Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालिकेची सोलर पॅनल यंत्रणा धूळ खात पडून

$
0
0

पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या मुख्य इमारतीवर पाणी पंपासाठी लागणारी वीज वाचविण्यासाठी बसविण्यात आलेली सोलर पॅनेल यंत्रणा धूळ खात पडली आहे. गेल्या दीड वर्षांपासून या यंत्रणेमधून ३० हजार युनीट वीज उपलब्ध होणे अपेक्षित असताना यामधून केवळ ३१८ युनिट वीज उपलब्ध झाली आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने पालिकेच्या मुख्य इमारतीच्या टेरेसवर पाणी पंपासाठी लागणारी वीज वाचविण्यासाठी सोलर पॅनेल यंत्रणा बसविण्यात आली आहे. अकरा किलो वॅटची ही यंत्रणा असून यामधून सर्वसाधारण दिवसाला ५५ युनीट वीज तयार होण्याची क्षमता आहे. ही यंत्रणा बसविण्यासाठी २३ लाख ४६ हजार १८६ रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, लाखो रुपये खर्च करून अपेक्षित हेतू साध्य होत नसल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केला. या युनीटच्या माध्यमातून साधारणपणे २० हजार ७५ युनीट इतकी वीज तर दीड वर्षांत ३० हजार युनीट वीज तयार होणे अपेक्षित होते. या यंत्रणेची जागेवर तपासणी केली असता या सोलर पॅनेलच्या डिजीटल मीटरमध्ये केवळ ३१८ युनीट वीज वापरल्याचे दिसून येत आहे.

जे पंप या सोलरच्या वीजेवर चालणे अपेक्षित होते ते एमएसईबीच्या विद्युत पुरवठ्यावर सुरू असल्याचे आढळून आले आहेत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसानही होत आहे. ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या प्रकारांमध्ये दोषी असलेल्या संबंधित ठेकेदारला काळ्या यादीत टाकावे आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांवर निलंबानाची कारवाई करावी, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खेड-शिवापूर रस्त्यावर शंभरावर अतिक्रमणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरजवळ रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अतिक्रमणांचा विळखा पडला असून या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या रस्त्याच्या बाजूला अनधिकृत टपऱ्या, हॉटेल व्यावसायिकांच्या बेकायदा शेड, तसेच नव्याने काही दुकाने थाटली गेल्याचे निदर्शनास आले आहे.

हवेलीच्या प्रांत अधिकारी स्नेहल बर्गे व भोरच्या प्रांत अधिकारी मोसमी बर्डे यांनी कात्रज, शिंदेवाडी, खेड-शिवापूर ते नसरापूरपर्यंत महामार्गाच्या बाजूला झालेल्या अतिक्रमणांची पाहणी केली. या पाहणीमध्ये शंभरहून अधिक अतिक्रमणे झाल्याचे दिसून आले. या अतिक्रमणांना तातडीने नोटीस बजावून कारवाई करण्यात येणार असल्याचे हवेलीच्या प्रांत अधिकारी बर्गे यांनी सांगितले.

शिंदेवाडी येथे पावसाच्या पाण्याच्या पुरामध्ये मायलेकींचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर शिंदेवाडी, खेड-शिवापूर परिसरातील अतिक्रमणे व बेकायदा बांधकामावर महसूल प्रशासनाने जोरदार कारवाई केली. या कारवाईमध्ये महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवरील हॉटेलही काढण्यात आली. हा संपूर्ण रस्ता मोकळा करून तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, गेल्या दोन वर्षांत प्राधिकरणाने या जमिनीवर रस्ता करण्याचे काम पूर्ण केले नाही. परिणामी, या जागेवर अतिक्रमणे वाढत गेली.

शिंदेवाडी, खेड-शिवापूर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा ही अतिक्रमणे झाली आहेत. अनधिकृत टपऱ्या, हॉटेलचालकांच्या बेकायदा शेड, तसेच खाद्यविक्रेत्यांच्या गाड्या, पत्र्याची दुकाने या भागात थाटली गेली आहेत. या अतिक्रमणांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच या भागात मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ही अतिक्रमणे काढण्याची कारवाई तातडीने केली जाणार आहे. त्यासाटी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या असून लवकर कारवाई केली जाणार असल्याचेही बर्गे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिओ कॅबवर कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरामध्ये बेकायदा व्यवसाय करणाऱ्या रेडिओ कॅबवर तातडीने कारवाई करावी आणि रिक्षा मीटर कॅलिब्रेशनला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात लवकर संबंधित विभागांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाला दिले.

रेडिओ कॅबला शहरामध्ये व्यवसाय करण्यास परवानगी नाही. तथापि, विविध कंपन्यांच्या रेडिओ कॅब शहरात प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पंचायतीने वारंवार केली आहे. मात्र, ही कारवाई होत नसल्याने रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.

रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. वैधमापन विभागाकडून मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी प्रत्येक केंद्राला कोटा ठरवून दिला आहे. त्यामुळे अतिरिक्त आलेल्या रिक्षांना या केंद्रांवरून परत पाठविले जाते. पुरेशी व्यवस्था निर्माण न करता मुदतीत कॅलिब्रेशन केले नाही, म्हणून रिक्षाचालकांना एक हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे. ही दंड आकारणी तातडीने थांबविण्यात यावी आणि कॅलिब्रेशनला मुदतवाढ देण्यात यावी, तसेच दरवर्षी मीटर कॅलिब्रेशन करण्याची पद्धत बंद करावी. 'ओला', 'विंग्ज'सारख्या रेडिओ कॅब यांना टुरिस्ट परवाना असताना ते प्रवासीभाडे घेत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पंचायतीने निवेदनात केली आहे. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधित विभागांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांमध्ये ध्वनिक्षेपकांना बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक बागा आणि उद्यानांमध्ये ध्वनिक्षेपक लावून कोणतेही कार्यक्रम करू नयेत, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिला आहे. यामुळे उद्यानांमध्ये होणारे गाण्यांचे कार्यक्रम, दिवाळी पहाट उत्सवांच्या कार्यक्रमांना आता कात्री लागली आहे. राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांनी शहरातील शांतता क्षेत्रांची निवड करून या संदर्भात नक्की धोरण ठरवावे, अशा शब्दात सरकारची कानउघाडणी केली आहे.

पुण्यातील गोंगाट विरोधी मंचाने हरित न्यायाधिकरणाकडे पर्यावरणहित याचिका दाखल केली होती. पुण्यातील कमला नेहरू पार्कमध्ये वर्षभर ध्वनिप्रक्षेपकाचा वापर करून गाण्यांचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, होळी उत्सव आणि दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष म्हणजे कोणतेही देवस्थान किंवा प्रार्थनास्थळ, शैक्षणिक संस्था, दवाखाने यांच्यापासून शंभर मीटरच्या परिघात येणारे क्षेत्र कायद्यानुसार शांतता क्षेत्र असते. कमला नेहरू पार्कला लागून दत्त मंदिर आहे, हॉस्पिटल असतानाही तेथे होत असलेल्या कार्यक्रमांना आक्षेप घेऊन संस्थेने न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती विकास किनगांवकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी उद्यानांतील ध्वनिप्रदूषाच्या बाबतीत कठोर आदेश दिले आहेत.

न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार कमला नेहरू पार्क किंवा इतर शांतता क्षेत्र व्याख्येत येणाऱ्या उद्यानांमध्ये राज्यात कुठेही या पुढे ध्वनिक्षेपक लावून कार्यक्रम घेता येणार नाहीत. यामुळे पुण्यातील ७७ उद्यानांमध्ये कार्यक्रम करताना महापालिकेला आता पुनर्विचार करावा लागणार आहे. सारसबागेसारख्या अनेक बागांमध्ये ध्वनिक्षेपक लावून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांनाही या निर्णयाने बंदी आली आहे, अशी माहिती अॅड. असीम सरोदे यांनी दिली.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या शहरीकरणामुळे ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवणे आम्हाला कठीण आहे, अशी बाजू महापालिकने सुनावणीदरम्यान मांडली होती. त्याची दखल घेऊन न्यायाधिकरणाने ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांना आणि संबंधितांवर कारवाई न करणाऱ्या महापालिकेला खडेबोल सुनावले. त्यावर हायकोर्टाने या पूर्वीच दिलेल्या आदेशांनुसार धोरणात्मक निर्णय घेणे महापालिकेचे काम आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

शांतता क्षेत्राची घोषणा करावी

कमला नेहरू पार्कमध्ये ध्वनिक्षेपक लावून कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत, यासाठी कायमस्वरुपी धोरण निश्चित करावे. पुढील चार आठवड्यात कमला नेहरू पार्क परिसर शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करावा, अशा सूचना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मावळ प्रांताकडून नोटीसच नाही

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायराबाबू खान यांच्याशी संबंधित लोणावळ्याजवळील कुरवंडे गावातील ५९ एकर जमीन खासगी वनांच्या शेऱ्यातून मुक्त करण्याच्या निर्णयाला वन खात्याने केलेल्या स्पष्टीकरणामुळे वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या जमिनीवरील खासगी वनाचा शेरा काढण्याच्या फेरविचाराच्या अर्जावर मावळ प्रांत कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षांत एकही नोटीस मिळाली नसल्याचे वन खात्याने स्पष्ट केले आहे.

