Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मॅगी’चा तीन कोटी १४ लाखांचा साठा कंपनीकडे परत

$
0
0

पुणे विभागात कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मॅगी' नूडल्सवर महाराष्ट्र सरकारने बंदी घातल्यानंतर कंपन्यांकडे माल परत पाठविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुणे विभागातून आतापर्यंत तीन कोटी १४ लाख रुपयांचा 'मॅगी'चा साठा कंपनीकडे परत पाठविण्यात आला आहे.

राज्यात मॅगीच्या नमुन्यात शिसाचे प्रमाण आढळले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी मॅगीवर बंदी लागू केल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुण्यासह राज्यातील विविध मोठ्या मॉलमधून मॅगी हद्दपार झाली; तर छोट्या-मोठ्या वितरकांकडे असलेला मॅगीचा साठा परत कंपनीकडे पाठविण्याची कारवाई एफडीएने सुरू केली. पुणे विभागातही अशा प्रकारची कारवाई करण्यात आली.

'पुणे विभागातून गेल्या आठवड्यापासून मॅगीचा साठा परत पाठविण्याची कारवाई सुरू केली आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत सर्व वितरकांकडे मॅगीच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. शहर जिल्ह्यात मॅगीचे १९ वितरक आहेत. या तपासणींतर्गत १६ जूनपर्यंत तीन कोटी १३ लाख ८१ हजार ३६३ रुपयांच्या मॅगीचा साठा कंपनीकडे पाठविण्यात यश आले आहे,' अशी माहिती सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली.

सर्वाधिक साठा पुण्यात

पुणे विभागात पुणे शहरात एक कोटी ६९ लाख ३८ हजार ५३६ रुपयांचा सर्वाधिक मॅगीसाठा आढळला; तर एक लाख दोन हजार ५४६ किलो एवढा साठा आढळला. सोलापूर, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक कमी साठा आढळला. सोलापूरमध्ये १० हजार १७६ किलो वजनाचा आणि तेरा लाख सहा हजार रुपये किमतीचा; तर सांगलीमध्ये २९ हजार ५९४ वजनाचा आणि २६ लाख ७ हजार ३७० रुपयांचा साठा आढळला. हा सर्व साठा कंपनीकडे आतापर्यंत पाठविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर रिपरिप झाली सुरू

$
0
0

हवेतील गारवादेखील वाढला; संसर्गाचा हंगामदेखील सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या नकाशावर तांत्रिकदृष्ट्या मान्सून येऊन आठवडा उलटला तरी अजूनही तो बरसलेला नव्हता. अखेर, गुरुवारी सायंकाळी शहराच्या काही भागांत का होईना मान्सूनच्या पावसाप्रमाणे रिपरिप झाल्याने पाऊस आल्याची चर्चा पुणेकरांमध्ये होती.

शहरात गुरुवारी संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण पसरल्याने जोराचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नागरिकांना केवळ रिपरिप अनुभवायला मिळाली. पुढील दोन दिवस पुणे आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. हवेत गारवा वाढल्यानंतर आता सर्दी-ताप संसर्गाचा हंगामदेखील सुरू झाला आहे.

पुण्यामध्ये दर वर्षीप्रमाणे १२ जूनला मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर काही दिवस पावसाच्या सरी कोसळल्या. पण, दोन आठवड्यात एकदाही मुसळधार पाऊस झालेला नाही. एकीकडे पुणे वेधशाळेच्या नकाशांवर पुण्यावर पावसाचे दाटलेले ढग दिसत असताना शहरात मात्र दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे दोन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो पाऊस मात्र गायब झाला आहे.

दरम्यान, शहरात गुरुवारी कमाल ३१.५ अंश सेल्सियस; तर किमान २२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. संध्याकाळनंतर ढग दाटून आले मात्र केवळ पावसाच्या सरी कोसळल्या. तासभर पावसाची रिपरिप सुरू होती. पुढील दोन दिवसांत शहरात पावसाच्या सरी पडण्याची तसेच कमाल तापमानतही घटण्याची शक्यता आहे.

मान्सून आता महाराष्ट्राचा उर्वरित भागाबरोबरच उत्तर अरबी समुद्र, गुजरात, छत्तीसगड, दक्षिण ओडिसा आणि वायव्य बंगालच्या उपसागारातील काही भागात दाखल झाला आहे. त्याच्या प्रगतीस अनुकूल वातावरण आहे. राज्यात कोकण- गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाची नोंद झीली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायटीत निवडणुका बंधनकारक

$
0
0

फक्त दहा टक्के सोसायटीत प्रक्रिया पूर्ण; तीस सप्टेंबरपर्यंत मुदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व सोसायट्यांना ३० सप्टेंबरपर्यंत या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. परंतु, अद्याप केवळ दहा टक्के सोसायट्यांनीच ही प्रक्रिया पार पाडली आहे,' अशी माहिती पुणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी दिली.

'सहकार विभागातर्फे सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. व ही मुदत ३० सप्टेंबर अखेर संपुष्टात येणार आहे. त्यामुळे सर्व सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना या मुदतीत निवडणुका घेणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे १४ हजार ५०० सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आहेत. परंतु. यापैकी केवळ दहा टक्केच सोसायट्यांनी आतापर्यंत निवडणुका घेतल्या आहेत,' असे पटवर्धन यांनी सांगितले.

