Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत : पवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिरुर

'साखर धंदा अडचणीत नसून ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत,' असे स्पष्ट मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी न्हावरा (ता. शिरुर) येथे बोलताना व्यक्त केले. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगामाची सुरुवात पवार यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, 'शेतमालाचे भाव कमी झाले आहेत. फक्त डाळीचे भाव वाढले आहेत. संकटाच्या काळी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. केंद्राची आणि राज्याची धोरणे बदलून ती शेतकऱ्यांच्या मदतीची झाली पाहिजेत.'

'राज्यकर्त्यांशी भेटीगाठी होत असतात, त्यांच्याशी विचारविनिमय चालू असतो. जनतेचे दु:ख राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचावे एवढाच त्यामागे उद्देश असतो,' असे पवार म्हणाले. अर्थमंत्री अरुण जेटली बारामतीत येत असल्याचा पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या वेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजी नागवडे, माजी आमदार पोपटराव गावडे, काकासाहेब पलांडे, जगन्नाथ शेवाळे आदी उपस्थित होते.

कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले. मंगेश ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांनी स्वागत केले. संचालक दिलीप मोकाशी यांनी आभार मानले. या वेळी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका बेबीनंदा सकट, अनिल पलांडे, राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम, प्रगतीशील शेतकरी दौलत भाकरे, रामचंद्र नागवडे यांचा सन्मान शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिवडीमध्ये सशस्त्र दरोडा

$
0
0

मारहाणीत महिलेचा मृत्यू; ८० हजारांचा ऐवज चोरीला

म. टा. वृत्तसेवा, सासवड

पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील मोकाशी वस्तीवर गुरुवारी रात्री दरोडा पडला. या वेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत माजी सभापती रमेश मोकाशी यांच्या आई लीलाबाई दशरथ मोकाशी (वय ६८) यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची पोत, कानातील कुड्या व रोख वीस हजार रुपये असा ऐवज दरोडेखोरांनी पळवून नेला.

भिवडी गावजवळ मोकाशी वस्तीवर लीलाबाई या एकट्याच राहत होत्या. गुरुवारी रात्री दहा ते पहाटे चारच्या दरम्यान हा गुन्हा घडला. या प्रकरणी सासवड पोलिस स्टेशनला पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश मोकाशी यांनी फिर्याद दिली आहे. मोकाशी यांच्या बंद घराच्या पाठीमागील स्टोअरमध्ये लीलाबाई झोपल्या होत्या. दरोडेखोर दरवाज्याचे कुलूप तोडून आत आले, तसेच खिडकीतून त्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला. देवघरात झोपलेल्या लीलाबाईंच्या डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. अडीच तोळे सोन्याची पोत, अर्ध्या तोळ्याच्या कानातील कुड्या व रोख २० हजार, असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले.

दरम्यान, लीलाबाई या घरात एकट्याच राहत असल्याने सकाळपर्यंत या घटनेची कोणालाही माहिती नव्हती. सकाळी मोकाशी यांच्या शेतावर काम करणारा गडी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्याने तातडीने मोकाशी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. मोकाशी यांनी सासवड पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना बोलावून घेतले. सासवड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४६०नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक गौड पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, सासवड शहरामध्येही काही दिवसांपूर्वी भर दिवसा चोरट्यांनी चार घरे फोडली होती. अद्याप त्याचा तपास लागला नाही. सासवड पोलिस स्टेशन अंतर्गत असलेली ४२ गावे व उपलब्ध पोलिस कर्मचारी यांच्यात बरीच तफावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाविरोधात गुन्हा

$
0
0

पुणेः अभ्यास पूर्ण केला नाही, म्हणून अकरा वर्षांच्या मुलीला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. कोथरूडच्या मयूर कॉलनी भागातील पी. जोग शाळेत ही घटना घडली. शिक्षकाने मारल्याने संबंधित मुलीच्या आईने शास्त्रीनगर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे.

