Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘निम्हण यांचा राजकीय स्टंट’

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, पुणे/पिंपरी

'औपचारिक उद्घाटनापूर्वीच उड्डाणपूल खुला करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट आहे. पालिका निवडणुका जवळ आल्याने आतापासूनच आम्ही 'करून दाखवले' हे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,' अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या उड्डाणपूल उद्घाटनाच्या राजकीय नाट्यावर भाष्य केले. स्वारगेट परिसरातील व्होल्गा चौकात (लक्ष्मीनारायण टॉकीज) उभारण्यात आलेल्या देशभक्त केशवराव जेधे उड्डाणपुलाचे उद्घाटन शनिवारी सकाळी पवार यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनानंतर तातडीने पुढच्या कार्यक्रमाला रवाना झालेल्या पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना शिवसेना आणि शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्यावर टीकास्त्र सोडले.

पवार यांच्या हस्ते शनिवारी उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असले, तरी गुरुवारी सकाळी निम्हण यांनी प्रतिकात्मक स्वरूपात उद्घाटन केले. त्याचा संदर्भ देत, 'निम्हण नुकतेच पुन्हा सेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे, मीच खरा शिवसैनिक आहे, हे दाखविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पालिका निवडणुका जवळ आल्याने हा राजकीय स्टंट केला गेला', अशी सूचक टिपण्णी पवार यांनी केली. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, पालिका आयुक्त कुणाल कुमार, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह पालिकेतील विविध राजकीय पक्षांचे गटनेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कट ऑफ’च्या चौकशीचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी प्रवेश प्रक्रियेत सध्या वादग्रस्त ठरत असलेल्या 'कट ऑफ'चा मुद्दा आता शिक्षणमंत्र्याच्या कोर्टात गेला आहे. ऑफ लाइन 'कट ऑफ' जाहीर न करता पालकांसह विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दखल घेतली असून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीमार्फत दरवर्षी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येते. यंदाच्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया चांगलीच वादग्रस्त ठरत आहे. प्रवेश समितीने गेल्या वर्षी ऑनलाइन आणि ऑफलाइन 'कट ऑफ'ची टक्केवारी जाहीर केली होती. त्याच धर्तीवर यंदा गेल्या वर्षीची ऑनलाइन 'कट ऑफ'ची टक्केवारी जाहीर केली. त्यावर पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये 'कट ऑफ' बाबत मोठा गोंधळ उडाला. या प्रकाराबाबत केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागाचे उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी मध्यंतरी 'ऑफलाइन'ची टक्केवारी जाहीर करू असे स्पष्ट केले होते. त्याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

वर्तमानपत्रात 'ऑफलाइन' टक्केवारी जाहीर करू असे सांगूनही उपसंचालकांनी 'कटऑफ'ची टक्केवारी जाहीर न केल्याने पालकांसह विद्यार्थ्यांची फसवणूक झाली. या गंभीर प्रकाराला 'मटा'ने वाचा फोडली होती. या निमित्ताने 'ऑफलाइन' टक्केवारी जाहीर करणार कधी, या प्रकरणात विद्यार्थ्यांसह पालकांची फसवणूक करणाऱ्या समितीच्या अध्यक्षांवर काही कारवाई करणार का, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागत असलेल्या अधिकाऱ्याकडेच पुन्हा प्रवेशाची जबाबदारी कशी याशिवाय केंद्रीय प्रवेश समिती ऑनलाइन प्रवेश अधिकृत मानत असेल तर 'ऑफलाइन' प्रवेशाची जबाबदारी कोणाची यासारखे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना थेट पत्रकार परिषदेत या संदर्भातील प्रश्न विचारले असता, ' अकरावीच्या 'कटऑफ'च्या टक्केवारीसंदर्भात अनेक पालकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यापैकी काही पालकांच्या तक्रारींमध्ये तथ्य आहे. त्या तथ्य असलेल्या तक्रारींसंदर्भात आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत', असे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

'पाकीट' संस्कृतीला आळा बसणार

राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळांची संख्या एका क्लिकवर मिळावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय सूचना केंद्राच्या मदतीने संगणकप्रणाली विकसित केली आहे. त्या संगणकप्रणाली डाटाबेसचे उद्घाटन शालेयशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शनिवारी उदघाटन झाले. या संगणकप्रणालीमुळे कोणत्या शाळेत किती विद्यार्थी आहेत. राज्यात विद्यार्थी संख्या, शिक्षकांची माहिती ऑनलाइन मिळणार आहे. त्याशिवाय विद्यार्थी संख्या खोट्या दाखवून शाळा चालविणाऱ्या आणि पाकीट देऊन खोटी माहिती कळू शकणार आहे. यामुळे शिक्षणविभागात सुरू असलेल्या पाकीट संस्कृतीला आळा बसणार आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगडासाठी शटल बस सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगडावरील वाहनांची, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे पर्यटकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पायथ्यापासून शटल बस सेवा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरव राव यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत सिंहगडावर आलेली वाहने आणि भविष्यात येणारी वाहने याच्या माहितीचे २२ जूनला सादरीकरण करण्याची सूचना राव यांनी वन खात्याला केली आहे. सिंहगडावर वाहनांची संख्या वाढल्यामुळे दोन-तीन तास वाहने अडकून पडतात. ही स्थिती बदलण्यासाठी वाहने पायथ्याशीच उभी करून पर्यटकांना गडावर नेण्यासाठी शटल बससेवा देण्याचा विचार असल्याचे राव यांनी 'मटा'ला सांगितले.

