Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्कॉलरशिपची माहिती अखेर वेबसाइटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना पालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपच्या अर्जांची माहिती पालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यास पालिका प्रशासनाने अखेर सुरुवात केली आहे. यामुळे स्कॉलरशिपचा ऑनलाइनचा अर्ज नक्की कुठे जाऊन भरावा, याची माहिती विद्यार्थी आणि पालकांना मिळण्यास मदत होणार आहे.

पालिकेच्या वतीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती पालिकेच्या वेबसाइटवर दिली जाईल, अशी घोषणा प्रशासनाने केली होती. अर्ज भरण्याची मुदत संपत आली असतानाही पालिकेच्या वेबसाइटवर माहिती देण्यात आली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह पालकांकडून करण्यात येत होती. याबाबतचे वृत्त 'मटा' ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने स्कॉलरशिपची माहिती वेबसाइटवर देण्यास सुरुवात केली आहे.

दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप घेण्याची अंतीम मुदत ३१ ऑगस्ट असून सध्या केवळ ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येणार आहेत. हे अर्ज भरण्यासाची सोय पालिकेने sdd.punecorporation या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सहकार’ निवडणुकांना मुदतवाढ

$
0
0

सहकार क्षेत्रातील काँग्रेसच्या प्रस्थापितांना धक्का देण्याची ८चाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य बँकेच्या संचालक मंडळाच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 'अ' वर्गातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ देण्याची शक्कल राज्य सरकारने लढविली आहे. ही चौकशी पूर्ण करून सहकार क्षेत्रातील दोन्ही काँग्रेसच्या प्रस्थापितांना धक्का देण्याचा बेत त्यामागे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यातील 'अ' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. सहकार कायदा बदलण्यात आल्यानंतर राज्यात सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि ठराविक मुदतीमध्ये सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. ३१ जुलैपर्यंत सर्व संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अॅफिडेव्हिट सरकारने कोर्टात सादर केले होते. गेल्या काही महिन्यांत राज्यातील ड, क आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व संस्थांचे प्रतिनिधी अ वर्गातील संस्थांमध्ये सदस्य असतात. त्यामुळे या निवडणुका झाल्यानंतर अ वर्गातील संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज हाती घेण्यात आले होते. 'अ' वर्गात प्रामुख्याने साखर कारखाने; तसेच राज्य बँकेसारख्या संस्थांचा समावेश होतो. मात्र, राज्य बँकेच्या संचालक मंडळाची चौकशी सुरू आहे. ही चौकशी काही काळातच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, तसेच दोन्ही काँग्रेसमधील बड्या नेत्यांचा समावेश आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर या नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का बसण्याचा संभव आहे. त्यानंतर राज्य बँकेची निवडणूक घेतल्यास फायदा होऊ शकेल, असा मतप्रवाह सत्ताधारी गोटात आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपची चाल

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची सत्ता घालविण्यात भाजपला यश आले असले, तरी सहकार क्षेत्रात या दोन्ही काँग्रेसचा वरचष्मा टिकून आहे. त्यामुळे या क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी भाजपच्या वतीने हा प्रशासकीय डाव टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात स्वाइन फ्लूने ४९ जणांचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये आणखी एका पेशंटचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्यामुळे जानेवारी ते आतापर्यंत शहरात ९५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकूण मृत्यूपैकी पुण्यात ४९, पुणे जिल्ह्यात ३८, तर पिंपरी चिंचवडमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात आतापर्यंत पाच हजार ९७१ जणांना लागण झाली आहे. त्यापैकी ५८६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात दोन जणांना नव्याने लागण झाली आहे, तर सहा जणांना स्वतंत्र कक्षात उपचार देण्यात येत आहेत. आणखी नऊ जणांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

'दरवर्षी जुलै, ऑगस्टमध्ये वातावरणात बदल होतो. मात्र, यंदा जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक महिन्यात स्वाइन फ्लूचे पेशंट आढळले आहेत. त्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूचे पेशंट वाढले आहेत. वातावरणातील बदलामुळे या वर्षी संपूर्ण देशात पेशंटना सर्वाधिक लागण आणि मृत्यू झाल्याचे आढळले आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रापेक्षा मे महिन्यापर्यंत अधिक मृत्यू झाले आहेत. वेगाने हा आजार पसरला आहे. त्यामुळे लागण होत आहे,' अशी माहिती आरोग्य विभागाच्या साथरोग विभागाचे डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांत लांबलेल्या संपाच्या दिशेने वाटचाल

$
0
0

१९९०मध्ये झाला होता शंभर दिवसांचा संप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मधील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांचा संप आता सर्वांत लांबलेल्या संपाचा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. संस्थेच्या इतिहासात १९९०मध्ये तब्बल शंभर दिवस चाललेला संप मोठा संप ठरला होता. या पार्श्वभूमीवर, सध्या सुरू असलेल्या संपाचे काय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळाच्या विरोधात १२ जूनपासून विद्यार्थ्यांचा संप सुरू आहे. सरकारकडून विद्यार्थांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, विद्यार्थीही मागे हटण्यास तयार नाहीत. प्रभारी संचालक प्रशांत पाठराबे यांनी विद्यार्थ्यांवर कारवाई सुरू केल्याने संपाला वेगळे वळण मिळत आहे. त्यामुळेच सध्याचा संप १९९०मध्ये झालेल्या संपाच्या दिशेने जाणार असल्याची चर्चाही इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे.

अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकावरून १९९०मध्ये विद्यार्थ्यांनी संप पुकारला होता. त्यावेळच्या स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि विद्यमान प्राध्यापक रवी डावला यांनी त्या संपाच्या आठवणींना उजाळा दिला. 'त्यावेळी वेळापत्रकावरून वादविवाद सुरू झाले होते. विद्यार्थ्यांना चित्रीकरणाच्या तयारीसाठी काहीच वेळ ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे त्या वेळापत्रकावर विद्यार्थी समाधानी नव्हते. वेळापत्रकासह काही प्रशासकीय अडचणीही होत्या. बऱ्याचदा निवेदने देऊनही काही होत नसल्याने संप पुकारण्यात आला. त्याचवेळी के. जी. वर्मा हे आयएएस अधिकारी संचालक म्हणून दाखल झाले. त्यांनी तातडीने सूत्रे हातात घेतली. काही चांगले बदलही केले. मात्र, वेळापत्रकाबाबत ते काहीच कार्यवाही करत नव्हते. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत त्यांची भूमिकाही आठमुठी होती. त्यामुळे वर्मा यांना हटवा, अशीही मागणी जोर धरू लागली. संप पुकारून आम्ही दिल्लीत मंत्रालयात चर्चेसाठी गेलो. तिथे एनएसडी, जमिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह आंदोलन झाले. हबीब तन्वीर यांच्यासारखी मान्यवर मंडळी त्यात सहभागी झाली होती,' असे डावला सांगत होते.

'अथक प्रयत्नांतून शंभर दिवस संप चालला. त्यानंतर नियामक मंडळाचे अध्यक्षपदी श्याम बेनेगल आले. त्यांनी मध्यस्थी करून संप मिटवला. वेळापत्रकाचा प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी सोडवला. मात्र, वर्मा यांना हटवण्याची मागणी काही मान्य झाली नाही. संचालक कोण असावा हे विद्यार्थी ठरवू शकत नाही, असे सरकारने सांगितले. संप मिटल्यानंतर संस्था तात्पुरती बंद करण्यात आली. तीन महिने सर्वांना घरी पाठवण्यात आले,' अशी आठवण त्यांनी सांगितली. आमच्या संपात दहा विद्यार्थी सहभागी झाले नव्हते. त्यांनी नियमितपणे लेक्चर्स, प्रोजेक्ट्स पूर्ण केले.

'आता सुरू असलेल्या संपाचे कारणच वेगळे आहे. विद्यार्थ्यांचा प्रक्रियेला विरोध आहे. गेल्या पंधरा वर्षांत संस्थेत संप झाला नव्हता. आमच्यावेळी सुमारे शंभर विद्यार्थी होते. आता २५० आहेत. त्यामुळे जास्त दिवस संप होणार नाही, असे वाटत होते. प्रत्यक्षात, हा संप बराच मोठा झाला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत फार बदल झालेला नाही,' असे निरीक्षणही डावला यांनी नोंदवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्रभूषण’ विरोधात लोकभूषण

$
0
0

ज्येष्ठ महिला शाहीर अनुसया शिंदे यांना पहिला पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्याची तयारी सुरू असतानाच त्याला प्रत्युत्तर म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बदनामीविरोधी कृती समितीने महाराष्ट्र लोकभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. पहिला पुरस्कार ज्येष्ठ महिला शाहीर अनुसया शिंदे यांना २९ ऑगस्ट रोजी मुंबईत दिला जाणार आहे.

सत्यशोधक क्रांती दलाचे किशोर ढमाले यांनी महाराष्ट्र लोकभूषण पुरस्काराबाबत माहिती दिली. प्रा. प्रतिमा परदेशी, श्रीमंत कोकाटे व दीपक गिरमे आदी या वेळी उपस्थित होते.

'महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निषेधार्थ लोकभूषण पुरस्कार देण्यात येणार असून, शिंदे या खऱ्या शिवशाहीर आहेत. शिंदे यांनी अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र भूषण सोहळा राजभवनात आटोपशीरणे उरकण्याचा सरकारी प्रयत्न हा आमचा नैतिक विजय आहे. महाराष्ट्र भूषण त्यांना लखलाभ असो. यापुढील काळातही शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या जाणार आहेत. तर बुधवारी पुण्यात समितीच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा निषेध करण्यात येईल,' असे ढमाले यांनी सांगितले.

पुरंदरे यांना वाढता पाठिंबा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघासह विविध ब्राह्मण संघटनांनी पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास पाठिंबा दिला आहे. महासंघासह विविध ब्राह्मण संघटनांनी पुरंदरे यांना पुरस्कार देण्यासाठी पाठिंबा दिला आहे. तर्कशुद्ध इतिहास लेखन करण्याच्या महाराष्ट्रातील उत्तुंग परंपरेचा हा गौरव असल्याचे विविध संस्था-संघटनांनी पत्रकात नमूद केले आहे.

विरोधाला न जुमानता सरकारने हा पुरस्कार द्यावा, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, रविकिरण साने, विश्वजित देशपांडे, भालचंद्र कुलकर्णी, अंकित काणे, काका धर्मावत व प्रकाश दाते यांनी केली आहे. तसेच सूर्यकांत पाठक, फत्तेचंद रांका, राहूल सोलापूरकर, आनंद सराफ, सागर देशपांडे, अॅड.प्रताप परदेशी, पराग ठाकूर व ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यासह स्वरूप वर्धिनी, राजे शिवराय प्रतिष्ठान, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आदी संस्था-संघटनांनी पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास पाठिंबा दर्शवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळ १४० रुपये किलो

$
0
0

हरभरा डाळ, मूगडाळीचे दरही गगनाला भिडले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने दिलेली ओढ, वाया गेलेल्या पेरण्या, सट्टेबाजार आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना डाळी खरेदीची नसलेल्या मर्यादा यामुळे बाजारात डाळीचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचे भाव गगनाला भिडले आहेत. क्विंटलमागे तूरडाळ ६०० रुपये, मूगडाळीच्या दरात २०० रुपये, तर हरभरा डाळीत ३०० रुपयांनी वाढ झाल्याने सामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.

गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या डाळींच्या बाजारभावाने सामान्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे किचनमधून वरण, आमटी, मूगभजी सारख्या वारंवार केल्या जाणाऱ्या पदार्थांची चलती कमी झाली आहे. पण हॉटेलचालकांकडून सांबर असो की मूगभजी अथवा दाल फ्रायसाठी तूर डाळ, मूग डाळींना नेहमीच मागणी वाढलेली आहे. टप्प्याटप्प्याने डाळींचे दर कमी जास्त होत असताना सोमवारी डाळींचे दर गगनाला भिडले आहेत.

'गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. यंदाच्या वर्षी पाऊस फारसा झाला नाही. त्यामुळे पेरण्या वाया गेल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकात तूर डाळीचे तर मध्य प्रदेशातून हरभरा डाळ, मसूरडाळ, उडीद डाळीचे उत्पादन घेतले जाते. खानदेश, राजस्थानातून मूग डाळ, मटकीचे उत्पादन घेतले जाते. जूनमध्ये या भागात चांगला पाऊस झाला. सध्या मराठवाड्यात पाऊस नसल्याने तुरीची पेरणी झाली नाही. राजस्थानात काही भागात पाऊस, तर काही भागात त्याने दडी मारली. सट्टेबाजाराच्या चढ उतारामुळे डाळींचे दर वाढले आहेत. तूर डाळीमध्ये क्विंटलमध्ये ६०० रुपये, मूग डाळीमध्ये २०० रुपये तर हरभरा डाळीत ३०० रुपयांनी वाढ झाली आहे,' अशी माहिती डाळींचे व्यापारी नितीन नहार यांनी 'मटा'ला दिली.

महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना धान्य, डाळी खरेदी करण्याच्या मर्यादा सरकारने आखून दिल्या आहेत. मात्र परदेशातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांना त्या मर्यादा नाहीत. त्यामुळे डाळींचा तुटवडा भासत असताना या कंपन्यांनी डाळींची मोठ्या प्रमाणात पूर्वीच खरेदी केली होती. त्यामुळे त्यांना चांगले दर मिळत आहेत. दर वाढल्याने तूर डाळीला किलोसाठी १२५ ते १४० रुपये मोजावे लागणार आहेत. र मसूरडाळ ८२ ते ८३ रुपये, मूगडाळ ८५ ते ९० रुपये, हरभरा डाळ ५८ ते ६२ रुपये, उडीदडाळ १००ते १२० रुपये किलोसाठी द्यावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FTIIच्या चार विद्यार्थ्यांना अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री फिल्म ऐंड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या कॅम्पसमध्ये प्रवेश करून १७ विद्यार्थ्यांपैकी चार जणांना अटक केली आले आहे. पोलिसांनी मध्यरात्री १.१५ वाजता कॅम्पस प्रवेश करत ही कारवाई केली. या विद्यार्थ्यांवर बेकायदेशीररित्या एकत्र येणे यासह अनेक आरोप या विद्यार्थ्यांवर ठेवले आहेत.

अन्य विद्यार्थ्यांच्या संदर्भात अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. अन्य विद्यार्थी या वेळी कॅम्पसमध्ये नसल्याचे समजते. ज्या १७ विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आले आहे यामध्ये तीन मुलींचा देखील समावेश आहे. मात्र मुलींना अटक करण्यात आलेली नाही. एफआयआरमध्ये अन्य ३० विद्यार्थ्यांचे देखील नाव असल्याचे कळते.

अटकेत असलेल्या विद्यार्थ्यांना डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात एका पोलीस जीपमधून नेण्यात आले. काही वेळातच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि काही फॅकल्टी मेंबर्स पोलीस ठाण्यात दाखल झाले. जेव्हा पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईबद्दल विचारण्यात आले त्यावेळी आपण केवळ आदेशाचे पालन केल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे कळते. सोमवारी रात्री ६ तास घेराव घालणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात संस्थेचे संचालक प्रशांत पाथराबे यांनी तक्रार केली दाखल केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आल्याचे कळते.

विद्यार्थ्यांनी प्रशांत यांना घातलेला घेराव हा एका प्रशासकिय निर्णयाचा विरोध होता. संस्थेकडून २००८च्या विद्यार्त्यांचे अपूर्ण प्रोजेक्ट तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हा प्रकार तर्कहीन, अयोग्य असल्याचे म्हणत संचालकांनाच घेराव घातला आणि तोपर्यत त्यांची सुटका करण्य़ात आली नाही जोपर्यंत प्रशांत यांनी मंगळवार सकाळ पर्यंत प्रोजेक्ट तपासणी थांबवण्याचे आश्वासन दिले नाही.
या विद्यार्थ्यांवर कलम १४७ (दंगा), १४३, १४९ (बेकायदेशीररित्या जमाव), ३५३ (सरकारी कामात अडथळा आणने), ३४१ (चुकीचा हस्तक्षेप) आणि ३२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एफटीआयआयचे विद्यार्थी मागील ६९ दिवसांपासून संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात संपावर गेले आहेत.


डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर एफटीआयआयचे विद्यार्थी



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FTII: पाचही विद्यार्थ्यांना जामीन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांना घेराव घातल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही विद्यार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

एफटीआयआय अध्यक्षपदी करण्यात आलेल्या गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात संस्थेतील विद्यार्थ्याने आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. गेल्या ७१ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांवर मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी कारवाई केली. रात्री १ वाजून १५ मिनिटांनी पोलिसांनी संस्थेच्या कॅम्पसमधून पाच आंदोलक विद्यार्थ्यांना अटक केली. संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला होता. याबाबत पाठराबे यांच्या तक्रारीवरूनच ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या पाचही विद्यार्थ्यांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्यावतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पाच विद्यार्थ्यांना अटक करतानाच अन्य ४२ विद्यार्थ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अटकनाट्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करीत विद्यार्थ्यांनी ६९ दिवसांपासून पुकारलेल्या संपात अखेर बुधवारी 'अॅक्शन' घडली. संचालकांना घेराओ घालून सरकारी कामकाजात अडथळा आणला आणि तोडफोड केली, हे आरोप लावून पाच विद्यार्थ्यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. नंतर त्यांना शिवाजीनगर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच, इतर विद्यार्थ्यांनादेखील अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

या अटकसत्राचे देशभरात पडसाद उमटले असून, राहुल गांधी यांच्यापासून दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांची बाजू घेत सरकारकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, माहिती व प्रसारण खात्याची तीन सदस्यांची समिती आजपासून संस्थेच्या पाहणीदौऱ्यावर येत आहे. दुसरीकडे, आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भातील मतभेदांवरून विद्यार्थ्यांनी मंगळवारी दिवसभर संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांना घेराओ घातला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत हा राडा सुरू होता. त्यापाठोपाठ पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अटक केली. आम्ही गुन्हेगार वा दरोडेखोर नाही. त्यामुळेच, मध्यरात्री संस्थेत घुसून पोलिसांनी अटक करण्याची गरज नव्हती. तसेच, आमच्याकडून कोणतीही तोडफोड झाली नसून पोलिसांनीच मारहाण केली, असा दावा विद्यार्थ्यांनी केला; परंतु अंतर्गत मूल्यमापनासंदर्भातील आडमुठे धोरण सोडण्याची कोणतीही तयारी त्यांनी दर्शवली नाही.

देशभर राजकीय पडसाद...

'मोदीजी, संस्थेतील आंदोलक विद्यार्थी आहेत, गुन्हेगार नव्हे. दुर्लक्ष, नोटीस आणि अटक, असाच मोदी सरकारचा कारभार आहे,' अशा शब्दांत ट्विट करून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना दिलेला पाठिंबा अधोरेखित केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांना दिल्लीचे दरवाजे खुले केले. अभ्यास-फिल्ममेकिंगसाठी दिल्लीत सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ, असे सांगून विद्यार्थ्यांना सहानुभूती दर्शवली. तसेच, मोदी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातमधील ठगाकडून तीन कोटी रुपये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुंतवणूक केलेली रक्कम महिन्याभरात दीडपट करण्याचे आमिष दाखवून नऊ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ठगाला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्याच्याकडून तीन कोटी सात लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

कौशल इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक कौशल विनोदकुमार ठाकर (३३, सध्या रा. इंद्रमणी हाउसिंग सोसायटी, चंदननगर, मूळ रा. सुरेंद्रनगर, गुजरात) या ठगाला अटक करण्यात आली आहे. त्याने गुंतवणूक केलेली रक्कम ३० दिवसांत दीडपट करण्याचे आमिष दाखवले होते. तसेच, गुंतवणूक केलेली मूळ मुद्दल परत गुंतवणूक करण्यात येईल आणि सहा महिन्यांनी ती पुन्हा देण्यात येईल, अशा बहाणा केला होता. वेगवेगळ्या २५ नागरिकांनी त्याच्याकडे नऊ कोटी ३२ लाख रुपयांची रक्कम गुंतवली. त्यातील पाच कोटी रुपये हे इतरांकडून कर्ज घेऊन गुंतवण्यात आले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ जय जाधव यांनी दिली.

ठाकर हा बलसाड येथील असल्याचे समजले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने त्याला तेथून अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने बंडगार्डन येथील एका सोनाराकडे सोने खरेदीसाठी तीन कोटी सात लाख रुपये ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यानुसार सोनाराकडून ती रक्कम जप्त केली आहे. ठकार हा आपली कंपनीतर्फे सीमाशुक्ल खात्याने पकडलेले सोने, चांदी, तांबे, 'टीव्ही', 'एलईडी', मोबाइल, 'एसी' विकत घेवून त्याची विक्री केली जाते, असे नागरिकांना सांगत होता.

निरीक्षक राम जाधव, सहायक निरीक्षक राजेश रामाघरे, कर्मचारी मोरेश्वर इनामदार, सचिन गायकवाड, राजेंद्र पुणेकर, विद्याधर निश्चित आणि गणेश महाडिक यांच्या पथकाने आरोपीबाबत सखोल माहिती काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑफलाइन प्रवेशावरून कोर्टाने फटकारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीचा एकही प्रवेश 'ऑफलाइन' झाला नसल्याचा शिक्षणखात्याचा दावा मुंबई हाटकोर्टाने फेटाळून लावला आहे. इतकेच नव्हे, तर अकरावी प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील शासननिर्णयाचे पालन झाले नसल्याचेदेखील स्पष्ट केले आहे. ऑफलाइन प्रवेश बेकायदा आहे, असे प्रधान सचिव नंदकुमार यांनी स्पष्ट केले होते. त्या न्यायाने पुण्या-मुंबईतील ऑफलाइन प्रवेश हायकोर्टाच्या निर्णयानुसार बेकायदा ठरत आहेत.

अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेविषयी वैशाली बाफना यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना हायकोर्टाने ५ ऑगस्टला आपली भूमिका स्पष्ट केली होती. हायकोर्टाचे लिखित आदेश मिळाल्यानंतर, बुधवारी त्यामधील बारकावे समोर आले. अकरावीच्या पुण्यातील सहाव्या फेरीचे धोरण आज जाहीर केले जाणार आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार आता त्या संदर्भात कोणते धोरण स्वीकारताना प्रवेश समितीची कसरत होणार आहे.

