Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भांडणे सोडविणाऱ्या महिलेला पेटवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनी येथे पाच जूनला सायंकाळी पाच वाजता घडली. यामध्ये ही महिला ७० ते ७५ टक्के भाजली असून तिच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भारत रामू चव्हाण (वय ४०), गिरजाबाई भारत चव्हाण (वय ३६), सताबाई मल्लेश चव्हाण (वय ४२) (सर्व रा. संभानगर, कर्वेनगर) यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी वनाबाई काळे (१८, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे वडील व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी दारू पिऊन फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करीत होते. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी व त्यांची आई या दोघी गेल्या असता, आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. यामध्ये त्यांच्या पोटाला, मांडीला, हाताला व पाठीला भाजले.

धडक बसल्याने अज्ञाताचा मृत्यू

अज्ञात वाहनाची जबर धडक बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना महापालिका भवन जवळील श्रमक भवन येथे घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे अंदाजे वय ४५ असून तिची ओळख पटलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एल निनो’मुळे मान्सूनला धोका नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मान्सून ही सूर्याची उष्णता आणि जगभरातील महासागर यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणारी प्रचंड ऊर्जेची जागतिक घटना असून, एल निनोसारख्या घटनांपासून मान्सूनला कोणताही धोका नाही,' असे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी केले.

मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित 'मान्सून, एल निनो आणि दुष्काळ' या व्याख्यानात ते बोलत होते. 'विदेशी शास्त्रज्ञांच्या दृष्टीकोनातून मान्सूनकडे पाहून आपण मान्सूनचे आकलन क्लिष्टपणे करतो. मात्र, वराहमिहीराने पंधराशे वर्षांपूर्वी सांगितलेल्या 'आदित्यात जायते वृष्टी:' या सोप्या समीकरणाकडे दुर्लक्ष करतो,' असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

डॉ. केळकर म्हणाले, 'आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या हवामानाच्या १४४ वर्षांच्या नोंदींनुसार १०१ वर्षे पावसाने सरासरी गाठली, १९ वर्षे पाऊस उत्तम झाला, तर २४ वर्षे दुष्काळ पडला. या कालावधीत २९ वर्षे एल निनोची होती. मात्र, २४ दुष्काळांपैकी १३ वर्षे एल निनोची होती, तर २९ एल निनोंपैकी १६ वर्षे दुष्काळ पडला. यामुळे दुष्काळ आणि एल निनो यांचा थेट संबंध लावता येत नाही. दर वर्षी मान्सून काळात दुष्काळ पडण्याची शक्यता फक्त १३ टक्के असल्यामुळे मान्सूनवर संकट येण्याचे दावे खरे नाहीत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांकडून १० दुचाकी जप्त

$
0
0

पुणेः दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना फरासखाना पोलिसांनी अटक करून त्यांनी विविध ठिकाणी चोरलेल्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. संजय उत्तेश्वर चेडे आणि शैलेश ज्ञानेश्वर पाटील यांना अटक करण्यात आली.

वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी फारसखाना पोलिस स्टेशनचे एक पथक रात्री गस्तीवर असताना, त्यांना एका दुचाकीच्या नंबर प्लेटविषयी शंका आली. त्यांनी दुचाकीवरील चेडे आणि पाटील यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ती दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. यातील चेडे याचे गॅरेज आहे. ते बनावट किल्लीने वाहने चोरत. पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, कर्मचारी शंकर कुंभार, अमोल सरडे, इकबाल शेख, विनायक शिंदे, अमेय रसाळ, रमेश चौधरी, हर्षल शिंदे, संदिप पाटील यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणमंत्र्यांची भूमिका रास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीचे सर्व प्रवेश ऑनलाइनच करण्याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या तंबीचे शिक्षणविश्वातून स्वागत करण्यात येत आहे. या धोरणामुळे प्रवेशप्रक्रियेतील गैरकारभार थांबतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यामुळे केंद्रीय प्रवेश समिती आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची जबाबदारी वाढली आहे.