सिंहगडाच्या पायथ्याशी वाहने कोठे उभी करता येतील, त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का; तसेच बसद्वारे पर्यटकांना गडावर नेणे शक्य होणार का यादृष्टीने पाहणी करण्यात येणार आहे. ही सेवा पर्यटकांच्या दृष्टीने सोयीची व आरामदायी असावी याचाही विचार केला जाणार आहे. या सेवेशिवाय गडावर जाणारे रस्ते आणि कठड्यांची दुरुस्ती तसेच दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागांची देखभाल करावी लागणार आहे. त्याचाही विचार करण्याची सूचना केली असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

खडकवासला धरणाजवळील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणे दूर करून तेथे पर्यटनसुलभ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. राव यांनी महसूल, वन, पाटबंधारे खाते; तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत सिंहगडाची पाहणी केली. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे जिल्हाधिकाऱ्यांना सिंहगडावर पोहोचता आले नाही. त्यामुळे सिंहगड व खडकवासला येथील वाहतूक नियोजन व अन्य सुविधांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी त्यांनी पावले टाकली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकार बाबा पाठक यांचे पुण्यात निधन

$
0
0

पुणेः ज्येष्ठ चित्रकार आर. व्ही. उर्फ बाबा पाठक (वय १०० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे कन्या राणी साठे, नातवंडे असा परिवार आहे. १३ जून रोजी पाठक यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

१३ जून १९१५ रोजी तत्कालीन औंध संस्थानचा भाग असणाऱ्या साताऱ्यात पाठक यांचा जन्म झाला. पंतप्रतिनिधींसारख्या कलाप्रेमी आणि दानशूर संस्थानिकामुळे पाठक यांच्यातील कलागुण बहरले. त्यांनी बडोद्याचे 'कलाभवन' आणि मुंबईत 'जे. जे. स्कूल'मध्ये कलाशिक्षण घेतले. स्वातंत्र्यचळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. कला, प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा मेळ घालत त्यांनी कोल्ड सिरॅमिक्स आणि म्यूरल्सच्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली. जगात अनेक देशात भ्रमंती करून चित्रे काढली. जलरंग, पेस्टल, तैलरंग अशा माध्यमातून त्यांनी काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असून अडचण, नसून खोळंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रामीण भागात राबविल्या जाणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांअंतर्गत झालेली कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे निदर्शनास आल्याने या कामांची यापुढे त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे यापूर्वी या कामांची तपासणी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या कामकाजावर राज्य सरकारने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे.

सरकारच्या आदेशानुसार योजनांच्या कामांची किमान दोन वेळा तात्रिक तपासणी केली जाणार आहे. काम २० टक्के पूर्ण झाल्यावर पहिली तपासणी केली जाईल, तर ६० टक्के काम पूर्ण झाल्यावर दुसरी तपासणी करावी लागेल. यासाठी जिल्हानिहाय त्रयस्थ यंत्रणांची यादी करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. या बदलामुळे कंत्राटदारांवर अंकूश ठेवणे सोपे जाणार असून, कामाचा दर्जाही राखता येणार आहे.

त्रयस्थ यंत्रणांची यादी करताना संबंधित यंत्रणांना ग्रामीण पेयजय व स्वच्छता या विषयाचे ज्ञान आणि या क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. इंजिनीअरिंग आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे महत्त्वाचे माहितीचे संकलन व हाताळणीचा अनुभव असणेही बंधनकारक आहे.

'कामचुकार ठेकेदारांवर कारवाई'

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गेल्या ४८ वर्षांत जिल्ह्यात राबविलेल्या ७९ योजनांपैकी १७ योजना बंद पूर्णपणे बंद पडल्या आहेत. अनेक योजनांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही नवीन योजना राबविताना ठेकेदारांकडून दिरंगाई होत अाहेत. या पार्श्वभूमीवर कामाची गुणवत्ता न राखणाऱ्या व कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे १९६७ पासून राबविलेल्या योजनांचा जिल्हा परिषदेत आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर कंद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एखाद्या योजनेचे काम करण्यासाठी पाच-पाच वर्षे लागतात, हे चुकीचे आहे. त्यामुळे यापुढे कामे नीट होण्यासाठी ठेकेदारांना धडा शिकविला पाहिजे. त्यामुळे योजनांबाबत तक्रारी आल्यास संबंधित संबंधित ठेकेदार त्यात दोषी आढळला, तर त्याला पाठीशी घालणार नाही. त्याच्यावर योग्य ती कारवाई करू, असे कंद यांनी स्पष्ट केले.

बैठकीच्या सुरुवातीलाच कंद यांनी सरकारने आता नवीन पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणार नाही, असे कळवले आहे. नादुरुस्त अवस्थेत किंवा बंद असलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. त्यामुळे बंद योजना सुरू करण्यासाठी उपाय योजना कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले. बैठकीस उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीएम’ फोडण्याचा दत्तवाडी येथे प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दत्तवाडी येथील 'आयसीआयसीआय' बँकेचे 'एटीएम'मशीन फोडून रक्कम लुटण्याचा प्रयत्न ​शनिवारी पहाटे घडला. चोरट्याने 'सीसीटीव्ही' आणि सायरनची वायर कापली तसेच पासवर्ड कॅबिनेशन जाळून मशीन उघडण्याचा प्रयत्न केला. आकुर्डी येथे दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे 'एटीएम' सेंटर फोडण्यात आले होते.

विनायक केंजळे (वय २७, रा. चिंचवड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाडी पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या 'एटीएम' सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. या सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे चोरट्याने सेंटरमध्ये प्रवेश केल्यावर लगेचच 'सीसीटीव्ही' आणि सायरनची वायर कापली. त्यानंतर त्याने मशीनचा दरवाजाही उघडला.

