Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एमएच-१२’ला हवा साथीदार...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही वर्षांत शहर मोठ्या प्रमाणावर विस्तारले असून, वाहनांची संख्या दर वर्षी सरासरी दोन लाखांनी वाढत असून गेल्या दहा वर्षांत एकूण संख्या १२ लाखांवरून २९ लाखांवर पोहोचली आहे. परिणामी, प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहनांशी संबंधित विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही त्याच प्रमाणात वाढले आहे. मात्र, 'आरटीओ'च्या मनुष्यबळात त्या तुलनेत वाढ झालेली नसल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. तसेच, आरटीओत येण्यासाठी नागरिकांना खूप प्रवासही करावा लागत आहे. त्यामुळे शहरात आणखी एक उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याची मागणी गेल्या दहा वर्षांपासून केली जात आहे. मात्र, शासनस्तरावर त्या मागणीकडे आजतागायत काळजीपूर्वक लक्ष देण्यात आलेले नाही.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात १९८४ पर्यंत संपूर्ण जिल्हा, पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होता. मात्र, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या पश्चिमेच्या तालुक्यातील नागरिकांना पुणे कार्यालय भौगोलिकदृष्ट्या खूप दूर असल्याने १९८४ साली पिंपरी चिंचवडला एक उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात आले. त्यानंतरच्या काळात बारामती तालुक्याचा झपाट्याने विकास झाला. तेथे नागरीकरण वाढले. त्यामुळे २००४ मध्ये तेथेही एक उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात, पुणे महापालिकेत १९९७ साली शहरालगतच्या २३ गावांचा समावेश करण्यात आला. शहराची हद्द वाढल्याने उपनगरे झपाट्याने विकसित झाली. सध्या शहराच्या हद्दीलगतच्या साधारणपणे पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांमध्येही नागरीकरण झाले आहे. त्यामुळे या सर्व भागातून आरटीओत येण्यासाठी नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला तोंड देत प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नागरिकांच्या सोयीसाठी व पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावरील ताण कमी करण्यासाठी उपनगरांत उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याची गरज आहे.

'फिरते केंद्र पुन्हा सुरू करावे'

उपनगरातील नागरिकांच्या सोयीसाठी आरटीओने अडीच वर्षांपूर्वी फिरते केंद्र सुरू केले होते. आठवड्यातील ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी ते केंद्र चालविले जात होते. नागरिकांचा त्यास चांगला प्रतिसादही मिळत होता. मात्र, त्या केंद्रावर आरटीओची सर्वच कामे होत नव्हती. कालांतराने ते केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मिळालेला दिलासा काही काळापुरताच होता. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी फिरते केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी मागणी होत आहे.

नवीन उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करणे हा धोरणात्मक निर्णय आहे. तो शासनस्तरावरच घेतला जाईल. त्यासाठी आणखी किती दिवस लागतील, याची कल्पना नाही.

- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संमेलनाध्यक्षपदासाठी पुन्हा लॉबिंग?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा खेळ रंगणार आहे. संमेलनाध्यक्षांची निवड सन्मानाने करण्याची मागणी सातत्याने केली जात असूनही साहित्य महामंडळाची अद्याप घटनादुरुस्ती झालेली नसल्याने अध्यक्षपदासाठीचे लॉबिंग सुरू होणार आहे. परिणामी संमेलनाचे औचित्य, ज्येष्ठ साहित्यिकांचा मान असे सर्वच मुद्दे बाहेर ठेवून पुन्हा ओंगळवाण्या लॉबिंगचाच प्रकार मराठी सारस्वताला याही वर्षी अनुभविण्यास मिळणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. संमेलनाध्यक्षपद हे मानाचे असल्याने निवडणूक न होता सन्मानाने नियुक्ती व्हावी, अशी मागणी साहित्य वर्तुळातून सातत्याने केली जात आहे. महामंडळही दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महामंडळाने साहित्यक्षेत्रातील मान्यवरांकडून त्याबाबत अभिप्राय मागवला होता. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे.

साहित्य महामंडळाने लोकशाही पद्धत स्वीकारलेली असूनही संमेलनाची निवडणूक पूर्णपणे लोकशाही पद्धतीने होत नाही. काही ठरावीक मतदारांनी दिलेल्या मतांच्या जोरावर संमेलनाध्यक्षांची निवड होते. तरीही लॉबिंग, एकगठ्ठा मते असे प्रकार होतातच. मतपत्रिका न मिळणे, उमेदवारांनी एकमेकांवर आरोप करणे अशा प्रकारांनी साहित्य संमेलनाच्या प्रक्रियेला गालबोट लागते. आयोजकांना हवा असलेला उमेदवार निवडून येण्यासाठी स्वागत समितीच्या मतांची फिरवाफिरवी करावी लागते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, साहित्य व्यवहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या सर्वसामान्य वाचकाला संमेलनाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत काहीच भूमिका बजावता येत नाही. सर्वसामान्य वाचकांच्या, साहित्यप्रेमींच्या मताचा विचारही या प्रक्रियेत व्हायला हवा. साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी सध्या निवडणूक होत असताना त्यात उमेदवारांचा ठोस जाहीरनामाही असायला हवा. त्या जाहीरनाम्याच्या जोरावरच निवडणूक लढली जायला हवी. केवळ साहित्य क्षेत्रात केलेले योगदान पुरेसे ठरवण्यापेक्षा भाषा आणि साहित्यप्रसाराच्या दृष्टीने काय काम करणार, हेही संबंधित उमेदवारांनी स्पष्ट केले पाहिजे. संमेलनाध्यक्षपद हे दीड दिवसाच्या मानाच्या गणपतीसारखे असते असे म्हटले जाते. मात्र, संमेलनाध्यक्षांना साहित्य महामंडळ एक लाख रुपये मानधन देते. त्याचा वापर भाषा-साहित्यप्रसारासाठी केला जाऊ शकतो, असे मुद्देही पुढे येत आहेत.

