Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

पुणे : मुंबई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणखी दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अॅग्नेलो उर्फ गुड्या अशोक देवलिया (वय २९, रा. कान्हेफाटा, मावळ) आणि अनिल चंद्रकांत काळखैर (४१, रा. देहूरोड) यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी आणखी चारजणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस शिपाई जालिंदर लोंढे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आठ सप्टेंबर २०१५ रोजी पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म परिसरात कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत चारजणांना पकडण्यात आले होते.

मारहाणप्रकरणी एकाला अटक

पुणे : बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मयूर ज्ञानेश्वर सिन्नरकर (२८, रा. सदाशिव पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुजित हणमंत दाते (३६, रा. तांबे बोळ, शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. २४ सप्टेंबर रोजी रात्री शनिवार पेठेतील निधी बारमध्ये ही घटना घडली. दाते हे मित्रांसह दारू पित होते. त्या वेळी सिन्नरकर तेथे दारू पिण्यासाठी बसले. त्या वेळी सिन्नरकरच्या मित्राचा धक्का लागल्याने टेबलवरील ग्लास फुटल्याने वाद झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोकाशी स्थानबद्ध

$
0
0

पुणे पोलिसांची एमपीडीएची सातवी कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार मुज्जमिल उर्फ मुर्ग्या शब्बीर मोकाशी (वय ३२, रा. घोरपडे पेठ) याच्याविरुध्द एमपीडीएची कारवाई केली आहे. त्याला औरंगाबाद येथील मध्यवर्ती जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे. या वर्षी पुणे पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत ७ सराईत गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

सराईत मुर्ग्या मोकाशीविरुद्ध विश्रामबाग, वानवडी, कोंढवा आणि खडक पोलिस ठाण्यात पिस्तुल, तलवार, चॉपर, चाकु, कोयता यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगून परिसरात खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरीचे गुन्हे केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मोकाशीमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता होती. त्याच्याविरुध्द कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. आरती महादेव मिसाळ (२५, रा. लोहियानगर) यांना मोकाशीने धमकविले होते. मोकाशीच्या गुन्हेगारी कृत्याच्या अनुषंगाने सह आयुक्त सुनील रामानंद यांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी व गुन्ह्यांची पडताळणी केल्यानंतर त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी शनिवारी मोकाशीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींनी दिशाभूल करू नये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व मिळविण्याचे ध्येय वास्तवात अजून दूर आहे, त्यामुळे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची दिशाभूल करू नये,' असा टोला माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी लगावला. 'नवे मित्र जोडण्याबरोबरच रशियासारखा मित्रदेशही आपल्याला पाठिंबा का देत नाही, याचा विचार करा,' असे सांगून पंतप्रधान मोदी यांना आंतरराष्ट्रीय राजकारण समजत नाही, अशीही टिपण्णी त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत, त्या पार्श्वभूमीवर भारताला सुरक्षा समितीचे सदस्यत्व मिळविण्याचा मुद्दा चर्चेत आहे. ही प्रक्रिया पूर्वीपासून सुरू आहे. 'ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया यांची यासाठी भारताला पाठिंबा देण्याची भूमिका होती. मात्र, स्वातंत्र्यापासून आपला मित्रदेश असलेला रशिया आता आपल्याला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत नाही, तसेच प्रथमच रशियाने पाकिस्तानशी संरक्षणविषयक करार केला, या बाबी चिंताजनक आहेत,' असे शर्मा म्हणाले. 'केवळ एखाद्या देशात जाऊन तेथील राष्ट्रप्रमुखांचे कौतुक करणे, म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण, असे पंतप्रधान मोदी यांना वाटत असले, तरी या बाबी त्याहून अधिक गुंतागुंतीच्या असतात, याची जाणीव ठेवली पाहिजे. महासत्ता बनण्याचे स्वप्न समोर ठेवताना संतुलित परराष्ट्रधोरणाची गरज आहे. मात्र, मोदी हे अजूनही निवडणुकीच्या प्रचारतंत्राची जुनी मानसिकता बदलण्यास तयार नाहीत, विरोधी पक्षांना देशात आणि परदेशातही अपमानित करण्यातच ते धन्यता मानत आहेत,' अशी टीका त्यांनी केली.