अकरावीची प्रवेशप्रक्रिया होण्यापूर्वीच खासगी क्लासेस सुरू केले जातात. त्यांच्या माध्यमातून बेकायदा प्रवेशदेखील दिले जातात. त्याचप्रमाणे, ऑफलाइन प्रवेशाच्या माध्यमातून गैरकारभारांना वाव मिळतो. ऑफलाइन प्रवेशाचा तपशीलदेखील योग्य पद्धतीने मांडला जात नाही. या सर्वांमुळे अकरावी प्रवेशाच्या वर्गात विद्यार्थी-पालकांनी पिळवणूक होऊन त्यांना मनस्ताप सोसावा लागतो. अकरावी प्रवेशातील गैरकारभार थांबविण्याबाबत आणि व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याबाबत 'मटा' सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून आग्रही भूमिका घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या सर्वांची माहिती घेतली. तसेच, कोणत्याही परिस्थितीत अकरावी प्रवेशप्रक्रियेत गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी दिली.

'सिस्कॉम' या पालकांच्या संघटनेच्या माध्यमातून अकरावी प्रवेशातील गैरकारभार थांबविण्याबाबत मुंबई हायकोर्टात धाव घेण्यात आली. तसेच, पोलिसांकडे तक्रारदेखील करण्यात आली. त्यानंतर, प्रवेश समितीकडून त्याची शहानिशा करण्याऐवजी पालकांच्याच विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडून कडक भूमिका जाहीर करण्यात आल्याने लढा देणारे पालक आणि 'मटा'च्या प्रयत्नांनाच यश आले आहे.

'सिस्कॉम'ने सर्व प्रवेश ऑनलाइन करण्याची मागणी केली होती. तसेच, त्याबाबतचा अहवालदेखील सादर केला होता. शिक्षणमंत्र्यांची भूमिका हा पालकांच्या भूमिका विजयच आहे, अशा शब्दात 'सिस्कॉम'तर्फे राजेंद्र धारणकर प्रतिक्रिया व्यक्त केली.

'केवळ यादी नव्हे; प्रवेशही ऑनलाइन दिसावेत'

ऑनलाइन प्रवेशात जागांचा काळाबाजार करण्याचे प्रमुख कारण म्हणजे एक फेरी संपल्यानंतर रिक्त सादर केला जाणारा हिशेब. यामध्ये कॉलेजकडून दिल्या जाणाऱ्या माहितीची शहानिशा केली जात नाही. यावर तोडगा म्हणून प्रवेशाची माहितीदेखील ऑनलाइन आणि रिअल टाइम दिसण्याची सोय वेबसाइटच्या माध्यमातून करून देणे गरजेचे आहे. तसे झाल्यासच संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन होईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आदेशानुसार आता कितीही फेऱ्या झाल्या तरी ऑनलाइन प्रवेश देण्यात येणार आहेत. अशा वेळी प्रत्येक फेरीनंतरच्या रिक्त जागांचा तपशील अचूक आणि सत्य असणे, गुणवान विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी गरजेचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमिषाने पाच लाखांना फसवले

$
0
0

शिक्षक म्हणून नोकरीला लावण्याचे अामिष दाखवून संबंधिताकडून पाच लाख रुपये घेऊन त्याची आर्थिक फसवणूक केल्याची घटना पुण्यात घडली. या प्रकरणी माधव उत्तम चाटे (रा. जळकोट, लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

महेश बेंजगमकर (वय ३०, रा कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चाटे याने महेश यांना शिक्षक म्हणून नोकरीला लावतो असे सांगितले होते. त्याबदल्यात चाटेने महेशकडून २२ मार्च २०१५ रोजी शिवाजीनगर येथील तृप्ती हॉटेल येथे पाच लाख रुपये घेतले होते. मात्र, काही महिने उलटल्यानंतरही चाटे नोकरीला लावत नसून त्याने फसवणूक केल्याचे महेशच्या लक्षात आले.

खंडणी मागणाऱ्याला अटक

सेनापती बापट रोडवर सुरू असलेले बांधकाम विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण विभागाला आरोग्य खात्याचा इशारा

$
0
0

पुणे : पावसाळा सुरू झाल्याने शहरात साथीच्या रोगांचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरादारी घेणाऱ्या आरोग्य विभागाने शुक्रवारी पालिकेच्याच अतिक्रमण विभागाला नोटीस बजावली. अतिक्रमण विभागाच्या गोडाउनमध्ये डासांची पैदास आढळून आल्याने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, टाळाटाळ केल्यास दंड ठोठावण्याचा इशाराही दिला गेला आहे.

