Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एलबीटीच्या अखेरच्या महिन्यात ९८ कोटी जमा

$
0
0

चार महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत चारशे कोटींचा कर जमा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) जाळ्यातून बहुसंख्य व्यापाऱ्यांना सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने लागू करण्यापूर्वीच्या अखेरच्या महिन्यात पालिकेला कराद्वारे ९८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. त्यामुळे, आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत चारशे कोटींचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी पालिकेला पुन्हा करता आली.

एक ऑगस्टपासून राज्य सरकारने एलबीटी कायद्यात बदल केला. निवडणुकीपूर्वी व्यापाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार एलबीटीच्या उलाढालीची मर्यादा वाढविण्यात आली. पाच लाख रुपयांची मर्यादा थेट ५० कोटी रुपयांवर नेण्यात आल्याने ९५ टक्क्यांहून अधिक व्यापाऱ्यांना यापुढे एलबीटी भरावा लागणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, जुलै महिन्याचा एलबीटी पालिकेकडे जमा करणे आवश्यक होते. त्यानुसार, एलबीटी भरण्याची मुदत गुरुवारी संपली. या कालावधीत पालिकेला ९८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सरकारने एलबीटी चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी लागू केलेल्या अभय योजनेलाही ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने एलबीटीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पालिकेला गेल्या आर्थिक वर्षात एलबीटीतून दर महिन्याला सरासरी शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा पहिल्या तीन महिन्यांत तीनशे दहा कोटी प्राप्त करणाऱ्या पालिकेला जुलैचे ९८ कोटींचे उत्पन्न मिळाल्याने चार महिन्यांत पालिकेने ४१० कोटींचा टप्पा गाठला आहे. यापुढे मात्र एक ऑगस्टपासून एलबीटीतील बदलांमुळे पालिकेला नेमके किती उत्पन्न प्राप्त होणार, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकाच दिवशी सात ठिकाणी सोनसाखळ्या चोरल्या

$
0
0

सुमारे चार लाखांचे नुकसान; उपनगरे लक्ष्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागपंचमीदिवशी सोनसाखळी चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडला. मोशी, निगडी, पिंपरी, खडकी, भोसरी आणि वानवडी परिसरात या एका दिवसात सोनसाखळी हिसकावण्याचे तब्बल सात गुन्हे घडले. एकीकडे पोलिसांकडून सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, प्रत्यक्षात मात्र या चोरट्यांकडून थैमान घालण्यात येत आहे.

हे गुन्हे ज्या पद्धतीने घडले आहेत, ते पाहता इराणी टोळीचा यात हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या ठावठिकाण्याची माहिती घेतली जात आहे. तक्रारदारांकडून आलेल्या माहितीनुसार, यातील दोन घटना एकाच आरोपींनी केल्याचे वर्णन मिळाले आहे आणि इतर घटना दुसऱ्या आरोपींकडून करण्यात आल्या असाव्यात. 'सोनसाखळी चोरी हे झटपट पैसे मिळवण्याचे साधन ठरत असल्याने हे गुन्हे करण्याकडे चोरट्यांचा कल असल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. गुन्हे शाखा, तसेच पोलिस ठाण्यांकडून सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक झाले आहे. काही गुन्हेगारांकडे तपास सुरू असून, आणखी काही गुन्हे लवकरच उघडकीस येतील. याशिवाय सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत नवनवीन गुन्हेगारांचा समावेश ही पोलिसांच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरत आहे,' अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

सोन्याच्या दागिन्यांचे आज वाटप

सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना उघडकीस आणून आरोपींकडून चोरीचे काही दागिने जप्त करण्यात आले आहेत. या दागिन्यांचे मालकांना वाटप करण्याचा छोटेखानी कार्यक्रम आज (शुक्रवारी) आयोजित करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या हस्ते या दागिन्यांचे वाटप करण्यात येणार आहे. जवळपास ६५ तक्रारदारांना सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने देण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कसबा गणपती’च्या मुख्य विश्वस्तपदी महिला

$
0
0

गेल्या ६४ वर्षांच्या वादावर अखेर तोडगा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती ट्रस्टचा गेल्या ६४ वर्षांपासून सुरू असलेला वाद धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांच्या पुढाकाराने अखेर संपुष्टात आला आहे. पुजारी, विश्वस्तांमधील वाद मिटवून ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदाचा मान प्रथमच महिलेला देण्यात आला. संगीता ठकार यांच्या मुख्य विश्वस्तपदी नियुक्तीचे आदेशही सहआयुक्तांनी दिले.

ऐतिहासिक वारसा असलेल्या कसबा गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, या ट्रस्टच्या विश्वस्त तसेच पुजाऱ्यांमध्ये गेल्या ६४ वर्षांपासून वाद सुरू होता. 'विश्वस्त, पुजाऱ्यांमधील वादात कसबा गणपती ट्रस्टचा विकास खुंटला. देवस्थानाला मिळणाऱ्या उत्पन्नाचा अधिकार नेमका कोणाचा यावरून हा वाद होता. ट्रस्टला मिळणाऱ्या उत्पन्नाचा देवस्थानच्या विकासासाठी वापर न होता परस्पर पुजारी वाटून घेत होते. त्यामुळे धर्मादाय सहआयुक्तांनी यात लक्ष घातले. या संदर्भात सर्व विश्वस्त, पुजाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकण्यात आले. त्यानंतर उत्पन्नाची काही रक्कम पुजाऱ्यांना देऊन उर्वरीत रक्कम देवस्थानाच्या विकासासाठी वापऱण्याचे आदेश देण्यात आले,' अशी माहिती सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.

कसबा गणपती ट्रस्टचे नवे विश्वस्त मंडळ तयार करण्यात आले. त्याची घटना, नियमावली तयार करून मंजुरी देण्यात आल्याचेही जगताप यांनी नमूद केले.
..