'ऑनलाइन प्रक्रियेमुळे आपल्याला दूरवरील कॉलेज मिळाले आहे. त्यामुळे ऑफलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून नव्याने प्रवेश द्यावेत,' हा विद्यार्थी-पालकांनी केलेला दावा हायकोर्टाने निराधार ठरविला आहे. पहिल्या काही फेऱ्यांनंतर पुणे-मुंबईत ऑफलाइन प्रवेशाला परवानगी दिली गेल्याचेही हायकोर्टाने निदर्शनास आणून दिले आहे.

आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींसाठी सहावी फेरी घेण्याचा निर्णय पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी घेतला होता. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश विषयीचा २८ मे २००९ च्या सरकारी आदेशाचा विचार करता, विद्यार्थ्यांच्या अशा एखाद्या विशिष्ट गटापुरताच असा निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीला वा प्रवेश प्रक्रियेचे अध्यक्ष असणाऱ्या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना नाही, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रक्रियेत सरकारी आदेशांची पायमल्ली होत असल्याचे निरीक्षणही हायकोर्टाने नोंदविले आहे.

हायकोर्टाचे आदेश

राज्य सरकारचा अकरावी प्रवेशाबाबतचा २५ मे २००९ रोजीचा शासननिर्णय पाळण्यात आलेला नाही

गेल्या तीन महिन्यांमध्ये कोर्टासमोर आलेल्या विविध मुद्द्यांवर योग्य ते निर्णय घ्या

कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी हायकोर्टासमोर मांडा

सहाव्या फेरीत विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांनाच संधी देण्याचे निकष बदला. चालू शैक्षणिक वर्षामध्येच गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतील, अशी कटऑफची मांडणी करा

रिक्त जागा भरण्यासाठी योग्य मार्गानेच सहाव्या फेरीनंतरची प्रवेशप्रक्रिया राबवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समुद्र गुप्त कश्यप यांना भूपेन हजारिका पुरस्कार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

ईशान्य भारतातील राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सरहद संस्थेच्यावतीने दिला जाणारा 'भूपेन हजारिका पुरस्कार' आसाममधील ज्येष्ठ पत्रकार समुद्र गुप्त कश्यप यांना जाहीर झाला आहे.

२२ ऑगस्ट रोजी एस. एम. जोशी फाउंडेशन नवी पेठ, पुणे येथील एका कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सरहद संस्थेच्यावतीने २०१२ पासून हा पुरस्कार देण्यात येत असून याआधी दिग्दर्शक जाहनु बरूआ, नाट्यकर्मी प्रा. रतन थिय्याम यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जाहनु बरूआा यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भरत’ झालं जिवंत!

$
0
0

पुणे टाइम्स टीम

पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची 'ओ जीवान्' ही एकांकिका वऱ्हाडातून आलेल्या कवीचा प्रवास उलगडते. वाल्मिकीमान या प्रसिद्ध कवीनं अल्लड वय असताना केलेली एक चूक त्याच्या मनावर खोलवर परिणाम करते आणि या चुकीची जाणीव होऊन स्वतःच स्वतःचं अस्तित्त्व शोधून त्यानं मिळवलेलं यश यावर ही एकांकिका भाष्य करते. यातील वऱ्हाडी भाषेचा वापर लक्षात राहण्यासारखा होता.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (दि. १८) या एकांकिकेसोबतच एच्.व्ही.देसाई (सब बंद) आणि मराठवाडा मित्र मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय (बिळीप) या तीन एकांकिकांचं सादरीकरण झालं. पुरुषोत्तमच्या निमित्तानं 'अरे आव्वाज कुणाचा, अरे करंडक कुणाचा,' यांसारख्या आरोळ्यांनी दुमदुमणारं भरत जिवंत होतंय.

एच्.व्ही.देसाईनं सादर केलेली 'सब बंद' ही एकांकिका विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर घडते. या विमान अपघातात अनोळखी ठिकाणी अडकलेल्या तीन व्यक्तींची (हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन) जगण्यासाठी धडपड यावर ही एकांकिका होती. 'बिळीप' ही एकांकिका सुधा मूर्ती यांच्या मूळ कथेचं नाट्यरूपांतर होती. एका सुंदर प्रस्थापित अभिनेत्रीला अचानक कोड होतो. यात तिचा डॉक्टर नवराही तिची साथ सोडतो. मग सुरू होतो एकटीचा प्रवास.

चौथ्या दिवशी (दि. १९) सुरुवातीला विद्या प्रतिष्ठान आभियांत्रिकी महाविद्यालयाची 'उडणारं घर' ही एकांकिका सादर झाली. कमी प्रॉप्समध्ये सहभागींनी संपूर्ण विषय मांडला होता. मानवी स्थलांतर, त्यात होणारी जगण्याची परवड, पैशासाठी धडपड, त्याबरोबर आलेली कौटुंब‌िक जबाबदारी यामुळे कसलंही काम करावं लागतं याची जाणीव या एकांकिकेनं करुन दिली. 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फार्मेशन टेक्नोलॉजी'नं 'आंधळे चष्मे' ही एकांकिका सादर केली. यामध्ये मार्क्सवाद आणि चंगळवाद हे दोन पैलू दाखवण्यात आले. कलाकार चांगले असूनही हे नाटक फारसं फुलू शकलं नाही. तिसरी एकांकिका होती, ती मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाची '२४ बाय ७'. भरपूर प्रॉप्सचा केलेला उत्तम उपयोग, कथा, नेपथ्य या सगळ्यानं ही एकांकिका परिपूर्ण होती. अतिक्रमणाच्या गर्त्यात आलेलं गॅरेज वाचवण्याची तरुणाची धडपड, त्यासाठी सरकारी व्यवस्थेला सामोरं जावं लागणं, कुटुंबाची फरफट यावर त्यात भाष्य करण्यात आलंय.

