Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बैठे काम देतेय पचनविकारांना निमंत्रण

$
0
0

पुणेः बदलती जीवनशैली, ताणतणाव, एकाच ठिकाणी सतत बसून काम करणे आणि फास्ट फूडचे सेवन यांमुळे अन्नपचनाच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन मधुमेह, लठ्ठपणाबरोबर पचनाच्या विकारांनी नव्या पिढीला गाठले आहे. त्यामुळे बद्धकोष्ठासह पाइल्ससारख्या आजारांनी अनेकजण त्रस्त झाले असून त्यात सरकारी नोकरांसह आयटीयन्स आणि बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश आहे.

विविध तक्रारींसंदर्भात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या ३० ते ४५ वयोगटातील पेशंटच्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. 'सतत एकाच ठिकाणी काम करत बसणे, पोट साफ न होणे यासारख्या कारणांमुळे बद्धकोष्ठ, पाइल्स यासारखे विविध आजार उद्भवतात. हे आजार सर्वच स्तरातील स्त्री-पुरुषांमध्ये आढळून येतात. या आजाराच्या उपचारांबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अनेकदा आजार खूप बळावल्यानंतर शेवटच्या टप्प्यात पेशंट उपचारासाठी येतात. उपचारानंतर दोन ते तीन महिने घरी बसावे लागेल. स्नायू कापणे अथवा इजा होणे, अशी नागरिकांमध्ये भीती असते. गेल्या काही काळात 'लेसर हिमरॅडो प्लास्टी'सारखे तुलनेने कमी त्रासदायक लेसर उपचारही उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती डॉ. अश्विन पोरवाल यांनी दिली. शहरात 'पाइल्स'चा आजार होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक, म्हणजे ४० टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र विभाग?

$
0
0

Suneet.Bhave@timesgroup.com

पुणेः शहरातील रस्ते आणि चौक मोकळे करण्यापासून अनधिकृत बांधकामांवरील कारवाईपर्यंत, सर्व ठिकाणांचा भार वाहणाऱ्या अतिक्रमण विभागाची कार्यकक्षा लवकरच कमी करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावित पथारी व्यावसायिक अधिनियमात फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र विभाग करण्याचे संकेत देण्यात येत असून, मोठ्या महापालिकांमध्ये अतिक्रमण विभाग फक्त अनधिकृत आणि नियमबाह्य बांधकामांवरील कारवाईपुरता मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारचा राष्ट्रीय फेरीवाला कायदा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार सरकारतर्फे सध्या पथविक्रेता अधिनियमाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. सरकारने या अधिनियमाचे प्रारूप प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर नुकत्याच झालेल्या हरकती-सूचनांच्या सुनावणीनंतर 'अ' आणि 'ब' वर्ग महापालिकांमध्ये अतिक्रमण विभागाच्या कामकाजात बदल करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्याबाबतचे सविस्तर आदेश येत्या काही दिवसांत काढण्यात येणार असून, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित होण्याची दाट चिन्हे आहेत.

सध्या शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची; तसेच शहरातील रस्ते, फुटपाथ अतिक्रमणांपासून मुक्त करण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागावर आहे. तसेच शहरात जागोजागी लावलेले अनधिकृत फ्लेक्स, बॅनरवरदेखील परवाना व आकाशचिन्ह विभागाच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाला वारंवार कारवाई करावी लागते. अतिक्रमण विभागाकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि त्यांच्यावरील कामाचा बोजा पाहता या विभागाचे विभाजन करण्याबाबत सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय सुरू होता. पथविक्रेता अधिनियमाच्या अनुषंगाने त्याला मूर्त स्वरूप देता येण्याची कल्पना मांडण्यात आल्याने त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

पथविक्रेता अधिनियमांतर्गत फेरीवाला विभागाकडे शहरात रस्त्यावर, चौकात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची सर्व जबाबदारी दिली जाणार आहे. त्यांची नोंदणी, परवाना देण्यापासून ते त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यापर्यंत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यापासून त्यांच्याकडून प्रशासकीय शुल्क, दंड वसूल करण्यापर्यंतचे सर्व कामकाज फेरीवाला विभागामध्ये समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. अतिक्रमण विभागाकडे अनधिकृत बांधकामे आणि नियम-अटींचे उल्लंघन केल्यानुसार होणाऱ्या कारवाईची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

अटी व शर्ती

राज्य सरकारच्या प्रस्तावित पथविक्रेता अधिनियमामध्ये फेरीवाले, पथारी व्यावसायिक यांच्यासाठी नियम आणि अटी-शर्ती लागू केल्या जाणार आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहेच; पण त्याचबरोबर फेरीवाले, पथारी व्यावसायिक यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल मार्टमध्ये शॉर्टसर्किटने आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रविवार पेठेतील फडके हौद चौकातील सिंग सायकल मार्टमध्ये शॉर्टसर्किटमुळे एसीला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या आगीत १५ सायकलींचे नुकनास झाले असून, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चार जण अडकले होते. मात्र, खाली उतरण्यास उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गाने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

