Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कॉसमॉस बँकेला २० कोटींचा गंडा

$
0
0

पुणेः बनावट कागदपत्रांच्या आधारे कॉसमॉस बँकेकडून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्या रोझरी एज्युकेशन ग्रुपविरोधात बँकेने बुधवारी फसवणुकीची तक्रार दाखल केली. बँकेच्या तक्रारीवरून रोझरीच्या विवेक अऱ्हाना आणि विनय अऱ्हाना यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, विवेक आणि विनय अऱ्हाना यांनी बँकेकडून वेगवेगळ्या स्वरुपात एकूण ४६ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी २० कोटी ४४ लाख रुपयांच्या कर्जासाठी संबंधितांनी तळेगाव दाभाडे येथील एका जमिनीची कागदपत्रे बँकेकडे तारण म्हणून सादर केली होती. बँकेचे कायदा अधिकारी एस. व्ही. काळे यांनी लष्कर पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी तक्रार दाखल केली.

बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी बँकेने कोणतेही बेकायदा कृत्य केले नसून, बँकेत कोणताही आर्थिक घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट केले. या सर्व प्रकरणात चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचेही स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेकवडे हत्या; संशयितांना कोठडी

$
0
0

पिंपरीः नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या हत्येच्या तपासादरम्यान शहरातून दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या दोघांना शनिवारी (५ सप्टेंबर) मोरवाडी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. टेकवडे यांची गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळ दोन हल्लेखोरांनी शस्त्राने वार करून हत्या केली होती. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे या प्रकरणातील सूत्रधार अमोल वहिले याला अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाकिस्तानला ठोस प्रत्त्युतर’

$
0
0

पुणेः 'पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी, अशी आमची भूमिका असली, तरी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यातच त्यांचा अधिक वेळ जात आहे. आमच्या शेजाऱ्यांवर पहिली गोळी आम्ही चालवणार नाही; पण वेळ आलीच तर ठोस प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही,' अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी पाकिस्तानला ठणकावले.

भारतीय जनता पक्षातर्फे पुण्यातील विविध क्षेत्रांतील जाणकारांसमवेत राजनाथसिंग यांचा संवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. देशातील सर्व पोलिस दलांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू केले जावे, असे निर्देश गृह मंत्रालयातर्फे सर्व राज्य सरकारांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खासदार आणि भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिंपरी वगळण्यास खासदार दोषी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश होऊ शकला नाही, याला शहरातील तिन्ही खासदार आणि आमदारांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (पाच सप्टेंबर) केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन योजनेतील पिंपरी-चिंचवडच्या समावेशाबाबत प्रयत्न केले जातील, असेही स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड पालिकेच्यावतीने आयोजित विविध विकासकामांचे भूमीपूजन, उद्‍‍घाटन आणि सत्कार पवार यांच्या हस्ते झाले. त्या दरम्यान भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पत्रकार परिषद झाली. त्या वेळी स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेवक अजित गव्हाणे, नितिन लांडगे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत बेस्ट सिटी म्हणून पारितोषिक मिळविलेल्या आणि स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त करूनही पिंपरी-चिंचवडचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत होऊ शकला नाही. याला सरकारची उदासिनता जबाबदार असल्याचा पुनरुच्चार करून पवार म्हणाले, 'भ्रष्टाचारामुळे समावेश होऊ शकला नाही, असे सांगून कोणी केविलवाणा प्रयत्न करीत असल्यास आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.'

योजनेत समावेशासाठी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहोत. तसेच वेळ पडल्यास राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित प्रस्ताव पाठविला होता. त्याचवेळी एक शहर वगळणार हे स्पष्ट झाले होते, असेही पवार यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकांमध्ये निराशेचा सूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने माजी सैनिकांसाठी 'वन रँक वन पेन्शन' योजना लागू करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत माजी सैनिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. व्हीआरएस घेतलेल्या सैनिकांना यातून वगळण्यात आल्याने तसेच या पेन्शनचा आढावा दर पाच वर्षांनी घेण्यात येणार असल्याने माजी सैनिकांमध्ये याबाबत काहीसा निराशेचा सूर आहे.

'ओआरओपीची घोषणा नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु, माजी सैनिकांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी ४० वर्ष लढा द्यावा, लागणे दुर्दैवी आहे. आताही आंदोलन, उपोषण केल्यावरच त्यांना न्याय मिळाला आहे. यामध्ये शासनपद्धतीचा प्रशासनाचा दोष आहे. या संदर्भातील अन्य काही समस्यांबाबत शासन लवकरच तोडगा काढेल, अशी आशा आहे', असे लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांनी सांगितले.

