Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बारामती पॅटर्न सर्वदूर जावा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

'बारामतीमधील विकासाचा पॅटर्न सर्वदूर पोहोचावा', अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

'बारामतीच्या शैक्षणिक संकुलास भेट दिल्यानंतर नवीन शिकायला मिळाले आहे. पवारांच्या कार्यामुळे बारामतीचे नाव राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. पवार हे बारामतीचे ग्रँडफादर आहेत,' अशा शब्दांत जेटली यांनी पवारांना प्रशस्तिपत्र दिले. बारामतीत शेतीबाबत होत असलेल्या नवीन प्रयोगांचा, तसेच तंत्रज्ञानाच्या वापराचा उल्लेख त्यांनी केला. बारामतीचे हे प्रारूप सर्वदूर जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी पवार यांनी या वेळी मांडल्या. तसेच या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी जेटली यांना केले. पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी या वेळी उपस्थित होते.

वाढत्या जवळिकीची चर्चा

राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील दरी रुंदावत असताना जेटली यांच्या बारामतीभेटीने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष जवळ येत आहेत की काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. भाजपबाबत पवार मवाळ भूमिका घेत असल्याकडेही लक्ष वेधले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोवर, कांजिण्या टाळण्यासाठी दोनदा लसीकरण हवे

$
0
0

बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणारा कांजण्या, गोवरचा संसर्ग यंदाच्या वर्षी एक महिना आधीच आला आहे. शहरात सध्या लहान मुलांना या दोन्ही आजारांचा संसर्ग झाल्याने लहान मुलांची चिडचिड होऊ लागली असून, पालक त्रस्त आहेत. दीड ते साडेचार वर्षे या वयोगटातील बालकांना गोवर, तसेच कांजिण्याप्रतिबंधक एकच डोस देण्याऐवजी दोन डोस देण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

'सध्या शहरात गोवरसह कांजिण्याचा संसर्ग झालेले पेशंट आढळून येऊ लागले आहेत. बाळाला गोवर प्रतिबंधक लस नवव्या महिन्यात दिली जाते. एकच डोस दिल्याने गोवर पुन्हा होण्याची शक्यता असते. सात ते आठ वर्षांच्या मुलांमध्ये गोवरचा आजार आढळून येत आहे. त्या तक्रारी घेऊन पालक आमच्याकडे उपचारासाठी येत आहेत. गोवर हा विषाणूजन्य, तसेच संसर्गाचा आजार आहे. अंगावर रॅश येऊन गेल्यानंतर मुलांना शाळेत पाठवावे,' अशी माहिती ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा यांनी दिली.

'गोवरची लागण झालेल्या लहान मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे. लसी घेतलेल्या दहा वर्षांच्या मुलांनाच गोवर होत आहे. लस घेण्याकडे पालकांचा कल कमी आहे. ५० टक्के पालक आपल्या मुलांना लस देतात. त्यापैकी ८५ टक्के मुलांना रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होत असल्याने त्यांना संसर्ग होत नाही. आठ ते दहा टक्के मुलांना लस देऊनही पुन्हा गोवर होण्याची शक्यता असते. त्यासाठी दोनदा डोस घेण्याची गरज असते,' असे बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांनी सांगितले.

कांजिण्यांचेही पेशंट सध्या आढळून येत आहेत. गेल्या सहा महिन्यांत कांजिण्यांवरील लस उपलब्ध नव्हती. सध्या ती उपलब्ध असून, पालकांनी मुलांना दीड ते साडेचार या वयोगटात दोनदा लस द्यावी. दहा वर्षांपर्यंत लहान मुलांना कांजिण्या झालेल्या असतात. कांजिण्या हा आजार 'व्हेरिफिला झोस्टर' या विषाणूमुळे, तर गोवर 'मीझल्स' विषाणूमुळे होतो. गोवर, कांजिण्यांपासून सरंक्षण मिळण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्याचे मतही डॉ. आगरखेडकर यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेकडून घरोघरी सर्वेक्षण

$
0
0

खबरदारीची उपाययोजना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शहर आणि परिसरात डेंगीच्या डासांबरोबरच काही विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

झोपडपट्ट्यांपेक्षा शहर, तसेच उपनगरांतील सोसायट्यांमध्ये डेंगीच्या डासांचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे पालिकेचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन डेंगीच्या डासांच्या उत्पत्तिस्थानांचा शोध घेत आहेत. त्याकरिता सर्वेक्षण सुरू करण्यात येऊन डासांची अंडी आढळलेल्या ठिकाणच्या व्यक्तीला नोटीस देऊन कारवाई केली जात आहे. शहरातील शाळा, कॉलेज, मोठ्या सोसायट्या, कंपन्या यांची पाहणी करून डेंगीच्या वाढीला कारणीभूत ठरणारे डास आढळल्यास संबंधितांना नोटीस देऊन, त्यांच्यावर खटला भरून, प्रसंगी दंड वसूल करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. आतापर्यंत पालिकेने एक लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहरात अवेळी झालेल्या पावसामुळे डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लूच्या आजाराचे पेशंट दिसू लागले आहेत. आजारांचा फैलाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन औषध फवारणी, पेशंटचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पावसाळ्यात साथीच्या आजाराच्या पेशंटची संख्या वाढत असल्याने याला अटकाव करण्यासाठी पालिकेच्या वतीने जनजागृती केली जात आहे. घरांमधील फ्रीज, फ्लॉवरपॉट, एअर कंडिशनरमध्ये डेंगीचे डास आढळून आले आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी केंद्रात येणाऱ्या या आजाराच्या संशयित पेशंटला तेथेच थेट उपचार दिले जात असल्याचे पालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले. पालिकेच्या मुख्य हॉस्पिटलसह विविध भागांतील ५३ केंद्रांवर सुविधा दिली जात आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास पेशंटवर तातडीने उपचार केले जात आहेत. यापूर्वी स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्या पेशंटपैकी अनेक पेशंटनी योग्य वेळी लक्षात येऊनही उपचार घेण्यास टाळाटाळ केल्याचे लक्षात आले. पेशंटवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. त्याशिवाय स्वाइन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी संशयित पेशंटना औषधे पुरवली जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरू केली आहे. दोन दिवसांमध्ये पाचशेपेक्षा जास्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. दीडशे रिक्षा चालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात आला आहे,' अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

भाडे नाकारणे, मीटरपेक्षा जास्त भाडे घेणे, अशा रिक्षा चालकांच्या विरोधात अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलिस सहआयुक्त सुनिल रामानंद यांनी रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले. त्यानुसार शनिवारपासून रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाईला सुरूवात करण्यात आली. शनिवारी दिवसभरात भाडे नाकारणाऱ्या ३६० रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली.