'एटीएम'मशीनमधून पैसे काढण्याचे अनेक प्रयत्न या चोरट्याकडून करण्यात आले. पैसे निघत नसल्याने त्याने मशीनचे पासवर्ड कॉम्बिनेशन जाळले. मात्र, तरीही पैसे निघाले नाहीत. हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आला होता. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केल्यावर चोरट्याने तेथून पळ काढला, अशी माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली. 'एटीएम' सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नेमण्याबाबत पोलिसांनी सर्व बँकांशी पत्रव्यवहार केला असल्याचे फौजदार एस. एम. क्षीरसागर यांनी सांगितले. आकुर्डी येथेही एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन दिवसांपूर्वी झाला होता. दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी केलेला प्रयत्न सारखा असल्याने या चोरीमागे एखादी टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅटधारकांची फसवणूक टळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील ग्राहकांच्या तक्रारींचे स्वरूप लक्षात घेतले, तर सर्वांधिक केसेस या बिल्डरविरुद्ध आहेत. फ्लॅटची नोंदणी केल्यापासून ते त्याचा ताबा मिळेपर्यंत ग्राहकांना अनेक अडचणी येतात. ग्राहकांची फ्लॅट खरेदी करताना फसवणूक होऊ नये, यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायातीने सर्वेक्षण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या सर्वेक्षणातून फ्लॅटधारकांची होणारी फसवणूक तसेच त्यावर काय उपाययोजना करता येईल, याची माहिती गोळा केली जाणार आहे. या सर्वेक्षणाचे अर्ज फेसबुक, व्हॉटस अप आणि इंटरनेटद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सर्वेक्षण कोणाच्याही विरोधात नाही, तर ग्राहकांचे आर्थिक शोषण बंद होऊन ग्राहकांमध्ये जागृती व्हावा हा आहे, अशी माहिती माहिती ग्राहक पंचायतीचे संघटक ठकसेन पोरे, सहसंघटक विलास लेले, म​हिला प्रमुख सीमा भाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फ्लॅट खरेदी करताना बिल्डर सांगेल ते ऐकून ग्राहकाला फ्लॅट घ्यावा लागतो. फ्लॅटची नोंदणी केल्यापासून ते प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंतची सर्व प्रक्रिया ग्राहकांना समजावी यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे.

- विलास लेले, संघटक, भारतीय ग्राहक पंचायात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिनेट’ निवडणुकीचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीसंदर्भात माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर यांच्या समितीने सिनेटवर लाल फुली मारली असली तरी विद्यापीठात सिनेट कायमच राहणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी स्पष्ट केले. यामुळे विद्यापीठात सिनेटसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाच्या कायद्यात दुरुस्तीसाठी सरकाराने निगवेकर समिती नियुक्ती केली होती. त्या समितीच्या अहवालानुसार सिनेट रद्द करावी, अशी शिफारस करण्यात आली होती. त्या अहवालास सध्याच्या सिनेट सदस्यांनी विरोध दर्शविला होता. सिनेटच्या मध्यमातून शिक्षण संस्थांशी संबंधित सर्व घटक निवडून जातात. दुसरी पर्यायी व्यवस्था आली ठराविक घटकांना सिनेटमध्ये जाता येईल. त्यामुळे राज्य सरकारने सिनेटबाबतचा अहवाल स्वीकारू नये अशी मागणी करण्यात येत होती.

यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, 'विद्यापीठ कायद्याबाबत निगवेकर समितीचा अहवाल मिळाला आहे. कुलगुरूंनी शैक्षणिक कार्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. त्याबाबतचे अधिकार त्यांना अधिक असावेत, अशी अपेक्षा करण्यात आली आहे. त्याशिवाय सिनेटच्या माध्यमातून वर्षातून दोनदा सिनेटच्या सदस्यांच्या प्रश्नांना, समस्यांना उत्तरे द्यावीत. त्याबाबतची जबाबदारी स्वीकारावी. त्यामुळे सिनेटचे अस्तित्व विद्यापीठ कायद्यात कायम राहणार आहे. मात्र, निगवेकर समितीच्या अहवालातील काही गोष्टी आम्ही बदलणार आहोत. तसेच, विद्यापीठ कायद्याबाबत काही धोरणे आपल्याकडे असून त्याबाबत सहा महिन्यांत शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यानंतर कायदा लवकरच जाहीर करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्केट यार्डातील ‘डमी’ व्यापार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्केट यार्डातील बाजारात वाढणारी वाहतूक कोंडी, वाहतूक सुरळीत व्हावा या हेतूने मार्केट यार्डातील सर्व विभागात असलेला 'डमी' व्यापार बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. एका महिन्याच्या प्रयोगानंतर त्यावर कायमस्वरूपी निर्णय घेण्यात येणार आहे.

मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या आडते असोसिएशनची बैठक झाली. त्या बैठकीत 'डमी' व्यापारासह अन्य काही निर्णय घेण्यात आले. 'मार्केट यार्डात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्याशिवाय गाळा सोडून गाळ्याच्या पुढे मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात व्यापार सुरु असल्याने कोंडी वाढली होती. त्यावर पर्याय म्हणून 'डमी' व्यापार बंद करण्याचा सर्वच व्यापाऱ्यांनी एकमुखाने असोसिएशनच्या बैठकीत निर्णय घेतला. त्या निर्णयाची एक महिन्यापर्यंत प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या २१ जुलैला होणाऱ्या पुढील बैठकीत 'डमी' व्यापार कायमस्वरुपी बंद करायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल,' अशी माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांनी 'मटा'ला दिली.

