Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अपहरणाचा प्रयत्न फसला; दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

वानवडी येथील नववीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा मोबाइल लुटण्याचा प्रकार घडला. घटना घडतानाच नागरिकांच्या मदतीने दोघा आरोपींना पकडण्यात वानवडी पोलिसांना यश आले आहे. अश्रफ अस्लम सय्यद (वय २०, रा. भवानीपेठ) आणि साजीद मासीर सय्यद (वय २२, रा. लष्कर) या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली असून, मोबाइलही जप्त केला आहे. प्रकरणी विद्यार्थ्याची आई नेहा महेश शेलाटे (वय ३२, रा. सेंट पॅट्रिक टाउनशिप, हडपसर ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

नेहा यांचा मुलगा साहिल सदर्न कमांड येथील केंद्रीय विद्यालयात शिकतो. तो शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वानवडीतील क्लास सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसची वाट पाहात थांबला होता. यावेळी दुचाकीवर आलेले आरोपी त्याच्याजवळ आले. 'आमच्या मोबाइलमधील बॅलन्स संपला आहे. आम्हाला तुझ्या फोनवरून एक फोन करू दे', अशी विनंती त्यांनी साहिलला केली. दरम्यान, त्यांनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसण्यास सांगितले. साहिलला संशय आल्याने त्याने आरडाओरडा केला.

दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात

पुणे : चैन करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या दुचाकी तो बनावट नंबरच्या आधारे वापरत होता. गुन्हे शाखेच्या होमीसाइड पथकाने ही कारवाई केली. अल्पवयीन मुलाकडे केलेल्या चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार दोन होंडा अॅक्टिव्हा, सुझुकी अॅक्सेस आणि स्कुटी पेप जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे चतु:श्रृंगी, खडक आणि मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकित पैशांसाठी अत्याचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

व्याजाने दिलेले पैसे 'रिकव्हर' करण्यासाठी तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर नऱ्हे येथील फ्लॅटमध्ये कोंडून नग्नावस्थेत चित्रिकरण करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंगणे खुर्द येथील तरुणाने तक्रार दाखल केली आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर सिंहगड पोलिसांनी त्वरित चक्रे फिरवून अवघ्या तीन तासांतच अत्याचारग्रस्त तरुणाची सुटका केली. या प्रकरणी हर्षद प्रदीप गव्हाणे (वय २५,रा. आनंदनगर), विराज प्रदीप गव्हाणे (वय २९), चिंग्या ऊर्फ अभिषेक विजय निवळकर (वय २३, रा. तरडे कॉलनी, हिंगणे), आसिफ शनाली बेग (वय २६, रा. कोटला नगर), स्वप्नील संजय धरणे (वय २७, रा. आनंदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अतुल गायकवाड आणि निखिल मरळ फरारी असून, त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचारग्रस्त तरुणाने विराजकडून व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, पैसे वेळेवर परत करण्यास तो असमर्थ ठरला. त्यामुळे विराज आणि त्याचा भाऊ हर्षद यांनी संबंधित तरुणाला वारंवार धमकावलेही होते. तसेच, हिंगणे चौकात तरुणाला आणि त्याच्या मित्राला मारहाणही केली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास इतर आरोपी तरुणाच्या घरात घुसले. तेथे त्यांनी तरुणाच्या वृद्ध वडिलांसमोरच त्याला मारहाण केली. घराच्या बाहेर ओढून दुचाकीवर बसवून गोयलगंगा सोसायटीचे पार्किंग तसेच रस्त्यावर पळवून मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तरुणाला नऱ्हे येथील फ्लॅटवर नेले. तेथे त्याचे नग्नावस्थेत चित्रिकरण केले. वडिलांना फोन करण्यास सांगून दीड लाख रुपये देण्यास सांगितले. दरम्यान, तक्रारदाराच्या वडिलांनी ही माहिती सिंहगड पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक श्रीनिवास मुंडे आणि फौजदार आनंद ढवळे यांनी तत्काळ कारवाई करून अत्याचारग्रस्ताला दिलासा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगामी संमेलन पुण्यातच?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एप्रिल २०१५मध्ये पंजाबमधील घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर आगामी ८९व्या संमेलनाचे स्थळ आज, रविवारी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत निश्चित होणार आहे. महामंडळाच्या पुण्यातील कार्यालयाचे यंदा अखेरचे वर्ष असल्याने संमेलनस्थळ पुणे परिसरातच असण्याची दाट शक्यता आहे.

अनेक वर्षांनंतर साहित्य संमेलनाने यंदा राज्याच्या सीमा ओलांडल्या. पंजाबमध्ये घुमान येथे झालेल्या संमेलनाला तेथील राज्य सरकारनेही उत्तम प्रतिसाद दिला. ८९व्या संमेलनासाठी राज्यासह कर्नाटकमधून १२ निमंत्रणे महामंडळाला प्राप्त झाली होती. या निमंत्रणांचा आढावा घेऊन, तेथील सुविधांची पाहणी करण्यासाठी स्थळ निवड समितीने काही ठिकाणांची पाहणी केली असून, त्याचा सविस्तर अहवाल महामंडळाच्या रविवारी होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.

