Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महोत्सवात रंग भरावेत अंतर्बाह्य

$
0
0

आग, चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीची गरज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा संपून थंडीचा चाहूल लागली की शहरात महोत्सवांचे पीक येते. दिवाळी पहाटपासून ते पुढे सवाई गंधर्व व इतर अनेक महोत्सव शहरात विविध मैदानांमध्ये रंगतात. किमान दहा हजार रसिक एका ठिकाणी जमल्यामुळे सर्व यंत्रणेवरच ताण येतो. अशा वेळी नागरिकांची सुरक्षा घेत कार्यक्रम यशस्वी करून दाखवणे हे आव्हान आयोजकांपुढे असते. आग, चेंगराचेंगरी अशा घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागते. यापुढील काही महिने महोत्सवी असल्याने या घटना घडू नयेत, यासाठी यंत्रणेला सतर्क राहावे लागणार असून, आत महोत्सव कितीही रंगला असला, तरी यंत्रणेसंबंधित प्रत्येक घटकासाठी हा काळ कसोटीचाच असेल.

दिवाळी पहाट झाली की शहरात विविध कार्यक्रम रंगू लागतात. सवाई गंधर्व, पुलोत्सव, स्वरझंकार, वसंतोत्सव याबरोबरच भीमथडी जत्रा असे एकामागून एक महोत्सव शहरामध्ये होतात. शाळेच्या अथवा महाविद्यालयांच्या मैदानांवर हे कार्यक्रम होत असल्याने कार्यक्रमांसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. रमणबागेच्या मैदानावर सवाई गंधर्व, पुलोत्सव, स्वरझंकार, वसंतोत्सव असे महोत्सव रंगतात. रमणबागेचाच विचार करायचा झाला, तर शाळेच्या मैदानाला तीन प्रवेशद्वार आहेत. त्यातील एक कायमस्वरूपी बंद असते. मुख्य प्रवेशद्वार महोत्सवकाळात फक्त विशेष व्यक्तींसाठी खुले असते. रसिकांना शनिवार पेठेतील मागच्या दाराने आत-बाहेर करावे लागते. त्यात पुन्हा तिकीट मिळाले नाही... आत सोडा, असा आग्रह करणारे रसिक शेकडोच्या संख्येने बाहेर उभे असतात.

आता सवाईच्याच वेळेला अशा रसिकांनी रमणबाग व नवीन मराठी शाळेच्या मधील रस्ता संपूर्ण व्यापला होता. हुज्जत घालणाऱ्या रसिकांमुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती निर्माण झाली होती. साधारण दहा हजार लोक एकत्रित येत असल्याने व एकच प्रवेशद्वार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण यापुढील काळात असेच महोत्सव या मैदानावर होणार आहेत.

या महोत्सवांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खाद्य पदार्थांचे स्टॉल. पुणे म्हटले की खवय्ये लोक आले. चटपटीत काही असेल आणि त्यावर खवय्यांच्या उड्या पडल्या नाही तर नवलच. महोत्सवांमध्ये जिभेचे चोचले पुरविणाऱ्या चविष्ट व हटके पदार्थांचे अनेक स्टॉल असतात. भीमथडी जत्रा तर त्यासाठीच प्रसिद्ध आहे. अस्सल गावरान पदार्थ खायला मिळत असल्याने खवय्ये महोत्सव काळात या स्टॉलवर गर्दी करतात. काहीजण तर फक्त चमचमीत खायला मिळते म्हणून अशा ठिकाणी येतात. स्टॉलवरच पदार्थ बनविले जात असल्याने याठिकाणी सावधानता बाळगणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.

महोत्सवासाठी विविध परवाने घेण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. पोलिस, पालिका प्रशासन, अग्निशमन दल अशा सुमारे दहा परवान्यांमधून जावे लागते. हे परवानेही मिळतात. त्यासाठी फारशी आडकाठी होत नाही. पण आयोजकांची भूमिका इथेच संपत नाही. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त असतो किंवा अग्निशमन दलाचे जवान असतात, म्हणून गाफील राहण्याचा प्रयत्न आयोजकांनी करू नये. महोत्सवातील प्रत्येक घटकाला अगदी कलावंत, रसिकांपासून ते कामगारांना काही त्रास होणार नाही. सर्वजण सुरक्षित राहतील ही काळजी संयोजकांनी घेतली आणि बाकीच्या घटकांनीही संयोजक, पोलिस यांच्याशी हुज्जत न घालता सूचनांचे पालन केले, तरच महोत्सव खऱ्या अर्थाने रंगतील व भैरवी सुरेल होईल, अशी भावना रसिक व्यक्त करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मला देशाला ऑस्कर मिळवून द्यायचा आहे

$
0
0

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची भावना

पुणे : 'पुरस्कारांकडे स्वच्छ नजरेने व सहजतेने पाहायला हवे. चित्रपट क्षेत्रात ऑस्करला मोठे स्थान आहे. हा पुरस्कार मला माझ्या देशाला एकदातरी मिळवून द्यायचाच आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच 'हेमलकसा' या चित्रपटाचे यश हे डॉ. प्रकाश आमटे व मंदाताईंच्या पुण्याईचे आहे,' अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने खास 'मटा'कडे व्यक्त केली.

सोनालीची प्रमुख भूमिका असलेल्या 'प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटाचा हिंदीत भाषांतरित 'हेमलकसा' हा चित्रपट सध्या ऑस्करच्या शर्यतीत आहे. भारताकडून अधिकृत गेलेला 'कोर्ट' हा मराठी चित्रपट स्पर्धेतून बाहेर पडला असला, तरी हेमलकसाच्या रूपाने भारतासाठी ऑस्करच्या आशा टिकून आहेत. हेमलकसाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल सोनालीने खास 'मटा'कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.

'ऑस्करसाठी गेलेला हा माझा दुसरा चित्रपट आहे. याआधी 'द गुड रोड' हा चित्रपट भारताचा अधिकृत चित्रपट म्हणून ऑस्करसाठी पाठविण्यात आला होता. भारतीय चित्रपटांची जागतिक व्यासपीठावर दखल घेतली जात आहे, याचा आनंद आहे. हा चित्रपट जात, भाषा या सीमांच्या पलीकडचा आहे,' असे सोनालीने सांगितले.