सरकारची नफेखोरी

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती प्रचंड कमी झालेल्या असतानाही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यात येत नाहीत. या माध्यमातून सरकारने गेल्या चार महिन्यांतच ३६ हजार कोटी रुपयांचा नफा कमावला असून या वर्षभरात ही रक्कम एक लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, त्यामुळे सरकार यामध्ये नफेखोरी करीत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.

राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबत पक्षाचा सामूहिक निर्णय

'काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून भाजपने टीकास्त्र सोडले आहे, त्याबाबत बोलताना राहुल गांधी यांचा प्रभाव पडत नसेल, तर त्यांच्या परदेश दौऱ्यांबाबत इतकी उत्सुकता का,' असा प्रश्न शर्मा यांनी केला. 'राहुल गांधी यांना एसपीजी संरक्षण आहे, त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा सरकारला नक्कीच ठाऊक आहे,' असेही ते म्हणाले. 'राहुल गांधी काँग्रेसचे नेतृत्व कधी स्वीकारणार, असे विचारले असता त्याबाबत काँग्रेस कार्यकारिणी सामूहिक निर्णय घेईल,' असे उत्तर त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजि निरोपाचा दिनु...

$
0
0

पुणे : पुणेकरांच्या उत्साहाने गेले दहा दिवस भक्त‌िमय वातावरणात साजरा झालेल्या गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाची आज (रविवारी) जल्लोषपूर्ण मिरवणुकीने सांगता होत आहे. मंगलमय सुरावटी आणि ढोलताशांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी सकाळी साडेदहापासून मिरवणूक सुरू होणार आहे. मानाच्या गणपतींसह शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन हौदांमध्ये करण्याचा निर्णय घेऊन टाकलेले नवे पाऊल, हे यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंडळाच्या गणेशाची पूजा महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते होईल. पालकमंत्री गिरीश बापट, पोलिस आयुक्त के. के. पाठक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित राहणार आहेत. लक्ष्मी रोड, केळकर, कुमठेकर, टिळक या रस्त्यावरून मध्यवर्ती पुण्यातील सर्व विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. सकाळच्या सत्रात मानाचे पाच गणपती आणि रात्री रोषणाईचे गणेशरथ हे यंदाच्याही मिरवणुकीचे आकर्षण आहे.

गणेश मंडळांबरोबरच, पोलिस, महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत आणि नियोजनबद्ध व्हावी, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी प्रमुख रस्त्याची पाहणी केली. अनेक मंडळांनी शनिवारी दुपारीत त्यांचे गाडे रांगेत लावण्यास सुरुवात केली होती. रात्री उशिरापर्यंत रथ सजविण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. फुलांच्या आकर्षक रचना, रोषणाईसाठी दिव्यांची केलेली मांडणी, कलाकुसरीचे रेखीव देखाव्यांनी सजविलेले रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. महापालिकेनेही नदीकाठावर विसर्जन घाटांची व्यवस्था केली असून फायर ब्रिगेडने सुरक्षिततेसाठी जय्यत तयारी केली आहे.

विसर्जनाला मुहूर्त नाही

गणपती विसर्जनाला मुहूर्त नाही. अनंत चतुर्दशी दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही गणेश विसर्जन केले तरी चालते. या दिवशी पौर्णिमा असली तरी विसर्जन दिवसभरात कधीही करायला हरकत नाही, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विश्वासू’ ड्रायव्हरने लांबवले ९५ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इस्टेट एजंटच्या कारवर काम करणाऱ्या चालकाने मोटारीच्या डिकीतील ९५ लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना सॅलिसबरी पार्क येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्टेट एजंट बिमल किमतानी (वय ६०, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीवरून चालक स्टिव्हन अँथोनी (वय ३५, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रायव्हर फरारी झाला आहे. किमतानी यांचा इस्टेट एजंटचा व्यवसाय आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्टिव्हन हा त्यांच्याकडे चालक म्हणून काम करतो. त्यामुळे त्याच्यावर किमतानी यांचा विश्वास बसला होता. कोणत्याही मोठ्या व्यवहाराच्यावेळी किमतानी स्टिव्हनला सोबत घेऊन जायचे. काही दिवसांपूर्वी उल्हासनगर येथील जागेचा व्यवहार झाला होता. या व्यवहारात त्यांना एका व्यक्तीने ९५ लाख रुपये दिले होते. ते पैसे त्यांनी मोटारीतील डिकीत ठेवले होते.

