा लागू झाल्यावर विद्यापीठे आणि कॉलेजांमधून विद्यार्थ्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठी आवश्यक तरतुदी कायद्याच्या मसुद्यात करण्यात आल्या आहेत. या कायद्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवस्थापन परिषदा आणि अभ्यास मंडळांवरही प्रतिनिधित्व देण्याचे पाऊलही उचलण्यात आल्याचे मसुद्यातून स्पष्ट होत आहे.

राज्यातील अकृषक विद्यापीठांसाठीचा नवा विद्यापीठ कायदा अधिकाधिक विद्यार्थिभिमुख करण्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वीच केली होती. राज्यभरातील विद्यापीठांमधून झालेल्या चर्चांमधूनही त्या विषयीची स्पष्टता करण्यात आली होती. या चर्चांचे प्रतिबिंब कायद्याच्या मसुद्यात विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींमधून उमटल्याचे दिसून येत आहे.

या मसुद्यानुसार, विद्यापीठांच्या व्यवस्थापन परिषदांवर या पुढे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष हा एक निमंत्रित सदस्य असेल. या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसाठी निमंत्रित केल्यास, त्याला बैठकीला उपस्थित राहता येईल. विद्यार्थ्यांचा विकास, कल्याण आणि तक्रारी यांच्याशी संबंधित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी या प्रतिनिधीला दर तीन महिन्यातून किमान एकदा निमंत्रित करण्याचे निर्देशही या मसुद्यामधून देण्यात आले आहेत. विविध विषयांच्या अभ्यास मंडळांवरही विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्त्व देण्याचे निर्देश नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यात देण्यात आले आहेत. प्रत्येक विषयासाठी किंवा विषयांच्या गटासाठी असणाऱ्या या अभ्यास मंडळामध्ये आधीच्या वर्षी पदवी परीक्षेतील आणि अंतिम वर्ष पदव्युत्तर परीक्षेतील संबंधित विषयातील पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला निमंत्रित सदस्य म्हणून संधी दिली जाणार आहे. एक वर्षासाठी मिळणाऱ्या या संधीच्या आधारे त्या विषयाचा किंवा विषयाच्या गटाचा अभ्यासक्रम तयार करणे, त्यात सुधारणा करणे, औद्योगिक क्षेत्राच्या अपेक्षांचा विचार करून त्यानुसार काही सूचना असल्यास त्या सुचविण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या विद्यार्थी विकास कक्ष आणि विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी या कायद्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

आचारसंहिता व तक्रार निवारण यंत्रणाही

विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सभापती आणि सचिवांसह इतर प्रतिनिधींसाठी विद्यापीठाच्या विभागांमधील विद्यार्थी मतदान करतील. प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थी परिषदेसाठी कॉलेज पातळीवरून मतदानाद्वारे सभापती, सचिव, महिला प्रतिनिधी, आरक्षित गटातील प्रतिनिधींची निवड होईल. विद्यापीठ विद्यार्थी संघ आणि सर्व कॉलेजांमधील विद्यार्थी परिषदांचे प्रतिनिधींच्या माध्यमातून विद्यापीठाची विद्यार्थी परिषद तयार केली जाईल. त्यासाठी होणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून परिषदेचे अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, आरक्षित गटांमधील प्रतिनिधी निवडले जातील.

विद्यार्थी परिषदांशी संबंधित विद्यार्थी हे कोणत्याही राजकीय चळवळींमध्ये भाग घेणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या निवडणुकीसाठी हजेरीपटावरील विद्यार्थीच सहभागी होऊ शकतील. उमेदवार आणि निवडणूक प्रशासकांसाठी आचारसंहिता व तक्रार निवारण यंत्रणाही उभारण्यात येणार असल्याचे कायद्याच्या मसुद्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वतंत्र विद्यार्थी परिषद