ग्रामदैवत कसबा गणपती ट्रस्ट चालविताना देवस्थानचा विकास होत नसल्याचे निदर्शनास आले. विश्वस्तांमध्ये वाद असल्याने तसेच ट्रस्टला घटना, नियमावली नसल्याने ती करण्याला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे भविष्यात ट्रस्टचा कारभार सुरळित चालेल, अशी आशा आहे.
- शिवकुमार डिगे, धर्मादाय सहआयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुपी’वरील निर्बंधांना फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

$
0
0

गेल्या महिनाभरात १०५ कोटींची कर्जे वसूल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आर्थिक अडचणीत आलेल्या रुपी बँकेवरील निर्बंधांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत या निर्बंधांना मुदतवाढ देण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने गुरुवारी काढला. दरम्यान, गेल्या महिन्याभरात बँकेच्या थकित कर्जांपैकी १०५ कोटी रुपयांची वसुली मार्गी लागल्याची माहिती प्रशासकांनी दिली.

थकित कर्जांचे (एनपीए) वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या रुपी बँकेवर दोन वर्षांपूर्वी आर्थिक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे हजारो ठेवीदार-खातेदारांचे हाल सुरू झाले. बँकेचा तोटा मोठा असल्यामुळे विलीनीकरणही होऊ शकले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बँकेच्या थकित कर्जांच्या वसुलीसाठी एकरकमी परतफेड योजनेला (ओटीएस) मान्यता देण्यात आली. त्यानंतर कर्जवसुलीला गती आल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी दिली. ओटीएस लागू झाल्यानंतर बँकेला आतापर्यंत २७ दिवसांचा कालावधी (वर्किंग डेज) मिळाला. त्यामध्ये ४५ कोटी रुपयांची वसुली निश्चित झाली आहे. त्यापैकी दहा कोटी रुपये प्रत्यक्ष जमा झाले असून, उर्वरीत रक्कम एक ते सहा महिन्यांच्या मुदतीत जमा होणार आहे. तसेच अन्य शंभर प्रकरणांमध्ये वाटाघाटी पूर्ण झाल्या असून, त्यातून ७० कोटी रुपयांची वसुली होणार आहे, अशी माहिती त्यांनी अभ्यंकर यांनी दिली.

दरम्यान, वेगवेगळ्या ९७ कर्जप्रकरणांमध्ये बँकेकडे मालमत्ता तारण ठेवण्यात आल्या आहेत. त्या प्रकरणांमध्ये वसुली न झाल्यामुळे त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रियाही बँकेने सुरू केली आहे. त्यासाठी पुणे, रायगड आणि कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयांकडे अर्ज करण्यात आले आहेत. या प्रकरणी लिलाव करण्याची परवानगी लवकर मिळावी, यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट आणि सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडूनही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या मालमत्तांचे लिलाव करून २५९ कोटी रुपयांची वसुली करणे शक्य आहे, असे डॉ. अभ्यंकर यांनी सांगितले. ही पावले उचलण्यात येत असताना बँकेवरील निर्बंधांना एका वर्षाची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला होता. त्यावर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असून, पुढील प्रगती पाहून पुन्हा मुदतवाढीचा विचार करण्यात येणार आहे.

'हार्डशिप'चे ८९ कोटी अदा

दरम्यान, वृद्ध आणि गरजू ठेवीदार-खातेदारांना निकडीच्या काळात पैसे देण्याची (हार्डशिप) तरतूद आहे. ही प्रकरणे मान्य करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेने प्रशासकीय मंडळास दिले आहेत. त्यानुसार बँकेकडे २१ हजार ७०४ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी २० हजार ९८६ अर्ज मान्य करण्यात आले असून त्यातून ८९ कोटी रुपये ठेवीदारांना देण्यात आले आहेत. तसेच, येत्या गणेशोत्सवापूर्वी बँकेच्या ठेवीदारांची बैठक घेऊन वसुलीसाठी सहकार्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे डॉ. अभ्यंकर यांनी सांगितले.
..........

वेगवेगळ्या मार्गांनी रुपी बँकेच्या थकित कर्जांची वसुली आता गतीने सुरू आहे. त्यांत यश आल्यास येत्या सहा महिन्यांत बँक विलीनीकरणास (मर्जेबल) योग्य ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.
डॉ. मुकुंद अभ्यंकर, अध्यक्ष, , प्रशासकीय मंडळ ,रुपी बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडी रेकनर घटवा

$
0
0

'क्रेडाय'ने केली राज्य सरकारकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी आणि फ्लॅटच्या सध्याच्या किमती लक्षात घेता रेडी रेकनरचे दर कमी करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या 'क्रेडाय' या संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी मोकळ्या जमिनी, फ्लॅटचे वास्तव दर आणि रेडी रेकनरमध्ये फरक असल्याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.

बांधकाम क्षेत्राला मंदीचा फटका बसला आहे. रेडी रेकनरचे दर वास्तववादी नसल्याने आणि दस्तनोंदणी करताना 'एलबीटी'पोटी एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क घेतले जात असल्याने त्याचा नाहक बोजा ग्राहकांवर पडत आहे. या संदर्भात 'क्रेडाय' पुणे मेट्रो अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी, रेडी रेकनरचे दर कमी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केल्याचे सांगितले. 'शहरामध्ये काही ठिकाणचे रेडी रेकनकरचे दर, प्रत्यक्ष जमीन आणि फ्लॅटचे दर यामध्ये खूपच तफावत आहे. रेडी रेकनकरचे दर ठरविताना संबंधित ठिकाणी झालेल्या फ्लॅट विक्रीच्या दरांची सरासरी काढली जाते. मात्र, अशी सरासरी न काढता कमी दराने झालेली विक्री लक्षात घेऊन रेडी रेकनर ठरविणे आवश्यक आहे. रेडी रेकनर ठरविण्याची पद्धत शास्त्रीय नसल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना भुर्दंड बसतो,' असे कटारिया यांनी स्पष्ट केले.

मंदीमुळे शहरात काही ठिकाणी रेडी रेकनरच्या दरापेक्षा कमी भावाने फ्लॅटची विक्री होत आहे. परंतु, बांधकाम व्यावसायिकांना रेडी रेकनरच्या दरानेच मुद्रांक शुल्क भरावे लागत आहे. तसे न केल्यास इन्कम टॅक्सकडून विचारणा होते. रेडी रेकनरच्या दराबाबत नोंदणी व मुद्रांक विभागाकडे हे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच, राज्य सरकारलाही रेडी रेकनर कमी करण्याबाबत 'क्रेडाय'मार्फत पत्र देण्यात आले आहे, असेही कटारिया म्हणाले. रेडी रेकनरच्या दरावरून मुद्रांक शुल्क आकारणीमध्ये नागरिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी रेडी रेकनर ठरविताना संबंधित भागातील कमी दराने विकल्या गेलेल्या फ्लॅटचे दर ग्राह्य धरावेत, अशी मागणी करण्यात आल्याचेही कटारियांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांसाठी ‘आसाम’ सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आसाम प्रवासासाठी सुरक्षित राज्य असून, पायाभूत सुविधांनीही ते आता सुसज्ज झाले आहे. त्यामुळे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या आसामाचे आदरातिथ्य अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील मुख्यतः चोखंदळ पर्यटकांनी आवर्जून यावे, असे आवाहन आसाम पर्यटन विभागाचे संचालक मनोज कुमार देका यांनी बुधवारी केले.