निवडणुकीपासून साहित्यिकांनीच अलिप्त राहू नये, यासाठी सन्मान्य निवडीचा पर्याय महामंडळाने तातडीने अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक नसल्याचे स्पष्टीकरण संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी नुकतेच दिले होते. साहित्य संमेलनात साहित्यिकांचा सक्रिय सहभाग असल्यास संमेलनाचे इप्सित कसे साध्य होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठीच निवडणुकीचा खेळ थांबवून संमेलनाच्या स्वरुपाचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज साहित्यिक व वाचक बोलून दाखवत आहेत.

संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक व्हायला हरकत नाही. मात्र, ती ओंगळवाणी निवडणूक होऊ नये हे माझेही म्हणणे आहे. निवडणूक नको असल्यास या रूढ पद्धतीला पर्यायी पद्धत सुचवायला हवी. ही पद्धत व्यावहारिक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी उभे राहणाऱ्या साहित्यिकांनी आधी काय योगदान दिले हे महत्त्वाचे आहे. मात्र, पुढील वर्षभरात काय करणार हे त्यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून स्वतःहून सांगणेही जास्त महत्त्वाचे आहे. येत्या निवडणुकीद्वारे हा नवा पायंडा पडायला हरकत नाही.

- डॉ. सदानंद मोरे, ८८ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

निवडणुकीची प्रक्रिया सुरू

पुणे : पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी तीन सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, सहा नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. अंतिम यादी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. नऊ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. १५ सप्टेंबर रोजी मतदारांना मतपत्रिका पाठवल्या जाणार आहेत. त्या मतपत्रिका मतदारांनी पाच नोव्हेंबरपर्यंत पाठवायच्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशी सफरचंदच तेजीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या फळबाजारात सफरचंदाची मोठी आवक झाल्याने दरामध्ये ५०० ते ७०० रुपयांची घट झाली आहे. देशी सफरचंदाची चव ग्राहकांना चाखता येणार आहे. यात अमेरिका, चीन, इटली, ऑस्ट्रोलिया देशातून येणाऱ्या सफरचंदापेक्षा भारतातील हिमाचल प्रदेशातून आलेल्या फळाला सर्वाधिक मागणी आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी सफरचंदाची मोठी आवक झाली. पुण्याच्या बाजारात अमेरिका, इटली, चीन, ऑस्ट्रोलिया तसेच अन्य देशांतूनही सफरचंदाची आवक होते. परदेशातून येणारे सफरचंद शीतगृहात चार ते पाच महिने ठेवले जाते. त्यानंतर काही दिवसांनी ते बाजारात उपलब्ध केले जाते. देशातील हिमाचल प्रदेशातून येणारे सफरचंद हे थेट तिसऱ्या दिवशी ग्राहकांच्या हाती मिळते. त्यामुळे हिमाचल प्रदेशामधील सिमला येथून येणाऱ्या सिमला सफरचंदाला अधिक मागणी आहे. मागणी वाढल्याने तसेच बाजारात रविवारी ३० हजार पेटींची आवक झाली आहे. पेटीमागे ५०० ते ७०० रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती सफरचंदाचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

सिमला सफरचंद रंगाने फिकट असले, तरी ते खाण्यासाठी चविष्ट आहे. तसेच त्यात व्हिटॅमिन अधिक असल्याने त्याला ग्राहकांची पसंती अधिक आहे. सिमला सफरचंदाच्या २० ते २५ किलोला १००० ते २००० रुपये दर मिळाले आहेत. गोल्डन सफरचंदाच्या २० ते २५ किलोला ८०० ते १२०० रुपये तसेच पीअरच्या १५ किलोला ५०० ते १००० रुपये दर मिळाला आहे, असेही मोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडधान्य, शेंगदाणा महागला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने कडधान्ये आणि शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे, तर सणामुळे गुळाच्या दरात क्विंटलमागे १५० रुपयांनी वाढ झाली. बाजारात मोठी आवक झाल्याने १०० रुपयांनी साखर स्वस्त तर बेसनाचे दरही उतरले आहेत.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गहू, ज्वारी, बाजरी, पोहे, मिरची, धने, हळद, साबुदाणा, भगर, रवा, आटा, मैदा, नारळ, खाद्यतेलांच्या किमती स्थिर आहेत. त्यांच्या दरात कोणताही बदल झाला नाही. गेल्या आठवड्यात डाळींच्या दरात पावसाअभावी भाव गगनाला भिडले होते. तूरडाळ, हरभरा डाळ, मूगडाळ, उडीद डाळीचे वाढलेले दर आठवड्याच्या शेवटपर्यंत स्थिर राहिले; पण दोन दिवसांपासून डाळींना मागणी घटल्याने डाळीचे, दर पुन्हा घसरण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत. डाळींबरोबर कडधान्याचे दर या आठवड्यात कच्चा मालाच्या तुटवड्यामुळे वाढले आहेत. कडधान्याच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झाली आहे. चीनमधून मूग, तांजानिया, मंगोलियातून तूर, तर ऑस्ट्रोलिया, कॅनडातून मसूर, काबुली चन्याची आवक होते. म्यानमारमधून उडीद डाळची आवक होते. ही आवक घटल्याने दरवाढ झाली आहे.