महामंडळाचे फिरते कार्यालय सध्या पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत आहे. परिषदेची तीन वर्षांची मुदत पुढील वर्षी संपणार असल्याने तत्पूर्वी होणारे संमेलन पुण्याच्या आसपासच्या परिसरातच घेण्यात यावे, अशी भूमिका मांडण्यात येत आहे. त्यानुसार, पुण्याच्या जवळपासची निमंत्रणे प्राप्त झाली असल्याने त्यापैकी एका ठिकाणाची निवड आज केली जाणार आहे. संमेलनासाठी सातारा, डोंबिवली, श्रीगोंदा, नांदेड, उस्मानाबाद, बारामती, अंमळनेर, हिंगोली आणि पिंपरी-चिंचवड येथील तीन संस्था आणि कर्नाटकमधील भालकी येथून निमंत्रणे प्राप्त झाली होती. मात्र, त्यापैकी सर्वांत जवळच्या पिंपरी-चिंचवडच्या पारड्यात महामंडळाचे वजन पडण्याची शक्यता आहे. अर्थात, पिंपरीतील कोणत्या संस्थेला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळणार, यावर महामंडळाच्या बैठकीतच अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.

पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप?

गेल्या सहा वर्षांतील संमेलन स्थळांचा आढावा घेतला, तर चंद्रपूर आणि घुमान या दोन संमेलनांचा अपवाद वगळला तर बहुतांश संमेलने पश्चिम महाराष्ट्र आणि त्या आसपासच्या परिसरातच झाल्याचे दिसून येत आहे. घुमानच्या आधीचे ८७ वे संमेलन पुण्याजवळील सासवड येथे झाले होते, तर तत्पूर्वीच्या संमेलनाचा मान चिपळूणला मिळाला होता. महामंडळाच्या पुण्यातील अखेरच्या वर्षामुळे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप मिळण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे राजकारण चांगलेच तापले आहे. निरंजन डावखरे यांच्या नियुक्तीस आक्षेप घेऊन माजी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या दोन कार्यकर्त्यांनी स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर निसर्ग मंगल कार्यालयात श​निवारी दुपारी घडला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने निसर्ग मंगल कार्यालयात सभासद नोंदणी अभियानाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला दिलीप वळसे पाटील, निरंजन डावखरे, माजी अध्यक्ष उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, युवक आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र कोरेकर,कार्याध्यक्ष विराज काकडे आदी उपस्थित होते. या वेळी नाशिक जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष धीरज मगर आणि वैभव देवरे यांनी डावखरे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पोलिसांनी दोघांना रोखले. पोलिसांनी त्यांना लगेचच ताब्यात घेतले. वळसे पाटील यांनी लगेचच दोघांची पक्षातून हकालपट्टी केली.

'या ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक करण्यात आली आहे,' अशी माहिती स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक निकम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीडीपीग्रस्तांवर अन्याय होणार नाही’

$
0
0

पुणेः 'महापालिकेच्या समाविष्ट गावांतील जैववैविध्य उद्यानाचे (बीडीपी) आरक्षण पडलेल्या जमीनमालकांवर अन्याय होऊ देणार नाही,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीपीग्रस्तांना आश्वस्त केले. बीडीपी आरक्षणाच्या मोबदल्यासंदर्भातील पॉलिसी तीन महिन्यांत जाहीर होत असून या प्रश्नातून मार्ग काढण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शहराच्या समाविष्ट गावांतील साडेनऊशे हेक्टर क्षेत्रावर बीडीपीच्या आरक्षणाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ही मंजुरी देताना बीडीपीमध्ये दहा टक्के बांधकाम परवानगी देण्याची मागणी सरकारने फेटाळली. तसेच, महापालिकेची २००५ पूर्वी मंजुरी घेतलेली बांधकामे या आरक्षणातून वगळण्यात आली आहेत. बीडीपीतील खासगी मालकांची जमीन संपादित करण्यापोटी आठ ग्रीन टीडीआर देण्याचा निर्णयही स्थगित ठेवण्यात आला आहे. बीडीपीमध्ये राज्य सरकारकडून कोणताही दिलासा न मिळाल्यामुळे या गावांतील गावकरी नाराज झाले आहेत.

त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी बीडीपीचे आरक्षण पडललेल्या कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. बीडीपीच्या मोबदल्यासाठी तीन महिन्यांत पॉलिसी जाहीर करण्यात येणार आहे. बीडीपीला भाजपचा विरोध होता हा गैरसमज आहे. हा प्रश्न बरेच दिवस रेंगाळला होता. त्यावर निर्णय घेऊन पहिले पाऊल टाकले आहे.