शाळेतून घरी आल्यानंतर आपल्या मुलीला जेवताना त्रास होत असल्याचे तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आले. तिच्याकडे विचारणा केली असता, शाळेतील शिक्षकांनी शिक्षा केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असल्याचे मुलीच्या आई डॉ. स्नेहा जोगळेकर यांनी सांगितले. हिंदीच्या शिक्षकांनी आपल्या मुलीसह आठ-नऊ मुलींना छडी मारल्याचे डॉ. जोगळेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलातून टेम्पो चालक तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील दरीपुलाजवळ शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. तरुणाजवळ पोलिसांना सुसाइड नोट मिळाली असून स्वखुशीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या नातेवाइकांना त्रास देऊ नये' असे त्यात म्हटले आहे.

वैभव यशवंत धुमाळ (२६, रा. अमोल एन्क्लेव्ह, फ्लॅट क्रमांक ७, कोटकर लेन, बोपोडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुमाळ हा टेम्पोचालक असून तो अविवाहित होता. तो बोपोडी परिसरात मामाकडे राहण्यास होता. गुरुवारी गावी जाऊन येतो, असे सांगून धुमाळ घरातून दुचाकीवरून बाहेर पडला. धुमाळ हा मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण महामार्गावरून निघाला. दरीपूलापासून काही अंतरावर त्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी केली. रस्त्यापासून काही अंतरावर मातीच्या ढिगाऱ्याजवळ त्याने सॅकमध्ये ठेवलेले पिस्तूल काढले. पिस्तुलातून छातीत गोळी झाडली. गोळी जवळून झाडल्यामुळे धुमाळ जागीच ठार झाला.

शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बाह्यवळण महामार्गाजवळून कंपनीत निघालेल्या कामगाराने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धुमाळला पाहिले. त्याने तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण घटनास्थळी पोहचले. धुमाळ याच्याकडे सापडलेले पिस्तूल देशी बनावटीचे आहे. हे पिस्तूल त्याच्या मामाचे असल्याचा संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरदचंद्र बेलवलकर यांचे पुण्यात निधन

$
0
0

पुणेः ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आणि बेलवलकर हाउसिंग कंपनीचे संस्थापक शरदचंद्र कृष्ण बेलवलकर (वय ७५) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ए. व्ही. भट यांच्याकडे त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर, बेलवलकर हाउसिंगच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम व्यवसायात अनेक वर्षे काम केले. व्यवसाय करीत असताना, लेखन, वाचन, फोटोग्राफी, प्रवास हे छंद त्यांनी जोपासले. ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर सहज समजतील अशा तेराव्या अध्यायापर्यंतच्या ओव्या त्यांनी लिहून पूर्ण केल्या होत्या. 'ऐसी अक्षरे' या नियतकालिकाच्या उपक्रमाची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गात फटाके फोडले

$
0
0

पिंपरीः वाढदिवस साजरा करण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गातच फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी कासारवाडी येथे घडला. या प्रकारमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. विशेष म्हणजे या प्रकारानंतर वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापिका शाळेत नसल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांनी याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

विद्यार्थिनींच्या पालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दहावी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी शाळेत फटाके फोडून तो साजरा करण्याचे ठरविले होते. विद्यार्थ्यांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दहावी 'अ'च्या वर्गातील मुलांनी वर्गातच सुतळी बॉम्ब व फटाके फोडण्यास सुरुवात केली. या वेळी वर्गात चौदा मुली उपस्थित होत्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्व मुली प्रचंड घाबरल्या. घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी शिक्षकांकडे तक्रार केली असता शिक्षकांनीही मुलांवर कारवाई न करता या मुलींनाच घरी जाण्यास सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आहे ‘पॉप्युलर’ तरी

$
0
0

'पॉप्युलर बुक हाउस'ला ६१ वर्षे पूर्ण; ऑनलाइन विक्रीचा फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अक्षर वाङ्मयाच्या वैभवशाली दालनांपैकी एक असलेले डेक्कन जिमखाना परिसरातील पॉप्युलर बुक हाउस बहुतांश इतर जुन्या पुस्तक विक्री केंद्रांप्रमाणेच अस्तित्वासाठी संघर्ष करते आहे. ऑनलाइन विक्रीचा थेट बसलेला फटका आणि वाचनाची कमी होत चाललेली आवड यामुळे ही स्थिती ओढवल्याचे चित्र आहे.