शहरातील प्रत्येक वाहतूक विभागाला भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महिला व पुरुष कर्मचारी साध्या वेशात जाऊन रिक्षा चालकास भाडे घेऊन जाण्यास सांगतात. रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यास थेट त्याला वाहतूक विभागात आणून कारवाई केली जाते. रविवारी दिवसभरात साधारण अडीचशे रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात येतो. त्यानुसार शनिवारी कारवाई करण्यात आलेल्या १६० रिक्षा चालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे आवाड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल पुरावे गोळा करा

$
0
0

गुन्हेगार सुटू नयेत यासाठी नवनियुक्त पोलिस महासंचालकांचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तक्रारदारच कोर्टात फितूर होणे, साक्षीदारांकडून जबाब फिरवला जाणे, अशा विविध कारणांमुळे गुन्हेगार निर्दोष सुटतात. यावर उपाय म्हणून पोलिसांनी गुन्ह्यांचा तपास करताना डिजिटल पुरावा गोळा करावा, असे आदेश नवनियुक्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले आहेत. त्यानुसार तक्रारदाराची तक्रार, साक्षीदाराचा जबाब, पुरावा गोळा करतानाचा पंचनामा या सर्व घटनांची व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे.

डिजिटल पुराव्याला कायदेशीर आधार नसल्याच्या संभ्रमामुळे पोलिस अशा प्रकारे पुरावे गोळा करण्यास फारसे तयार नसत. मात्र, भारतीय पुरावा कायद्यामधील कलम ६५ ब अन्वये असा पुरावा ग्राह्य धरण्यात येतो. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासात डिजिटल पुरावा गोळा केलाच पाहिजे, असे आदेश काढण्यात आले आहेत. खटल्याच्या सुनावणीत कोर्टासमोर तक्रारदारच फितूर झाला, तर तक्रार घेताना करण्यात आलेले शूटिंग कोर्टासमोर सादर करता येऊ शकते. परिणामी तक्रार सिद्ध करण्यासाठी पोलिसांना या शूटिंगचा फायदा होईल. त्याचप्रमाणे घटनास्थळ पंचनामा, जप्ती पंचनामा याचेही शूटिंग करावे, असे यामध्य म्हटले आहे. अनेकदा पंचही कोर्टात फितूर होतात. पंचनामा करताना शूटिंग केले, तर फितुरी रोखता येईल आणि पंचांनाही कोर्टात जबाब देताना शूटिंगद्वारे उजळणी होऊ शकेल.

हॅश व्हॅल्यूच्या नोंदी ठेवा

कम्प्युटरवर तयार केलेले पत्र, मेल, डिझाइन, डिजिटल फोटो, ऑडिओ- व्हिडीओ रेकॉर्डिंग या सर्वांची कम्प्युटर वा मेमरी कार्डवर 'युनिक व्हॅल्यू' तयार होते आणि हे 'युनिक व्हॅल्यू रेकॉर्ड' भक्कम पुरावा म्हणून कोर्टात सादर होऊ शकते. त्यासाठी पोलिस कर्मचारी- अधिकाऱ्यांना रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटोरीमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना सर्टिफिकेटही देण्यात येईल, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्रभात कुमार यांनी दिली.

पुरावा कसा गोळा होणार?
>> डिजिटल डॉक्युमेंटची मूळ प्रत सेव्ह केल्यानंतर तपासादरम्यान ती पुन्हा वापरू नये.
>> हॅश व्हॅल्यू काढलेल्या पुराव्यात कोणीही बदल करणार नाही. बदल केल्यास, हॅशव्हॅल्यू बदलते.
>> डिजिटल पुरावे गोळा करताना जुने मेमरी कार्ड वापरू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येथे पुलावरून पाणी वाहते

$
0
0

जुन्नरमध्ये ७५ लाखांच्या नव्या पुलावर पाणीगळती

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

जुन्नर शहरातून एसटी स्थानकाकडे जाणाऱ्या पुलाचे काम करण्यासाठी अलीकडेच ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले; पण ते पैसे अक्षरशः पाण्यात गेल्यासारखी स्थिती आहे. कारण पुलाच्या स्लॅबखालून गेलेल्या जलवाहिन्यांची अधूनमधून गळती होत असल्याने पुलावर अनेकदा पाण्याचे तळे साचते. त्यामुळे या पुलाखालून नव्हे, तर पुलाच्या वरून बरेच पाणी वाहून गेले आहे.

या पुलाच्या स्लॅबखालून पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन गेल्या आहेत. त्यांची जागा न बदलता त्यांच्या वर काही इंचांवर पुलाचा स्लॅब टाकण्यात आला. त्यामुळे या जलवाहिन्यांमधून गळती झाल्यानंतर पुलावर पाणी साचते. या पुलाच्या तांत्रिक समस्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हरकती घेण्यात आल्या होत्या; मात्र त्यावर फार गांभीर्याने विचार न करता हे काम पूर्णत्वास नेले गेले. त्याचा फटका आता नागरिकांना बसतो आहे.

आता पुलाखाली गळती बंद करणे हे द्राविडी प्राणायाम करण्यासारखे झाले आहे. या जलवाहिन्या दुरुस्त करायच्या असतील, तर पुलाचा स्लॅब पुन्हा काढावा लागेल, असे जाणकार सांगतात. त्यामुळे या पुलासाठी खर्च केलेले ७५ लाख रुपये वाया गेल्यासारखेच आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. 'जुन्नर शहरातील पाणीपुरवठ्यासाठी नव्या जलवाहिन्या शहरातून टाकण्यात आल्या आहेत. त्यातून पाण्याचे वितरण करण्याचे काम दहा ते १२ दिवसांमध्ये मार्गी लागेल. त्यानंतर पुलाखालील जुन्या जलवाहिनीतून होणारे पाण्याचे वितरण बंद होईल. तोपर्यंत या समस्येवर तांत्रिक कारणाने मार्ग काढणे जिकिरीचे आहे,' असे त्यांनी नमूद केले.
एसटी स्थानक ते पंचायत समितीदरम्यानच्या मुख्य रस्त्यावरदेखील दररोज सकाळी जलवाहिनीतून गळती होऊन रोज पाणी वाया जात आहे. हे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्यावरून वाहने जाताना पादचाऱ्यांच्या अंगावर पाण्याचे सिंचन होत आहे. त्यामुळे वैतागलेले नागरिक पालिका प्रशासनाला लाखोल्या वाहत आहेत; पण करदात्या नागरिकांच्या प्रश्नांकडे आणि पाण्याच्या अपव्ययाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोणार आळीतूनही गटारगंगा..