बीडीपीत दहा टक्के बांधकाम परवानगी देताना गुंठेवारीत घरे नियमित करावीत. बांधकाम परवानगी देताना हेक्टरी चारशे झाडांचे बंधन घालावे. तसे केल्यास कोणताही आर्थिक बोजा न पडता बीडीपी विकसित करता येईल, असे निवेदन नगरसेवक विकास दांगट, सचिन दोडके, दिलीप बराटे, राजाभाऊ लायगुडे, श्रीकांत जगताप यांनी मुख्यमंत्र्याना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरभर सीसीटीव्हींचा ‘वॉच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झालेली 'सीसीटीव्ही' यंत्रणा ही देशातील पहिली यंत्रणा ठरली आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईमध्येही 'सीसीटीव्ही' बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून आक्टोबर २०१६ अखेर पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गुन्हेगारीच्या समस्येवर प्रभावीपणे पोलिसिंग करता यावे, यासाठी या यंत्रणेचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'सीसीटीव्ही' यंत्रणेचा लोकार्पण सोहळा पार पडला. पोलिस आयुक्तालयात झालेल्या उद‍्घाटनप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे आणि प्रा. राम शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम पोलिस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद आणि जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते.

पुणे शहरात साडेबाराशे कॅमेरे बसवण्यात आले आहेत; तर २७ ठिकाणी या कॅमेऱ्यांचे फुटेज दाखवण्याची सोय करण्यात आली आहे. यातील काही कॅमेरे 'पीटीझेड' स्वरूपाचे आहेत. त्यामुळे वाहनांचे नंबरप्लेटही पाहणे शक्य झाले आहे. संवेदनशील ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले असून येथील हालचाली सदैव टिपण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. वाढत्या शहरीकरणामुळे पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी होत असते. मात्र, पोलिसांनी आता स्मार्ट पोलिसिंग करणे गरजेचे आहे आणि 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून ते साध्य होणार आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.

जर्मन बेकरी स्फोटानंतर शहरात 'सीसीटीव्ही' बसवण्याच्या मागणीने जोर धरला होता. आघाडी सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया झाल्या. मात्र, त्यानंतरही काम बंद पडण्याच्या मार्गावर होते. पुन्हा निविदा प्रक्रिया करावी लागते, की काय असे वाटत होते. परंतु, पालकमंत्री गिरीश बापट यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्याने हे काम पूर्ण झाले, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईत 'सीसीटीव्ही' आॅक्टोबर २०१६ अखेर

मुंबईच्या एका परिमंडळात येत्या नोव्हेंबरपर्यंत; तर संपूर्ण मुंबईत पुढील वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत 'सीसीटीव्ही' यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. मुंबईत जवळपास ६ हजार कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सव निर्विघ्नच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गणेशोत्सवात मंडपांबाबत हायकोर्टाने आदेश दिले असले, तरी येत्या गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही,' अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. हा उत्सव आनंदाने आणि कोणत्याही अडचणीविना साजरा व्हावा, यासाठी महापालिका आणि पोलिस खात्याला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

ससून रुग्णालयात कार्डिअॅक कॅथलॅब, डायलिलिस विभागांचे नूतनीकरण, तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या आंतररुग्ण कक्षाचे नूतनीकरण आणि रूग्णांच्या नातेवाइकांसाठी विश्रामगृहाच्या कोनशिलेचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, महापौर दत्तात्रय धनकवडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राम शिंदे, विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, ससूनचे डीन डॉ. अजय चंदनवाले, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, तसेच हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, माणिकराव चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. गणपती मंडळांच्या मंडपांबाबत हायकोर्टाने काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात मंडळांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु, सरकारने कोर्टात योग्य ती बाजू मांडली आहे, मंडपांबाबतच्या गाइडलाइन्स महापालिकांना देण्यात आल्या आहेत, तसेच पोलिसांनाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही, अशी हमी फडणवीस यांनी या वेळी दिली. दरम्यान, गणेशोत्सवासंदर्भात कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्यामुळे पोलिस आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी हमी बापट यांनी दिली. रासने यांनी स्वागत केले, गोडसे यांनी प्रास्तविक केले.

जिल्ह्यात मेडिकल कॉलेज; ससूनमध्ये कॅन्सर विभाग

येत्या काही काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येईल, त्यासाठी खासगी क्षेत्राचाही सहभाग (पीपीपी) घेण्यात येईल आणि त्यामध्ये मोठ्या ट्रस्टना प्राधान्य देऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच, खासगी सहभागातून ससूनमध्ये कॅन्सरचा विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सव निर्विघ्नच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गणेशोत्सवात मंडपांबाबत हायकोर्टाने आदेश दिले असले, तरी येत्या गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही,' अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.