मागील आठवड्यात कोलम, आंबेमोहोर, सोनामसुरी तांदळाच्या दरात झालेली वाढ तशीच टिकून आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटकात पाऊस कमी झाल्याने त्यात काही दिवसांपूर्वी क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये दर वाढ झाली होती. आता दर स्थिर आहेत. श्रावण महिना, राखी पोर्णिमा, गोपाळष्ठमी या सणसुदीमुळे गुळाला मागणी वाढल्याने क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाण्याचा कच्चा माल बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली आहे. साखरेला मागणी कमी असल्याने त्याला उठाव नाही. त्यामुळे क्विंटलमागे १०० रुपयांनी घट झाली आहे. भाजकी डाळीच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढल्याने फळभाज्या स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने दडी मारल्याचे चित्र राज्यभर दिसत असताना गुलटेकडीच्या मार्केट यार्डात मात्र रविवारी फळभाज्यांसह पालेभाज्यांची प्रचंड आवक झाली. ठिंबक सिंचन पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीमुळे ही आवक बाजारात झाल्याचे सांगितले जाते. परिणामी, काकडी, कार्ली, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवार, मटार, सिमला मिरची, वांगी, दूध भोपळा यांचे दर उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. कांद्याची आवक थोडी वाढली असली, तरी किरकोळ बाजारात कांद्याचे वाढलेले दर कायम आहेत. त्यामुळे ग्राहकांना खिशावर थोडा भुर्दंड पडत असल्याचे चित्र आहे. तुलनेत गाजर, आले, हिरवी मिरची, तोंडली, भुईमूग शेंगाचे दर स्थिर आहेत.

मार्केट यार्डात रविवारी अडीचशे ट्रक फळभाज्यांची आवक झाली. एकीकडे पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचन पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. पाऊस नसतानाही गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारात फळभाज्यांची आवक चांगली होत असल्याचे दिसते. रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत परगावाहून येणारा शेतीमाल उतरून घेण्याचे काम सुरुच होते. त्यामुळे विक्रेत्यांनी देखील मालाची आवक पाहून कमी दरात खरेदी विक्री केली.

पुरंदर, पारनेर, वाई, सातारा या भागातून मटारची तीन हजार गोणींची आवक झाली. बेंगळुरू आल्याची अडीचशे, तर सातारी आल्याची सहाशे पोत्यांची आवक झाली. टोमॅटोची देखील नेहमीप्रमाणे साडेसहा हजार पेटी, हिरवी मिरचीची ५ टेम्पो एवढी आवक झाली. फ्लॉवर, कोबी, शेवग्याची नेहमी होणारी एवढीच आवक झाली. भुईमूग शेंगाची १०० ते १२५ पोत्यांची आवक झाली.

कर्नाटक, मध्यप्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, गाजरची इंदौरहून ५ ते ६ टेम्पो, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो आवक झाली. उटीहून देखील गाजराची एक टेम्पो आवक झाली. राजमा घेवड्याची १० ते १२ टेम्पोची आवक झाली. जुन्या कांद्याची ७० ते ८० ट्रक, तर कर्नाटकहून हंगामातील लाल रंगाचा कांदा बाजारात येऊ लागला आहे. तेथून दहा ट्रक कांद्याची आवक झाली आहे. इंदौर, आग्राहून बटाट्याची ५५ ते ६० ट्रक, तर लसणाची मध्यप्रदेशातून अडीच हजार गोणींची आवक झाली. पालेभाज्यांमध्ये मेथीची ४० हजार जुडींची आवक झाली. या आठवड्यात पालेभाज्यांच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून प्रकरणातील पसार आरोपी अटकेत

$
0
0

पिंपरीः पिंपळे गुरव येथे दोन महिन्यांपूर्वी खून करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने रविवारी पहाटे जेरबंद केले. मुन्ना उर्फ आकाश संजय गायकवाड (वय २२, रा. पवारनगर, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपचे नाव आहे. पिंपळे गुरव येथील पवनानगर परिसरात राहणाऱ्या दनायतुल्ला शेख यांचा जमिनीच्या वादातून २६ जूनला १३ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. या प्रकरणातील १२ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्ववत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटातील खंडाळा व आडोशी बोगद्याजवळील अत्यंत धोकादायक दरडी हटविण्याची सुरू असलेली मोहिम शनिवारी संपविण्यात आली आहे. दोन महिन्यापासून एक्स्प्रेस वेवरील वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेले बदल हे पूर्ववत करण्यात आले आहे. यामुळे रविवारपासून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांनी दोन महिन्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. दरड हटविण्याची मोहीम संपली असली तरी अद्याप खंडाळा घाटातील (बोरघाट) खंडाळा एक्झिट ते खोपोली एक्झिटपर्यंत अनेक ठिकाणी धोकादायक दरडी असल्याने येथील संकट अद्याप टळलेले नाही.

पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील खंडाळा व आडोशी बोगद्याजवळ अनुक्रमे २२ जून व १९ जुलैला मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. या घटनेनंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने धोकादायक दरडी हटविण्याच्या कामाला २४ जुलैला सुरुवात केली. खंडाळा घाटातील (बोरघाट) खंडाळा एक्झिट ते खोपोली एक्झिट या परिसरातील आठ ठिकाणे अत्यंत धोकादायक दरडी असल्याचे निश्चित करून त्या ठिकाणच्या दरडी हटविण्याच्या मोहीम राबविली होती. मोहिमेदरम्यान खंडाळा बोगद्याजवळ सव्वा महिन्यात चार वेळा, तर दोन महिन्याच्या आत आडोशी बोगद्याजवळ दोनदा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या मोहिमेचा शेवट शनिवारी सायंकाळी खंडाळा बोगद्याजवळ करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुग्धव्यवसायाला चालना देण्याची गरज : बापट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दूध व कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्रातील चळवळीत काही दोष आलेले आहेत. त्यात राजकारण देखील आहे. कोणताही व्यवसाय चांगला चालवायचा असेल तर त्याचे निकष आणि नियम पाळले पाहिजेत,' असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी भोसरीत केले.

दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी उत्पादन करणाऱ्या भोसरी एमआयडीसीतील महालक्ष्मी इंडस्ट्रिजचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार विलास लांडे, मोहन जोशी, पुणे मनपाचे नगरसेवक प्रकाश ढोरे, महालक्ष्मी इंडस्ट्रिजचे अॅड. त्रिभुवन्नाथ तिवारी, अॅड. एस. के. तिवारी, पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ज्योती भारती, कांता तिवारी, दीपक तिवारी, रमेश तिवारी आदी उपस्थित होते.

बापट पुढे म्हणाले, 'भारताची दुध व दुग्धजन्य उत्पादनात पिछेहाट झालेली आहे. दुधाच्या भेसळीबाबत सरकार कडक पावले उचलणार आहे. दुधाच्या पावडरचा बाजारभाव आंतराष्ट्रीय बाजारात ठरतो त्यामुळे किंमतीत चढ उतार असतात. तरी सरकार दूध व्यावसायिकांच्या पाठीशी उभे आहे.' खासगी दूध विक्रेत्या कंपन्या महाराष्ट्रात पाय रोवत असल्याने सहकारी संस्था डबघाईला आल्या आहेत का असा प्रश्न विचारला असता, बापट म्हणाले, 'आज स्पर्धा सर्वत्र आहे. आर्थिक संकटात सापडला आहे. तरी सरकार दूध व्यावसायिकांच्या पाठीशी उभे आहे.' रमेश तिवारी यांनी स्वागत केले, शोभा कुलकर्णी सूत्रसंचालन केले, तर बीणा तिवारी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मलनिस्सारणाला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून बांधण्यात येणाऱ्या बहुचर्चित पहिल्या मलनिस्सारण प्रकल्पाचा सोमवारी भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला असताना, ​या प्रकल्पाला सत्ताधारी भाजपकडूनच विरोध करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या नियोजित जागेवरील शाळा स्थलांतरित करण्यास विरोध असून, नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

बुटी स्ट्रीट येथे २० एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. डिफेन्स इस्टेटचे महासंचालक रविकांत चोप्रा यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, या समारंभाला खासदार अनिल शिरोळे, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, डिफेन्स इस्टेटचे प्रिन्सिपल डायरेक्टर जोगेश्वर शर्मा, बोर्डाचे अध्यक्ष ए. के. त्यागी आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून बोर्डाला मिळाला आहे. प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेवर रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल आहे. त्या शाळेचे स्थलांतर बाबाजान चौकातील बोर्डाच्या गोदामाच्या जागेत करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. ही शाळा स्थलांतरित करण्यास भाजपच्या कामगार आघाडीचे माजी शहराध्यक्ष शशिधर पूरम आणि कँटोन्मेंट बोर्ड विभागाचे माजी सरचिटणीस विनायक काटकर यांनी विरोध केला आहे.