'आसामध्ये सर्वाधिक संख्येने जाणाऱ्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. आसाममधील पर्यटकांमध्ये पहिला क्रमांक पश्चिम बंगालचा असून, त्या पाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षभरात आसामला ४६ लाख पर्यटकांनी भेट दिली असून, त्यातील २५ टक्के पर्यटक महाराष्ट्रातील होते. याशिवाय २५ हजार परदेशी पर्यटक भटकंतीसाठी आले होते. या वर्षभरात आम्ही देशांतर्गत पर्यटकांची संख्या दहा लाखांनी, तर परदेशी पर्यटकांची संख्या दहा हजारांनी वाढविण्याचे ध्येय निश्चित केले आहे,' असेही देका म्हणाले.

आसाम पर्यटन विभागातर्फे पुण्यातील पर्यटन कंपनी चालकांसाठी बुधवारी रोड शो आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त देका यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'आसाम पर्यटनासाठी सुरक्षित नाही, असा गैरसमज पसरला आहे. तो दूर करण्यासाठी आम्ही आता पर्यटन कंपन्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहेत. आसाममधील बंडखोरी संपुष्टात आली असून, हे राज्य प्रवासाकरिता सुरक्षित ठिकाण आहे. मुंबईहून गुवाहाटीला आता २ फ्लाइटस् तसेच २ रेल्वेगाड्या सुरू झाल्याने पुणेकरांसाठी प्रवास सोयीस्कर झाला आहे,' असेही देका म्हणाले.

रिव्हर क्रूझची वाढती क्रेझ

काझिरंगातील विपुल वन्यजीव, नद्या आणि समृद्ध निसर्गाबरोबरच धार्मिक पर्यटनाचे अनेक पर्याय आसाममध्ये पर्यटकांना उपलब्ध आहेत. अलीकडे काही वर्षांत आम्ही टी गार्डन आणि गोल्फ

टुरिझमवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात सध्या २४ गोल्फ कोर्स आहेत. मध्यभागी गोल्फ कोर्स त्याच्या चोहोबाजूला चहाचे मळे, त्यामध्ये वसलेले ब्रिटिशकालीन बंगले.. अशी रचना असलेली पर्यटनस्थळे आम्ही विकसित केली आहेत. याशिवाय ब्रह्मपुत्रा या विशाल नदीमध्ये रिव्हर क्रूझलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असेही देका म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायटी निवडणुकांचे सर्वेक्षण

$
0
0

फक्त ५६८ सोसायट्यांनी घेतल्या निवडणुका; सर्वेक्षणाला असहकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील निवडणुका घेण्यासाठी केवळ सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत शिल्लक असताना आतापर्यंत शहरातील केवळ ५६८ सोसायट्यांनीच आपली निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी सहकार विभागातर्फे सोसायट्यांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. परंतु, या सर्वेक्षणाला सोसायट्यांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचेही सहकार विभागातर्फे सांगण्यात आले.

आतापर्यंत सोसायटीच्या पातळीवर या निवडणुका होत असत. आता या निवडणूका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून होणार आहेत. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार या निवडणूका प्राधिकरणाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर 'मटा'ने सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण सोनावणे यांच्याशी संवाद साधून या विषयी माहिती घेतली.

'पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये मिळून साधारणतः साडेपंधरा हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. घटनादुरुस्तीनंतर या सोसायट्यांना ३० सप्टेंबरपर्यंत निवडणूका घेणे बंधनकारक आहे. यापैकी ५६८ सोसायट्यांनी आपली निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे', असे सोनावणे यांनी स्पष्ट केले.

'सहकार विभागाकडे सर्वच सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचे काम आहे. यापैकी गृहनिर्माण सोसायट्यावगळता अन्य सोसायट्यांच्या निवडणूका प्राधान्याने घेण्यात आल्या. यातील बंद किंवा कागदोपत्री असलेल्या सोसायट्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानंतर आता गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकांकडे अधिक लक्ष पुरविण्यात आले आहे.' 'सहकार विभागाचे कर्मचारी स्वतः सोसायट्यांमध्ये जाऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेत आहेत. या कर्मचाऱ्यांची आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची वेळ जमत नसल्याने ही माहिती मिळण्यास उशीर होत आहे. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्यास निवडणुकीची प्रक्रिया वेळेत पार पडेल', असे सोनावणे यांनी सांगितले.

सहकार्याची गरज

सहकार विभागातर्फे सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सोसायटीत निवडणूक प्रक्रिया झाली आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यात येत आहे. सहकार विभागाचे कर्मचारी सोसायट्यांमध्ये जाऊन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून एक फॉर्म भरून घेत आहेत. सोसायट्यांचे रेकॉर्ड तपासल्यानंतर हे रेकॉर्ड नियमांनुसार नसेल, किंवा सोसायटीने ऑडिट केलेले नसेल व निवडणुकाही घेतलेल्या नसतील तर सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना मार्गदर्शनही केले जात आहे.

'या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना काही वेळ सोसायटीच्या कार्यालयातील कागदपत्रे पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु, यासाठी सोसायटयांकडून सहकार्य मिळत नाही. एकाच सोसायटीत वारंवार जावे लागत असल्यामुळे या प्रक्रियेला उशीर होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही कागदपत्रांची कमतरता असल्याच्या कारणामुळे सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे', असे सोनावणे यांनी स्पष्ट केले.