'ऑस्करचे नामांकन मिळणे कामाची पावती आहे. ऑस्करबाबतीत विविध विचार असले, तरी मला देशाला एकदा तरी हा पुरस्कार मिळवून द्यायचाच आहे,' असा विश्वास सोनालीने व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गार्गी लेले, रिमिता चित्रकलेत प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लहान मुलांची कल्पकदृष्टी चित्रांच्या माध्यमातून पुन्हा दिसून आली, ती 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब'तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत. या स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन आणि विजेत्यांचा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात रविवारी पार पडला.

'पाटे डेव्हलपर्स' या स्पर्धेचे प्रायोजक होते. वीकेंडला आयोजिण्यात येणाऱ्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून ही चित्र स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये आठ ते १० वर्षं आणि १० ते १२ वर्षं असे दोन विभाग करण्यात आले होते. कर्वे रोड आणि युनिव्हर्सिटी रोडवरील पुणे सेंट्रल, सिंहगड रोडवरील अभिरूची मॉल आणि शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल अशा चार ठिकाणी ही स्पर्धा एकाच वेळी घेण्यात आली होती.

आठ ते दहा वर्षं वयोगटामध्ये गार्गी लेलेने 'माझा आवडता सण' म्हणून 'बैलपोळा' साकारून पहिला क्रमांक मिळवला. यामध्ये दिशा कडू (माझा आवडता सण, नागपंचमी) आणि धीरेन लोढा (स्वच्छ भारत, सुंदर भारत) यांनी अनुक्रमे दुसरा-तिसरा क्रमांक मिळवला.

दुसऱ्या वयोगटात रिमिता डेने 'ग्रीन कंट्री, क्लीन कंट्री' असा संदेश देत पहिला क्रमांक पटकावला. नियती खिंवसराने 'स्वच्छ भारत, सुंदर भारत' हे चित्र काढून दुसरा, तर अथर्व कळसेकरने 'माझा आवडता खेळ' म्हणून 'आंधळी कोशिंबीर' दाखवून तिसरा क्रमांक पटकावला. या दोन्ही वयोगटामध्ये प्रत्येकी वीस अशी चाळीस बक्षीसे उत्तेजनार्थ म्हणून देण्यात आली आणि एकूण २२५ चित्रे प्रदर्शनात मांडली होती.

अभिनेते आनंद इंगळे, 'पाटे डेव्हलपर्स'चे प्रमोद वाणी आणि व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब पाटे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला. किरकटवाडीतील 'पाटे डेव्हलपर्स'चा 'लाइफ मॅक्सिमा' प्रकल्पही असाच नागरिकांमधील गुण, संस्कार आणि संस्कृतीचे संवर्धन करणारा आहे,' असे वाणी यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोती’ सिनेमात मिळेल तृतीयपंथीयांची माहिती

$
0
0

पुणे : 'आम्ही मुले जन्माला घालू शकत नाही; पण दुसऱ्याच्या तृतीयपंथी मुलांना आधार, प्रेम, सर्वस्व देतो. प्रचंड वेदनेने आमचे आयुष्य भरलेले आहे. तृतीय पंथियांवर अनेक सिनेमे आहेत; पण 'कोती' या सिनेमात तृतीयपंथी जन्माला कसा येतो, तृतीय पंथियाची लैंगिक प्रक्रिया दाखवली आहे. हे कुणालाच माहीत नाही. हा सिनेमा सामाजिक न्याय विभागाच्या लोकांनी पाहावा. आमच्यासाठी धोरण ठरवताना याचा नक्कीच उपयोग होईल,' असे मत सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी मांडले.

सुहास भोसले दिग्दर्शित 'कोती' या सिनेमाचे स्क्रीनिंग एनएफएआयमध्ये नुकतेच झाले. या वेळी त्रिपाठी बोलत होत्या. आज्ञेश मुडशिंगकर, संजय कुलकर्णी, विनिता काळे, दिव्येश मेदगे यांनी यामध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. कुटुंबातील मोठा मुलगा तृतीयपंथी असल्याचे कळल्यानंतर होणारे हाल, समाजाची त्यांच्याबद्दलची अनास्था अशा गोष्टी 'कोती'मध्ये दाखवण्यात आल्या आहेत. पंकजा मुंडेंना सिनेमा दाखवणार असल्याचेही त्रिपाठी यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरारी आरोपीला सहा वर्षांनी अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खून प्रकरणात जानेवारी २००९मध्ये पुणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला आरोपी संचित रजेवर गेल्यावर फरारी झाल्यानंतर त्याला सहा वर्षांनी अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून त्याला अटक केली आहे. तेथे तो आपल्या कुटुंबासमवेत नाव बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

इखलाख फकीर मोहम्मद शेख (३४, रा. मंगळवारपेठ) असे त्याचे नाव आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात इखलाख याला कोर्टाने जानेवारी २००९मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याने मे महिन्यात येरवडा जेलमधून संचित रजा घेतली होती. रजेवर असताना तो त्याच्या कुटुंबीयांसमवेत फरारी झाला. दरम्यान, तो उत्तरप्रदेश येथील बिजनौर येथे खोट्या कागदपत्रांच्या आधारे नाव बदलून राहात होता. उत्तरप्रदेश पोलिसांनी भाडेकरूंची माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा इखलाखकडे केलेल्या चौकशीत तो पुण्यातील एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याचे समोर आले. त्याच्यावर बनावट कागदपत्रे बनविल्याच्या प्रकरणात बिजनौर येथील नगीना पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला उत्तरप्रदेश पोलिसांनी सोमवारी दुपारी ​शिवाजीनगर कोर्टात हजर केले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्याला समर्थ पोलिसांच्या हवाली करण्यात आले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गड-किल्ल्यांचे संवर्धन संघटनांकडे सोपवावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, शिवरायांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या आणि मराठी मनांमध्ये प्रेरणा जागृत करणाऱ्या गड-किल्ल्यांचे संवर्धन सरकारला शक्य होत नसेल, तर उद्योजक अथवा इतर अनेक संस्था व संघटनांना त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी द्यावी,' असे मत कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी सोमवारी व्यक्त केले.