फडके हौद चौकात सिंग सायकल मार्ट हे सायकलचे बहुमजली दुकान आहे. या दुकानाच्या तळघरातील एसीला आग लागल्यानंतर कमी वेळात आग पसरली. तळघर बंदिस्त असल्याने धूर बाहरे जात नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर साठून राहिला होता. अग्निशमन दलाला सायंकाळी पाच वाजून १७ मिनिटांनी आगीची वर्दी मिळाली. काही मिनिटातच कसबा पेठ केंद्राची एक फायर गाडी, भवानी पेठेतील मध्यवर्ती अग्निशमन केंद्राची फायर गाडी व वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

तळघराच्या खिडक्या दगड, विटांनी बंद होत्या. त्यामुळे मदतकार्यात अडचण येत होती. अग्निशमनच्या जवानांनी शोरूमच्या काचा व खिडक्या तोडून धुराला मोकळी वाट करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट अदालत येत्या ६ जानेवारीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वेगवेगळ्या कारणांमुळे पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टचे अर्ज अडकून पडलेल्या नागरिकांसाठी येत्या ६ जानेवारीला पासपोर्ट अदालत आयोजित करण्यात आली आहे. सेनापती बापट रोडवरील पासपोर्ट कार्यालयामध्ये सकाळी १० ते १ या वेळेतही अदालत होणार आहे. अदालतीमध्ये १५ ऑगस्ट २०१५ पूर्वी दाखल केलेल्या अर्जांच्या तक्रारीच स्वीकारण्यात येणार आहेत.
अदालतीमध्ये सहभागी होण्यासाठी अपॉइंटमेंट आवश्यक असून यासाठी passportadalat@gmail.com या ई-मेलवर अथवा पासपोर्ट कार्यालय, सेनापती बापट रस्ता, पुणे ४११०१६ या पत्त्यावर अर्जदाराने पूर्ण, नाव, अर्ज क्रमांक, फाइल क्रमांक, संपर्क पत्ता अशी सविस्तर माहिती द्यावी. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील अर्ज स्वीकारले जातील. येत्या ३ जानेवारीपर्यंत येणारे ई-मेल आणि पत्रांचा समावेश या उपक्रमामध्ये करण्यात येईल, असे अतुल गोतसुर्वे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलनानिमित्त नेमाडे यांची मुलाखत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग' अशी टीका करणाऱ्या 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे यांचा परिसस्पर्श ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने संमेलनाला लागणार आहे. 'ज्ञानपीठ'विजेत्या दहा साहित्यिकांच्या मुलाखतींमध्ये नेमाडेंच्या मुलाखतीचा समावेश असून, त्यांच्या मुलाखतीनेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. नेमाडे संमेलनाला येणार की नाहीत, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारीत पिंपरीत रंगणार आहे. संमेलनाला एका महिन्यापेक्षा कमी कालावधी उरल्याने कामांना वेग आला आहे. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी संमेलनाच्या निमित्ताने ज्ञानपीठविजेत्या साहित्यिकांच्या मुलाखतींसाठी पुढाकार घेतला आहे. ज्ञानपीठविजेत्या दहा लेखकांचा प्रवास या मुलाखतीच्या निमित्ताने कॅमेऱ्यात अनंत काळासाठी बंदिस्त होणार असून, शेवटचा दहावा क्रमांक भालचंद्र नेमाडे यांचा आहे.

'वासुदेव नायर, प्रतिभा राय, केदारनाथ सिंग, रेहमान राही, गुरुदयाल सिंग अशा साहित्यिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, नेमाडेंच्या मुलाखतीने हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे,' अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी 'मटा'ला दिली.

डॉ. पाटील म्हणाले, 'नेमाडे यांचा मुलगा ओडिशात असतो. नेमाडेही सध्या ओडिशातच आहेत. त्यामुळे ओडिसात जाऊन त्यांची मुलाखत घेण्यात येणार आहे. येत्या रविवारी, २७ डिसेंबर रोजी मंगला खाडिलकर नेमाडे यांची मुलाखत घेतील. ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांच्या मुलाखती किमान ५-६ तासांच्या करण्यात येत आहेत. त्यामुळे नेमाडे यांची मुलाखतदेखील किमान पाच तासांची असेल. मुलाखत आणि चित्रीकरण असे सध्या केले जाणार असून, त्यामध्ये नंतर काही चित्रफिती, साहित्याचा आढावा घेणारी माहिती अशातून मुलाखत कशी सजवता येईल, हे पाहिले जाणार आहे. नेमाडे यांनी मुलाखतीसाठी होकार दिला आहे. रविवारची वेळही त्यांनी दिली आहे. दरम्यान, दहा साहित्यिकांच्या प्रत्येकी पाच तासांच्या मुलाखती संमेलनात दाखविणे शक्य नसले, तरी या मुलाखतींच्या निमित्ताने एक महत्त्वाचा ठेवा जतन होणार आहे.