'लष्करातून काही विशिष्ट वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती घेतल्यास पेन्शन लागू होते. त्यामुळे अशी निवृत्ती घेतलेल्यांना ओआरओपी लागू न करणे चुकीचे आहे. तसेच या पेन्शनचा आढावा दरवर्षी घेण्यात यावा, व त्यासाठी न्यायाधिशांबरोबरच लष्करी अधिकारी व एका अर्थ विभागाच्या अधिकाऱ्याचाही समावेश असावा', अशी अपेक्षाही शेकटकर यांनी व्यक्त केली. एखाद्या गोष्टीचे आश्वासन दिल्यानंतर ती पूर्ण न केल्यास असंतोष पसरतो, याचे दर्शनही या काळात घडल्याचे त्यांनी सांगितले.

'चाळीस वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेली मागणी सरकारने अखेर पूर्ण केली आहे, ही आनंदाची बाब आहे. परंतु, यासाठी माजी सैनिकांना मोठ्या प्रमाणावर चळवळ, आंदोलन करावे लागले. सरकारच्या या निर्णयाचा लवकर निवृत्त होणाऱ्या जवानांना अधिक प्रमाणात होईल. या निर्णायावेळी मान्य न झालेल्या अन्य काही मुद्द्यांवरही लवकरच तोडगा निघेल, अशी आशा आहे', असे एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी सांगितले.

'माजी सैनिकांनी केलेली ओआरओपीची मागणी आणि सरकारने प्रत्यक्षात केलेली घोषणा यात खूप फरक आहे. त्यामुळे याला ओआरओपी म्हणावे का, असा सवाल ब्रिगेडिअर शरद लुकतुके (निवृत्त) यांनी उपस्थित केला. 'तरीही इतक्या वर्षांच्या लढ्यानंतर सरकारने किमान हा मुद्दा तत्वतः मान्य केला हे स्वागतार्ह आहे. पेन्शनचा आढावा दरवर्षी घेतला पाहिजे. लष्करात व्हीआरएस अशी गोष्टच नसताना पेन्शन लागू झाल्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ३५ ते ४० टक्के अधिकारी, जवान यातून आपोआपच वगळले गेले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी आठ दहा हजार कोटी रुपये लागणार असल्याचा सरकारचा दावाही चुकीचा आहे', असे लुकतुके यांनी स्पष्ट केले. निवृत्तीनंतर सरकार आमची काळजी घेईल, ही माजी सैनिकांची अपेक्षा सरकारने फोल ठरवली आहे, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली.



'लढा चालूच ठेवणार'

ओरओपीची तारीख जाहीर करण्यासाठी माजी सैनिकांना ८२ दिवस लढा द्यावा लागला. या काळात माजी सैनिक व सरकार, माजी सैनिक व प्रशासन व्यवस्था यांच्यातील नात्यांना तडे गेले आहेत. ओआरओपीशी संबंधित अन्य मुद्दे मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही लढा चालूच ठेवू', असे इंडियन एक्स सर्व्हिसमन मूव्हमेंटचे कमांडर रवींद्र पाठक (निवृत्त) यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाचा आदेशभंग करणाऱ्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहीहंडी उत्सवामध्ये कोर्टाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहीहंडी मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. उत्सवासाठी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात रविवारी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत साधारण एक हजार मंडळे हा उत्सव साजरा करतील. त्यातील दोनशे मंडळे मोठी असून, उर्वरित छोटी मंडळे आहेत. उत्सव सुरक्षित, सुरळितपणे पार पडावा म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. स्थानिक पोलिसांना त्यांच्या मागणीप्रमाणे पोलिस मुख्यालयातून वाढीव बंदोबस्त देण्यात येणार आहे. तसेच, एक एसआरपीएफची तुकडी आणि पाचशे होमगार्ड बंदोबस्तासाठी देण्यात येणार आहेत. गुन्हे शाखेची तपास पथके राहणार असून, विशेष शाखेची पथके गस्त घालणार आहे, असेही पाठक म्हणाले.

वाहतुकीत बदल नाही

दहिहंडी उत्सवासाठी कोणत्याही ठिकाणी रस्ते बंद केले जाणार नाहीत. सर्व ठिकाणची वाहतूक सुरळित ठेवली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

कोर्टाने दिलेले नियम

बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडी उत्सवात सहभागी होता येणार नाही.

दहीहंडीची उंची वीस फुटांपेक्षा अधिक असू नये.

दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी मॅट, अॅम्ब्युलन्स सज्ज ठेवावे.