गेली चार दशके सह्याद्री आणि गडकिल्ल्यांची भ्रमंती करून देशातील अकराशेहून अधिक किल्ल्यांना भेट देणारे आणि दोन हजारांहून अधिक किल्ल्यांचा ज्ञानकोश करणारे दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या एकसष्ठीनिमित्त त्यांचा सत्कार केल्यानंतर संभाजी महाराज बोलत होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मांडे यांच्यावरील 'सह्याद्रीपुत्र दुर्गमहर्षी प्रमोद मांडे' पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ लेखक प्रा. विलास पाटील, इतिहासाचे अभ्यासक भगवानराव चिले, पुस्तकाचे लेखक व संपादक प्रा. सतीश वाघमारे उपस्थित होते.

शिवराय माझे आयडॉल!
शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष असलेल्या गड-किल्ल्यांचा अभ्यास करताना शिवाजी महाराज किती असामान्य व्यक्तिमत्त्व होते, हे लक्षात आले. तेच माझे खरेखुरे आयडॉल झाले, असे मांडे म्हणाले. राम कुतवळ यांनी त्यांची मुलाखत घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चांगल्या विचारांची पेरणी गरजेची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'माणसाच्या अहंकाराचा मृत्यू होतो, तेव्हाच त्याचे खरे जीवन सुरू होते. जीवनात प्रत्येकाचे कर्म महत्त्वाचे आहे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा, हे व्रत प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. वाइट प्रवृत्तींना कमी करून सुंदर मनाची उभारणी करण्यासाठी चांगल्या विचारांची पेरणी गरजेची आहे,' असे मत बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तजयंतीनिमित्त आयोजित सप्तस्वरोत्सवाचे उद्घाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. इंदूरचे बाबामहाराज तराणेकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, शिरीष मोहिते, बाळासाहेब गायकवाड, नंदकुमार पाटील, शिवराज कदम जहागीरदार, उल्हास कदम, चंद्रशेखर हलवाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमात गिर्यारोहक उमेश झिरपे, समाजसेवक हरकचंद सांवला आणि नारायण महाराज यांना गुरुमहात्म्य पुरस्काराने गौरविण्यात आले. 'सर्व ताकद एकवटून संकटांचा सामना करायला हवा. आपल्या आयुष्यात जे घडवायचे आहे, त्याची निर्मिती आपणच करायला हवी,' असे डॉ. पाटील म्हणाले.

त्यानंतर ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांच्या दत्तवंदना भक्तीगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. डॉ. संजीव उपाध्ये, प्रथमेश लघाटे, निलाक्षी पेंढारकर यांनी विविध गीते सादर केली. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. युवराज गाडवे यांनी प्रास्ताविक केले. शिवराज कदम जहागीरदार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधक घडवावे लागतात

$
0
0

संस्कृत भाषा-वाङ्मय आणि बौद्ध संस्कृत तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांना साहित्य अकादमीचा 'भाषा सन्मान' पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वैदिक संस्कृत, अभिजात संस्कृत, बौद्ध संस्कृत (तंत्र मार्ग) या कार्यक्षेत्रातील भाषाविषयक योगदानासाठी बहुलकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी चिंतामणी पत्की यांनी साधलेला संवाद.


प्रश्न : अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार आपल्याला जाहीर झाला आहे, आपल्या काय भावना आहेत?

बहुलकर : या पुरस्कारासाठी मी अर्ज केला नव्हता, तसेच मला विचारणाही झाली नव्हती. माझ्या कामाची दखल घेऊन त्यांनी आपणहून पुरस्कार दिला आहे. याबद्दल साहित्य अकादमीच्या निवड समितीचे धन्यवाद.

प्रश्न : असहिष्णुतेमुळे पुरस्कार परत करण्याचे सत्र मध्यंतरी होते. साहित्य अकादमीचेच पुरस्कार परत करण्यात आले आहेत. अशा वातावरणात तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला आहे. या एकंदर परिस्थितीबाबत काय वाटते?

बहुलकर : तथाकथित असहिष्णू वादात मी पडत नाही. मी माझे काम करतोय. साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचा राजकारणाशी संबंध जोडणे चुकीचे आहे.

प्रश्न : संस्कृत भाषा-वाङ्मय आणि बौद्ध संस्कृत याविषयी काय सांगाल?

बहुलकर : गेली ४० वर्षे मी वैदिक ते आधुनिक संस्कृत यासाठी काम करतोय. इ. स. पूर्व पाचवे शतक ते इ. स. पाचवे शतक अशा सुमारे एक हजार वर्षांच्या कालखंडातील बौद्ध संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास सुरू आहे. या कालखंडाचा आणि त्याकाळच्या भाषेचा अभ्यास ही खूप अवघड प्रक्रिया आहे.

प्रश्न : बौद्ध धर्माचा संस्कृतशी संबंध आहे, हे अनेकांना माहीत नसते. नेमके काय आहे?

बहुलकर : बौद्ध संस्कृत हा विषय भारतामध्ये उपेक्षित राहिला आहे. बौद्ध धर्माची वचने संस्कृतमध्ये आहेत. पाली मिश्रित संस्कृत असे तिला म्हणता येईल.

प्रश्न : बौद्ध संस्कृत हा विषय दुर्लक्षित राहिल्यामुळे काहीच संशोधन होऊ शकलेले नाही का?

बहुलकर : काही प्रयत्न झाले आहेत. त्यातून अनेक अप्रकाशित ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. मोठ्या प्रमाणावर संशोधनाची गरज आहे. पण भारतात संशोधनाला उतरती कळा लागली आहे.

प्रश्न : संशोधक का घडत नाहीत?