डॉ. पाटील देणार निमंत्रण

भालचंद्र नेमाडे संमेलनाच्या निमित्ताने मुलाखत देणार असले, तरी ते संमेलनाला येणार की नाहीत, हे गुलदस्त्यात आहे. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांना संमेलनात आणण्याचा चंग बांधला आहे. काही साहित्यिकांनी येण्याचे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील नेमाडे यांची भेट घेऊन त्यांना संमेलनाचे निमंत्रण देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिक्रेट सांता’देणार गरजूंना गिफ्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चिमुकल्यांच्या ओठांवर रूळणाऱ्या 'जिंगल बेल...जिंगल बेल' गाण्यातील त्यांचा आवडता सांताक्लॉज म्हणजे नाताळच्या सकाळी गिफ्ट देणारा मित्रच असतो. ख्रिसमसच्या सकाळी उशीजवळ सांताक्लॉजने काय गिफ्ट ठेवले असेल याची उत्सुकता चिमुकल्यांच्या आनंदात भर टाकत असते; पण गरीब कुटुंबातील गरजू आणि निराधार मुलांसाठी असा कोणताही सांताक्लॉज येत नाही की त्यांना गिफ्ट देत नाही. एकीकडे सुखवस्तू कुटुंबातील मुले सांताक्लॉजच्या गिफ्टच्या आनंदात रमलेली असताना या आनंदापासून वंचित असलेल्या मुलांसाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने खास 'सिक्रेट सांता' ही अभिनव कल्पना आणली आहे.
समाजातील गरजू व निराधार मुलांसाठी सांताक्लॉजची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी 'मटा' च्या माध्यमातून वाचकांना देण्यात आहे. यामध्ये वाचकांनी मुलांसाठी नवीन वस्तू, खेळणी, शालोपयोगी वस्तू, उपयुक्त अशी अवांतर वाचनाची पुस्तके भेट म्हणून 'मटा' च्या कार्यालयात जमा करावयाची आहेत. या भेटवस्तू नव्याच असणे आवश्यक आहे. गिफ्ट द्यायची वस्तू छान पॅक करून त्यावर स्वतःचे नाव, पत्ता व फोन नंबर लिहून 'टाइम्स हाउस,' फर्ग्युसन रोड, पुणे येथे आणून जमा करावीत. वाचकांकडून आलेल्या या भेटवस्तू 'सिक्रेट सांता' च्या माध्यमातून ख्रिसमसच्या दिवशी वारजे माळवाडी येथील आपलं घर या संस्थेला देण्यात येणार आहेत.
विजय आणि साधना फळणीकर यांनी पंधरा वर्षांपूर्वी ही संस्था त्यांचा एकुलता एक मुलगा वैभव यांच्या स्मरणार्थ स्थापन केली. संस्थेतर्फे आश्रमामध्ये समाजातील वंचितांबरोबरच, निराधार मुलांसाठी निवास, भोजन, कपडे, शिक्षण आणि औषधोपचाराची निःशुल्क व्यवस्था कऱण्यात आली आहे. या सर्व मुलांना शैक्षणिक धडे देण्याबरोबरच शिवणकाम, हस्तकला, सुतारकाम, वायमरमन अशा विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक खर्चाच्या पैशांसाठी सुनेचा छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या खर्चासाठी माहेराहून तीन लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावत सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याची घटना निगडी ओटा स्किम येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी विवाहितेचे सासरे रजनीकांत क्षीरसागर यांच्यासह सात जणांवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहा प्रमोद क्षीरसागर (वय २१, रा. ओटा स्किम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रमोद रजनीकांत क्षीरसागर, दीर धम्मप्रकाश रजनीकांत क्षीरसागर, सासरे रजनीकांत क्षीरसागर, सासू संगीता क्षीरसागर, जाव कांचन क्षीरसागर, चुलत सासरे रतीलाल क्षीरसागर आणि चुलत सासू (नाव समजू शकले नाही, सर्व रा. ओटा स्किम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत क्षीरसागर यांनी यापूर्वी नेहा यांच्या वडिलांकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे त्यांनी परत केले नाहीत. दुचाकी घेण्यासाठी एक लाख, तर आगामी निवडणुकीसाठी दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून नेहा यांचा मानसिक-शारीरिक छळ करण्यात येत होता. यातून तगादा लावत सारच्या मंडळींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फौजदार मदन कांबळे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुलांच्या वाचन संस्काराबाबत आपुलकी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शालेय मुला-मुलींमध्ये वाचन संस्कृती रुजावी व ती वाढावी, यासाठी पाश्चात्य देशांमध्ये नवनवीन प्रयोग सुरू असताना आपल्याकडेही काही प्रयत्न होत आहेत. मात्र, ते तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचत नाहीत. अशा मुलांपर्यंत वाचन संस्कार पोचविण्यासाठी धडपडणाऱ्या स्वयंसेवी संस्थांविषयी मला कमालीची आपुलकी आणि आत्मियता वाटते,' अशी भावना शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांनी सोमवारी व्यक्त केली.
डोअर स्टेप स्कूल, स्वाधार, वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशन व क्षितिज या पाच संस्थांनी एकत्र येऊन सामाजिक संस्थांचे वाचन संस्कार नेटवर्क सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित 'चला, वाचन रंजक बनवूया' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डोअर स्टेपच्या संस्थापिका रजनी परांजपे, भावना कुलकर्णी, शिक्षण मंडळाच्या उपशिक्षणप्रमुख शुभांगी चव्हाण, स्वाधारच्या अंजली बापट, वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या सुषमा साठे, स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशनचे डॉ. प्रकाश भंडारी, क्षितिज संस्थेच्या उमा माने व संजय राऊत या प्रसंगी उपस्थित होते.
चंदावरकर म्हणाल्या, 'वाचन मुलांना समृद्ध बनवते आणि विचार करण्यास प्रवृत्त करते. मराठी भाषेत आज अनेक प्रयोग राबविले जात असून, त्यातून मुलांमध्ये वाचनाची आवड रुजत आहे. पूर्वी मुलांना चांगली शाळा व चांगले शिक्षक मिळायचे; पण काळ बदलल्याने चांगले शिक्षक हरपले. भाषेची व व्याकरणाची जाण आपल्यात उपजतच असते. फक्त त्याला जाणून घेण्याची गरज आहे. दूरचित्रवाणी पाहून ज्ञान मिळत नाही. पुस्तक वाचल्याने मनाला शांती मिळते.'
'लहानपणीच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हायला हवी. अध्यापन आनंददायी करायचे असेल, तर मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याची आवश्यकता आहे,' असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. दरम्यान, मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती या वेळी देण्यात आली; तसेच गप्पा, गोष्टी, गाणी, खेळ, चित्रवाचन, भित्तीपत्रके आणि पुस्तक वाचनातून मुलांमध्ये वाचन संस्कार कसे रुजवावे, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राधिकरणाच्या विलीनीकरणास विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 'पीएमआरडीए'मध्ये होत असलेल्या विलीनीकरणाला विरोध करत शिवसेनेने मंगळवारी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी शिवसेनेने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये ७२ टक्के लोकांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवल्याचे शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी सांगितले.