व्यापाऱ्यांनी गाळ्याच्या पंधरा फुटाच्या पुढे माल लावू नये. तसेच त्याची विक्री करू नये. गाळ्यातच व्यापार करावा, असे बैठकीत ठरल्याचे त्यांनी सांगितले. मार्केट यार्डातील गणपती मंदिर ते गेट क्रमांक एक या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी रस्ता खुला झाला पाहिजे. तेथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा उपाय केला आहे. त्या मार्गावर कोणत्याही व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा नाही. त्याशिवाय रिकामी वाहने उभी करू नयेत. तसेच गणपती मंदिर ते पश्चिमकडे ट्रक उभे करून व्यापार होत होता. तेथील व्यापाऱ्यांनी दुसरीकडे माल विकावा, असाही निर्णय घेण्यात आला आहे, असेही भोसले यांनी सांगितले.

बाजार समितीचे नियंत्रण कधी?

मार्केट यार्डाच्या आवारात गेल्या कित्येक वर्षापासून 'डमी' व्यापारांची संख्या वाढत आहेत. किंबहुना मार्केट यार्डात प्रमुख आडत्यांपेक्षा 'डमी' व्यापारीच अधिक असल्याचे दिसून आले आहे. प्रमुख आडत्यासंह त्यांचे वारसदार, कामगार, दिवाणजी, नातेवाईक, जवळचा, जावई असे अनेक 'डमी' व्यापारी म्हणून सध्या व्यापार करत आहेत. त्यामुळे 'डमी' व्यापाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी, किरकोळ व्यापार सुरू होत होता. त्याला जबाबदार कोण, असा सवाल वारंवार विचारला जात होता. प्रमुख आडत्यांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या. या 'डमी' व्यापाऱ्यांवर बाजार समितीचे प्रशासन नियंत्रण आणणार का, असा सवाल आता आडते विचारत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांदूळ, डाळ, साखर उतरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्केट यार्डातील भुसार विभागात सध्या मंदीचे वातावरण असल्याने गगनाला भिडलेल्या डाळी खाली उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्याशिवाय तांदूळ, गूळ, आणि साखरेतील घसरण सुरुच आहे.

संपूर्ण मार्केट यार्डातील भुसार विभागात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे डाळींचे गेल्या काही महिन्यांपासून दर वाढल्याने त्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे ग्राहकांपेक्षा व्यापारी वर्गच चिंतेत अधिक होता. आता तूरडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ, मूगडाळीच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची घसरण झाली आहे. कडधान्यांचे दर मात्र जैसे थे आहेत. बासमती, कोलमसह अन्य प्रकारच्या तांदळाच्या दरात मंदीचे वातावरण असल्याने क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची घट झाली आहे.

गहू, ज्वारी, बाजरी, तेल, रवा, आटा, मैदा, खोबरे, मिरची, धने, शाबुदाणा, नारळाच्या दरात मात्र कोणताही बदल झाला नाहीत. हे सर्व दर स्थिर आहेत. साखरेच्या दरातील घसरण गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. साखर कारखान्यांवर विक्रीबाबत दबावामुळे साखरेचे दर उतरत आहेत. आता साखरेचे दर २२ रुपये ५० पैसे किलो असे झाले आहेत. या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.

साखरेच्या दरावर परिणाम झाल्याने गुळाचे दरही उतरले आहेत. क्विंटलमागे ७० ते ७५ रुपये दर उतरले आहेत. गुळाची आवक थोडी थंडावली आहे. बेसनाला ग्राहकांकडून फारशी मागणी नसल्याने आणि डाळी स्वस्त झाल्याने त्याच्या दरात १०० रुपये घट झाली आहे. हळदीच्या दरात २०० रुपयांनी घट झाली आहे. शेंगदाण्याच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. त्याची निर्यात होत असल्याने मागणी चांगली आहे. मात्र, सध्या फारशी आवक नाही.

गेल्या काही दिवसांत डाळींचे भाव गगनाला भिडतील, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र, बाजारपेठेतील सध्याची स्थिती पाहता डाळींचे भाव किंचित कमी झाल्याने ग्राहकवर्गात समाधान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसासोबत भाज्यांचीही आवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाचे आगमन झाले असले, तरी काही फळभाज्यांची मार्केट यार्डात रविवारी आवक वाढली. त्यामुळे काकडी, घेवडा, सिमला मिरचीसह मटारच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली. हिरवी मिरचीची आवक घटल्याने त्याच्या दरवाढ झाली. त्याशिवाय पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत.

मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. पावसाचे आगमन झाले असले, तरी त्याचा फळभाज्यांच्या आवकवर सध्या तरी त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. भिजलेल्या पावट्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे दर उतरले. हिमाचल प्रदेशातून एक ट्रक मटार, कर्नाटकातून ५ ते ६ ट्रक कोबी, इंदौरहून ७ ते ८ टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून शेवग्याची ४ टेम्पो आवक झाली. हिरवी मिरचीची कर्नाटकातून ८ ते १० टेम्पो, तोतापुरी कैरीची २ ट्रक आवक झाली.

सातारी आल्याची ४०० ते ४५० पोती, टोमॅटोची साडे पाच हजार पेटी, फ्लॉवर, कोबीची नेहमीप्रमाणे साधारण आवक झाली. सिमला मिरचीची केवळ १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंगांची २५० पोतींची आवक झाली. गावरान कैरीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली. पावसामुळे मुंबईच्या वाशीला जाणारी आवक पुण्यात झाली. गाजर, काकडीची आवक परिसरातून झाली आहे.