'पॉप्युलर बुक हाउस'च्या स्थापनेला नुकतीच ६१ वर्षे पूर्ण झाली. गेल्या दहा वर्षांपर्यंत वाचकांचा प्रचंड ओघ अनुभवणाऱ्या या दालनातील गर्दी अलीकडील काळात जाणवण्याइतपत कमी झाली आहे. 'गेल्या दोन वर्षांत सुमारे ५० टक्के ग्राहक कमी झाले आहेत,' अशी माहिती 'पॉप्युलर बुक हाउस'चे सुनील गाडगीळ यांनी दिली.

'चांगली नावे असलेली पुस्तक विक्री दुकाने बंद पडण्याचे प्रमाण पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षांत वाढले आहे. परदेशातही 'बॉर्डर्स'सारखी प्रसिद्ध पुस्तक विक्री केंद्रांची साखळी बंद पडली. या पुस्तक विक्री केंद्रांना मुख्यतः ऑनलाइन विक्रीचा फटका बसला आहे. पुण्यातही हाच ट्रेंड दिसतो आहे,' असे गाडगीळ यांनी नमूद केले.

'पॉप्युलर बुक हाउस'ची स्थापना १० ऑक्टोबर १९५४मध्ये झाली. सुनील गाडगीळ यांचे वडील माधव गाडगीळ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात सहायक ग्रंथपाल होते. त्यांनी जंगली महाराज रस्त्यावर तत्कालीन 'पूना कॅफे हाउस'नजीक पॉप्युलर लायब्ररी आणि बुक स्टॉल या नावाने दुकान सुरू केले. मात्र, सन १९६१च्या पानशेत पुरात या दुकानाचे नुकसान झाले. सुमारे पाच हजार पुस्तके खराब झाली. त्यानंतर निळूभाऊ लिमये यांनी सध्याची जागा 'पॉप्युलर'ला दिली आणि १० ऑक्टोबर १९६४ला पॉप्युलर बुक हाउस आणि लायब्ररी पुन्हा सुरू झाले.

'आमच्याकडे तत्कालीन सर्व प्रतिष्ठित मराठी लेखकांची; तसेच 'पेंग्विन'ची इंग्रजी पुस्तके होती. आम्ही वाचकांना प्रत्यक्ष पुस्तके हाताळून निवड करण्याची संधी द्यायला सुरुवात केली आणि 'पॉप्युलर'ची लोकप्रियता वाढली. आम्ही जयकर ग्रंथालय, गोखले इन्स्टिट्यूट अशा संस्थांनाही पुस्तके पुरवत होतो,' असे गाडगीळ यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'गेल्या काही वर्षांत काळाप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करत 'पॉप्युलर'मध्ये सिनेमांच्या; तसेच शैक्षणिक सीडींचीही विक्री सुरू झाली. मात्र, आता 'डाउनलोडिंग'च्या ट्रेंडमुळे त्यावरही मर्यादा आल्या आहेत. बारा वर्षांपूर्वी आम्ही ऑनलाइन पोर्टल सुरू केले होते. मात्र, त्या वेळी ते चालले नाही आणि बंद करावे लागले. आता त्याच ऑनलाइन ट्रेंडचा आम्हाला फटका बसतो आहे. सध्या दुकानात सुमारे १५,००० पुस्तके आहेत. ग्रंथालयही सुरू आहे. पूर्वी आठवड्याला ३०० पुस्तके विकली जायची. ती संख्या आता निम्म्यावर आली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालीमातेचे रम्य मंदिर

