Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तिसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

$
0
0

पुणेः कोंढवा परिसरात बांधकाम साइटवर काम करणाऱ्या कामगाराचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचानन रामचंद्र पंडित (वय ४०, रा. शोभा कंपनी, लेबर कॅम्प, कोंढवा) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी बांधकाम साइटचा सुपरवायझर रामप्रकाश नारायण नवाडे (वय ३३, रा. पोकळे मळा, पारगेनगर, कोंढवा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा ब्रुद्रक येथे शोभा डेव्हलपर्स कंपनीतर्फे 'शोभा ओरियन ब्लॉक ३' या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी सोमवारी पंचानन हे तिसऱ्या मजल्यावर काम करत होते. काम करत असताना त्यांचा तोल जाऊन खाली पडले. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0

पुणेः मोटारसायकल घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून सासरच्या व्यक्तींकडून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना हडपसरमध्ये घडली. या प्रकरणी पती व सासू सासऱ्याच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पना सचिन म्हस्के (वय १९, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कल्पनाचे वडील मधुकर जाधव (रा. उस्मानाबाद) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पती सचिन सतीश म्हस्के आणि सासू-सासरे यांच्यावर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना आणि सचिन यांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ते हडपसर येथे राहात होते. मोटारसायकल घेण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणावेत म्हणून सासरच्या मंडळींनी कल्पनाकडे तगादा लावला होता. तसेच, तिला शिविगाळ आणि मारहाण करण्यात येत होती. या छळास कंटाळून कल्पनाने ५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान ७ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाअखेर राज्याचे फेरीवाला धोरण

$
0
0

पुणेः राष्ट्रीय फेरीवाला कायद्याच्या धर्तीवरच राज्यातील फेरीवाले-पथारीवाल्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या नियमावलीवर राज्याच्या विविध भागांतून शंभरहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींचे वर्गीकरण केले जाणार असून, त्यानुसार, राज्याचे धोरण निश्चित केले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल.

केंद्र सरकारच्या फेरीवाला कायद्यानुरूप राज्यातील फेरीवाले, पथारीवाल्यांसाठी स्वतंत्र अधिनियम तयार केले जात आहेत. त्याचे प्रारूप सरकारने नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्यावरील, हरकती-सूचनांनी मुदत संपल्यानंतर अधिनियमांना अंतिम स्वरूप देण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीची पहिली बैठक नुकतीच झाली. या बैठकीत, हरकती-सूचनांना आढावा घेण्यात आला असून, प्राधान्याने त्याचे वर्गीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती समिती सदस्य आणि पालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप यांनी दिली.

सरकारने अधिनियमात मांडलेल्या विविध तरतुदींबाबत हरकतींद्वारे सविस्तर सूचना करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश सूचना लिखित स्वरूपात असून, काही ई-मेलद्वारे प्राप्त झाल्या आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही नियमावली सर्वांसाठी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी शक्यताही जगताप यांनी वर्तविली. सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि केंद्र सरकारच्या कायद्यानुसार रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा न आणता फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करणे, प्रमुख रस्ते आणि चौकातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे आणि शहरातील रस्ते आणि फूटपाथ मोकळे ठेवणे, या उद्देशाने ही नियमावली तयार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनानंतर ‘फिल्मवॉर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी आंदोलनावर चित्रपट तयार करण्याचे काम हाती घेतल्यानंतर आता थेट चित्रपट परीनिरीक्षण मंडळ अर्थात फिल्म सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी एफटीआयआयमधील आंदोलनावर 'अॅक्शन' म्हणणार आहेत. निहलानी आंदोलनावर माहितीपट तयार करणार असून, विद्यार्थी कसे देशविरोधी आहेत, हे त्यातून दाखवले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या चित्रपटातून सरकारचे हुकूमशाही रूप, तर निहलानी यांच्या माहितीपटातून विद्यार्थ्यांचे देशविरोधी रूप समोर आणण्यात येणार असल्याने एफटीआयआयमधील आंदोलनातून आता 'फिल्मवॉर' सुरू होणार आहे.