सॅलिसबरी पार्कमधील सिटी वंडर्स इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांची कार पार्क केली होती. गुरुवारी स्टिव्हन कारच्या डिकीतील पैशाची बॅग घेऊन पळून गेला. शुक्रवारी सकाळी तो कामावर न आल्यामुळे किमतानी यांनी त्याला फोन केला. मात्र, त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे किमतानी यांना संशय आला. कारच्या डिकीत पैशाची बॅग नसल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगेश जोशी, रेड्डी ‘भटनागर’चे मानकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सीएसआयआरच्या परिषदेचे 'लाइव्ह वेबकास्टिंग' मी पाहात होतो. पारितोषिकाच्या घोषणेची वेळ झाली, आणि काही क्षणातच माझे नाव जाहीर झाले... अत्यंत प्रतिष्ठेच्या या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याने डोळ्यात आनंदाश्रू तरळले, कृतज्ञतेची भावना दाटून आली, आणि तेव्हाच भविष्यातील संशोधनासाठी मोठी प्रेरणा मिळाल्याचीही जाणीव झाली. 'मेक इन इंडिया' आणि रोजगारनिर्मितीला चालना देईल, असे संशोधन मला करायचे आहे....'

यंदाचे शांतिस्वरूप भटनागर पारितोषिकाचे मानकरी डॉ. योगेश मोरेश्वर जोशी 'मटा'शी बोलत होते. 'सध्या मी विविध संशोधन प्रकल्पांवर काम करत आहे. उद्योगजगतासाठी आवश्यक संशोधन करून भारतीय कंपन्या उत्पादन क्षेत्रात आघाडीवर जातील, असे संशोधन मला करायचे आहे. यातून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. माझ्या पारितोषिकाचे श्रेय मी माझे पीएचडीचे मार्गदर्शक डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. आशिष लेले यांना देतो,' असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

'केमिकल इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. एम. एम. शर्मा यांच्यासारखे दिग्गजही भारतात आहेत. भविष्यातही भारतात केमिकल इंजिनीअरिंग क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध असणार आहेत,' असे डॉ. जोशी यांनी नमूद केले.

पुण्यातच झाले शिक्षण

डॉ. योगेश मोरेश्वर जोशी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये झाले. मॉडर्न कॉलेजमधून बारावी झाल्यानंतर त्यांनी एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधून (एनसीएल) डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीचे संशोधन केले. त्यानंतर तीन वर्षे अमेरिकेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिपअंतर्गत संशोधन केल्यावर ते भारतात परतले. त्यानंतर २००४ पासून ते आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 'या पारितोषिकामुळे मला मोठी ऊर्जा मिळाली आहे,' असे जोशी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक सुधारणेला ‘डीपी’चे प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील (डीपी) आरक्षणांवरून झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३९० आरक्षणे वगळण्याची शिफारस विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केली आहे. प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, रेल्वे, पीएमपी आणि मेट्रोसाठी अतिरिक्त जागा, १३० एकरवर बिझनेस झोन, शासकीय जमिनी आरक्षणमुक्त करण्यासारखे बदलही या समितीने आपल्या अहवालात सुचविल्या आहेत. हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला असून, तो नागरिकांना एक महिना पाहता येणार आहे.

या समितीने विकास आराखड्यात अनेक बदल सुचविताना गावठाणासारख्या भागांत चटई क्षेत्र (एफएसआय) निश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल्स) तयार करण्यास तीन महिन्यांची वाढीव मुदत सरकारकडे मागितली आहे. चोक्कलिंगम समितीमध्ये पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते यांचा समावेश होता. प्रा-रूप विकास आराखड्यावर हरकती-सूचनांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरही महापालिकेला आराखडा सरकारकडे वेळेत सादर करता आला नाही. त्यामुळे मार्चमध्ये हा डीपी ताब्यात घेऊन सरकारने ही समिती नेमली होती.