शहरातील सोसायट्या तसेच इतर व्यावसायिक भागांत पाणी साठणाऱ्या ठिकाणांची पाहणी पालिकेतर्फे केली जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डासांमुळे साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने आतापासूनच तपासणी सुरू केली असून, अतिक्रमण विभागाच्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) गोडाउनमध्ये डासांची पैदास आढळल्याने तत्काळ नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील अतिक्रमण विभागाची गोडाउन्स आणि व्हेईकल डेपो यांना प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले असून, डासांची उत्पती रोखण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेने नोटीस दिल्यानंतर पुन्हा डासांची उत्पत्ती आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे बजाविण्यात आले आहे. गेल्यावर्षी आरोग्य विभागाने डासांची पैदास रोखण्यात अपयशी ठरल्याने भांडार विभागाकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीचा पाय आणखी ‘खोलात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दैनंदिन प्रवाशांमध्ये अवघ्या तीन महिन्यांत दोन लाखांची घट झाली असल्याची धक्कादायक बाब उजेडत आली आहे. तसेच, ताफ्यातील बसची संख्या वाढूनही, सुमारे साडेसहाशे बस सध्या बंद असल्याने पीएमपीचा पाय आणखी खोलात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे अभिषेक कृष्णा यांनी नुकतीच स्वीकारली आहेत. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांत पीएमपीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे बंद पडणाऱ्या बसचे प्रमाण कमी करून उत्पन्न व प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान कृष्णा यांना उचलावे लागणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये सुमारे १२ लाखांपर्यंत अससेली प्रवासी संख्या एप्रिलमध्ये १० लाखांहून कमी झाली असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन उत्पन्नावर होत आहे. पीएमपीच्या आणि भाडेत्तत्वावरील बसचा ताफा सुमारे बावीसशेपर्यंत पोचलेला असूनही सध्या साडेसहाशे बस मार्गांवर धावू शकत नसल्याने पीएमपीचे उत्पन्न बुडते आहे. पीएमपीच्या अडचणींत झालेल्या वाढीतून मार्ग काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे पत्र पीएमपी प्रवासी मंचाच्या जुगल राठी यांनी कृष्णा यांना दिले आहे.

प्रति दिन बस प्रवाशांची संख्याही ६८९ अशा नीचांकी पातळीपर्यंत घसरली आहे, याकडे राठी यांनी लक्ष वेधले आहे. प्रवासी केंद्रीत नियोजन, प्रशासनाला शिस्त, उत्पन्न व अनुदान निधीचा प्रभावी वापर आणि दुचाकी व रिक्षाभाड्यापेक्षा कमी तिकीट दर, अशा उपायांतून पीएमपीला सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढणे शक्य होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

जूनमध्ये उत्पन्न वाढले

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मार्गांवरील बसची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने पीएमपीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात एक कोटी ४० लाखांच्या दरम्यानचे पीएमपीचे सरासरी दैनंदिन उत्पन्न आता एक कोटी ७० लाखांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या सोमवारी (१५ जून) पीएमपीने एक कोटी ८० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले असून, रविवार वगळता संपूर्ण आठवड्यातील दैनंदिन उत्पन्न एक कोटी ५० लाखांहून अधिक आहे. पीएमपीच्या बंद बस मार्गांवर धावण्यासाठी कृष्णा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येत असल्याचे दिसून येत असून, मार्गांवरील सरासरी चौदाशे बसची संख्या आता पंधराशेपर्यंत पोहोचली आहे.

पीएमपीच्या मार्गांवरील बसची संख्या वाढली, तर उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यासाठी, दैनंदिन स्वरूपात सर्व डेपो मॅनेजरच्या कामाचा आढावा घेण्यात येत असून, आगामी काही दिवसांत दोन कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

- अभिषेक कृष्णा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायसन्ससाठी धोनी, रैना पुण्यात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धोनी, रैना, युवराज यांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अपॉइंटमेंट मागितली आहे ! वाचून धक्का बसला ना, मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. आरटीओकडे 'डमी' व्यक्तींकडून अपॉइंटमेंट घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, नाव नोंदविताना धोनी, रैना, युवराज यांच्या नावाचा वापर केला जात आहे.