गणपती मंडळांच्या मंडपांबाबत काही ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. त्याबाबत हायकोर्टाने काही निर्बंध घातले असून, त्यावर मतमतांतरे व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्य केले. 'याबाबत सरकारने कोर्टात योग्य ती बाजू मांडली आहे, मंडपांबाबतची मार्गदर्शक तत्त्वे महापालिकांना देण्यात आल्या आहेत, तसेच पोलिसांनाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही', असे फडणवीस म्हणाले. 'गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर सांस्कृतिक उत्सव आहे, त्यामुळे उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कोणतीही काळजी करू नये', अशी पुस्ती त्यांनी जोडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तत्परतेने झाले ‘रेस्क्यू ऑपरेशन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-देहूरोड बायपासवर शनिवारी सकाळी-सकाळी १४ टन वजनाचा 'एलपीजी' गॅस टँकर उलटतो आणि सुरू होते 'रेस्क्यू ऑपरेशन'... अवघ्या तेरा मिनिटांत कोरेगाव पार्क ते डुक्करखिंडीपर्यंत टँकरची दुरुस्त करणाऱ्या ​अधिकाऱ्याला पोलिस बंदोबस्तात नेण्यात येते... टँकरला आग लागणार नाही यासाठी फायर ब्रिगडेचे अधिकारी आपल्या लवाजम्यानिशी टँकरची काळजी घेतात... टँकरपासून ५०० मीटर अंतरावरील परिसर निर्मनुष्य केला जातो... वाहतूक पोलिसांनी केलेल्या धावपळीमुळे गॅस गळती झालेला टँकर शक्य तितक्या कमी वेळेत दुरूस्त करून वाहतूक पूर्ववत करण्यात येते.

डुक्कर खिंडीजवळ 'आरएमडी' कॉलेजसमोर साताऱ्याच्या दिशेने निघालेला 'एलपीजी' गॅस टँकर शनिवारी सकाळी पावणेसात वाजता उलटला होता. रात्रपाळीला ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्याने सहायक निरीक्षक महेश सरतापेंना घटनास्थळी बोलावले. गॅस गळती सुरू झाल्याचे लक्षात आल्यावर सरतापे यांनी 'एलपीजी गॅस'च्या शिक्रापूर येथील बेसकॅम्पशी संपर्क साधला. 'रेस्क्यू टीम'चे अधिकारी सूर्यवंशी यांना घटनेची माहिती देण्यात आली. सूर्यवंशी यांनी सरतापे यांना टँकरला 'एमसील' लावण्याचा सल्ला दिला.

हे सर्व सुरू असताना बेसकॅम्पवरील सूर्यवंशी हे घटनास्थळाकडे येण्यास निघाले होते. ते वाघोली येथे पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले. हा आढावा वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड घेत होते. आवाड यांनी सूर्यवंशी यांना पायलट कार पुरवण्याचे आदेश दिले. पायलट कार दिल्यामुळे सूर्यवंशी हे केवळ तेरा मिनिटांत कोरेगाव पार्क येथून डुक्करखिंडीजवळ पोहोतले. टँकर एका बाजूला केला असल्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली. अखेर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास थोड्या थोड्या अतंराने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करून कोंडी फोडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झोंपाळ्यावरची गीता’ ९८ वर्षांनी पुनर्प्रकाशित

$
0
0

अनिकेत कोनकर, पुणे

लहान मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टीने मुलींना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने रचलेल्या 'झोंपाळ्यावरची गीता' या वैशिष्ट्यपूर्ण मराठी रचनेला यंदा ९८ वर्षे पूर्ण झाली आहेत. कवी दत्तात्रय अनंत आपटे ऊर्फ अनंततनय यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान यात अत्यंत बाळबोध मराठीत ओवीबद्ध पद्धतीने मांडले आहे. लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्य ग्रंथाच्या प्रकाशनाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. ते औचित्य साधून टिळकभक्त असलेल्या अनंततनय यांच्या 'झोंपाळ्यावरची गीता' या पुस्तिकेचे पुनर्प्रकाशन नुकतेच टिळकांचे जन्मस्थान असलेल्या रत्नागिरी शहरात करण्यात आले.