सध्या या शाळेमध्ये गळतीचे प्रमाण जास्त आहे. बाबाजान चौकात शाळा स्थलांतरित केल्यानंतर या परिसरातील विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. तसेच पुढील जून महिन्यात होणाऱ्या शैक्षणिक वर्षापर्यंत इमारतीचे बांधकाम होणे अशक्य आहे. कारण त्यासाठी बोर्डाकडे निधी नाही. तरीही बोर्डाकडून घाई करण्यात येत असल्याचे पूरम आणि काटकर यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. हा प्रश्न अद्याप सोडविण्यात आलेला नसताना भूमिपूजन समारंभ घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला सुरुवातीपासून विरोध झाला. कंत्राटदाराविरुद्ध तक्रारी झाल्यानंतर त्याने शिर्डी येथे उभारलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित कंत्राटदाला काम देण्यात आले आहे. या कंत्राटदाराला पुन्हा विरोध करण्यात आला आहे. कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया नव्याने करण्याची मागणी पूरम आणि काटकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक वादातून गोळीबार

$
0
0

पुणेः चंदननगर येथे कौटुंबिक वादातून सासऱ्याने हवेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री खराडी येथील राजाराम पाटीलनगर येथे घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, सासरा व जावयाच्या पाच मित्रांनाही अटक करण्यात आली आहे. विनाकारण हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या सासऱ्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संजयकुमार बब्रुवाहन सातपुते (वय ४४, रा. खराडी) असे अटक केलेल्या सासऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा जावई गणेश विजय कांबळे याने फिर्याद दिली आहे. सातपुते यांच्या फिर्यादीवरून कांबळे त्याच्या पाच मित्रांना अटक केली आहे. सातपुते सैन्य दलातून निवृत्त झाले असून, ते सध्या महापालिकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. कांबळे याने सातपुते यांच्या मुलीसोबत प्रेम विवाह केला आहे. त्यामुळे त्यांनी मुलीला कांबळेकडे पाठविले नाही. शुक्रवारी रात्री राजाराम पाटील नगर येथे कांबळे मित्रांसोबत गप्पा मारीत बसला होता. त्या वेळी मुलीसोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून सातपुते यांनी कांबळेला दगड फेकून मारला. तो दगड डोक्याला लागल्यामुळे जखमी झाले. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी कांबळे याचे आई-वडील व मित्र हे सातपुते यांच्याकडे गेले. त्या वेळी सातपुते यांनी 'घरासमोर का जमलात' असे म्हणून परवानाधारक डबल बोअरच्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला.

गोळीबाराची माहिती मिळताच चंदनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पात्रुडकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी सातपुते यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे.

साडेपाच लाखांची फसवणूक

पुणेः चंदननगर येथील कंपनीचे कोटक महिंद्र बँकेत असलेल्या खात्याचा पासवर्ड हॅक करून सेल्समनने स्वतःच्या खात्यावर चार लाख हस्तांतर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. कंपनीच्यानावे सिमेंटची ऑर्डर देऊन एक लाख १२ हजार रुपये घेतले आहे.

याबाबत कान्स्ट्रो ट्रेडींग प्रा. लि. कंपनीचे राजेश अगरवाल यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अभिलाष शंकर पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कान्स्ट्रो ट्रेडींग प्रा. लि या कंपनीत पटेल सेल्समन म्हणून काम करतो. कंपनीचे कोटक महिद्रा बँकेतील खात्याचा पासवर्ड हॅक करून स्वतः खात्यावर ३ लाख ९१ हजार रुपये हस्तांतर केले. त्यापैकी दीड लाख रुपये काढले. कंपनीमार्फत बिर्ला सुपर सिमेंट या कंपनीस ३४० सिमेंटच्या बॅगांची ऑर्डर दिली. कंपनीचा खोटा शिक्का व सही करून एक लाख १२ हजार रुपयांची ऑर्डर दिली. अशाप्रकारे कंपनीची फसवणूक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेच्या उत्पन्नात तीस कोटींची वाढ

$
0
0

पुणेः रेल्वेद्वारे केल्या जाणाऱ्या मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला २०१५-१६ या वर्षांत ११६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी रेल्वेचे उत्पन्न ८६ कोटी रुपये होते. माल वाहतुकीत सातत्याने होत असलेल्या वृद्धीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्नात ३० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे.

गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या मालवाहतुकीला कमी दरातील रस्ते वाहतुकीमुळे स्पर्धा निर्माण झाली होती. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी रेल्वेच्या उत्पन्नातील वाढ पाहता रेल्वेच्या मालवाहतुकीला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पुणे विभागामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती आदी स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात साखरेची वाहतूक केली जाते. एप्र्रिल ते जुलै दरम्यान १९३ रेकच्या माध्यामातून ७१ कोटी ७७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मागच्या वर्षी ११५ रेकच्या माध्यमातून ५६ कोटी २८ लाख रुपये उत्पन्न मिळाले होताे. पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय, अप्पर व्यवस्थापक मिलिंद देउस्कर आणि वरिष्ठ व्यवस्थापक (वाणिज्य) गौरव झा यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकल जैन समाजाचा विधानभवनावर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जैन धर्मातील संथारा-सल्लेखना व्रताच्या विरोधात राजस्थान हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाद मागावी आणि अध्यादेश काढून हा घटनात्मक अधिकार कायम राखावा, या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने आज (सोमवारी) देशभरात मोर्चे काढण्यात येणार आहेत. पुण्यातही ओसवाल बंधू समाज चौकातून विधान भवनावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकल जैन समाजाचे विजयकांत कोठारी, अचल जैन, फत्तेचंद रांका, मिलिंद फडे, पोपटलाल ओस्तवाल, डॉ. कल्याण गंगवाल, महावीर कटारिया, अभय छाजेड, प्रवीण चोरबेले, लक्ष्मीकांत खाबिया, चंदुभाई शहा, अमिचंद संघवी, अशोक हिंगड, महेंद्र जैन आणि विपुल शहा यांनी ही माहिती दिली आहे.

