Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माफीनामा दिल्यास तक्रार मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'तील (एफटीआयआय) संपकरी विद्यार्थ्यांनी लेखी माफीनामा दिल्यास त्यांच्याविरोधात पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेण्याची नरमाईची भूमिका प्रशासनाने स्वीकारल्याचे समजते. एकूणातच, देशभर चर्चेचा विषय ठरलेला हा संप मध्यममार्गी तोडगा काढून मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंनी निकराचे प्रयत्न सुरू आहेत.

संचालक प्रशांत पाठराबे यांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांनी दिवसभर आंदोलन केल्यानंतर मध्यरात्री पोलिसांना पाचारण करून पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही नरमाईची भूमिका घेतली गेली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'मटा'ला दिली.

केंद्रीय समितीचा आज अहवाल

संस्थेला भेट दिलेली केंद्रीय समिती आज, सोमवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे. गेल्या ७३ दिवसांपासून सुरू असलेले 'एफटीआयआय'चे महाभारत कधी संपणार, या प्रश्नाचे उत्तर या अहवालावरच स्पष्ट होणार आहे.

संस्थेच्या पुनर्रचित मंडळातील गजेंद्र चौहान, अनघा घैसास, राहुल सोलापूरकर, शैलेश गुप्ता व नरेंद्र पाठक यांच्याविरोधात विद्यार्थ्यांचा संप सुरू झाला. त्यानंतर २००८ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या अपूर्ण राहिलेल्या डिप्लोमा फिल्मचे आहे त्या स्थितीत मूल्यमापन करण्याचा निर्णय संचालक प्रशांत पाठराबे यांनी घेतला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना अटकही झाली. त्यानंतर हे आंदोलन आणखीनच चिघळले आहे.

प्रवेश परीक्षेला प्रतिसाद

'एफटीआयआय'ची यंदाची प्रवेश परीक्षा रेंजहिल्स येथील केंद्रीय विद्यालयात झाली. या परीक्षेसाठी गोवा, गुजरात आदी राज्यांतील सुमारे चार हजार विद्यार्थीही आले होते. मागील प्रवेश परीक्षा २०१३मध्ये झाली होती. बॅकलॉग भरून काढण्यासाठीच २०१४मध्ये प्रवेश प्रक्रिया न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुण्यासह कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई आदी चोवीस शहरांमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीआरटी नव्हे, अपघाती मार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

स्वारगेट-हडपसर या बीआरटी मार्गावर गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुसंख्य अपघात रात्रीच्या वेळी दुभाजकाला वाहने धडकून झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रामटेकडी किर्लोस्कर उड्डाणपुलावर रस्ता ओलांडताना दोन अपघात झाले असून, त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे चित्र पाहता स्वारगेट - हडपसर बीआरटी मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

पुणे शहरातील हडपसर ते स्वारगेट हा बीआरटी मार्ग प्रायोगिक तत्त्वावर २००७मध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आला. मात्र, जलद आणि सुलभ प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांच्या पदरी निराशाच आली. खासगी वाहनांची घुसखोरी होऊन बीआरटी मार्गात अडथळेच निर्माण झाले आहेत. मागील तीन वर्षापासून हडपसर - स्वारगेट बीआरटी मार्गात पीएमपी बस व खाजगी वाहने यांचे अपघात सातत्याने होत आहेत. यात १४ जणांचा मृत्यू झाला असून, कित्येक जण जखमी झाले आहेत. झेब्रा क्रॉसिंग नसल्याने रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादाय झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विभागात रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

$
0
0

कुलदीप जाधव, पुणे

वायर तोडून रेल्वेचा सिग्नल बंद पाडल्याची धक्कादायक घटना नुकतीच हडपसरजवळील फुरसुंगी येथे घडली. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वेचा सिग्नल बंद पाडल्याने दरोड्यापासून गाड्यांच्या अपघातापर्यंत कोणत्याही घटनेची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांनी दक्ष राहिले पाहिजे....

रेल्वेच्या पुणे विभागाच्या हद्दीत मळवली स्टेशनपासून पाटस स्टेशनपर्यंत रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) १६० जवानांची सुरक्षेस्तव नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी पुणे स्टेशनला ८० जवान, देहूरोड स्टेशनला ४५ आणि लोणी स्टेशनला ३५ जवान आहेत. तर, उर्वरित स्टेशनला आरपीएफचे जवान नाहीत. तसेच, पुणे स्टेशनसहीत महत्त्वाच्या काही स्टेशनवर लोहमार्ग पोलिसांच्या चौक्या आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे बहुतांश स्टेशनवर लोहमार्ग पोलिसांची अनुपस्थिती आहे. त्यामुळे आरपीएफ व लोहमार्ग पोलिस नसलेल्या ठिकाणची सुरक्षा वाऱ्यावर आहे. अशा ठिकाणी काही आपत्कालिन परिस्थिती उदभवल्यास तातडीने मदत मिळणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर किमान एखाद्या सुरक्षा यंत्रणेचे अस्तित्व असणे गरजेचे आहे.

रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुणे स्टेशन, शिवाजीनगर स्टेशन, लोणावळा किंवा दौंड स्टेशन या सर्वच स्टेशनवर तोकडी सुरक्षा आहे. पुणे स्टेशनमध्ये प्रवेशासाठी दोन मुख्य गेट आहेत. दोन्ही ठिकाणी जवान तैनात असतात. दोन्ही गेटवर मेटल डिटेक्टर आहेत. एका ठिकाणी स्कॅनिंग मशिनही आहे. मात्र, या सर्व गोष्टी केवळ नावापुरत्या आहेत. रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे सामान स्कॅनिंग मशिनमधून स्कॅन केले जात नाही. केवळ लगेज रूममध्ये ठेवावयाच्या सामानाचेच स्कॅनिंग होते. मेटल डिटेक्टर बहुतांशवेळा बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुणे स्टेशनवरील चोख यंत्रणा केवळ नावालाच आहे, अशी परिस्थिती आहे.

'त्यांचा' बंदोबस्त कोण करणार?

पुणेमार्गे ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांकडूनही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जातो. मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांमध्ये लोणावळा स्टेशनच्या अलिकडे तृतीयपंथीय व्यक्ती गाड्यांमध्ये प्रवेश करतात आणि जनरल डब्यातील नागरिकांकडून पैसे मागतात. एका व्यक्तीकडून किमान १० रुपये घेतले जातात. पैसे न देणाऱ्या किंवा १० रुपयांपेक्षा कमी पैसे देणाऱ्या प्रवाशांना शिवीगाळ केली जाते. त्याचप्रमाणे दौंडकडून येणाऱ्या गाड्यांमध्येही असाच प्रकार घडतो. दोन्ही बाजूने येणाऱ्या गाड्या पुणे रेल्वे स्टेशनच्या काही अंतर अलिकडे धीम्या झाल्यावर ते तृतीयपंथीय गाड्यांमधून उतरतात. रोज हा प्रकार सर्रास घडतो. या प्रकाराकडे आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

गेल्या वर्षी पुणे लोहमार्ग पोलिस स्टेशनच्या हद्दीत लूटमारीच्या २७ घटना घडल्याची लोहमार्ग पोलिसांकडे नोंद आहे. त्यापैकी २० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या वर्षी आतापर्यंत १० घटनांची नोंद असून, त्यापैकी सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये राज्यात पावसाची शक्यता’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यात आतापर्यंत कमी पाऊस झाला असला, तरी पावसाचा हंगाम अजून संपलेला नाही. परतीच्या मान्सूनमुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होतो. त्याप्रमाणे यंदाही अशा प्रकारे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस हजेरी लावेल', असा आशावाद भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी सोमवारी व्यक्त केला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सध्याचा पाऊस आणि एल निनो या विषयावर केळकर यांच्याशी वार्तालपाचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर आणि सरचिटणीस योगीराज प्रभुणे उपस्थित होते.

'प्रशांत महासागरात पेरूजवळ स्थानिक तापमानवाढ होऊन एल निनो तयार होतो. यंदाही एल निनो सक्रिय आहे. परंतु, प्रत्येक एल निनोच्या वर्षी भारतात दुष्काळ नसतो, तसेच भारतातील प्रत्येक दुष्काळावेळी एल निनो सक्रिय नसतो. काही वर्ष एल निनो सक्रिय असतानाही भारतात चांगला किंवा अतिरिक्त पाऊस झाला होता. त्यामुळे मान्सून आणि एल निनोचा सरळ संबंध जोडता येत नाही', असेही केळकर यांनी स्पष्ट केले. मीनाक्षी गुरव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी सोलापूरचे; कारवाई पुण्यात

$
0
0

थेऊरचे मंडल अधिकारी निलंबित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मातीने भरगच्च भरलेली ट्रक वेगाने दौंडहून पुण्याकडे निघाली होती...ट्रकवर कोणतेही आच्छादन केलेले नसल्याने माती रस्त्यावर सांडत होती... या रस्त्यावरील वाहनचालकांना याचा त्रास असल्याची कल्पना असूनही ट्रकचालक बेदरकारपणे ट्रक दामटत होता...' ही गोष्ट मात्र 'त्या' कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या लक्षात आली. ट्रकचा पाठलाग करून त्यांनी ट्रक अडविली आणि कारवाईचा प्रवास सुरू झाला !

बेकायदा माती, वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाईचा आदेश थेट मुख्यमंत्र्यांनीच दिला आहे. तसेच ही वाहतूक करताना त्यावर आच्छादन घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत असताना त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पण हे धाडस दाखविले ते सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी.

विभागीय आयुक्तांनी बोलाविलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी ते सोलापूरहून पुण्यात येत होते. मातीने भरलेला एक ट्रक नियम पायदळी तुडवून चालला असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही ट्रक थेऊरजवळ अडविली आणि ट्रकची चावी काढून घेतली. त्यानंतर त्यांनी हा प्रकार पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांना सांगितला. राव यांनी लगोलग हवेलीच्या तहसीलदारांना संबंधित ट्रकवर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. हवेलीच्या तहसीलदारांनी थेऊरच्या मंडळ अधिकाऱ्यांना हा प्रकार कळवून कारवाई करण्यास सांगितले.