१२५० सोसायट्यांचे कन्व्हेयन्स

सहकार विभागाने सोसायट्यांचे कन्व्हेयन्स डीड करण्याला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत पुण्यात १२५० सोसायट्यांचे डीम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया सहकार विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहे. हे डीड केल्यानंतर सोसायटीच्या इमारतीखालील जमीन ही सोसायटीच्या सभासदांच्या नावे होते. त्यामुळे सोसायट्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक किरण सोनावणे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवेकाचा आवाज बुलंद

$
0
0

पुणे : 'फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर, विवेकाचा आवाज बुलंद करूया...' अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गुरुवारी शिंदे पूल ते मनोहर मंगल कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

'अंनिस'चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर काढण्यात आलेल्या या मोर्चात डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अतुल पेठे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील, राजा शिरगुप्पे, प्रा. सुभाष वारे, अविनाश पाटील, मिलिंद देशमुख, सुनीती सु. र आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दोन मिनिटे मौन पाळून डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर विज्ञानगीतांचे सादरीकरण करण्यात आले; तसेच साधना साप्ताहिकाच्या विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर 'सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम' या रिंगणनाट्याचा ३६५ वा प्रयोगही पार पडला. जाहीर सभेनंतर डॉ. दाभोलकर यांची हत्या, तपास आणि माध्यमांची भूमिका या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नागराज मंजुळे आदींनी डॉ. दाभोलकर यांच्या निवडक साहित्याचे अभिवाचन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाखो लिटर पाणीचोरी

$
0
0

>> संतराम घुमटकर, बारामती

बारामतीला वरदान ठरणाऱ्या निरा नदीच्या डाव्या कालव्यातून प्रत्येक आवर्तनात लाखो लिटर पाण्याची चोरी सुरू आहे. एका ओढ्याच्या खोलीकरणाचे काम सुरू असताना चोरीसाठी टाकलेले पाण्याचे पाइप उघडे पडल्याने चोरी झाकण्यासाठी संबंधित पाटकरी व पाणीचोर यांची भंबेरी उडाली आहे.

कालव्याला अनेक ठिकाणी छिद्रे पाडून जमिनीखालून पाइपलाइनद्वारे थेट शेतात घेतल्याचे आढळले आहे. काही ठिकाणी कालव्याच्या बाजूला विहिरी खोदून त्यात थेट कालव्याचे पाणी सायफन तंत्राने सोडल्याचे दिसले. तेथून पाणी पंपिंग करून पाटकरी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याच्या मर्जीने कोणतीही परवानगी न घेता घेतले जात असल्यामुळे पाणी चोरीचे प्रमाण अधिक आहे. ही चोरी आपल्या अंगाशी येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी मोजक्याच गरीब शेतकऱ्यांना नोटिसा देऊन सरकारी कारवाई केल्याचे भासवले जात आहे. या पाणीचोरीत राजकीय वरदहस्त लाभलेल्या काही बड्या शेतकऱ्यांसह जलसंपदा विभागाच्या यंत्रणेचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी विभागातील उपअभियंते, शाखा अभियंते, उपविभागीय अधिकाऱ्यांची खातेनिहाय मालमत्ता चौकशी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

एकूण पाणीवापरापैकी अंदाजे ८० टक्के पाणीवापर सिंचनासाठी, १२ टक्के पिण्यासाठी (घरगुती वापरासाठी) आणि आठ टक्के ओद्यागिक क्षेत्रासाठी वापरावे, असे सरकारच्या निर्देशात असतानाही संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचे नियोजन होत नसल्याने महसुलाची उद्दिष्टे पूर्ण करण्यास खाते कमी पडत आहे.

आठ पाणीचोरांना नोटिसा पाठवल्याचे शाखा अभियंता शंकरराव चौलंग यांनी 'मटा'ला सांगितले आहे. बारामती उपविभागातून शासनाच्या तिजोरीत २०१४मध्ये सिंचन १३६.५६ लाख, बिगरसिंचन १३१.५८ लाख असा एकूण फक्त २६८.१४ लाख रुपये महसूल गोळा झाला आहे; मात्र येणाऱ्या पाण्याच्या किती पट महसूल गोळा होतो हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. बारामती उपविभागात २४ पाणीवापर संस्था आहेत.

पाणीचोरी बाबत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात 'याबाबत आम्हांला काही माहिती नाही' असे टिपिकल सरकारी उत्तर मिळाले. उपविभागीय अधिकारी ए. आर. भोसले यांनी माहिती देण्यास असमर्थता दाखवली आहे.

परवाना सहज मिळत नसल्याने...

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी परवाना सहजासहजी मिळत नसल्याने शेतकरी, संबंधित पाटकरी, शाखा अभियंता व राजकीय नेत्यांच्या दाराच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकरी पाण्याची चोरी करत असल्याचे शेतकऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे; मात्र अधिकाऱ्यांना नाव कळले, तर कायमस्वरूपी पाणी मिळणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचे केवळ हातावर हात

$
0
0

दाभोलकर, पानसरेंच्या हत्येच्या तपासाबाबत एन. डी. पाटील यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'दाभोलकर व पानसरेंच्या हत्येपेक्षाही त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास न लागणे ही महाराष्ट्राला शरम आणणारी गोष्ट आहे. पोलिस यंत्रणा कुचकामी नाही; मात्र त्यांना सरकारने योग्य दिशा दिल्यास ते मारेकऱ्यांचा तपास लावू शकतील. पण या हत्यांचा तपास लागून खरे सूत्रधार समोर यावेत, अशी सरकारची इच्छाशक्ती आहे का? कारण राज्य सरकार केवळ हातावर हात ठेवून बसले आहे,' अशी टीका ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पाटील यांच्यासह खासदार हुसेन दलवाई, आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक सुभाष वारे, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, स्मिता पानसरे, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, भालचंद्र कानगो, प्रा. डॉ. अजित अभ्यंकर, एकनाथ पाटील, मिलिंद देशमुख आदी या सभेत सहभागी झाले होते.

'महाराष्ट्राला लाजवणारी डॉ. दाभोलकरांच्या खुनाची घटना दोन वर्षांपूर्वी घडली. मात्र, त्या घटनेचा तपास योग्य दिशेने होत नाही. सरकारला खरंच या घटनेविषयीचे गांभीर्य दिसत नाही, हे मान्य करावे लागेल. पोलिस यंत्रणा कुचकामी म्हणणे चुकीचे ठरेल. त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य जर सरकारने दिले नाही, तर ते काय करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, चांगली हवा येऊ द्या!