नव्या विद्यापीठ कायद्याद्वारे प्रत्येक विद्यापीठात आणि प्रत्येक कॉलेजमध्ये स्वतंत्र विद्यार्थी परिषदा अस्तित्त्वात येणार आहेत. विद्यापीठ विद्यार्थी संघ हा विद्यापीठाच्या विभागांमधील विद्यार्थ्यांसाठी असेल. प्रत्येक कॉलेज पातळीवर स्वतंत्र विद्यार्थी परिषद असेल. दोन्ही परिषदांच्या आधारे विद्यापीठाची एक स्वतंत्र विद्यार्थी परिषद अस्तित्वात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएस’शी संबंध नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मालवणीतून गायब झालेल्या तीन तरुणांपैकी अब्दुल वाजीद शेख (वय २५) या तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी कात्रज भागातून ताब्यात घेतले. इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेशी थेट संबंध आला नसल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याने त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मात्र, त्याचे दोन साथीदार चेन्नई येथून त्याला सोडून गायब झाले असून, त्यांच्या शोध तपास यंत्रणा घेत असल्याचे पुणे एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले.

मालाडच्या मालवणी परिसरातून १५ डिसेंबर रोजी अब्दुल शेख, नूर शेख आणि मोहसीन सय्यद हे तीन तरुण बेपत्ता झाले होते. एटीएसचे प्रमुख विवेक फणसाळकर यांना बातमीदाराकडून शेखची माहिती मिळाली. बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एटीएसच्या पथकातील पोलिस निरीक्षक सुनिल तांबे, बापू कुतवळ आणि अरविंद गोकुळे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचा आयएसशी थेट संबंध नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

अब्दुल शेखने १८ हजार रुपये घेऊन तिघेजण कर्नाटक, हैदराबाद, चेन्नई येथे गेले. त्या ठिकाणी एका लॉजमध्ये राहत असताना टीव्हीवर मालवणीमधील तीन तरुण आयएसच्या संपर्कात आल्याच्या बातम्या येत होत्या. ती पाहिल्यानंतर अब्दुल याने परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्या तयारीत असताना मोहसीन व नूर त्याला सोडून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात गुलाबी थंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कडाक्याच्या थंडीमुळे विदर्भ वगळता पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागाला बुधवारी हुडहुडी भरली. पुण्यात ९.८ अंश सेल्सिअस इतक्या यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली. नाशिक येथे ६ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे ११.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहून तापामनात घट होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून राज्याकडे वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढतो. उत्तरेकडील जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. तर गुजरातचा दक्षिण भाग आणि कोकणच्या उत्तर भागासह उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागातही थंडीच्या लाटेसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. किमान तापमानात सरासरीपेक्षा पाच अंशांनी घट झाल्यास त्या भागात थंडीची लाट आहे, असे मानण्यात येते. राज्यातही सध्या हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यातही तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढली आहे.

बुधवारी राज्यातील सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद नाशिक येथे (६ अंश सेल्सिअस) झाली. पुण्यात ९.८, जळगाव येथे १०, नांदेड येथे १०, सांताक्रूझ येथे ११.६ तर महाबळेश्वर येथे १४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुण्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सातत्याने तापमानात घट होत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. बोचरे वारे वाहत असल्यामुळे पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. परिणामी शाल, स्वेटर, जर्किन, टोप्या अशा जामानिमा करून बाहेर पडणारे पुणेकर सध्या पहायला मिळत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी शेकोट्या पेटविण्यासही सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस थंडी मुक्कामी असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांनाही थंडीपासून बचावासाठी आयुधे सज्ज करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारही धर्मग्रंथांत माणुसकीचे धडे

$
0
0

मुंबईत राहणाऱ्या १३ वर्षीय मरियम सिद्दिकी या विद्यार्थिनीने 'इस्कॉन'तर्फे देशपातळीवर आयोजिण्यात आलेली भगवद्गीता स्पर्धा जिंकली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिचे कौतुक केले. तिच्या या प्रवासाबद्दल कुलदीप जाधव यांनी तिच्याशी केलेली बातचीत...

भगवद्गीता स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा कशी निर्माण झाली, स्पर्धेसाठी काय तयारी केली होतीस ?