आरटीओकडून शिकाऊ आणि पक्के ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन अपॉइंटमेंट पद्धती सुरू करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीपासूनच खूप वेटिंग दिसत आहे. तसेच, सध्याही दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लायसन्ससाठी काही प्रमाणात वेटिंग आहे. मात्र, या काही महिन्यांमध्ये क्रिकेटपटू आणि अभिनेत्यांच्या नावाने असलेल्या नावाने अनेक अपॉइंटमेंट घेण्यात आल्या आहेत. त्या सर्व अर्जदारांची जन्मतारीखही एकच नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या अपॉइंटमेंट बोगस असल्याचे स्पष्ट होते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर आरटीओने बनावट अपॉइंमेन्ट घेणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. आरटीओने नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरकडून याबाबतची माहिती संकलित केली जात आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंटचा अर्ज भरताना संबंधितांच्या मोबाइल व्हेरिफिकेशन कोड पाठविण्यात येतो. त्या कोडशिवाय अर्ज भरता येत नाही. त्यामुळे या बोगस अपॉइंटमेंट करणाऱ्यांचे मोबाइल नंबर एनआयसीकडून आरटीओला प्राप्त होत आहेत. 'एनआयसी'कडून आरटीओला आतापर्यंत अशा २० नंबरची यादी मिळाली आहे. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांच्या सायबर शाखेकडे ही माहिती सुपूर्द केली जाणार असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

नागरिकांना पारदर्शक सेवा मिळावी यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट पद्धती अवलंबली जात आहे. मात्र, काही लोक बनावट अपॉइंटमेंट घेवून आरटीओची आणि नागरिकांचीही फसवणूक करत आहेत. या मागे त्यांचा नक्की हेतू काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाने रेल्वे ‘रुळावर’च!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक शुक्रवारी पूर्णपणे कोलमडली. पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्याची वेळ आली. पुण्यावरून सकाळी सुटलेल्या डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस आदी गाड्या अर्ध्यातून मागे फिरल्या. त्यामुळे नोकरदार, प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या गाड्यांच्या तिकिटाचे पैसे प्रवाशांना परत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहण्याबरोबरच रेल्वे ट्रॅकवरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे लोकल सेवेसह देशभरातून मुंबईला येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले होते. अनेक गाड्या उशिराने येत होत्या. तसेच, रद्द केलेल्या गाड्यांचे प्रमाणही अधिक होते. अनेक प्रवाशांनी आनलाइन बुकिंग केले असल्याने, स्टेशनवर पोहचल्यावर गाड्या रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळत होती. त्यामुळे त्यांना मागेफिरून जावे लागत होते. पुणे रेल्वे स्टेशनवर सकाळी काह प्रमाणात गर्दी होती, गोंधळाचे वातावरण होते. मात्र, प्रवाशांना माहिती होत गेल्यानंतर गर्दी ओसरली.

लांब पल्याच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या नाहीत; परंतु बहुतांश गाड्या उशिराने धावत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शक्य आहे, तिथंपर्यंत गाड्या पाठविल्या जात आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक रेल्वे स्टेशनवर तिकीट रद्द करण्याची व्यवस्था केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतोष मेमाणे निलंबित

$
0
0

पुणे : महापालिकेत बदली करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या शिक्षणमंडळातील क्लार्क संतोष मेमाणे याला पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मेमाणे याच्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत विभागाकडून आल्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

नगर जिल्ह्यातील शिक्षकाची पुणे महापालिकेत बदली करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना मेमाणे याला गुरुवारी अटक करण्यात आली होती. बदलीसाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी शिक्षणमंडळाचे विद्यमान अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी अध्यक्ष रवी चौधरी यांच्यासह एजंट बापूसाहेब भापकर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील संजय देशमुख या शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी देशमुख यांची पुण्यात नियुक्ती करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. या नियुक्तीचे आदेश काढण्याचे काम शिक्षण मंडळाचे होते. हे आदेश काढण्यासाठी या शिक्षकाकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. लाचलुचपत खात्याने मेमाणे याला अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे. मेमाणे हा पालिकेचा सेवक असल्याने त्याला सध्या निलंबित करण्यात आले आहे.

लाचलुचपत विभागाचा अहवाल आल्यानंतर त्यावर पुढील कारवाई केली जाईल. लाचलुचपत खात्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या वतीने पुढील चौकशी केली जाईल.

- राजेंद्र जगताप, अतिरिक्त आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल अॅप्लिकेशन साधून देताहेत ‘योग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

व्यग्र दिनचर्येमुळे क्लासच्या वेळा जुळत नाहीत म्हणून तरुणांनी आता मोबाइल अॅप्लिकेशन्स, वेबसाइट आणि पुस्तकांनाच गुरू मानून योगविद्या अवगत करण्याचा नवा पर्याय स्वीकारला आहे. मोबाइलवरील अॅप्लिकेशन्सच्या संख्येत दर महिन्याला वाढ होते आहे. आत्तापर्यंत दहा लाखांहून अधिक नागरिकांनी योगप्रशिक्षणाची अॅप्लिकेशन्स डाउनलोड केली आहेत.