'अद्याप निवडणुका न घेतलेल्या सोसायट्यांना हाउसिंग फेडरेशनतर्फे स्मरणपत्र पाठविण्यात येत आहेत. अशा सोसायट्यांनी तातडीने सहकार विभागाशी संपर्क साधून निवडणूक प्रक्रिया सुरू करावी. फेडरेशनतर्फे त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले जाईल,' असे पटवर्धन यांनी सांगितले.

त्याचबरोबर सन २०१४-१५ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपले आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना ३० सप्टेंबर अखेर आपला लेखापरीक्षण अहवाल तयार घेणे, वार्षिक सर्वसाधारण सभेकडून तो मंजूर करून घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सोसायटीने उपविधी (बायलॉज) तयार करून घेतले असल्यास त्यालाही मंजुरी घेणे आवश्यक आहे. पूर्वी ही मुदत १४ ऑगस्टपर्यंत होती. ती आता ३० सप्टेंबर करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'सहकार दरबारा'चे आयोजन

पुणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनतर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सकाळी ११ ते १ या वेळेत सहकार दरबार आयोजित करण्यात येतो. या वेळी सोसायटीतील निवडणुकांसह विविध प्रश्नांवर मोफत मार्गदर्शन केले जाते. नारायण पेठेत विजय टॉकीज शेजारील फेडरेशनच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्य कंपन्यांच्या नूडल्सचीही तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मॅगी' नूडल्समध्ये शिसाचे प्रमाण अधिक आढळल्यानंतर राज्य सरकारने बंदी घातली असली तरी आता अन्य कंपन्यांच्या नूडल्सवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. 'टॉप रमण' आणि 'आयटीसी' कंपनीच्या नूडल्सचे आठ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

'मॅगी'मध्ये 'मोनो ग्लुटामेट' तसेच शिसाचे प्रमाण अधिक आढळल्याने संपूर्ण देशात त्याविरोधात गुंता वाढला होता. परिणामी दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमधून मॅगीवर बंदी घालण्यात आली. त्या पाठोपाठ महाराष्ट्रातही 'मॅगी'मध्ये शिसाचे प्रमाण आढळून आले. त्यामुळे राज्यात बंदी लागू करण्यात आली. 'मॅगी'पाठोपाठ अन्य कंपन्यांच्या काही उत्पादनांना 'फूड सेफ्टी स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया'ने (एफएसएसएआय) काळ्या यादीत टाकले. त्याशिवाय एफएसएसएआयने नूडल्स तयार करणाऱ्या अन्य कंपन्याच्या उत्पादनांचे नमुने ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

'पुणे विभागातून 'मॅगी' नूडल्सचे उत्पादन कंपन्यांना पाठविण्यात आले. त्यानंतर आता 'आयटीसी' आणि 'टॉप रमण' या सारख्या कंपन्यांच्या नूडल्सचे उत्पादन तपासण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
..

पुणे ‍विभागातील पुणे, सांगली, सोलापूर येथून प्रत्येकी दोन आणि सातारा, कोल्हापूर येथून नूडल्सचे प्रत्येकी एक असे आठ नमुने एफडीएने तपासणीसाठी घेतले आहे. हे सर्व नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. हे सर्व आठ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. अहवालात नूडल्समध्ये दोष आढळल्यास त्यानुसार कारवाई करता येणार आहे.
- दिलीप संगत, एफडीए, सहायक आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टंट उद्घाटनाचा... श्रेय लाटण्याचा

$
0
0

काम पूर्ण होण्यापूर्वीच स्वारगेट पुलाचे शिवसेनेकडून उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वारगेट परिसरातील जेधे चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम रखडले असल्याचा दावा कर‌त शहर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी या पुलाचे अनौपचारिक उद्घाटन केले. पुलाचे काम अर्धवट असतानाही पुणेकरांचे लक्ष वेधण्यासाठी हा उद्घाटनाचा स्टंट केल्याची चर्चा रंगली आहे.

स्वारगेट भागात होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी जेधे चौकात उड्डाणपूल उभारण्यात ये‌त आहे. स्वारगेटवरून कात्रजकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम गेले काही वर्षांपासून सुरू असून सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलावर वाहतुकीचे दिशादर्शक फलक, स्पीड ब्रेकर्स, स्ट्रीट लाइट अशी अनेक काम अद्यापही अपूर्ण असल्याने ही सर्व कामे पूर्ण होण्यास अजून काही दिवसांचा अवधी लागणार आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने काम पूर्ण होऊन या पुलाचे उद्घाटन रखडल्याचा दावा करत शहर शिवसेनेने गुरुवारी या उड्डाणपुलाचे अनौपचारिक उद्घाटन केले. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पुणेकरांचे लक्ष वेधण्यासाठी या पुलाचे काम अर्धवट असतानाही शिवसेनेने उद्घाटनाचा स्टंट केल्याची चर्चा पालिकेत सुरू होती. शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात‌ आलेल्या या उद्घाटनाला पक्षाचे गटनेते अशोक हरणावळ, अशोक येनपुरे, अजय भोसले, श्याम देशपांडे, सचिन तावरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बीआरटी मार्ग चारचाकी वाहनांसाठी खुला करणार