मानवी जीवनाचे सार सांगितलेली श्रीमद्भगवद्गीता जाणून घेण्याचे प्रयत्न तिच्या निर्मितीपासून अव्याहतपणे सुरू आहेत. गीर्वाणवाणीतील हे ज्ञान सर्वसामान्यांना उमजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' लिहिले आणि विनोबा भावेंनी गीताईचे लेखन केले. या साऱ्यांसोबतच अनंततनय यांनी केलेली 'झोंपाळ्यावरची गीता' ही रचनाही मराठी भाषेचा एक मौल्यवान ठेवा आहे. केवळ एक आध्यात्मिक साहित्य म्हणून नव्हे, तर लहान मुलांवर चांगले संस्कार होऊन सुसंस्कृत पुढची पिढी घडवण्याच्या हेतूने अनंततनय यांनी झोंपाळ्यावरची गीता रचली. झोंपाळ्यावर बसून झोके घेतही महिलांना गीतेचे तत्त्वज्ञान सांगता यायला हवे, अशा विचाराने त्यांनी मोरोपंतांच्या सीतागीताच्या चालीवर ही ओवीबद्ध रचना केली.

'धार्मिक विचार क्षणभर बाजूला ठेविला तरीं दिवसेंदिवस निरुत्साह अतएव कर्तव्यविमुख होत असलेल्या महाराष्ट्राला अशा पुस्तकांची अत्यंत गरज आहे, असें वाटतें व म्हणूनच लेखकानें महाराष्ट्राच्या भावी मातांची मनें सुसंस्कृत व उत्साहपूर्ण करण्याकरितां प्रस्तुतचा अल्प प्रयत्न केला आहे,' अशा शब्दांत अनंततनय यांनी या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत आपली भूमिका मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात नव्याने ५० हजार रोजगार

$
0
0

फॉक्सकॉनची ३५ हजार कोटींची गुंतवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांत जगात आघाडीवर असलेली फॉक्सकॉन कंपनी पुणे व मुंबई परिसरात ३५ हाजर कोटी रुपयांची (पाच अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. ही कदाचित देशातील सर्वांत मोठी थेट परदेशी गुंतवणूक ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

फडणवीस आणि या कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांच्या उपस्थितीत मुंबईत या संदर्भातील करार शनिवारी करण्यात आला. त्यानुसार येत्या पाच वर्षांत ही कंपनी पाच अब्ज डॉलर्सची (सुमारे ३५ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार असून, त्यातून ५० हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी चीन दौऱ्यात फॉक्सकॉनच्या एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली होती व राज्यात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार झालेल्या या कराराद्वारे फॉक्सकॉनचे प्रकल्प मुंबई आणि पुणे दरम्यान उभे राहतील आणि तळेगाव येथे त्यांचा प्रकल्प असेल, असे त्यांनी सांगितले. आयपॅड-आयफोन, तसेच विविध कंपन्यांच्या टीव्हीचे स्क्रीन्स, चिप्स आदी उपकरणांची निर्मिती या कंपनीमार्फत करण्यात येते. एमआयडीसीने या कंपनीस पुणे व मुंबई परिसरातील काही भूखंड दाखविले असून प्रारंभीच्या काळात तेथे टीएफटी स्क्रीन्स आणि सेमीकंडक्टर्सचे उत्पादन सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागुंतवणूक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांत जगात आघाडीवर असलेली फॉक्सकॉन ही कंपनी पुणे व मुंबई परिसरात ३५ हजार कोटी रुपयांची (पाच अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. ही कदाचित देशातील सर्वांत मोठी थेट परदेशी गुंतवणूक ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

फडणवीस आणि या कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांच्या उपस्थितीत मुंबईत या संदर्भातील करार शनिवारी करण्यात आला. त्यानुसार येत्या पाच वर्षांत ही कंपनी पाच अब्ज डॉलरची (सुमारे ३५ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार असून, त्यातून ५० हजार रोजगार निर्माण होतील, असे फडणवीस यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी फडणवीस यांनी चीन दौऱ्यात फॉक्सकॉनच्या एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली होती व राज्यात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार झालेल्या या कराराद्वारे फॉक्सकॉनचे प्रकल्प मुंबई आणि पुणे दरम्यान उभे राहतील आणि तळेगाव येथे त्यांचा प्रकल्प असेल. आयपॅड-आयफोन, तसेच विविध कंपन्यांच्या टीव्हीचे स्क्रीन्स, चिप्स आदी उपकरणांची निर्मिती या कंपनीमार्फत करण्यात येते. एमआयडीसीने या कंपनीस पुणे व मुंबई परिसरातील काही भूखंड दाखविले असून प्रारंभीच्या काळात तेथे टीएफटी स्क्रीन्स आणि सेमीकंडक्टर्सचे उत्पादन सुरू होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.


अशी असेल फॉक्सकॉनची गुंतवणूक...

