Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेश विसर्जन मिरवणुकीचे फोटो काढण्यासाठी आलेल्या एका तरुणीचा हॉटेलमध्ये विनयभंग केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत पंचवीस वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मुंबईची राहणारी आहे. पुण्यातील गणेश विसर्जनाचे फोटो काढण्यासाठी ती मित्रांसोबत पुण्यामध्ये आली होती. रविवारी रात्री रात्री साडेआठच्या सुमारास ती मित्रांसोबतच बेलबाग चौकाजवळील एका हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. हॉटेलच्या स्वच्छतागृहामध्ये गेलेल्या या तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी तरुणीने विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचा घोडनदीत बुडून मृत्यू

पुणेः गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षाच्या मुलाचा घोडनदीत बुडून मृत्यू झाला. शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे रविवारी ही घटना घडली. वैभव संजय कलमे (१२, रा. कारेगाव, ता. शिरूर, मूळ गाव - लातूर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वैभव सातवीमध्ये शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवचे वडील कारेगाव येथे राहण्यास असून, तेथील एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना वैभव व अरुण अशी दोन मुले आहेत. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोघे जण राहत्या चाळीतील व्यक्तींसोबत गणेश विसर्जनासाठी घोडनदीवर गेले होते; मात्र त्या दरम्यान वैभव बुडाला. त्याचा मृतदेह रात्री कारेगावच्या कुंभार आळीतील दशक्रिया घाटावर आढळून आला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लूटमार करणाऱ्या तिघांना अटक

पुणेः पायी जाणाऱ्या तरुणाला एसएनडीटी कॉलेजजवळ रस्त्यात अडवून लुटल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याबाबत नंदलाल ऊर्फ बिरज चौधरी (२०, रा. डेक्कन) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शाहरूख यासीन सय्यद (२०), ओंकार सुमाम बोराडे (२०) आणि अभिनव अर्जुन भुंबर (१८, सर्व रा. - एकजीव मित्र मंडळ, जनवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी शनिवारी रात्री मित्रांसबोत पायी जात होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना अडवून जबरदस्तीने पाचशे रुपये आणि मोबाइल असा अडीच हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून नेला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक पन्हाळे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडगाव शेरीत ढोल-पथकांत बेदिली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

वडगाव शेरी भागात दोन गणेशोत्सव मंडळांमध्ये झालेल्या भांडणामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत ढोल वाजवताना एका पथकातील कार्यकर्त्याचा दुसऱ्या पथकातील कार्यकर्त्याला धक्का लागल्याचे कारण घडले. त्याचे रूपांतर मारामारी आणि दगडफेकीत झाले. त्यात चार जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री वडगाव शेरीतील साईनाथनगर येथे घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी मुंढव्यातील 'एकदिल वाद्य' या ढोल-ताशा पथकातील सहा कार्यकर्त्यांना अटक केली.

प्रशांत राजेंद्र तोरसकर (२५), निखिल रमेश गिरमे (१९), दीपक अनिल गिरमे (२४, तिघे रा. गवळी आळी, मुंढवा), मंगेश वामनराव वैराट (२३, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), मयूर सुनील घोलप (२५, रा. दत्त चौक, मुंढवा) आणि सतीश चंद्रकांत डुबे (२५, रा. शाहूनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या मारहाण आणि दगडफेकीत सवाई वाद्य पथकातील महेश जनार्दन कवडे, शैलेश बाळकृष्ण कवडे, उमेश दत्तात्रय कवडे आणि विकास भगत जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुकेश बबनराव गुंड (४२, रा. गुलमोहर पार्क, मुंढवा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

येरवडा उपनगर परिसरात अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी गणपती विसर्जन करण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार शनिवारी वडगाव शेरीतील साईनाथनगरमधील शिवशक्ती मंडळाने घोरपडी गावातील सवाई वाद्य पथकाला, तर भोलेनाथ मित्रमंडळाने मुंढव्यातील एकदिल वाद्य पथकाला विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशे वाजवण्याची सुपारी दिली होती. रात्री शिवशक्ती मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने भोलेनाथ मंडळाची मिरवणूक सुरू झाली. दरम्यान दोन्ही गणेश मंडळे आणि त्यांची पथके समोरासमोर आली. सवाई पथकाकडून ढोल वाजवत असताना अनवधनाने पार्थ कवडे या कार्यकर्त्याचा धक्का समोरील एकदिल पथकातील एकाला लागला. त्यावरून त्यांच्यात वादावादी आणि नंतर बाचाबाची व शिविगाळ सुरू झाली. वाद आणखी वाढू नये, म्हणून सवाई पथक वादन बंद करून साई चौकात निघून गेले; मात्र काही वेळाने एकदिल पथकाने त्यांचा पाठलाग करून पथकातील प्रशांत तोरसकर आणि सतीश डुबे यांनी ढोल वाजवण्याच्या टिपरीने सवाई पथकातील महेश कवडे याच्या डोक्यात मारले. पाठोपाठ मंगेश वैराट व निखिल गिरमे यांनी शैलेश कवडे याच्या डोक्यात दगड मारू लागल्यानंतर इतर कार्यकर्त्यांनीदेखील दगडफेक केल्याने चार जण जखमी झाले.

या घटनेची माहिती स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार झाल्यानंतर पोलिसांनी एकदिल पथकातील सहा आरोपींना अटक केली.

पोलिसांवर दबाव

एकदिल पथकावर गुन्हे दाखल करू नयेत, म्हणून माजी महापौर, उपमहापौर यांच्यासह वडगाव शेरीतील एक विद्यमान नगरसेवक चंदननगर पोलिसांना फोन करून विनंती करत होते; मात्र पोलिसांनी कुठल्याही राजकीय नेत्याच्या दबावाला बळी न पडता दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

मंडळांवर कारवाई?