महापालिकेत सत्ताधारी असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हट्टामुळे अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण होऊन ते नागरिकांना वापरण्यासाठी अद्यापही खुले झालेले नाहीत. नगररोड तसेच संगमवाडी परिसरात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात आलेला बीआरटी मार्ग वर्षानुवर्षे धूळ खात पडलेला आहे. महापालिका प्रशसनाच्या मनमानी कारभारामुळे या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नगररोडवरील बीआरटी‌ मार्ग चारचाकी वाहनांसाठी खुला करून देण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शुक्रवारी (१९ जूनला) हा मार्ग वाहनचालकांसाठ‌ी खुला करणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी हा उद्योग : महापौर

'स्वागेट येथील जेधे चौकातील अर्धवट पुलाच्या कामाचे शिवसेनेने केलेले उद्घाटन म्हणजे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रकार आहे,' असा टोला महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी लावला. या पुलाचे काम अर्धवट असल्याचे पत्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पालिकेला दिले असून लवकरच हे काम पूर्ण होईल, त्यानंतर याचे उद्घाटन केले जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनासाठी नेत्यांची वेळ मिळो अथवा न मिळो हा पुल उद्घाटनासाठी बंद राहणार नाही, असे धनकवडे यांनी स्पष्ट केले. सातारारोडवरच गेली अनेक वर्षे भुयारी मार्गाचे रखडले आहे. सेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या हितासाठी हे काम तातडीने कसे पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही धनकवडे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळशीबाग महिन्यानंतर खुली

$
0
0

जागा वाटपाचा अंतिम निर्णय दोन दिवसांत होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तुळशीबागेत स्टॉल लावण्यावरून झालेल्या हाणामारीनंतर पालिकेच्या सक्त भूमिकेमुळे तब्बल महिन्याभरापासून बंद असलेला येथील बाजार गुरुवारी दुपारपासून पुन्हा सुरू झाला. पालिकेने बहुतांश व्यावसायिकांना जागा निश्चित करून दिली असली, तरी येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यातील रविवारी भर दुपारी तुळशीबागेत स्टॉल लावण्यावरून जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर पालिकेने तुळशीबागेतील सर्वच अतिक्रमणांवर कारवाई करत येथील सर्व बाजार सक्तीने बंद केला. तुळशीबागेतील अनेक व्यावसायिकांकडे अधिकृत प्रमाणपत्र असूनही पालिकेने जागा आखणी होत नाही, तोपर्यंत व्यवसाय बंदच ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले; तसेच अतिक्रमणांवरून वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी तुळशीबागेतील व्यावसायिकांचे स्थलांतर करण्याबाबत पालिकेतर्फे विचार-विनिमय सुरू होता. आर्यन वाहनतळाच्या तळमजल्यावर स्थलांतर करण्याबाबत चाचपणी केली जात होती; पण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि फेरीवाला संघटनांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे पालिकेने आखून दिलेल्या जागेतच, व्यवसाय करण्याचे मान्य केल्यानंतर 'ए', 'बी' आणि 'सी' अशा तीन विभागांतील व्यावसायिकांच्या जागा निश्चित करण्याचे काम पालिकेतर्फे सुरू होते. बहुतांश व्यावसायिकांना जागा आखून देण्यात आल्या असून, हे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जाईल, अशी माहिती अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांचा ‘योग @ होम’

$
0
0

पाचशेहून अधिक योग प्रशिक्षकांकडून निवासस्थानी प्रशिक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घड्याळाच्या तालावर नाचताना फिटनेसचा योग साधण्यासाठी आता घरी येऊन धडे देणाऱ्या योगशिक्षकांना वाढती मागणी आहे. 'योग अॅट होम'ची प्रात्यक्षिके देणारे पुण्यात सुमारे पाचशे योगशिक्षक असून, रविवारच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर ते सध्या चर्चेत आहेत.

बदलती जीवनशैलीने निमंत्रण दिलेले आजार आणि ताणतणावांपासून सुटका मिळविण्यासाठी नियमित योगासने करावीत, असा निष्कर्ष वेगवेगळ्या संशोधनातून आल्याने जगभरात सध्या योगाची लाट पसरली आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये योगासने 'स्टेटस सिम्बॉल' झाला आहे; पण क्लासच्या वेळा न जुळल्याने पुणेकरांनी आता शिक्षकांनाच स्वतःच्या घरी बोलावून ही विद्या शिकण्याचा योग निवडला आहे. 'सर्वसाधारणपणे चाळीस वर्षांपासून पुढील वयोगटातील नागरिकांकडून घरगुती प्रशिक्षणाची मागणी जास्त आहे. शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांना सामूहिक वर्गामध्ये योगासने करणे शक्य होत नाही, तर काहींच्या ऑफिसच्या वेळा विचित्र असल्याने इच्छा असूनही क्लासला जाता येत नाही, ही मंडळी घरगुती प्रशिक्षणाला प्राधान्य देतात,' अशी माहिती योग शिक्षक मिलिंद सिदिड यांनी दिली.

काही वर्षांपूर्वी केवळ उच्चभ्रू वर्गात हा ट्रेंड होता. आता आयटी-सॉफ्टवेअर कंपन्यांसह उत्साही तरुणांनी या ट्रेंडला पसंती दिली आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये कधी भल्या पहाटे, कधी दुपारी तर कधी संध्याकाळी योगासने शिकण्याचा वर्ग सुरू असल्याचे चित्र दिसते. क्लासच्या शिस्तीचे पालन करता न आल्याने अनेकांवर योगाभ्यास सोडून देण्याची वेळ येते. मात्र, घरपोच योगशिक्षण मिळत असल्याने त्यामध्ये 'ड्रॉपआउट' होण्याची शक्यता राहात नाही.