मरियम : मी सहा वर्षांची असल्यापासून माझ्या वडिलांनी मला सर्व धर्मग्रंथांबाबत माहिती देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे गीतेबाबत मला प्राथमिक माहिती होती. आमच्या शाळेतून दरवर्षी या स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात. यंदा मी स्पर्धेत सहभागी होण्याबाबत वडिलांना विचारले. त्यावर ते मला म्हणाले, 'जिंकण्यासाठी गीता वाचू नकोस; तर दररोज जे वाचशील त्याचा अर्थ मला सांगायचा व ते आचरणात आणायचे.' या एका अटीवर त्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली. स्पर्धेत सहभाग नोंदविल्यापासून एक महिना नियमितपणे गीता वाचन सुरू होते. काही अडचण असेल, एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नसेल, तर त्यांनी मला मदत केली.

गीतेतून काय शिकलीस ?

मरियम : गीतेतून मला जिहाद शिकायला मिळाला. जिहाद म्हणजे लढाई. अशी लढाई की, जी दुसऱ्या कोणत्याही माणसाशी नसून स्वतःशीच असते. स्वतःमधील वाइट गोष्टींविरोधात लढले पाहिजे, हे गीता शिकवते. कोणत्याही माणसाचे चांगले किंवा वाइट कृत्य हे त्याच्या धर्माशी जोडले जाते. त्यामुळे स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करणे महत्त्वाचे असते.

भगवद्गीता स्पर्धेत विजयी झालीस, म्हणजे तू संस्कृत भाषाही शिकली आहेस का ?

मरियम : मला संस्कृत भाषा येत नाही. पण, मला संस्कृत शिकायचे आहे. माझे वडील म्हणतात, 'संस्कृत ही ज्ञानाची भाषा आहे. तर, उर्दू ही नम्रतेची भाषा आहे. माझे वडील माझ्यासाठी संस्कृतचे क्लासेस शोधत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे तू गीता, कुराण, बायबल व गुरुग्रंथसाहीब या धर्मग्रंथांचे वाचन सुरू केले आहे. या चारही ग्रंथात तुला काय साम्य दिसते ?

मरियम : या चारही धर्मग्रंथात माणुसकीचे धडे दिले आहेत. प्रत्येक ग्रंथातील संदेश एकच संदेश आहे. केवळ त्याची भाषा, पद्धत वेगळी आहे. कोणत्याही ग्रंथात अमूक एखाद्या धर्माविषयी किंवा त्या धर्माच्या माणसांविषयी कटू संदेश दिलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धर्माच्या नावाखालील राजाश्रय धोकादायक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शीना बोरा हत्या प्रकरणी तपासासाठी आठ पथके आणि डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी चारच अधिकारी हा विरोधाभास चकीत करणारा आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्यालाच धमकी देण्याचे धाडस केले जात असल्यास सर्वसामान्यांच्या जीवाचे काय, असा सवाल डॉ. हमीद दाभोलकर यांनी गुरुवारी उपस्थित केला.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास न थांबवल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या कराडच्या चंद्रकांत दिनकर मोहिते आणि त्याची पत्नी संगीता यांना अटक करून कोर्टाने पोलिस कोठडी देण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर दाभोलकर बोलत होते. 'धर्माच्या नावाखाली दिला जाणारा राजाश्रय गंभीर बाब असून, समाजासाठी धोकादायक आहे,' असे दाभोलकर यांनी सांगितले. 'संशयित म्हणून पकडलेल्या संस्थांना सरकारमधील काही घटक पाठबळ देतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह झालेल्या भेटीदरम्यान ही बाब त्यांच्या कानावर घालण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी असे न होण्याबाबत सूचना देणार असल्याचे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. अनेकदा प्रयत्न करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वेळी मिळालेली नाही,' असेही ते म्हणाले.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या तपासात गांभीर्य नसल्याने २८ महिन्यांनंतरही मारेकऱ्यांचा शोध घेण्यात तपास यंत्रणांना यश आलेली नाही. सरकारसाठी ही बाब लज्जास्पद आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द दारूचा नाही; दुधाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्याच्या नावाखाली मद्यसंस्कृतीकडे आकर्षित झालेल्या तरुणाईला परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेकवाहिनी यांच्यातर्फे २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान 'व्यसनविरोधी निर्धार सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'चला व्यसनाला बदनाम करूया' या मोहिमेंतर्गत 'दारू नको दूध प्या' हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी ही माहिती दिली. समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी आदी या वेळी उपस्थित होते. या सप्ताहाच्या माध्यमातून या अंतर्गत ३१ डिसेंबर रोजी दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे धोरण थांबवण्यासाठी राज्यभरातील जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. राज्यभरात व्यसनविरोधी युवा निर्धार मेळावे घेऊन तरुणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे. ठिकठिकाणी दुधाचे वाटपही करण्यात येणार आहे.