'डीपी मंजूर झाल्यापासून दहा वर्षांच्या आत संपादित करता येतील, एवढीच आरक्षणे विकास योजनेत प्रस्तावित केली जावीत, अशी तरतूद कायद्यातच आहे; तसेच १९८७च्या डीपीतील डीपीतील केवळ २३ टक्के आरक्षणेच पालिकेला विकसित करता आली आहेत. त्यामुळे पालिकेने प्रसिद्ध केलेल्या नव्या डीपीमध्ये नऊशेहून अधिक आरक्षणे दर्शविण्यात आली असली, तरी त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन काही आरक्षणे वगळण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला,' अशी माहिती एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FTIIमधील आंदोलन थंडावणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'तील (एफटीआयआय) संपकरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बैठक निश्चित केल्यास गेल्या सतरा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दर्शवली आहे. आता सरकार एक पाऊल पुढे येऊन बैठक निश्चित करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

स्टुडंट्स असोसिएशनचे विकास अर्स, राकेश शुक्ला, उपोषणकर्ता विद्यार्थी हिमांशू शेखर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर सरकारने चर्चेची तयारी दाखवली होती. त्याबाबतचे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, त्यात संप मागे घेतल्यास चर्चा करण्याची भूमिका मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी मंत्रालयाला पत्र पाठवून उपोषण मागे घेण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यापूर्वी सरकारने बैठक निश्चित करण्याची त्यांची मागणी आहे.

'माध्यमांच्या बातम्या आणि संस्थेच्या प्रशासनाच्यावतीने संपाविषयीची माहिती मंत्रालयाला वेळोवेळी मिळत आहे. मात्र, माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी संस्थेला भेट दिल्यास त्यांना नेमकी परिस्थिती कळेल. संस्थेत येऊन चर्चा केल्यास ते अधिक चांगले आहे,' असे विकास गर्ग याने सांगितले.

सरकारचे घूमजाव

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून मागील आठवड्यात विद्यार्थ्यांशी बिनशर्त चर्चेची तयारी दर्शविण्यात आली होती. भेटीची वेळ आणि दिवस विद्यार्थ्यांनीच ठरविण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, अचानकपणे सरकारने घूमजाव केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आंदोलन मागे घेऊन शैक्षणिक कामकाज सुरू केल्यास चर्चा होऊ शकेल, असे मंत्रालयाकडून आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आता एक पाऊल मागे घेतले आहे.

आमच्या मागण्यांइतकेच आमचे आरोग्यही लाखमोलाचे आहे. गेले सतरा दिवस सुरू असलेल्या उपोषणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य खालावले आहे. काही सहकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी आता पुढे यायला हवे. - हिमांशु शेखर, उपोषणकर्ता विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


FTIIचे महाभारत २९ तारखेला संपणार?

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'तील (एफटीआयआय) संपकरी विद्यार्थी मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी सरकारी प्रतिनिधीशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून तोडगा काढून आंदोलन पूर्णपणे थांबवण्याची तयारी विद्यार्थ्यांनी केल्याचे समजते.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बैठक निश्चित केल्यास गेल्या सतरा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दर्शवली होती. स्टुडंट्स असोसिएशनचे विकास अर्स, राकेश शुक्ला, उपोषणकर्ता विद्यार्थी हिमांशू शेखर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका बदलताच सरकारने संयुक्त सचिवांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवून २९ सप्टेंबर रोजी चर्चेची तयारी दाखवली आहे.