जैन धर्मातील संथारा व्रत ही आत्महत्या असल्याचा निर्णय राजस्थान हायकोर्टाने दिला आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ही आत्महत्या नसून उच्च व पवित्र मानली गेलेली परंपरा आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेस कायमस्वरूपी अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी सकाळी साडेनऊ वाजता ओसवाल बंधू समाज चौकापासून मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात नागरिकांनी आणि सर्व पंथांच्या साधू-साध्वींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास धार्मिक आचरणासंबंधि दिलेला अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राजस्थान हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारने ज्येष्ठ वकिलांमार्फत सुप्रीम कोर्टात अपील करावे आणि हायकोर्टाचा निर्णय रद्द करवून घ्यावा, अशी मागणी सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सगळा कारभार रामभरोसे

$
0
0

कुलदीप जाधव, पुणे

इतर मागासवर्ग विकास महामंडळ व अपंग वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांचा कारभार रामभरोसे असल्याचे 'मटा'ने नुकत्याच केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. या दोन्ही कार्यालयांची धुरा सद्यस्थितीत अधिकारी व कर्मचारी मिळून केवळ तिघांच्या खांद्यावर असून पाहणीदरम्यान केवळ एकच अधिकारी कार्यालयात उपस्थित असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले.

इतर मागासवर्ग विकास महामंडळ व अपंग वित्त व विकास महामंडळातर्फे इतर मागासवर्गीय प्रवर्ग व अपंग प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना राबविल्या जातात. या दोन्ही महामंडळाची जिल्हा कार्यालये येरवडा येथे आहेत. इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या कामकाजासाठी शासनाने तिघांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये व्यवस्थापक, अकाउंटंट व वसुली अधिकारी यांचा समावेश आहे. या कार्यालयाकडे जुलै २००५ पासून अपंग वित्त व विकास महामंडळाचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे.

या महामंडळाचे कामकाज पाहण्यासाठी केवळ एक कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे; परंतु ३१ जुलैला त्या कर्मचाऱ्याचा करार संपुष्टात आल्याने एक ऑगस्टपासून इतर मागरसवर्ग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवरच त्याचा बोजा पडला आहे. त्यामुळे या दोन्ही महामंडळांचे कामकाज पार पाडताना या कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. तर, अपंग वित्त व विकास महामंडळाशी संबंधित काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक दिली जात नाही, त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते, अशा तक्रारीही अपंग कल्याण आयुक्तालयाला प्राप्त झाल्या आहेत.

अपंग वित्त विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या स्थापनेपासून स्वतंत्र कार्यालय व स्वतंत्र कर्मचारी नसल्याची माहिती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांकडून मिळाली. या महामंडळाची स्थापना १९९९ साली झाली. पुण्यात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाची स्थापना २००२ साली झाली. सुरुवातीची दोन वर्ष या कार्यालयाचा कारभार महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडे होता. नंतर एक वर्ष महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंळाकडे या कार्यालयाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. जुलै २००५पासून या कार्यालयाचा कारभार इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयालयाकडे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्नर शहरात दारू, गांजा जप्त

$
0
0

पुणेः जुन्नर येथील मंगळवार पेठेत छापा टाकून साडेसात हजार रुपये किंतीचा दीड किलो गांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. डिंभे धरणाजवळील मायंबवाडी येथे छापा टाकून १८० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला जुन्नरच्या मंगळवार पेठेत गांजा विक्रीची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या ठिकाणाहून आमन हरूक तक्की (वय ३५) याला अटक केली. त्याच्याकडून गांजा व इतर असा नऊ हजार रुपयांचा माल जप्त केला. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच, डिंभे धरणाजवळील मायंबवाडी येथे छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या ठिकाणाहून अल्लाबक्ष बाबुमियाँ मुंढे याला अटक करून देशी दारू व इतर माल, असा दोन लाख साठ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0

पुणेः सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना टिंगरेनगर येथे शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पती व दीरास अटक केली आहे. नूतन विजय लाटे (वय ३०, रा. संत तुकारामनगर, टिंगरेनगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पती विजय कालीदास लाटे (३५) आणि नागेश कालीदास लाटे (३७) यांना अटक केली आहे. याबाबत नूतनची आई सुंदर काळे यांनी तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवले पूल धोकादायकच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई- बेंगळुरू महामार्गावर साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना नवले पूल संपल्यानंतरचा परिसर अपघातप्रवण क्षेत्रच बनला आहे. कात्रजकडून येणारी वाहने ही पुलाखालून तसेच जांभुळवाडीकडून येणारी वाहने ही पुलावरून येतात, आणि एकाचवेळी ही वाहने एकमेंकाना 'क्रॉस' करत असल्याने या ठिकाणचे अपघात वाढले आहेत. अशाच प्रकारे दोन ट्रक एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. त्यामध्ये कोणती जीवितहानी झाली नसली, तरी या परिसरातील धोके कायमच आहेत. रविवारी सायंकाळीही त्या ठिकाणची स्थिती कायम होती.