(संकलनः पद्माक्षी घैसास, अश्विन फडके)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सादरीकरणाला तरतरी आणणारी खाऊगल्ली

$
0
0

पुणे टाइम्स टीम

सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा जल्लोषात सुरू आहे. इथं अभिनय कलेतील नैपुण्य पणाला लागलेलं असतं. संध्याकाळच्या गारेगार वातावरणात रंगणाऱ्या या स्पर्धेदरम्यान स्पर्धक मुलं शोधात असतात, ती गरमागरम पेयाच्या. सादरीकरणाचा जोश अजून वाढवणारं आणि पोटाला थोडं आधार देणारं असं काही आता भरत नाट्य मंदिरजवळच मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

कवितांच्या प्रांतात भ्रमंती करणाऱ्या वलय मुळगुंद या तरुणानं 'कोजागरी दूध कट्टा' पावन मारूती चौकात अमूल स्वीटपाशी नुकताच सुरू केला आहे. चॉकलेट मिल्कशेक किंवा गुलकंद लस्सीची चव तर आत्तापर्यंत आपल्यापैकी अनेकांनी विविध ठिकाणी चाखली असेल. मात्र, घरगुती मसाला आणि दूध एवढ्याच दोन पदार्थांच्या मिश्रणातून सुरू झालेल्या या दूध कट्ट्यावर मसाला दुधाचा आस्वाद घ्यायलाच हवा.

पाण्याचा एक थेंबही न मिसळता तयार होणाऱ्या या दूध कट्ट्याचं वैशिष्ट्य म्हणजे, दूध पिता पिता आस्वादकाला दररोज दर्जेदार गाणीही ऐकायला मिळतील. या मैफलीत कधी अमीन सयानी यांची बिनाका गीतमाला, कधी मदनमोहन यांची गाणी, तर कधी पं. भीमसेन जोशी यांच्या संतवाणीचा अनुभवही रसिकांना घेता येणार आहे.

तशी 'भरत'च्या जवळ 'पुरुषोत्तम'च्या निमित्ताने खाऊगल्ली भरत असते. त्याचा एक भाग म्हणजे 'कोजागरी दूध कट्टा' आहे; पण मसाला दुधाव्यतिरिक्तचे पर्यायही इथं उपलब्ध आहेत. 'भरत'वरून थोडंसं उजवीकडे वळून पुढे गेलं, की हरिश्चंद्र डेअरी आहे. तिथं चॉकलेट मिल्कशेक, लस्सी, ताक, रोझ मिल्कशेक असे विविध पर्याय रसना तृप्ती करण्यासाठी उपलब्ध आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी 'आव्वाज कुणाचा'चा जल्लोष अधिक मोठ्या आवाजात होण्यासाठी या पर्यायांचा विचार करायला काहीच हरकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जॉब फेअर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जेटकिंग' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'तर्फे आयोजित 'जॉब फेअर'मध्ये सुमारे २००० उमेदवार सहभागी झाले आहेत. या उमेदवारांपैकी सुमारे ३०० जणांची आयटी आणि आयएमएसमधील विविध जागांसाठी अंतिम निवड यादी तयार करण्यात आली आहे. सहभागी उमेदवारांपैकी ११०० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील ३०० उमेदवारांची त्यांच्या कामगिरीनुसार अंतिम यादी तयार करण्यात आली. इतर उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती कंपन्यांकडे सुपूर्द केली. त्यांना गरजेनुसार, अंतिम निवडीसाठी संपर्क करण्यात येणार आहे.

एचपी-जॅबिल, कॅपजेमिनी, पीसीएस टेक्नॉलॉजी, नेटक्रॅकर, अडेक्को, आयसोर्स, अॅक्सेल फ्रंटलाइन, ओपन व्ह्यू सोल्युशन्स आदी कंपन्या जॉब फेअरमध्ये सहभागी झाल्या होत्या. 'भारत हे नेटवर्किंग आणि आयएमएससाठीचे मुख्य स्थान बनत आहे. त्यामुळे आयटीमधील गुणवान मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे. आयटी हा तरुणांसाठी एक उत्तम करिअरमार्ग आहे,' असे 'जेटकिंग'चे संचालक सिद्धार्थ भारवानी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संस्कृत प्रचारासाठी संस्कृतभारती प्रयत्नशील

$
0
0

पुण्यात दहा हजार घरांशी संपर्क साधण्याचे उद्दिष्ट

म. टा. प्रतिनिधी पुणे

संस्कृत भाषेला घरोघरी पोहोचवण्यासाठी संस्कृतभारती या संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने रविवारी (२३ ऑगस्ट) 'गृहं गृहं संस्कृतं' हे अभियान राबवण्यात येणार असून, किमान दहा हजार घरांमध्ये जाऊन कार्यकर्ते संस्कृत भाषेचे महत्त्व सांगणार आहेत.