स्मार्ट फोन आता घराघरात पोहोचल्याने लहान मोठ्या गरजांसाठी सर्रास मोबाइल अॅप्लिकेशन्सचा वापर होतो आहे. यामध्ये योग प्रशिक्षणही आता मागे राहिलेले नाही. योगा अँड हेल्थ टिप्स, योगा डॉट कॉम, योगा फॉर ऑल, योगा फॉर फिटनेस अशी अनेक अॅप्लिकेशन नामांकित कंपन्यांनी तयार केली आहेत. योगविद्येचा खजिनाच या निमित्ताने सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत एका अॅप्लिकेशनमधून खुला झाला आहे. विशेष योगासनांवर आधारित प्रत्येक अॅप्लिकेशन किमान एक लाख ते पाच लाख लोकांनी आत्तापर्यंत डाउनलोड केले आहे.

योगविद्या म्हणजे काय, तिचा इतिहास, शास्त्रीय आधार, ही विद्या अवगत केलेल्या तज्ज्ञांची सविस्तर माहिती देण्याबरोबरच रेखाटनांद्वारे प्रत्येक आसनाचा संबंधित अवयवांवर नेमका कसा परिणाम होतो, याची रेखाटने आणि क्लिप्स या अॅप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी दररोज करावीत अशा आसनांपासून प्राणायामाच्या विविध प्रकारांची प्रात्यक्षिके सहजसोप्या पद्धतीने दिली आहेत. त्यामुळे अॅपवरील व्हिडीओ अथवा चित्रे पाहून योगसाधना घरच्याघरी करता येईल, अशी नागरिकांची मानसिकता आहे. गेल्या काही वर्षांत योगासनाचे महत्त्व सर्वदूर पसरल्याने प्रगत देशांनीदेखील ही विद्या आत्मसात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, योगविद्येविषयी वाढत्या आकर्षणामुळे योगासनांची सखोल माहिती देणाऱ्या पुस्तकांच्या मागणीही वाढली आहे. योगविद्येचा प्रसार करण्यासाठी गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील नामवंत प्रशिक्षक, मार्गदर्शकांनी सहजसोप्या भाषेत पुस्तके लिहिली आहते. त्यामुळे दुकानांमध्ये आरोग्यासाठी योग, आपली योगविद्या, दररोजची योगासने, महिलांसाठी योगासने, प्राणायाम-सूर्यनमस्कार, योग आणि मन अशा विविध संकल्पनांवर आधारित सर्व भाषेतील असंख्य प्रकारची पुस्तके उपलब्ध असून, वाचकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एवढेच नव्हे; तर योगवर आधारित ऑनलाइन पुस्तकांची खरेदीही वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षांचा तपास अद्याप सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये बदली करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा रामचंद्र धुमाळ आणि माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी यांच्या सांगण्यावरून दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, अद्यापही शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, माजी अध्यक्षांचा तपास सुरूच आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील कनिष्ठ लिपिक संतोष रामदास मेमाणे (३६, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) आणि खासगी व्यक्ती भाऊसाहेब बाबासाहेब भापकर (४५, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड) या दोघांना कोठडी सुनावण्यात आली.

महापालिकेच्या शिक्षणमंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा रामचंद्र धुमाळ (रा. वारजे माळवाडी) आणि माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रवींद्र चौधरी (रा. अमित समृद्धी, जंगली महाराज रस्ता) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नोकरी करणाऱ्या एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. संबंधित शिक्षकाची पत्नी पुणे शिक्षण मंडळाच्या एका शाळेमध्ये शिक्षिका आहे. त्यामुळे या शिक्षकाने पुण्यामध्ये बदली मागितली होती.

एसीबीकडे दाखल केलेल्या तक्रारीवरून मेमाणे आणि भापकर या दोघांना सापळा रचून गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. ही कारवाई अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरीक्त अधीक्षक अर्जुन सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक जगन्नाथ कळसकर आणि त्यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कन, सिंहगड आल्या माघारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबईतील पावसाच्या हाहाकारामुळे पुण्यातील रेल्वे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. सकाळी गेलेल्या गाड्या अर्ध्यातून परतल्या, तर अनेक गाड्या रद्ददेखील झाल्या आहेत; तसेच पाऊस ओसरून ट्रॅक खुले झाल्यानंतर पुढील गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी हेल्पलाइनदेखील कार्यान्वित करण्यात आली आहे.