$
0
0

पावसाच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे पुण्यातील वायुप्रदूषण वाढले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने ओढ दिल्याने फटका पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणारच आहे; पण या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे शहरातील वायुप्रदूषणामध्ये अचानक वाढ झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार आपण सध्या तरी 'सेफ झोन'मध्ये असलो, तरी या प्रदूषकांमुळे श्वसनाचे संसर्गजन्य आजार वाढणार असल्याचा निष्कर्ष 'सफर'ने नोंदविला आहे.

पावसाळा सुरू झाला की पुण्यातील हवेची गुणवत्ता दर वर्षी सुधारते. पावसाच्या पाण्यामुळे प्रदूषके वाहून जातात आणि प्रदूषणाचे प्रमाण उल्लेखनीय प्रमाणात घटते. पण जुलै-ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने यंदा संपूर्ण शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.

'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीअट्रॉलॉजी'ने सुरू केलेल्या 'सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च' अर्थात सफरने घेतलेल्या नोंदीमधून ही माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनमध्ये पाऊस चांगला पडल्याने प्रदूषणाची पातळी घटली होती, मात्र जुलै-ऑगस्टमध्ये चित्र बदलले आहे.

हवेच्या प्रदूषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या 'पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) २.५'ची (मायक्रॉनपर्यंत आकार असलेले धूलिकण) पातळी शहरात सगळीकडेच वाढली आहे. यात सर्वाधिक वाढ मांजरीमध्ये दिसली. मांजरीमध्ये गेल्या जुलैमध्ये १०.९८, तर ऑगस्टमध्ये १९ क्युबिक मॉयक्रॉन पर क्युबिक मीटर पीएम २.५ ची नोंद झाली होती. या वर्षी जुलैत त्यात तिपटीने वाढ होऊन सध्या २९.४१ मायक्रोग्रॅम्स पर क्युबिक मीटर नोंदवले गेले. शहरात यंदा जुलैमध्ये ६२ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या वेळी हे प्रमाण २८२ मिमी होते.

पावसाचे प्रमाण उल्लेखनीय असल्याने जूनमध्ये आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळाले. प्रदूषके वाहून जात होती. जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याने प्रदूषकांचे हवेतील प्रमाण वेगाने वाढले असून, प्रदूषणातही वाढ झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार अजून आपण 'सेफ झोन' मध्ये आहोत. परिस्थिती गंभीर झालेली नाही. मात्र, वाढलेल्या प्रदूषणामुळे श्वसनाशी निगडित संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते आहे, अशी माहिती 'सफर'चे प्रकल्प संचालक गुफरान बेग यांनी दिली.

अलीकडील काही दिवसांत पीएम २.५ च्या पातळीतील सर्वाधिक वाढ ही लोहगाव, मांजरी, शिवाजीनगरमध्ये नोंदविली गेली आहे. निगडीमध्ये हे प्रमाण सर्वांत कमी दिसले. वाहनांमधून होणारे उत्सर्जन हा पुण्यातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा स्रोत आहे. परिणामी यातील पार्टिक्युलेट मॅटर हा घटक सर्वांत हानीकारक ठरतो आहे. पीएम २.५ हे शरीरासाठी हानीकारक असून, त्यांचा थेट दुष्परिणाम फुफ्फुसे आणि रक्तवाहिन्यांवर होतो, असे बेग यांनी सांगितले.

'पीएम १०'मध्येही वाढ

'पीएम २.५'बरोबरच 'पीएम १०'ची (१० मायक्रॉनपर्यंत आकार असलेले धूलिकण) पातळीही वाढली आहे. 'पीएम १०'चे लोहगाव येथील प्रमाण गेल्या जुलैमध्ये ४७.५५ होते. या वेळी ते ८१.९७ वर पोहोचले. शिवाजीनगरमध्ये 'पीएम १०'मध्ये वाढ असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७.८५ वरून ५९.१९ पर्यंत वाढले. पाषाणमध्येदेखील 'पीएम १०' हे ३३.२१ वरून ५५.३९ मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् भारावला इतिहासपुरुष...

$
0
0

पुरंदरे वाड्यासमोर रंगले महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे 'सेलिब्रेशन'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपली अलौकिक वाणी अन् लेखणीतून गेली ७५ वर्षे अविश्रांतपणे शिवछत्रपतींचा अखंड जागर मांडत शिवचरित्र सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरेंवर पुष्पवृष्टीसह शुभेच्छांचा वर्षाव करत पुणेकरांनी गुरुवारी त्यांचे स्वागत केले. आबालवृद्धांच्या शुभेच्छांचा तितक्याच आत्मीयतेने स्वीकार करताना बाबासाहेब भारावून गेले.

संध्याकाळी साडेचार वाजल्यापासूनच पुरंदरे वाड्याचे आवार माणसांनी गजबजू लागले होते. शिवछत्रपतींचा भव्य पुतळा, रांगोळ्या, झेंडूच्या तोरणांनी सजवलेले आवार आणि व्यासपीठ अशी जय्यत तयारी पर्वती नागरिक संघातर्फे करण्यात आली होती. पुरंदरे वाड्याच्या आवारात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती झाल्यावर ढोलताशांच्या निनादात, तुतारीच्या गगनभेदी आवाजात, स्नेहपूर्ण अभिवादन करत, कंगणीदार मावळी पागोटे घातलेले बाबासाहेब फुलांच्या पायघड्यांवरून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुरंदरे वाड्यावर दाखल झाले. त्यावेळी भगवे ध्वज घेऊन असलेले दिग्विजय प्रतिष्ठानचे अश्वारूढ कार्यकर्ते आणि युवा वाद्य पथकाने ढोल-ताशांच्या गजरात बाबासाहेबांना मानवंदना दिली. बाबासाहेबांच्या हस्ते शिवछत्रपतींची आरती करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी बाबासाहेबांवर पुष्पवृष्टी केली.

'प्रौढप्रतापपुरंदर' हा बाबासाहेबांच्याच आवाजातील आल्काब सुरू असताना 'जाणता राजा' या महानाट्यात गेली १५ वर्षे काम करणाऱ्या पर्णाल ठाकूर यांनी बाबासाहेबांना औक्षण केले. त्यानंतर फुलांच्या पायघड्यांवरून बाबासाहेब व्यासपीठावर आले. शाहीर हेमंत मावळे, बालशाहीर होनराज मावळे, शाहिरा संगीता मावळे आणि सहकाऱ्यांनी बाबासाहेबांवरील पोवाडा सादर केला.

पुणेकरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. भगवे फेटे परिधान केलेल्या युवकांनी उत्साहाने बाबासाहेबांची प्रतिमा मिरवली. उपस्थितांना साखर आणि पेढे वाटण्यात आले. विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी पुष्पगुच्छ देऊन बाबासाहेबांचा सन्मान केला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, वसंत प्रसादे, श्री. म. जोशी, संघाचे शहर कार्यवाह कैलास सोनटक्के, नगरसेविका प्रिया गदादे, इक्बाल दरबार, डॉ. मिलिंद भोई, जयराज लांडगे आदी या वेळी उपस्थित होते.

पोलिस पहारा, ही खंत...

वयाच्या ९४व्या वर्षीही इतिहासाचा बेलभंडारा उधळत, नव्या पिढीला गडकोट, लढाया, शस्त्रास्त्रे, मराठी परंपरा आणि चालीरीतींच्या माध्यमातून शिवरायांचा महिमा सांगण्यासाठी धडपडणाऱ्या बाबासाहेबांच्या मनात अनेक योजनांचे विचार सुरू झाले आहेत. मराठी संस्कृती आणि परंपरा दाखवणारा वाडा उभा करण्याचा त्यांचा मानस आहे. आनंदसोहळ्याने भारावलेल्या बाबासाहेबांच्या मनात असलेली एक खंत त्यांनी केवळ कुटुंबीयांसमोरच बोलून व्यक्त केली, ती म्हणजे, एवढा जल्लोष असताना दारी पोलिस बंदोबस्त असणे त्यांच्या मनाला यातना देणारे ठरले. 'पुरस्कारामुळे मला आनंद वाटला' एवढीच भावना त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात ४० टक्के फ्लॅट पडून

$
0
0

मुद्रांकशुल्काच्या महसुलात २० टक्क्यांची घट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांधकाम क्षेत्रातील मंदीचा जोरदार फटका दस्तनोंदणीला आणि पर्यायाने मुद्रांक शुल्कापोटी मिळणाऱ्या महसुली उत्पन्नाला बसला आहे. गेले वर्षभर जाणवणाऱ्या मंदीमुळे जमीन वा फ्लॅट खरेदी-विक्रीमध्ये सुमारे २० टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे.

बांधकाम क्षेत्रामध्ये सध्या मंदीचे वारे वाहात आहेत. परिणामी, फ्लॅट बुकिंग आणि विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. राज्यात मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मुद्रांकापोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत १० हजार कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क वसुलीचा टप्पा गाठला असला, तरी तो फारसा समाधानकारक नाही.

राज्यात मंदीचे सावट असतानाही रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी वीस टक्क्यांनी वाढ करण्यात आली. ही वाढ गृहित धरून मुद्रांक शुल्काद्वारे महसुलात मोठी भर पडण्याची अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. यंदा जानेवारी ते ऑगस्ट २०१५ या आठ महिन्यांमध्ये राज्यात १४ लाख ९६ हजार दस्तांची नोंदणी झाली. त्याद्वारे १० हजार ४६५ कोटी रुपयांचा मुद्रांक मिळाला. या दस्तनोंदणीमध्ये 'लिव्ह अॅण्ड लायसन्स'च्या दस्त नोंदणीची संख्या अधिक असल्याचे नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाडेकरूंच्या नोंदणीसाठी 'लिव्ह अॅण्ड लायसन्स'चा दस्त करण्याची पद्धत अत्यंत सोपी करण्यात आली आहे. तसेच, त्यासाठी खासगी एजन्सीची (सर्व्हिस प्रोव्हायडर) नियुक्तीही करण्यात आली आहे. राज्यात दर वर्षी साधारणतः चोवीस लाख दस्तांची नोंदणी होते. त्यात वीस टक्के वाटा भाडेकरारांचा आहे. 'लिव्ह अॅण्ड लायसन्स'ची नोंदणी वाढल्यामुळे दस्त नोंदणीमध्ये वाढ दिसत असली, तरी नोंदणीशुल्क कमी असल्यामुळे महसुली उत्पन्न वाढीवर फारसा फरक पडलेला नाही. बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे महसुलात मात्र, घटच दिसत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

४० टक्के फ्लॅट पडूनच

दरम्यान, एका बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंदीचे चित्र स्पष्ट करण्यात आले आहे. शहर आणि लगतच्या उपनगरी परिसरात जवळपास ४० ते ४५ टक्के तयार फ्लॅट पडून आहेत. शहरात औंध, बाणेर, कोथरूड, वारजे, खराडी, कल्याणी नगर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात हजारो फ्लॅट मंदीच्या विळख्यात सापडले असल्याकडे या बैठकीत लक्ष ‍वेधण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FTII वादावर तोडग्याची शक्यता

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

गेल्या ७० हून अधिक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या पुण्यातील एफटीआयआय विद्यार्थ्यांची अखेर आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या तीन सदस्यीय पथकाने भेट घेतली. या बैठकीमुळे या चिघळलेल्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एफटीआयआय अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध आहे. त्यासाठी त्यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे. त्यातच दोनच दिवसांपूर्वी ५ आंदोलक विद्यार्थ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. एफटीआयआयचे संचालक पाठराबे यांना घेराव घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईने मागे न हटता विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन अधिकच तीव्र केले आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रथमच आंदोलक विद्यार्थ्याचे गाऱ्हाणे केंद्राने ऐकल्याने या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रातून आलेलं पथक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर केंद्राच्या समितीतील प्रतिनिधी एस. एम. खान यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले. या चर्चेचा अहवाल सोमवारी संबंधित खात्याला सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनीही केंद्राने चर्चेची दारे खुले केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आमची लढाई केवळ गजेंद्र चौहान यांच्याविरोधात नाही. संपूर्ण निवड प्रक्रियेवरच आमचा आक्षेप आहे. आजच्या चर्चेने आम्हाला आशेचा किरण दिसला आहे. आमचं गाऱ्हाण सरकारपर्यंत पोहोचेल असं आता वाटत आहे. मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार, असे विद्यार्थी प्रतिनिधीने माध्यमांसमोर बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ निवारणाचे गाऱ्हाणे

$
0
0

श्री श्रियाळशेठ राजाचा उत्सवाला भाविकांची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'श्रीयाळशेठ वाणीया खोबऱ्याच्या गोणीया...' अशा घोषणा देत हजारो भाविकांनी शुक्रवारी श्री श्रीयाळशेठ राजाच्या उत्सवानिमित्त दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. उत्साही वातावरणात हा उत्सव संपन्न झाला. राज्यावर सध्या दुष्काळाची छटा आहे. त्यामुळे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी श्री श्रीयाळशेठ राजाला दुष्काळ निवारणाचे साकडे घातले.