या मंडल अधिकाऱ्यांनी ट्रक थांबलेल्या ठिकाणावर कूच केले. पण तोवर ट्रकचालक व त्याचा मालक पसार झाले होते. त्यामुळे त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. पण, हा गुन्हा दाखल करताना ही कारवाई करणारे कोण होते याची माहिती पोलिसांनी त्यांना विचारली. या मंडळ अधिकाऱ्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाला फोन करून त्यांच्या नावाची एफआयआर दाखल करण्यासाठी विचारणा केली. या अंगरक्षकाने आपल्या 'साहेबां'ना हे कळविले. मग 'साहेबां'नी जिल्हाधिकारी राव यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला. त्यामुळे संतप्त झालेल्या राव यांनी हवेलीच्या तहसीलदारांना या प्रकारात लक्ष घालण्याचे आदेश दिले.

सोलापूरचे जिल्हाधिकारी पुण्यात येऊन बेकायदा वाहतूक करणारी ट्रक पकडतात आणि पोलिस एफआयआरसाठी त्यांचे नाव विचारले जाते हे चुकीचे आहे. वास्तविक हे काम मंडल अधिकाऱ्यांचे असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असेही तहसीलदारांना बजावण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्व संमेलनाला शिवसेनेची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंदमान येथे होत असलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला शिवसेनेकडून भरीव मदत करण्यात आली आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेकडून संमेलनासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संमेलनाचे उद‍्घाटन करणार आहेत.

साहित्य संमेलन आणि राजकीय पक्ष यांचे वेगळे नाते गेल्या काही वर्षांत तयार झाले आहे. सासवड येथे झालेल्या ८७व्या साहित्य संमेलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, घुमान येथे झालेल्या ८८व्या साहित्य संमेलनाला भाजपने मदत केली होती. संत नामदेवांच्या भूमीत झालेल्या या संमेलनाच्या साहित्यप्रेमींच्या सोयीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन रेल्वे सवलतीत उपलब्ध करून दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, अंदमानच्या साहित्य संमेलनाशी शिवसेनेचे नाते जुळले आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. विश्व संमेलनासाठी निधी उभा करण्याचे आव्हान आयोजकांपुढे असताना शेवाळे यांच्याच प्रयत्नातून मुंबई महापालिकेने संमेलनासाठी पंचवीस लाखांची मदत केली आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे संमेलनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनीही दहा लाख रुपये संमेलनाला दिले. त्याशिवाय डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. पी. डी. पाटील यांनीही पाच लाखांची मदत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकहंडी अन् नाट्यप्रयोगही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध अंदमान येथे होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात घेतला जाणार आहे. सावरकरांवर आधारित एकल नाट्यप्रयोग, सावरकरांच्या पुस्तकावर आधारित कार्यक्रम, परिसंवाद अशा कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना संमेलनात मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद‍्घाटन होणार आहे. तसेच, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते संमेलनाच्या उद‍्घाटनाला उपस्थित राहणार असून, खासदार राहुल शेवाळे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत विश्व मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन आदी या वेळी उपस्थित होते. संमेलनाच चर्चा, परिसंवाद, व्याख्याने आदी नेहमीचे कार्यक्रमही होणार आहेत.

घुमान येथील संमेलनात आलेल्या अनुभवांवरून विश्व संमेलनासाठी वैद्यकीय व्यवस्था, अग्निशामक दल अशी तातडीच्या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ग्रंथदिंडीमध्ये पुस्तकहंडीही केली जाणार आहे. अंदमानातील मराठीजन या संमेलनामुळे उत्साहात आहेत. त्यामुळे हे संमेलन नक्कीच आनंददायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्लिश स्पीकिंगअभावी नोकरीवर गदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या राज्यातील ४० टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण कौशल्याच्या अभावामुळे नोकरी मिळवताना अडचणी निर्माण होत असल्याची माहिती एका खासगी कंपनीने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. मात्र, अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थी तुलनेने चांगले इंग्रजी बोलत असल्याचेही निदर्शनास आले.

'अॅस्पायरिंग माइंड्स' या कंपनीने देशातील ३० हजार विद्यार्थी आणि नोकरदारांचा इंग्रजी भाषाविषयक सर्व्हे केला. त्यामध्ये महाराष्ट्रातील ३,२०० जणांचा समावेश होता. इंग्रजी संभाषण कौशल्य, शब्दांचे उच्चार, शब्द संपत्ती, ऐकून घेण्याची क्षमता आणि नोकरीच्या दृष्टीने आवश्यक इंग्रजी आणि अन्य कौशल्य या पाच निकषांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत दिलेल्या योगदानाच्या आधारावर कंपनीने वरील निष्कर्ष मांडले आहेत, अशी माहिती कंपनीचे सहयोगी उपाध्यक्ष अनुभव पॅट्रो आणि उपाध्यक्ष रजत माथूर यांनी दिली. कंपनीतर्फे चौथ्या राष्ट्रीय रोजगार परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