सरकारने काहीच प्रतिसाद न दिल्याने विद्यार्थ्यांनी कंटाळून १३९ दिवसांनंतर आपला संप मागे घेतला. संपाच्या या महाभारतामुळे आपल्या पदरात काय पडले, हे विद्यार्थ्यांना अद्याप उमगले नसले, तरी ते 'महाभारत' आता एका चित्रपटाच्या रुपाने समोर येणार आहे. आंदोलनाचे 'ते १३९ दिवस' कॅमेऱ्यात चित्रित झाले असून, साक्षी या एडिटिंग विभागातील विद्यार्थिनीने त्यावर चित्रपट बनविण्याचे काम सुरू ठेवले आहे. याच वेळी आता विद्यार्थ्यांच्या विरोधातील माहितीपट निहलानी यांच्या निमित्ताने समोर येणार आहे.

'एफटीआयआय'च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या झालेल्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संप पुकारला होता. आंदोलनामध्ये घडणाऱ्या सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्याची संपूर्ण जबाबदारी साक्षीने घेतली होती. संचालकांना घेराव घालण्यापासून विद्यार्थ्यांच्या अटकसत्रापर्यंतच्या सर्व घटनांचे चित्रण तिने आपल्या कॅमेऱ्यामध्ये केले होते. या आंदोलनादरम्यान छोट्या छोट्या घटनांवर काही विद्यार्थ्यांनी १२ शॉर्टफिल्म केल्या असून, या सर्वांचा मिळून एक चित्रपट तयार होत आहे. यामध्ये सरकार कसे हुकूमशाही आहे, हे दाखविण्यात येणार आहे. त्याच वेळी निहलानी विद्यार्थी कसे देशविरोधी आहेत, हे माहितीपटातून समोर आणणार आहेत. याबाबत निहलानी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा नवा लोगो वापरायलाच हवा

$
0
0

महापौरांची कडक भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची लेटरहेड, महापालिकेच्या कार्यक्रमाची निमंत्रणे आणि पालिकेच्या उपक्रमांचे बोर्ड-बॅनर अशा सर्व ठिकाणी पालिकेच्या नव्या बोधचिन्हाचा (लोगो) वापर करण्याचे फेरआदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मंगळवारी दिले. नगर सचिवांमार्फत सर्वांना त्यासंबंधीचे पत्र तातडीने पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

महापालिकेने काही दिवसांपूर्वी शहरासाठी स्वतंत्र लोगो तयार करून घेतला. शहराच्या ब्रँडिंगसाठी हा लोगो सर्व ठिकाणी वापरण्यात येईल, असे जाहीर केले गेले. महापौरांव्यतिरिक्त या लोगोचा वापर कोणीच करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. हा लोगो वापरण्याचे आदेश महापौरांनी गेल्या महिन्यातच दिले होते. तरीही अद्याप पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून हा लोगो दुर्लक्षिलाच गेला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने त्यासंबंधीचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध केले. त्याची, दखल घेऊन महापौरांनी नगरसचिव खात्यामार्फतच हा लोगो वापरण्याचे बंधन घालणारे पत्र सर्वांना पाठवा, अशी सक्त ताकीद दिली. सर्व अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या लेटरहेडवर, पालिकेच्या इतर सर्व कागदपत्रांवर, पाकिटांवर; तसेच विविध कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवरही या लोगोचा वापर व्हायलाच हवा, अशी तंबी महापौरांनी भरली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत महापालिकेने या लोगोचे अनावरण केले होते. त्यानंतर, हा लोगोचा वापर सर्वत्र केला जाणे अपेक्षित असताना, पालिकेच्या वेबसाइटशिवाय कुठेच त्याचा प्रसार, प्रचार केला जात नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी पाच जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोन महिन्यांपूर्वी कात्रज येथून तरुणाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी मंगळवारी पाच आरोपींना अटक केली. दोन महिन्यापुर्वी ही घटना कात्रज परिसरात घडली होती.