शिवशक्ती आणि भोलेनाथ मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना विनापरवाना मंडप उभारणी केली आहे. या दोन्ही मंडळांनी नियमाप्रमाणे स्थानिक पोलिसांकडून गणेशोत्सव, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारी कुठलीही परवानगी घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या मंडळांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुमारे सोळा तासांची शर्थ

$
0
0

पुणे : शहरात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असताना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सोहराब हॉलच्या पहिल्या मजल्यावरील क्रॉसवर्ड दुकानात आग लागली. ही आग शमविण्यास अग्निशामक दलाला सुमारे १६ तास लागले. फायर ब्रिगेडने सुरुवातीला दोन बंब पाठविले. मात्र, आगीचे स्वरूप पाहून आणखी कुमक मागविण्यात आली. त्यानंतर १३ बंब, मुख्य अधिकाऱ्यासह १० अधिकारी आणि ४० कर्मचारी या मदतकार्यात सहभागी होते. जवानांनी सुरुवातीला दरवाजाच्या बाजूने पाण्याचा मारा करण्याचा

प्रयत्न केला. मात्र, मोठा धूर झाल्याने जवानांना तेथून माघार घ्यावी लागली. त्यानंतर खिडकीच्या काचा फोडण्यात आणि आतील प्लायवूड तोडण्यात आले. सोहराब हॉलमधील आगीची ही दुसरी मोठी घटना आहे. येथे फायर सिस्टीम आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा करण्याचा प्रश्न नाही. मात्र, ती सिस्टीम दुरुस्त करून घेण्याबाबत त्यांना पत्र पाठवणार आहे. पुस्तकांमुळे आगीने क्षणार्धात उग्र रूप धारण केल्याची माहिती फायर ब्रिगेडचे मुख्याधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाच्या कातड्याची विक्री; तिघांना अटक

$
0
0

पुणेः वाघाच्या कातड्याची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. त्यांच्याकडून वाघाचे कातडे, एक गावठी पिस्तुल, मोटार आणि दोन रॅम्बो चाकू असा चार लाख तीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

उमेश विश्वंभर जायभाय (२२, रा. जायभायवाडी, ता. जामखेड, जि. नगर), प्रफुल्ल आवडसिंग जाधव (३०), आणि अर्जुन राजेंद्र खंडाळे (२१, , रा. सातेफळ, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट दोनचे कर्मचारी वारजे भागात पॅट्रोलिंग करीत होते. त्या वेळी कर्मचारी शैलेश जगताप यांना माहिती मिळाली, की कोंढवे-धावड्याजवळ काही जण पिस्तुलविक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक सतीश निकम यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर वाघाच्या कातड्यासह एक पिस्तुल, दोन काडतुसे, दोन रॅम्बो चाकू असा एकूण चार लाख तीस हजार रुपयांचा माल जप्त केला. हे कातडे कोठून आणले, कोणाला विक्री करणार होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठाण क्षेत्र वाढणार

$
0
0

दीड हजार मीटर अंतरापर्यंत वाढीचा राज्य सरकारचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गावठाणांच्या निवासी क्षेत्रामध्ये पाचशे ते दीड हजार मीटर अंतरापर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा पुण्यातील १४५ गावांना निवासी बांधकामासाठी थेट फायदा होणार असून, बेकायदा बांधकामांना अटकाव घालण्याच्या दृष्टीने हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.

गावांच्या नैसर्गिक विस्तारासाठी संबंधित गावाच्या २०११च्या जनगणनेआधारे गावठाण हद्दीपासून सभोवतालच्या शेती व 'ना विकास झोन'मध्ये या अंतरापर्यंत निवासी वापरास आता परवानगी मिळणार आहे. या संदर्भातील अधिसूचना नगरविकास विभागाचे अवर सचिव संजय सावजी यांनी जारी केली आहे.

गावठाणांची निवासी क्षेत्रवाढ सुचवताना पुणे जिल्हा प्रादेशिक योजनेतील झोन प्लॅन तयार झालेल्या गावठाणांचे अंतर दोनशेऐवजी पाचशे मीटरपर्यंत कायम करण्यात आले आहे. ज्या गावांची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार पाच हजारांपेक्षा कमी असेल, अशा गावांमध्ये गावठाण हद्दीपासून पाचशे मीटरपर्यंत निवासी बांधकामाला मुभा मिळणार आहे. पुण्यातील साधारणतः ९९ गावांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

गावाची लोकसंख्या (२०११च्या जनगणनेनुसार) पाच हजारांपेक्षा अधिक असेल, तर गावठाण हद्दीपासून दीड हजार मीटरपर्यंत निवासी क्षेत्रवाढ मंजूर करण्यात आली आहे. ही निवासी क्षेत्रवाढ पाचशे मीटरहून दीड हजारपर्यंत करण्यात आल्याने त्याचा ४६ गावांना फायदा होणार आहे. पश्चिम घाटातील संरक्षित क्षेत्रात येणाऱ्या गावांच्या गावठाणांत दोनशे मीटरपर्यंत निवासी बांधकामांवर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावठाणांमध्ये निवासी बांधकामांना अटकाव घालण्यात आला आहे. त्यात डोंगर व डोंगरउतार, १:५ उतार व पाणवठे, तसेच तलावांच्या पूररेषेपासून दोनशे मीटरपर्यंत निवासी बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही.

सर्वंकष आराखड्याची सूचना

निवासी क्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या गावांमध्ये रस्त्यांचे जाळे उभारण्याच्या दृष्टीने सर्वंकष आराखडा तयार करण्याची सूचना राज्य सरकारने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व नगररचना विभागाच्या सहसंचालकांना केली आहे. गावांत अस्तित्वात असलेले रस्ते आणि प्रादेशिक योजनेतील रस्त्यांचा विचार करून सहा महिन्यांत हा आराखडा करावा. त्याला नगररचना संचालकांची प्राथमिक मान्यता घेण्यात यावी आणि हा आराखडा राज्य सरकारलाही सादर करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जमीनमालकांना या प्रस्तावित रस्त्यांचे बांधकाम नकाशे मंजूर करून घेण्यासाठी अंतर्भाव करता आला पाहिजे. रस्त्यांच्या जाळ्याचा आराखडा करताना बांधकाम नकाशे मंजूर करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. 'पीएमआरडीए'चा विकास आराखडा करताना हे रस्ते त्यात सामावून घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’चे ९२ मार्ग मिरवणुकीवेळी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरातील प्रमुख रस्ते बंद असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तब्बल ९२ मार्ग या दिवशी बंद राहिले. त्यामुळे, अलीकडच्या काळात सरासरी पंधराशेहून अधिक बस मार्गावर असताना, विसर्जनाच्या दोन दिवसांत पीएमपीच्या बाराशे बसच मार्गावर येऊ शकल्या. तरीही, उपगनरांतील प्रवाशांना मिरवणुकीपर्यंत पोहोचता यावे, यासाठी पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, एसएनडीटी कॉलेज येथून जादा बसची व्यवस्था करण्यात आली होती.