बारा ते पंधरा वयोगटातील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी होताना पालकांचे संमतीपत्र घ्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड कोटींचे अंमली पदार्थ जप्त

$
0
0

दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सॉफ्टवेअर कंपन्यांमधील तरुणांना 'एलएसडी' नामक अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८७ मिली 'एलएसडी' जप्त केले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दीड कोटी रुपये किंमत आहे. गोव्यातील एका व्यक्तीने त्यांना हा अंमली पदार्थ दिल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

टॉरेंन्स फिरदोस मेहता (वय ३०, रा. बी. टी. कवडे रोड, मुंढवा) आणि यश अविनाश जोगळेकर (वय २९, रा. श्रीनिकेत अपार्टमेंट, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोवा येथून अंमली पदार्थ आणून त्याची मोठ्या प्रमाणावर पुण्यात विक्री करीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले आणि त्यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुंढवा परिसरात सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे २९ लाख ९८ हजार रुपयांचे ८७ मिली 'एलएसडी' मिळाले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत दीड कोटी रुपये आहे. या दोघांकडे अधिक तपास केला असता, गोव्यातील एका व्यक्तीने त्यांना 'एलएसडी' आणून दिले. त्यांनी आतापर्यंत १३ मिली 'एलएसडी' पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्यांना विकले आहे. 'एलएसडी'च्या एका मिलीमध्ये १५ ड्रॉप होतात. एक ड्रॉप अठराशे रुपयांना विकला जातो. दोन्ही आरोपींचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. जेट एअरवेजमध्ये काम करीत असताना त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांना कामावरून काढण्यात आले होते. या ठिकाणचे काम सोडल्यानंतर जोगळेकर हा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. मात्र, या ठिकाणची नोकरी त्याने सोडली होती. जेट एअरवेजमधील नोकरी सुटल्यानंतर मेहता आइस्क्रीम पार्लर चालवित होता.

अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक निरीक्षक अजय वाघमारे, कर्मचारी अविनाश शिंदे, ज्ञानदेव घनवट, राकेश गुजर, रामदास जाधव, कुणाल माने, रामचंद्र यादव, प्रफुल्ल साबळे, राजेंद्र बारशिंगे, विठ्ठल खिलारे, नितिन सानप, सचिन चंदन आणि संगिता जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक

बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

चेतन प्रभाकर आरडे (वय २२, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण व कर्मचारी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घातल होते. त्यावेळी पोलिस हवालदार प्रकाश मोरे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार आरडे हा धनकवडी येथील त्रिमुर्ती चौकात पिस्तुल घेऊन फिरत आहे. त्यानुसार सापळा रचून आरडे याला पकडण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘FRP’साठी शेतकऱ्यांचे आंदोलन

$
0
0

पुणेः उसाच्या 'एफआरपी'ची थकित रक्कम हंगाम संपूनही शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी शनिवारी साखर आयुक्तालयावर आंदोलन केले. वंगण तेलाचे फुगे सरकारी पाट्या आणि नामफलकांवर फोडून आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला.

हिंदुस्थान प्रजापक्षाच्या नेतृत्त्वाखाली ऊस उत्पादकांनी साखर आयुक्तालयात अचानक आंदोलन केले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. यंदाच्या ऊस गाळप हंगामामधील 'एफआरपी'ची थकित रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 'एफआरपी'ची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन सहकारमंत्री आणि साखर आयुक्तांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले गेले नाही आणि शेतकऱ्यांना थकित रकमाही मिळाल्या नाहीत.

उसाची थकबाकी त्वरित मिळावी आणि आगामी हंगामात उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव दिलाच पाहिजे, अशा घोषणा देऊन आंदोलनकांनी साखर संकुलात प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पुरुषोत्तम’च्या अंतिम फेरीस सुरुवात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

एक दिग्दर्शक नाटक बसवत असतो.. तिथे निवड चाचणी सुरू असते. या ऑडिशनसाठी प्रेक्षकांतूनच एक मुलगी चालत येते. या तिच्या एंट्रीलाच खणखणीत टाळ्या पडल्या आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सची 'जार ऑफ एल्पिस' ही एकांकिका पुढे खुलत जाणार असल्याची खात्री बसल्याजागी प्रेक्षकांना पटली.

महाराष्ट्रीय कलोपासक, पुणेतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी भरत नाट्य मंदिर येथे दिमाखात सुरू झाली. अंतिम फेरीत गेलेल्या नऊ कॉलेजपैकी तीन कॉलेजच्या एकांकिका या वेळी सादर झाल्या. त्यात गरवारेप्रमाणेच फर्ग्युसन कॉलेजची 'गवत' आणि व्हीआयटीची 'नातं'ही एकांकिका सादर झाली.