'नववर्षाच्या नावाखाली व्यसनाचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे तरुण पिढी दारूच्या आहारी जात आहे. मात्र, सरकार महसूल वाढवण्यासाठी व्यसनवाढीला प्रोत्साहनच देत आहे. त्यामुळे व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्यासह व्यसनविरोधी धोरण सरकारने जाहीर करण्यासाठीचा पाठपुरावा या सप्ताहादरम्यान केला जाणार आहे,' असे दाभोलकर यांनी सांगितले.

..

'मदर तेरेसांच्या कामाचा अपमान'

संतपदाची कसोटी असलेल्या दुसऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे मदर तेरेसा यांना संतपद मिळणे हा त्यांनी केलेल्या मानवतावादी कामाचा अपमान असल्याची टीका समितीतर्फे करण्यात आली. चमत्काराची अट ठेवणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात असल्याने त्या विरोधात कृतिशील विरोध करणार असून, विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करण्यासाठी अंनिसचे पंचवीस लाख रुपयांचे आव्हान तेरेसा यांचा चमत्कार मान्य करणाऱ्या समितीने स्वीकारावे, असे अविनाश पाटील यांनी सांगितले. संतपदासाठी चमत्काराची अट हे मानवतावादी कामाचे अवमूल्यन असल्याने त्या विरोधात पोप फ्रान्सिस यांना पत्र आणि ई-मेल पाठवण्याची मोहीम राबवली जाणार आहे.
..

कोल्हापूरमध्ये युवा संकल्प मेळावा

गेल्याच आठवड्यात कोल्हापूरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून इंद्रजित व मेघा कुलकर्णी यांची हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, जात प्रथा मोडण्यासाठी अंनिसतर्फे २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील सायबर कॉलेजमध्ये युवा संकल्प मेळावा आयोजिण्यात आला आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रातही संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजून २२ लाख निराधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहर आणि जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना आधार कार्ड देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले असले तरी, प्रत्यक्षात त्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून दिलेली नाही. परिणामी, ३१ डिसेंबरपूर्वी शंभर टक्के आधार कार्ड देण्याचे उद्दिष्ट कागदावरच राहणार आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील २०११च्या जनगणनेनुसार ९४ लाख नागरिकांना आधार देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निर्धारित केले होते. त्यात आता बदल करून २०१५च्या जनगणनेप्रमाणे १ कोटी २ लाख नागरिकांना चालू वर्षअखेर आधार कार्ड देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ७९ लाख ८३ हजार आधार कार्डचे वाटप करण्यात आले आहे. अद्याप २२ लाख नागरिकांना आधार देण्याचे काम शिल्लक आहे. या नागरिकांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आधार कार्ड देण्याचे काम पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, त्यासाठी लागणारी आवश्यक आधार मशिन उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. हे काम तूर्त १८६ मशिन्सद्वारे करण्यात येत आहे. पुणे शहर व ग्रामीण भागासाठी वास्तविक तीनशे मशिन्सची आवश्यकता आहे. मात्र, ही मशिन अजूनही उपलब्ध करण्यात आलेली नाहीत.