लोणार आळीतून भास्कर घाटाकडे जाणाऱ्या ड्रेनेजलाइनदेखील काही दिवसांपासून फुटल्या असून रस्त्यावरून 'गटारगंगा' वाहत आहे. नवरात्र मंडळाच्या समोरच्या रस्त्यावरूनच हे सांडपाणी वाहत आहे; मात्र ही समस्या दूर करण्यासाठी प्रशासन काहीच कसे करत नाबी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदूंचे इतर समाजांशी तंट्याचे कारण नाही

$
0
0

'आरएसएस'चे सहकार्यवाह भैय्याजी जोशींचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हिंदू समाजाची ताकद विधायक पद्धतीने वापरण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कटिबद्ध आहे. त्यामुळे इतर समाजांशी तंट्यांचे कोणतेही कारण नाही,' असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी रविवारी केले.

संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित शिवशक्ती संगम उपक्रमाचे भूमिपूजन रविवारी झाले. हिंजवडीजवळील मारुंजी येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी जोशी यांनी हे मत मांडले. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार माधुरी मिसळ, आमदार मेधा कुलकर्णी, फुलगाव येथील सागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्यासह संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे विविध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, 'जगात इतर काही धर्मांमध्ये हिंदू धर्मियांपेक्षाही अधिक संख्येने लोक आहेत. मात्र ते त्यांची शक्ती चुकीच्या कारणांसाठी वापरत आहेत. हिंदू धर्मियांबाबत असे होऊ नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हिंदू धर्मियांची एकत्रित ताकद कधीही चुकीच्या बाबींसाठी वापरली जात नाही, याला हजारो वर्षांचा इतिहास साक्षी आहे. दुर्जनांचा नाश करण्यापेक्षा त्यांनी आपले दुर्गुण सोडावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये इतर धर्मिकांशी तंटे होण्याचे कोणतेही कारण नाही.'

'हिंदू समाजाची शक्ती सज्जनांना आश्वस्त करणारी आहे. दुर्जनांनी सज्जन व्हावे, अशी प्रेरणा ही शक्ती देते. अशा सज्जनशक्तीचे दर्शन शिवशक्ती संगमातून अनुभवायला मिळणार आहे,' असेही जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालाबाह्य मुलांसाठी शिक्षणहमी कार्ड

$
0
0

जिल्हा पातळीवरील हंगामी वसतिगृहांसाठीही सरकार प्रयत्नशील

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालाबाह्य मुलांसाठी येत्या डिसेंबर महिन्यात आयोजित फेरसर्वेक्षणातून समोर येणाऱ्या मुलांसाठी सरकार शिक्षणहमी कार्ड आणि हंगामी वसतिगृहांची योजना राबवणार आहे. या माध्यमातून राज्यातील खाण कामगार, ऊसतोडणी कामगार, वीट भट्टीवरील कामगार आणि देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

राज्यातील शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षण खात्याने यंदा पहिल्यांदाच जुलै महिन्यात एक मोहीम राबवली होती. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात ५४ हजारांहून अधिक शालाबाह्य मुले असल्याचे या मोहिमेतून प्राथमिक टप्प्यात समोर आले. ही आकडेवारी फसवी असून, खऱ्या अर्थाने शालाबाह्य असणाऱ्या मुलांची यात गणनाच झाली नसल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी त्यानंतरच्या टप्प्यात केला होता. त्याचा विचार करून सरकारने डिसेंबरमध्ये फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या नियोजनाची माहिती देताना राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शिक्षणहमी कार्ड आणि हंगामी वसतिगृहांविषयी माहिती दिली.

डॉ. भापकर म्हणाले, 'स्थलांतराची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील सध्या शिकणारी मुले, स्थलांतरानंतरच्या टप्प्यात शालाबाह्य ठरू शकतात. अशा मुलांची अचूक गणना या सर्वेक्षणातून होईल. या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात हंगामी वसतिगृहे देण्याची योजनाही राबवण्यात येणार आहे. तसेच सर्वेक्षण झालेल्या मुलांचे शैक्षणिक मूल्यमापन करून शिक्षणहमी कार्ड (एज्युकेशन गॅरंटी कार्ड) देण्यात येईल. या कार्डद्वारे तो विद्यार्थी-विद्यार्थिनी कुठल्या इयत्तेत शिकू शकेल, याची माहिती संबंधित शाळेतील शिक्षकांना कळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सर्वेक्षणाचा कार्यक्रम

स्थलांतरित शालाबाह्य मुलांचे परिपूर्ण सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण खात्याने या उपक्रमाचे परिपूर्ण नियोजन केले आहे. त्यानुसार सर्व जिल्हानिहाय माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सात ते १५ ऑक्टोबरदरम्यान समितीची स्थापना करण्यात येईल. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचाही यात समावेश असेल. ही समिती ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील शालाबाह्य मुलांची ठिकाणे नकाशावर शोधून अचूक सर्वेक्षणाचे नियोजन करील. त्यानुसार डिसेंबरमध्ये सर्वेक्षणाचा कार्यक्रम पार पडेल, असेही डॉ. भापकर यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँका गुरुवारी, शनिवारी बंद

$
0
0

शुक्रवारी कामकाज नेहमीप्रमाणे सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येत्या आठवड्यात गुरुवारी, शनिवारी व रविवारीही बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे बँकांची कामे बुधवारपर्यंत किंवा शुक्रवारी करून घेणे फायद्याचे ठरेल. शुक्रवारी बँकांना सुट्टी असेल असे मेसेज फिरत असले, तरी प्रत्यक्षात शुक्रवारी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे, असे बँकांमधील सूत्रांनी स्पष्ट केले.