गणेशोत्सवाच्या कालावधीत मध्यवस्तीतील अनेक रस्ते बंद असल्याने पीएमपीला अनेक मार्ग बदलावे लागतात. शिवाजी रोड, लक्ष्मी रोडची वाहतूक सायंकाळनंतर बंद होत असल्याने पर्यायी रस्त्यांद्वारे पीएमपीला सेवा पुरवावी लागते. मात्र, विसर्जनादरम्यान शहरातील सर्वच प्रमुख रस्ते बंद राहात असल्याने त्याचे नियोजन सुमारे महिनाभर आधीपासूनच करावे लागते. लक्ष्मी रोडसह शिवाजीनगर आणि स्वारगेटला जोडणारे शिवाजी रोड व बाजारीव रोड; तसेच डेक्कन आणि टिळक चौकातून स्वारगेट आणि कोथरूडला जोडणारे सर्व मार्ग पीएमपीला बंद ठेवावे लागतात. पीएमपीच्या सुमारे तीनशे मार्गांपैकी बंद ठेवाव्या लागणाऱ्या मार्गांची संख्या ९२ आहे. विसर्जन काळात इतर पर्यायी मार्गांवरही वाहतूक कोंडी झाल्यास असे मार्गही तात्पुरत्या स्वरूपात खंडित केले जातात.

गेल्या काही दिवसांपासून पीएमपीने सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे सरासरी पंधराशे बस मार्गांवर आणण्याचे उद्दिष्ट पार केले आहे. मात्र, विसर्जन काळात मार्गच बंद ठेवावे लागत असल्याने जेमतेम बाराशे बसच मार्गावर धावू शकतात. पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर या तीन महत्त्वाच्या ठिकाणांहून शहराच्या उपनगरांत धावणाऱ्या बसवर विसर्जनाचा परिणाम होत नाही. तसेच, चांदणी चौक, पौड रोड, कोथरूड येथील नागरिकांना मुख्य शहरात येता यावे, यासाठी एसएनडीटी कॉलेजपर्यंतची सेवा पीएमपीतर्फे पुरविण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृततुल्य’ने दिला रिलीफ

$
0
0

Kuldeep.Jadhav @timesgroup.com

पुणे : मध्य वस्तीतील 'अमृततुल्य' हॉटेलांनी संपूर्ण मिरवणूक काळात हॉटेल सुरू ठेवून पुणेकरांची चहाची तल्लफ भागवली आणि मिरवणुकीच्या थकव्यातून थोडासा रिलिफ मिळाला. शहरातील अशा अनेक हॉटेलांमधून 'चाय पे चर्चा' रंगल्या होत्या.

गणपतीची विसर्जन मिरवणूक आणि रस्त्यावरील अमृततुल्य हॉटेलांमध्ये चहाचा घोट घेत रंगणारा गप्पांचा फड हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गणेशोत्सवात पुण्यात साधारणपणे पावसाळ्याप्रमाणेच वातावरण असते. मात्र, यंदा कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती असतानाही अमृततुल्य गर्दीने फुलली होती. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीला होणारी गर्दी लक्षात घेता बहुतांश अमृततुल्य चालकांनी नेहमीपेक्षा लवकर दुकाने उघडली होती. काहींनी तर शनिवारी उघडलेली दुकाने बंदच केली नव्हती.

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी शहराच्या मध्य वस्तीतील नागरिकांसह उपनगर व ग्रामीण भागातील नागरिक दरवर्षी येत असतात. सकाळी लक्ष्मी रोड परिसरात दाखल झालेले नागरिक रात्री उशिरापर्यंत शहरातच थांबतात. त्यामुळे हॉटेलांमध्ये गर्दी असते; तसेच चहाला सर्वाधिक मागणी असते. महात्मा फुले मंडई येथील कृष्णभवन अमृततुल्यचे मालक अंबालाल आहेर-गवळी म्हणाले, 'गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून दुकान नेहमीपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवले जात आहे. काही दिवस दुकान बंदच केले नाही. या १० दिवसांसाठी तीन अतिरिक्त कर्मचारी नेमले आहेत. उमरगा, बीड या दुष्काळग्रस्त भागातील काही लोक नोकरीच्या शोधात आले, त्यांना येथे तात्पुरती नोकरी दिली.' या वर्षी चहा पिण्यासाठी गर्दी असली, तरी ती दरवर्षीपेक्षा कमी आहे. केळकर रोड परिसरात उशिरा गर्दी जमते. त्यामुळे हॉटेल नेहमीच्या वेळेला उघडले, असे नारायण पेठेतील अशोक भुवन 'अमृततुल्यचे मालक मोतीलाल व्होरा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तिशी’तल्या उकाड्याने वादकांना फुटला ‘घाम’

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com

पुणेः सुमारे ३३ अंश सेल्सिअस तापमान, सकाळपासूनच हवेत जाणवणारा प्रचंड उकाडा, साडेदहापासून बसणारे उन्हाचे चटके, परिणामी अंगाला येणारा घाम आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाहावी लागणारी वाट आणि पाण्याच्या बाटलीचे शेअरिंग... यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना आणि ढोलपथकाच्या वादकांचे रविवारी अक्षरशः हाल झाले.

मागील काही दिवसांपासून शहरात पावसाने दडी मारली आहे. त्यातच आकाश निरभ्र राहिल्याने कडक ऊन पडून हवेत उकाडा जाणवत होता. मिरवणुकीच्या दिवशी आकाश निरभ्र राहून तापमान वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार रविवारी शहरात ३२.९ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक होते.

साडेदहापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. तेव्हाही उन्हाचा चटका जाणवत होता. मध्यान्हापर्यंत उन्हाचा कडाका आणखी वाढत गेला. या असह्य उकाड्यात ढोल वादन करणे, तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना मिरवणुकीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते. कडक ऊन आणि वादनामुळे झालेले श्रम यामुळे सर्वच जण तहानलेले होते. परिणामी ढोल पथकांसाठी पथकांनी, तसेच मंडळांनीही आणलेल्या पाण्याच्या बाटल्या अवघ्या तासा-दीड तासातच संपल्या. त्यानंतर बंद असलेले रस्ते, रस्त्यावरील प्रचंड गर्दी आणि ढोलपथकांच्या रांगांमधून आपल्या पथकापर्यंत पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स डोक्यावरून वाहून पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत होती. दमल्या भागल्या कार्यकर्त्यांसाठी आणि वादकांसाठी शेवटी काही मंडळांनी कसरत करून पाण्याची पिंपे आपल्या मिरवणुकीतील एखाद्या गाड्यापर्यंत पोहोचवली. बर्फ घातलेल्या या पिंपांमधून बाटल्या भरून ते पाणी वादकांपर्यंत पोहोचविण्यात येत होते. काही मंडळांनी वादकांच्या चेहऱ्यावर गार पाण्याचा स्प्रे मारण्याचीही युक्ती शोधून काढली. काही ठिकाणी मंडळांतर्फे पाण्याऐवजी सरबत, कोल्ड्रिंक, लिमलेटच्या गोळ्या, कॅडबरी, कोल्ड-कॉफी असे उपाय योजण्यात आले.

प्रचंड उकाड्याने मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही परीक्षा पाहिली. स्कार्फ, टोपी घातलेले, किंवा छत्री घेतलेले पुणेकर ठिकठिकाणी दिसून येत होते. अनेकांनी सावलीतल्या जागा पटकावल्या होत्या. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळवण्यासाठी सायंकाळपर्यंत खाद्यपदार्थ अथवा चहा कॉफी ऐवजी पाण्याच्या बाटल्या, लिंबू आणि कोकम सरबत, कोल्ड्रिंक्स, ऊसाचा रस यालाच मोठी मागणी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्युटीवर हाल होतात, पण करणार काय?

$
0
0

Vandana.Ghodekar@timesgroup.com

पुणे : महिला असलो म्हणून आम्हाला वेगळी वागणूक देण्याची गरज नाही... मिरवणुकीत बंदोबस्ताची ड्युटी करणे आमचे कामच आहे... चोवीस तास ड्युटी करताना महिला म्हणून काही कारणामुळे आमची कुचंबणा होते... गर्दी आवरताना अनेकदा लोकांकडून कॉमेंट मारल्या जातात... मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे लागते... बंदोबस्त करताना स्वच्छतागृह उपलब्ध नसतात... अनेकदा खाण्याचेही हाल होतात... रात्री बाराला मिरवणूक थांबते तेव्हा पहाटेपर्यंत किमान एका ठिकाणी बसता येईल, अशी जागाही अनेकदा मिळत नाही..

अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत महिला पोलिस खंबीरपणे बंदोबस्तासाठी सज्ज असतात. गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी महिला पोलिसांची नेमणूक असते. मिरवणुकीत गोंधळ झाल्यास सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना वेगवेगळे पाइंट नेमून दिलेले असतात. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांना २४ तासांहून अधिक वेळ बंदोबस्त करावा लागतो. २४ तास रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना आपली ड्युटी बजावताना होणारा त्रास सहन करावा लागतो. कितीही त्रास झाला, तरी त्याकडे दुर्लक्ष करत पोलिस बंदोबस्तास सज्ज असतात.

गेली २० वर्षे विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्ताची ड्युटी करत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने गणेशोत्सव कसा बदलला आहे याची माहिती दिली. बदलत्या काळाबरोबर सुरक्षेचे प्रश्नही बदलले आहेत. मिरवणुकीत येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवताना येणारा ताण अधिक असतो. गर्दीत आता महिलांचे प्रमाण वाढले आहे. मिरवणुकीत मुलींचे नाचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांची छेड काढली जात नाही ना, याकडे आम्हाला लक्ष ठेवावे लागते. गणेशोत्सवात ड्युटी करताना महिला पोलिसांना स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे अडचण सहन करावी लागते, तर उपलब्ध असलेली स्वच्छतागृह स्वच्छ नसतात. बंदोबस्तासाठी नेमून देण्यात आलेली जागा सोडून जाता येत नाही, अशी व्यथाही त्यांनी मांडली.

एका महिला पोलिस अधिकाऱ्याने आपण प्रथमच पुण्यातील बंदोबस्तात ड्युटी करत असल्याचे सांगितले. अधिकारी असल्यामुळे बरोबर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना सोडून जाता येत नाही. स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे शेजारी असलेल्या घरातील महिलांना विनंती करून त्यांच्या घरातील स्वच्छतागृह वापरावे लागले, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस मित्र हरवले

$
0
0

पुणे : गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना मदत करण्यासाठी पोलिस मित्रांची नेमणूक करण्यात आली होती; मात्र रविवारी रात्री टिळक रस्त्यावर पोलिसच नव्हे, तर पोलिस मित्रही हरवल्याचे अनुभवायला मिळाले.

या रस्त्यावरील मिरवणुकीसाठी कोणताही बंदोबस्त नसतानाही, ती सुरळीत पार पडल्याने, ती बाप्पाच्याच भरवशावर झाली की काय, असेच म्हणायची वेळ मिरवणूक संपल्यावर आली. लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकांमध्ये खंड पडल्यानंतर नेहमीप्रमाणेच यंदाच्या मिरवणुकीमध्येही नागरिक लक्ष्मी रस्त्याकडून टिळक रस्त्यावरील मिरवणुकीकडे वळले. त्यातच टिळक रस्त्यावरील मिरवणुकीसोबत आलेल्या नागरिकांची गर्दीही वाढू लागली होती. तसेच, टिळक चौकाकडून एस. पी. कॉलेजकडे जाणाऱ्या नागरिकांची गर्दीही यात मिसळू लागली होती. मिरवणुकीतील मंडळांचे कार्यकर्ते गर्दी हटवण्यासाठी प्रयत्नशील होते.