प्राधिकरण सल्लागार भगवान वाल्हेकर, मधुकर बाबर, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक धनंजय आल्हाट, बाबा धुमाळ, नगरसेविका संगीता पवार, विजया जाधव, अश्विनी चिंचवडे, विमल जगताप, चारुशीला कुटे, शहर संघटक नंदकुमार सातुर्डेकर, योगेश बाबर, उपशहर प्रमुख उल्हास कोकणे, उपप्रमुख विनायक रणसुभे, युवासेना प्रमुख अमित गावडे, आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलिनीकरण 'पीएमआरडीए'मध्ये करण्याऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावे, तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवल्याशिवाय प्राधिकरणाचे विलिनीकरण करू नये, असे निवेदन विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांना देण्यात आले.

राहुल कलाटे म्हणाले , 'पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणातील जनतेला विश्वासात न घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आला आहे. याची योग्य दखल सरकारने घेतली नाही, तर त्याचे तीव्र स्वरूपही सरकारला बघावे लागेल.'

सुलभा उबाळे म्हणाल्या, 'प्राधिकरणातील रहिवासी पिंपरी महापालिकेत विविध कर भरतात. महापालिका त्यांना मुलभूत सेवासुविधा पुरवते. प्राधिकरणाचा समावेश 'पीएमआरडीए'मध्ये करण्याचा हेतू काय? एलबीटी निर्मूलनामुळे महापालिकेचे उत्पन्न घसरले आहे, त्यामुळे भविष्यात उद्भवू शकतात. याचा विचार करता प्राधिकरणाची स्थावर मालमत्ता महापालिकेत विलिन व्हायला हवी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरणाच्या जागेवरील प्रकल्पांची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत मोठमोठे गृहप्रकल्प साकारले आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) अशा गृहप्रकल्पांसाठी भूखंड विक्री केली. या भूखंडांवरील प्रकल्पांना देण्यात आलेली मंजुरी आणि त्या प्रकल्पांच्या आराखड्यांना दिलेली मंजुरी यासह यातील किती प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला, याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे संपर्क प्रमुख एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

बिल्डरांनी नियम धाब्यावर बसवून या भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. या इमारतींचा प्लॅन अर्थात आराखडा मंजूर करताना आणि इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला देताना प्राधिकरणासह संबंधित यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप पवार यांनी केला.

प्राधिकरणाच्या भूखंडांवरील प्रकल्पांसाठी बिल्डरांनी एफएसआय घेतला किती आणि विकला किती, हा प्रश्नही समोर येत आहे. त्यामुळे प्राधिकरणाने दहा वर्षांत म्हणजे २००५पासून आतापर्यंत किती भूखंड अशा प्रकल्पांसाठी दिला. याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शवविच्छेदनासाठी लागले आठ तास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) शवविच्छेदन विभागात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने मृताच्या नातेवाईकांना आठ तास ताटकळत थांबावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

थेरगाव येथील विशाल सुरेश मोहिते (वय ३७) या तरुणाने मंगळवारी सकाळी आत्महत्या केली. त्याच्या नातेवाईकांनी व पोलिसांनी त्याचा मृतदेह सकाळी आठ वाजता वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात आणला. तोपर्यंत रात्रपाळीचे डॉक्टर निघून गेले होते. त्यामुळे दिवसपाळीच्या डॉक्टरांची वाट पाहात पोलिस आणि नातेवाईक थांबले. मात्र, कोणीही डॉक्टर आले नव्हते. तोपर्यंत आणखी एक मृतदेह शवविच्छेदनासाठी आला. मृताच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावेळी, 'आज फक्त एकच डॉक्टर येणार असून ते देखील त्यांच्या मेडिकल तपासणीसाठी ससून रुग्णालयात गेले आहेत. ते आल्याशिवाय शवविच्छेदन होणार नाही,' असे सांगण्यात आले. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना डॉक्टरांची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यानंतर आठ तासानंतर म्हणजेच दुपारी चारच्या सुमारास एक डॉक्टर आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील सभांच्या तहकुबीचे सत्र सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिका सभेच्या तहकुबीचे सत्र सुरू असतानाच आता स्थायी समितीनेही मंगळवारी सभा तहकूब केली. या तहकूब सत्रामुळे अनेक विषय महापालिका सर्वसाधारण सभेबरोबरच स्थायी समितीमध्येही प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.