दरम्यान, आधार कार्ड देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक आहेत. हे काम 'संग्राम' या संस्थेला देण्यात आले आहे. मात्र, 'संग्राम'बद्दल तक्रारी वाढल्याने त्यांच्याकडील हे काम काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आधार कार्ड वाटपामधील अडचणी आणखी वाढल्या आहेत. आधार कार्डचे मशिन ऑपरेटर तसेच प्रशिक्षित कर्मचारी याची वाणवा भासणार असून, हे काम कसे पूर्ण करायचे याची डोकेदुखी वाढली आहे. आधार कार्ड वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये प्राधान्याने आधार कार्ड देण्याचे काम सुरू असल्याचे उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार-गोकुळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूशिष्य परंपरेला रसिकांची दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुरूकुल परंपरेला आजही जपणाऱ्या, शिष्यांना विद्यादान करताना त्यांचे शिक्षण परिपूर्ण होईल याची काळजी घेणाऱ्या गुरूला शिष्यांकडून मिळालेल्या तितक्याच समर्पक मानवंदनेला रसिकांची दाद मिळाली. प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित संगीत समारोहाचा गुरुवारी जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशा झाला. गुरूशिष्य परंपरेचा दाखला देणाऱ्या या मैफलीने उपस्थितांना संगीताची आगळी सफर घडविली.

'नाद' संस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिरात येत्या शनिवारपर्यंत (दि. २६) हा संगीत समारोह आयोजिण्यात आला आहे. या मैफलीची सुरुवात खान यांच्या शिष्यांच्या सतारवादनाने झाली. शिष्यांनी सतारीवर राग भीमपलास, यमन, कलावती आणि किरवानी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रकाश कंदस्वामी आणि विघ्नेश्वरन यांनी तबल्यावर समर्पक साथसंगत केली.

उस्तादांच्या फ्रान्स येथील शिष्या सिल्व्हिया फॉर्मिकोनी यांनी खान यांच्या सांगीतिक प्रवासावर तयार केलेला 'जर्नी इन ड्रीम' हा माहितीपटही यावेळी दाखविण्यात आला. उस्तादांची जडणघडण, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची शिष्यपरंपरा, परदेशातील दौरे या गोष्टी माहितीपटातून उलगडल्या. मैफलीचा समारोप उस्तादांच्या मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि कोईमतूर येथील शिष्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याविष्काराने झाला. निवेदन सिद्धार्थ बेंद्रे आणि कुमार कारिगिसू यांनी केले.

'सतार हे एकमेव खेळणे हाती देऊन वडील आणि गुरू अब्दुल करीम खान यांनी मला घडविले. त्यांनी माझ्याकडून सतत सराव करून घेतला त्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकलो. कोणत्याही क्षेत्रात सराव तुम्हाला अधिक सरस बनवतो,' अशी भावना उस्ताद उस्मान खान यांनी यावेळी व्यक्त केली.

..

समारोहात आज

उस्ताद उस्मान खान यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित संगीत समारोहात आज शुक्रवारी (दि. २५) धारवाड घराण्याचे उस्ताद पै. अब्दुल करीम खान यांचे चिरंजीव आणि उस्ताद उस्मान खान यांचे धाकटे बंधू छोटे रहमत खान, शफिक खान आणि रफिक खान या तिघांच्या सतारवादनाची मैफल रंगणार आहे. अरविंदकुमार आझाद (तबला) त्यांना साथसंगत करणार आहेत. उत्तरार्धात वसुंधरा कोमकली यांची कन्या व शिष्या कलापिनी कोमकली यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. तळवलकर यांना मिरजकर पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांना यंदाचा 'तालविश्व उस्ताद मेहबूबखान साहेब मिरजकर पुरस्कार' जाहीर झाला आहे. 'तालविश्व'तर्फे येत्या रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित 'संगीत विरासत' या सांगीतिक मैफलीत तळवलकर यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