काही ठिकाणी चेंगराचेंगरीचे किरकोळ प्रकार घडले. या काळात पोलिस मित्रांची खरी गरज असताना, त्यांची अनुपस्थिती हा गोंधळ काही काळ आणखी सुरू राहण्यास कारणीभूत ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणूक झाली ‘हाय-टेक’

$
0
0

गो-प्रो कॅमेरा, स्मार्टफोन्सनी टिपली मिरवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ढोल-ताशे, 'डीजे'च्या तालावर थिरकत बाप्पांना निरोप देतानाचे क्षण टिपून ठेवण्यात हौशी फोटोग्राफर पुढे असतात; मात्र गेल्या काही वर्षांत एसएलआर कॅमेऱ्यांची जागा हायएंड स्मार्टफोन आणि 'गो-प्रो'सारख्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे मिरवणूक 'हाय-टेक' होत असल्याचा ट्रेंड दिसून येत आहे.

पुण्याच्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक जगभरात प्रसिद्ध आहे. मिरवणुकीदरम्यान 'श्रीं'चे, ढोलपथकांचे, मित्र-मैत्रिणींचे फोटो काढण्यासाठी तरुणाई पुढे असते. अलीकडच्या काळात डिजिटल क्रांतीमुळे छोटे कॅमेरे आणि एसएलआर कॅमेरे मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत; मात्र स्मार्टफोन हा कॅमेऱ्यांना पर्याय ठरू लागला आहे. स्मार्टफोन आणि टॅब्लेटना पाच मेगापिक्सेलपासून बारा-पंधरा मेगापिक्सेलपर्यंतच्या क्षमतेचे कॅमेरे असतात. यंदा या कॅमेऱ्यांच्या साह्याने फोटो आणि व्हिडिओ चित्रित केले जात असल्याचे चित्र प्रकर्षाने नजरेत भरले.

फोटोग्राफीमध्ये 'सेल्फी' हा नवा प्रकार दाखल झाल्यामुळे मिरवणुकीतही त्याचा बोलबाला दिसत होता. मंडळाच्या बाप्पासह, मित्रमैत्रिणींसह नाचताना, सोशल नेटवर्किंग साइटवर स्टेटस अपडेट करण्यासाठी सेल्फी घेणाऱ्यांची संख्या अफाट होती. लक्ष्मी रोडचे दृश्य आणि गर्दी टिपण्यासाठी 'सेल्फी स्टिक'ही मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. त्यामुळे मिरवणुकीतून चालताना जागोजागी उंचावलेल्या सेल्फी स्टिक सहज दिसत होत्या.

या सगळ्याच्या पलीकडे 'गो-प्रो कॅमेरा' हे यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. काडेपेटीइतक्या छोट्या कॅमेऱ्यातून मिरवणुकीचा 'फिश आय व्ह्यू' टिपण्यासाठी हौशी फोटोग्राफर धडपडत होते. औरंगाबादहून आलेला हृषीकेश होशिंगही गो-प्रो कॅमेऱ्याच्या साह्याने 'स्लो मोशन'मधील शॉर्ट फिल्म करण्यासाठी मिरवणूक चित्रित करत होता. 'गो-प्रो कॅमेरा पूर्वी परवडत नव्हता. त्याच्या किमती आता आवाक्यात आल्याने तो वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. 'फिश आय व्ह्यू' देणारा हा एकमेव कॅमेरा आहे. एकाच यंत्रणेत खूप सुविधा उपलब्ध असल्याने फोटोग्राफर या कॅमेऱ्याला प्राधान्य देतात. आकाराने लहान असल्याने हाताळणीसाठीही तो सोपा आहे. शिवाय, 'ब्लू-टूथ'च्या साह्याने हा कॅमेरा मोबाइलशी जोडता येतो,' असे हृषीकेशने सांगितले.

'ड्रोन'चाही वापर

पुण्याचा राजा अर्थात मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा गणपती टिळक चौकात आला आणि तेवढ्यात अनेकांच्या नजरा आकाशाकडे वळल्या. त्या वेळी आकाशात एक ड्रोन भिरभिरत होता आणि मिरवणुकीचे चित्रिकरण करत होता. मिरवणुकीचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी बेलबाग चौकातही अशाच ड्रोनचा वापर केलेला दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीत राजकीय रंग फिका

$
0
0

Suneet.Bhave@timesgroup.com

पुणे : शहरात गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या १२२ वर्षांच्या परंपरेत नेहमीच राजकीय नेतेमंडळी-पुढारी यांचा जवळचा संबंध राहिला आहे; पण रविवारी मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी वगळता इतर राजकीय नेत्यांनी मिरवणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. शहरातील काही माजी पदाधिकारी, आमदार मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले असले, तरी विद्यमान मंत्री-खासदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची पूजा, आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला औपचारिक सुरुवात झाली. शहराचे खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर आबा बागूल, आमदार मेधा कुलकर्णी, अनंत गाडगीळ, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे अशा काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह काही आजी-माजी आमदार आणि नगरसेवक या वेळी आणि स्वागत कक्षात उपस्थित होते; मात्र अनेक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मिरवणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.

मूळचे पुण्याचे आणि केंद्रीय पर्यावरणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे प्रकाश जावडेकर, गेल्या वर्षीपर्यंत मिरवणुकीसाठी आवर्जून उपस्थित राहणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे, दीप्ती चवधरी अशा अनेकांची अनुपस्थिती मिरवणुकीत जाणवली. त्यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, सेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मिरवणुकीतील गैरहजेरी प्रकर्षाने समोर आली.