कुरवंडे गावातील सर्व्हे नंबर १२४ ही ५९ एकर ५ गुंठे ही जमीन खासगी वनांच्या यादीत समाविष्ट नसल्याने हा शेरा कमी करण्याचा अर्ज सायराबानू यांच्या वतीने हरविंदरसिंग रंधवा यांनी केला होता. तत्कालीन मावळ प्रांत संजय पाटील यांच्याकडे या केसची सुनावणी सुरू असताना, ही जमीन खासगी वनात नसल्याचे पत्र वन खात्याने दिले. त्याआधारे हा खासगी राखीव वनाचा शेरा कमी करण्याचा आदेश त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पवारांना आताच का शेतकऱ्यांचा पुळका’

$
0
0

पुणे : 'केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी कधीही दुष्काळी दौरे केले नाहीत. सत्ता गेल्यानंतरच त्यांना जाग आली. आताच त्यांना शेतकऱ्यांचा पुळका का आला', असा सवाल ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी उपस्थित करत पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

साईनाथ यांनी शनिवारी 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 'पवार यांनी कृषिमंत्रीपदी असताना कधीही शेतकऱ्यांची विचारपूस केली नाही. ऊस, गुलाब यासारखी जास्त पाणी लागणारी पिके पवारांनीच राज्यात रूजवली. लवासासारख्या सिटी उभारून पाणी अडवून ठेवले. पुण्या-मुंबईत राहणाऱ्या आणि घरी स्विमिंग पूल असलेल्या व्यक्तींच्या जीवनशैलीमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दर दहा वर्षांनी दुष्काळ अपेक्षित असतो. त्यानुसार आधीच नियोजन केले पाहिजे', असेही साईनाथ यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

CID कडील ४५ टक्के गुन्हे प्रलंबित

$
0
0

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : वाहिन्यांवरील मालिकांमधून कितीही यश मिळवित असले, तरी प्रत्यक्षात मात्र राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाला गेल्या १२ वर्षांत तब्बल ४५ टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगार शोधण्यात अपयश आले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या बळाबरोबरच सुविधांच्या कमतरतेमुळे 'सीआयडी'वर ही नामुष्की ओढवली आहे.

'मटा'च्या बातमीदारानेच दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जामध्ये 'सीआयडी'ने तपासाच्या प्रगतीसंदर्भातील तपशील दिला आहे. 'सीआयडी' ही राज्याची एक महत्त्वाची तपास यंत्रणा आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती असे 'सीआयडी'चे चार विभाग आहेत. एखाद्या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिस व इतर तपास यंत्रणांना लावण्यात अपयश आल्यानंतर राज्य सरकार अथवा कोर्टाच्या आदेशानुसार 'सीआयडी'कडे गुन्ह्याचा तपास दिला जातो. या तपासांसाठी 'सीआयडी'मध्ये फोटोग्राफी, फिंगरप्रिंट असे टेक्निकल विभाग मदतीला आहेत. मात्र, तपास करण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाचा अभाव असल्याने तपास लांबत जातो. 'सीआयडी'कडे २००२ सालापासून गुन्हे तपासासाठी आहेत. काही गुन्ह्यात तपास लागल नसल्याचा अहवाल कोर्टाला सादर करून गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला आहे.

गेल्या पाच वर्षांत 'सीआयडी'कडे दाखल झालेले गुन्हे आणि त्याचा केलेला तपास, प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची माहितीच्या आधाराखाली माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार, 'सीआयडी'कडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत सीआयडीच्या चार विभागांकडे आठशे गुन्हे तपासासाठी आले आहेत. त्यांपैकी पुणे विभागाकडे (६३४) सर्वाधिक गुन्हे आले आहेत. राज्यात एकूण गुन्ह्यांपैकी ३६५ गुन्हे तपासावर प्रलंबित आहेत. यामध्ये २००२ पासून गुन्हे प्रलंबित असल्याची माहिती सीआयडीकडून आरटीआयमध्ये दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘१७ क्रमांका’चा गैरवापर