अमेरिकेत राहणाऱ्या नातवाची आठवण काढणाऱ्या आजोबांचा आहे त्यात समाधान मानण्यापर्यंत होत गेलेला प्रवास व्हीआयटीच्या 'नातं'तून उलगडला. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या 'गवत' या मूळ कथेचे नाट्य रुपांतर फर्ग्युसन कॉलेजच्या 'गवत'मधून सादर झाले. शोषणारे आणि शोषित यांच्यामधील संघर्ष यात दाखवण्यात आला. मराठी इंडस्ट्रीतील मान्यवर कलाकारही या अंतिम फेरीतील सादरीकरणांना आवर्जून हजेरी लावत आहेत. शनिवारी अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेत्री माधवी सोमण, दिग्दर्शक दिलीप जोगळेकर, अभिनेत्री पौर्णिमा मनोहर आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेल्या वर्षीनुसारच मांडवांना परवानगी

$
0
0

पुणेः हायकोर्टाने मंडपांसंबंधी निर्देश दिले असले, तरी पालिकेच्या धोरणाला अद्याप अंतिम मान्यता मिळाली नसल्याने गणेश मंडळांच्या मंडपांना गेल्यावर्षीप्रमाणेच परवानगी देण्यात येईल, याचा पुनरूच्चार महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शनिवारी केला. तसेच, मंडळांना परवानगी देताना पोलिसांनी आडकाठी आणू नये, असे आवाहन करतानाच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनीही पाणी बचतीविषयी जनजागृती करावी, असा सल्ला महापौरांनी दिला.

अवघ्या १० दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंडळांचे पदाधिकारी, नगरसेवक, पोलिस अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. मंडपाचा आकार, त्याची उंची याबाबत कोर्टाने कडक निर्बंध घातल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे, पालिकेने नेमकी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी सर्वांकडून केली गेली. त्यावेळी, महापौरांनी गेल्यावर्षीप्रमाणेच मंडळांच्या उत्सव मंडपांना परवानगी देण्याच्या सुचना पुन्हा केल्या. कोर्टाच्या आदेशानुसार मंडपांसाठीचे धोरण पालिकेने ठरविले असून, त्यात कार्यकर्त्यांच्या सूचनाही घेण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन ते लवकरच कोर्टासमोर सादर करण्यात येईल, अशी माहिती महापौरांनी दिली.

पोलिस आयुक्तांचा निषेध

गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी पुण्यात केली. त्यामुळे, पुण्यनगरीच्या उत्सवाला ऐतिहासिक महत्त्व आहे. उत्सवातील सर्वांच्या एकत्रित सहभागातून हा उत्सव दरवर्षी साजरा होतो. पुण्याचे महापौर त्यासाठी पुढाकार घेतात. त्यांच्या निमंत्रणावरून उत्सव मंडळे, पोलिस अधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक नेहमी घेतली जाते; पण त्यांच्या निमंत्रणाचा मान न ठेवता पोलिस आयुक्त बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्यांचा या वेळी निषेध करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात उष्णतेची लाट

$
0
0

पुण्यात पारा ३३ अंशांवर; कमाल तापमानातही वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा आणि त्यातही श्रावण महिना सुरू असला, तरी पावसाने पाठ फिरवल्याने पुण्यासह मध्य महाराष्ट्र तीव्र उन्हाच्या झळांमध्ये होरपळून निघत आहे. पुण्यात पारा ३३.३ अंशांवर पोहोचला असून, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरी पाच अंशांनी वाढ झाली आहे. राज्यात केवळ महाबळेश्वर येथेच २५.८ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान असून, अन्यत्र पारा ३० अंशांपेक्षा अधिक पातळीवर पोहोचल्याने अवघे राज्यच उष्णतेच्या लाटेवर स्वार झाले आहे.

हवामान विभागानुसार एखाद्या ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा पाच अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास त्या ठिकाणी उष्णतेची लाट असल्याचे मानले जाते. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी अधिक असल्याने या ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रावण महिन्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. परंतु, यंदा पावसाने पूर्णतः पाठ फिरवल्याने केवळ कडक ऊनच अनुभवायला मिळत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आकाश निरभ्र राहत असल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे.

शनिवारी पुण्यात ३३.३ अंश सेल्सियस (सरासरीपेक्षा ५.३ अंशांनी अधिक )इतके कमाल तापमान नोंदले गेले. तर लोहगाव येथे ३५.४ अंश सेल्सियस (सरासरीपेक्षा ६.४ अंशांनी अधिक) कमाल तापमान नोंदले गेले. अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, परभणी येथेही पारा ३० अंशांपेक्षा अधिक होता. मराठवाडा आणि विदर्भातही सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३१ अंशांपेक्षा अधिक आहे. परंतु, हे तापमान सरासरीच्या आसपास असल्याने या ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही.