'घरी जाऊन प्रशिक्षण देणारे शिक्षक संबंधित कुटुंबातील व्यक्तींचा वयोगट, त्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करून आसनांचे प्रकार निश्चित करतात. बहुतांश ठिकाणी संपूर्ण कुटुंबाला प्रशिक्षण देण्याची मागणी केली जाते. योग प्रशिक्षक साधारणः व्यक्तींच्या संख्या आणि तासांनुसार शुल्क आकारतात,' असे पिंपरी-चिंचवडीमधील योग प्रशिक्षक उमा दौंडे यांनी सांगितले.

योगाचा 'सेल्फी' हानिकारक

योगसनाचे महत्त्व आणि प्रकारांविषयी माहिती देणाऱ्या वेबसाइट, सीडी आणि पुस्तके बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, योगासन ही शास्त्रीय आधार असलेली विद्या आहेत. ती शिकताना सुरुवातीला जाणकार व्यक्तींकडून प्रशिक्षण घेतले पाहिजे. स्वतःचे स्वतः चुकीच्या पद्धतीने केलेल्या आसनांमुळे अनेक नागरिकांना कायमस्वरूपी इजा झाल्या आहेत. कोणतेही आसन शिकताना सुरुवातीला शारीरिक क्षमतेचा विचार करावा लागतो, अन्यथा त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात, त्यामुळे या साधनांचा वापर करून नागरिकांनी स्वतःवर प्रयोग करू नयेत, असे आवाहन योग प्रशिक्षक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शत प्रतिशत’ ऑनलाइन

$
0
0

पुण्यातील अकरावी प्रवेशांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला बगल देऊन 'ऑफलाइन'च्या माध्यमातून पुण्यात अकरावी प्रवेशाची 'दुकाने' थाटणाऱ्यांवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लाल फुली मारली आहे. 'प्रवेशाच्या कितीही फेऱ्या घेण्याची वेळ आली तरी चालतील; पण सर्व प्रवेश ऑनलाइनच करणार,' अशी ग्वाही तावडे यांनी 'मटा'ला दिली.

अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत गेल्या वर्षी तब्बल ३९ टक्के प्रवेश ऑफलाइन, म्हणजेच कॉलेज स्तरावर झाले होते. ते करताना प्रवेशाचे सर्व निकष धाब्यावर बसविण्यात आल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या. त्याबाबत मुंबई हायकोर्टात याचिकादेखील दाखल करण्यात आली. 'मटा'ने सातत्याने पाठपुरावा करून अकरावीचे सर्व प्रवेश पारदर्शक व ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा आग्रह धरला होता. तावडे यांच्या भूमिकेमुळे 'मटा'च्या लढ्याला यश मिळाले आहे; तसेच ऑफलाइन प्रवेशाची माहिती दडवून आणि खोटा कट-ऑफ देऊन प्रवेशाची दुकानदारी थाटणाऱ्या घटकांनादेखील चाप बसणार आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळाबाबत 'मटा'तून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्ताची माहिती तावडे यांनी घेतली. 'मटा'च्या प्रतिनिधीकडून या संदर्भात सविस्तर तपशीलदेखील जाणून घेतला. पुण्यातील ऑनलाइन प्रक्रिया ही आदर्शवत मानली जात होती. मात्र, त्यामधील ३९ टक्के प्रवेश ऑनलाइन प्रवेशाच्या धोरणाला हरताळ फासून होत असल्याबद्दल तावडे यांनी नाराजी व्यक्त केली. ही सर्व नियमबाह्य कृत्ये प्रवेश समिती खपवून कशी घेते, असा सवालही उपस्थित केला. 'या संदर्भात प्रवेश समितीकडून स्वतंत्रपणे अहवाल मागवून घेतला जाईल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रवेश समितीमधील घटकांवर कडक कारवाई करण्यात येईल,' असा इशाराही दिला.

आजही स्वीकारणार ऑनलाइन अर्ज

अकरावीच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या दुसऱ्या टप्प्याला एक दिवसाची मुदतवाढ दिल्याचे प्रवेश समितीने गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थी आपले अर्ज आज, शुक्रवारी सायंकाळपर्यंत (१९ जून) अंतिम करू शकतील. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ७४,८७६ विद्यार्थ्यांनी अकरावीचे अर्ज भरले. त्यापैकी ७०,४०५ विद्यार्थ्यांनी अर्ज अॅप्रूव्ह्ड केले आहेत. ६६,१६५ विद्यार्थ्यांनी कॉलेजांचे पर्याय नोंदवून अर्ज अंतिम केल्याचेही प्रवेश समितीने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेने ठरवावे कसे वागायचे ?