'तालविश्व'तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. संस्थेचे नवाझ मिरजकर आणि रिझवान मिरजकर या वेळी उपस्थित होते. तबलावादक उस्ताद मेहबूबखान साहेब मिरजकर आणि तबलावादक उस्ताद महम्मद हनीफखान साहेब मिरजकर यांच्या स्मरणार्थ 'तालविश्व'ने 'संगीत विरासत'चे आयोजन केले आहे. या निमित्ताने गुरूशिष्य परंपरेत संगीताचा वारसा जपणाऱ्या दोन पिढ्यांचे वादन रसिकांसमोर सादर होणार आहे. उस्ताद रशीद मुस्तफा थिरकवा आणि शरीक मुस्तफा थिरकवा (तबला), पंडित राजन कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी (सरोद) तसेच, पंडित सुरेश तळवलकर आणि सावनी तळवलकर (तबला) यांच्या एकत्रित सादरीकरणाचा यात समावेश असल्याची माहिती मिरजकर यांनी दिली. 'तालविश्व'च्या विद्यार्थ्यांचेही या वेळी सादरीकरण होणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेट सदस्यांच्या संख्येला कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नव्या विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील विद्यापीठांच्या अधिसभांमधील (सिनेट) सदस्य संख्येला कात्री लागणार आहे. प्रत्येक विद्यापीठामध्ये कुलपतींच्या अध्यक्षतेखाली किमान ७३ सदस्यांची सिनेट अस्तित्त्वात येणार आहे. या कायद्याद्वारे प्रथमच प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात कार्यरत संघटनेचा एक प्रतिनिधी सिनेटवर येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने, विद्यापीठांच्या कामकाजावर माध्यमांची करडी नजर राहणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.

नव्या विद्यापीठ कायद्याद्वारे सिनेट विसर्जित करून, त्या ऐवजी 'सोल' नावाची स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे विचाराधीन होता. मात्र, त्या विषयी राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञांनी घेतलेल्या आक्षेपानंतर नव्या विद्यापीठ कायद्यामध्ये सिनेटचे अस्तित्व कायमच ठेवण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. नव्या विद्यापीठ कायद्याविषयी राज्यभरातील विद्यापीठांमधून झालेल्या चर्चांमधूनही त्यांनी या आश्वासनाला दुजोरा दिला होता. त्याचवेळी सिनेटच्या सदस्य संख्येवर मर्यादा आणण्याचे संकेतही दिले होते. या सर्व बाबींचे प्रतिबिंब नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यामधून उमटले आहे.

नव्या कायद्याद्वारे सिनेटच्या सदस्य संख्येवर मर्यादा आणतानाच, आरक्षित गट, महिला आणि समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींनाही सिनेटमध्ये प्रतिनिधित्त्व मिळेल, अशा तरतुदी सरकारने केल्या आहेत. कुलपतींच्या अनुपस्थितीत कुलगुरू हे सिनेटचे अध्यक्षपद भूषवतील. प्रत्येक विद्यापीठात दर वर्षी सिनेटच्या दोन बैठका होणे कायद्याला अपेक्षित आहे. त्यापैकी एक बैठक ही वार्षिक बैठक असावी, अशा सूचना या कायद्याच्या मसुद्यामध्ये आहेत.

000

यांच्यासाठी होणार निवडणुका-

दहा- प्राचार्य (एक आरक्षित गटातील, एक महिला)

चार- संस्था व्यवस्थापनाचे प्रतिनिधी (किमान एक आळीपाळीने आरक्षित, एक महिला) - एक वा त्याहून अधिक कॉलेजे असणाऱ्या संस्थांबाबत व्यवस्थापनाचा केवळ प्रतिनिधी हा या गटात समाविष्ट होण्यास पात्र असेल.

दोन- विद्यार्थी (विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आणि सचिव)

दहा- अध्यापक (एक आरक्षित, एक महिला)

तीन- विद्यापीठ अध्यापक गटाचे प्रतिनिधी (एक महिला, एक आरक्षित)

दहा- नोंदणीकृत पदवीधर गटाचे प्रतिनिधी (एक आरक्षित गट, एक महिला)

...