महाभारतातील युधिष्ठिराच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणा-या गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर विद्यार्थी नाराज झाले होते. केंद्र सरकारने सक्षम संचालकाऐवजी स्वतःचे धोरण राबवण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. चार-पाच वर्षापासून प्रकल्प (प्रोजेक्ट) करत असलेले विद्यार्थी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेऊन दररोज टीव्ही कॅमे-यापुढे येत आहेत, या विद्यार्थ्यांमुळे आंदोलन दीर्घ काळ चालेल आणि आपले शैक्षणिक नुकसान होईल याची जाणीव होताच आंदोलकांमध्ये फूट पडली. सरकार झुकत नसल्याचे पाहून उपोषण सुरु करणा-या विद्यार्थ्यांनी तब्येत खालावल्यानंतर चर्चेची तयारी दाखवली आहे.

उपोषण सोडले

सरकारविरोधात आंदोलन तीव्र करण्यासाठी उपोषण सुरु करणा-या विद्यार्थ्यांनी चर्चेची तारीख ठरताच उपोषण सोडल्याची घोषणा केली आहे.

............

आमच्या मागण्यांइतकेच आमचे आरोग्यही लाखमोलाचे आहे. गेले सतरा दिवस सुरू असलेल्या उपोषणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य खालावले आहे. काही सहकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी आता पुढे यायला हवे. - हिमांशु शेखर, उपोषणकर्ता विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात पारंपारिक पद्धतीने गणरायाला निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ढोल-ताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या सान्निध्यात आणि अपूर्व उत्साहात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला रविवारी सकाळी प्रारंभ झाला. सायंकाळपर्यंत मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या गणपतींनी पालिकेने बांधलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आनंदोत्सवाची सांगता रविवारी झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पुण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. महात्मा फुले मंडई येथे मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाच्या 'श्रीं'ची पूजा झाल्यावर मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, श्री गुरुजी तालीम, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती आणि केसरीवाडा हे मानाचे इतर चार गणपतीही मिरवणुकीत सहभागी झाले. पारंपरिक वेशातील महिला, सामाजिक संदेश देणारी पथके, मल्लखांब प्रात्यक्षिके यांच्यासहलमामाच्या प्रत्येक गणपतीसमोर होणारे ढोल-ताशा पथकांचे वादन हे विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण होते. लक्ष्मी रोडवरील चौका-चौकात ढोल-ताशा वादन ऐकण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मिरवणुकीसाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. लक्ष्मी रोडवरील टिळक चौकात महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांतर्फे सर्व मानाच्या मंडळांचे स्वागत करण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या सर्व गणपतींनी हौदात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, कसबा गणपतीचे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पांचाळेश्वर घाटावरील पालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात आले. मानाच्या इतर गणपतींनीही हौदात विसर्जन केले. सायंकाळी सातपर्यंत मानाच्या पाचही मंडळांचे विसर्जन झाले.

सायंकाळनंतर शहराच्या टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड या मार्गांवरील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. संध्याकाळी रोषणाईच्या गणपती मंडळांसह साउंड सिस्टीम आणि डीजेच्या भिंती उभारलेली मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली. रात्री उशिरा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊ रंगारी ही प्रतिष्ठेची मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली. उद्या, सोमवारी पहाटेपर्यंत या गणपतींचे विसर्जन होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे वेतन वेळेवरच; राज्य सरकारचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शालार्थ'प्रणाली सुरळीत चालण्यासाठी शिक्षण खात्याने खासगी कंपनीसोबत केलेल्या कराराचे एक वर्षासाठी नूतनीकरण केले आहे. त्यामुळे 'शालार्थ'च्या अंमलबजावणीमधील त्रुटी दूर होणार असून, एक ऑक्टोबरपासून राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळच्या वेळी वितरित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यातील माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी 'शालार्थ''ही ऑनलाइन प्रणाली वापरली जाते. यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच या प्रणालीच्या वापरामध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची ओरड शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांकडून करण्यात येत होती. त्यामुळेच राज्यातील अनेक शिक्षकांचे पगार वेळच्या वेळी होण्यातही अडचणी निर्माण झाल्याची ओरड करण्यात येत होती. 'मटा'ने या विषयी केलेल्या पाठपुराव्यामधून 'शालार्थ'चे कामकाज सुरळीत चालण्यासाठी खात्याने नेमलेल्या खासगी कंपनीशी केलेला करारच संपल्याची बाब उघड झाली होती. हा करार संपल्याने संबंधित कंपनी 'शालार्थ'चे काम पाहात नसल्याने, तांत्रिक अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर खात्याने कराराचे नूतनीकरण केल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FTII विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे

$
0
0

२९ ला तोडगा निघण्याची शक्यता

वृत्तसंस्था, पुणे

फिल्ड अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्ट‌िट्युट ऑफ इंडियाच्या प्रमुखपदावरून (एफटीआयआय) गजेंद्र चौहान यांना हटविण्याची मागणी करीत बेमुदत उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांशी सरकारने चर्चेची तयारी दाखविल्याने त्यांनी उपोषण सोडले आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी त्यांची केंद्र सरकारसोबत चर्चा होणार असून त्यातून काही ठोस तोडगा निघाल्यास आंदोलन पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतल्याचे समजते.

महाभारतातील युधिष्ठिराच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर विद्यार्थी नाराज झाले होते. ही नियुक्ती करताना केंद्र सरकारने सक्षम संचालकांऐवजी स्वत:चे धोरण राबविण्याऐवजी एकाच व्यक्तीची निवड केल्याचा आरोप केला होता. सरकारने नियुक्ती रद्द न करण्याची भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले होते. तसेच नंतर आंदोलनाची धार तीव्र करीत बेमुदत उपोषण सुरू केले होते. केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने चर्चेची तयारी दाखविताच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याची तयारी दाखविली होती. त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने चर्चेसाठी विद्यार्थ्यांना निमंत्रण दिल्याने रविवारी उपोषणाची सांगता करण्यात आली.

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना अनेकवेळा आंदोलन सोडण्यास सांगण्यात आले. शंभर दिवसांहून अधिक काळ चाललेले हे आंदोलन सरकारने बेकायदा ठरविले होते. विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केल्यानंतरही सरकारने त्यांची दखल घेतली नव्हती. मात्र, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल न घेण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर सर्वस्तरातून टीका होत होती. विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्याने तब्बल १७ दिवसांनी का होईना परंतु केंद्राने त्यांची दखल घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौरभ हॉलमधील क्रॉसवर्डमध्ये आग

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्याच्या सौरभ हॉलमधील क्रॉसवर्डमध्ये रात्री लागलेली विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान मागील ८ तासांपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सौरभ हॉलमधील अग्निशमन यंत्रणा बंद पडली आहे. आग थोड्या वेळापूर्वी आणखी भडकल्यामुळे परिस्थिती नियंत्रित करणे आणखी कठीण झाले आहे.

आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ बंबगाड्या, ३ जेसीबी आणि एक ४० मीटरपेक्षा जास्त उंचीची शिडी दाखल झाली आहे. आतापर्यंत ३ जणांना वाचवण्यात आले आहे, अद्याप ४-५ जण सौरभ हॉलमध्ये अडकले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आग विझवण्यासाठी तसेच सौरभ हॉलमध्ये अडकून पडलेल्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला असून नागरिकांना सौरभ हॉलपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

हजारो पुस्तके खाक

क्रॉसवर्डला लागलेल्या आगीत हजारो पुस्तके जळून खाक झाली आहेत. पुस्तकांचा मोठा साठा हाच आगीचा वारंवार मोठा भडका उडण्याचे प्रमुख कारण ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात बहुराष्ट्रीय युद्ध सराव

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मार्च २०१६ मध्ये होणार असलेल्या बहुराष्ट्रीय युद्ध सरावात आग्नेय आशियातील देशांसह रशिया, चीन आणि अमेरिकेची सैन्य पथके सहभागी होणार आहेत. पुण्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर युद्ध सराव होणार आहे. या सरावासंदर्भात आजपासून (सोमवारी) पुण्यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांची बैठक सुरु होत आहे. ही बैठक बुधवार, ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ब्रिगेडिअर अशोक नरुला यांच्या नेतृत्वाखालील एक टीम या युद्ध सरावाच्या तयारीत गुंतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परस्परांमधील लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी तसेच दहशतवाद, तस्करी आणि घुसखोरी या विरोधात कारवाईसाठी एकमेकांना मदत करणे सोपे जावे या हेतूने पुण्यात युद्ध सराव होत असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

