Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

८ हजार बालकांना संजीवनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कमी वजनाच्या बालकांना वेळेवर उपचार देऊन त्यांना जीवदान देण्यासाठी राज्यातील जिल्हा हॉस्पिटलमध्ये उभारलेल्या ३५ विभागांमुळे आठ हजार बालकांना संजीवनी मिळाली. आणखी १२ विभाग नव्याने तयार करण्यात येणार असून पूर्वीच्या ३५ पैकी दहा विभागांमध्ये बेड्सची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे १४ हजार बालकांना जीवदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात मुदतपूर्व बाळंत होणाऱ्या मातांसह बालकांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे माता मृत्यू आणि बाल मृत्यूचे प्रमाण राज्यात वाढत असल्याचे चित्र आहे. त्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने गेल्या काही वर्षांपासून यावर लक्ष केंद्रित केले आहे. माता मृत्यूवर नियंत्रण मिळविताना बालमृत्युच्या नियंत्रणाकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये बालरोग विभाग स्वतंत्रपणे कार्यरत करण्यात आला आहे. त्यामुळे नवजात शिशू अथवा बालकांना संजीवनी मिळू लागली आहे.

'कमी वजनाच्या आणि नाजूक प्रकृतीच्या बाळास बरे होईपर्यंत पूर्वी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात नव्हते. त्यामुळे बाहेर

उपचाराविना असलेल्या कमी वजनाच्या २५ टक्के बालकांचा मृत्यू होत असे. परंतु, त्यांच्यावर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत आणण्यात यश आले. राज्यात सध्या ३५ जिल्हा हॉस्पिटल, जिल्हा महिला हॉस्पिटल, जनरल हॉस्पिटलमध्ये नवजात शिशूंसाठी स्वतंत्र कक्षच स्थापन करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ४५ हजार बालकांना उपचार देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यापैकी नाजूक प्रकृतीच्या आठ हजार बालकांना जीवदान मिळाले, अशी माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी 'मटा'ली दिली.

आजमितीला राज्यात ३५ विभाग कार्यरत आहेत. त्यात आणखी नव्याने बारा विभागांची भर घालण्यात येणार आहे. ३५पैकी दहा युनिटचा विस्तार केला जाणार आहे. त्यामध्ये १२ ते ६० बेड्सचे नियोजन केले जाणार आहे. यामुळे यापुढे राज्यात ४५ ऐवजी ७५ हजार बालकांना उपचाराची सुविधा मिळणार आहे. गेल्या वर्षी ७ ते ८ हजार बालकांवर उपचार करण्यात आल्याने त्यांना जीवदान मिळाले. या पुढे चौदा हजार बालकांना जीवदान मिळेल, असेही डॉ. पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तांदळासह साखर महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्रासह अन्य राज्यात पाऊस लांबल्याचा फटका आंबेमोहोर, कोलम तांदळास बसला असून, त्याच्या दरात क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली. त्याशिवाय देशात परदेशातून डाळी आयात करण्यात येत असल्याने अन्य देशांना साखर निर्यात करण्यात येणार असल्याने साखरेला भाव आला आहे.

साखरेच्या दरात क्विंटलमागे १५० रुपयांनी वाढ झाली. त्याशिवाय तूरडाळीच्या दरात मागील आठवड्याप्रमाणे वाढीव दर टिकून आहेत. तसेच गहू, ज्वारी, बाजरी, गूळ, आटा, रवा, मैदा, भगर, मुरमुरे, भडंग, मिरची, धने, हळद यांचे दर स्थिर आहेत.

सोयाबीन, सरकी पामतेल वगळता अन्य तेलांचे दरही स्थिर आहेत. आयात अधिक होत असल्याने आणि ग्राहकांची फारशी मागणी नसल्याने सरकी आणि पामतेलाच्या १५ लिटरच्या डब्यामागे अनुक्रमे २० आणि ५० रुपयांची तर सोयाबीनच्या दरात ३० रुपयांची वाढ झाली आहे. ग्राहकांची फारशी मागणी नसल्याने साबुदाण्याचे दरही १५० रुपयांनी उतरले आहेत. विविध प्रकारच्या पोह्यांच्या दरात ५० रुपयांनी घट झाली आहे. बेसनात देखील ५० रुपयांनी घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून डाळींची भारतात आयात होत आहे. त्या बदल्यात साखरेची निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे साखरेला बाजारात उठाव आला असल्याने गेल्या काही आठवड्यात घटलेल्या साखरेचे दर १५० रुपयांनी वाढले आहेत. राज्यासह अन्य राज्यांच्या भागात फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे आंबेमोहोर आणि कोलम तांदळाच्या दरात १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. बासमतीचे दर टिकून आहेत. तूरडाळीचा राज्यात तुटवडा असून त्याची फारशी आवक होत नाही. लातूर, अकोला, बार्शी येथेदेखील पाऊस कमी झाल्याने या तीन्ही ठिकाणांहून फारशी आवक झालेली नाही. त्यामुळे गेल्या काही आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात दर वाढलेलेच आहेत.