$
0
0

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : शहरातील बड्या कॉलेजांमधून गेल्या काही वर्षांपासून मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थी बेकायदा सतरा क्रमांकाच्या अर्जाद्वारे बारावीची परीक्षा देत असल्याचे आता माहिती अधिकारातूनच उघड झाली आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्जांची पडताळणी करण्यासाठी शेकडोंचे शुल्क घेणाऱ्या राज्य बोर्डाच्या कारभारावरही त्यामुळे शंका उपस्थित करण्यात येत आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या पातळीवरून बेकायदा तुकडी मान्यता मिळविणाऱ्या कॉलेजांचे प्रताप 'मटा'ने नुकतेच उजेडात आणले. अशा तुकड्या मिळाल्यानंतरही कॉलेजांचे विद्यार्थी मिळविण्याचे प्रयत्न थांबतच नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. वाढीव तुकड्या मिळाल्यानंतरही आपल्याकडे अतिरिक्त ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र जाऊ न देता, आपल्याच कॉलेजमधून बारावीची परीक्षा देण्यासाठी १७ नंबरची सुविधा वापरून कॉलेजे विद्यार्थी टिकवून ठेवत आहेत. कॉलेजची प्रतिष्ठा जपण्यासोबतच विद्यार्थी टिकविण्याच्या या प्रयत्नात १७ नंबरच्या अर्जाच्या संख्येची मर्यादा मात्र ही कॉलेजे दरवर्षी ओलांडत आहेत. 'सिस्कॉम''च्या वैशाली बाफना यांनी माहिती अधिकाराद्वारे संबंधित कॉलेज, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य बोर्ड) मागविलेल्या माहितीतून या बाबी स्पष्ट होत आहेत. केवळ उपसंचालक कार्यालयातीलच नव्हे, तर राज्य बोर्डातील अधिकारीही या गैरप्रकारांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही या निमित्ताने करण्यात येत आहे.

श्रीमती बाफना म्हणाल्या, 'एका कॉलेजमधून एकावेळी जास्तीत जास्त ५० विद्यार्थ्यांनाच १७ क्रमांकाच्या अर्जाद्वारे बोर्डाची परीक्षा देता येते. त्यापेक्षा अधिक खासगी विद्यार्थी असल्यास बोर्डाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असल्याचे नियम आहेत. प्रत्यक्षात कॉलेज पातळीवरून असा कोणताही विचार झालेला नाही. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाल्यानंतर आम्ही संबंधित कॉलेजांविरोधात राज्य बोर्डाचे अधिकारी आणि शिक्षण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. परीक्षा अर्जांची छानणी करण्यासाठी बोर्ड विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करते.'

छाननीच होत नसेल, तर हे शुल्क नेमके कोणत्या कारणासाठी घेतले जाते, असा सवालही बाफना यांनी या निमित्ताने उपस्थित केला. या विषयी शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

कॉलेजांचा असाही मर्यादाभंग

माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, शहराच्या पूर्व भागातील एका कॉलेजने एक हजार ८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असताना बारावीला एक हजार १६० नियमित, तर २५० विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी म्हणून बसविले. शिवाजीनगर परिसरातील एका कॉलेजने ९६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असताना एक हजार १७१ विद्यार्थी नियमित, तर ५४ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी म्हणून बसविले. शहरातील इतर भागांमधील कॉलेजांमधूनही अशाच पद्धतीने विद्यार्थी परीक्षा देत असल्याचेही उघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी सम-विषमचे गणित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला; पण पहिल्याच दिवशी पालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही ठिकाणी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे आता सम-विषम तारखांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, सोमवारी (७ तारखेला) पाणीपुरवठा झालेल्या भागांत आता, ९, ११, १३, १५ अशा तारखांना, तर मंगळवारी (८ सप्टेंबर) पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत १०, १२, १४, १६ अशा तारखांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

महापालिकेने तयार केलेल्या वेळापत्रकामध्ये ज्या भागांना सोमवार, बुधवार, शुक्रवारी पाणी दिले जाणार होते, अशा भागांना विषम तारखांना, तर मंगळवार, गुरुवार, शनिवारी पाणी दिले जाणाऱ्या भागांना सम तारखांना पाणी दिले जाणार आहे. संपूर्ण शहरात दिवसाआड पद्धतीनेच पाणीपुरवठा केला जाणार असून, दिवसांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सम-विषम तारखांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सोमवारचा पहिला दिवस मात्र गोंधळाचा होता. पेठांच्या परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले गेले होते. मात्र, सोमवारी सकाळी नियमित पाणीपुरवठा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले; तर खडकीसह इतर काही भागांत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. गेल्या अनेक दिवसांपासून दररोज केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात एकदम बदल झाल्याने काही त्रुटी राहण्याची शक्यता असून, येत्या ३-४ दिवसांत सर्व व्यवस्था सुरळीत होईल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून (७ सप्टेंबर) त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी, खडकवासला धरणातून ८५० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी उचलले जाणार असून पालिकेने केलेल्या वेळापत्रकानुसार हे पाणी दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

$
0
0

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली. चिंचवड एसकेएफ कॉलनी येथे सोमवारी (७ सप्टेंबर) ही घटना घडली. अश्विनी सुहास गुजर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती सुहास गुजर हे पिंपरी पोलिस ठाण्यात 'पोलिस नाईक' पदावर कार्यरत आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी गुजर सोमवारी मुंबई हायकोर्टात गेले होते. दुपारी त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या वेळी त्यांच्या सासू एकट्याच घरामध्ये होत्या. त्यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर अश्विनी यांना वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवानगी फांद्या तोडणाऱ्यांना दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेची परवानगी न घेता झाडाच्या फांद्या तोडल्याने दशनाम गोसावी संस्थेच्या अकरा पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आणि १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महापालिकेच्या कोर्टाने शिक्षा सुनावली असून, शिक्षा सुनावण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तरीच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