संतोष खंडू बोडके (वय ३२), रोहित उर्फ बंटी शिवाजी पिलाणे (वय २२), नीलेश उर्फ बाळा रमेश चव्हाण (वय २३) व मनोज कैलास जगताप (वय ३२, सर्व रा. दांडेकर पूल), योगेश शंकर सावंत (वय २४, दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राजू भेगडे (वय २६, रा. पारी कंपनी रोड, नऱ्हे गाव) याचे २९ सप्टेंबर रोजी अपहरण करून, खून झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशावरून आरोपी व भेगडे यांची वादावादी झाली होती. त्यामुळे २९ सप्टेंबर रोजी आरोपींनी भेगडे याचे कात्रज दूध डेअरी येथून अपहरण केले होते. त्यानंतर त्याचा खून केला होता. या गुन्ह्याचा तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत होते. त्यांनी बातमीदारामार्फत आरोपींची माहिती काढून विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींना अटक केली. अटक आरोपींकडे चौकशी केली असता, मृत राजू भेगडे याच्या अंगावरील सोन्याचे दागिने, पैसे व हत्यारे ताम्हिणी घाटात पडल्याचे सांगितले. पोलिसांनी या ठिकाणची तपासणी केली. मात्र, त्यांना काहीच मिळाले नाही. आरोपी पुरावा लपवत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता पळून गेलेला आरोपी योगेश सावंत याच्याकडे सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले. तसेच, घटनेत वापरण्यात आलेले हत्यार कात्रज बायपास महामार्गावरील कचराकुंडी येथे पुरले असल्याची माहिती दिली. पया प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत शिंदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन चालूच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांना राज्यात मंत्रिपद दिले, तरी स्वाभिमानी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागे- पुढे पाहणार नसल्याची स्पष्टता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पुण्यात केली. तसेच, बिहार निवडणुकांच्या निकालांबाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी या निमित्ताने सांगितले.

स्वाभिमानी पक्षाच्या राज्य मेळाव्याचे मंगळवारी पुण्यात आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी या बाबी स्पष्ट केल्या. 'उसाला एक रकमी वाजवी दर मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली होती. त्यानंतरही महसूलमंत्री एकनाथ खडसे शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने वाजवी दराची रक्कम देण्याविषयी बोलत असतील, तर ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते,' असा टोलाही त्यांनी या निमित्ताने लगावला. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा, त्यानंतरच्या टप्प्यात तुलनेने मवाळ झालेली 'स्वाभिमानी'ची भूमिका आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नानाविध प्रश्नांविषयीही शेट्टी यांनी या वेळी पक्षाची भूमिका मांडली.

शेट्टी म्हणाले, 'विधानसभा निवडणुकांमधील सत्तांतरात स्वाभिमानीचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतरही केवळ आमचे उमेदवार पराभूत झाले, म्हणून आम्हाला मंत्रिपद देणार नसतील, तर ते चुकीचे आहे. सत्तेत येणे हा आमचा अधिकार आहे. मात्र सत्तेमध्ये घेतले नाही, म्हणून पक्ष-संघटना काम थांबवणार नाही. आत्तापर्यंत उसाला वाजवी दर मिळण्यासाठी भांडावे लागत होते. आता सरकारने ऊस दर नियंत्रण समिती असल्याने, संघर्षाची तशी गरज भासली नाही. याचा अर्थ शेतकऱ्यांचा समस्या सुटल्या असे नाही.' राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी पक्षाची भूमिका यापूर्वीच स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यकर्त्यांकडून अद्याप कोणताही संपर्क झाला नसून, पक्षानेही तसे प्रयत्न केले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहुजी स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार : बापट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'लहुजी वस्ताद साळवे यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांचा इतिहास स्मारकाच्या रुपाने जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. संगमवाडी येथील लहुजी स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल,' असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी नुकतेच दिले.

लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रा. मच्छिंद्र सकटे, बाबासाहेब गोपले, रमेश बागवे, हनुमंत साठे, नगरसेविका आशा साने, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, प्रकाश वैराळ, दत्ता जाधव, रवी आरडे आदी उपस्थित होते.