वस्तूंचे भाव

तेलाचे भाव (१५ लिटर)

सोयाबीन ९५०० -१०३०

सरकी ९०० - १०६०

पामतेल ७५० - ८३०

साखर (क्विंटलमध्ये)

२२५० - २३००

आंबोमोहोर तांदूळ ४५०० - ५०००

कोलम तांदूळ ३९७०० - ४५००

तूरडाळ १००००-१२०००

साबुदाणा ३८०० - ५०००

शेंगदाणा ९००० -१०,०००

पोहा (मध्यम पोहा) २७५० - २८५०

सुपर पोहा ३०००-३१५०

पेण पोहा २७००- २८००

पातळ पोहा ३१०० -३५००

दगडी पोहा २३००-२४५०

बेसन ३१५०- ३२५०

नारळ (शेकडा)

नवा माल १००० - १२००

मद्रास १८०० - २०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटो ५ ते ७ रुपये किलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यासह पुणे विभागात सर्वदूर पावसाने थोड्याफार प्रमाणात हजेरी लावल्याने टोमॅटो खराब होण्याची शेतकऱ्यांना भीती व्यक्त केली. त्यामुळेच नुकसान टाळण्यासाठी बाजारात विक्री करण्यासाठी आणल्याने टोमॅटोची मोठी आवक झाली. त्यामुळे किलोमागे अवघे पाच ते सात रुपये किलो असा दर मिळाला आहे. यामुळे कांदा, लसणाची फोडणी महाग झाली असताना टोमॅटो मात्र सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.

गुलटेकडीच्या फळबाजारात साडेसहा हजार ते सात हजार पेट्यांची आवक झाली. टोमॅटोची मोठी आवक झाली असली तरी मागणी मात्र घटली. त्यामुळे दहा किलोला ५० ते ७० रुपये किलो दर मिळाला, तर किरकोळ बाजारात १५ ते १६ रुपये किलोने टोमॅटोची विक्री झाली. दररोज अडीच ते तीन हजार पेट्यांची आवक होत असे. दुपटीपेक्षा अधिक आवक वाढल्याने दरात मोठी घट झाली आहे, अशी माहिती विलास भुजबळ यांनी दिली.

पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भीतीपोटी शेतकऱ्यांनी टोमॅटोचा शेतीमाल बाजारात विक्रीसाठी आणला आहे. मागणी घटल्यामुळे मालाची विक्रीही फार झालेली नाही. चांगल्या मालाला प्रती किलोला सात रुपये दर मिळाला आहे. मात्र, हलक्या प्रतीचा माल ग्राहकांनी मागेल त्या दराने विकावा लागल्याची वस्तुस्थिती रविवारी बाजारात दिसून येत होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास घाऊक बाजारातील आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. मागणी आणखी घटल्यास टोमॅटोचे दर आणखी उतरण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकडी, शेवगा स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी फळभाज्यांची आवक वाढून शेवगा, काकडी, टोमॅटो, सिमला मिरची स्वस्त झाल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळणार आहे. फ्लॉवर, कोबी, भेंडी, गवार यांच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे.

मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशातून पाच ते सहा टेम्पो मटार, कर्नाटकातून पाच ते सहा टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून आठ टेम्पो शेवग्याची आवक झाली. कर्नाटक, मध्य प्रदेशातून हिरवी मिरची दहा ते बारा टेम्पो, इंदूरहून तीन ते चार टेम्पो गाजर, बेंगळुरू आल्याची दोनशे पोत्यांची आवक झाली.

सातारी आल्याची ६५० पोत्यांची आवक झाली. टोमॅटोही सहा ते सात हजार पेटी, फ्लॉवरची १४ ते १५ टेम्पो, कोबीची १४ ते १५ टेम्पो, सिमला मिरचीची १४ चे १५ टेम्पोची आवक झाली. भुईमुगाच्या शेंगांची १७५ ते २०० पोती, कांद्याची ४५ ते ५० ट्रक आवक झाली आहे. आंध्र प्रदेश, इंदूर, नाशिक भागातून ६० ट्रक बटाटा, मध्य प्रदेशातून तीन ते साडेतीन हजार गोणी इतकी आवक झाली.

बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे सर्व पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. पुणे विभागातून कोथिंबिरीच्या दीड लाख जुड्यांची, तर मेथीच्या एक लाख जुड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. कोथिंबीर आणि मेथीला शेकड्यामागे ४०० ते ८०० रुपये द्यावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलदाराला उडविले?

$
0
0

पुणे : बेकायदा वाळू वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याकडे जात असताना तहसीलदारांनी आणलेल्या खासगी गाडीला धडक मारून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न एका ट्रकचालकाने केला. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे रविवारी हा प्रकार घडला.