सोमवार पेठेतील दशनाम गोसावी संस्थेने आपल्या आवारातील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या बेकायदा पद्धत‌ीने तोडल्याची तक्रार संस्थेचे आजीव सदस्य नंदकुमार गोसावी यांनी पालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार दाखल केली होती. झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी हायकोर्टाच‌ी मंजुरी घेणे आवश्यक असते. फांद्या तोडण्याची परवानगी देण्याचे अधिकार पालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संस्थेच्या आवारातील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी उद्यान विभागाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर फांद्या तोडल्याचे लक्षात आल्याने संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पालिकेच्या कोर्टात हॉर्टीकल्चर मिस्त्री अजय भिसे यांनी तक्रार दाखल केली होती. कोर्टाने मिस्त्री यांच्यासह त्यांचे सहकारी रवींद्र कांबळे यांची साक्ष नोंदविली. फांद्या तोडताना पालिकेची परवानगी न घेता सिद्ध झाल्याने कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रेवती कंटे यांनी ही शिक्षा सुनावली.

विधी सल्लागारावर कारवाईची मागणी

बेकायदा पद्धतीने झाडाच्या फांद्या तोडल्याचा खटला कोर्टात दाखल असतानाही खटला मागे घ्यावा, यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाब टाकण्याचे काम तत्कालीन विधी सल्लागार मंजुषा इधाटे यांनी केल्याचा आरोप गोसावी यांनी केला. फिर्यादीच्या नावाने खोटा अर्जही त्यांनी सादर केला. पालिका आयुक्तांनी इधाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी गोसावी यांन‌ी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेऐवजी ‘यशदा’त चाकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या उद्यानात नियुक्ती असलेली महिला कर्मचारी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त नरेंद्र झुरमुरे यांच्या 'यशदा' येथील घरी धुणीभांड्याची कामे करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षापासून 'यशदा' येथे शासकीय नियुक्तीवर असलेल्या झुरमुरे यांच्या घरी काम करणाऱ्या या महिलेला दरमहा पालिकेतर्फे वेतन मिळत आहे. पालिकेतून बदली झालेल्या अधिकाऱ्याच्या घरी पालिकेच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करणाऱ्या झुरमुरे यांची दोन वर्षांपूर्वी 'यशदा'मध्ये बदली झाली. बदली झाल्यानंतर 'यशदा' येथील त्यांच्या बंगल्यात उद्यान विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची धुणीभांडी करण्यासाठी बदली झाली. पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशानुसार या महिलेची बदली करण्यात आल्याचे उद्यान विभागाने माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे. भाजपचे कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी विचारलेल्या प्रश्नात ही बाब उघड झाली आहे. संबंधित महिला कागदोपत्री औंध क्षेत्रीय कार्यालयाअंर्तगत उद्यान विभागामध्ये नियुक्तीस आहे. मात्र, प्रत्यक्षात ती झुरमुरे यांच्या सरकारी निवासस्थानी कामाला आहे, असे आल्हाट म्हणाले. पालिकेचे कोणतेही काम न करता उद्यान विभागातर्फे दमहा महिलेला पगार देण्यात येत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आल्हाट यांनी केली आहे.

'त्या अधिकाऱ्याची चौकशी करा'

'यशदा'मध्ये बदली झाल्यापासून संबंधित महिला कर्मचारी आपल्या घरी कामाला असल्याची स्पष्ट कल्पना झुरमुरे यांना होती. तरीदेखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. झुरमुरे यांनी शासनाची दिशाभूल केली आहे. पालिकेतील ज्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने या महिलेची नेमणूक केली आहे, त्याची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ने दोन महिलांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'च्या संसर्गाने पुण्यातील आणि साताऱ्यातील एका महिलेचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील आतापर्यंत संसर्गाने दगावलेल्या पेशंटची संख्या १०७ पर्यंत पोहोचली आहे. दोन्ही महिला स्वाइन फ्लूच्या लक्षणांमुळे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आल्यानंतर त्यांना संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली. दोघींचा सोमवारी मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले नव्हते. मात्र, दोन महिलांचा मृत्यू झाल्याने नागरिकांत पुन्हा भीती आहे.