बहुलकर : संशोधक घडवावे लागतात. ती प्रक्रिया सुरू आहे. पण यासाठी संस्कृत व तिबेटी भाषेचा अभ्यास हवा. लोक

उत्सुक दिसून येत नाहीत. बौद्ध संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास करणारे देशात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे उरले आहेत. हे काम सोपे

नाही. वर्षानुवर्षे त्यासाठी खर्ची घालावी लागतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रजपूत झोपडपट्टी रस्ता ब्लूलाइनमधून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्त्यांची आणखी करतानाच, ती चुकीच्या पद्धतीने केल्याचा फटका सलग दुसऱ्यांदा पालिकेला बसण्याची शक्यता आहे. विठ्ठलवाडी ते वारजे दरम्यानच्या नदीपात्रातील रस्त्यानंतर रजपूत झोपडपट्टी ते राजा मंत्री मार्गादरम्यानचा (म्हात्रे पूल डीपी रोड) नदीपात्रातील रस्ताही ब्लू-लाइनमधून जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, आज (मंगळवारी) पालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून, त्यानंतरच त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

महापालिकेने जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल आणि भिडे पूल ते रजपूत झोपडपट्टी दरम्यान नदीपात्रातून रस्ता तयार केला. त्यापुढे, हा रस्ता म्हात्रे पुलाखालून राजा मंत्री मार्गाला जोडण्यात येणार होता. हे उर्वरित काम केवळ पाचशे मीटरचे असले, तरी ते अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे, ते काम तातडीने पूर्ण करून वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करावी, यासाठी स्थानिक नगरसेवक अनिल राणे यांनी पाठपुरावा केला होता. मनसेने त्याबाबत आंदोलनही केले होते. मात्र, या रस्त्याचा रजपूत झोपडपट्टीपासून पुढे जाणारा मार्ग ब्लू लाइनमध्ये येत असल्याचा अहवाल पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सादर करण्यात आला आहे. पालिका आणि पाटबंधारे विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीत ही बाब उजेडात आली असून, आज मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीतही तो मांडण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, पालिका आणि पाटबंधारे अधिकारी मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करणार आहेत.

यापूर्वी, नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) विठ्ठलवाडी मंदिर ते वारजेपर्यंत पालिकेने नदीपात्रातून रस्त्याची आखणी केली होती. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) त्याला आक्षेप घेत, हा रस्ता उखडण्याचे आदेश दिले होते. या रस्त्याचे उदाहरण ताजे असतानाच, आता पुन्हा नदीपात्रातील या रस्त्याचीही अलाइनमेंट सदोष असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे, वाहतूक कोंडीतून सुटका होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना तूर्तास तरी त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनआरएचएम’कडून कायदा धाब्यावर

$
0
0

पुणे : कोणत्याही कर्मचाऱ्याच्या वेतनातून ठरावीक रक्कम प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) म्हणून कपात करताना काही हिस्सा संबंधित कंपनीने कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा नियम आहे. याच सरकारी नियमांना केराची टोपली दाखविण्याचे 'धाडस' 'राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान' (एनआरएचएम) या केंद्र सरकारच्या विभागाने दाखविले. दहा वर्षांपासून 'एनआरएचएम'अंतर्गत राज्यातील सुमारे २० हजार २०३ कर्मचाऱ्यांचा पीएफ कापण्यात न आल्याने त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात पुण्याच्या 'इपीएफ' कार्यालयाने 'एनआरचएम'च्या कृत्याची दखल घेऊन नोटीस जारी केल्याचे खात्रीलायक सांगण्यात आले. 'ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी एनआरएचएमअंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत राज्यात २० हजार २०३ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठरावीक रक्कम पीएफ म्हणून कपात करणे अपेक्षित आहे. देशात २००५पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारातून वेतन गेल्या दहा वर्षांपासून पीएफची कपातच करण्यात आली नाही. त्याच नियमामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले,' असा आरोप राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संघर्ष समितीचे राज्य प्रवक्ते डॉ. दिनेश घार्गे यांनी 'मटा'कडे बोलताना केला.

'पीएफ' कायद्याच्या कलम १९५२च्या कलम १६ नुसार 'एनआरएचएम'ने 'पीएफ' कपातीच्या अटी सूट मिळविली होती. त्यामुळे 'पीएफ' कपात केली जात नव्हती. तसेच कंपनीचा असेलला हिस्सा देखील अभियानाकडून न भरता कोट्यवधी रुपयांची बचत करण्यात आली. 'इपीएफ'च्या सात सप्टेंबरच्या परिपत्रकानुसार 'एनआरएचएम'ला 'पीएफ' कपातीतून ३१ एप्रिलपर्यंतच सूट होती. मुदत संपून गेल्यानंतरही गेल्या सहा महिन्यांपासून 'पीएफ' अद्यापही कपात केला जात नसल्याचे आढळले आहे. या संदर्भात पुणे विभागाच्या इपीएफ विभागाकडे कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. या संदर्भात 'एनआरएचएम'च्या विभागीय अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी इपीएफ विभागाने नोटीस जारी केली होती. मात्र त्या नोटिशीला उत्तर देण्यात आले नाही, अशी माहिती डॉ. घार्गे यांनी दिली.

याबाबत 'इपीएफ'चे सहायक आयुक्त व्ही. व्ही. गोरखिंडीकर, तसेच पीएफ आयुक्त (वसुली) हनुमंत प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. तर 'एनआरएचएम'च्या वित्त विभागाचे विभागीय अधिकारी व्ही. एल. गोकक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाचा पालिकेला दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी तडजोड शुल्कापोटी भरलेली रक्कम व्याजासकट परत मिळविण्यासाठी पालिकेविरोधातील दावा फेटाळून कोर्टाने बिल्डरला धक्का दिला आहे. बिल्डरने केलेले बेकायदा बांधकाम मानवतेच्या दृष्टिकोनातून नियमित करण्यासाठी पालिकेने तडजोड शुल्क स्वीकारले होते. ही रक्कम परत मिळावी, त्यासाठी बिल्डरने पालिकेवर ९.१० कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता.