खानोटा परिसरात वाळू उपसा करणारे ट्रक तहसीलदारांकडून इंदापूर पोलिस ठाण्याच्या आवारात आणले जात होते. त्यामध्ये २५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली; तसेच एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. त्या वेळी या बोटींवर छापा टाकण्याचे काम सुरू असताना बेकायदा वाळू वाहतूक करणारे आणखी तीन ट्रक निदर्शनास आले. त्यांच्यावरही कारवाई करताना तहसीलदारांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. संबंधित ट्रकमालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर नैतिकतेने प्रॅक्टिस करतात का? : डॉ. आमटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांवर समाजातील काही घटकांकडून हल्ले होणे चांगले नाही; पण डॉक्टरदेखील नैतिकतेने प्रॅक्टिस करतात का,' असा सवाल करून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी डॉक्टरांच्या व्यावसायिकतेवर प्रश्न उपस्थित केला.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेच्या वतीने डॉ. एम. जे. जोशी इंडियन मेडिकल असोसिएशन भूषण पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष आहे. वैद्यकीय व्यवसायातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजकार्यासह वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग गरिबांसाठी करणाऱ्या तज्ज्ञांचा पुरस्काराने गौरव केला जातो. यंदाच्या वर्षी हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आमटे आणि मंदा आमटे या दाम्पत्याला गौरवण्यात आले. 'आयएमए'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भूतकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी डॉ. एम. जे. जोशी फाउंडेशनच्या डॉ. माधुरी लोकापूर, डॉ. मुकुंद जोशी, डॉ. जयंत नवरंगे, 'आयएमए'चे सचिव डॉ. संजय पाटील, डॉ. आरती निमकर उपस्थित होते. डॉ. मंदार परांजपे यांनी या वेळी आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली.

'डॉक्टरांवर समाजकंटकांकडून हल्ले होत आहेत. त्याची कारणे विविध असतील; पण सध्या समाजात प्रचंड पैसा आला आहे. त्यामुळे आपण सर्व काही विकत घेऊ शकतो, असा अतिविश्वास नागरिकांमध्ये वाढत चालला आहे. तसेच, डॉक्टरांकडूनदेखील नैतिकदृष्ट्या (इथिकल) आपण वैद्यकीय प्रॅक्टिस करतो का, याचे आत्मपरीक्षण व्हायला हवे. वैद्यकीय व्यवसायात अनेक अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असून, त्या दूर ठेवून प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करावी, तरच जीवनाचे सार्थक होईल,' असा सल्ला डॉ. प्रकाश आमटे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावित्रीबाई फुले यांचे विद्यापीठात स्मारक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केली. तसेच, विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या प्रक्रियेत योगदान देऊ शकल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या वर्षपूर्तीनिमित्त विद्यापीठामध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. पुणे विद्यापीठ नामांतर कृती समितीतर्फे या वेळी मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. एच. एम. देसरडा, कृष्णकांत कुदळे, महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, 'महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे आमच्या पिढीसाठी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणेच आहे. त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवत कार्य केल्यास देश निश्चितच प्रगती करील. विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे योगदान देऊ शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे.' फुलेंच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी विद्यापीठात फुले यांचे स्मारक उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. प्रा. गौतम बेंगाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आखाड संडे’ साजरा

$
0
0

२० हजार किलो मटण, ७०० टन चिकन फस्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार म्हणजे 'आखाड पार्टी'चाच दिवस! येत्या शनिवारपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असल्याने पुणेकर खवय्यांनी बघता बघता २० हजार किलो मटण, ७०० टन चिकन आणि पापलेट, सुरमई, बांगड्यासह कोळंबी मासळीवर ताव मारला.

'आखाडा'च्या निमित्ताने गणेश पेठेतील मासळी बाजारासह चिकन, मटण बाजार रविवार सकाळपासून चांगला फुलला होता. ग्राहकांनी सकाळी लवकरच दुकानांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. हॉटेलचालकांकडून मोठ्या प्रमाणात अगोदरच मागणी नोंदवून ठेवण्यात आली होती, असे निरीक्षण मटण, चिकन विक्रेत्यांनी नोंदवले.

'आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार साजरा करण्यासाठी खवय्यांनी एका दिवसात सातशे टन चिकनची खरेदी केली. वेंकीज, शगुणा, झाफा यांसारख्या मोठ्यांसह, लहान कंपन्यांकडूनही कोंबड्यांची विविध भागांतील विक्रेत्यांनी खरेदी केली. नगर रस्ता, तळेगाव, सासवड, भोर या भागांतून कोंबड्यांचीदेखील आवक झाली. काही शेतकऱ्यांनी थेट कंपन्यांना कोंबड्यांचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांकडून चिकनची खरेदी मोठी झाली. गेल्या वर्षी सहाशे टनांपर्यंत खरेदी झाली होती; मात्र यंदा नागरिकांचा चिकन खाण्याकडे अधिक ओढा होता. त्यामुळे सातशे टनांपर्यंत खरेदी एका दिवसात झाली आहे,' अशी माहिती चिकनचे विक्रेते रूपेश परदेशी यांनी दिली.