युद्ध सरावात सहभागी होणार असलेले देशः भारत, ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, रशिया, चीन, अमेरिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर अपघात, २ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटे ४ चारच्या सुमारास टेम्पो आणि इंडिका गाडीत अपघात झाला. या अपघातात दोघे ठार तर तिघे जण जखमी झाले. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एक्स्प्रेस वेवर पहाटे ४ च्या दरम्यान टेम्पो आणि इंडिका गाडीत अदाई उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. पंक्चर झालेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा असताना पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या इंडिका गाडीने टेम्पोला धडक दिली. या अपघातात इंडिका गाडीतील दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एफटीआयआय’मधील उपोषण मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संपकरी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, केंद्र सरकारने मंगळवारी (२९ सप्टेंबर) बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही एक पाऊल मागे घेत सतरा दिवस सुरू असलेल्या उपोषणाचे विसर्जन केले.

गेल्या ११० दिवसांपासून सुरू असलेल्या संपात मार्ग करण्यासाठी चर्चेची दुसरी फेरी व्हावी, अशी मागणी करणारे पत्र विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला दिले होते. मंत्रालयाने उपोषण मागे घेतल्यास चर्चेची तयारी दाखवली होती. विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद देत बैठक निश्चित केल्यानंतर उपोषण मागे घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंत्रालयाच्या सहसचिवांकडून चर्चेसाठी निमंत्रित करणारे पत्र रविवारी विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. मंत्रालयाकडून बैठक निश्चित झाल्यावर तातडीने विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

मंत्रालयाने २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे फिल्म्स डिव्हिजनच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता बैठक निश्चित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची नावेही कळविण्यात यावीत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मंत्रालयाच्या पत्राला दिलेल्या उत्तरात, विद्यार्थ्यांकडून सात जणांची नावे देण्यात आली आहेत. त्यात हरिशंकर नचिमुथू, विकास अर्स, रणजित नायर, रिमा कौर, अजयन अडट आणि मल्यज अवस्थी, शिनी जे. के. यांचा समावेश आहे. 'संस्थेच्या नियामक मंडळावरील नियुक्त्यांबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयासह होणाऱ्या चर्चेत संप मिटण्यासाठी काहीतरी ठोस मार्ग निघावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ही चर्चेकडे सकारात्मक दृष्टीने पाहात आहोत. मात्र, तोडगा निघेपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही,' असे विद्यार्थ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेची धडक लागून मायलेकींचा मृत्यू

$
0
0

म . टा. प्रतिनिधी, हडपसर

लोहमार्ग ओलांडताना रेल्वेची धडक लागून मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. हडपसरच्या गोसावी वस्ती येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहीबाई भास्कर सोनवणे (वय ६५), चंदाबाई गौतम घोडके (४५, दोघी रा. गोसावीवस्ती,वैदुवाडी, हडपसर) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नाव आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहीबाई व चंदाबाई या दोघी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शौचालयासाठी रेल्वे रुळाच्या पलीकडे गेल्या होत्या. रात्रीचे बारा वाजले तरी या दोघी घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. रात्री साडे बारा वाजता रेल्वे रुळावर त्या मृत अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. रात्री जवळच गणेश विसर्जनची मिरवणूक सुरू असल्याने त्यात वाजणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे दोघींना रेल्वेचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वीच दोन मूर्तीकरांचा याच ठिकाणी मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे मोबाइल केले लंपास

$
0
0

चोरीची तक्रार देण्यासाठी संभाजी चौकीत लागलेली रांग

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवातील गर्दीत चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला आहे. शहराच्या मध्य वस्तीत चोरट्यांनी सुमारे दीडशे मोबाइल पळवल्याचा अंदाज आहे. विश्रामबाग, फरासखाना, खडक आणि स्वारगेट पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक चोरी झाली आहे. चोऱ्या झाल्या असल्या, तरी पोलिसांच्या दप्तरी 'मिसिंग'ची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक चोऱ्या विश्रामबाग आ​णि फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेलबाग चौक आणि टिळक चौकात झाल्या आहेत. गणेशोत्सव काळात लाखोंच्या संख्येने भाविक पुण्यात उपस्थित होते. त्यामुळे बेलबाग आणि टिळक चौकात गर्दीचे लोंढे होते. त्याचा फायदा उठवत चोरट्यांनी सुमारे दीडशे मोबाइल पळवले.