संपूर्ण उत्सवातही नेते गैरहजर

यंदाच्या केवळ विसर्जन मिरवणुकीतच नाही, तर संपूर्ण उत्सवामध्येही अनेक नेत्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. गृहराज्यमंत्री राम शिंदे, काँग्रेसचे विधिमंडळातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशिवाय कोणाही मंत्री-नेते उत्सवात दर्शनाला आले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे धावती भेट घेऊन गेले; पण प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवात पुण्यात येणे का टाळले, यावर चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमोल्लंघनाची परंपराही पाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विनापरवाना ड्रोनचा वापर, तसेच लेझर बीमचा वापर करण्यावर प्रतिबंधात्मक आदेश काढून मनाई करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या आदेशांना हरताळ फासून ड्रोनचाही वापर झाला. तसेच विसर्जन रथांवर लेझर बीम जोरदार झळकत होते.

गणेशोत्सव म्हटला की नियम मोडणे आलेच. आवाजाची मर्यादा, ढोलपथकांची संख्या, वेळेचे बंधन आदी नियम सहज मोडण्यात येतात. या वर्षी​ नियम मोडण्यामध्ये आणखी दोन घटनांची भर पडली आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ड्रोनचा वापर करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. तसेच, वैमानिकांना विमान लँड करताना 'लेझर बीम'चा अडथळा येत असल्याने पुणे शहरातही 'लेझर बीम'च्या वापरावर मनाई करण्यात आई आहे. त्यासाठी पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत.

असे असतानाही बेलबाग आणि टिळक चौकात ड्रोनचा वापर करून व्हिडिओ शूटिंग, तसेच फोटोग्राफी करण्यात आली आहे. ड्रोनचा वापर करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असते. पोलिस सहआयुक्त रामानंद बेलबाग चौकात असताना त्यांच्यासमोरच ड्रोनचा वापर करण्यात येत होता. त्याबाबत फरासखाना आणि विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांना याबाबत फारशी काही माहिती नव्हती. त्यामुळे ड्रोनचा वापर करण्यासाठी परवानगी घेतली नसेल, तर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार का, अशी चर्चा बेलबाग चौकात रंगली होती. ज्या विसर्जन रथांवर लेझर बीम बसवण्यात आले होते, त्यांच्यावर तरी कारवाई होणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादकांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकही पैसा न घेता गणेशोत्सवात दिवस-रात्र ढोल, ताशा वाजवणाऱ्या तरुणांच्या जिवावर ढोलपथके लाखो रुपये कमावतात; मात्र या तरुणांची आवश्यक काळजी घेण्याबाबत पथकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे रविवारी मिरवणुकीदरम्यान पाहायला मिळाले. वादकांच्या जेवणाची नीट व्यवस्था नाही, त्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही कमतरता होती. त्यामुळे रविवारी विसर्जन मिरवणुकीमध्ये वादन करताना अनेक जण चक्कर येऊन पडले.

पुण्यातील पथकांची संख्या वाढू लागल्यानंतर केवळ एक छंद म्हणून आयटी व कॉर्पोरेट कंपन्यातील तरुणांसह कॉलेजचे विद्यार्थीही या पथकांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला दिला जात नाही. ही पथके एका मंडळाच्या मिरवणुकीसाठी पाच हजारापासून एक लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारतात; मात्र वादकांच्या जिवावर उभ्या असलेल्या या पथकांमध्ये वादकांच्या स्वास्थ्याबाबत गांभीर्य नसल्याचे रविवारी आढळून आलेल्या बाबी व वादकांनी सांगितलेल्या अनुभवांवरून स्पष्ट होते.

सातव्या, नवव्या, दहाव्या दिवशीच्या मिरवणुकांमध्ये वादन केल्यानंतर रविवारी दुपारी भर उन्हात वादन करताना काही वादक चक्कर येऊन पडले, तर टिपरू लागल्यानेही काही वादक जखमी झाले होते; मात्र काही पथकांनी पाण्याची तुटपुंजी व्यवस्था केली होती. तसेच त्यांच्याकडे प्रथोमपचार पेटीही नव्हती. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय सेवा केंद्रांमध्ये त्या वादकांवर उपचार करण्यात आले. दरम्यान, सातव्या दिवसापासून मिरवणुकांची संख्या वाढली. या मिरवणुकांमध्ये वाजवल्यानंतर जेवणाऐवजी केवळ वडापाव, पॅटीस किंवा पराठा देण्यात आल्याचे काही पथकांतील वादकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. काही पथकांनी उत्सव काळात वादकांची जेवणाची व्यवस्था चांगल्या हॉटेलांमध्ये केली होती.

भोसरी येथील एका मंडळाच्या मिरवणुकीसाठी पुण्यातील एक पथक गेले होते. तेथील मिरवणूक संपून पुण्यात परत येण्यासाठी त्यांना मध्यरात्रीचे दीड वाजले होते. त्या पथकातील वादकांना जेवणाऐवजी केवळ वडापाव देण्यात आला होता, असे त्या पथकातील वादकाने सांगितले. हडपसर येथे गेलेल्या एका पथकाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच केली नव्हती.

सरावाच्या वेळेत सवलत नाही

गणेशोत्सवापूर्वी ढोलपथकांचा सराव सुरू झाल्यापासून अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत पथकातील प्रत्येकाला वेळेचे बंधन असते. पगारी नोकराप्रमाणे अमुक वेळेला सरावासाठी आलेच पाहिजे, असा आग्रह धरला जातो; परंतु सुटण्याची वेळ निश्चित नसते. सरावाला उशिरा आल्यास ढोल वाजवू दिला जाणार नाही, अशी तंबी पथक व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याचे एका महिला वादकाने सांगितले.

मंडळांची संख्या वाढली

गेल्या वर्षी शहरात चार हजार ३४ सार्वजनिक गणपती मंडळांची स्थापना झाली होती. त्यामध्ये या वर्षी वाढ झाली असून, शहरात ४ हजार ३७२ मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. या वर्षी सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तीनशेने वाढ झाली आहे; घरगुती गणपतींची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी चार लाख ६३ हजार ८० घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यंदा ४ लाख ७९ हजार ९२२ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

किरकोळ वादावादीच्या घटना वगळता शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. गेल्या वर्षीपेक्षा २० मिनिटे मिरवणूक आगोदर संपली. मिरवणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नटेश्वर घाटावर गंज पेठेतील सुवर्ण तरूण मंडळाच्या गणेशाच्या विसर्जनाने मिरवणुकीची सांगता झाली.

- पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्माल्यदानामुळे टळले नदीप्रदूषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नदी प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य स्वयंसेवकांकडे द्या,' या पुणे महापालिका आणि 'स्वच्छ' संस्थेने केलेल्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी महापालिकेकडे २१३ टन निर्माल्य जमा झाले.

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सकाळपासूनच महापालिकेचे कर्मचारी आणि 'स्वच्छ' संस्थेचे स्वयंसेवक शहरातील वेगवगेळ्या घाटांवर उपस्थित झाले होते. रात्री उशिरापर्यंत स्वयंसेवक घाटांवर थांबले. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना जल प्रदूषणाचे गांभीर्य सांगून स्वंयसेवक त्यांच्याकडील निर्माल्य आणि फळे स्टॉलवर जमा करून घेत होते. गेल्या पाच वर्षांत याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे यंदाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 'स्वच्छ' संस्थेच्या सभासदांबरोबरच २५० स्वयंसेवकांची टीम पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २१ घाटांवर उपस्थित होते. त्यांनी १२५ टन निर्माल्य गोळा केले; तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी निर्माल्य कलशांच्या माध्यमातून निर्माल्य जमा केले. पिंपरी-चिंचवडमधील मिलिंदनगर घाटावर सर्वाधिक म्हणजेच २२ हजार ५०० किलो निर्माल्य गोळा झाले. याशिवाय गणेशोत्सवातील दुसऱ्या, पाचव्या, सातव्या दिवशीही महापालिका आणि 'स्वच्छ'ने निर्माल्य गोळा केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५ हजार गणेशमूर्ती दान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन गणेश मूर्तीचे विसर्जन हौदात करा अथवा मूर्ती दान करा, अशा महापालिकेच्या आवाहनाला पुणेकरांचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी शहराच्या विविध भागातील नागरिकांनी तब्बल २५ हजारांहून मूर्ती दान केल्या.

पावसाने या वर्षी ओढ दिल्याने धरणे भरलेली नाहीत, त्यामुळे या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी नदीला अत्यल्प पाणी सोडण्यात आले होते. प्रशासनाने या वेळी कालव्यांनाही पाणी सोडले नव्हते. या ऐवजी शहराच्या विविध भागात विसर्जन हौदांची संख्या वाढविण्यात आली होती. तसेच काही विसर्जन घाटांवर मूर्ती दान करण्याची सोय उपलब्ध केली होती. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पुणेकरांनी या वेळी विसर्जन हौदाबरोबरच मूर्ती दानाला प्राधान्य दिले.

महापालिकेने गेल्या वर्षी मूर्ती दानाचा उपक्रमचा राबविला नव्हता. मात्र या वेळी नागरिकांनी एकाच दिवशी २० हजार ७५ गणेशमूर्ती दान या स्टॉलवर जमा केल्या. वारज्यांमधून १२४३, येरवडा स्टॉलवर ६४३ तर हडपसर येथे विक्रमी १८ हजार मूर्ती जमा झाल्या. हडपसर कॅनॉलमध्ये पाणी नसल्याने नागरिकांनी मूर्ती दानाला प्राधान्य दिले. याशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनीही पुण्यातील हौदांवर गणेश मूर्ती दानाचे स्टॉल उभारले होते. त्यामुळे विसर्जनाच्या दिवसभरात पुणेकरांनी २५ हजारांहून अधिक मूर्ती दान केल्या.

रोटरी क्लबकडे सहा हजार मूर्ती जमा

रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटजने देखील राबविलेल्या मूर्ती दानाच्या उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या, पाचव्या आणि अखेरच्या दिवशी राबवविलेल्या या उपक्रमात संस्थेकडे सहा हजार मूर्ती जमा झाल्या आहेत. मातोश्री वृद्धाश्रम, एस. एम. जोशी पुलाखाली आणि नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिराजवळ हा उपक्रम राबविण्यात आला. जमा झालेल्या या मूर्तींची विक्री करून मिळणारी रक्कम मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या अध्यक्षा मधुमिता बर्वे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोहराब हॉलमधील ‘क्रॉसवर्ड’ खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जहांगीर हॉस्पिटलजवळील सोहराब हॉलमधील क्रॉसवर्ड या पुस्तकांच्या दुकानाला रविवारी रात्री लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल १६ तास २० मिनिटांचा कालावधी लागला. इमारतीत अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका करण्यात आली. एखाद्या दुर्घटनेत आग आटोक्यात आणण्यासाठी लागलेली ही पुण्यातील विक्रमी वेळ ठरली.

इमारतीतील फायर सिस्टीम निरुपयोगी असल्याने आग आटोक्यात आणताना अडचणी आल्या. जेसीबी व इतर साहित्याद्वारे भिंती व काचा फोडून व्हेंटिलेशन करून धुराचे प्रमाण कमी करण्यात आले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मदतकार्याच्या वेळी जितेंद्र सापाटे आणि राजाराम केदारी हे जवान जखमी झाले. सोहराब हॉल ही मॉल प्रकारातील इमारत असून तेथे सुमारे १३० ऑफिसेस आहेत. येथे जर्मनी आणि अमेरिकेच्या व्हिसा सेंटरसारखी महत्त्वाची कार्यालये आहेत.

मोठे ऑपरेशन

शहरात या पूर्वी कासेवाडी झोपडपट्टी येथे २००५ मध्ये लागलेल्या आगीत साडेतीनशेपेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सहा तास लागले होते. आणि २०१० मध्ये सेनापती बापट रोडवरील मुथा चेंबर्सला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पाच तास लागले होते. त्यापेक्षा सोहराब हॉल आटोक्यात आणण्याचे ऑपरेशन अधिक मोठे ठरले. सोहराब हॉलच्याच इमारतीतील एका भागातील एका जिमला लागलेल्या आगीत संपूर्ण मजला जळून खाक झाला होता. ती जिम क्रॉसवर्डच्या अगदी समोरील बाजूस आहे. आजच्या आगीने त्या घटनेचीही आठवण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौदांतील विसर्जनाने इतिहास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळे आणि तब्बल पन्नास टक्के पुणेकरांनी नदी-कॅनॉल टाळून हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करून गणेशोत्सवात नवा इतिहास घडवला. ढोलताशांच्या दणदणाटाने रंगलेला दिवस आणि डीजेच्या सुरावटींमध्ये हरवलेली रात्र, अशा उत्साही वातावरणात शहरातील दिमाखदार गणेश विसर्जन मिरवणुकीची सोमवारी दुपारी तब्बल सव्वाअठ्ठावीस तासांनी सांगता झाली.