एकूण विद्यार्थ्यांपैकी ४७ टक्के विद्यार्थी चांगले इंग्रजी बोलू शकत नव्हते, तर, ४१ टक्के इंजिनीअर इंग्रजी शब्दांचे स्पष्ट आणि योग्य उच्चार करू शकले नाहीत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या इंग्रजी उच्चारावर त्यांच्या मातृभाषेचा प्रभाव असल्याचे निदर्शनास आले, असे पॅट्रो यांनी सांगितले. देशात इंग्रजी भाषा अवगत असणाऱ्यांना नोकरीच्या संधी निर्माण होण्याचे प्रमाण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहे. राज्यात व्यावसायिक सल्लागार आणि कॉर्पोरेट सेल्स या क्षेत्रात इंग्रजी भाषेशी संबंधित रोजगार निर्मितीचे प्रमाण २.९ टक्के आहे. तर, देशात हेच प्रमाण एक टक्का आहे. ग्राहक सेवा, कॉल सेंटर आणि प्रशासकीय सेवा यांमध्ये राज्यात ६० टक्के रोजगार निर्मिती होते. देशात हेच प्रमाण ४९.२ टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अट्टल साखळीचोर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोनसाखळी हिसकावण्याच्या ५० गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या अली अक्रम जाफरी उर्फ इराणी (वय २८, रा. लोणी काळभोर) याला गुन्हे शाखेने लोणी काळभोर येथून अटक केली. आईला भेटण्यासाठी आलेला अली दोन वर्षांनतर पो​लिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी या पूर्वी अलीच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. अलीच्या आईच्या बँक खात्यातील १३ लाख रुपये गोठविण्यात आले आहेत.

खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलीला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी अलीच्या साथीदारांना अटक झाल्यानंतर त्याने पुणे शहरात सोनसाखळी चोरीचे ५० गुन्हे केल्याचे उघडकीस आले होते. मात्र, तो सापडत नव्हता. पवार यांच्या पथकातील कर्मचारी जावेद पठाण यांना अली लोणी काळभोर येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली.

चौकशीदरम्यान अलीने कोरेगाव पार्क आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याची माहितीही मिळाली. या दुचाकींचा वापर करून त्याने डेक्कन, खडकी, स्वारगेट, कोथरूड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोन्याचे दागिने हिसकावले होते. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी तसेच सोनसाखळी हिसकावण्याच्या सात घटनांमधील ११८ ग्रॅम वजनाचे दागिने, असा चार लाख नऊ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलिस निरीक्षक सुनील पवार, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, फौजदार सुधीर साकोरे, प्रकाश अवघडे, सहायक फौजदार सिकंदर जमादार, अशोक भोसले, स्टीव्हन सुंदरम, शरद वाकसे, दिनेश शिंदे, गुणशिंलग रंगम, जावेद पठाण, अस्लम आत्तार, प्रतीक लाहिगुडे यांचा तपास पथकात सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिलेनियम’ विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

$
0
0

पुणे : कोथरूडमधील मिलेनियम नॅशनल स्कूलवर शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्क्यांचे प्रवेश नाकारल्याबाबत सोमवारी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हायकोर्ट आणि पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे आदेश न पाळल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका व व्यवस्थापक-संचालक राधिका वैद्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक असताना शाळेने हा नियम पाळला नाही.

दरम्यान, शहरातील विविध शाळांमधून २५ टक्क्यांचे प्रवेश दिले जात नसल्याबाबत 'आम आदमी पार्टी'ने सोमवारी महापालिका शिक्षण मंडळावर मोर्चा काढला होता. या वेळी पालकांनी या शाळेविषयी मंडळाकडे थेट तक्रार केली होती. त्याची दखल घेत मंडळाने शाळेला भेट दिली. पालकांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे लक्षात आल्यानंतर शाळेला प्रवेश देण्याबाबत विचारणा केली. त्यानंतरही शाळेने प्रवेश देण्यात टाळाटाळ केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी फेरपरीक्षेचा आज ई-निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा पहिल्यांदाच जुलै- ऑगस्टमध्ये झालेल्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (२५ ऑगस्ट) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या वेबसाइटवरून आपले विषयनिहाय गुण जाणून घेता येतील.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य बोर्ड) यंदा पहिल्यांदाच २१ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान दहावीची फेरपरीक्षा घेतली होती. एरवी ऑक्टोबर महिन्यात आयोजित होणारी ही परीक्षा जुलैमध्येच झाल्याने, विद्यार्थी- पालकांमध्येही या परीक्षेविषयी औत्सुक्य होते. परीक्षेनंतर राज्य बोर्ड अवघ्या २० दिवसांमध्ये या परीक्षेचा निकालही जाहीर होणार आहे.

बोर्डाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टला दुपारी ३ वाजल्यापासून आपापल्या शाळांमधून छापील गुणपत्रिकांचे वाटप होणार आहे. गुणपडताळणीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी छापील गुणपत्रिका मिळाल्यानंतर संबंधित विभागीय मंडळांकडे अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच, उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीसाठी विद्यार्थी संबंधित विभागीय मंडळांकडे १४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतील.

विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची सुविधाही उपलब्ध असून, त्यासाठी उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेणे गरजेचे आहे. फोटोकॉपी मिळाल्यानंतर विद्यार्थी पाच दिवसांच्या आत आपले पुनर्मूल्यांकनाचे अर्ज विभागीय मंडळांकडे सादर करू शकतील, असे मंडळाने पत्रकाद्वारे सोमवारी स्पष्ट केले. मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा रक्षाबंधनाला १७०० बस रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वाधिक बससंख्या, उत्पन्न वाढ आणि प्रवासी संख्येची चढती कमान... पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) प्रवास अशा सुधारणांच्या मार्गावरून सुरू असला, तरी मागील आर्थिक वर्षात (२०१४-१५) १६७ कोटी रुपयांचा तोटा पीएमपीला सहन करावा लागला आहे.

तत्पूर्वी २०१३-१४ या आर्थिक वर्षात १३२ कोटी रुपयांची संचलनातील तूट भरून देणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला यंदा त्यापेक्षा अधिक रक्कम पीएमपीवर खर्चावी लागणार आहे. पीएमपीच्या वार्षिक ताळेबंदातून गेल्या आर्थिक वर्षात सहन कराव्या लागलेल्या नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे. येत्या बुधवारी (२६ ऑगस्ट) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ताळेबंद सादर केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पीएमपीच्या स्थितीत अंशतः सुधारणा होत असल्याचे चित्र दिसून येत असले, तरी गेल्या वर्षी मात्र पीएमपीला मोठी आर्थिक तूट सहन करावी लागली होती. गेल्या वर्षात पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे सहाशेहून अधिक बस बहुतांश काळ बंद होत्या. त्यामुळे, पीएमपीच्या प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली होती. परिणामी, उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याने पीएमपीचा तोटा दिवसेंदिवस वाढतच होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी पीएमपीची संचलन तूट भरून देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, पीएमपीला ही रक्कम देण्यात दोन्ही पालिकांकडून सातत्याने टाळाटाळ केली जात होती. अखेरीस, राज्य सरकारने पुन्हा ताकीद दिल्यानंतर दोन्ही महापालिकांनी (पुणे महापालिका ७९.५१ कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ५३.०१) पीएमपीची तूट भरून दिली होती. यंदा पीएमपीची तूट आणखी वाढल्याने दोन्ही पालिकांना त्यानुसार बजेटमध्ये तरतूद करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’चा तोटा १६७ कोटींवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वाधिक बससंख्या, उत्पन्न वाढ आणि प्रवासी संख्येची चढती कमान... पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) प्रवास अशा सुधारणांच्या मार्गावरून सुरू असला, तरी मागील आर्थिक वर्षात (२०१४-१५) १६७ कोटी रुपयांचा तोटा पीएमपीला सहन करावा लागला आहे.

तत्पूर्वी २०१३-१४ या आर्थिक वर्षात १३२ कोटी रुपयांची संचलनातील तूट भरून देणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला यंदा त्यापेक्षा अधिक रक्कम पीएमपीवर खर्चावी लागणार आहे. पीएमपीच्या वार्षिक ताळेबंदातून गेल्या आर्थिक वर्षात सहन कराव्या लागलेल्या नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे. येत्या बुधवारी (२६ ऑगस्ट) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ताळेबंद सादर केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पीएमपीच्या स्थितीत अंशतः सुधारणा होत असल्याचे चित्र दिसून येत असले, तरी गेल्या वर्षी मात्र पीएमपीला मोठी आर्थिक तूट सहन करावी लागली होती. गेल्या वर्षात पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे सहाशेहून अधिक बस बहुतांश काळ बंद होत्या. त्यामुळे, पीएमपीच्या प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली होती. परिणामी, उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याने पीएमपीचा तोटा दिवसेंदिवस वाढतच होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी पीएमपीची संचलन तूट भरून देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, पीएमपीला ही रक्कम देण्यात दोन्ही पालिकांकडून सातत्याने टाळाटाळ केली जात होती. अखेरीस, राज्य सरकारने पुन्हा ताकीद दिल्यानंतर दोन्ही महापालिकांनी (पुणे महापालिका ७९.५१ कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ५३.०१) पीएमपीची तूट भरून दिली होती. यंदा पीएमपीची तूट आणखी वाढल्याने दोन्ही पालिकांना त्यानुसार बजेटमध्ये तरतूद करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष‌िप्रधान भारतातील खेडी कमकुवत : डॉ. बंग

$
0
0

पुणेः 'कृष‌िप्रधान भारत देशाचा कणा असलेली खेडी कमकुवत झाली आहेत. अगतिकता म्हणून लोक आज ग्रामीण भागात राहत आहेत. विज्ञान आणि समाज यांची सांगड घातली, तरच संकटग्रस्त खेड्यांना, ग्रामीण भागाला नैराश्याच्या चक्रातून बाहेर काढता येईल,' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बंग यांनी वेगवेगळ्या संकटांशी लढा देणाऱ्या ग्रामीण भागाचे वास्तव उलगडले. डॉ. बंग यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणारे बचत गट, शेतकरी आणि संशोधकांना गौरविण्यात आले. बाएफचे विश्वस्त डॉ. नारायण हेगडे, प्रताप पवार, अध्यक्ष गिरीश सोहनी, उपाध्यक्ष डॉ. अशोक पांडे, सुनील लालभाई, शरद उपासनी उपस्थित होते.