येत्या गुरुवारी (२२ ऑक्टोबर) दसऱ्यानिमित्त बँकांना सुटी असेल. त्यानंतर शुक्रवारी बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू राहील. त्यानंतर शनिवारी चौथा शनिवार व मोहरमनिमित्त बँकांना सुटी राहील. रविवारी बँकांना साप्ताहिक सुटी असेल. त्यामुळे खातेदारांना बँकेत जाऊन करावयाची कामे शुक्रवारी किंवा पुढील सोमवारीच करून घेता येतील.
'सोशल मीडियावर बँकांच्या सुट्यांविषयी काही चुकीचे मेसेज फिरत आहेत. या मेसेजमध्ये दुर्गा पूजा (२१ ऑक्टोबर), दसरा (२२), मोहरम (२३), चौथा शनिवार (२४) आणि रविवारी (२४) बँका बंद राहतील, असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात बँकांना दुर्गा पूजेची सुटी नसून, मोहरमही २४ ऑक्टोबरला असल्याने बुधवारी २१ ऑक्टोबर व शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी बँका सुरू राहतील,' असे बँकांमधील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.

या सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार असल्या, तरी खातेदारांना मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग, एटीएम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा पर्यायी सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना फारशा समस्यांचा सामना करावा लागणार नाही; प्रत्यक्ष बँकेतच जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांसाठी बुधवारपर्यंत किंवा शुक्रवारीच जावे लागणार आहे. त्यानंतर पुढील सोमवारीच बँकांचे व्यवहार करता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसल पॉवर’चा सामान्यांना धसका

$
0
0

बॉडीगार्ड घेऊन फिरणाऱ्यां माननियांचे प्रमाण वाढले

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : राजकारणात 'मनी' आणि 'मसल' पॉवरच्या जोरावर सत्ता काबिज करणे तसे आता नवीन नाही. आता पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात 'बॉडीगार्ड' घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतांश बॉडीगार्डचे कोणतेही पोलिस व्हेरिफिकेशन अथवा नोंदणी झालेली नाही. केवळ सामान्यांवर प्रभाव पाडण्यासाठी हे ओंगळवाणे उद्योग काही माननियांनी चालविले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेची मुख्य इमारत असो वा सार्वजनिक कार्यक्रम सध्या अशा व्यक्तींकडून गर्दीचे लक्ष केंद्रीत केले जात आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार, स्वयंघोषित संघटनांचे पदाधिकारी बॉडीगार्ड घेऊन फिरतात दिसतात. शहरात गुंठा मंत्र्यांची भाऊ गर्दी झाली आहे. माथाडी नेते किंवा काही नगरसेवक देखील पिळदार शरीरयष्टीचे बॉडीगार्ड घेऊन हिंडत असतात. स्वतःच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड घेऊन फिरणे गैर नाही. मात्र, या बॉडीगार्डची कोणतीही नोंद नसणे बेकायदा आहे. सामान्यांना धाकात ठेवण्यासाठी असले उद्योग करणाऱ्यांवर कारवाई होणे देखील गरजेचे आहे.

बॉडीगार्डपैकी काही जण पिस्तुलधारी असून, त्यांचे परवाने देखील परराज्यातील असल्याचे नुकतेच एका घटनेवरून उघड झाले होते. त्यानंतरही पोलिसांनी अशा प्रकारांबाबत कोणतीही ठोस खबरदारी घेतलेली दिसतन नाही. बॉडीगार्ड घेऊन फिरणाऱ्यांकडून सर्रास नियम पायदळी तुडविले जात असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. डिसेंबरमध्ये खून झालेला कुख्यात गुंड आणि माथाडी नेता प्रकाश चव्हाण हा देखील खासगी बॉडीगार्ड घेऊन फिरत होता.

भोसरी पट्ट्यातील एका गुंठामंत्र्याचे बॉडीगार्डबरोबरचे फोटो व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर मध्यंतरी व्हायरल झाले होते. शाहुनगर, सांगवी, पिंपळेसौदागर, पिंपरी कॅम्प, औंध आदी पट्यात बॉडीगार्डना सध्या विशेष मागणी आहे. निगडी-रावेत पट्यातील आसपासच्या एका नगरसेवकाने तर अशाच एका बॉडीगार्डचा पगारच दिलेला नाही. त्यामुळे तो पोलिस ठाण्यात जाऊन बसला होता. तेव्हा या गार्डकडे असलेली बंदूक शहराबाहेर नोंदणी झालेली असल्याचे उगड झाले.

बॉडीगार्डचे प्रोफेशन तेजीत

बॉडीगार्ड पुरविणे आणि स्वतः बॉडीगार्ड होणे हे एक प्रोफेशन झाले आहे. त्यासाठी जीममध्ये किमान चार-पाच तास रोज कठीण व्यायाम करावा लागतो. खूप अंगमेहन घेतल्यावर युवकांना बॉडीगार्ड म्हणून ओळख मिळते. पण त्यांची योग्य नोंद न झाल्याने कारवाईला देखील काही युवकांना सामोरे जावे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीतही ‘आप’ची उमेदवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोंढव्यामध्ये महापालिकेच्या येत्या नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, भाजप, एमआयएमच्या पाठोपाठ आता आम आदमी पक्षही पुढे आला आहे. पक्षाचे कार्यकर्ते राज फैय्याज या पदाची ही निवडणूक लढविणार आहेत.

राजकीय पातळीवर वाढत असलेली धार्मिक-जातीय तेढ लक्षात घेऊन कोंढव्यात लोकांसाठी काम करणारा स्वच्छ उमेदवार मिळावा यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती फैय्याज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या नाहीत असे आम आदमी पक्षाचे सध्याचे अधिकृत धोरण असले तरी कार्यकर्त्यांना व्यक्तिगत पातळीवर निवडणूक लढविण्यास मज्जाव नाही. सामान्य लोकांच्या भावना आणि पक्षशिस्त लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी एकत्र येत या निवडणुकीत राज फैय्याज यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले आहे. राज फैय्याज हे पक्षाचे कार्यकर्ते असून गेली अनेक वर्ष सामाजिक कामाशी संबंधित आहेत, असे आम आदमी पक्षाच्या निवडणूक समितीचे समन्वयक इंद्रनील सदलगे यांनी सांगितले.