कर्वेनगर सर्व्हे क्रमांक ९ येथे प्रथमेश कन्स्ट्रक्शनने 'अमृतकलश' हा प्रकल्प उभारताना संबंधित बाजूच्या इमारतीची मोकळी जागा पार्किंगसाठी दाखविली होती. मोठ्या प्रमाणात गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध होणार म्हणून नागरिकांनी या इमारतीमध्ये फ्लॅट विकत घेतले होते. पालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन बिल्डरने चुकीच्या पद्धतीने नागरिकांना फ्लॅट विकून त्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण 'महाराष्ट्र टाइम्स' ने उघडकीस आणले होते. त्यानंतर संपूर्ण शहरातच नव्हे तर नगरविकास खात्यामध्ये याचे जोरदार पडसाद उमटले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांची पाहणी केली होती. त्यावेळी या भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारत क्रमांक जी चे पार्किंग आणि सहा मजल्याचे प्रथमेश कन्स्ट्रक्शनने विनापरवाना केल्यास समोर आले होते. त्यामुळे त्यांना पालिकेने बीपीएमसी अॅक्ट २६० (१) ची नोटीस दिली होती. त्यानंतर संबंधित बिल्डरने एफएसआय उपलब्ध नसल्याने टीडीआर घेऊन पालिकेच्या बांधकाम खात्याकडे विना परवाना बांधकाम नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता.

या इमातीमध्ये राहत असलेल्या ४८ फ्लॅटधारकांवर अन्याय नको, या साठी पालिकेने मानवतेच्या दृष्टिकोनातून पालिका आयुक्तांच्या अधिकारात २९ हजार ८६० चौरस फूट विना परवाना बांधकामासाठी ३ कोटी ७ लाख, ५६ हजार ६२४ रुपये, तर विना परवाना वापरासाठी २ कोटी ४६ लाख ५ हजार ३०० रुपये असे ५ कोटी ५३ लाख रुपये घेऊन बांधकामाचा प्लॅन मंजूर केला. त्यानंतर या इमारतीचे भोगवटापत्र पालिकेने बिल्डरला दिले होते. या नंतर प्रथमेश कन्स्ट्रक्शनच्या वतीने शिरीष रिसवडकर यांनी यांनी पालिकेला ३० एप्रिल २०१३ ला नोटीस पाठवून पालिकेकडे भरलेली ५ कोटी ५३ लाख रुपयांची रक्कम आणि त्यावर प्रत्येक महिन्याला २ टक्के व्याजाची मागणी केली. त्यानंतर पुणे विभागाच्या वरिष्ठ दिवाणी कोर्टाकडे पालिकेच्या विरोधात ९ कोटी १० लाख रुपयांचा दावा दाखल केला होता. हा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. मालकापट्टी रेड्डी यांनी निकाली काढत पालिकेच्या बाजूने निकाल दिला. प्रथमेश कन्स्ट्रक्शनच्या वतीने रिसवडकर आणि आर्किटेक्ट जगदीश देशपांडे यांची साक्ष नोंदविण्यात आली. पालिकेच्या वतीने अॅड. ज्ञानदेव चौधरी यांनी बाजू मांडली. पालिकेचे मुख्य विधी अधिकारी रवींद्र थोरात, विधी अधिकारी अॅड निशा चव्हाण यांनी यासाठी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकी देणारे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास थांबवावा, तपास न थांबवल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन सीबीआयचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (२० डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास सांगली येथे ही कारवाई करण्यात आली. सोमवारी त्यांना खडकी कोर्टात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी चंद्रकांत दिनकर मोहिते (वय ४१) आणि त्याची पत्नी संगीता चंद्रकांत मोहिते (वय २५, दोघेही रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांच्या विरोधात खडकी पोलिस ठाण्यात खंडणी व जीवे मारण्याची धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कमलाकर ताकवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडके हे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात (सीबीआय) पोलिस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान त्यांना दोन डिसेंबरला मोबाइलवर मेसेज आला. त्यामध्ये दाभोलकर यांच्या हत्येचा तपास थांबवावा असा निरोप देण्यात आला होता. त्यावेळी घोडके यांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतली नाही.

त्यानंतर नऊ डिसेंबरला त्यांना पुन्हा एकदा मेसेज आला. त्यामध्ये दाभोलकर यांच्या हत्येचा तपास थांबवावा, तपास न थांबवल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच, २५ लाखांची खंडणीही मागण्यात आली होती. या वेळी मात्र, घोडके यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्या आधारे खडकी पोलिस ठाण्यात अज्ञात खंडणीखोराविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली.

..

अनेकांना पाठवले मेसेज

या प्रकरणाचा तपास करीत असताना, मोबाइल क्रमांकाचा छडा लावला असता हा कराड येथील नंबर असल्याचे लक्षात आले. हा क्रमांक सुरू असून, मोहिते पतीपत्नीच्या नावावर असल्याचेही समोर आले. त्या आधारे त्यांचा पत्ता शोधून खडकी पोलिसांचे पथक कराडला रवाना झाले. त्यांनी या दोघांना सापळा रचून अटक केली. मोहिते पती-पत्नी दोघेही शेती करतात, त्यांची स्वतःची शेती आणि राहते घर आहे. त्यांनी हा प्रकार का केला याचा अद्याप तपास लागलेला नाही. मात्र, अशा प्रकारचे तसेच काही अश्लील मेसेज त्यांनी अन्य काही जणांनाही पाठवले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाज कुणाचा...रमणबाग, अभिनवचा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आवाज कुणाचा...रमणबाग, अभिनवचा! अशी आरोळी भरत नाट्य मंदिरात सोमवारी घुमताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. निमित्त होते.. चंद्रसूर्य रंगभूमीतर्फे आयोजित २७ व्या आंतरशालेय एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या 'इनव्हिजिबल एनिमी' या एकांकिकेने सांघिक मुलांच्या विभागात तर, अभिनव विद्यालय मराठी माध्यम या शाळेच्या 'गोष्ट पृथ्वी मोलाची' या एकांकिकेने सांघिक मुलींच्या विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावित करंडकावर नाव कोरले.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. फुलचंद चाटे, बाजीराव बेल्हेकर, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्य, दादासाहेब आगलावे, श्रीकांत नाईक, संजय ढगे, उमेश जाचक, किरण नरसाळे, अरविंद सूर्य आदी या वेळी उपस्थित होते. प्रसाद मराठे अध्यक्षस्थानी होते.