संस्कृत भाषेला मोठा इतिहास आहे. प्रत्येक विषयातील ज्ञान या भाषेत उपलब्ध आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत संस्कृत भाषा जनसामान्यांमध्ये राहिली नाही. शिक्षणापुरतीच ती मर्यादित झाली. या भाषेला पुनरुज्जीवित करण्यासाठी संस्कृतभारती ही संस्था प्रयत्न करत आहे. 'गृहं गृहं संस्कृतं' या अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबात संस्कृत भाषेचे महत्त्व, संस्कृत शिकण्याच्या सोप्या पद्धती, भाषेविषयीचे समज-गैरसमज या बाबतल माहिती दिली जाणार आहे. तसेच थेट संवाद साधून त्यांना संस्कृत भाषेच्या या चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

संस्थेच्या मुक्ता मराठे यांनी या अनोख्या अभियानाविषयी माहिती दिली. 'संस्कृत भारती संस्थेच्या वतीने देशभरात 'गृहं गृहं संस्कृतं' हे अभियान राबवले जात आहे. पुण्यातील उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे. विविध क्षेत्रांतील व्यक्तींना संस्कृत शिकण्याची इच्छा असते, किंवा या भाषेबद्दल किमान उत्सुकता तरी असते. परंतु काही कारणाने त्यांना आपली इच्छा पूर्ण करता येऊ शकत नाही. या निमित्ताने संस्कृत संभाषणाच्या पुस्तिकांची विक्री, पत्रद्वारा संस्कृत अभ्यासक्रमाची माहिती असे अन्य उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. संस्कृत ही क्लिष्ट किंवा मृत भाषा नसून, आपल्या दैनंदिन व्यवहारातही ती सहपणे वापरता येऊ शकते, हा आत्मविश्वास त्यांना देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे,'' असे त्यांनी सांगितले. उपक्रमाविषयी अधिक माहिती आणि सहभागी होण्यासाठी ९८५०१७३४९०, ८७९३८५६६०४, ७७२००९१८३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही संस्थेच्या वतीने करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या राज वर्माला तीन लाखांची शिष्यवृत्ती

$
0
0

ब्रिटिश कौन्सिलतर्फे आयईएलटीएस शिष्यवृत्त्यांचे वितरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याचा विद्यार्थी राज वर्मा याला ब्रिटिश कौन्सिलतर्फे देण्यात येणारी 'आयईएलटीएस' शिष्यवृत्ती मिळाली आहे. याअंतर्गत यूकेमधील उच्च शिक्षणासाठी त्याला तीन लाख रुपये मिळाले आहेत. दर वर्षी एकूण दहा भारतीय विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा या शिष्यवृत्तीसाठी सुमारे एक हजार अर्ज आले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयावर इंग्रजीत निबंध लिहावा लागतो; तसेच परीक्षकांपुढे सादरीकरण आणि मुलाखत असे अन्य दोन टप्पेही पार पाडावे लागतात.
राज वर्मा या पुण्याच्या विद्यार्थ्याला लॉमधील पीएचडी करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल येथे प्रवेश मिळाला आहे. त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे त्याचा शिक्षणाचा खर्च भरून निघणार आहे. 'मी पीएचडीसाठी करत असलेल्या कोर्सनंतर मला शिक्षकी पेशात करिअर करायचे आहे,' असे राजने सांगितले.
ब्रिटिश कौन्सिलच्या संचालक (परीक्षा) साराह डेव्हराल, विभागीय संचालक शेरॉन मेमिस यांच्या हस्ते या शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात आल्या. सन २०१०पासून ब्रिटिश कौन्सिलतर्फे 'आयईएलटीएस' ही शिष्यवृत्ती दिली जाते आहे. आतापर्यंत ४०हून अधिक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी www.britishcouncil.in/ielts ही वेबसाइट पाहावी. अमेना अहमद, सुस्मिता डे, अरिजित घोष, श्वेता दाभोळकर, चक्षुदा मसिह, नव्या हेब्बर, राजरूपा दास, नमिता राजेश आणि सिंधू थिरुमलायस्वामी या इतर विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षिकेचे प्रसंगावधान; अपहरणाचा प्रसंग टळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

शिक्षिकेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. विवाहाला नकार दिल्याने परिचयातील तरुणाने दौंड येथून अन्य दोघांच्या मदतीने चारचाकी वाहनातून संबंधित शिक्षिकेचे अपहरण केले होते. तो गाडी घेऊन पुण्याच्या दिशेने चालला होता. संधी मिळताच यवत टोलनाक्यावर तरुणीने आपली सुटका करून घेतली. या प्रकरणी यवत पोलिसांनी असीम अस्लम जमादार (२४, रा. हडपसर), सुहास सुभाष हेगडे (२५), यावर इमदाद खान (२५, दोघे रा. एनआयबीएम, वानवडी) यांना अटक केली आहे.

संबंधित शिक्षिका बहीण-भाऊ व आईसह दौंड शहरात राहते. अपहरणाच्या आदल्या दिवशी आरोपी असीम जमादार याने रात्री उशिरा शिक्षिकेच्या आईच्या मोबाइलवर फोन केला व तुमच्या मुलीचे आपल्याशी लग्न लावा अशी गळ घालून धमकी दिली. दुसऱ्या दिवशी शिक्षिका तिच्या दुसऱ्या शिक्षिका असलेल्या बहिणीबरोबर नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता विद्यालयात गेली असता, असीम अन्य दोन मित्रांसमवेत तेथे आला व शाळेत गोंधळ करीन अशी धमकी त्याने दिली. आपण दौंडमधील समतानगर येथे नातेवाइकाशी थोडे बोलू असे सांगून त्याने संबंधित शिक्षिकेला धमकावून गाडीत बसण्यास भाग पाडले. त्याने गाडी दौंडच्या दिशेने न नेता पुण्याच्या दिशेला वळवली. पुढे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कासुर्डी येथे टोलनाक्यावर वाहनांच्या गर्दीमुळे गाडी थांबली असता, शिक्षिकेने प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर पळ काढला. तिच्या सुदैवाने तिथेच पोलिसांचे वाहन उभे होते. तिने तिथे जाऊन सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी तत्परतेने वाहनासह आरोपींना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीतील चोऱ्यांवर ‘वॉच’

$
0
0

भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसरात सध्या चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील अन्य भागातही धातूच्या वस्तूंची चोरी वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे पोलिसांनी आपला मोर्चा वळविला आहे. शहरातील सर्व भंगार व्यावसायिकांनी रजिस्टर नोंद ठेवण्याचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत.