'साळवे हे महात्मा फुले, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके आदींना गुरुस्थानी होते. त्यांनी अनेक क्रांतीकारक निर्माण केले. त्यांच्या स्मारकासाठी शासन प्रयत्नशील आहे,' असे बापट म्हणाले. 'दलित समाजात जन्मलेल्या साळवे यांनी देशासाठी प्रचंड योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव नियोजित स्मारकाद्वारे करण्यात येईल,' असे कांबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निहार’च्या ८ जणांवर दोषारोपपत्र दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वंचितांसाठी कार्यरत लोहगाव येथील निहार संस्थेत सुरक्षारक्षकाने १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी तसेच सांगली येथे बाळंतपण केल्याच्या प्रकरणात सुरक्षारक्षक आणि त्याला पाठीशी घातल्याबाबत संस्थेतील आठजणांविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी जितेंद्र सोमनाथ गाडे (३०, रा. अहमदनगर), संचालक सुनीता गजानन जोगळेकर (४९, बुधवार पेठ), अकाउंटंट देवयानी दिनेश गोंगले (४३, शुक्रवार पेठ), अधीक्षक माया शरण्णाप्पा नवाडे (३६, नेवाडा, जि. लातूर), संचालक मीना शिरीष कुर्लेकर (५६, नारायण पेठ), लिपिक चैत्राली चंद्रकांत वाघ (५२, श्रीराम सोसायटी, वारजे जकातनाका), व्यवस्थापन सहायक जयश्री मोहन शिंदे (५१, वडगांवशिंदे, गुलाबहरी वस्ती, हवेली), संस्थापक विलास सुंदर चाफेकर (७३, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) या आठ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता सदानंद विपत (रा. बारामती) यांनी फिर्याद दिली होती.

नोव्हेंबर ते डिसेंबर २०१२ या कालावधीत जितेंद्र गाडे या सुरक्षारक्षकाने बालगृहातील मुलीवर पाचवेळा लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. तिला दहावीचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. जोगळेकर, नवाडे, कुर्लेकर, गोंगले, वाघ, शिंदे, चाफेकर या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षकाला पाठीशी घातले. त्याची माहिती पोलिसांना दिली नाही.

पीडितेने लिहिली चिठ्ठी

पीडितेने गाडे याच्यापासून गर्भवती राहिल्याची चिठ्ठी संस्थेच्या लायब्ररीमधील पुस्तकात ठेवली होती. ही चिठ्ठी एकाच्या हाती लागल्यानंतर त्यांनी ती चिठ्ठी माया नवाडे हिच्याकडे दिली. त्यानंतर नवाडे हिने गाडेला वाचविण्याच्या उद्देशाने चिठ्ठी फाडली. गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक टेकवडे खूनप्रकरणाला कलाटणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नगरसेवक अविनाश टेकवडे खूनप्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. माथाडी कामगार नेता आणि कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनातील आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून टेकवडे यांचा खून करण्यात आल्याचे तपासात पुढे येत आहे. या प्रकरणी कटात सामील असल्याच्या संशयावरून चार जणांना पिंपरी पोलिसांनी मंगळवारी (१७ नोव्हेंबर) रात्री उशिरा अटक केली.

रमेश लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा. चिखली), बाबू उर्फ सूर्योदय शेखर शेट्टी (वय ३५, रा. चिंचवड स्टेशन), इंद्रास युवराज पाटील (वय ३८, रा. चिखली), आकाश अनिल पोटगन (वय २०, रा. मोहननगर) यांना अटक करण्यात आली आहे. रमेश प्रकाशचा भाऊ आहे, तर बाबू कटाचा सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इंद्रास चव्हाण माथाडीचे काम बघत होता, तर पोटगन याने टेकवडे यांच्या मारेकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी रस्ता दाखविण्याचे काम केले आहे.

टेकवडे यांचा तीन सप्टेंबर रोजी राहत्या घराच्या इमारतीत डोळ्यात मिरची पूड टाकत भोसकून खून करण्यात आला होता. त्या वेळेस चार आरोपींना अटक करण्यात आली होती. महापालिकेच्या जागेवर असलेला गोठा नगरसेवक टेकवडे यांनी हटविला म्हणून त्यांचा खून केला, असे मुख्य आरोपी अमोल वहिले याचे म्हणणे होते. जे न पटणारे होते. त्यामुळे तपास सुरू होता.

माजी नगरसेवकाने मागितले संरक्षण

नगरसेवक टेकवडे यांच्या खुनानंतर राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने पोलिस संरक्षण मागितले आहे. टेकवडे यांच्याप्रमाणेच माझा खून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस संरक्षण द्यावे असे त्या नगरसेवकाने पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

सराईत गुन्हेगाराचा मोहन नगर येथे दगडाने ठेचून खून करण्यात आला. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) दुपारी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघड झाली. सोमवारी रात्री खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. चेहरा विद्रुप केल्याने मृताची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या.