$
0
0

>> मंदार लवाटे

विद्यापीठाच्या मागे खडकी स्टेशनच्या नजीक कालीमातेचे एक रम्य मंदिर आहे. पुण्यातील बंगाली समाजाने १९७६ साली हे मंदिर बांधले व १९९६ साली त्याचा जीर्णोद्धार केला. यासाठी तपन देवनाथ यांनी पुढाकार घेतला होता. येथील मंदिरांची रचना बंगाली पद्धतीची व संगमरवरी आहे. मध्यभागी कालीमातेचे मंदिर असून, कालीमातेची मूर्ती दोन ते अडीच फूट उंच आहे. पारंपारिक रूपानुसार जीभ बाहेर आहे. पायाखाली महादेव, उजवा वरील हात अभय मुद्रेत व खालील हात वरद मुद्रेत आहे. डाव्या वरील हातात विळा, तर खालील हातात मुंडके आहे.

देवीची स्थापना बैठकीवर केलेली आहे. बैठकीच्या खाली रामकृष्ण परमहंस व शारदामाता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. देवीच्या डाव्या बाजूस गणपतीचे, तर उजव्या बाजूस शंकराचे मंदिर आहे. या मूर्ती जयपूरहून घडवून आणल्या, असे अनुप दत्त यांनी सांगितले.

मटा नवरंग...येथे फोटो अपलोड करा आणि जिंका भरघोस बक्षिसं!

मंदिरासमोर मोठा सभामंडप असून त्याखाली ध्यानधारणेसाठी तितकेच मोठे तळघर आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम असतात. मुख्य उत्सव नवरात्रात असतो. महाराष्ट्रात जे महत्त्व गणपती उत्सवास ते येथे दुर्गापूजेस असल्याने येथे मोठा मांडव घालून उत्सवाची तयारी सुरू असलेली दिसते. षष्ठीला देवीची स्थापना होते व दसऱ्याला विसर्जन होते. मंदिराची रचना व येथील परिसर हे मन प्रसन्न करणारे आहेत. काली बाडी म्हणजे कालीमातेचे घर. येथे विद्यापीठाच्या मागील खडकी गेटमधून जाता येते अथवा ब्रेमेन चौकातून स्पायसर कॉलेज ओलांडून पुढे गेले की या रस्त्याच्या शेवटी उजव्या हातास वळल्यावर हे मंदिर आहे. या मंदिरा लगतच अय्यपा स्वामींचेही मंदिर आहे. सकाळी ५ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते १० या वेळात येथे दर्शन घेता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात ६७ गावे दुष्काळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या पुणे जिल्ह्यात ६७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून या गावांमध्ये कृषिपंपांना वीजबील सवलती, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, जमीन महसुलामध्ये सूट अशा सवलती देण्यात येणार आहेत.

अपुऱ्या पावसामुळे या गावांत शेतीबरोबरच रोजगारांच्या साधनांवर मर्यादा आल्या होत्या. या गावांचा दुष्काळी गावांच्या यादीत समावेश झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा पावसाने मोठी ओढ दिली. अनेक भागांमध्ये पावसाने सरासरीही गाठली नाही. त्याचा परिणाम शेतीवर झाला आहे. तसेच धरणांतही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. या परिस्थितीत अपुरा पाऊस झालेल्या जिल्ह्यातील गावांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्य सरकारने जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पावसाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झालेल्या तसेच ६७ पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६७ गावांचा समावेश आहे.

पावसाचे अडीच-तीन महिने कोरडे गेल्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची नव्या पद्धतीनुसार नजर अंदाज पैसेवारी करण्यात आली आहे. नव्या पैसेवारीच्या पद्धतीमध्ये मागील पाच वर्षांची उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे घोषित झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रज बोगद्यात टेम्पोला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रजच्या नवीन बोगद्यात एका टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यामुळे बोगद्यात मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. परिणामी, परिस्थिती निवळेपर्यंत या मार्गावरील एक बाजूची वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

नऱ्हे-आंबेगाव येथून हेरोकोम आणि निकेलचे ड्रम व पिशव्या घेऊन साताऱ्याला चाललेल्या टेम्पोच्या (क्रमांक- एम एच-१२, एफझेड ४८२६) इंजिनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामध्ये टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. सिंहगड रोड फायरब्रिगेड केंद्रातील जवानांनी ताबडतोब घटनास्थळी दाखल होत आग विझवली. या आगीत जीवितहानी झाली नाही.