कांद्याची १०० ट्रक, बटाट्याची आग्रा, नाशिक येथून ६० ट्रक तसेच लसणाची मध्य प्रदेशातून ३५०० गोणींची आवक झाली. स्थानिक भागातून कोथिंबीरची दीड लाख जुडीची आवक झाली. तर इंदौरहून १० टेम्पो कोथिंबीरची आवक झाली. हलक्या प्रतीची कोथिंबीरची आवक झाल्याने त्याचे दरही कमी आहेत. मात्र चांगल्या प्रतीची कोथिंबीर महाग आहे. मेथीची केवळ २५ हजार जुडींची आवक झाली आहे. पालेभाज्या सध्या स्थिर आहेत.

मासळीची आवक घटली

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील तीन ते साडेतीन टन आवक झाली. खाडीची १५० किलो, नदीची सुमारे २०० किलो आवक झाली होती. पूर्व किनारपट्टीवरून पापलेटची आवक सुरू झाली आहे.

रमजानमुळे फळांना मागणी

रमजान महिन्यातील उपवासामुळे फळांना मागणी वाढू लागली आहे. मात्र, मार्केट यार्डात फळांची फारशी आवक झाली नसल्याचे दिसून आले. लिंबाची आवक वाढली असली, तरी पावसामुळे मागणी मात्र घटली. पाच ते सात हजार गोणींची आवक झाली असून, शेकड्यामागे १०० ते २०० रुपयांची घट झाली. डाळिंबाची आवक झाली असली, तरी सध्या त्याला मागणी कमी आहे. त्यामुळे दरात पाच ते दहा रुपयांनी घट झाली आहे. पेरुची दोन टन एवढी आवक झाली. सध्या रमजानच्या सणामुळे सफरचंद, कलिंगड, खरबूज आणि पपईला अधिक मागणी असल्याचे व्यापारी सांगतात.

फुले स्वस्त

सध्या लगीनसराई संपली असून पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे कट फ्लॉवरच्या फुलांना फारशी बाजारात मागणी होत नाही. परिणामी, फुलांचे ६० ते ७० टक्के दर घटले आहेत. फुले स्वस्त झाली आहेत. बाजारात फुलांची आवक वाढली असली, तरी मागणी नसल्याचे व्यापारी सांगतात. मोगऱ्याच्या एका किलोसाठी ६० ते १२० रुपये दर मिळाला आहे. झेंडूसाठी ५ ते ३० रुपये किलो असे दर मिळाले आहेत. डच गुलाबासाठी ३० ते ५० रुपये असा दर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनसे’समोर आव्हान संघटना मजबुतीचे

$
0
0

सुनीत भावे, पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांपैकी अनेकांची उचलबांगडी करून अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश सर्व कार्यकर्त्यांपर्यंत दिला आहे. तसेच, पालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावा, अशा सूचना दिल्या असल्या, तरी त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सहकार्याने मिळवलेल्या दोन समित्यांच्या अध्यक्षपदांवर पाणी सोडण्याची तयारी दाखवली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत पुणेकरांचा 'न भूतो न भविष्यति' असा पाठिंबा मिळाल्याने 'मनसे'चे २९ नगरसेवक निवडून आले. परंतु सुरुवातीपासूनच विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याऐवजी सत्ताधाऱ्यांना मदत होईल, अशा तऱ्हेने 'तटस्थ' राहण्यातच 'मनसे'ने धन्यता मानली. त्याचा फटका गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'मनसे'ला बसला. त्यानंतरच, शहर पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केला जाण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांकडून दिले जात होते; मात्र लोकसभा निवडणुकांना वर्ष उलटून गेल्यानंतरही पक्ष संघटनेत कोणताही बदल झाला नाही. एवढेच नव्हे, तर मधल्या काळात पक्षातील गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली अन् पक्षाच्या शहर कार्यालयावरच मोर्चा काढण्याची वेळ कार्यकर्त्यांवर ओढवली.

नाशिकपाठोपाठ 'मनसे'च्या पारड्यात सर्वाधिक जागा पुण्यात पडूनही पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुण्याकडे सुरुवातीपासून नीट लक्ष दिलेच नाही. पक्षाचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांच्याकडे काही काळ पुण्याची जबाबदारी होती, तर त्यानंतर दीपक पायगुडे यांच्याकडे धुरा देण्यात आली. लोकसभेत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर काही काळ राजन शिरोडकर यांच्याकडे पक्ष संघटनेत लक्ष घालण्याचे काम देण्यात आले होते. दुर्दैवाने यातील कोणालाच शहर पदाधिकाऱ्यांसमवेत पक्षबांधणी करण्यात यश आले नाही. त्यामुळे नगरसेवकांचे आंदोलन पालिकेत अन् पदाधिकाऱ्यांचे रस्त्यावर अशी स्थिती कायम दिसत राहिली. पक्षाच्या रस्त्यावरील आंदोलनांना नगरसेवक अभावानेच दिसले. पक्षातील या विस्कळीतपणाचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसला. गेल्या निवडणुकीत दोन मतदारसंघात 'टफ फाइट' देणाऱ्या 'मनसे'ला या वेळी मतदारांनीही जागा दाखवण्याचे काम केले.

मुंबईबाबत रोखठोक प्रश्न उपस्थित करणाऱ्या पक्षाध्यक्षांनी पुण्याच्या विकास आराखड्यात (डीपी) अनंत घोळ झाल्याचा आरोप केला जात असूनही त्यात कधीच लक्ष घातले नाही. तसेच, मेट्रो, कचरा, पीएमपी या शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत शहर 'मनसे'ने कधीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे पुणेकरांना 'मनसे'बद्दल वाटणारा विश्वास, जवळीक कमी होत गेली. तरीही नगरसेवकांना बोलावून त्यांची झाडाझडती घेण्यापलीकडे मतदारांमधला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.