'इनव्हिजिबल एनिमी' या एकांकिकेतील प्रमुख भूमिकेसाठी मंथन महाडिक याला अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तर 'गोष्ट पृथ्वी मोलाची' या एकांकिकेतील प्रमुख भूमिकेसाठी अनुष्का गोखले हिला अभिनयाच्या प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले. सांघिक मुलांच्या विभागात द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे 'न संपणारी गोष्ट' या मॉडर्न हायस्कूलच्या एकांकिकेला व 'पानगळ' या सिग्नेट पब्लिक स्कूलच्या एकांकिकेला मिळाला.

सांघिक मुलींच्या विभागामध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे 'केवळ एका पेनासाठी' या नूमविच्या एकांकिकेला व 'आई' या अहिल्यादेवी हायस्कूलच्या एकांकिकेला मिळाला. रवींद्र सातपुते यांना 'इनव्हिजिबल एनिमी' या एकांकिकेच्या दिग्दर्शनासाठी व लेखनासाठी प्रथम पुरस्कार मिळाला. वंदना आणेकर यांना 'गोष्ट पृथ्वी मोलाची' या एकांकिकेच्या दिग्दर्शनासाठी द्वितीय क्रमांक मिळाला. नीलेश गावडे, हर्षवर्धन पानसरे, प्रणव मालपोटे, अभिषेक शिंदे, ओम गोरे, सार्थक सातपुते, पुष्कराज सैद, सानिका ओंकार, वैभवी रूईकर, गायत्री खेडकर, अपूर्वा देशपांडे, संपदा कुलकर्णी, ऋचिका पाटील, सलोनी तोडकर यांना अभिनयासाठी गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रदीप पाटसकर यांनी केले. परीक्षक म्हणून रमेश वाकनीस यांनी काम पाहिले.

'सर्जनशील लोकांमुळे वेदना घटतील'

समृद्ध, सर्जनशील लोक अधिक संख्येने समाजात निर्माण झाले तर समाजातील वेदना कमी होतील, अशी आशा मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली. अभिनय म्हणजे फक्त नक्कल करणे नव्हे तर सत्याचा आभास निर्माण करणे होय, असे सांगून रंगभूमीवर शिकण्यासारखे खूप काही आहे. एकांकिकेला कमी महत्व देऊ नये, त्याचवेळी अभ्यास सांभाळा. आयुष्यात या दोन्हीचा उपयोग होईल, अशा शब्दांत तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच कुटुंबातील चौघांना जलसमाधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे


शिर्डीहून देवदर्शन करून पुण्याकडे निघालेल्या मोटारीचे टायर फुटून ती कॅनॉलमध्ये पडली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश आहे. पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथील कुकडी कॅनॉलमध्ये रविवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. कॅनॉलमध्ये पन्नास मीटर अंतरावरच सोमवारी सायंकाळी मोटार आढळून आली असून, त्यामध्ये चौघांचे मृतदेह मिळाले आहेत.


मोतीलाल शिवलाल जाधव (वय ३४), त्यांची पत्नी दीपाली (वय ३०), मुलगा अदित्य (वय ११) आणि यशराज (वय ७) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जाधव कुटुंबीय पुण्यातील मुंढवा परिसरातील सरोदे कॉलनी येथे राहण्यास आहेत. जाधव यांचे वडील वाडेगव्हाण परिसरात आश्रमशाळा चालवितात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय रविवारी सकाळी शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनानंतर जाधव कुटुंबीय रविवारी रात्री मोटारीतून पुण्याकडे निघाले होते. नारायण गव्हाण गावाच्या अगोदरच जाधव यांनी अकराच्या सुमारास म्हणसे फाटा येथील टोलनाक्यावर असताना वाडेगव्हाण येथील त्यांच्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांना फोन केला होता. शिक्षण संस्थेला भेट देण्यासाठी येत असल्याचे सांगितले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते पोहचले नाहीत. जाधव यांना संपर्क केल्यानंतर त्यांचा मोबाइल बंद येत होता. त्यामुळे शिक्षकांनी याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाइकांना दिली. नातेवाइकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. जाधव यांच्या मोबाइलचे लोकेशन काढले असता ते नारायण गव्हाण येथील कुकडी कॅनॉलपर्यंतच दाखवत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता मोटारीचा तुटलेला भाग कॅनॉलजवळ पडलेला दिसला. त्यामुळे जाधव कुटुंबीयांची मोटार कॅनॉलमध्ये पडल्याचे दिसून आले.



सुपा पोलिसांनी स्थानिक गावकरी बळीराम शेळके, करण शेळके आणि इतरांच्या मदतीने मोटारीचा कॅनॉलमध्ये शोध सुरू केला. त्यावेळी रोडपासून पन्नास मीटर अंतरावर मोटार पाण्यात आढळून आली. सायंकाळी पाचच्या सुमारास क्रेनच्या मदतीने मोटार बाहेर काढल्यानंतर मोटारीमध्ये चौघांचे मृतदेह आढळून आले. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



..



दृश्य हेलावून टाकणारे



पाण्याबाहेर मोटार काढण्यात आल्यानंतर मोटारीत मोतीलाल, त्यांची पत्नी दीपाली, मुले आदित्य व यशराज यांनी एकमेकांना घट्ट धरल्याचे पहावयास मिळाले. मोटारीच्या एका टायरमध्ये हवा नव्हती. बहुदा मोटारीचा टायर फुटून ती कालव्यात कोसळली असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करण्यात आला आहे. मोटार पाण्यात पडल्यानंतर चौघांनी जिवाच्या आकांताने एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या. मोटारीचे दार तोडल्यानंतरचे हे दृश्य पाहून अनेकांच्या मनात चर्र झाले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मिनिटांची फेरपाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोलनाक्यावरून तीन मिनिटांच्या आत वाहनचालकांना सोडण्यात येते का, याची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे. या आठवड्यात सलग चार दिवस सुट्या आल्याने या कालावधीत टोलनाक्यावर गर्दी होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने पाच आणि सहा डिसेंबर रोजी टोलनाक्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्याबाबतचा अहवाल प्रशासनाकडे दिला आहे. त्यामध्ये १५ सेकंदांच्या आत वाहने ही टोलनाका पार करून गेल्याचे निदर्शनास आले होते. 'या आठवड्यात २४ ते २७ डिसेंबर या कालावधीत सलग सुट्या आल्या आहेत. त्यामुळे टोलनाक्यावर गर्दी होणार असल्याने पुन्हा टोलनाक्याची पाहणी केली जाणार आहे. या पाहणीनंतर अचानकपणेही पाहणी होणार आहे,' असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सोमवारी सांगितले.