मात्र, या आगीच्या घटनेनंतर नवीन बोगद्याच्या पुणे-सातारा लेनला जांभूळवाडी बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वारजे वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक महेशकुमार सरतापे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या मदतीने टेम्पो बाजूला घेऊन वाहतूक साडेचार वाजण्याच्या सुमारास सुरू केली. रोहिदास दुधाने, संतोष भिलारे, सुनील धिवडकर, भरत गोगावाले, भरत भुजबळ हे जवान मदत कार्यात सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल्यमापनासाठी पालिकेचे ‘स्कोअर कार्ड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारी करणाऱ्या पालिकेने प्रशासनामध्येही 'स्मार्टनेस' आणण्यासाठी पावले उचलली असून, ई-गव्हर्नन्स अंतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी दर महिन्याला विभागप्रमुखांकडून 'स्कोअर-कार्ड' भरून घेण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी नुकतेच त्या संदर्भात निर्देश दिले असून, पुढील महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

तब्बल चार हजार कोटींचे बजेट असणाऱ्या पालिकेची स्मार्ट सिटीतील समावेशासाठी विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध खात्यांतर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, त्यांच्यातर्फे सुरू असणारे प्रकल्प, नागरिकांना दिली जाणारी माहिती, यासह इतर बारीक-सारीक तपशील 'स्कोअर-कार्ड'च्या माध्यमातून भरण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सर्व माहिती कम्प्युटर विभागाला कळविण्यात यावी, असे निर्देशही दिले गेले आहेत.

या स्कोअर-कार्डसाठी पालिकेतील प्रत्येक विभागाची कार्यपद्धती कशी असावी, याचे मापदंड निश्चित करण्यात आहेत. पालिकेच्या विविध विभागांमध्ये परस्पर समन्वय राखला जातो का; तसेच विविध विभागांतील त्रुटी आणि कमतरता काय आहेत, हे याद्वारे समोर येऊ शकणार आहे.

प्रतिसादावर यश ठरणार

पालिकेच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी आतापर्यंत अनेक आयुक्तांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. मात्र, त्याची अपेक्षित अंमलबजावणी होऊ न शकल्याने सर्व उपाय केवळ कागदावरच राहिले आहेत. त्यामुळे, स्मार्ट सिटीकडे जाण्यास इच्छुक असणाऱ्या शहरात आता या नव्या 'स्कोअर-कार्ड'ला अधिकारी-कर्मचारी कसा प्रतिसाद देतात, त्यावरच त्याची यशस्विता ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएसने) गुरुवारी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सागर शांताराम सावंत (वय २८, रा. गहुंजे, ता. मावळ) व नितीन पांडूरंग गव्हाळे (वय १९, रा. रमाबाईनगर झोपडपट्टी, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्यांची दहशतवादविरोधी पथकाकडून माहिती काढण्याचे काम सुरू आहे. त्या वेळी बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विश्रांतवाडी परिसरातील हॉटेल किर्तीसमोर शस्त्र घेऊन दोन व्यक्ती येणार आहेत. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे याच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून त्यांना अटक केली.

आरोपीला कोठडी

आर्किटेक्चर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन देतो असे सांगून ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरज शशिकांत म्हेत्रे (रा. कल्पना अपार्टमेंट, भवानी पेठ) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध सुनील विठ्ठल पारखे (४८, रा. बाणेर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच मागणाऱ्या इंजिनीअरला अटक