शहराध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि विद्यार्थी सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केले असले, तरी २०१२च्या निवडणुकीप्रमाणे दीड वर्षावर आलेल्या पालिका निवडणुकीत पुन्हा यश मिळवायचे असेल, तर 'मनसे'समोर पक्षाची संघटना मजबूत करण्याचे खरे आव्हान आहे.

नगरसेवकांवर अंकुश हवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना नुकतेच मुंबईत बोलावून विरोधी पक्षासारखे काम करा, अशी सक्त ताकीद दिली होती. मुळातच गेल्या तीन वर्षांत मनसे विरोधी पक्ष म्हणून पालिकेत दिसला नाही, अशी खंत काही महिन्यांपूर्वी ठाकरे यांनीच पुण्यात व्यक्त केली होती. तरीही पुनःपुन्हा पक्षाध्यक्षांना त्याच सूचना द्यावा लागत असताना, दुसऱ्या बाजूने मात्र 'मनसे'ने सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधत पालिकेतील दोन समित्यांची अध्यक्षपदेही पदरात पाडून घेतली आहेत. गेल्या तीन वर्षांत पालिकेत 'मनसे'च्या बाबतीत हेच चित्र सातत्याने दिसत आले असल्यानेच मतदारांचा विश्वास कमी होताना दिसतो. त्यामुळे पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या बडतर्फीनंतर नगरसेवकांवरही अंकुश राखण्याचे आव्हान पुन्हा सरचिटणीस अनिल शिदोरे यांच्यावर असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीए अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलणार’

$
0
0

पुणे : 'चार्टर्ड अकाउंटंटच्या अभ्यासक्रमबदलाबाबतची कार्यवाही केंद्रीय स्तरावर आहे. या अभ्यासक्रमाला पुस्तकी ज्ञानापेक्षा संशोधनात्मक स्वरूप आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने पाठपुरावा केला जाईल,' अशी माहिती 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया'चे (आयसीएआय) अध्यक्ष मनोज फडणीस यांनी शनिवारी दिली.

'आयसीएआय'च्या २११ विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा शनिवारी झाला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष देवराज रेड्डी, अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष व्ही. मुरली, केंद्रीय परिषदेचे सदस्य एस. बी. झावरे, पुणे शाखेचे अध्यक्ष यशवंत कासार, राजेशकुमार पाटील या वेळी उपस्थित होते. कंपनी कायदा सुधारणा विधेयक २०१४नुसार चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपन्यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्यामध्ये समतोल साधला जावा, यासाठी संस्थेद्वारे संशोधनात्मक पावले उचलली जात आहेत, असे फडणीस यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापनाला दहा गुण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपत्ती व्यवस्थापन हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा राज्य सरकारचा विचार असून, त्यासाठी स्वतंत्र दहा गुण देण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात लवकरच शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत ही माहिती दिली. राज्यात कधी व कोणती नैसर्गिक आपत्ती येईल याची कल्पना देता येत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपली संपर्क यंत्रणा आणि मदतनीसांची फौज तयार ठेवावी, अशीही सूचना त्यांनी या वेळी केली.

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात माळीण येथे भू-स्खलनाची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे दरड कोसळण्याच्या धोका असलेल्या भागांचा अभ्यास करण्यात यावा. मुंबई, तसेच उपनगर परिसरातील अशी धोकादायक ठिकाणे तपासून त्याबाबत काळजी घेण्यात यावी. मुंबई व उपनगरांतील टेकड्यांवर बांधकामे झाली आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत. परंतु तेथे राहणाऱ्या नागरिकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्याने त्या संदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात, असेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आपत्तीसंदर्भात सजगता यावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापनाचा विषय समाविष्ट करण्याचा विचार करण्यात येत आहे. त्यासाठी दहा गुण देण्याचाही प्रस्ताव आहे. शिक्षण विभागाशी याबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही खडसे यांनी नमूद केले.

'ऑनलाइन' माहिती उपलब्ध

आपत्ती व्यवस्थापनाची माहिती लवकरच ऑनलाइन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी निर्माण करण्यात आलेले मदतीचे स्रोत यांवर असतील. त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकारी राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाविषयीची संदर्भातील एका क्लिकवर पाहू शकणार आहेत. राज्यात १४ आपत्तीग्रस्त जिल्हे आहेत. त्यातील धोकायदायक ठिकाणांची माहिती संकलित जालेली नाही. त्या दृष्टीनेही पावले उचलण्यात येत असल्याची माहिती या परिषदेत देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्विमिंग सुरक्षा पावसाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्विमिंग पूलकरिता नियमावली, तसेच तेथील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यासाठी उन्हाळ्याचा पोहण्याचा हंगाम संपल्यानंतर आता मुहूर्त मिळाला आहे. स्विमिंग पूलच्या परवानगीसाठी नियमावली तयार करण्यात आली असून, पहाटे पाचनंतरच पूल पोहण्यासाठी खुले करता येणार आहेत. पुरेशा जीवरक्षकांपासून ऑक्सिजन मास्क, प्रथमोपचार पेटी, टेलिफोन आणि तळ दिसेल अशा स्वच्छ पाण्यापर्यंतची बंधने स्विमिंग पूलचालकांवर घालण्यात आली आहेत. पोहायला शिकवणाऱ्या प्रशिक्षकांची चारित्र्य पडताळणी करण्याचीही अट या नियमावलीमध्ये आहे.

स्विमिंग पूलची परवानगी आणि व्यवस्थापनासंदर्भात 'पुणे पोलिस कमिशनरेट स्विमिंग पूल्स (लायसन्स अँड कन्ट्रोलिंग) रूल २०१५' ही नियमावली करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी या नियमावलीला मंजुरी दिली आहे. या नियमावलीवर काही आक्षेप असल्यास तीस दिवसांत त्यावर हरकती घेता येणार आहेत.