किरकोळ प्रकार वगळता मिरवणूक शांततेत पार पडली असली, तरी गणेशभक्तांची अलोट गर्दी, ढोलपथकांनी लावलेला विलंब आणि पोलिसांनी घेतलेली कार्यकर्त्यांची भूमिका, यांमुळे मिरवणुकीचे व्यवस्थापन मात्र कोलमडून पडले.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदा मानाचे सर्व गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई मंडळ अशा प्रमुख मंडळांनीही हौदात विसर्जन करून नवा पायंडा पाडला. पाऊस नसल्याने सकाळपासूनच कडक उन्हातही गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळली होती, सायंकाळनंतर त्यामध्ये अधिकच भर पडली. अखेरीस, टिळक रोडवरील सुवर्ण मित्र मंडळाच्या गणपतीचे तीनच्या सुमारास विसर्जन झाल्यावर २८ तास ५५ मिनिटांनंतर मिरवणुकीची सांगता झाली.

पोलिस 'कार्यकर्त्यां'च्या भूमिकेत

'पोलिस यंदा कार्यकर्त्यांच्या भूमिकेत दिसतील,' या आयुक्तांच्या सूचनेचे पोलिस दलाने तंतोतंत पालन केले आणि कारवाई-गर्दीचे व्यवस्थापन करण्यात हात आखडता घेतला. त्यामुळे संपूर्ण मिरवणुकीत पोलिस सौम्य भूमिका घेतली होती. लक्ष्मी रस्त्यासह टिळक रोड आणि परिसरात गर्दीमुळे चेंगराचेंगरीचे काही प्रकार घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजा ढाले यांना डॉ. आंबेडकर पुरस्कार

$
0
0

प‌ुणे : पुणे महापालिकेच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार यंदाच्या वर्षी दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक राजा ढाले यांना जाहीर झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येत्या गुरुवारी (एक ऑक्टोबर) बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

पालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत नेते नामदेव ढसाळ यांना देण्यात आला होता. १ लाख ११ हजार १११ रुपये आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज जवळील नांद्रे या गावी राजा ढाले यांचा जन्म झाला. दलितांवरील वाढत्या अन्यायाविरोधात त्यांनी अमेरिकेतील निग्रोंच्या ब्लॅक पँथर या चळवळीच्या धर्तीवर महाराष्ट्रात इतर सहकाऱ्यांच्या मदतीने दलित पँथरची स्थापना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवाई दलाचे रिव्हर्स इंजिनीअरिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हवाई दलाने आपल्या अत्याधुनिक विमाने आणि हेलिकॉप्टरमध्ये वापरण्यात येणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रिंटेड सर्किट बोर्डाची (पीसीबी) दुरुस्ती स्थानिक पातळीवर करण्यास सुरुवात केली आहे. रिव्हर्स इंजिनीअरिंगच्या माध्यमातून या बोर्डांमधील नेमका बिघाड शोधून त्याची दुरुस्ती करणे, शक्य झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांची बचत झाली.

हवाई दलाच्या विमाननगर येथील ९ बेस रिपेअर डेपोचे प्रमुख एअर कमांडर संजय कुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हवाई दलातर्फे 'मेक इन इंडिया'च्या धर्तीवर काही उत्पादनांचे संशोधन, तर काहींची दुरुस्ती स्थानिक पातळीवर करण्यावर भर देण्यात येत आहे. विमानांच्या दुरुस्तीबरोबरच दळणवळण, विमानतळावरील विविध यंत्रणा, नेव्हिगेशन यंत्रणा आदींबाबतही संशोधन करून भारतीय यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. त्याद्वारे आतापर्यंत दोन कोटी रुपयांची बचत झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हवाई दल लढाऊ विमाने परदेशी कंपन्यांकडून किंवा 'एचएएल'सारख्या काही कंपन्यांकडून खरेदी करते. परंतु, त्या कंपन्यांकडून त्यासाठीचे तंत्रज्ञान देण्यास टाळाटाळ केली जाते. किरकोळ दुरुस्तीसाठी 'पीसीबी'सारख्या यंत्रणा या कंपन्यांकडे पाठवाव्या लागतात. त्यासाठी खूप कालावधी लागतो, तसेच मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होते. हे टाळण्यासाठी रिव्हर्स इंजिनीअरिंगच्या माध्यमातून बेस रिपेअर डेपोचे उच्चशिक्षित अधिकारी प्रयत्नशील आहेत. विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हजारो पीसीबींपैकी वारंवार बिघडणाऱ्या ६० पीसीबींमधील बिघाड शोधून तो यशस्वीरित्या दूर करणे त्यांना शक्य झाले आहे, असे डेपोतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हवाई दलाच्या मेन्टेनन्स कमांड अंतर्गत येणाऱ्या ९ बेस रिपेअर डेपोची स्थापना बेस सिग्नल रिपेअर युनिट या नावाने एक मे १९५७ रोजी झाली. एक एप्रिल १९६६ रोजी त्याचे नामकरण बेस रिपेअर डेपो करण्यात आले.

सुखोईच्या शिडीची निर्मिती

सुखोईसारख्या लढाऊ विमानाच्या कॉकपीटमध्ये शिरण्यासाठी लागणारी शिडी हवाई दल आतापर्यंत देशातील एका आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडून खरेदी करत होते. यासाठी प्रत्येक शिडीसाठी तीन लाख रुपये आकारण्यात येत होते. परंतु, ९ बीआरडीच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या २१ दिवसांत संशोधन करून शिडीचे प्रारूप विकसित केले. यासाठी केवळ १८ हजार रुपये खर्च आला. त्यानंतर आता एका खासगी कंपनीमार्फत ४८ हजार रुपयांत या शिड्या मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images