सज्जा कोसळून मजूर ठार

पुणेः बोपोडीतील गणेशनगर येथे इमारतीच्या खिडकीचा सज्जा कोसळून एक कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना घडली. यात आणखी एक कर्मचारी जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. नरसिंग बसराज वगर (वय ४२) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. बोपोडीतील गणेशनगर हा झोपडपट्टीचा भाग आहे. येथे एका दोन मजली घराचे काम सुरू होते. या घराचा स्लॅब नुकताच टाकण्यात आला होता. खिडकीवरील सज्जावरही स्लॅब टाकण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल चालकास वर्गणीसाठी मारहाण

$
0
0

पुणेः गणपतीची वर्गणी कमी दिल्यामुळे एरंडवणे भागातील सूर्या हॉटेल चालकाला मारहाण करून हॉटेलची तोडफोड केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. या प्रकरणी जबरदस्तीने वर्गणी मागणऱ्या पटवर्धन बाग बालमित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांवर अलंकार पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हॉटेल चालकाने अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पटवर्धन बाग बालमित्र मंडळाचे कार्यकर्ते निलेश, रोहन, बलकवडे या कार्यकर्त्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

'नागरिकांनी तक्रार करावी'

मोठमोठ्या रकमांची जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांच्या विरोधात समोर येऊन नागरिकांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार द्यावी. गणेशोत्सवामध्ये कोणत्याही व्यक्तीने किंवा मंडळाने वर्गणीसाठी जबरदस्ती केली. तसेच, त्रास दिल्यास (०२०) २६२०८२४२, २६२०८२९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणाऱ्यास दोन दिवस कोठडी

$
0
0

पुणेः बिबवेवाडी येथील एका मिठाई व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्यास आरोपीस दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. खंडणी विरोधी पथकाने सोमवारी रात्री या आरोपीला अटक केली होती.

दुर्गेश बाळू गजरे (वय २४, रा. शिवजेतनजर, बिबवेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. बिबवेवाडी येथील आराधना स्वीट मार्टमध्ये गजरे शुक्रवारी गेला. 'पन्नास किलो काजू कतली खरेदी करायची आहे,' असे सांगून मालकाच्या मोबाइल नंबरची मागणी केली. नोकराने मालकाचा मोबाइल नंबर दिल्यानंतर आरोपीने विविध कॉइन बॉक्सवरून मालकास फोन केले. हिंदीमध्ये जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली.

मालकाने तत्काळ खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. पथकाचे पोलिस कर्मचारी धीरज भोर यांना खंडणी मागणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा दोन दिवस माग काढून गजरे याला अटक केली. गजरे याच्यावर पूर्वीचा आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे. त्याला कोर्टाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुशल कामगारांची वानवा

$
0
0

आयटी-आयटीईएस, ऑर्गनाइज्ड रिटेलकडे युवकांचा कल

Prasad.Panse@timesgroup.com

पुणेः राज्यात येत्या काही वर्षांमध्ये आयटी-आयटीईएस तसेच ऑर्गनाइज्ड रिटेल क्षेत्राला मोठी मागणी असेल. त्याकडे युवकांचा ओढाही मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे. परंतु, बांधकाम क्षेत्र तसेच असंघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासण्याची शक्यता असताना ग्लॅमरअभावी युवकांचा या क्षेत्राकडे ओढा नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यात या क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची कमतरता भासण्याचीच शक्यता आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली. राज्यात २०२२ पर्यंत कोणत्या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. तसेच त्याकडे युवकांचा कल किती प्रमाणात आहे, याबाबत करण्यात आलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे.

राज्यात माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योग (आयटी-आयटीईएस) आणि संघटित रिटेल क्षेत्राला सर्वाधिक कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही क्षेत्रांकडे युवकांचा कलही अधिक आहे. त्यामुळे युवकांचा कल तसेच या क्षेत्राची नेमकी गरज लक्षात घेऊन या युवकांना योग्य प्रशिक्षण देण्याचे आव्हान सरकारी यंत्रणा तसेच शिक्षण, प्रशिक्षण संस्थांना पेलावे लागणार आहे. ट्रॅव्हल, टूरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मध्यम स्वरूपाची मागणी असून, त्याकडे युवकांचा कलही मध्यम स्वरूपाचा असण्याचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. तर अन्न प्रक्रिया, वाहन उद्योग आणि वाहनांचे सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्यांना मनुष्यबळाची गरज तुलनेने कमी लागण्याची शक्यता असताना युवकांचा त्याकडे अधिक ओढा असल्याचेही यातून समोर आले आहे. असंघटित क्षेत्रांना विशेषतः बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. परंतु, या क्षेत्राला ग्लॅमर नसल्याने युवकांचा या क्षेत्राकडे असलेला ओढा फारच कमी आहे. उत्पादन क्षेत्रातील अन्य कंपन्या आणि शेती व शेतीशी संबंधित उद्योगांमध्ये मध्यम स्वरूपाची मागणी असली, तरी या क्षेत्रांकडे युवकांचा ओढा कमी आहे. रसायने, औषध निर्मिती तसेच ज्वेलरी आणि मौल्यवान रत्नांच्या क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरजही कमी प्रमाणात लागणार असून, या क्षेत्राकडे युवकांचा ओढाही खूपच कमी आहे.