$
0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांचा टोला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'युतीत आम्ही मोठा भाऊ आहे, आमची संख्या अधिक असूनही आम्ही शिवसेनेशी चांगलेच वागायचे ठरविले आहे. शिवसेनेने कसे वागायचे, ते त्यांनी ठरवावे,' असा टोला पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी शिवसेनेला लगावला. 'स्वारगेट येथील उड्डाणपुलाची कामे अपूर्ण असून ती पूर्ण झाल्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन करू,' असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने स्वारगेट उड्डाणपुलाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. त्यासंदर्भात बापट यांना विचारले असता, यासंदर्भात महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. 'हा पूल उभारण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता. या पुलाची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत,' असे महापौरांनी आपल्याला सांगितले. यापुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे आणि आपण अशा सर्वांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन व्हावे, असे नियोजन असल्याचे बापट यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही काळात निम्हण यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. त्याबाबत विचारले असता, 'युतीमध्ये आमची संख्या अधिक आहे. आम्ही मोठा भाऊ असून त्याप्रमाणे आम्ही वागत आहोत. आम्ही मित्रपक्षाशी चांगले वागायचे, असे ठरविले आहे, त्यांनी कसे वागावे, हे ते ठरवतील,' अशी टिप्पणी त्यांनी केली.

या हंगामात बेबी कॅनॉलची चाचणी

'शहरातून प्रक्रिया केलेले पाणी शेतीला पुनर्वापरासाठी देण्याच्या प्रकल्पाच्या मार्गातील अडसर दूर झाला आहे. त्यानंतर काल रात्रीपासूनच पुढील कामांना सुरुवात झाली आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये उरलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून येत्या पावसाळ्यात या योजनेची चाचणी घेण्यात येईल,' असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यभर पावसाची शक्यता

$
0
0

पश्चिम किनारपट्टी आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी हवामान अनुकूल झाल्यामुळे येत्या आठवड्यात राज्यभर मान्सून सक्रिय राहणार आहे. बंगालच्या उपसागरात हंगामातील पहिले कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी येत्या पाच दिवसांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

राज्यात मान्सून दाखल होऊनही पावसाला सुरुवात न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. गेला आठवडाभर कोकण किनारपट्टी वगळता राज्याच्या इतर भागांत पावसाने विशेष हजेरी लावली नाही. आता मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे आठवडाभर सर्वदूर पावसाची अपेक्षा आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून, दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोरही अनुकूल असल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत शुक्रवारपासून पावसाला सुरुवात होईल. सध्याच्या अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा रखडत सुरू असलेला प्रवासही वेग धरणार असून, पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बंगालचा उपसागर व्यापण्याची शक्यता असल्याचे 'आयएमडी'ने म्हटले आहे.

जून कोरडा नाही

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा जून कोरडा जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, 'आयएमडी'ने जाहीर केलेल्या एक ते १८ जून या कालावधीतील पावसाच्या आकडेवारीनुसार जूनच्या पूर्वार्धात राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. विदर्भात या कालावधीतील सरासरीपेक्षा ८० टक्के अधिक, तर मराठवाड्यात ३६ टक्के अधिक पाऊस झाला. तर, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १० टक्के कमी आणि कोकण किनारपट्टीवर १७ टक्के कमी पाऊस झाला. राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्यामुळे जून कोरडा जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राण्यांची कमाई ६६ लाखांची

$
0
0

कात्रज संग्रहालयाला उन्हाळ्यात पाच लाख पर्यटकांची भेट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डिस्कव्हरी, तसेच नॅशनल जिऑग्राफीच्या विविध मालिकांमुळे मुलांमध्ये वन्यप्राण्यांविषयी कुतूहल वाढत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्यप्राण्यांनी तब्बल ६६ लाखांची कमाई केली आहे. एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांत तब्बल पाच लाख पर्यटकांनी भेट दिली.

पुणेकरांच्या 'वन डे पिकनिक' च्या ठिकाणांमध्ये कात्रजचे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय वरच्या क्रमांवर असल्याने वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. या वर्षी एप्रिल महिन्यात एक लाख ३७ हजार ९५, तर मे महिन्यात दोन लाख ६३ हजार ५०७ पर्यटकांनी संग्रहालयात हजेरी लावली. गेल्या वर्षी मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने धरून चार लाख ८३ हजार पर्यटकांनी भेट दिली होती. 'राजीव गांधी प्राणी संग्रहालय 'प्लास्टिक कचरामुक्त' करण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे. पर्यटकांना प्रवेश देतानाच त्यांच्याकडील सामानाची तपासणी करून प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या आम्ही ताब्यात घेत आहोत. प्लास्टिकची पाण्याची बाटली आत नेण्यासाठी डिपॉझिटही आकारले जाते आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत कचऱ्याचे प्रमाण वेगाने घटले आहे. उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या वाढली, तरी प्लास्टिकबंदी पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. नागरिकांमध्येही अलिकडे जागृती झाल्याचे दिसते आहे,' अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी दिली.

वर्ष भेट दिलेले पर्यटक प्रवेश शुल्क

२०१४ (एप्रिल ते १५ जून) ४,८३,३५४ ६२,८३,०१०

२०१५ (एप्रिल ते १५ जून) ५,०८,१६९ ६६, २४,७९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अट्टल चोर गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चतुश्रृंगी पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले आहे. या चोरांनी बाणेर परिसरात चार घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपींनी घरफोडीतील रक्कम पनवेल येथे डान्सबारमध्ये उडवली आहे. पोलिसांनी बार मालक तसेच आरोपींकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

सकाळनगर येथील सुरेश पाडुरंग पांडव यांच्या घरातून सात लाख रुपयांची रोकड चोरण्यात आली होती. जनवाडी येथील अतुल सुभाष बिचवे यांच्या घरातून चोरण्यात आलेले सोन्याचांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. विकास विजय आगरवाल (रा. बाणेर) यांच्या ऑफिसमधून सोन्याचांदीचे शिक्के चोरण्यात आले. त्यापैकी चांदीचे शिक्के जप्त करण्यात आले आहेत. गौरवजीत सिंग यांच्या घरातून दोन लॅपटॉप चोरीस गेले असून, ते जप्त करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांनी दिली.