$
0
0

पुणेः टायर रिमो‌ल्डिंगच्या कामाचे बील वरिष्ठांकडे मंजुरीला पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या 'पीएमपीएम'च्या डेपो मेंटेनन्स इंजिनीअरला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केली. रमेश शामराव चव्हाण असे अटक केलेल्या इंजिनीअरचे नाव आहे. चव्हाण 'पीएमपी'मध्ये भांडार विभागात डेपो मेंटेनन्स इंजिनीअर म्हणून काम करीत होता. तक्रारदाराचा टायर रिमोल्डिंगचा व्यवसाय आहे. पीएमपीचे टायर रिमोल्डिंगचे काम टेंडरप्रमाणे त्यांच्याकडे आहे. जानेवारीपासून केलेल्या कामाचे पंधरा ते वीस लाख रुपये बील 'पीएमपी'कडे थकीत आहे. प्रलंबित बील वरिष्ठांकडे मंजुरीला पाठविण्यासाठी चव्हाण याने ऐंशी हजार रुपयांची लाच मागितली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भामा-आसखेडबाबत तातडीने बैठक घ्या’

$
0
0

पुणे : 'भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सध्या या प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले असले, तरी शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन त्याबाबत त्वरेने निर्णय घेणे गरजेचे असल्याने तातडीची बैठक बोलाविण्यात यावी,' अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वीच भामा-आसखेड योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले होते. तसेच, शिवसेनेने दगडफेक करून हे कामही बंद पाडले. केंद्र सरकारने भामा-आसखेड योजनेसाठी निधी मंजूर केला आहे. त्याद्वारे, जलवाहिनीचे काम सुरू असले, तरी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद करण्यात आले आहे. शहराच्या पूर्व भागांतील नागरिकांना याद्वारे सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. ही योजना वेळेत कार्यान्वित झाल्यास त्याचा लाभ शहरातील सुमारे दहा लाख नागरिकांना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्लू लाइन’ निश्चित करा

$
0
0

जलसंपदा विभागाला राम नदीबाबत तातडीच्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेल्या राम नदीची पूररेषा निश्चित झाली नसल्याबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नाराजी व्यक्त केली आहे. नदीची 'ब्लू लाइन' तातडीने निश्चित करण्याची सूचनाही प्राधिकरणाने जलसंपदा विभागाला केली आहे.

राम नदीतील अतिक्रमणांसंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवालही पुढच्या सुनावणीपर्यंत दाखल करण्याचे निर्देश न्यायाधिकरणाने दिले आहेत. राम नदीवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र आक्रसले आहे. हे पात्र अरुंद झाल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन नजीकच्या सोसायट्यांमध्ये शिरते. या नदीतील अतिक्रमणे काढावीत आणि प्रवाह मोकळा करावा, यासाठी हरित लवाद न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल झाली आहे. या याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायाधिकरणाने राम नदीतील अतिक्रमणांची पाहणी करण्याचे आदेश दिले. महसूल खाते व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नदीची संयुक्त पाहणी केल्यानंतर महसूल खात्याने नदीत भुगाव व बावधनमधील आठ अतिक्रमणांवर कारवाई केली.

राम नदीपात्रातील बांधकामासंदर्भात एका बांधकाम व्यावसायिकाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यानुषंगाने जलसंपदा विभागानेही प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यासंदर्भातील सुनावणीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नदीची पूररेषा निश्चित झाली नसल्याबद्दल नाराजी प्रकट केली. राम नदीतील अतिक्रमणांबद्दल समिती नेमण्यात आली आहे. या समितीने नदीची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल तयार करावा, अशी सूचना न्यायाधिकरणाने केली होती. त्यानुषंगाने समितीने नदीची पाहणी केली. पण त्याचा अहवाल सादर केलेला नाही. हा अहवाल सादर करण्याची सूचनाही न्यायाधिकरणाने केली आहे.

राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचे अतिक्रमण

राम नदीमध्ये बांधकाम व्यावसायिकांबरोबर स्थानिक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यानेही अतिक्रमण केले असल्याचे समजते. भाजपशी संबंधित एका नेत्याचे बांधकाम नदीपात्रात आले आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीत हे बांधकाम निदर्शनास आले आहे. त्याला महापालिकेकडून नोटीसही देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, या बांधकामावर अद्याप कारवाई झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मारहाण करणाऱ्या शिक्षकाला जामीन