चारही पोलिस ठाण्यांतील 'मिसिंग प्रॉपर्टीज'ची माहिती घेण्यात आली. त्यात सर्वाधिक मोबाइल असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी 'मिसिंग' नोंद घेतली असली, तरी त्यालीत बहुतेक मोबाईल चोरण्यात आले आहेत. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत एका मोबाइल चोराला पकडल्यानंतर एक टोळीच पोलिसांच्या हाती लागली होती. या टोळीने ७० मोबाइल चोरल्याचे उघडकीस आले होते. या वर्षीही अशीच एखादी टोळी कार्यरत होऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाइल लांबवले असावेत, अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन मिरवणुकीत खुनाचे तीन प्रयत्न

$
0
0

पुणेः गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भांडणात तीन तरुणांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटना रविवारी रात्री घडल्या. या प्रकरणी कोंढवा, सहकारनगर आणि खडक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रत्येक वादावादीमागे किरकोळ कारण असल्याचे समोर आले आहे.

वंदे मातरम् मंडळाचे कार्यकर्ते रोहित घोडके (३०, रा. सदाशिव पेठ) व त्यांचा भाऊ सदाशिव पेठेत विसर्जन मिरवणुकीत थांबले होते. त्या वेळी एका मुलीला दीपक गायकवाड याचा धक्का लागला. गायकवाड याला मंडळाचे कार्यकर्ते व इतरांनी मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून गायकवाडने रात्री साडेबाराच्या सुमारास रोहित घोडके याच्या डोक्यात फरशीने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक इप्पर अधिक तपास करत आहेत.

कोंढव्यात व्यक्तीवर चाकूने वार

विसर्जन मिरवणूक पाहून घरी निघालेल्या एका व्यक्तीवर किरकोळ वादातून चाकूने वार केल्याची घटना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण शुक्ला (४०, रा. कोंढवा बुद्रुक) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अनिल दत्ता कांबळे (२६, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला विसर्जन मिरवणूक पाहून रविवारी रात्री घरी निघाले होते. त्या वेळी कांबळे व त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली.

त्यात कांबळे याने शुक्ला यांच्या पोटात, हातावर, पायावर चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी त्याला अटक केली असून, सहायक पोलिस वळवी अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन महिन्यांत आंबा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंब्याचा यंदाचा हंगाम संपून तीन महिने होतात न होतात तोच आणि नवा हंगाम सुरू होण्यासाठी किमान पाच-सहा महिने बाकी असतानाच कोकणातून रत्ना आंबा पुण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना याच वर्षात पुन्हा एकदा आंबा चाखायला मिळणार आहे.

रविवारी गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डाच्या फळबाजारात रत्ना जातीच्या ३२ डझन आंब्यांची आवक झाली. ११ डझन आंब्यांना २१०० रुपये प्रति डझन असा, तर २१ डझन आंब्यांना १६०० रुपये प्रति डझन असा दर मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेशेत या गावातून ही आवक झाल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नीलम आणि हापूस या जातींच्या संकरातून रत्ना ही जात विकसित केली आहे. हापूस आंब्याला एक वर्षाआड फळधारणा होते, तर रत्ना जातीचे झाड दर वर्षी उत्पादन देते. रत्नागिरीत किमान ४० ते ५० हेक्टरवर रत्ना जातीच्या आंब्याची लागवड आहे. या झाडांना लवकर फळधारणा झाल्याने यंदा इतर वर्षीच्या तुलनेत आंब्याचे लवकर अगमन झाले आहे. 'झाडांना फळधारणा चांगल्या प्रमाणात झाली असल्याने आवक सुरूच राहणार आहे. बाजारात दाखल झालेल्या फळांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळेच दरही चांगला मिळाला आहे,' असेही मोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images