बाणेर येथील युतिका अपार्टमेंटमधून चोरटे दुचाकीवरून घाईघाईने जात होते. या वेळी तेथील सुरक्षारक्षकाने दुचाकीस्वारांना रजिस्टरमध्ये एंट्री करण्यास सांगितले होते. चोरट्यांनी रजिस्टरमध्ये एंट्री करताना दुचाकीचा चुकीचा नंबर लिहिला होता. हा प्रकार सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकीचा नंबर दुरुस्त करून तशी नोंद केली. याच अपार्टमेंटमधील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना दुचाकीच्या नंबरचा उपयोग झाला.

भिकाजी नारायण गुणके (वय ३०, सध्या रा. नवी सांगवी, मूळ रा. कोल्हापूर) आणि विकास सुरेश लाहुरकर (रा. नवी सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुणके हा कोल्हापूर येथून बसने पुण्यात येत असे. त्यानंतर हे दोघे जण बाणेर, औंध परिसरात दुपारी अनेक फ्लॅट बंद असल्याचा फायदा उठवून घरफोड्या करत. गुणके याला २०११मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झाली होती.

फौजदार राजारामसिंग चौहान, तुषार पाचपुते, शाम शिर्के, कर्मचारी हमीद शेख, लक्ष्मण ढमाले, बाळू गायकवाड, शरद पाटील, संजय शिंदे, महेश बामगुडे, राकेश खुणवे, चेतन गोरे, संतोष कदम, वंदना शिर्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पौड, वेल्ह्यात होणार ग्राम न्यायालय सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

न्याय आपल्या दारी या संकल्पनेनुसार पक्षकारांचा कोर्टात येण्यासाठी लागणारा वेळ वाचावा म्हणून ग्रामन्यायालय हा उपक्रम पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येतो आहे. लोणी काळभोर येथे सध्या ग्रामन्यायालय भरविण्यात येत असून वेल्हे आणि पौड येथे ग्रामन्यायालय सुरु करण्याचे नियोजन आहे.

कोर्टात दाखल होणाऱ्या खटल्यांची आणि प्रलंबित खटल्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाचा ताण वाढतो आहे. कोर्टात येणाऱ्या पक्षकारांचा वेळ वाचावा, तसेच त्यांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी 'ग्राम न्यायालय' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पक्षकारांना आपल्या केससाठी जिल्हा न्यायालयात तसेच तालुका न्यायालयात जाण्यासाठी लागणारा वेळ वाचावा म्हणून 'ग्राम न्यायालय' सुरू करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून 'ग्राम न्यायालय' हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. दोन वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या तसेच दंडाची तरतूद असलेल्या केसेस या ग्राम न्यायालयात चालविण्यात येतात. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ग्राम न्यायालय भरविण्यात येते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. बी. म्हटलकर, सरकारी वकील राजेंद्र सूर्यवंशी या ग्राम न्यायालयाचे कामकाज पाहतात. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील सात नंबर कोर्टातील कर्मचारी या न्यायालयाचे कार्यालय कामकाज पाहतात.

'कदम वाकवस्ती येथील ग्रामपंचायातीच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ग्राम न्यायालय भरविण्यात येते. दर​ महिन्याला ग्राम न्यायालयात ४० - ४५ केसेस निकाली काढण्यात येतात,' अशी माहिती सरकारी वकील राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’वर अपघात; २ ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर ओझर्डे गावच्या हद्दीत व उर्से टोल नाक्याजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या विचित्र अपघातांत दोन ठार १५ जण जखमी झाले आहेत. हे अपघात अनुक्रमे गुरुवारी रात्री उशिरा व शुक्रवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडले.

बसचालक मधुकर शिवाजी देवघरे (वय ४०, रा. जावळी, सातारा) व सुवर्णा इसंगप्पा गणापुरे (३५, रा.कर्नाटक) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. या अपघातात बसचालक मधुकर देवघरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री उशिरा पावणे बारा वाजता ओझर्डे गावच्या हद्दीत झाला.

दुसऱ्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या ट्रकने पुढे जात असलेल्या टेम्पोला मागून धडक देऊन ट्रक विरुद्ध दिशेला पुणे-मुंबई लेनवर गेला. या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी कर्नाटक राज्यातील एक खासगी लक्झरी बस ट्रकवर आदळून मार्गालगत उलटली. यात बसमधील सुवर्णा गणापुरे या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर १० प्रवाशी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता उर्से टोलनाक्याजवळील फूडमॉल समोर झाला. या घटनेचा पुढील तपास तळेगावचे पोलिस हवालदार एम. व्ही. शेंडगे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांचे आजही काम बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी काम बंद आंदोलन करण्यात आले असून आज, शनिवारीही वकील कोर्टात उभे राहणार नाहीत.