चेतन सुरेश मोहिते (वय २०, रा. मोहन नगर) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन नगर येथील नाल्यात मृतदेह पडल्याचे नागरिकांनी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चेतन याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याचे आढळले आहे. तसेच त्याच्या गळ्यावर, हातावर चाकूचे वार आहेत. सुरवातीला चेतनची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, त्याच्या भावाने चेतनला ओळखले. चेतनने काही महिन्यांपूर्वी पी. के. पॅकवेल या कंपनीत दरोडा घातला होता. या प्रकरणात तो कारागृहात होता. पंधरा दिवसांपूर्वीच सुटून घरी आला होता. त्याच्यावर या व्यतिरिक्त अन्य दोन गुन्हे दाखल होते. उपायुक्त डॉ. बसवराज तेली, वरिष्ठ निरीक्षक सैफन मुजावर, निरीक्षक विठ्ठल कुबडे, फौजदार हरीश माने, पी. कदम, रत्ना सावंत यांनी घटनास्थळी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेट्रो मार्गात फरक तीन किलोमीटरचा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मेट्रो मार्गात तीनशे मीटरचा नाही, तर तीन किलोमीटरचा फरक पडत आहे. महापालिकेतर्फे सर्वसामान्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि अधिकारी संगनमताने मेट्रोबाबत निर्णय घेणार असतील, तर मनसेतर्फे त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

वनाज ते रामवाडी मेट्रोच्या मार्गात तीनशे मीटरचा बदल करण्यात आल्याने त्याचा सुधारित आराखडा (डीपीआर) दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून तयार केला जात आहे. मात्र, हा बदल तीनशे मीटरचा नसून, तीन किलोमीटरपेक्षा अधिक असल्याचा दावा मनसेने केला आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेमध्येही बदल केला गेला आहे. त्यामुळे, या बदलांबाबतची वस्तुस्थिती पालिका अधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेसमोर सादर करावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. मेट्रो मार्गात सुचविण्यात आलेल्या नव्या बदलांमुळे कायदेशीर व तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही, त्याकडे डोळेझाक करून भाजप सरकार आणि अधिकारी थेट निर्णय घेणार असतील, तर त्याला विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खर्च भागवण्यासाठीच ४ एफएसआय’

$
0
0

पुणेः मेट्रोचा खर्च भागविण्यासाठीच दोन्ही बाजूला चार एफएसआय देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप उपमहापौर आबा बागूल यांनी केला. चार एफएसआय देण्याच्या निर्णयामुळे शहराची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या समितीने विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) मेट्रो मार्गांच्या दोन्ही बाजूस चार एफएसआय देण्याची शिफारस केली आहे. मेट्रोच्या दोन्ही बाजूस चार एफएसआय देण्यावरून यापूर्वीही अनेक स्वयंसेवी संस्थांनी टीका केली आहे. आता, राजकीय पक्षांनीही त्याविरोधात भूमिका घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच काँग्रेसनेही वाढीव एफएसआयमुळे शहराचे अतोनात नुकसान होणार असल्याचा दावा केला आहे. शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा, ड्रेनेज वाहिन्या; तसेच इतर सेवा वाहिन्या अपुऱ्या पडत असताना, चार एफएसआयमुळे वाढणाऱ्या घरांना पालिका सेवा कशा पुरविणार, असा प्रश्न बागूल यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे, शहराच्या मध्यवस्तीवर अजून भार टाकण्यापेक्षा उपनगरांमध्ये टाअनशिप निर्माण केल्या जाव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात नीचांकी तापमानाची नोंद

$
0
0

पुणेः शहरातील थंडीचा कडाका कायम असून, मंगळवारी किमान तापमानात आणखी घट झाली. मंगळवारी शहरात १३.८ अंश सेल्सिअस इतके हंगामातील नीचांकी तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसात किमान तापमानात एक -दोन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. क्वचित शहरात हलक्या पावसाचीही शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