स्थायी समितीचे सभापती अतुल शितोळे यासंदर्भात म्हणाले, गणसंख्या कमी असल्यामुळे आज सभा तहकूब करण्यात येत आहे, तसेच आयुक्त राजीव जाधव हे देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्ही ही सभा पुढील मंगळवारपर्यंत (२९ डिसेंबर) तहकूब केली आहे.'

काही महत्त्वाचे विषय सहा-सहा महिन्यांपासून प्रलंबित राहत आहेत. नवीन वर्षात तरी त्यांना मुहूर्त मिळेल की हे विषय तसेच पडून राहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शून्य कचरा प्रकल्पासोबतच महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत विधवा व घटस्फोटीत ४५९ पात्र महिला लाभार्थींना प्रत्येकी सहा हजार रुपये मदत करण्यासाठी २७ लाख ५४ हजार रुपयांचा प्रस्तावावर चर्चा होणार होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळा नगरपरिषदेच्या विषय समित्या बिनविरोध

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
लोणावळा नगरपरिषदेच्या विषय समित्या बिनविरोध झाल्या असून, स्थायी समितीच्या सभापतिपदी नगराध्यक्ष अमित गवळी, नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी उनगराध्यक्ष भरत हरपुडे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी विजय उर्फ पोपट मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभापतिपदी सौम्या शेट्टी, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतिपदी बाळासाहेब कडू, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतिपदी संजय गायकवाड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी कविना बैकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

विषय समित्या नवनिर्वाचित सभापती व सदस्य पुढील प्रमाणे -

स्थायी समिती : अमित गवळी (पदसिद्ध सभापती). सौम्या शेट्टी, संजय गायकवाड, बाळासाहेब कडू, विजय मोरे, कविना बैकर, भरत हारपुडे, सुनील इंगूळकर, गिरीश कांबळे, प्रमोद गायकवाड.

नियोजन व विकास समिती : भरत हारपुडे (पदसिद्ध सभापती), शकुंतला इंगूळकर, दत्तात्रय येवले, नितीन आगरवाल, शादान चौधरी, अशोक मावकर व एक जागा रिक्त.

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : विजय मोरे (सभापती), श्रीधर पुजारी, शकुंतला इंगूळकर, दीपाली गवळी, रूपाली जाधव, अशोक मावकर, रेखा जोशी.

सार्वजनिक बांधकाम समिती : सौम्या शेट्टी (सभापती), सुनील इंगुळकर, दीपाली गवळी, अनिल पानसरे, रुपाली जाधव, प्रमोद गायकवाड व शादान चौधरी.

स्वच्छता व आरोग्य समिती : बाळासाहेब कडू (सभापती), श्रीधर पुजारी, सुरेखा जाधव, रूपाली जाधव, अनिल पानसरे, रेखा जोशी, शादान चौधरी.

शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती : संजय गायकवाड (सभापती), जयश्री काळे, दीपाली गवळी, अनिल पानसरे, रूपाली जाधव, जयश्री इंगूळकर, अशोक मावकर.

महिला व बालकल्याण समिती : कविना बैकर (सभापती) व जयश्री काळे (उपसभापती), सुरेखा जाधव, शकुंतला इंगूळकर, दीपाली गवळी, जयश्री इंगूळकर, रेखा जोशी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तुलधाऱ्याचा पोलिसावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिवाची पर्वा न करता पिस्तुलधारी गुन्हेगाराचा पाठलाग करून त्याला आपटे रोडवरील एका गल्लीत अडवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. ओंकारेश्वर घाट ते आपटे रोड या दरम्यान हे थरारनाट्य घडले. गोळी पायाला चाटून गेल्यानंतरही पोलिसाने गुन्हेगाराची पकड सोडली नव्हती. अखेर त्याने पोलिसाच्या पोटाला पिस्तुल लावल्यानंतर नाईलाज झाला. आणि गुन्हेगाराने तेथून पळ काढला.

मयूर राजेंद्र भोकरे असे या धाडसी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भोकरे शिवाजीनगर कोर्टात नेमणुकीला असून, काही कामामुळे सुटीवर होते. भोकरे आणि त्यांचा मित्र संदेश खडके दुचाकीवरून मनपाकडून बालगंधर्वकडे येत होते. ओंकारेश्वर घाटाजवळ एका दुचाकीवरील व्यक्तीच्या कमरेला पिस्तुल लावल्याचे दिसल्याने त्यांनी त्याला हटकले. त्यामुळे दुचाकीवरील दोघांनी पळ काढला. राणी लक्ष्मीबाई चौकात सिग्नल सुरू असल्यामुळे पिस्तुलधारी त्या ठिकाणी थांबले. पुढे ते जंगली महाराज रोडवर वळले आणि आपटे रस्त्यावरील संतोष बेकरीजवळ आले. दरम्यान, भोकरेंनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला.