रास्ता पेठेतील श्रीयाळशेठ चौक येथे सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास औट घटकेचा राजा, श्री श्रीयाळशेठ राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ट्रस्टचे अध्यक्ष विकास बकरे व त्यांच्या पत्नी राजश्री बकरे यांच्या हस्ते करण्यात आली. नगरसेविका सोनम झेंडे व त्यांचे पती मयूर झेंडे यांनी मूर्तीचे पूजन केले. धनकवडे यांच्या हस्ते श्रीयाळशेठ राजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उत्सवाला प्रारंभ झाला. ट्रस्टचे प्रमुख सल्लागार देवेंद्र खोले, संदिप जांभळे व उत्सव प्रमुख ओकांर बकरे या वेळी उपस्थित होते.

सकाळी भाविकांची संख्या कमी होती. मात्र, दुपारनंतर भाविकांचा ओघ वाढत गेला. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्सवाला हजेरी लावली होती. उत्सवानिमित्त श्रीयाळशेठ चौकात मोठ्या संख्येने विक्रेत्यांनी त्यांची दुकाने मांडली होती. लहान मुलांच्या विविध प्रकारच्या खेळण्यापासून घरोपयोगी वस्तू तेथे असल्याने सर्वांनीच खरेदीचा आनंद लुटला. फुलराणी व विविध प्रकारच्या पाळणण्यात बसून लहान मुलांनी उत्सवाचा पुरेपूर आनंद लुटला. या परिसरात साउंड सिस्टिमही मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. त्यामुळे तरुणाईचा आनंद द्विगुणित झाला होता. सायंकळच्यावेळी ठिकठिकाणी गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपेक्षित धर्माची व्याख्या समाजापासून अनभिज्ञच

$
0
0

प्रा. शेषराव मोरे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारतीय राज्यघटनेला अपेक्षित धर्माची व्याख्या ही प्रचलित धर्मांच्या व्याख्यांपेक्षा वेगळी आहे. मात्र, राज्यघटनेला अपेक्षित धर्माची ‍व्याख्या भारतात जाणीवपूर्वक समाजापर्यंत पोहोचविली जात नाही. प्रचलित धर्मांच्या व्याख्यांचा विचार करून प्रत्येकाने वागायचे ठरविल्यास देशात हाहाःकार माजेल,' असे परखड मत विश्व मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

लोकशाही जागर मंच आणि मराठवाडा विद्यार्थी समितीतर्फे आयोजित 'भारतीय राज्यघटनेतील सेक्युलॅरिझमचा अर्थ' या विषयावरील व्याख्यानात प्रा. मोरे बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स विभागामध्ये झालेल्या व्याख्यानावेळी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे सहाय्यक कुलसचिव बाळासाहेब नाईक, मंचाचे सागर शिंदे, समितीचे मारुती अवरगंड व्यासपीठावर उपस्थित होते. धर्म, धार्मिकता, धार्मिक स्वातंत्र्य, अध्यात्म आणि भारतीय राज्यघटनेतील या सर्व संकल्पनांचे अर्थ आदींचा मोरे यांनी या वेळी आढावा घेतला.

'आपल्याकडे धर्मनिरपेक्षता हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतो. प्रत्येक पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत असला, तरी सर्व पक्षांमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येबाबत कधीही एकमत होत नाही. त्यामुळेच धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमके काय हे जाणून घेताना राज्य, धर्म आणि धर्माला असणाऱ्या कायदेशीर चौकटींचा विचार करणे गरजेचे ठरते. घटनेने धर्माचे स्वातंत्र्य दिले असले, तरी ते उपभोगताना कायदा-सुव्यवस्था, आरोग्य, नीतीमत्ता आणि दुसऱ्याचे मूलभूत हक्क या चार गोष्टींच्या अधीन राहून ते स्वातंत्र्य घेता येते. मात्र धर्माचा असा अर्थ आपल्याकडे सांगितलाच जात नाही,' असे मोरे यांनी स्पष्ट केले.
.........

आपल्याकडे धर्मनिरपेक्षता हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतो. प्रत्येक पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत असला, तरी सर्व पक्षांमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येबाबत कधीही एकमत होत नाही.
प्रा. शेषराव मोरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेश संपल्याने ‘जीपीपी’त गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या डी. फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेत शुक्रवारी पुण्यात गोंधळ झाला. गुरुवारी मध्यरात्रीच प्रवेश संपल्याचे जाहीर झाल्याने, शुक्रवारी प्रवेशासाठी आलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी पुण्यातील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये (जीपीपी) गोंधळ घातला. कॉलेज प्रशासनाने पोलिसांची मदत घेतल्यानंतर हा गोंधळ शांत झाला.

डी. फार्मसीच्या प्रवेशांसाठी संचालनालयामार्फत राज्यभरातील सहा केंद्रांवरून परीक्षा घेण्यात आली होती. पुणे केंद्रावर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना समावेश होता. त्यातूनच प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २१ ऑगस्टदरम्यान गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशाच्या कौन्सेलिंग फेरीसाठी बोलविण्यात आले होते. १ हजार ९४४ जागांसाठी ही प्रक्रिया सुरू होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारालाच या सर्व जागा भरल्या. त्यामुळे शुक्रवारी सकाळी प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य नसल्याने हा गोंधळ झाल्याचे 'जीपीपी'चे उपप्राचार्य आर. एन. शिकारी यांनी सांगितले.