पुण्यात मंगळवारी नोंदले गेलेले किमान तापमान (१३.८ अंश सेल्सिअस) हे यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमान आहे. हे तापमान सरासरीपेक्षा एका अंशाने कमी आहे. शहरात दुपारी फारशी थंडी जाणवत नसली, तरी रात्री आणि पहाटे मात्र चांगलीच थंडी जाणवत आहे. पुण्याबरोबरच राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी राज्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद नांदेड येथे ११.५ अंश सेल्सिअस, तर नाशिक येथे १३.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असहिष्णुतेकडे वाढता कल

$
0
0

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे पुण्यात निरीक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात सध्या बहुविधता आणि विरुद्ध मतप्रवाहांबाबत असहिष्णू होण्याकडे कल असल्याचे निरीक्षण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मंगळवारी नोंदवले. 'मानवी हक्कांचा सन्मान राखताना केवळ सहिष्णुताच नव्हे तर विविधतेची स्वीकारार्हताही गृहीत धरलेली असते. सहिष्णुतेपासून स्वीकारार्हतेपर्यंतचा हा प्रवास समाज एकसंध राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो', असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित 'नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन' या परिषदेचे उद् घाटन अन्सारी यांच्या हस्ते झाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव, पालकमंत्री गिरीश बापट, सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबाने, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल गुप्ता आदी या वेळी उपस्थित होते. उद् घाटनानंतर 'सोशल इनोव्हेशन अँड सोशल हार्मनी' या विषयावर अन्सारी यांनी आपले मत व्यक्त केले.

'आपण नोंदवलेली प्राथमिक निरीक्षणे सध्याची सामाजिक पार्श्वभूमी विशद करण्यासाठी महत्त्वाची आहेत. नवकल्पनांची आस बाळगणाऱ्या समाजात सर्जनशीलतेसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी; तसेच समता, न्याय आणि सबलीकरणाचे अस्तित्व टिकवण्याकरता सामाजिक सहमती निर्माण करणे आवश्यक आहे. अशी सहमती होण्याबाबत मात्र आज चिंता वाटावी, असे चित्र आहे', असे अन्सारी यांनी स्पष्ट केले.

'भारतात अभिनव सामाजिक उपक्रमांची परंपरा असून भविष्यात यामध्ये आणखी वाढ होणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आज गरज आहे. भारतात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची, अभियानाची निर्मिती होताना आपल्या पाहायला मिळते. पण या उपक्रमांचा पुढील सुधारित पल्ला आपण गाठू शकत नाही. त्यामुळे या उपक्रमांना आपण कसे पाठबळ देऊ शकतो, हे पाहणेही महत्त्वाचे आहे', असेही अन्सारी यांनी स्पष्ट केले. डॉ. विजय केळकर यांनी आभार मानले.

सध्या सोशल इनोव्हेशन क्षेत्रात अनेकजण कार्यरत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि अर्थपुरवठ्याची गरज आहे. सीएसआरच्या नियमांनुसार कंपन्यांकडून मोठा निधीही उपलब्ध होत आहे. या कंपन्या आणि संशोधक यांची सांगड घालणे आवश्यक आहे.

- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप-काँग्रेसचे ‘डाळ वॉर’ उतरले रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तूर डाळीच्या वितरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू झालेले 'डाळ वॉर' आ‌‌ता रस्त्यावर आले आहे. छाप्यात जप्त तूर डाळ भाजप कार्यकर्त्यांमार्फत नागरिकांना शंभर रुपयांनी उपलब्ध करून देणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टिळक पुतळ्यासमोर आंदोलन केले; तर बापट यांच्या समर्थकांनी त्याच परिसरात नागरिकांना डाळ वाटपाचा कार्यक्रम घेतला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर जोरदार घोषणायुद्धही रंगले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १२० रुपये किलो दराने सरकारने नागरिकांना तूर डाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शंभर रुपये किलो दराने डाळ उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. त्यानंतर कमी किमतीत डाळ देण्याचे राजकारण सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी बापट यांनी खालापूर येथील गोडाउनवर छापा टाकून डाळीचा साठा जप्त केला होता. त्यानंतर त्याच कंपनीकडून दहा टन डाळ भाजपच्या कार्यकर्त्यांमार्फत खरेदी करून दिवाळीच्या तोंडावर त्याची विक्री करून नफा कमाविल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला होता.

याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी शहर काँग्रेसच्या वतीने मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ आंदोलन केले. शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, रमेश धर्मावत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जप्त केलेली डाळ कमी दरात देऊन नागरिकांची सहानभूती मिळविणाऱ्या बापट यांचा धिक्कार असो, चुकीचे काम करणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. याच वेळी भाजपचे स्थानिक नगरसेवक दिलीप काळोखे यांनी कमी दरात डाळ देण्याचा स्टॉल लावून नागरिकांना शंभर रुपये किलो दराने तूर डाळ देण्याचा उपक्रम राबविला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसरीतील दोन विद्यार्थिनी बेपत्ता

$
0
0

पुणेः भोसरी येथील दोन विद्यार्थिंनी बेपत्ता झाल्या असून या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा लालदेव चौहाण (वय १५, रा. धावडे वस्ती, भोसरी) आणि अर्चना शामनाथ शर्मा (वय १५, रा. भगत वस्ती, भोसरी) अशी बेपत्ता झालेल्या विद्यार्थिंनींची नावे आहेत. या प्रकरणी दोन्ही विद्यार्थिंनीच्या पालकांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा आणि अर्चना या भोसरी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नववीमध्ये शिकतात. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता शाळा सुटल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. दोघींच्या पालकांनी त्यांचा खूप शोध घेतला. मात्र, त्या न मिळाल्यामुळे त्यांनी भोसरी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी दोघींचा शोध सुरू आहे. या दोघी आढळून आल्यास भोसरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र परीक्षा मंडळाचा प्रस्ताव गुंडाळणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांची समान पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात स्वतंत्र परीक्षा मंडळ अस्तित्त्वात येण्याच्या शक्यता सध्या धूसर झाल्या आहेत. विद्यापीठांच्या उत्त्पन्नाचा एक प्रमुख स्रोत असणाऱ्या परीक्षा विभागांचा ताबा एका स्वायत्त संस्थेकडे देण्याबाबत विद्यापीठांचा नाराजीचा सूर पाहता, सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुढे आलेला प्रस्ताव गुंडाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षांची वेळापत्रके, परीक्षांची अंमलबजावणी आणि निकालांबाबत एकसमान धोरण अवलंबिता यावे या प्रमुख उद्देशाने अशा मंडळाची निर्मिती करण्याची बाब उच्चशिक्षण विभागाच्या विचाराधीन होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही अशा मंडळाच्या स्थापनेबाबत सूतोवाच केले होते. दहावी- बारावीच्या परीक्षा घेणाऱ्या राज्य बोर्डाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांसाठी असे परीक्षा मंडळ विचाराधीन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या हालचालींचा आढावा घेताना या बाबी समोर आल्या.

विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांमधील प्रवेशांविषयीची धोरणे सोयीची ठरावीत, सध्याच्या वेगवेगळ्या वेळापत्रकांच्या ससेमिऱ्यामधून विद्यार्थ्यांची सुटका होऊन, प्रवेशांच्या वेळापत्रकांमध्येही एकसमानता यावी, आदी उद्दिष्टे विचारात घेत अशा मंडळाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. त्यासाठी नव्या विद्यापीठ कायद्यामध्ये तरतुदी करण्याच्या चर्चाही दरम्यानच्या काळात सुरू झाल्या होत्या. त्याविषयी नंतरच्या टप्प्यात विद्यापीठांनी नाराजीचा सूर आळवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठ्या चोरीमुळे खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपटे रोडवरील हॉटेल कोहिनूर एक्झिक्युटिव्हमधील तिजोरीत ठेवलेले ३७ लाख रुपये तिजोरीसह चोरून नेल्याच्या घटनेने इतर हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. चोरीची ही घटना मंगळवारी उघडकीस आली.