दोघेजण फर्ग्युसन रोडकडे येणाऱ्या लेनमधून पाटील बंगला परिसरात शिरले. पण, पुढे रस्ता नसल्याने दोघांना भोकरे यांनी अडविले. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. पिस्तुलधारी व्यक्तीने भोकरे यांच्या पायावर झाडलेली गोळी त्यांच्या बुटाला चाटून गेली. तरीही भोकरे यांनी त्याला पकडून ठेवल्यामुळे त्याने अखेर पोटाला पिस्तुल लावले. त्यामुळे भोकरे यांनी नाईलाजास्तव त्याला सोडून दिले. त्यानंतर ते एमएच १२ जीटी २३७३ या दुचाकीवरून पळून गेले. काही वेळातच डेक्कन पोलिस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. गोळीबार करणारे सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटीचे उत्पन्न ९५० कोटी रुपयांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचे आर्थिक स्रोत अडचणीत आले असताना, स्थानिक संस्था करातून (एलबीटी) नोव्हेंबरमध्येही पालिकेला सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे भरघोस उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरच्या उत्पन्नात २५ कोटींहून अधिक वाढ झाली असून, एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीतील एलबीटीचा महसूल साडेनऊशे कोटींवर पोहोचला आहे.

राज्य सरकारने एलबीटीची करमर्यादा वाढविल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचा आरोप केला जात होता. त्याची भरपाई म्हणून राज्य सरकारमार्फत पालिकेला दर महिन्याला अनुदान दिले जात आहे. सुरुवातीच्या दोन वर्षांत एलबीटीतून बाराशे कोटी रुपये प्राप्त केल्याने पुणे महापालिकेला राज्याकडून मिळणाऱ्या अनुदानाचा सर्वाधिक वाटा मिळत आहे. 'गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ९६ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. तर, यंदा एलबीटीतून १२४ कोटी रुपये जमा झाले आहेत. यात सरकारी अनुदानाचा सर्वाधिक ८१ कोटी रुपयांचा वाटा आहे. एप्रिल ते नोव्हेंबरअखेरपर्यंत एलबीटीतून जमा झालेला महसूल गतवर्षीपेक्षा सव्वाशे कोटी रुपयांनी अधिक आहे', अशी माहिती एलबीटीप्रमुख विलास कानडे यांनी दिली.

चालू आर्थिक वर्षाचे आणखी चार महिने बाकी असल्याने एलबीटीतून महापालिकेला गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्पन्न मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. केंद्र सरकारचे प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) मंजूर होण्याची शक्यता मावळल्याने सरकारतर्फे राज्यातील सर्व महापालिकांना आणखी किती काळासाठी अनुदान दिले जाणार, हा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.

उर्वरित तीन महिन्यांचे काय?

सरकारने एलबीटी कररचनेत केलेल्या बदलांमुळे महापालिकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती वर्तविली जात होती. महापालिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सरकारने डिसेंबरपर्यंत सर्व पालिकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, हे अनुदान संबंधित महापालिकांना वितरित केले जात आहे. जानेवारी ते मार्च या आर्थिक वर्षातील अखेरच्या तीन महिन्यांसाठीही नुकतेच पुरवणी मागण्यांमध्ये महापालिकांसाठी वाढीव अनुदान मंजूर केले गेले आहे. परंतु, त्यातून कोणत्या पालिकेला किती अनुदान मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

..................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी सैनिकाकडून पोलिसाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिग्नल तोडून जाणाऱ्या माजी सैनिकाला अडविणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला फरपटत नेऊन मारहाण केल्याची घटना स्वारगेट येथील व्होल्गा चौकात सोमवारी सकाळी घडली. या मध्ये पोलिस कर्मचारी जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोघांच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

या बाबत पोलिस हवालदार राजेंद्र गिरी यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून माजी सैनिक निरंजन केदारीसिंग (वय ३७) आणि दिप्यो लोचन वृंदावन बेहरा (वय ३४, दोघेही रा. घोरपडी गाव) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरी हे स्वारगेट वाहतूक विभागात नेमणुकीला आहेत. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ते व्होल्गा चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी केदारीसिंह आणि बेहरा सिग्नल तोडून जाऊ लागले. त्यामुळे त्यांना गिरी यांनी थांबण्याचा इशारा केला. पण, ते न थांबल्यामुळे गिरी यांना त्यांना पकडले. पण, आरोपींनी तरीही न थांबता गिरी यांना त्यांच्या सोबत फरफटत नेले. त्यांना हाताने मारहाण केली. यामध्ये गिरी यांच्या पाय, हात, खांद्याला जबर दुखापत झाली आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पलांडे हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोटामुक्त पीएमपीसाठी विशेष बिझनेस प्लॅन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आता विशेष 'बिझनेस प्लॅन' राबविला जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. येत्या नऊ महिन्यात हा आराखडा तयार करून पुढील दोन वर्षांत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी पाच कोटी ३० लाख रुपये खर्च येणार आहे.

या बिझनेस प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी पीएमपीने 'अर्नस्ट अँड यंग' या सल्लागार कंपनीशी चार वर्षांचा करार केला आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली. पुण्याचे महापौर दतात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर सुशीला धराडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पीएमपीचे संचालक आनंद अलकुंटे, पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अजय शितोळे, पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे यावेळी उपस्थित होते.