दरम्यान, पुढील दोन तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील दोन दिवस मराठवाड्यात बऱ्याच, विदर्भात काही तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

प्रमुख ठिकाणचे कमाल तापमान

अहमदनगर ३३.८

सोलापूर ३७.८

सातारा ३४.१

कोल्हापूर ३४.२

परभणी ३५.९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पेट्रोलपंप उद्या सुरूच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक स्वराज्य संस्था कर गोळा करण्याच्या मुद्द्यावरून पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये पुण्यातील पेट्रोलपंप आणि सीएनजी पंपचालक सहभागी होणार नाहीत. त्यामुळे उद्या (सोमवारी) शहरातील सर्व पंप सुरू राहतील, असे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने शनिवारी कळविले आहे.

फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनने पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करण्यासाठी राज्यातील महापालिकांच्या हद्दीतील पंपांना सामूहिक सुटी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, एलबीटी हा थेट तेल कंपन्यांकडून संबंधित महापालिकांकडे जमा होतो. त्यातून कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, दिवे अशी सामाजिक कामे होतात. फक्त पेट्रोलपंपांचा पुण्यात साठ ते शंभर कोटी रुपये एलबीटी जमा होतो. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या हिताच्या बाजूने उभे राहण्यासाठी पुण्यातील पंपचालक या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी कळविले आहे.

बंदचा दावा

दरम्यान, पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द झाल्यास नागरिकांना इंधन स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पंपचालकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा ठराव झाल्याचा दावा फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते सागर रुकारी यांनी केला आहे. येत्या २० सप्टेंबरपर्यंत पुणे जिल्हा पातळीवर नवी संघटना स्थापन करण्याचा ठराव करून वीस पंपचालकांची कार्यकारिणी स्थापन केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदीनुसारच नियम तरतुदी

$
0
0

पुणे : खासगी वनाची नोंद कमी करताना सुप्रीम कोर्टातील एका रिट याचिकेवरील निर्णयाप्रमाणे शासकीय अभिलेख्यात वने अशी नोंद असल्यास त्यास वन संवर्धन अधिनियमाच्या तरतुतदी लागू होतात. त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे न्यायाधीश पाटील यांनी निकालपत्रात म्हटले होते. त्यानुसार वडगाव मावळच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी यावर फेरविचार करण्याचा अर्ज २८ मे २०१३ रोजी मावळ प्रांत कार्यालयात दाखल केला. याचदरम्यान पाटील यांची बदली झाल्याने नवे प्रांत सुभाष बोरकर यांच्याकडे याची सुनावणी सुरू झाली.

या अर्जाच्या अनुषंगाने १० सप्टेंबर २०१३ रोजी मावळ प्रांत अधिकाऱ्यांकडे सुनावणी ठेवण्यात आली. या दिवशी कोणतीही सुनावणी झाली नाही. त्यानंतर सुनावणीचा कोणताही पत्रव्यवहार मावळ प्रांत कार्यालयाकडून झाला नाही आणि सुनावणीची तारीखही कळविण्यात आली नाही, असे वन खात्याने स्पष्ट केले आहे. बोरकर यांनी वन खात्याचा फेरविचार अर्ज फेटाळताना, या सुनावणीला वन खात्याचे अधिकारी वा वकिल उपस्थितच राहिले नाही. तसेच फेरविचार अर्ज ९० दिवसांत करणे आवश्यक असताना तब्बल एक वर्ष २० दिवसांनी दाखल करण्यात आला. त्यामुळे तो दखलपात्र नसल्याचे स्पष्ट करीत अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे सायराबानू यांची जमीन खासगी वनातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आढे गावचे सरपंच केदारी यांचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राजकीय वादातून मावळ तालुक्यातील आढे गावचे नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब उर्फ परशुराम नामदेव केदारी (वय ४४) यांचा खून आला आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

तळेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील आढे गावचे सरपंच बाळासाहेब केदारी हे दुपारी तब्येत बरी नसल्यामुळे रुग्णालयात गेले होते. तेथून ते एकटेच आपल्या दुचाकीवरून परतत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या मानेवर, छातीवर, पोटावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करण्यात आले. यात केदारी यांचा जागीच मृत्यू झाला. मावळात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते असलेले केदारी हे निवडून आले होते. तसेच आढे गावच्या सरपंचपदी त्यांची निवड झाली होती. त्यांच्या हत्येमागे राजकीय पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

केदारी यांचा खून कोणी केला, तसेच या खुनामागील नेमक्या कारणाचा तळेगाव पोलिस तपास करीत आहेत. ऐन निवडणुकीत कामशेत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष बंटी वाळूंज यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर केदारी यांच्या खुनामुळे, राजकीय गुन्हेगारी बोकाळल्याचे चित्र समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'स्वाइन फ्लू'ने महिलेचा मृत्यू

$
0
0

पुणे : पावसाने ओढ दिली असली तरी अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी 'स्वाइन फ्लू'च्या विषाणूंना पोषक ठरत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत स्वाइन फ्लूच्या विषाणूंची लागणबरोबर मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भारती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका महिलेचा देखील संसर्गाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे.