जागा पूर्ण भरल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर गोंधळ शांत झाला. मात्र, त्यानंतर विद्यार्थी- पालकांनी एकत्र येत डी. फार्मसीच्या प्रवेशासाठीच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली. त्यासाठीचे एक निवेदनही पालकांनी प्रशासनाकडे दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कार्यालयावर छापे नाहीत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) चालक से मालक कर्जप्रकरणी संबंधित कंपनीच्या पुणे, मुंबई, सुरत आणि सिल्वासा येथील कार्यालयांवर छापे घातले. पण, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँकेशी संबंधित कार्यालयांवर छापे मारलेले नाहीत, असे स्पष्टीकरण 'महाबँके'तर्फे देण्यात आले आहे.

महाबँकेचे सरव्यवस्थापक राजकिरण भोईर यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे. चालक से मालक प्रकरणातील अनियमितता लक्षात आल्यानंतर बँकेने स्वतःहून सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊनच सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेने योग्य ती पावले उचलली आहेत, असेही महाबँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ये तो मेरा छोटा भाई दिखता है’

$
0
0

स्वतःच्याच पुतळ्यावर शिवकुमार शर्मांची प्रतिक्रिया

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मी जगभरात फिरलो; पण पुण्याची गोष्टच निराळी आहे. इथे नेहमी काहीतरी वेगळेच पाहायला मिळते,' हे उद्गार आहेत, जगप्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे. आपला हुबेहुब पुतळा चक्क आपल्याच शैलीत बोलतोय, हे पाहून ते भारावले होते. तर 'ये तो मेरा छोटा भाई दिखता है' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया जगप्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी आपल्या पुतळ्याला पाहून दिली.

बागूल उद्यानातील 'मॅड मॅपिंग' या संकल्पनेअंतर्गत उभारलेल्या शो ला या दिग्गज कलावंतांनी शुक्रवारी भेट दिली. सहकारनगर येथील पं. भीमसेन जोशी कलादालनात पुणे महानगरपालिकेतर्फे उपमहापौर आबा बागूल यांच्या पुढाकाराने हा अनोखा प्रकल्प साकारण्यात आला आहे. अशाप्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे बागूल यांनी सांगितले. त्याअंतर्गत एका दालनात पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे बैठे पुतळे उभारण्यात आले आहेत. हे पुतळे स्वतः देशातील महान कलावंतांची माहिती देतात. यावेळी संबंधित कलाकाराची माहिती देणारी दृश्यफितही प्रोजेक्टरवर दाखविली जाते.

हे पुतळे बोलताना त्यांची बोलण्याची शैली, लकब आणि ओठ, भुवया, पापण्या यांच्या अचूक हालचाली अचंबित करतात. ही कामगिरी साधली आहे, गार्डियन मीडिया एंटरटेन्मेंटने. या प्रकल्पाचे दिग्दर्शन संजय दाबके यांचे आहे.' हे पुतळे साडेतीन फूट उंचीचे असून, क्ले आणि फायबरपासून त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यास चार महिन्यांचा कालावधी लागला असून, १५ लाख रुपये खर्च आला आहे,' अशी माहिती गार्डियन एंटरटेन्मेंटचे मनीष साबडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयात ‘मंगळसूत्र महोत्सव’

$
0
0

चोरट्यांकडून जप्त केलेले तीस लाखांचे दागिने महिलांकडे सुपूर्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महिलांचे दागिने चोरीला जाण्याची वेळ येऊच नये. महिलांना सुरक्षा देण्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. परंतु, तरीदेखील अशा घटना घडू नयेत म्हणून पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. माता-भगिनींचे आशीर्वाद पाठीशी राहिल्यास सोनसाखळी चोरीचे सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात यश येईल. यापुढे आपल्याला अधिक चांगली सेवा देण्याचे पोलिसांचे प्रयत्न राहतील,' असे आश्वासन पुण्याचे पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी शुक्रवारी दिले.

पुणे शहर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांकडून जप्त केलेला ऐवज संबंधित महिलांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. या वे‍ळी पाठक यांच्या हस्ते ५९ महिलांना ३० लाख ६२ हजार रुपये किमतीच्या ऐवजाचे वाटप करण्यात आले. पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, प्रकाश मुत्याळ, पी. एन. रासकर आदी या वेळी उपस्थित होते. सोनसाखळी चोरांनी हिसकावलेले सौभाग्यालंकार परत घेताना अनेक महिला गहिवरल्या होत्या. त्यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले. एरव्ही टीकेचे लक्ष्य ठरलेल्या पोलिसांची दुसरी बाजू काही महिलांनी मांडून त्यांच्या कामाचे कौतुक केले. सोन्याचे प्रदर्शन न करता कामापुरतेच सोने घालून त्याची काळजी घेण्याची सूचनाही अनुभवातून शिकलेल्या महिलांनी इतर महिलांना केली.

पाठक म्हणाले, 'सोनसाखळी चोरीचे गुन्हे कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येत आहे. पुढील महिन्यात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणखी ६० महिलांना त्यांचा चोरी झालेला ऐवज सुपूर्द करण्यात येणार आहे.'

'गेल्या दहा वर्षांत सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. असे गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत. सोनसाखळी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना बाहेरच्या राज्यांपर्यंत जावे लागले आहे. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे,' असे रामानंद यांनी सांगितले.

पोलिसांकडून खूपच सहकार्य

मी नेहमी खोटे मंगळसूत्र घालायचे. आमच्या सोसायटीमध्ये लग्न असल्यामुळे त्या दिवशी मंगळसूत्र घातले होते आणि नेमक्या त्याच वेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी ते हिसकावले. 'एकदा गेलेले दागिने परत मिळत नाहीत, पोलिस आपल्यालाच त्रास देतात, कशाला तक्रार देता,' असे अनेक सल्ले मला देण्यात आले. तरीही याबाबत तक्रार देण्यासाठी मी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गेले. त्या वेळी मला पोलिसांचा खूपच चांगला अनुभव आला. त्यांनी प्रेमाने विचारपूस करून मला आधार दिला. माझ्या वयाचाही आदर राखून तक्रार दाखल करून घेतली. पोलिसांबद्दल जे बोलले जाते, त्याच्या नेमका विरुद्ध अनुभव मला आला. पोलिसांनी खूप सहकार्य केले. आज मला माझे अलंकार परत मिळाले आहेत. महिलांनी दागिन्यांचे प्रदर्शन टाळले, तर बरेच गुन्हे कमी होतील.

- शुभलक्ष्मी तांबे, लेक टाउन, बिबवेवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images