माध्यम, मनोरंजन क्षेत्रात संधी

माध्यमे व मनोरंजन, बँका व वित्तीय संस्था, वाहतूक व दळणवळण, आरोग्यसेवा, शिक्षण व कौशल्यविकास, वस्त्रोद्योग या क्षेत्रांना मध्यम स्वरूपाच्या मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या क्षेत्रांकडे युवकांचा ओढाही मध्यम स्वरूपाचाच आहे. त्यामुळे या क्षेत्रांना कुशल मनुष्यबळाची फारशी कमतरता जाणवण्याची शक्यता नाही.

आयटीला अधिक गरज

आयटी, आयटीईएस, रिटेल क्षेत्राला सर्वाधिक गरज

या क्षेत्रांकडे युवकांचा

ओढाही अधिक

बांधकाम क्षेत्राला मोठी गरज असूनही युवकांचा ओढा कमीच

रसायने, औषधे, ज्वेलरी क्षेत्रात मागणी व ओढा दोन्ही कमी

अन्न प्रक्रिया, वाहन उद्योग

क्षेत्रात मागणी कमी व युवकांचा ओढा अधिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्तींची भाववाढ दहा टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाची चाहूल लागली असून शहरात सर्वत्र गणेशमूर्तींचे स्टॉल लागले आहेत. मूर्तींची आगाऊ नोंदणी जोरात सुरू झाली आहे. दुष्काळामुळे मूर्तींचे भाव प्रचंड वाढतील अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, दर वर्षीप्रमाणे १० टक्के अशी किरकोळ भाववाढ करण्यात आली आहे.

गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने वातावरणही उत्सवमय होऊ लागले आहे. दमदार पाऊस नसल्याने एकीकडे दुष्काळाची छाया गडद होऊ लागलेली असतानाच ऐतिहासिक परंपरा असलेल्या गणेशोत्सवावर त्याचा फारसा प्रभाव पडल्याचे दिसून येत नाही. गणेशोत्सवाच्या कामाला आता वेग येऊ लागलेला असतानाच मूर्तींची आगाऊ नोंदणी जोरात सुरू झाली आहे. काही व्यावसायिकांकडील जवळपास निम्म्या मूर्ती विकल्या गेल्या आहेत.

गणेश मूर्तींबरोबरच सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली असून गर्दीने ती अधिकच फुलून गेली आहे. गेल्या काही वर्षांत नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत सजगता वाढली आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्तींची मागणी प्रचंड वाढली असून 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस' च्या मूर्तींनाही मागणी कायम असल्याची माहिती व्यावसायिकांनी 'मटा'ला दिली.

'मंगलमूर्ती'चे अतुल मारणे यांनी सांगितले, 'दरवर्षी प्रमाणे यंदाही केवळ १० ते १५ टक्के भाववाढ आहे. दुष्काळाची तीव्रता असली तरी गणेशोत्सवासाठी मूर्ती घ्यावीच लागते. त्यामुळे दुष्काळाचा परिणास फारसा जाणवत नसून आठ दिवस आधीच नोंदणी जोरात सुरू झाली आहे. आमच्याकडील ५० टक्के मूर्तींची आत्ताच नोंदणी झाली आहे.'

शाडूच्या मूर्तींचे व्यापारी चैतन्य तागडे यांनी देखील हीच बाब अधोरेखित केली. ते म्हणाले, 'शाडूच्या मूर्तींची नोंदणी सुरू झाली असून ती गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. दुष्काळाची चिन्हे असले तरी मूर्ती खरेदी करावीच लागते.'

शाडूच्या मूर्तींना मागणी

दमदार पाऊस नसला तरी घरोघरी गणराय थाटात विराजमान होणार आहेत. पाण्याअभावी विसर्जनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता घरीच एखाद्या भांड्यात गणपती विसर्जन करण्याचा विचार वाढत असून त्यादृष्टीने शाडूंच्या मूर्तींना आत्तापासूनच मागणी वाढली आहे, असे निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूची लस गर्भवतींना मोफत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'चा संसर्ग वाढत असल्याने गर्भवती महिलांना मोफत लस देण्यासाठी राज्यात साठ केंद्रे कार्यान्वित कऱण्यात आली आहेत. त्यातील दहा केंद्रे एकट्या पुण्यात आहेत. गेल्या महिन्याभरात राज्यात दोन हजारांहून अधिक गर्भवतींनी मोफत लशीचा लाभ घेतला आहे.