$
0
0

पुणेः अभ्यास केला नाही म्हणून विद्यार्थ्याला हात सुजेपर्यंत मारणाऱ्या जोग शाळेच्या शिक्षकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टाने या शिक्षकाला जामीन मंजूर केला आहे. जयदीप भोसले (वय ३३, रा. शिवणे) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. स्नेहा जोगळेकर यांच्या मुलीसह शाळेतील इतरही काही मुलांना या शिक्षकाने छडीने मारले होते. जोगळेकर यांनी शाळेकडे तक्रार केली होती. मात्र,शिक्षकावर कारवाई झाली नव्हती. अखेर तक्रार दिल्यानंतर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोसलेंना अटक केली. त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. शाळेने शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॅगीविरोधात सुप्रीम कोर्टात’

$
0
0


पुणेः मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार तीन विविध प्रयोगशाळांमध्ये मॅगीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये खाण्यायोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे, असे नेस्ले कंपनीने शुक्रवारी जाहीर केले. याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात आला असून मॅगीविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महसूल’ सुप्रीम कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भामाआसखेड धरणाच्या ३८८ प्रकल्पग्रस्तांना ६५ टक्के रक्कम भरून पर्यायी जमीन देण्याच्या हायकोर्टाच्या निकालाविरोधात महसूल प्रशासनाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाचे पालन केल्यास भामाआसखेडसह पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणग्रस्तांना किमान दहा हजार हेक्टर जमीन द्यावी लागणार असल्याने प्रशासनासमोर अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे.

भामाआसखेड धरणामध्ये २००० मध्ये पाणी अडविण्यास सुरुवात झाली. हे धरण बांधताना स्थानिक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. तसेच या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हवेली व दौंड तालुक्यात पर्यायी जमीन देण्याचे निश्चित झाले होते. धरण बांधण्यापूर्वी कलम १५ नुसार पुनर्वसन आराखडा जाहीर करण्यात आला. त्यानंतर कलम १६ (१) अन्वये शेतकऱ्यांनी पासष्ट टक्के रक्कम भरून ४५ दिवसांत पर्यायी जमिनीसाठी अर्ज करणे अपेक्षित असते.

या पर्यायी जमिनीसाठी बहुतांश प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. धरण बांधून वीस वर्षे उलटल्यानंतर शेतकऱ्यांनी हायकोर्टात धाव घेऊन पर्यायी जमीन मिळण्यासाठी दावा केला. हायकोर्टाने त्यावर निकाल देताना भामाआसखेड धरणाच्या ३८८ प्रकल्पग्रस्तांना ६५ टक्के रक्कम भरून पर्यायी जमीन देण्यात यावी असे स्पष्ट केले. हायकोर्टाच्या या निकालाने प्रशासनाचे धाबे दणाणले. भामाआसखेड धरणाचा निकाल हा पुण्यातील सर्वच धरणांना पुनर्वसनासाठी लागू होऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व धरणग्रस्तांना अशा पद्धतीने जमीन द्यायची झाल्यास किमान दहा हजार हेक्टर जमीन वाटप करावी लागेल. धरणग्रस्तांना देण्यास एवढी जमीन जिल्ह्यात कोठेही उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर, हायकोर्टाने दिलेल्या निकालाला प्रशासनाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शतप्रतिशत बारामती!

$
0
0

अरुण जेटली यांची शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने

म. टा. वृत्तसेवा, बारामती

महाराष्ट्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात सातत्याने कुरबुरी सुरू असताना व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर खोचक टिप्पणी केली असताना भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी जणू 'शतप्रतिशत बारामती'चा नारा दिला. जेटली यांनी शनिवारी पवार यांच्याकडे बारामतीत पाहुणचार झोडला. त्यानंतर, 'पवार यांनी बारामतीचा कायापालट केला असून, देशात अशा शंभर बारामती निर्माण झाल्याखेरीज खरी क्रांती होणार नाही' अशी स्तुतिसुमने जेटली यांनी पवार यांच्यावर उधळली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी बारामतीमध्येच पवारांचा पाहुणचार स्वीकारला होता. त्यांच्यापाठोपाठ जेटली यांनी बारामतीचा दौरा केला. 'अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट'च्या कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन जेटली यांच्या हस्ते झाले. विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनीअरिंग कॉलेजचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी असे नामकरणही त्यांनी केले. त्यानंतर जेटली यांनी पवार यांच्या विकासकार्याचे कौतुक केले.