मुंबई-बेंगळुरू महामार्गावर आई पुतळा चौकात फ्लायओव्हर तर धायरी चौकात पूल बांधण्यात आला आहे. फ्लॉयओव्हर आणि पूल एकमेकांना न जोडल्याने त्यांच्यामधील २०० फूट अंतराचा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. शक्यतो, साताराकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पुलावरून खाली उतरताना वेग नियंत्रित होत नसल्याने अपघात होत आहेत.

नवले पुलाजवळ शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. कात्रजच्या दिशेने नवले पुलाखालून आलेला एक ट्रक सर्व्हिसरोडवरून मुंबई-बेंगळुरू महामार्गावर येण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी जांभुळवाडीकडून आलेला ट्रक फ्लायओव्हरवरून उतरता होता. उतार असल्याने साहजिकच या ट्रकचा वेग अधिक होता. या ट्रक चालकाला वेग नियंत्रित न आल्याने समोर क्रॉस करत असलेल्या ट्रकला त्याने जोराची धडक दिली. त्या वेळी पुढच्या ट्रकने एका रिक्षाला चिरडले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पुलाखालील वाहने आणि पुलावरील वाहने एकमेकांना क्रॉस करत असल्याने या ठिकाणी अपघात घडतात. पुलाखालून येणारा वाहतुकीचा प्लो मोठ्या प्रमाणात आहे. सोलापूर रोडवरून मुंबईच्या दिशेने येणारी ही वाहने कात्रजवरून येतात. या वाहनांना नवलेपुलाखालून मुंबई-बेंगळुरू महामार्गावर येताना दिव्य पार पाडावे लागत असल्याची परिस्थिती आहे. भविष्यात येथे कधीही मोठा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक महेश सरतापे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांची भूमिका तोंडचे पाणी पळवणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने मारलेल्या दडीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. तरीही उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी काहीही ठोस न ठरवता 'पाऊस पडेल, १५ सप्टेंबरपर्यंत वाट पाहू' अशी भूमिका घेऊन पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलेला 'आशावाद' पुणेकरांसाठी अधिक त्रासदायक ठरण्याची भीती महापालिकेतील गटनेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. 'पालकमंत्री बापट यांच्यामध्ये निर्णय घेण्याची कुवत नसल्यानेच धरणातील पाणीसाठा तळाला जात असतानाही केवळ बैठकांचा फार्स केला जात आहे,' अशी टीका केली जात आहे.

बापट यांनी कालवा समितीच्या बैठकीत ठोस निर्णय न घेता, १५ सप्टेंबरपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिल्याने पालिकेतील गटनेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'गेल्या काही आठवड्यांपासून पाऊस पडत नसल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी पालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत वाट न पाहता आतापासूनच पाण्याचे नियोजन केले पाहिजे,' अशी भूमिका शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी मांडली. 'पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. आयुक्तांनी पुढील २३ दिवस थांबण्यापेक्षा कपात करण्यास सुरुवात केली पाहिजे,' अशी भूमिका मनसेचे गटतेने बाबू वागस्कर यांनी मांडली.

'निर्माण होणाऱ्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जावे, याबाबत पालकमंत्री या नात्याने बापट यांनी सावध करणे गरजेचे होते; मात्र बापट यांनी त्याकडे दुर्लक्ष केले,' असा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला. 'बापट यांना परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही. ठोस ‌निर्णय घेण्याची कुवत त्यांच्यामध्ये नसल्याने पुणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे,' टीका सभागृहनेते शंकर केमसे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनी केला रेल्वेचा सिग्नल बंद

$
0
0

पुणे : हडपसर जवळील फुरसुंगी येथे वायर तोडून रेल्वेचा सिग्नल बंद पाडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यामुळे सह्याद्री एक्स्प्रेस वीस मिनिटे फुरसुंगीत थांबवण्यात आली होती. या दरम्यान चोरट्यांनी एका महिलेची पर्स हिसकावली असून, याबाबत तक्रार देण्यात आलेली नाही. सिग्नलच्या वायर तोडल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लस घेण्यास गर्भवती नाखूश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असल्याने अतिजोखमीचा घटक म्हणून गर्भवतींना स्वाइन फ्लूची लस मोफत देण्याच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या उपक्रमाला महिलांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील सर्व भागातील गर्भवती महिलांपर्यंत ही लस पोहोचावी यासाठी आता प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील साथरोग आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील याबाबत राज्य सरकारने डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. समितीने स्वाइन फ्लूच्या अतिजोखमीच्या पेशंटना तातडीने मोफत लस देण्याबाबतचा सल्ला आरोग्य विभागाला दिला होता. त्यानुसार आरोग्य विभागाने गेल्या महिन्यात याबाबत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. 'राज्यात अतिजोखमीचा घटक म्हणून गर्भवती महिलांचा समावेश आहे. अशा महिलांना चौथ्या महिन्यातच स्वाइन फ्लूची लस मोफत देण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील सहा ठिकणी केंद्र सुरू केली आहेत.