मणिभाई देसाई गौरव पुरस्कार आणि विजया देशमुख स्मृती पुरस्कार गुजरातमधील ज्योत गावातील साईनाथ महिला बचत गटाला, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जिल्ह्यातील तुमकुर श्री देवी महिला स्व-सहाय संघाला, तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार नगर जिल्ह्यातील संतोषीमाता स्वयंसहाय्यता महिला गटाला देण्यात आला. या शिवाय उल्लेखनीय बचत गट, उत्कृष्ट शेतकरी, अभ्यासकांचाही गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कटऑफची गणिते चुकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीची सहावी फेरीही ऑनलाइन आणि गुणवत्तेवरच राबविल्याने, गुणवत्ताधारी विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या टक्केवारीला साजेशा कॉलेजांमध्ये प्रवेश मिळाला. सहाव्या फेरीतही बड्या कॉलेजांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश होत असल्याने, या कॉलेजांची नेहमीची कटऑफची गणिते यंदा चुकणार असल्याचे स्पष्ट झाले.

अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळत नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केली जात होती. ऑनलाइन प्रक्रियेमुळे कॉलेज पातळीवर रिक्त जागांचा आकडा वाढल्याची तक्रार करत कॉलेजांकडून ऑफलाइन प्रक्रियेला मान्यता देण्याची मागणीही गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. मात्र, अकरावी प्रवेशाची सहावी फेरीही ऑनलाइनच करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्याने, शहरात सोमवारी आणि मंगळवारी या फेरीचे प्रवेश देण्यात येत आहेत. या फेरीच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी अगदी आपटे प्रशाला आणि फर्ग्युसन कॉलेजमध्येही प्रवेश झाल्याने या फेरीचे महत्त्व अधोरेखित झाले.

सहाव्या फेरीसाठी एस. पी. कॉलेज आणि टिळक शिक्षण महाविद्यालयाच्या हॉलमध्ये टेबल अॅडमिशन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. सहाव्या फेरीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसोबतच ज्यांना या फेरीमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जात आहे. कॉलेजांमध्ये रिक्त असलेल्या जागांचा या फेरीसाठी विचार होत आहे. अर्जदार विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार कॉलेज उपलब्ध करून दिली जात आहेत. या फेरीमधून तुलनेने सोयीच्या ठरणाऱ्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळत असल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

ऑनलाइनमध्येही ऑफलाइन?

या फेरीसाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना टेबल अॅडमिशनसाठी बोलवून, त्यांना कॉलेजांमधील रिक्त जागांची माहिती दिली जात आहे. त्यातून विद्यार्थ्याला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करून दिला जात आहे. मात्र, सोमवारी गुणवत्ता यादीतील १०० व्या क्रमांकाच्या जवळपासचे प्रवेश सुरू असतानाच यादीत ८०० व्या क्रमांकावर असणारा एक विद्यार्थी अचानक प्रवेशासाठी आला. टेबल अॅडमिशनच्या सुरुवातीच्याच टप्प्यात या विद्यार्थ्याला संधी देता येणार नसल्याचे लक्षात आल्याबरोबर या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात आले. चोख तपासणी सुरू असतानाही एजंटांच्या मदतीनेच हा विद्यार्थी थेट प्रवेशाच्या टेबलवर पोहोचल्याचा आरोप या निमित्ताने करण्यात आला.

मला ८९.६ टक्के मार्क आहेत. मला यापूर्वी मुक्तांगण ज्युनिअर कॉलेजला प्रवेश मिळाला होता. त्यानंतर बेटरमेंटने एमआयटीही मिळाले होते. मात्र, मी बेटरमेंटचा प्रवेश घेतला नाही. सहाव्या फेरीतून मला आपटे प्रशालेत प्रवेश मिळाला आहे.

- अभिषेक पवार

मला यापूर्वी एस. पी. कॉलेजला विनाअनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला होता. मी सहाव्या फेरीत अर्ज भरला. मला ९० टक्के मिळाले होते. सहाव्या फेरीतून आता मला एस. पी. मध्येच अनुदानित तुकडीला प्रवेश मिळाला आहे. ही प्रक्रिया खूपच पारदर्शी बनल्याने काहीही गडबड झाली नाही.

- तनय कर्वे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्सवासाठी पोलिसांचे सहकार्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच सर्वसामान्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी मंडळांनी स्पीकरच्या भिंती लावणे टाळावे, असे अावाहन पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस मुख्यालयामध्ये बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलिस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद, अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, प्रकाश मुत्याळ, पी. एन. रासकर, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक, डॉ. सुधाकर पठारे, सुधीर हिरेमठ, डॉ. बसवराज तेली, पी. आर. पाटील, तुषार दोषी, संजय पाटील, मकरंद रानडे, अरविंद चावरीया उपस्थित होते. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना हायकोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले.