'पवार हे न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान'

उद्योगपती राहुलकुमार बजाज यांनीही बारामतीत पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. 'पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहेत', असे बजाज म्हणाले.

ते म्हणाले होते...

​भाजप-सेनेचे नेते परस्परांवर आरोप करीत असले तरी हे दोन्ही पक्ष सत्तेला लागलेले मुंगळे आहेत. गोडी आहे तोपर्यंत हे सरकार टिकेलच. - शरद पवार, बुधवार, १४ ऑक्टोबर

सेनेशी आमचे संबंध चांगले असून, आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. त्यासाठी राष्ट्रवादीची गरज लागणार नाही.

- देवेंद्र फडणवीस, गुरुवार १५ ऑक्टोबर

शिवसेनेचे मंत्री राजीनामा देऊन राज्य सरकार अर्धवट अवस्थेत सोडणार नाहीत. मात्र शिवसेनेसाठी आत्मसन्मानही महत्त्वाचा आहे.

- सुभाष देसाई, गुरुवार १५ ऑक्टोबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवानी पेठेतील भवानी माता

$
0
0

>> मंदार लवाटे

पुण्यात बऱ्याच पेठात भवानी देवीची मंदिरे आहेत. परंतु, सर्वांत प्रसिद्ध आहे ते भवानी पेठेतील मंदिर! येथील पेठच या मंदिराच्या नावाने ओळखली जाते.

भवानी पेठेच्या तसेच मंदिराच्या स्थापनेचा अस्सल कागद आजपर्यंत पाहण्यात आला नाही. या दोन्हीची स्थापना उत्तर पेशवाईत झालेली आहे. येथे भवानीची मूर्ती तुळजापूरप्रमाणे आठ हातांची नसून, चार हातांची आहे. उंची सुमारे अडीच फूट आहे. काळ्या पाषाणात ही मूर्ती घडविलेली आहे व ती उभी आहे. कमंडलू, गदा, शंख ही आयुधे धारण केली आहेत. भवानीच्या उजव्या बाजूस कोंढणपूरच्या देवीची अर्थात तुकाईची मूर्ती आहे. ही मूर्तीही काळ्या पाषाणातील असून महिषासूरमर्दिनीच्या रूपातील आहे. भवानीच्या उजव्या बाजूस ओवरीत विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्ती आहेत.
मटा नवरंग... येथे क्लिक करा, फोटो अपलोड करा आणि जिंका भरघोस बक्षिसं!
गाभारा पूर्णतः दगडाने बांधलेला आहे. समोर सभामंडप आहे. सभामंडपात चित्रे व दुर्मिळ फोटो लावले आहेत. यात इंग्रजी काळाच्या सुरुवातीची खंडोबा व देवी अशी दोन चित्रे आहेत, ती पाहण्यासारखी व अभ्यास करावा अशी आहेत. नवरात्र हा येथील मुख्य उत्सव व मोठ्या गर्दीचा काळ. उत्सवाबाबत मंदिराचे विश्वस्त विनायक मेढेकर यांनी माहिती दिली. उत्सव प्रतिपदा ते कोजागिरीपर्यंत असतो. उत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम असतात. दसऱ्याला छबिना म्हणजे पालखी निघते. ती फडगेटपर्यंत येऊन शिवाजी रस्ता, बुधवारातील दत्त मंदिर, सोन्या मारुती, मोती चौक, बोहरी आळी, गोविंद हलवाई चौक या रस्त्याने परत मंदिरात येते. दसऱ्याला सर्व व्यापारी वर्ग देवीच्या दर्शनास येतो. नवरात्रात मंदिर रात्री ११ ते पहाटे ५ या काळात बंद असते. नऊ दिवस रोज सकाळी १०.३० व रात्री ८.३० ला आरती असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images