पीएमपीच्या तोट्यात सातत्याने वाढ होऊन सध्या १६७ कोटी रुपये वित्तीय तूट आहे. पीएमपीकडून दिल्या जाणाऱ्या सेवेवरही त्याचा परिणाम होत आहे. पीएमपीची ही परिस्थिती सुधारण्यासाठी पीएमपीने तीन वर्षांपूर्वी 'जेएनएनयुआरएम' अंतर्गत हा बिझनेस प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यासंदर्भात निविदाही मागविल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने निधी न दिल्यावे पुढील प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. परंतु, पीएमपीला चांगले दिवस आणण्यासाठी हा प्लॅन आवश्यक असल्याने दोन्ही महापालिका आणि पीएमपीच्या निधीतून हा प्लॅन राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पुणे महापालिकेने दोन कोटी रूपयांचा निधी दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून निधी मिळाल्यानंतर उर्वरित खर्च पीएमपीकडून केला जाणार आहे.

सल्लागाराची नेमणूक तीन वर्षांसाठी

पीएमपीसाठी आवश्यक असलेली टेक्नॉलॉजी, सध्या कार्यान्वित असलेल्या टेक्नॉलॉजीचे अद्ययावतीकरण, पॅसेंजर व उत्पन्न वाढीसाठी उपाय योजना, पीएमपीच्या मालमत्तेचा वापर करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न, बस मार्गांचे सुसूत्रीकरण, उत्पन्नासाठी पर्यायी स्त्रोत्तांची निर्मिती, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, वाढत्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि पीएमपीची प्रतिमा सुधारणे या गोष्टींचा अंतर्भाव या प्लॅनमध्ये असणार आहे. 'अर्नस्ट अँड यंग' ही कंपनी प्लॅन तयार करण्याबरोबरच पुढील तीन वर्षे त्याच्या अंमलबजावणीसाठी पीएमपीसोबत काम करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य परिषदेचा उमेदवारी अर्ज पाचशे रुपयांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदारांची संख्या माहीत नसतानाच मतदारयादी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा अजब प्रकार मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत घडला. अशा स्थितीत उमेदवारी अर्जशुल्कही वाढविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना अर्जासाठी आता पाचशे रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत. यादी तपासून मतदारांची संख्या ठरविण्यात येईल, असे स्पष्टीकरण परिषदेकडून देण्यात आले.

परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी पात्र मतदार सभासदांच्या यादीची मूळ प्रत मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांच्याकडे सुपूर्द केली. निवडणूक अधिकारी अॅड. सुभाष किवडे, प्रा. सुधाकर जाधवर आणि प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पात्र मतदारांची संख्या किती, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, याद्या तपासल्यानंतर संख्या कळून येईल, असे उत्तर देण्यात आले. वास्तविक निवडणूक अधिकाऱ्यांकडे यादी सुपूर्द करताना त्यातील मतदारसंख्या माहीत नाही काय, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला. पण निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असताना मतदार किती हेच कार्यकारिणीला माहीत नसल्याचे यानिमित्ताने उघड झाले. मतदार किती, शाखा किती, किती जिल्ह्यांमध्ये निवडणूक होणार आहे, ही माहिती देण्यास पदाधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली.

दरम्यान मतपत्रिका आता पोस्टाने पाठविण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठी पाचशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हे शुल्क तीनशे रुपये होते, यंदा दोनशे रुपये वाढविण्यात आले असून निवडणूक खर्च वाढला असल्याचे राजकीय पक्षाप्रमाणे उत्तर पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २२ जानेवारी २०१६ असून, १५ मार्च रोजी परिषदेची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. २३ ते २५ डिसेंबर २०१५ या कालावधीत यादीमधील नावे तपासून २७ डिसेंबर रोजी अंतिम प्रत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ३० डिसेंबर रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. ११ ते १६ जानेवारी २०१६ या काळात उमेदवारी अर्जांचे वाटप केले जाणार असून, १९ ते २२ जानेवारी या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २३ जानेवारी या दिवशी अर्जांची छाननी केली जाणार आहे. २५ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर २७ जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. मतदारांना पाच फेब्रुवारीपर्यंत मतपत्रिका पाठवल्या जाणार असून, १४ मार्च ही मतपत्रिका परत येण्याची अंतिम तारीख आहे. १५ मार्च रोजी निकाल जाहीर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठांतून धार्मिक शिक्षण?

$
0
0


Yogesh.Borate@timesgroup.com


पुणे : बदलत्या काळाची आव्हाने पेलणारे आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच विविध धर्म, वैदिक कला, आणि संस्कृतीच्या अभ्यासाला चालना देणे, असे उद्दिष्ट राज्यातील विद्यापीठांपुढे ठेवण्यात आले आहे. नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यात थेट धर्मांचा उल्लेख केल्याने विद्यापीठांतून धार्मिक पद्धतीचे शिक्षण दिले जाणार काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.



राज्यातील विद्यापीठांनी धर्म, साहित्य, इतिहास, विज्ञान व वैदिक कला, हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, शीख, ख्रिश्चन, झोरास्ट्रीयन आणि इतर सभ्यता व संस्कृती यांच्या अभ्यासाला चालना देण्याची अपेक्षा नव्या मसुद्यात व्यक्त करण्यात आली आहे. विद्यापीठांच्या उद्दिष्टांमध्येच या तरतुदीचा समावेश करण्यात आला असून, या मसुद्याची प्रत 'मटा'ला उपलब्ध झाली आहे.