पुणे शहरात जानेवारीपासून ते आतापर्यंत १०५ जणांचा बळी गेल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे.महिलेला लक्षणे आढळून आल्याने एक सप्टेंबरला तिच्या लाळेच्या नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात तिला लागण झाल्याचे निदान झाले. न्यूमोनिया बरोबर महिलेला न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचे उपचारादरम्यान निदान झाले. त्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली. लक्षणे दिसल्यानंतर उपचार घेण्यास महिलेने चार दिवस उशीर केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संघ बैठकीत गोपनीयताभंग नाही

$
0
0

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केंद्राचा कारभार चालवत असल्याचे आरोप निराधार आहेत. मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघेही संघाचे स्वयंसेवक आहोत. आम्ही दोघेही संघाच्या बैठकीला गेलो होतो. त्यात कोणत्याही प्रकारे गोपनीयतेचा भंग झालेला नाही', असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी स्पष्ट केले.

एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सिंह यांनी स्पष्टीकरण दिले. 'संघ केंद्र सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवून आहे. संघच सरकारचा कारभार चालवत आहे, असे आरोप केले जात असले तरी त्यात तथ्य नाही. मी आणि मोदी संघाच्या बैठकीला गेलो असलो, तरी या बैठकीत कोणत्याही प्रकारे गोपनीयतेचा भंग झालेला नाही,'असेही सिंह यांनी सांगितले.

पुण्यात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना पोलिसांकडील नोंदणीसाठी महिना-महिना थांबावे लागते. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना पुण्यात अपमानास्पद वागणूक दिली जाते, अशी तक्रार सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाने थेट सिंह यांच्याकडे केली. त्यावर पोलिस नोंदणीमधील अडचणी एका महिन्यात सोडविण्याचे आश्वासन देतानाच भारतीयांनी या विद्यार्थ्यांशी बंधुत्वाच्या नात्याने वागावे, असे आवाहनही सिंह यांनी केले. सिम्बायोयिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील सिंह यांच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांदरम्यान दक्षिण सुदानच्या सायमन या विद्यार्थ्याने थेट राजनाथ सिंह यांच्यापुढेच आपल्या समस्या मांडल्या. परदेशी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे नोंदणी करावी लागते. परंतु, त्यासाठी खूप वेळ लागतो. नवे तंत्रज्ञान आणूनही त्यात सुधारणा होताना दिसत नाही, अशी तक्रार सायमनने केली.

'सिम्बायोसिसबरोबरच मी अन्य ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटनांशी संबंधित आहे. या विद्यार्थ्यांकडूनही अशाच प्रकारचे अनुभव येत असल्याचे सांगण्यात येते. आमच्यावर हल्ला होत नसल्याने आम्ही सुरक्षित असलो, तरी अशा प्रकारच्या अनुभवांमुळे आम्हाला पुण्यात फिरताना दडपण जाणवते. सिम्बायोसिसमध्ये अशा प्रकारचा अनुभव येत नसला तरी अन्य ठिकाणी असा अनुभव येतो', असेही सायमनने स्पष्ट केले.

परदेशी विद्यार्थ्याने मांडली कैफियत

'पुण्यात शिकणाऱ्या परकीय विद्यार्थ्यांना विशेषतः आफ्रिकन विद्यार्थ्यांना काही व्यक्तींकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. आमच्या त्वचेचा रंग काळा असल्याने त्यावरून वर्णभेदी टिपण्णी करून आम्हाला चिडवले जाते. त्याचबरोबर विद्यार्थिनींवरही विचित्र कमेंट्स केल्या जातात. त्यामुळे आमच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते', अशी कैफियत दक्षिण सुदानच्या सायमनने केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात लवकरच काँग्रेसवापसीची वेळ