'स्वच्छ राजकारण आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था यासाठी आम आदमी पक्षालाच राजकारणात उतरले पाहिजे, या पक्षाच्या तत्त्वाला अनुसरूनच कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व कार्यकर्ते फैय्याज यांच्या प्रचारासाठी येतील असे नियोजन आहे. या समितीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे,' असे सदलगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन कांद्यामुळे दरवाढीला ‘ब्रेक’

$
0
0

सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कांद्याच्या भाववाढीमुळे सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणल्यानंतर इजिप्तसह स्थानिक भागातील नवीन कांद्याची आवक झाली. पुण्याच्या घाऊक बाजारात दहा किलोसाठी २०० ते २८० रुपये दरापर्यंत कांदा खाली आला आहे. दरवाढीमुळे ७० रुपयांपर्यंत पोहोचलेला कांदा आता किलोसाटी घाऊक बाजारात २० ते २८ रुपये दराने विकला जात आहे. परंतु, किरकोळ बाजारात मात्र ३० ते ४० रुपये दराने विकला जात आहे.

नवीन कांद्याला दक्षिण भारतातून चांगली मागणी होऊ लागली आहे. येत्या पंधरा दिवसांत नवीन कांद्याची आवक १०० ट्रकपर्यंत आवक वाढण्याची शक्यता आहे. नवीन कांद्याची कांद्याची आवक वाढत असल्याने जुन्या कांद्याच्या दरावर परिणाम झाला आहे. कांद्याला स्थानिक ग्राहकांची अधिक मागणी आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत नवीन कांदा बाजारात दाखल होतो. पाऊस लांबल्याने काद्यांची लागवड लांबल्याने कांद्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे कांद्याच्या दरवाढ गगनाला भिडली होती. त्यात साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी फायदा करून घेतला.

पुणे विभागातून नवीन कांद्याची ६० ट्रक तर स्थानिक भागातून जुन्या कांद्याची सहा ट्रक एवढी आवक झाली आहे. इजिप्तहून दोन ट्रक कांद्याची आवक झाली आहे. नवीन कांदा बाजारात आल्याने दरवाढीला ब्रेक लागला आहे. जुन्या कांद्याच्या दहा किलोला ३०० ते ४०० रुपये, नवीन कांद्याला २०० ते२८० रुपये असा घाऊक बाजारात दर मिळाला आहे. इजिप्तच्या कांद्याला दहा किलोसाठी २८० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर आणखी उतरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंडक्टरने विद्यार्थिनींना लावले पाय धरायला

$
0
0

स्वारगेट येथील घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चुकीच्या मार्गावरील बसमध्ये बसलेल्या मुलींना त्या बसच्या कंडक्टरने त्याचे पाय धरून माफी मागायला सांगितल्याची धक्कादायक घटना स्वारगेट येथे शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेची माहिती संबंधित मुलींच्या कुटुंबीयांना कळल्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी कोथरूड डेपो येथे त्या कंडक्टरच्या शोधासाठी गर्दी केली होती.

पद्मावती परिसरात राहणाऱ्या सात ते आठ मुली पुलगेट येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमधील सातवी-आठवीच्या वर्गात शिकतात. शनिवारी शाळा सुटल्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या मुली घरी जाण्यासाठी गोळीबार मैदान येथील बस स्टॉपवर एका बसमध्ये बसल्या. त्या वेळी मुलींनी कंडक्टरला त्यांचा पास दाखविला असता, त्या चुकीच्या बसमध्ये बसल्याचे कंडक्टरने त्यांना सांगितले. हे समजल्यावर मुलींनी कंडक्टरला गाडी थांबविण्याची विनंती केली. मात्र, कंडक्टरने त्यांना तिकीट काढावे लागेल, असे सांगितले. मुलींनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. 'तुम्ही तिकीट काढा नाही, तर तुम्हाला कोथरूड डेपोपर्यंत घेऊन जाईन,' असा दम कंडक्टरने मुलींना भरला. त्यामुळे त्या घाबरल्या. बस स्वारगेटला आल्यावर त्यातील काही मुली तिथे उतरल्या, परंतु तीन मुली बसमध्येच होत्या. अखेर कंडक्टरने त्या मुलींना त्याचे पाय धरून माफी मागण्यास सांगितले आणि नंतर त्यांना नेहरू स्टेडियमपाशी उतरविले, अशी माहिती मुलीच्या नातेवाइकांनी दिली.

पीडित मुलींपैकी एका मुलीचे काका यासीन शेख यांनी रविवारी सकाळी कोथरूड डेपो येथून पीएमपीच्या अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्या मुलीही त्या वेळी तेथे उपस्थित होत्या. अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गोळीबार मैदान मार्गावर असलेल्या कोथरूड डेपोच्या बसच्या ड्रायव्हर, कंडक्टरांना त्यांच्यासमोर हजर केले. मात्र, त्यापैकी कोणीच नसल्याचे मुलींनी सांगितले.

कंडक्टर शोधणे अवघड

त्या मुलींना बसचा क्रमांक किंवा मार्ग क्रमांक माहिती नसल्याने कंडक्टरचा शोध घेणे अवघड असल्याचे कोथरूड डेपोतील पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑक्टोबर हीट’मुळे ‘स्वाइन फ्लू’ घटणार

$
0
0

'एच वन एन वन'साठी वातावरण मारक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एच वन एन वन'च्या विषाणूच्या वाढीसाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पोषक हवामान मिळाल्याने स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे राज्यभरात दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला. आता 'ऑक्टोबर हीट' सुरू झाली असून, हा कालावधी या विषाणूच्या वाढीस मारक ठरणार आहे. परिणामी, स्वाइन फ्लूचा संसर्ग कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

स्वाइन फ्लूच्या विषाणूने जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात डोके वर काढले होते. विषाणूच्या संसर्गामुळे जानेवारी ते मार्च महिन्यात पुणेकरांना मोठी लागण झाली होती. त्या वेळी अक्षरशः २००९मधील स्वाइन फ्लूच्या साथीची आठवण करून झाली होती. परंतु, २००९च्या साथीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारीत नागरिकांमध्ये चांगली रोगप्रतिकारशक्ती तयार झाल्याने संसर्ग फारसा वाढू शकला नाही. तरीही जून महिन्यानंतर या विषाणूचा प्रसार पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. यंदा खरे तर पाऊस कमी आहे; पण पावसाच्या हजेरीनंतर स्वाइन फ्लूच्या विषाणूंना वाढीस पोषक हवामान तयार होते. त्यामुळे उद्रेक होण्यास हातभार लागला.

'ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाच्या आगमनामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे राज्यभरात दोन महिन्यांत दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला. आता 'ऑक्टोबर हीट' सुरू झाल्याने स्वाइन फ्लूचा संसर्ग, तसेच त्यामुळे होणारे मृत्यूदेखील कमी होतील. ऑगस्टमध्ये २० ते ५० या वयातील व्यक्तींनाच संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्याच वयातील पेशंटचा मृत्यू झाला आहे. पुण्यासह पिंपरीतही दोन महिन्यात संसर्ग वाढला; मात्र ऑक्टोबरमध्ये हा संसर्ग आणखी कमी होईल, असे आरोग्य खात्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

राज्यात आजमितीला ८३८ जणांचा मृत्यू झाला असला, तरी त्यापैकी ४० जण राज्याबाहेरील पेशंट आहेत. त्यापैकी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुमारे दोनशे जणांचा मृत्यू झाला. जानेवारी ते आतापर्यंत राज्यात आठ हजार ३६२ जणांना लागण झाली आहे. सध्या नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या सर्वाधिक पेशंटचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ नाशिक, मुंबई, पुणे शहर जिल्ह्याचा क्रमांक लागतो.
.................

शहराचे नाव - मृत्यू
नागपूर - ७७
नाशिक - ७१
मुंबई - ७०
पुणे ग्रामीण - ६६
पुणे शहर - ६५
ठाणे - ४९
पिंपरी-चिंचवड - ३७
नगर - ३७
सांगली - ३२
औरंगाबाद - ३०
सातारा - ३०
कोल्हापूर - २९
लातूर - २३
रायगड - २२
सोलापूर - १६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर डाळ, हरभरा डाळ उतरली

$
0
0

आयात होणार असल्याने दर उतरले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशांतर्गत घटलेले ४० टक्के उत्पादन, मागणीच्या तुलनेत होणाऱ्या कमी पुरवठ्यामुळे तूरडाळीने 'भाव' खायला सुरुवात केली. त्यावर केंद्र सरकारने तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेताच मोठ्या व्यापाऱ्यांनी डाळीचे दर खाली आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तूर डाळीत एक हजार रुपये तर उडीद डाळीमध्ये ३०० रुपये क्विंटलमागे दर उतरले आहेत.

तांदूळ, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, साबुदाणा, खाद्यतेल, बेसन, नारळ, हळदचे दर स्थिर आहेत.

तूर डाळीस घाऊक बाजारात किलोसाठी १९० रुपये दर मोजावे लागणार असून, किरकोळ बाजारात सध्या १८० रुपये दराने विक्री सुरू आहे. परंतु, जुन्या दराने खरेदी केलेल्या डाळीचा साठा संपल्यानंतर नव्या दराने किरकोळ विक्री सुरू होईल. दोन दिवसांपूर्वी तूर डाळीने दोनशे रुपयांचा टप्पा गाठला होता. आयात होणार असल्याने बाजारावर दबाव आल्याने दर उतरण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक बाजारात आयात होणारा माल लवकर आल्यास तूर डाळीचे दर आणखी खाली येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली. क्विंटलमागे तूर डाळ एक हजार रुपये, हरभरा डाळ १०० रुपये तर उडीद डाळ हे तीनशे रुपयांनी खाली उतरले आहेत. तर मटकी डाळीस सध्या उठाव नसल्याने त्याच्या दरावर परिणाम नाही. मूग डाळीत क्विंटलमागे २०० रुपये घट झाली आहे. मसूर डाळ स्थिर आहे.

जूनपूर्वी तूर डाळीची आयात केली असती तर डाळीचे दर कमी झाले असते. परंतु, त्या वेळी ८० रुपये किलो दराने असलेली तूरडाळ तीन महिन्यात १९० रुपये किलोवर पोहोचली आहे. यामध्ये मल्टिनॅशनल कंपन्यांनी डाळींची साठेबाजी करून हात धुवून घेतल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले. हरभरा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, मटकी डाळ या सर्व डाळी खरीपातील पिके आहेत. पावसामुळे ३० ते ४० टक्के उत्पादन कमी झाले आहे.

पोह्यासह पातळ पोह्यांच्या दरात प्रत्येकी २० ते २५ रुपये दर कमी झाले आहेत. नवरात्र संपत आल्याने उपवासासाठी लागणाऱ्या भगरची मागणी घटली आहे. त्यामुळे क्विंटलमागे ६०० रुपये कमी झाले आहेत. आवक होऊ लागल्याने क्विंटलमागे दीड हजार रुपयांनी घट झाल्याने शेंगदाणे स्वस्त झाले आहेत.

खोबऱ्याची आवक कमी झाली असून मागणी वाढल्याने त्याच्या दरात दहा किलोमागे १५० रुपयांची वाढ झाली आहे. आंध्रप्रदेशात पावसाअभावी आणि रोगामुळे मिरचीचे ५० टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे मिरचीच्या दराव त्याचा परिणाम झाला आहे.क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. रवा, आटा मैदाच्या दरात पोत्यामागे ५० रुपयांची वाढ झाली आहे. गव्हाच्या दरात क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोलाई देवी

$
0
0

>> मंदार लवाटे

वाडे बोलाई हे बोलाईचे पुण्यानजीकचे प्रसिद्ध स्थान. पुणे शहरातही बोलाईचे मंदिर असून, ते जिल्हा परिषद चौकानजीक आहे. पूर्वी या मंदिरामागे तळे होते. इंग्रजांच्या काळात लष्कर विभागास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून इंग्रजांनी बोलाई मंदिरामागील व गारपीरामागील तळे खोल; तसेच रुंद केल्याच्या नोंदी आहेत. या नोंदींत बोलाई मंदिराचा उल्लेख आढळतो. हे मंदिर त्याही पूर्वीचे आहे.