हॉटेलचे अकाउटंट राजेश सतीश तिखे (वय ४६, रा. नंददीप अपार्टमेंट, पाषाण-सूस रोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे मालक माधव कोकणे (रा. दादर, मुंबई) हे हॉटेलमध्ये अधून-मधून येत असतात. हॉटेलच्या नूतनीकरणासाठी काम सुरू असून हॉटेलमध्ये जमा झालेली रक्कम बँकेत न भरता तळमजल्यावरील तिजोरीत ठेवली जाते. तिजोरीपर्यंत जाण्यासाठी तीन दरवाजे लागतात. या तिजोरीच्या चाव्या तिखे यांच्याकडे असतात. तर, दरवाज्याच्या चाव्या या रिसेप्शन काउंटरवर जमा केल्या जातात. सोमवारी सायंकाळी सहा वाजता तिखे यांनी तिजोरी व दरवाजे बंद करून दरवाज्याच्या चाव्या काउंटरवर जमा केल्या, तर तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे ठेवल्या होत्या.

रिसेप्शन काउंटरवर रात्री एकजण आणि सुरक्षारक्षक असे दोघेजण होते. पहाटे तीनच्या सुमारास चोरी झाल्याचे लक्षात आले. मात्र, काउंटरवरील व्यक्तीने सकाळी तिखे व पोलिसांना कळविले. सकाळी पोलिस घटनास्थळी गेले, त्या वेळी हॉटेलच्या तळमजल्यावरील चार दरवाज्यांपैकी पहिल्याचे कुलूप दिसले नाही. आतील दरवाजाच्या लॅच तुटलेले होते. तसेच, चोरट्यांनी तिजोरी व त्यामधील ३७ लाख रुपये चोरून नेल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पांडुरंग चौगुले, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट

हॉटेलमध्ये सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले असून ते अस्पष्ट दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी चित्रीकरणात दिसत नाहीत. हे चित्रीकरण स्पष्ट करण्याचे काम सुरू असल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली. तसेच, आपटे रोडवरील इतर सीसीटीव्हीचे फुटेज मिळविले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यथा ही कात्रज-देहूरोडची!

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : अनधिकृत प्रवासी थांबे, फळविक्रेत्यांनी व्यापलेली एक लेन, उखडलेले रस्ते धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडणारे पादचारी आणि रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे संथगतीने चालणारी वाहतूक...,अशी परिस्थिती कात्रज-देहूरोड बायपासवर मंगळवारी पाहायला मिळाली.

गेल्या काही वर्षांपासून पुणे-बेंगळुरू महामार्गावर कात्रज-देहूरोड बायपासवर विविध कारणास्तव रेंगाळलेल्या कामांमुळे वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच, या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कात्रज-देहूरोड बायपास कायमच चर्चेत राहिला आहे. तांत्रिक अडचणींमुळे काही कामे रखडली आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिले जात आहे. मात्र, काही ठिकाणी सर्व गोष्टी अनुकूल असतानाही रिलायन्स इन्फ्राकडून वेळेत काम केले जात नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, या खेरीजही या मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अनेक घटक असल्याचे 'मटा'ने यापूर्वी केलेल्या पाहणीत आढळले होते. तीच परिस्थिती अद्यापही पाहायला मिळत आहे.

वडगाव येथील उड्डाणपूल, चांदणी चौक, वाकड येथे अनधिकृत प्रवासी थांबे आहेत. येथे थांबणाऱ्या वाहनांमुळे व प्रवाशांच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा होतो. आणि अपघाताचा धोकाही संभवतो. चांदणी चौकात एसटीचा अधिकृत प्रवासी थांबा आहे. मात्र, येथे खासगी वाहतूकदार मोठ्या संख्येने थांबतात. त्यांच्या गर्दीमुळे या परिसरात हमखास वाहतूक मंदावते. तसेच, अनेक ठिकाणी फळविक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत. महामार्ग असूनही येथे अनेक वाहनचालक फळे खरेदीसाठी थांबतात. त्यामुळे रस्त्याची एक लेन त्या वेळेकरीता वाहतुकीसाठी बंद राहते. तसेच, कधीकधी एकापेक्षा जास्त गाड्या थांबल्याने वाहतूक विस्कळित होत असल्याचे निदर्शनास आले.

वाकड येथील इंदिरा कॉलेजच्या परिसरात विद्यार्थी धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडतात. तसेच, येथे रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्याने महामार्गावर येणाऱ्या दुचाकींची संख्या जास्त आहे. या दुचाकींमुळे मोठ्या वाहनांना काही प्रमाणात अडथळा निर्माण होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images