$
0
0

शशी थरूर यांची केंद्र सरकारवर टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाजप सरकारचा कारभार पाहता देशात काँग्रेस वापसीची वेळ आली आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी शनिवारी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या थरूर यांचा काँग्रेस भवनात सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष अभय छाजेड, आमदार दीप्ती चवधरी, उपमहापौर आबा बागूल, महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे तसेच उल्हास पवार, मोहन जोशी, चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, अजित आपटे, मुकारी अलगुडे, मुख्तार शेख, मंदा चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. 'काहीजण सध्या घरवापसीची भाषा करीत आहेत, पण केंद्र सरकारचा कारभार पाहिल्यास काँग्रेस वापसीची वेळ येण्यासारखी स्थिती आहे. गेल्या काही काळात देशभरातील लोकांसमोर नवनव्या अडचणी उभ्या राहात आहेत. निवडणुकीत आपला पराभव झाला, हे वास्तव आहे. राजकारणात हारजीत होतच असते. पण पराभवातून सावरून पुन्हा कसे उभे राहतात, हे महत्त्वाचे आहे,' असेही थरूर म्हणाले.

संसदेत जमीन अधिग्रहण विधेयकातील शेतकऱ्यांच्या हिताविरोधातील दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. वस्तू व सेवा कराचे मूळ विधेयक काँग्रेसनेच आणले, पण त्यामध्ये सध्याच्या सरकारने जनविरोधी तरतुदी करण्याचा प्रयत्न केला. योग्य तरतुदी केल्या आणि चर्चा केली, तर आम्ही त्याला पाठिंबाच देऊ, असेही थरूर म्हणाले. निवडणुकीला अजून चार वर्षे बाकी आहेत, ती सरकारची अखेरचीच चार वर्षे ठरणार आहेत, असे सांगून देश आणि काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिसेंबरनंतर परिस्थिती गंभीर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'दुष्काळ आणि पाणीटंचाईची इतकी गंभीर स्थिती आपण या पूर्वी कधीही पाहिलेली नाही. अशा वेळी राज्य सरकारने तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर येत्या डिसेंबरनंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते,' असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात दिला. या परिस्थितीबाबत कोणीही राजकारण करू नये, अशीच आपली भूमिका असून, लवकरच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, अशी माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'काही दिवसांपूर्वी फक्त मराठवाड्यातील स्थिती गंभीर होती, पण पावसाने दडी मारल्याने आता नाशिक, नगर, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील कमी पावसाच्या भागातही प्रश्न बिकट झाला आहे. आपण १९७२ चा दुष्काळ पाहिला आहे, पण यंदा पाणीटंचाईची स्थिती तेव्हापेक्षाही गंभीर आहे,' असे पवार यांनी सागितले. विशेषतः धरणांमधील पाणीसाठे अत्यंत कमी आहेत आणि कदाचित हे साठे संपूर्णपणे पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय सरकार लवकरच घेईल, अशी शक्यता आहे. औरंगाबाद, नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथे डिसेंबरपर्यंत पुरेल, इतकेच पाणी शिल्लक आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने काही आघाड्यांवर तातडीने पावले उचलली पाहिजेत, असे पवार म्हणाले.

छावण्या सुरू कराव्यात

सध्याचा चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या काही काळात 'चारा गेला कोठे,' अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे आमच्या सहकाऱ्यांनी आता चारा छावण्या सुरू करू नयेत, तर सरकारनेच छावण्या सुरू कराव्यात आणि आमच्या लोकांनी त्यांना सहकार्य करावे, असे माझे आवाहन आहे. त्यामुळे कोणाला दोषारोप ठेवण्याची संधी मिळणार नाही, अशी भूमिका पवार यांनी यावेळी मांडली.

पाणी जपून वापरा

पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लातूरमध्ये पंधरा दिवसांनी, परभणी आणि औरंगाबादेत दहा दिवसांनी पाणी येते, त्या तुलनेत पुण्याची स्थिती बरी म्हणावी लागेल, अशा स्थितीत सर्वांनीच पाणी जपून वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उभ्या पिकांची भरपाई द्या

पाणीटंचाईमुळे उसासाठी पाणी देता येणार नाही, त्यामुळे साखर कारखान्यांना परवानगी देऊ नये, अशी सूचना कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्याला आपली एकच 'उपसूचना' आहे, की सरकारने या पिकांची भरपाई द्यावी आणि चाऱ्यासाठी त्याचा वापर करावा. पण आम्ही काहीच करणार नाही आणि फक्त सूचना करणार, अशी भूमिका आम्ही स्वीकारणार नाही, असेही पवार म्हणाले. तसेच, उपसा सिंचन योजनांची वीजबिले टंचाई निधीतून सरकारने भरावीत, रोजगार हमीची कामे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच भागाचे मुख्यमंत्री

$
0
0

शरद पवारांचा फडणवीसांना टोला; नियोजनावरही टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती आहे, अशा काळात राज्याच्या प्रमुखांनी आपण एखाद्या भागाचे प्रमुख नसून संपूर्ण राज्याचे प्रमुख आहोत याचे भान ठेवावे,' असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी लगावला. मात्र, सध्या किती क्षेत्रात दुष्काळ आहे याची नोंद अद्याप घेतली आहे की नाही, याची शंका येत असल्याचेही पवार म्हणाले.