'चिकनपेक्षा मटणाचे दर अधिक असल्याने नागरिकांनी मटणापेक्षा चिकनला अधिक पसंती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक चिकन खरेदी करतात; पण मटणाचा चाहता वर्ग अद्यापही कायम असून त्यांच्याकडूनदेखील मटणाला मागणी आहे. गेल्या वर्षी साडेतीन हजार बकऱ्यांची मागणी नोंदवली गेली होती. परंतु, त्या तुलनेत

यंदाच्या वर्षी रविवारी सुमारे दोन हजार बकऱ्यांची खरेदी करण्यात आली. म्हणजेच वीस हजार किलो (दोन टन) मटणाची विक्री शहरातील विक्रेत्यांकडून झाली,' असे निरीक्षण मटण विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी नोंदवले.

'चिकनला १४० ते १६० रुपये किलो, तर मटणाला ४०० ते ४४० रुपये किलो असा दर मिळाला होता. त्यामुळे महागडे मटण खरेदी करण्यापेक्षा नागरिक चिकन खरेदीचा अधिक विचार करत आहेत,' असेही कांबळे यांनी स्पष्ट केले.

मासळीलाही मोठी मागणी

'पुण्यात रविवारी समुद्राच्या मासळीची आठ ते १० टन, तर आंध्रमधून नदीचा रोहू व कटला माशांची १४ ते १५ टन आवक झाली. बाजारात जेवढी आवक झाली, तेवढीच विक्री एका दिवसात झाली. त्यामुळे आखाड पार्टी साजरी करताना मटण, चिकनबरोबर मासळीलादेखील मागणी होती,' असे ठाकूर परदेशी यांनी सांगितले. मासळीत पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगड्याला अधिक मागणी होती. त्यामुळे या मासळीचे दर १५ ते २० टक्के जास्त होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संप चिरडण्यासाठी राजकीय खेळी

$
0
0

पुणेः 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये (एफटीआयआय) सुरू असलेला संप चिरडण्यासाठी केंद्र सरकार राजकीय खेळी करत असल्याचा आरोप स्टुडंट्स कौन्सिलने केला आहे. २००८च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे फायनल प्रोजेक्ट 'आहेत त्या स्थितीत' तपासण्याचा प्रशासनाचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने अमान्य आहे, असेही कौन्सिलने स्पष्ट केले आहे.

'एफटीआयआय'च्या विद्यार्थांच्या संपाला दोन महिने होत आहेत; मात्र अद्याप काहीही मार्ग निघालेला नाही. संचालक प्रशांत पाठराबे यांनी रखडलेल्या २००८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे फायनल प्रोजेक्ट्स आहेत, त्या स्थितीत तपासण्याची नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेधा कुलकर्णींनी टाकली अवैध दारूधंद्यावर धाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथील उच्चभ्रू अशा डहाणूकर कॉलनीजवळील लक्ष्मीनगर वस्तीत अवैधरीत्या दारूविक्री करण्यात येत असलेल्या ठिकाणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी रात्री धाड टाकली. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर दारूसाठा जप्त करण्यात आला. या ठिकाणावरून दारूविक्री करणारी एक महिला व पाच ते सहा खरेदीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

रविवारी कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांसह मिळालेल्या माहितीच्या आधारावर संबंधित ठिकाणी धाड टाकली. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिस त्या ठिकाणी दाखल झाल्यावर पोलिसांनी दारूचा साठा जप्त केला. दारूविक्री करणाऱ्या एका महिलेला व दारू खरेदी करण्यासाठी आलेल्या पाच ते सहा जणांना त्यांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीनगर पोलिस चैकीत गुन्हा नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. या वेळी त्या वस्तीतील महिलादेखील पोलिस चौकीत उपस्थित होत्या. आमच्या येथील दारूविक्री कायमची बंद करा, असे त्या पोलिसांना सांगत होत्या.

यापूर्वीही आंदोलन

डहाणूकर कॉलनीतील लेन नंबर एकच्या वरील बाजूस लक्ष्मीनगर नावाची मोठी वस्ती आहे. या वस्तीत अवैध दारूविक्री होत असल्याचे यापूर्वी समोर आले होते. त्या वेळी या वस्तीतील महिलांसह आमदार कुलकर्णी यांनी आंदोलन केले होते; मात्र त्यानंतरही दारूविक्रीचा हा प्रकार सुरूच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारस्वतांचा मेळा भरणार उद्योगनगरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान उद्योगनगरी पिंपरी चिंचवडला मिळाला आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी ही संस्था संमेलनाचे आयोजन करणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी ही घोषणा केली. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते, मोना चिमोटे, शुभदा फडणवीस आदी या वेळी उपस्थित होते. साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच पिंपरी चिंचवडला संमेलन होणार आहे.

'जागेची उपलब्धता, मनुष्यबळ आणि आर्थिक बळ ध्यानात घेऊन संमेलन स्थळाचा विचार झाला. घुमानचे साहित्य संमेलन आणि अंदमानचे विश्व संमेलन दूर असल्याने रसिक त्यापासून वंचित राहिले. त्यामुळे सर्वांना जवळचे आणि मध्यवर्ती ठरेल अशा पिंपरी चिंचवडची संमेलन स्थळासाठी निवड करण्यात आली,' असे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.

साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान दिल्याबद्दल महामंडळाचे आभार. भक्तश्रेष्ठ मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे; तसेच पिंपरी चिंचवडची ओळख उद्योगनगरी म्हणून आहे. या संमेलनामुळे साहित्यिक वैचारिक चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम होतील हे महत्त्वाचे आहे. आगामी संमेलनात वेगळेपणा राखण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल.

- पी. डी. पाटील, अध्यक्ष, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून २५ लाखांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कायमच वर्दळ असणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई हायवेवर दुचाकींवरून आलेल्या सात जणांनी वाकडेवाडी येथील भुयारी मार्गात दोघांना मारहाण करून, त्यांच्याकडील २५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रदीप दुबे (२७, रा. चाकण) यांनी या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबे व त्यांचे सहकारी शारदाप्रसाद झा त्यांच्या पुण्यातील दोन ग्राहकांकडून अनुक्रमे १० व १५ लाख रुपये घेऊन दुचाकीवरून जात होते. त्या वेळी त्यांच्या मागून पाच दुचाकींवरून आलेल्या सात जणांनी वाकडेवाडी येथील भुयारी मार्गात त्यांना अडवले. त्यांनी दुबे व झा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या बॅगेतील रक्कम घेऊन ते पसार झाले. चोरट्यांना दुबे यांच्याकडे असलेल्या रकमेची माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

लूटमार करणारे दोघे अटकेत

रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन लूटमार करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यास खडक पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. शहरात नुकत्याच घडलेल्या लुटीच्या दोन घटनांमध्ये फिर्यादींनी आरोपींचे केलेले वर्णन एकसारखे होते. त्यानुसार पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस तपासादरम्यान त्यांनी गुन्हा मान्य केला.

आत्माराम धोंडू सावंत (३९, रा. जनता वसाहत) बाजीराव रोडवरून शुक्रवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी जात होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचा मोबाइल व रोख रक्कम असा तीन हजार सातशे रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. दुसरी घटना शंकरशेठ रोडवर गेल्या महिन्यात घडली होती. भोलेनाथ मोहन जवारे (३०, रा. आंबेगाव खुर्द) पालखीचे दर्शन घेऊन घरी जात असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले होते. या दोन्ही घटनांप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

खडक पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू असताना येथील कर्मचारी अजय थोरात व अमोल पवार यांना त्यांच्या खबऱ्यांकडून आरोपींविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार सुभाषनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोघांना १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेक मुगळीकर, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी थोरात, पवार, महेंद्र पवार, दत्तात्रय रत्नपारखी, संदीप पोळ यांनी ही कामगिरी केली.

भर दिवसा घरफोडी

भर दिवसा बंद घराचा दरवाजा उचकटून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तीन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना कर्वेनगर येथील स्टेट बँकनगर येथे घडली. या प्रकरणी राजीव कुलकर्णी (५८, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली असून, अज्ञातांविरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलकर्णी यांचे राहते घर बंद असताना चार ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी घराचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील तीन लाख सात हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने त्यांनी लंपास केले. दुपारी कुलकर्णी घरी परतल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या रोहनकडून नॉर्थ चॅनेल पार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याचा जलतरणपटू रोहन मोरेने इंग्लंडमधील नॉर्दन आयर्लंड ते स्कॉटलंड या ३६ किलोमीटरच्या सागरी जलतरण पूर्ण करून आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. त्याने हे अंतर १२ तास ४६ मिनिटांमध्ये पार केले. ही खाडी पार करणारा तो जगातील २४ वा, तर भारत व आशियातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. त्याचप्रमाणे या कामगिरीमुळे त्याने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.

नॉर्दन आयर्लंड ते स्कॉटलंड ही मोहीम पूर्ण करण्यासाठी रोहन महिनाभर आयर्लंडमध्ये मुक्कामाला होता. या काळात त्याने एका पाच किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग घेतला. मात्र, मुख्य मोहिमेचा सराव करत असतानाच तेथील हवामान बिघडले. तेथील थंड तापमानाचा सामना करणे हे रोहनसमोरील मुख्य आव्हान होते. संयोजकांकडून त्याला मोहिमेसाठी ९ ऑगस्टनंतरची तारीख मिळाली होती. मात्र, पुढील आठवड्यात तापमान अधिक खराब होईल, असा अंदाज असल्याने संयोजकांनी ऐनवेळी ६ ऑगस्ट रोजी मोहिम पूर्ण करण्यास सांगितले. त्यानुसार रोहन, अन्य एक जलतरणपटू व पाच जलतरणपटूंचा रिले संघ यांनी एकाच दिवशी मोहिमेला प्रारंभ केला.