गणेशोत्सवामध्ये लावण्यात येणाऱ्या बंदोबस्ताची आखणी, मनुष्यबळाची उपलब्धता, देखावे, मंडळांचे परवाने, प्रतिबंधात्मक कारवाई यासंदर्भात पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. विसर्जन मिरवणूक संपण्यासाठी दरवर्षी होणारा विलंब टाळण्यासाठीही मंडळांशी चर्चा करुन उपाययोजना करण्यात येणार आहे.

मंडळांची बैठक घेणार

पालकमंत्री गिरीश बापट, पोलिस आयुक्त के. के. पाठक यांच्यासोबत शहरातील सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची येत्या ३ सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्यादृष्टीने अधिक विस्तृत चर्चा केली जाणार असून, पोलिस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमधील वाद टाळण्यासाठी सूचना देण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर दिवसा कर्वेनगरमध्ये घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनधी, पुणे

सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही असणे किती महत्वाचे आहे, याची प्रचिती कर्वेनगर येथील महालक्ष्मी अपार्टमेंटमधील नागरिकांना सोमवारी आली. सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट फोडून चोरट्यांनी बारा लाख रुपयांचा ऐवज पळविला. अलीकडे रात्रीपेक्षा दिवसा घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या सोसायट्यांनी सुरक्षारक्षकांची नेमणूक तसेच, सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत असले, तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याकडेच सोसायट्यांचा कल आहे.

कर्वे नगरच्या सहवास सोसायटीजवळील धनलक्ष्मी अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, हिरेजडित सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज असा १२ लाख रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी रवींद्र जोशी (वय ५९) यांनी तक्रार दिली आहे. जोशी यांचे फूड प्रॉडक्ट विक्रीचे दुकान आहे. दररोज सकाळी ते पत्नीसह दुकानात जातात. दुपारी घरी येऊन पुन्हा सायंकाळी पाच ते नऊपर्यंत दुकानात थांबतात. चोरट्यांनी सायंकाळी पाच ते रात्री नऊदरम्यान घर बंद असताना घरफोडी केली. रविवार असल्यामुळे सोसायटीचा सुरक्षारक्षक सुटीवर होता. तसेच, या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. धनलक्ष्मी अपार्टमेंटसमोरून अलंकार पोलिस ठाण्याकडे रस्ता जातो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. तरीही चोरट्यांनी या सोसायटीमध्ये चोरी केली.

अलंकार पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक गणेश माने म्हणाले, की 'या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी सुरक्षारक्षक सुटीवर होता. तसेच, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या प्रकरणी मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे तपास सुरू आहे.'

सोसायटीची लवकरच बैठक

सोसायटीमध्ये रविवारी रात्री चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले आहे. सोसायटीच्या समोरून रस्ता जात असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी वर्दळ असते. तरीही चोरीची घटना घडल्यामुळे लवकरच सोसायटीची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, कायमस्वरूपी सुरक्षरक्षक ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती सोसायटीतील रहिवाशांनी दिली.

सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी

घरात मौल्यवान वस्तू ठेऊ नका. शक्यतो बँक लॉकरचा वापर करा.

सुरक्षेच्यादृष्टीने दरवाजा कडी-कोयंडे, लॅच चांगल्या दर्जाचे वापरावेत.

शेजारी हाच खरा आपल्या घराचा पहारेकरी असतो. त्यामुळे बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी.

सोसायट्यांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

सोसायटीला सुरक्षारक्षक नेमावा. नेमणूक करताना त्यांची पोलिस पडताळणी करून घ्यावी.

घरासमोर वर्तमानपत्र पडल्यामुळे घरातील व्यक्ती बाहेरगावी गेल्याचे समजते. त्यामुळे जाताना दरवाजा पेपर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शहराऐवजी राष्ट्रवादीचे ब्रँडिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचे ब्रँडिंग करण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोणताही प्रोटोकॉल न पाळता सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मनमानी कारभार करून पक्षाचे आणि पदाधिकाऱ्यांचे ब्रँडिंग करण्यासाठीच हा कार्यक्रम घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत नाराजी व्यक्त करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. पक्षनेत्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेकडे दुर्लक्ष करत महापौरांनी दिलेला शब्द न पाळता कार्यक्रम केला असल्याची टीका भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी केली.

पुणे शहराची पर्यटन क्षेत्रात विशिष्ट ओळख व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने 'बोधचिन्ह आणि कॉफी टेबल बुक' तयार करण्यात आले आहे. या बोधचिन्हाचे अनावरण आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. शहराच्या ब्रँडिंगच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या नेत्यांना न बोलाविल्याने काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी व्यासपीठावर न जाता प्रेक्षकांमध्ये बसून नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित करून नाराजी व्यक्त केली. महापौरांना कार्यक्रम घेण्याचे सर्व अधिकार दिल्यानंतर त्यांनी प्रत्येक पक्षाला विश्वासात घेऊन असे कार्यक्रम घेतले पाहिजेत. पक्षनेत्यांच्या बैठकीत या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमाला केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच बोलाविण्यात आले. एका दिवसांत कार्यक्रम ठरविण्यात आला आणि केवळ एका व्यक्तीवर फोकस करण्यात आला. शरद पवार यांच्याबाबत सर्वांना आदर आहे. परंतू शहरासाठीच्या कार्यक्रमात किमान इतर पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित करणे गरजेचे होते, अशा शब्दात शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