अर्ध्यातून मागे फिरलेल्या गाड्या : डेक्कन क्वीन लोणावळ्याहून, प्रगती एक्स्प्रेस पनवेलहून सिंहगड एक्स्प्रेस चिंचवडहून, कोल्हापूर-सीएसटी सह्याद्री एक्स्प्रेस चिंचवडहून.

रद्द झालेल्या गाड्या : जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे, मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस; तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस व डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या दोन्ही बाजूने रद्द करण्यात आल्या.

उशिराने धावणाऱ्या गाड्या : सीएसटी-भुवनेश्वर, सीएसटी-चेन्नई, सीएसटी-कन्याकुमारी, सीएसटी-वाराणशी. दरम्यान, शनिवारी रेल्वेच्या गाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार की नाही, हे मुंबईतील परिस्थिती अवलंबून असेल. अधिक माहितीसाठी १३९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गुंठ्यापर्यंत दोन ‘एफएसआय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरातील अनधिकृत बांधकामांचा तिढा सोडविण्यासाठी दोन गुंठ्यापर्यंतच्या (दोनशे मीटर) निवासी बांधकामांना दोन चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याची शिफारस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने शनिवारी (२० जून) केली.

अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जटील झाल्यामुळे महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये काही प्रमाणात सुधारणा आणि बदल होण्याच्या दृष्टीने निवासी बांधकामांबाबत प्रशांत शितोळे आणि रोहित काटे यांनी सदस्य प्रस्ताव मांडला होता. त्यावर महापौर शकुंतला धराडे अध्यक्षस्थानी असलेल्या सभेत चर्चा झाली. शहरात दोनशे चौरस मीटरच्या भूखंडापर्यंतची मोजणी महापालिका ठरवेल इतकी माफक फी आकारून नगररचना आणि बांधकाम परवानगी विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या करावी. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि नगर भूमापन अधिकाऱ्यांना कळवावे, दोनशे चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना दाट वस्तीचे नियम लागू करावेत, त्यांना कमाल दोन 'एफएसआय' लागू करावा, पर्किंग नियमावलीत बदल करावे आणि दाट लोकवस्तीच्या भागात 'शिफ्टेड बॉन्ड्री'चे नियम शिथिल करावेत, असे प्रस्तावात म्हटले आहे. या चर्चेत शितोळे यांच्यासह अजित गव्हाणे, दत्ता साने, नारायण बहिरवाडे, सुलभा उबाळे, योगेश बहल यांनी भाग घेतला. बांधकाम दुरुस्ती करावयाच्या नियमांतील अटी शिथिल कराव्यात, या उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी पकडणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारने नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडण्याचे मनावर घेतले आहे का, सरकारला मारेकरी पकडायचे आहेत का, असे प्रश्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी शनिवारी उपस्थित केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २२ महिने आणि पानसरे यांच्या हत्येला चार महिने उलटले आहेत. मात्र, तपास यंत्रणेला अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. त्यामुळे डॉ. दाभोलकरांची हत्या करण्यात आलेल्या बालगंधर्व पुलावर (विठ्ठल रामजी शिंदे पूल) सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, माहिती अधिकार कार्यकर्त्या विनिता देशमुख, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, शहराध्यक्ष माधव गांधी, शहरकार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी आणि नंदिनी जाधव आदी या वेळी उपस्थित होते. 'सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींची हत्या झाल्यानंतर मनात चिड येते. मात्र, ती हिंसेच्या मार्गाने न व्यक्त करता अहिंसक पद्धतीने व्यक्त करत आहोत. आमचा अहिंसेवर विश्वास असल्याने शांततेच्या मार्गाने आम्ही जात आहोत,' असे डॉ. हमीद यांनी सांगितले.

'राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडी सरकार असो किंवा भाजप-सेना महायुतीचे सरकार यांच्या हेतू विषयी शंका येते. सीबीआय (केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभाग) दाभोलकर हत्येचा तपास करीत असून त्यांना त्यात अपयश आले आहे. सीबीआयच्या तपासात गती मिळण्यासाठी पंतप्रधानांना भेटायचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट नोटाप्रकरणी तिघांना अटक

$
0
0

पुणेः दहशतवादविरोधी पथकाने बनावट नोटाप्रकरणी तिघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या एक लाख १५ हजार रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी एटीएसने अशोक नोगेन मंडल (वय ३२), गोपाल मंतू सरकार (२५) जमीदार अयाझअली शेख (२५, रा. गणेशनगर, चिखली, मूळ पश्चिम बंगाल) या तिघांना अटक करण्यात आली आहे. मंगला थिएटरजवळ शुक्रवारी रात्री या तिघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी मंडल याच्याकडून एक हजार रुपयांच्या ४९ बनावट नोटा, गोपाल सरकारकडून पाचशे रुपयाच्या ९१ नोटा, शेखकडून पाचशे रुपयांच्या ४१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या लेखी परीक्षा २१ जुलैपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्राच्या अर्थात दहावीच्या लेखी व अन्य परीक्षा आता येत्या सप्टेंबर ऑक्टोबर ऐवजी जुलैमध्ये होणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून येत्या २१ जुलैपासून लेखी परीक्षांना प्रारंभ होणार आहे. त्याशिवाय तोंडी परीक्षा या १४ ते २० जुलैदरम्यान घेतल्या जाणार आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात दहावीची ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahasscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर १९ जूनपासून जाहीर होणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा २१ जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्याशिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयाची प्रात्यक्षिक परीक्षा देखील लेखी परीक्षेच्या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच तोंडी परीक्षा १४ ते २० जुलै दरम्यान होईल. त्याशिवाय अन्य परीक्षा देखील १४ ते २० जुलै या दरम्यान होणार आहेत, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद डॉक्टरांचे प्रमाणपत्र ‘आरटीओ’त ग्राह्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आयुर्वेद डॉक्टरांनी पेशंटला दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आता यापुढे राज्य परिवहन कार्यालयात (आरटीओ) ग्राह्य धरण्यात येईल. या संदर्भात परिवहन खात्याच्या मंत्र्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखविला असून त्याबाबत लवकरच आरटीओकडून परिपत्रक काढण्यात येईल,' अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या (सीसीआयएम) निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा वैद्यकीय विकास मंच आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार माधुरी मिसाळ, बाळासाहेब आहेर, निशिकांत भोसले, चंद्रकांत कोलते, राजेश पांडे, तसेच विजयी उमेदवार डॉ. सदानंद सरदेशमुख, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. आशानंद सावंत, डॉ. जयंत देवपुजारी, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. जुबेर शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

'आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या तसेच प्रॅक्टिस करणाऱ्यांना पुढील काही वर्षे चांगली आहेत. आयुर्वेदाची ताकद वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. राज्य मेडिकल रजिस्टरमध्ये आयुर्वेद डॉक्टरांची नोंदणी करण्यात येईल.

स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठाचा प्रस्ताव

अॅलोपॅथीसह अन्य शाखांच्या स्वतंत्र आरोग्य विद्यापीठांच्या धर्तीवर आयुर्वेदाच्या विकास, शिक्षण, प्रचार, प्रसारासह संशोधनाच्या हेतूने आयुर्वेद विद्यापीठ स्थापण्याचा विचार आहे. यासंदर्भात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी चर्चाही झाली. त्याकरिता राज्यातील आयुर्वेद तज्ज्ञांनी स्वतंत्र आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणे बंधनकारक राहील. सरकारकडे पैसा नसल्याने खासगी सरकारी भागीदारीतून आयुर्वेदाची कॉलेज सुरू करण्यायाबाबत सरकार विचार करेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकार देऊन पस्तावलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शिक्षण मंडळाचे काढून घेण्यात आलेले अधिकार पुन्हा मंडळाच्या सदस्यांना देण्यासाठी आपण भांडलो. मात्र, सदस्यांकडून लाच घेण्याचे प्रकार होत असल्याने अधिकार दिल्याचा आपल्याला पश्चाताप होत आहे,' अशा शब्दांत शिक्षण मंडळातील लाचखोरी प्रकरणावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी भाष्य केले.

शिक्षण मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बदलीसाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. त्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी सध्या फरार असल्याचे पोलिस सांगत आहेत. शिक्षण मंडळाला पूर्वीप्रमाणे अधिकार मिळावेत, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेऊन पालिका आयुक्तांना आदेश दिले होते. मात्र, शनिवारी शिक्षण मंडळाबाबत आपण घेतलेली भूमिका चुकल्याची कबुली तावडे यांनी दिली.