गेल्या काही दिवसांत पवार यांनी मराठवाड्यासह राज्यभर दौरा केला असून, दुष्काळी स्थितीवर उपाययोजना केल्या नाहीत, तर जनावरांसह जेलभरो आंदोलनाचा इशाराही दिला आहे. '२० ऑगस्ट रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार केवळ तीन जिल्ह्यांत आणि तोही सवलतीच्या दरात चारा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही भूमिका संपूर्ण राज्याच्या व्यापक हिताची नाही, हे चिंताजनक आहे,' असेही पवार यांनी स्पष्ट केले. आजवर दुष्काळाच्या काळात चारा आणि पाणी मोफत पुरविण्यात येत होता, याची आठवणही पवार यांनी करून दिली. या पूर्वी वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि आपणही अशी स्थिती उभी राहिल्यानंतर सर्वपक्षीयांना विश्वासात घेण्याची भूमिका घेतली होती. आज आम्हाला ते सांगावे लागत आहे, असेही ते म्हणाले.

सरकारने कुंभमेळ्यासाठी मोठी व्यवस्था केली, मोठा खर्चही केला. राज्यकर्त्यांना साधूसंतांना प्राधान्य द्यायचे, असे दिसत आहे. त्याचे पुण्य त्यांच्या पदरात पडेल, पण नागरिक आणि पशुधनाकडेही लक्ष द्यावे, असाही टोला पवार यांनी लगावला.

विचारवंतांना संरक्षण द्या

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनाही धमक्या देण्यात आल्या आहेत. या पूर्वी राज्यात आमचे सरकार असताना काही घटना घडल्यानंतर आपण तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी लक्ष घातले होते. नंतर गोविंद पानसरे यांची हत्या झाली. सत्तांतर झाल्यानंतर अशा प्रवृत्तींचा आत्मविश्वास वाढत आहे काय, अशी शंका येते. त्यामुळे अशा स्थितीत विचारवंतांना योग्य संरक्षण देणे, ही सरकारची जबाबदारी आहे, असे शरद पवार यांनी सुनावले. सरकारने तसे केले नाही, तर आणखी एक पानसरे झाले,असे समजून दुखवट्याच्या सभेला जावे लागेल, असा गर्भित इशाराही पवार यांनी दिला.

'राज दूरदृष्टीचे, विचारवंत'

राज्यातील दुष्काळाला राष्ट्रवादी जबाबदार असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर पवार यांनी 'ठाकरे हे अत्यंत दूरदर्शी आणि विचारवंत नेते आहेत. या पूर्वी भूकंप झाला, तरी राष्ट्रवादीला जबाबदार धरण्यात येत होते. आता त्यांनी दुष्काळाबाबत जबाबदार धरले आहे. ते अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन जनतेसाठी अखंड कार्यरत राहणारे नेते आहेत,' असा टोला पवारांनी मारला.

आर्थिक निकषावर आरक्षण

घटनेने एससी-एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण शाबूत ठेवून मराठा, ब्राह्मण आणि इतरही समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण द्यावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण 'आम्हाला नाही, तर कोणालाच आरक्षण नको,' ही भूमिका पटण्यासारखी नाही, असे पवार म्हणाले. गुजरातेतील हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाचा जोर फार काळ चालेल, असे वाटत नाही, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग चौथ्या दिवशी खंडपीठासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे या मागणीसाठी​ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता लष्कर कोर्टाच्या दारात महावीर चौक येथे पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती आणि पुणे जिल्हा बार असोसिएशनतर्फे निदर्शने करण्यात आली.

आंदोलनाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांनी १६ दिवस कोर्ट कामकाज बंद आंदोलन केले होते. खंडपीठाच्या मागणीसाठी वकील आणि पक्षकारांनी कृती समिती स्थापन केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अॅड. योगेश पवार, हेरंब गानू, सचिव राहुल झेंडे, सुहास फराडे, खजिनदार अॅड. साधना बोरकर, तसेच पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ वकील व नागरिक या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष अॅड. आर. एम. शरमाळे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, नगरसेवक शिंदे, चार्टर्ड अकाउंटंट संघटनेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब माने आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images