पूर्वापार कसबा पेठेतील जुना काळ व नवा काळ भैरवनाथ या मंदिरांच्या पालख्या सीमोल्लंघनासाठी दसऱ्याला व वार्षिक उत्सव असणाऱ्या चैत्री पौर्णिमेला या देवीच्या दर्शनास आणण्यात येतात. बोलाईचे मंदिर छोटे असून येथे जमिनीलगत तांदळासदृश अशी देवीची मूर्ती आहे. तांदळासदृश असल्याने फक्त चेहरा आहे व त्यावरील भाव प्रसन्न आहेत. देवीसमोर सिंह व जवळ महिषासूरमर्दिनी, खोकलाई, खरजाई, मारुती आदी मूर्ती आहेत. सर्व मूर्ती पाषाणाच्या आहेत. येथील व्यवस्था बघणारे प्रथमेश गिरी यांनी बोलाई हे बोल आई या शब्दांचा अपभ्रंश असून पार्वतीचे रूप आहे असे सांगितले.
मटा नवरंग... येथे क्लिक करा, फोटो अपलोड करा आणि जिंका खास बक्षिसं!
येथे चैत्रातील व अश्विनातील नवरात्र हे मुख्य उत्सव असतात. नवरात्रात रोज उपवासाच्या पदार्थांचा, तर नवमीला पुरणा-वरणाचा नैवेद्य असतो. अश्विन महिन्यात सर्व रविवार जत्रा असते. एकेकाळी शहर व लष्कर यांच्या वेशीवर असणारा हा भाग सातत्याने बदलत आहे. तळ्याचा आता मागमूसही नाही व गेल्या काही वर्षांत उड्डाणपूल झाल्याने परत येथे मोठे बदल झाले आहेत. सुदैवाने या सर्व बदलात बोलाईचे मंदिर मात्र आहे तिथेच राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ टक्के पुणेकर आजारी

$
0
0

सततच्या बदलत्या वातावरणामुळे साथीच्या रोगांचे विषाणू कार्यरत

Mustafa.Attar@timesgroup.com

पुणे : दिवसा कडक ऊन, रात्री आणि पहाटे थंडी अशा सततच्या बदलत्या वातावरणामुळे हवेतील विविध प्रकारचे विषाणू कार्यरत झाले आहेत. परिणामी, सर्दी, खोकला, ताप, स्वाइन फ्लू आणि डेंगीच्या साथीने शहरातील प्रत्येक घरातील एक ते दोन व्यक्ती आजारी पडल्या आहेत. एकूणच, पुण्यातील ३० ते ३५ टक्के नागरिक विविध प्रकारच्या विषाणूंच्या तडाख्यात सापडले आहेत. त्यामुळे दवाखान्यांमध्ये अक्षरशः रांगा लागल्या आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला जोरदार पावसाने लावलेली हजेरी, यादरम्यान, दिवसा प्रचंड उकाडा, रात्री थंडी असे वातावरण अनेक दिवस कायम राहिले. त्याचा परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

'वातावरणातील कमाल आणि किमान तापमानात असलेली तफावत अधिक असल्याने हाच काळ विषाणूंच्या वाढीस फायदेशीर ठरतो. सध्या हवेत विविध प्रकारचे विषाणू आहेत. सर्दी, ताप, खोकल्यासारखे संसर्गजन्य आजार 'ऱ्हायनो' या विषाणूमुळे होत आहेत. त्याशिवाय हवेत 'रोटा व्हायरस,' 'अॅडिनोव्हायरस', 'एन्फ्लुएंझा' यांसारख्या विषाणूंचाही प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या पुण्यातील ३० ते ३५ टक्के नागरिक आजारी आहेत,' असे निरीक्षण इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य शाखेचे उपाध्यक्ष आणि फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे यांनी 'मटा'कडे नोंदवले.

साधारणतः प्रत्येक घरातील एक ते दोन माणसे साथीच्या कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत. सर्दी, खोकल्यासह विषाणूजन्य ताप, डोळ्यांची आग होणे, जुलाब, त्वचेला सुटणारी खाज, तसेच श्वसनमार्गाचे विकार आणि तापाने पुणेकरांना हैराण केले आहे. सर्दी, खोकल्यापासून तापापर्यंत आजाराची सुरुवात झालेल्या पेशंटना दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय राहत नाही; मात्र फारशा उपचारांची गरज नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. पुरेशी विश्रांती, तसेच काही अँटीबायोटिक्स आणि उकळते पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तरीही आजार कमी होत नसले, तर अनेक पेशंट स्वतःहून विविध पॅथॉलॉजी लॅबकडे विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे हॉस्पिटल, दवाखान्यांसोबत लॅबमध्येही पेशंटची गर्दी वाढत आहे.

पाऊस पडल्याने 'एडिस इजिप्ती' नावाच्या डासांचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी शहराच्या विविध भागांत डेंगीचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. डेंगीची लागण होत असल्याने पेशंटच्या शरीरातील 'प्लेटलेट'चे प्रमाण कमी होत आहे. स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याने अनेकांना श्वसनाचे विकार बळावत आहेत. त्यामुळे 'सेप्टिसेमिया' होऊन शरीरातील विविध अवयव निकामी होत असल्याने अनेकांचा बळी जात आहे.

आबालवृद्धांना 'संसर्ग'

सर्दी, ताप, खोकला, जुलाब, उलट्यांचा आजार केवळ प्रौढांमध्येच नव्हे, तर लहान मुले आणि वृद्धांमध्येही असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे घरातील सर्वांनीच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकतज्ज्ञ देत आहेत. आजारी ३० ते ३५ टक्के पुणेकरांमध्ये लहान मुले आणि वृद्ध यांनाच साथीचा रोगांचा सर्वाधिक संसर्ग असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्ल्याची एकवीरा आई

$
0
0

>>बंडू येवले, लोणावळा

देवींच्या जागृत स्थानास शक्तिपीठे म्हटले जाते. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी होय. वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे.
मटा नवरंग: येथे क्लिक करा, फोटो अपलोड करा आणि बक्षिसंही जिंका!
इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणीकलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील कार्ला लेणी. या लेण्यांमध्ये ऐश्वर्य आहे; मात्र त्यात डामडौल नसून अभिजात कला आहे. पर्यटन व वर्षाविहारासाठी नावलौकिक असलेल्या लोणावळ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर कार्ला गडावर एकवीरा देवीचे स्थान आहे. पुणे-मुंबई या महानगरांच्या मध्यभागी वसलेली कार्ला लेणी आणि एकवीरा मातेचे मंदिर म्हणजे विपुल निसर्गसंपदा, प्राचीन लेणी, गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे आहे.