शहरात 'एमआयडीसी'मध्ये वॉचमेनला मारहाण करून, लोखंडी, अॅल्युमिनिअम अथवा तांब्याच्या पट्ट्या, प्लेट चोरीला गेल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. त्यापैकी बहुतांश चोरीचे साहित्य कुदळवाडी-चिखली, थेरगाव, निगडी ओटास्कीम, रामनगर पिंपरी, काळेवाडी स्माशनभूमीमागे, बिजलीनगर-आनंदनगर येथील काही प्रमुख भंगार व्यापाऱ्यांना विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर आता छापासत्र हाती घेण्यात आले आहे. लघुउद्योजक संघटना आणि महापालिकेकडूनही भंगार चोरीच्या घटनांबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. केवळ एमआयडीसीच नाही. तर, शहरातील अन्य चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरातील बहुतांश भंगार व्यावसायिकांना राजकीय पाठबळ आहे. त्यामुळे आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. या सर्वांमुळे उद्योजक हवालदिल झाले होते. अनेक मोठ्या चोरीच्या घटनांमधील धातूचा माल हा भंगार व्यावसायिकांना विकल्याचे सांगितले जात असे. मात्र, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून देखली याकडे डोळेझाक केली जात होती. त्यामुळे उपायुक्त डॉ. तेलींकडून वरील कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. अनेकदा केवळ कायद्यातील पळवाटांमुळे भंगार चोरटे आपला उद्योग चालवत असल्याचे पोलिसांना लक्षात आले आहे. निगडी, पिंपरी, भोसरी, एमआयडीसी भोसरी या पोलिस ठाण्यांच्या अखत्यारित एमआयडीसी कंपन्या आहेत. तर, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वात जास्त भंगार व्यावसायिक आहेत. त्यामुळे याबाबत कडक धोरण सर्व वरिष्ठ निरीक्षकांनी अवलंबवावे असे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत.

'गस्त वाढवा'

एमआयडीसीमधील कामगारांना मारहाण करून लुटण्याचे प्रकार देखील अनेकदा घडत आहेत. त्यामुळे भंगार चोरीला आळा घालण्याबरोबरीनेच कामगारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी उद्योजकांच्या संघटनेने पोलिसांकडे केली आहे. दर महिन्याला पगाराच्या दिवशी एमआयडीसी भागात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी कामगारांमधून जोर धरत आहे.
.....

सर्व भंगार व्यावसायिकांना रजिस्टर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आमचे अधिकारी हे रजिस्टर चेक करणार आहेत. तसेच वेळप्रसंगी मी स्वतः कोणत्याही भंगाराच्या गोदामात जाऊन तपासणी करणार आहे. ज्या कंपनीतून विकत घेतले आणि ज्याला ते भंगार विकले याच्या रितसर पावत्या जर व्यावसायिकांकडे नसतील तर अशांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
- डॉ. बसवराज तेली, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच खंडणीखोरांना अटक

$
0
0

वारजे पोलिस आणि गुन्हे शाखेची तत्परतेने कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे येथील एका भंगार व्यावसायिकासह त्याच्या कामगाराचे अपहरण करून दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला होता. वारजे पोलिस आणि गुन्हे शाखेने तत्परतेने कारवाई केल्याने आरोपींनी व्यावसायिक आणि त्याच्या कामगाराला सासवड येथे सोडून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली.

नितीन ऊर्फ भावड्या निवृत्ती सकपाळ, स्व​प्नील राकेश चव्हाण, अभिषेक विकास लोणारे, संदीप संपत गोरे, धनंजय नागनाथ सूर्यवंशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आणखी तिघे आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती वारजे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने यांनी दिली.

मोहंमद समी अहमद (५५) आणि लेस मोहंमद बिस्मिल्ला (२५, दोघेही रा. रामभाऊ बराटे चाळ, वारजे गावठाण) अशी अपहरण झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी मेहबुल्ला मुख्तार अहमद (२७, वारजे) यांनी तक्रार दाखल केली. अहमद आणि बिस्मिल्ला मंगळवारी रात्री दुकानात झोपलेले असताना आरोपींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर बुधवारी सकाळी आठच्या सुमारास मेहबुल्ला यांच्या मोबाइलवर आरोपींनी फोन केला. 'तुमच्या वडिलांचे अपहरण केले आहे. दोन लाख रुपये तयार ठेवा,' अशी धमकी आरोपींनी दिली. ही तक्रार गुरुवारी दुपारी पोलिसांना समजली होती. त्यानुसार देशमाने यांच्या पथकाने तपास करून सायंकाळपर्यंत एक संशयित ताब्यात घेतला होता.

दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र जोशी आणि पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड वारजे पोलिस ठाण्यात गेले होते. या दोघांनी त्या संशयिताला चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने तोंड उघडले आणि अपहरणाची माहिती दिली. इतर आरोपींनी अहमद आणि बिस्मिल्ला यांना पानशेतला नेले असल्याचे त्याने सांगितले.

त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील, तसेच वारजे पोलिस ठाण्याचे पथक पानशेतला गेले; मात्र तेथून आरोपी त्या दोघांनाही घेऊन पसार झाले होते. पोलिसांनी तेथील एका संशयिताच्या घरी विचारपूस केली. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास अहमद आणि बिस्मिल्ला यांना सासवड येथे सोडले आणि पळ काढला. दोघांनीही सासवड पोलिस ठाणे गाठले आणि आपले अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यानुसार दोघांनाही सासवड येथून आणण्यात आले, असे जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images