त्यांनी नॉर्दन आयर्लंडमधून पहाटे पाच वाजता मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात समुद्र शांत असल्याचा फायदा घेत त्याने पहिल्या पाच तासांत १०.५ मैल म्हणजेच अर्ध्याहून अधिक अंतर पार केले; सहा तास जलतरण केल्यानंतर हवामान बदलले व समुद्र थंड होण्यास सुरुवात झाली. पाण्याचे तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत कमी झाले होते. त्यातच रोहनला समुद्रातील जेली फिशमुळे दुखापत झाली. आठव्या तासानंतर रोहनच्या क्षमता जवळपास संपली होती. मात्र, मानसिक खंबीरपणाच्या जोरावर त्याने आणखी पावणेपाच तास अव्याहत जलतरण करून यशस्वीपणे मोहीम पूर्ण केली. समुद्रात जवळ असलेल्या बोटीवरून आईने आणि बोटीच्या कॅप्टनने दिलेले प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरल्याचे रोहनने नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्टअखेरीस ‘परीक्षा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यामुळे 'परीक्षाच नाही' अशा वातावरणात भरत असलेल्या शाळांमधील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑगस्टअखेरीस मूल्यमापन व गुणवत्तावृद्धी चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या आठ भाषांमधील प्रश्नपत्रिकांची निर्मिती सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण शालेय व्यवस्थेची पुन्हा 'परीक्षा' पाहिली जाणार आहे.

शिक्षणहक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना नापास करण्यास मनाई आहे. परिणामी, या इयत्तांमधील शिक्षणाचा स्तर खालावत चालल्याची टीका केली जात होती; तसेच वर्गातील मोठ्या विद्यार्थिसंख्येमुळे सर्वंकष-सातत्यपूर्ण मूल्यमापनदेखील प्रभावी ठरत नव्हते. अशा परिस्थितीत राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या मूल्यमापन व गुणवत्तावृद्धी चाचण्यांची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांचीदेखील 'परीक्षा' पाहणारी ही चाचणी प्रत्यक्षात पूर्वीप्रमाणेच सत्रांतर्गत घटक परीक्षेसारखी घेतली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये (एससीईआरटी) या चाचणी परीक्षांची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. ऑगस्ट अखेरीस त्या घेतल्या जातील, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली.

सर्व्हेचे निकाल चिंतजनक

'प्रथम'च्या 'असर' या शैक्षणिक सर्वेक्षण अहवालातून गेल्या पाच वर्षात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेमध्ये ९४ टक्क्यांहून ७४ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे समोर आले आहे. 'एससीईआरटी'ने घेतलेल्या राज्यस्तरीय अध्ययन सर्वेक्षणात पाचवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात सरासरी ५३ टक्के व गणित विषयात ५१ टक्के गुण मिळविल्याचेही आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर या चाचणीच्या माध्यमातून अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचे घसरलेले गाडे पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ही चाचणी परीक्षा दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आणि गणित विषयांसाठी तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. या चाचण्यांच्या मूल्यमापनातून जाहीर होणारा निकाल संकलित करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. या निकालाच्या आधारे पुढील सत्रामधील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचे विविध उपक्रम जाहीर केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीखत नाही; विकासक गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या आदेशानंतरही फ्लॅटधारकांना खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जमिनीच्या मालक-विकासकाची रवानगी अखेर तुरुंगात झाली आहे. त्याला तीन वर्षे साधी कैद व दहा हजार दंड, तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशा प्रकारे प्रथमच शिक्षा सुनावण्यात आल्याचे ग्राहक संरक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या अध्यक्षा अंजली देशमुख यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. येरवड्यातील एका सोसायटीमधील फ्लॅटधारकांनी या मालक, विकसक असलेल्या व्यक्तीविरोधात तक्रार केली होती. ही सोसायटी १९८२मध्ये रजिस्टर झाली. तेव्हापासून मालक-विकासकाने सभासदांच्या नावाने फ्लॅटचे खरेदीखत करून दिलेले नव्हते. त्या विरोधात ही तक्रार करण्यात आली होती. सोसायटीच्या वतीने अॅड. रामराव देशमुख व अॅड. वंदना डांबरे यांनी काम पाहिले.

सोसायटीने ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २७नुसार ग्राहक मंचाकडे अर्ज केला. मंचाने २०१२ साली यावर निकाल देऊन संबंधित मालक, विकासकाला तीन वर्ष साधी कैद, दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. त्यावर संबंधित मालक-विकसकाने राज्य ग्राहक आयोग आणि त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. परंतु, तेथेही ग्राहक मंचाने दिलेला आदेशच कायम ठेवण्यात येऊन याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर सात ऑगस्ट रोजी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या अध्यक्षा अंजली देशमुख यांनी याबाबत संबंधित मालक-विकसकावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली असून, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन

या मालक-विकासकाविरोधात सोसायटीने २००३मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली होती. त्यावर २००७मध्ये निर्णय देताना 'एक महिन्याच्या आत खरेदीखत करून द्यावे व प्रत्येक सभासदाला एक हजार रुपये दंड द्यावा,' असा आदेश मंचाने दिला होता. परंतु, संबंधित मालक-विकासकाने या आदेशाचे पालन केले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेल्पलाइनच्या शिलेदारांची भरारी!