राज्यात जानेवारीमध्ये स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढल्यानंतर जूनमध्ये पावसाळ्यात आणखी वाढेल अशी भीती निर्माण झाली होती. साथरोग आजारासंदर्भातील समितीने या भीतीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य खात्याला अतिधोक्याच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली होती. त्या नुसार अतिधोक्याच्या घटकांमध्ये गर्भवती महिलांचा समावेश होतो. त्यानुसार २९ जुलैपासन राज्यातील गर्भवती महिलांना स्वाइन फ्लूची मोफत लस देण्यास सुरुवात झाली.

'राज्यात स्वाइन फ्लूची मोफत लस देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले आहे. राज्यात साठ केंद्रे सुरू कऱण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ पुण्यातदेखील पालिकेच्या मदतीने लस देण्यासाठी केंद्रे सुरू केली आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात दहा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राज्यात महिन्यात २०७६ गर्भवती महिलांनी मोफत लस घेतली आहे, तर दहा दिवसांत पुण्यातील ६६० गर्भवतींनी लस घेतली आहे,' अशी माहिती साथरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

पुण्यातील केंद्रे

महापालिकेचे कमला नेहरू हॉस्पिटल, सोनवणे प्रसूतीगृह, येरवड्यातील राजीव गांधी हॉस्पिटल, कोथरूडमधील सुतार दवाखाना, ससून, औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरीत यशवंतराव चव्हाण स्मृति हॉस्पिटल आणि तालेरा हॉस्पिटल, बारामतीचे महिला रुग्णालय, बारामती, मंचरचे उपजिल्हा हॉस्पिटल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेतील कचऱ्यासाठी इको फ्रेंडली बॅग

$
0
0

पुणेः रेल्वेतील प्रवाशांकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्याला, पर्यायाने प्रदूषणाला आळा घालण्यासठी झेलम एक्स्प्रेसच्या प्रत्येक स्लिपर कोचमध्ये कचऱ्यासाठी इको फ्रेंडली बायो डीग्रेडेबल बॅग उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. रेल्वे आणि रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा हा कचरा रेल्वेत सीट खाली किंवा ट्रॅकवर टाकला जातो. यामध्ये सुका, ओला अशा दोन्ही प्रकारच्या कचऱ्याचा समावेश आहे. कचरा मोठ्या प्रमाणावर साठल्याने रेल्वेतही दुर्गंधी पसरत असल्याचा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अध्यक्षपदासाठी मला वेळ नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गजेंद्र चौहान यांच्या जागी अध्यक्षपदासाठी मला विचारण्यात आले नव्हते. शैक्षणिक समितीच्या अध्यक्षपदासाठी मला विचारण्यात आले होते. विद्यार्थी आणि मंत्रालयाला मी बाहेरून मदत करीन. मला अध्यक्षपद सांभाळण्यास वेळ नाही, त्यामुळे मी हे पद स्वीकारू शकत नाही,' असे स्पष्टीकरण प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राजू हिरानी यांनी दिले आहे. त्यामुळे 'एफटीआयआय'च्या प्रश्नासंदर्भात तोडगा काढण्याच्या हालचालींना 'खो' बसला आहे.

'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदावरून चौहान यांना इतरत्र हलविण्याची किंवा पदावर कायम ठेवून अधिकार काढून घेण्याची तयारी माहिती प्रसारण मंत्रालयाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'एफटीआयआय'मधील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासमोर सरकारने काही पर्याय ठेवले होते. त्यामध्ये चित्रपट निर्माते राजू हिरानी चौहान यांची जागा घेणार असून, आगामी काळात चौहान संस्थेच्या पायाभूत सुविधा आणि धोरणे ठरविणाऱ्या समितीचे अध्यक्ष राहतील, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. हिरानींना विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमा संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात येणार होता. मात्र, आता खुद्द हिरानींनीच मला हे पद नको, मला वेळ नाही, अशी भूमिका घेतल्याने या पदासाठी विद्यार्थीमान्य व्यक्ती निवडण्याची वेळ मंत्रालयावर आली आहे.

चौहान यांची नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याच्या विरोधात संस्थेतील विद्यार्थ्यांचे 'अभ्यास वर्ग बंद' आंदोलन सुरू आहे. मंगळवारी आंदोलनाचा ८९ वा दिवस होता.

अभिजित दास यांचे उपोषण मागे

आंदोलनावर सरकार पातळीवर तोडगा न निघाल्याने हताश होऊन उपोषण करणारे कंत्राटी प्राध्यापक अभिजित दास यांनी ६६ तासांनंतर मंगळवारी उपोषण मागे घेतले. दास गेल्या दोन दिवसांपासून उपोषण करीत होते. उपोषण केल्याने सोमवारी रात्री शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला होता. शासनाने दखल न घेतल्याने दास यांना त्रास झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आंदोलन त्वरित संपुष्टात यावे आणि शैक्षणिक वर्ग पुन्हा सुरू व्हावेत या मागणीसाठी दास शिक्षन दिनापासून उपोषणाला बसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images