राज्याच्या उच्चशिक्षणाच्या वर्तुळामध्ये गेल्या वर्षभरापासून नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्याविषयीची चर्चा घडून येत होती. विद्यापीठांमधून कोणत्याही धर्माच्या शिक्षणाविषयीचे संदर्भ यापूर्वी दिले गेले नव्हते. या कायद्यासाठी यापूर्वी मांडण्यात आलेले अहवाल वा राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये नव्या विद्यापीठ कायद्याविषयीच्या संदर्भाने झालेल्या चर्चांमध्येही कोणत्याही टप्प्यावर अशा बाबींचा विचार नव्हता. असे असतानाही अंतिम मसुद्यात या मुद्द्यांचा वापर झाल्याने, त्या विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


मसुद्यात विद्यापीठांची उद्दिष्ट्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. त्यामधील बाराव्या पोटकलमामध्ये हा विचार झाला आहे. तसेच, 'जे समकालीन, जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक आणि स्थानिक तसेच धार्मिक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे अशा ज्ञानाची निर्मिती करणे व त्याचा प्रसार करणे आणि श्रेष्ठ दर्जाच्या संशोधनाची जोपासना करणे,' हे उद्दिष्ट विद्यापीठांसमोर ठेवण्यात आले आहे. राज्यघटनेत नमूद केलेले स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समता व सामाजिक न्याय यांचे संवर्धन करणे, सर्वोत्तम मूलतत्त्वे व मूल्ये यांची राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने जोपासना करण्याचे उद्दिष्ट विद्यापीठांसमोर ठेवण्यात आले आहे. त्या सोबतच राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करणे व सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि भारताच्या नानाविध संस्कृती व वेगवेगळे धर्म यांच्या बाबतीत आदर बिंबवणे, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तरुण पिढीला उघड करून दाखविण्यासाठी त्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता पोषक वातावरण तयार करणे आणि खेळांमध्ये कौशल्यांचा विकास करण्याकरिता संधी निर्माण करण्याचाही या उद्दिष्टांसाठी विचार झाला आहे.

'यापूर्वी धर्म नव्हता'


यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यांमध्ये कधीही धर्माचा असा थेट संदर्भ देण्यात आला नव्हता. या कायद्याच्या रुपाने पहिल्यांदाच धर्म असा थेट संदर्भ विद्यापीठ कायद्यामध्ये समाविष्ट झाल्याची माहिती पुण्यातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी 'मटा'ला दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीसीयूडी’होणार विसर्जित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील विद्यापीठांमध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळांचे (बीसीयूडी) या पुढील काळात विसर्जन होणार आहे. त्याचवेळी नव्या विद्यापीठ कायद्याच्या आधारे विद्यापीठांमधून नव्याने स्थापन होणाऱ्या स्वतंत्र अशा माहिती तंत्रज्ञान मंडळ, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहचर्य मंडळांच्या माध्यमातून 'बीसीयूडी'च्या माध्यमातून यापूर्वी होणारे कार्य साध्य केले जाणार आहे.

बहुचर्चित नवा विद्यापीठ कायदा राज्याच्या विधिमंडळामध्ये चर्चेसाठी मांडण्यात आला आहे. या कायद्याच्या मसुद्याची प्रत 'मटा'कडे उपलब्ध झाली आहे. त्यानुसार हा कायदा मान्य झाल्यास राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमधील 'बीसीयूडी'चे कार्य संपुष्टात येणार आहे. तसेच, त्याऐवजी नव्याने निर्मिती होणाऱ्या मंडळांच्या माध्यमातून व्यापक कार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मंडळांसाठी स्वतंत्र संचालकांचाही विचार करण्यात आल्याचे याच निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

..

चार प्रमुख विद्याशाखा

नव्या विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीनंतरच्या टप्प्यावर राज्यात उच्चशैक्षणिक क्षेत्रामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांना चालना दिली जाणार असल्याचे या मसुद्यामधील तरतुदींवरून स्पष्ट झाले आहे. उच्चशिक्षण क्षेत्रासाठी या पुढे चार प्रमुख विद्याशाखांचा विचार या मसुद्यामध्ये करण्यात आला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान, आंतर-ज्ञानशाखीय अभ्यासक्रम या चार प्रमुख विद्याशाखांमधून या पुढील काळात अभ्यासक्रमांची विभागणी होणार आहे. या चारही विद्याशाखांसाठी प्रत्येकी एक अधिष्ठाता नेमला जाणार आहे. तसेच, या अधिष्ठात्यांच्या मदतीसाठी सहयोगी अधिष्ठात्यांची नेमणूकही शक्य असल्याचे या मसुद्यातील तरतुदींमधून स्पष्ट होत आहे.

..

नव्या विद्यापीठ कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी

- ६७ सदस्यांची अधिसभा.

- व्यवस्थापन परिषदेवर विद्यार्थी प्रतिनिधीचा 'निमंत्रित' म्हणून समावेश, विद्यार्थ्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा.

- आजीवन अध्ययन व विस्तार संचालक, विद्यार्थी विकास संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक या पदांची निर्मिती

- विद्यापीठामध्ये कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र संशोधन मंडळाचीही निर्मिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images