स्विमिंग पूलना परवानगी देताना सुरक्षिततेबाबत कडक पावले उचलण्यात आली आहेत. पूलला एक वर्षासाठी परवाना देण्यात येणार असून, त्यासाठी चारशे रुपये फी आकारली जाणार आहे; मात्र ही परवानगी मिळताना पूलचालकांना सुरक्षिततेच्या विविध तपासण्यांमधून जावे लागणार आहे. पूलमधील पाणी स्वच्छ आणि तळ दिसणारे असावे, वीस पोहणाऱ्यांमागे एक जीवरक्षक असावा, पूलच्या खोलीची माहिती असावी, पूलमध्ये रोप व पोल्सची उभारणी, पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर मास्क, औषधोपचार पेटी, इमर्जन्सी ड्रिल याचे बंधन पूलचालकांवर घालण्यात आले आहे.

स्विमिंग पूलवर टेलिफोन व्यवस्था करण्यासबतच पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बाथरूम आणि शॉवरची व्यवस्था असणे आवश्यक करण्यात आले आहे. या भागात कॅमेरे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. स्विमिंग पूल रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत बंद करावा लागणार आहे. नियमातील वेळेव्यतिरिक्तच्या वेळेला पूल सुरू करायचा झाल्यास त्यासाठी पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. स्विमिंग पूलमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रशिक्षकांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांची नियुक्ती करता येणार आहे.

महत्त्वाचे नियम

आंघोळ केल्याशिवाय कोणीही पूलमध्ये जाणार नाही.

स्विमिंग कॉश्च्युम व स्विमिंग ट्रंक गरजेचे

त्वचारोग, तसेच डोळे किंवा कानामध्ये संसर्ग झालेल्यांना प्रवेश नाही

पाण्यात थुंकणाऱ्या व घाण करणाऱ्या स्विमरवर लक्ष

स्विमिंग पूलमध्ये व बाजूच्या जागेत पाळीव प्राण्यांना मनाई

अन्नपदार्थ व शीतपेये नेण्यास मनाई

आठ वर्षांच्या आतील शिकाऊ मुलांबरोबर पालक हवेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरोग्य विभागातील पगार थांबवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आदेश देऊनही पुणे स्टेशन येथील मध्यवर्ती इमारतीतील आरोग्य विभागाचे कार्यालय कर्मचाऱ्यांनी विश्रांतवाडीला हलविले नाही. या कारणास्तव संबंधित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार तसेच अन्य भत्ते थांबविण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी दिले आहेत. सोमवारपर्यंत कार्यालय हलविण्याची 'डेडलाइन' देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी यासंदर्भात संचालकांच्या आदेशाच परिपत्रकच शनिवारी जारी केले आहे. या मुळे आरोग्य विभागात विश्रांतवाडीला कार्यालय स्थलांतर करण्यावरुन सुरु असलेल्या संघर्षात आणखी ठिणगी पडली आहे. परिणामी, कर्मचारी वर्ग आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात संतापला आहे.

आरोग्य विभागाने पाच जून रोजी स्टेशन येथील कार्यालय स्थलांतरीत करण्याची योजना आखली होती. या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य व कुटुंब कल्याणच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. विश्रांतवाडी येथे कार्यालय स्थलांतर करण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध नसून, स्थलांतरणाची गरज काय, असा सवाल करीत त्यांनी स्थलांतराला फेब्रुवारी महिन्यापासून विरोध दर्शविला आहे. आरोग्य सहसंचालक डॉ. जगताप यांनाही कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन स्थलांतर थांबविण्याची केली होती. मात्र त्यांनी दखल घेतली नाही.

शिवेसनेच्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांना निवेदन दिले असता त्यांनी यासंदर्भात आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. स्टेशन येथील आरोग्य कार्यालय स्थलांतर करण्याचा हट्ट कोणाचा असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

याचसाठी अट्टहास

दोन विभागांचा कार्यभार सांभाळताना अधिकाऱ्यांची दमछाक होत असल्याने कार्यालय स्थलांतराचा हट्ट धरण्यात आला आहे. आरोग्य विभाग विश्रांतवाडीला हलविणे किती सोपे आणि कसे शक्य आहे याबाबतची माहिती आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिव सुजाता सौनिक यांना अधिकाऱ्यांनी पुरविली. प्रत्यक्षात स्टेशन येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयात आरोग्य सचिव कधी फिरकल्याच नाहीत. त्यामुळे त्यांना या कार्यालयाची माहिती कशी, असा सवाल कर्मचारी करीत आहेत. विश्रांतवाडीला कार्यालय स्थलांतर करण्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या ठिकाणी स्थलांतरीत होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. तसेच तेथे फर्निचर तयार करण्यात आले नाही, मग बसायचे कोठे, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’चे आजपासून धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील साखर कारखन्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पावणेचार हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने आता सरकारने बघ्याची भूमिका सोडावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी केली. आजपासून (सोमवार) संघटनेच्या वतीने साखर आयुक्तालयापुढे बेमुदत धरणे धरण्यात येणार असून, 'एफआरपी'च्या रकमा मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या पॅकेजच्या घोषणा अद्याप अंमलात आलेल्या नसतानाच मित्रपक्षाने आंदोलन पुकारल्याने राज्य सरकारपुढे अडचणी आल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी स्वाभिमानीने याच मागणीसाठी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आजपासून पुन्हा सुरू होत असलेल्या आंदोलनाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर आणि योगेश पांडे यांनी आंदोलनाबाबत रविवारी माहिती दिली. आता सरकारने दंडुका घेऊन कारखान्यांच्या मागे लागावे आणि येत्या महिन्याअखेरपर्यंत 'एफआरपी'च्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