शहरातील अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी वकिलांना भेऊन खंडपीठ मागणीसाठी पा​ठिंबा दिला. वकिलांकडून शनिवारीही काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच खंडपीठाच्या मागणीसाठी लक्ष वेधण्यासाठी कोर्टात वकिल मानवी साखळी करणार आहेत. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शिवाजीनगर जिल्हा न्यायालय, फॅमिली कोर्ट, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या वकिलांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला. शुक्रवारी झालेल्या आंदोलनात पुण्यातील वकिलांनी एकीचे दर्शन घडविले. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस करणाऱ्या सिनिअर, ज्युनिअर वकिलांनी उत्सफुर्तपणे या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. त्याचा परिणाम कोर्टातील कामकाजावर झाला. कोर्टातील कामकाज ठप्प झाले होते.

खंडपीठाच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी आंदोलन सुरू करण्यात आले. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील गेट नंबर एक, तीन आणि चार येथे जमून वकिलांनी आंदोलन सुरू केले. कोर्टाच्या गेटवर अनेक जमून अनेक सिनि​​अर वकिलांनी इतर वकिलांना कोर्टाच्या कामकाजात सहभागी न होण्याच्या सूचना दिल्या. वकिलांनी त्याला पाठिंबा दिला. दरम्यान, खडकीतही वकिलांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कोर्ट परिसरात वर्दळ कमी

​वकिलांच्या काम बंद आंदोलनामुळे कोर्टाच्या आवारात एरवी असलेली पक्षकारांची गर्दी कमी होती. वकिलांनी कामकाज बंद आंदोलन केल्यामुळे कोर्टातील कँटीन बंद ठेवण्यात आले होते. कोर्टातील ग्रंथालय, झेरॉक्स मशिन बंद ठेवण्यात आले होते. तसेच कोर्टातील वकिलांचे बार रुम रिकामे होते. कोर्टात वकिलांची सोसायटी असून या सोसायटीकडून स्टॅम्प पेपर, तसेच कागदपत्रांची विक्री होते. वकिलांची सोसायटीही शुक्रवारी आंदोलनाला पाठिंबा म्हणून बंद ठेवण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कँटोन्मेंटमध्ये व्यापारी आक्रमक

$
0
0

पुणे : पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यामुळे व्यापाऱ्यांना दुप्पट टॅक्स भरावा लागणार असल्याने याविरोधात पुणे कॅम्प मर्चंट्स असोसिएशनने २३ जून रोजी दुकाने बंद ठेऊन निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरातील ६२ कँटोन्मेंट बोर्डांपैकी फक्त पुणे कँटोन्मेंटमध्येच 'एलबीटी' लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने महापालिकांमधील 'एलबीटी' ऑगस्टपासून रद्द करण्याची घोषणा केली असतानाही पुणे कँटोन्मेंटमध्ये 'एलबीटी' लावण्यात आला आहे. बोर्डातील 'एलबीटी'मुळे व्यापाऱ्यांना दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे. व्यापाऱ्यांनी पुणे महापालिकेच्या हद्दीतून माल आणण्यानंतर महापालिकेकडे 'एलबीटी' भरला असला, तरी बोर्डालाही 'एलबीटी' द्यावा लागणार आहे. त्यामुळे या विरोधात २३ जून रोजी दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे अतिरिक्त आयुक्त पराग शहा यांनी सांगितले. अनेक व्यापाऱ्यांची दुकाने दोन्हीकडे आहेत. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांना दोनवेळा 'एलबीटी' भरावा लागणार आहे. त्याचा सामान्य नागरिकांना भुर्दंड पडणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एलबीटी’वरून वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिका आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड यांच्यात जकातीची थकबाकी आणि पाण्याच्या बिलावरून वादंग झाल्यानंतर आता स्थानिक संस्था करावरून (एलबीटी) वाद उफाळून आला आहे. महापालिकेने बोर्डाच्या हद्दीतील काही व्यापाऱ्यांकडून 'एलबीटी' वसूल केल्याचे निदर्शनास आले असून आतापर्यंत ​बोर्डाच्या परिसरातील किती व्यापाऱ्यांकडून 'एलबीटी' घेण्यात आली, याची माहिती देण्याचे पत्र बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेला पाठविले आहे.

महापालिका आणि बोर्ड यांच्यात जकातीची थकबाकी आणि पाणीपट्टी यावरून वाद निर्माण झाला होता. महापालिकेकडे बोर्डाची २४ कोटी ७९ लाख रुपयांची जकात थकबाकी असून, महापालिकेने दिलेले पाण्याचे बील चुकीचे असल्याचा दावा बोर्डाने केला आहे. महापालिकेने आरोप फेटाळून लावले आहेत. बोर्डाला 'एलबीटी' वसूल करण्यास केंद्र सरकारने चार जून रोजी परवानगी दिली आहे. त्यानुसार बोर्डाने 'एलबीटी'ची नोंदणी करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच नोंदणी करण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत.