मुंबईहून पुण्याला रेल्वेने जाताना मळवली स्थानकावर उतरल्यावर डाव्या हाताला, तर पुण्याहून मुंबईला जाताना उजव्या हाताला सहा किलोमीटर अंतरावर वेहरगाव-कार्ला गडावर कार्ला लेणी परिसरात श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे. प्राचीन लेण्यांमध्ये या लेण्यांचा क्रमांक अग्रस्थानी असल्याचे सांगतात. ही बौद्धकालीन लेणी आहेत. या लेणी व मंदिराच्या निर्मितीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. १८६६मध्ये या मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आल्याचे समजते.

या परिसरात देवीला वेहरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असे म्हटले जाते. एकवीरा देवी ही महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, ब्राह्मण, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची कुलस्वामिनी आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत एकवीरा मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक रांगा लावून दर्शन घेतात. यात्राकाळात महाराष्ट्रातून, विशेषतः कोकण, मुंबई, ठाणे या भागांतून लाखो कोळी बांधवांसह अन्य भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मागील दहा वर्षांपासून देवीच्या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी या स्थानाला केवळ पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात होते. लेणी व परिसर भारतीय पुरातत्त्व विभाग आणि वन विभागाच्या अखत्यारीत आहे. परंतु या दोन्ही विभागांकडून अशा स्थळांची योग्य ती देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने अशा प्राचीन व पुरातन धार्मिक पर्यटनस्थळांची अवस्था दयनीय होत चालली आहे.

या देवस्थानची व्यवस्था श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट पाहते. मागील काही वर्षांपासून अनंत तरे हे या देवस्थानचे अध्यक्ष असून, त्यांच्या पुढाकाराने या दुर्लक्षित पर्यटन व धार्मिक स्थळाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. ट्रस्टच्या वतीने गडावर भाविकांसाठी अनेक सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत. गडाच्या पायथ्याशी वाहनतळ, स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छतागृहे, गडावर विजेची सेवा, भाविकांच्या निवासासाठी धर्मशाळा, मुबलक पाणी, परिसराचे सुशोभीकरण, भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी वातानुकूलित दर्शनरांगा, दर्शनरांगेत लहान मुलांना व वृद्धांना बसण्याची व्यवस्था, पायथ्यापासून गडापर्यंत पायऱ्यांना संरक्षक लोखंडी रेलिंगची व्यवस्था, यात्रा काळात देवीचे दर्शन घेता यावे यासाठी एलसीडी टीव्ही व मोठ्या स्क्रीनची व्यवस्था अशा प्रकारच्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

सध्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरात भाविकांना देवीचे दर्शन सुलभपणे व्हावे यासाठी पूर्वीचे अरुंद व छोटे दगडी प्रवेशद्वार व बाहेर जाण्यासाठीच्या प्रस्थानद्वाराच्या जागी नव्याने सागवान लाकडाची सुंदर नक्षीदार द्वारे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी नगरसेवक कारागृहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हॉटेल व्यवस्थापकाच्या खुनाचा गुन्हा दाखल असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य काँग्रेसचे नगरसेवक जालिंदर बापू शिंदे यांची सोमवारी (१९ ऑक्टोबर) येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. उच्च न्यायालयाने दिलेला जामीन संपल्याने शिंदे सोमवारी पुणे शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर झाले असता, त्यांची १४ दिवसांसाठी न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेत येथील हॉटेल शिवनेरी येथे २३ सप्टेंबर २०१४ ला रात्री साडेनऊ वाजता व्यवस्थापक विनायक दत्तोबा शिंदे (वय ३७, रा. हॉटेल शिवनेरी, रावेत. मूळ गाव वेल्हा) यांचा तीन गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी शिंदे यांच्यासह कुणाल लांडगे, नरेंद्र भोईर आणि विशाल टिंगरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांना कात्री लावण्याचे आदेश नाहीत

$
0
0

बजेटमधील तुटीवर आयुक्तांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या बजेटमध्ये यंदा सहाशे ते सातशे कोटींची तूट येण्याची शक्यता असल्याने विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, या कामांना कात्री लावण्याचे कोणतेही आदेश दिले नसल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले.

पालिकेच्या बजेटमध्ये तूट येणार असल्याने विकासकामांना कात्र‌ी लावण्याच्या सूचना केल्याचे कारण पुढे करत प्रशासन कामे करत नसल्याची तक्रार सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. बजेटला मुख्य सभा मंजुरी देते, त्यामुळे आयुक्तांना परस्पर कामांना कात्री लावण्याचे अधिकार नाही. ‌कामांना कात्री लावायची असेल तर आयुक्तांनी सर्वात अगोदर तुटीचे बजेट सादर करावे, असे सांगत सर्वपक्षीय सभासदांनी याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. उत्पन्नाचा आणि खर्चाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत खर्च अडीचशे कोटींनी जास्त असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे विद्युत, ड्रेनेज अशा कामांचे निकष ठरविण्याच्या सूचना करण्यात आल्या. याची इतिवृत्तातही नोंद घेण्यात आली होती. मात्र, कामांना कात्री लावण्याचे कोणतेही परिपत्रक काढले नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये शासनाकडून महापालिकेला १९४ कोटींचा निधी मिळाला. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाल्याने कामे मार्गी लावण्याचे पत्रही पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा बजेटमधील तूट सहाशे ते सातशे कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामांचे निकष ठरवून प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. तसेच, कामांना कात्री लावण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा केल्यावरच घेऊ, असे आयुक्तांनी यांनी स्पष्ट केले.

'...तर कात्री लावण्याचा निर्णय घ्या'

विकासकामांना सरसकट कात्री लावण्याच्या निर्णयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील गोगले यांनी 'प्रशासनात दम असेल; तर बजेट पाच कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या नगरसेवकांच्या कामांना कात्री लावण्याचा निर्णय घ्यावा,' अशी मागणी केली. या मागणीला सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांसह अनेकांनी बाके वाजवून पाठिंबा दर्शविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images