$
0
0

पुण्यातील हृद्य समारंभात मदतनिधीचे चेक प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दात्यांच्या अनाम हातांनी मदतीची ओंजळ भरभरून त्यांच्या ओंजळीत सुपूर्द केली आणि त्यांच्या पंखांना क्षितिज गवसले. या पंखांनी आता उडायचे स्वप्न तर पाहिले आहेच; पण भरारी घेताना जमिनीशी इमान राखून, आपल्यासारख्याच पंखांना बळ देण्याची प्रतिज्ञाही त्यांनी केली आहे!

हर्षद पाचारणे, अंजली हिवरे, चैतन्य तापसे, निकिता रेणुसे, साक्षी थोरात, पूजा जगताप, सायली साळवी, प्रतीक्षा ठोसर, अक्षय जोरी, ऐश्वर्या वीर, अश्विनी आव्हाड आणि रेखा गायकवाड या 'मटा हेल्पलाइन'च्या पुण्यातील १२ शिलेदारांना रविवारी समारंभपूर्वक मदतीचे चेक प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध हॉटेल उद्योजक आणि लेखक डॉ. विठ्ठल कामत यांनी साधलेला प्रेरणादायी संवाद आणि मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित वाचकांशी केलेले हृद्य हितगुज यामुळे समारंभाने एक वेगळीच उंची गाठली. या उपक्रमासाठी आलेल्या आर्थिक मदतीने शब्दशः 'कोटी'चे उड्डाण केले, हेही यंदाचे आणखी एक वैशिष्ट्य होते.

'तुमची आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, हे विसरू नका. ही तुमच्या बांधीलकीचीही सुरुवात आहे. तुम्ही जे यश मिळवलेत, ते टिकवणेही महत्त्वाचे आहे. जे काम पहिल्यांदा कराल, तेच चांगले करा. जेव्हा तुमचा पहिला पगार चालू होईल, तेव्हा दरवर्षी एका मुलाला शिष्यवृत्ती देण्याची प्रतिज्ञा करा. ज्योत से ज्योत लगाते चलो...' अशी साद डॉ. कामत यांनी विद्यार्थ्यांना घातली. कामत यांच्या या आवाहनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसादही उत्स्फूर्त मिळाला. 'आम्हाला ज्यांच्यामुळे मदत मिळाली, त्यांचे आम्ही ऋणी आहोत. आमच्या पंखांना बळ मिळाले आहे, आम्ही उडणार आहोत; पण आमचे पाय जमिनीवरच असतील. घेता घेता देणाऱ्याचे हात घेण्याचेही भान आम्ही नक्की ठेवू,' असे सांगून विद्यार्थ्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेजारधर्म पाळा निरोगी राहा!

$
0
0

पुणे टाइम्स टीम

वाडा संस्कृती लोप पावली आणि आपल्यापैकी अनेकजणांना ओनरशिपमध्ये 'अॅडजस्ट' व्हावं लागलं. तिथं गेल्यावर तिथल्या सोसायटी कल्चरनं 'रूल्स आणि रेग्युलेशन्स' आणले. प्रत्येक मजल्यावरच्या बंद दरवाजांनी 'शेजारधर्म' या गोष्टीला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, चांगला शेजारधर्म तुमच्या आरोग्यदायी आयुष्यातला महत्त्वाचा घटक होऊ शकत असेल तर? जागतिक स्तरावर झालेल्या एका सर्वेक्षणानं ही बाब सिद्ध केली आहे.

बंद दरवाजे ही आपल्या देशाची संस्कृती नाही; पण 'शेअरिंग' आणि 'एकत्र कुटुंब पद्धती' या दोन्ही गोष्टी आपल्या जगण्यातून हद्दपार होत असल्यानं 'चांगले शेजारी' असण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. या सर्वेक्षणानुसार, तुमचं घर सुरक्षित ठिकाणी असेल आणि त्यातही तुमचे शेजारी तुमच्या विश्वासातले, कुटुंबातल्या सदस्यांसारखे असतील, तर ताणतणाव, हृदयविकार, निराशा या गोष्टी टाळून सुंदर, आरोग्यदायी आयुष्य जगणं शक्य आहे.

जगभरात जिथं शेजारधर्माची संस्कृती अद्याप तगून आहे, अशा ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात पाच हजार व्यक्तींशी चार वर्षांसाठी संपर्क ठेवण्यात आला होता. या व्यक्तींमध्ये तरुण, मध्यमवयीन आणि ज्येष्ठ अशा सगळ्याच वयोगटांचा समावेश होता. शेजाऱ्यांशी असणारे संबंध, त्यांच्याविषयी असणारी माहिती, शेअरिंग, सुख-दुःखाच्या प्रसंगांत असणारी त्यांची साथ या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. यातली जवळपास ९० टक्के आनंदी मंडळी ही उत्तम शेजारधर्मामुळे सुखी असल्याचा निष्कर्ष त्यातून पुढे आला आहे.

दोन्हीकडून संवाद गरजेचा

शेजारधर्म पाळताना दोन्हीकडून संवाद आणि चांगले संबंध ठेवण्यासाठी पुढाकार गरजेचा आहे. बंद दरवाजा संस्कृतीनं आणलेली असुरक्षितता, शेजारी कोण राहातं हे माहीत नसणं, तणावपूर्ण संबंध, किरकोळ गोष्टींवरून वाद अथवा भांडणं या सगळ्या गोष्टी चांगल्या शेजारधर्मातून टाळता येतात.