हे येणार नामनिर्देशनाद्वारे

दहा - कुलपती नामनिर्देशित व्यक्ती (चार- कृषी, समाजकार्य, सहकारी चळवळ, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील, एक उद्योग, एक शिक्षणतज्ज्ञ, एक शास्त्रज्ञ, एक कला-क्रीडा, एक पर्यावरणाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेचा प्रतिनिधी, एक महिला विकास वा ज्येष्ठ नागरिक कल्याण वा प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत संघटनेचा प्रतिनिधी)

दोन - कुलगुरू नामनिर्देशित व्यक्ती (एक विद्यापीठ कर्मचारी, एक कॉलेज कर्मचारी)

दोन - विधानसभा सदस्य

दोन - विधानपरिषद सदस्य

एक - नगरपालिका- महापालिका सदस्य

एक - जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य

000

विद्यापीठाच्या सिनेटचे हे पदसिद्ध सदस्य

कुलपती (अध्यक्ष), कुलगुरू, प्र- कुलगुरू, अधिष्ठाते, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, वित्त व लेखा अधिकारी, विद्यापीठ उप-केंद्रांचे संचालक, उच्चशिक्षण संचालक वा त्यांचे नामनिर्देशित सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालक वा त्यांचे नामनिर्देशित सहसंचालक, विद्यापीठाचा ग्रंथपाल, विद्यार्थी विकास मंडळ संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ संचालक, कुलसचिव (सदस्य सचिव)

000

(कायद्यानुसार अस्तित्त्वात येणाऱ्या चार विद्याशाखांचे किमान चार अधिष्ठाते धरून सिनेट सदस्यांची ही संख्या ७३ होते. यामध्ये विद्यापीठ उपकेंद्रांचे संचालक यांची संख्या एकत्र करून, संबंधित विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची संख्या निश्चित होईल. )

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाट्यशास्त्र विभागांना राजाश्रयाची निकड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यातील विद्यापीठांमधील नाट्यशास्त्र विभागांचे काम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू आहे. या विभागांमधून तरुणांची ऊर्जा बाहेर पडते, अनेक कलाकार घडतात. हे कार्य सुरू राहण्यासाठी सरकारने धोरण आखून नाट्यशास्त्र विभागांना आपल्या छत्राखाली घ्यावे,' अशी सूचना ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी गुरुवारी केली.

शनिवारवाडा कला महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे, तबलावादक राजू जावळकर आणि श्री संत दर्शन मंडळाचे प्रमुख श्रीराम साठे यांना याप्रसंगी गौरविण्यात आले. महोत्सवाचे संयोजक आमदार विजय काळे, प्रमोद रानडे, प्रल्हाद तापकीर आदी या वेळी उपस्थित होते. ललित कला केंद व नाट्यशास्त्र विभागांचे काम ३०-४० वर्षांपासून सुरू आहे. काही विद्यापीठांमध्ये नव्याने नाट्यशास्त्र विभार सुरू झाले आहेत. या विभागांचे काम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असल्याने शिक्षण देण्यात मर्यादा येतात, असे सांगून आळेकर म्हणाले, की ' पुणे शहर विकासाच्या बाबतीत हाताबाहेर गेले आहे. शहर वसविण्याची संधी पानशेत पुरावेळी होती, पण सर्व राजकारण्यांनी ही संधी गमावली. शहर आता दुचाकी, चारचाकी व बिल्डरांच्या हातात गेले आहे.'

गाण्याचे सर्व प्रकार शिकले. नाटकात काम केले. घर सांभाळून कला जोपासता आली. कला सादर केली त्या शनिवारवाड्यावर सत्कार झाला, याचा आनंद वाटतो अशी भावना मराठे यांनी व्यक्त केली. उत्तरार्धात स्वरश्री संस्थेचा सुहाना सफर हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम रंगला. सूत्रसंचानल मंगेश वाघमारे यांनी केले.

..

असहिष्णू वादात आळेकरांची उडी

कलेसाठी विविध व्यासपीठे निर्माण होत आहेत. चित्रपट महोत्सव, संगीत महोत्सव यातून तरुणांच्या ऊर्जेला सकारात्मक वाट देण्याचे भान राजकीय मंडळींना आहे, अन्यथा ही ऊर्जा असहिष्णू झाली असती, असे भाकीत वर्तवित आळेकर यांनी सहिष्णू, असहिष्णू वादात उडी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images