'लोक प्रतिनिधीच लाच घेत असतील तर कसे व्हायचे. ज्यांच्या हक्कासाठी आपण भांडलो तेच चुकीचे काम करीत असतील तर त्यांचे अधिकार त्यांना मिळवून दिल्याचा आता आपल्याला पश्चाताप होत आहे,' अशा शब्दांत तावडे यांनी कबुली दिली.

दोघांना जामीन

पुण्याच्या शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये बदली करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षणमंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा रामचंद्र धुमाळ आणि माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी यांच्या सांगण्यावरून दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची शनिवारी जामिनावर सुटका करण्यात आली. शिक्षण मंडळातील कनिष्ठ लिपिक संतोष रामदास मेमाणे (३६, रा. हडपसर) आणि खासगी व्यक्ती भाऊसाहेब बाबासाहेब भापकर (४५, कात्रज-कोंढवा रोड) यांना अटक करण्यात आली होती.

'शिक्षण मंडळ बरखास्त करा'

पुणेः शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने आता पुन्हा मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे. आर्थिक अधिकार देण्याबाबत राष्ट्रवादी आणि भाजपमधील गौडबंगाल काय आहे, अशी विचारणा शिवसेनेने केली असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार मेधा कुलकर्णी आणि शिक्षण मंडळाचे पदाधिकारी यांची चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार मंडळच बरखास्त करावे, अशी मागणी शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी केली आहे. मंडळाच्या आजी-माजी अध्यक्षांवरच गुन्हा दाखल झाला असल्याने धुमाळ आणि चौधरी यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षांनी तातडीने सर्वसाधारण सभा बोलवावी, असे पत्र शिक्षण मंडळ सदस्य राम बोरकर व विनिता ताटके यांनी दिले आहे.

शिक्षण मंडळाचे वित्तीय अधिकार तातडीने काढून घ्यावेत, असे पत्र सजग नागरिक मंचाने पालिका आयुक्तांना दिले आहे. शिक्षण मंडळात पारदर्शक व्यवहार चालत नाहीत, अशी मागणी विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे.

भाजपचे घूमजाव

शिक्षण मंडळाला पुन्हा अधिकार देण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, आता भाजपने घुमजाव केले असून, शिक्षण मंडळ बरखास्त करून जिल्ह्यातून केलेल्या सर्व बदल्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्याबाबत, त्वरेने निर्णय न घेतल्याल लोकायुक्तांकडे दाद मागावी लागेल, असा इशारा भाजपचे प्रवक्ते उज्ज्वल केसकर यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालक गिरवताहेत योगाचे धडे

$
0
0

दत्ता जाधव, पुणे

सततच्या कामाचा ताण, खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे येणारी हाडांच्या आजारांची समस्या यावर इलाज म्हणून पुण्यातील रिक्षाचालकांनी योगसाधनेचा मार्ग अवलंबला आहे. डॉ. विनोद योग क्लिनिक आणि महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन यांच्या उपक्रमातून रिक्षाचालक योगाचे धडे गिरवत असून, त्याचा रिक्षाचालकांना फायदा होत आहे.

पुण्यातील रिक्षाचालकांविषयीचा सार्वत्रिक अनुभव बोलका असला, तरीही खड्डेमय रस्ते आणि सततचा प्रवास यांचा विपरित परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. वाहतुकीची कोंडी आणि त्याबरोबर येणाऱ्या समस्यांमुळे मानसिक ताणही रिक्षाचालकांना सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून डॉ. विनोद योग क्लिनिक आणि महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन रिक्षाचालकांसाठी विनामूल्य योगासनांचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यातून रिक्षाचालकांना चांगल्या पद्धतीने योगाचे प्रशिक्षण देऊन, त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्याचा हा प्रयत्न आहे.

पुण्यात ४० वर्षांपासून योगाचा प्रसार करणाऱ्या महर्षी विनोद रिसर्च फांउडेशनच्या वतीने रिक्षाचालकांच्या विविध समस्यांवर उपययोजना करण्यासाठी खास शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. एकूण पाच शिबिरांची ही मालिका असून, यातील दोन शिबिरे ४ ते ६ मे आणि २७ ते २९ मे दरम्यान पार पडली आहेत. तिसरे शिबिर २९, ३० जून आणि १ जुलै रोजी होणार आहे. शिवाय आणखी दोन शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images