गुंतवणूक : ३५ हजार कोटी

रोजगार निर्मिती : ५० हजार

राज्यात दोन किंवा तीन प्रकल्प

त्यातील एक तळेगावजवळ

दुसरा खालापूर किंवा पेण-खोपोली रस्त्यावर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत चोरी करणारा अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

रेल्वेत प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्यास लोहमार्ग पोलिसांनी शिताफीने अटक केली. रविवारी पुणे रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. गणेश भाईदास पाटील (वय ३१, रा. गाडगेनगर, अंबरनाथ, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पुणे रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिस निरीक्षक अरुण मोरे व त्यांचे सहकारी कर्मचारी गस्त घालत असताना डेक्कन एक्स्प्रेस या गाडीत गणेश पाटील हा संशयितरित्या प्रवाशांच्या बॅगा चाचपत असल्याचे आढळले. मोरे यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी पाटील याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने रेल्वेमध्ये प्रवाशांचे लॅपटॉप बॅगा तसेच किमती वस्तू चोरत असल्याची माहिती दिली.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे रेल्वेत चोरलेले दोन लॅपटॉप व एक किमती मोबाइल असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का याची चौकशी लोहमार्ग पोलिस करीत आहेत. निरीक्षक अरुण मोरे, फौजदार मामासाहेब मापारी, धनंजय दुगाने, दत्तात्राय मोरे, उमेश बागली, सतीश ढोले, पंकज मुळे, विक्रम मधे, अजय पारधी, वाहन चालक सुभाष ननावरे, जगदी सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वकिलाला लुटणारे गजाआड

वकिलाला तलवारीचा धाक दाखवत लुटून पाळणाऱ्या दोघा चोरट्यांना गस्तीवरील पोलिसांनी पकडले. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास निगडी परिसरात ही घटना घडली. हर्षवर्धन पवार (वय १८), चेतन भगत (१८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या प्रकरणी अॅड. तुषार बेंडाळे (३४, रा. शिंदेवाडी, रावेत) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणेबारा वाजता तुषार घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडविले. तलवारीचा धाक दाखवत जबरदस्तीने त्यांना त्यांच्यात मोटारीत बसवून आकुर्डी येथील एटीएम सेंटरमध्ये आणले. त्यांच्याकडून जबरदस्तीने एटीएमचा पिन घेऊन दहा हजार रुपये काढले. ते पुन्हा रावेतच्या दिशेने जात असताना निगडी पोलिसांना एका मोटारीतून हे तिघे संशयास्पदरीत्या जाताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना अडवून विचारणा केली आणि अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना उपशहरप्रमुख उल्हास कोकणे तडीपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार चिंचवड विधानसभा शिवसेना उपशहर प्रमुख उल्हास कोकणे याच्यासह अन्य एका सराईतांवर दोन वर्षांसाठी तडीपार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान,या व्यतिरिक्त शहरातील ४६ सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिली.

उल्हास कोकणे (३०, रा. रहाटणी) असे या उपशहरप्रमुखाचे नाव आहे. तसेच जालिंदर राजू निकम उर्फ जाल्या (वय २४, रा. नाणेकर चाळ, पिंपरी) या सराईत गुन्हेगारालाही तडीपार करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणे यांची शिवसेनेने नुकत्याच जाहीर केलेल्या कार्यकारीणीमध्ये चिंचवड विधानसभेच्या उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याच्याविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

कोकणे याने २०१२ च्या महापालिका निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर रहाटणी येथून निवडणूकही लढवली होती. सध्या एका महिला मंचाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमही राबवत होता. त्याच्यावर दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हेगार जाल्या निकम याच्याविरोधातही गंभीर गुन्हे असल्यामुळे त्याच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदिस्त जलवाहिनी नकोच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

'पवना ही मावळच्या शेतकऱ्यांची आस्था आणि अस्मिता आहे. तिच्या पाण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी प्राणपणाला लावून, स्वतःचे बलिदान दिले, त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही. कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय कायम असून, तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असे आमदार बाळा उर्फ संजय भेगडे यांनी स्पष्ट केले.

बंदिस्त पवना जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या मावळ गोळीबाराच्या घटनेला रविवारी चार वर्षे पूर्ण झाले. या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त येळसे (पवनानगर) येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार भेगडे बोलत होते.

या वेळी येळसे गावातून स्मृती ज्योत पेटवून रॅली काढण्यात आली. त्यानंतर सभेच्या ठिकाणी १२ वाजून ४० मिनिटांनी गोळीबारात बळी गेलेल्या शेतकरी कांताबाई ठाकर, शामराव तुपे, मारेश्वार साठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, भाजपचे तालुकाध्यक्ष रामनाथ वारिंगे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, प्रशांत ढोरे, एकनाथराव टिळे, पंचायत समितीच्या सभापती मंगलाताई वाळूंजकर, उपसभापती गणेश गायकवाड, रवींद्र भेगडे, गणेश भेगडे, शंकरराव आडकर, शिवसेना नेते शांताराम भोते, देहूरोड कँटोन्मेंटचे सदस्य रघुवीर शेलार, आरपीआयचे तालुका सरचिटणीस लक्ष्मण भालेराव, सुकनशेठ बाफना, गुलाब म्हाळसकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

या वेळी बाळा भेगडे म्हणाले,'मावळ गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरीवर घेण्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्यामुळे अडथळा येत आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध पहिल्यापासून असून तो आजही कायम आहे. मृतांच्या वारसांना नोकरी मिळावी, यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, सरकारच्या आदेशानुसार येत्या दीड महिन्यात मृतांच्या वारसांना नोकरी मिळेल.'