टोलनाका ओलांडून जाण्यासाठी तीन मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागल्यास संबंधित वाहने टोल न घेता सोडावीत, असे आदेश जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये दहा ते पंधरा सेकंदात टोल भरून वाहने गेल्याचे आढळले होते. वाहने तीन मिनिटांपूर्वीच टोलनाक्यावरून जाऊ शकतात, हे पाहणीवरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे ही तत्परता कायम ठेवण्याच्या सूचना राव यांनी दिल्या होत्या. गेल्या वेळी केलेल्या पाहणीत काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यामध्ये अवजड आणि हलकी वाहने एकाच लेनमधून जात असल्याचे दिसून आले. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने ​केल्या आहेत. या टोलनाक्यावर बारा लेन आहेत. त्यापैकी काही लेन बंद असतात. त्यामुळे सर्व लेनचा वापर करण्याचे सुचविण्यात आले आहे. क्लोज सर्किट टीव्हीचे (सीसीटीव्ही) बॅकअप घेण्यात येत नाही. त्याची व्यवस्था करण्याचेही प्रशासनाने आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मशिनमध्ये नाणी टाका; तिकिटे मिळवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीवर होणारी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्टेशनवर चार सीओ-टीव्हीएम (व्हर्सोटाइल) मशिन बसविले आहेत. प्रवासी तिकिटाची रक्कम मशिनमध्ये टाकून, तिकीट मिळवू शकतील. रोख रक्कम, नाणी किंवा स्मार्ट कार्डचा वापर करूनही तिकीट काढता येणार आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवर करंट तिकीट विक्रीच्या अनेक खिडक्या आहेत. मात्र, सर्व खिडक्यांवर प्रवाशांची गर्दी असते. गाडी सुटण्याची वेळ जवळ आली, तरी काही केल्या रांग पुढे सरकत नाही, अशा परिस्थितीचा प्रत्यय अनेकांना वारंवार येतो. त्यामुळे अनेकदा गाड्या सुटतात. आता टीव्हीएम मशिनमुळे प्रवाशांना रांगेचा, गर्दीचा सामना न करता तिकीट मिळणार आहे. प्रवासी स्वत: ते मशिन हाताळू शकणार आहेत. पुणे स्टेशनवर रविवारपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या मशिनवरून प्रवाशांना एटीव्हीएम मशिनचे स्मार्टकार्ड रिचार्ज, तिकीट काढणे,प्लॅटफार्म तिकीट, सिझन तिकिटे सहज मिळू शकणार आहेत.

पुणे विभागात पुणे स्टेशनसह कोल्हापूर आणि मिरज रेल्वे स्टेशनवर हे मशिन बसविण्यात आले असून, ते लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या मशिनचा वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार वाळू माफियांवर इंदापूर तालुक्यात मोक्का

$
0
0

भिगवण पोलिसांची कारवाई

बारामती : भिगवणमध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबार करणाऱ्या चार वाळू माफियांना भिगवण पोलिसांनी थेट मोक्का कायदा लावल्याने माफियांवर आता मोठी जरब बसणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तहसीलादारांच्यावर टिपर घालून मारण्याचा प्रयत्न करणारे वाळू माफिया इंदापुरातील महसुल पथकाला उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्याचेही धाडस केले होते. काही दिवसापूर्वी २६ सप्टेंबर रोजी सागर राजपूत, संजय तनपुरे, मनीष तनपुरे, शरद चौरे या चौघांनी वाळूच्या कारणावरून विनोद बंडगर आणि महेंद्र जगताप यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात विनोद बंडगर याचा मृत्यू झाला होता. अशाच पद्धतीचे गुन्हे या वाळू माफियांवर असल्याने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाईची प्रस्ताव बनवल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माफियांवर मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल केले असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.

वाळू माफियांना मोक्का लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे राज्यातील संघटीत बनू लागलेल्या वाळू माफियांच्या साम्राज्याला गृह विभागाने हा जोरदार तडाखा दिल्याने माफियांमध्ये आता दहशत बसण्यास मदत होईल. मोक्का कायदा लावल्याने वाळू माफियांना आता मोठी जरब बसणार आहे.

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, भिगवण

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

- डॉ. जय जाधव, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात खंडपीठ हवेच

$
0
0

खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पुणे शहरात हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेमध्ये शुक्रवारी (१८ डिसेंबर) प्रायव्हेट मेंबर बिल सादर केले. १९७८साली पुणे आणि औरंगाबाद येथे हायकोर्टाचे खंडपीठ सुरू करावे, असा विधी मंडळाचा ठराव झाला होता. त्या अनुशंगाने १९८९साली औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले. पुणे येथे हायकोर्टाचे खंडपीठ सुरू करण्याबाबत आजतागायत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे बारणे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण विविध प्रकारचे दावे हायकोर्ट, मुंबईमध्ये दाखल होतात. त्या दाव्यांपैकी ४० टक्के दावे पुण्यातील आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरील नागरिकांचे दावे मुंबई हायकोर्टात दाखल होत असतात परंतु, हायकोर्टाचा कामाचा ताण वाढत असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुणे येथे हायकोर्टाचे खंडपीठ केल्यास अनेक नागरिकांना होणारा त्रास दूर होईल आणि मुंबई हायकोर्टावरील कामाचा ताण कमी होईल, ही बाब निदर्शनास आणण्यासाठी बारणे यांनी संसदेमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल सादर केले आहे. मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुणे येथे लवकर सुरू व्हावे, अशी मागणी त्यांनी संसदेत केली.

धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी बारणे यांनी संसदेमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडून सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाचे लोक स्वातंत्र्यानंतरही सतत संघर्ष करत आहेत. परंतु, त्यांना अजूनही आरक्षण मिळालेले नाही. भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती सूची क्र. ३६मध्ये 'धनगड' हा उल्लेख आहे. 'धनगड' आणि 'धनगर' हे दोन्ही शब्द एकाच समाजासाठी वापरले जातात. महाराष्ट्र राज्यामध्ये 'धनगर' समाज असून 'धनगड' समाज अस्तित्त्वात नाही.

महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या ११ टक्के म्हणजेच १ कोटी ३० लाख आहे. राज्यात धनगर समाज अत्यंत मागासलेला असून समाजामध्ये उच्च दर्जा मिळविण्यासाठी सतत संघर्ष करत आहे. महाराष्ट्र सरकारने या समाजाच्या विकासासाठी कोणतीही योजना अंमलात आणलेली नाही. केंद्र सरकारने या समाजास आरक्षण दिले, तर या समाजातील लोक मुख्य प्रवाहात येतील व त्यांचा विकास होईल. या अनुशंगाने खासदार बारणे यांनी लोकसभेमध्ये विधेयक मांडून सरकारचे लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिनविरोधचे प्रयत्न फसले

$
0
0

काळभोरनगर पोटनिवडणुकीत भाजप, सेना रिंगणात

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खुनानंतर घेण्यात येणारी काळभोरनगरची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. पण दादांच्या अनेक सूचनांना बगल देणाऱ्या स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी म्हणावे तेवढे प्रयत्न केले नसल्याचे दिसत आहे. भाजपच्या आयात उमेदवारासह शिवसेना आणि टेकवडे यांच्या पत्नी सुजाता टेकवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महापालिकेची फेब्रुवारी २०१२मध्ये झालेली निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली. काळभोरनगर प्रभाग क्रमांक २६ मधील 'अ' आणि 'ब' या दोन्ही जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. त्यातील 'अ' जागेवर राष्ट्रवादीचे अविनाश टेकवडे निवडून आले होते. तीन सप्टेंबर २०१५ रोजी मोहननगर येथील राहत्या घराजवळ डोळ्यात मिरचीपूड टाकून भोसकून त्यांचा खून करण्यात आला. टेकवडे यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेवर येत्या १० जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे.

या प्रभागात आता निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघा आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी बिनविरोधसाठी मनापासून प्रयत्न केले नसल्याने अखेर सर्वच राजकीय पक्षांनी या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश लंगोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून विजय गुप्ता यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. भाजप व शिवसेनेने उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे.

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी (२२ डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या आगामी महापालिका निवडणुकीची झलक या पोटनिवडणुकीत दिसून येणार आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी आणि अविनाश टेकवडे यांच्या पत्नी सुजाता टेकवडे नावावर सर्वपक्षीयांचे शिक्कामोर्तब व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. प्रत्यक्षात हे प्रयत्न निष्फळ ठरले. मात्र, अद्याप अर्ज माघारीची मुदत बाकी असून, तोपर्यंत काय हालचाली होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट्रल एजन्सीचा ‘वॉच’

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड या भागातून 'आयएस' या दहशतवादी संघटनेबाबत सर्वात जास्त इंटरनेट सर्च होत असल्याची माहिती एका सर्व्हेक्षणातून काही महिन्यांपूर्वी पुढे आली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी 'आयएस'च्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या १६ वर्षीय मुलीचे 'एटीएस'ने समुपदेशन करत तिला यातून बाहेर काढले. हा घटनाक्रम लक्षात घेता केंद्रीय तपास आणि गुप्तचर यंत्रणांनी उद्योगनगरीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

शिक्षणासाठी बाहेर राज्यांसह देशातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शहरात जास्त आहे. त्यातच पिंपरी-चिंचवडमधून भारतात चिंचवड हे तिसऱ्या क्रमांकाला 'आयएस' सर्च करणारे शहर म्हणून मध्यंतरी त्याची नोंद झाली. हा सर्व्हे खासगी संस्थेचा असल्याचे सांगत यंत्रणांनी त्याला 'कॅज्युअली' घेतले; पण त्यानंतर पुण्यातून १६ वर्षांची मुलगी थेट दुसऱ्या- तिसऱ्या फळीतील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे उघड होताच तपास यंत्रणांची झोप उडाली. फेसबुकसह अन्य सोशल नेटवर्किंग साईटवरून 'आयएस' ने 'सायबर वॉर' देखील छेडले आहे.

'आयएस'संदर्भातील साइट्समध्ये सुमारे १६ ते ३० या वयोगटातील तरुणांना अधिक रस असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब आणि गुगल या सर्च इंजिनवरून 'आयएस'ची माहिती घेतली जाते. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड बरोबरीनेच बेंगळुरू आणि हैदराबादसह गुवाहाटी मध्ये देखील 'आयएस'बाबत नेटकऱ्यांना भलताच रस आहे.

क्रूर तसेच भावना भडकविणारे व्हिडिओ आणि माहिती शेअर करून तरुणांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातच पिंपरी-चिंचवडमधील एकंदरीत इंटरनेट यूजर दिवसेंदिवस वाढत चालल्याचे सर्व्हेक्षण नोंदविण्यात आले आहे. स्मार्ट फोन असो; वा कम्प्युटर, इंटरनेटवरून कोण काय सर्च करतो, यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा 'वॉच' असतो. त्यामुळे कोणती साइट अथवा माहिती कोठून किती प्रमाणात सर्च केली जाते याची माहिती उपलब्ध होत असते.

'आयएस' विविध प्रकाराबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून देखील भारतात शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर आणि तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. मनपरिवर्तन करण्यात आलेल्या तरुणीशी अनेक युवक-युवती संपर्कात असल्याचे देखील एटीएससह तपास यंत्रणांच्या चौकशीत पुढे आले आहे. पुणे शहरात सर्वच तपास यंत्रणांनी आपले सोर्स भक्कम केले आहेत. त्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा पिंपरी-चिंचवड आणि जवळच्या मावळ परिसरात वळविला. एटीएसने गेल्या काही दिवसांमध्ये या परिसरात केलेल्या कारवाईंमुळे ही बाब उघड झाली होती. भविष्यातील धोका लक्षात घेता सेंट्रल एजन्सीने (केंद्रीय तपास आणि गुप्तचर) त्यामुळे पिंपरी-चिंचवडबाबत अधिक सतर्क झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images