बोर्डाने नोटिसा पाठविल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी बोर्डाच्या कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेने त्यांच्याकडून 'एलबीटी' वसूल केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यावरून महापालिकेने बोर्डाच्या हद्दीतून 'एलबीटी' गोळा केल्याचे निदर्शनास आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाणी बिलावरून वाद शिगेला

बोर्डाने पाण्याचे बील भरले नसल्याने मार्च महिन्यात बोर्डाच्या मुख्यालयाचा पाणीपुरवठा तोडण्यासाठी महापालिकेचे पथक गेले होते. त्यानंतर दोन्ही सरकारी यंत्रणांमधील वाद शिगेला पोहोचला होता. महापालिकेने कारवाई केल्यास बोर्डाच्या हद्दीत महापालिकेने टाकलेल्या पाइपलाइन तोडण्याचा इशाराही बोर्डाने दिला होता. हा वाद थंडावला असताना, आता 'एलबीटी' वसूल करण्यावरून पुन्हा वाद उफाळून आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंनिस’चे नवे अभियान ‘हिंसा के खिलाफ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 'हिंसा के खिलाफ, मानवता की ओर' अभियान राबवण्यात येणार आहे. अभियानाची सुरुवात २० जुलै रोजी मुंबईत धरणे आंदोलनाने करण्यात येणार आहे.

नाशिक येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, सुशीला मुंडे, माधव बावगे आदी उपस्थित होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संघटनेचे रौप्य वर्षपूर्ती अधिवेशन आठ व नऊ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे; तसेच सात ऑगस्ट रोजी विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद होणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या काळात राज्यव्यापी धरणे आंदोलन झाल्यानंर २० ऑगस्टपर्यंत राज्यभरात निषेध मोहीम राबवली जाणार आहे. त्यात राष्ट्रपतींच्या नावे पोस्टकार्ड लिहिणे, लोकप्रतिनिधींना जाब विचारणे, जिल्हा-तालुकानिहाय धरणे, निदर्शने, मोर्चे आदी कार्यक्रमांचे नियोजन आहे.

कुंभमेळ्यावर 'अंनिस'ची टीका

नाशिक येथे ऑगस्टपासून पुढील वर्षभर सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा मिथकांवर आधारित, पर्यावरणाचे प्रदूषण करणारा, विकासाचे प्राधान्यक्रम बदलवणारा, सामाजिक नितीमत्ता व संविधानिक मूल्यांना हरताळ फासणारा असतानाही त्यासाठी केंद्र व राज्य सरकार भरीव आर्थिक तरतूद करत असल्याची टीकाही अंनिसने केली. या कुंभमेळ्याच्या आयोजनामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची चर्चाही अंनिसच्या वतीने केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा बेकायदा रस्ते उखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जांभुळवाडी ते कात्रज नवीन बोगद्यादरम्यानच्या महामार्गावरून डोंगरावर जाण्यासाठी सहा ठिकाणी तयार केलेला बेकायदा रस्ता शुक्रवारी चर खोदून उखडण्यात आला. जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली; तसेच डोंगरावर जाण्यासाठी अशा रस्त्यांचा अनाधिकराने वापर करण्यात येऊ नये, असे फलकही लावले आहेत.

या कारवाईला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. 'महामार्गालगत आमच्या मालकीची जमीन आहे. या जमिनीवर जाण्यासाठी कोणताही पर्याय दिलेला नाही. महामार्गाचे काम करताना जमिनीवर जाण्यासाठी सर्व्हिस रोड करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता झाली नसल्याने महामार्गावरून आमच्या जमिनीवर जावे लागते. जनावरे चारण्यासाठी याच रस्त्यांचा अवलंब करावा लागत असल्याने ही कारवाई थांबविण्यात यावी,' अशी मागणी ग्रामस्थ अॅड. मुरलीधर जांभळे, अमर चिंधे, नितीन जांभळे, दत्तात्रय जांभळे यांनी केली आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील जांभूळवाडी ते नवीन बोगद्यादरम्यान हॉटेलचालक, गगनगिरी सोसायटी, कात्रज हिल रिसोर्ट व इतर व्यावसायिकांनी डोंगरावर जाण्यासाठी सहा ठिकाणी रस्ते तयार केले आहेत. महामार्गावरून हे रस्ते कोणाचीही परवानगी न घेता करण्यात आले आहेत. त्यामुळे हे रस्ते चर खोदून बंद करण्याची कारवाई हवेली तहसीलदारांकडून करण्यात आली. गतवर्षीही हे बेकायदा रस्ते बंद करून त्याचा वापर करण्यास प्रशासनाने मनाई केली होती; परंतु त्यानंतर हे रस्ते पूर्ववत करण्यात आले.

ही फसवणूकच...

महामार्गाला जोडून करण्यात आलेले हे रस्ते बंद करण्याच्या कारवाईला आधी विरोध झाला. आमच्या जागेत जाण्यासाठी महामार्गावरून रस्ता देण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहे. त्याचा लेखी पत्रव्यवहारही उपलब्ध आहे. मात्र, हे आश्वासन पाळले गेले नाही. उलट ग्रामस्थांची फसवणूकच केली गेली. त्यामुळे यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे उपसरपंच बाळासाहेब जांभळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखळी चोरीच्या शहरात दोन घटना

$
0
0

पुणेः पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरून नेल्याच्या दोन घटना गुरुवारी सदाशिव पेठ आणि बिबवेवाडी येथे घडल्या. दोन्ही घटनांमध्ये एकूण ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला.

सदाशिव पेठेतील राम मंदिरासमोरून गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास एक महिला (५७) पायी चालल्या असताना त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून तोडून नेली. या प्रकरणी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, बिबवेवाडी येथील मेघस्तर्श अपार्टमेंटसमोरील रोडवर दुपारी पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे सोनसाखळी हिसकावून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images