अनेक महिने लोटल्यानंतरही एफआरपीच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यावर साखर आयुक्तांनी काय कारवा केली, याची माहिती दिली पाहिजे, कारखानदार रकमा देणार नसतील, तर त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. 'एफआरपी'च्या रकमा देण्यासाठी केंद्राने सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे, त्यातून राज्याला साडेअठराशे कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यातून एफआरपीच्या काही रकमा मिळणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडे गेलेल्या शिष्टमंडळात आपलाही समावेश होता, मात्र कच्च्या साखरेच्या निर्यातीवरील अनुदानाचा निर्णय जाहीर होण्यास विलंब झाला, तसेच मळीवरील निर्बंधही उशिरा उठविण्यात आले, अशी टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नल यंत्रणा पूर्ण शहरात ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदाच्या पावसाळी हंगामात प्रथमच शहरभर पडलेल्या जोरदार पावसाने रस्त्यांवर साचलेले पाणी आणि मध्यवर्ती भागातील काही मुख्य चौकातील बंद पडलेले सिग्नल यामुळे रविवारी वाहतुकीचा बोजवारा उडाला.

शनिवारी पहाटे आणि रविवारी सकाळी रिमझीम पाऊस पडत होता. माजत्र, दुपारच्या वेळेत सुमारे दोन ते तीन तास पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे रस्त्यावरून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागले. त्याबरोबरच असखल भागामध्ये साचूनही राहिले. शिवाजीनगर, डेक्कन, पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता, स्वारगेट चौक, अभिनव चौक अशा अनेक ठिाकणी पावसाचे पाणी साचले होते. पाण्यामधून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. शहरातील स्वारगेट चौकासह अनेक मुख्य चौकांतील सिग्नल यंत्रमा बंद असल्याने काही ठिाकाणी वाहतूक कोंडीही झाली. शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते, ड्रेनेजची कामे अद्यापही सुरू आहेत. या अपूर्ण कामांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. या रस्त्यांवर दुचाकीस्वार घसरण्याचे प्रकारही घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग चौथ्या दिवशी रेल्वेसेवा विस्कळित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबईला गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे विस्कळित झालेली रेल्वेची सेवा अद्याप पूर्णपणे ट्रॅकवर आलेली नाही. सलग चौथ्या दिवशीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. आज, सोमवारीही डेक्कन, प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेस या गाड्या गाड्या सुटणार की नाही, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आले नाही. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी नोकरदारांना कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

पावसामुळे शुक्रवारपासून मुंबईतील रेल्वे व्यवस्था पुर्णतः कोलमडली आहे. पावसाचे प्रमाण कमी होत नसल्याने तेथील लोकल रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. चौथ्या दिवशीही अंशत: तिच परिस्थिती होती. सुटी असल्यामुळे पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र रविवारी पुणे स्थानकातून सुटणाऱ्या विविध गाड्यांसाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. पुणेमार्गे जाणाऱ्या सुमारे १५ ते २० गाड्या उशिराने धावत होत्या.

रविवारी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या १२ ते १४ तास आणि पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या गाड्या चार तास उशीराने धावत होत्या. प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, दोन पॅसेंजर गाड्या, मुंबई - शिर्डी फास्ट पॅसेंजर, मिरज - पंढरपूर, पुणे - अमरावती आणि पंढरपूर आदी गाड्या रद्द करण्यात आल्या. मुंबईला मोठ्या प्रमाणावर ट्रॅकवर पाणी साचले होते. आता काहीप्रमाणात पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, पाणी पूर्णपणे ओसरल्याशिवाय रेल्वे सेवा पूर्ववत होणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रवाशांचा एसटीवर ताण

रेल्वे सेवा विस्कळ‌ित झाल्यामुळे अद्याप एसटीच्या सेवेवर प्रवाशांचा ताण पडलेला नाही. प्रवासी संख्या वाढल्यास त्यातुलनेत गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल, असे एसटीच्या विभागिय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी सांगितले. पावसामुळे कोणतीही एसटी रद्द करण्यात आली नाही. पावसाचा व रेल्वेच्या विस्कळीत सेवेचा एसटीच्या सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. शनिवारी आणि रविवारी सर्व एसटी बसेस वेळेवर सुटल्या होत्या. रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने एसटीच्या सेवेवर कोणताही ताण आला नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.

कूल कॅब टॅक्सीला प्रतिसाद

रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे पुणे स्टेशन येथील 'मुंबई-पुणे-मुंबई' कूल कॅब टॅक्सीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. मात्र, खासगी वाहतुकदार प्रवाशांकडून नेहमीपेक्षा जास्त पैसे आकारत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनची सर्वदूर हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात रविवारी जोरदार बरसलेल्या पावसाने राज्यातही अनेक ठिकाणी हजेरी लावली. मुंबईसह कोकणात आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

रविवारी राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद कोल्हापूर येथे (३५ मिमी) झाली. नागपूर येथे ३२, डहाणू २४, यवतमाळ येथे २९ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी वगळता अन्यत्र तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला.

बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनारपट्टीलगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात गुजरातची दक्षिण किनारपट्टी ते केरळ दरम्यान समुद्रसपाटीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्याचबरोबर राजस्थानचा पश्चिम भाग ते छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी, बंगालचा उपसागर व अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने तसेच मोसमी वाऱ्यांचा प्रवाहही चांगला असल्याने पुण्यासह राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोरही कायम राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images