औंध येथील जिल्हा हॉस्पिटल, नागपूर, मुंबईतील कस्तुरबा तसेच अन्य तीन नर्सिंग होम, नाशिक आणि लातूर येथील जिल्हा हॉस्पिटल तसेच औरंगाबाद येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध केली आहे. त्यानुसार एका महिन्यात ५०८ गर्भवती महिलांनी मोफत लस घेतली आहे. ही लस ऐच्छिक असल्याने गर्भवतींना बंधनकारक करण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी आहे. ही लस राज्यभरातील गर्भवती महिलांपर्यंत पोहोचविण्याकरिता आणखी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. राज्यात प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे,' अशी माहिती साथरोग विभागाचे डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

राज्यात जानेवारीमध्ये स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्या वेळी अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या गरीब पेशंटना मोफत उपचार अथवा परतावा देण्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली होती. त्यानुसार राज्यातून ११९ जणांनी उपचार केल्यासंदर्भात आरोग्य खात्याकडे परताव्यासाठी प्रस्ताव पाठविली होती. ही प्रकरणे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी ४५ प्रकरणे आरोग्य संचालकांना प्राप्त झाली आहेत. त्यातील दोन प्रस्तावातील पेशंटना पैसे देण्यात आले आहेत. त्याशिवाय उर्वरित ४३ प्रकरणांमध्ये असलेल्या किरकोळ त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे, असे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा आवाक्यात येण्याची शक्यता

$
0
0

आयात वाढणार; साठेबाजीमुळे दर चढे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने दडी मारली असल्याने कांद्याची बाजारात घटल्याने एकीकडे भाव गगनाला भिडले आहेत. तर नाशिक, लासलगाव येथे कांद्याची झालेली साठेबाजी, दुसरीकडे इजिप्तमधून मुंबईपर्यंत आलेला कांदा यामुळे कांद्याचे दर खाली येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. परिणामी, ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

काही दिवसांत कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इजिप्त, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून कांद्याची आयात करण्यास सुरुवात केली. साठेबाजी करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई सुरु केली असून, त्यांच्याकडील पावणेदोन लाख क्विंटल कांदा येत्या दोन तीन दिवसांत बाजारात येण्याची शक्यता आहे.

'पुण्याच्या बाजारात जुना कांद्याची ७० ते ८० ट्रक तर कर्नाटकातून नव्या कांद्याची १० ट्रक एवढी आवक रविवारी झाली. केरळमध्ये सण, उत्सव असल्याने कांद्याला मागणी आहे. त्यामुळे कांद्याची आवक वाढली तरी दक्षिणेतून कांद्याला मागणी होत असल्याने दरावर फारसा परिणाम झाला नाही. इजिप्तमधून आयात झालेला कांदा मुंबईत दाखल झाला आहे. हा कांदा थोडा ओला असल्याने त्याला वाळवून तो बाजारात येईपर्यंत तीन ते चार दिवस लागतील. इजिप्तचा कांदा बाजारात आल्यास त्यामुळे दर खाली येऊ शकतात', अशी माहिती विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली. इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तानातून केंद्र सरकारने कांदा आयात करण्यास सुरुवात केली आहे. येथील कांदा पुण्या मुंबईच्या बाजारात दाखल झाला तर कांद्याचे दर खाली येतील. परंतु, इजिप्तचा कांदा कोणत्या प्रतीचा आहे याचे चित्र तीन दिवसांत स्पष्ट होईल. त्यानंतर कांद्याचे दर समजू शकतील. कांद्याला क्विंटलमागे सध्या ५५० ते ६०० रुपये दर आहे, असे कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

साठेबाजीत उपलब्ध झालेला कांदा येत्या काही दिवसांत बाजारात आल्यास त्यामुळे आवक निश्चित वाढेल. आवक वाढल्याने दरही उतरतील. बेंगळुरूहून कांद्याची आवक होत आहे. बाजारात येणारा १० ते १५ टक्के कांदा हा जुना असून तो शेतकऱ्याकडील साठा आहे. उर्वरीत ८५ टक्के कांदा हा व्यापाऱ्यांकडून बाजारात येत आहे. दिल्लीत सध्या कांद्याचे किलोचे दर ५० रुपये आहेत, असे एका व्यापाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

साठेबाजीचा ग्राहकांवर भुर्दंड

घाऊक बाजारात ५० ते ६५ रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा किरकोळ बाजारात चढ्या दराने विकला जात आहे. ग्राहकांच्या खिशावर भुर्दंड पडत आहे. दरम्यान, कांद्याच्या साठेबाजांवर केलेल्या कारवाईत नाशिक, लासलगावमधील विक्रेत्यांकडून पावणेदोन लाख क्विंटल कांदा उपलब्ध होईल. कांद्याच्या दरवाढीस साठेबाजी हे देखील एक कारण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कांदा बाजारात आल्यास दर खाली येतील, असा दिलासाही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images