'राज्यातील सत्तांतरानंतर मावळातील राष्ट्रवादीचे नेते आता सरड्याप्रमाणे रंग बदलायला लागले असून, आता ते बंदिस्त जलवाहिनीला विरोध करायला लागले आहेत. मग चार वर्षांपूर्वी का झोपले होते. आता ते याचे राजकीय भांडवल करून राजकारण करत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बाळा भेगडे यांनी केला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र भेगडे यांनी तर सूत्रसंचालन विश्वनाथ जाधव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अत्रे संमेलनाच्या अध्यक्षपदी रामदास फुटाणे यांची निवड

$
0
0

सासवड : सासवड येथे होणाऱ्या १८ व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ हास्यकवी रामदास फुटाणे यांची निवड झाली आहे. तर स्वागताध्यक्षपदी शांताराम पोमण यांची निवड झाल्याची माहिती आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी म्हणजेच १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे दर वर्षी आचार्य अत्रे प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. संमेलनाचे हे १८ वे वर्ष आहे.

सासवड येथे ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी मिळालेल्या प्रतिसादानंतर आत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवस आयोजित केले जाते व बाल आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, परीसंवाद, याचे आयोजन केले आहे, असे कोलते यांनी सांगितले.

१३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आचार्य अत्रे यांचे अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरात होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्नधान्य वितरण व ग्राहक संरक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांचे हस्ते सकाळी १० वाजता सासवड नगर परिषदेच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात संमेलनाचे उद्घाटन करतील. याच दिवशी दुपारी बाल आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परिसंवाद, दुपारी कथाकथन होईल. तर दुपारी ३ ते ४ या वेळेत समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहांसाठी धोरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केलेल्या राज्यभरातील नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालाबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून, त्यानंतर नाट्यगृहांची परिस्थिती सुधारण्यासाठीचे धोरण ठरवले जाणार आहे.

राज्याच्या विविध भागात नाट्यगृहे आहेत. मात्र, त्यांची परिस्थिती चांगली नसल्याची तक्रार रंगकर्मींकडून वारंवार केली जाते. त्यामुळे नाट्यप्रयोग अथवा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणे शक्य होत नाही.

या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने विशेष समिती नेमली. सर्वेक्षणासाठी कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या विभाग करण्यात आले. या विभागांतर्गत पस्तीस जिल्ह्यांतील नाट्यगृहांचा अभ्यास करण्यात आला. त्याबाबतचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'नेच सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. नाट्यगृहांची झालेली दुरवस्था, वास्तुरचनेबाबतच्या उणीवा, सभागृहांचेच नाट्यगृहामध्ये करण्यात आलेले रूपांतर आदी बाबी या पाहणीत तपासण्यात आल्या. राज्यव्यापी सर्वेक्षणातून आता नाट्यगृहांचा नेमका डेटा हाती आला आहे.

समितीने केलेल्या सर्वेक्षणानंतर वस्तुस्थिती दर्शविणारा अहवाल तयार करून तो सरकारला सादर करण्यात आला आहे. आता त्याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह चर्चा केली जाणार आहे. पुढील टप्प्यात नाट्यगृहांची स्वतंत्र वेबसाइट राज्य सरकारच्या वतीने तयार करण्याची योजना आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 'मटा'ला देण्यात आली.

पीपीपी तत्त्वावर नाट्यगृहांचा विकास

नाट्यगृहांचे फायर ऑडिट नाही, साउंड-लाइटची पुरेशी सोय नाही, अस्वच्छता, मनुष्यबळाचा अभाव, सुरक्षितता अशा बऱ्याच त्रुटी या पाहणीतून आढळून आल्या. या नाट्यगृहांची परिस्थिती सुधारण्याबाबत, तिकीट दर, पार्किंगची, व्यवस्था याबाबत धोरण ठरवले जाणार आहे. त्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. स्थानिक कलावंत, लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य त्यासाठी घेतले जाणार आहे, असेही संचालनालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी अ‌‌धिकारी आरोपांना वैतागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) घडी अंशतः पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असतानाच, कर्मचारी संघटनांच्या त्रासाला वैतागून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदभार काढून घेण्याची मागणी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. पीएमपीच्या कारभारात शिस्त आणण्यासाठी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनीच ही मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार अभिषेक कृष्णा यांनी दोन महिन्यांपूर्वी स्वीकारला. त्यानंतर, पीएमपीला सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काही बदल करण्यात आले. पीएमपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे महत्त्वाचा पदभार सोपविण्यात आला. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी काही कठोर पावले उचलली. काही राजकीय संघटनांकडून त्याचे भांडवल केले जात असून, संबंधित अधिकाऱ्यांवर अकार्यक्षमतेचा आरोप केला जात आहे. तसेच, त्यांच्याकडील कार्यभार काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