कॉफीटेबल बुक मराठीतही येणार

भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनीही शिंदे यांचे समर्थन करत कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त केली. महापौर दिलेला शब्द पाळणार नसतील तर बैठका, सभा घेऊ नयेत. पुढील काळात असे खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका बीडकर यांनी मांडली. सभागृहनेते बंडू केमसे यांनी वेळेअभावी कार्यक्रमात काही कमतरता राहिली असेल, याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच कॉफी टेबल बुक मराठीतूनही करण्यात येणार असून काही ठिकाणांचा उल्लेख या बुकमध्ये राहीला असेल तर तोही करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी क्लास अन् कॉलेजांचे लागेबांधे

$
0
0

पुणेः अकरावी प्रवेशाच्या सहाव्या ऑनलाइन फेरीमुळे क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेजांचे लागेबांधे सोमवारी उघड झाले. खासगी क्लासेसच्या आधारानेच भोसरीमधील दोन कॉलेजांनी विद्यार्थ्यांना ऑफलाइन प्रवेश दिल्याचेही त्यातून समोर आले आहे. त्यामुळे ऑफलाइन प्रवेश झालेच नसल्याचे शिक्षण खात्याचे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत.

अकरावीच्या सहाव्या ऑनलाइन फेरीची प्रवेश प्रक्रिया सोमवारी एस. पी. कॉलेजमध्ये सुरू झाली. या प्रक्रियेत दुपारनंतर भोसरीमधील दोन कॉलेजांच्या विद्यार्थ्यांनी अगदी रांगा लावून ऑनलाइन प्रवेशांसाठी गर्दी केली होती. खासगी क्लासच्या माध्यमातून या दोन कॉलेजांमध्ये ऑफलाइन प्रवेश घेतले होते. हे प्रवेश नियमित करून घेण्यासाठीच हे विद्यार्थी प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. ऑफलाइन प्रवेश रद्द होण्याच्या भीतीने हे सर्व विद्यार्थी एकाच वेळी ऑनलाइन प्रक्रियेसाठी आल्याने खात्यातील अधिकारीही अवाक झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देऊन त्यांना प्रक्रियेत सामावून घेण्यात आले.

या विषयी विचारले असता, सध्या विद्यार्थ्यांना प्रक्रियेतून योग्य त्या ठिकाणी प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट केले. ऑफलाइन प्रवेशांवर कारवाईबाबत, तसेच खासगी क्लासचालकांसोबतच्या कॉलेजांच्या टायअप्सबाबत वस्तुस्थितीची माहिती घेऊन मगच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. तसेच, केवळ या दोनच कॉलेजांबाबत नव्हे, तर ऑफलाइन प्रवेश देणाऱ्या इतर सर्वच कॉलेजांबाबत समिती कडक कारवाई करण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी नियोजनासाठी बैठक

$
0
0

महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणातील पाणीसाठा कमी होत असतानाही उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. यामुळे पुढील काळात पाण्याची स्थिती गंभीर होऊन पुणेकरांना अधिक पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये, यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पाणी बचतीचे उपाययोजनांसाठी पालिकेतील अधिकाऱ्यांची मंगळवारी (२५ ऑगस्टला) बैठक बोलाविली आहे. यामध्ये बांधकामासाठी होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर, वॉशिंग सेंटर, स्विमिंग टँकसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पावसाने मारलेल्या दडीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. हवामान खात्यानेही पुढील काही दिवस पाऊस पडणार नाही, असा अंदाज व्यक्त केलेला असतानाही पालकमंत्री बापट यांनी बोलाविलेल्या कालवा समितीच्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. या बैठकीत अजून २२ दिवस वाट पाहण्याची भूमिका बापट यांनी घेतली आहे. पुढील काही दिवस पाऊस न पडल्यास परिस्थिती अधिकच गंभीर होऊ नये, यासाठी महापालिकेने खबरदारीची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी बचतीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी महापौर धनकवडे यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत मुंढवा जॅकवेल, खडकवासला ते पर्वती बंद पाइपलाइन या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर बांधकामांसाठी, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, उद्याने, वाहनांना धुण्यासाठी अशा विविध कारणांसाठी जे पिण्याचे पाणी वापरले जाते त्यावर निर्बंध घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने कायमच आवाज उठवला आहे. पुणेकरांवर कपात लादून कालव्याच्या माध्यमातून पाणी पळविण्याचा कारभार 'मटा'ने उघडकीस आणला होता. धरणात पुरेसे पाणी असताना पुणेकरांना त्यांच्या हक्काचे पाणी दिवसातून दोनदा मिळाले पाहिजे. मात्र, यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरीही पुरेसा पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठा नीचतम पातळीवर पोचला आहे. या परिस्थितीत पाण्याची बचत करणे हाच एकमेव उपाय आहे. म्हणून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात वेळेवर कपात व्हायला हवी. पारदर्शक कारभार करून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब पुणेकरांना मिळायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images