काय करायला हवं शेजाऱ्यांशी स्वतःहून ओळख करून घ्या. समोरची व्यक्ती कधी बोलते, याची वाट न पाहाता संवाद ठेवा. लिफ्टमध्ये, जिन्यात, पार्किंगमध्ये भेट झाल्यास छान स्माइल द्या. सणवार आणि इतर सेलिब्रेशनप्रसंगी शुभेच्छा द्यायला विसरू नका. सुट्टीच्या दिवशी त्यांना नाश्ता किंवा चहासाठी आमंत्रण द्या. सहकुटुंब सहल, सिनेमा किंवा नाटकाचाही बेतही जमवा. दिवाळीसारख्या सणाला न्याहारीसाठी घरी बोलवा. त्यांच्या घरी मुलं असतील, तर तुमच्या मुलांसोबत त्यांच्यासाठी पार्टीचं आयोजन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अपहरणाचा डाव उधळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संशयास्पद कारचा पाठलाग करत ती अडवणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचेच अपहरण केल्याचा प्रकार नवले पुलाजवळ सोमवारी सकाळी घडला. या प्रकरणी मुंबई येथील दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत विभाकर पिराळे (वय ४८) आणि दीपक सूर्यकांत मैंदर्गे (४८, रा. दोघेही सोनी अपार्टमेंट, जरी-मरी कुर्ला अंधेरी रोड, कुर्ला (वेस्ट), मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी वाहतूक पोलिस कर्मचारी मयूर मंडले (२९) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मंडले हे वडगाव पुलाजवळ नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना संशयित इको मारुती कारचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना या कारमधील दोघंनी मंडले यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. अन्य पोलिसांच्या मदतीने त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. कारमधील दोघांनाही ताब्यात घेऊन सिंहगड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनआयओच्या शोधाची आंतरराष्ट्रीय दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोतिबिंदूसह काचबिंदू झालेल्या महिलेच्या डोळ्यात कृत्रिम भिंगारोपण करण्यासाठी आवश्यक आधार नसताना बुबुळाशेजारील पांढऱ्या भागाच्या दोन्ही बाजूला खोबणी तयार करून भिंगाचे रोपण करण्यात आले. अशा स्वरूपाचे नवे तंत्र राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेच्या (एनआयओ) नेत्रतज्ज्ञांनी शोधून काढले असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने दखल घेतली आहे. संशोधनाच्या नव्या पद्धतीमुळे ४६ वर्षाच्या महिलेला जग पाहणे शक्य झाले आहे. 'केस रिपोर्ट्स इन ऑफ्थेल्मॉलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात संशोधन प्रसिद्ध झाले आहे. 'एनआयओ'चे नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर, डॉ. श्रीकांत केळकर, डॉ. रचना शहा, डॉ. एकता अरोरा, डॉ. जाई केळकर या नेत्रतज्ज्ञांनी नवे तंत्र शोधून काढले आहे.

'मोतिबिंदूमुळे दिसेनासे होत असल्याने ४६ वर्षांची महिला 'एनआयओ'मध्ये उपचारासाठी आली होती. महिलेच्या डोळ्याची प्राथमिक तपासणी केली असता मोतिबिंदू तसेच काचबिंदू झाल्याचे दिसून आले. काही पेशंटना 'स्फिरोफेकिया' नावाचा आजार होतो. हाच आजार महिलेला झाला होता. डोळ्याची नैसर्गिक भिंग ही बाहुलीच्या मागे असते. महिलेला आजार झाल्याने डोळ्यातील नैसर्गिक भिंग डोळ्याच्या पुढच्या भागात आल्याचे दिसले. डोळ्यावरील ताण कमी करण्यास भिंग काढणे आवश्यक होते. यासाठी कृत्रिम भिंगारोपण करण्याची गरज होती,' अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना मांस विकणाऱ्याला अटक

$
0
0

पिंपरी : देहूरोड येथे बंदी घालण्यात आलेल्या जनावरांच्या मांसाची विक्री करणाऱ्या विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. अब्दुल वहाब वकोली (वय ३४, रा. देहूरोड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या विक्रेत्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २२, रा. शिवाजीनगर) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर राजेंद्र स्वामी हे अखिल भारत कृषी गो संघाचे सभासद आहेत. तसेच मुंबई हायकोर्टाने त्यांची मानद पशुकल्याण अधिकारीपदी नेमणूक केली आहे. देहूरोड परिसरातील एम. बी. कॅम्प परिसरात सरकारने बंदी घातलेल्या जनावरांच्या मांसाची विक्री होत असल्याची माहिती स्वामी यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती देहूरोड पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी या छापा टाकून मांसविक्री करणाऱ्या वकोली याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मांसविक्री करण्याचा अधिकृत परवाना नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील सुमारे ३५० ते ४०० किलो मांस जप्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images