पीएमपीच्या फायद्यासाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न करूनही सातत्याने आरोपांना सामोरे जावे लागत असल्याने पदभार काढून घ्यावा, अशी मागणी पीएमपीतील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कृष्णा यांच्याकडे केली आहे. येत्या काही दिवसांत आळंदी रोडवरील बीआरटी सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्याचा फायदा, पीएमपीला होण्याची शक्यता असली, तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे सुधारणेच्या मार्गावर असलेल्या पीएमपीला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे पोलिसांचेही ‘आपले सरकार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने सुरू केलेले 'आपले सरकार' हे वेब पोर्टल पुण्यातही राबवण्यात येत आहे. येत्या १५ ऑगस्टपासून हा प्रायोगिक प्रकल्प सुरू होत असून, पुणे पोलिसांनाही त्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार नाकारण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. वेब पोर्टलवरून केलेल्या तक्रारीची दखल थेट सहायक आयुक्तांना घ्यावी लागणार आहे. त्या तक्रारीची किती वेळेत आणि काय दखल घेतली गेली याची माहितीही वेबसाइटवर टाकावी लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राज्यस्तरीय उपक्रम सुरू केला आहे. सरकार पातळीवर उपक्रम यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. १५ ऑगस्ट रोजी हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रेल्वे पुणे, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त यांचा थेट सहभाग उपक्रमात राहणार आहे. राज्य सरकारच्या कार्यालयांशी संबंधित प्रश्नांचे निवारण थेट 'आपले सरकार'वरून करण्यात येणार आहे.

या वेबपोर्टलमध्ये तक्रार निवारण, माहितीचा अधिकार आणि सहयोग हे तीन विभाग करण्यात आले आहेत. तक्रार निवारणामध्ये कोणीही नागरिक आपली तक्रार थेट मोबाइल नंबरच्या आधारे करू शकतो. ती तक्रार कोणाकडे पाठवण्यात आली आहे, त्यावर काय कार्यवाही झाली, हे तक्रारदाराला वेबसाइटवरच दिसणार आहे. याचप्रकारे माहिती अधिकार अर्जाचीही प्र​क्रिया समजणार आहे. 'सहयोग'मध्ये राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे.

तक्रार थेट सहायक आयुक्तांकडे

पुणे शहर पोलिसांनी सायबर सेलच्या सहायक आयुक्तांना अॅडमिन यूजर म्हणून नेमले आहे. तसेच, शहरात नेमणुकीसाठी असलेल्या सर्व सहायक आयुक्तांना त्यांच्या युनिटचे अॅडमिन यूजर करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहर पोलिसांशी संबंधित वेबपोर्टलवरून आलेली तक्रार थेट सहायक आयुक्तांकडे येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूप्रमाणेच कॅन्सरचीही दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वाइन फ्लू, टीबीसारख्या आजाराची केंद्र आणि राज्य सरकारने दखल घेतली (नोटिफाय) त्याप्रमाणे कॅन्सरचा आजार देखील लवकरच 'नोटिफाय' करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.

इंडियन कॅन्सर सोसायटी आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट्सतर्फे (एएमएमओ) दोन दिवसीय परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेला राज्यातील विविध कॅन्सरतज्ज्ञ उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी व्यासपीठावर इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अॅन्ड पिडिअॅट्रीक ऑन्कॉलॉजी आणि एएमएमओचे उपाध्यक्ष डॉ. अनंतभूषण रानडे, एएमएमओचे अध्यक्ष डॉ. बी. व्ही. औसेकर, सचिव डॉ. शैलेश बोंदर्डे, इंडियन कॅन्सर सोसायटीचे महासंचालक डॉ. प्रदीप गोगटे, डॉ. पद्मज कुलकर्णी उपस्थित होते.

'कॅन्सरच्या आजाराबाबत जनतेत जनजागृती वाढावी, तसेच पेशंटला कमीत कमी खर्चात उपचार मिळावे यासाठी कॅन्सरच्या आजाराला राज्य सरकारकडून लवकरच 'नोटिफाय' केले जाईल,' असे आरोग्य राज्यमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले.

'इंडियन कॅन्सर सोसायटी आणि कॅन्सर तज्ज्ञ यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. ही दरी दूर कऱण्यासाठी परिषद आयोजित करण्यात आली. कॅन्सरच्या पेशंटची संख्या किती आहे, याबाबत सूसुत्रता आणणे हा परिषदेचा उद्देश होता,' असे डॉ. रानडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images